BharatKosha
Back to the archive

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

by जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग

DevanagariMarathipublished611 pages

प्रस्तावना व चरित्र सारांश

Page 1Permalink

या पृष्ठावर केवळ श्री विठ्ठलाची प्रतिमा (चित्र) असून कोणताही लिखित मजकूर (Text) उपलब्ध नाही.

Page 2Permalink

तुकाराम तुकाराम । नाम घेता कांपे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणें केला पुरुषार्थ । जळीं दगडासहित वह्या । तारियल्या जैशा लाहा ॥ म्हणे रामेश्वरभट्ट द्विजा । तुका-विष्णु नाहीं दुजा ।

Page 3Permalink

भक्तिभावाने समर्पण मातृकृपांकित तीर्थरूप कै. नरहरशास्त्री जोशी, खरशीकर.

Page 4Permalink

श्रीतुकाराम महाराजांच्या चरणी स्तुतिसुमनांजली भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्पदभुत चराचरीं ॥ ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावंश होत जगन्माता ॥ ब्रह्मानंद सुखे तुके आला तुका । तो हा विदवसखा जोडे जनों । शास्त्र श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । विधिदिने योगेशी ब्रह्मार्पण ॥ भक्तितत्त्वें आणि वैराग्यें आगळा । ऐसा नाहीं डोळा देखियेला ॥ जप तप यज्ञ लाजविलीं दाने । हरिनामक्रीर्तनें करूनिया ॥ मार्गे कवीश्वर जाले थोर थोर । नेलें कलेवर कोणे सागा ॥ म्हणे रामेश्वर सकळां पुसोनी । गेला तो विमानीं बैसोनिया ॥ —रामेश्वर

प्रपंचरचना सर्वही भोगुनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुद्धि हृदिली ॥ वैराग्याची निष्ठा प्रकदुनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशाती वरीली ॥ १ ॥ जयजय जी सद्गुरु तुकया दातारा । तारक संतांचा तूं जिवलग सोयरा ॥ हरिमक्तांचा महिमा विशेष वाढविला । विरक्षित ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ॥ २ ॥ —निळो

तुकोबाचीं पदें अद्वैत प्रसिद्धें । तयांच्या अनुवादें चित्त झुरे ॥ ऐसीं ज्याचीं पदें तो मज भेटता । जीवाची या होता तोष बहु ॥ तुकोबाचा छंद लागला मनासी । ऐकतां पदासी कवेमध्यें ॥ तुकोबाची भेटी होईल तरे क्षण । वैकुंठसमान होय मज ॥ तुकोबाची कार्नी ऐकेन हरिकथा । होये तैसे चित्ता समाधान ॥ तुकोबाचे ध्यान करूनि अंतरे । राहें त्या भितरीं घरामाजी ॥ बहेणी म्हणे तुका सद्गुरु सहोदर । भेटतां अपार सुख आहे ॥ मत्स्य जैसा जळावांचूनि घरफडी । तैसी ते आवडी तुकोबाची ॥ अंतरींचा साक्ष असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेळ तो ॥ तृषितासी जैसे आवडे जीवन । तैसा पिंड प्राणेवीण तया ॥ बहेणी म्हणे हेत तुकोबाचे पायीं । ऐकोनिया वेहीं पदें त्याचीं ॥ —बहिणाइ

निर्गुण गुणवंता । तुकारामा समर्या । मागुती भेटी देई । पायीं ठेवीन माथा ॥ १ ॥ वर्तुळ दोंद पोट । नेत्र नासिक कठ । देखिल्या दंतपंक्ति । तुकाराम समर्था ॥ २ ॥ देखिले रूप जैसे । ह्यास दायिले तैसे । सावळे रूप बापा । त्याचे लागले पिसें ॥ ३ ॥ उच ना ठेवणा हो । ध्यानीं हॅचि हें राहो । मानसीं कचेश्वरा । गुरु तुकोबा पाहा हो ॥४ —कचेश्व

स्वात्मानुभव पहाता तुकया केवळ सखाचि जनकाचा । वैराग्यै डोलविला माया जेणे मुनींद्र सनकाचा ॥ १ ॥ ज्याच्या सदभंगातें सेवी जन जैवि वाळ आंब्यातें । धनसा म्हणे भवाचे सुरसे जे मूळ करील आ भ्या तें ॥ २ ॥ ज्याच्या होय अभंगावाचुनि होऊनि हरिकथा नाहीं । धोत्यासि अभगांहीं तो दे जसि माय हरिस पानाहीं ॥ ३ ॥

Page 5Permalink

श्री पुरस्कारादाखल चार शब्द

ह. भ. प. शंकर महाराज खंदारकर यांच्या श्रीतुकाराम महाराज गाथाभाष्याचे दोन भाग नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील पहिल्या भागास प्रास्ताविक म्हणून मी चार शब्द लिहिले आहेत. जवळ-जवळ गाथाभाष्याच्या प्रसिद्धीच्या वेळीच डॉ. प्र. न. जोशी यांचा 'सार्थ तुकाराम गाथा' खंड पहिला प्रसिद्ध होत आहे यासाठी पुरस्कार म्हणून चार शब्द मी लिहीत आहे, हे पाहून वाचकास थोडे आश्चर्य वाटण्याचा संभव आहे. म्हणून त्यासंबंधी खुलासा करणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. शिवाय, हा खुलासा करताना पुरस्काराचाही त्यात भाग सहजच येत असल्याने पुरस्कार म्हणून वेगळे लिहिण्याचे कारणच पडणार नाही! या दोन सार्थ गाथ्यांचा विषय जरी तुकारामबोवांचे अभंग हा एकच असला तरी त्या दोन गाथ्यांचे कर्ते भिन्न आहेत. ह. भ. प. शंकर महाराज हे वऱ्हाडातील उमरेड येथे ज्यांची समाधी आहे त्या श्रीसाधु महाराजांचे वंशज आहेत. अनेक पिढ्यांचे वारकरी आहेत. त्यांनी स्वतः अधिकारी पुरुषा- जवळ वेदान्तशास्त्राचे उत्तम अध्ययन करून त्यावर प्रभुत्व मिळवले आहे. पंढरपुरात अनेक चातुर्मास्य राहून ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा यावर प्रवचन-कीर्तने केली आहेत. यामुळे त्यांच्या अर्थावर वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाच्या लाभाचा, शास्त्राध्ययनाचा, उपासनेचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या सार्थ गाथ्याचे नाव 'गाथाभाष्य' आहे. डॉ. प्र. न. जोशी यांचे वडील वै. ह. भ. प. खरडीकर शास्त्री हे उत्तम शास्त्री होते व संत- वाङ्मयाचे मोठे व्यासंगी होते. डॉ. प्र. न. जोशी हे त्यांचे चिरंजीव असल्याने संतवाङ्मयाशी त्यांचा परिचय अगदी बालपणापासून झालेला असणे हे अगदी स्वाभाविक आहे. शिवाय त्यांनी स्वतः संतवाङ्मयाचा अभ्यास करून 'मराठी साहित्यातील मधुर भक्ति' या विषयावर प्रबंध लिहून पुणे विश्वविद्यालयाची Ph. D. ची पदवी संपादन केली आहे व तो त्यांचा प्रबंध प्रसिद्धही झाला आहे. पाश्चात्य पद्धतीने त्यांचा अभ्यास झाल्याने ते संतवाङ्मयाकडे संप्रदाय अथवा परंपरा याहून थोड्या स्वतंत्र अशा बुद्धीने पाहू शकतात. या दोन सार्थ गाथ्यांचे कर्ते अशा रीतीने वेगवेगळ्या संस्कारांनी युक्त असल्याने अभंग तुका- रामाचेच, पण त्याकडे पहाण्याचे दोघांचे दृष्टिकोन एकमेकांपासून भिन्न असावेत, हे अगदी स्वाभाविक आहे. ही भिन्नता त्यांच्या प्रयत्नाच्या नामाभिधानावरूनही कळून येणारी आहे. एका प्रयत्नाचे नाव आहे 'गाथा-भाष्य', दुसऱ्याचे नाव आहे 'सार्थ तुकारामगाथा'. तात्पर्य, दोघांचे दृष्टिकोन भिन्न आहेत म्हणूनच दोघांच्या प्रयत्नासही पुरस्कार म्हणून चार शब्द लिहिणे शक्य झाले आहे. तुकारामबोवांच्या अभंगांची भाषा जरी ज्ञानेश्वरीपेक्षा अर्वाचीन असली तरी, ते अभंग सर्वच सहज समजतील असे मात्र नाहीत. उलट प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र तुकडा आहे यामुळे एकाच माण- साला सर्व बाजू दिसतील असे नाही व यामुळेच सर्व बाजूंनी पाहून तो पदरात घ्यावा लागतो. त्यांतील काही अभंग तर खूपच कठीण आहेत. यामुळे अशा अभंगावर वेगवेगळ्या अंगाने प्रकाश पडला तर तो हवाच आहे. त्यायोगे अभंगाची उकल होण्यास मदतच होईल.

