दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१० वा. ] अंतःकरण. २४१ दशक दहावा. १. अंतःकरण. श्रीगणेशाय नमः ॥ सकळांचें अंतःकरण एक। किंवा एक नव्हे अनेक । ऐसें हें निश्चयात्मक । मज निरूपावें ॥ १ ॥ ऐसें श्रोत्यानें पुसिलें । अं- तःकरण एक कीं वेगळें । याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥ सम- स्तांचें अंतःकरण एक । निश्चय जाणावा नेमक । हा प्रत्ययाचा विवेक । तुज निरूपिला ॥ ३ ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । अंतःकरण एक समस्तांसी । तरी मिळेना एकएकासी । काय निमित्त ॥ ४ ॥ एक जेवितां अवघे धाले । एक निवतां अवघे निवाले । एक मरतां अवघे मेले । पाहिजेत कीं ॥ ५ ॥ एक सुखी एक दुःखी । ऐसें वर्ततें लौकिकीं । एक अंतःकरणाची वोळखी । कैसी जाणावी ॥ ६ ॥ जनीं वेगळाली भावना । कोणास कोणीच मिळेना । म्हणोन हें अनुमाना । येत नाहीं ॥ ७ ॥ अंतःकरण एक असतें । तरी ए- काचें एकास कळों येतें । कांहीं चोरितांच न येतें । गौप्य गुह्य ॥ ८ ॥ या- कारणें अनुमानेना । अंतःकरण एक हें घडेना । विरोध लागला जना । काय निमित्त ॥९॥ सर्प डसाया येतो । प्राणी भिऊन पळतो । एक अंतःक- रण तरी तो । विरोध नसावा ॥ १० ॥ ऐसी श्रोत्यांची आशंका । वक्ता म्हणे चळों नका । सावध होऊन ऐका । निरूपण ॥ ११ ॥ अंतःकरण म्ह- णिजे जाणीव । जाणीव जाणता स्वभाव । देहरक्षणाचा उपाव । जाणती कळा ॥ १२ ॥ सर्प जाणोनि दंखूं आला । प्राणी जाणोनि पळाला । दोहींकडे जा- णिवेला । बरें पाहा ॥ १३ ॥ दोहींकडे जाणिवेसि पाहिलें । तरी अंतः- करण एकचि जाहलें । विचारितां प्रत्यया आलें । जाणीवरूपें ॥ १४ ॥ जाणीवरूपें अंतःकरण । सकळांचें एक हें प्रमाण । जीवमात्रास जाणपण । एकचि असे ॥ १५ ॥ एक दृष्टीचें देखणें । एक जिव्हेचें चाखणें । ऐकणें स्पर्शणें वास घेणें । सर्वत्रांस एक ॥ १६ ॥ पशु पक्षी किडा मुंगी । जीव- मात्र निर्माण जगीं । जाणीवकळा सर्वांलागीं । एकचि आहे ॥ १७ ॥ सर्वांस जळ तें शीतल । सर्वांस अग्नि तेजाळ । सर्वांस अंतःकरण केवळ । जाण-
२४२ श्रीदासबोध. [ दशक ती कळा ॥ १८ ॥ आवडे नावडे ऐसें जाहलें । तरी देहस्वभावावरी गेलें । परी हें कळों आलें । अंतःकरणयोगें ॥ १९ ॥ सर्वांचें अंतःकरण एक । ऐसा निश्चय निश्चयात्मक । जाणती याचें कौतुक । चहूकडे ॥ २० ॥ इत्तु- केन फिटली आशंका । आतां अनुमान करूं नका । जाणणें तितुकें एका । अंतःकरणाचें ॥ २१ ॥ जाणोन जीव चारा घेती । जाणोन भिती लपती । जाणोनियां पळोन जाती । प्राणिमात्र ॥ २२ ॥ किडामुंगीपासून ब्रह्मादिक । समस्तांस अंतःकरण एक । ये गोष्टीचें कौतुक । प्रत्ययें जाणावें ॥ २३ ॥ थोर लहान तरी अग्नी । थोडें बहुत तरी पाणी । न्यून पूर्ण तरी प्राणी । अंतःकरण जाणती ॥ २४ ॥ कोठें उणें कोठें अधिक । परंतु जिन्नस मासला एक । जंगम १ प्राणी कोणी एक । जाणिल्याविण नाहीं ॥ २५ ॥ जाणीव म्हणजे अंतःकरण । अंतःकरण विष्णूचा अंश जाण । विष्णु करितो प्रति- पाळण । येणें प्रकारें ॥ २६ ॥ नेणतां प्राणी संहारितो । नेणीव तमोगुण बोलिजे तो । तमोगुणें रुद्र संहारितो । येणें प्रकारें ॥ २७ ॥ कांहीं जाणीव कांहीं नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव । जाणतां नेणतां जीव । जन्मास येती ॥ २८ ॥ जाणिवेनें होतें सुख । नेणिवेनें होतें दुःख । सुखदुःख आव- श्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥ जाणण्या नेणण्याची बुद्धी । तोचि देहीं जा- णावा विधी २ । स्थूळदेहीं ब्रह्मा त्रिशुद्धी ३ । उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥ ऐसा उत्पत्ति स्थिति संहार । प्रसंगे बोलिला विचार । परंतु याचा निर्धार । प्रत्ययें पा- हावा ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके अंतःकरण- निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. देहाशंका. श्रीगणेशाय नमः ॥ स्वामीनें विचार दाखविला । तेथें विष्णूचा अभाव दिसोन आला । ब्रह्मा विष्णु महेश्वराला । उरी नाहीं ॥ १ ॥ उत्पत्ति स्थेंति संहार । ब्रह्मा विष्णु महेश्वर । यांचा पाहतां विचार । प्रत्यय नाहीं ॥ २ ॥ ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौमुखाचा । येथें प्रत्यय नाहीं त्याचा । पालन- कर्ता विष्णु चौभुजांचा । तोहि ऐकोनि जाणों ॥ ३ ॥ महेश ५ संहार करि- १. सचेतन. २. ब्रह्मदेव. ३. निश्चयपूर्वक. ४. पालन. ५. शंकर.
