भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

लोकीं ॥ ३० ॥ एक म्हणती अघोरमंत्र । तेणें होइजे स्वतंत्र । श्रीहरी- चें कलत्र¹ । तेंचि वोले ॥ ३१ ॥ तिज लागले सर्व अधर्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । एक म्हणती कुकर्म । तिच्या मदें ॥ ३२ ॥ एक म्हणती एक साक्षेप । करावा मृत्युंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प² । सिद्धीतें पावती ॥ ३३॥ एक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । एक म्हणती झोटिंग सर्व । पुरवितसे ॥ ३४ ॥ एक म्हणती काळी³ । एक म्हणती भद्रकाळी । एक म्हणती उच्छिष्ट चांडाळी⁴ । साद्य करावी ॥ ३५ ॥ एक म्हणती विघ्न- हर । एक म्हणती भोळा शंकर । एक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥३६॥ एक म्हणती मल्हारी । सत्वरचि सभाग्‍य करी । एक म्हणती महा बरी । भक्ति व्यंकटेशाची ॥ ३७ ॥ एक म्हणती पूर्वठेवा⁵ । एक म्हणती प्रयत्न करावा । एक म्हणती भार घालावा । देवावरी ॥३८॥ एक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहतो भल्यांचा । एक म्हणती हा युगाचा । युगधर्म ॥३९॥ एक आश्चर्य मानिती । एक विस्मय करिती । एक कंटाळोन म्हणती । काय होईल तें पाहावें ॥ ४० ॥ ऐसे प्रापंचिक जन । लक्षणें सांगतां गहन ! प- परंतु कांहींएक चिन्ह । अल्पमात्र बोलिलें ॥ ४१ ॥ आतां असो हा स्वभाव । ज्ञात्याचा कैसा अनुभव । तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥ एक म्हणती करावी भक्ती । श्रीहरि देईल सद्गती । एक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेचि होय ॥ ४३ ॥ एक म्हणती भोग सुटेना । जन्ममरण हें तुटेना । एक म्हणती ऊर्मी⁶ नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥ एक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । एक म्हणती हा अधर्म । बोलोंच नये ॥४५॥ एक म्ह- णती सर्व नासे । उरलें तेंचि ब्रह्म असे । एक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥४६॥ सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म । दोन्ही पूर्वपक्षांचे⁷ भ्रम । अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती एक ॥ ४७ ॥ एक म्हणती हें न घडे । अनिर्वाच्य⁸ वस्तु न जोडे । जे बोलतां मौन पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥ तंव श्रोता अनुवादला । ह्याणे निश्चय कोण केला । सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥ अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वीच बोलिलें । आतां कांहींएक केलें । न


१. स्त्री, लक्ष्मी. २. मनोरथ. ३. महाकाळी. ४. एक देवी. ५. नशीब. ६. कल्पनां. ७. खोट्या विचाराचे. ८. बोलून दाखवितां येत नाहीं अशी.

२१६ श्रीदासबोध. [ दशक वचे कीं ॥ ५० ॥ एक साक्षित्त्वें वर्तती । साक्षी वेगळाचि ह्मणती । आ- पण द्रष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥ दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा । आपण साक्षित्त्वें निराळा । स्वानुभवें ॥ ५२ ॥ सकळ पदार्थ जाणता । तो पदार्थांहूनि परता । देहीं असोनि अलिप्तता । सहजाचि जाहली ॥ ५३ ॥ एक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षित्त्वें वर्तावें । दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥ एक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठायींचीच अभेद । तेथें कैचा मतिमंद । द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥ अ- वघी साखरचि स्वभावें । तेथें कडू काय निवडावें । द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥ प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद । परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥ विघरलें तूप थिजलें । तैसें निर्गु- णचि गुणा आलें । तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥ म्हणोनि द्रष्टा आणि दृश्य । अवघा एकचि जगदीश । द्रष्टेपणाचा सायास । कासयासी ॥ ५९ ॥ ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा एकाचा अनुभव । ऐसे हे दोन्ही स्व- भाव । निरूपिले ॥ ६० ॥ अवघा आत्मा आकारला । आपण भिन्न कैंचा उरला । दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥ ऐक तिसरा अनु- भव । प्रपंच सारूनियां सर्व । कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें ह्मणती ॥६२॥ दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें । तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती एक ॥ ६३ ॥ परी तें ब्रह्म म्हणों नये । उपायासारिखा अपाय । शून्यत्वास ब्रह्म काय । म्हणों येईल ॥ ६४ ॥ दृश्य अवघें वोलांडिलें । अ- दृश्य शून्यत्वीं पडिलें । ब्रह्म म्हणोनि मुराडिलें । तेथूनचि मागें ॥६५॥ इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें शून्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धीस्तव । प्राणी ब्रह्म ह्मणे ॥ ६६ ॥ रायासि नाहीं वोळखिलें । सेवकास राव ऐसें कल्पिलें । परी तें अवघें व्यर्थ गेलें । राजा देखतां ॥६७॥ तैसें शून्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म । शून्यत्वाचा अवघा भ्रम । तुटोनि गेला ॥ ६८ ॥ परी हा सूक्ष्म अडथळा । वारी विवेकें वेगळा । जैसें दुग्ध घेऊनि जळां । राज- हंस सांडिती ॥ ६९ ॥ आधीं दृश्य हें सोडिलें । मग शून्यत्व वोलांडिलें । मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७० ॥ वेगळेपणें पाहणें घडे । तेणें वृत्ति शून्यत्वीं पडे । पोटीं संदेह पवाडे । शून्यत्वाचे ॥ ७१ ॥ भिन्नपणें अनुभ-

९ वा. ] आशंका. २१७ विलें । तयास शून्यत्व ऐसें बोलिलें । वस्तुप¹क्षीं अभिन्न झालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥ वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तूचें पाहणें । निश्चयेंसि भि- न्नपणें । शून्यत्व लाभे ॥ ७३ ॥ या कारणें शून्यत्व कांहीं । परब्रम्ह होणार नाहीं । वस्तुस्वरूप होऊनि पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥ आपण वस्तु सि- द्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये । साधु सांगती उपाय । तूं चि आत्मा ॥ ७५ ॥ मन मी ऐसें नों²थिलें । संतीं नाहीं निरूपिलें । मानावें कोणा- च्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥ संतवचनीं ठेवितां भाव । तोचि शुद्ध स्वानुभव । मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥ जयाचा घ्या- वा अनुभव । तोचि आपण निरवय³व । आपुला घेती अनुभव । विश्व- जन ॥ ७८ ॥ लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि झाले । मग ते भाग्य पुरुषीं भोगिले । सावकाश ॥ ७९ ॥ तैसें देहबुद्धि सोडितां । साध- कास झालें तत्वतां । अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥ आपण वस्तु मुळीं एक । ऐसा ज्ञानाचा विवेक । येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जा- हला ॥८१॥ आत्मज्ञान निरूपिलें । यथामतीनें बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टम- दशके शून्यत्वनिरसननिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ६४३. दशक नववा. १. आशंका. श्रीगणेशाय नमः ॥ निराकार म्हणिजे काय । निराधार म्हणिजे काय । निर्विकल्प ह्मणिजे काय । मज निरूपावें ॥ १ ॥ निराकार म्हणिजे आकार नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं । निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मीं ॥२॥ निरामय म्हणिजे काय । निराभास म्हणिजे काय । निरवय- व म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ३ ॥ निरामय म्हणिजे आम⁴य नाहीं । निराभास म्हणिजे भासचि नाहीं । निरवयव म्हण्जे अवयव नाहीं । पर- १. ब्रह्माचिंतनानें. २. नसलेलें. ३. अवयवरहित. ४. दुःख.

