सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
२० सार्थ तुकारामगाथा अर्थ:-दुर्गुणांचा काहीच उपयोग नाही. त्यांच्यायोगे नेहमीच फजिती होत असते १ भांडे कसले आहे, चांगले की वाईट यावर काही नसून आतील पदार्थाच्या गुणावगुणांवर सर्व आहे. २ तांब्याच्या पवित्र वाटीमधील विष ते विषच, परिणामो घातकारकच होणार; ती भरलेली वाटी ओठाना लावता कामा नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात मूळचा भाव जो असेल तोच खरा; धरले सोंग व्यर्थ आहे. ४ ४२ हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥ १ ॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठीं ॥ २ ॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलीती अंतीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागरण - भजनकीर्तन वगैरेसाठी केलेले जागरण, तुटी-नुकसान, वेचे-खर्च होत आहे, गुंती-मोह, माया, मोकलीती-सोडून देतात, अंतीं-शेवटी, अर्थ - मना, हरीच्या कथाकीर्तनाला का जात नाहीस ? १ केवळ प्रपंचाचा विचार करून तुझे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई तू करणार तरी कुठे ? आयुष्य हरिविना फुकट चालले ना ? २ ज्या मुलांबाळांचा व आप्तांचा तुला मोह पडत आहे ते तर अंतकाळी तुला सोडून जातील. ३ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरप्राप्तीचाच जो चांगला लाभ आहे त्याचाच तू विचार कर. ४ ४३ धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥ १ ॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासुनि दुस्तरा ॥ २ ॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥ ३ ॥ जिवोंच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुस्तर-तरून जाण्यास कठिण अर्थ - ईश्वरा, तू तर प्रत्यक्ष धर्माचीच मूर्ती आहेस आणि पापपुण्यही तुझ्याच हाती आहे. १ म्हणून हे दातारा, या कठिण अशा पापपुण्यात्मक कर्मापासून मला मुक्त कर. २ देवा, तू जर माझा स्वीकार केलास तर तुला काय माझा भार होणार आहे ? ३ सर्व जीवांचे जीवन असणाऱ्या देवा नारायणा, तुला माझे ओझे काय आहे ? ४ ४४ ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणें । बळिये आम्ही भले शरणागत ॥ १ ॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाऋणी ॥ २ ॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुपावें ॥ ३ ॥ बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥ ४ ॥ हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥ ५ ॥ तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -ब्रह्मादिक-ब्रह्मलोक वगैरे, बळिये-बलवान, पद्मनाभ-श्रीविष्णू, सेवाऋणी-सेवेने ऋणी. कामधेनु-इच्छिलेली वस्तू देणारी दैवी गाय, त्रिपुटो-ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान किंवा ध्येय, ध्याता, ध्यान, अशा तिघांचा समुदाय, लाटे-भरपूर मोठे अर्थ - ज्याच्या लाभापुढे ब्रह्मादिकांचेही लाभ ठेंगणे आहेत अशा ईश्वराच्या संगतीचा लाभ आम्ही मिळविला आहे; त्यामुळे मी शरणागत मोठा बलवान बनलो आहे. १ मी वासनेचा त्याग करून देवाच्या भजनाची जोड मिळविली आहे आणि त्यायोगे पद्मनाभ श्रीविष्णूलाच ऋणी करून ठेविले आहे. २ ईश्वराची ही भक्ती म्हणजे कामधेनूप्रमाणे असून तिच्या दुधाला अंत नसतो. जशी ज्याला इच्छा होईल तसा त्याच्यावर वर्षाव होत राहील. ३
सार्थ तुकारामगाथा २१ बसल्या ठिकाणीच तिच्या दुधाला भरते येते व त्याच्या प्राशनाने एवढी लय साधते की ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होते ध्येय, ध्याता, ध्यान यातील भेद मावळतो ३ काय जाणावयाचे आहे ते, जाणणारा व त्याची झालेली जाणीव अशा वेगळया अवस्थाच शिल्लक राहात नाहीत ४ या जगात आम्हासारख्या विष्णुदासांना हरिनाम हाच एक विसावा आहे. नारायणाने विसावा आमच्याच देहांत घेतलेला आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात की ईश्वरप्राप्तीच्या या भोजनाचा लाभ फार मोठाच आहे येथे कुणीही उपाशी राहू म्हटले तरी राहू शकत नाही ६ ४५ दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । नलगे ठाव धुंडावा ॥ १ ॥ इतुले जाणावया जाणा । कोठे तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । १जाणतेचि साधावे ॥ २ ॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसे भासतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जागा । नको २धासपू घाउगा ॥ आहेसि तू आंगा । अगों डोळे उघडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुजें-द्वैत, जीवशिव, आत्मापरमात्मा ही भिन्न असल्याची जाणीव खंडे-सडल्यावर सपल्यावर, पारधी-शिकारी, धासपू-चाचपू, घाउगा-व्यर्थ अर्थ - एक द्वैत संपले की जे उरते ते सर्व परमेश्वराचेच रूप आहे मग त्याला शोधण्यासाठी आपल्या- बाहेर कुठे जावे लागत नाही १ पण हे ज्ञान होण्यासाठी मनाने मनाकडेच अंतर्मुख व्हावयास हवे, कारण पारध्यासच पारध्याच्या खुणा माहित असतात २ आधी देह हासुद्धा खरा नाही, मग त्यापासून निर्माण झालेला पसारा खरा कसा असणार ? शेतातले बुजगावणे हे जसे चोरास रक्षण करणारेच वाटते त्याप्रमाणे देह आपणास खरा वाटतो ३ म्हणून तुकाराम महाराज जागे करीत आहेत की, उगाच इकडे तिकडे ध्येयं चाचपू नका, देहातच तुम्ही ईश्वरस्वरूप आहात, हे देहातीलच ज्ञानदृष्टीने तुमच्या ध्यानात येईल ४ विवरण - संताच्या अभंगात द्वैताद्वैताचा उल्लेख नेहमी येतो मग द्वैती की अद्वैती ? याचे उत्तर संत तत्त्व ज्ञानाच्या वा बोधाच्या दृष्टीने अद्वैतीच त्यांची अनुभूती अद्वैताची दुजेपणा किंवा द्वैत संपल्यावर जे स्वरूप उरत तोच एक परमेश्वर हा या अभंगाचा मुख्य गाभा आहे दुजेपणा संपावा, भेद सर्व नाहीसा व्हावा, जीव वेगळा, ईश्वर वेगळा अशी भावना उरू नये यासाठी तर आग्रह आहे 'भेद तुटलीयावरि। आम्ही तुमचीच हो हरी' अशी जाणीव सर्वत्र आहे 'कासयाने पूजा करू केशीराजा' नावाच्या सर्वोत्तम अभंगात या अद्वैतानुभूतीचे फार चांगल वर्णन आलेले आहे नाव निरनिराळी म्हणून काय मूळ रूपही वेगवेगळे असावे ? जलप्रवाह निराळा, तरंग निराळा, सुवर्ण निराळे, अलंकार वेगळे किंवा तुकोबाच्या भाषेत बोलायचे म्हणजे 'खडा साळी साखर । झाला नामाचाची फेर ' नामाची भिन्नता, परंतु स्वरूपाच्या दृष्टीने एकताच की 'तुज मज नाहीं भेद' अशीच अनुभूती सर्वत्र आहे मग द्वैत आले कोठून ? 'अद्वैतीं तो नाहीं माझें समाधान ' असही तुकारामबुवा का म्हणतात ? याचे उत्तर अस की बोधाला, प्रचीतीला, तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर अद्वैतच; पण या अद्वैताची अनुभूती येणार ती द्वैताच्या साह्याने भोगायला द्वैत, अनुभूतीत अद्वैत दिसायला दोन पण असायला एक अशी वस्तुस्थिती आहे डोळे दोन पण दृष्टी एक ओठ दोन पण गोष्टी एकरूपाच्या एक वीजच वृक्षाच्या रूपाने आले सुवर्णच नाना अलंकाराच्या रूपानी व्यक्त झाले, अनेक लहरीच समुद्रावर उमटल्या, पण या सर्वात अनुभूती एका अव्यक्ताचीच आहे घरात सूर्य अस्तित्व दिसतो वाळात अग्नी वेगळा दिसतो पण सूर्याची व अग्नीची व्यापकता सर्वत्र जगत उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा हीच अनुभूती उदक व तरंग या द्वैतापासून यावयाची तत्त्वर बीजा पोटीं । वीज तश्यवरा शेवटी, 'असे हे द्वैताद्वैत चक्र आहे 'तुझी माझी एक ज्योती' हे अनुभवाचे सार आहे अध्ययनाला सुद्धा व्यक्त होण्याचा अद्वैताला द्वैतावर येण्याचा ध्यास असतो कारण त्याशिवाय सुख नाही त्या मूलस्थानाचा एकट्यास करमनास होणे म्हणून तो बहुविध आवा- रानी नटतो, व्यक्त होतो एका बीजाचा नाश झाल्यासारखा वाटून तरी अनेक टपोऱ्या दाण्याचे कणीस दिसते या अनेक दाण्यातही एक बीजच विविधनान नटलेल असत १ जाणे तणेंचि साधाव्या २ चाचपू
