भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

१ ला. ] सद्गुरुस्तवन. स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भरवसा । आतां असाल तैसे असां । सद्गुरु स्वामी ॥ ४ ॥ मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांच्छित होतें मन । ते माया जाहली लज्जायमान । काय करूं ॥ ५ ॥ नातुडे¹ मुख्य परमात्मा । म्हणोनि करावी लागे प्रतिमा² । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुरूचा ॥ ६ ॥ आपुल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्या- नीं । तैसा सद्गुरु हा स्तवनीं । स्तवूं आतां ॥ ७ ॥ जयजयाजी सद्गुरुराजा । विश्वंभरा विश्वबीजा । परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधू ॥ ८ ॥ तुझियेनि अभय करं । अनावर माया हे वोसरे³ । जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोनि जाय ॥ ९ ॥ आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे । निशीं⁴ जाहलिया नंतरें । पुन: काळोखें ॥ १० ॥ तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्यूंचा वाव⁵ । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११ ॥ सुव- र्णाचें लोह कांहीं । सर्वथा होणार नाहीं । तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२ ॥ कां सरितां⁶ गंगेशि मिळाली । मिळणी होतां गंगाचि जाहली । मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३ ॥ परी ते सरिता मिळणीमागें । वोहळ मानिजेल जगें । तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीचि होय ॥ १४ ॥ परिस आपणाऐसें करीना । सुवर्ण लोह पालटेना । उपदेश करी बहुत जना । अंकित⁷ सद्गुरूचा ॥ १५ ॥ शिष्यास गुरुत्व प्राप्त होय । सुवर्णें सुवर्ण करितां नये । म्हणोनि उपमा काय । सद्गु- रूसी परिसाची ॥ १६ ॥ उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतचि क्षार । अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७ ॥ उपमे द्यावा जरी मेरू । तरी तो जड पाषाण कठोरू । तैसा नव्हे कीं सद्गुरु । परम कोमळ दीनाचा ॥ १८ ॥ उपमेस द्यावें गगन । परी गगनापरीस तो नि- र्गुण । या कारणें दृष्टांत हीन । सद्गुरूसी गगनाचा ॥ १९ ॥ धीरपणें उपमूं जगतीं⁸ । तरी हेही खचेल कल्पांतीं । म्हणोनि धीरत्वासि दृष्टांतीं । हीन वसुंधरा⁹ ॥ २० ॥ आतां उपमेस द्यावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती । शास्त्रे मर्यादा बोलती । सद्गुरु तौं अमर्याद ॥ २१ ॥ म्हणोनि उप- १. जाणतां येत नाहीं. २. मूर्ति. ३. नाहीशी होते. ४. रात्र. ५. नाश. ६. नदी. ७. दास. ८. निराकार. ९. पृथ्वी. १०. सूर्य.

मेस उणा दिनकर । सद्गुरुज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणिवर¹ । तरी तो भारवाही ॥ २२ ॥ आतां उपमेस द्यावें जळ । तरी तें कालांतरें ओटेल सकळ । सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥ सद्गुरुस उप- मावें अमृत । तरी अमर² धरिती मृत्युपंथ । सद्गुरुकृपा यथार्थ । अमराचि करी ॥ २४ ॥ सद्गुरुस म्हणावें कल्पतरू । तरी हा कल्पनातीत विचारू । कल्पवृक्षाचा अंगिकारू । कोण करी ॥ २५ ॥ चिंता मात्र नसे मनीं । कोण पुसे चिंतामणी । कामधेनूची दुभणी । निष्कामास न लगती ॥ २६ ॥ सद्गु- रूस म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशवंत । ज्याचे द्वारीं असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥ स्वर्गलोक इंद्रसंपत्ती । हे कालांतरें विटंबती । सद्गुरु- कृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८ ॥ हरिहरब्रह्मादिक । नाश पावती सकळिक । सर्वदा अविनाश एक । सद्गुरुपद ॥ २९ ॥ तयास उपमा काय द्यावी । नाशवंत सृष्टि आघवी । पंचभौतिक उठाठेवी । न चले येथें ॥ ३० ॥ म्हणोनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीच्या खुणा ॥ अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके सद्गुरुस्तवनं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. संतस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदीन संतसज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान³ । जयांचेनि गुह्य ज्ञान । प्रगटे जनीं ॥ १ ॥ जे वस्तु परम दुर्लभ । जयाचा अलभ्य लाभ । तेंचि होय परम सुलभ । सत्संगेंकरूनी ॥ २ ॥ वस्तु प्रग- टाचि असे । पाहतां कोणासीच न दिसे । नाना साधनें सायासें । न पडे ठाईं ॥ ३ ॥ जेथें परीक्षावंत थकले । नातरी डोळसचि अंध झाले । पाहत असतांच चुकले । निज⁴वस्तूसी ॥ ४ ॥ जें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकार्शे गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ सोळा कळीं पूर्ण शशी⁵ । दाखवूं शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळाराशी । तोहि दाखवीना ॥ ६ ॥ जया सूर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतू⁶ तोहि दिसे । नाना सूक्ष्म पदार्थ भासे । १. शेष. २. देव. ३. आश्रय. ४. परब्रह्मास. ५. चंद्र. ६. कोळ्याचें सूत.