२१८ श्रीदासबोध. [ दशक ब्रह्मीं ॥ ४ ॥ निष्प्रपंच म्हणिजे काय । निष्कलंक म्हणिजे काय । निरु- पाधी म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ५ ॥ निष्प्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं । निष्कलंक म्हणिजे कलंक नाहीं । निरुपाधि म्हणिजे उपाधि¹ नाहीं । पर- ब्रह्मीं ॥ ६ ॥ निरुपम म्हणिजे काय । निरालंब म्हणिजे काय । निरपेक्ष म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ७ ॥ निरुपम म्हणिजे उपमा नाहीं । निरालंब म्हणिजे अवलंब² नाहीं । निरपेक्ष म्हणिजे अपेक्षा नाहीं । पर- ब्रह्मासी ॥ ८ ॥ निरंजन म्हणिजे काय । निरंतर म्हणिजे काय । निर्गुण म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ९ ॥ निरंजन म्हणिजे अंजन³चि नाहीं । निरंतर म्हणिजे अंतर नाहीं । निर्गुण म्हणिजे गुणचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १० ॥ निःसंग म्हणिजे काय । निर्मळ म्हणिजे काय । निश्चळ म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ११ ॥ निःसंग म्हणिजे संगाचि नाहीं । निर्मळ म्हणिजे मळचि नाहीं । निश्चळ म्हणिजे चळ नाहीं । परब्रह्मासी ॥ १२ ॥ निःशब्द म्हणिजे काय । निर्दोष म्हणिजे काय । निवृत्ति म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ १३ ॥ निःशब्द म्हणिजे शब्दचि नाहीं । निर्दोष म्हणिजे दोषचि नाहीं । निवृत्ति म्हणिजे वृत्तिच नाहीं । परब्रह्मासी ॥ १४ ॥ नि- ष्काम म्हणिजे काय । निर्लेप म्हणिजे काय । निष्कर्म म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ १५ ॥ निष्काम म्हणिजे कामचि नाहीं । निर्लेप म्हणिजे ले- पचि नाहीं । निष्कर्म म्हणिजे कर्मचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १६ ॥ अनाम म्हणिजे काय । अजन्मा म्हणिजे काय । अप्रत्यक्ष म्हणिजे काय । मज नि- रूपावें ॥ १७ ॥ अनाम म्हणिजे नामचि नाहीं । अजन्मा म्हणिजे जन्मचि नाहीं । अप्रत्यक्ष म्हणिजे प्रत्यक्ष नाहीं । परब्रह्म तें ॥ १८ ॥ अगणित म्हण जे काय । अकर्तव्य म्हणिजे काय । अक्षय म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ १९ ॥ अगणित म्हणिजे गणित नाहीं । अकर्तव्य म्हणिजे कर्तव्य नाहीं । अक्षय म्हणिजे क्षय नाहीं । परब्रह्मासी ॥ २० ॥ अरूप म्हणिजे काय । अलक्ष्य म्हणिजे काय । अनंत म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २१ ॥ अरूप म्हणिजे रूपचि नाहीं । अलक्ष्य म्हणिजे लक्ष्य⁴चि नाहीं । अनंत म्हणिजे अंतचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २२ ॥ अपार म्हणिजे काय । अढळ म्हणिजे १. संबंध. २. आधार. ३. मळ. ४. लक्षांत आणण्याजोगें.

९ वा. ] ब्रह्म. २१९ काय । अतर्क्य म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २३ ॥ अपार म्हणिजे पाराचि नाहीं । अढळ म्हणिजे ढळचि नाहीं । अतर्क्य म्हणिजे तर्क्याचि नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥ अद्वैत म्हणिजे काय । अदृश्य म्हणिजे काय । अच्युत म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २५ ॥ अद्वैत म्हणिजे द्वैतचि नाहीं । अदृश्य म्हणिजे दृश्यचि नाहीं । अच्युत म्हणिजे च्युतें नाहीं । परब्रह्म तें ॥ २६ ॥ अच्छेद्य म्हणिजे काय । अदाह्य म्हणिजे काय । अक्लेद्य म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २७ ॥ अच्छेद्य म्हणिजे छेदेना । अदाह्य म्हणिजे जळेना । अक्लेद्य म्हणिजे कौलवेना । परब्रह्म तें ॥ २८ ॥ परब्रह्म म्हणिजे सकळां परतें । तयास पाहतां आपणचि तें । हें कळे अनुभवमतें । सद्गुरु केलिया ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके आशंका- निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ जें जें कांहीं साकार दिसे । तें तें कल्पांतीं नासे । स्वरूप तें असतचि असे । सर्वकाळ ॥ १ ॥ जें सकळांमध्यें सार । मिथ्या नव्हे तें साचार । जें कां नित्य निरंतर । संचलेंचि असे ॥ २ ॥ तें भग- वंताचें निजरूप । त्यासि बोलिजे स्वरूप । याहि वेगळीं अमूप । नामें तयाचीं ॥ ३ ॥ त्यास नामाचा संकेत । कळावया हा दृष्टांत । परी तें स्व- रूप नामातीत । असतचि असे ॥ ४ ॥ दृश्यांसेंबाह्य संचलें । परी तें विश्वास चोरलें । जवळींच नाहींसें झालें । असतचि कैसें ॥ ५ ॥ ऐसा ऐकोनियां देव । उठे दृष्टीचा भावें । पाहों जातां दिसे सर्व । दृश्यचि अवघें ॥ ६ ॥ दृष्टीचा विषय दृश्य । तोचि झालिया सादृश्यें । तेणें दृष्टी पावे संतोष । परी तें देखणें नव्हे ॥ ७ ॥ दृष्टीस दिसे तें नासे । एतद्विषयीं श्रुति असे । म्हणोनि जें दृष्टीस दिसे । तें स्वरूप नव्हे ॥ ८ ॥ स्वरूप तें निराभास । आणि दृश्य भासलें साभास । भासास बोलिला नाश । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥ आणि पाहतां दृश्यचि भासे । वस्तु दृश्यावेगळी असे । स्वानुभवें १. तर्काने जाण्याजोगें. २ चळणारें. ३. भिजेना. ४. पुष्कळ. ५. जगताच्या आंतबाहेर. ६. पाहण्याची इच्छा. ७. प्रत्यक्ष. ८. आभासयुक्त.