२२ सार्थ तुकारामगाथा ४६ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥ १ ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ २ ॥ कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पाये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भेदाभेदभ्रम-हे माझे, हे दुसऱ्याचे, हा पापी, हा पुण्यवान, हा लहान, हा मोठा अशा जाणिवेचा भ्रम, वर्म-खूण. अर्थ :- सर्व जगच विष्णुमय आहे, म्हणजे एकच तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे असे मानणे हा वैष्णवांचा धर्मच आहे. यात भेद मानणे, निराळेपणा कोणत्याही कारणाने कल्पिणे हे वाईट आहे. १ तुम्ही खरे भगवंताचे उपासक असाल तर जे कराल ते सत्याचे स्वरूप जाणून हिताचे असेल तेच करा. २ कुणाही जीवाचा मत्सर करु नका, कारण सर्वत्र एकच परमेश्वरतत्त्व भरून राहिले आहे, व त्या सर्वेश्वर पूजनाचे तत्त्व ध्यानात असू द्या. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व अवयव एकाच देहाचे आहेत. जर एका अवयवास सुखाची किंवा दुःखाची अनुभूती आल्यास ती त्या जीवात सारखीच जाणवते. ४ विवरण :- वारकरी संप्रदायात या अभंगास फार महत्त्व आहे याचे कारण असे की दोन महत्त्वाचे विचार या अभंगात थोडक्या शब्दांत सांगितले आहेत सर्व जगतात एकच परमेश्वर भरून राहिला आहे असे समजून सर्व- श्वराची पूजा करण्याचीच वृत्ती आपली असावी असा एकत्वाचा बोध फार परिणामकारक रीतीने वर्णन केला आहे. या बोधाचा व्यावहारिक उपयोग म्हणजे सर्वत्र परमेश्वराचाच अंश व्यक्त झालेला असल्यामुळे हा लहान, हा मोठा हा उच्च, हा नीच, हा चांगला, हा वाईट, हा पुण्यवान, हा पापी असे भेद उरू नयेत एकट्याचाच हा सर्व विस्तार असल्यामुळे समानबधत्त्वाची जाणीव असणे जगण्याचे आहे, हा यातून निघालेला दुसरा विचार. मग कुणाचाही मत्सर करू नये हे ओघानेच आले. हेवा दावा, मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वरी अशाचा व्यक्त झालेला आकार असेल तर ? असा प्रश्न सर्वांच्याच मनासमोर उभा राहिला तर पुजळसे हेवेदावे मिटतील कटुता कमी होईल. भागवत धर्माने या समत्वाच्या दृष्टीने फार मोठी कामगिरी सामाजिक क्षेत्रातही केली आहे भेददृष्टीने पाहणे संतानी अमंगल मानले आहे ४७ आम्ही तरी आस । जालों टाकोनि उदास ॥ १ ॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ २ ॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगी हा चढो ॥ ३ ॥ तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसों जैसों ॥ ४ ॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥ ५ ॥ तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आस-इच्छा, आशा, तुरंगी-घोड्यावर मानामान-मान किंवा अपमान, खंती-काळजी अर्थ :- देहबुद्धीची आशा सोडून आता आम्ही उदास झालो आहोत. १ आता परमेश्वरा, मरणाचे भय कुणास आहे ? २ आता देह कुठे पडून जावो अथवा घोड्यावर चढो, आम्हांस त्याचे काय ? ३ यामुळे होणारे सुखदुःखादी विकार तुमचे तुम्हापाशीच राहोत, आमचा त्यांच्याशी संबंध नाही; आम्ही आहो तसेच राहू. ४ मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांचा नाश करून आम्ही आता त्यांच्या पलीकडे गेलो आहोत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता यासंबंधीची मनांत बिलकुल चिंता उरलेली नाही. ६ ४८ निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥ १ ॥ मज हेंही नाहीं तेंही नाहीं । वेगळा वोहों पासुनी ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा २३ देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥ ३ ॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुम्हाचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देहभोग-देहास होणारे सुखदुःखादी विकार अर्थ :- आमची कोणी निंदा करोत अथवा कोणी स्तुती करोत, कोणी मार देवोत अथवा कोणी पूजा करोत, १ मला पहिल्याचे दुःख नाही दुसऱ्याचे सुख नाही. मी सुखदुःखान्याहोपेक्षा निरच्छाच आहे. २ देहभोगानुसार जे जे बरेवाईट प्रसंग येतील ते सर्व सारख्याच दृष्टीने मी भोगीन. त्याचे समत्वाने स्वागतच करीन ३ कारण ही सर्वच सुखदुःखे माझी स्वतःची नसून जनार्दन स्वरूपाच्या नारायणास ती मी अर्पण केली आहेत, मी तसा अलिप्तच राहिलो आहे. ४ विवरण - वरील दोन्ही अभंगात भक्ताच्या उदासीन वृत्तीचे रहस्य फार समर्पक रीतीने वर्णन केले आहे. त्याने आपले सर्व भाव व सर्व क्रिया सर्वज्ञ परमेश्वरास अर्पण केले असल्याने तो त्यात गुंतून राहात नाही, त्या मानअपमान, सुखदुःख याच्या पलिकडे असतो स्तुतिनिंदा त्याला सारखीच असते भगवद्गीतेच्या बाराव्या अध्या- यात 'यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी' (जो कशाचाही आनंद मानीत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही व इच्छाही करीत नाही, समचि शुभाशुभ फलही ज्याच्या मनात नसते) अशा भक्ताचा गौरव केला आहे त्याची वागणूक 'तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी' (निंदास्तुती समान मानणारी) असते सर्व साधुसंतांनी हाच बोध आपल्या आचरणातून व्यक्त केला आहे 'निंदा स्तुति कोणी करो दया माया । न धरीं चाड या सुखदुःखा' असे तुकारामबुवांनीही म्हटले आहे ४९ जन विजन जालें आम्हा । विठ्ठलनामा प्रमाणे ॥ १ ॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ २ ॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥ ३ ॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विजन-एकान्ताची जागा, पट्टण-शहर, सरता झाला-सारखा झाला, विठ्ठल् रूपाने भरून राहिला अर्थ :- एका विठ्ठलनामामुळे आम्हास जनसमुदायात राहून विजनवासाची, एकान्ताची गोडी मिळाली १ जिकडे आम्ही पाहू तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाईचीच रूपे आम्हास दिसतात २ वन असो अथवा नगर असो विठ्ठलवासामुळे सर्व ठिकाणे आम्हास सारखीच झाली ३ या अद्वितीय अशा समभावाच्या आनंदात आम्हाला सुख- दुःखाची आठवणही होत नाही; तुकाराम महाराज त्याच कौतुकाने नाचत आहेत. ४ विवरण-या अभंगात परमेश्वरी कृपेने भाग्यवान झालेल्या भक्ताची अवस्था समत्वाची कशी होते याचे उत्कृष्ट चित्रण आले आहे सर्वत्र विठ्ठलभावच प्रतीतीस आल्यामुळे सुखदुःख, स्तुति-निंदा याची भावना नष्ट झाली जनात आहोत की विजनात आहोत हेही आमच्या ध्यानात येत नाही असे बुवा सांगत आहेत या ठिकाणी 'जन विजन जाले आम्हा' या शब्दातील रहस्य समजावून घ्यावयास हवे जनसमुदाय व वननिवास ही स्थिती आम्हास समान वाटते म्हणजे वनातील एकान्त गर्दीप्रमाणे वाटतो, असे नसून शहरातील जनसमुदायातही एकान्ताचा अनुभव येण्याइतपत आमची विठ्ठलाशी तद्रूपता झाली आहे असा भावार्थ या विजनवासाचे, एकान्ताचे, वननिवासाचे महत्त्व साधकाच्या आयुष्यात फार मोठे आहे 'अरतिर्जनसंसदि' सर्वसामान्य जनांच्या समूहाची आवड नसणे हे एक आत्मज्ञानी माणसाचे लक्षण गीतेत सांगितले आहे हा आत्मज्ञानी 'विविक्त सेवी' म्हणजे विशिष्ट अशा एका- न्ताच्या स्थळी राहाणारा असतो 'एकान्तेवीण प्राणियांतें बुद्धि कैंची ?' म्हणून समर्थांनीही विचारले आहे यासाठी तुकारामबुवांनी गावातील गजबजाट सोडून भंडाऱ्याच्या डोंगरावरील वृक्षवल्लीच्या व वनचरांच्या सोबत्यात मन रमविले हा एकान्ताचा निवास बुवांच्या मनास फार रुचला येथे आपल्याच मनाशी आपणच संवाद
२४ सार्थ तुकारामगाथा करू शकतो ' सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाहीं बहुमता ' असा स्पष्ट निर्वाळा बुवानी दिलेला आहे एकान्तात आपल्या मनासच साक्षी ठेवून वागता येते सर्वसामान्य लोकांचे बहुमत उपयोगी नसते या आत्मज्ञानी भक्ताच्या निवासाचे व एकान्तप्रियतेचे वर्णन ज्ञानेश्वरांनी फार बहारीने केले आहे ' आणि तीर्थे धौतें तटें । तपोवनें चोखटें । आवडती कपाटें । बसवू जया ॥ शैलकक्षांचीं कुहरें । जलाशय परिसरें । अधिष्ठी जो आदरें नगरा नये । बहु एकान्तावरी प्रीति । जया जनपदाची खती । जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो " साधुसंत वा आत्मज्ञानी याप्रमाणे एकांतवासात प्रभूशी समरस झाले असले तरी ते सुख इतरेजना देप्यासाठी ते लोकाच्यातही मिसळत असतात हेही येथे ध्यानात घ्यावयास हवे ' आपण जेवुनी जेववी लोका । सतपंण करी तुका ' म्हणून बुवानी आपल्या कार्याचे मर्म मागितल आहे लोकाच्या उद्धारासाठी जेव्हा सत पुरुष समुदायात येतात तेव्हाही त्याच एकान्ताचे ममत्व कायम असत ५० हिरा ठेविता ऐरणीं । वाचे मारिता जो घणीं ॥ १ ॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ २ ॥ मोहरा होय तोचि अगिं । सूत न जळे ज्याचे सगिं ॥ ३ ॥ तुका म्हणे तोचि सत । सोसी जगाचे आघात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - करणी-कृत्रिम मणी काच इ० मोहरा-ज्याच्या संगतीत आगीतही सूत जळत नाही अस रत्न अर्थ - जो हिरा एरणीवर हातोडयाचे आघात सहन करूनही फुटत नाही तोच खरा १ त्यालाच खरे मोल असते कृत्रिम काचेसारखा असेल तर त्याचा लागलीच चुराच होतो २ ज्याच्या संगतीत अग्नीच्या मुखातही सूत जळत नाही तोच खरा मोहरा मणी म्हणायचा ३ जो जगाचे आघात सहन करील तोच खरा सत म्हणावा असे तुकाराम महाराज म्हणतात ४ विवरण -सताच्या चरित्राच व वर्तणुकीचे महत्त्व समकालीन लोकांना बहुधा वेळीच उमगत नसत संत फटकळपणे समाजाच्या, व्यक्तीच्या गैरवर्तनावर बोट ठेवून कधी कटु शब्दात कधी मृदु शब्दात जाणीव देत असतात सर्व काळास उपयुक्त होईल असा त्याचा उपदेश असतो स्वतः अतिशय निर्लोभी मानापमानाच्या पलीकड गेलेले असे त असतात याच्या या वृत्तीमुळे ढोंगी स्वार्थी, लोभी माणसांची अडचण होते मग ते संताचा द्वेष करायला प्रवृत्त होतात ज्ञानेश्वर एकनाथ, तुकाराम इत्यादी सत्पुरुषांचा झालेला छळ प्रसिद्ध आहच स्वतः संताना याचं काही नसत लाव रागावले तरी सुत पुरुष शांत असतात ' विश्व रागें झालिया वन्ही । संते सुखें व्हावे पाणी ' अशी त्याची शिकवण असते जगाचे आघात संतांना सहन करावे लागतात ५१ आलिंगने घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥ १ ॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ २ ॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । त्याची केली पाये सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सायुज्यता-मुक्तीचा एक प्रकार सीमा-अखर पायापें-पायाशी अर्थ - संताच्या आलिंगनाने सायुज्यतेची मुक्ती मिळते १ संतांचा महिमा हा असा आहे त्याविषयी बोलणेही अपुरे पडते सायुज्यता मिळाल्यानंतर दुसरे काय साध्ययचे २ सर्व तीर्थे व सर्व पर्वकाळ संताच्या पद्याशीच असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, संताची सेवा केली की तो देवास पोचते ४ विवरण -या अभंगात संत महिमा वर्णन केला आहे संताच्या सहवासात सर्व तीर्थे सब पुण्ये प्राप्त होतात अशी ग्वाही सबच संतानी दिलेली आहे या सताच्या पायी नामदेव-तुकारामानी आपला जीव काढून ठेविला होता ' संतमहंत माझी पूजा । आन भाव नाहीं दुजा । अशी निष्ठा स्वतः तुकोबाची होती संताच्या पादुका सायावर
