भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ
३५०श्रीदासबोध.[ दशक

अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप । देहांततपें१ पुण्यरूप । दुसरा जन्म जाहला ॥ १२ ॥ अनुतापें आसन घातलें । देहाचें वारुळ जाहलें । तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥ वारुळास वल्मीक बोलिजे । म्हणोन वा- ल्मीक नाम साजे । जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसांचें ॥ १४ ॥ जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवीश्वरांमध्यें वरिष्ठ । जयाचें बोलणें स्पष्ट । निश्चयाचें ॥ १५॥ जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तीचें भूषण । ज्याची धारणा असाधारण । साधकांस दृढ करी ॥ १६ ॥ धन्य वाल्मीक ऋषी- श्वर । समर्थ जो कवीश्वर । तयासि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ १७॥ वाल्मीक ऋषि बोलिला नसता । तरी आम्हांस कैंची रामकथा । म्हणो- निया समर्था । काय म्हणोनि वर्णावें ॥ १८ ॥ रघुनाथकीर्ति प्रगट केली । तेणें तयाची महिमा वाढली । भक्तमंडळी सुखी जाहली । श्रवणमात्रें ॥ १९ ॥ आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमध्यें बुडाला । भूमं- डळीं उद्धरिला । बहुत लोक ॥ २० ॥ रघुनाथभक्त थोर थोर । महिमा जयांचा अपार । त्या समस्तांचा किंकर२ । रामदास म्हणे ॥ २१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके वाल्मीकिस्तवननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥


२. सूर्यस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा सूर्यवंश । सकळ वंशांमध्यें विशेष । मार्तंड-मंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥ सोमीं४ अंगीं असे लां- छन । एकापक्षीं ५ होय क्षीण । रविकिरण फांकतां आपण । कलाहीन होय ॥ २ ॥ या कारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे । ज्याच्या प्रकाशें उजेडे । प्राणिमात्रांसीं ॥३॥ नाना धर्म नाना कर्मे । उत्तम मध्यम अधमें । सुगमें दुर्गमें नित्यनेमें । सृष्टीमध्यें चालती ॥ ४ ॥ वेदशास्त्रे आणि पुराणें । मंत्र यंत्र नाना साधनें । संध्या स्नान पूजाविधानें । सूर्याविणें बापुडीं ॥५॥ नाना योग नाना मतें । पाहों जातां असंख्यातें । जाती आपुलाल्या पंथें । सूर्य उदय झालिया ॥ ६ ॥ प्रापंचिक अथवा पारमार्थिक । कार्य करणें


• १. देहपात करणाऱ्या तपानें. २. सेवक. ३. सूर्य. ४. चंद्रावर. ५. कृष्णपक्षीं.

१६ वा. ] सूर्यस्तवन. ३५१ कोणी एक । दिवसैंविण निरर्थक । सार्थक नव्हे ॥ ७ ॥ सूर्याचें अधिष्ठान डोळे । डोळे नसतां सर्व आंधळे । या कारणें कांहींच न चले । सूर्याविण ॥ ८ ॥ म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेही सूर्याचीच गती । थंड झालिया आपुली मती । मग मतिप्रकाश कैंचा ॥ ९ ॥ उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा । उष्णत्व नसतां देहाचा । घात होतो ॥ १० ॥ या कारणें सूर्याविण । सहसा न चले कारण । श्रोते तुम्ही विच- क्षण । शोधून पाहा ॥ ११ ॥ हरिहरांच्या अवतारमूर्ती । शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती । यांपूर्वीं होता गभस्ती । आतांही आहे ॥ १२ ॥ जितुके सं- सारासी आले । तितुके सूर्याखालीं वर्तले । अंतीं देह त्यागून गेले । प्रभा- करो देखतां ॥ १३ ॥ चंद्र ऐलीकडे झाला । क्षीरसागर मंथूनि काढिला । चवदां रत्नांमध्ये आला । बंधु लक्ष्मीचा ॥ १४ ॥ विश्वचक्षु हा भास्कर । ऐसें जाणती लहान थोर । या कारणें दिवाकरें । श्रेष्ठाहून श्रेष्ठ ॥ १५ ॥ अपार नभमार्ग क्रमणें । ऐसेंच प्रत्यहीं येणें जाणें । या लोकोपकाराकारणें । आज्ञा समर्थाची ॥ १६ ॥ दिवस नसतां अंधकार । सर्वांसि न कळे सारा- सार । दिवसैंविण तस्कर । कां दिवाभीत पक्षी ॥ १७ ॥ सूर्यापुढें आणिक दुसरें । कोण आणावें समोरें । तेजोराशि निर्धारें । उपमेरहित ॥ १८ ॥ ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा । अगाध महिमा मानवी वाचा । काय म्हणोन वर्णावा ॥ १९ ॥ रघुनाथवंश पूर्वापार । एकाहून एक थोर । मज मतिमंदास हा विचार । काय कळे ॥२०॥ रघुनाथा- चा समुदाय । तेथें गुंतला अंतर्भाव । म्हणोनि वर्णितां महत्त्व । वाग्दुर्बळ मी ॥ २१ ॥ सकळ दोषांचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार । स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेतां ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके सूर्यस्तवननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥


१. सूर्य. २. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, गाई, ऐरा- वत, रंभा, सात मुखांचा अश्व, विष, धनु, शंख, आणि अमृत हीं चौदा रत्‍नें. ३. घुबड. ४. मनोभाव. ५. वाणीनें दुर्बळ.

१५२ श्रीदासबोध. [ दशक ३. पृथ्विस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हे बसुमती । इचा महिमा वर्णावा किती । प्राणिमात्र तितुके राहती । तिच्या आधारें ॥ १ ॥ अंतरिक्ष राहती जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव । देह जड नसतां जीव । कैसे लगती ॥२॥ ज्वालिती पोळिती कुदाळिती । नांगरती उकरिती खणिती । मळमूत्र तिज- वरी करिती । आणि वमनें ॥ ३ ॥ नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैंचा थार । देहांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥ बरें वाईट सकळ कांहीं । पृथ्वीविण थार नाहीं । नाना धातु द्रव्य तेंही । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥ एकास एक संहारिती । प्राणी भूमीवरी असती । भूमि सांडूनि जाती । कोणीकडे ॥ ६ ॥ गड कोट पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें¹ । देव दा- नव मानवां राहणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥ नाना रत्नें हिरे परिस । नाना धातु द्रव्यांस । गुप्त प्रगट करावयास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥ मेरु मंदर हिमाचल । नाना अष्ट² कुळाचॅल । नाना पक्षी मत्स्य व्याळ³ । भूमंडळीं ॥ ९ ॥ नाना समुद्रांपैलीकडे । भोवंतें आवरणोदकाचें कडें । असंभाव्य उठले कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥ त्यामध्यें गुप्त विवरें । लहान थोरें अपारें । तेथें निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥ आवरणोदक तें अपार । त्याचा कोण जाणे पार । उदंड दाटले जलचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥ त्या जीवनास आधार पवन । निबिड दाट आणि घन । फुटों शकेना जीवन । कोणीकडे ॥ १३ ॥ ह्या प्रभंजनास⁴ आधार । कठिणपणें अहंकार । ऐसा हा भूगोलाचा पार । कोण जाणे ॥ १४ ॥ नाना पदार्थांच्या खाणी । धातु- स्वांमंच्या वाटणी । कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥ नाना द्वीपें नाना खंडें । वसती उँद्रसें⁵ उदंडें । तेथें नाना जीवांचीं बंडें । वेगळालीं ॥ १६ ॥ मेरूर्भोवते कडे कापले । असंभाव्य कडोशे पडिले । निबिड तरु लागले । नानाजिनसी ॥ १७ ॥ त्यासन्निध लोकालोक⁶ । जेथें सूर्याचें फिरे चाकँ⁷ । चंद्राद्रि द्रोणाद्रि मैनाक । महागिरी ॥ १८ ॥ नाना देशीं पाषाण- १. फिरण्यानें. २. कुलाचल सात प्रसिद्ध आहेतः-महेंद्रो मलयः सह्यः शक्तिमान् मधमादनः ॥ विंध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ॥ ३. सर्प. ४. वायूंस. ५. ओसाड. ६. एक पर्वत. ७. रथ परत फिरतो.