१० वा. ] देहाशंका. २४३ तो । ह्याहि प्रत्यय कैसा येतो । लिंगपुराणीं महिमा तों । विपरीत बोलिला ॥ ४ ॥ मूळमायेस कोणें केलें । हें तों पाहिजे कळलें । तिहीं देवांचें रूप झालें । ऐलीकडे ॥ ५ ॥ मूळमाया लोकजननी । तयेपासून गुणक्षोभिणी । गुणक्षोभिणीपासून त्रिगुणीं । जन्म देवां ॥ ६ ॥ ऐसें बोलती शास्त्रकारक । आणि प्रवृत्तीचेहि लोक । प्रत्यय पुसतां कित्येक । आकांत करिती ॥ ७ ॥ म्हणोनि त्यांस पुसवेना । त्यांचेन प्रत्यय आणवेना । प्रत्ययेंविण प्रयत्न नाना । ठकाठकी ॥ ८ ॥ प्रचीतीविण वैण म्हणवी । उगिच करी उठाठेवी । तया मूर्खाला गोवीं । प्राणिमात्र ॥ ९ ॥ तैसाच ह्याहि विचार । प्रत्ययें क- रावा निर्धार । प्रत्यय नसतां अंधकार । गुरुशिष्यांशीं ॥ १० ॥ बरें लोकांसि काय म्हणावें । लोक म्हणती तेंचि बरवें । परंतु स्वामींनीं सांगावें । विशेंद करूनी ॥ ११ ॥ म्हणों देवीं माया केली । तरी देवांचीं रूपें मायेंत आलीं । जरी म्हणों मायेनें माया केली । तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥ जरी म्हणों भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली । म्हणावी जरी परब्रह्मीं केली । तरी ब्रह्मीं कर्तृत्व नाहीं ॥ १३ ॥ आणि माया खरी असावी । तरी ब्रह्मीं कर्तृत्वाची गोंवी । माया मिथ्या ऐसी जाणावी । तरी कर्तृत्व कैंचें ॥ १४ ॥ आतां हें अवघेंच उर्गवे । आणि मनासि प्रत्यय फाँवे । ऐसें केलें पाहिजे देवें । कृपा- ळूपणें ॥ १५ ॥ वेद मातृकेविण नाहीं । मातृका देहाविण नाहीं । देह निर्माण होत नाहीं । देहावेगळा ॥ १६ ॥ तया देहामध्यें नरदेहो । त्या नरदेहांत ब्राह्मणदेहो । तया ब्राह्मणदेहांत पाहो । अधिकार वेदीं ॥ १७ ॥ असे वेद कोठून झाले । देह कासयांचे केले । देव कैसे प्रगटले । कोणत्या प्रकारें ॥ १८ ॥ ऐसें बळावलें अनुमान । केलें पाहिजे समाधान । वक्ता म्हणे सावधान । होईं आतां ॥ १९ ॥ प्रत्यय पाहतां सांकडी । अवघी होते बिघडाबिघडी । अनुमानितां घडीनें घडी । काळ जातो ॥ २० ॥ लो- कधाटी शास्त्रनिर्णय । येथें बहुविध निश्चय । म्हणोनियां एक प्रत्यय । ये- णार नाहीं ॥ २१ ॥ आतां शास्त्रांची भीड धरावी । तरी सुटेना ही गाथा- गोवी । गाथागोवी हे उगवी । तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥ शास्त्र रक्षून १. त्रिगुणांचा आविर्भाव करणारी. २. व्यावहारिक. ३. फजीत करी. ४. उघड. ५. गुंतागुंत. ६. उलगडावें. ७. येई. ८. अक्षरांवाचून.
२४४ श्रीदासबोध. [ दशक प्रत्यय आणिला । पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला । शहाणा मूर्ख समजा- विला । एका वचनें ॥ २३ ॥ शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें लटक्याला । विचार पाहतां आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥ तथापि बोलों कांहीं एक । शास्त्र रक्षून कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पा- हिजे ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके देहाशंका- निरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. देहाशंका. श्रीगणेशाय नमः ॥ उपाधीविणें जें कां आकाश । तेंचि ब्रह्म निराभास । ते निराभासीं मूळमायेस । जन्म जाहलें ॥ १ ॥ ते मूळमायेचें लक्षण । वायुस्वरूपचि जाण । पंचभूतें आणि त्रिगुण । वायुअंगीं ॥ २ ॥ आका- शापासून वायु झाला । तो वायुदेव बोलिला । वायूपासून अग्नि झाला । तो अग्निदेव ॥३॥ अग्नीपासून झालें आप । तें नारायणाचें स्वरूप । आपा- पासून पृथ्वीचें रूप । तें बीजाकारें ॥ ४ ॥ ते पृथ्वीचे पोटीं पाषाण । बहु- दैवांचें लक्षण । नाना प्रचीत प्रमाण । पाषाणदेवीं ॥ ५ ॥ नाना काष्ठ वृक्ष मृत्तिका । प्रचीत रोकडी विश्वलोकां । समस्त देवांचा थारा एका । वायूम- ध्यें ॥ ६ ॥ देव यक्षिणी कात्यायनी । चामुंडा जखिणी मानविणी । नाना शक्ति नाना स्थानीं । देहपरत्वें ॥ ७ ॥ पुरुषनामें कितीएक । देव असती अनेक । भूतें दैवतें नपुंसक । नामें बोलिजेती ॥८॥ देव देवता देवतें भुतें । पृथ्वीमध्यें असंख्यातें । परंतु या समस्तांतें । वायुस्वरूप बोलिलें ॥ ९ ॥ वायुस्वरूप सदा असणें । प्रसंगें नाना देह धरणें । गुप्त प्रगट होणें जाणें । समस्तांसी ॥ १० ॥ वायुस्वरूपें विचरती । वायूमध्ये जगज्योती । जाणती कळा वासना वृत्ती । नाना भेदें ॥ ११ ॥ आकाशापासून वायु झाला । तो दों प्रकारें विभागला । सावधपणें विचार केला । पाहिजे श्रोतीं ॥ १२ ॥ एक वारा सकळ जाणती । एक वायूमधील जगज्ज्योती । जग- ज्योतीच्या अनंत मूर्ती । देवदेवतांच्या ॥ १३ ॥ वायु बहुत विकारला । परंतु दों प्रकारें विभागला । आतां विचार ऐकिला । पाहिजे तेजाचा ॥१४॥ वायूपासून तेज झालें । उष्ण शीतळ प्रकाशलें । द्विधारूप ऐकिलें । पाहिजे
१० वा. ] बीजलक्षण. २४५ तेजाचें ॥ १५ ॥ उष्णापासून झाला भानु । प्रकाशरूपें दैदीप्यमान । सर्वभक्षक हुताशन १ । आणि विद्युल्लता ॥१६॥ शीतळापासून आप अमृत । चंद्र तारा आणि शीत । आतां परिसा सावचित्त । होऊन श्रोते ॥ १७ ॥ तेज बहुत विकारिलें । परंतु द्विधाच बोलिलें । आपहि द्विधाच निरूपिलें । आप आणि अमृत ॥ १८ ॥ ऐका पृथ्वीचा विचार । पाषाण मृत्तिका निरं- तर । आणिक दुसरा प्रकार । सुवर्ण परिस नाना रत्ने ॥ १९ ॥ बहुरत्ना वसुंधरा २ । कोण खोटा कोण खरा । अवघें कळे विचारा- । रूढ होतां ॥ २० ॥ मनुष्यें कोठून झालीं । हे मुख्य आशंका राहिली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके देहाशंकानिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. बीजलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ आतां पाहों जातां उत्पत्ती । मनुष्यापासून मनुष्यें होती । पशूपासून पशु निपजती । प्रत्यक्ष आतां ॥ १ ॥ खेचरें ३ आणि भूचरें ४ । वनचरें आणि जळचरें ५ । नानाप्रकारचीं शरीरें । शरीरापासून होती ॥ २ ॥ प्रत्यक्षास आणि प्रमाण । निश्चयास आणि अनुमान । मार्ग सांडून आडरान । घेऊंच नये ॥३॥ विपरीतापासून विपरीत होती । परी शरीरें बोलिजेती । शरीरावांचून उत्पत्ती । होणार नाहीं ॥ ४ ॥ तरी हे उत्पत्ति कैसी झाली । कासयाची कोणें केली । जेणें केली त्याची निर्मिली । काया कोणें ॥ ५ ॥ ऐसें पाहतां उदंड लांबलें । परी मुळीं शरीर कैसें झालें । कासयाचें उभारिलें । कोणें कैसें ॥ ६ ॥ ऐसी हे मागील आशंका ६ । राहत गेली ते ऐका । कदापि जाजूं घेऊं नका । प्रत्यय आल्यानें ॥ ७ ॥ प्रत्ययचि आहे प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण । पिंडें प्रचीत शब्दें जाण । विश्वासासी ॥ ८ ॥ ब्रह्मीं मूळमाया झाली । तेचि अष्टधा ७ प्रकृति बोलिली । भूतीं त्रिगुणीं कालवली । मूळमाया ॥९॥ ते मूळमाया वायुस्वरूप । वायू- मध्यें जाणीवेचें रूप । तेचि इच्छा परी आरोप । ब्रह्मीं न घडे ॥ १० ॥ १. अग्नि. २. पृथ्वी. ३. पक्षी. ४. जनावरें. ५. मासे वगैरे. ६. संशय. ७. पंच- महाभूतें व मन, बुद्धि, आणि अहंकार मिळून आठ प्रकारची.