१ ला.] संतस्तवन. ९ अणुरेणुभादिक ॥ ७ ॥ चिरलें वालाग्रे तेंहि प्रकाशी । परी तो दाखवीना वस्तूसी । तें जयाचेनि साधकासी । प्राप्त होय ॥ ८ ॥ जेथें आक्षेपें आटले । जेथें प्रयत्न पस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ॥ ९ ॥ बळें विवेकाची वेंगडी । पडे शब्दाची बोबडी । जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १० ॥ जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष । तोहि शिणला निःशेष । वस्तु न सांगवे ॥ ११ ॥ वेदें प्रकाशिलें सर्वही । वेद- रहित कांहीं नाहीं । तो वेद कोणासही । दाखवूं शकेना ॥ १२ ॥ तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे । त्यांचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवण ॥ १३ ॥ विचित्र कळा ये मायेची । परी ओळखी न सांगवे वस्तूची । मायातीत अनंताची । संत सोर्य सांगती ॥ १४ ॥ वस्तूसि वर्णिलें न वैचे । तेंचि स्वरूप संतांचें । या कारणें वचनाचें । कार्य नाहीं ॥ १५ ॥ संत आनंदाचें स्थळ ॥ संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६ ॥ संत मोक्षाची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती । नातरी भक्तीची फलश्रुती । ते हे संत ॥ १७ ॥ संत धर्मांचें क्षेत्र । संत स्वरूपांचें सत्पात्र । नातरी पुण्यचि पवित्र । पुण्यभूमी ॥ १८ ॥ संत समाधींचें मंदिर । संत विवेकाचें भांडार । नातरी बोलिजे माहेर । सायुज्यमुक्तीचें ॥ १९ ॥ संत सत्याचा निश्चय । संत सार्थकाचा जय । संत प्राप्तीचा समय । सिद्ध- स्वरूप ॥ २० ॥ मोक्षश्रिया अलंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दारिद्री असंख्यात । नृपति केले ॥ २१ ॥ जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दान- शूर । तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२ ॥ महाराजे चक्र- वर्ती । झाले आहेत पुढें होती । परंतु कोणी सायुज्यमुक्ती । देणार नाहीं । २३ ॥ जें त्रैलोक्याँ नाहीं दान । तेंचि करिती संतसज्जन । तया संतांचें महिमान । काय म्हणोनि वर्णावें ॥ २४ ॥ जें त्रैलोक्याहूनि वेगळें । जें वेदश्रुतींसी नौकळे । तेंचि जयांचेनि वोळे परब्रह्म अंतरीं ॥ २५ ॥ ऐसी १. केंसाचें अग्र. २. शंका, प्रश्न. ३. वेंगडी वळे–विवेक संकुचित होतो, असा भाव. ४. मार्ग. ५. न जाई, वर्णिले जात नाहीं. ६. पुण्य उत्पन्न होण्याचें स्थळ. ७. ब्रह्माचें. ८. ब्रह्मरूप होणें एतद्रूप मुक्तीचें. ९. मोक्षरूप लक्ष्मीनें. १०. सार्वभौम. ११. समजत नाहीं.

१० श्रीदासबोध. [ दशक संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । जयांचेनि मुख्य परमात्मा प्रगट होय ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके संत- स्तवनं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. श्रोतृस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन । विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १ ॥ एक सत्वाचे सागर । एक बु- द्धीचे आगर । एक श्रोते वैरागरे । नाना शब्दरत्नांचे ॥ २ ॥ जे नाना अर्थामृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्त्याचे वक्ते । नाना संशयाचे छेदिते । नि- श्चयी पुरुष ॥ ३ ॥ ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नातरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४ ॥ कीं ऋषीश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागैळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५ ॥ हृदयीं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विलासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६ ॥ जे पवित्रपणें वैश्वानरें । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टी- समोर । ब्रह्मांड नये ॥ ७ ॥ जे अखंड सावधान । जयांसि त्रिकाळींचें ज्ञान । सर्वकाळ निरभिमान । आत्मज्ञानी ॥ ८ ॥ ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रासि लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९ ॥ जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांसि पूर्वीच ठावें । तेथें काय अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १० ॥ परंतु हे गुणग्राहक । म्हणोनि बोलतों निःशंक । भाग्यपुरुष काय एक । सेवीत नाहीं ॥ ११ ॥ सदा सेवती दिव्यान्नें । पालटाकारणें अवीट अन्नें । तैसीं हीं माझीं वचनें । प्राकृत ॥ १२ ॥ आपुले शक्त्यनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३ ॥ तैसा मी एक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ । त्यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४ ॥ व्युत्पत्ति नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंध नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौळ्यतां नाहीं वचनाची ॥ १. धैर्याचे, किंवा सत्वगुणाचे. २. खान. ३. सत्वगुणानें अधिक. ४. वेदांत वर्णन केलेलें ब्रह्म. ५. अलंकारयुक्त भाषण. ६. बृहस्पति. ७. अग्नि. ८. वाणीनें वरळणारा, वाचाट. ९. रसाळपणा.

१५॥ ऐसा माझा वाग्विलास । निःशंक बोलतों सावकाश । भावाचा भोक्ता जगदीश । म्हणोनियां ॥ १६ ॥ तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती । तेथें माझी व्युत्पत्ति किती । बुद्धिहीन अल्पमती । सलगी करितों ॥ १७ ॥ समर्थांचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याच्या अंगीं । तुम्हां संतांची मी सलगी । म्हणोनि करितों ॥ १८ ॥ व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयचकित होती लोक । परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढें खेळती ॥ १९ ॥ तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतापाशीं बोलत । परी माझी चिंता तुमचें चित्त । वाहेलचि कीं ॥ २० ॥ आपुलेंचि बोले वाडगें । त्याची संपादणी करणेंच लागे । परंतु कांहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१ ॥ हें तों प्रतीतीचें लक्षण । स्वभावेंचि करी मन । तैसे तुम्ही संत सज्जन । मायबाप विश्वाचे ॥ २२ ॥ माझा आशय जाणोनि जीवें । आतां उचित तें करावें । पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके श्रोतृस्तवनं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥

७. कवीश्वरस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ आतां वंदूं कवीश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । नातरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १ ॥ कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन । नाना शब्दांचें भूषण । यथार्थ होय ॥ २ ॥ कीं हे पुरुषार्थांचें¹ वैभव । कीं हे जगदीशाचें महत्व । नाना लाघव सत्की- र्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३ ॥ कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचें मुक्तें² सरोवर । नाना बुद्धीचे वैरागर³ । निर्माण जाहले ॥ ४ ॥ कीं हे अध्यात्मरत्नाची खाणी । कीं हे बोलके चिंतामणी । नाना कामधेनूंची दुभणी । वोळली श्रोत्यांवरी ॥ ५ ॥ कीं हे कल्पनेचे कल्पतरू । कीं हे मोक्षाचे मुख्य पडिभरू⁵ । नाना सायुज्यतेचे विस्तारू । विस्तारले ॥ ६ ॥ कीं हा परलोकींचा निजस्वार्थे⁴ । कीं हा योगियांचा गुप्त पंथ । नाना ज्ञा- नियांचा परमार्थ । रूपासि आला ॥ ७ ॥ कीं हे निरंजनाची⁶ खूण । कीं हे


१. धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे. २. खुलें, मोकळें. ३. खाण ४. प्राप्त झाली. ५. आधार. ६. ब्रह्माची.

