सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
असला खटाटोप न करता अगदी सोपे असे हे नामसंकीर्तनाचे साधन या कलियुगात माणसांस उपलब्ध झाले आहे. 'हेंचि कलिमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचें' कारण या कीर्तनामुळे 'महापापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले' अशी साक्ष एकनाथांनी दिली आहे. 'पतित पातकी पावनपंगतीं । चतुर्भुज होती देवा ऐसे' असा निर्णय या एका अभंगात तुकारामबुवा देतात त्यास आधारही त्यांच्या व इतर संतांच्या वाङ्मयात भरपूर सापडतात. 'कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥ वाल्ह्या तारिला कीर्तनीं । पावन झाला त्रिभुवनीं ॥ गणिका कीर्तनें तरली। मोक्षधामा ती नेली ।। अजामेळ चोख्या महार । कीर्तनी तरले अपार ॥ एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक जाले पावन' असा या कीर्तनाचा महिमा स्वतः एकनाथांनी वर्णन केलेला आहे या कीर्तन परंपरेविषयीच्या अधिक माहितीसाठी अभंग क्र ९६ वरील विवरण पाहावे १०३७ संसारसोहळे भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विठोबाचें ॥ १ ॥ भय चिंता¹ धाक न मानिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ २ ॥ पापपुण्य त्यांचें धडूं न शके अंग । भक्तांसी धीरंग सर्वभावें ॥ ३ ॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां² भार सर्व वाहे ॥ ४ ॥ तुका म्हणे देव भक्तां वेल्हाईत । भक्त ते निश्चित त्याचियानें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेल्हाईत-साह्यकारी, कैवारी. अर्थ :- संसाराचे सर्व सोहळे अलिप्तपणे भोगणारे जे कुणी आहेत, अशा भक्तांना त्या विठोबाचे साह्य नेहमीच असते. १ जो चक्रपाणी श्रीकृष्णच त्यांचा सांभाळ करीत असल्यामुळे त्यांना भय, चिंता, धाक यांची बाधा कधीही होत नसते. २ सर्व भक्त एका त्या धीरंगाच्या नावेच रंगून गेलेले असल्यामुळे, त्यांच्या अंगास पापपुण्याचा स्पर्श कधीच होऊ शकत नाही. ३ त्या भक्तांना मुक्तही व्हावेसे वाटत नाही पुनः पुनः जन्म घेऊन संसार करावा, अशी त्यांच्या मनांत एक इच्छा असते कारण त्यांचा सर्व भार तो परमेश्वरच वहात असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, देव हा आपल्या भक्तांचा कैवारी आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे ते निश्चित असतात. ५ १०३८ देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहोंचा विचार एकपणें ॥ १ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ २ ॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥ ३ ॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-महिमा. अर्थ :- देवाने भक्तांच्यासाठी अवतार घेणे व भक्ताने त्याचे स्मरण ठेवून संसार करणे या दोन्ही बाबींचे स्वरूप एकच आहे. १ देवाच्या मुळेच भक्तांस सर्व सुखाचे सोहाळे उपभोगता येतात व देवही त्या भक्तांच्या संगतीत सुखी होऊन जातात २ या देवानेच आपल्या भक्तांना जन्म देऊन रूप व आकार दिलेले असतात आणि भक्तांनी त्या देवाचा महिमा वर्णन केलेला असतो. ३ एकाच परब्रह्माच्या अंगावर दोन भाव निर्माण झाले. देव व भक्त, स्वामी व सेवक अशा दोन भावांनी ते परब्रह्म व्यक्त झाले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तरी त्यांच्यात भेद कधीही नसतो. भक्त हाच देव व देव हाच भक्त; इतकी एकरूपता त्यांच्यांत असते. ५ विवरणः- या एका तत्त्वस्पर्शी अभंगात तुकाराम महाराजानी देव व भक्त याच्या अभेदत्वाचे समर्पक वर्णन केले आहे. केवळ सुखासाठी, भोगविलासासाठी, प्रेमाच्या सुखार्थ एकच तत्त्व दोन अवस्थाना आले एक देव झाले, एक भक्त झाले. आणि हे सर्व त्यास तत्त्वाच्या आवडीने झाले. 'आपुलीच आवडी धरूनि सोहळा । आपआपणांतें १ चित्ती, २ त्यांचा.
४६८ | सार्थ तुकारामगाथा व्यानले रे' अशा नांवेत नामदेवांनी या रीतीने वर्णन केले आहे केवळ प्रेमसुखासाठी 'देवचि झाला भक्त' हेंच खरे आहे देवभक्ताचे हे ऐक्य व प्रेमाच्या भोगासाठी त्यांच्यातील भेद हा भक्तिमार्गातील एक मोठा तरल विचार आहे 'देव ते सत । देव ते सत । निमित्त त्या प्रतिभा', 'आम्ही जाणो तुझा भाव । कंचा भक्त, कंचा देव?' इत्यादी वचनातून तुकारामबुवानी देव व भक्त याचे अभिन्नत्व वर्णन केले असून 'अभेदानें भेद राखियेला अंगीं । वाढावया जगों प्रेमसुख' असा निर्णय दिलेला आहे १०३९ हुवरती गाये तयाकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥ १ ॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणे वनमाळी सुखावला ॥ २ ॥ चोरोनिया खाये दुध दही लोणी । भावे चक्रपाणि गोविला तो ॥ ३ ॥ निष्काम तो जाला कामासी लपट । गोपिकाची वाट पाहात बैसे ॥ ४ ॥ जगदानी इच्छी तुळसी एकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥ ५ ॥ तुका म्हणे हेंचि चैतन्य सावळे । व्यापूनि निराळें राहिलैसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका :- हुवरती-मोठ्या प्रेमाने, कैवल्यनिधान - मोक्षाचा, कैवल्याचा साठा, गोविला- गुंतला गेला अर्थ - जो भक्त मोठ्या प्रेमाने गाऊन देवाचे गुणगान करतो, त्याच्याकडे कान देऊन हा कैवल्याचा साठा श्रीहरी उभा राहिलेला असतो १ तो गोपाळानी केलेली पूजा मोठ्या प्रेमाने घेतो, त्याचे उच्छिष्टही ग्रहण करतो त्याच्यातच हा वनमाळी सुखावून जातो २ हा गोपाळांचे दहीदूध, लोणी चोरून खातो व त्यांच्या भावभक्तीत गुंतला जातो ३ गोपिकांविषयी हा प्रेमासक्त असला तरी निष्काम असल्यामुळे त्याची वाट पाहण्यात त्याला सुख वाटते ४ सर्व जगातील लोकांना आपल्या कृपेचे दान देणारा हा प्रभू, एका तुळशीच्या पानाची इच्छा करीत नसतो भक्ताच्या भावास तो अशा प्रकारे जणू विकलाच गेलेला असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, येथे हे सावळे चैतन्य सर्व विश्वात व्यापून आपण पुन वेगळे राहिलेले आहे ६ १०४० समर्थांसी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरों ॥ १ ॥ आदराचे ठायों बहुच आदर । मागितले फार तेथें' वाढी ॥ २ ॥ न म्हणे सोइरा सुहृद आवश्यक । राजा आणि रंक सारिखाचि ॥ ३ ॥ भाव देखे तेथें करी लडबड² । जडा राखे जड निराळेंचि ॥ ४ ॥ कोणी न विसभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥ ५ ॥ तुका म्हणे पोट भरूनी उरवी । धाले³ ऐसे दावी अनुभवे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - समर्थाती-श्रीमंत व उदार गृहस्थाच्या ठिकाणी, वर्णावर्णभेद-उत्तम-कनिष्ठ असा भेद, धाले-संतुष्ट झाले अर्थ :- श्रीमंताच्या घरी मेजवानीच्या प्रसंगी, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ, असा भाव कधी नसतो, त्याच्या घरची सामग्री सर्वांसाठी सिद्ध असते १ ज्याच्या मनात देवाविषयी विशेष आदर असतो त्याचा आदर मग देवही करतो व यामुळे भक्त जेवढे मागतील त्याच्यापेक्षाही जास्त तो त्याना देतो २ ह्यावेळी तो हा माझा सोयरा आहे, हा मित्र आहे, हा राजा आहे, हा भिकारी आहे, असा भेद तो कधी करीत नाही ३ जेथे भक्ताचा शुद्ध भाव त्यात दिसतो, तेथे हा देव फार लुडबुड करुन त्याला जड अशा संसाराच्या उपाधीपासून वेगळे ठेवतो ४ कोणत्याही याचक भक्ताकडे हा दुर्लक्ष करीत नाही त्याची दशा समजायून घेऊन त्याची इच्छा हा देव पूर्ण करितो ५ सर्वांचे पोट भरले आहे व अन्न उरले आहे, सर्वजण जेवून तृप्त झाले आहेत, असे स्वानुभवाने हा जाणतो भक्तानाही असाच अनुभव येतो ६ १ ते ते, २ बडबड, ३ आल.