२४६ श्रीदासबोध. [ दशक तथापि ब्रह्मीं कल्पिला । तरी तो शब्दचि वायां गेला । आत्मा निर्गुण संचला । शब्दातीत ॥११॥ आत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म । नाममात्र तितुका भ्रम । करून लाविला संभ्रमें¹ । तरी लागणार नाहीं ॥१२॥ तथापि आग्रहें लाविला । तरी धोंडा अंतरीं मारिला । आकाशावरी कुंथिला । तरी तें तुटेना ॥ १३ ॥ तैसें ब्रह्म निर्विकार । निर्विकारीं लाविती विकार । विकार नासे निर्विकार । जैसें तैसें ॥१४॥ आतां ऐकावा प्रत्यय । जाणोनि धरावा निश्चय । तरीच पाविजे जय । अनुभवाचा ॥१५॥ मायाब्रह्मीं जो समीर² । त्यातें जाणता तो ईश्वर । ईश्वर आणि सर्वेश्वर । तयासचि बोलिजे ॥ १६॥ तोचि ईश्वर गुणास आला । त्याचा त्रिगुणभेद झाला । ब्रह्मा विष्णु महेश उपजला । तये ठायीं ॥१७॥ सत्व रज आणि तम । हे त्रिगुण उत्तमोत्तम । त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम । मागां निरूपिला ॥ १८ ॥ जाणता विष्णु भ- गवान । जाणता नेणता चतुरानन³ । नेणता महेश पंचानन⁴ । अत्यंत भोळा ॥ १९ ॥ त्रिगुणीं त्रिगुण कालवले । कैसे होती वेगळाले । परी विशेष न्यून भासले । ते बोलावे लागती ॥ २० ॥ वायुमध्यें विष्णु होता । तो वायुस्वरूपचि तत्वतां । पुढें झाला देहधर्ता । चतुर्भुज ॥२१॥ तैसाच ब्रम्हा आणि महेश । देह धरिती सावकाश । गुप्त प्रगट होतां तयांस । वेळ नाहा ॥ २२ ॥ आतां रोकडी प्रचीती । मनुष्यें गुप्त प्रगटती । मों⁵ त्या देवांच्या मूर्ती । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥ देव देवता भूतें दैवतें । चढतें सामर्थ्य आहे येथें । येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥ झोटिंग वायुस्वरूप असती । सवेंचि खुळखळां चालती । खोबरीं खारिका टाकोनि देती । अक- स्मात ॥ २५ ॥ अवघेंच न्याल अभावें⁶ । तरी हें बहुतेकांस ठावें । आपुला- ल्या अनुभवें । विश्वलोक जाणती ॥ २६ ॥ मनुष्यें धरिती शरीरवेष । नाना परकाया प्रवेश । मग तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥ २७ ॥ म्ह- णोन वायुस्वरूप देह धरिले । ब्रम्हा विष्णु महेश झाले । पुढें तेचि विस्तार- लें । पुत्रपौत्रीं ॥ २८ ॥ अंतरींच स्त्रिया कल्पिल्या । तों त्या कल्पितांच निर्माण झाल्या । परी तयांपासून प्रजा निर्मिल्या । नाहींत कदा ॥ २९ ॥ १. प्रपंचाचा व्याप. २. वायु. ३. महादेव. ४. शंकर. ५. मग. ६. अश्रद्धेनें.
१० वा.] बीजलक्षण. २४७ इच्छून पुत्र कल्पिले । ते ते प्रसंगीं निर्माण झाले । येणें प्रकारें वर्तले । हरिहरादिक ॥ ३० ॥ पुढें ब्रम्हयानें सृष्टि केली । इच्छेसरीसी सृष्टि झाली । जीवसृष्टि निर्माण केली । ब्रम्हदेवें ॥ ३१ ॥ नानाप्रकारचे प्राणी कल्पिले । इच्छेसरीसे निर्माण झाले । अवघें जोडेंचि उदेलेँ । अंडजें १ जारं२जादिक ॥ ३२ ॥ थुक जलस्वेदा३पासून झाले । ते प्राणी स्वेदज बोलिले । एक वायूकरितां झाले । अकस्मात उद्भिज्जें ४ ॥ ३३ ॥ मनुष्याची गौड ५ विद्या । राक्षसांची वो- डंबरी ६ विद्या । ब्रह्मयाची सृष्टिविद्या । येणें प्रकारें ॥ ३४ ॥ कांहींएक मनु- ष्यांची । त्याहून विशेष राक्षसांची । त्याहून विशेष ब्रह्मयाची । सृष्टिवि- द्या ॥ ३५ ॥ जाणते नेणते प्राणी निर्मिले । वेद वदोन मार्गी लाविले । ब्रह्मयानें निर्माण केले । येणें प्रकारें ॥ ३६ ॥ मग शरीरापासून शरीरें । सृ- ष्टि वाढिली विकारें । सकळ शरीरें येणें प्रकारें । निर्माण जाहलीं ॥ ३७ ॥ येथें आशंका फिटली । सकळ सृष्टि विस्तारली । विचार पाहतां प्रत्यया आली । यथान्वयें ॥ ३८ ॥ ऐसी सृष्टि निर्माण केली । पुढें विष्णूनें कैसी अतिपाळिली । हेहि विवंचना पाहिली । पाहिजे श्रोतीं । ३९ सकळ प्राणी निर्माण झाले । ते मूळरूपें जाणोन पाळिले । शरीरें दैत्य निर्दाळिले । नानाप्रकारींचे ॥ ४० ॥ नाना अवतार धरणें । दुष्टांचा संहार करणें । धर्म स्थापावयाकारणें । विष्णूस जन्म ॥ ४१ ॥ म्हणोन धर्मस्थापनेचे नर । तेहि विष्णूचे अवतार । अभक्त दुर्जन रजनीचरें ७ । सहजचि झाले ॥ ४२ ॥ आ- तां प्राणी जे जन्मले । ते नेणोन संहारले । मूळरूपें संहारिले । येणें प्रकारें ॥ ४३ ॥ शरीरें रुद्र खवळेल । तैं जीवसृष्टि संहारेल । अवघें ब्रह्मांडचि जळेल । संहारकाळीं ॥ ४४ ॥ एवं उत्पत्ति स्थिति संहार । यांचा ऐसा आहे विचार । श्रोतीं होऊन तत्पर । अवधान द्यावें ॥ ४५ ॥ कल्पांतीं संहार घडेल । तोचि पुढें सांगिजेल । पंच प्रलय ओळखेल । तोचि ज्ञानी ॥ ४६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके बीजलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ १. पक्षी. २. मनुष्य वगैरे. ३. घामापासून. ४. वनस्पती. ५. गौडबंगाल. ६. मायावी. ७. राक्षस.