१२ श्रीदासबोध. [ दशक निर्गुणाची वोळखण । मायाविलक्षणाचें लक्षण । ते हे कवी ॥ ८ ॥ कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ । नातरी होय सुलभ । निजबोधें कविरूपें ॥ ९ ॥ कवि मुमुक्षूंचें अंजन । कवि साधकांचें साधन । कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १० ॥ कवि स्वधर्माचा आश्रय । कवि मनाचा मनोदय । कवि धार्मिकांचा विनय । विनयकर्ते ॥ ११ ॥ कवि वैराग्याचें रक्षण । कवि भक्तांचें भूषण । नाना स्वधर्मांचें स्थापन । ते हे कवी ॥ १२ ॥ कवि प्रेमळांची प्रेमस्थिती । कवि ध्यान- स्थांची ध्यानमूर्ती । कवि उपासकांची वांडे कीर्ती । विस्तारली ॥ १३ ॥ नाना साधनांचें मूळ । कवि नाना प्रयत्नांचें फळ । नाना कार्यसिद्धि सकळ । कवीचेनि प्रसादें ॥ १४ ॥ आधीं कवीचा वाग्विलास । तरी मग श्रवणीं तुंबले रस । कवीचेनि मतिप्रकाश । कवित्वास होय ॥ १५ ॥ कवि व्युत्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंताची सत्ता । कवि विचक्षणाची कुशलता । नाना प्रकारें ॥ १६ ॥ कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना घाटी मुद्रा छंद । कवि गद्यपद्य भेदाभेद । पदप्रास-कर्ते ॥ १७ ॥ कवि- सृष्टीचा अलंकार । कवि लक्ष्मीचा शृंगार । सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८ ॥ कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण । नाना सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९ ॥ कवि देवाचे रूपकर्ते । कवि ऋषींचें महत्त्व वर्णिते । नाना शास्त्रांचे सामर्थ्यांतें । कवि वाखाणिती ॥ २० ॥ नसता कवीचा व्यापार । तरी कैंचा असता जगदुद्धार । म्हणोनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१ ॥ नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवीश्वरावीण तें नाहीं । कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२ ॥ मागां वाल्मीकव्यासा- दिक । जाहले कवीश्वर अनेक । तयांपासून विवेक । सकळ जनांसी ॥ २३ ॥ पूर्वी काव्यें होतीं केलीं । तरीच व्युत्पत्ति प्राप्त जाहली । तेणें पंडितांअंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४ ॥ ऐसे पूर्वी थोर थोर । जाहले कवीश्वर अपार । आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५ ॥ नाना चातुर्यां- च्या मूर्ती । कीं हे साक्षात् बृहस्पती । वेदश्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६ ॥ परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें । सेखीं बोलिलें १. आत्मज्ञान. २. मोठी. ३ शेवटीं.

पूर्णपणें । संशयातीत ॥ २७ ॥ कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवे- रसांचे वोघ लोटले । नाना सुखांचें उचंबळलें । सरोवर हें ॥ २८ ॥ कीं हीं विवेकनिधींचीं भांडारें । प्रकट जाहलीं मनुष्याकारें । नाना वस्तूंचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९ ॥ कीं हें आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदा- र्थांसि आणि उणें । लाधलें पूर्वसंचिताच्या गुणें । विश्वजनांसी ॥ ३० ॥ कीं हीं सुखाचीं तारवें लोटलीं । अक्षय आनंदें डैतटलीं । विश्वजनांसी उपयोगा आलीं । नाना प्रयोगकारणें ॥ ३१ ॥ कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती । कीं हे भक्तीची फलश्रुती । फळासि आली ॥३२॥ कीं हा ईश्वराचा पॅवाड । पहातां गगनाहून वाड । ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंधरचना ॥ ३३ आतां असो हा विस्तार । जगासि आधार कवीश्वर । तयांसि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे प्रथमदशके कवीश्वरस्तवनं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. सभावर्णन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदूं सकळ सभा । जिये सभेसी मुक्ति सुलभा । जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठत प्रेमभरें ॥ १ ॥ श्लोक ॥ नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ १ ॥ टी० ॥ नाहीं वैकुंठींच्या ठायीं । नाहीं योगियांचे हृदयीं । माझे भक्त गाती जे ठाईं । तेथें मी तिष्ठत नारदा ॥ २ ॥ या कारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ । नामघोष गडगडाट । जयजयकारें गर्जती ॥३॥ प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवद्वाक्यें हरिकीर्तनें । वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४ ॥ परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणांचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथें ॥ ५ ॥ नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकांनिवृत्ती । चित्तीं बैसे ध्यानमूर्ती । वाग्विलासें ॥ ६ ॥ भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्विक । रम्य रसाळ गायक । निष्ठावंत १. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, वीभत्स, रौद्र आणि शांत या नऊ रसांचे. २. उचंबळून आलीं. ३. विश्वस्वरूप ईश्वराची. ४. कीर्ति, मोठेपणा. ५. वेदान्तविद्या. ६. गंभीर.

१४ श्रीदासबोध. [ दशक ॥ ७ ॥ कर्मशीळ आचारशीळ । दानशीळ धर्मशीळ । शुचिमंत पुण्यशीळ अंतरशुद्ध कृपाळू ॥ ८ ॥ योगी विरागी उदास । नेमनिग्रही तापस । विरक्त निस्पृह बहुवस । अरण्यवासी ॥ ९ ॥ दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्रा- धारी । एक बाळब्रह्मचारी । योगीश्वर ॥ १० ॥ पुरश्चरणी आणि तपस्वी । तीर्थवासी आणि मनस्वी । महायोगी आणि जनसैवी । जनासारिखे ॥ ११॥ सिद्ध साधु आणि साधक । मंत्रयंत्रादि शोधक । एकनिष्ठ उपासक । गुण- ग्राही ॥ १२ ॥ संत सज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन । प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळ कर्ते ॥ १३ ॥ योगी व्युत्पन्न ऋषीश्वर । धूर्त तार्किक कवीश्वर । मनोजयाचे मुनीश्वर । आणि दिग्वल्कलीं ॥ १४ ॥ ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी । तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी । योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५ ॥ पंडित आणि पुराणिक । विद्वांस आणि वैदिक । भट आणि पाठक । यजुर्वेदी ॥ १६ ॥ महाभले महाश्रोत्री । याज्ञिक आणि अग्निहोत्री । वैद्य आणि पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७ ॥ भूत भविष्य व- र्तमान । जयांसि त्रिकाळींचें ज्ञान । बहुश्रुत निरभिमान । निरपेक्षी ॥ १८॥ शांतिक्षमादयाशीळ । पवित्र आणि सत्त्वशीळ । अंतरशुद्ध ज्ञानशीळ । ई- श्वरी पुरुष ॥ १९ ॥ ऐसे जे कां सभानायक । जेथें नित्यानित्यविवेक । त्यांचा महिमा अलौकिक । काय म्हणून वर्णावा ॥ २० ॥ जेथें श्रवणाचा उपाय । आणि परमार्थसमुदाय । तेथें जनांस तरणोपाय । सहजचि घडे ॥ २१ ॥ उत्तम गुणांची मंडळी । सत्त्वधीर सत्त्वागळी । नित्य सुखाची न- व्हाळी । जेथें वसे ॥ २२ ॥ विद्यापात्रे कळापात्रे । विशेष गुणांचीं सत्पात्रे । भगवंताचीं प्रीतिपात्रे । मिळालीं जेथें ॥ २३ ॥ प्रवृत्ति आणि निवृत्ति । प्रपंची आणि परमार्थी । गृहस्थाश्रमी वानप्रस्थी । संन्यासादिक ॥ २४ ॥ वृद्ध तरुण आणि बाळ । पुरुष स्त्रियादि सकळ । अखंड ध्याती तमालनीळें । अंतर्यामीं ॥ २५ ॥ ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसि माझें अभिवंदन । जयां- चेनि समाधान । अकस्मात बाणे ॥ २६ ॥ ऐसिये सभेचा गजर । तेथें माझा नमस्कार । जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७ ॥ जेथें १. शुद्ध. २. मन जिंकणारे. ३. जनप्रिय, ४. दिशाच ज्यांचीं वल्कले तें. ५. शरीराचें तत्व जाणणारे. ६. नवेपणा. ७. घनश्याम, श्रीकृष्ण. ८. हृदयामध्यें.

