दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
| ४२६ | श्रीदासबोध. | [ दशक |
|---|
वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काय वेंचे । जाणते पुरुष प्रचीतींचे । ते तों मानीतना ॥ २७ ॥ उगीच बोलणें अनुमानाचें । अनु- मानाचें कोण्या कामाचें । येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २८ ॥ स- गट विचार तो अविचार । किती एक म्हणती एकंकार । एकंकार भ्रष्टाकार । करूं नये ॥ २९ ॥ कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं एक शुद्ध घ्यावें । जाण- जाणोनि निवडावें । सारासार ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके आत्मनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. देहक्षेत्र. श्रीगणेशाय नमः ॥ विधिप्रपंचतरु¹ वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण झाला । फळें येतां विश्रांति पावला । बहुत प्राणी ॥ १ ॥ नाना फळें रसाळें लागलीं । नानाजिन्नसें² गोडीस आलीं । गोडी पाहावया निर्माण केलीं । नाना शरीरें ॥ २ ॥ निर्माण जाहले उत्तम विषय । शरीराविणें भोगितां न ये । म्हणोनि निर्मिला उपाय । नाना शरीरें ॥ ३ ॥ ज्ञानेंद्रियें निर्माण केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं । एका शरीरास लागलीं । परी वेगळालीं ॥ ४ ॥ श्रोत्रेंद्रियीं शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला । ऐसा उपाय निर्माण केला । इंद्रियांमध्यें ॥ ५ ॥ त्वचेंद्रियें शीतोष्ण भासे । चक्षुरिंद्रियें सकळ दिसे । इंद्रियांमध्यें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥ जिव्हेमध्यें रस चाखणें । घ्राणामध्यें परिमळ घेणें । इंद्रियांमध्यें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥ वायु- पंचकीं अंतःकरणपंचक । मिसळोन फिरे निःशंक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें सक- ळिक । सावकाश पाहे ॥ ८ ॥ कर्मेंद्रियें लागवेगें³ । जीव भोगी विषयां- लागीं । ऐसा हा उपाय जगीं । ईश्वरें केला ॥ ९ ॥ विषय निर्माण झाले बरवे । शरीराविण कैसे भोगावे । नाना शरीरांचे गोवे । याच कारणें ॥ १० ॥ अस्थिमांसांचीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं । लहान थोर निर्माण झालीं । येणें प्रकारें ॥ ११ ॥ अस्थिमांसांचीं शरीरें । निर्माण केलीं जगदीश्वरें । विवेकें गुणविचारें । करूनियां ॥ १२ ॥ अस्थिमांसांचा पुतळा । जाणे ज्ञानें सकळ कळा । शरीरभेद वेगळा । ठायीं ठायीं ॥ १३ ॥ तो भेद
तळटीपा : १. ब्रह्मदेवाचा संसार हाच कोणी एक वृक्ष. २. अनेक प्रकारें. ३. उत्कंठेनें.
२० वा. ] सूक्ष्म ब्रह्म. ४२७ कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण । सकळ तीक्ष्णबुद्धीविण । काय कळे ॥ १४ ॥ सकळ करणें ईश्वराला । म्हणोनि भेद निर्माण केला । ऊर्ध्वमुख होतां भेदाला । ठाव कैंचा ॥ १५ ॥ सृष्टिकर्मीं अगत्य भेद । संहारें सहजचि अभेद । भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १६ ॥ मायेमध्यें अंतरात्मा । न कळे तयाचा महिमा । झाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १७॥ पीळ पेंच कडोविकर्डीं । तर्क तीक्ष्ण घडीनें घडी । मनासि होय तांतडी । विवरण करितां ॥ १८ ॥ आत्मत्वीं लागलें सकळ कांहीं । निरंजनीं हें कांहींच नाहीं । एकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ १९ ॥ देह- सामर्थ्यानुसार । सकळ करी जगदीश्वर । थोर सामर्थ्यं अवतार । बोलि- जेती ॥ २० ॥ शेष कूर्म वराह झाले । येव्हढे देह विशाल धरिले । तेणें- करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २१ ॥ ईश्वरें केव्हडें यंत्र केलें । सूर्य- बिंब धांवाया लाविलें । धुक्टाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २२ ॥ पर्वता ऐसें ढग उचलती । सूर्यबिंबास आच्छादिती । तेथें सर्वैचि वायूची गती । प्रगट होय ॥ २३ ॥ झिडझिडकूं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियांरा । ढग मारून दिनकरा । मोकळें करी ॥ २४ ॥ बैसती विजांचे तडाखे । प्राणिमात्र अवचितां धाके । गगन कडकडून तडके । स्थळांतरीं ॥ २५ ॥ एकासि एक वर्म केलें । महद्भूतें महद्भूत आलिलें । सकळ समभागें चालि- लें । सृष्टिरचनेसी ॥ २६ ॥ ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसें कैंचे । विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २७ ॥ ऐसी माझी उपा- सना । उपासकीं आणावी मना । अगाध महिमा चतुरानना । काय कळे ॥ २८ ॥ आवाहनविसर्जन । हेंचि भजनाचें लक्षण । सकळ जाणती सजन । मी काय सांगों ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके देहक्षेत्रनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. सूक्ष्मब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ मृत्तिकापूजन करावें । आणि सर्वैचि विसर्जावें ।
१. आत्मरूपासन्निध. २. युक्तिप्रयुक्तीनें. ३. धुराचे मेघ बनविले, असा भाव. ४. चाकर. ५. ठिकऱ्या ठिकऱ्या. ६. मायेची उभारणी आणि संहारणी.