भेद । नाना जिनसी मृत्तिकाभेद । नाना विभूती छंदभेद । नाना खाणी ॥ १९ ॥ बहुरत्ना वसुंधरा । ऐसा पदार्थ कैंचा दुसरा । अफाट पडली सैरा- वैरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥ अवघी पृथ्वि फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । दुजी तुळणा न साहे । धरणीविषयीं ॥ २१ ॥ नाना वल्ली नाना पिकें । देशोदेशीं अनेकें । पाहों जातां सारिख्यास सारिखें । एकहि नाहीं ॥ २२ ॥ स्वर्ग मृत्यु पाताळें । अपूर्व रचिलीं तिन्ही तोळें । पाताळ- लोकीं महान्योळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥ नाना वल्ली बीजांची खाणी । ते हे विशाल धरणी । अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥ गड कोट नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें । सकळां ठायीं जगदीश्वरें । वस्ती कीजे ॥ २५ ॥ महा बळी होऊन गेले । पृथ्विवरी चौताळले । सामर्थ्यं राहिले । हें तो घडेना ॥ २६ ॥ असंभाव्य हे जगती । जीव किती येती जाती । नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥ सध्या रोकडें प्र- माण । कांहीं करावें नलगे अनुमान । नानाप्रकारें जीवन । पृथ्विचेनि आ- धारें ॥ २८ ॥ कित्येक भूमि माझी म्हणती । शेवटीं आपणचि मरोनि जाती । कित्येक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥ ऐसा पृथ्वीचा महिमा । दुसरी काय द्यावी उपमा । ब्रह्मादिकांपासोनी आम्हां । आश्रयचि ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके पृथ्वीस्तवननिरू- पणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. आपस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां सकळांचें जन्मस्थान । सकळ जीवांचें जीवन । जयास आपोनारायण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥ पृथ्विस आधार आवरणो- दक । सप्तसिंधूंचें शुद्धोदक । नाना मेघांचें मेघोदक । भूमंडळीं चालिलें ॥ २ ॥ नाना नद्या नाना देशीं । वाहत मिळाल्या सागरासी । लहान थोर पुण्यराशी । अगाध महिमे ॥ ३ ॥ नद्या पर्वताहून कोसळल्या । नाना सांकडींमध्यें रिचवल्या । धबधबां खळखळां चालिल्या । असंभाव्य ॥ ४ ॥ कूपें वाँपी सरोवरें । उदंड तळीं थोरथोरें । निर्मळें उचंबळती नीरें । नाना १. स्थळें. २. महाभुजंगानें. ३. शिरल्या. ४. आड. ५. विहिरी.

३५४ श्रीदासबोध. [ दशक देशीं ॥ ५ ॥ गायमुखें पाट जाती । नाना कालवे वाहती । नाना झरे झि- रपती । झरती नीरें ॥ ६ ॥ ढुंइरे विहरे पाझर । पर्वत फुटोन वाहे नीर । ऐसे उदकाचे प्रकार । भूमंडळीं ॥ ७ ॥ जितुके गिरी तितुक्या धारा । कोसळती भयंकरा । पाभळे वोहळ अपारा । उकळ्या सांडिती ॥ ८ ॥ भूमंडळींचें जळ आघवें । किती म्हणोनि सांगावें । नाना कारंजी आणावें । बांधोनि पाणी ॥ ९ ॥ डोहो डबकें खबांडीं टाकीं । नाना गिरीकंदरीं अने- कीं । नाना जलें नाना लोकीं । वेगळालीं ॥ १० ॥ तीर्थे एकाहून एक । म- हापवित्र पुण्यदायक । अगाध महिमा शास्त्रकारक । बोलोन गेले ॥ ११ ॥ नाना तीर्थाचीं पुण्योदकें । नाना स्थळोस्थळीं शीतळोदकें । तैशींच नाना उष्णोदकें । ठायीं ठायीं ॥ १२ ॥ नाना वल्लीमध्ये जीवन । नाना फळीं फुलीं जीवन । नाना कंदीं जीवन । गुणकारक ॥ १३ ॥ क्षारोदकें शुद्धो- दकें । विषोदकें पीयूषोदकें । नाना स्थळांतरीं उदकें । नाना गुणांचीं ॥ १४ ॥ नाना इक्षुदंडांचे रस । नाना फळांचे नाना रस । नानाप्रकारींचे गोरस । मद पारा गूळ अन्न ॥ १५ ॥ नाना मुक्ताफळांचें पाणी । नाना रत्नीं तळपे पाणी । नाना शस्त्रांमध्यें पाणी । नाना गुणांचें ॥ १६ ॥ शुक्र शोणित लाळ मूत्र स्वेद । नाना उदकांचे नाना भेद । विवरोन पाहतां विशद । होत जातें ॥ १७ ॥ उदकाचे देह केवळ । उदकाचेंच भूमंडळ । चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥ १८ ॥ क्षारसिंधु क्षीरसिंधु । सुरासिंधु आज्य- सिंधु । दधिसिंधु इक्षुरससिंधु । शुद्ध सिंधु उदकाचां ॥ १९॥ ऐसें उदक विस्ता- रलें । मुळापासूनी शेवटास आलें । मध्येंहि ठायीं ठायीं उमटलें । ठायीं ठायीं गुप्त ॥ २० ॥ जे जे बीजीं मिश्रित झालें । तो तो स्वाद घेउनि उठिलें । वंसामध्ये गोडीस आलें । परम सुंदर ॥ २१ ॥ उदकाचा बांधा हें शरीर । उदकचि पाहिजे तदनंतर । उदकाचा उत्पत्ति विस्तार । किती म्हणोनि सां- गावा ॥ २२ ॥ उदक तारक उदक मारक । उदक नाना सुखदायक । उद- काचा विवेक । अलौकिक आहे ॥ २३ ॥ भूमंडळीं धांवे नीर । नाना ध्वनि १. कुवँ. २. झरा. ३. लहान पाणटाकें. ४. अमृतोदकें. ५. उंसाचे. ६. दूध वगैरे. ७. रेत. ८. रक्त. ९. क्रमानें मिठाचा, दुधाचा, मद्याचा, तुपाचा, दह्याचा, उंसाच्या रसाचा व पाण्याचा असे हे सप्तसागर. १०. रुचि. ११. शरीर बनल्यावर.

