सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
६८ सार्थ तुकारामगाथा गाईंच्या बरोबर रानात, वनात जात असे त्याच्या सवंगड्यांबरोबर त्याची शिदोरी पाठीशी असे वनात गेल्यावर काही खेळ होत असत, नीडाविलास झाला की मग शिदोऱ्या सोडून जेवण होई यावेळी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र होत असाव्यात या मिश्रणास काला म्हणतात यात श्रीकृष्णचीही शिदोरी मिसळलेली असल्याने तिची चव या काल्यात आलेली असते त्यामुळे फार महत्त्व या काल्यास येते श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी यांच्या बालजीवनातील हे मधुर प्रसंग मराठी संतांनी मनापासून वर्णन केले आहेत श्रीकृष्णाच्या बालजीवनातील हा रम्य आविष्कार अतिशय लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी वनातील विविध क्रीडांचे व गोपांच्या खेळांचे फार सुंदर वर्णन केले आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हा श्रीकृष्णाचा बाल अवतार अस- ल्यामुळे या वनक्रीडांना फारच महत्त्व आहे या दृष्टीने हे काल्याचे अभंग पाहण्यासारखे आहेत यात गोळणी, हमामा, हुतुतू, चेंडूफळी, फुगड्या, हुवरी, दळण, कांडण, टिपरी, विटीदांडू, मृदंगपाट्या इत्यादी विविध खेळांचे रूपकात्मक वर्णन असून त्यातून अध्यात्माचे व परमार्थविचाराचे सुबोध विवेचन करण्यात आले आहे नुसता बोध कोरडा होतो, तो खेळाच्या, बाललीलांच्या रूपांनी दिल्यास अधिक पटतो श्रीकृष्ण व त्याचे बालमित्र यांनी मधुवनात केलेल्या क्रीडांचे अवीट वर्णन संतांच्या अभंगांतून पाहावयास सापडते श्रीकृष्णाची सुंदर अशी बालमूर्ती, त्याचा डौलदार असा गवळ्याचा वेष, गळ्यात हार, डोक्यावर मोरपिसांची टोपी, आणि भोवती साधे साधे पण श्रीकृष्णावर अपार प्रेम असलेले त्याचे अनेक सोबती यांच्या विविध खेळांचे प्रकार, त्यांच एकमेकांवर रागावणे, रुसणे, श्रीकृष्णाने समजूत काढणे, मग त्याच्या शिदोऱ्या सुटणे, त्यांची वनातील पंगत बसणे, कुणाची भाकरी, कुणाचा भात, कुणाचे दहीदूध, कुणाच्या लाह्या यांचेमधूनच सर्व मिश्रण-काला-करून त सर्वांना वाटणे इत्यादी विविध क्रीडामधील आनंद व अलौकिक सुख संतांनी काल्यावरचे अभंग करून स्वतः लुटले व इतरांसाठी सिद्ध केले बाम्होबा, पेंद्या इत्यादी विशिष्ट मित्रांचे उल्लेख संतांच्या अभंगांत येत असतात काही मित्र बोबडे, लंगडे, खुजे, पांगळे, बहिरे होते त्यांची मजेदार वर्णने त्यांनी केलेली आहेत. 'तुला कमाल ले, संभाल अपुल्या गाई' या नावाने एकनाथांचे एक प्रसिद्ध गीत या संबंधात ध्यानात येण्यासारखे आहे विविध खेळ, क्रीडा, भांडणे, मारामारी, पुनः गोडी, सलोखा, श्रीकृष्णाचे समजावणे व मग सर्वांचे एकत्रित भोजन यातील सुख भोगण्यासाठी स्वर्गातील देवसुद्धा पृथ्वीवर येण्याची इच्छा करतात ज्ञानेश्वरांच्या काळापासून हे काल्याचे अभंग प्रसिद्ध आहेत एखाद्या उत्सवाच्या अखेरीस, यात्रेच्या शेवटच्या दिवशी, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी काल्याचे कीर्तन करण्याची पद्धती अजून आहे 'वैष्णवाचा मेळ सबळ मिळाला । विठ्ठल नामें काला पदरींसी, 'म्हणून निवृत्तिनाथांनी याचे वर्णन केले आहे 'सोडिल्या शिदोरी । काला करी दहीभात । प्यारे अवघे समस्त । हरी गोपाळांसी देत' असे या काल्याचे वर्णन श्रीसेनामहाराजांनी केले आहे 'देव भक्त दोन्ही करिताती काला । तयाच्या सुखाला वर्णो कोण।' या शब्दात एकनाथानी काल्याच्या सुखाचे वर्णन केले आहे 'अवघ्या सोडियेल्या मोटा । आजीचा दही काला केला गोमटा ॥ घ्यारे घ्यारे दहीभात । आम्हा देतो पंढरीनाथ' अशा भाषेत संत भानुदासांनी या प्रेमसुखाची महती गाइली आहे 'एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळांशीं लाह्या बांटी' अशी साक्ष ज्ञानेश्वरांच्याबद्दल जनाबाईने दिली आहे तुकाराम महाराजांनी तर या काल्याचे 'आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी' इतके वर्णन अतिशय विस्ताराने पण तन्मयतेने केले आहे श्रीकृष्ण व त्याचे मित्र यांच्या प्रेमाचे इतके अवीट वर्णन इतरत्र सापडणे कठिण आहे या प्रेमसुखाच्या दर्शनाने साऱ्या ब्रह्मांडास जणू वेड लागले 'काल्याचिये असे । देव जळीं जाले मासे' असे वर्णन तुकोबांनी एके ठिकाणी केले आहे 'धर्ची धर्ची घेऊ घास । ब्रह्मरस आवडी' अशी याची महती असल्याने 'गोकुळीच्या सुखा । अतपार नाही लेखा' असा निर्णय तुबांनी एका अभंगात दिला आहे काल्याच्या या सर्व अभंगात भगवंताचे प्रेम सर्वांवर कसे सारख्या प्रमाणात असते, कधी दुःखीकष्टी भक्तांकडे त्याचे अधिकच लक्ष कसे असते हेही ध्यानात येते प्रभुप्रेमाची व अध्यात्माची खेळता खेळता शिकवण देण्याची सोय संतांनी या काल्याच्या अभंगात केलेली आहे पंढरपूरच्या यात्रेतही काल्याच्या या प्रसंगास फार महत्त्व असते पंढरपूरच्या दक्षिणेस सुमारे एका मैलावर गोपाळपूर नावाची छोटी वस्ती आहे तेथे गोपाळकृष्णाचे देऊळ आहे विष्णुपद, गोपाळपुरा याच भागात श्रीकृष्णाने
सार्थ तुकारामगाथा ६९ आपल्या गोपाल मित्राबरोबर आनन्दगत वहून बालचात्री मौज लुटलो असे मागतात येथील मंदिरात यशोदेची दधिमथनाची जागा, मुसळ, जाते असा सखारही दाखविला जातो मंदिराच्या पूर्वेस असलेल्या पटांगणात आषाढ व वात्तिक शु. १५ स काल्याचा थाट होतो येथील काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय न परतण्याचा कित्येक वार- कऱ्याचा प्रघात आहे कृष्णावतारी झाल्या या बालगोलाचे कौतुक भक्तिप्रेमाच्या पोटी अजूनही ताजे टवटवीत असे आहे १४० अजुनि का थोर पोरा न म्हणसी फिर । धरुनिया धीर लाजे बुर निघाला ॥ १ ॥ मोकळा होतासि का रे पडिलासि डाईं । वरिलाचा भार आता उतरेसा नाही ॥ २ ॥ मेळवूनि मेळा एकाएकी दिली मिठी । कवळिले एक बहु बैसविली पाठी ॥ ३ ॥ तळील ते वरी वरील ते येते तळा । न सुटे तोयरी येथे गुंतलिया खेळा ॥ ४ ॥ सांडिता ठाव पुढे सैल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥ ५ ॥ तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावे तोच बरें वरी न ये डाय ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -थोर-पुर, फिर-बरोबर, बुर-भुसा, डाय-डाव अर्थ - अरे गृहस्था, जन्ममृत्यूच्या चक्रात इतक्या चकरा मारल्यास तरी अजून 'पुरे' कसे म्हणत नाहीस ? सशोधाने धैर्य धरून तू राहिलास तरी त्यामुळे तुझा भुसा निघाला असेल फार ताप झाला असेल १ चागला देहादिकाच्या व त्रिगुणाच्या बंधनातून प्रथम मोकळा होतास, मग या या प्रपंचाच्या डवात का पडलास ? आता प्रपचाचा हा भार तुझ्या डोक्यावर आहे तो खाली कसा उतरणार ? २ पचमहाभूताचा मेळा मिळवून आत्म्याने शरीराला मिठी दिल्यामुळे अनेक विकाराने ओझे आता पाठीवर येऊन बसले आहे ३ या प्रपचाच्या खेळात आता काही पुण्यकर्म करून खालचे थर येतील, दुष्ट कर्मादिकामुळे वरचे तळाशी येतील, पण येथील खेळात जोपर्यंत ते गुंतले आहेत तोपर्यंत त्याची पूर्ण सुटका मात्र होणार नाही ४ हा प्रपचरूपी डाव सोडून देताना हात सैल धर, जो चढेल तो पडेल अशी गोष्ट ध्यानात असू द्या ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा देहबुद्धी धारण करून प्रपंचाचा डाव खेळावा तरी किती ? देहात्मबुद्धी वृथा धारण करून हा डाव न खेळणेच अधिक बरे कारण मग अगावर डाव तरी येणार नाही ६ कोडें-अभंग २ १४१ कोडें रे कोडें ऐका हें फोडें । उगवूनि फार राहे गुतोनिया थोडें ॥ १ ॥ पुसतसे सागा मी हे माझें ऐसे काई । रूसू नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ २ ॥ सांगतो हैं मूळ काही न धरावी खती । जाले जीवो मेले मरो प्रारब्धा हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे अभिमान साडावा सकळी । नये अगावरी वाया येऊ देऊ कळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -उगवून-स्पष्ट होऊन सुगवे-समजणार नाही, कळी-लचाड अर्थ - एक कोडे आहे माझे ऐकता का ? त्याचे उत्तर सांगता का ? ते स्पष्ट होणारे फार असून गुप्त असे थोडेच आहे १ रागावू नका, पण ज्याला हे कोडे सुटणार नाही तो आपल्या आईशी सबंध ठेवणारा होईल मी व माझे असे हे काय आहे ? या प्रश्नाचे उत्तर हवे २ मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती अशी की तुम्ही कसलीच चिंता करू नका हा देह प्रारब्धामुळे जन्मास येतो, मरण पावतो, त्याच्या जन्माचा या मरणाचा विचार तुम्ही कशास करता ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देहात्म बुद्धीचा हा सर्व अभिमान तुम्ही सोडून द्यावा कोणत्याही विकाराचे लचाड तुमच्या अगावर येऊ देऊ नका ४