१ द. ] परमार्थस्तवन. १५ भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती । ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं । महंत बोलिले ॥ २८ ॥ कलौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ । कथा- श्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे प्रथमदशके सभावर्णनं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. परमार्थस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां स्तवूं हा परमार्थ । जो साधकांचा निज- स्वार्थ । नातरी समर्थांमध्यें समर्थ । योग हा ॥ १ ॥ आहे तरी परम सु- गम । परी जनासि जाहला दुर्गम । कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २ ॥ नाना साधनांचें उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार । वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३ ॥ आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टीस न पडे । उदास परी एकीकडे । पहातां दिसेना ॥ ४ ॥ आकाशमार्गै गुप्त पंथ । जाणती योगी समर्थ । इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५ ॥ साराचेंहि निजसार । अखंड अक्षय अपार । नेऊं न शकती तस्कर । कांहीं केल्या ॥ ६ ॥ तयासि नाहीं राजभय । अथवा नाहीं अग्निभय । अथवा श्वापदभय । बोलोंच नये ॥ ७ ॥ परब्रह्म तें हालवेना ! अथवा ठावही चुकेना । कालांतरीं चळेना । जेथींचें तेथें ॥ ८ ॥ ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे । अथवा नव्हे अधिक उणें । बहुतां काळें ॥ ९ ॥ अथवा तें बसवटेना । अथवा अदृश्य होईना । नातरी पाहतां दिसेना । गुरुअंजनेंविण ॥ १० ॥ मागां योगिये समर्थ । त्यांचांहि निजस्वार्थ । त्यासि बोलिजे परमार्थ । परम गुह्य म्हणोनि ॥ ११ ॥ ज्यांहीं शोधून पाहिला । त्यांसीच अर्थ सांपडला । येरां असोनि अलभ्य झाला । जन्मोजन्मीं ॥ १२ ॥ अपूर्वता या परमा- र्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्यूची । आणि पदवी सायुज्यतेची । सन्निधचि लाभे ॥ १३ ॥ माया विवेकें मावळे । सारासार विचार कळे । परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४ ॥ ब्रह्मीं भासलें उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड । पंचभूतांचें थोतांड । तुच्छ वाटे ॥ १५ ॥ प्रपंच वाटे लटिका । माया वाटे झापाणिकों । शुद्ध आत्मा विवेका-। अंतरीं आला ॥ १६ ॥ ब्रह्मस्थिति बा- १. मलिष्ट. २. सद्गुरूच्या उपदेशावांचून. ३. कृत्रिम, पोकळ.

१६ श्रीदासबोध. [ दशक पतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी । दृश्याची जुनी जेर्जरी । कुहीटें जाहेली ॥ १७॥ ऐसा हा परमार्थ । जो करील त्याचा निजस्वार्थ । आतां या समर्थासि समर्थ । किती म्हणोनि म्हणावें ॥ १८ ॥ या परमार्थाकरितां ब्रह्मादिकांसि विश्रामता । योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९ ॥ पर- मार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु महानुभावां । सेखीं सात्विक जड- जीवा । सत्संगेंकरूनी ॥ २० ॥ परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं तारक । परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकांसी ॥ २१ ॥ परमार्थ ताप- सांसी आधार । परमार्थ साधकांसी धार । परमार्थ पाववी पार । भवसाग- राचा ॥ २२ ॥ परमार्थां तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी । या परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥ २३॥ अनंत जन्मींचें पुण्य जोडे । तरीच हा परमार्थ घडे । मुख्य परमात्मा आतुडे । स्वानुभवासी ॥ २४ ॥ जेणें पर- मार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थ केला । येर तो पापी जन्मला । कुळ- क्षयाकारणें ॥ २५ ॥ असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा शीण । त्या मूर्खाचें मुखावलोकन । करूं नये ॥ २६ ॥ भल्यानें परमार्थां भरावें । शरीर- सार्थक करावें । पूर्वजांसी उद्धरावें । हरिभक्ती करूनी ॥ २७॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके परमार्थस्तवनं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. नरदेहस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहा हो । जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १ ॥ या नरदेहाचेनि लागेंवेगें । एक लागले भक्तिसंगें । एकीं परम वीतरागें । गिरिकंदरें से- विलीं ॥ २ ॥ एक फिरती तीर्थाटणें । एक करिती पुरश्चरणें । एक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३ ॥ एक तपें करूं लागले । एक योगा- भ्यासी भले । एक अभ्यासयोगें जाहले । वेदशास्त्रीं व्युत्पन्न ॥ ४ ॥ एकीं हठनिग्रह केला । देह अत्यंतचि पीडिला । एकीं देव ठाईं पाडिला । भावार्थबळें ॥ ५ ॥ एक महानुभाव विख्यात । एक भक्त झाले ख्याति- १. जीर्णावस्था. २. नासून गेली. ३. प्राप्त होतो. ४. लाभानें, आधारानें.