२२० श्रीदासबोध. [ दशक पाहतां दिसे । दृश्यासबाह्य ॥ १० ॥ जें निराभास निर्गुण । त्याची काय सांगावी खुण । परी तें स्वरूप जाण । सन्निधचि असे ॥ ११ ॥ जैसा आकाशीं भासला भास । आणि सकळांमध्यें आकाश । तैसा जाणिजे जग- दीश । सबाह्य अभ्यंतरीं ॥ १२ ॥ उदकामध्ये परी भिजेना । पृथ्वीमध्ये परी शिरेना । वन्हीमध्यें परी जळेना । स्वरूप देवाचें ॥ १३ ॥ तें ओघा- मध्यें परी बुडेना । तें वायूमध्ये परी उडेना । सुवर्णी असे परी घडेना । सुवर्णा- सारिखें ॥ १४ ॥ ऐसें जें संचलें सर्वदा । परी तें आकळेना कदा । अमे- दामाजी वाढवी भेदा । ते हे अहंता ॥ १५ ॥ तिच्या स्वरूपाची खूण । सांगों कांहीं वोळखण । अहंतेचें निरूपण । सावध ऐका ॥ १६ ॥ जे स्वरूपाकडे पावे । अनुभवासवें झेंपावे । अनुभवाचे शब्द आघवे । बोलोन दावी ॥ १७ ॥ म्हणे आतां मीच स्वरूप । तेंचि अहंतेचें रूप । निराकारीं आपे- आप । वेगळी पडे ॥१८॥ स्वयें मीच आहें ब्रह्म । ऐसा अहंतेचा भ्रम । ऐ- सिये सूक्ष्मीं सूक्ष्म । पाहतां दिसे ॥ १९ ॥ कल्पना आकळी हेत । वस्तु कल्पनातीत । म्हणोन नाकळे अंत । अनंताचा ॥ २० ॥ अन्वय आणि व्यतिरेक । हा शब्दभेद कोणीएक । निःशब्दाचा अंतर्विवेक । शोधिला पा- हिजे ॥ २१ ॥ आधीं घेइजे वाच्यांश । मग वोळखिजे लक्ष्यांश । लक्ष्यांशीं पाहतां वाच्यांश । असेल कैंचा ॥ २२ ॥ सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म । हा वाच्यांशाचा अनुक्रम । शोधितां लक्ष्यांशाचें वर्म । वाच्यांश नासे ॥२३॥ सर्व विमळ दोन्ही पक्ष । वाच्यांशीं आटती प्रत्यक्ष । लक्ष्यांशीं लावितां लक्ष । पक्षपात घडे ॥ २४ ॥ हें लक्ष्यांशें अनुभवणें । तेथें नाहीं वाच्यांश बोलणें । मुख्य अनुभवाचे खुणे । वाचारंभ कैंचा ॥ २५ ॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी । जेथें वोसरती चारी । तेथें शब्द कळाकुसरी । कोण काज ॥ २६ ॥ शब्द बोलतां सर्वचि नासे । तेथें शाश्वतता कोठें असे । प्रत्यक्षास प्रमाण नसे । बरें पाहा ॥ २७ ॥ शब्द प्रत्यक्ष नाशवंत । म्हणोन घडे पक्ष- पात । सर्व विमळ ऐसा हेत । अनुभवीं नाहीं ॥ २८ ॥ ऐक अनुभवाचें लक्षण । अनुभव म्हणिजे अनन्यपण । ऐक अनन्याचें लक्षण । ऐसें असे ॥ २९ ॥ अनन्य झणिजे अन्य नसे । आत्मनिवेदन जैसें । संगभंगें असत- १. लय पावतात. २. एकपक्षो बोलणें. ३. शब्दप्रवृत्ति. ४. आसक्ति तुटल्यानें.

९ वा.] नि:संदेह. २२१ चि असे । आत्मा आत्मपणें ॥ ३० ॥ आत्म्यास नाहीं आत्मपण । हेंचि निःसंगाचें लक्षण । हें वाच्यांशें बोलिलें जाण । कळावयाकारणें ॥ ३१ ॥ येन्हवीं लक्ष्यांश तो वाच्यांशें । सांगिजेल हें घडेल कैसें । वाक्यविवरणें आपैसें । कळों लागे ॥ ३२ ॥ करावें तत्त्वविवरण । शोधावें ब्रह्म निर्गुण । पाहावें आपणास आपण । म्हणजे कळे ॥ ३३ ॥ हें न बोलतांचि विवरिजे । विवरोन विवरोन राहिजे । मग अबोलणेंचि साजे । महापुरुषां ॥ ३४ ॥ शब्दांचि निःशब्द होती । श्रुति नेति नेति¹ म्हणती । हें तों आलें आत्म- प्रचीती । प्रत्यक्ष आतां ॥ ३५ ॥ प्रचीत आणि अनुमान । हा तों प्रत्यक्ष दुरभिमान । तरी आतां मी अज्ञान । मज कांहींच न कळे ॥ ३६ ॥ मी लटिका माझें बोलणें लटिकें । मी लटिका माझें चालणें लटिकें । मी माझें अवघेंचि लटिकें । काल्पनिक ॥ ३७ ॥ मज मुळींच नाहीं ठाव । माझें बो- लणें अवघेंचि वाव । हा प्रकृतीचा स्वभाव । प्रकृति लटिकी ॥ ३८ ॥ प्रकृति आणि पुरुष । या दोहींस जेथें निरास । तेथें मीपण विशेष । हें केवीं घडे ॥ ३९ ॥ जेथें सर्वहि अशेष² झालें । तेथें विशेष कैचें आलें । मी मौनी म्हणतां भंगलें । मौन जैसें ॥ ४० ॥ आतां मौन न भंगावें । करून कांहींच न करावें । असोन निःशेष नसावें । विवेकबळें ॥ ४१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. निःसंदेह. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं केलें अनुमान । ऐसें कैसें ब्रम्हज्ञान । कांहींच नाहीं असोन । हें केवीं घडे ॥ १ ॥ सकळ करूनि अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता । सकळांमध्ये अलिप्तता । येईल कैंची ॥ २ ॥ तथापि तुम्ही म्ह- णतां । योगी भोगून अभोक्ता । तरी स्वर्ग नरकही आतां । येणेंचि न्यायें ॥ ३ ॥ जन्ममृत्यु भोगिलेच भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी । पा- तक नाहीं तयालागीं । येणेंचि पाँडें³ ॥ ४ ॥ कुटून नाहीं कुटिला । रडोन नाहीं रडला । कुंथोन नाहीं कुंथिला । योगीश्वर ॥ ५ ॥ जन्म नसोन घात- ला । पतित नसोन झाला । यातना नसोन पावला । नानापरी ॥ ६ ॥ १. हें ब्रह्म नव्हे, तें ब्रह्म नव्हे, इत्यादि. २. शून्य. ३. तुलनेनें.