सार्थ तुकारामगाथा ४६९ १०४१ आलें भरा केणें । येरझार चुके जेणें ॥ १ ॥ उभें केलें विटेवरी । पेठ इनाम पंढरी ॥ २ ॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥ ३ ॥ तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- केणे-माल, जिन्नस. अर्थ:- ज्याच्या सहाय्याने आपली जन्ममृत्यूची येरझार संपते, असा हा या विठ्ठलनामाचा माल बाजारात आला आहे, तो नीट भरून ठेवा. १ पंढरी ही भक्तांना दिलेली इनामाची मोठी पेठ मिळालेली आहे, आणि या ठिकाणी विटेवर हा विठ्ठल उभा राहिलेला आहे. २ तो प्राप्त व्हावा म्हणून चहू दिशांनी एकसारखा ओघ लागलेला आहे. सर्व दिशांनी याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळून गेली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, बापहो, हा माल घेण्यासाठी माप मात्र खरेखुरे आणा. ४ १०४२ लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥ १ ॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥ २ ॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥ ३ ॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- लक्ष्मीवल्लभा-लक्ष्मीपती, पद्मनाभा-ज्याच्या नाभीमधून कमळ उगवले आहे, असा देवा. अर्थ :- लक्ष्मीपती, दीनांच्या नाथा, पद्मनाभा, १ तुझ्याच पायांवर सर्व सुखांची वस्ती आहे व त्याच ठिकाणी मला तू ठेव. २ हीच माझी अल्प वासना असून तू उदारांचा राजा असल्यामुळे ती पुरवावीस. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या माझ्या कर्मभोगाने फार त्रास दिला आहे. तू लौकर धावत येऊन माझे रक्षण कर. ४ १०४३ करों ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥ १ ॥ प्रेम झोंबो' कंठीं । देह धरणीये लोटीं ॥ २ ॥ राहे लोकाचार । पडे अवघा विसर ॥ ३ ॥ तुका म्हणे ध्यायें । तुज व्यभिचारभावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- झोंबो-टिकून राहो. अर्थ :- देवा, तुमच्याच पायांवर वारंवार पडून राहण्याची इच्छा व्हावी, असे मला जागे करा. १ माझ्या कंठात तुमच्या विषयीचे प्रेम सदैव टिकून राहो. माझ्या या देहाने धरणीवर तुम्हांस लोटांगण घालावे. २ माझा सर्व लोकाचार, लौकिक व्यवहार दूर व्हावा आणि मला सर्वांचा विसर पडावा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या जारिणीने व्यभिचारीभावाच्या तीव्रतेने आपल्या प्रियकराचे ध्यान करावे, तसे देवा, माझे चित्त तुझ्यावर जडावे. ४ १०४४ टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥ १ ॥ जाल तरी कोणी जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ २ ॥ जाती सादावीत । तेयें असों द्यावें चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सांगाती-सोबती, मित्र, सादवीत-सादघ करीत, समजावीत. १ झोंबे.
४७० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- हातांत टाळ वीणा घेऊन निघालेल्या या विष्णुभक्तांची सोबत ज्यांना आहे १ त्यांनी लगबग करून या मार्गाने चालावे. पुण्याची शिदोरी तयार ठेवावी २ असे हे भक्त सर्वांना सावध करीत जात असल्याने सर्वांनी त्यांच्यावर आपले चित्त द्यावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे वैष्णववीर, विठ्ठल, विठ्ठल बोल बोलोत निघाले आहेत. ४ १०४५ वांयां जातो देवा । नेणे भवती करूं सेवा ॥ १ ॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलो निवांत ॥ २ ॥ करावें ते काय । न कळे अवलोकितों पाय ॥ ३ ॥ तुका म्हणे दान । दिले पदरीं घेईन ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निवात-स्तब्ध, अवलोकितों-पाहतो अर्थ :- देवा, आतां माझा जन्म व्यर्थच चाललेला दिसतो मला तुझी सेवा करता येत नाही भक्ती करता येत नाही. १ आतां तुझ्यापुढे हात जोडून मी निवांतपणे उभा आहे २ काय करावे, ते मला समजत नाही तुमच्या पायाकडे पाहात देवा, इथे उभा मात्र आहे मी ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे दान देवा, द्याल ते मी पदरात घेईन. ४ १०४६ जीव खादला दैवतें । माझा येणें महाभूतें । झोबले निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥ १ ॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हा आम्हा सये । विघडाविघड केली ॥ २ ॥ बोलतां दुश्चिती । मी वो पडियेले भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥ ३ ॥ भलतेंचि चापळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥ ४ ॥ नका बोलो सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहे । उग्या वाचा खुंटोनी ॥ ५ ॥ तुम्हां आम्हा भेटी । नाही जाली जीवेसाठीं । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- खादला-खाल्ला, सये-सखे, विघडाविघड-वियोग, खुटोनी-बंद करून, अर्थ :- हा महाभूत असणारा जो देव त्याने तर माझा जीवच खाल्ला आहे. हे दैवत माझ्या जीवाला इतके झोंबून राहिले आहे की, काही केल्याने सुटत नाही १ आता मी काय करू? काहीही उपाय केले तरी, काही उपयोग नाही तसे, याने तुमच्याआमच्यात वियोग निर्माण केला आहे २ असे बोलत असतानाच मी दुश्चित्त होऊन भ्रांतीमध्ये पडले आहे माझ्या मनात मी व माझे असा आठवसुद्धा राहिला नाही ३ मी काहीतरी भलतेच बोला यला लागले आहे मला माझीं मलेबाळेही काही आठवत नाहीत आपले व परके हा भावही माझ्यामधील निघून गेला आहे ४ सख्यानो, माझ्याशी बोलूही नका, कारण मला आता एक वायगा शब्द सहन होत नाही. वाणी बद करून जशा आहात तशाच उगाच बसून राहा ५ तुमचीआमची भेट होणार नाही, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे आता हा श्रीहरी माझ्याजवळ एकसारखा आहे हे तुम्ही नीट पाहा ६ १०४७ जीवीचा जिव्हाळा । पाहो आपुलिया डोळा ॥ १ ॥ आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥ २ ॥ पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं । वाहू रखुमाईचा पती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- येर-इतर, वाव-व्यर्थ अर्थ :- आमच्या जीवाचा जिव्हाळा असणारा हा श्रीहरी आम्ही आपल्या डोळ्यानी पाहू. १ विठ्ठल हाच एक देव असून इतर सर्व व्यर्थ आहेत आमच्या दृष्टीने. २ हा विठ्ठल पुंडलिकासाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा रखुमाईचा पती श्रीविठ्ठल आम्ही आमच्या चित्तात धारण करू. ४
सार्थ तुकारामगाथा ४७१ १०४८ माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥ १ ॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ २ ॥ दास विठ्ठलाचा । अंकित अनिला ठायींचा ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा. - आराधन-आराध्य दैवत, निधान-ठेवा. अर्थ :- माझे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा हा एक ठेवा श्रीविठ्ठल हेच आहे. १ त्याच्या एकाशिवाय आम्हास दुसरे कुणी माहीत नाही. पंढरीराज विठ्ठल हेच आमचे एकमेव दैवत. २ मी या विठ्ठलाचा दास असून त्याच्या स्थानाचा अंकित असा सेवक आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता यात कधी पालट होणार नाही. ४ १०४९ आतां आम्हां हेचि काम । न १ विसंभावे तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें २ नाचावें ॥ १ ॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकळिक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिले ॥ २ ॥ गोदातटें निर्मळें । देव देवांहीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न विसभावें-विसरू नये, आराणूक-विश्रांती, गोदातीरें-गोदावरी नदीच्या काठी. अर्थ :- आता आम्हास हे एकच काम उरले आहे. तुला विसरू नये. वाणीने एकसारखे तुझेच नाम गावे. दोनही हातानी टाळी वाजवून प्रेमसुखाने नाचावे. १ या सुखामुळे मनास पूर्ण विश्रांती प्राप्त झाली असून मागची- पुढची सर्व काळजी सपलेली आहे. आध्यात्मिक, आधिदैविक आणि साधिभौतिक अशा प्रकारचे त्रिपुटीचे दुःख संपून आमचे प्रारब्धही पूर्णपणे संपले आहे. २ गोदावरीच्या स्वच्छ व निर्मळ किनाऱ्यावर अनेक देवांची देवळे पाहून, संतमहंतांच्या मेळाव्यात बागून दिवस मोठ्या सुखाचा जात आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, आता कसलीही चिंता मला उरलेली नाही. माझा सर्व योगक्षेम मी तुझ्याकडे सोपविलेला आहे. सर्व भार तुझ्यावरच टाकला आहे. ४ १०५० चोरटें सुनै मारिलें ताळें । फेंउं करी परि न संडी चाळे ॥ १ ॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ २ ॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कर्म बळिवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुनै-कुत्रे, ताळें-जोडपाच्या तळव्याने. अर्थ :- चोरट्या कुत्र्याला जोडप्याच्या तळव्याने मारले तर 'केउ केउ' करीत ते पळून जाते; पण ते स्वतःचे चाळे काही कधी सोडीत नाही. १ देवा, असे काही दुराचारी असतात, ते आपल्या जीवास आपणच घात करून घेतात. २ त्यांचे नाक काटले गेले असले तरी, त्यांना त्याची लाज कधीच वाटत नाही. फजितखोर होऊनही ते दारोदार हिंडत असतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे प्रारब्धकर्म बलवान म्हणून, ते त्याला मागेपुढे चांगल्या मार्गाने सरकू देत नाहीत. ४ १ वाचे गाऊ तुझे नाम, २ सुखें आनंदे.