Page 6Permalink

. तेरा .

या दृष्टीने हे दोन्ही प्रयत्न स्वागताहंच आहेत इंग्रजीत एक म्हणही आहे More the merrier व म्हणूनच मी दोन्ही गाथ्यांना पुरस्कार लिहिण्याचे ठरविले. ह. भ प. शंकर महाराज यांनी आपल्या ' गाथा भाष्यात ' फक्त आरंभाच्या एका अभंगाचा अर्थ देऊन विवरण दिले आहे पुढे मात्र सर्व अभंगाचा अर्थच दिला आहे डॉ जोशी यांच्या ' सार्थ तुकारामगाथा ' या ग्रंथात जास्त माहिती आहे प्रथम अभंग देऊन शब्दार्थ व टीपा दिल्या आहेत, व मग संपूर्ण अभंगाचा अर्थ दिला आहे शब्दार्थ व टीपा दिल्याने कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ होतो, हे समजण्याची चांगली सोय झाली आहे अर्थ देत असतानाही स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यास मदत म्हणून काही अभंगावर अर्थ देऊन विवरणही दिले आहे. हेतू असा की, अर्थाचा खुलासा अधिक व्हावा अभंगाबाबत इतका प्रपंच केल्यामुळे या पहिल्या खंडात सुमारे बाराशे अभंगाचाच विचार झालेला आहे या विवरगामुळे तुकाराम महाराजांचा स्वभाव, अभंगातील विषय मांडण्याची दृष्टी, त्याची सामाजिक, धार्मिक मते, त्याचे तत्त्वज्ञान, यावर प्रकाश पाडण्यास मदत होणारी आहे तुकारामबोवांच्या अभंगाचा, सर्व अभंगाचा अर्थ सर्वांनाच लागेल असे नाही. डॉ जोशी यांनी अभंगाचा अर्थ करताना स्वतंत्र बुद्धीचा, व थोडासा ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग केला आहे निव्वळ सांप्रदायिक पद्धती जशी थोडी सदोष आहे, तशी संप्रदाय न बघता स्वतंत्र बुद्धीने अर्थ करण्यातही दोष उत्पन्न होण्याचा संभव आहे उदाहरणार्थ, त्याच्या ' बाळो जन मज म्हणोत शिंदळी।' प्रथमचरण, अथवा ' दुजें सकें तरी' ( शेवटचा चरण ) याचे अर्थ पहाण्यासारखे आहेत वस्तुस्थिती अशी आहे की, तुकारामबोवांच्या गाथ्याचा अर्थ करणाऱ्‍यास संप्रदायाचे ज्ञान व शास्त्रदृष्टी दोन्हीही हवीत. काही काळ तुकोबाच्या गाथ्याची सार्थ प्रत मिळतच नव्हती आता योग असा आला आहे की, दोन वेगवेगळ्या अधिकाराच्या व्यक्तींनी एकाच वेळी आपले अर्थ प्रसिद्ध केले आहेत. यामुळे अभ्यास- वाची सोय चांगली झाली आहे श्रीतुकोबाच्या गाथ्याच्या अभ्यासूस या दोन्ही प्रयत्नाचा उपयोग होऊन त्याला स्वत ला अर्थ ठरवण्यास मदत होईल अशी आशा आहे -- शं. वा. दांडेकर. पुणे २८।२।६६

Page 7Permalink

तुकाराम महाराजांचे संक्षिप्त चरित्र तुकाराम महाराज यांचा जन्म शके १५३० सन १६०८ या वर्षी इंद्रायणी नदी तीरावर असलेल्या देहू या गावी एका पवित्र अशा कुळात झाला. तुकारामबुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे मोठे भगवद्भक्त असल्याने त्याच्या वेळेपासूनच या कुळात विठ्ठलभक्ती, नामस्मरण व पंढरीची वारी याचे माहात्म्य वाढलेले होते. तुकाराम बुवांच्या घरचा व्यवसाय दुकानदारीचा, वाण्याचा असून घरीं थोडीफार महाजनकी अथवा सावकारीही होती. 'याती शूद्र वैश्य केला वेवसाय,' 'बरे देवा कुणबी केलो,' 'शूद्रवंशीं जन्मलों' इत्यादी शब्दांवरून तुकारामबुवांची जात शूद्र मानण्याचे कारण नाही, ते सामान्यत: मराठी कुणबी या कुळातील असावेत. तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई असे असून यांचीही विठ्ठलाची उपासना चांगली मनापासून असे. आषाढी कार्तिकीची वारी याची कधी चुकत नसे. अन्नदान, गरिबांविषयी दया, संतांचा सन्मान, विठ्ठलावर दृढ निष्ठा, भजनपूजन, सदाचार याचे महत्त्व, या घरी विशेष प्रकारचे असे. सावकारी, व्यापारधंदा व महाजनकी प्रथम प्रथम चांगलीच चालत असावी. तुकोबांना आयुष्याच्या पहिल्या बारा तेरा वर्षात विशेष चिंता नसावी. बरोबरीच्या मुलांच्यात खेळावे, इंद्रायणीवर स्नान करावे, विठ्ठलाची पूजा करावी आणि बापाबरोबर दुकानदारी समजावून घ्यावी, असा साधा जीवनक्रम बुवांचा प्रथम असावा. तुकोबांना बंधू दोन होते. एक थोरला सावजी व दुसरा धाकटा कान्होबा. त्याच्या आईवडिलांनी आपल्या मुलांची लग्ने करून दिली. तुकोबांचे लग्न त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी झाले. बायकोचे नाव रखमाबाई. परंतु ही नेहमी आजारी असल्याने अप्पाजी गुळवे या एका श्रीमंत सावकाराच्या मुलीशी तुकोबांचे दुसरे लग्न झाले, व जिजाबाई तथा आवली त्यांच्या आयुष्यात येऊन स्थिर झाली. संसाराचे सुख मातापित्याच्या सावलीत बुवांनी पहिली काही वर्षे उत्तम प्रकारे भोगले, पण पुढे काळच पालटल्यासारखे झाले. थोरला भाऊ सावजी हा मूळचाच अतिशय विरक्त असल्यामुळे संसार तुकोबांनी पाहावा हे ओघानेच आले, व तुकोबा वडिलांच्या बरोबर व्यवहार पाहू लागले. परंतु पुढे संसारात एकामागून एक अशी संकटपरंपरा उभी राहिली. प्रथम वडील, व नंतर दोनतीन वर्षात आई, यांच्या मृत्यूने तुकोबांच्या मनावर आघात झाला आणि ही मृत्यूची परंपरा वाढत गेली. थोरली भावजय मरण पावली, पहिली बायको अन्नअन्न करिताना मरून गेली, पहिला मुलगा संताजी मरण पावला. थोरला भाऊ वैराग्याच्या भरात घर सोडून निघून गेला. सर्व संसाराचा भार एकाएकी तुकोबांच्या खांद्यावर येऊन पडला. तशात बाहेरची परिस्थिती विचित्रपणे पालटली. दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले, दुकानदारी बुडाली, कर्ज वाढत राहिले. येणे वसूल होईनासे झाले, दुकानाचे दिवाळे निघाले. या सर्व संकटांनी तुकारामबुवांचे मन उद्विग्न झाले. मूळचेच भक्तिप्रवण मन आता या संसारातून उठून जाऊ पाहात होते. दुसरी बायको कर्कशा असल्याने तही वजन ववाना फारसे या वैराग्याच्या काळात राहिले नाही. त्यांना संसाराचा व घराचा वीट आला. 'संसाराच्या तापें तापलों मी देवा' या अभंगात आपल्या संसाराची वाताहत कशी झाली, याचे मोठे हृदयभेदक चित्र बुवांनी काढले आहे. त्यामुळे त्यांचे चित्त संसारात रमण्याऐवजी श्रीविठ्ठला- कडे केंद्रित झाले. 'विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचे काज' अशा एकत्वाच्या नात्याने तुकाराम बुवा फटकळपणे घरातून उठून जवळच असणाऱ्या भामनाथाच्या किंवा भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन भजन, ज्ञानेश्वरी, नाथभागवत, गीता याचे वाचन, विठ्ठलचिंतन याच्याच नादात दंग होऊन गेले.