२२२ श्रीदासबोध. [ दशक ऐसें श्रोत्यांचें अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान । आतां याचें समाधान । केलें पाहिजे ॥ ७ ॥ वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें । परी हें तुमच्या अनुभवें । तुम्हांस घडे ॥ ८ ॥ ज्याचा अनुभव जैसा । तो तो बोलतो तैसा । संपदेविण जो धिंवैसा । तो निरर्थक ॥ ९ ॥ नाहीं ज्ञानाची संपदा । अज्ञानदरिद्रें आपदा । भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें ॥ १० ॥ ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरें । योगी ओळखावा योगीश्वरें । महा चतुर तो चतुरें । वोळखावा ॥ ११ ॥ अनुभवी अनुभवियासि कळे । अलिप्त अलिप्त- पणें निवळे । विदेहाचा देहभाव गळे । विदेही देखतां ॥ १२ ॥ बद्धा- सारिखा सिद्ध । आणि सिद्धासारिखा बद्ध । एक भावील तो अबद्ध । म्ह- णावा नलगे ॥ १३ ॥ झडपला तो देहधारी । आणि देहधारक पंचाक्षरी । परंतु दोघां एक सैरी । कैसी द्यावी ॥ १४ ॥ तैसा अज्ञान पतित । आणि ज्ञानी जीवन्मुक्त । दोघां समान मानी तो युक्त । कैसा म्हणावा ॥ १५ ॥ आतां असो हे दृष्टांत । प्रचीत बोलों कांहीं हेत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षणएक व्हावें ॥ १६ ॥ जो ज्ञानें मुक्त झाला । जो विवेकें विराला । जो अनन्यपणें उर- ला । नाहींच कांहीं ॥ १७ ॥ तयास कैसें गवसावें । शोधूं जातां तोचि व्हावें । तोचि होतां म्हणावें । नलगे कांहीं ॥ १८ ॥ देहीं पाहतां दिसेना । तत्त्वें शोधितां भासेना । ब्रह्म आहे निवडेना । कांहीं केल्या ॥ १९ ॥ दि- सतो तरी देहधारी । परी कांहींच नाहीं अंतरीं । तयास पाहतां वरीवरी । कळेल कैसा ॥ २० ॥ कळाया शोधावें अंतर । तंव तो नित्य निरंतर । ज- यास धुंडितां विकार । निर्विकार होती ॥ २१ ॥ तो परमात्मा केवळ । तयास नाहीं मायाजाळ । अखंड हेतूचा विटाळ । झालाच नाहीं ॥ २२ ॥ ऐसा जो कां योगिराज । तो आत्मा सहजीं सहज । पूर्णब्रह्म वेदबीज । दे- हाकारें कळेना ॥ २३ ॥ देहें भावितां देहचि दिसे । अंतर अनारिसें असे । तयास शोधितां नसे । जन्ममरण ॥ २४ ॥ जयास जन्ममरण व्हावें । तें तो नव्हेचि स्वभावें । नाहींच तें आणावें । कोठून कैंचें ॥ २५ ॥ निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला । तरी उडाला आणि जन्मला । आपला आपण ॥ २६ ॥ माध्यान्हीं थुंकितां सूर्यावरी । तो थुंका पडे आप- १. सामर्थ्यावांचून. २. धैर्य. ३. योग्यता. ४. कल्पना केली असतां. ५. वेगळें.

णावरी । दुसऱ्यास चिंतित i अंतरीं । आपणास घडे ॥ २७ ॥ समर्थ रा- याचें महिमान । जाणतां होतें समाधान । परंतु भुंकों लागलें श्वान । तरी तें श्वानचि असे ॥ २८ ॥ ज्ञानी तो १सत्यस्वरूप । अज्ञान देखे मनुष्यरूप । भावासारिखा फळद्रूप । देव तैसा ॥ २९ ॥ देव निराकार निर्गुण । लोक २भाविती पाषाण । पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैंचा ॥ ३० ॥ देव स- दोदित संचला । लोकीं बहुविध केला । परंतु बहुविध झाला । हें तों घडे- ना ॥ ३१ ॥ तैसा साधु आत्मज्ञानी । बोधें पूर्ण समाधानीं । विवेकें आ- त्मनिवेदनीं । आत्मरूपी ॥ ३२ ॥ जळोन काष्ठाचा आकार । अग्नि दिसे काष्ठाकार । परी काष्ठ होईल हा विचार । बोलोंचि नये ॥ ३३ ॥ कापूर असे तो जळतां दिसे । तैसा ज्ञानी देहीं भासे । तयासि जन्मवितां कैसे । कदलीउदरीं ॥ ३४ ॥ बीज भाजलें उगवेना । वस्त्र जळालें उकलेना । वोघ निवडितां निवडेना । गंगेमध्यें ॥ ३५ ॥ वोघ गंगेमागें दिसे । गंगा एक- देशी असे । साधु कांहींच न भासे । आत्मा सर्वगत ॥ ३६ ॥ सुवर्ण नव्हे लोखंड । साधूस जन्म थोतांड । अज्ञान प्राणी जड मूढ । तयांसि हें उम- जेना ॥ ३७ ॥ अंधास कांहींच न दिसे । तरी ते लोक आंधळे कैसे । स- न्निपातें बरळतसें । सन्निपाती ॥ ३८ ॥ जो स्वप्नामध्यें भ्याला । तो स्वप्न- भयें वोसणला । तें भय जागत्याला । केवीं लागे ॥ ३९ ॥ मुळीं सर्पा- कार देखिली । एक भ्याला एकें वोळखिली । दोघांची अवस्था लेखिली । सारिखीच कैसी ॥ ४० ॥ हातीं धरितां डसेना । हें एकास भासेना । तरी ते त्याची कल्पना । तयासीच बाधी ॥ ४१ ॥ विंचू सर्प डसला । तेणें तोचि ३जाकळला । तयाचेनि लोक झाला । कासावीस कैसा ॥ ४२ ॥ आतां तुटलें अनुमान । ज्ञानियास कळे ज्ञान । अज्ञान्यास जन्ममरण । चुकेना कीं ॥ ४३ ॥ एका जाणण्यासाठीं । लोक पडिले ४आटॉआटीं । नेणतपणें हिं- पुटी ५ । होती जन्ममृत्यु ॥ ४४ ॥ तेंचि कथानुसंधान । पुढें केलें परीच्छिन्न । सावधान सावधान । म्हणे वक्ता ॥ ४५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसं- वादे नवमदशके निःसंदेहनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥


१. ब्रह्मस्वरूप. २. मानतात. ३. घाबरला. ४. खटपटींत. ५. कष्टी.

२२४ श्रीदासबोध. [ दशक ४. जाणपण. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें लोक सकळ । एक संपन्न एक दुर्बळ । एक निर्मळ एक वोंगळ । काय निमित्तें ॥ १ ॥ कित्येक राजे नांदती । कि- त्येक दरिद्र भोगिती । कित्येकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमाधम ॥ २ ॥ ऐसें काय निमित्त झालें । हें मज पाहिजे निरूपिलें । याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥ हे सकळ गुणापासी गती । १सगुण भाग्य- श्रो भोगिती । अवगुणास दरिद्रप्राप्ती । यदर्थीं संदेह नाहीं ॥ ४ ॥ जो जेथें उपजला । तो तेथें व्यवसायीं उमजला । तयास लोक म्हणती भला । कार्यकर्ता ॥ ५ ॥ जाणता तो कार्य करी । नेणता कांहींच न करी । जाण- ता तो पोट भरी । नेणता भीक मागे ॥ ६ ॥ हें तों प्रगटचि असे । जनीं पाहतां प्रत्यक्ष दिसे । विद्येविण करंटा वसे । विद्या तो भाग्यवंत ॥ ७ ॥ आपुली विद्या न शिकसी । तरी काय भीक मागसी । जेथें जेथें बुद्धि ऐसी । वडील सांगती ॥ ८ ॥ वडील आहे करंटा । आणि समर्थ होय धाकुटा । कां जो विद्येनें मोठा । म्हणोनियां ॥ ९ ॥ विद्या नाहीं बुद्धि नाहीं । वि- वेक नाहीं साक्षेप नाहीं । कुशलता नाहीं व्याप नाहीं । म्हणोन प्राणी करंटा ॥ १० ॥ इतुकेंहि जेथें वसे । तेथें वैभवास उणें नसे । वैभव सोडि- तां आपैसें । पाठी लागे ॥ ११ ॥ वडील समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी । वडिलांऐसा व्याप न करी । म्हणोनियां ॥ १२ ॥ जैसी विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसें वैभव । तोलसारिखा हावभाव । लोक करिती ॥ १३ ॥ विद्या नसे वैभव नसे । तेथें निर्मळ कैंचा असे । करंटपणें चोखटा दिसे । वोंगळ आणि विकारी ॥ १४ ॥ पशु पक्षी गुणवंत । त्यांस ग्रहण करिती समर्थ । गुण नसतां जिणें व्यर्थ । प्राणिमात्रांचें ॥ १५ ॥ गुण नाहीं गौरव नाहीं । सामर्थ्य नाहीं महत्व नाहीं । कुशलता नाहीं तर्क नाहीं । प्राणिमात्रांसी ॥ १६ ॥ या कारणें उत्तम गुण । तेंचि भाग्याचें लक्षण । लक्षणेंविण अवलक्षण । सहजचि झालें ॥ १७ ॥ जना- मध्यें जो जाणता । त्यास आहे मान्यता । कोणी एक विद्या असतां । महत्व पावे ॥ १८ ॥ प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि १. गुणी पुरुष. २. उद्योग. ३. प्रतिष्ठा.