७० सार्थ तुकारामगाथा १४२ नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥ १ ॥ आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ २ ॥ कमाईस मोल येथें नका रीस मानू । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥ ३ ॥ तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयजयंत मग सेवटाला एक वेळीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-नुगवें-उलगडत नाहीं, उगवून-समजावून, ताळा-मेळ, रीस-राग. अर्थ - भाई, तुझ्या बुद्धीने जे तुला समजणार नाही ते मी आता उलगडून दाखविले आहे. आता त्याचा स्वतःशी मेळ बसवून तुम्ही लवकर शुद्ध भाव मनात निर्माण करा. १ स्वरूपाला एकदा जाणल्यावर आता काही शोधाायचे, जाणून घ्यायचे काही उरत नाही. २ स्वतःच्या कमाईलाच येथे मोल आहे; याचा राग मानू नका, मला इथे कुणाची निवड करता येत नाही की कुणाचे वर्णनही मी करु शकत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, एकसारखे कान्होवाचे नाव घ्या, म्हणजे शेवटी एकाद्या वेळी तुमचा जय गजरिने होईल. ४ १४३ हरुष आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥ १ ॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ २ ॥ काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी न ठेवा ॥ ३ ॥ जें सुख दृष्टी आहे । तेंच अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळीकाळ तें बापुडें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा-हरूप-हर्ष, आनंद, उरी-शिल्लक अर्थ :- ईश्वराच्या नावाचा घोष सतत करणे हाच मोठ्या आनंदाचा प्रसंग आहे. कोणत्या दैववानास हा वाटा मिळणार आहे ? १ या प्राप्तीसाठी अनेक जन्मांच्या पुण्याचा साठा जवळ असेल तरच तो अधिकारी होईल. २ अरे भाईनो, पाहता काय ? आनंदाने नाचा ना. हात धरा, गर्दीगर्दीने ओळ धरा. या भक्तिरसाचे पोटभर सेवन असे करा की काही उरू देऊ नका ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या दृष्टीपुढे जे परमेश्वराचे सुख उभे आहे तेच तुमच्या अंतःकरणात स्थिर, होऊ द्या. मग त्याच्यापुढे प्रत्यक्ष यमही बापुडा पराजित होऊन जाईल. ४ १४४ अवघे गोपाळ म्हणतो या रे करूं काला । काय कोणाची शिदोरी ते पाहों द्या मला ॥ नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरेंच बोला । ग्रंथी ग्रंथला तोचि रे येथें भोयंडा त्याला ॥ १ ॥ घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुले कांही । एकां एक ग्याही बहुत देती मोकळें नाहीं ॥ ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीन तेंही ॥ २ ॥ एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ॥ एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा ।
सार्थ तुकारामगाथा ७१ एक ते करूनि आराले आतां ऐसेचि घाटा ॥ ३ ॥ एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळल्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोवतीं घेती ॥ एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जोवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥ ४ ॥ एकीं एके वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुले । आपण घरींच गुंतलें माळा नासिलीं फुले ॥ गांठीचें तें सोडूं नावडे खाप आइतें दिले । सांपडलें वेठी घोडी रे भार वाहातां मेलें ॥ ५ ॥ एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया फांहींच ठावें ॥ जैसें होतें शिळें संचित तैसे लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडलें ठावें ॥ ६ ॥ एकीं हातीं पायीं पटे रे अंगों लाविल्या राखा । एक ते सोसिव वोडके केलो सपाट शिखा ॥ एक ते आळसी तळीं रे बरी वाढिल्या काजा । शिदोरी यांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाजा ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघेंचि ठावें ॥ मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंतें कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा – वळी-कमवी, भोवडा-हाकलून या, मोटा-शिदोऱ्याची गाठोडी, आराले-शांत झाले, वाजा-नाश. अर्थः-सर्व गोपाळ म्हणू लागले, या रे सर्वजण या, आपण काला करू. कोणी कोणती पापपुण्याची शिदोरी आणली आहे ते मला पाहू द्या. नीट खरे बोलून मला सर्व शिदोरी दाखवा; काही राखून ठेवू नका जो काही चोरून ठेवील, फसवोल त्याला येथून बाहेर काढले जाईल. १ हे काही जण त्याचा झाडा घेतल्याशिवाय काहीच देत नाहीत; जो तो एकमेकांची गवाही देत आहे, पण कुणी मोकळेपणाने सांगत नाहीत. तर कुणी ताक देतात, कुणी नात, कुणी भाकरी, कुणी दही देतात, याचा काला तयार करतात मध्यभागी बसलेला श्रीहरी हे सर्व घेतो; तो स्वतः होऊन काही आणीत नाही. २. काही गोपाळांना दम निघेना, त्यांनी आपली पापपुण्याची गाठोडी सोडून लागलीच श्रीकृष्णाच्या स्वाधीन केली. कित्येक जण गाठ सोडण्याचा विचार करीत राहिले तर कित्येक याचा नुसताच विचार करीत होते दुसरा एक या गाठोड्याचे ओझे नुसतेच पाठीवर घेऊन उभा होता; तर दुसरे काही हा सर्व भार हरीस अर्पण करून शांत झाले व दुसऱ्यास तुम्ही असेच करा असे सांगत राहिले. ३ कित्येकांनी आपल्या इंद्रियादी वृत्तींच्या गाई स्थिर केल्या, तर काहींनी त्यांना मोकळे सोडले, विषयात गुंतवून ठेविले काहींच्या या तृषांत गाई फारच ओढाळ निघाल्या; त्यांनी त्यांना फार त्रास दिला. विषयसुखातच त्यांचे फेरे चालू राहिले. कित्येकांच्या मनोवृत्ती हिरव्या चाऱ्यास पाहून तेथेच गुंतल्या, त्याच्या चित्तात श्रीहरी उरला नाही; काही एकमेकांना चला, हरीकडे चला म्हणू लागल्या; काही फेरे धरू लागल्या, हुंकारू लागल्या ४ कित्येकांनी, भोळ्या भावाने
एकमेकांना मार्ग दाखविले व आपण मात्र प्रपंचबुद्धीतच गुंतून राहिले. वरवरच्या माळात व फुलांत चित्त गुंतवून त्याचा नाश केला. यांना आपले पदरचे खर्च करून द्यावे हे पसंत नसते. दुसऱ्याचे आयते खावेसे वाटते. अशी माणसे जन्ममरणाच्या चक्रात सापडून, भार वाहता वाहताच मरण पावतात. ५ दुसरी काही माणसे मायेच्या खटाटोपात सापडून देह बुद्धीच्या घरात अडकतात. आपली स्वतःची अशी काहीच वार्ता त्यांना माहीत नसते. ते पूर्वजन्मीच्या क्रियेचे साठलेले जुनेपाके व शिळे फळ असेल तेच त्यांना खावे लागते. अशा परिस्थितीत, पाहता पाहता त्यांचे आयुष्य संपते व मग ते सावध होतात. ६ कित्येकांनी तर हातापायांना व अंगाला राखेचे पट्टे लावून गोसाव्याचे रूप धारण केले. दुसऱ्या काहींनी आपले डोके सोलून, भुंडून शेंडी नाहीशी केली, संन्याशाचे सोंग घेतले. आणखी कित्येकांनी आळसात राहून दाढीजटा व केस वाढविले, पण शुद्ध पुण्याच्या शिदोरीशिवाय त्यांच्या सर्व क्रिया व त्यांची बुद्धी याचा नाशच झाला. ७ तुकाराम महाराज म्हणतात, आता श्रीकृष्ण, या आमच्या शिदोऱ्या तूच आम्हास वाटून दे. आमच्यापाशी काय आहे नाही ते तुला सर्व काही माहीत आहेच. तूच जर आम्हास सोडलेस तर मग आम्ही शरण कोणास जावे? कृपावंत परमेश्वराने एकदा कृपा केली की मग पोटभर भोजन सुखाने करता येते. ८ १४५ बैसवूनि फेरीं । गडिया मध्यभागीं हरी ॥ अवघियांचे करी । समाधान सारिखें ॥ १ ॥ पाहे तो देसे समोर । भोगी अवघे प्रकार ॥ हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ २ ॥ बोले बोलतिया सवें । देतील तें त्याचें घ्यावे ॥ एक एका ठावे । येर येरा अदृश्य ॥ ३ ॥ कोणाचिया जीवां । वाटो नेदीं विषम ॥ तुका म्हणे हेवा । बहु आवडीचा हेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फेरी-ओळ, कवळ-घास, विषम-दुःख. अर्थ - श्रीकृष्ण सर्वांना आपल्या भोवती ओळ करून बसवितो व आपण सर्वांचे समाधान करून सर्वांना सारखेच वागवितो. १ प्रत्येकास तो आपल्या समोरच आहे असे भासले व सर्व प्रकारचे भोग ते भोगू लागले. मोठ्या आनंदाने हातात व मुखात श्रीकृष्ण घास झेलू लागला. २ जे स्वतःशी बोलतील त्यांच्याशी तो मनापासून बोलू लागला, जे देतील ते तो घेऊ लागला. त्यांच्या या कृत्यांतील अर्थ त्यांचा त्यालाच माहीत असावा. त्यांच्यात ते गुप्त होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराला भक्तांच्या प्रीतीची हाव मोठीच आहे. तो कुणाच्याही मनाला दुःख होईल असे कधी करीत नाही. ४ १४६ आम्हा निकट वासे । कळों आलें जैसे तैसे ॥ नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरों ॥ १ ॥ पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना ॥ कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ २ ॥ खेळ खेळे न पडे टाई । ज्याचा भार त्याच्या ठायीं ॥ कोणी पडतील डाईं । कोणी फोडो उगविती ॥ ३ ॥ तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ ॥ देतो ज्याचे बळ । त्यासि तैसा विभाग ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अनारीसे-वेगळे, टाई-डावात, कवळ-घास.