Page 8Permalink

कर्मकांडावर त्यांनी कडाडून असा प्रखर शब्दांत हल्ला केला आहे लोक संसार-संसार, पैसा-पैसा, बायको- बायको करीत असताना कसे बेभान होतात व विठ्ठलाला कसे विसरतात, याचे वर्णन त्यांनी अनेक उदा- हरणे देऊन केले आहे. निरनिराळ्या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांनी संसारी लोकांना सावध करून भक्ति- मार्गास लाविले नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग जो भागवत संप्रदायात रूढ होऊ पाहात होता, त्यास त्यांनी चालना दिली ज्या जिजाबाईंचे किंवा आवलीचे नाव तुकोबांच्या चरित्रात वारंवार कडवटपणे उच्चा- रिले जाते, तिच्याही बाजूने पुष्कळच सहानुभूतीने बोलण्यासारखे आहे तुकारामबुवानी तिलाही उपदेश करून पूर्ण बोधाचे बारा अभंग लिहिले आहेत

याप्रमाणे तुकोबानी स्वतःचा उद्धार करून घेतलाच पण त्यांचे कुटुंबीय व त्याच्या भोवतीचा परिवार यांनाही विठ्ठलभक्तीचे सुख समजू लागले. तुकारामबुवांची कीर्ती अवघ्या महाराष्ट्रात पसरून राहिली त्याच्या भोवती शिष्यसमुदाय मोठ्या प्रमाणावर जमू लागला तुकारामबुवाना जिंजाबाईपासून काशी, भागीरथी व गंगा अशा तीन कन्या व महादेव, विठ्ठल व नारायण असे तीन मुलगे, अशी अपत्ये झाली या लहानशा कुटुंबाबाहेर अवघे विश्व तुकोबाना जवळचे झाले होते 'देवांसाठीं झालें ब्रह्मांड सोयरें' असे त्यांनी म्हटले आहे निळोबाराय पिंपळनेरकर, रामेश्वरभट्ट वाघोलीकर, गंगाराम मवाळ कडूस्कर, महादाजीपंत कुलकर्णी देहूकर, कोंडोपंत लोहोकरे, मालजी गाडे येळवाडीकर, गवरशेट सुदुंब्रेकर, संताजी जगनाडे, लोहगावकर इत्यादी अनेक शिष्य मंडळी बुवांच्या भोवती जमा झाली निळोबाराय पिंपळनेरकर यांच्या परमार्थांमधील अधिकारासंबंधी जितके लिहावे तितके थोडेच आहे. 'येऊनियां कृपावंतें । तुकया स्वामी सद्गुरू नाथें । हात ठेविला मस्तकीं । देऊनि प्रसाद केलें सुखीं' असा आपला व तुकोबांचा संबंध निळोबानी वर्णन केलेला आहे असेच नाव या भक्तीच्या व परमार्थवृत्तीच्या प्रांतात तुकोबांच्या कृपेने कमाविले आहे ते बहिणाबाई या थोर व अधिकारसंपन्न अशा स्त्रीने 'मत्स्य जैसा जळावांचूनी चरफडी । तैसी ते आवडी तुकोबाची' अशा प्रकारची तगमग तिची तुकोबांसाठी असे हिला तुकोबानी स्वप्नात मंत्रोपदेश दिला 'स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली' अशी साक्ष बहिणाबाईंची आहे

याप्रमाणे तुकारामबुवा आपल्या जीवनात ईश्वरी प्रसादाने तृप्त झाले 'तुका प्रेमें माजे गाये । गाणियांत विरोनि जाये' अशी त्याची अवस्था झाली 'सर्व सुखें पायीं वोळंगिती,' 'खुटलीया धाव तृष्णेचिया,' 'वेध थोरगें लावियेला' अशा तृप्तीच्या आनंदात तुकोबानी स्वतःचा व लोकांचा उद्धार केला व आपल्या नंतरही अखंडपणे लोकांना प्रेरक व मार्गदर्शक ठरेल असे अभंगवाङ्मय निर्माण केले अणुरेणूएवढे असलेले तुकारामबुवा आभाळाएवढे बनून राहिले 'तुझी माझी एक ज्योती' अशी अनुभूती त्यांना येत राहिली जिवंतपणीच ते नारायणाच्या स्वरूपात जाऊन जणू मिळाले होते 'निरजनीं आम्हीं बांधियेलें घर', 'झाला प्रेतरूप शरीराचा भाव' 'बीज भाजुनी केली लाही । आम्हा जन्ममरण नाहीं' यासारख्या अनुभवातून तुकारामबुवा जात शेते भक्तिमार्गाच्या पथावर ते कळसरूपाने स्थिर झाले शके १५७१ च्या फाल्गुन व १ रोजी त्यांनी देहूस गोपाळपुरा येथे नांदुरगीच्या वृक्षाखाली कीर्तन केले आणि फाल्गुन व २ या दिवशी तुकोबानी या लोकांची यात्रा संपविली ते सदेह वैकुंठाला गेले असा समज पुष्कळांचा आहे 'घरा आलें वैकुंठपीठ' अशी ज्यांची अनुभूती ती मात्र त्यांच्या अभंगवाणीत आजही ताजी टवटवीत अशी आहे

Page 9Permalink

तुकाराम महाराजांची अभंगवाणी अलौकिक तेजाचा उगम कसा, कुठे व केव्हा होतो, याचे गणित अजून कुणासही समाधान- कारक रीतीने सुटलेले नाही. 'शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते-योगभ्रष्ट झालेला पुरुष शुचिर्भूत व श्रीमान् लोकांच्या घरी जन्म घेतो' असा निर्वाळा भगवद्गीतेने दिलेला आहे. पूर्वपुण्याई, घराण्याचे संस्कार, शिक्षण, परिस्थिती, संगती इत्यादी अनेक कारणांचे चिंतन विचारवंतानी या बाबतीत केलेले आहे. पुढील अनंत काळावर तीव्रपणे ठसा उमटविण्याचे सामर्थ्य असणारी दिव्य प्रतिभा किंवा अलौकिक शक्ती कोणत्या अवस्थेत जन्मास येते? कशी विकसित होते? या प्रश्नाच्या उत्तराविषयी काही तर्क करिता येतात, काही अनुमाने बांधता येतात, पण शास्त्रीय दृष्टीने उत्तर देणे अजून कुणासही जमलेले नाही! 'अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची' सन १६०८ मध्ये देहूसारख्या खेडेगावच्या मातीच्या कणात व तेथल्याच इंद्रायणीच्या पाण्यात असे कोणते गुणधर्म निर्माण झाले की, ज्यातून एक अलौकिक तेज मुसावले जाऊन तुकाराम या नावाने नावारूपास आले? वृत्तीने वाणी, जन्माने कुणबी, लौकिक शिक्षणाचा म्हणावा असा संस्कार नाही, उच्च वर्णीयाना मिळणारी परंपरागत अशी अनुकूल पार्श्वभूमी नाही, व्यावसायिक व सांसारिक जीवन तसे म्हटले तर प्रतिकूलच पण अशाही परिस्थितीत तुकोबांच्या मनाने जी आकाशास भिडणारी झेप घेतली, ती कशाच्या बळावर? अनेक विद्यांचे संस्कार झाले असले तरी, चार ओळी लिहिताना अडखळणारे, अडणारे आपणास माहीत आहेत. तुकाराम महाराजांना असे काय प्राप्त झाले की, ज्याच्या योगाने त्यांच्या मुखातून अशी अभंगवाणी बाहेर पडली की, तिच्यापासून ते स्वतः तर तृप्त झालेच, पण त्यांच्या भोवतीचे लोकही संतुष्ट होऊन गेले. त्यांच्या नंतरही त्यांच्या अभंगवाणीने साऱ्या मराठी माणसांना मुग्ध केले. 'अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची' असाच रिवाज सर्वांच्या बोलण्यातून निर्माण झाला. स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध, व्यावसायिक, पारमार्थिक, उच्चवर्णीय, मध्यमवर्णीय, सर्वांनाच या तुकाराम महाराजांच्या अभंगाचे एवढे वेड लागलेले दिसते की, प्रत्येकाला तो आपल्या अंतरंगातील जिव्हाळ्याचा ठेवा वाटावा. संसारताप, व्यावसायिक अपयश, परमार्थमार्गातील हुरहूर, असे कोणतेही कारण असो, प्रत्येकास आधार मिळाला आहे तो तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा. तुकाराम- बुवांच्या अभंगातील दहापाच ओळी तरी माहीत नाहीत, असा मराठी मनुष्य सहसा मिळणार नाही. शिक्षणाचा प्रसार नव्हता, तेव्हाही सबंध गाथा पाठ म्हणून दाखविण्याचे चमत्कार करणारे काही थोर भक्त होते. प्रसिद्ध भक्तवर वै. बाबुराव हरि देवडीकर यांचे साडेचार हजार अभंग पाठ होते !