सार्थ तुकारामगाथा २५ घेऊन मी आनंदाने नाचेन असे त्यांनी एका अभंगात म्हटले आहे संताच्या आलिंगनाने सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त होते असे म्हटले आहे स्वतः संतांना कसल्याही मुक्तीची जरूरी नसते त्यांना केवळ ईश्वरसान्निध्य व भजन याचीच गोडी असते पण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने मुक्तीचे किंवा मोक्षाचे ध्येय सांगितले आहे आपल्या परंपरेत मुक्ती चार प्रकारच्या सांगितल्या आहेत सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चार मुक्ती होत भागवतात सार्टि ही पाचवी मुक्ती सांगितली आहेत ५२ माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥ १ ॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें बसविलें अंग ॥ २ ॥ टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥ ३ ॥ याये कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उगाणा-गणना, हिशेब, कामावरी-कामादिक वृत्तींवर अर्थ - देहाविषयी मी, माझा देह असा जो भाव होता तो सर्व संपला, त्याचा हिशेब नीटपणे झाला १ आता सर्व भोग व सर्व त्याग तो पांडुरंगच बनलेला आहे, कारण माझ्या सर्वांगात त्याचीच वस्ती आहे तोच प्रेरक आहे २ थोडाफार घात अथवा फायदा करण्याचे कारण जी देहबुद्धी होती तीच संपवून टाकली आहे ३ आता कामादिक वृत्तींवर यावे अशी अवस्थाच उरलेली नाही आता पुढल्या इच्छा मी कराव्यात असे राहिलेच नाही सर्व काही प्रभूच बनून राहिला आहे ४ ५३ सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ १ ॥ मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें ॥ तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणे दर्शने ॥ २ ॥ मन शुद्ध तया काय करितो माळा । मदित सकळां भूषणांसी ॥ हरीच्या गुणे गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥ ३ ॥ तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णू त्याची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चिंतामणी-चिंतलेले देणारा रत्न, स्फटिक-कान्तियुक्त पारदर्शक दगडाची एक जात, आगळा-श्रेष्ठ, थोर अर्थ - ज्याची समूळ देहबुद्धी गेलेली आहे अहंकार गळाला आहे, सर्व आशा संपली आहे त्याचे सर्व शरीरच मनात असेल ते देणाऱ्या रत्नाप्रमाणे आहे ज्याच्या मनात निंदा, हिंसा, कपटबुद्धी उरलेली नाही तो स्वच्छ कान्ती देणाऱ्या स्फटिकाप्रमाणेच आहे १ सर्व मोक्षाचे तीर्थ जे काशी तिथे आता जायला नको, कारण याच संत- पुरुषापाशी सर्व लोक आता येतात सर्व तीर्थांचा तीर्थ तोच स्वतः बनलेला असतो त्याच्या दर्शनानेच मोक्ष मिळतो २ मग या सत्पुरुषाच्या गळ्यात माळ असो नसो, ज्याचे मन शुद्ध असते त्यास माळेसारख्या बाह्य उपचाराची काय आवश्यकता आहे ? इतर भूषणांनी अथवा अलंकारांनी भूषित होण्याची जरूरी तरी काय आहे ? ते परमेश्वराच्या गुणाचे संकीर्तन नेहमीच करीत असतात, त्यामुळे त्याचे चित्त सदोदित आनंदाने भरून राहिलेले असते ३ या श्रेष्ठ पुरुषाने आपले तन मन धन हे सर्वस्व परमेश्वरास अर्पण केलेले असते, त्याला स्वतःला कुठलीही आशा उरलेली नसते तुकाराम महाराज म्हणतात असा सत्पुरुष परिसाहूनही श्रेष्ठ आहे त्याची महती मी काय वर्णन करू ? ४ ५४ आहे तें सकळ कृष्णासि अर्पण । न कळता मन दुजें भावी ॥ १ ॥ म्हणउनी पाठी लागतील भूतें । येतों गवसीत पाचजणे ॥ २ ॥ तु गा ४
२६ सार्थ तुकारामगाथा ज्याचें त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥ ३ ॥ तुका म्हणे काळें चेपियेला गळा । मी मी वेळोवेळां करीतसे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भावी-भावना धरते, मानते, भूतें-पंचेंद्रिये व पंचविषय, वचलें-विस्मरण झाले. अर्थ :- जे आहे ते सर्व श्रीकृष्णाला अर्पण करावे, कृष्णाच्याच सत्तेने व प्रेरणेने सर्व क्रिया होतात असे मानावे. हे ज्याना कळत नाही ते मात्र अज्ञानामुळे सर्व कर्मे मीच केली अशी विपरीत भावना मनात धरतात. १ त्यामुळेच त्याच्यामागे पचेंद्रिये व पचविषय याची भुते लागतात. यात ते गुरफटून राहतात. २ आपल्याकडून होणारे सर्व कर्मे त्या परमेश्वराकडूनच होतात व ही त्यालाच अर्पण करायची असतात, याची आठवण न राहिल्यामुळे फसगत होते व विविध विषयाच्या तावडीत सापडण्यास अवसर मिळतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचा म्हणजे देहबुद्धी धारण करून पचविषयात रममाण होणाऱ्या माणसाचा गळा काळ एकसारखा चेपीत असतो, तरी हा मी मी, माझे माझे असेच अज्ञानाने म्हणत असतो ४ ५५ महारासि सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥ तपा प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ २ ॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥ २ ॥ ज्याचा सग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- कोपे-रागावतो, नातळे-जवळ करु नये अर्थ - या अभगाचे अर्थ दोन प्रकारानी लाविता येतात. एक आध्यात्मिक अर्थ, दुसरा लौकिक. पहिला अर्थ असा - क्रोध हा महार मानला आहे. याला म्हणजे क्रोधरुप महाराला जो शिवतो तो ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणास राग आला तर तो महार या पदवीस जातो. १ या क्रोधयुक्त ब्राह्मणाने देहान्त प्रायश्चित्त जरी घेतले तरी तो शुद्ध होणार नाही. २ या क्रोधरूपी चाडाळास कधीही जवळ करु नये, कारण त्याच्या अंतरगात विटाळ असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा सग ज्याच्या मनात तशी जात त्याची होते क्रोधरूप महारास त्याने मनात स्थान दिल्यास तोही महारच होईल ४ दुसरा लौकिक अर्थ असा की, महारास शिवल्यावर जो ब्राह्मण संतापतो तो खरा ब्राह्मणच नव्हे. १ अशा संतापी ब्राह्मणास, दुसऱ्यास अस्पृश्य मानणाऱ्या ब्राह्मणास देहत्यागाचे प्रायश्चित्तही कमीच होईल. २ हा मनुष्य चांडाळास जवळ करीत नाही, कारण त्याच्या अंतरंगातच विटाळ असतो, म्हणून त्यास तो चांडाळ वाटतो. ३ हा महार, हा चांडाळ असाच ध्यास एकसारखा त्याच्या चित्तात असल्यामुळे तो त्याच जातीचा होतो. जसे चिंतन तसे त्याला फळ मिळते ४ विवरण :- तुकोरामबुवाच्या वेळेच्या आधीपासून हिंदू धर्मात कर्मकाडाचे, बाह्य उपचाराचे माहात्म्य फार माजले होते पण एक जात उच्च, एक नीच असा फरक सताच्या दृष्टीत नसल्याचे दिसून येते जातिबाह्य, हीन जातीचा, अस्पृश्य, चाडाळ, पापकर्मी यांच्या उद्धाराची मोय भागवतधर्मीय संतानी केली. 'म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजही व्हावें । परि वैष्ह्णवांचे नांवें । पशूचेही लाभो' अशी ग्वाही ज्ञानदेवानी दिली दगडाप्रमाणे पाप- योनीतील मूर्ख असले तरी एकदा त्याची दृष्टी भगवंताकडे लागली की मग काही उणीव पडू नये 'जाति कुळवर्ण। हे आघवेचि गा अकारण' अशी घोषणा करून ज्ञानेश्वरानीच या क्रातिकार्यास सुरुवात केली जन्मजात जातिभेद परमेश्वराच्या दरबारात नाहीचा अशी नवी विचारसरणी रूढ झाली 'जाति व्यर्थित पडें विपुले' असा निर्णय ज्ञानेश्वरानी दिला आहे भगवद्गीतेने दिलेल्या सवलतीवर भाष्य करिताना ज्ञानेश्वरानी म्हटले आहे 'यापरी पापयोनिही अर्जुना । का वैश्य शूद्र अगंना । मातें भजता सदना माझिया येती' निदान भक्तीच्या प्रातातील जातिभेद कमी होत राहून मानवाळी प्रत्येक जमातीत एक एक गत्पुरुष निर्माण झाला. महार जातीत चोखामेळा निर्माण होऊन या नवविचारांना एक प्रकारचा विजयच झाला बोन्धा, कर्ममेळा इत्यादी अस्पृश्य सताच्या अभंगातील