वंत । एक सिद्ध अकस्मात । गगन वोळंगती ॥ ६ ॥ एक तेजीं तेज जा- हले । एक जळीं मिळोन गेले । एक दिसतांचि अदृश्य जाहले । वायुरूपीं ॥ ७ ॥ एक एकचि बहुधा होती । एक देखतांचि निघोन जाती । एक बै- सले असतांचि भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८ ॥ एक भयानकांवरी बैसती । एक अचेतनें चालविती । एक ते प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९ ॥ एक तेजें मंद करिती । एक जळें आटविती । एक वायु निरोधिती । विश्वजनांचा ॥ १० ॥ ऐसे हठनिग्रही कृतबुद्धी । जयांसि वोळल्या नाना सिद्धी । ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊनि गेले ॥ ११ ॥ एक मनःसिद्ध एक वाचासिद्ध । एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध । ऐसे नानाप्रकारचे सिद्ध । विख्यात जाहले ॥ १२ ॥ एक नवविधाभक्तिराजपंथें । गेले तरले परलोकींच्या निजस्वार्थे । एक योगी गुप्त पंथें । ब्रह्मभुवन पावले ॥ १३ ॥ एक वैकुंठास गेले । एक सत्यलोकीं राहिले । एक कैलासीं बैसले । शिवरूप होऊनी ॥ १४ ॥ एक इंद्रलोकीं इंद्र जाहले । एक पितृलोकीं मिळाले । एक उँडुगणीं बैसले । एक ते क्षीरसागरीं ॥ १५ ॥ सलोकता समीपता । स्वरूपता सायुज्यता । या चार मुक्ति तत्वतां । इच्छा सेवून राहिले ॥ १६ ॥ ऐसे सिद्ध साधु संत । स्वहितीं प्रवर्त्तले अनंत । ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणोनि वर्णावा ॥ १७॥ या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें । मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८ ॥ या नरदेहाचेनि संबंधें । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सो- डोनि स्वानंदें । सुखी जाहले ॥ १९ ॥ नरदेहीं येऊनि सकळ । ऊर्ध्वगति पावले केवळ । येथें संशयाचें मूळ । खंडोनि गेलें ॥ २० ॥ पशुदेहीं नाहीं गती । ऐसें सर्वत्र बोलती । म्हणोनि नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१ ॥ संत महंत ऋषि मुनि । सिद्ध साधु समाधानी । भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२ ॥ तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी । पिंडज्ञानी षट्दर्शनी तापसी । नरदेहींच जाहले ॥ २३ ॥ म्ह


१. सिंह, व्याघ्र इत्यादिकांवर. २. निर्जीव पदार्थ. ३. निश्चयी. ४. नक्षत्रांच्या समुदायांत. ५. न्याय, वैशेषिक, सांख्य, पातंजल, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशीं सहा शास्त्रें जाणणारे.

१८ श्रीदासबोध. [ दशक णेन नरदेहचि श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ । जयाचेनि चुके अरिष्ट । यम- यातनेचें ॥ २४ ॥ नरदेह हा स्वाधीन । सहसा नव्हे पराधीन । परंतु हा परोपकारीं झिजवून । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५ ॥ अश्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी । कृपाळुपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६ ॥ तैसा नव्हे नरदेहो । इच्छा जावो अथवा राहो । परी यास कोणी पहा हो । बंधन करूं शकेना ॥ २७ ॥ नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येता । अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥२८॥ नरदेह अंध असिला । तरी तो निपट वायां गेला । अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९ ॥ नरदेह असिला मुका । तरी घेतां न ये आशंका । अशक्त रोगी नासका । तरी तो निष्कारण ॥३०॥ नरदेह असिला मूर्ख । अथवा फॅपऱ्या समंधाचें दुःख । तरी तो जाणावा निर- र्थक । निश्चयेंसी ॥ ३१ ॥ इतुकेँही नसतां व्यंग । नरदेह आणि सकळ सांगें । तेणें धरावा परमार्थमार्ग । लौगवेगें ॥ ३२ ॥ सांगें नरदेह जोडला । आणि परमार्थबुद्धि विसरला । तरी मूर्ख कैसा भ्रमला । मायाजाळीं ॥३३॥ मृत्तिका खणोनि घर केलें । तें माझें असें दृढ कल्पिलें । परी हें बहुतांचें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४ ॥ मूषक म्हणती घर आमुचें । पाली म्ह- णती घर आमुचें । मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसी ॥ ३५ ॥ कां- तर्ण्य म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें । मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसी ॥ ३६ ॥ विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर । झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ३७ ॥ भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोऱ्या म्हणती आमुचें घर । आळिका म्हणती आमुचें घर । काष्ठामध्यें ॥ ३८॥ मार्जारें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर । मुंगुसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ३९ ॥ ढेंकूण म्हणती आ- मुचें घर । चांचणें म्हणती आमुचें घर । घुंगरडीं म्हणती आमुचें घर । नि- श्चयेंसी ॥ ४० ॥ पिंगूळ म्हणती आमुचें घर । व्याळें म्हणती आमुचें घर । पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ४१ ॥ पिसोळे म्हणती आमुचें १. सर्व अवयवांनीं युक्त. २. अति त्वरेनें. ३. उंदोर. ४. कोळ्याच्या जातीचा एक लहान किडा. ५. भ्रमरीची आळी. ६. कीड. ७. सर्प.