Page 10Permalink

अठरा काढावासा वाटतो, कुणाला त्याच्या भाषासरणीचा अभ्यास करावासा वाटतो, कुणी त्याच्या चरित्रातील ऐतिहासिक प्रसंगांची सत्यता पडताळून पाहात असतात, कुणी त्याच्या अभंगाचा क्रमविकास बसविण्याच्या नादात असतात, कुणाला त्याच्या सगुणभक्तीने चटवा लाविला असतो, तर कुणास त्याच्या निर्गुणनिराकाराच्या उपासनेची बौद्धिक उंची प्रिय वाटते कुणी त्याच्या द्वैत अथवा अद्वैत तत्त्वज्ञानाचा शोध घेतात, तर कुणी त्यांना आलेल्या गूढ अशा आध्यात्मिक अनुभूतीची मानसशास्त्रीय चिकित्सा करतात कुणी त्याच्या आयुष्यातील चमत्कारिक गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, तर कुणी त्याच्या परंपरेचा शोध घेतात कुणी त्याच्या नावाविषयी, गावाविषयी, जन्मशकाविषयी, जातीविषयी, व्यवसायाविषयी, शिक्षणाविषयी, गुरुपरंपरेविषयी त्याच्या नामदेवाच्या प्रेरणेविषयी, त्याच्या सदेह वैकुंठगमनाविषयी उत्सुकतेने चर्चा करीत असतात कोणत्या का होईना, पण एकाद्या बलवत्तर अशा कारणाने देहूच्या या भगवद्भक्ताने सर्वांचे लक्ष आपणाकडे वधून घेतले आहे खास 'धन्य देहू गाव' तुकोबाच्या या लोकप्रियतेचे व त्याच्या अभंगवाणीच्या यशाचे नेमके गमक कोणते ? त्याच्या आयुष्यातील मुख्य प्रेरणा कोणत्या ? त्याच्या जीविताचा क्रमविकास व त्याच्या मानसिक अवस्थांची श्रेणी याचा काही संबंध जुळविता येतो का ? प्रथम आपण तुकोबाच्या घरच्या किंवा घराण्याच्या काही प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करू तुकारामबुवानी आपल्या गावाचे वर्णन धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग' या अभंगात विस्ताराने केले आहे तेथील श्रीविठ्ठल, रखुमाई इंद्रायणी- तीर, हरेश्वर, गरुड, हनुमंत, लक्ष्मीनारायणाचे मंदिर, इत्यादी खुणा तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलेल्या आहेत 'पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्म घेती' असे दुसऱ्या एका अभंगात त्यांनी हरिदासाच्या, भक्ताच्या जन्मभूमीचे व कुळाचे माहात्म्य वर्णन केले आहे 'माझ्या वडिलांची मिरासी' या पवित्र भूमीत एका प्रतिष्ठित व विठ्ठलभक्तिसंपन्न अशा कुळात तुकोबांचा जन्म झाला तुकोबांनी आपल्या कुळाची थोरवी अनेकदा वर्णन केलेली आहे 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं' असे त्यांनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे अतिशय शुद्ध अशा कुळात हे भक्तीचे रसाळ व गोमटे असे फळ निर्माण झाले यांच्या घराण्यातील आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे मोठेच विठ्ठलभक्त होते त्यांच्याच वेळेपासून या गावास क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले असावे याच विश्वंभरबाबांनी देहूस विठ्ठलाचे मंदिर बांधले त्यात विठ्ठलमूर्तींची स्थापना केली अशी ही विठ्ठलपरंपरा तुकोबांच्या वंशाची मिरासदारी आहे 'विठ्ठल कुळींचे दैवत', 'आदि तो हा देव कुळपूज्य', 'सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा' असे तुकोबांनी आपल्या कुळाच्या दैवताचे वर्णन केले आहे 'पंढरीची वारी आहे माझ्या घरीं' म्हणून त्यांनी साद्य अभिमानाने उल्लेख केलेला आहे 'तुका म्हणे संत सेवा । मान्या पूर्वजाचा ठेवा' अशा आपल्या आनुवंशिक ठेवण्याचे वारंवार वर्णन तुकारामबुवांनी केले आहे 'व्रत एकादशी करीन उपवासी । गाईन अहोर्निशी मुखीं नाम अशा भाषेत तुकोबांनी आपल्या घराण्याच्या पवित्र परंपरेचा उल्लेख केलेला आहे या पावन कुळातील भक्तिपरंपरेचा संस्कार तुकोबांच्या मनावर झालेला असावा सुस्थितीचा संसार तुकाराम महाराजांच्या घरी महाजनकी होती थोडी सावकारकी असावी त्यांच्या घराण्याचा व्यवसाय वैश्याचा, वाण्याचा तेव्हा घरी दुकानदारी व व्यापार या गोष्टी ओघाने आल्याच तुकाराम- बुवांचे लक्ष प्रथमपासूनच या व्यवसायात बऱ्यापैकी असावे आईवडिलांच्या सुखद छायेत बाळपणही सुखाचे गेले असावे टिप्पऱ्या, चेंडू, मुदमपाट्या, हुतूतू हुंबरी, विटीदांडू, कुरमोडी इत्यादी खेळांची त्यांनी

Page 11Permalink

एकोणीस पुढं जी वहारीची वर्णनं केली आहेत, ती बहुधा त्याच्या स्वानुभवाचीच असावीत तुकोबांचे जनक बोल्होबा व आई कनकाई यांचीही विठ्ठलाचरणी असीम भक्ती होती आषाढी-कार्तिकीची वारी घरी चालू होती दानधर्म, वैष्णवाचा सत्कार, भजनपूजन याच्या परिसरातच तुकोबा लहानाचे मोठे होत होते. पहिली पत्नी रखुमाई दीर्घकाळ आजारी असल्याने तुकोबांचे दुसरे लग्न त्याच्या आईबापानी करून दिले या दुसऱ्या बायकोने, जिजाबाई उर्फ आवलीने तुकोबाच्या चरित्रात बरेच नाव कमाविले आहे तुकोबाचा संसार प्रारंभी तरी आनंदी होता 'मातापिता बंधु सज्जन । घरीं उदड धनधान्य । शरीर आरोग्य लोकात मान्य । एकही उणे असेना' अशा सुस्थितीच्या संसाराच चित्र आकर्षक नव्हत असे कोण म्हणेल ? सांसारिक आपत्ती परंतु देवाला या भक्तास केवळ संसार करू द्यावयाचा नव्हता असे दिसते त्याच्यावर एका- मागून एक असे घाव प्रथम घरून बसण्यास प्रारंभ झाला. 'बाप मेला न कळतां' ही पहिली मोठी आपत्ती थोड्याच दिवसात आई मरण पावली थोरला बंधू सावजी याची पत्नी मरण पावली व तो वैराग्याच्या भरात घर सोडून निघून गेला त्याची पहिली बायको अन्नअन्न करून मरण पावली पहिला मुलगा संताजी मरण पावला या घरच्या आघाताने बघून येणारे सासारिक तुकारामबुवा गांगरून गेले असल्यास नवल नाही मूळची वृत्ती अतिशय सात्त्विक, विठ्ठलावर भरवसा मोठा, पण एकामागून एक अशा कोसळणाऱ्या संकटांनी तुकोबांचे मन व्यथित झाले असावे अशा वेळी मनास जपणारी, हळुवारपणे फुंकर घालून दुख हलवे करणारी पत्नी असावी ना ? पण त्यांना हे सुख म्हणावेसे नव्हते सांवलीच्या बाजूने पुष्कळच म्हणण्यासारखे असले तरी, तुकोबानी 'बाईल कर्कशा' म्हणूनच तिचा उल्लेख केलेला आहे 'कर्कश संगती । दुःख उदड फजीती' असाच अनुभव त्यांनी सांगितला आहे बाहेरच्या संकटाचा वर्षाव घरात झालेल्या या पडझडीत भर पडली, ती बाहेरच्या विलक्षण आपत्तीची मग मोठा दुष्काळ पडला, व्यापार बसला, दुकानदारी बुडाली, देणे वाढले, शेतीतील पिके नष्ट झाली व शेवटी दुकानाचे दिवाळे निघाले बऱ्या पुरुषाच्या मनावर अशा आघातानी जा परिणाम होतो, त्याचेही वर्णन तुकारामबुवानी मधून मधून केले आहे आपल्या संसाराच्या व व्यवसायाच्या वाताहतीचे मोठे विदारक चित्र त्यांनी एकदोन ठिकाणी काढलं आहे. 'संसारें जालों अति दुखें दुःखी' येथपासून प्रारंभ करून त्यांनी आपल्यावरील संकटाची मालिकाच निवेदन केलेली आहे 'दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली । लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखें । वेवसाय देखें तुटी येता' किंवा 'बहु पीडिलों संसारें' या शब्दात त्यानी आपल्या फजितीचे वर्णन केले आहे, आणि मग स्वतःचे समाधानही करून घेतलं आहे 'बाईल मेली मुक्त झाली । देवें माया तोडविली', 'बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरे या दुष्काळें पीडा केली' 'बरे झाले देवा बाईक कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये' 'देव भक्तालागीं करूं नेदी संसार' 'स्त्री बाळी गुणवती तीथें गुते आशा । यालागीं कर्कशा पाठी लायी' यासारख्या वचनात क्षणिक उद्वेग किती ? तात्त्विक सिद्धान्ताच भ्रम किती ? हा विचारही एका अभ्यासास उपयुक्त पडण्यासारखा आहे 'येथें सारं भगवंत' संसाराच्या, व्यवसायाच्या या वाताहतीनंतर बुवांच मन लौकिक जीवनातून उठले 'जाला हा वमन संसार', 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' या निश्चयाने तुकोबांच्या आयुष्यास एक नवीन वाट मिळाली सुप्त असलेल्या विठ्ठलभक्तीस जोराची जाग प्राप्त होण्याचा समय प्राप्त झाला.