४७२ सार्थ तुकारामगाथा १०५१ मुनि मुक्त जाले भेणे गर्भवासा । आम्हा विष्णुदासा सुलभ तो ॥ १ ॥ अवघाचि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनिया ॥ २ ॥ पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हा सोपी वाट वैकुंठाची ॥ ३ ॥ तुका म्हणे जना सकळांसहित । घेऊं' अखंडित प्रेमसुख ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भेणें-भिऊन, भीतीने, उद्भट-कठिण अर्थ - थोर ऋषीमुनी गर्भवासाच्या भीतीने मुक्तीच्या मार्गास लागले, परंतु हा गर्भवास आम्हा विष्णु- दासाना मात्र अतिशय सुलभ असा झाला आहे १ आम्ही सर्व संसारच ब्रह्मरूप मानल्यामुळे आम्हास संसाराचे अथवा जन्ममृत्यूचे भय नाही आमचे सब विठ्ठलरूप होऊन गेले आहे २ ब्रह्मलोकाला अथवा वैकुंठाला जाण्याचा मार्ग फार कठिण आहे असे उल्लेख नाना पुराणांतून असले तरी, आम्हा भक्ताना मात्र वैकुंठाची वाट अतिशय सोपी अशी निर्माण झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व लोकांच्या सहित या ईश्वराचे प्रेमसुख मोठ्या आवडीने भोगू ४ १०५२ न करावी स्तुति माझी सतजनीं । होईल या वचनीं अभिमान ॥ १ ॥ भारे भवनदी नुतरवे पार । दुरावतील दूर तुमचे पाय ॥ २ ॥ तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सतजनीं-सत लोकांनी नुतरवे-उतरवणार नाही अर्थ - तुम्ही संत लोकांनी माझी आता स्तुती थोडीसुद्धा करू नये त्यामुळे माझ्या संतत्वाबद्दल मला मोठा अभिमान निर्माण होईल १ आणि या भारामुळे मला भवनदी तरून जाण्याचे सामर्थ्य राहणार नाही, आणि तुमच्यासारख्या साधुसंतांचे पायही दुरावतील २ तुकाराम महाराज म्हणतात आणि गर्व तर माझी पाठ पुरवील, व त्यायोगे या विठोबाची आणि माझी ताटातूट होईल ३ १०५३ तुमचिये दासींचा दास करुनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥ १ ॥ नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी२ माझ्या हात सतजनीं ॥ २ ॥ तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारें । उतरेन खरें भवनदी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नवविधा-शास्त्रात सांगितलेली श्रवण कीर्तन, स्मरण पादसेवन इत्यादी नऊ प्रकारची भक्ती अर्थ - सत सज्जनहो, मला तुमच्या दासाचा दास जरी करून ठेविले तरी चालेल हाच आशीर्वाद मला तुम्ही द्यावा १ शास्त्रामध्ये जो नवविधा भक्ती सांगितली आहे, ती तुम्ही सत लोकांनी मजकडून करवून घ्यावी २ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाच्या आधाराने मी ही भवनदी खरोखरीच उतरून जाईन ३ १०५४ चोर टेंकाचे निघाले चोरी । आपले तैसे पारखे घरीं३ ॥ १ ॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ २ ॥ बुद्धिहीन नये कांहींचि कारणा । तयासवे जाणा तेंचि सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ठाउके वर्म । तयासी कर्म वोढवले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - टेंकाचे-समूहान पारखे-दुसऱ्याच्या अर्थ -काही कमकुवत चोर समूहान चोरी करायला निघाले आणि आपल्या घरात जसे आपण वावरतो तसेच ते दुसऱ्याच्या घरीही वावरू लागले १ त्यामुळे काय झाले ? त्यांना तेथे काहीच फायदा न होता, उलट ते स्वतःच नागवले गेले घरातील मालकाकडून त्याचे कान व हातपाय कापले गेले मात्र २ याप्रमाण बुद्धिहीन माणसाचा १ बैसोनि निवान्त सुख भागू, २ द्यावी, ३ घरी
सार्थ तुकारामगाथा ४७३ उपभोग काहीच होत नाही. आणि त्याच्या बरोबर असणारास ही त्याच प्रकारचे भोग भोगायला लागतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला खरोखरच एखाद्या गोष्टीचे मर्म माहीत नाही, त्याला हे असे कर्मगतीचे फळ भोगावे लागते. ४ १०५५ समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥ १ ॥ अवगुणी जरी जालें तें घोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि १ मुद्रांकित जालों तुझा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- जन-लोक, घोंगळ-वाईट, मुद्रांकित-कृपेने, स्वाधीन. अर्थ :- देवा, एखाद्या समर्थ असणाऱ्या श्रीमंत माणसाचे मूल जर दीनवाणे अथवा केविलवाणे दिसत असेल तर, त्याकडे पाहताच लोक कुणाला हसतील? त्याच्या आईबापासच बोल देतील, नाही का? याचा विचार तुम्ही केला आहे? १ ते मूल कितीही अवगुणी असेल व कितीही वाईट असेल, तरी त्यांना त्याचा सांभाळ करावा लागतोच. २ तुकाराम महाराज म्हणतात, तसा मी एक पतित असून देवा, त्याची चिंता तुला असावी, कारण मी तुमच्या पतितपावन या मुद्रेने अंकित झालो आहे. तुमच्याच स्वाधीन आहे ३ १०५६ गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें २ भेटी केली तेणें ॥ १ ॥ सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ २ ॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मणि-रत्न, खळा-दुष्टास अर्थ :- एखाद्या गाढवाच्या अंगाला चांगली चंदनाची उटी लावली तरी त्याचा त्याला काय उपयोग ? ते लागलीच नेहमीच्या स्वभावाप्रमाणे राखेत जाऊन लोळणारच. १ ज्याचे जे सहज स्वभावातील गुण असतील ते काही बदलत नाहीत. २ एखाद्या माकडाच्या गळ्यात जर किंमतवान रत्न बांधले तर त्याचा त्याला काय उपयोग? ते त्याचे तुकडे तुकडे करून चघळूनच टाकणार ना? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे दुष्ट माणसास फार हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या त्याला आवडत नाहीत. आपल्याच मताने ते अज्ञानाची गोष्ट वाढवितात ४ १०५७ नेणे सुनैं चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥ १ ॥ शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेलें वांयां बोल जातो ॥ २ ॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥ ३ ॥ वंदूं निंदूं काय दुराचार ३ । खळाचा विचार तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुनैं-कुत्रे, ढाळ-खोड, वागण्याची रीत अर्थ :- दारात बांधलेले कुत्रे चोर कोण, पाहुणा कोण, हे न ओळखता सर्वावरच भुंकत राहते ? त्याला कितीही शिकविले तरी त्याचा काही उपयोग त्याला कधी होत नाही. त्याला शिकविले ते सर्व वायाच जाते. २ त्याला जरी चांगले दूध पाजले तरी, ते ओकून टाकून अमंगळ अशा घाणेरड्या पदार्थाकडेच त्याचे लक्ष जाणार. ते आपली खोड काही सोडायला तयार नसते. ३ त्याचप्रमाणे एखाद्या दुष्टाला कितीही वंदा अथवा निंदा, त्याच्या स्वभावात काही कधी फरक होणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ १०५८ जन मानवलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥ १ ॥ म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ २ ॥ १ दास, २ राख तया तेणे केलीसे भेटी, ३ दुराचारी थोर. तु. गा -.६०