समर्थ । नेणतां जाणिजे व्यर्थ । निष्कारण ॥१९॥ नेणतां विंचू सर्प डसे । नेणतां जीवघात असे । नेणतां कार्य नासे । कांहींएक ॥ २० ॥ नेणतां प्राणी सिंतरे १ । नेणतपणें तन्हे भरे । नेणतपणें ठके विसरे । पदार्थ कांहीं ॥ २१ ॥ नेणतां वैरी जिंकिती । नेणतां अपायीं पडती । नेणतां संहारिती घडती । जीवनाश ॥ २२ ॥ आपुलें स्वहित न कळे जनां । तेणें भोगिती यातना । ज्ञान नेणतां अज्ञाना । अधोगती ॥२३॥ माया ब्रह्म जीव शिव । सारासार भावाभाव २ । जाणिल्यासाठीं होतें वाव । जन्ममरण ॥ २४ ॥ कोण कर्ता निश्चयेंसी । बद्ध मोक्ष तो कोणासी । ऐसें जाणतां प्राणियासी । सुटका घडे ॥२५॥ जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण । जाणिजे अनन्यैलक्षण ३ । म्हणिजे मुक्त ॥२६॥ जितुकें जाणोन सांडिलें । तितुकें दृश्य वोलांडिलें । जाणत्यास जाणतां तुटलें । मूळ मीपणाचें ॥२७॥ न जाणतां कोटिवरी । साधनें केलीं परोपरी । तरी मोक्षास अधिकारी । होणार नाहीं ॥ २८ ॥ माया ब्रह्म वोळखावें । आपणास आपण जाणावें । इतु- क्यासाठीं स्वभावें । चुके जन्म ॥ २९ ॥ जाणतां समर्थांचें अंतर । प्रसंगे वर्ते तदनुसार । भाग्यवैभव अपार । तेणेंचि पावे ॥ ३० ॥ म्हणोन जाणणें नव्हे सामान्य । जाणतां होईजे सर्वमान्य । कांहींच नेणे तो अमान्य । सर्वत्र करिती ॥ ३१ ॥ पदार्थ देखोन भूतें ४ भावी । नेणतां झेंडपोन प्राण ठेवी । मिथ्या आहे उठाठेवी । जाणते जाणती ॥ ३२ ॥ जाणत्यास कळे वर्म । नेणत्याचें खोटें कर्म । सकळ कांहीं धर्माधर्म । जाणतां कळे ॥३३॥ नेणे त्यास यमयातना । जाणत्यास कांहींच लागेना । सकळ जाणोन विवे- चना । करी तो मुक्त ॥ ३४ ॥ नेणतां कांहीं राजकारण । अपमान करून घेती प्राण । नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ॥ ३५॥ म्हणोनियां नेणणें खोटें । नेणते प्राणी ते करंटे । जाणतां विवरतां तुटे । जन्ममरण ॥३६॥ म्हणोन अलक्ष करूं नये । जाणणें हाचि उपाय । जाणतां सांपडे सोय । पर- लोकाची ॥ ३७ ॥ जाणणें सकळांस प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण । प- रंतु अलिप्तपणाची खूण । जाणतां कळे ॥ ३८ ॥ एक जाणणें करून पर- तें । कोण सोडवील प्राणियातें । कोणी एक कार्य जें तें । जाणिल्याविण न

१. फसतो. २. असणें-नसणें. ३. एकनिष्ठेचें स्वरूप. ४. पिशाच्च समजतो.

२२६ श्रीदासबोध. [ दशक कळे ॥ ३९ ॥ जाणणें म्हणिजे स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण । दोहीं- मध्यें कोण प्रमाण । शाहणे जाणती ॥ ४० ॥ जाणते लोक शाहाणे । नेणते वेडे दैन्यवाणे । विज्ञान तेंहि जाणतपणें । कळों आलें ॥ ४१ ॥ जेथें जाणतेपण खुंटलें । तेथें बोलणेंहि तुटलें । हेतुरहित जाहलें । समाधान ॥ ४२ ॥ श्रोते म्हणती हें प्रमाण । झालें परम समाधान । परी पिंडब्रह्मांड- ऐक्यलक्षण । आम्हां निरूपावें ॥ ४३ ॥ ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे । बहुत बोलती ऐसें । परंतु याचा प्रत्यय विलसे । ऐसें केलें पाहिजे ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके जाणपणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. अनुमाननिरसन. श्रीगणेशाय नमः ॥ पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । न ये आमुच्या अनु- माना । प्रचीत पाहतां नाना । मतें भांबावती ॥ १ ॥ जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । ऐसी बोलावयाची प्रौढी । हें वचन घडीनें घडी । तत्त्वज्ञ बोलती ॥ २ ॥ पिंडब्रह्मांड एक राहाटी । ऐसी लोकांची धाटी । परी प्रत्ययाचे परिपाठीं । तगों न शके ॥ ३ ॥ स्थूल सूक्ष्म कारण महाकारण । हे पिंडींचे चार देह जाण । विराट हिरण्यगर्भ अव्याकृत मूळप्रकृति हे खूणें । ब्रम्हां- डाची ॥ ४ ॥ हे शास्त्रधाटी जाणावी । परी प्रचीती कैसी आणावी । प्रचीत पाहतां गाथागोवी । होत आहे ॥ ५ ॥ पिंडीं आहे अंतःकरण । तरी ब्रह्मांडीं विष्णु जाण । पिंडीं बोलिजे तें मन । ब्रह्मांडीं चंद्रमा ॥ ६ ॥ पिंडीं बुद्धि ऐसें बोलिजे । तरी ब्रह्मांडीं ब्रम्हा ऐसें जाणिजे । पिंडीं चित्त ब्रह्मांडीं वोळखिजे । नारायण ॥ ७ ॥ पिंडीं बोलिजे अहंकार । ब्रह्मांडीं रुद्र हा निर्धार । ऐसा बोलिला विचार । शास्त्रांतरीं ॥ ८ ॥ तरी कोण विष्णूचें अंतःकरण । चंद्राचें कैसें मन । ब्रम्हाचें बुद्धिलक्षण । मज निरू- पावें ॥ ९ ॥ नारायणाचें कैसें चित्त । रुद्र अहंकाराचा हेत । हा विचार पाहोन नेमस्त । मज निरूपावें ॥ १० ॥ प्रचीत निश्चयापुढें अनुमान । जैसें सिंहापुढें आलें श्वान । खऱ्यापुढें खोटें प्रमाण । होईल कैसें ॥ ११ ॥ परी यासि पारखी पाहिजे । पारखीनें निश्चय लाहिजे । परीक्षा नसतां १. साक्षात्कार. २. मार्गामध्यें. ३. नांवें; चार देहांचीं चार.