२४८ श्रीदासबोध. [ दशक ५. पंचप्रलय. श्रीगणेशाय नमः ॥ ऐक प्रलयाचें लक्षण । पिंडीं दोन प्रलय जाण । एक निद्रा एक मरण । देहांतकाळीं ॥ १ ॥ देहधारक तीन मूर्ती । निद्रा जेव्हां संपादीती । तो निद्राप्रलय श्रोतीं । ब्रम्हांडींचा जाणावा ॥ २ ॥ तिही मूर्तीस होईल अंत । ब्रम्हांडास माडेल कल्पांत । तेव्हां जाणावा नेम- स्त। ब्रम्हप्रलय जाहला ॥ ३ ॥ दोन्ही पिंडीं दोन्ही ब्रम्हांडीं । चारी प्रलय नवखंडीं । पांचवा प्रलय उदंडीं । जाणिजे विवेकाचा ॥ ४ ॥ ऐसे हे पांच प्रलय । सांगीतले यथान्वयें । आतां हें अनुभवास ये । ऐसें करूं ॥ ५ ॥ निद्रा जेव्हां संचरे । तेव्हां जागृतिव्यापार सरे । सुषुप्ति अथवा स्वप्न भरे । अकस्मात अंगीं ॥ ६ ॥ या नांव निद्राप्रलय । जागृतीचा होय क्षय । आतां ऐका देहांतसमय । म्हणिजे मृत्युप्रलय ॥ ७ ॥ देहीं रोग बळावती । अथवा कठिण प्रसंग पडती । तेणें पंचप्राण जाती । व्यापार सांडूनी ॥ ८ ॥ तिकडे गेला मनपवन । इकडे राहिली नुसती तनू । दुसरा प्रलय अनुमाने । असेचिना ॥ ९ ॥ तिसरा ब्रम्हा निजेला । तों हा मृत्युलोक गोळा झाला । अवघा व्यापार खुंटला । प्राणिमात्रांचा ॥ १० ॥ तेव्हां प्राण्यांचे सूक्ष्मांश । वायुचक्रीं करिती वास । कित्येक काळ जातां ब्रम्हयास । जागृती घडें ॥ ११ ॥ पुनः मागुती सृष्टि रची । विसंचले जीव मागुते संची । सीमा हो- तां आयुष्याची । ब्रम्हप्रलय मांडे ॥ १२ ॥ शतवरुषें मेघ जाती । तेणें प्राणी मृत्यु पावती । असंभाव्य तडके क्षिती । मर्यादे वेगळी ॥ १३ ॥ सूर्य तपे बारा कळीं । तेणें पृथ्वीची होय होळी । अग्नि पावतां पाताळीं । शेष विष वमीं ॥१४॥ आकाशीं सूर्यांच्या ज्वाला । पाताळीं शेष वमी गरळा । दोहींकडून जळतां भूगोळा । उरी कैंची ॥ १५ ॥ सूर्यास खडतरता चढे । हलकल्लोळ चहूंकडे । कोसळती मेरूचे कडे । गडगडायमान ॥ १६ ॥ अमरावती सत्यलोक । वैकुंठ कैलासादिक । यांहि वेगळे नानालोक । भस्मोन जाती ॥ १७ ॥ मेरु अवघाच सरे । तेथील महिमाच वोसरे । देवसमुदाय बावरे । वायुचक्रीं ॥ १८ ॥ भस्म झालिया धरित्री । पर्जन्य पडे शुंडाधारीं । मही विरे जळांतरीं । निमिषमात्रें ॥ १९ ॥ पुढें नुसतें उरेल जळ । तयास शोषील १. झोंप. २. संशय. ३. विस्कळित झालेले जमवितो. ४. ओकतो.
अनळ । पुढें एकवटतील ज्वाळ । मर्यादेवेगळे ॥ २० ॥ समुद्रांचा वडवान- ळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ । सप्तकंचुकीं२चा आवरणानळ । सूर्य आणि वि- द्युल्लता ॥ २१ ॥ ऐसे ज्वाळ एकवटती । तेणें देव देह सोडिती । पूर्वरूपीं मिळोन जाती । प्रभंजनीं ॥ २२ ॥ तो वारा झडपी वैश्वानरा । वेन्हि वि- जेल एकसरां । वायु धांवे सैरावैरा । परब्रह्मीं ॥ २३ ॥ धूम्र वितळे आ- काशीं । तैसें होईल समीरासी । बहुतांमध्ये थोडियासी । नाश बोलिला ॥ २४ ॥ वायु वितळतां जाण । सूक्ष्म भूतें आणि त्रिगुण । ईश्वर सांडी अधिष्ठान । निर्विकल्पीं ॥ २५ ॥ तेथें जाणीव राहिली । आणि जगज्ज्योत निमाली । शुद्ध सारांश उरली । स्वरूपस्थिती ॥ २६ ॥ जितुकीं कांहीं नामाभिधानें । तये प्रकृतीचेनि४ गुणें । प्रकृति नसतां बोलणें । कैसें बोलावें ॥ २७ ॥ प्रकृति असतां विवेक कीजे । त्यास विवेकप्रलय बोलिजे । पांचहि प्रलय वोजें५ । तुज निरूपिले ॥ २८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके पंचप्रलयनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. भ्रम. श्रीगणेशाय नमः ॥ उत्पत्ति स्थिति संहार । यांचा निरूपिला व्यवहार । परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥ होतें वर्ततें आणि जातें । यांचा संबंध नाहीं तेथें । आदि मध्य अवसानीं तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥ परब्रह्म असतांचि असे । मध्येंच हा भ्रम भासे । भासे परंतु अवघा नासे । कालांतरीं ॥ ३ ॥ उत्पत्ति स्थिति संहारत । मध्यें हें अखंड होत जात । पुढें शेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४ ॥ यांमध्ये ज्यास विवेक आहे । तो आधींच जाणताहे । सारासार विचारें पाहे । म्हणोनियां ॥ ५ ॥ बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले । सृष्टीमध्यें उमजले । ऐसे थोडे ॥ ६ ॥ त्या उमजल्याचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । भ्रमाहून विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥ भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावें तयासी । ऐका आतां भ्रमासी । निरूपिजेल ॥ ८ ॥ एक परब्रह्म संचलें । कदापि नाहीं विकारलें । त्या वेगळें जें भासलें । तें भ्रमरूप ॥ ९ ॥ जयास १. अग्नि. २. ब्रह्मांडाचा. ३. वायूचे ठिकाणीं. ४. मायेचे. ५. स्पष्टपणें.
बोलिला कल्पांत । त्रिगुण आणि पंचभूत । हें अवघेंच समस्त । भ्रमरूप ॥ १०॥ मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम । ईश्वर हा हि भ्रम । निश्चयें सी ॥ ११ ॥ श्लोक ॥ भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर- भावत्वं भ्रममूलमिदं जगत् ॥ १॥ टीका ॥ या कारणें सृष्टि भासत । परंतु भ्रमचि हा समस्त । यामध्यें जे विचारवंत । तोचि धन्य ॥ १२॥ आ- तां भ्रमाचा विचारू । अत्यंतचि प्रांजळ करू । दृष्टांतद्वारें विवरूं । श्रोत- यांसी ॥ १३॥ भ्रमण करितां दूरदेशीं । दिशाभुली आपणाशी । कां ओ- ळखी मोडे जिवलगांसीं । या नांव भ्रम ॥ १४ ॥ कां उन्मत्तद्रव्य सेविलें । तेणें अनेक भासों लागलें । नाना व्यथा कां झडापिलें । भूतें तो भ्रम ॥ १५॥ दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडिली बाजीगिरी । उगाच संदेह अं- तरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥ ठेवला ठाव तो विसरला । कां मार्गीं जातां चुकला । पट्टणामध्यें भांभावला । या नांव भ्रम ॥ १७॥ वस्तु आपणा- पासीं असतां । गेली म्हणोन होय दुश्चिता । आपुलें आपण विसरता । या नांव भ्रम ॥१८॥ कांहीं पदार्थ विसरोन गेला । कां जें शिकला तें विसरला । स्वप्नदुःखें बाविरा झाला । या नांव भ्रम ॥१९॥ दुश्चिन्ह अथवा अपशकुन । मिथ्या वार्तेनें भंगे मन । दचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥२०॥ वृक्ष काष्ठ पशु देखिले । मनांत वाटे भूत आलें । कांहींच नसतां हडबडिलें । या नांव भ्रम ॥२१॥ आतां कांच म्हणोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणी वावडे । द्वार चुकोन भलतीकडे । या नांव भ्रम ॥२२॥ एक असतां एक वाटे । एक सांगतां एक निर्बटे । एक दिसतां एक उठे । या नांव भ्रम ॥२३॥ आतां जें जें दीजेतें । तें तें पुढें पाविजेतें । मेलें माणूस भोजना येतें । या नांव भ्रम ॥ २४ ॥ ये जन्मींचें पुढिले जन्मीं । कांहीं एक पावेन मी । प्रीति गुं- तली मनुष्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥ मेलें मनुष्य स्वप्नीं आलें । तेणें कांहीं मागीतलें । मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥ २६ ॥ अवघें मिथ्या म्हणोन बोले । आणि सामर्थ्यांवरी मन चाले । ज्ञाते वैभवें दड- पिले । या नांव भ्रम ॥ २७ ॥ कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळेंचचि १. उघड. २. मादक पदार्थ. ३. जादुगिरी. ४. मोठ्या शहरामध्यें. ५. आर- सेमहाल. ६. शिरतो. ७. घडलें.