१६ वा. ] अग्निस्तवन. ३५५ त्या सुंदर । धबावां धबावां थोर । रिचवती धारा ॥२४॥ ठायीं ठायीं डोह तुं- बती । विशाल तळीं डबाबिती । चबाबिती थबाबिती । कालवे पाट ॥२५॥ एकी पालथ्या गंगा वाहती । उदकें सन्निधाचि असती । खळाळां झरे वा- हती । भूमीचे पोटीं ॥ २६ ॥ भूमिगर्भी डोह भरले । कोणी देखिले ना ऐ- किले । ठायीं ठायीं झरे झाले । विद्युल्लतांचे ॥ २७ ॥ पृथ्वीतळीं पाणी भ- रलें । पृथ्वीमध्यें पाणी खेले । पृथ्वीवरी प्रगटलें । उदंड पाणी ॥२८॥ स्वर्ग मृत्यु पाताळीं । एक नदी तिन्हीं ताळीं । मेघोदक अंतराळीं । पृथ्वीवरी वृष्टि करी ॥ २९ ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ दहनें । दहनाचें मूळ पवन । थोराहून थोर ॥ ३० ॥ त्याहून थोर परमेश्वर । महद्भूतांचा विचार । त्याहून थोर परात्पर । परब्रह्म जाणावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशि- ष्यसंवादे षोडशदशके आपस्तवननिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥

५. अग्निस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा वैश्वानरँ । होय रघुनाथाचा श्वशुर । विश्वव्यापक विश्वंभर । पिता जानकीचा ॥ १ ॥ ज्याच्या मुखें भगवंत भोक्ता । जो ऋषींचा फलदाता । तमँ हिर्म रोगहर्ता । भर्ता विश्वजनांचा ॥ २ ॥ नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रांस अभेद । अभेद आणि परम शुद्ध । ब्रह्मादिकांसी ॥३॥ अग्नीकरितां सृष्टि चाले । अग्नीकरितां लोक धाले । अग्नीकरितां सकळ झाले । लहान थोर ॥ ४ ॥ अग्नीनें आळलें भूमंडळ । लोकांस राहाया झालें स्थळ । दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥५॥ पोटामध्ये जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं । अग्नीकरितां भोजनीं । रुचि येते ॥ ६ ॥ अग्नि सर्वांगीं व्यापक । उष्में राहे कोणी एक । उष्ण नसतां सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥ आधीं अग्नि मंद होतो । पुढें प्राणी तो नासतो । ऐसा हा अनुभव येतो । प्राणिमात्रांसी ॥ ८ ॥ असतां अग्नीचें बळ । शत्रु जिंके तात्काळ । अग्नि आहे तावत्काळ । जिणें आहे ॥ ९ ॥ नानारस निर्माण झाले । अग्नीकरितां निपजले । महारोगी आरोग्य झाले । निमिषमात्रें ॥ १० ॥ सूर्य सकळांहून विशेष । सूर्या उपरि अग्निप्रकाश । १. भूमीखालून. २. विजा पडून. ३. स्थळाँ. ४. भांग. ५. अंधकार. ६. थंडी.

३५६ श्रीदासबोध. [ दशक रात्रिभागीं लोक अभीस । साह्य करिती ॥ ११ ॥ अंत्यज-गृहींचा अग्नि आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला । सकळां गृहीं पवित्र झाला । वैश्वां- नरू ॥ १२ ॥ अग्निहोत्र नाना याग । अग्नीकरितां होती सांग । अग्नि तृप्त होतां मग । प्रसन्न होय ॥ १३ ॥ देव दानव मानव । अग्नीकरितां झाले सर्व । सकळ जनांस उपाव । अग्नि आहे ॥ १४ ॥ लग्नें करिती थोर थोर । नाना दारूंचा प्रकार । भूमंडळीं यात्रा थोर । दारूनें शोभती ॥ १५ ॥ नाना लोक रोगी होती । उष्ण औषधें सेविती । तेणें लोक आरोग्य होती । व- न्हीकरितां ॥ १६ ॥ ब्राह्मणास तन मन । सूर्यदेव हुताशेन । एतद्विषयीं अनुमान । कांहींच नाहीं ॥ १७ ॥ लोकांमध्ये जठरानळ । सागरीं आहे व- डवानळ । भूगोलाबाहेर आवरणानळ । शिवनेत्रीं विद्युल्लता ॥ १८ ॥ कुपी- पासुनि अग्नि होतो । उंच दर्पणीं अग्नि निघतो । काष्ठमंथनीं

१६ वा.] वायुस्तवन. ३५७ श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके अग्निस्तवननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. वायुस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा वायुदेव । याचा विचित्र स्वभाव । वायूकरितां सकळ जीव । वर्तती जनीं ॥ १ ॥ वायूकरितां श्वासोच्छ्वास । नाना विद्यांचा अभ्यास । वायूकरितां शरीरास । चळण घडे ॥ २ ॥ चळण वळण प्रसारण । निरोधन आणि आकुंचन । प्राणे अपाने व्याने उदान । समाने वायू ॥ ३ ॥ नागें कूर्म कृकले वायू । देवदत्तें धनंजयू । ऐसे हे वायूचे स्वभावू । उदंड असती ॥ ४ ॥ वायु ब्रह्मांडों प्रगटला । ब्रह्मांडदेव- तांस पुरवला । तेथून पिंडीं प्रगटला । नाना गुणें ॥ ५ ॥ स्वर्गलोकीं सबळ देव । तैसेच पुरुषार्थी दानव । मृत्युलोकींचे मानव । विख्यात राजे ॥ ६ ॥ नरदेहीं नाना भेदें । अनंत भेदांचीं श्वापदें । वनचरें जलचरें आनंदें । क्रीडा करिती ॥ ७ ॥ त्या समस्तांमध्यें वायु खेले । खेचरकुळें अवघें चले । उठती वन्हीचे उमाळे । वायूकरितां ॥ ८ ॥ वायु मेघांचे भरण भरी । सवेंचि पिटून परते सारी । वायुऐसा कारभारी । दुसरा नाहीं ॥ ९ ॥ परी ते आत्मयाची सत्ता । वर्ते शरीरीं तत्वतां । परी व्यापकपणें या समर्था । तुल- ना नाहीं ॥ १० ॥ गिरीहून दाट फौजा । मेघ उठिले स्वामिकाजा । गर्ज- गर्जोनि तडकती विजा । वायुबळें ॥ ११ ॥ चंद्र सूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमं- डळें मेघमाळा । ये ब्रह्मांडों नाना कळा । वायूकरितां ॥ १२ ॥ एकवटलें तें निवडेना । कालवलें तें वेगळें होईना । तैसें हें बेचाड नाना । केवीं कळे ॥ १३ ॥ वायु सुटे सरारा । असंभाव्य पडती गारा । तैसे जीव हे नीरा- सरिसे पडती ॥ १४ ॥ वायुरूपें कमळेकळा । तोचि आधार जळा । तया जळाच्या आधारें भूगोळा । शेषें धरिलें ॥ १५ ॥ शेषास पवनांचा आहार । आहारें फुगे शरीर । तरी मग घेतला भार । भूमंडळाचा ॥ १६ ॥ महा- ६कूर्माचें शरीर भलें । ब्रह्मांड पालथें घातलें । एवढें शरीर तें राहिलें । वायू- १. हे पांच प्राण वायु. २. हे पांच उपप्राण. ३. सर्व पक्षी. ४. हा वायुरूप कमळाचा कट्टा आहे. ५. वायूचा. ६. कूर्मावतार (कासव).