४७४ सार्थ तुकारामगाथा संता ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥ ३ ॥ तुका म्हणे मी तो आपणासी ठावा । आहे बरा देवा जैसा तैसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मानविले-मानसन्मान केला अर्थ - देवा, बाहेरच्या दृष्टीने या लोकांनी माझा मानसन्मान केला असला तरी, मी अंत:करणाने मात्र तेवढा मोठा झालेलो नाही १ म्हणूनच पंढरीराया, माझ्या मनात फारच चिंता वाटत आहे, आणि मनाची खरी अवस्था प्रकट करताना भारी लाज वाटते २ साधुसंतांना सारे जगच ब्रह्मरूप दिसत असल्याने ते कुणाचेच दोष पाहात नाहीत माझेही अवगुण त्यामुळे त्यांना दिसले नाहीत ३ परंतु देवा मी कसा आहे हे तुम्हास माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी जसा आहे तसाच आहे हे तुम्ही जाणता ४ १०५९ काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसे ॥ १ ॥ कैसा सरता जालो तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हे ॥ २ ॥ पुराणांची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवी हे देवा साच खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जीताती-जिवंतपणे वावरतात, सरता जालो-मान्य झालो, साच-खरे अर्थ - खरे पाहिले असताना माझ्या शरीरात कामक्रोधादी विकार जिवंतपणे वावरत असूनही मी वरच्या बाजूने मात्र अतिशय मृदू शब्द बोलीत आहे १ तरी सुद्धा पांडुरंगा मी तुमच्या पायाशी कसा मान्य झालो, हे काही माझ्या ध्यानात येत नाही २ पुराणातील संतांचे चित्त कशा प्रकारे शुद्ध असायला पाहिजे, याची ग्वाही दिलेली आहे तशा प्रकारचे काही माझ चित्त शुद्ध झालेले नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून देवा, जी काही खरी गोष्ट असेल ती माझ्या अनुभवास आणून द्या ना ४ १०६० स्तुति करों जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥ १ ॥ तुमचे मी दास संताचे दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ २ ॥ रामकृष्णहरि मन उच्चारणा । आवडी चरणा विठोबाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे तुमचे सेवितो उच्छिष्ट । क्षमा करीं धीट होऊनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम, सेवितों-खातो अर्थ - संत लोकांनो, मी तुमची स्तुती करावी, असा अधिकार मजजवळ नाही कारण तुमच्या योग्यतेचा विचारच मला समजत नाही १ तुम्हा संतांचा मी एक दुर्बल असा दास असल्याने तुम्ही तुमच्या पायावरच माझे रक्षण करावे २ रामकृष्ण हरि या मंत्राचाच मी उच्चार करीत असतो व माझे प्रेम विठ्ठलाच्या चरणावर दृढ असे आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतहो, मी तुमचे उच्छिष्ट खात असतो, मोठ्या धिटाईने सेवन करीत असतो मला तुम्ही क्षमा करावी ४ १०६१ बहु दूरवरी । वेठीं ओझें होते शिरों ॥ १ ॥ आता उतरला भार । तुम्ही केला अंगीकार ॥ २ ॥ बहु काकुलती । आलो मागें किती ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेठी-बिगारीच्या पद्धतीत, अंगीकार-स्वीकार अर्थ - कित्येक जन्मपर्यंत मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात बिगारीस धरलेल्या नोकराप्रमाणे सापडलो होतो फार मोठे ओझे माझ्या डोक्यावर होते १ पण आता ते सर्व ओझे कमी झाले आहे देवा, तुम्ही माझा स्वीकार
केल्यामुळे आता माझा भार हलका झाला आहे २ मी पूर्वीपासून तुमची कितीतरी काकुळतीने विनवणी करीत आलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आज मात्र तुम्ही मला पदरी घेतल्यामुळे माझी सेवा सफळ झाली असे मला वाटते ४ पाईक-अभंग ११. १०६२ पाईकपणें१ जोतिला सिद्धांत । शूर धरी मात वचन चित्तीं ॥ १ ॥ पाइकावाचून नव्हे कधीं सुख । प्रजामध्यें दुःख न सरे पीडा ॥ २ ॥ तरि व्हावें पाईक जिवाचे उदार । सकळ त्याचा भार स्वामी वाहे ॥ ३ ॥ पाइकीचे सुख जया नाही ठावे । धिग त्यांनीं ज्यावे वायाविण ॥ ४ ॥ तुका म्हणे एका क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा -पाईकपणें-सेवकपणा, जोतिला-जोडिला, सांगितला, ज्याचें-जयाचे अर्थ -मी सेवकपणाचा जो विचार सांगितला आहे, तो जो शूर पुरुष असेल तोच चित्तात धरून नीट समजावून घेईल १ सेवक झाल्यावाचून सुख कधीच लाभणार नाही त्याशिवाय प्रजेमधील दुःख, पीडा दूर होणारच नाही २ तरी जीवावर उदार होऊन तुम्ही सेवक व्हावे. तुमचा सर्व भार तो देव स्वतः वाहील ३ सेवकाच्या सुखाची ज्याला कल्पना नाही, त्याचे जन्माला येऊन जगणे व्यर्थच आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, एक क्षणभर जरी सेवकपणा अंगी बाणला तर अपार असे सुख त्यास भोगायला मिळेल ५ विवरण - या पुढचे दहा अभंग पाईक-अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत पाईक म्हणजे शूर शिपाई, सेवक, वीर पुरुष जीवनाच्या विविध क्षेत्रात पाईकपणाने वागणे किती महत्त्वाचे आहे, याचा स्पष्ट बोध या अभंगातून तुकाराम बुवांनी केलेला आहे राजकारण असो, देशरक्षण असो, विद्यासंपादन असो की परमेश्वरप्राप्तीची साधना असो, त्यात पाईकाचे, सेवकाचे गुण हवेतच या सेवकाच्या वृत्तीशिवाय कोणतही अवघड काम होणे शक्य नाही तुकाराम- बुवाच्या या अभंगातून निव्वळ परमार्थाचा बोध किती, व त्यातील राजकारणाचा अर्थ किती, याबद्दल शाहिंच्या मनात संशय येण्यासारखा आहे शिवरायांचे कार्य नजरेसमोर ठेवून तुकोबांनी पाईकाना, स्वराज्याच्या शिपायाना उद्देशून या अभंगातून उपदेश केलेला आहे, असेही मानिले जान या अभंगाच्या निर्मितीचाही प्रसंग सांगितला जातो, तो असा की, एकदा शिवबा व त्याचे महवारी शूर वीर पुरुष असे सर्वजण तुकाराममहाराजाचे कीर्तन ऐकत बसले होत 'थोर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळा पाया पढे' या अभंगाचे स्मरण होऊन वारकरी विठ्ठलभक्ताना व स्वराज्यसाधकाना एकदमच बोध व्हावा, असे तुकोबाच्या मनात आले व त्या प्रसंगी त्यांनी हे 'पाईक अभग ११' म्हटले धीरत्व, पुढारी- पणाची वृत्ती, धीटपणा, जीवावर उदार होऊन कुठेही धैर्याने उडी घेण्याची हिंमत या सर्व गोष्टीची जशी जरूरी स्वराज्यसाधनेस आहे, तशीच ती जीवनाच्या इतरही क्षेत्रात विविध ठिकाणी आहे, असे स्पष्ट दिसत परमार्थाच्या क्षेत्रातही या गुणाना किती महत्त्व आहे, ते या अभंगावरून समजण्यासारखे आहे १०६३ पाइकीचें सुख पाइकासी ठावे । म्हणोनिया जीवे केली साटीं ॥ १ ॥ येता गोळ्या बाण साहिले खडमार । वर्षाता अपार वृष्टि वरी ॥ २ ॥ स्वामीपुढें व्हावे पडता भांडण । मग त्या मडन शोभा दावी ॥ ३ ॥ पाइकांनीं सुख भोगिले अपार । शुद्ध आणि धीर अतर्याहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे या सिद्धाताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - मडन-भूषण, अलकार १ पाईक म्हणे
