भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

७ वा. ] ब्रह्मनिरूपण. १५९ स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तुं ॥३१॥ ब्रम्ह नाहीं नवें जुनें । ब्रम्ह नाहीं अधिक उणें । उणें भावील तें सुणें ३ । देह- बुद्धीचें ॥३२॥ देहबुद्धीचा निश्चय । करी समाधानाचा क्षय । चुके समाधान- समय । देहबुद्धियोगें ॥ ३३ ॥ देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण । मिथ्या जाणोन विचक्षण । निंदिती देह ॥३४॥ देह पावे जंववरी मरण । तंववरी धरी देहाभिमान । पुन्हा दाखवी पुनरागमन ४ । देहबुद्धी मागुती ॥३५॥ देहाचेनि थोरपणें । समाधानासि आणिलें उणें । देह पडेल कोणत्या गुणें । हेंहि कळेना ॥ ३६ ॥ हित आहे देहातीतें । म्हणोनि निरू- पिती संत । देहबुद्धीनें अनहित । होऊंचि लागे ॥३७॥ सामर्थ्यबळें देहबुद्धी । योगियांस तेहि बाधी । देहबुद्धीची उपाधी । फैसावों लागे ॥ ३८ ॥ म्हणोन देहबुद्धि झडे । तरीच परमार्थ घडे । देहबुद्धीनें बिघडे । ऐक्य- ता ब्रम्हींची ॥ ३९ ॥ विवेक वस्तूकडे वोढी । देहबुद्धि तेथूनि पाडी । अहंता लावूनि निवडी । वेगळेपणें ॥ ४० ॥ विचक्षणें या कारणें । देह- बुद्धि त्यजावी श्रवणें । सत्यब्रम्हीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१ ॥ सत्यब्रम्ह तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । प्रत्युत्तर दे आपण । व- क्ता श्रोत्यासी ॥ ४२ ॥ म्हणे ब्रम्ह एकचि असे । परी तें बहुविध भासे । अनुभव देहीं अनारिसे । नानामतीं ॥ ४३ ॥ जें जें जया अनुभवलेँ । तेंचि तयासि मानलें । तेथेंचि त्याचें विश्वासलें । अंतःकरण ॥४४॥ ब्रह्म नामरूपा- तीत । असोनि नामें बहुत । निर्मळ निश्चळ निवांत ५ । निजानंद ॥४५॥ अरूप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपार । अद्वय अतर्क्य अपार । ऐसीं नामें ॥४६॥ नादरूप ज्योतिरूप । चैतन्यरूप सत्तारूप । स्वस्वरूप साक्षरूप । ऐसीं नामें ॥४७॥ शून्य आणि सनातन । सर्वेश्वर आणि सर्वज्ञ । सर्वात्मा ६ जगज्जी- वन । ऐसीं नामें ॥ ४८ ॥ सहज ७ आणि सदोदित ८ । शुद्ध बुद्ध ९ सर्वातीत १० । शाश्वत आणि शब्दोतीत ११ । ऐसीं नामें ॥ ४९ ॥ विशाल विस्तीर्ण विश्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार । आत्मा परमात्मा परमेश्वर । ऐसीं नामें ॥ ५० ॥ परमात्मा ज्ञानघन । एकरूप पुरातन । चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्या-

१. देहाहून वेगळें. २. ब्रम्ह. ३. क्षुद्र. ४. पुन्हा जन्मास येणें. ५. न ढळणारें. ६. सर्वांस व्यापून राहतो तो. ७. कृत्रिम नव्हे. ८. सदैव प्रकाशित असणारें. ९. ज्ञानमय. १०. सर्वांहून भिन्न. ११. वाणीच्या पलीकडचें.

१६० श्रीदासबोध. [ दशक र्ची ॥ ५१ ॥ ऐसीं नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत । त्याचा क- रावया निश्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२ ॥ तो विश्रांतीचा विश्राम । आदि- पुरुष आत्माराम । तें एकचि परब्रम्ह । दुसरें नाहीं ॥ ५३ ॥ तेंचि कळा- याकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें श्रवणें । निश्चय बाणे ॥ ५४ ॥ खोटें निवडितां एकसरें । उरलें तें जाणिजे खरें । चौदा ब्रह्मों शा- स्त्राधारें । बोलिजेती ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमद- शके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. चतुर्दश ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान । जेणें होय समाधान । साधकांचें ॥ १ ॥ रत्नें साधायाकारणें । मृत्तिका लागे एकवटणें । चौदा ब्रम्हांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २ ॥ पदार्थाविण संकेत । द्वैतावगळा दृष्टांत । पूर्वपक्षांविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३ ॥ आधीं मिथ्या उभारावें । मग तें वोळखोन सांडावें । पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४ ॥ म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सि- द्धांत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५ ॥ पहिलें तें शब्द- ब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरें ब्रह्म । तिसरें खंब्रह्म² । बोलिली श्रुती ॥ ६ ॥ चौथें जाण सर्व³ ब्रह्म । पांचवें चैतन्य⁴ ब्रह्म । साहावें सत्ता⁵ ब्रह्म । साक्षि ब्रह्म सातवें ॥ ७ ॥ आठवें सगुण ब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म । दाहावें वाच्य⁶ ब्रह्म । जाणावें पै ॥ ८ ॥ अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें । तदा- कार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्यं⁷ ॥ ९ ॥ ऐसीं हीं चौदा ब्रम्हें । यांचीं निरूपिलीं नामें । आतां स्वरूपाचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १० ॥ अनुभवांविण भ्रम । या नांव शब्दब्रम्ह । आतां ओमित्येकाक्षरें ब्रम्ह । तें एकाक्षर ॥ ११॥ खं शब्दे आकाशब्रम्ह । महदाकाश व्यापक ब्रम्ह । आतां बोलिजेल सूक्ष्मब्रम्ह । सर्व ब्रम्ह ॥ १२ ॥ पंचभूतांचें कोडें । जें जें तत्व दृष्टीस पडे । तें तें ब्रम्ह- चि रोकडें । बोलिजत आहे ॥ १३ ॥ या नांव सर्व ब्रम्ह । श्रुतिआश्रयाचें १. ॐ असें एक अक्षर. २. आकाशरूप. ३. सर्व दृश्य हेंच ब्रह्म. ४. ज्ञानरूप. ५. अस्तित्वमात्र. ६. वाणीरूप. ७. शब्दानें सांगण्यास अशक्य.