अष्टे । कोणी एक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥२८॥ देहाभिमान कर्माभि- मान । जात्याभिमान कुळाभिमान । ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव भ्रम ॥ २९ ॥ कैसा न्याय तो न कळे । केला अन्याय तो नाढळे । उगाच अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥ मागील कांहीं आठवेना । पुढील हीं सुचेना । अखंड आरूढ अभिमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥ प्रची- तीवीण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें । प्रचीतीविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ३२ ॥ फळश्रुतीविण प्रयोग । ज्ञानेंविण नुसता योग । उ- गाच शरीरें भोगी भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥ ब्रह्मा लिहितो अदृष्टीं १ । आणि वाचून जाते संटी २ । ऐशा प्रकारच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥ उदंड भ्रम विस्तारला । अज्ञानजनीं पैलावला । अल्पसंकेतें बोलिला । कळावयाकारणें ॥३५॥ भ्रमरूप विश्व स्वभावें । तेथें काय म्हणोन सांगावें । निर्गुण ब्रह्मावेगळें आघवॆं । भ्रमरूप ॥ ३६ ॥ ज्ञात्यास नाहीं संसार । ऐसे बोलती अपार । गत झाल्यांचे चमत्कार ३ । या नांव भ्रम ॥ ३७ ॥ येथें आ- शंका उठिली । ज्ञात्यांची समाधि पूजिली । तेथें कांहीं प्रचीत आली । किंवा नाहीं ॥ ३८ ॥ तैसेचि अवतार संपले । त्यांचेंहि सामर्थ्य उदंड चाले । तरी ते काय गुंतले । वासना धरूनी ॥ ३९ ॥ ऐसी आशंका उद्भवली । समर्थे पाहिजे निरूपिली । इतुकेन हे संपली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके भ्रमनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. सगुणभजन. श्रीगणेशाय नमः ॥ अवतारादिक ज्ञानी संत । सारासार विचारें मुक्त । त्यांचें सामर्थ्य चालत । कोणत्या प्रकारें ॥ १ ॥ हे श्रोत्यांची आशंका । पाहतां प्रश्न केला निका । सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥ ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचें सामर्थ्य चाले । परंतु ते नाहीं आले । वास- ना धरूनी ॥ ३ ॥ लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार । परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥ जित असतां नेणों किती । जना-
१. कपाळावर. २. सटवी. ३. अलौकिक कृत्यें.
२५२ श्रीदासबोध. [ दशक मध्यें चमत्कार होती । ऐसी यांची सद्यःप्रचीती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥ तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला । ऐसा हा चमत्कार झाला । यास काय म्हणावें ॥ ६ ॥ तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां देव यथार्थ । अन्यत्र कल्पना व्यर्थ । कुतर्काच्या ॥ ७ ॥ आवडे तें स्वप्नीं देखिलें । तरी काय तेथूनि आलें । म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥ एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना १। तरी ते पदार्थ चालतीना । अथवा आठवू नाहीं ॥ ९ ॥ येथें तुटली आशंका । ज्ञा- त्यास जन्म कल्पूं नका । उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥ ज्ञाते मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगौचि चाले । कां जे पुण्यमागें चालिले । म्हणोनियां ॥ ११ ॥ या कारणें पुण्यमागें चालावें । भजन देवाचें वाढवावें । न्याय सोडून न जावें । अन्यायमागें ॥ १२ ॥ नाना पुरश्चरणें करावीं । नाना तीर्थाटनें फिरावीं । नाना सामर्थ्यं वाढवावीं । वैराग्यबळें ॥ १३ ॥ निश्चय बैपे वस्तुंकडे । तरी ज्ञानमागैंहि सामर्थ्य चढे । कोणी एक ऐकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥ एक गुरु एक देव । कोठें तरी असावा भाव २। भावार्थ नसतां वाव ३। सर्व कांहीं ॥ १५ ॥ निर्गुण ज्ञान झालें । म्हणोन सगुण अलक्ष्य केलें । तरी तें ज्ञानें नागविलें । दोहींकडे ॥ १६ ॥ नाहीं भक्ति नाहीं ज्ञान । मध्येंच पैसावलें अनुर्मान ४। म्हणोनियां जप ध्यान । सांडूंचि नये ॥ १७ ॥ सांडील सगुण भजनासी । तरी तो ज्ञाता परी अ- पेशी । म्हणोनियां सगुण भजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥ निष्कामबुद्धी- चिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा । सामर्थ्याविण घडेना । निष्काम भजन ॥ १९ ॥ कामनेनें फळ घडे । निष्कामभजनें भगवंत जोडे । फळ- भगवंतासी कोणीकडे । महदंतर ॥ २० ॥ नाना फळें देवापाशीं । आणि फळ अंतरी भगवंतासी । या कारणें परमेश्वरासी । निष्काम भजावें ॥ २१॥ निष्काम भजनाचें फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळें । तेथें बापुडीं फळें । कोणीकडे ॥ २२ ॥ भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणाचि करावें । तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥ दोन्ही सामर्थ्यं एक होतां । का- ळासि नाटोपे सर्वथा । तेथें इतरांची काय कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥
१. अन्य पदार्थ. २. निष्ठा. ३. मनांतून दूर. ४. संशय.