४७६ सार्थ तुकारामगाथा अर्थ - शिपाई किंवा सेवक होण्यात काय सुख असते, हे एक सेवकच जाणतो. म्हणून तर जीवावर उदार होऊन पाईक व्हावे. १ समोरून तोफांच्या गोळ्यांचा अथवा धनुष्यातून निघालेल्या बाणांचा वर्षाव सहन करावा, अगणित शस्त्रांचा मारा सहन करावा २ युद्ध सुरु असतांना आपल्या स्वामीपुढे होऊन हा सर्व मारा सहन करणे यातच सर्व शोभा आहे. शस्त्राचे वार अंगावर घेणे, हीच शूराची खरी भूषणे आहेत. ३ अंतर्बाह्य असे जे शूर पुरुष आहेत, धैर्यवान आहेत, त्यांनी पाईकपणाचे सुख अपार भोगले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व सिद्धांताच्या खुणा मी सांगितल्या आहेत. जो शहाणा व जाणणारा असेल, तो त्या ओळखील व त्याप्रमाणे स्वामीकार्य करून सुखी होईल. ५ १०६४ पाईक तो जाणे पाइकीचा भाव । लाग पगैं ठाव चोरवाट ॥ १ ॥ आपणां राखोनि ठकावे आणीक । घ्यावें सकळीक हरुनियां ॥ २ ॥ येऊं नेदी लाग लागों नेदी भाग । पाइक त्या जग स्वामी मानी ॥ ३ ॥ ऐसे जन केलें पाइक पाईक । जया कोणी भीक न घालिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाइक त्रैलोकींचा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पगें-पाय, पावले अर्थ :- जो खरा सेवक असेल तोच सेवकाचा भाव जाणेल, त्यालाच कोणत्या ठिकाणी काय आहे, चोर- वाटा कुठे आहेत, हे माहीत असल्याने तो आपली पावले नेमकी टाकीत असतो. १ तो आपले स्वतःचे रक्षण करून इतरांना फसवितो, त्यांचे सर्वस्व हरण करून घेतो. २ हे असे शूर सेवक कुणाविषयी फारसा सुगावा लागू देत नाहीत; आणि स्वतःविषयीही फारशी माहिती कुणास सांगत नाहीत असे सेवक स्वामीसहो जगासारखे मान्य होतात. ३ ज्यांना कुणी विचारोतही नव्हते, अशाही लोकांना या सेवकांनी सेवकत्वाची दीक्षा देऊन पाईक केले आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे ज्याचे सेवक आहेत, तो त्रैलोक्यात मोठा बलवान व श्रेष्ठ राजा आहे असे समजावे. ५ १०६५ पाइकांनीं पंथ चालविल्या वाट । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥ १ ॥ पारखिये ठायीं घेउनिया ठाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ २ ॥ आधारेविण जें बोलता चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥ ३ ॥ सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥ ४ ॥ तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पारख्याचा-परक्या शत्रूचा, साटा-स्थाने. अर्थ :- या सेवकांनी शत्रूची स्थाने मोडून चांगले निर्भय असे मार्ग निर्माण केले आहेत. १ या पाईकांनी शत्रूच्या ठिकाणी हल्ला केला असून तेथेच ते बसनी करून आहेत. त्यांनी या वेळी आपल्या लोकांचे मात्र रक्षण केले आहे. २ शास्त्राचा आधार नसताना जे लोक उगाच बोलतात, ते आपल्या जातीचे नव्हेतच असे समजून येते. ३ कुणी ठरलेला, शिस्तीचा रस्ता सोडून गेले की, त्यांना हे सेवकलोक शिक्षा करतात. कारण त्यामुळे मग इतरांनाही मोठ शिक्षण मिळते ४ तुकाराम महाराज म्हणतात, हे सेवक लोक सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व प्रकारचे सुख देतात ५ १०६६ पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥ १ ॥ तो एक पाईक पाइका नाईक । भाव सकळीक स्वामिकार्यों ॥ २ ॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥ ३ ॥
७. दैन्य-याचना, विठ्ठल कृपा व उपसंहार
सार्थ तुकारामगाथा ४७७ विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥ ४ ॥ तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- तृणवत-गवताप्रमाणे क्षुद्र. अर्थ :- हा सेवक कसा असतो ? तर तो आपल्या प्रजेचे रक्षण करतो आणि जो शत्रू असेल त्याचे मूळ छेदून त्याचा नाश करतो. १ ज्याचा सर्व भाव एका स्वामीच्याच कार्यावर असतो. तो सर्व पाईकांचा नायकच बनतो. २ त्याला स्वतःचा देह गवताप्रमाणे क्षुद्र वाटतो. त्याने सोने दगडाप्रमाणे मानलेले असते. अशा सेवकास हा पाईक स्वतःहून काही वेगळे मानत नाही. ३ स्वामीवर असा दृढ विश्वास ठेवल्याखेरीज त्या सेवकाला कधी मोल घडत नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, स्वामीस जेणेकरून कमीपणा येणार नाही, अशा कार्याचे जतन हे पाईक लोक करीत असतात. ५
१०६७ धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥ १ ॥ जयाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥ २ ॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥ ३ ॥ कमाइचों हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥ ४ ॥ तुका म्हणे तरि पाइकीच भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- हीण-कमी प्रतीची. अर्थ :- जो स्वामी आपल्या सेवकास मानतो, त्या सेवकासही मग सर्वजण भिवून असतात. १ जीवावर उदार होऊन लढणारे सेवकच शोभून दिसतात. ते सेवकांचे प्रमुख नाईक होऊन मोठ्या दिमाखाने शोभतात. २ असे हे सेवक सत्तेने स्वामीचे सर्व सुख भोगतात. त्यांचा गौरव सर्व प्रकारांनी होत असतो. ३ परंतु ज्यांची कमाईच हीन प्रतीची असते, असे किती तरी सेवक पडले आहेत. असे किती येतात आणि जातात, त्यांचा हिशोबच नाही. ४ तुका- राम महाराज म्हणतात, परंतु स्वामीची सेवा करणारे पाईकच भले होत. ५
१०६८ पाइकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥ १ ॥ पाईक जाणे मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ २ ॥ एके दोहीं घरीं घेतलें ठाणें । पाईक तो पणें निवडला ॥ ३ ॥ करुनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥ ४ ॥ तुका म्हणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- मशारा-वेतन, कारण-कार्य. अर्थ :- राजीपणाने सेवा करणे, हेच खरे म्हणजे पाईकाचे वेतन आहे. सेवेच्या योगानेंच तो खरा पाईक शोभून दिसतो. १ ज्या सेवकास लढाईचे अंग माहीत आहे, त्याच्या सेवेस कधी कमतरता पडणार नाही. २ एक दोन ठिकाणी स्वतः होऊन लढाई जिंकणारा जो सेवक असतो, तोच शूर सेवक म्हणून ओळखला जातो. ३ ज्याने काही विशेष कार्य करून स्वामीस यश दिलेले असते. त्याच्या सेवेलाच खऱ्या सेवेचे नाव मिळते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा स्वामीनिष्ठ पाईकांना त्यांच्या स्वामीखेरीज इतर विश्रांतीचे ठिकाण कुठलेही नाही. ५
१०६९ उंच निच कैंसी पाइकाची ओळी१ । कोण गांडे वळी निवडिले ॥ १ ॥ स्वामिकार्या एक सर्वस्वें तत्पर । एक ते फुचर आशाबद्ध२ ॥ २ ॥ प्रसंगावांचूनि आणिता आविर्भाव३ । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥ ३ ॥ १ वोळी, २ आशा बहु, ३ आयुर्भाव.