सार्थ तुकारामगाथा २७ सामाजिक दृष्टणे या संदर्भात पाहण्यासारखे आहे चोखोबांचे विटाळाचे अभंग तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत त्यांच्या मते सोवळेओवळे ज्याच्यात्याच्या पाहण्यावर आहे प्रत्यक्ष विठ्ठल पाहिला तर ? तो 'सोवळ्याच्या ठायीं सोंवळा आहे । ओवळ्याचे ठायीं ओवळा का न राहे ? चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा' म्हणून चोखोबानी निर्णय दिला आहे समत्वाची हीच विचारसरणी नंतर सर्वच संतानी पुढे नेली कबीरासारख्या फटकळ वाणीच्या संताने एकदम विचारले, एक बह्मसे विश्व रच्यौ है, को बाह्मम को शूद्रा ?' एकाच ब्रह्मापासून जर सर्व जीवांची उत्पत्ती असेल तर हा पवित्र, हा अपवित्र हा भेद कसा आला ? एकदा हरीचे त्वरित झाल्यावर मग त जातीचे कुणीही असले तरी 'जाती कुळ नाहीं तयास प्रमाण' अस तुकोबानी एके ठिकाणी सांगितले आहे अशा हीन जातीयाची एक नामावलीच तुकारामबुवानी 'पवित्र तें कुळ पावन तो देश' या अभंगात दिली आह 'उत्तम कुळीं जन्म, क्रिया अमंगळ' असेल तर 'जातीचा ब्राह्मण न करितां सध्या- स्नान । तो एक नावाचा ब्राह्मण, होय हीनाहूनी हीन' म्हणून तुकोबानी आपले जातिभेदावरील विचार स्पष्ट केले आहेत हाच विचार पुढे मराठीतील इतर साधुसंताच्या उपदेशातही येत राहिला एकनाथाय्या चरित्रातील अनेक कथावरून हा जातिविषयक विचार अध्यात्माच्या, भक्तीच्या क्षेत्रातून सामाजिक व्यवहारातही उतरू पाहात होता असे दिसून येईल ५६ तेलणीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥ १ ॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न घरीं कांही ॥ २ ॥ नावडे¹ लोका टाकिला गोहो । बोडिले डोके सांडिला मोहो ३ ॥ शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनीं घर भरिले मागें ॥ ४ ॥ पिसारानें² माजिले घर । नागविले ते नेणे फार ॥ ५ ॥ तुका म्हणे वाच्या रागें । फेडीले सावले देखिले जगें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - भिडा-भिडेने, नावडे-आवडत नाही गोहो-नवरा, बोडिले-हजामत करून घेतली वाच्या रागें-उवांच्या रागाने सावले-लुगडे अर्थ-आपले हित कशात आहे हे न पाहता उगाच संकोच करून वागणाऱ्या माणसाची फजिती कशी होते हे सांगताना तुकारामबुवा म्हणत आहेत, कोणी एक मूर्ख मनुष्य काही कारणाने तेलिणीवर रुसला आता तिच्याकडे तेल कसे मागावे ? या संकोचाने तो भाकरी कोरडीच खात राहिला १ आपले हित पाहून संकोच न धरता त्याने वागायला हवे नाही तर त्याची फजितीच होणार २ लोकांना आवडत नाही म्हणून कोणा एका येडपट स्त्रीने आपल्या पतीचाच त्याग केला व मोह सोडून स्वतःचे डोके बोडून घेतले यात तिचेच नुकसान झाले ३ दुसऱ्या एका मूर्ख स्त्रीने शेजारच्या स्त्रीशी भांडण झाले म्हणून आपले घर उघडे टाकून घराबाहेर प्रयाण केले व तिच्यानंतर कुत्र्यांनी तिचे घर भरून गेले, ४ घरात पिसवा फार झाल्या म्हणून एका शहाण्या माणसाने घरच पेटवून दिले त्यामुळे त्याचेच फार नुकसान झाले ५ एका गलिच्छ स्त्रीच्या लुगड्यात फार उवा झाल्या म्हणून तिने अंगावरचे लुगडेच फेडून टाकले तुकाराम महाराज म्हणतात यात तिचेच मोठे नुकसान झाले तिचे नग्नत्व लोकांना दिसले ना ! अनित्येनी लोक अशा प्रकारे स्वतःचे हित कशात आहे हे न पाहता मूर्खपणाने वागतात ६ ५७ मज दास करी त्याचा । संतदासाच्या दासाचा ॥ १ ॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ २ ॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥ ४ ॥ १ नाविले २ पिसागेने
२८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - कल्पवरी-युगाच्या अखेरपर्यंत, नीचवृत्तिकाम-हलक्या वृत्तीमधील कोणतेही काम, वेचाये-खर्च व्हावेत अर्थ-साधुसंगतीचे माहात्म्य गाताना तुकारामबुवा म्हणत आहेत, संताचे जे दास आहेत त्याच्या दासाचा दास मला परमेश्वरा, केलेस तरी चालेल १ असे झाले तर मग अनेक युगापर्यंत मला गर्भवास घडून जन्मावर जन्म लाभले तरी चालतील २ तुझे नाव माझ्या मुखात असले म्हणजे वाटेल तसली हलकी कामेही मी आनंदाने करीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरा, तुझ्या सेवेतच माझे सर्व संकल्प याप्रमाणे खर्च व्हावेत ४ ५८ सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ १ ॥ त्याचे दर्शन न व्हावे । शव असता तो जिवे ॥ २ ॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥ ३ ॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शव-प्रेत, कुशब्द्-वाईट शब्द, पर-परतत्त्व अर्थ - ज्याचे चित्त नेहमीच वृथा तळमळ करीत असते, हळहळत असते, १ त्याचे दर्शन सुद्धा मला होऊ नये कारण तो जिवंत असला तरी प्रेताप्रमाणेच असतो २ वाईट शिवराळ शब्दाच्या घाणीने त्याची वाणी अमंगल बनलेली असते ३ परतत्त्वाविषयी, ईश्वराविषयी त्याला एक शब्दही माहित नसतो परोपकारही तो जाणीत नाही ४ ५९ जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत शव लोकीं ॥ १ ॥ त्याचे१ वय नित्य काळ लेखीताहे । रागें दांत खाय करकरा ॥ २ ॥ जयाचिये द्वारी तुळसीवृंदावन । नाही ते स्मशान गृह जाणा ॥ ३ ॥ जये कुळी नाही एक ही वैष्णव । त्याचा वुडे भवनदीतापा ॥ ४ ॥ विठोबाचे नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष ते कुड रजकाचे२ ॥ ५ ॥ तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया३ ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - काळ-यम वैष्णव-विष्णुभक्त, भवनदीतापा-संसाररूपी नदीमधील नाव, रजकाचे- परिटाचे, चर्मकाचे-चांभाराचे, काष्ठ-लाकूड अर्थ - ज्याच्या घरी एकादशीचे व्रत नाही त्याचा देह सजीव असला तरी समाजात त्याची एखाद्या प्रेताइतकीच किंमत समजावी १ त्याचे जाणारे दिवस प्रत्यक्ष यम रागाने दात करकरा खाऊन मोजीत बसला आहे २ ज्याच्या घराच्या दारात तुळसीवृंदावन नाही त्या घरात घर न म्हणता स्मशानच समजावे ३ ज्याच्या कुळात एकही विष्णुभक्त झाला नाही त्याची संसारसागर तरून जाण्याची नाव बुडाली आहे असेच समजावे ४ जो मनुष्य तोंडाने विठ्ठलाचे नाव उच्चारीत नाही त्याचे तोंड म्हणजे चामडे बुडवायचे चांभाराचे कुंडच होय ५ तुकाराम महाराज म्हणतात जो कीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय म्हणजे निर्जीव लाकडेच म्हणावीत ६ विवरण -वारकरी संप्रदायातील पंथीयांना काही आचारधर्म साधुसंतानी बसवून दिले आहेत त्याचे उपास्य दैवत श्रीविठ्ठल असावे त्याने एकादशी व्रत करावे, त्याच्या दारात तुळसीवृंदावन असावे, त्याने विठ्ठलाचे नामस्मरण करावे, त्याने कीर्तनास जावे असा काही साधनमार्ग आखून दिलेला आहे हा न पाळणारा मनुष्य कसा वाया जातो याचे वर्णन या अभंगात आहे वारकरी संप्रदायात एकादशी या महाव्रताचे महत्त्व विशेष सांगितले आहे या दिवशी उपवास करून हरिसस्मरणात सर्व वेळ घालविणे हा मुख्य हेतू असतो उपवास हे परमेश्वरप्राप्तीचे एक साधन म्हणून उपनिषदातून वर्णन आहे 'तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिषन्ति यज्ञेन दानेन तपसानाशकेन' म्हणजे वेदाभ्यास, यज्ञ, दान, तप व अनाशक म्हणजे अन्नपाण्यावाचून राहणे हे पाच परमेश्वरप्राप्तीचे माग आहेत अन्नपाणी वर्ज्य करून भगवंताजवळ एकचित्ताने राहणे हे उपवासाचे रहस्य आहे भागवतात एकादशीच १ त्याचे दिवस २ चर्मकाचे ३ हरीच्या जो
सार्थ तुकारामगाथा २९ माहात्म्य सांगितले आहे तुकोबांनी अनेक अभंगातून एकादशीचे महत्त्व परोपरीने सांगितले आहे 'एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्याची गति होईल नेणों' अशी काळजी एका अभंगात व्यक्त केली आहे 'एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन' या अभंगात एकादशी न करणारांची गती काय ती सांगून त्यांनी एकादशीमाहात्म्य वर्णन केले आहे ६० आम्ही सदैव सुडके । जवळी येता चोर धाके । जाऊ पुडो भिके । कुतरीं घर राखती ॥ १ ॥ नादणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वाया भागा । थोरपण अगर । तरी ऐसे आणावे ॥ २ ॥ अक्षय साचार । केले सायासानीं घर । एरडंसिवार । दुजा भार न साहती ॥ ३ ॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन तो करी । कोण गुरें वासरे ॥ ४ ॥ जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीची ॥ ५ ॥ ॰तुका म्हणे देवा । अवघा निरविला १ हेवा ॥ कुटुबाची सेवा । तोचि करो आमुच्या ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सुडका- लंगोटी धारण करणारा, दरिद्री, धाके- भितो, पुढी- रोजच्या भिक्षेस, वाया- विनाकारण, भागा- श्रमता, साचार- खऱ्या स्वरूपाचे, सिवार- शेराचे लाकूड, निरविला- दूर केला अर्थ - थोर भक्त किती उदासीन व निरिच्छ असतो याचे वर्णन या अभंगात बुवानी फार चांगल्या प्रकारे केले आहे ते म्हणतात, आम्ही नेहमीच असे दरिद्री म्हणून भाग्यवान आहोत आमच्या घरी चोर येतच नाहीत, आले तर तेच भिवून जातात आम्ही बाहेर कुठे भिक्षेस अथवा भोजनाच्या व्यवस्थेस गेलो असता आमच्या घराचे रक्षण कुत्री करतात म्हणजे रक्षण करण्याजोगे तेथे काही नसतेच १ अशी भाग्याची वागणूक कुणाची आहे सांगा तुम्ही सर्वजण व्यर्थ भागता, दमता तुम्हास थोरपण हवे असेल तर आमच्या सारखे वागा २ आम्ही पाहा मोठ्या कष्टाने खरेखुरे घर उभे केले आहे त्याला लाकडे एरंडाची व शेराचीच वापरली आहेत, कारण याच्या- शिवाय दुसरा भार या घरास सहन झालाच नसता ३ आमचे धन व धान्य यानी लोकाची घरे भरली असून आम्ही मात्र पोट भरण्यासाठी भिक्षा मागीत हिंडतो गुरे, वासरे यांचे जतन करण्याची कटकट कोण करीत बसतो ? ४ आम्हास कशाचीच काळजी नाही, सर्वाविषयी आम्ही निश्चित आहोत कारण आमचे भांडवल म्हणजे शेण व माती, याचेच आहे याच्या साहाय्याने घराच्या भिंती मात्र स्वच्छ सारवलेल्या असून तुळशीवृंदावनही निर्मळ केले आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वराने आमची सर्व विषयाबद्दलची हावच दूर केली आहे आणि कुटुंबाची काळजी तोच नेहमी करीत असतो ६ विवरण - निरिच्छ व उद्दाम राहून सर्व भार परमेश्वरावर टाकणाऱ्या भक्ताच्या प्रपंचाची काळजी परमेश्वर करीत असतो असा अनुभव अनेक संतांना आलेला आहे मज जम अनन्य भक्त असतात तसंच ईश्वरही आपल्या भक्तांना अनन्य असतो 'अनन्याश्चिन्तयन्तो मा ये जना पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्' म्हणून आपण अनन्य चिंतन करणाऱ्या भक्ताचा यागक्षम मी चालविता अशी साक्ष भगवंताने गीतेत स्वमुखाने दिली आहे ज्ञानेश्वरांनी तर या परमेश्वराच्या अनन्यतेचे वर्णन करताना कौतुकाने म्हटले आहे, 'मग याहीवरी पार्था, माझ्या भजनीं आस्था । तरी तयाते मी माथा । मुकुट करीं ।' इतकेच नव्हे तर 'म्हगोनी गा नमस्करू । तयांतें आम्ही माथा मुकुट करू । तयाची टांच धरू । हृदयीं आम्ही तो पाहाया हे डोइल्ल । म्हणूनि अवकृती मज डोळे । हातींचिनि लालाफळें । पूजू तयांतें ॥ दोवेरी दोनी । भुजा आलो घेउनी । आलिंगावया लागुनी । तयाचे आंग ॥ असा गौरव ज्ञानेश्वरांनी भक्ताचा केला आहे ६१ परधिया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥ १ ॥ न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष । काय तुमचे यास वेचे सांगा ॥ २ ॥ बैसलिये ठायीं म्हणता रामराम । काय होय धर्म ऐसे सांगा ॥ ३ ॥ १ निरसला
