सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 97, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ६९ आपल्या गोपाल मित्राबरोबर आनन्दगत वहून बालचात्री मौज लुटलो असे मागतात येथील मंदिरात यशोदेची दधिमथनाची जागा, मुसळ, जाते असा सखारही दाखविला जातो मंदिराच्या पूर्वेस असलेल्या पटांगणात आषाढ व वात्तिक शु. १५ स काल्याचा थाट होतो येथील काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय न परतण्याचा कित्येक वार- कऱ्याचा प्रघात आहे कृष्णावतारी झाल्या या बालगोलाचे कौतुक भक्तिप्रेमाच्या पोटी अजूनही ताजे टवटवीत असे आहे १४० अजुनि का थोर पोरा न म्हणसी फिर । धरुनिया धीर लाजे बुर निघाला ॥ १ ॥ मोकळा होतासि का रे पडिलासि डाईं । वरिलाचा भार आता उतरेसा नाही ॥ २ ॥ मेळवूनि मेळा एकाएकी दिली मिठी । कवळिले एक बहु बैसविली पाठी ॥ ३ ॥ तळील ते वरी वरील ते येते तळा । न सुटे तोयरी येथे गुंतलिया खेळा ॥ ४ ॥ सांडिता ठाव पुढे सैल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥ ५ ॥ तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावे तोच बरें वरी न ये डाय ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -थोर-पुर, फिर-बरोबर, बुर-भुसा, डाय-डाव अर्थ - अरे गृहस्था, जन्ममृत्यूच्या चक्रात इतक्या चकरा मारल्यास तरी अजून 'पुरे' कसे म्हणत नाहीस ? सशोधाने धैर्य धरून तू राहिलास तरी त्यामुळे तुझा भुसा निघाला असेल फार ताप झाला असेल १ चागला देहादिकाच्या व त्रिगुणाच्या बंधनातून प्रथम मोकळा होतास, मग या या प्रपंचाच्या डवात का पडलास ? आता प्रपचाचा हा भार तुझ्या डोक्यावर आहे तो खाली कसा उतरणार ? २ पचमहाभूताचा मेळा मिळवून आत्म्याने शरीराला मिठी दिल्यामुळे अनेक विकाराने ओझे आता पाठीवर येऊन बसले आहे ३ या प्रपचाच्या खेळात आता काही पुण्यकर्म करून खालचे थर येतील, दुष्ट कर्मादिकामुळे वरचे तळाशी येतील, पण येथील खेळात जोपर्यंत ते गुंतले आहेत तोपर्यंत त्याची पूर्ण सुटका मात्र होणार नाही ४ हा प्रपचरूपी डाव सोडून देताना हात सैल धर, जो चढेल तो पडेल अशी गोष्ट ध्यानात असू द्या ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा देहबुद्धी धारण करून प्रपंचाचा डाव खेळावा तरी किती ? देहात्मबुद्धी वृथा धारण करून हा डाव न खेळणेच अधिक बरे कारण मग अगावर डाव तरी येणार नाही ६ कोडें-अभंग २ १४१ कोडें रे कोडें ऐका हें फोडें । उगवूनि फार राहे गुतोनिया थोडें ॥ १ ॥ पुसतसे सागा मी हे माझें ऐसे काई । रूसू नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ २ ॥ सांगतो हैं मूळ काही न धरावी खती । जाले जीवो मेले मरो प्रारब्धा हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे अभिमान साडावा सकळी । नये अगावरी वाया येऊ देऊ कळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -उगवून-स्पष्ट होऊन सुगवे-समजणार नाही, कळी-लचाड अर्थ - एक कोडे आहे माझे ऐकता का ? त्याचे उत्तर सांगता का ? ते स्पष्ट होणारे फार असून गुप्त असे थोडेच आहे १ रागावू नका, पण ज्याला हे कोडे सुटणार नाही तो आपल्या आईशी सबंध ठेवणारा होईल मी व माझे असे हे काय आहे ? या प्रश्नाचे उत्तर हवे २ मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती अशी की तुम्ही कसलीच चिंता करू नका हा देह प्रारब्धामुळे जन्मास येतो, मरण पावतो, त्याच्या जन्माचा या मरणाचा विचार तुम्ही कशास करता ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देहात्म बुद्धीचा हा सर्व अभिमान तुम्ही सोडून द्यावा कोणत्याही विकाराचे लचाड तुमच्या अगावर येऊ देऊ नका ४