३२८ श्रीदासबोध. [ दशक हें मानेना स्वभावें । अंतःकरणासी ॥ १ ॥ देव पूजावा आणि टाकावा । हें प्रशस्त न वाटे जीवा । याचा विचार पहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ देव करिंजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोन याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥ देव नाना शरीरें धरितो । धरूनि मागुती सोडितो । तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें ओळखावा ॥४॥ नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें । सकळ आपुल्या अंतःकरणें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥ ब्रह्मज्ञानाचा उपाय । समजल्याविण देतां न ये । पदार्थ आहे मा घे जाय । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रत्यक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥ विचार पाहतां तगेना । त्यास देव ऐसें म्हणवेना । परंतु जन राहेना । काय करावें ॥८॥ थोर लोक मरौन जाती । त्यांच्या सुरता करूनि पाहती । तैशीच आहे ही गती । उपासनेची ॥ ९ ॥ थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी । राज्यसंपदा तयाचेनी । प्राप्त कैंची ॥ १० ॥ म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पा- विजेल कैंचा ॥ ११ ॥ अज्ञानासि ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने । म्हणोनि सिद्धांचिये खुणे । पावलें पाहिजे ॥ १२ ॥ माया सांडून मुळासि जावें । तरीच समाधान पावावें। ऐसें न होतां भरंगळावें । भलती- कडे ॥१३॥ माया उल्लंघायाकारणें । देवासि नाना उपाय करणें । अध्यात्म- श्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥ ऐसें न करितां लौकिकीं । अवघीच होते चुकाचुकी । स्थिति खरी आणि लटिकी । ऐशी ओळखावी ॥ १५ ॥ खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगति धरूं नये । खोटें संग्रहीं करूं नये । कांहीं एक ॥ १६ ॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खऱ्यासि तगेना तें बालटें । मन अधोमुख तें उफरटें । केलें पाहिजे ॥१७॥ अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारांचे गोवे । तुटोनि जाती ॥ १८ ॥ सूत गुंतलें तें उकलावें । तैसें मन उगवावें । मानत मानत घा- लावें । मुळाकडे ॥ १९ ॥ सकळ कांहीं कालवलें । त्या सकळांचें सकळ जाहलें । शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥२०॥ काय तें येथेंचि पाहावें । १. तसविरी. २. मजूरकाम. ३. प्रवृत्तिमार्गात असलेले. ४. निवृत्त.
कैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥ निर्गुण निर्विकार एक । तें सर्वां ठायीं व्यापक । देहामध्यें तें निष्कलंका । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥ मूळमाया संकल्परूप । तें अंतःकरणाचें स्वरूप । जड चेतवी चैतन्यरूप । तेंहि शरीरीं आहे ॥ २३ ॥ समान गुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाण ते प्रणम्ये¹। तयां समस्तांसी ॥ २४ ॥ द्विधा भासतें शरीर । वामांगें दक्षिणांग² विचार । तोचि अर्धनारी नटेश्वर । पिंडीं ओळखावा ॥ २५ ॥ तोचि प्रकृति पुरुष जाणिजे । शिव-श- क्ति बोलिजे । षड्गुणेश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥ तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । मीपणें तयास अहंतत्त्व । निश्चयें बुद्धितत्व । तयासीच म्हणती ॥ २७ ॥ त्रिगुणें चालतें शरीर । प्रत्यक्ष दिसे विचार । मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥ मन माया आणि जाणीव । हाहि दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राय । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥ पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहतें । शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्म- ब्रह्मनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. विमल ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ धरूं जातां धरितां नये । टाकूं जातां टाकितां नये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥ जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ २ ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे । पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥ जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशाचि भोंवतें । बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥४॥ जि- कडे जिकडे प्राणी पाहे । तिकडे सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे । मध्यान्हीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥ परी तो आहे एकदेशी । दृष्टांत न घडे व- स्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिलें ॥ ६ ॥ नाना तीर्थे ना- ना देशीं । कष्टत जावें पाहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं
१. प्रणाम, नमस्कार. २. डावा व उजवा भाग.
॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥ पक्षी अंतराळीं गेला । भोवतें आकाशाचि तया- ला । तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥ ९ ॥ परब्रह्म पोकळ घनदाट । परब्रह्म शेवटाचा शेवट । ज्यासि त्यासि ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥१०॥ दृश्य सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । अरे त्या निर्मळाची सरी । कोणास यावी ॥ ११ ॥ वैकुंठ कैलास स्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं । प- न्नागादि पाताळलोकीं । तेथेंहि आहे ॥१२॥ काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें अपार । पाहतां पाहतां पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥ परब्रह्म तें एकलें । एकदाचि सकळांस व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं ॥ १४ ॥ परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना । पुरामध्ये परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥ एकसरें सन्मुख । वाम १ सव्य २ दोहोंकडे एक । अधोर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥ १६ ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापि नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥ एकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्य भास । भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ संत साधु महानुभावां । देव दानव मानवां । परब्रह्म सकळांस विसांवा । विश्रांति ठाव ॥ १९ ॥ कोणीकडे शेवटास जावें । कोणीकडे काय पाहावें । असंभाव्य तें मानावें । काय म्ह- णोनी ॥ २० ॥ स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एक सारिखें नव्हे । ज्ञान- दृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांड निरास । मग तें ब्रह्म निरा- भास । येथून तेथवरी आकाश । भकासरूपें ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक हें तों खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें । व्यापाविण कोण्या प्रकारें । व्या- पक म्हणावें ॥ २३ ॥ ब्रह्मासि शब्दाचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ४ । कल्पनेतीत निरंजना । विवेकें ओळखावें ॥ २४ ॥ शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानीं पावत उन्मन ३ । सहजाचि होतें ॥ २५ ॥ झालें साधनाचें फळ । संसार झाला सकळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥ हिशेब झाला मायेचा । झाला निवाडा तत्वांचा । साध्यें होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृ-
१. डावें. २. उजवें. ३. संकल्पविकल्परहित स्थिति. ४. ब्रह्मरूप.
२० वा.] विमल ब्रह्म. ४३१ तीस उडालें । सहजाचि अनिर्वाच्यें झालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेसि बाणावें । जन्ममृत्यूंच्या नांवें । शून्याकार ॥ २९ ॥ भक्तांचेनी साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध । मननकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥ वीस दशक दोन- शें समास । साधकें पाहावे सावकाश । विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काय प्रयोजन । येथें प्रत्य- यास कारण । प्रत्यय पाहावा ॥ ३३ ॥ देह तंव पांचां भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा । आणि कवित्वप्रकार मनुष्यांचा । कशावरुनी ॥ ३४ ॥ सकळ करणें जगदीशाचें । आणि कवित्व मनुष्यांचें । ऐशा अप्रमाण बोल- ण्याचें । काय घ्यावें ॥ ३५ ॥ सकळ देहांचा झाडा केला । तत्वसमुदाय उडाला । तेथें कोणत्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥ ऐसीं हीं वि- चाराचीं कामें । उगीच भ्रमो नये भ्रमें । जगदीशेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके विमलब्रह्मनिरू- पणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३०८. एकूण ओंवीसख्या ७७५०. समाप्त. १. बोलून दाखविण्यास कठीण. २. रघुवीरानें.
॥ श्री ॥ दासबोधाची आरती. जय जय दासबोधा ग्रन्थराज प्रसिद्धा । आरती वोवाळीन विमळज्ञान बाळबोधा ॥ ध्रु० ॥ वेदांतसंमतीचा काव्यसिंधु भरला । श्रुति शास्त्रग्रन्थ गीता साक्ष संगम केला । महानुभाव संतजनीं अनुभव चाखिला । अज्ञान जड जीवां मार्ग सुगम जाला ॥ १ ॥ नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी । चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी । हरिहरहृदयींचें गुह्य प्रगट दावी । बद्धाचि सिद्ध जाले असंख्यात मानवी ॥ २ ॥ वीसही दशकींचा अनुभव जो पाहे । नित्यनेमें विवरितां स्वयें ब्रह्मचि होय । अपार पुण्य गांठीं तरी श्रवण लाहे । कल्याणलेखकाचे भावगर्भ हृदयीं ॥ ३ ॥