७ वा.] चतुर्दश ब्रह्म. १६१

वर्म । आतां चैतन्यब्रम्ह । बोलिजेल ॥ १४ ॥ पंचभूतादि मायेतें । चैतन्य- चि चेतवितें । म्हणोनियां चैतन्यातें । चैतन्य ब्रम्ह बोलिजे ॥ १५ ॥ चैत- न्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रम्ह तत्वतां । तये सत्तेस जाणतां । या नांव साक्षिब्रम्ह ॥ १६ ॥ साक्षित्व जयापासूनी । तेंहि आकळिलें गुणीं । सगुण ब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १७ ॥ जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुण ब्रह्म तत्वतां । वाच्यब्रम्ह तेंहि आतां । बोलिजेल ॥ १८ ॥ जें वाचे बोलतां आलें । तें वाच्य ब्रम्ह बोलिलें । अनुभवासि कथिलें । न वचे सर्वथा ॥१९॥ या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म । परंतु याचेंहि वर्म । बोलवेना ॥ २० ॥ ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद । अनिर्वाच्य संवाद । तु- टोनि गेला ॥ २१ ॥ ऐसीं हीं चौदा ब्रह्में । निरूपिलीं अनुक्रमें । साधकें पाहतां भ्रमें । बाधिजेना ॥ २२ ॥ ब्रम्ह जाणावें शाश्वत । माया तेचि अ- शाश्वत । चौदा ब्रम्हांचा सिद्धांत । होईल आतां ॥२३॥ शब्दब्रम्ह तें शाब्दि- क । अनुभवैविण मायिक । शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥२४॥ जेथें क्षर ना अक्षर । तेथें कैंच ओमित्येकाक्षर । शाश्वताचा विचार । तेथें न दिसे ॥ २५ ॥ खंब्रम्ह ऐसें वचन । तरी शून्यातें नाशी ज्ञान । शाश्वताचें अधि- ष्ठान । तेथें न दिसे ॥ २६ ॥ सर्वत्रांस होतो अंत । हें तों प्रगटचि दिसत । प्रलय बोलिला निश्चित । वेदांतशास्त्रीं ॥२७॥ ब्रम्हप्रलय मांडेल जेथें । भूता- न्वय कैचा तेथें । म्हणोनियां सर्वब्रम्हांतें । नाश आहे ॥२८॥ अचलासि आणी चळण । निर्गुणास लावितां गुण । आकारास विचक्षण । मानतिना ॥ २९॥ जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नाशवंत । सर्वब्रम्ह हे मात । घडे कैंवी ॥३०॥ असो आतां हें बहुत । सर्व ब्रह्म नाशवंत । वेगळेपणास अंत । पाहणें कैंचें ॥ ३१ ॥ आतां जयास चेतवावें । तेंचि मायिक स्वभावें । तेथें चैतन्याच्या नांवें । नाश आला ॥ ३२ ॥ परिवारांविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्वतां । पदार्थांविण साक्षता । तेहि मिथ्या ॥ ३३ ॥ सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये । सगुण ब्रह्म निश्चयें । नाशवंत ॥ ३४ ॥ निर्गुण ऐसें जें नांव । त्या नांवास कैंचा ठाव । गुणेंविण गौरव । येईल कैंचें ॥ ३५ ॥ माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ । कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंचि ॥


१. विनाशी. २. अविनाशी. ३. पंचभूतांचा संबंध.

१६२ श्रीदासबोध. [ दशक ३६ ॥ ग्रामो नास्ति कुतः सीमां । जन्मैविण जीवात्मा । अद्वैतासि उपमा । द्वैताची ॥ ३७ ॥ मायेविरहित सत्ता । पदार्थाविण जाणता । अविद्येविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८ ॥ सत्ता चैतन्यता साक्षी । सर्वहि गुणां- चियेपाशीं । ठायींचे निर्गुण त्यासी । गुण कैंचे ॥ ३९ ॥ ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत । तोचि जाणावा अशाश्वत । निश्चयेंसी ॥ ४० ॥ निर्गुण- ब्रह्मासि संकेतें । नामें ठेविलीं बहुतें । तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१ ॥ आनंदाचा अनुभव । हाहि वृत्तीचाच भाव । तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२ ॥ अनिर्वाच्य याकारणें । संकेतवृत्तीच्या गुणें । तया संकेतास उणें । वृत्तीनें आणिले ॥ ४३ ॥ अनिर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती । निरूपाधी विश्रांती । योगियांची ॥ ४४ ॥ वस्तु जे कां निरूपाधी । तेचि सहजसमाधी । जेणें तुटे आधिब्याधी । भवदुःखाची ॥ ४५ ॥ जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत । सिद्धांत आणि वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६ ॥ असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम । अनु- भवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७ ॥ आपुलेनि अनुभवें । कल्पनेसी मोडावें । मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८ ॥ निर्विकल्पासि कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें । मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९ ॥ कल्पनेचें एक बरें । मोहरितांचें मोहेरें । स्वरूपीं घालितां भरे । निर्विकल्पीं ॥ ५० ॥ निर्विकल्पास कल्पितां । कल्पनेची नुरे वार्ता । निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१ ॥ पदार्थाऐसें ब्रम्ह नव्हे । म्हा तें हातीं धरुनि द्यावें । असो हें अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥ ५२ ॥ पुढें कथेचा अन्वये । केलाचि करूं निश्चये । जेणें अनुभवास ये । केवळ ब्रम्ह ॥ ५३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके चतुर्दशब्रह्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥३॥ ४. विमल ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रम्ह नभाहूनी निर्मळ । पाहतां तैसेंचि पोकळ । १. गांवच नाहीं तर शीव कशाची ? तद्वत् द्वैतच नाहीं, तर अद्वैत म्हणून तरी काय सांगावें ? २. एकरूपतेंत. ३. मनाच्या लयाची. ४. अंतर्बाह्य पीडा. ५. फिरवितांच फिरते. ६. मग. ७. संबंध. ८. आकाशाहून.

७ वा.] विमल ब्रह्म. १६३ अरूप १ आणि विशाल । मर्यादावेगळें ॥ १ ॥ एकवीस स्वर्ग सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्माण्डगोळ । ऐसें अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २ ॥ अनंत ब्रम्हांडाखालतें । अनंत ब्रम्हांडावरतें । तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३ ॥ जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी । तेणेंविण रिता प्राणी । एकहि नाहीं ॥ ४ ॥ जलचरांस जैसें जळ । बाह्य अभ्यंतरीं निखळ । तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रांसी ॥ ५ ॥ जळावेगळा ठाव आहे । ब्रह्मा- बाहेरि जातां न ये । म्हणोनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६ ॥ आका- शाबाहेरि पळों जातां । पुढें आकाशाचि तत्वतां । तैसा तया अनंता । अंतचि नाहीं ॥ ७ ॥ परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगाडिलें । अतिनिकट- पणीं चोरलें । सकळांसि जें ॥ ८ ॥ तयामध्येंचि असिजे । परी तयासि नेणिजे । उमजे भासे नुमजे । परब्रह्म तें ॥ ९ ॥ आकाशामध्यें आभाळ २ । तेणें आकाश वाटे डहुळ । परी तें मिथ्या निवळ । आकाशाचि असे ॥ १० ॥ न्याहाळ ३ देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांशीं । तैसें दृश्य ज्ञानि- यांशीं । मिथ्यारूप ॥ ११ ॥ मिथ्याचि परी आभासे । निद्रितासी स्वप्न जैसें । जागा झालिया आपैसें । बुझों लागे ॥ १२ ॥ तैसें आपुलेनि अनु- भवॆं । ज्ञानें जागृतीस यावें । मग मायिक स्वभावें । कळों लागे ॥ १३ ॥ आतां असो हें कुवाडें ४ । जें ब्रह्मांडा पैलीकडे । तेंचि आतां निवाडें । उमजोनि दावूं ॥ १४ ॥ ब्रह्म ब्रह्मांडों कालवलें । पदार्थमात्रासि व्यापूनि ठेलें । सर्वां- मध्यें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५ ॥ ब्रह्मामध्यें सृष्टि भासे । सृष्टीमध्यें ब्रह्म असे । अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६ ॥ अंशमात्रें सृष्टीभीतरीं । बाहेरि मर्यादा कोण करी । सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । मायील कैसें ॥ १७ ॥ अमृतीं ५ मध्यें आकाश । सगळें सांठवतां प्रयास । म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो ॥ १८ ॥ ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें । सर्वांत परी संचलें । संचलेपणें ॥ १९ ॥ पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंच- भूतातीत । पंकीं ६ आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २० ॥ ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे । परी दृष्टांतीं साहित्य ७ पेंडे ८ । विचारितां आ-