३५८ श्रीदासबोध. [ दशक चेनि ॥ १७ ॥ वराहें आपुले दंतीं । पृथ्वी धरिली होती । तयाची एवढी शक्ती । वायुबळें ॥ १८ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । चवथा आपण जगदीश्वर । वायुस्वरूपविचार । विवेकी जाणती ॥ १९ ॥ तेहतीस कोटी सुरवर । अठ्यायेशीं सहस्र ऋषीश्वर । सिद्धयोगी भारेंभार । वायूकरितां ॥ २० ॥ नवकोटी कात्यायनी । छपन्नकोटी चामुंडिणी । औट कोटि भूतखाणी । वायुरूपें ॥ २१॥ भूतें दैवतें नाना शक्ती । वायुरूपें त्यांच्या व्यक्ती । नाना जीव नेणों किती । भूमंडळीं ॥ २२ ॥ पिंडीं ब्रह्मांडीं पुरवला । बाहेर कंचु- कासें गेला । सकळां ठायीं पुरवला । समर्थ वायु ॥ २३ ॥ ऐसा हा समर्थ पवन । हनुमंत जयाचा नंदन । रघुनाथस्मर्णीं तन मन । हनुमंताचें ॥२४॥ हनुमंत वायूचा प्रसिद्ध । पित्यापुत्रास नाहीं भेद । म्हणोनि दोघेहि अभेद । पुरुषार्थविषयीं ॥ २५ ॥ हनुमंतास बोलिजे प्राणनाथ । येणें गुणें हा समर्थ । प्राणेंविण सकळ व्यर्थ । होत जातें ॥ २६ ॥ मागें मृत्यु आला हनुमंता । तेव्हां वायु रोधला होता । सकळ देवांस अवचिता । प्राणांत मांडले ॥२७॥ देव सकळ मिळोन । केलें वायूचें स्तवन । वायु प्रसन्न होऊन । मोकले केले ॥ २८ ॥ म्हणोनि प्रतापी थोर । हनुमंत ईश्वरी अवतार । याचा पुरु- षार्थ सुरवर । पाहतचि राहिले ॥ २९ ॥ देव कारागृहीं होते । हनुमंतें देखिलें अवचितें । संहार करून लंकेभोवतें । विटंबूनि पाडिलें ॥ ३० ॥ उसणें घेतलें देवांचें । मूळ शोधिलें राक्षसांचें । मोठें कौतुक पुच्छकेतूचें । आश्चर्य वाटे ॥ ३१ ॥ रावण होता सिंहासनावरी । तेथें जाऊन ठोंसरे मारी । लंकेमध्यें निरोध करी । उदक कैंचें ॥३२॥ देवांस आधार वाटला । मोठा पुरुषार्थ देखिला । मनामध्यें रघुनाथाला । करुणा करिती ॥ ३३ ॥ दैत्य अवघे संहारिले । देव तात्काळ सोडिले । प्राणिमात्र सुखी जाहले । त्रैलोक्यवासी ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके वायु- स्तवननिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. महद्भूतस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ अन्न । अ- १. आवरण करण्यास. २. पुच्छ हाच ध्वज ज्याचा अशा हनुमंताचें.

१६ वा. ] महद्भूतस्तवन. ३५९ क्षीचें मूळ पवन । मागां निरूपिलें ॥ १ ॥ आतां ऐका पवनाचें मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ । अत्यंतचि चंचल । सकळांमध्ये ॥ २ ॥ तो येतो जातो दिसेना । स्थिर होऊन बैसेना । ज्याचें रूप अनुमानेना । वेदस्मृ- र्तीसी ॥ ३ ॥ मुळीं मुळींचें स्फुरण । तेंचि अंतरात्म्याचें लक्षण । जगदी- श्वरापासुनि त्रिगुण । पुढें जाहले ॥ ४ ॥ त्रिगुणापासुनि झालीं भूतें । पा- वलीं स्पष्टदशेतें । त्यां भूतांचें रूप तें । विवेकें ओळखावें ॥ ५ ॥ त्यांमध्ये मुख्य आकाश । चौं भूतांमध्ये विशेष । त्याच्या प्रकाशें प्रकाश । सकळ कांहीं ॥ ६ ॥ एक विष्णु महद्भूत । ऐसा भूतांचा संकेत । परंतु याची प्रतीत । पाहिली पाहिजे ॥ ७ ॥ विस्तारें बोलिलीं भूतें । त्या भूतांमध्ये व्यापक तें । विवरोन पाहतां येतें । प्रत्ययासी ॥ ८ ॥ आत्म्याच्या चपळ- पणापुढें । वायु तो किती बापुडें । आत्म्याचें चपळपण रोकडें । समजोन पाहावें ॥ ९ ॥ आत्म्यावेगलें कर्म चालेना । आत्मा दिसेना आढळना । गुप्तरूपें विचार नाना । पाहोन सोडी ॥ १० ॥ पिंडब्रह्मांड व्यापून भरलें । नाना शरीरीं विकासलें । विवेकी जनास भासलें । जगदंतरीं ॥ ११ ॥ आत्म्याविण देह चालती । हें तों न घडे कल्पांतीं । अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती¹ । रूपास आल्या ॥ १२ ॥ मुळापासुनि शेवटवरी । सकळ कांहीं आत्माच करी । आत्म्यापैलकिडे निर्विकारी । परब्रह्म तें ॥ १३ ॥ आत्मा शरीरीं वर्ततो । इंद्रियग्रामें² चेष्टवितो । नाना सुखदुःखें भोगितो । देहा- त्मयोगें ॥ १४ ॥ सप्तकंचुक³ हें ब्रह्मांड । त्यामध्यें सप्तकंचुकें पिंड । त्या पिंडामध्ये आत्मा जड । विवेकें वोळखावा ॥ १५ ॥ शब्द ऐकोन सम- जतो । समजोन प्रत्युत्तरें देतो । कठिन मृदु शीतोष्ण जानतो । त्वचेमध्यें ॥ १६ ॥ नेत्रीं भरोन पदार्थ पाहणें । नाना पदार्थ परीक्षणें । उंच नीच समजणें । मनामध्यें ॥ १७ ॥ क्रूरदृष्टी सौम्यदृष्टी । कपटदृष्टी कृपादृष्टी । नाना प्रकारच्या गोष्टी । भेद जाणे ॥ १८ ॥ जिव्हेमध्यें नाना स्वादें⁴ । निवडून जाणे भेदाभेद । जें जें जाणे तें तें विशद् । करूनि बोले ॥ १९ ॥ उत्तम अ- न्नाचे परिमळ । नाना सुगंध परिमळ । नाना फळांचे परिमळ । घ्राणेंद्रियें जाणे ॥ २० ॥ जिव्हेनें स्वाद घेणें बोलणें । पाणींद्रियें⁵ घेणें देणें । पादेंद्रियें १. आकृति. २. इंद्रियसामूह. ३. सात आवरणांचें. ४. रुचि. ५. हातानें.