Page 12Permalink

अठरा काढावासा वाटतो, कुणाला त्याच्या भाषासरणीचा अभ्यास करावासा वाटतो, कोणी त्याच्या चरित्रातील ऐतिहासिक प्रसंगांची सत्यता पडताळून पाहात असतात, कोणी त्याच्या अभंगांचा क्रमविकास बसविण्याच्या नादात असतात, कुणाला त्याच्या सगुणभक्तीने चटका लावला असतो, तर कुणास त्याच्या निर्गुणनिराकाराच्या उपासनेची बौद्धिक उंची प्रिय वाटते. कोणी त्याच्या द्वैत अथवा अद्वैत तत्त्वज्ञानाचा शोध घेतात, तर कोणी त्यांना आलेल्या गूढ अशा आध्यात्मिक अनुभूतीची मानसशास्त्रीय चिकित्सा करतात. कोणी त्याच्या आयुष्यातील चमत्कारिक गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी त्याच्या परंपरेचा शोध घेतात. कोणी त्याच्या नावाविषयी, गावाविषयी, जन्मशकाविषयी, जातिविषयी, व्यवसायाविषयी, शिक्षणाविषयी, गुरुपरंपरेविषयी, त्याच्या नामदेवाच्या प्रेरणेविषयी, त्याच्या सदेह वैकुंठगमनाविषयी उत्सुकतेने चर्चा करीत असतात. कोणत्या का होईना, पण एखाद्या बलवत्तर अशा कारणाने देहूच्या या भगवद्भक्ताने सर्वांच लक्ष आपणाकडे वेधून घेतलं आहे खास. 'धन्य देहू गाव' तुकोबांच्या या लोकप्रियतेचे व त्याच्या अभंगवाणीच्या यशाचे नेमके गमक कोणते ? त्याच्या आयुष्यातील मुख्य प्रेरणा कोणत्या ? त्याच्या जीविताचा क्रमविकास व त्याच्या मानसिक अवस्थांची श्रेणी याचा काही संबंध जुळविता येतो का ? प्रथम आपण तुकोबांच्या घरच्या किंवा घराण्याच्या काही प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करू. तुकारामबुवांनी आपल्या गावाचे वर्णन 'धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग' या अभंगात विस्ताराने केले आहे. तेथील श्रीविठ्ठल, रखुमाई, इंद्रायणी- तीर, हरेश्वर, गरुड, हनुमंत, लक्ष्मीनारायणाचे मंदिर, इत्यादी खुणा तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलेल्या आहेत. 'पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्म घेती' असे दुसऱ्या एका अभंगात त्यांनी हरिदासाच्या, भक्ताच्या जन्मभूमीचे व कुळाचे माहात्म्य वर्णन केले आहे. 'माझ्या वडिलांची मिरासी' या पवित्र भूमीत एका प्रतिष्ठित व विठ्ठलभक्तिसंपन्न अशा कुळात तुकोबांचा जन्म झाला. तुकोबांनी आपल्या कुळाची थोरवी अनेकदा वर्णन केलेली आहे 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं' असे त्यांनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे अतिशय शुद्ध अशा कुळात हे भक्तीचे रसाळ व गोमटे असे फळ निर्माण झाले. यांच्या घराण्यातील आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे मोठेच विठ्ठलभक्त होते. त्यांच्याच वेळेपासून या गावास क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले असावे. याच विश्वंभरबाबांनी देहूस विठ्ठलाचे मंदिर बांधले. त्यात विठ्ठलमूर्तीची स्थापना केली. अशी ही विठ्ठलपरंपरा तुकोबांच्या वंशाची मिरासदारी आहे. 'विठ्ठल कुळींचे दैवत', 'आदि तो हा देव कुळपूज्य', 'सहज वडिला होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा' असे तुकोबांनी आपल्या कुळाच्या दैवताचे वर्णन केले आहे. 'पंढरीची वारी आहे माझ्या घरीं' म्हणून त्यांनी सर्व अभिमानानं उल्लेख केलेला आहे. 'तुका म्हणे संत सेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा' अशा आपल्या आनुवंशिक ठेव्याचे वारंवार वर्णन तुकारामबुवांनी केले आहे. 'व्रत एकादशी करोन उपवासी । गाईन अहर्निशीं मुखीं नाम' अशा भाषेत तुकोबांनी आपल्या घराण्याच्या पवित्र परंपरेचा उल्लेख केलेला आहे. या पावन कुळातील भक्तिपरंपरेचा संस्कार तुकोबांच्या मनावर झालेला असावा. सुस्थितीचा संसार तुकाराम महाराजांच्या घरी महाजनकी होती. थोडी सावकारकी असावी. त्यांच्या घराण्याचा व्यवसाय वैश्याचा, वाण्याचा. तेव्हा घरी दुकानदारी व व्यापार या गोष्टी ओघाने आल्याच. तुकाराम- बुवांचे लक्ष प्रथमपासूनच या व्यवसायात बऱ्यापैकी असावे. आईवडिलांच्या सुखद छायेत बाळपणही सुखाचे गेले असावे. टिपऱ्या, चेंडू, मृदंगपाटचा, हुतूतू, हुबरी, विटीदांडू, कुरघोडी इत्यादी खेळांची त्यांनी

Page 13Permalink

. एकोणीस पुढ जी बहारीची वर्णने केली आहेत, ती बहुधा त्याच्या स्वानुभवाचीच असावीत तुकोबांचे जनक बोल्होबा व आई कनकबाई यांचीही विठ्ठलाचरणी असीम भक्ती होती आषाढी-कार्तिकीची वारी घरी चालू होतो दानधर्म, वैष्णवांचा सत्कार, भजनपूजन याच्या परिसरातच तुकोबा लहानाचे मोठे होत होते पहिली पत्नी रखुमाई दीर्घकाळ आजारी असल्याने तुकोबांचे दुसरे लग्न त्याच्या आईबापानी करुन दिले या दुसऱ्या बायकोने, जिजाबाई उर्फ आवलीने तुकोबाच्या चरित्रात बरेच नाव कमाविले आहे तुकोबाचा संसार प्रारंभी तरी आनंदी होता 'मातापिता बंधु सज्जन । घरीं उदड धनधान्य । शरीर आरोग्य लोकांत मान्य । एकही उणे असेना' अशा सुस्थितीच्या संसाराचे चित्र आवर्षक नव्हते असे कोण म्हणेल ? सांसारिक आपत्ती परतु देवाला या भक्तास केवळ समार करू द्यावयाचा नव्हता असे दिसते त्याच्यावर एका- मागून एक असे घाव प्रथम घरून बसण्यास प्रारंभ झाला. 'बाप मेला न कळतां' ही पहिली मोठी आपत्ती थोड्याच दिवसात आई मरण पावली थोरला बंधू सावजी याची पत्नी मरण पावली व तो वैराग्याच्या भरात घर सोडून निघून गेला त्याची पहिली बायको अन्नअन्न करून मरण पावली पहिला मुलगा संताजी मरण पावला या घरच्या आघाताने, वयात येणारे सांसारिक तुकारामबुवा गांगरून गेले असल्यास नवल नाही मूळची वृत्ती अतिशय सात्विक, विठ्ठलावर भरवसा मोठा, पण एकामागून एक अशा कोसळणाऱ्या संकटांनी तुकोबांचे मन व्यथित झाले असावे अशा वेळी मनास जपणारी, हळुवारपणे फुंकर घालून दुःख हलके करणारी पत्नी असावी ना ? पण त्यांना हे सुख म्हणावेसे नव्हते. सावलीच्या बाजूने पुष्कळच म्हणण्यासारखे असले तरी, तुकोबानी 'बाईल कर्कशा' म्हणूनच तिचा उल्लेख केलेला आहे 'कर्कश संगती । दुःए उदड फजीती' असाच अनुभव त्यांनी सांगितला आहे बाहेरच्या संकटाचा वर्षाव घरात झालेल्या या पडझडीत भर पडली, ती बाहेरच्या विलक्षण आपत्तीची भला मोठा दुष्काळ पडला, व्यापार बसला, दुकानदारी बुडाली, देणे वाढले, शेतीतील पिके नष्ट झाली व शेवटी दुकानाचे दिवाळे निघाले कर्त्या पुरुषाच्या मनावर अशा आघातांनी जो परिणाम होतो, त्याचेही वर्णन तुकारामबुवानी मधून मधून केले आहे आपल्या संसाराच्या व व्यवसायाच्या वाताहतीचे मोठे विदारक चित्र त्यांनी एकदोन ठिकाणी काढले आहे. 'संसारें जालों अति दुखें दुखी' येथपासून प्रारंभ करून त्यांनी आपल्यावरील संकटाची मालिकाच निवेदन केलेली आहे 'दुष्काळें आटिलें द्रव्य मेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली । लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखें । वेवसाय देखों तुटी येता' किंवा 'बहु पीडिलो संसारें' या शब्दात त्यांनी आपल्या फजितीचे वर्णन केले आहे, आणि मग स्वतःचे समाधानही करून घेतले आहे 'बाईल मेली मुक्त झालो । देवे माया सोडविली', 'बरें झालें देवा निघाले दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली', 'बरे झालें देवा बाईल कर्कशा । बरो हे दुर्दशा जनामध्ये', 'देव भक्तालागीं करु नेदी संसार', 'स्त्री व्हावी गुणवती तोपें गुंत आशा । यालागीं कर्कशा पाठो लावी' यासारख्या वचनात क्षणिक उद्वेग किती ? तात्त्विक सिद्धांताचे मर्म किती ? हा विचारही एका अभ्यासास उपयुक्त पडण्यासारखा आहे 'येथे सारं भगवंत' संसाराच्या, व्यवसायाच्या या वाताहतीनंतर बुवांचे मन लौकिक जीवनातून उठले 'जाला हा वमन सवसार', 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' या निश्चयाने तुकोबांच्या आयुष्यास एक नवीन वाट मिळाली सुप्त असलेल्या विठ्ठलभक्तीस जोराची जाग प्राप्त होण्याचा समय प्राप्त झाला.