सार्थ तुकारामगाथा ७३ अर्थ.-आम्ही त्या परमेश्वराच्या जवळ वावरणारे असल्यामुळे तो कसा आहे तसा आमच्या ध्यानात आला आहे कान्होबाच्या मनातील भाव आम्हास समजला असून तो काही वेगळी भावना धरून असतो असे नाही १ ज्याची जशी वासना असेल तशी तो त्याला पीडा देत असतो हे मात्र खरे असून हा श्रीहरी कर्माकडे नुसता पाहात असतो सर्व लीलाचे कौतुक तो बघत असतो २ तो स्वत ही काही खेळ खेळतो, पण कुणाच्या डावात मात्र सापडत नाही त्याचा भार त्याच्या डोक्यावर ठेवून देतो, कुणी या डावात अडकून पडतात तर कुणी या प्रपंचाच्या डावातून मोकळे होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा गोपाळ हातात घास घेऊन ज्याचा कसा अधिकार असेल तसा त्याला काल्याचा भाग देत असतो ४ १४७ काम सारुनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आता वेळ । म्हणती आणा सिदोऱ्या ॥ १ ॥ देती आपुलाला झाडा । गाई वंसविल्या वाडा । दोदिल बोबडा । वाकड्याचा हरि मेळीं ॥ २ ॥ आपुलालिये आवडी । मुदा घातल्या परवडी । निवडूनिया गोडी । हरि मेळवी त्यात तें ॥ ३ ॥ भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जो मांदी । सकाळचे सदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥ ४ ॥ मागे जो सातडी । त्यासि रागा येती गडी । तुझी का रे कुडी । येथें मिष्या भावना ॥ ५ ॥ एक एकाच्या संवादे । कैसे धाले 'ब्रह्मानंदे । तुका म्हणे पर्दे । या रे वदू हरीचीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वाडा-गोठ्यात, दोधील-मोठ्या पोटाचा, परवडी-विविध प्रकारच्या, मांदी-समुदाय, सदी-अडचणीत, कुडी-खोटी, धाल-आनंद अर्थ - नित्यची सर्व कामे करून झाल्यावर सर्व गोपाळ एकत्र झाले व म्हणू लागले, आता वेळ झाली आपल्या शिदोऱ्या सोडा पाहू १ मग सर्वजण आपापल्या कर्माचा हिशेब देऊन इंद्रियरूपी गाई आपल्या हृदयाच्या गोठ्यात बाधू लागले श्रीहरीच्या भोवती मोठ्या पोटाचा दोदील बोबडा, वाकडा असे सवंगडी होते २ या गोपाळांनी आपापल्या आवडीनुसार नाना प्रकारच्या भावभक्तीच्या विविध प्रकारच्या मुदा बाधल्या त्यातील गोडी निवडून श्रीहरीनेही आपली शुद्ध बाबड त्यात मिसळली ३ जो पर्यंत हे गोपाळ समुदायात एकत्र झालेले नव्हते तोपर्यंत त्यातील प्रत्येकास आपापला भार खाद्यावर वागवावा लागत होता पण आता सगळ एकत्र आल्यावर अडचणींची ओझी खाद्यावरून खाली आली ४ जो उतावळा होऊन श्रीहरीचे प्रेम प्रथम मागतो त्यास दुसरे रागावितात व म्हणतात, अशी तुझी खोटी भावना का रे? ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे एकमेकाच्या सवादात सर्व गोपाळ ब्रह्मानंद मिळवून सतुष्ट झाले, ही सतुष्टता देणाऱ्या श्रीहरीची पाऊले आपण वदन करू या ६ १४८ यमुनें पावलीं । गडिया बोले वनमाळी ॥ आणा सिदोऱ्या सकळी । काला करु आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद घ्याचा पाहीं । मजपाशीं आहे ते ही । तुम्हामाजी देतों ॥ १ ॥ १ परमानंद तु गाथा १०
७४ सार्थ तुकारामगाथा म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें । खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करुनिया वांटा । गडिया देतो हरि ॥ २ ॥ एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिकचि वाटे । म्हणती गोड जाले । म्हणती गोड जालें । आणिक देईं । नाहीं पोट धालें ॥ ३ ॥ हात नेतो मुखापासी । एर आशा तोड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया । देउनिया मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी घाली ॥ ४ ॥ म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोपाठीं तयाच्या । अवघियांचें खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥ ५ ॥ एक एका मारी । हुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां । येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥ ६ ॥ आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती शिंगें पांवे । वांकडे बोबडे । लूडे मूडे एक लूडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥ ७ ॥ करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसें । एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां हीं धीट । आपुलिया संगें ॥ ८ ॥ नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखेंच हरी । म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥ ९ ॥ गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहो ठेलें ।
सार्थ तुकारामगाथा ७५ देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥ १० ॥ म्हणती कैसें करावे । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया । सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिकची होंट । मटमटां वाजवी ॥ ११ ॥ आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी । म्हणती जाणे जीवींचें । म्हणती जाणे जीवींचें । लाजे त्यास येणें कैंचे । शेष कृष्णाचे । लाभ थोरिवे ॥ १२ ॥ धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें । मानवले गटी । एक एकांचे आवडी । दहीं सादलें परवडी । धणीवरी आजी ॥ १३ ॥ तुझा संग वरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें । तंव म्हणे वनमाळी । घ्या रे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळोमेळीं । गाई चारावया ॥ १४ ॥ तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी ॥ १५ ॥ आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । खाले परमानंद । सवे आम्हांसहित ॥ १६ ॥ शब्दार्थ व टोपा :- पावळों-तीरावर, याहाती-वाजविती, मोहरी-मुरली, ठकडा-चतुराईने फसविणारा, दुम करणे-धूम पळणे, वाती-वाजविती, पुडा-बोटे, मुडे-वाकडे, लुडे-लुळे, होंट-ओठ अर्थ - यमुनेच्या तीरावर असलेल्या सर्व सोबत्याना श्रीहरी म्हणाले, चला रे आपण आपल्या शिदोऱ्या आज सकाळीच सोडू आपण सर्वांचा एकत्र काला करू. सर्व शिदोऱ्या एक करुन मी त्याचा स्वाद पाहीन माझ्या जवळची जी शिदोरी आहे तीही मी तुमच्याजवळ देतो १ 'तेव्हा बरे आहे, बरे आहे' असे सर्व गोपाळांनी म्हटले व ते मोठ्या आनंदाने मुरली आणि पावे वाजवू लागले सर्वांनी नदीच्या काठावरील खडकावर आपापल्या शिदोऱ्यांची गाठोडी सोडली व सर्वांचा एकत्र काला केला; व सर्व मित्राना श्रीहरी त्याचा भाग वाटून देऊ लागला २ यावेळी जो तो दुसऱ्याच्या अगोदर आपणास वाटा मिळावा म्हणून तोंड अथवा हात पसरू लागला. ज्याला मोठा वाटा मिळाला त्याला फारच सुख होई, व तो फार छान झाले, छान झाले असे म्हणू लागला सर्वजण म्हणत राहिले की आमचे पोटच भरले नाही. आम्हास आणखी काला हवा ३ देवाने तोंडापाशी हात नेला की दुसरा आपल्यास काला मिळाया म्हणून तोंड उघडून त्याच्याकडे पाहू लागता, पण श्रीहरी स्वतःच खाऊ लागला व भागणारास गमतीने वेडावू लागला. सर्व काला स्वत एकट्यानेच मुखात घालून तो श्रीहरी पळू लागला. तेव्हा सर्व गोपाळ त्याच्या पाठोपाठ धावू लागले ४ आणि म्हणायला लागले की, हा कान्हा मोठा फसवा आहे. एका घासासाठी