३६० श्रीदासबोध. [ दशक येणें जाणें । सर्वकाळ ॥ २१ ॥ शिश्नेंद्रियें सुरतभोग । गुदेंद्रियें मलोत्सर्ग । मनेंकरूनि सकळ सांग । कल्पूनि पाहे ॥ २२ ॥ ऐसे व्यापार परोपरी । त्रिभुवनीं एकलाचि करी । त्याची वर्णावया थोरी । दुसरा नाहीं ॥ २३ ॥ त्याविण दुसरा कैंचा । जे महिमा सांगावा तयाचा । व्याप आटोप आत्म- याचा । नै भूतो न भविष्यति ॥ २४ ॥ चौदाहिविद्या चौसष्ट कळा । धूर्त- पणाच्या नाना कळा । वेदशास्त्रपुराण जिव्हाळा । तेणेंविण कैंचा ॥ २५ ॥ इहलोकींचा आचार । परलोकीं सारासारविचार । उभय लोकींचा निर्धार । आत्माच करी ॥ २६ ॥ नाना मतें नाना भेद । नाना संवाद वेदवाद । नाना निश्चय भेदाभेद । आत्माच करी ॥ २७ ॥ मुख्य तत्व विस्तारलें । तेणें तयास रूप आणिलें । येणेंकरितां सार्थक झालें । सकळ कांहीं ॥ २८॥ लिहिणें वाचणें पाठांतर करणें । पुसणें सांगणें अर्थ करणें । गाणें वाजवणें नाचणें । आत्म्याचकारितां ॥ २९ ॥ नाना सुखें आनंदतो । नाना दुःखें कष्टी होतो । देह धरितो आणि सोडितो । नाना प्रकारें ॥ ३० ॥ एकलाच नाना देह घरी । एकलाच नटे परोपरी । नटनाट्य कळाकुसरी । त्याविण नाहीं ॥ ३१ ॥ एकलाचि झाला बहुरूपी । बहुरूपी बहु साक्षेपी । बहुरूपें बहु प्रतापी । आणि लंडीं३ ॥ ३२ ॥ एकलाच विस्तारला कैसा । पाहे बहुविध तमासा । दंपत्याविण कैसा । विस्तारला ॥ ३३ ॥ स्त्रियांस पाहिजे पुरुष । पुरुषांस पाहिजे स्त्रीवेष । ऐसा आवडीचा संतोष । परस्परें ॥ ३४ ॥ स्थूलांचें मूळ तें लिंग । लिंगामध्यें हे प्रसंग । येणेप्रकारें जग । प्रत्यक्ष चाले ॥ ३५ ॥ पुरुषांचा जीव स्त्रियांचे जीवीं । ऐशी होते उठाठेवी । परी या सूक्ष्माची गोवी । समजली पाहिजे ॥ ३६ ॥ स्थूळाकारितां वाटे भेद । सूक्ष्मीं अवघेंच अभेद । ऐसें बोलणें प्रसिद्ध । प्रत्यया आलें ॥ ३७ ॥ बाय- कोनें बायकोस भोगिलें । ऐसें नाहीं कीं घडलें । बायकोस अंतरीं लागलें । ध्यान पुरुषाचें ॥ ३८ ॥ स्त्रीस पुरुष पुरुषास वधू । ऐसा आहे हा संबंधू । या कारणें सूक्ष्म संवादू । सूक्ष्मींच आहे ॥ ३९ ॥ पुरुषइच्छेमध्यें प्रकृती । प्रकृतीमध्यें पुरुषव्यक्ती । प्रकृतिपुरुष बोलती । येणें न्यायें ॥ ४० ॥ पिंडा- वरून ब्रह्मांड पाहावें । प्रतीतीनें प्रतीतीस घ्यावें । उमजेना तरी उमजावें । १. अलौकिक २. खटपटी. ३. भित्रा. ४. शरीराचें. ५. मन.

१६ वा.] अंतरात्मा. ३६१ विवरविवरोनी ॥ ४१ ॥ द्वैतइच्छा होते मुळीं । तरी ते आली भूमंडळीं । भूमंडळीं आणि मुळीं । रुजु पाहावें ॥ ४२ ॥ येथें मोठा झाला साक्षेप । फिटला श्रोत्यांचा आक्षेप । जे प्रकृतिपुरुषांचें रूप । निवडोन गेलें ॥४३॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके महद्भूतस्तवननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. अंतरात्मा. श्रीगणेशाय नमः ॥ नमूं गणपती मंगलमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती । लोक भजती स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥ नमूं वैखरी वागीश्वरी¹ । अभ्यंतरीं प्रकाश करी । नाना भरोवेरीं² विवरी । नाना विद्या ॥ २ ॥ स- कळ नामामध्यें नाम । रामनाम उत्तमोत्तम । श्रम जाऊन विश्राम । चंद्र³- मौळी पावला ॥ ३ ॥ नामाचा महिमा थोर । रूप कैसें उत्तरोत्तर । परात्पर परमेश्वर । त्रैलोक्यधर्ता ॥ ४ ॥ आत्माराम चहूंकडे । लोक वावडे जिकडे तिकडे । देह पडे मृत्यु घडे । आत्म्याविण ॥ ५ ॥ जीवात्मा शिवात्मा परमा- त्मा । जगदात्मा विश्वात्मा गुह्यात्मा । आत्मा अंतरात्मा सर्वात्मा । देव दान- व मानवीं ॥ ६ ॥ सकळ मार्ग बोलती चालती । अवतार पंगतीची गती । आत्म्याकारितां होत जाती । ब्रह्मादिक ॥ ७ ॥ नादरूप ज्योतिरूप । सूक्ष्म- रूप सत्तारूप । चैतन्यरूप सुखरूप । द्रष्टारूप जाणिजे ॥ ८ ॥ नरोत्तम वीरोत्तम । पुरुषोत्तम रघूत्तम । सर्वोत्तम उत्तमोत्तम । त्रैलोक्यवासी ॥ ९ ॥ नाना खटपट आणि चटपट । नाना लटपट आणि झटपट । आत्मा नसतां सर्व सपाट । चहूंकडे ॥ १० ॥ आत्म्याविण वेडें कुडें⁴ । आत्म्याविण मडें बापुडें । आत्म्याविण थडें रोकडें । शरीराचें ॥ ११ ॥ आत्मज्ञानी समजे मनीं । पाहे जनीं आत्म्यालागुनी । भुवनीं आणि त्रिभुवनीं । आत्म्याविण बोस ॥ १२ ॥ परम सुंदर आणि चतुर । जाणे सकळ सारासार । आत्म- याविण अंधकार । उभय लोकीं ॥ १३ ॥ सर्वांगीं सिद्ध सावध । नाना भेद नाना वेध । नाना खेद आणि आनंद । तेणेंचिकारितां ॥ १४ ॥ रंक अथ- वा ब्रह्मादिक । एकचि चालवी अनेक । पाहावा नित्यानित्यविवेक । को- १. सरस्वती. २. विस्तारानें. ३. शंकर. ४ खोटें.