१० वा. ] प्रचीत. २५३ म्हणोनि निष्काम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । तयास तुळितां त्रिभुवन । उणे वाटे ॥ २५ ॥ येथे बुद्धीचा प्रकाश । आणिक न चढे विशेष । प्रताप कीर्ति आणि यश । निरंतर ॥ २६ ॥ निरूपणाचा विचार । आणि हरिक- थेचा गजर । तेथें होती तत्पर । प्राणिमात्र ॥ २७ ॥ जेथें भ्रष्टाकार घडेना । तो परमार्थहि बुडेना । समाधान बिघडेना । निश्चयाचें ॥ २८ ॥ सारासार विचार करणें । न्याय अन्याय अखंड पाहणें । बुद्धि भगवंताचें देणें । पालटे- ना ॥ २९ ॥ भक्त भगवंतीं अनन्य । त्यासि बुद्धि देतो आपण । यदर्थी भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥ श्लोकार्थ ॥ ददामि बुद्धियोगं तं येन मा- मुपयांति ते ॥ म्हणोन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । प्रत्ययाचें समा- धान । दुर्लभ जगीं ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. प्रचीत. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका प्रचीतीचीं लक्षणें । प्रचीत पाहतील ते शा- हाणे । येरें वेडे दैन्यवाणे । प्रचीतीविण ॥ १ ॥ नाना रत्ने नाना नाणीं । परीक्षून न घेतां होय हानी । प्रचीत न येतां निरूपणीं । बैसोंच नये ॥ २ ॥ तुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहतां प्रचीतीस आलें । तरी मग पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥ बीज उगवेल ऐसें पाहावें । तरी मग द्रव्य घालून घ्यावें । प्रचीत भालिया ऐकावें । निरूपण ॥ ४ ॥ देहीं आ- रोग्यता झाली । ऐसी जनास प्रचीत आली । तरी मग अगत्य घेतली । पाहिजे मात्रा ॥ ५ ॥ प्रचीतीविण औषध घेणें । तरी मग घडचि विघ- डणें । अनुमानानें जें कार्य करणें । तेंचि मूर्खपण ॥ ६ ॥ प्रचीतीस नाहीं आलें । आणि सुवर्ण करविलें । तरी मग जाणावें ठकिलें । देखत देखतां ॥ ७॥ शोधून पाहिल्याविण । कांहीं तरी एक कारण । होणार नाहीं निर्वाणें । प्राणास घडे ॥ ८ ॥ म्हणोन अनुमानाचें कार्य । भल्यानें कदापि करूं नये । उपाय पाहतां अपाय । नेमस्त घडे ॥ ९ ॥ पाण्यांतील म्हैसीची साँटी । करणें हे बुद्धिच खोटी । शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १०॥ १. इतर. २. घोडा अथवा शस्त्र फिरवून पाहिल्यावर. ३. नाश. ४. सवदा.
२५४ श्रीदासबोध. [ दशक विश्वासें घर घेतलें । ऐसें कधीं नाहीं ऐकिलें । मैंदें¹ मैंदायें केलें । परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥ (शोधिल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मु- कणें । लटिक्याचा विश्वास धरणें । हेंचि मूर्खपण ॥ १२ ॥ संगती चोरांची धरितां । घात होईल तत्वतां । ठक सिंतरू² शोधितां । ठायीं पडे) ॥ १३ ॥ गैरसालै³ तालमगिरी । कोणी नवी मुद्रा करी । नाना कपट परोपरी । शो- धून पहावें ॥ १४ ॥ दिवाळखोराचा मोंड⁴ । पाहतां वैभवहि दिसे उदंड । परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥ तैसें प्रचीतीविण ज्ञान । तेथें नाहीं समाधान । करून बहुतांचें अनुमान । अनहित केलें ॥ १६ ॥ मंत्र यंत्र उपदेशिले । नेणते प्राणी गोचिले । जैसें झांकून मारिलें । दुखणाइत ॥ १७ ॥ वैद्य पाहिला परी काचा । तरी प्राण गेला पोराचा । येथें उपाय दुस- ऱ्याचा । काय चाले ॥ १८ ॥ स्वदुःखें अंतरीं झिजे । आणि वैद्य पुसतां लाजे । तरी मग तयासि साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥ जाणत्यावरी गर्व गेला । परी तो नेणत्याकरितां बुडाला । येथें कोणाचा घात झाला । बरें पाहा ॥ २० ॥ पापाची खंडणा झाली । जन्मयातना चुकली । ऐसी स्वयें प्रचीत आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥ परमेश्वरासि ओळखिलें । आ- पण कोण ऐसें कळलें । आत्मनिवेदन झालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥ ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें । मुख्य कर्त्यास ओळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥ जेथें अनुमान राहिलें । तरी परमार्थ केले ते वायां गेले । प्राणी संशयीं बुडालें । प्रचीतीविण ॥ २४ ॥ हेंचि परमार्थाचें वर्म । लटिकें बो- लेल तो अधम । लटिकें मानील तो अधमाधम । यथार्थ जाणावा ॥ २५ ॥ येथें बोलण्याची झाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा । असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूंचि जाणसी ॥ २६ ॥ माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सां- गावें साचार । मिथ्या बोलतां उत्तर । प्रभूसी लागे ॥ २७ ॥ म्हणोनि सत्यचि बोलिलें । कर्त्यास पाहिजे ओळखिलें । मायोद्भवाचें शोधिलें । पा- हिजे मूळ ॥ २८ ॥ तेंचि पुढें निरूपण । बोलिलें बोलिजे प्रमाण । श्रोतीं सावध अंतःकरण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥ सूक्ष्म निरूपण लांगलें । तेथें बोलिलेंचि मागुती बोलिलें । श्रोतयांस पाहिजे उमजलें । म्हणोमिया
१. फांसेगारानें. २. फसव्या. ३. दुर्वर्तनी. ४. पसारा.
१० वा. ] प्रकृतिपुरुषनिदर्शन. २५५ ॥ ३० ॥ प्रचीत पाहतां निकट । उडोन जाती परिपाठें । म्हणोन हे खट- पट । करणें लागे ॥ ३१ ॥ परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचीत समा- धान बुडालें । प्रचीतसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥ ऐसीं सा- कडीं दोहींकडे । म्हणोनि बोलिलेंचि बोलणें घडे । दोन्ही राखोनियां कोडें । उकलून दावूं ॥ ३३ ॥ परिपाठ आणि प्रचीतप्रमाण । दोन्ही राखून निरूपण । श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे दशमदशके प्रचीतनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. प्रकृतिपुरुषनिदर्शन. श्रीगणेशाय नमः ॥ आकाशीं वायु झाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळ- माया जाण । त्या वायुमध्यें त्रिगुण । आणि पंचभूतें ॥ १ ॥ वटबीजीं असे वड । फोडून पाहतां न दिसे झाड । नाना वृक्षांचे जुंबाड । बिजापासून होती ॥ २ ॥ तैसी बीजरूप मूळमाया । विस्तार झाला तेथूनिया । तिचें स्वरूप शोधूनिया । बरें पाहा ॥ ३ ॥ तेथें दोन्ही भेद दिसती । विवेकें पाहावी प्रचीती । निश्चळीं जे चंचल स्थिति । तोचि वायु ॥ ४ ॥ तया- मध्यें जाणीवकळा । जगज्ज्योतीचा जिव्हाळा । वायु जाणीव मिळोन मेळा । मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥ सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहतां पाणीच असे । विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥ वायु जाणीव जगज्योती । तयास मूळमाया म्हणती । पुरुष आणि प्रकृती । याचेंच नांव ॥ ७ ॥ वायूंस म्हणती प्रकृती । आणि पुरुष म्हणती जगज्ज्योती । पुरुष प्रकृति शिव शक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥ वायुमध्यें जाणीव विशेष । तोचि प्रकृतीमध्यें पुरुष । ये गोष्टीचा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ९ ॥ वायु शक्ति जा- णीव ईश्वर । अर्धनारी नटेश्वर । लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥ वा- यूमध्यें जाणीव गुण । तेंचि ईश्वराचें लक्षण । तयापासून त्रिगुण । पुढें झाले ॥ ११ ॥ तया गुणांमध्यें सत्वगुण । निखिल जाणीव लक्षण । त्याचा देह- धारी आपण । विष्णु जाहला ॥ १२ ॥ त्याच्या अंगें जग चाले । ऐसें भगवद्गीता बोले । गुंतलें तेंचि उगवलें । विचार पाहतां ॥ १३ ॥ एक १. संप्रदाय. २. नदी. ३. उलगडलें.
