सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 99, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ७१ एक ते करूनि आराले आतां ऐसेचि घाटा ॥ ३ ॥ एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळल्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोवतीं घेती ॥ एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जोवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥ ४ ॥ एकीं एके वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुले । आपण घरींच गुंतलें माळा नासिलीं फुले ॥ गांठीचें तें सोडूं नावडे खाप आइतें दिले । सांपडलें वेठी घोडी रे भार वाहातां मेलें ॥ ५ ॥ एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया फांहींच ठावें ॥ जैसें होतें शिळें संचित तैसे लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडलें ठावें ॥ ६ ॥ एकीं हातीं पायीं पटे रे अंगों लाविल्या राखा । एक ते सोसिव वोडके केलो सपाट शिखा ॥ एक ते आळसी तळीं रे बरी वाढिल्या काजा । शिदोरी यांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाजा ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघेंचि ठावें ॥ मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंतें कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा – वळी-कमवी, भोवडा-हाकलून या, मोटा-शिदोऱ्याची गाठोडी, आराले-शांत झाले, वाजा-नाश. अर्थः-सर्व गोपाळ म्हणू लागले, या रे सर्वजण या, आपण काला करू. कोणी कोणती पापपुण्याची शिदोरी आणली आहे ते मला पाहू द्या. नीट खरे बोलून मला सर्व शिदोरी दाखवा; काही राखून ठेवू नका जो काही चोरून ठेवील, फसवोल त्याला येथून बाहेर काढले जाईल. १ हे काही जण त्याचा झाडा घेतल्याशिवाय काहीच देत नाहीत; जो तो एकमेकांची गवाही देत आहे, पण कुणी मोकळेपणाने सांगत नाहीत. तर कुणी ताक देतात, कुणी नात, कुणी भाकरी, कुणी दही देतात, याचा काला तयार करतात मध्यभागी बसलेला श्रीहरी हे सर्व घेतो; तो स्वतः होऊन काही आणीत नाही. २. काही गोपाळांना दम निघेना, त्यांनी आपली पापपुण्याची गाठोडी सोडून लागलीच श्रीकृष्णाच्या स्वाधीन केली. कित्येक जण गाठ सोडण्याचा विचार करीत राहिले तर कित्येक याचा नुसताच विचार करीत होते दुसरा एक या गाठोड्याचे ओझे नुसतेच पाठीवर घेऊन उभा होता; तर दुसरे काही हा सर्व भार हरीस अर्पण करून शांत झाले व दुसऱ्यास तुम्ही असेच करा असे सांगत राहिले. ३ कित्येकांनी आपल्या इंद्रियादी वृत्तींच्या गाई स्थिर केल्या, तर काहींनी त्यांना मोकळे सोडले, विषयात गुंतवून ठेविले काहींच्या या तृषांत गाई फारच ओढाळ निघाल्या; त्यांनी त्यांना फार त्रास दिला. विषयसुखातच त्यांचे फेरे चालू राहिले. कित्येकांच्या मनोवृत्ती हिरव्या चाऱ्यास पाहून तेथेच गुंतल्या, त्याच्या चित्तात श्रीहरी उरला नाही; काही एकमेकांना चला, हरीकडे चला म्हणू लागल्या; काही फेरे धरू लागल्या, हुंकारू लागल्या ४ कित्येकांनी, भोळ्या भावाने