? No, the third word is कोट्यानकोटी. Wait, before कोट्यानकोटी, the word has how many letters? Two letters! Letter 1: Letter 2:चि? वि? जि? Wait, is there a dot over ? Look at inअंधकार(L8):अं. There is a distinct dot above . In L27, above , there is NO dot! Wait, is there a dot above the second letter? The second letter has a िmatra. Above the loop of the matra, there is NO dot. Wait, what is the letter under the matra? It isवि? चि? Wait, look at अवि: is that a word? Wait, could it be आणिmisprinted asअविorअचि? Wait, look at the letter: it has a loop on the left, horizontal stroke, vertical stroke: that is ! Wait, does it say अचि? Wait, what about अभि? Wait, what about आदि`? Let's look really closely at the letter: It has a top bar. Left part: round shape. Wait,

२२८ श्रीदासबोध. [ दशक चौऱ्यायशीं लक्ष योनींची दाटी । पिंडीं कोठें ॥ ३२ ॥ ब्रह्मांडीं पदार्थ निर्माण झाले । पृथगाकारें वेगळाले । तेहि तितुके निरूपिले । पाहिजेत पिंडीं ॥ ३३ ॥ जितुक्या औषधी तितुकीं फळें । नानाप्रकारचीं रसाळें । नाना बीजें धान्यें सकळें । पिंडीं निरूपावीं ॥ ३४ ॥ हें सांगतां पुरवेना । तरी उगेंच बोलवेना । बोलिलें न येतां अनुमाना । लाजिरवाणें ॥ ३५ ॥ तरी हें निरूपिलें न वचे । फुकट बोलतां काय वेंचे । या कारणें अनुमानाचें । कार्य नाहीं ॥ ३६ ॥ पांच भूतें तीं ब्रह्मांडीं । आणि पांचचि वर्तती पिंडीं । यांची पाहावी रोकडी । प्रतीत आतां ॥ ३७ ॥ पांचीं भूतांचें ब्रह्मांड । आणि पांचभौतिक हें पिंड । या वेगळें तें उदंड । अनुमानज्ञान ॥ ३८ ॥ जितुकें अनुमानाचें बोलणें । तितुकें वमनप्राय त्यागणेँ । निश्चयात्मक तेंचि बोलणें । प्रत्ययाचें ॥ ३९ ॥ जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । प्रतीत नाहीं कीं रोकडी । पंचभूतांची तांतडी । दोहींकडे ॥ ४० ॥ म्हणोनि दोहींचें स्थान- मान । हें तों अवघेंचि अनुमान । आतां एक समाधान । मुख्य तें कैसें ॥ ४१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके अनुमाननिरसननिरू- पणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥

६. गुणरूप. श्रीगणेशाय नमः ॥ आकाश जैसें निराकार । तैसा ब्रह्माचा विचार । तेथें वायूचा विकार । तैसी मूळमाया ॥ १ ॥ हें दासबोधीं असे बोलिलें । ज्ञानदशकीं प्रांजळ केलें । मूळमायेतें दाखविलें । पांचभौतिक ॥ २ ॥ तेथें जाणीव तो सत्वगुण । मध्य तो रजोगुण । नेणिव तो तमोगुण । जाणिजे श्रोतीं ॥ ३ ॥ म्हणाल तेथें कैंची जाणीव । तरी ऐका याचा अभिप्राय । पिंडीं महाकारण देहीं सर्व- । साक्षिणी अवस्था ॥ ४ ॥ तैसी मूळप्रकृति ब्रह्मांडींचें । देह महाकारण साचें । म्हणोनि तेथें जाणीवेचें । अधिष्ठान आलें ॥ ५ ॥ असो मूळमायेभीतरीं । गुप्त त्रिगुण वास करी । स्पष्ट होती संधी चतुरीं । जाणावी गुणक्षोभिणी ॥ ६ ॥ जैसा तृणाचा पोटरा कळा । १. वमनाप्रमाणें. २. विस्तार. ३. मूळमायाच पांचभौतिक आहे असें दाखविलें. ४. तीन गुण स्पष्ट होण्याची जी संधि तीच गुणक्षोभिणी माया.

९ वा.] गुणरूप. २२९ पुढें उकलोन होय मोकळा । तैसी मूळमाया अवलीळां । गुणा प्रसवली ॥ ७ ॥ मूळमाया वायुस्वरूप । ऐका गुणक्षोभिणीचें रूप । गुणविकार होतां अल्प । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ पुढें जाणीव मध्यस्थ नेणीव । मिश्रित चालिला स्वभाव । तेथें मातृकांस ठाव । शब्द जाहला ॥ ९ ॥ तो शब्द- गुण आकाशींचा । ऐसा अभिप्राय येर्थींचा । शब्देंचि वेदशाखांचा । आकार झाला ॥ १० ॥ पंचभूतें त्रिगुणाकार । अवघा वायूचा विकार । जाणीवनेणीवेचा विचार । वायूचकरितां ॥ ११ ॥ वायु नसतां कैंची जाणीव । जाणीव नसतां कैंची नेणीव । जाणीवनेणीवेसि ठाव । वायुगुणें ॥ १२ ॥ जेथें मुळींच नाहीं चळण । तेथें कैंचें जाणीवलक्षण । म्हणोन वायूचा गुण । नेमस्त जाणावा ॥ १३ ॥ ए- कापासून एक झालें । हें एक उगेंच दिसोन आलें । स्वरूप मुळींच भासलें । त्रिगुण भूतांचें ॥ १४ ॥ ऐसा हा मुळींचा कर्दर्म । पुढें स्पष्टतेचा अनुक्रम । सांगतां एकापासून एक उगम । हेंहि खरें ॥ १५ ॥ वायूचा कर्दम बोलिला । तयापासून अग्नि झाला । तोहि पाहतां देखिला । कर्दमचि ॥ १६ ॥ अग्नीपासून झालें आप । तेंचि कर्दमस्वरूप । आपापासून पृथ्वीचें रूप । तेंहि कर्दमरूपी ॥ १७ ॥ येथें आशंका उठली । भूतांतें जाणीव कोठें देखिली । तरी भूतांत जाणीव ऐकिली । नाहीं वार्ता ॥ १८ ॥ जाणीव म्हणजे जाणतें चळण । तेचि वायूचें लक्षण । वायुअंगीं सकळ गुण । मागां निरूपिले ॥ १९ ॥ म्हणोन जाणीव नेणीव मिश्रित । अवघें चालिलें पंचभूत । म्हणो- निया भूतांत । जाणीव असे ॥ २० ॥ कोठें दिसे कोठें न दिसे । परी ते भूतीं व्यापून असे । तीक्ष्णबुद्धि करितां भासे । स्थूल सूक्ष्म ॥ २१ ॥ पंच- भूतें आकारलीं । भूतीं भूतें कालवलीं । परी पाहतां भासलीं । एक स्थूळ एक सूक्ष्म ॥ २२ ॥ निरोधें वायु न भासे । तैसी जाणीव न दिसे । न दिसे परी ते असे । भूतरूपें ॥ २३ ॥ काष्ठीं अग्नि दिसेना । निरोधीं वायु भासे- ना । जाणीव तैसी लक्षेना । एकाएकीं ॥ २४ ॥ भूतें वेगळालीं दिसती । पाहतां एकचि भासती । बहुत धूर्तपणें प्रचीती । वोळखावी ॥ २५ ॥ ब्रह्मा- पासून मूळमाया । मूळमायेपासून गुणमाया । गुणमायेपासून तयां । गुणांस जन्म ॥ २६ ॥ गुणापासूंनियां भूतें । पावलीं स्पष्टदशेर्तें । ऐसीं यांचीं रूपें १. अकस्मात. २. अक्षरांस. ३. मिश्रण. ४. पंचभूतांत. ५. आकारास.