१ ला. ] नरदेहस्तवन. १९ घर । गांधले म्हणती आमुचें घर । सोट म्हणती आमुचें घर । आणि गोमी ॥ ४२ ॥ बहुत किड्यांचा जोजारें १ । किती सांगावा विस्तार । समस्त म्ह- णती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३ ॥ पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर । ग्रामस्थ म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥४४॥ पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर । घरचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५ ॥ तस्कर म्हणती आमुचें घर । राजकीय म्हणती आमुचें घर । अग्नि म्हणे आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६ ॥ समस्त म्ह- णती घर माझें । हें मूर्खही म्हणे माझें माझें । शेवटीं जड जाहलें बोझें । टाकिला देश ॥ ४७ ॥ अवघीं घरें भंगलीं । गांवाची पांढरी २ पडली । मग ते गृहीं राहिलीं । अरण्यश्वापदें ॥ ४८ ॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचें घर निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोनि गेलें ॥ ४९ ॥ ऐसी गृहाची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रतीती । जन्म दों दिवसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५० ॥ देह म्हणावें आपुलें । तरी तें बहुतात्कारणें निर्मिलें । प्राणियांच्या माथां घर केलें । उवा मस्तकीं भक्षिती ॥ ५१ ॥ रोममुळीं किडे भक्षिती । खांडूक झाल्या किडे पडती । पोटामध्यें जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२ ॥ कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी । कीड लागे कर्णांसी । आणि गोमाशा भरती ॥ ५३ ॥ गोचडि अशुद्ध ३ सेविती । चामवा मांसांत घुसती । पिसोळे चावून पळती । अक- स्मात ॥ ५४ ॥ सुंगे गांधले चाविती । गोमी जळवा अशुद्ध घेती । विंचू सर्प दंश कारिती । काँनटें फुशीं ४ ॥ ५५ ॥ जन्मोन देह पाळिलें । तें अक- स्मात व्याघ्रें नेलें । कीं तें लांडग्यांचि भक्षिलें । बलात्कारें ॥ ५६ ॥ मूषक- मार्जारें दंश कारिती । श्वानें अश्वें लोळें ५ तोडिती । रिसें ६ मर्कटें मारिती । कासावीस करूनियां ॥ ५७ ॥ उँहूॅ ७ डसोन उचलिती । हस्ती चिरडोनि टाकिती । वृषभ टोंचोन मारिती । अकस्मात ॥ ५८ ॥ तस्कर तडतडां तोडिती । भुतें झडपोन मारिती । असो या देहाची स्थिती । ऐसी आहे ॥ ५९ ॥ ऐसें शरीर बहुतांचें । हें मूर्ख म्हणे आमुचें । परंतु खाजें ९ जिवांचें । १. जंजाळ. २. लोकवस्ती; गांव ओस झाला हा अर्थ. ३. रक्त. ४. एक जातीचे जंतु. ५. लाडे, मांसाचे तुकडे. ६. अस्वलें. ७. उंट. ८. बैल. ९. खाद्य.

२० श्रीदासबोध. [ दशक तापत्रयीं बोलिलें ॥ ६० ॥ देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जाहलें । नाहीं तरी व्यर्थचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथें ॥ ६१ ॥ असो जे प्रापंचिक मूर्ख । ते काय जाणती परमार्थसुख । त्या मूर्खाचें लक्षण कांहींएक । पुढें बोलिलें असे ॥ ६२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके नरदेहस्तवनं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी ३२६. दशक दुसरा. १. मूर्खलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ॐनमोजी गजवदना । एकदंता त्रिनयना । कृपादृष्टीं भक्तजना । अवलोकावें ॥ १ ॥ तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्म- सुते । अंतरीं वसें कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥ वंदूनि सद्गुरुचरण । करूनि रघुनाथस्मरण । त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥३॥ एक मूर्ख एक पढत- मूर्ख । उभय लक्षणीं कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पाहिजे ॥ ४ ॥ पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । सावध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥ आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार । परी कांहीं एक तत्पर । होऊनि ऐका ॥ ६ ॥ जे प्रापंचिक जन । जयांसि नाहीं आत्मज्ञान । जे केवळ अज्ञान । त्यांचीं हीं लक्षणें ॥ ७ ॥ जन्मला जयांचे उदरीं । तयांसि जो विरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो एक मूर्ख ॥ ८ ॥ सांडोनि सर्वही गोत । स्त्रिये आधीन जीवित । सांगे अंतरींची मात । तो एक मूर्ख ॥ ९ ॥ परस्त्रियेसी प्रेम धरी । श्वशुरगृहीं वास करी । कुळेंविण कन्या वरी । तो एक मूर्ख ॥ १० ॥ समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता । सामर्थ्याविण करी सत्ता । तो एक मूर्ख ॥ ११ ॥ आपली १. तापत्रयनिरूपणांत. (दशक ३, समास ६।७।८ पहा.) २. ग्रंथलेखनाच्या स्फुरणरूपानें ३. स्त्री.

२ रा. ] मूर्खलक्षण. २१ आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ती । सांगे वडिलांची कीर्ती । तो एक मूर्ख ॥ १२ ॥ अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी । जो बहु- तांचा वैरी । तो एक मूर्ख ॥ १३ ॥ आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यांसी मैत्री करी । परन्यून बोले अहोरात्रीं । तो एक मूर्ख ॥ १४ ॥ बहुत जाग- ते जन । तयांमध्यें करी शयन । परस्थळीं बहु भोजन । करी तो एक मूर्ख ॥ १५ ॥ मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न¹ । सदा व्यसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख ॥ १६ ॥ धरूनि पराची आस । प्रयत्न सांडी सावकाश । निसुगाईचाँ² संतोष । मानी तो एक मूर्ख ॥ १७ ॥ घरीं विवे- क उमजे । आणि सभेमध्यें लाजे । शब्द बोलतां निर्बुजे³ । तो एक मूर्ख ॥ १८ ॥ नायके त्यास शिकवी । वडिलांस जाणीव दावी । जो सात्विकां- सि गोंवी⁴ । तो एक मूर्ख ॥ १९ ॥ आपणासून जो श्रेष्ठ । तयासि अत्यंत निकट । शिकवणीचा मानी वीट । तो एक मूर्ख ॥ २० ॥ एकाएकीं एक- सरा । जाहला विषयीं निलाजिरा । मर्यादा सांडोनि सैराँ⁵ । वर्ते तो एक मूर्ख ॥ २१ ॥ औषध न घे असोनि व्यथा । पथ्य न करी सर्वथा । न मिळे आलिया पदार्था । तो एक मूर्ख ॥ २२ ॥ संगेंविण विदेश⁶ करी । वोळखी- विण संग धरी । उडी घाली महापुरीं । तो एक मूर्ख ॥ २३ ॥ आपणासि जेथें मान । तेथें अखंड करी गमन । रक्षूं नेणे मानाभिमान । तो एक मूर्ख ॥ २४ ॥ सेवक जाहला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित । सर्वकाळ जो दुश्चित । तो एक मूर्ख ॥ २५ ॥ विचार न करितां कारण । दंड करी अप- राधाविण । स्वल्पासाठीं जो कृपण । तो एक मूर्ख ॥ २६ ॥ देवलंड पितृ- लंड । शक्तिविण करितो दंड । ज्याचे मुखीं भंड⁷भंड । तो एक मूर्ख ॥ २७ ॥ घरींच्यावरी खाय दाढा । बाहेर दीन बापुडा । ऐसा जो कां मूढ वेडा । तो एक मूर्ख ॥ २८ ॥ नीच यातीसि सांगात । परांगनेसि एकांत । मागें जाय खात खात । तो एक मूर्ख ॥ २९ ॥ स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनुपकार । करी थोडें बोले फार । तो एक मूर्ख ॥ ३० ॥ तपिळ⁸ खादाड आळसी । कुश्चिळ⁹ कुटिळ¹⁰ मानसीं । धारिष्ट नाहीं जयापाशीं । तो एक मूर्ख


१. उघड. २. आळसाचा, किंवा निर्लज्जपणाचा. ३. घाबरतो. ४. पीडा करी. ५. स्वैर. ६. प्रवास ७. बडबड. ८. तापट. ९. दुष्ट स्वभावी १०. कपटी.