१. रूपरहित. २. परब्रह्मावरील भास, जग. ३. नजर. ४. कोडें. ५. तीर्थ ठेवण्याचें भांडें, त्यांत. ६. चिखलांत. ७. अलंकारशास्त्र. ८. अपुरतें होतें.

१६४ श्रीदासबोध. [ दशक काश ॥ २१ ॥ खंब्रह्म ऐसी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥ कालिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३ ॥ म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन । आढळ परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥ शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा । परंतु ते स्थिरावेना । वायूऐसी ॥ २५ ॥ असो ऐसी माया मायिक । शाश्वत तें ब्रम्ह एक । पाहों जातां अनेक । व्यापून असे ॥ २६ ॥ पृथ्वीसि भेदूनि राहे । परी तें ब्रम्ह कठीण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७ ॥ पृथ्वीहूनि मृदु जळ । जळाहूनि तो अनळ¹ । अनळाहूनि कोमल । वायु जाणावा ॥ २८ ॥ वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण । गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रम्ह जाणावें ॥ २९ ॥ वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें । उपमेरहित संचिलें । कठीण ना मृदु ॥ ३० ॥ पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें न नासे । जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१ ॥ तेजीं असे परी जळेना । पवनें² असे परी चलेना । गगनीं असे परी ढळेना । परब्रम्ह तें ॥ ३२ ॥ शरीरीं अवघें व्यापिलें । परी तें नाहीं आढळलें । जवळींच दुरा- वलें । नवल कैसें ॥ ३३ ॥ सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें राहणें घडे । बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४ ॥ तयामध्येंच आपण । सै- बाह्य³ तें जाण । दृश्यावेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५ ॥ कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंच तें कोंदाटलें । जैसें न दिसे आपुलें । आपणासि धन ॥ ३६ ॥ जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे । अनुभवें हें कुवांडें⁴ । उकलावें ॥ ३७ ॥ मागें पुढें आकाश । पदार्थैविण जो पैस⁵ । पृथ्वीविण भकांस⁶ । एकरूप ॥ ३८ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो नौथि- लाचि⁷ भ्रम । नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९ ॥ नभीं धू- म्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसें दावी वोडंबरें⁸ । माया देवी ॥ ४० ॥ ऐशी माया अशाश्वत । ब्रम्ह जाणावें शाश्वत । सर्वांठायीं सदोदित । भ- रलें असे ॥ ४१ ॥ पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमध्यें९ भरलें आहे । : १. अग्नि. २. वायूमध्यें. ३. आंत बाहेर. ४. कोंडें ५. अवकाश. ६. ओसाड. ७. नसलेला. ८. गारुड. ९ अक्षरांमध्ये.

७ वा. ] द्वैतकल्पनानिरसन. १६५ नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२ ॥ श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहतां । मना सबाह्य तत्वतां । परब्रम्ह तें ॥ ४३ ॥ चरणें चालतां मार्गीं । जें आढळेल सर्वांगीं । करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रम्ह ॥ ४४ ॥ असो इं- द्रियसमुदाय । तयामध्यें वर्तें सर्व । जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥ जें जवळींच असे । पाहों जातां न दिसे । न दिसोन बैसे । कांहीं एक ॥ ४६ ॥ जें अनुभवेंच जाणावें । सृष्टीचेनि अभावें । आपुलेनि स्वानुभवें । पाविजे ब्रम्ह ॥ ४७ ॥ ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे । अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया । ते एक जाणावी तुर्या । सर्वसाक्षणी ॥ ४९ ॥ साक्षित्व वृत्तीचें कारण । उन्मनीं ते निवृत्ती जाण । तेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५० ॥ जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे । विज्ञानवृत्ति मुरे । परब्रम्हीं ॥ ५१ ॥ ऐसें ब्रम्ह शाश्वत । जेथें कल्पनेसि अंत । योगिजनांचा एकांत । अनुभवें जाणावें ॥ ५२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तम- दशके विमलब्रम्हनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. द्वैतकल्पनानिरसन. श्रीगणेशाय नमः ॥ केवळ ब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें । आणि मायेचें लागलें । अनुसंधान ॥ १ ॥ ब्रह्म अंतरीं प्रकाशे । आणि मा- याही प्रत्यक्ष दिसे । आतां हें द्वैत निरसे । कवणेपरी ॥ २ ॥ तरी आतां सावधान । एकाग्र करूनियां मन । माया ब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३ ॥ सत्य ब्रम्हाचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प । ऐशिया द्वैताचा जल्प । मनचि करी ॥ ४ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया । ते एक जाणावी तुर्या । सर्व जाणे म्हणोनियां । सर्वसाक्षिणी ॥ ५ ॥ ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाण- पण । सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६ ॥ संकल्पविकल्पांची सृष्टी । झाली मनाचिये पोटीं । तें मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवण ॥ ७ ॥ साक्षित्व चतन्य सत्ता । हे गुण ब्रम्हाचिया माथां । आरोपिले जाण वृथा । मायागुणें १. दिसत नाहीं पण आहे. २. डोळ्यानें. ३. मनाच्या लयाची अवस्था. ४. तर्क. ५. सविकल्प समाधि.