७६ सार्थ तुकारामगाथा हा रानभर पळायला लावतो त्याच्या पाठीमागे धूम ठोकून जो पळेल तोच खरा शहाणा श्रीहरी माय आम्हा सर्वांचे घास एकटीच खाते या सर्व सुखांना आपण मुकलो म्हणून इंद्रादी देव हायहाय करू लागले ५ सर्व गोपाळ मग काल्याच्या घासांचाच खेळ खेळू लागले घासाने एकमेकाना मारायला लागले कुणी कुणाच्या तोंडावर, दुसऱ्यावर मारू लागले श्रीहरीला हा मार सहन होईना, तेव्हा आता पुरे असे तो म्हणू लागला मी आता फार दमलो आता आपण नियमास धरून आपले खेळ खेळू या श्रीकृष्णाच्या या सांगण्याचा सर्वांनी आदर केला ६ मग सर्व गोपाळांनी मोठ्या आनंदाने फेर धरले व मध्यभागी श्रीहरीला बसविले नंतर प्रत्येकेजण फेर धरत राहिले. काही जणांनी शिंगे, पावे वाजविण्यास सुरुवात केली या सोबत्यात काही गोपाळ वाकडे होते, काही बोबडे होते काही खोटे, लुळेही होते परंतु हे सर्व फार भाविक असल्यामुळे श्रीकृष्णाला फार प्रिय होते ७ त्याची भावपूर्ण तोंडे पाहून श्रीकृष्ण त्यांचे कौतुक करू लागला हे सर्व सुख पाहून श्रीकृष्ण खळखळून हसू लागला एकमेकांचे उष्टे खाण्यासही कुणास वीट वाटेनासा झाला काही थोडे संकोच धरणारे होते, पण त्यांनाही श्रीहरीने आपल्या संगतीने धीट बनविले ८ ज्यांची अजून भूक गेली नाही त्यांची मुखे उघडवून तो हरी सर्वांना सुख सारख्या प्रमाणात देतो मग सर्वजण म्हणत राहिले की, श्रीकृष्णा, तू फार चांगला, फार चांगला आहेस रे, तुझी संगत फार चांगली, आता तू जरी आम्हास फसविलेस तरी आम्ही दुसऱ्या कुणाही बरोबर जाणार नाही ९ श्रीहरी व गोपाळ यांचा हा आनंदप्रसंग पाहून गाई चारा खाण्याचा विसरून गेल्या पक्षी व वनातील इतर पशू यांचेही चारा खाणे बंद झाले यमुनेचे पाणी स्थिर झाले, त्याचा प्रवाहच जणू श्रीकृष्णस्मरणात थांबला हे सर्व प्रकार देवांनी पाहिले व त्याच्या तोंडात पाणी सुटले, व ते म्हणू लागले की यमुनेच्या तीरावरस्ते हे गोपाळ किती धन्य आहेत, आमचा जन्म मात्र फुकट धिक्कार असो त्याला १० मग ते स्वर्गातील देव म्हणू लागले, काय करावे, कसे करावे ? काल्याचा भाग भक्षण करण्यासाठी आपण यमुनेच्या पाण्यातील मासे व्हावे असे त्यांना वाटले या संकल्पास अनुसरून सर्व देव मत्स्यरूपांनी यमुनेच्या तीरावर आले सर्व किनारा भरून गेला तेव्हा हे खटपाळ गोपाळ अधिकच प्रमाणात आपले ओठ मटामटा वाजवून त्यांना हिणवू लागले ११ मोठ्या आनंदाने गोपाळांसह श्रीकृष्ण खेळ खेळू लागले आणि त्यांनी कुणीही आपले हात यमुनेत धुवू नका (कारण या मत्स्यांना काल्याचा शेष उगाच मिळेल) असे सांगितले त्यावर हा कृष्ण बरोबर आमच्या मनातले ओळखतो असे गोपाळ म्हणू लागले श्रीकृष्णाच्या हातच्या काल्याचा भाग जे आपल्या थोरवीमुळे लाजणारे आहेत त्यांना कसा मिळणार ? १२ आजचा दिवस व काळ किती धन्यतेचा आहे, कारण आज श्रीकृष्ण परमात्मा आम्हास भेटला देवा, तुझ्या हातामधून आज आम्हात काल्याचा प्रसाद मिळाला म्हणून आम्ही आज संतुष्ट झालो एकमेकाच्या संगतीत हे गोपाळ सोंगडी फार सुखावले नाना प्रकारांनी यानी इही पोटभर संतुष्ट होऊन खाल्ले असल्याने ते तृप्त झाले १३ देवा, तुझी ही चांगली संगत आम्हास नेहमी असावी अशाच प्रकारे नित्य जीवांना आनंद देऊन आम्हांस चालवावे त्यावर तो वनमाळी सर्व गोपाळांना म्हणाला, चला रे आपापल्या काठ्या, कावळ्या घ्या आपण सर्वजण खळीमेळीने गाई चारायला निघू या आता १४ तुकाराम महाराज म्हणतात, आज मोठा ब्रह्मानंद झाला त्याचे वर्णनही करता येणार नाही आज या श्रीकृष्णाने सर्व गाईंना व गोपाळांना आपल्यासारखच करून टाकले १५ आज केवढा आनंद झाला आहे प्रत्यक्ष परब्रह्मदच आपल्याबरोबर आज उभा आहे १६ १४९ या हो या चला जाऊ सकळा । पाहो हा सोहळा आजि वृदावनींचा ॥ १ ॥ वाहिला गोपाळें वेणुनाद पडे कानी । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ २ ॥ उरले ते सांडा काम नका करू गोवी । हेचि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥ ३ ॥ निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता । बोलती ते आता घरचीं सोसूं वाईट ॥ ४ ॥ कृष्णभेटीआड कांहीं १नावडे आणीक । लाज तरी लोक मन जाले उदास ॥ ५ ॥ एकाएकीं चालियेल्या सादावीत सवे । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥ ६ ॥ १ न साहे
सार्थ तुकारामगाथा ७७ शब्दार्थ व टीपा - वाइला-वाजविला, गोवो-गुतवण, सादावीत-सावध करीत अर्थ - चला, याज सर्वजण वृंदावनातील सोहळा पाहण्यासाठी जाऊ या १ या ठिकाणी श्रीकृष्ण मुरली वाजवीत आहे ती आपल्या कानी येईल चला, मला काही धीर निघत नाही, माझे चित्त आज भारी चंचल झाले आहे २ जे हातात काम धरले असेल ते टाकून द्या त्यात मग गुंतवू नका कारण, श्रीकृष्णास भेटण्याची हीच एक वेळ आहे ३ त्या श्रीकृष्णाला पाहताच डोळे निवतील घरची माणसे यासाठी काही वेडेवाकडे बोलतील तर ते सहन करू ४ कारण कृष्णाच्या भेटीआड जे येईल ते काही मला आवडणार नाही त्याच्या भेटीविषयी लाज कसली? या लाजेसबंधीच माझे मन उदास झाले आहे मी लज्जेची पर्वा करणार नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, एकमेकींना सावध करीत त्या सर्व एका मेळ्याने श्रीकृष्णाकडे निघाल्या त्या श्रीकृष्णाने आपल्या ठिकाणी त्यांना तन्मय करून सोडले आहे ६ फुगड्या-अभंग २ १५० फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज साडोनि एक एकी पाहे ॥ १ ॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरोच गोडी गे संसार तोडी गे ॥ २ ॥ मागें जें शिकली होतीस पोटीं । तेंचि विचारूनि आता उच्चारी ओठीं ॥ ३ ॥ त्रिगुणाची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि घरी घाली मूळबदीं गाठी ॥ ४ ॥ आगळें पाऊल जिके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥ ५ ॥ तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुके बार घेऊ पावो उच्च ठाव ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - मूळबद-योगातील एक क्रिया, टाचेने गुदद्वार दाबून, संकोचित करून अपानवायूची गती वरच्या दिशेस करणे, तुके-वजनाने, बार-खेप अर्थ - प्रपंचरूपी फुगडी घालीत असताना तू बाह्य वस्तूंविषयी कसलीही ममता न धरता निसंग होऊन उघडी राहा सर्व प्रकारची लाज सोडून त्या एका परमेश्वराकडे एकरूपतेने तू पाहा १ या फुगडीच्या नादाने तू प्रपंचातील बाह्य उपाधी साऱ्या मोडून टाक, संसारातील बाह्य गोष्टींचा संग सोडलास तरच या फुगडीची गोडी तुझ्या ध्यानात येईल २ मागे अध्यस्त असताना जो एकात्मतेचा भाव तू शिकली होतीस तो तुझ्या जवळ होताच, त्याचाच विचार करून आपल्या ओठातून तू उच्चार कर ३ ही फुगडी खेळताना त्रिगुणाची वेणी तुझ्या पाठीवर एकसारखी उडत असते, ती नीट सावरून धर यासाठी योगमार्गातील मूळबदादि क्रिया कराव्या लागल्या तरी तू कराव्यास ४ या फुगडीच्या खेळातील तुझे एक पाऊल पुढे पडेल तसे तू जिंकून घेशील एकरूप होण्यात तुला यश मिळेल तुला मान मिळेल तिन्ही लोक तुला मान देतील ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या माझ्या- मध्ये एकच आत्मरूप भाव आहे या खेपेस आता अशा आत्मरूपाची अनुभूती घेऊन तुझ्या बरोबरीने आम्ही उंचावले जाऊ ६ १५१ फुगडी फू सवती माझे तू । हागुनि भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावरि थू ॥ १ ॥ फुगडी घेता आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ २ ॥ हात पाय बेंबळ जाती । दुगण घोळिता लागे माती ॥ ३ ॥ सात पाच आणिल्या हरी । याचुनी काय तगसी पोरी ॥ ४ ॥ सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥ ५ ॥ तुका म्हणे आझुन तरी । सांगितले ते घडडी करी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - हरी-पराभव, जगनोवरी-जगाशी सबंध ठेवणारी नवरी, बेंबळ-ढिले, सात-सप्त धातू, पाच-पंचमहाभूते.