२२ श्रीदासबोध. [ दशक ॥ ३१ ॥ विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान । तो एक मूर्ख ३२ ॥ लंडी लटिका लबाड । कुकर्मी कुटिल निचोड । निद्रा जयाची वाँड । तो एक मूर्ख ॥ ३३ ॥ दंत चक्षु आणि घ्राण पाँणी वसन आणि चरण । सर्वकाळ जयाचे मलिन । तो एक मूर्ख ॥ ३४॥ ऊंचीं जाऊनि वस्त्र नेसे । चौबारां बाहेरि बैसे । सर्वकाळ नग्न दिसे । तो एक मूर्ख ॥ ३५ ॥ वैधृति आणि व्यतिपात । नाना कुमुहूर्तै जात । अपशकुनें करी घात । तो एक मूर्ख ॥ ३६ ॥ क्रोध अभिमान कुबुद्धी आपणासि आपण वधी । जयासि नाहीं दृढ बुद्धी । तो एक मूर्ख ॥ ३७ ॥ जिवलगांसी परम खेदी । सुखाचा शब्द तोही नेदी । नीच जनांसि वंदी । तो एक मूर्ख ॥ ३८ ॥ आपणासि राखे नानापरी । शरणागतासि अव्हेरी । लक्ष्मीचा भरंवसा धरी । तो एक मूर्ख ॥ ३९ ॥ पुत्र कलत्र आणि दारा । इतु- काचि मानूनियां थारा । विसरोन गेला ईश्वरा । तो एक मूर्ख ॥४०॥ जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावावें । हें जयासी नेणवे । तो एक मूर्ख ॥ ४१ ॥ पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांसी ईश्वरी देणें । ऐशा केल्या बहुत जेणें । तो एक मूर्ख ॥ ४२ ॥ दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडोनि चाले । दिवसा झांकिले डोळे । तो एक मूर्ख ॥ ४३ ॥ देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही । ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो एक मूर्ख ॥ ४४ ॥ आदरेंविण बोलणें । न पुसतां साक्ष देणें । निंद्य वस्तु अंगिकारणें । तो एक मूर्ख ॥ ४५ ॥ तुर्क तोडोनि बोले । मार्ग सोडोनि चाले । कुकर्मी मित्र केले । तो एक मूर्ख ॥ ४६ ॥ परपिडेचें मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख । गेले वस्तूचा करी शोक । तो एक मूर्ख ॥ ४७ ॥ पत्त राखो नेणे कदा । विनोद करी सर्वदा । हांसतां खिजे पेटे हुंद्दीं । तो एक मूर्ख ॥ ४८ ॥ होर्ड घाली अवघड । 'काजेंविण करी बडबड । बोलोचि नेणे मुखजड । तो एक मूर्ख ॥ ४९ ॥ वस्त्र शस्त्र दोन्ही नसे । उंचस्थानीं जाऊनि बैसे । जो गोत्रजांसि विश्वासे । तो एक मूर्ख ॥ ५० ॥ तस्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे । आपुलें अनहित करी रागें । तो एक मूर्ख ॥ ५१ ॥ हीन जनांसि बरोबरी । बोल १. निर्लज्ज. २. अतिशय. ३. हात ४. चव्हाठा. ५. कामविकार. ६. वजन, महत्व. ७. झोंबी करण्यास. ८. पैज.

२ रा. ] मूर्खलक्षण. २३ बोले सरोत्तरीं । वामहस्तें प्राशन करी । तो एक मूर्ख ॥ ५२ ॥ समर्थांसी मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी । घरींच्या घरीं करी चोरी । तो एक मूर्ख ॥ ५३ ॥ सांडोनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भरंवसा । सार्थकेंविण वेंची वयसा । तो एक मूर्ख ॥ ५४ ॥ संसारदुःखाचेनि गुणें । देवासी गाळी देणें । मैत्राचे बोले उणें । तो एक मूर्ख ॥ ५५ ॥ अल्प अ- न्याय क्षमा न करी । सर्वकाळ धारकीं धरी । जो विश्वासघात करी । तो एक मूर्ख ॥ ५६ ॥ समर्थांचे मनींचा तुटे । जयाचेनि सभा विटे । क्षणीं बरा क्षणीं पालटे । तो एक मूर्ख ॥ ५७ ॥ बहुत दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक । ज्याची सभा निर्नायक । तो एक मूर्ख ॥ ५८ ॥ अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी । तो एक मूर्ख ॥ ५९ ॥ घरीं असोनि सुंदरी । जो सदा परद्वार करी । बहुतांचें उच्छिष्ट अंगिकारी । तो एक मूर्ख ॥ ६० ॥ आपलें अर्थ दुसऱ्यापाशीं । आणि दुसऱ्याचें अभिलाषी । पर्वतें करी हीनासी । तो एक मूर्ख ॥ ६१ ॥ अतीताचा अंत पाहे । कुग्रामामध्यें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो एक मूर्ख ॥ ६२ ॥ दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो एक मूर्ख ॥ ६३ ॥ उदकामध्यें सांडी गुरळी । पायें पाय खांजोळी । सेवा करी हीन कुळीं । तो एक मूर्ख ॥ ६४ ॥ स्त्री- बाळकांस सलगी देणें । पिशाच्चासन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें । तो एक मूर्ख ॥ ६५ ॥ परस्त्रींशीं कलह करी । मुकी वस्तु निघातें मारी । मूर्खाची संगति धरी । तो एक मूर्ख ॥ ६६ ॥ कलह पाहत उभा राहे । सोडवीना कौतुक पाहे । खरें असतां खोटें साहे । तो एक मूर्ख ॥ ६७ ॥ लक्ष्मी आलियावरी । जो मागील ओळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो एक मूर्ख ॥ ६८ ॥ आपुलें कार्य होय तोंवरी । बहुसाल नम्रता धरी । पुढिलांचें कार्य न करी । तो एक मूर्ख ॥ ६९ ॥ अक्षरें गाळून वाची । कांहीं घाली पदरींचीं । निगा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख ॥ ७० ॥ आपण वाचीना कधीं । कोणासि वाचाया नेदी । बांधोनि ठेवी बंदीं । तो १. उत्तरास उत्तर असे. २. हांव. ३. धारेवर धरतो, त्रास देतो. ४. द्रव्य, ठेव. ५. देणें घेणें. ६. याचकाचा. ७. गुळणी. ८. कुतरें. ९. प्राणी. १० दुसऱ्याचें.