३६२ श्रीदासबोध. [ दशक णी एकें ॥ १५ ॥ ज्याचे घरीं पद्मिनी नारी । आत्मा तंववरी आवडी तरी । आत्मा गोलिया शरीरीं । तेज कैंचें ॥ १६ ॥ आत्मा दिसेना ना भासेना । बाह्यात्कारें अनुमानेना । नाना मनांच्या कल्पना । आत्म- याचेनी ॥ १७ ॥ आत्मा शरीरीं वास्तव्य करी । अवघें ब्रह्मांड विवरी भ- री । वासना भावना परोपरी । किती ह्मणोन सांगाव्या ॥ १८ ॥ मनाच्या अनंत वृत्ती । अनंत कल्पना धरिती । अनंत प्राणी सांगों किती । अंतरा- त्माचें ॥ १९ ॥ अनंत राजकारणें धरणें । कुबुद्धि सुबुद्धि विवरणे । कळों न देणें चुकावणें । प्राणिमात्रांसी ॥ २० ॥ एकास एक जपती टपती । ए- कास एक खपती लपती । शत्रुत्वाची स्थिती गती । चहूकडे ॥ २१ ॥ पृथ्वीमध्यें परोपरी । एकास एक सिंतरी । कित्येक भक्त परोपरी । परोपका- र कारिती ॥ २२ ॥ एक आत्मा अनंत भेद । देहपरत्वें घेतो स्वादें । आत्मा ठायींचा अभेद । भेदहि धरी ॥ २३ ॥ पुरुषास स्त्री पाहिजे । स्त्रीस पुरुष पाहिजे । नवरीस नवरी पाहिजे । हें तों घडेना ॥ २४ ॥ पुरुषांचा जीव स्त्रियांचे जीवीं । ऐशी नाहीं उठाठेवी । विषयसुखाची गोवी । तेथें भेद आ- हे ॥ २५ ॥ ज्या प्राण्यास जो आहार । तेथेंचि होती तत्पर । पशूचे आहा- रीं नर । अनादरें वर्तती ॥ २६ ॥ आहारभेद देहभेद । गुप्त प्रगट उदंड भे- द । तैसाचि जाणावा आनंद । वेगळाला ॥ २७ ॥ सिंधुगर्भीचीं नीरें । त्या नीरामधील शरीरें । आवरणोदकींचीं जळचरें । अत्यंत मोठीं ॥ २८ ॥ सू- क्ष्मदृष्टी आणितां मना । शरीरांचा अंत लागेना । मां तो अंतरात्मा अनु- माना । कैसा येतो ॥ २९ ॥ देहात्मयोग शोधूनि पाहिला । तेणें कांहीं अनुमांनला । स्थूळ सूक्ष्मांचा गलबला । गाथागोवी ॥ ३० ॥ गाथागोवी उगवावयाकारणें । केलीं नाना निरूपणें । अंतरात्मा कृपाळूपणें । बहुतां मुखें बोलला ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके अं- तरात्मनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥

९. उपासना. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें लोक नाना । त्यांस नाना उपासना । १. अत्यंत सुंदर. २. इच्छा. ३. कल्पना. ४. फसचितो. ५. रुचि. ६. मग.

१६ वा. ] उपासंना. ३६३ भावार्थे प्रवर्त्तले भजना । ठायीं ठायीं ॥ १ ॥ आपुलाल्या देवास भजती । नाना स्तुति स्तवनें करिती । जे ते निर्गुण म्हणती । उपासनेसी ॥ २ ॥ या- चा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राय । अरे हा स्तुतीचा स्वभाव । ऐसा आहे ॥ ३ ॥ निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण । सकळ आहे प्रमाण । प्रतीत पाहा ॥ ४ ॥ सकळ जनास मानावें तें । एका अंतरात्म्यास पावतें । अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥ श्रोता म्हणे हें अनुमान । मुळीं घालावें जीवन । तें पावे पानोपान । हे सद्यःप्रचीती ॥ ६॥ वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी । परी न थिरे निमि- षभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥ थोर वृक्षास कैसें करावें । शेंड्यास पात्र कैसें न्यावें । त्याचा अभिप्राय देवें । मज निरूपावा ॥ ८ ॥ पर्जन्याचें उदक पडतें । तें तों मुळाकडेच येतें । हातचि पावेना तेथें । काय करिती ॥ ९ ॥ सकळांस मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैंचें घडे । साधुजनांचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥ तथापि वृक्षाचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे । ये गोष्टीचें सांकडें । कांहींच नाहीं ॥ ११ ॥ मागील आशंकेचें निरसन । होतां जाहलें समा- धान । आतां गुणास निर्गुण । कैसे म्हणती ॥ १२ ॥ चंचळपणें विकारलें । सगुण ऐसें बोलिलें । येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥ वक्ता म्हणे हा विचार । शोधून पाहावें सारासार । अंतरीं राहतां निर्धार । नांव नाहीं ॥ १४ ॥ विवेकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा । याचा विचार समजा । विवाद खोटा ॥ १५ ॥ कल्पांतप्रळयीं जें उरलें । तें निर्गुण ऐसें बोलिलें । येर तें अवघेंचि जाहलें । मायेमध्यें ॥ १६ ॥ सेना शहर बाजार । नाना यात्रा लहान थोर । शब्द उठती अपार । कैसे निव- डावे ॥ १७ ॥ काळामध्यें पर्जन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ । नाना जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥ नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । बहु ऋषि बहु मतें । कैसीं निवडावीं ॥ १९ ॥ वृष्टि होतांच अंकुर । सृष्टीवरी निघती अपार । नाना तंतु लहान थोर । कैसे निवडावे ॥ २० ॥ खेचरें भूचरें जलचरें । नाना प्रकारोंचीं शरीरें । नाना रंग चित्र- विचित्रें । कैसीं निवडावीं ॥ २१ ॥ कैसें दृश्य आकारलें । नाना प्रकारें, १. थिरतें. २. तुलनेनें. ३. पक्षी. ४. पशु वगैरे.

३६४ श्रीदासबोध. [ दशक विकारलें । उदंडाचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥ पोकळीमध्यें गंधर्व- नगरें । नाना रंग लहान थोरें । बहुत व्यक्ति बहु प्रकारें । कैशीं निवडावीं ॥२३॥ दिवसरजनीचा प्रकार । चांदणें आणि अंधकार । विचार आणि अविचार । कैसा निवडावा ॥२४॥ विसर आणि आठवण । नेमस्त आणि बाष्कळपण । प्रचीत आणि अनुमान । येणें रीती ॥ २५ ॥ न्याय आणि अन्याय । होय आणि न होय । विवेकेंविण काय । उमजों जाणे ॥ २६ ॥ कार्यकर्ता आणि निकामी । शूर आणि कुकर्मी । धार्मिक आणि अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥ धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तस्कर । खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥ वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ । सारासारविचार स्पष्ट । कळला पाहिजे ॥२९॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके उपासननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. गुणभूत. श्रीगणेशाय नमः ॥ पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग । पंचभूतें गेलिया मग । काय आहे ॥ १ ॥ श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमै वाढविले । आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥ अंतरात्मा पां- चवें भूत । त्रिगुण त्याचे अंगभूत । सावध करूनियां चित्त । बरें पाहा ॥ ३ ॥ भूत म्हणिजे जितुकें झालें । त्रिगुण झाल्यांत आले । इतुकैन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥ भूतांवेंगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्वही । एका वेगळें एक कांहीं । घडेचि ना ॥ ५ ॥ आत्म्याचेनि झाला पवन । पवनाचेनि प्रगटे अन । अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥ जीवन अवघें दबाबिलें । तें रविमंडळें आळलें । वन्हिवायूचेनि झालें । भूमंडळ ॥ ७ ॥ वन्हि वायु रवि नसतां । तरी होती उदंड शीतळता । ते शीतळते- मध्यें उष्णता । येणेंचि न्यायें ॥८॥ अवघें वर्मास वर्म केलें । तरीच एवढें फांपावलें । देहमात्र तितुके झाले । वर्माकरितां ॥ ९॥ अवघें शीतळचि असतें । तरी प्राणिमात्र मरोनि जाते । अवघ्या उष्णेचि करपतें । सकळ १. आकाशांत भासमान् होणारें नगर. २. भूतापासून झालेलें. ३. भरलें.