१६६ श्रीदासबोध. [ दशक

॥ ८ ॥ घटमठाचेनि गुणें । त्रिविध¹ आकाश हें बोलणें । मायेचेनि खरेपणें । गुण ब्रम्हीं ॥ ९ ॥ जंव खरेपण मायेसी । तंवचि साक्षित्व ब्रम्हासी । माया- अविद्येचे निरासीं² । द्वैत कैंचें ॥ १० ॥ म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि झा- लिया उन्मन³ । मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ॥ ११ ॥ जयास द्वैत भासलें । तें मन उन्मन झालें । द्वैताद्वैताचें तुटलें । अनुसंधान ॥१२॥ एवं द्वैत आणि अद्वैत । होय वृत्तीचा संकेत । वृत्ति झालिया निवृत्त । द्वैत कैंचें ॥ १३ ॥ वृत्तिरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान । जेथें तुटे अनुसं- धान । मायाब्रम्हाचें ॥ १४ ॥ मायाब्रम्ह ऐसा हेत । मनें कल्पिला संकेत । ब्रम्ह कल्पनेरहित । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥ जें मनबुद्धि अगोचर । जें क- ल्पनेहूनि पर । तें अनुभवितों साचार । द्वैत कैंचें ॥ १६ ॥ द्वैत पाहतां ब्रम्ह नसे । ब्रम्ह पहातां द्वैत नासे । द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी ॥१७॥ क- ल्पना माया निवारी । कल्पना ब्रम्ह थाव⁴री । संशय धरी आणि वारी । तेहि कल्पना ॥ १८ ॥ कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान । ब्रम्हीं लावी अनुसंधान । तेहि कल्पना ॥ १९ ॥ कल्पना द्वैताची माता । कल्पना ज्ञा⁵सि तत्वता । बद्धता आणि मुक्तता । कल्पनागुणें ॥ २० ॥ कल्पना अं- तरीं सबळ । नसते दावी ब्रह्मगोळ । क्षणएकांत निर्मळ । स्वरूप कल्पी ॥ २१ ॥ क्षणएक धोका वाहे । क्षणएक स्थिर राहे । क्षणएक पाहे । वि- क्षित होउनी ॥ २२ ॥ क्षणएकांत उमजे । क्षणएक निर्बु⁶जे । नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३ ॥ कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचें फळ । कल्पना तेचि केवळ । मोक्षदात्री ॥ २४ ॥ असो ऐसी हे कल्पना । साधनें दे समाधाना । येन्हवीं हे पतना⁷ । मूळंचि कीं ॥ २५ ॥ म्हणोनि सर्वांचें मूळ । ते हे कल्पनाचि केवळ । इचें केलिया निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६ ॥ श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान । मिथ्या कल्पनेचें भान । उडोनि जाय ॥ २७ ॥ शुद्धब्रह्माचा निश्चय । करी कल्प- नेचा जय । निश्चिताथें संशय । तुटोनि जाय ॥२८॥ मिथ्या कल्पनेचें कोडें ।

१. घटानें मर्यादित, मठानें मर्यादित, व अमर्याद असें त्रिविध. २. निरसन झाल्यावर. ३. संकल्पविकल्परहित. ४. स्थापित करी. ५. ज्ञान. ६. समजत नाहींसें होतें. ७. नाशास कारण.

७ वा.] बद्धमुक्त. १६७ कैसें राहे साचापुढें । जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९ ॥ तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे । मग हें तुटे आपसें । द्वैतानु- संधान ॥ ३० ॥ कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें शर आंतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१ ॥ शुद्ध कल्पनेचें बळ । झालिया नासे सबळें । हेंचि वचन प्रांजळ । सावध ऐका ॥ ३२ ॥ शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण । स्वस्वरूपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३ ॥ सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचें निरसन । अद्वैत निश्चयाचें ज्ञान । तेंचि शुद्ध कल्पना ॥ ३४ ॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अ- शुद्ध तेचि प्रसिद्ध । सबळ जाणावी ॥ ३५ ॥ शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वै- ताचा निश्चितार्थ । आणि सबळ ते व्यर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६ ॥ अद्वैत क- ल्पना प्रकाशे । तेच क्षणीं द्वैत नासे । द्वैतासरसी निरसे । सबळ कल्पना ॥ ३७ ॥ कल्पनेनें कल्पना सरे । ऐसें जाणावें चतुरें । सबळ गेलियानंतरें । शुद्ध उरली ॥ ३८ ॥ शुद्ध कल्पनेचें रूप । तेंचि कल्पी स्वरूप । कल्पितां तद्रूप । होय आपण ॥ ३९ ॥ कल्पनेस मिथ्यात्व आलें । सहजचि तद्रूप झालें । आत्मनिश्चयें नाशिलें । कल्पनेसी ॥ ४० ॥ जेचि क्षणीं निश्चय चले । तेचि क्षणीं द्वैत उँफाळे । जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१ ॥ तैसें ज्ञान होतां मलिन । अज्ञान प्रबळे जाण । याकारणें श्रवण । अखंड असावें ॥ ४२ ॥ आतां असो हें बोलणें झालें । आशंका फेहूँ एका बोलें । जयास अद्वैत भासलें । तें तूं नव्हेंसी सर्वथॉ ॥ ४३ ॥ मार्गील आशंका फिटली । इतुकेन हे कथा संपली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके द्वैतकल्पनानिरसननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. बद्धमुक्त. श्रीगणेशाय नमः ॥ अद्वैत ब्रह्म निरूपिलें । जें कल्पनारहित संचलें । क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १ ॥ परी म्यां तदाकार व्हावें । १. जगताचा भास. २. तुटून पडता. ३. शबल, औपाधिक. ४. उसळतें. ५. कल्पनेला अद्वैत भासतें, ती कल्पना कांहीं स्वरूप नव्हें.

१६८ श्रीदासबोध. [ दशक ब्रम्हचि होऊन असावें । पुनः संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २ ॥ कल्पनेरहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख । म्हणोनि तेंचिएक । होऊन असावें ॥ ३ ॥ बम्हचि होईजे श्रवणें । पुन्हा वृत्तीवरी लागे येणें । ऐसें सदा येणें । चुकेना कीं ॥ ४ ॥ मनें अंतरीं जावें । क्षणएक ब्रम्हचि व्हावें । पुन्हा तेथून कोसळावें । वृत्तींवरी¹ मागुती ॥ ५ ॥ ²ऐत्यावृत्ति सैरावैरा । किती करूं येरझारा । पायीं लावूनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६ ॥ उपदेश- काळीं तदाकार । होतां पडे हें शरीर । अथवा नेणे आपपर । ऐसें झालें पाहिजे ॥ ७ ॥ ऐसें नसतां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें । ब्रम्ह हो- ऊन संसार करणें । हेंहि विपरीत दिसे ॥ ८ ॥ जो स्वयें ब्रम्हचि झाला । तो मागुता कैसा आला । ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वाटे ॥ ९ ॥ ब्रम्ह होऊन जावें । कां ते संसारींच असावें । दोहींकडे भरंगळावें । किती म्हणोनी ॥ १० ॥ निरूपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे । मागुता कामक्रोध खवळे । ब्रम्हरूपासैं³ ॥ ११ ॥ ऐसा कैसा ब्रम्ह झाला । दोहींकडे अंतरला । वोडगस्तपणींच गेला । संसार त्याचा ॥ १२ ॥ घेतां ब्रम्हसुखाची गोडी । संसारिक मागें वोढी । संसार करितां आवडी । ब्रम्हीं उपजे ॥ १३ ॥ ब्रम्हसुख नेलें संसारें । संसार नेला ज्ञानद्वारें । दोन्ही अपुरीं पुरें । एकहि नाहीं ॥ १४ ॥ याकारणें माझें चित्त । चंचळ झालें दुश्चित । याकारणें निश्चितार्थ । एकहि नाहीं ॥ १५ ॥ ऐसा श्रोता करी विनंती । आतां राहावें कोणे रीती । म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६ ॥ आतां याचें प्रत्युत्तर । वक्ता देईल सुंदर । श्रोतीं व्हावें निरुत्तर । क्षणएक आतां ॥ १७ ॥ ब्रह्मचि होऊन जे पडिले । तेचि मुक्तिपदास गेले । येर ते काय बुडाले । व्यासादिक ॥ १८ ॥ श्रोता विनंती करी पुढती । शुको मुक्तो वामदेवो वा⁴ हे श्रुती । दोघेचि मुक्त आदि अंतीं । बोलत असे ॥ १९ ॥ वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव । वेदवचनीं अभावैं५ । कैसा धरा- वा ॥ २० ॥ ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्युत्तरें । दोघेचि मुक्त अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१ ॥ वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृ- १. देहभानावर. २. पुन्हा पुन्हा. ३. ब्रम्हरूप झालेल्या मला. ४. 'शुक मुक्त किंवा वामदेव मुक्त.' ५. अविश्वास.