३० सार्थ तुकारामगाथा संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥ ४ ॥ खरें बोलता कोण लागतो सायास । काय वेचे यास ऐसे सांगा ॥ ५ ॥ तुका म्हणे देव जोडे याचसाठीं । आणीक ते आटी न लगे काही ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पराविया-दुसऱ्याची, वेचे-खर्च होन, आटी-खटाटोप अर्थ - परस्त्री आईप्रमाणे मानल्यास तुमचे कधी द्रव्य खर्च होते काय ? १ दुसऱ्याची निंदा जर केली नाही, दुसऱ्याच्या धनाची इच्छा केली नाही तर तुमचे काही खर्च होते काय ? २ बसल्याबसल्याच हरिनाम घेतल्यास तुम्हास काही श्रम होतील का ? ३ साधुसंताच्या वचनावर विश्वास ठेवाल तर तुमचे काय नुकसान होणार आहे ? ४ खरे बोलण्यास तुम्हास का येवढे कष्ट होतात ? त्यात काय तुम्हास खर्च येतो ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, वर सांगितलेल्या नियमांनी वागा, म्हणजे देव तुम्हास भेटेल, देव मिळवायला आणखी काही खटाटोप करण्याची जरूरी नाही ६ ६२ शुद्ध बीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥ १ ॥ मुखीं अमृताची वाणी । देह येचावा १ कारणी ॥ २ ॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जातो । ताप दर्शने विश्रांती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गोमटो-सुरेख चागलो, ताप-त्रास अर्थ - बीज शुद्ध असले म्हणजे त्यापासून फळेही रसदार, टवटवीत, व सुंदर निर्माण होतात, १ मुखातून अमृताप्रमाणे, मधुर शब्द बाहेर पडत आहे आणि देह देवाच्याच कारणी लागला आहे २ त्या पुरुषाचे सर्व अंग निर्मळ असून त्याचे चित्त गंगेप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा पुरुषाच्या दर्शनाने सर्व त्रास दूर होतात व मनास एक प्रकारची विश्रांती मिळते ४ ६३ चित्त समाधाने । तरी विष वाटे सोने ॥ १ ॥ बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगों काय ॥ २ ॥ मनाच्या तळमळे । चंदने ही अग पोळे ॥ ३ ॥ तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अतिशय-अतिक्रम हावरटपणा अर्थ - चित्त जर समाधानी नसेल तर सोन्यासारखे सुख विषाप्रमाणे वाटेल १ कशाचोही अतिशय हावं खरी नव्हे हे तुम्हीच जाणावे मी काय तुम्हा भल्यारा सांगावे ? २ मन जर तळमळत असेल तर चंदनाने अंग थंड न वाटतां भाजूनच निघेल ३ तुकाराम महाराज म्हणतात अशा मनास दुसऱ्या शीत उपचाराची सोय केली तरी त्यास दुःख होते ४ ६४ परिमळ म्हणून चोळू नये फूल। खाऊ नये मूल आवडते ॥ १ ॥ काय एक नव्हे धरितां अतरीं । कासवीचे परी वेळोवेळां ॥ २ ॥ मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद । यत्र भेदुनि नाद पाहू नये ॥ ३ ॥ कर्मफळ म्हणुनी इच्छू नये काम । तुका म्हणे वर्म दावू लोका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परिमल-सुवास म्हण-म्हणून अतरीं-दूर अंतरावर यत्र-गोड वाद्य अर्थ - फुलास मधुर सुगंध आहे म्हणून ते चोळून त्याचा एकदम सुगंध वाढण्याचा प्रयत्न करू नय मूल आवडते झाले म्हणून ते खायचे का असते ? १ कासवीप्रमाणे दूर राहून पिलांचे पोषण करता येणार नाही काय ? २ १ देवान
सार्थ तुकारामगाथा ३१ चमकदार पाण्याचे मोती असेल त्याचा स्वाद चाखण्याचा वेडेपणा करू नये मधुर ध्वनी वाढणारे वाद्य असले तरी ते फोडून त्याचा नाद कधी पाहू नये ३ कर्म देणारी फळे असली तरी फळाची इच्छा धरून कर्म करू नयेत असे मर्म तुकाराम महाराज लोकांना दाखवीत आहेत ४ ६५ माया तेंचि ब्रह्म ब्रह्म तेचि माया । अंग आणि छाया तया परी ॥ १ ॥ तोडिता न तुटे सारिता निराळी । लोटांगणातळीं हारपते ॥ २ ॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥ ३ ॥ तुका म्हणे उंच वाढे उंचपणे । ठेंगणी लवणे जैसीं तैसीं ॥ ४ शब्दार्थ व टीपा - हारपते-नाहीशी होन, लपते, आटी-खटपट, लवणे-वाकणे म्हणज अर्थ -माया आणि ब्रह्म हे दोन नसून एकच आहेत माया तेच ब्रह्म व ब्रह्म तेच माया आहे जसे देह आणि त्याची छाया यांचे ऐक्य असते तसेच ब्रह्म-माया याचेही ऐक्य आहे १ छाया कधी शस्त्राने तोडली तरी निराळी होत नाही, दूर सारली तरी नाहीशी होत नाही, आपण जमिनीवर लोटांगण घातल्यास ती वेगळी न राहता आपल्यातच नाहीशी होते इतकी ती आपल्या देहाशी एकजीव आहे २ ही छाया दुसऱ्या पणाने खरी नाही मग तिच्या स्वतंत्र सिद्धीसाठी बळ कशासाठी खर्च करायचे ? विचारांची खटपट तरी काय म्हणून करावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही छाया नेहमी आपणास अनुसरते आपण उंच झालो की ती उंच होते, आपण जर लवलो तर तीही तशीच लवून राहते देहापासून छाया जशी दूर या वेगळी नाही, तशीच अवस्था ब्रह्म व माया याच्या संबंधाने आहे ४ ६६ दुर्जनासि करी साहे । तो ही लाहे दंड हे ॥ १ ॥ शिंदळीच्या फुटणी वाटा । सग लोटा लोटाचा ॥ २ ॥ येर येरा काचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥ ३ ॥ तुका म्हणे कापू नाके । पुढें आणिके शिकविती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साहे-मदत लाहे-मिळवितो दंड-शिक्षा, काचणी-घासण अर्थ - वाईट लोकाना जे मदत करणारे आहेत त्यांनाही शिक्षाच व्हावयास हवी १ वाईट चालीच्या स्त्रीचा माग कुंटिणीचाच असतो खरे आहे, खोटयाना संगत खोट्याचीच लाभते २ एका पदार्थाची दुसऱ्यावर घषण झाल की त्यातून आग निर्माण व्हायचीच ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुर्जनांचे नाक कापून घ्यावे, कारण ते असाच दुराचार इतरानाही शिकवितात ४ ६७ वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाहीं ॥ १ ॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचे सार लाभ नाहीं ॥ २ ॥ देवपूजेवरी ठेवोनिया मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥ ३ ॥ तुका म्हणे फळ चिंतिती आदरे । लाघव हे चार शिंदळीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -वृत्ति-निर्वाहाच साधन, शेतवाडी उपार्जितो-मिळवतात अंतरींचे-आतील सार-मुख्य वस्तू लाघव-मायादा प्रकार चार-दड पाछ अर्थ -निर्वाहाचे साधन म्हणून जे लोक भूमी, राज्य, द्रव्य याची प्राप्ती करून घतात, त्याना देव निश्चित मिळत नाही असे समजा १ भाडेकरी आपल्या पाठीवर केवळ सामानाचे ओझेच वाहतो, त्या ओझ्यातील मुख्य वस्तू काही त्याला मिळत नाही २ एखाद्या विषयाचा लोभ मनात ठेवून जर एखादा देवपूजा करीत असेल तर तोही एका पाषाणापुढेचा दुसरा पाषाणच होय ३ मोठ्या आदराने या प्रमाणे नाना वासना ठेवून लोक कर्म करणारे असतात फलाची आशा ठेवून ज्याची कर्म असतात त्याचे आचार व त्याचे सारे कौतुक, वेश्येप्रमाणेच या गोष्टी असतात ४