गणतीचे एक उच निंच फार । तयामध्यें शूर विरळा थोडे ॥ ४ ॥ तुका म्हणे स्वामी जाणे त्याचा मान । पाईक पाहोनि मोल करी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - ओळी-प्रकार, गांडे-भिव, वळी-बलवान, कुचर-कुचराई करणारे अर्थ - या सेवकांचे श्रेष्ठ व कनिष्ठ असे प्रकार कसे असतात ते पाहा. कुणी भित्रे असतात कुणी शूर व बलवान असतात १ कुणी आपल्या स्वामीच्या सेवेत तत्पर असतात, तर कुणी त्याविषयी कुचराई करतात नुसतेच आशेने धड असतात २ शौर्य दाखविण्याचा प्रसंग आल्याशिवायच ते वृथा शूरत्वाचा खोटा आविर्भाव आणतात व आपण सेवक आहोत, अशी विनाकारण ऐट मिरवितात ३ या सेवकाची गणतीच करायला गेले तर, खरा व प्रामा- णिक असा सेवक एखादाच मिळतो खालच्या दर्जाचेच सेवक फार असतात त्याच्यात शूर असे वीर सेवक क्वचितच आढळून येतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा शूर सेवकाचा मान त्याचा स्वामी जाणीत असतोच त्याच्या सेवेप्रमाणेच त्याचा स्वामी त्याचे मोल यथायोग्य करीत असतो ५ १०७० एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥ १ ॥ स्वामिपदीं एका ठाव उच स्थळीं । एक तों निराळीं जवळी दुरी ॥ २ ॥ हीन कमाईचा हीन आन ठाव¹ । उचा सर्व भाव उच पद ॥ ३ ॥ पाईकपणे तो सर्वन सरता । चांग तरी परता गाडचा ठाव ॥ ४ ॥ तुका म्हणे मरण आहे या सकळा । भेने अयफळा अभयें मोल ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - भेनें-भीतीने अर्थ - एकाच स्वामीचे सब पाईक असले तरी त्याच्यात ज्याचे जसे बळ असेल तसे त्याचे मोल ठरते १ जे खरे, सच्चा दिलाचे असतात, शूर व प्रामाणिक असतात, त्याना स्वामीजवळच उचावर आसन मिळते व दुसरे कुणी कमी प्रतीचे असतात, त्याना स्वामीच्या आसपास कुठे तरी दूरच्या ठिकाणी जागा मिळत असते २ ज्याचे कर्तृत्व कमी प्रतीचे असते, त्याना स्थानही खालच्या दर्जाचे मिळते उलट ज्याचे शौर्य श्रेष्ठ दर्जाचे असते, त्याला मानाचे स्थानही फार उचीचे मिळते ३ तो सेवक आपल्या सेवेने सर्वांना प्रिय झालेला असतो, परंतु एखादा चांगला असूनही जर कुचराई करील, तर मात्र तो भित्राच ठरतो ४ तुकाराम महाराज म्हणतात मरण तर सर्वांनाच आहे पण मरणाचे भय धारण केल्यास अप्रतिष्ठा होते व अभय धरल्यास जीवितास मोल चढते ५ १०७१ प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठीं एके जैशीं तैशीं ॥ १ ॥ आगळें पाऊल आणिकासी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ २ ॥ पाठीवरी घाय² म्हणती फटमर । धडा अग्रें शूर मान पाये ॥ ३ ॥ घेईल दरवाडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥ ४ ॥ तुका म्हणे नव्हे बोलाचे कारण । कमाईचा पण सिद्धी पाये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रजी-प्रजेच्या सुखासाठी फटमर-भ्याड अर्थ - प्रजेच्या सुखासाठी मरण पत्करणारा जो सेवक असतो, तोच नाईकाच्या पोरवीस पोचतो आणि केवळ पोटासाठी लढणारे असतात, त्याना मानही जशास तसा असाच जमतेम मिळतो १ कित्येकजण शत्रूवर चाल करून वेगळेच पाऊल टाकतात, तर कित्येक शत्रूच्या भीतीने माघारी वळून पळत असतात, त्याचे मात्र पाय तुटले जातात २ शत्रूचे घाय पाठीवर घेऊन जे पळून येतात ते शिपाईगडी भ्याडच म्हणावेत व जे धड अगाने शत्रूवर समोर होऊन चालून जातात, त्याचाच मान सवत्र असतो ३ आपल्या जीवावर उदार होऊन जो पाईक शत्रूवर १ धाव, २ धाव
सार्थ तुकारामगाथा ४७९ हल्ला करील, तोच त्याचा पराभवही करू शकेल त्यालाच जय मिळेल ४ तुकाराम महाराज म्हणतात, या शूरत्वाच्या गोष्टी नुसत्या बोलायच्या नसतात, तर मोठा निश्चय करून कार्यसिद्धी करणे हेच सेवेकऱ्याच्या सेवेचे सार्थक आहे ५ १०७२ जातीचा पाईक ओळखले पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥ १ ॥ धरितील पोटासाठीं हतियेरें । फळती तों खरें वेठोचींसों ॥ २ ॥ जातीचे ते असे खरें घायदाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥ ३ ॥ तुका म्हणे नमूं देव म्हण जन । जालियाच्या खुणा जाणतसो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जातीचा-श्रेष्ठ प्रकारचा, खरा, खरें-गाढवे, वेठीचींसों-विगारीची, घायदाय-रीत, डावपेच, पारखिया-पारस करणाऱ्या लोकांपाशी अर्थ - जो खरा जातवंत सेवक असतो, तोच दुसऱ्या सेवकास ओळखतो त्यासच त्याच्या कार्याविषयी आदर वाटतो १ व जे केवळ पोटासाठीच हातात हत्यारे धरून असतात, ती माणसे केवळ बिगारीच्या गाड्या- प्रमाणेच नुसती हेतुशून्य होऊन राबतात असे समजावे २ जे जातीने खरे शूरवीर पुरुष आहेत, त्याचे डावपेच जो पारखी असतो, त्याच्या दृष्टीतून सुटत नाहीत त्यास त्याची ओळख पटतेच ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र देवाचीच वस्ती आहे, असे समजून आम्ही या सेवकास वंदन करूच, पण जे खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेलेले आहेत, त्यांच्याही खुणा आम्ही जाणतोच ४ विवरण - तुकाराम महाराजांचे हे पाईकाचे अकरा अभंग अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहेत. परमेश्वर- प्राप्तीच्या मार्गात अथवा भक्तिसाधनेत पाईकाच्या गुणाची कितीतरी आवश्यकता आहे आपले सर्व गुणसर्वस्व आपल्या धन्यासाठी, स्वामीसाठी खर्च करण्याची प्रतिज्ञा या सेवकाने घेतलेली असते अशी ही निकराची भावना भक्तीच्या वृत्तीस पोषकच आहे तुकाराम महाराजांच्या या विशेष अभंगाचा अर्थ दोन्ही प्रकारांनी लावता येण्या- सारखा आहे शिवबा व त्याचे स्वराज्यसाधनाचे कार्य व त्यासाठी तळहातावर शीर घेऊन निघालेले वीर सेवक, याच्या धैर्याचे व काहींच्या कुचराईचे वर्णन बुवांनी केले आहे हे सर्व वर्णन परमार्थाच्या मार्गावर निघालेल्या विठ्ठलाच्या वीर पुरुषानाही यथार्थपणे लागू पडते समोरील बाणाचा, तोफेच्या गोळ्याचा वर्षाव छाती पुढे करून झेलणे, शत्रूच्या चोरवाटा शोधणे, आपले शरीर गवताप्रमाणे क्षुल्लक मानणे, सुवर्ण दगडाप्रमाणे मानून वागणे, आपल्या गुणवत्तेने पाईकाचे सेवकाचा नाईक होणे, थोर प्रकारची सेवा, हेच खरे वतन मानणे, पाठीवर शत्रूचे घाव घेऊन पळून न येणे, सर्व धैर्य एकवटून शत्रूवर तुटून हल्ला करणे, ही सर्व खऱ्या पाईकाची लक्षणे तुकारामबुवांनी दिली आहेत ती पाहून यावेळी त्याच्या भोवती खरोखरच शिवबाचे शूरवीर शिपाई त्याची कथा ऐकण्यासाठी तत्पर झालेले असावेत असे वाटते तुकोबानी त्यांनाही स्वदेशकार्यासाठी उत्तेजित केले व आपल्या भक्तांनाही परमार्थमार्गात पाईकपणाचे महत्त्व काय आहे हे विशद करून सांगितले किंवा असेही असेल की, प्रत्येकाने जस परमार्थमार्गात निपुण असावे, तसच देशकार्याचीही त्यास जाणीव असावी हे दोन्ही मार्ग परस्पर दिसतात, तेवढे भिन्न नाहीत केवळ भक्तीमार्गी लोकांना व केवळ देशवीरांना उद्देशून प्रत्येकाच्या वर्गास उपयोगी पडेल असा उपदेश या अभंगात आहे, असे म्हणण्यापेक्षा सरमिसळ करून प्रत्येक माणसाने या दोनही अंगाचे महत्त्व समजावे अशीही कल्पना बुवाच्या मनात असेल ईश्वरप्राप्ती हेच जीविताचे ध्येय तुकारामादी साधुसंतानी मानले होते, हे खरे असले तरी त्याचे लक्ष भोवती असावे असे वाटून त्याचे परमार्थज्ञान एवढे संकुचित मानण्याचे काही कारण नाही त्याच्या आत्मज्ञानात सर्व विश्वाचा सामावेश होतो व त्यामुळे पीडलेल्या प्रजेच्या पारमार्थिक अराजकाने ते जसे कळवळून गेले, तसेच त्याचे ऐहिक दुर्दैवही त्याना पाहावले नाही दोघाची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यानी केला