१६ वा. ] गुणभूत. ३६५ कांहीं ॥ १० ॥ भूमंडळ आळोनि गोठलें । तें रविकिरणें वाळोन गेलें । मग सहजचि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥ म्हणोनि केला पर्जन्यकाळ । थंड झालें भूमंडळ । पुढें उष्णकाळीं शीतळ । शीतकाळ जाणावा ॥ १२ ॥ शीत- काळें कष्टले लोक । कपोंनि गेले वृक्षादिक । म्हणोनि पुढें कौतुक । उष्ण- काळाचें ॥ १३ ॥ त्याहिमध्यें प्रातःकाळ । मध्यान्हकाळ सायंकाळ । शीत- काळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥ ऐसें एकामागें एक केलें । विल्हेनें¹ नेमस्त लाविलें । येणेंकरितां जगले । प्राणिमात्र ॥ १५ ॥ नाना रसें रोग कठिण । म्हणोनि औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टिरचनेचें विवरण । केलें पाहिजे ॥ १६ ॥ देहमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दांत । ऐशी भूमं- डळीं प्रचीत । नाना रत्नांची ॥ १७ ॥ सकळांसि मूळ जीवन बांधों । जी- वनें चाले सकळ धंदा । जीवनेंविण हरि गोविंदा । प्राणी कैंचे ॥ १८ ॥ जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ । हिरे माणिक इंद्रनीळ । तेजाळ झाले ॥ १९ ॥ महिमा कोणाचा सांगावा । तेजाळ कर्दै³मैचि आघवा । वे- गळा वेगळा निवडावा । कोणत्या प्रकारें ॥ २० ॥ परंतु बोलिलें कांहीं एक । मनास कळावया विवेक । जनामध्यें तार्किक लोक । समजती अवघें ॥ २१ ॥ अवघें समजलें हें घडेना । शाखाशाखांसि पडेना । अनुमानें निश्चय होईना । कांहीं एक ॥ २२ ॥ अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णू न शके वाचे । वेद विधि⁴ तेहि काँचे⁵ । देवेंविण ॥ २३ ॥ आत्माराम सकळां पाळी । अवघें त्रैलोक्य संभाळी । तया एकेंविण धुळी । होय सर्वत्रांची ॥ २४ ॥ जेथें आ- त्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं । त्रैलोक्यांचे प्राणी सर्वही । प्रेतरूपी ॥ २५ ॥ आत्मा नसतां येती मरणें । आत्म्याविण कैंचें जिणें । बरा विवेक समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥ समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैंचें । कोणी एकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥ उपासना प्रगट झाली । तरी हे विचारणा कळली । या कारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥ उपासनेचा मोठा आश्रय । उपासनेविण निराश्रय । उदंड केलें तरी तो जय । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥ समर्थांची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी । या कारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥ भजन साधन अभ्यास । येणेंचि १. क्रमानें. २. कारण. ३. पंचभूतांचें मिश्रण. ४. ब्रह्मदेव. ५. अपुरे.

३६६ श्रीदासबोध. [ दशक पाविजे परलोकास । दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥३१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके गुणभूतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥ ओंव्या ३०२. दशक १७ वा. १. देवबलात्कार. श्रीगणेशाय नमः ॥ निश्चळ ब्रह्मीं चंचल आत्मा । सकळां पर जो पर- मात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । षड्गुणेश्वर ॥ १॥ सकळ जगाचा ईश्वर । म्हणोनि नामें जगदीश्वर । तयापासून विस्तार । विस्तारला ॥ २ ॥ शिव- शक्ति जगदीश्वरी । प्रकृतिपुरुष परमेश्वरी । मूळमाया गुणेश्वरी । गुणक्षो- भिणी ॥ ३ ॥ क्षेत्रज्ञ १ द्रष्टा २ कूटस्थै ३ साक्षी । अंतरात्मा सर्व लक्षी । शुद्ध- सत्व महत्तत्व परीक्षो । जाणता साधु ॥ ४ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । नाना पिंडीं जीवेश्वर । त्यांस भासती प्राणिमात्र । लहान थोर ॥ ५॥ देव देवळा४- मध्यें बैसला । न भजतां मारितो देहाला । म्हणोनि त्याच्या भेणें तयाला । भजती लोक ॥ ६ ॥ जे वेळेसि भजन चुकलें । ते तेव्हां पछाडिले । आव- डीनें भजों लागले । सकळ लोक ॥ ७ ॥ जें जें जेव्हां आँक्षेपिलेँ । तें तें तात्काळचि दीधलें । त्रैलोक्य भजों लागलें । येणें प्रकारें ॥ ८ ॥ पांचां वि- ६षयांचा नैवेद्य । जेव्हां पाहिजे तेव्हां सिद्ध । ऐसें न करितां सद्य । रोग होती ॥ ९ ॥ जेणें काळें नैवेद्य पावेना । तेणें काळें देवै ८ राहिना । भाग्य वैभव पदार्थ नाना । सांडून जातो ॥ १० ॥ जातो तों कळों देईना । कोणास ठाऊक होईना । देवेंविण अनुमानेना । कोणास देव ॥ ११ ॥ देव पहावयाकारणें । देऊळें लागती पाहणें । कोठें तरी देउळा- च्या गुणें । देव प्रगटे ॥ १२ ॥ देऊळें म्हणिजे नाना शरीरें । तेथें राहिजे जीवेश्वरें । नाना शरीरें नाना प्रकारें । अनंत भेद ॥ १३ ॥ चालती बो- लती देऊळें । त्यांमध्यें राहिजे राऊळें । जितुकीं देऊळें तितुकीं सकळें । कळलीं १. देहादींस जाणणारा. २. जगद्भास पाहणारा. ३. गुप्तरूपानें राहणारा. ४. शरीरांत. ५. मागितलें. ६. शब्द, स्पर्श इत्यादींचा. ७. जीवात्मा. ८. देवानें.