७ वा.] बद्धमुक्त. १६९ ष्टीवरी । ऐसें बोलतां उरी १ । कोणास आहे ॥ २२ ॥ बहु ऋषी बहु मुनी । सिद्ध योगी आत्मज्ञानी । झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३ ॥ श्लोक ॥ प्रह्लादनारदपराशरपुंडरीकव्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ॥ रुक्मांगदार्जुनवसिष्ठबिभीषणादीन्पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १ ॥ कविर्हरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ॥ आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभा- जनः ॥ २ ॥ यांहीं वेगळे थोर थोर । ब्रम्हा विष्णु महेश्वर । आदिकरून दिगंबर २ । विदेहादिकें ३ ॥ २४ ॥ शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच बुडाले । या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५ ॥ तरी वेद कैसा बो- लिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला । ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर ॥ २६ ॥ वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष । साधु आणि व्युत्पन्न दक्ष । त्यास हें न माने ॥ २७ ॥ तथापि हें जरी मानलें । तरी वेदसामर्थ्य बुडालें । वेदाचोनि उद्धारिलें । न वचे कोणा ॥ २८ ॥ वेदांअंगीं सामर्थ्य नसे । जरी या वेदासि कोण पुसे । म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे । जन उद्धरावया ॥ २९ ॥ वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी । म्हणोनि वेदीं सामर्थ्यांसी । काय उणें ॥ ३० ॥ वेद शास्त्र पुराण । भाग्यें झालिया श्रवण । तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१ ॥ श्लोक अ- थवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपादें ४ । श्रवण होतां एक शब्द । नाना दोष जाती ॥ ३२ ॥ वेदशास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या अर्थीं ५ । अगाध म- हिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३ ॥ एकाक्षर होतां श्रवण । तात्काळां चि होइजे पावन । ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४ ॥ दोहीं- वेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे । असें हें जाणिजे चतुरें । येर- गाथागोवी ॥ ३५ ॥ वेदशास्त्रें पुराणें । कैसीं होती अप्रमाणें । दोघांवांचूनि तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६ ॥ म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक मुक्त झाला । शुक तोहि अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७ ॥ शुक मुक्त ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण । परी तो नव्हता अचेतन ६ । ब्रम्हाकार ॥ ३८ ॥ अचेतन ब्रम्हाकार । असता शुक योगीश्वर । तरी सारासार विचार ।


१. बाकी कोण उरलें ? मुक्त कोणीच नाहीं असें झालें. २. संन्यासी. ३. जन- कादिक. ४. श्लोकाचा एक चरण. ५. ठिकाणीं ६. जड, सुस्त.

१७० श्रीदासबोध. [ दशक बोलणें न घडे ॥ ३९॥ जो ब्रम्हाकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला । शुक भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४० ॥ निरुपण हें सारासार । बोलिला पाहिजे विचार । धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१ ॥ क्षणएक ब्रम्ह- चि व्हावें । क्षणएक दृश्य धांडोळावें । नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वांसी ॥ ४२ ॥ असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण । तया अंगीं बद्धपण । लावूं नये कीं ॥ ४३ ॥ म्हणोनि बोलतां चालतां । निश्चेष्टित पडिलें नसतां । मुक्ति लाभे सायुज्यता । सद्गुरुबोधें ॥ ४४ ॥ एक मुक्त एक नित्यमुक्त । एक जाणावे जीवन्मुक्त । एक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५ ॥ सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेह²मुक्त । दोहीं वेगळे नित्यमुक्त । योगीश्वर जाणावे ॥ ४६ ॥ स्वरूपबोधें स्तब्ध³ता । ते जाणावी तटस्थता । तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७ ॥ येथें अनुभवासीच कारण । येर सर्व निष्कारण । तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८ ॥ कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला । तेणें शब्दें जाजावला । हें तों घडेना ॥ ४९ ॥ स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह । बद्ध मुक्त ऐसा भाव । देहाचकडे ॥ ५० ॥ देहबुद्धी धरून चित्तीं । मुक्त ब्रम्हादिक नव्हती । तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१ ॥ मुक्तपणें येणेंचि बद्ध । मुक्त बद्ध ह अबद्ध⁴ । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२ ॥ मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा । देहबुद्धीची अर्गळा⁵ । स्वरूपीं न संटे⁶ ॥ ५३ ॥ मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला । मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४ ॥ जयास बांधावें तें वावें । तेथें कैंचा मुक्तभाव । पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५ ॥ श्लोक ॥ बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ॥ गुणस्य मायामूल- त्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १ ॥ टीका ॥ तत्वज्ञाता परम शुद्ध । तया- सि नाहीं मुक्त बद्ध । मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६ ॥ जेथें नाम- रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे । मुक्तबद्ध हें विसरे । विसरपणेंसीं १. देहभानावर असणारे; व्यवहार करणारे. २. देहभानरहित, समाधिनिमग्न. ३. इंद्रियगति थांबणें. ४. गैरशिस्त. ५. अडथळा. ६. टिकत नाहीं. ७. भ्रामक. ८. त्रिगुणांचा विचार.