२४ श्रीदासबोध. [ दशक एक मूर्ख ॥ ७१ ॥ ऐसीं हीं मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे । चित्त देऊ- निया शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥ लक्षणें अपार असती । परी कांहीं एक यथामती । त्यागार्थ बोलिलों श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥ ७३ ॥ उत्तम लक्षणें घ्यावी । मूर्खलक्षणें त्यागावीं । पुढिले समासीं आघवीं । निरू- पिलीं ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके मूर्खलक्षणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. उत्तमलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । जेणेंकरितां बाणे खूण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥ वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये । सांपडली वस्तु घेऊं नये । एकाएकीं ॥ २ ॥ अतिवाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये । शोधिल्याविण करूं नये । कुळहीन कांता ॥ ३॥ विचारेंविण बोलूं नये । मर्यादेविण हालूं नये । विवंचनेविणें चालूं नये । कांहीं केल्या ॥ ४ ॥ प्रीतीविण रुसूं नये । चो- रासि वोळखी पुसूं नये । रात्रीं पंथ क्रमूं नये । एकाएकीं ॥ ५ ॥ जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥ निंदाद्वेष करूं नये । असत्संग धरूं नये । द्रव्यदारा हरूं नये । बलात्कारें ॥ ७ ॥ वक्त्यास खंडूं नये । ऐक्यतेसि फोडूं नये । विद्याभ्यास सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥ तोंडाळासि भांडूं नये । वाचाळासि तंडूं नये । संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥ अतिक्रोध करूं नये । जिवल- गासि खेदूं नये । मनीं वीट मानूं नये । शिकवणीचा ॥ १० ॥ क्षणक्षणा रुसूं नये । लटिका पुरुषार्थ बोलूं नये । केल्याविण सांगूं नये । आपुला पराक्रम ॥ ११ ॥ बोलिला बोल विसरूं नये । प्रसंगीं सामर्थ्य चुकूं नये । केल्याविण निर्खंदूं नये । पुढिलांसी कदा ॥ १२ ॥ आळसें सुख मानूं नये । चहाडी मनासी आणूं नये । शोधिल्याविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३ सुखा अंग देऊं नये । प्रयत्न पुरुषें सांडूं नये । कष्ट करितां त्रासूं नये । निरंतर ॥ १४ ॥ सभेमध्यें लाजू नये । बाष्कळपणें बोलूं नये । पैज होड १. विचार केल्यांशिवाय. २. तिरस्कार अथवा धिक्कार करूं नये.

२ रा. ] उत्तमलक्षण. २५ घालूं नये । कांहीं केल्या ॥ १५ ॥ बहुत चिंता करूं नये । निःसंगपणें राहूं नये । परस्त्रीतें पाहूं नये । पापबुद्धीं ॥ १६ ॥ कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखूं नये । परपीडा करूं नये । विश्वासघात ॥ १७ ॥ शौचेंविण असूं नये । मळिण वस्त्र नेसूं नये । जाणारासी पुसूं नये । कोठें जातोसि म्हणोनि ॥ १८ ॥ व्यापकेंपण सोडूं नये । पराधीन होऊं नये । आपलें ओझें घालूं नये । कोणी एकासी ॥ १९ ॥ पत्रेंविणें परतें करूं नये । हीनाचें ऋण घेऊं नये । ग्वाहीविण जाऊं नये । राजद्वारीं ॥ २० ॥ ल- टकी जांजू घेऊं नये । सभेसि लटिकें करूं नये । आदर नसतां बोलूं नये । स्वाभाविक ॥ २१ ॥ अदेखणेपण करूं नये । अन्यायाविण गांजूं नये । अ- नतिीनें वर्तू नये । अंगबळें ॥ २२ ॥ बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करूं नये । बहुत दिवस राहूं नये पिशुना

२६ श्रीदासबोध. [ दशक वाचा नवस बुडवूं नये । आपुला धर्म उडवूं नये । भलते भरीं पडूं नये । विचारेंविण ॥ ३६ ॥ निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये । पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥ सभा देखोनि गळूं नये । समयीं उत्तर टळूं नये । धिक्कारितां ढळूं नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥ गुरुविरहित असूं नये । नीच यातीचा गुरु करूं नये । जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥ सत्य मार्ग सोडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥ अपकीर्ति सोडावी । सत्कीर्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥ न घेतां हे उत्तम गुण । तो मनुष्य अवलक्षण । ऐक त्याचें लक्षण । पुढिलिये समासीं ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीय- दशके उत्तमलक्षणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. कुविद्यालक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका कुविद्येचीं लक्षणें । अतिहीन कुलक्षणें । त्यागार्थ बोलिलों श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥ ऐका कुविद्येचे प्राणी । जन्मा येऊनि केली हानी । सांगिजेल इहीं लक्षणीं । श्रोतीं ओळखावा ॥ २ ॥ कुविद्येचा प्राणी असे । तो कठिन निरूपणीं त्रासे । अवगुणांची समृद्धि असे । ह्मणोनियां ॥ ३ ॥ श्लोक ॥ दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ टी०॥ काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार । गर्व ताठा अहंकार । द्वेष विवाद विकल्पी ॥ ४ ॥ आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना । असूया अविद्या ईषणा वासना । अतृप्ति लोलंगतां ॥ ५ ॥ इच्छा वांञ्छा चिकित्सा निंदा । अनीति ग्रामेणी मस्ती सदा । जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ति दुर्वासना ॥ ६ ॥ स्पर्धा खटपट आणि चटपट । नव्हे झटपट आणि वटवट । सदा खटनट आणि लटपट । परम व्यथा आणि कुविद्या ॥७॥ कुरूप आणि कुलक्षण । अशक्त आणि दुर्जन । दरिद्री आणि कृपण । अतिशयेंसी ॥८॥ आळसी आणि खादाड । दुर्बळ आणि लाताड । तुटक आणि लुबाड । १. गीं. अ. १६. २. मत्सर. ३. इच्छा. ४. लुब्धपणा. ५. हरामी. ६. शठ व नष्ट.