७८ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- या फुगडीमध्ये देहादी वृत्तींच्या मागे लागणाऱ्या सवतीशी तू गडी फू कर. त्याच्या नादाने जो वाईट क्रियाकर्म झाली ती तुलाच धुवून काढावी लागतील. नाही तर तुझ्या ढुंगणावर व तोंडावर आम्ही थुंकू. १ ही प्रपंचरूप फुगडी खेळताना तुला जरी पराभव झाल्यासारखा वाटला तरी सर्व जगाशी संबंध ठेवणाऱ्या नवऱ्या मुलीप्रमाणे तू होऊ नकोस. ऊठ, सावध होऊन त्या श्रीहरीस शरण जा. २ ही आजची वेळ जर जाईल तर तुझे हातपाय ढिले पडतील. तू वाटेल तशी वागलीस तर तुझ्या अंगास फक्त मातीच लागेल. ३ तू सप्तधातू व पंच- महाभूते यांना जिंकून आणल्याखेरीज या प्रपंचरूप फुगडीत टिकणार नाहीस पोरी ४ आताच पहा, तुझ्या अंगातील सर्व शक्ती संपली असून तुझे पायही पांगुळले आहेत. तरी अजूनही तू या प्रपंचात काय घोळून राहिली आहेस? गुरफटून राहिली आहेस ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे गधडे, अजून तरी मी जे सांगतो आहे ते कर ना ६
लखोटा-अभंग १
१५२ लये लये लखोटा । मूळबंर्दि कासोटा । भावा केलें साह्यें । आतां माझें पाहें ॥ १ ॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥ २ ॥ अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं झांडे । जग झोडी रांडे ॥ ३ ॥ बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥ ४ ॥ पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥ ५ ॥ आतां उभी ठायीं । उभाउर्भी पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥ ६ ॥ नामा केलें खरें । आपुलें म्या घरें । तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- लये-अनुसंधानाची एकरूपता निका-उत्तम, झांड-निलाजरी, गोहो-पती, डोल-रूप.
अर्थ - योगमार्गातील मूळबंधादि क्रियांचा कासोटा घालून व सर्व वृत्तींच्या अनुसंधानाचा परमेश्वराशी लय साधून मी ही लखोट्याची क्रीडा करीत आहे. माझ्या भाववृत्तींचे साह्य मी घेतले असल्यामुळे माझी क्रीडा आता पाहाच. १ माझी वृत्ती आता जीवपणास मुकून ताबडतोब ईश्वरस्वरूपातच गुंतून राहिली. माझे धैर्य पाहा किती उत्तम आहे उगाच पोकळ बडबड तू आता सोडून दे. २ तूही याच श्रीहरीचा अंगिकार कर. उगाच जन्म- मरणाच्या फेऱ्यात अडकू नकोस. साऱ्या जगाची उठाठेव करणाऱ्या रांडे, भाडतोर वये, थोडीशी तरी लाज तू मनात धर ना. ३ तू श्रीहरीच्या भक्तीचाच फक्त आश्रय कर; माझी गोष्ट ऐक नीट. देहाभिमानाचा तू जो पती केला आहेस तो सोडून टाक; व या श्रीहरीच्या ठिकाणीच प्रेम ठेव. ४ पाठमोरी होशील तर तुझी अवस्था कठीण होईल. तुला कंप सुटेल, व्यर्थ बडबड तुला आवरावी लागेल व बाळे, बाह्य वृत्तींत तू रमून राहशील तर पुढे फार कठीण स्थिती प्राप्त होईल. ५ आताच या ठिकाणी उभी आहेस तोच त्या श्रीहरीकडे जा. उगाच पुढे डुक्कर, गाढव, कुत्री यांच्या जन्मास जाऊ नकोस. ६ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या नामाने माझे मी कल्याण करून घेतले आहे; पण इतर मुली मात्र त्यांचे चित्त देहावर व प्रपंचावर असल्यामुळे पळून गेल्या. ७
सार्थ तुकारामगाथा ७९ हुंबरी-अभंग १ १५३ तुझीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ १ ॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥ २ ॥ चेंडुयासवें घातली उडो । नाथिला काळिया देउनि बुडी ॥ ३ ॥ अशुद्ध पीता करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥ ४ ॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥ ५ ॥ जाणों तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥ ६ ॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुक्यास्वामी सारंगधरू ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- हुंबरी-तोडाने एका प्रकारपा आवाज करून खेळावयापा खेळ, साही-सहा शास्त्रे, अठरा-अठरा पुराणे, चारी-चार वेद, शेष-नाग, नाथिला-कपटी केला, अशुद्ध-रक्त, माउशी-पूतना मावशी, मामा-कस, सारंग-एव' धनुष्य. अर्थ :- देवा, तुझ्याशी हुंबरीचा खेळ कोण रे खेळू शकणार ? तुझे सामर्थ्य वर्णन करताना चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणेही थकली. १ हरी, एवढा सहस्र मुखाचा शेषनाग, तोही तुझे वर्णन करताना शिणून गेला. २ गोकुळात यमुनेच्या तीरावर चेंडूफळीचा खेळ खेळत असताना चेंडु यमुनेच्या डोहात पडला, तेव्हा तूच यमुनेत उडी घेतलीस व तेथील दुष्ट कालिया नागाचा पराभव केलास. ३ तुला मारण्यासाठी स्तनाना विष लावून ती पूतना मावशी आली असताना तू तिचे रक्त प्राशन करून तिला मारलेस. तुला कशी करुणा अगदी येत नाही रे ? ४ रामावताराच्या वेळी तू त्या रावणाचे घर बुडविलेस, त्याची बायकामुले मारून टाकलीस. ५ तू किती कठिण हृदयाचा आहेस हे आम्हास माहित आहे. या अवतारात तू आपल्या कंस मामालाही ठार मारलेस. ६ तुकाराम महाराज म्हणतात, सारंग नावाचे धनुष्य धारण करणाऱ्या या ईश्वराशी खेळ खेळताना असाच मोठा नाश होतो. कधी देहाहम्बुद्धीच्या वृत्तीचा नायनाट होतो. ७ हमामा-अभंग २ १५४ मझीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥ १ ॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ २ ॥ मझीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥ ३ ॥ तरीच मझीं बोल । पोरा जिव्हाळघाची ओल ॥ ४ ॥ मझीं घेता भास । जीवा मीतूपणा नास ॥ ५ ॥ मज सर्वै खरा । पण जाऊं नेदी घरा ॥ ६ ॥ आमुचिये रंगीं । तुजें तगे ना ये संगीं ॥ ७ ॥ तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥ ८ ॥
८० सार्थ तुकारामगाथा तू बोल. ४ माझ्यापुढे शपथ घेताना पोरा मी तूरणाचा माझ व्हायला हवा. ५ तू माझ्याबरोबर येशील तर मी तुला प्रपंचादिक मुलांसाठी परत घरी जाऊ देणार नाही. ६ आमच्या या अद्वैताच्या रंगात दुजेपणाचा भाव टिक- णारच नाही. ७ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा माझ्याबरोबर प्रतिज्ञा केली म्हणजे श्रीहरी जीवदशेचा नाश करून सर्वच सुखमय करून सोडतो. ८ १५५ हुमामा रे पोरा हुमामा रे। हुमामा घालितां ठकले पोर । करी येरझार चौऱ्याशीची ॥ १ ॥ पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतले ॥ देखोनि गडी तें विसरले । डाईं पडिले आपणची ॥ २ ॥ दुसऱ्या पहारा महा आनंदें । हुमामा घाली छंदछंदें । दिस वाढे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥ ३ ॥ तिसऱ्या पहारा घेतला बार । अहंपणें पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥ ४ ॥ चौथ्या पहारा हुमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुऱ्यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडसील डाईं ॥ ५ ॥ हुमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक विठोबा त्यासवें चारितो गाई ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठकले-फसले, पहारा-वेळेस, सुऱ्या पाटिलाचा-मूर्ख या पाटलाचा अर्थ :- पोरा, हुमामा खेळ खेळ रे. हुमामा हुमामा म्हणताना व खेळताना हे पोर फसून गेले आहे चौऱ्यांशी लक्ष योनींच्या फंदात सापडले. १ गर्भावस्थेच्या पहिल्या अवस्थेत मोठा रंग आलेला होता, त्यावेळी पोरा, तू सोहं सोह-तो मी आहे तो मी आहे, असा छंद घेतलास, पण संसारातील इतर गडी पाहून तू हा छंद विसरलास या डावात आपण होऊन सापडलास २ दुसऱ्या बालपणाच्या वेळी तू मोठया आनंदात होतास, स्वच्छंदाने हुमामाचा खेळ खेळत राहिलास. जसजशी वाढ होऊ लागली तसतसे तुला बरे वाटले, पण पोरा, पुढे काय आहे हे तुला काय माहित ? ३ तिसऱ्या तारुण्याच्या अवस्थेत याने मी वेगळा, निराळा असा देहबुद्धीच्या अहंपणाचा ध्यास घेतला. त्यामुळे याचा पाय स्थिर राहीना, तो सारखी संसाराची उठाठेव करू लागला. त्याने नाना विषयाचा सोस केल्यामुळे तो या डावात पुरता सापडला; हे खरेच समजावे. ४ मग चौथ्या अवस्थेत वृद्धपणा आल्यावर त्याचा हुमामा निराळाच सुरू होतो त्याचे हातपाय कापू लागतात सूर्याजी पाटलाचा पोर यम त्याच्या तावडीत सापड- ण्याची वेळ जवळ आलेली असते. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देहादी प्रपंचाशी हुमामा खेळताना मी भीत असतो. मी या सर्व गड्याचा सबंध सोडून गोकुळातील यादवाचा तो एक मूल जो विठोबा त्यालाच मित्र करून त्याच्या गाई मी वळण्याचे, चारण्याचे काम करतो. ६ गाई-अभंग १ १५६ आम्हां घरी एक गाय दुभता हे। पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥ १ ॥ वान ते सांयळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ २ ॥ वत्स नाहीं माय भलत्या सवे जाय । कुर्याळी तो लाहे भावभरणा ॥ ३ ॥ चहूं थारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥ ५ ॥
सार्थ तुकारामगाथा ८१ शब्दार्थ व टीपा - दुभताहे-दूध देणारी आहे, न समाये-मावत नाही, थान-वर्ण, रग, वसुंधरा-पृथ्वी, भलत्या-कुणाही, जोगविते-पोसते अर्थ - आमच्या घरी एक दुभती गाय असून तिचा पान्हा सर्व त्रिभुवनांत मावत नाही १ तिचा रंग काळसर असून तिचे नाव धोधर असे आहे ती पृथ्वी व चौदा भुवनात चरत असते, हिंडत असते २ तिला स्वतःला वासरु नसल्याने ती कोणाही भक्ताबरोबर जाते जो तिला प्रेमाने कुरवाळतो त्याला ती कृपेचे दूध भरपूर देते ३ या गाईच्या चार स्तनांतून चार धारांनी कृपेचे दूध भरपूर मिळते याच दुधावर सनकादिक ऋषिमुनी व सिद्धलोक संतुष्ट झाले आहेत ४ तुकाराम महाराज म्हणतात अशा ठिकाणी माझी एवढीशी भूक काही विशेप नाही, कारण ही अदभुत धेनू तीनही लोकांची जोपासना करणारी आहे ५ कांडण-अभंग २ १५७ सिद्ध करूनिया ठेविले कांडण । मज सागातीण शुद्ध बुद्धि गे ॥ १ ॥ आठव हा घरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं शेवटिचा गे ॥ २ ॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी ॥ मी तुजमिळणी जय मिळे ॥ ३ ॥ एक कक्षी पाखडी दुसरी निवडी । नि शेष तिसडी ओज करी ॥ ४ ॥ सरले कांडण पाकसिद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचे ॥ ५ ॥ उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥ ६ ॥ तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तातडी मूळ केले ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - सम तुके-समानपणाची अर्थ - आत्मा-अनात्माभावाचे कांडण मी तयार करून ठेविले आहे कांडण करण्यासारख्याच या गोष्टी आहेत माझी विवेकबुद्धी हीच या कामी माझी मैत्रीण आहे तिच्या साहाय्याने मी हे कांडण करीत आहे १ ही आठवण मनात धरूनच अग्रे, मला रात्रीच्या शेवटच्या प्रहरी म्हणजे पहाटेसच तू जागे कर २ हे मैत्रिणी, तू सर्वत्र समत्वबुद्धी धरूनच या कांडणासाठी घाव घाल तर तुझी व माझी जुळणी एकरूपाची होईल ३ या शुद्धबुद्धीने मी माझ्या वृत्तीने किंवा देहात्मभावाचे कांडण करताना एकदा पाखडीन, एकदा निवडीन, एकदा सडून काढीन, मग मात्र बुद्धी तेजस्वी होईल ४ एवढे झाले की मग कांडण संपेल नंतर स्वयंपाक तयार होईल खीर व साखर याची मिळणी आत्मज्ञान व सुखानुभूती याच्या स्वरूपात होईल ५ आणि या अलौकिक प्रसंगी उद्धव व अक्रूर हे श्रीकृष्ण सखे व प्रत्यक्ष नारायण भोजनास येणार आहेत ६ तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या माहेरच्या माणसांची मोठीच आवड असल्यामुळेच तातडीने ते सगळेजण मला बोलवावयाला आले आहेत ७ १५८ सावधों कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥ १ ॥ मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सावरोनि थिरों घाव घालीं ॥ २ ॥ वाजती काकणे अनूहात गजरे । छंद माहियेरे गाऊ गीति ॥ ३ ॥ कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तो ॥ ४ ॥ तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - सावडीं-सावध थिरों-स्थिर बुद्धीन, अनुहात-अखंड ध्वनी अर्थ - नारायणाची ओवी गात गात आता तू हे कांडण आबर व आता यातील भुसा कोणता, व आत्मा- नुभूतीचे सार कोणते याचा निवाडा करू १ तू आता मुसळ असेच वरचे वर धर व नीट मन, बुद्धी, इद्रियादी वृत्ती यांना आवरून स्थिर चित्ताने घाव घाल २ त्यावेळी तुला अनुभव येईल की सोहच्या अनुभूतीचा ध्वनी तुझ्या वृत्तिरूप काकणातूनच तुला ऐकू येईल याच स्वरानी माहेरच्या आईबापाना आपण गाणे गाऊ ३ जोपर्यंत या तु गाथा ११
८२ सार्थ तुकारामगाथा कांडाशामध्ये मी-तूषणाचा दुजाभाव निर्माण झालेला नाही तोपर्यंत हे कांडण कांडताना कुठलाच त्रास होणार नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, जसा आरसा असेल तसेच आपले रूप त्यात उमटेल त्याप्रमाणे जशी आपली तयारी असेल तसा परमात्मस्वरूपाच्या स्वानुभूतीचा स्वयंपाक शुद्ध व सात्त्विक होईल. ५
आडसण-दळण-अभंग १
१५९ शुद्धीचें सरोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥ १ ॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलेँ ॥ २ ॥ सुपीं तोंचि पाहें घड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥ ३ ॥ सुपीं तोंचि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥ ३ ॥ सुपीं तोंचि संग घेई घडकुडी । एकसा घडडी नास केला ॥ ५ ॥ दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥ ६ ॥ सुपीं तोंचि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- आडसण-सुपाने वेगळे काढलेले स्वच्छ दाणे; उगटिले-वाईट; घडकुडो-खरोखर; वोज- काळजी; सांदीस-कोपऱ्यात.