२५६ श्रीदासबोध. [ दशक जाणीव वांटली । प्राणिमात्रास विभागली । जाणजाणों वांचविली । सर्व काया ॥ १४ ॥ तयेचें नांव जगज्योती । प्राणिमात्र तिचेनि जगती । याची रोकडी प्रचीती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥ पक्षी श्वापद किडा मुंगी । कोणी एक प्राणी जगीं । जाणीव खेळे त्याचे अंगीं । निरंतर ॥ १६ ॥ जाणोन काया पळविती । तेणें गुणें प्राणी वांचती । दडती आणि लपती । जाणजाणों ॥ १७ ॥ अवघ्या जगास वांचविती । म्हणोन नामें जगज्योती । ते गेलिया प्राणी मरती । जेथील तेथें ॥ १८ ॥ मुळींच जाणीवेचा विकार । पुढें झाला विस्तार । जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणू ॥ १९ ॥ तैसें देव देवता भूतें । मिथ्या म्हणों नये त्यांतें । आपुलाल्या सामर्थ्ये ते । सृष्टिमध्यें फिरती ॥ २० ॥ सदा विचरती वायुस्वरूपें । स्वइच्छा पालटती रूपें । अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पें । त्यासि बाधिती ॥ २१ ॥ ज्ञात्यासि संकल्पाचि असेना । म्हणोन त्यांचेनि बाधवेना । या कारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥ अभ्यासिल्या आत्मज्ञान । सर्व कर्म होये खंडण । हे रोकडी प्रचीत प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥ ज्ञानेंविण कर्म विथेंडे । हें तों कल्पांतीं न घडे । सद्गुरुविण ज्ञान जोडे । हेंहि अघटित ॥ २४ ॥ म्हणोन सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा । तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं ॥ २५ ॥ तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वतां । अनन्य- भावें सार्थकता । सहजाचि जाहली ॥ २६ ॥ विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगेंचि व्यर्थ गेलें । म्हणोनि विचारीं प्रवर्त्तलें । पाहिजे आधीं ॥२७॥ विचार पाहील तो पुरुष । विचार न पाहे तो पशु । ऐसीं वचनें सर्वेश । ठायीं ठायीं बोलिला ॥ २८ ॥ सिद्धांत साधावयाकारणें । पूर्वपक्ष लागे उठवणें । परंतु साधकांसी निरूपणें । साक्षात्कार ॥ २९ ॥ श्रवण मनन निदिध्यास । प्रचीतीनें बाणतां विश्वास । रोकडा साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके प्रकृ- तिपुरुषनिदर्शननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१. फलशून्य होतें.
१० वा.] चलाचलः २५७ १०. चलाचल. श्रीगणेशाय नमः ॥ गगनासारिखें ब्रह्म पोकळ । उदंड उंच अंतराळ । निर्गुण निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १ ॥ त्यास परमात्मा म्हणती । आणिक नामें सांगों किती । परी तें जाणिजे आदि अंतीं । जैसें तैसें ॥२॥ विस्तीर्ण पसरला पैस । भोंवता दाटला अवकाश । भासचि नाहीं निराभास । जैसें तैसें ॥ ३ ॥ चहूंकडे पाताळातळीं । अंतचि नाहीं अंतराळीं । कल्पांत- काळीं सर्वकाळीं । संचलेंचि असे ॥ ४ ॥ ऐसें कांहींएक चंचळ । तें अचंचळीं भासे चंचळ । त्यास नामेंही सकळ । विविध प्रकारें ॥ ५ ॥ न दिसतां नाम ठेवणें । न देखतां खूण सांगणें । असों हीं जाणावयाकारणें । नामाभिधानें ॥ ६ ॥ मूळमाया मूळप्रकृती । मूळपुरुष ऐसें म्हणती । शिव- शक्ति नामें किती । नाना प्रकारें ॥ ७ ॥ परी जें नाम ठेविलें जया । आधीं ओळखावें तया । प्रचीतीविण कासया । वल्गना करावी ॥ ८ ॥ रूपाची न धरितां सोय । नामासरिसें भरंगळों नये । प्रत्ययेंविण गळंगो¹ होय । अनुमानज्ञानें ॥ ९ ॥ निश्चळ गगनीं चंचल वारा । वाजों लागला भरारा । परी त्या गगना आणि समीरा । भेद आहे ॥ १० ॥ तैसें निश्चळ परब्रम्ह । चंचळ माया भासला भ्रम । त्या भ्रमाचा संभ्रम² । करून दावूं ॥ ११ ॥ जैसा गगनीं चालिला पवन । तैसें निश्चळीं झालें चळण । इच्छा स्फूर्ति लक्षण । स्फुरणरूप ॥ १२ ॥ अहंपणें जाणीव झाली । तेचि मूळ- प्रकृति बोलिली । महाकारण काया रचिली । ब्रह्मांडाची ॥१३॥ महामाया मूळप्रकृती । कारण ते अव्याकृती । सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती । विराट ते स्थूळ ॥ १४ ॥ ऐसें पंचीकरण³ शास्त्रप्रमेय⁴ । ईश्वरतनुचतुष्टयें⁵ । म्हणोन हें बोलणें होय । जाणीव मूळमाया ॥१५॥ परमात्मा परमेश्वर । परेश ज्ञानघन ईश्वर । जगदीश जगदात्मा जगदीश्वर । पुरुष नामें ॥ १६ ॥ आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । द्रष्टा साक्षी सर्वात्मा । क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा । देहीं कूटस्थ बोलिजे ॥ १७ ॥ इंद्रात्मा ब्रम्हात्मा हरिहरात्मा । यमात्मा धर्मात्मा नैर्ऋ- तात्मा । वरुण वायु कुबेरात्मा । ऋषिदेवमुनिधर्ता ॥ १८ ॥ गण गंधर्व १. घोटाळा. २. खुलासा. ३. पंचतत्वांचें मिश्रण. ४. शास्त्राचे सिद्धांत. ५. विराट्, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृति हे ब्रह्मांडांचे चार देह.
२५८ श्रीदासबोध. [ दशक विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । सर्व लोकांचें अंतर । तो सर्वात्मा बोलिजे ॥ १९ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । भूमंडळें मेघमंडळें । एकविस स्वर्गे सप्त पाताळें । अंतरात्माच वर्तवी ॥ २० ॥ गुप्तवल्ली पाल्हाळली । तिचीं पुरुषनामें घेतलीं । आतां स्त्रीनामें ऐकिलीं । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥ मूळमाया जगदीश्वरी । परम विद्या परमेश्वरी । विश्वाविद्या विश्वेश्वरी । त्रैलोक्यजननी ॥ २२ ॥ अंतर्हेतु अंतर्कळा । मौन्यगर्भ जाणीवकळा । चपळा जगज्योति जीवनकळा । परा पश्यंती मध्यमा ॥ २३ ॥ युक्ति बुद्धि मति धारणा । सावधानता नाना चाळणा । भूत भविष्य वर्तमाना । उकलून दावी ॥ २४ ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति जाणे । तुर्या तटस्थावस्था जाणे । सुख दुःख सकळ जाणे । मानापमान ॥ २५ ॥ ते प- रम कठिण कृपाळू । ते परम कोमळ स्नेहाळू । ते परम क्रोधी लोभाळू । मर्यादेवेगळी ॥ २६ ॥ शांति क्षमा विरक्ति भक्ती । अध्यात्मविद्या सायुज्य- मुक्ती । विचारणा सहजस्थिती । जयेचेनी ॥ २७ ॥ पूर्वी पुरुषनामें बोलि- लीं । उपरि स्त्रीनामें निरूपिलीं । आतां नपुंसकनामें ऐकिलीं । पाहिजे चंचळाचीं ॥ २८ ॥ सत्तारूप ज्ञानस्वरूप । प्रकाशरूप ज्योतिरूप । कार- णरूप चिद्रूप १ । शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ २९ ॥ जाणणें अंतःकरण चित्त । श्र- वण मनन चैतन्य जीवित । येतें जातें सुचित्त । होऊन ऐका ॥ ३० ॥ मीपण तूं पण जाणपण । ज्ञातेपण सर्वज्ञपण । जीवपण शिवपण ईश्वरपण । अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥ ऐसी नामें उदंड असती । परी ते एकचि ज- गज्योती । विचारवंत ते जाणती । सर्व अंतरात्मा ॥ ३२ ॥ आत्मा जग- ज्योति सर्वज्ञपण । तिन्ही मिळोनि एकचि जाण । अंतर्कळाचि प्रमाण । ज्ञप्तिमात्र ॥ ३३ ॥ ढीग झाले पदार्थांचे । पुरुष स्त्री नपुंसक नामांचे । परंतु सृष्टिरचनेचे । किती म्हणोन सांगावे ॥ ३४ ॥ सकळां चालिता एक । अंतरात्मा वर्तवी अनेक । मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेंचि चालती ॥ ३५ ॥ तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत ओळखाना आभासा । नाना प्रकारींचा तमासा । येथेंचि आहे ॥ ३६ ॥ तो कळतो परी दिसेना । प्रतीत येते परी भासेना । शरीरीं असे परी वसेना । एके ठायीं ॥ ३७ ॥ तीक्ष्णपणें २ १. ज्ञानस्वरूप २. सूक्ष्मपणें.