७ वा. ] साधनप्रतिष्ठा. १७१ ॥ ५७ ॥ बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न । बाधक जाणावें मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८ ॥ एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम । मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९ ॥ असो बद्धता आणि मुक्तता । आली कल्पनेच्या माथां । ते कल्पना तरी तत्वतां । साच १ आहे ॥ ६० ॥ म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ । स्वप्न मिथ्या तात्काळ । जागृतीस होय ॥ ६१ ॥ स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं आला । कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२ ॥ म्हणोन मुक्त विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान । शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३ ॥ बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह । साधु सदा निःसंदेह । देहा- तीत वस्तु ॥ ६४ ॥ आतां असो हें पुढती । पुढें कळावें कोणे रीतीं । तेंचि निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. साधनप्रतिष्ठा. श्रीगणेशाय नमः ॥ वस्तूसि जरी कल्पावें । तरी तें निर्विकल्प स्वभा- वें । तेथें कल्पनेच्या नांवें । शून्याकार ॥ १ ॥ तथापि कल्पूं जातां । न ये कल्पनेच्या हातां । वोळखी ठावीं २ नै पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २ ॥ कांहीं दृष्टिस न दिसे । मनास तेंहि न भासे । न भासे न दिसे कैसें । वोळखावें ॥ ३ ॥ पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार । कल्पूं जातां अं- धकार । भरला वाटे ॥ ४ ॥ कल्पूं जातां वाटे काळें । परी तें काळें ना पिवळें । आरक्त निळें ना ढवळें ३ । वर्णरहित ॥ ५ ॥ जयास वर्ण व्यक्ती ४ नसे । आसाहूनि अनारीसें । रूपचि नाहीं कैसें । वोळखावें ॥ ६ ॥ न दि- सतां वोळखण । किती धरावी आपण । हें तों श्रमासीच कारण । होत असे ॥ ७ ॥ जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त ५ । जो अचिंत्य चिं- तनातीत । परमपुरुष ॥ ८ ॥ श्लोक ॥ अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गु- णात्मने । समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १ ॥ अचिंत्य तें चिंतावें । अव्यक्तास आठवावें । निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९ ॥ जें दृष्टिसचि १. खरी आहे? नाहीं. २. सांपडत नाहीं. ३. पांढरें. ४. आकार. ५. गुप्त.

१७२ श्रीदासबोध. [ दशक न पडे । जें मनासहि नातुं१डे । तया कैसें पाहणें घडे । निर्गुणासी ॥ १० असंगाचा संग धरणें । निरा२लंबिं वास करणें । निःशब्दासि अनुवादणें । कोणे परी ॥ ११ ॥ अचिंत्यासि चिंतूं जातां । निर्विकल्पासि कल्पितां । अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२ ॥ आतां ध्यानचि सांडावें । अनुसंधान मोडावें । तरी मागुतें पडावें । महासंशयीं ॥ १३ ॥ द्वैताच्या भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी । तेणें समाधाना डै३री । कदा असेचि ना ॥ १४ ॥ सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे । नित्या- नित्य विचारें घडे । समाधान ॥ १५ ॥ वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी करितां कांहीं नुमजे । शून्यत्वें संदेहीं पडिजे । विवेकेंविण ॥ १६ ॥ ह्म- णोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सांडावा । अहंभाव वोसरावा । परी तो वोसरेना ॥ १७ ॥ परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत । तेथें हेतु आणि दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८ ॥ तें आठवितां विसरिजे । कां तें विसरोन आठविजे । जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९ ॥ त्यास न भे- टतां होय भेटी । भेटों जातां पडे तुटी । ऐशी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २० ॥ तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना । लागला सं- बंध तुटेना । निरंतर ॥ २१ ॥ तें असतचि सदा असे । नातरी पाहतां दु- ४रावे । न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२ ॥ जेथें अपाय तोचि उपाय । आणि उपाय तोचि अपाय । हें अनुभवेंविण काय । उमजों जाणे ॥ २३ ॥ तें नुमजतांचि उमजे । उमजोन कांहींच नुमजे । तें वृत्तीविण पाविजे । नि- वृत्तिपद ॥ २४ ॥ तें ध्यानीं धरितां न ये । चिंतनीं चिंतावें तें काय । म- नामध्यें न ५समाये । परब्रह्म तें ॥ २५ ॥ त्यास उपमे द्यावें जळ । तरी तें नि- र्मळ निश्चळ । विश्व बुडालें सकळ । परी तें कोरडेंच असे ॥ २६ ॥ नव्हे प्र- काशासारिखें । अथवा नव्हे काळोखें । आतां तें कासयासारिखें । सांगावें हो ॥ २७ ॥ ऐसें ब्रह्म निरं६जन । कदा नव्हे दृश्य७मान । लावावें तें अनुसं- धान । कोणे परी ॥ २८ ॥ अनुसंधान लावूं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां । तेथे मनाचिये माथां । संदेह वाजे ॥ २९ ॥ लटिकेंचि काय पाहावें । कोठें


१. न कळे. २. अधांतरीं. ३. ठावठिकाण. ४. दुरावतें. ५. मावत नाहीं. ६. उपाधिरहित. ७. पाहण्याजोगें.

जाऊन राहावें । अभाव घेतला जीवें । सत्यस्वरूपाचा ॥ ३० ॥ अभावाचे म्हणों सत्य । तरी वेदशास्त्र कैसें मिथ्य । आणि व्यासादिकांचें कृत्य १ । वाउगें नव्हे ॥ ३१ ॥ ह्मणोनि मिथ्या म्हणतां न ये । बहुत ज्ञानाचे उ- पाय । बहुतीं निर्मिलें तें काय । मिथ्या ह्मणावें ॥ ३२ ॥ अद्वैत ज्ञानाचा उपदेश । गुरुगीता तो महेश । सांगता होय पार्वतीस । महाज्ञान ॥ ३३ ॥ अवधूतें गीता केली । गोरक्षास निरूपिली । ते अवधूतगीता बोलिली । ज्ञा- नमार्गें ॥ ३४ ॥ विष्णु होऊन राजहंस । विधीस २ केला उपदेश । ते हंस- गीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५ ॥ ब्रम्हा नारदातें उपदेशित । चतुःश्लोकी भागवत । पुढें व्यासमुखें बहुत । विस्तारलें ॥ ३६ ॥ वासि- ष्ठसार वसिष्ठ ऋषी । सांगता झाला रघुनाथासी । कृष्ण सांगे अर्जुनासी । सप्तश्लोकी ३ गीता ॥ ३७ ॥ ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषि बोलिले ब- हुतीं । अद्वैतज्ञान आदि अंतीं । सत्यचि असे ॥ ३८ ॥ म्हणोन मिथ्या आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन । प्रज्ञारहित जे जन । तयांस हें कळेना ॥ ३९ ॥ जेथें शेषाची प्रज्ञा ४ मंदली । श्रुतीस मौनमुद्रा पडिली । जाणपणें न वचे वदली । स्वरूपस्थिति ॥ ४० ॥ आपणास नुमजे बरवें । ह्मणोनि मि- थ्या कैसें करावें । नातरी सुदृढ धरावें । सद्गुरुमुखें ॥ ४१ ॥ मिथ्या तेंचि सत्य झालें । सत्य असोनि मिथ्या केलें । संदेहसागरीं बुडालें । अकस्मात मन ॥ ४२ ॥ मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे । तेणें गुणें संदेह धांवे । मीपणाचेनि पंथें ॥ ४३ ॥ तरी तो पंथचि मोडावा । मग पर- मात्मा जोडावा । समूळ संदेह तोडावा । साधूचेनि संगतीं ॥ ४४ ॥ मीपण शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना । मीपण सोडितां सुटेना । कांहीं केल्या ॥ ४५ ॥ मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे । मीपणें शक्ति गळे । वैराग्याची ॥ ४६ ॥ मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे । मीपणें सकळहि उडे । यश कीर्ती प्रताप ॥ ४७ ॥ मीपणें मैत्री तुटे । मीपणें प्रीति आटे । मीपणें लिगटे । अभिमान आंगीं ॥ ४८ ॥ मीपणें विकल्प उठे । मीपणें कलह सुटे । मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९ ॥ मीपण कोणासीच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे । म्हणून


१. ग्रंथरूप कृति. २. ब्रम्हदेवास. ३. सप्तशतश्लोकी, सातशें श्लोकांची. ४. बुद्धि.