४८० सार्थ तुकारामगाथा १०७३ बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥ १ ॥ आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ २ ॥ अवचितें निधान लागलें हे हातीं । भोगावी विपत्ति गर्भवास ॥ ३ ॥ यावें जावे पुढें ऐसेचि कारण । भोगावें पतन नरकवास ॥ ४ ॥ तुका म्हणे घरीं आठव या देहीं । नाही तरि कांहीं बरें नव्हे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - मागुता-यानंतर, दारा-बायको. अर्थ :- लोकहो, तुम्ही तुमच्या बुद्धीत काही तरी पालट करावा कारण यानंतर हा मनुष्यदेह मिळेलच असे नाही. १ आपल्या आयुष्याचे सर्व बाजूनी हित होईल, असे काही प्रयत्न तुम्ही करीत नाही तुमचे चित्त रात्र- दिवस घर, बायको, पैसा याच्या आशेतच गुरफटून राहिले आहे. २ अवचितपणे मनुष्यदेहाचा हा ठेवा तुमच्या हाताशी आला आहे मग विनाकारण गर्भवासाची विपत्ती पुन पुन' का भोगावी ? ३ एकदा हा मनुष्यदेह संपला की मग सारख्या जन्ममृत्यूच्याच फेऱ्या सुरू होऊन नरकवास मात्र भोगावा लागेल. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा तू याच जन्मी नीट आठवण प्रभूची ठेव. नाहीतर पुढे काही ठीक होणार नाही ५ १०७४ आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हा लागे कोडें उगवणें ॥ १ ॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हाती ॥ २ ॥ न घेतां कवडी करावा कुढांवा । पाचारिता देवा नामासाठीं ॥ ३ ॥ दयासिंधु नाम पतितपावन । हैं आम्हा वचन सांपडले ॥ ४ ॥ तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूंचि देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- साकडें-संकट, उगवणें-सोडवणे, मोकळे करणे, कुढावा-रक्षण, पाचारिता-बोलविता. अर्थ - देवा, आम्ही पातकी लोकांनी नाना पापे करून तुम्हास संकटात टाकावे व तुम्ही आम्हास त्या संकटांतून मुक्त करावे. १ अनेक प्रकारच्या दोषांचे आचरण करिताना आम्ही कधीच आम्हास जपणार नाही पण त्यातून मोकळे करण्याचे काम मात्र देवा, तुम्हास करावे लागते. २ देवा, तुमचे नुसते नाव घेऊन जरी तुम्हास कोणी हाक मारिली, तरी तुम्ही एका कवडीची किंमत न घेता त्याचे रक्षण करता ३ तुमचे नावच दयेचा सागर व पतितपावन असे आहे. असे तुम्ही आमच्या भक्ताना जे सांगितले आहे, तेच वचन आमच्या हाती आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अनेक कोटी अन्याय करू तरी सुद्धा देवा, तुम्ही कृपावत आहात तसेच, आमच्या अनुभवास येईल. ५ १०७५ जो भक्ताचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥ १ ॥ हातीं प्रेमाचे भातुके । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधू सुखें । उत्तरी कासे लावूनि ॥ २ ॥ थोर भक्ताची आस । पाहे भोवताली वास ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पाचारितो-बोलावितो, भातुके-खाऊ, वास-वाट, धणी-तृप्ती. अर्थ:- हा देव भक्तांसाठी किती तत्पर असतो पाहा. भक्ताचा विसावाच असणारा हा देव उभे राहून आपल्या भक्ताना जवळ बोलवितो तरी त्याच्याकडे धाव घ्यावी १ त्याच्या हातात प्रेमाचा खाऊ असून तो मोठ्या कौतुकाने भक्ताच्या मुखात तो खाऊ घालण्यास उत्सुक आहे. आपली कास आथरून हा देव आपल्या भक्ताचे रक्षण या संसारसागरातून करीत असतो. २ याला आपल्या भक्ताची आवड फार मोठीच आहे. भोवताली दृष्टी ठेवून
सार्थ तुकारामगाथा ४८१ तो त्यांची वाट एकसारखी पाहात असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, कृपेचे दान देणारा हा देव भक्तांवर कृपा करून त्यांच्या विषयी आपल्या प्रेमाची तृप्ती करीत असतो. ४ १०७६ अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नाणीं कांटाळा ॥ १ ॥ पडोन राहेन ते ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मागें न करों कांहीं । तुझी आण विठोबा ॥ २ ॥ तुम्ही आम्ही पीडों ज्यानें १ । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा² माझा आव्हेर ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- नाणों-न आणी, आणणार नाही, आण-शपथ. अर्थ :- देवा, तुझ्यावर ज्यांची अखंड प्रीती असते, त्या साधुसंतांची व भक्तांची संगत मला द्यावी. कमला- पती, मग सारखे सारखे मागून मी तुला कंटाळा येईल असे काही करणार नाही १ त्या संतांच्या पायांजवळच पडून राहीन. मी काही करणार नाही. काही मागणारही नाही. देवा, याविषयी त्या विठ्ठलाची शपथ आहे. २ तुमच्या दाराशी हाका देऊन सारखे धरणे धरल्याने तुम्हास व आम्हांस अशी दुहेरी पीडा होत असते; ती यामुळे आता दूर होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा विठ्ठला, माझ्या या बोलण्याकडे लक्ष द्यावे आता. माझा त्याग तुम्ही करु नये. ४ १०७७ पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोपी ॥ १ ॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होऊनिया ठाके ॥ २ ॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पुनीत-पवित्र, ओखदासी-औषधालासुद्धा, मेदिनी-पृथ्वी. अर्थ :- या विष्णुदासांनी आपल्या पावन संगतीने भोवतीच्या सर्व पातकी लोकांना पवित्र केले आहे १ आता यांच्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहील ? कारण ते या विठ्ठलाविषयी प्रेम धारण करणारे शूर वीर आहेत. जर काही अशुभ असेल तर ते होऊनच त्यांच्या पुढे उभे राहते. २ त्यांच्या समोर श्रीहरीच्या प्रेमाचे पर्वताच्या पर्वत उभे असून पाप औषधाला सुद्धा उरत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या संत पुरुषांनी सर्व पृथ्वीच वैकुंठ- रूपाची करून टाकली आहे. ४ १०७८ जन³ देव तरी पायांचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥ १ ॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥ २ ॥ तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाड नाहीं-पाहू नये, ध्यानात धरू नये, पालवीं-पदरात. अर्थ :- सर्व लोक ही देवाचीच स्वरूपे आहेत, असे असले तरी त्यांचे अवगुण ध्यानात न धरता त्यांच्या पायां पडावे. १ असे असले तरी हेही ध्यानात ठेवावे की, अग्नीचे काम शीतनिवारण आहे. थंडी दूर करणे, हे अग्नीचे १ जन, २ आता, ३ जग. तु गाथा...६१
सौजन्य असून यासाठी ह्याचा उपयोग आपणास मोठाच आहे म्हणून काही ह्याला आपल्या पदरात बांधून घेता येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, विंचू व सर्प ही नारायणाची रूपे, परंतु ह्यांना न शिवता दुरूनच वंदन करावे ३
१०७९ भूत भविष्य फळो यावे वर्तमान । हे तो भाग्यहीन त्याची जोडी ॥ १ ॥ आम्ही विष्णुदासीं देव घ्यावा चित्ते । होणार ते होतें प्रारब्धें ॥ २ ॥ जगत्डीसाठीं घातले दुकान । जातो नारायण अतरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा ऋद्धिसिद्धी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जोडो-प्राप्ती अर्थ - आपणास भूतकाळातील व भविष्यकाळातील वर्तमान समजावे म्हणून पुष्कळ लोकांची खटपट असते पण या ज्ञानाची प्राप्ती ही भाग्यहीन माणसांस होते म्हणजे ही प्राप्ती काही विशेष भाग्याची नव्हे १ आम्ही विष्णुदासांनी मात्र निरंतर या देवाचेच चिंतन मनात करावे, व जे प्रारब्धानुसार असेल ते भोगावे २ केवळ जगदंडीसाठीच भूतभविष्य समजणाऱ्या लोकांनी दुकान घालून धंदा सुरू केलेला आहे पण त्यामुळे परमेश्वराचे पाय अंतरून जातात ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच मोठा गहन असून त्यात, ऋद्धिसिद्धींची पीडाही फार मोठी असते ४
घोंगड्यांचे अभंग- १२
१०८० ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥ १ ॥ पाघुरलो बहु काळें । घोंगडें वळें सांडवले ॥ २ ॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥ ३ ॥ तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धाडली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठकिले-फसविले, कुडी-देह, लाग-लाभ, हेवा-हाव अर्थ - मी काळाला फसवून दडी देऊन लपून राहिलो देहभावाची वृत्तीही टाकून दिली १ पुष्कळ दिवसांपर्यंत मी हे काळे घोंगडे पाघरले होते, ते मुद्दामच टाकून दिले आहे २ आता त्या काळात कसलाही लाभ होणार नाही, अशा दूरच्या ठिकाणी जाऊन मी लपलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य सेवा करण्याची माझी वरवरची हाय होती, तिची आटकाठी मी या प्रकाराने खटपट दूर केली ४