१० वा.] चलाचल. २४९ गगनीं भरे। सरोवर देखतांच पसरे। पदार्थ रक्षून उरे। चहूंकडे ॥ ३८ ॥ जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो। तो त्या पदार्थासारिखाच होतो। वायूहून विशेष तो। चंचळविषयीं ॥ ३९ ॥ कित्येक दृष्टीनें देखे। कित्येक रसनेनें चाखे। कित्येक ते वोळखे। मनेंकरूनी ॥ ४० ॥ श्रोत्रीं बैसोन शब्द ऐ- कतो। घ्राणेंद्रियें वास घेतो। त्वचेंद्रियें जाणतो। शीतोष्णादिक ॥ ४१ ॥ ऐशा जाणे अंतरकळा। सकळांमध्यें परी निराळा। पाहतां त्याची अगाध लीला। तोचि जाणे ॥ ४२ ॥ तो पुरुष ना सुंदरी। बाळ तरुण ना कुमारी। नपुंसकाचा देहधारी। परी नपुंसक नव्हे ॥ ४३ ॥ तो चालवी सकळ दे- हांसी। करून अकर्ता म्हणती त्यासी। तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी। देहीं कूटस्थ बोलिजे ॥ ४४ ॥ श्लोक ॥ द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ॥ क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १ ॥ टीका ॥ दोन्ही पुरुष लोकीं अ- सती। क्षराक्षर बोलिजेती। सर्व भूतें क्षर म्हणती। अक्षर कूटस्थ बोलिजे ॥ ४५ ॥ उत्तम पुरुष तो आणिक। निष्प्रपंच आणि निष्कलंक। निरंजन परमात्मा एक। निर्विकारी ॥ ४६ ॥ चारी देह निरसावे। साधकें देहा- तीत व्हावें। देहातीत होतां जाणावें। अनन्य भक्त ॥ ४७ ॥ देहमात्र नि- रसोन गेला। तेथें अंतरात्मा कैंचा उरला। निर्विकारीं विकारला। विका- रचि नाहीं ॥ ४८ ॥ निश्चळ परब्रह्म एक। चंचळ जाणावें मायिकें। ऐसा प्रत्यय निश्चयात्मक। विवेकें पाहावा ॥ ४९ ॥ येथें बहुत नलगे खळखळ। एक चंचळ एक निश्चळ। शाश्वत कोण हें केवळ। ज्ञानें ओळखावें ॥ ५० ॥ असार त्यागून घेइजे सार। म्हणोन सारासार विचार। नित्यानित्य निरं- तर। पाहती ज्ञानी ॥ ५१ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान। जेथें मनाचें होतें उन्मन। तेथें कैंचें चंचळपण। आत्मयासी ॥ ५२ ॥ सांगणी वांग- णीचें काम नव्हे। आपुल्या अनुभवें जाणावें। प्रत्ययेंविण सिणावें। तेंचि पाप ॥ ५३ ॥ सत्याएवढें सुकृतें नाहीं। असत्याएवढें पाप नाहीं। प्रची- तीविण कोठेंचि नाहीं। समाधान ॥ ५४ ॥ सत्य म्हणिजे स्वरूप जाण। असत्य माया हें प्रमाण। येथें निरूपिलें पाप पुण्य। रूपांसहित ॥ ५५ ॥ दृश्य पाप वोसरलें। पुण्य परब्रह्म उरलें। अनन्य होतांच झालें। नामा- १. कानामध्यें. २. नाकामध्यें. ३. त्वचेमध्यें. ४. खट. ५. पुण्य,
२६० श्रीदासबोध. [ दशक तीतें ॥ ५६ ॥ आपण वस्तुच स्वतःसिद्ध । तेथें नाहीं देहसंबंध । पापराशी होती दग्ध । येणें प्रकारें ॥ ५७ ॥ येन्हवीं ब्रह्मज्ञानेंविण । जें जें साधन तो तो सिण । नाना दोषांचें क्षाळण । होईल कैसें ॥ ५८ ॥ पापाचें वळलें शरीर । पापचि वढे तदनंतर । अंतरीं रोग वरी उपचार । काय करी ॥ ५९ ॥ नाना क्षेत्रीं हें मुंडलें । नाना तीर्थीं हें दंडिलें । नाना निग्रहीं खं- डिलें । ठायीं ठायीं ॥ ६० ॥ नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा तप्तमुद्रेनें डाँशिलें । जरी हें वरीवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१ ॥ शेणाचे गोळे गिळिले । गोमूत्राचे भौघे घेतले । माळा रुद्राक्ष घातले । काष्ठमणी ॥ ६२ ॥ वेष वरिवरी केला । अंतरीं दोष भरला । त्या दोषाच्या दहनाला । आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्था- टणें । सर्वांहून कोटिगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥ आत्मज्ञान पाहे सदा । त्याच्या पुण्यास नाहीं मर्यादा । दुष्ट पातकांची बाधा । निर- सोन गेली ॥ ६५ वेदशास्त्रीं सत्यस्वरूप । तेंचि ज्ञानियाचें रूप । पुण्य झालें अमूर्प । सुकृतें सीमा सांडिली ॥ ६६ ॥ ह्या प्रचीतीच्या गोष्टी । प्र- चीत पाहावी आत्मदृष्टी । प्रचीतीवेगळें कष्टी । होऊं नये ॥ ६७ ॥ अगा हे प्रचीतीचे लोक हो । प्रतीत नसतां अवघा शोक हो । रघुनाथकृपेनें राहो । प्रत्यय निश्चयाचा । ६८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दश- मदशकचे चलाचलनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३५४. दशक अकरावा. १. सिद्धान्त. श्रीगणेशाय नमः ॥ आकाशापासून वायु होतो । हा तों प्रत्यय येतो । वायूपासून अग्नि होतो । सावध ऐका ॥ १ ॥ वायूची कठिण धैसणी । येथें निर्माण झाला वँन्ही । मंद वायु शीतळ पाणी । तेथून जाहलें ॥ २ ॥ आँ- पापासून झाली पृथ्वि । ते नाना बीजरूप जाणावी । बीजापासून उत्पत्ति १. नामरहित. २. डागलें. ३. एक मातीचें भांडें. ४. पुष्कळ. ५. घर्षण. ६. अग्नि. ७. जलापासून.