१७४ श्रीदासबोध. [ दशक मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५० ॥ मीपण कैसें त्यागावें । ब्रम्ह कैसें अनुभवावें । समाधान कैसें पावावें । कोणत्या प्रकारें ॥ ५१ ॥ मीपण जाणोन त्यागावें । ब्रम्ह होऊन अनुभवावें । समाधान तें पावावें । निः- संगपणें ॥ ५२ ॥ आणिक एक समाधान । मीपणेंविण साधन । करूं जाणे तोचि धन्य । समाधानी ॥ ५३ ॥ मी ब्रम्हचि झालों स्वतां । साधन कोण करील आतां । ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४ ॥ ब्रम्हीं कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे । तयेसि शोधूनि पाहे । तोचि साधु ॥ ५५ ॥ निर्विकल्पासि कल्पावें । परी कल्पिलें तें आपण न व्हावें । मीप- णास त्यागावें । येणें रीती ॥ ५६ ॥ ब्रम्हविद्येच्या लपनीं¹ । कांहींच न व्हावें असोनी । दक्ष आणि समाधानी । तोचि हें जाणे ॥ ५७ ॥ जयास आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें । येथें कल्पनेच्या नांवें । शून्य आलें ॥ ५८ ॥ पैदींहून² चलों नये । करावें साधन उपाय । तरीच सांपडे सोय । अलिप्तपणाची ॥ ५९ ॥ राजा राज्यपदीं असतां । उगीच चाले सर्वसत्ता । साध्यचि होऊन तत्वतां । साधन करावें ॥ ६० ॥ साधन आलें देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा । ऐसा करून अकर्ता । सहजचि आहे ॥ ६१ ॥ देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें । देहातीत असतां स्वभावें । देह कैंचा ॥ ६२ ॥ ना तें साधन ना तें देह । आपण आपला निःसंदेह । देहींच असोन विदेह³-। स्थिती ऐसी ॥ ६३ ॥ साधनेंविण ब्रम्ह होतां । लागों पाहे देहममता । आळस प्रबळे तत्वतां । ब्रम्हज्ञानमिसें ॥ ६४ ॥ परमार्थमिसें आळस जागे । ध्यानमिसें निद्रा लागे । मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता⁵ ॥ ६५ ॥ निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद पडे । उपाधिमिसें येऊन जडे । अभिमान अंगीं ॥ ६६ ॥ तैसा ब्रम्हज्ञान- मिसें । आळस अंतरीं प्रवेशे । म्हणे साधनाचें पिसें । काय करावें ॥ ६७ ॥ श्लोक ॥ किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् । आत्मना पूरितं सर्वं महाकल्पांबुना यथा ॥ १ ॥ वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिर- विलें । स्वतां हाणोनि घेतलें । जयापरी ॥ ६८ ॥ तैसा उपायाचा अपाय । विपरीतपणें स्वहित जाय । साधन सोडितां होय । मुक्तपणें बद्ध ॥ ६९ ॥ १. पोटांत. २. स्वरूपांतून. ३. देहसंबंधी अलिप्तपणा. ४. लागतो. ५. स्वैरपणा.

७ वा. ] श्रवण. १७५ साधन करितां सिद्धपण । हातींचें जाईल निघोन । तेणें गुणें साधन । करूंच नावडे ॥ ७० ॥ लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे एक । साधन करिती ब्रम्हादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१ ॥ आतां असो हे अवि- द्या । अभ्याससारिणी विद्या । अभ्यासें पाविजे आद्या । पूर्ण ब्रम्हा ॥ ७२ ॥ अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । परमार्थाचें साधन । बोलिलें पाहिजे ॥ ७३ ॥ याचें उत्तर श्रोत्यांसी । दीधलें पुढिलिये समासीं । निरूपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे सप्तमदशके साधनप्रतिष्ठानिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. श्रवण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥ १ ॥ श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें उद्भवे विरक्ती । श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २ ॥ श्रवणें घडे चित्त- शुद्धी । श्रवणें होय दृढबुद्धी । श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३ ॥ श्रवणें निश्चय घडे । श्रवणें ममता मोडे । श्रवणें अंतरीं जडे । समाधान ॥ ४ ॥ श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशय तुटे । श्रवण होतां पालटे । पूर्व- गुण आपुला ॥ ५ ॥ श्रवणें आवरे मन । श्रवणें घडे समाधान । श्रवणें तुटे बंधन । देहबुद्धीचें ॥ ६ ॥ श्रवणें मीपण जाय । श्रवणें धोका न ये । श्रवणें नाना अपाय । भस्म होती ॥ ७ ॥ श्रवणें होय कार्यसिद्धी । श्रवणें लागे समाधी । श्रवणें घडे सर्वसिद्धी । समाधानाची ॥ ८ ॥ सत्संगावरी श्रवण । तेणें कळे निरूपण । श्रवणें होईजे आपण । तदाकार ॥ ९ ॥ श्रवणें प्रबोधें वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे । श्रवणें विषयांचे वोढे । तुटोनि जाती ॥ १० ॥ श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळे । श्रवणें वस्तु निवळे । साध- कासी ॥ ११ ॥ श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे । श्रवणें मन हें माँगे । भगवंतासी ॥ १२ ॥ श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम वोहटे । श्रवणें धोका आटे । एकसरां ॥ १३ ॥ श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे । श्र- वणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४ ॥ श्रवणें होय उत्तम गती । श्रवणें १. अभ्यासानें लाभणारी. २. निश्चय. ३. विवेक. ४. बुद्धि. ५. इच्छितें.