१७ वा.] शिवशक्ति. ३६७ पाहिजे ॥ १४ ॥ मत्स्य कूर्म वराह देउळें । भूगोल धरिला सर्वकाळें । क- राळें विक्राळें निर्मिलें । कितीएक ॥ १५ ॥ कितीएक देउळीं सौख्य पाहे । भरितें अवघे सिंधूस आहे । परी तें सर्वकाळ न रहे । अशाश्वत ॥ १६ ॥ अशाश्वताचा मस्तकमणी । जयाची एवढी करणी । दिसेना तरी काय झालें धनी । तयासीच म्हणावें ॥ १७ ॥ उद्भवोन्मुख होतां अभेद । विमुख होतां उदंड खेद । ऐसा अधोध्वं संवाद । होत जातो ॥ १८ ॥ सकळांचें मूळ दिसेना । भव्य भारी आणि भासेना । निमिष एक वसेना । एके ठायीं ॥ १९ ॥ ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । तुझी लीला सर्वोत्तमा । तूंचि जाणसी ॥ २० ॥ संसारास आलियाचें सार्थक । जेथें नित्यानित्यविवेक । इहलोक आणि परलोक । दोन्ही साधिले ॥ २१ ॥ मननशीळ लोकांपासीं । अखंड देव अहर्निशीं । पाहतां त्यांच्या पूर्व- संचितांसी । जोडा नाहीं ॥ २२ ॥ अखंड योग म्हणोनि योगी । योग नाहीं तो वियोगी । वियोगी तोहि योगी । योगबळें ॥ २३ ॥ भल्याची महिमा ऐसी । जे सन्मार्ग लावी लोकांसी । पोहणार असतां बुडत्यासी । बुडों नेदी ॥ २४ ॥ स्थूळसूक्ष्म तत्त्वझाडा । पिंडब्रह्मांडाचा निवाडा । प्रचीत पाहे ऐसा थोडा । भूमंडळीं ॥ २५ ॥ वेदांतींचें पंचीकरण । अखंड तयाचें विवरण । महावाक्यें अंतःकरण । रहस्य पाहे ॥ २६ ॥ जे पृथ्वीमध्यें वि- वेकी असती । धन्य तयांची संगती । श्रवणमात्रें पावती गती । प्राणि- मात्र ॥ २७ ॥ सत्संग आणि उत्तम गुण । सत्संग आणि सच्छास्त्रश्रवण । अखंड होतसे विवरण । नाना परोपकारांचें ॥ २८ ॥ जे सत्कीर्तीचे पुरुष । ते परमेश्वराचे अंश । धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेंचि वसे ॥ २९ ॥ विशेष सारासारविचार । तेणें होय जगदुद्धार । संगत्यागें निरंतर । होऊन गेले ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देवबलात्कारनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. शिवशक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । जैसें गगन अंतराळ । निरा- १. विश्वांतपत्तीचा विचार करितां. २. विश्व आणि ब्रह्म. ३. पुण्यास.

३६८ श्रीदासबोध. [ दशक कार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥ अंतचि नाहीं तें अनंत । शाश्वत आणि सदोदित । असंत१ नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥ परब्रह्म तें अविनाश । जैसें आकाश अवकाश । न तुटे न फुटे सावकाश । जैसें तैसें ॥ ३ ॥ तेथें ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण । तेथें अखंड निर्गुण । निर२व- लंबी ॥ ४ ॥ तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोख प्रकाश । उपाधी- वेगळें एक । निरूपाधि ब्रह्म ॥ ५ ॥ निश्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य ऐसें कल्पिलें । गुणसमानत्वें झालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥ गगनीं आली अभ्रच्छाया३ । तैशी जाणिजे मूळमाया । उद्भव आणि विलया । वेळ नाहीं ॥ ॥ ७ ॥ निर्गुणीं गुणविकार । तोचि षड्गुणेश्वर । अर्धनारी नटेश्वर । तयासि म्हणिजे ॥ ८ ॥ आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति । तेथून पुढें नाना व्यक्ती । निर्माण झाल्या ॥ ९ ॥ तेथून पुढें शुद्ध सत्व । रजतमाचें गूढत्व । तयासि म्हणिजे महत्तत्व । गुण४क्षोभिणी ॥ १० ॥ मुळीं असेचि ना व्यक्ती । तेथें कैंची शिवशक्ती । ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान असावें ॥ ११ ॥ ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड । अधोध्वं पाहतां निवाड । कळों येतें ॥ १२ ॥ बीज फोडून आणिलें मना । तेंथें फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥ फळ फो- डितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंड- ब्रह्मांडीं ॥ १४ ॥ नरनारी दोन्ही भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध । मुळीं न- सतां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥ नाना बीजरूप कल्पना । तींत काय एक असेना । सूक्ष्म म्हणोन भासेना । एकाएकीं ॥ १६ ॥ स्थूळाचें मूळ तें वासना । ते वासना आधीं दिसेना । स्थूळा वेगळें अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥ कल्पनेची सृष्टि केली । ऐशीं वेदशास्त्रं बोलिलीं । दिसेना म्हणोन मिथ्या केलीं । न पाहिजेत कीं ॥१८॥ पडदा एकेक जन्माचा । तेथें विचार कळेल कैंचा । परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥ नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । एकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥ २० ॥ नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे । पिंडावरून उमगे । ब्रह्मांडबीज ॥२१॥ नवरीचें मन नवऱ्यावरी । नवऱ्याचें मन नवरीवरी । ऐशी १. असत्. २. आश्रयरहित. ३. ढगांची सांवली. ४. त्रिगुणांस चाळविणारी.

१७ वा. ] श्रवणोपदेश. ३६९ वासनेसी परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥ वासना मुळींच अभेद । देहसंबंधें झाला भेद । तुटतां देहाचा संबंध । भेद गेला ॥ २३ ॥ नरनारीचें बीज कारण । शिवशक्तीमध्यें जाण । देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥ नाना प्रचीतींच्या वासना । एकाचें एकास कळेना । तीक्ष्ण दृष्टीनें अनुमाना । कांहींसें येतें ॥ २५ ॥ बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी । उपाधि वाढे जयाचेनी । ते हे वनिता ॥ २६ ॥ वीट नाहीं कंटाळा नाहीं । आलस्य नाहीं त्रास नाहीं । इतुकी माया कोठेंचि नाहीं । माते वेग- ळी ॥ २७ ॥ नाना उपाधि वाढवूं जाणे । नाना मायेनें गोवूं जाणे । नाना प्रीति लावूं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ॥ २९ ॥ ईंश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें । लोभाचें गुंडाळें केलें । उग- वेना ऐसें ॥ ३० ॥ ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची महा गोडी । हे मु- ळींहून चालली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥ मुळीं सूक्ष्म निर्माण झालें । पुढें स्पष्ट दिसोन आलें । उत्पत्तीचें कार्य चाले । उभयतांकरितां ॥ ३२ ॥ मुळीं शिवशक्ती हें तों खरें । पुढें झालीं वधुवरें । चौऱ्याशीं लक्ष विस्तारें । विस्तारली जे ॥ ३३ ॥ येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे आणिलें । विवरल्याविण बोलिलें । तें व्यर्थ जाणावें ॥ ३४ ॥ इति श्रीदा- सबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके शिवशक्तिनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. श्रवणोपदेश. श्रीगणेशाय नमः ॥ थांबा थांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडूं नका । सांगीतलें तें ऐका । सावधपणें ॥ १ ॥ श्रवणामध्यें सार श्रवण । तें हें अ- ध्यात्मनिरूपण । सुचित्त करूनि अंतःकरण । ग्रंथामध्यें विवरावें ॥ २ ॥ श्रवण मननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार । रोकडा मोक्षाचा उधार । बोलोंच नये ॥ ३ ॥ नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां । उत्तम सोनें पुटीं घालितां । सावधान असावें ॥ ४ ॥ नाना नाणीं मोजून घेणें । १. सूक्ष्म विचारानें. २. बायको. ३. पाहावें. ४. मुशींत.