अर्थ :- शुद्ध केलेले दळण बाजूस सारून उरलेले जात्याच्या पाळीत भरून ठेवले व हे ओंगळ किंवा वाईट असणारे प्रभूच्या नामाने भरडून काढले. १ हे साजणी, आता तू हे दळण आडसून नीट स्वच्छ करून ठेव. पापिणी, हे चांगले तयार होत असलेले दळण तू नाश करू नकोस. २ जोपर्यंत हे सुपात आहे, तोपर्यंत तू ते चांगलें की वाईट हे नीट पाहा नाही तर निलाजरे बये, तू सर्वांचाच नाश करून टाकशील ३ जोपर्यंत हे दळण सुपात आहे, जोवर जीव देहात आहे तोपर्यंत तुझी त्यावर सत्ता आहे; मग मात्र, म्हणजे दळण संपल्यावर मात्र कर्मगतीप्रमाणेच तुला त्याचे भोजनरूपाने फळ मिळेल. ४ तेव्हां बरोबर, हे दळण सुपात आहे तोच त्याची संगत धरून नीट त्याचे रूप ओळखून घे. नाही तर गधडे, या मनुष्यदेहाचा नाश करशील. ५ नाही तर देहात्मबुद्धीचे दळण दळतानाच अनेक वेळा मग जन्ममृत्यूंच्या चक्रात सापडावे लागेल. नीट ध्यानात घे. तुझे कान व डोळे गेलेले नाहीत ना ? ६ जोपर्यंत हे दळण सुपात आहे, जोपर्यंत देह कायम आहे तोपर्यंतच तू त्याची नीट काळजी घे. फार श्रम न करता तू याला नीट जप; नाही तर अनेक जन्मांच्या कोपऱ्यात मात्र उगाच तू पडून राहशील. ७
दळण-अभंग १
२. बाल-क्रीडा व पंढरी महिमा
सार्थ तुकारामगाथा ८३ नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हे शुद्ध दळण सर्वांनाच आवडते आणि ज्या स्त्रीस हे दळण पसंत पडते तिला आपल्या जिवास या श्रीहरीश्वतारापासून कधीही वेगळे राहावत नाही ५ १६१ उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहीभात ॥ १ ॥ वैकुंठीं तो ऐसे नाहीं । कवळ काहीं काल्याचे ॥ २ ॥ एकमेका देऊ मुखीं । सुखीं घालू हुबरी ॥ ३ ॥ तुका म्हणे वाळवट । बरवे नीट उत्तम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपजोलिया-पुन जन्म घेऊन अर्थ - पुन पुन जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही, पण हा काला व दहीभात आपण मोठ्या प्रेमाने खाऊ १ कारण वैकुंठलोकीसुद्धा हे सुख नाही काल्याच्या घासाचे सुख तेथे कुठून असणार? २ हे घास आपण एकमेकाच्या तोंडात देऊ व मग सुखाने हुवरीचा खेळ खेळू ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा काल्याचा खेळ खेळाबला हे बाळवट फार चांगले आहे ४ १६२ याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥ १ ॥ आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोवरी ॥ २ ॥ हळ हळू चला । कोणी कोणाशी न बोला ॥ ३ ॥ तुका म्हणे साडा घाटें । तेणे नका भरू पोटें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लागें- लागलीच, घाटे- फोलकटे अर्थ - गोपाळांनो, यायचेच असेल तर लागलीच सर्वजण माझ्या मागोमाग या १ आज मी तुम्हाला काल्याचा प्रसाद पुरे पुरे म्हणाल तोपर्यंत पोटभर देणार आहे २ पण अगदी पाय न वाजविता हळूहळू चला, कुणाशीही एक शब्द बोलू नका ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व फोलकटे सोडून द्या त्यानी काही तुमचे पोट भरणार नाही ४ १६३ शिके लावियेलें दुरी । होतो तिघाचे मी वरी ॥ १ ॥ तुम्ही व्हा रे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ २ ॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहोंच्या कोपरा ॥ ३ ॥ तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणे नेदी एका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुरी-उच, टोका-पाहा अर्थ - गोपाळानो, आज त्या गवळणीने हे शिके फार उच लावले आहे काही हरकत नाही तुम्ही एक- मेकाच्या खाद्यावर असे तिघेजण उभे राहा मी तुमच्या खाद्यावर चढून ते दहीदूध काढतो १ तुम्ही मात्र माझ्या दोन्ही बाजूस तोंड उघडून तयार असा २ माझ्या दोन्ही हाताच्या कङानी दह्यादुधाच्या धारा वाहतील त्या नीट पाहा ३ तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हाताकडे पाहा, कुणाला काही कमीजास्त न करता मी सर्वांना सारखाच वाटा देईन ४ १६४ पळाले ते भ्याड । त्यासि येथे जाला नाड ॥ १ ॥ धीट घेती घणीवरी । शिकीं उतरितो हरी ॥ २ ॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥ ३ ॥ तुका लागे घ्यारे पायां । कं पावाल या ठाया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नाड-फसवणूक, रितीं-रिकामी
८४ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- या गोपाळांत जे भित्रे होते ते पळून गेले. पण त्याची फार फसवणूक झाली. कारण त्यांना स्वसुख मिळाले नाही. १ हा श्रीहरी उंचावरली शिकी उतरवीत आहे; तुमचे प्रारब्ध, क्रियमाण व संचित कमी करीत आहे. अशा प्रसंगी जे धीट होते ते भूमीवर पाय भक्कम ठेवून उभे राहिले. त्यांनी दह्यादुधांचे सेवन केले. २ आणि जे आपल्याच शहाणपणाच्या विचारात सापडले ते बिचारे रिकामेच, प्रभुकृपेविनाच तसेच राहिले. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या पायांशी लागा रे गोपाळांनो, पुनः या ठिकाणी कधी याल? आताच चांगली संधी आहे. ४ १६५ धाले मग पोट । केला गड्यांनीं बोभाट ॥ १ ॥ ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ २ ॥ खांद्यावरी भार । तों झिजती बहु फार ॥ ३ ॥ तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धाले-संतुष्ट झाले, बोभाट-आरडाओरडा, अबोलण्या-अनिर्बचनीय, बोलता न येणाऱ्या. अर्थ :- सर्व दहीदूध खाऊन झाल्यावर गोपाळ संतुष्ट झाले मग त्यांनी प्रभूच्या नावाने एकच आरडा- ओरडा केला, १ ते म्हणू लागले 'नारायणा, तुम्ही या ना. लवकर या, काही न बोलण्यासारख्या किंवा ज्याचे वर्णन करता येणार नाही अशा काही गोष्टी बोलू ना.' २ ज्यांच्या खांद्यावर पोषणाचे ओझे फार आहे त्यांना फारच त्रास झालेला असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने आपल्याबरोबर जे गोपाळ नेले ते सर्व सुखी करून सोडले. ४ १६६ पाहाती गोळणी । तंव पालथी दुधानी ॥ १ ॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ २ ॥ त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥ ३ ॥ सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दुधानी-दुधाचे भांडे, नासी-नासाडी, अगुणार-दुर्गुणी, अतिशय गुणी, किंवा गुणातीत अर्थ - दुसऱ्या दिवशी गोकुळातील गोळणी उठून पाहतात तो दुधाची सर्व भांडी पालथी झालेली त्यांना दिसली. १ त्या म्हणू लागल्या आज त्या नंदाच्याच पोराने चोरी केलेली दिसते. २ त्याच्याशिवाय दह्या-दुधांची ही अशी नासाडी दुसरे कोण करणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याच दुर्गुणी किंवा अतिशय गुणी या गुणातीत अशा नंदाच्या पोराने गोपाळाचा मेळा आणून हे कर्म केले असावे. ४ १६७ आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥ १ ॥ मग टाकती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ २ ॥ कोडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥ ३ ॥ बोलाबितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खोडी-सवय अर्थ -ह्या गोळणी मग म्हणू लागल्या, आता आपण असे करू, त्या श्रीकृष्णाला व त्याच्या साथिदाराला दोघांनाही धरून चांगला मार देऊ. १ तेव्हाच त्यांची चांगली खोड मोडेल, सवय नाहीशी होईल, त्यांच्या तोंडाला या दुधाची गोडी लागली आहे ती दूर होईल. २ किंवा त्यांना या आपल्या घरात कोंडून ठेवू, हृदयात बंदिस्त करून ठेवू, न बोलताच बुद्धी जागी ठेवून त्याला पकडू ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या श्रीहरीस व त्याच्या सवंगड्यांच्या मेळाव्यास बोलवावे व शिक्षा करावी असे त्या गोळणींनी ठरविले. ४