३२ सार्थ तुकारामगाथा ६८ पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥ १ ॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ २ ॥ तोंच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पाये सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-भूमंडळीं-या जगतात, सरतीं पुरतीं-संपन्न, विपुल अर्थ - जगात भक्त हेच अति पवित्र व सोवळे असतात. १ त्यांचा देव मोठा आवडता व प्रेमाचा असून त्याविषयी त्याच्या मनात अखंड प्रेमभाव असतो. २ हे भक्त मोठे भाग्यवंत असून धनधान्य, संपत्ती यांची विपुलता त्याच्या घरी असते, म्हणजे या काळजीत ते कधी नसतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांची सेवा केल्यास ती देवाला पोचते. ४ ६९ आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥ १ ॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ २ ॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥ ३ ॥ तुका म्हणे विषें । अन्न नाशियेलें जैसें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-भ्रमले-भ्रमलेले, चावळे-चावळलेले. अर्थ :- आशाबद्ध लोक परमेश्वरास कसे जाणणार ? त्यांना परमेश्वर कसा समजणार ? १ तो तर इंद्रियाच्या म्हणजे विषयसुखाच्या सेवेत तत्पर असतो, आवडीच्या विषयाचाच हेवा त्याला वाटत असतो २ भ्रमलेला, चावळलेला मनुष्य बोलतो तेव्हा त्यात उचित-अनुचित असे काहीच नसते, आशेने बद्ध असलेल्याची गत अशीच असते. ३ ' तुकाराम महाराज म्हणतात, सुग्रास अन्नात विष कालविले म्हणजे जसे ते अन्न नासून जाते तसे आशाबद्ध माणसाचे आयुष्य व्यर्थ होते. ४ ७० ढेंकर्रें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथों ॥ १ ॥ हेही बोल तेही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ २ ॥ गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे असे हातांचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-साचे-खरोखर, काचे-कच्चे, खोटे, फोल-फुकट, परी-प्रकार, फकेवरी-फुकट्या मारून, थवाणे मारून, विल्हाळक-व्यर्थ अर्थ - तृप्ती करणारे जेवण झाले आहे की नाही ते सहजच येणाऱ्या ढेकरीवरून समजते जेवण यथातथाच झाले तर ढळेळळेच खोटे) ढेकर ध्यानात येतेच. १ तृप्त होऊन ढेकर देणाऱ्याचेही बोलच; व उपाशी राहून खोटी ढेकर देण्याचेहो बोलच. पण पहिल्याचे स्वानुभवी व खरे आहेत, दुसरे फोलकटाप्रमाणे व्यर्थ आहेत. २ गव्हाचे पुष्कळव निरनिराळे पदार्थ होतात म्हणून ते नुसतेच फाके अथवा थकाणे भरून खाऊ नयेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, हातच्या कंकणाला आरसा घेणे व्यर्थच नव्हे काय ? ४ ७१ करावी ते पूजा मनेंचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥ १ ॥ फळावें तयासि कळें अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ २ ॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसे ॥ ३ ॥ तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- लौकिक-बाह्य अवडंबर, साच-खरा, अतिशया-अति हव्यास, लौकिकाची हाव अर्थ - देवाची पूजा करायची असेल तर ती मनातल्या मनातच करावी हे उत्तम. येथे बाह्य अवडंबराची काय जरूरी आहे ? १ अशी मानसिक पूजा ज्या ईश्वरास पोचावयास हवी, त्यास समजावयास हवी त्यास ती बरोबर पोचते, समजते अंत करणातील खरा भाव खरोखरीच उपयोगी पडतो २ बाह्य डामडौलाचा हव्यास फार धरला तर कधी लाभ व कधी हानीही होईल कारण ज्या जातीचे बीज चिंतात असेल त्याप्रमाणे त्याचे फळ मिळते आपल्या अंत करणातील भावाप्रमाणे आपणास फलप्राप्ती होईल ३ तुकारामबुवा म्हणतात, ज्या भजनामुळे मनास खरे समाधान मिळते त्याच्या योगानेच संसारातून पैलतीराला जाण्याचे करावे ४ विवरण - मनात देवाविषयी प्रीती नसताना गंध, धूप, दीप, फुले, आरती, नैवेद्य या बाह्य थाटान पूजा केली तरी देव प्रसन्न होणार नाही त्यास फक्त भक्ताच्या मनातील भाव दिसतो मानसिक पूजा तुकारामबुवाना यासाठी श्रेष्ठ वाटते मनच भगवंताला अर्पण करून सर्व कर्मे करीत राहणे हीही एक प्रकारची पूजाच, आपले मन व त्याच्या सर्व वृत्ती हरिरूपच आहेत असे समजून वृथा बाह्य अवडंबर माजवू नये कारण या बाह्य देखाव्याने ईश्वर संतुष्ट होत नाही त्यास आपल्या मनाची निर्मळता व समर्पित अवस्था याची गोडी असते 'मनीं भाव असे काहीं । तेथें देव येती पाहीं' असे दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितले आहे आणखी एका अभंगात त्यांनी म्हटले आहे, 'मनोमयपूजा । हेंचि पदिये केशीराजा' या पंढरीरायाला भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम हवे त्याला गंध, अक्षदा, सुवासिक पुष्प, भरजरी वस्त्रे, मोल्यवान अलंकार याची जरूरी नसून भक्ताचे मनापासूनच प्रेम तवढे हवे असते 'देव भावाचा भुकेला' हेच खरे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात ज्ञानदेवांनी भगवंताच्या या आवडीचे मोठे रसाळ वर्णन केले आहे मनामधील नि:सीम भावाने एखादे फळ, फूल, पान जरी अर्पण करणारा भक्त असला तरी परमेश्वर संतुष्ट होतो आणि यापैकी काहीच मिळाले नाही तर पाण्याचा थेंबसुद्धा पुरेसा होतो या भक्तीच्या प्रेमाचा देव भुकेलेला असतो 'आम्ही भावाचे पाहुणे' असे खुद्द भगवंतानीच मागितले आहे मनानेच ईश्वराची पूजा कधी न जमली तर काय करावे याचेही सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरांनी बाराव्या अध्यायात केले आहे सर्व वृत्तीसहु मन ईश्वराशी निगडित करणे हे प्रथम कठीण वाटेल मग एखादे निमिष जरी ईश्वराच्या स्मरणात खर्च केले तरी चालेल, किंवा मनाने, वाणीने ज्या ज्या क्रिया होत आहेत त्या 'मी करतो आहे' असे असे मानू नये ज्याच्या स्फूर्तीने विश्वाचे चलनवलन होते, तेथे आपण कोण ? असाच भाव असावा बाह्य देखाव्याचा ईश्वराच्या भक्तीत काही उपयोग नसून स्वतःच्या मानसिक वृत्तीच हरिरूप बनल्याची जाणीव करून घेणे हीच सर्वोत्तम पूजा होय ७२ एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्याची गति होइल नेणो ॥ १ ॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ २ ॥ हरिहरा नाहीं बोटभरी वाती । कोण त्याची गति होइल नेणों ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्याची गति होइल नेणो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गति-परिणाम अखेरी, बहिर्मुखं-बाह्य उपचारावर लक्ष देणारे, वाती-वात, आरती अर्थ - जे लोक एकादशी अथवा सोमवारचे व्रत करीत नाहीत त्यांच्या आयुष्याची काय अखेरी होईल हे समजत नाही १ या सर्व लोकाकडे पाहून मनाची फार तळमळ होते, कारण सर्व माणसे आंधळी आहेत बाह्य कर्म- काडावर त्याचा भर आहे त्यांची वृत्ती बहिर्मुख आहे २ विष्णू किंवा शंकर यांना बोटभर वातीनेही जे ओवाळीत नाहीत, आपले प्रेम व्यक्त करीत नाहीत त्यांची गत काय होणार कुणास माहित ? ३ ईश्वरावर ज्यांचे प्रेम नाही त्यांचे आयुष्य सुखाचे कसे होणार याबद्दलची चिंता तुकाराम महाराजांना वाटते ४ विवरण - कोणत्या तरी देवास भजा, त्याचे स्मरण करा म्हणजे तुमच्या जीवनाचे सार्थक होईल या उपदेशाबरोबरच आणखी एक महत्वाचा सिद्धान्त बुवांनी या अभंगात सांगितला आहे धुवा भागवत संप्रदायातील, वारकरी पथातील त्याचे दैवत पंढरपूरचे श्रीविठ्ठल हा विठ्ठल श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण होय एकादशीचे व्रत हे या तु गा ५
३४ सार्थ तुकारामगाथा
पंथात प्रमुख; पण तुकाराम महाराज या ठिकाणी सोमवारही करायला सांगतात, यातले रहस्य काय ? कोणत्याही देवाची पूजा करा, स्मरण करा, स्तवन करा, ते एकाच परमेश्वराला पोचते अशी आपली परंपरा आहे. शिव, विष्णू ही नांवे दोन पण दैवत एकच अशीच वारकरी पंथाची धारणा आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हा शिवाशी संबंधित आहेच. त्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. ‘ विठोनें शिरीं वाहिला देव राणा ' म्हणून समर्थ रामदासांनी विठ्ठलाचे स्तवन केले आहे. हरिहरांचे ऐक्य हे वारकरी पंथाचे एक महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य मानावे लागेल. दैवतांवरून मतभेद व भांडण या बाबी वारकरी पंथात दिसत नाहींत मुख्य भर विठ्ठलावर असला तरी तोही शिवस्वरूपच संतानी मानला आहे हरिहरात केवळ एका बेलाटीचा फरक आहे असे एके ठिकाणी बुवांनी म्हटले आहे. विष्णू व शिव, हरि व हर यांच्यात वरवरचा भेद असला तरी ‘ मज उभयरूपां एक ' असे तुकारामांनी सांगितले आहे. 'हरिहरां भेद । नाहीं करूं वाद । एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं' अशी मोठी गोड अनुभूती तुकारामांनी वर्णन केली आहे आणि म्हणून हरीला किंवा हरला, कुणाला का होईना पण थात लावा, त्याचे स्मरण करा असे बुवा आग्रहाने सांगत आहेत तुकोबांच्या घरी कुलदैवत म्हणून शिवाचीही उपासना होतीच हरिहरेश्वराचे देऊळ अद्यापही त्यांच्या जागेत आहे ( अभंग क्र. १२४ वरील अधिक विवरण पाहावे )
७३ नव्हे आराणूक संसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥ १ ॥ देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ २ ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥ ३ ॥ तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- आराणूक- शांती, समाधान, सुख, सांदीं- कोपऱ्यात अर्थ.- केवळ संसार करणाऱ्या प्रापंचिकास कधीही समाधान मिळणार नाही; कारण त्याच्या चित्तात नेहमी धंदा, व्यवसाय याचाच ध्यास असतो. त्यास शांती कुठली ? १ अशा रीतीने सर्व चित्तच संसारात व्यग्र झाल्यावर मग देवधर्म सांदोकोपऱ्यात पडतात, त्यांची आठवणही कुणास होत नाही, कारण एकसारखे विविध विषयांचे चिंतन व त्याचाच गोंधळ मनात गाजत असतो. २ आणि कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे समाधान रात्रंदिवस कितीही केले तरी ते पुरे पडत नाहीं; पण त्यामुळे मात्र ईश्वराकडे दुर्लक्ष होऊन त्याचे दर्शन घेणेही दुर्लभ होऊन जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे संसारग्रस्त लोक आत्मघातकीच असतात. नारायणाच्या ठिकाणीं तयांचे चित्त लागत नाही ही त्यांची मोठी चूक होत आहे. ४