२३० श्रीदासबोध. [ दशक समस्तें । निरूपिलीं ॥ २७ ॥ आकाश गुणापासून जाहलें । हें कदापि नाहीं घडलें । शब्दगुणास कल्पिलें । आकाश वायां ॥ २८ ॥ एक सांगतां एक- चि भावी । उगीच करी गाथागोवी । तया वेड्याची डेंगवी । कोणें करावी ॥ २९ ॥ शिकविल्याहि कळेना । उमजविल्याहि उमजेना । दृष्टांतें- हि तर्केना । मंदरूप ॥ ३०॥ भूतांहून भूत थोर । हााहि दाखविला विचार । परी भूतां वडील स्वतंत्र । कोण आहे ॥ ३१॥ जेथें मूळमाया पांचभौतिक । तेथें काय राहिला विवेक । मूळमायेपरतें एक । निर्गुण ब्रह्म ॥ ३२ ॥ ब्रह्मीं मूळमाया झाली । तिची लीला परीक्षिली । तंव ते निखळ वोतिली । भूतें त्रिगुणांचीं ॥ ३३ ॥ भूतें विकारवंत चार । आकाश पाहतां निर्विकार । आकाश भूत हा विचार । उपाधीकरितां ॥ ३४ ॥ पिंडीं व्यापक म्हणोन जीव । ब्रह्मांडीं व्यापक म्हणोन शिव । तैसाचि हााहि अभिप्राय । आकाशा- चा ॥ ३५ ॥ उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें । इतुक्त्यासाठीं आकाश झालें । भूतरूप ॥ ३६ ॥ आकाश अवकाश तो भकास । परंतु ब्रह्म तें निराभास । उपाधि नसतां जें आकाश । तेंचि ब्रह्म ॥ ३७ ॥ जाणीव नेणीव मध्यमान । हेंचि गुणांचें प्रमाण । येथें निरूपिले त्रिगुण । रूपांसहि- त ॥ ३८ ॥ प्रकृति पावली विस्तारातें । पुढें एकाचें एकचि होतें । वि- कारवंताचि तयातें । नेम कैंचा ॥ ३९ ॥ काळें पांढरें मेळवितां । पारवें होतें तत्वतां । काळें पिवळें मेळवितां । हिरवें होय ॥ ४० ॥ ऐसे रंग नानापरी । मेळवितां पालट धरी । तैसें दृश्य हें विकारी । विकारवंत ॥ ४१ ॥ एका जीवेंने नाना रंग । उमटों लागती तरंग । पालटाचा लागेवेग । किती म्हणोन पाहावा ॥ ४२ ॥ एका उदकाचे विकार । पाहतां दिसती अपार । पंचभूतांचा विस्तार । चौऱ्यांशीं लक्ष योनी ॥ ४३ ॥ नाना देहांचें बीज उदक । उदकापासून सकळ लोक । किडा मुंगी श्वापदादिक । उदकेंचि हो- य ॥ ४४ ॥ शुक्रें शोणितें म्हणिजे नीरें । त्या नीराचें हें शरीर । नखें दंत अस्थिमात्रें । उदकाच्या होती ॥ ४५ ॥ मुळाचे बारीक पागोरे । तेणें पंथें उदक भरे । त्या उदकेंचि विस्तारे । वृक्षमात्र ॥ ४६ ॥ आम्रवृक्ष मो- हरा आले । अवघे उदकाकरितां झाले । फळीं फुलीं लगडले । सावकाश १. उलगडा. २. उदकानें. ३. प्रकार. ४. रेत. ५. रक्त. ६. पाणी. ७. हाडें.

, then has a vertical line above? Wait! Could it be कोसले? Let's look at the letter: Is it को सें ले? Or को सै ले? Wait, in line 17: + = को Then with two matras? No, one matra and a rafar? Wait, why are we guessing when we can just transcribe what is printed visually? Let's look at the printed characters: - - र् - - ले? Wait, look at the letter after को: it is र् (rafar) on ? Wait, does rafar sit on the following consonant? Yes! A rafar on means र्स. With matra: र्से. So कोर्सेले? No, the ले has a matra: ले. Wait, what about कोसले? Let's search Dasbodh 9.7.4: "कोसले अथवा कांटेघरें । नाना पृष्ठभागीं चालतीं घरें ।" In almost ALL editions of Dasbodh, the text of 9.7.4 is: "कोसले अथवा कांटेघरें । नाना पृष्ठभागीं

२३२ श्रीदासबोध. [ दशक

हें प्रवृत्तींचें बोलणें । प्रत्ययास आणि उणें । प्रत्यय पाहतां श्लाघ्यवाणें । होणार नाहीं ॥ ११ ॥ ब्रम्हास कोणें जन्मास घातलें । विष्णूस कोणें प्रति- पाळिलें । रुद्रास कोणें संहारिलें । महाप्रळयीं ॥ १२॥ म्हणोनि हा सृष्टिभाव । अवघा मायेचा स्वभाव । कर्ता म्हणों निर्गुण देव । तरी तो निर्विकारी ॥ १३ ॥ म्हणावें माया जन्मास घाली । तरी हे आपणाचि विस्तारली । आणि विचारितां थारैली । हेंहि घडेना ॥ १४ ॥ आतां जन्मतो कोण । कैसी त्याची वोळखण । आणि संचिंताचें लक्षण । तेंहि निरूपावें ॥ १५ ॥ पुण्याचे कैसें रूप । आणि पापाचें कैसें स्वरूप । याहि शब्दाचा ऑक्षेप । कोण कर्ता ॥ १६ ॥ हें कांहींच न ये अनुमाना । म्हणती जन्म घेते वा- सना । तरी ते पाहतां दिसेना । ना धरितां न ये ॥ १७॥ वासना कामना आणि कल्पना । हेतु भावना मति नाना । ऐशा अनंत वृत्ति जाणा । अं- तःकरणपंचकाच्या ॥ १८ ॥ असो हें अवघें जाणीवयंत्र । जाणीव म्हणजे स्मरणमात्र । त्या स्मरणास जन्मसूत्र । कैसें लागे ॥ १९ ॥ देह निर्माण पांचभूतांचा । वायु चाळक तयाचा । जाणणें हा मनाचा । मनोभाव ॥२०॥ ऐसें हें सहजचि घडलें । तत्त्वांचें गुंथाडें झालें । कोणास कोणें जन्मविलें । कोणत्या प्रकारें ॥ २१ ॥ तरी हें पाहतां दिसेना । म्हणोनि जन्मचि अ- सेना । उपजला प्राणी येईना । मागुती जन्मा ॥ २२ ॥ कोणासीच जन्म नाहीं । तरी संतसंगें केलें कार्यी । ऐसा अभिप्राय सर्वेही । श्रोत्यांचा ॥ २३ ॥ पूर्वी स्मरण ना विस्मरण । मध्येंचि हें झालें स्मरण । अंतर्यामी अंतःकरण । जाणती कळा ॥ २४ ॥ सावर्धान आहे तों स्मरण । विकळ होतां विस्मरण । विस्मरण पडतां मरण । पावती प्राणी ॥ २५ ॥ स्मर- ण विस्मरण राहिलें । मग देहास मरण आलें । पुढें जन्मास घातलें । कोणास कोणें ॥ २६ ॥ म्हणोनि जन्मचि असेना । आणि यातनाहि दि- सेना । अवघी व्यर्थचि कल्पना । बळावली ॥ २७ ॥ म्हणोनि जन्मचि नाहीं कोणासी । श्रोत्यांची आशंका ऐसी । मरोन गेलें तें जन्मासी । मा- गुर्ती न ये ॥ २८ ॥ वाळलें काष्ठ हिरवळेना । पडिलें फळ पुन्हा लागेना । तैसें पडिलें शरीर येइना । जन्मास मागुतें ॥ २९ ॥ मडकें अवाचितें फु-

१. लोकरीतीचें. २. बरें. ३. टिकली. ४. पूर्वकर्माचें. ५. विचार. ६. सावध.