Page 14Permalink

... वीस ... दुकानदारी व प्रपंच करण्यांतच गुंतण्यापेक्षां अवघ्या विश्वाची उठाठेव करण्याची शक्ती जेथे मिळते, तेथेच त्याचे चित्त गिळून राहिले. त्यांनी आपल्या नव्या साधनमार्गाचीही नोंद तपशीलाने दिलेली आहे तुकाराम महाराजांच्या साधनक्रमाचे एका अभंगात संक्षेपाने पण स्पष्ट असे वर्णन आले आहे. 'याती शूद्र वैश्य केला वेवसाय' या प्रसिद्ध अशा आत्मनिवेदनपर अभंगांत ने या साधनमार्गाचा खुलासा करताना म्हणतात, देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावें तें ॥ आरंभीं कीर्तन करो एकादशी । बहुतें अभ्यासों चित्त आधीं ॥ कांही पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥ संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥ ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥ वचन मानिलें नाहीं सुहृदांचें । समूळ प्रपंचों वीट आला ॥ सत्य असत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमत ॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥ यावरि या झाली कवित्त्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥ 'आपुलाचि वाद आपणांसी' याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या साधनेस प्रारंभ झाला पारमार्थिक जीवनयात्रेचा प्रवास सुरू झाला गावातील विठोबाचे देऊळ त्यांनी प्रथम दुरुस्त केले संतांची काही उत्तरे पाठ केली. कुणी कीर्तन करू लागले तर, त्याच्या पाठीमागे उभे राहून धृपद धरण्याचे काम त्यांनी पत्करले. संताच्या चरणसेवेची लाज मनात वाटू दिली नाही शेजारच्या भामनाथाच्या डोंगरावर जाऊन तुकारामबुवांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता या ग्रंथाची पारायणे केली. अखंड विठ्ठलनामाचा जयघोष केला. 'सरें नानपट निक्षेपीचें जुनें ठेवणें' होते ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकान्ताच्या निवासाने व ज्ञानेश्वर-नामदेवांच्या कृपेने त्याचे चित्त शांत झाले डोंगरावरील वृक्षवल्लींचा व वनचरांचा सहवास त्यांना किती सुखाचा वाटत होता, याचे मोठे बहारदार वर्णन त्यांनी एका अभंगात केले आहे.- वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥ येणे सुखें रुचे एकान्ताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥ आकाश मंडप पृथ्वो आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥ कंथा कमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥ तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥ 'मज विश्वंभर बोलवितो' बशा या विशाल पार्श्वभूमीवर तुकोबांचे मन रमून गेले पृथ्वीचे आसन झाले. आकाशाची छाया झाली हरिकथेच्या भजनाचे नाना प्रकार झाले. आपल्या मनाशी आपले सुलसवाद सुरू झाले. याच वेळी आणखी एकदोन महत्त्वाच्या घटना बुवांच्या आयुष्यात घडल्या. बाबाजी चैतन्य या थोर सत्पुरुषाने त्यांना उपदेश दिला 'राम कृष्ण हरि' हा मंत्र प्राप्त झाला आणि थोड्याच दिवसांत नामदेवरायांच्या कडून त्यांना कवित्त्वाची प्रेरणा झाली 'नामदेवें केले स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगें येवोनिया । सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नये' अशा आज्ञेवरून तुकाराम महाराजांच्या कवित्वास प्रारंभ झाला.

Page 15Permalink

एकवीस घरी असलेली विठ्ठलभक्तीची परंपरा व ज्ञानेश्वर, नामदेव यांची प्रेरणा यातून तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंगवाणी स्रवू लागली. साक्षात्काराच्या आधी, नामदेवाच्या प्रेरणेच्या आधी, सद्गुरूच्या उपदेशाआधी, त्यांनी थोडेफार कवित्व केले असावे. पण आता जे परतत्त्वाच्या स्पर्शाने पुनीत झालेले 'वाङ्मय' त्यांच्या मुखातून बाहेर येऊ लागले, त्याच्या तेजाने, त्याच्या रसकत्तेने, त्याच्या मार्मिकतेने, सर्वजण त्यावेळीही दिपून गेले. तुकोबांच्या कवित्वाचा एक महत्त्वाचा विशेष असा की, त्यांचा आत्मविश्वास मोठा असला तरी, आपले कवित्व ही ईश्वराची देणगी आहे, अशी यथार्थ जाणीव त्यांना होती. इतकेच नव्हे तर, तो देवच आपल्या मुखातून बोलतो, अशी त्यांची खात्री होती. आपण केवळ भारवाही आहोत, धन्याचा माल वाटणारे आहोत, निरोप आहोत, प्रत्यक्ष बोलणारा अथवा बोलविणारा तो भगवंत आहे, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. 'माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो । काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तैंचि वदे ।', 'नव्हती माझे बोल बोले पांडुरंग', 'आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची । साळुंकी मजुल बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची', 'तुका म्हणे मज बोलवितो देव', इत्यादी ओळींतून तुकाराम बुवांनी आपल्या वाणीच्या प्रसादाचे व तेजाचे मर्म विशद केले आहे. पारमार्थिक अनुभवांचे सार तुकाराम महाराजांनी एकूण अभंग किती लिहिले ? म्हणजे त्यांच्या मुखातून किती स्रवले ? त्यांचे लेखन कुणी केले, कोणत्या प्रसंगी कोणते अभंग तयार झाले, विशेष प्रसंगाचे अभंग कोणते ? इतर तुकारामांचे 'तुका म्हणे' या मुद्रेने देहूच्या तुकारामाच्या गाथेत शिरलेले कोणते ? त्यांच्या अभंगातील क्रमविकास कोणता ? स्फुट अभंगांचे गट किंवा समूह प्रथमपासूनच होते काय ? पुढे ज्या ओळींना किंवा वर्गीकरणांना महत्त्व आले, त्यांना तुकोबांच्या हयातीत कितपत आधार होता ? इत्यादी अनेक प्रश्नांची चर्चा संशोधकांनी व अभ्यासकांनी आजपर्यंत केलेली आहे. सर्वसाधारणपणे साडेचार ते पाचहजार पर्यंत अभंग तुकाराम महाराजांचे म्हणून उपलब्ध आहेत असे मानले, तर त्यांचे सक्षेपारने दर्शन घेता येण्यासारखे आहे. स्थूल मानाने तुकारामबुवांच्या अभंगांचे दोन प्रकार पडतात. पहिल्या विभागात त्यांना आलेले वैराग्य, त्यांची साधना, त्यांच्या मनाची तळमळ, त्यांच्या जीवाची झालेली लटपट, त्यांनी केलेली ईश्वराची, विठ्ठलाची करुण शब्दांतील प्रार्थना, त्यांचे देवावरचे रुसणे, त्यांचा प्रेमकलह, त्यांचा देवापाशी लडिवाळ हट्ट, त्यांचे एरयेरीवर येणे, इत्यादी साधनेच्या किंवा साक्षात्काराच्या पूर्वावस्थेतील विविध अनुभवांचे चित्तवेधक व करुणेने ओतप्रोत भरलेले अभंग सर्वांनाच मोलाचे वाटतील असे आहेत. यानंतर तुकारामांना ईश्वर भेटला, त्यांचा अभंगसंग जडला, जीवाशिवांचे आलिंगन झाले, शरीरसंबंधाची मिठी जडली, सगुण विठ्ठलाचे हृदयंगम दर्शन झाले, त्यांच्या प्रेमाने व जवळकीने आयुष्य धन्य झाले. मनातील सर्व संशय फिटले, मन शांत झाले, तन्मयता व तल्लीनतेचा उल्हास निर्माण झाला, ईश्वराच्या सहवासात निरनिराळ्या प्रकारचे अनुभव येत राहिले, यासंबंधीचीही वर्णने अतिशय सखोल, भावपूर्ण व वाचकाचे चित्त उल्हसित करणारी आहेत. तुकोबांच्या या आत्मानुभूतीपर अभंगांतच त्यांच्या पारमार्थिक अनुभवांचे सारसर्वस्व साठविले आहे. सामाजिक उद्बोधन अभंगाच्या दुसऱ्या विभागात तुकाराम महाराज ज्या संसारापासून दूर झाले, त्या संसार- इतरांचा अधिक उन्नत स्वरूपाचा व्हावा म्हणून, समाजाकडे वळून त्यांनी अतिशय करून पथात दोषांवर बोट ठेवून टीका करण्यास प्रारंभ केला. भोळ्याभाबड्या लोकांना दंभाच्या, धर्माच्या नावा- खाली फसवणारे साधुसंत व ढोगी बुवा निर्माण झाले होते. नाना दैवते निर्माण करून वेड्यापायाडया