७४ स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥ १ ॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ २ ॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- ग्रामवासी- गावचे लोक, श्वान- कुत्रे, लिंग- शिव, अतित- अतिथी, थारा- विश्रांती, कंटक- दुसऱ्याला त्रास देणारे लोक, कुळवाडी- वतनदारी अर्थ - ज्या गावचे लोक परमेश्वराची सेवा व भक्ती करीत नाहीत ते गाव व त्याच्या भोवतीची जागा स्मशानासारखी समजावी व त्या गावातील माणसे जिवंत असली तरी प्रेतरूप मानावीत. १ कसला तरी धंदा करून कुत्र्याप्रमाणे ते पोट भरतात एवढेच, पण त्यांच्या घरी यमदूतांची वस्ती असते. मृत्यूच्या पथाराच त्यांचे वागणे लागलेले असते. २ जेथे लिंगाची म्हणजे ईश्वराची पूजा होत नाही, तेथे अतिथीही आश्रयास, विश्रांतीस धावत नाही या गावात वस्ती फक्त चोरांची व समाजकंटकांचीच असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या बुद्धीला आपण कोण, आपली स्थिती काय याविषयी काहीच जाणीव नाही तेथे निश्चितपणे यमाची वतनदारी सुरू झालेली असते. ४
सार्थ तुकारामगाथा ३५ ७५ आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥ १ ॥ गळेचि ना गर्भ नव्हेचि का वांज । माता त्याची लाजलाया पापी ॥ २ ॥ परपीडे परद्वारीं सावधान । सादरचि मन अभाग्याचे ॥ ३ ॥ न मिळता निंदा चाहाडी उपवास । संग्रहवे दोष सकळ ही ॥ ४ ॥ परउपकार पुण्य त्या नावडे । विषाचे ते कीडें दुग्धीं मरे ॥ ५ ॥ तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाकटा- अरे देवा असे दुःखाने शब्द दुराचार-वाईट चालीरीतीचा, लाजलाया- वंशाला काळिमा लावणारा, सादर-उत्सुक, नावडे-सहन न होण्याजोग, नातळे-शिवत नाहीत अर्थ - आपल्या कुळातील पुत्र वाईट रीतीचा निघाला आहे असे पाहून स्वर्गातील त्याचे पितरही 'हाय रे देवा' म्हणून शोक करतात १ कुळाला लाज लावणारा, काळिमा लावणारा मुलगा प्रसवून, पापी मुलास जन्म देऊन कष्टी झालेली माता पाहून लोक म्हणतात, ही वांझ का नाही राहिली ? किंवा हिचा गर्भच गळून का नाही गेला ? २ या अभागी मुलाचे मन नेहमी दुसऱ्यास पीडा देण्यासाठी व दुसऱ्याच्या स्त्रीविषयी उत्सुक असते ३ कुणाची निंदा किंवा चहाडी करावयास एखाद्या दिवशी त्रास मिळाली नाही तर यास उपवास घडल्याइतके दुःख होते सगळ्या दोषांचा संग्रह करावा अशी त्याची बुद्धी असते ४ दुसऱ्यावर उपकार करावा अथवा काही पुण्य करावे हे त्याला सहनच होत नाही, विषावर जगणारे किडेच ते त्यांना गोड दुधात टाकल्यास ते मरणारच त्यांना विषच बरे वाटते ५ तुकाराम महाराज म्हणतात, तो केवळ विटाळाचीच, अमंगलाचीच मूर्ती असतो त्याच्या चित्तात दया, क्षमा, शांती हे गुण स्पर्श देखील करणार नाहीत ६ ७६ श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥ १ ॥ नाहीं भोड आणि धीर । उपदेश जिरें क्षीर ॥ २ ॥ माणसासि भुके । विजातीने द्यावे थुके ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - श्वान-कुत्रे शीघ्रकोपी-लवकर संतापणारा, घातकर-घात करणारा, विजातीने-हलक्या जातीच्या लोकांनी अर्थ - लवकर संतापणारा मनुष्य म्हणजे एक प्रकारचा कुत्राच आपला आपणच तो घात करतो १ तो कुणाची भीड धरत नाही, त्याला कसला धीरही नसतो उपदेशरूपी दूधही त्याच्या अंगी पचत नाही २ दुसऱ्या माणसावर तो नेहमी भुकत असतो, इतर हलक्या लोकांनीही त्याच्यावर थुंकावे अशी मग परिस्थिती निर्माण होते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचे चित्त हे पापी असते, त्याची पुरती फजिती करावी ४ ७७ देखोनि हरखली अड । पुत्र जाला म्हणे रांड ॥ तव तो जाला भाड । चाहाड चोर शिवळ ॥ १ ॥ जाय तिकडे पीडी लोका । जोडी भाडवल थुका ॥ थोर जाला चुका । वर का नाहीं घातली ॥ २ ॥ भूमि कापे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्ठुर उत्तरें । पाप दृष्टी मळिणचित्त ॥ ३ ॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सागातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनिया निषिद्ध तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हरखली-संतुष्ट झाली अड-गुरुत्व साधक चिन्ह भाड-भांडखोर, कुंभपाक-एक प्रकारचा नरक
३६ सार्थ तुकारामगाथा अथ - पुत्रप्राप्तीस हपापलेल्या एका स्त्रीस बऱ्याच दिवसांनी पुत्र झाला, पण तो दुराचारी निघाला काय त्याचा उपयोग ? या पाश्र्वभूमीवर तुकाराम महाराज म्हणत आहेत, वांझत झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने कोण्या एका स्त्रीने आपणास मुलगा झाला हे पाहताच मोठा आनंद व्यक्त केला, पण पुढे हा पोरगा तर मोठाच माडशोर व चोर निघाला चहाडखोरी करू लागला वाईट चालीचा निघाला काय त्याचा उपयोग ? १ त्याने जिकडे पाहिले तिकडे लोकांना पीडाच निर्माण झाली त्यामुळे लोक तिरस्काराने त्याच्यावर थुंकले, हेच त्याचे एकमेव भाडवल जमा झाले या आईच्या हातून मोठीच चूक झाली जन्मतःच तिने यास नष्ट का नाही केले ? २ या दुष्ट मुलाच्या भाराने भूमी थरथरा कापायाला लागते याचे शरीर म्हणजे कुंभपाक नरकाचे ठिकाणच होय हा नेहमी निष्ठुर उत्तरांनी बोलत असतो, याची दृष्टी पापी असून चित्तही नेहमी मलीन असते ३ हा धाडाळ दुराचारी असतो, याच्या बरोबर पापाचा विटाळ असतो तुकाराम महाराज म्हणतात, हा दुष्टच असतो याचा सदैव निषेधच करावा ४ ७८ नेंणें गाणे कठ नाहीं हा सुस्वर । घालू तुज भार पांडुरंगा ॥ १ ॥ नेंणे राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥ २ ॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना ॥ तुज नारायणा वौंचूनिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - कठ-गळा चाड-पर्वा, मात मात-ताल, लय वगैरे अर्थ - देवा, मला गायनाचे शास्त्र माहित नाही, मला चांगला गळा नाही, मला नीट गाता येत नाही, माझा आवाज गोड नाही पण पांडुरंगा, माझा सब भार तुझ्यावर आहे १ मला संगोतामधील राग माहित नाहीत, निरनिराळ्या वेळांच्या घात-मात्राच्या रीतीही मला माहित नाहीत, पण देवा, तुझ्या पायांवर मात्र माझे चित्त सदोदित असते २ तुकाराम महाराज म्हणतात की मला लोकांची काही पर्वा नाही नारायणा, तुझ्यावाचून या लोकाचा काय उपयोग आहे ? ३ ७९ माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥ १ ॥ तब तया पारखी सिव । लाजे ठाव सांडिता ॥ २ ॥ उष्टावळी करूनि जमा । थुथुनि प्रेमा आणितसे ॥ ३ ॥ तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदों न सरती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उट-कटकट पारखा-परीक्षा करते, सिव-सीमा ठाव-मूळचे ठिकाण बाहेरमुदी- बाह्यमुद्रा वरवरचे ढोंग आहाच-व्यर्थ न सरती-पोचती होत नाही अर्थ - सर्व सामान्य कवी असतात ते 'माझी कविता वाचा, पाठ करा' अशी एकसारखी कटकट लोकांच्या पाठीमाग लावतात १ पण ज्यांची परीक्षा स्वतःच्या गावच्या सीमेवर जाताच होते, व मग आपले स्थान सोडताच त्यानाच लाजल्यासारखे होते २ कारण मागच्या काही कवींच्या काव्यातील शब्द उसने आणून वृथा कष्टाने प्रेम व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, याचे बाहेरचेच ढोंग तेवढे पाहून घ्यावे ते व्यर्थ असते कारण ईश्वराच्या ठिकाणी ते कवित्व कधीच पोचत नसते ४ ८० उपाधीच्या नावे घेतला सितोडा । नेदू आता पीडा आतळो ते ॥ १ ॥ पाशासाठीं हात भरूनि धुवावे । । चालतिया गोवे मारगासि ॥ २ ॥ काय नाहीं देवे करूनि ठेविले । असे तें आपुले ते ते ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार । तेव्हा आपपर बोळविले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपाधी-बाह्य बंधने, शितोडा घेणे-शुद्ध होण, नदू-न येऊ, आतळणे-शिवू देणे, गोवे- अडथळे आपपर-मी-तू असा भाव बोळविले-निरोप दिला घालविले
सार्थ तुकारामगाथा ३७ अर्थ - दरोराचे विषय, प्रपंचातील सुखदुःखे इत्यादि बाह्य बंधनातून मी गोमूत्राचा शितोडा घेऊन शुद्ध झालो आहे. आता पुनः तो पीडा मला शिवणार देखील नाही. १ एखाद्या घाणेरड्या बाबतीत हात भरला व मग तो धुवा हे कशाला हवे ? चालत्या मार्गात अडथळे कशासाठी ? २ परमेश्वराने आपल्यासाठी काय करायचे बाकी ठेविले आहे ? त्याने जे जे निर्माण केले ते आपल्यासाठीच नाही का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य उपाधींचा अहंकार एकदा गेला म्हणजे मग मी-तू असा द्वैतावरचा भाव नाहीसा होतो. दुजेपणा उरत नाही. ४ ८१ योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥ १ ॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ २ ॥ मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥ ३ ॥ तुका म्हणे उचित जाना । उगीं सिणा काशाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दमा-दमन करा, ताब्यात ठेवा, सोयरा-आप्त, मिरासी-परंपरागत हक्क, सेत-शेत, सिणा-श्रम करा अर्थ - क्षमा हे योगाचे खरे सौभाग्य असून आधी इंद्रियांचे दमन करावे, त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा १ एकदा देवाशी सख्यत्व जडले, तो सोयरा झाला म्हणजे मग सर्व भाग्याच्या गोष्टी आपल्या घरात येतील २ शेत आपल्या वंशपरंपरागत हक्काचे असले तरी काही श्रम न करता काही पीक हाती येत नाही. ३ हे तुम्ही उचित असे जाणून परमेश्वरासाठी इंद्रियदमनाचे तप करा; उगाच इतर व्यर्थ असे प्रयत्न मात्र करून शिणू नका असे तुकाराम महाराज म्हणतात ४ ८२ न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥ १ ॥ तो हे चावटीचे बोल । जन रंजनणें फोल ॥ २ ॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- चावटी-उगाच बडबड, फोल-फुकट, सादर-प्रसन्न, स्वाधीन अर्थ - डोळ्यात पाण्याचा एक थेंबही नाही आणि मनात ईश्वराविषयी प्रेम नाही १ तोपर्यंत त्याचे बोल उगाच व्यर्थच आहेत. केवळ लोकांना रंजविण्यासाठी केलेली ती वायफळ बडबडच म्हणावी लागेल २ जोपर्यंत आपला स्वामी, परमेश्वर आपल्या स्वाधीन झाला नाही, त्याची कृपा झाली नाही तोपर्यंत आपल्या बोलाना अपेक्षित असे फळ मिळत नाही ३ दृष्टादृष्ट होऊन एकमेकाकडे पाहणे होऊन जोपर्यंत भेट झाली नाही तोपर्यंत तुमच्या वचनात कोणतेच इष्ट असे फळ येणार नाही ४ ८३ बाईल सवासिण आई ॥ आपण पितराचे ठायीं ॥ १ ॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ २ ॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥ ३ ॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव थोडा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेच-खर्च, अपसव्य-उलटी क्रिया, चरवणीं-भोगान, गाळणी करणे-व्यर्थ घालविणे, सरविणे, लंडा-धर्मभ्रष्टास अर्थ - धर्मशास्त्रविरहित वागणाऱ्या एका बेताल माणसाचे वर्णन बुवा येथे करीत आहेत. आपल्या आईबापाच्या श्राद्धाच्या दिवशी याने ब्राम्हण सुवासिनी जेवण्यास बोलावण्याऐवजी आपली बायकोच सवाष्ण आईच्या जागी व आपण ब्राह्मण वडिलांच्या जागी असा व्यवहार केला १ अरे दुष्ट माणसा, या धर्मबाह्य कृत्यामुळे तुझे फारच नुकसान झाले आहे, कारण या सर्व गोष्टी धर्माच्या उलट झाल्या आहेत धर्मशास्त्राच्या विपरीत ही तुझी १ चरणी
३८ सार्थ तुकारामगाथा करणी आहे २ तू तुझ्या आयुष्याची अखेर व्यर्थपणे विषयाच्या भोगातच केली आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा धर्मभ्रष्टाला कसलीही दयामाया उरत नाही या अधमाला देव आणि धोंडा सारखाच वाटतो ४ ८४ दानें कापे हात । नावडे तेविशीं मात ॥ १ ॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ २ ॥ न वजती पाय । तीर्था म्हणे वेचू काय ॥ ३ ॥ तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नावडे-आवडत नाही, ते विशीं-त्याबद्दल मात-गोष्ट चावटीचे-उगाच बडबडीचे मिथ्या-व्यर्थ, नवजतां-वळत नाही वेचू-खर्च करू अर्थ - दान देताना त्याचा हात थरथर कापतो, मनातून त्याला दान द्यायला नकोच असते, दानाविषयी कुणी गोष्ट काढली तरी ती त्याला आवडत नाही १ दुधात हिंगाचा खडा टाकल्यावर जशी स्थिती होते तसेच याच्या व्यर्थ बडबडीमुळे होते याचे सर्व बोल फुकट असतात २ तीर्थयात्रेसाठी याची पावले वळत नाहीत तो म्हणतो तेथे जाऊन खर्च कसा करू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या मनातच नाही तर ते आचरणात कसे दिसणार ? ४ ८५ वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥ १ ॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके घणी वरी ॥ २ ॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥ ३ ॥ सांडी थोरपणा । तुका म्हणे सवे दीना ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निवे-संतुष्ट होते घणी-समाधान सांडी-सांडून देवा अर्थ - केवळ गाई वळण्याच्या रूपाने प्रकट झालेल्या श्रीकृष्णस संतुष्ट करण्यास फार लागत नाही १ केवळ भक्तिप्रेमाचा मनापासूनचा एखादा उद्गारही त्याला पुरा होतो त्यावर तो संतुष्ट होतो कुणाच्याही या प्रेमाने तो तृप्त होतो, समाधान पावतो २ त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी जपजाप्य, यज्ञयाग वगैरे प्रकट काही करावे लागत नाही, काही मानाचे, आदर दर्शविण्याचे इतर उद्योगही करण्याची जरूरी नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमभावाने भजन्या या दीनासाठी आपले मोठेपण सोडून देवही त्याच्याशी सख्यत्व पत्करतात, त्याच्यावर कृपा करतात ४ ८६ मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥ १ ॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरी हा उत्तम ॥ २ ॥ नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥ ३ ॥ धन मेळविले कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥ ४ ॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥ ५ ॥ तववरि मिरविसी बळ । जव आला नाहीं काळ ॥ ६ ॥ तुका म्हणे बापा । चुकवीं चौऱ्यांशींच्या फेपा ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - मैत्र-मित्र, सामा-सामान कोडी-कोटीच अर्थ - आयुष्याचे कल्याण व्हावे म्हणून प्रापंचिकास उपदेश करताना बुवा म्हणतात, अनेक मोठेमोठे मित्र जरी तू जमविलेस तरी शेवटी अंतकाळी त्याचा काही उपयोग होत नाही १ म्हणून तू आधी रामनाम घे परमेश्वराच्या नामस्मरणाच्या सामानाने भांडवल जपून ठेवावेस हे उत्तम २ नाहीतर यम तुझ्यावर क्रुद्ध होऊन कराकरा दात खाईलच ३ कोट्यावधी रुपयांचे धन जरी तू मिळविलेस तरी ते यम घेतल्याखेरीज सोडणार
सार्थ तुकारामगाथा ३९ नाही म्हणूने ते धन तुला सोडावेच लागेल ४ बलवान मित्र, बाप, बहीण, आई, पत्नी हे बांधव व आप्त यांचे सैन्य जरी मोठे असले तरी त्याचा काहीच उपयोग शेवटी होणार नाही ५ कारण तुझी ही शक्ती जोपर्यंत प्रत्यक्ष काळ जवळ आलेला नाही तोपर्यंतच तू मिरवशील ६ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हा काळ जवळ नाही तोपर्यंतच तू काही करुन जन्ममृत्यूच्या चोऱ्यांशी लक्ष योनींच्या फेऱ्या चुकवीव ८७ कानडीनें केला मऱ्हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ॥ १ ॥ तैसे मज नको करु कमळापति । देईं या संगति सज्जनाची ॥ २ ॥ तिने पाचारिले इल या म्हणोन । येरु पळे आण जाली आता ॥ ३ ॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे शीण सुखा पोटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कानडीने-कर्नाटकातील कानडी बोलणाऱ्या स्त्रीने पाचारिले-बोलाविल एलदा-इकडे या, येह-हा नवरा आण-शपथ, येर येरा-एकमेकात विच्छिन्न-विसंगत अर्थ - आपणास संताची संगत हवी इतर कुणाची भलत्याची मिळाल्यास कसा शीण होतो ते या अभंगात बुवानी एक मोठ्या गमतीचे विनोदी उदाहरण घेऊन सिद्ध केले आहे एकदा एका कानडी भाषाच जाणणाऱ्या स्त्रीने मराठी बोलणाऱ्या माणसाशी लग्न केले पण संसार सुरु झाल्यावर एकाचे बोलणे दुसऱ्यास समजेना असा प्रसंग आला हे कमलापती विष्णू, मला मात्र तशी अवस्था देऊ नकोस, मला संताचीच संगत हवी २ नाही तर काय होईल पाहा, त्या कानडी बाईने 'इलबा-इकडे या' म्हणून नवऱ्याला बोलविले, पण नवऱ्याला वाटले हिन आपणास 'आ' शपथ म्हणून भलतीच शपथ घेतली त्यामुळे तो पळून जाऊ लागला ३ तुकाराममहाराज म्हणतात एकमेकास जे विसंगत असते त्यापासून सुख होण्याऐवजी दुःखच मोठे होते ४ ८८ सुख पाहता जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ १ ॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचे वचन ॥ २ ॥ नैलें रात्रीने तें अर्धं । बाळपण जराव्याधें ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुती जसी मूढा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जवापाडे-जवा एवढ अल्प जराव्याधें-म्हातारपण व रोग यांनी, पुढा-पुढील जन्म अर्थ - या संसारात माणसांस सुख जवाएवढे सुद्धा लाभत नाही उलट दुःख मात्र पर्वताएवढे अनुभवास येते १ याची आठवण धरुन मना, तू संताच्या उपदेशाप्रमाणे वाग २ कारण तुझे आयुष्य पाहा कसे चालले आहे निम्मे रात्रीच्या झोपेतच गेले काही बाळपणात गेले, काही म्हातारपणात व नाना रोगाच्या व्याधीत जाईल ३ आणि संतवचनाच्या साह्याने काही आताच उपाय न करोल तर पुढील जन्मीही तू असाच घाण्याला जुंपला जाशील ४ विवरण - तुकाराम महाराजांचा हा एक छोटा परंतु सर्वप्रसिद्ध असा अभंग असून यात मानवी समाजाच चित्र सथेपान पण यथायतनें रेखाटलं आहे या संसाराचा एकंदर अनुभव काय आहे ? हा संसार दुखमय की सुखमय ? संताचे उत्तर ठाम आहे आह की ईश्वरकृपा झाल्यास सर्वच सुखमय होऊन जात, मग दुःखेहा सुखच वाटतात परंतु ही अवस्था महतामहती सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी येत नाही तो संसारातील बाह्य वस्तूतच सुख शोधता द्रव्य, मान, कीर्ति, घर जमीन लौकिक यांच्या बाधीन मुख वाढेल अशी त्याची कल्पना असते पण ईश्वरी कृपेचिवाय हे सर्व व्यर्थ आह असाच त्याचा अनुभव असतो सब याह्य लौकिकाच्या वाढीबरोबरही ईश्वराशिवाय सुख जवा एवढे सुद्धा न दिसता दुःख मात्र पर्वताएवढे अनुभवास यत कारण या लौकिक गोष्टीच्या वागनेच सार आयुष्य व्यर्थ होाने ईश्वराकडे पाहण्यास वा त्याचे स्मरण करण्यास तुषाम वेळ आहे ? सुखदुःखाची रचनाच मुळात चुकलेली असते सुख म्हणजे काय ? दुख म्हणजे काय ? आपल्या शास्त्र- कारांनी शास्त्रीय व तात्त्विक पद्धतीने विचार केलेला आहे 'जे केवळ बुद्धीनेच ग्राह्य असून व ज इंद्रियातीत असत तेच आत्यंतिक सुख होय' (सुखमात्यंतिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ६-२१) असा निश्चय भगवद्गीतेतच