९ वा. ] विकल्पनिरसन. २३३ टलें । फुटलें तें फुटोनीच गेलें । तैसेंचि पुन्हा जन्मलें । नाहीं मनुष्य ॥३०॥ येथें अज्ञान आणि सज्ञान । सारिखेंचि झालें समान । ऐसें बळावलें अनु- मान । श्रोत्यांसी ॥ ३१ ॥ वक्ता म्हणे हो ऐका । अवघें थोतांड करूं नका । सावध होऊन विवेका । अवलोकावें ॥३२॥ प्रयत्नेंविण कार्य झालें । जेविल्याविण पोट भरलें । ज्ञानेंविण मुक्त झालें । हें तों घडेना ॥ ३३ ॥ स्वयें आपण जेविला । त्यास वाटे लोक धाला । परंतु हें समस्तांला । घ- डलें पाहिजे ॥ ३४ ॥ पोहणें शिकला तो तरेल । पोहणें नेणे तो बुडेल । येथेंहि अनुमान करील । ऐसा कवण ॥ ३५ ॥ तैसें जयांस ज्ञान झालें । ते ते तितुकेच तरले । ज्याचें बंधन तुटलें । तोचि मुक्त ॥ ३६ ॥ मोकळा ह्याणे नाहीं बंधन । आणि प्रत्यक्ष बंदीं पडिले जन । त्यांचें कैचें समाधान । तें तुम्ही पाहा ॥ ३७ ॥ नेणे दुसऱ्याची तळमळ । तें मनुष्य परदुःखशी- तळ । तैसाचि हाही केवळ । अनुभव जाणावा ॥ ३८ ॥ जयास आत्मज्ञान झालें । तत्त्वें तत्व विवंचिलें । खुणेसि पावतां बाणलें । समाधान ॥ ३९ ॥ ज्ञानें चुके जन्ममरण । सगट बोलणें अप्रमाण । वेद शास्त्र आणि पुराण । मग कासयासी ॥ ४० ॥ वेदशास्त्र विचारखोली । महानुभावांची मंडळी । भूमंडळीं लोक सकळी । हें तों मानीतना ॥ ४१ ॥ अवघें होतां अप्रमाण । मग आपुलेंच काय प्रमाण । म्हणोनि जेथें आत्मज्ञान । तोचि मुक्त ॥४२॥ अवघेच मुक्त पाहतां नर । हा हि ज्ञानाचा उद्धार । ज्ञानेंविण तो उद्धार । होणार नाहीं ॥ ४३ ॥ आत्मज्ञान कळों आलें । म्हणोनि दृश्य मिथ्या झालें । परंतु वेढा लाविलें । सकळांस येणें ॥ ४४ ॥ आतां प्रश्न फिटला । ज्ञानी ज्ञानें मुक्त झाला । अज्ञान तो बांधला । आपुले कल्पनेनें ॥ ४५ ॥ विज्ञानासारिखें अज्ञान । आणि मुक्तासारिखें बंधन । निश्चयासारिखें अ- नुमान । मानूंचि नये ॥ ४६ ॥ बंधन ह्मणिजे कांहींच नाहीं । परी वेढां लाविलें सर्वही । यासि उपायचि नाहीं । कळल्यावांचूनी ॥ ४७ ॥ कांहींच नाहीं आणि बांधी । हेंचि नवल पाहतां आधीं । मिथ्या जाणिजेना बंधीं । म्हणोनि बद्ध ॥ ४८ ॥ भोळा भाव सिद्धीस जाव । हा उधाराचा उपाव । रोकडा मोक्षाचा अभिप्राय । विवेकें जाणावा ॥ ४९ ॥ प्राणी व्हावया मो- कळा । आधीं पाहिजे जाणीवकळा । सकळ जाणतां निराळा । सहजचि

होय ॥ ५० ॥ कांहींच नेणिजे तें अज्ञान । सकळ जाणिजे तें ज्ञान । जा- णीव राहतां विज्ञान । स्वयेंचि आत्मा ॥ ५१ ॥ अमृत सेवून अमर झाला । तो म्हणे मृत्यु कैसा येतो जनाला । ऐसा विवेकी म्हणे बद्धाला । जन्म तो कैसा ॥ ५२ ॥ जाणता म्हणे जनांतें । तुम्हांस भूत कैसें झडपितें । तुम्हांस विष कैसें चढतें । निर्विष म्हणे ॥ ५३ ॥ आधीं बद्धासारिखें व्हावें । मग हें नलगेचि पुसावें । विवेक दूरी ठेवून पाहावें । लक्षण बद्धाचें ॥ ५४ ॥ निजल्यास चेइला तो । म्हणे हा कांरे वोसणैतो । अनुभव पाहणोंचि आहे तो । तरी मग निजोन पाहावा ॥ ५५ ॥ ज्ञात्याची उठावली वृत्ती । बद्धा- ऐसी न पडे गुंती । भुकेल्याची अनुभवप्राप्ती । धाल्यास न ये ॥ ५६ ॥ इतुकेन आशंका तुटली । ज्ञानें मोक्षप्राप्ति झाली । विवेक पाहतां बाणली । अंतरस्थिती ॥ ५७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके विक- ल्पनिरसननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. देहातीत. श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानी सुटला ज्ञानमतें । परंतु जन्म कैसा बद्धांतें । बद्धाचें काय जन्मतें । अंतकाळीं ॥ १ ॥ बद्ध प्राणी मरोन गेले । तेथें कांहींच नाहीं उरलें । जाणिवेचें विस्मरण झालें । मरणापूर्वी ॥ २ ॥ ऐसी घेतली आशंका । याचें उत्तर ऐका । आतां दुश्चित होऊं नका । म्हणे वक्ता ॥ ३ ॥ पंचप्राण स्थळें सोडिती । प्राणरूप वासनावृत्ती । वासना- मिश्रित प्राण जाती । देह सोडुनियां ॥ ४ ॥ वायूसरिसी वासना गेली । ते वायुरूपेंचि राहिली । पुन्हा जन्म घेऊनि आली । हेतुपरत्वें ॥ ५ ॥ कित्येक प्राणी निःशेष मरती । पुन्हा मागुते जीव येती । टाकून दिल्हे तेणें दुखवती । हस्तपादादिक ॥ ६ ॥ सर्पदंश झालियावरी । तीन दिवसां उठवी धन्वंतरी । तेव्हां ते माघारीं । वासना येते कीं ॥ ७ ॥ कित्येक शवें होऊन पडती । कित्येक तयांस उठविती । यमलोकींहून आणिती । माघारे प्राणी ॥ ८ ॥ कित्येक पूर्वी शापिले । ते शापदेह पावले । उःशाप- काळीं पुन्हा आले । पूर्वदेहीं ॥ ९ ॥ कित्येकीं बहु जन्म घेतले । कित्येक १. ब्रह्मानुभवाचें ज्ञान. २. भितों.