१७६ श्रीदासबोध. [ दशक आतुडे शांति । श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळ पद ॥ १५ ॥ श्रवणाऐसें सार नाहीं । श्रवणें घडें सर्व कांहीं । भवनदीच्या प्रवाहीँ । तरणोपाय श्र- वणें ॥ १६ ॥ श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वां सर्वारंभ । श्रवणें होय स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७ ॥ प्रवृत्ती अथवा निवृत्ती । श्रवणेंविण न घडे प्राप्ती । हे तों सकळांस प्रचीती । प्रत्यक्ष आहे ॥ १८ ॥ ऐकिल्याविण कळे- ना । हैं ठाउकें आहे जना । या कारणें मूळ प्रयत्ना । श्रवण आधीं ॥ १९ ॥ जें जन्मीं ऐकिलेंचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं । म्हणोनिया दुजें कांहीं । साम्यता न घडे ॥ २० ॥ बहुत साधनें पाहतां । श्रवणास न घडे साम्यता । श्रवणेंविण तत्वतां । कार्य न चले ॥ २१ ॥ न देखतां दिनकर । पडे अव- घा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होय ॥ २२ ॥ कैसी नवविधा भक्ती । कैसी चतुर्विधा मुक्ती । कैसी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न कळे ॥ २३ ॥ न कळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण । न कळे कैसें उपासन । विधियुक्त ॥ २४ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना साधनें । नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५ ॥ नाना वि- द्या पिंडज्ञान । नाना तत्त्वांचें शोधन । नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥ २६ ॥ अठराभार वनस्पती । एक्या जळें प्रबळती । एक्या जळें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७ ॥ सकळ जीवां एक पृथ्वी । सकळ जीवां एक रवी । सकळ जीवां वर्तवी । एक वायु ॥ २८ ॥ सकळ जीवां एक पैस । जयास बोलिजे आकाश । सकळ जीवांचा वास । एक परब्रह्मीं॥२९॥ तैसें सकळ जीवांस मिळोन । सारें एकचि साधन । तें हें जाण श्रवण । प्राणिमात्रांसी ॥ ३० ॥ नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । स- वांस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥ ३१ ॥ श्रवणें घडे उपेरती । बद्धाचे मुमुक्षु होती । मुमुक्षूचे साधक अंतीं । नेमंसि चालती ॥ ३२ ॥ साधकां- चे होती सिद्ध । अंगीं बाणतां प्रबोधें । हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३ ॥ ठायींचे खळ चांडाल । तेचि होती पुण्यशील । ऐसा हा १. प्राप्त होते. २. अंतर्मुख होणें. ३. संसार. ४. परमार्थ. ५. अध्ययन, अ- ध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह, यांचें आचरण. ६. मंत्राचा विधिपूर्वक जप. ७. सर्व प्रकारच्या. ८. श्रेष्ठ. ९. वैराग्य. १०. विवेक.

७ वा. ] श्रवण. १७७ गुण तात्काळ । श्रवणाचा ॥ ३४ ॥ जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होय पु- ण्यात्मा । अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५ ॥ तीर्थ- व्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती । तैसें नव्हे हातींच्या हातीं । सप्र- चीत श्रवणें ॥ ३६ ॥ नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधीं । तैसी आहे श्रवणसिद्धि । अनुभवी जाणती ॥ ३७ ॥ श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रबळे । मुख्य परमात्मा आकळे । स्वानुभवासी ॥ ३८ ॥ या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान । निदिध्यासें समा- धान । होत असे ॥ ३९ ॥ बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान नि- वळे । अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेह ॥ ४० ॥ संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणें होय निर्मूळ । पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१ ॥ जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचें समाधान । मुक्तपणाचें बंधन । जडलें पायीं ॥ ४२ ॥ मुमुक्षु साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो बद्ध । श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होय ॥ ४३ ॥ जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विल- क्षण । तेथें साधकें एक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४ ॥ जेथें नाहीं श्रवण- स्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ । मागें केलें तितुकें व्यर्थ । श्रवणेंविण होय ॥ ४५ ॥ तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें । नित्यनेमें तरावें । संसारसागरीं ॥ ४६ ॥ सेविलेंच सेवावें अन्न । घेतलेंच घ्यावें जीवन । तैसें श्रवणमनन । केलेंच करावें ॥ ४७ ॥ श्रवणाचा अनादर । आळसें करी जो नर । त्याचा होय अपहार । स्वहिताविषयीं ॥ ४८ ॥ आळसाचें संरक्षण । परमार्थाची बुडवण । या कारणें नित्य श्रवण । केलेंचि पाहिजे ॥ ४९ ॥ आतां श्रवण कैसें करावें । कोणत्या पंथास पावावें । पुढीलिये स- मासीं आघवें । सांगिजेल ॥ ५० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स- प्तमदशके श्रवणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. श्रवण. श्रीगणेशाय नमः ॥ आतां श्रवण कैसें करावें । तेंहि सांगिजेल स्वभावें । श्रोतीं अवधान द्यावें । एकचित्तें ॥ १ ॥ एक वक्तृत्व श्रवणीं पडे । तेणें झालें समाधान मोडे । केला निश्चय विघडे । अकस्मात ॥ २ ॥ तें वक्तृ-

स्व त्यागावें । जें मायिक स्वभावें । जेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३ ॥ एक्या ग्रंथें निश्चय केला । तो दुजयानें उडविला । तेणें संशयाचि वाढला । जन्मवरी ॥ ४ ॥ जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती । अद्वैतग्रंथ प- रमार्थीं । श्रवण करावे ॥ ५ ॥ जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ धरी । प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६ ॥ जेणें सांडिला इहलोक । जो परलोकींचा साधक । तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७ ॥ जयास पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत । तेणें क्षोभलें उठे चित्त । श्रोत्यांचें ॥ ८ ॥ आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे । नाहीं तरी कंटाळे । मानस ऐकतां ॥ ९ ॥ ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी । तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १० ॥ प्रीतींचें लक्षण ऐसें । अंतरीं उठे अनायासें । पाणी पाणवाटे जैसें । आपणचि धांवे ॥ ११ ॥ तैसा जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर । तेथें पाहिजे सारासार । विचा- रणा ते ॥ १२ ॥ जेथें कुलदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती । इतर देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३ ॥ घेतां अनंताच्या व्रता । तेथें नलगे भगवद्गीता । साधुजनांसि वार्त्ता । फळाशेची नाहीं ॥ १४ ॥ वीर- कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । जेथील तेथें आणिकीं । कामा न ये सर्वथा ॥ १५ ॥ नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य झालीं । विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६ ॥ मल्हारि- माहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी । काशीमाहात्म्य व्यंक- टेशीं । शोभा न पावे ॥ १७ ॥ ऐसें सांगतां असे वाढ । परी जेथील तेथेंच गोड । तैशी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८ ॥ योगियापुढें राहाणे । परीक्षावंतापुढें पाषाण । पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९ ॥ वेदज्ञापुढें जंती । निस्पृहापुढें फलश्रुती । ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राची ॥ २० ॥ ब्रह्मचाऱ्यापुढें नाचैंणी । रासक्रीडा निरूपणीं । राजहंसापुढें पाणी । ठेविलें जैसें ॥ २१ ॥ तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारिक टिपडें । तेणें त्याचें कैसें घडे । समाधान ॥ २२ ॥ रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा । १. जादूटोणा. २. जैनांचा स्वामी. ३. कामशास्त्राची. ४. नायकीण. ५. ब्रह्म- निष्ठापुढें. ६. अमृताला.