सार्थ तुकारामगाथा ८५ १६८ गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥ १ ॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ २ ॥ न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥ ३ ॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रडी-चिडून राहिले. अर्थ :- पुष्कळ वेळ यमुनेच्या तीरावर खेळ खेळल्यावर मग गोपाळ रडकुंडीस आले, चिडूनही गेले व म्हणू लागले, कान्होबा, तू आमचा डाव चढूच देत नाहीस, तूच नेहमी जिंकतोस. १ आम्ही काही आता तुझ्याशी खेळणार नाही, तुझी लबाडीची भावना आता आमच्या ध्यानात आली आहे. २ आम्हाला आता या तुझ्या डावाचे ओझे सहन होत नाही व आम्हाला आता उशीरही झाला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणत एक गोपाळ रागारागाने मागे निघून गेला. हरीला त्याने आपल्या मागे येऊनसुद्धा दिले नाही. ४ हाल-अभंग २ १६९ यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियासि ॥ १ ॥ हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ २ ॥ नांवें ठेवूनि बांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥ ३ ॥ तुका म्हणे कान्हो तिळतांदळाचा । जिंके तो करी आपुला खेळचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हाल-डाव, न वजे-चालणार नाही अर्थ :- श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर खेळ सुरु करुन आपल्या सवंगड्यांना तो म्हणाला, १ चला आपण मोठा खेळ खेळू. डाव मांडू. उगाच व्यर्थ काळ घालवू नका. २ नावे ठेवून गडी वाटून घ्या; म्हणजे मग नंतर कुणाला रडी करायला जागा सापडणार नाही. कुणाची तक्रार चालणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या कान्होबाने कामक्रोधरूपी तिळातांदुळाची बोलीसुकी करुन त्याने डाव जिंकला व त्याने आपला खेळ सुरु केला. ४ १७० बळें डांईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥ १ ॥ मोकलें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडाव्या ॥ २ ॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥ ३ ॥ तुका म्हणे घरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कळा-युक्ती. अर्थ :- मोठ्या बळाने श्रीहरीला पकडण्याचा प्रयत्न करावा तर तो सापडत नाही. म्हणून बुद्धिकौशल्य वापरुन जो त्याला पकडील तोच शहाणा ठरेल १ या श्रीकृष्णाला मोकळेपणाने खेळू द्यावे व समत्वभावाने त्यास पकडून ठेवावे. २ तो अनेक वेळा हातात सापडतो, अनेक वेळा निसटून जातो; तो कायमचा सापडेल, हाती राहील अशी काय युक्ती आहे हे समजत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याला जागच्या जागीच पकडून ठेवा. त्याच्या पायांशीच जीवाने मिठी घालून राहिले पाहिजे. ४ सुतुतू-अभंग १ १७१ जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥ १ ॥ घाली सुतुतू फिरोनि पाही आपणासि । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ २ ॥
८६ सार्थ तुकारामगाथा खेळिया तो हाल साभाळी । घुम घाली तो पडे पाताळीं ॥ ३ ॥ वळिया गाढ्या तोचि ग्येळे । दम पुरे तो वेळोवेळा खेळे ॥ ४ ॥ हाता पडे तो चि डाग । दम पुरे तो खेळिया चांग ॥ ५ ॥ मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तोचि आधार फिके ॥ ६ ॥ आपल्या बळें खळे रे भाई । गडियाची साडोनि सोई ॥ ७ ॥ तुका म्हणे मी खेळिया नव्हे । जिकडे पडें त्याचि सवे ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीका - युतुतू-एक प्रकारचा खेळ, हाल्ला-डावात, भेडती-खेळातील भिडू अर्थ - जीवाशिवाच्या या डावात माडून अह सोहम या भिडूची चागली गाठ पडली आहे आता १ हे दोन गडी आता सुतुतूचा खेळ करून आपणाकडे फिरून फिरून पाहू लागले आहेत एखादा बलवान गडी मागील गड्याची कमतरता पुढल्यासाठी भरून काढीत असतो २ एखादा गडी डाव साभाळतो व दुसरा एकदा पळून जातो तो धरणीवर पडून राहतो ३ जो गडी चांगला दणकट तोच शेवटपर्यंत खेळतो त्याचा दम जसा पुरेल तसा तो खूप वेळपर्यंत खेळत राहील ४ गडी हातात सापडला असे वाटते, टाग मारून निसटून जातो कारण त्याचा दम भरपूर असल्यामुळे त्याचा खेळ चांगला होतो ५ मागेपुढे पाहून अवधान राखून जो खेळतो तोच जिंकतो जो गडी हाती आलेला असतो तोच आधार वाटतो ६ इतर गड्याची सोय सोडून आपल्या बळाने एखादा गडी खेळ करीत असतो ७ तुकाराम महाराज म्हणतात असा मी खेळिया गडी नाही मी ज्याच्या बाजूस राहीन त्याचीच बाजू राखीन ८ १७२ अनत ब्रह्मांडें उदरीं । हरि हा बाळक नदा घरीं ॥ १ ॥ नवल केव्हडें केव्हडें । न कले कान्होबाचे कोडें ॥ २ ॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥ ३ ॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥ ४ ॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - नटधारी-नाट्य धारण करणारा अर्थ - ज्याच्या उदरात अनत ब्रह्मांड समावतात तो हा बालक श्रीकृष्ण या नदाच्या घरी रागत आहे १ केवढे नवल आहे पाहा हे या कान्होबाचे कोडे काही केल्या उलगडतच नाही २ ज्या कृष्णाने सर्व पृथ्वीवरील लोकांना तृप्त केले त्यास माता यशोदा मोठ्या प्रेमाने घास भरवीत आहे ३ सर्व विश्वाला व्यापून राहणारा हा कमलापती श्रीकृष्ण, पण गोळणी यास कडेवर घेऊन मिरवितात ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण म्हणजे अनेक प्रकारची नाटकी रूपे धारण करणारा आहे अनेक प्रकारचे विविध भोग भोगून हा श्रीकृष्ण
सार्थ तुकारामगाथा ८७ १७३ कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टा चळकाप सुटला ॥ १ ॥ होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ २ ॥ प्रेम॑ नाम वाचे गाती । सदा आनंदें नाचती ॥ ३ ॥ तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चळकाप-चळचळा कापावया लावणारा थरकाप अर्थ - आज श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला केवढी आनंदाची गोष्ट दुष्ट लोकांच्या अंगाचा थरकाप उडालेला दिसतो १ या श्रीकृष्णाचा अवतार होताच सर्वत्र घरोघरी आनंद निर्माण झाला २ लोक त्याचे नाव मोठ्या प्रेमाने तोंडातून काढू लागले, आनंदाने नाचू लागले ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाचे नाव घेताना, त्याचा घोष करताना आपले सर्व दोष दूर होतील ४ विवरण - या एका लहानशा पण सुंदर अभंगात श्रीकृष्णजन्माने सर्वत्र जो आनंदी आनंद झाला त्याच मोठे रेखीव जिवंत वर्णन बुवानी केले आहे श्रीकृष्णजन्माच्या आधी कंसांदिकाची दुष्ट कृत्ये ध्यानात धरली तर लोक किती कष्टी व दुःखी झाले होत याची कल्पना येईल अशा प्रसंगी साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचे निर्दाळण करण्यासाठी आपण अवतार घेता हे 'पुढचे वचन श्रीकृष्णाने जन्म घेऊन जणु आधीच सार्थ केले कृष्ण जन्माचा आनंद या संदर्भात पाहण्यासारखा आहे १७४ मेळउनि सकळ गोपाळ । काहीं करिती विचार ॥ १ ॥ चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी । वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ २ ॥ वाट काढिली गोविंद्रीं । मागें गोपाळांची मांदी ॥ ३ ॥ अवघाचि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥ ४ ॥ घर पाहोनि एकांताचे । नवविधा नवनीताचे ॥ ५ ॥ रिघे आपण भीतरी । पुरवी मायुलियांच्या हरी ॥ ६ ॥ बोलो नेदी म्हणे स्थीर । खुणा बाबी खा रे क्षीर ॥ ७ ॥ जोगावल्यावरी । तुका करितो चाकरी ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - चंद्रधणी-मनाची तृप्ती, मांदी-समुदाय, मायुलियांच्या-दहादुधाच्या डेऱ्याच्या, हरी- ओळी, जोगावल्यावरी-संतुष्ट झाल्यावर अर्थ - सर्व गोपाळ एके ठिकाणी जमा करून श्रीकृष्णाने काही एक विचार केला १ तो म्हणाला, चला रे मित्रहो, आज आपण गौळणींच्या घरी जाऊन लोणी चोरून खाऊ व मनाची तृप्ती होईपर्यंत आज दहीदूध खाऊ चला, वेळ लावू नका एखाद्यासाठी उशीर करू नका २ श्रीकृष्णाने पुढे होऊन सर्वांना वाट दाखविली व त्याच्या पाठीमागे सर्व गोपाळांचा थवा निघाला ३ हा श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र वावरत असूनही कुणास एकदम समजत नाही ४ आणि जिथे नवविधा भक्तीचे स्थान आहे, जिथे एकान्तात ईश्वरचिंतन चालते ५ अशा ठिकाणी हा देव मोठ्या आनंदाने प्रवेश करतो व आपल्या सोबत्यांना दह्यादुधानी भरलेल्या भाड्याची किंवा डेऱ्याची रगच्या राग दाखवितो, त्यांना ते दहीदूध वाटतो ६ आणि दह्यादुधाचे सेवन मुकाटघाने करावे, बोलू नये, कुणी आवाज करू नये म्हणून हा खुणा करतो व सुचवितो की दूधदही भरपूर घ्या ७ तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने तृप्त झाल्यानंतर मी त्या प्रभूची मनोभावे चाकरी करीन संतुष्ट झाल्यावर त्याच्याच सेवेत राहीन ८ १ सदा नाम वाच गाती । प्रेमें आनंदे नाचती ॥