Page 16Permalink

बावीस

मार्गांनी लोक अनाचारास प्रवृत्त झाले होते. टिळाटोपी करून, डोळे मिटून, समाधीचे नाटक करून लोकांना फसवण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. तुकाराम महाराजांनी या सर्व गैर- प्रकारावर अतिशय कडक शब्दांत प्रहार केले आहेत. तुकोबांच्या उपदेशाचे दुसरे अंग असे की, या भोंदू गुरूंच्या नादाने लोकही बिघडत चालले होते. जे परमार्थाच्या मार्गात होते, त्यांचा मार्गच चुकला होता. भलत्याच फंदात ते अडकले होते, आणि जे संसारात रमले होते, त्यांना एका संसाराशिवाय, पैशाशिवाय, बायकोशिवाय दुसरे समजेनासे झाले होते. परद्रव्य व परनारी यांचा अभिलाष मोठ्या प्रमाणावर वाढला होता. लोक आपल्याच नादात, आपल्याच गर्वाने, अभिमानाने केवळ विषयसुखात रमून गेले होते. नाना प्रकारची इंद्रियसुखे भोगण्यात त्यांना सारा जन्म घालवावा असे वाटे. देवधर्माची, कुलधर्माची, संतांची, पवित्र स्थानांची मर्यादा सुटत चालली होती. अशा बिघडलेल्या संसाराची विदारक शब्दचित्रे तुकाराम महाराजांनी काढलेली आहेत. केवळ पैसा, इंद्रियसुख हेच एक ध्येय झाले, म्हणजे मग मनाचा तोल सुटतो. तृष्णेला व लोभाला सीमा उरत नाही. मग कोणतेही पातक करण्यास लोक कचरत नाहीत, कोणत्याही अनाचाराचे त्यांना वावडे उरत नाही. संसारात सदा सर्वकाळ आसक्त राहून लोकांनी ईश्वराचे नावच सोडून दिल्यामुळे या एका आधारावर जे परस्परांचे नाते उभे असते, तेही मग विस्कटून जाते. दुसऱ्यांना त्रास देऊनच स्वतःच्या सुखाची वृद्धी करण्याकडे व सर्व काही मलाच पाहिजे, या लोभाकडे माणसे लक्ष देतात. तुकारामबुवांनी आपल्या उपदेशपर अभंगांतून या सांसारिक पतनाचेही बोलके चित्र उभे करून लोकांना सावध केले आहे.

अभंगवाणीचे स्थूल स्वरूप तुकाराम महाराजांच्या अभंगांचे आत्मपर किंवा अनुभूतीपर आणि उपदेशपर असे दोन प्रमुख विभाग असले तरी, या प्रत्येकाचे आणखी उपविभाग होण्यासारखे आहेत. शिवाय शिव, राम, हनुमंत, गजेंद्र, एकादशी, बाळक्रीडा, गौळणी, विराण्या अशा विविध विषयांवर त्यांची अभंगरचना आहेच. संतमाहात्म्य, पंढरपूरवर्णन, कीर्तनमाहात्म्य, नामाची महती, याही विषयांवर तुकोबांचे पुष्कळच अभंग उपलब्ध आहेत. सद्गुरूंची कृपा, स्वतःच्या दंभित्वाचा निषेध, मंबाजीबुवाकडून विरोध, लोहगावचा वेढा, चिंचवड येथील चिंतामणी देव यांच्याशी संभाषण, स्वतःच्या वैराग्यप्राप्तीचा क्षण, कवित्वाची प्रेरणा इत्यादी विविध अशा प्रासंगिक विषयांवरही बुवांनी रचना करून स्वतःच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे उल्लेख केलेले आहेत. याशिवाय वासुदेव, आंधळा, पांगळा, डाका, गाधळ, लळिता, फुगडी इत्यादीसारखी भारुडात्मक अभंगरचनाही तुकाराम महाराजांची आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचे हे असे स्थूल व बाह्य स्वरूप विविधतेने नटलेले दिसते. प्रत्येक अभंग सुटा खरा, स्फुट खरा, पण काही अभंगांचे गटही काही गाथांत एकत्र आलेले दिसतात. विचारांचे, भावनांचे, तत्त्वांचे एखादे सूत्र त्या त्या गटात दिसतेही. परंतु यासंबंधी निश्चित असा शोध अजून झालेला नाही. तुकारामांच्या अभंगांचे पुढे संपादन करणाऱ्यांनी नामपर, संतपर, करुणापर, प्रेमळकलहपर, सलगीपर अशी वर्गवारी करून काही व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यावरून तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंग स्रवले, ते कोणत्या क्रमाने व कोणत्या प्रसंगांनी याचा बोध होणे दुरापास्त होते.

'तुका झाला पांडुरंग' तुकोबांच्या अभंगवाणीचा एवढा बाह्य परिचय करून घेतल्यानंतर तिच्या अंतरंगाचे तेजस्वी दर्शन जवळ जाऊन घेण्यासारखे आहे. मानवी मन किती आतुर, किती कोमल, किती भावप्रवण होऊ शकते, याची उत्तम उदाहरणे तुकारामबुवांच्या आत्मपर अभंगांतून आपणास मिळतील. वैराग्यामुळे,

Page 17Permalink

तेत्रीस .

संसाराच्या उदासीनतेमुळे तुकोबांचे लक्ष विठ्ठलाकडे वळले हे खरेच आहे. संसारातील व व्यवसायातील आपत्तीमुळे तुकोबांना एकान्ताचा वास रुचला, हेही खरे. घरी दारी त्याची विटंबना होत राहिली म्हणून त्यांचे चित्त विठ्ठलपायी दृढ झाले हे खरेच. पण या बाबतीत आणखी सूक्ष्म विचार व्हावयास हवा. प्रसंगी तुकारामबुवांनी वैतागाचे, दुःखाचे उद्गार काढले आहेत. कर्कशा असणाऱ्या बाईलीचे त्यांनी आभार मानले आहेत; दुकानाचे दिवाळे निघाले, बरे झाले, असेही त्यांनी म्हटले आहे. पण केवळ या सांसारिक व व्यावसायिक आपत्तीमुळेच तुकोबा श्रेष्ठ पदवीस चढले, असे मानणे बरोबर होणार नाही. संसारातील आपत्ती सर्वांनाच असतात; व्यवसायातील चढउतारही सर्वांनाच भोगावे लागतात. वांझाड बायको पुष्कळांच्या नशिबी असते. पण या अवस्थेत प्रत्येक ठिकाणी तुकोबा निर्माण होत नाहीत. 'संसाराच्या तापें तापलों मी देवा' येथपासून 'तुका झाला पाडुरंग' येथपर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे, त्याचा अधिक बारकाईने विचार व्हावयास हवा. तुकोबांच्या मनाची वृत्ती, त्यांची घरची परंपरा, घराण्यातील विठ्ठलाचे अनुसंधान, त्यांची साधना, त्यांचे नामसंकीर्तन, त्यांचा एकान्तवास, त्यांची पूर्व- पुण्याई, ज्ञानेश्वरनामदेवांशी त्यांचे जडलेले नाते, या सर्वांचा परिपाक म्हणजे तुकाराम महाराजांचे दिव्य असे पारमार्थिक जीवन होय. सांसारिक दुःखे व व्यावसायिक अपयश हे वरवरचे एक निमित्त होय.

अभंगवाणीचे अंतरंग

यान पार्श्वभूमीवरून महाराजांच्या अभंगवाणीचे अंतरंग पाहावयास हवे. त्यांच्या दिव्य अभंगवाणीच्या गाभाऱ्याचे दर्शन, हा आजही एक अलौकिक व चैतन्याने रसरसलेला अनुभव आहे. त्याच्या सजीव दर्शनाने आजही माणसाचे डोळे पाणावतात, हृदय भरून येतं, सात्त्विकतेने चित्त प्रका- शित होते, भगवंताच्या रूपसौंदर्याने डोळे दिपून जातात; त्याच्या वत्सलतेने व भक्ताच्या आर्ततेने अभंग वाचणाऱ्याच्या चित्तावरही तेच संस्कार उमटतात. तुकोबांनी जे पाहिले, जे भोगले, त्याचा जसाच्या तसा ठसा त्यांच्या अभंगवाणीवर उमटलेला असल्यामुळे वाचकासही ती अनुभूती सहजासहजी ध्यानात येऊ शकते. सोपे सोपे शब्द व प्रसादपूर्ण अशी रचना या गुणांमुळे बुवांचे कित्येक अभंग आजही हृद- याचा ठाव घेऊन जातात. तुकारामबुवांच्या भावविश्वाचे या मनोगभाऱ्याचे अलौकिक दर्शन आजही अनेकांच्या चित्तवृत्ती उल्हसित करील असेच आहे.

Page 18Permalink

लालचावलेले होते याच दर्शनसुखाची गोडी त्यांना अवीट वाटत होती हेच 'सकळ मंगळाचे सार । मूळ सिद्धीचे भांडार' त्यांना वाटत होते याच्या दर्शनाने मनाची अवस्था कशी होऊन जाई ? तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे ' रूपीं गुंतले लोचन । पायीं स्थिरावले मन । देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला । फळो नेदि सुख दुःख । सान हरपली भूक । तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥ विठ्ठलाशी लडिवाळपणा या विठ्ठलाच्या रूपाचा वेध त्यांना निरंतर असे त्याच्या दर्शनसुखासाठी ते उत्सुक असत. त्याच्या अंगाखांद्यावर खेळावया मिळावे म्हणून त्यांची तळमळ असे कधी कळवळून ते या विठाई माउलीला हाक मारतात कधी तिला प्रश्न विचारतात, कधी तिच्यावर रुसतात, कधी प्रेमाने तिच्याशी भांडतात, कधी लडिवाळपणे ते आवतीभोवती वावरतात. कधी तिने आपणाकडे लक्ष द्यावे म्हणून इतरांचे दाखले ते देतात आपल्या मुलाचा सांभाळ कसा करावा, हे काही आईला शिकवावे लागत नाही ती त्याला गोड गोड पदार्थ न मागता देते, त्यास लागलेली भूक तिलाच अगोदर समजते आणि मग ती 'खेळाया गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनीं लावी वळें' त्याच्या दुःखाने ती कष्टी होत असते या मातेप्रमाणेच ही विठाई माउली तुकोबांना वाटत होती ते पुन पुन कळवळ्याने म्हणतात, 'पांडुरंगे ये यो पांडुरंगे । जिवाचे जीवलगे ये यो पांडुरंगे । भक्ताच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आवरणूपी कारणे जन्म दाहा घेतले' आणि मग आता माझ्यासाठी तू का येत नाहीस असा त्यांचा प्रश्न असे. 'मायें मोकलिले कोठें जावे बाळें?'

Page 19Permalink

[Header] पंचवीस

पांडुरंगाने मनात न आणता आपण पातकांची रास असलो तरी, त्याने आपल्यावर कृपा करावी, असे त्यांना वाटते या परमेश्वराने जर आपणास सांभाळिले नाही, तर मग आपले पालन तरी कोण कर- णार ? आम्ही मग आमचे सुखदुःख कुणास सांगावे ? आमच्या तापाचा परिहार कोण करणार ? आमची तहानभूक कोण निवारण करणार ? आम्ही सत्ता तरी मग कुणावर करावी ? कोण आम्हांला साह्य करणारे होईल ? अशा प्रकारचा आक्रोश करुन बुवांचा कंठ क्षुब्ध होऊन जातो 'तुजलागी माझा जीव झाला पिसा । अवलोकितो दिशा पांडुरंगा । प्राण हा विकल होय कासाविस । जीवनावेग मत्स्य तयापरी ' अशी त्यांची अवस्था करुणास्पद होऊन गेलेली असते

आपण परदेशी झालो आहांत, अन्यायी आहोत, अवगुणी आहात, पातकी आहात, पण या विठाईमाउलीने हे सर्व विसरून आपला अंगीकार करावा, असा त्याचा आग्रह असे या विठोबाने आपणावर कृपा कशी करावी ? नुसते दर्शन देऊन नव्ह, नुसता मस्तकावर हात ठेवून नव्ह, तर महाराजांच्या मुखातून त्याची ही भूक ऐकण्यासारखी आहे भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥ देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें ही दातारें निववावीं ॥ अमृताची दृष्टी घालूनीया वरी । शीतल हा करी जीव माझा ॥ धई उचलौनि पुसे तानभूक । पुसो माझें मुख पीतांबरें ॥ मुखावनी माझेधरी हनुवटी । ओवाळुनी दिठी करुनी सांडी ॥ तुका म्हणे जे बाप्पा अहो विश्वभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥

Page 20Permalink

... सदवीस ... केली नाहीस तर मी काय करीन ? तुकारामबुवानी एक गोड धमकी विठ्ठलालाच दिलेली आहे. त्यानी स्पष्टपणे सागितले की, 'संतासी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यासी सांगीन ॥, घेईन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा । तुका म्हणे आम्ही राहिलों मरोनि । तूं का होसी धनी निमित्ताचा ।' कारण देवा, आमच्यामुळे तुला मोठेपणा आला आहे, हेही तू विसरला आहेस. अनाथाचा नाथ तू आहेस, हेही तुझ्या ध्यानात नाही. कारण तू माझ्यावर कृपाच करीत नाहीस. खरे म्हणजे देवा, आम्हीच तुझे दैवत आहोत. जेणे तुज झालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्हीं ॥ १ ॥ नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ २ ॥ अंधारें दीपातें आणिली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥ ३ ॥ धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखी काय चाडा जाणार्यें तें ॥ ४ ॥ अमृतासी मोल विषाचिये गुणें । पितळें तरी सोनें उंचावेच ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्ही असोनियां जाण । तुज देवपण आणिर्येले ॥ ६ ॥ 'दिवाळीच्या मूळा लेकी आसायली' अशा प्रेमाचे भाडण तुकोबासारख्या श्रेष्ठ भक्तालाच शोभून दिसते तेच मोठ्या धिटाईने पाडुरंगाचा पदर धरून विचारू शकतात, 'धरुनि पालव असुडीन फरें । मग काय बरे दिसें लोकीं ।' एकदा परमेश्वराची शोभा करायची ठरविले तर, मग कुणाची अब्रू बाहेर येईल? कुणाचा लौकिक बिघडून जाईल ? समर्थांचे बालक जर केविलवाणे दिसले तर लोक कुणाला हसतील ? म्हणून देवा, तू मला भेट द्यावीस 'कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावीं हरी । ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दार्वी डोळा । कटीं पीतांबर फास मिरवली । दाखवीं वाहिली ऐसी मूर्ती।' कारण देवा, याच भेटीसाठी आता प्राण कंठाशी आले आहेत रे. किती दिवस वाट पाहावयाची ? तुझ्या- शिवाय मला दुसरे सोयरे कोण आहेत ? तुझ्या भेटीशिवाय आता मला दुसरे काहीच सुचत नाही देवा, 'कन्या सासुऱ्यासी जाये । मागे परतोनि पाहे । तैसे जालें माझ्या जीवा । केव्हां भेटसी केशवा ?' देवा, मला भेट देशील तर तुझे काय नुकसान होने रे ? 'काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन । काय तुझें रूप घेतों मी चोरूनि । त्या भेणे रूपोनि राहिलासी । काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ।' असा दिलासा तुकोबानीच विठ्ठलला दिला आहे ! कसेही करा आणि मला एवढा येऊन देवा, भेट ना, असा सारखा टाहो तुकाराम महाराज फोडताना दिसतात. तळमळून एका अभंगात ते म्हणतात- भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥ पूर्णिमेचा चद्रमा चकोरा जीवन । तैसे माझें मन वाट पाहे ॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहातसे वाटुली पंढरीची ॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परी माउलीची ॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवुनि श्रीमुख दावी देवा ॥