१०८१ घोगडिपाचा पालट केला । मुलामुला आपुल्यात ॥ १ ॥ कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिंसे सवगडिया ॥ २ ॥ तो बोले मी उगाच बैंसे । आनारिसे न दिसे ॥ ३ ॥ तुका म्हणे दिलें सोंग । नेदी व्यंग जाऊ देऊ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पिंसे-वेड, आनारिसे-वेगळेपणा अर्थ - खेळताना या गोपाळाच्या मुलानी आपल्या घोंगड्याची अदलाबदल केली. १ प्रत्येकजणाने कान्होबा मीच, असे सोंग घेऊन इतर सोबत्याना भलावणी केली. २ तो बोलतो व मी उगाच बसतो असे असले तरी, त्याच्यात व आमच्यात वेगळेपणा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने हे जे सोंग त्याना दिले आहे, ते काही व्यर्थ वाया जात नाही ४
सार्थ तुकारामगाथा ४८३ १०८२ खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥ १ ॥ कान्होबाचे पडिलों गळां । घेईं गोपाळा देईं झाडा ॥ २ ॥ मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥ ३ ॥ तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठायोंची मजपाशीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हारपली-हरवून गेली, काची-खोटी. अर्थ :- देवा, सुरकवडीचा खेळ मी खेळू लागलो, तेव्हा माझ्या खांद्यावरची पोंगडी हरवून गेली. १ त्या वेळी मी कान्होबाच्या गळघात पडून म्हणालो की, गोपालकृष्णा, तू माझी झडती घे व तूही तुझ्या अंगाची झडतो दे. २ हा पाहा मी झडतीसाठी उघडा झालो आहे. सर्व उपाधी सोडून आलो आहे. सर्व वासनांतून मुक्त झालो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जवळ माझी मूळचीच बुद्धी काही छोटी नाही. ४ १०८३ घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥ १ ॥ माझियाचा भाग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ २ ॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे लाहान मोठा । सांडा¹ ताठा हा देवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोवा-गुंतवणूक, उगवो द्या-सोडवा, आन-शपथ अर्थ :- देवा, तुझ्याजवळ अनेक लोकांच्या घोंगड्यांचे ढोगच्या ढीग होते. माझेही हे घोंगडे तेथेच होते. १ देवा, माझा मार्ग मला दाखवा ना. ज्या गुंतव्यात माझी गुंतवणूक झाली आहे त्यातून माझी सुटका करावी. २ माझ्या वासनांचे व देहरूपी घोंगडीचे निसंतान व्हावे, अशी शपथ मी तुझ्यापाशी घेत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही हा लहानमोठेपणाचा ताठा सोडून द्यावा. ४ १०८४ नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥ १ ॥ चाहाड तुझे दाविन घरों । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ २ ॥ तुम्हा आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥ ३ ॥ तुका म्हणे उरती गोष्टी । पडिली मिठी न सुटे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- उगा-उगाच, सरोबरी-बराबरी, गोष्टी-हृद्गत, गोष्टी. अर्थ :- देवा, गोपाळा, माझी घोंगडी तू घेतलीस, तेव्हा मी काही उगाचच गळ्यात पडलो म्हणून नव्हे. गोपाळा, तू तसाच जाऊ नकोस १ तुझ्या बोलण्यात काहीच ताळतंत्र नाही असे तुझ्या घरी जाऊन सांगणारे चहाडखोर मित्र मी तुला दाखवीन. २ आतापर्यंत तुमच्याआमच्यांत मर्यादेचा व भेदाचा पडदा होता, तो आता संपला. आता तुझीआमची बराबरी झाली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता त्या भेदाच्या नुसत्या गोष्टींच उरतील. आता तुमच्या पायाशी जो मिठी पडली आहे, ती काही सुटणार नाही. ४ १०८५ तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसे तैसे ॥ १ ॥ माझें घोंगडें टाकून देईं । एके ठायीं मग असों ॥ २ ॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारों बोलविसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जनाचारी-लोकव्यवहार, लोकाचार. अर्थ :- तुमच्यात व आमच्यात जोपर्यंत भेद आहे, मर्यादा आहे, तोपर्यंतच लोकव्यवहार असा तसाच राहणार. १ देवा, माझे घोंगडे टाकून द्या ना. मग तुम्ही व आम्ही एकाच ठिकाणी असू. २ आपापसांत विरोध १ माडवा.
४८२ सार्थ तुकारामगाथा सौजन्य असून यासाठी त्याचा उपयोग आपणास मोठाच आहे म्हणून काही त्याला आपल्या पदरात बांधून घेता येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, विंचू व सर्प ही नारायणाची रूपे, परंतु त्यांना न शिवता दुरूनच वंदन करावे ३ १०७९ भूत भविष्य कळो यावे वर्तमान । हे तो भाग्यहीन त्याची जोडी ॥ १ ॥ आम्ही विष्णुदासीं देव घ्यावा चित्ते । होणार ते होते प्रारब्धें ॥ २ ॥ जगरुडीसाठी घातले दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जोडी-प्राप्ती अर्थ - आपणास भूतकाळातील व भविष्याळातील वर्तमान समजावे म्हणून पुष्कळ लोकांची खटपट असते पण या ज्ञानाची प्राप्ती ही भाग्यहीन माणसास होते म्हणजे ही प्राप्ती काही विशेष भाग्याची नाही १ आम्हीं विष्णुदासांनी मात्र निरंतर या देवाचेच चिंतन मनात करावे व जे प्रारब्धानुसार असेल ते भोगावे २ केवळ जगरुडीसाठीच भूतभविष्य समजणाऱ्या लोकांनी दुकान घालून धंदा सुरू केलेला आहे पण त्यामुळे परमेश्वराचे पाय अंतरून जातात ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच मोठा गहन असून त्यात, रिद्धीसिद्धींची पीडाही फार मोठी असते ४ घोंगडयाचे अभंग- १२ १०८० ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥ १ ॥ पांघुरलो बहु काळें । घोगडें बळें सांडवले ॥ २ ॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥ ३ ॥ तुका म्हणे आड सेवा । लाबिला हेवा धाडली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठकिले-फसविले, कुडी-देह लाग-लाभ, हेवा-हाव अर्थ - मी काळाला फसवून दडी देऊन लपून राहिलो देहभावाची वृत्तीही टाकून दिली १ पुष्कळ दिवसांपर्यंत मी हे काळे घोंगडे पांघरले होते, ते मुद्दामच टाकून दिले आहे २ आता त्या काळास कसलाही लाभ होणार नाही, अशा दूरच्या ठिकाणी जाऊन मी लपलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य सेवा करण्याची माझी वरवरची हाव होती, तिची आडकाठी मी या प्रकाराने झटपट दूर केली ४ १०८१ घोंगडियाचा पालट केला । मुलामुला आपुल्यात ॥ १ ॥ कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिसे सवंगडिया ॥ २ ॥ तो बोले मी उगाच बैसे । आनारिसे न दिसे ॥ ३ ॥ तुका म्हणे दिले सोंग । नेदी व्यंग जाऊ देऊ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पिसे-वेड, आनारिसे-वेगळेपणा अर्थ - खेळताना या गोपाळांच्या मुलानी आपल्या घोंगड्यांची अदलाबदल केली. १ प्रत्येकजणाने कान्होबा मीच, असे सोंग घेऊन इतर सोबत्याना बतावणी केली २ तो बोलतो व मी उगाच बसतो असे असले तरी, त्याच्यात व आमच्यात वेगळेपणा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने हे जे सोंग त्याना दिले आहे, ते काहीं व्यर्थ वाया जात नाही ४
सार्थ तुकारामगाथा ४८३ १०८२ खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥ १ ॥ कान्होबाचे पडिलों गळां । घेईं गोपाळा देईं झाडा ॥ २ ॥ मी तों हारगे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥ ३ ॥ तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठाणोची मजपाशीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हारपली-हरवून गेली, काची-खोटी. अर्थ :- देवा, सुरकबडीचा खेळ मी खेळू लागलो, तेव्हा माझ्या खांद्यावरची घोंगडी हरवून गेली. १ त्या वेळी मी कान्होबाच्या गळ्यात पडून म्हणालो की, गोपालकृष्णा, तू माझी झडती घे व तूही तुझ्या अंगाची झडती दे २ हा पाहा मी झडतीसाठी उघडा झालो आहे. सर्व उपाधी सोडून आलो आहे. सर्व वासनांतून मुक्त झालो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जवळ माझी मूळचीच बुद्धी काही खोटी नाही. ४ १०८३ घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥ १ ॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ २ ॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे लहान मोठा । सांडा¹ ताठा हा देवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोवा-गुंतवणूक, उगवो द्या-सोडवा, आन-शपथ अर्थ :- देवा, तुझ्याजवळ अनेक लोकांच्या घोंगडयांचे डोंगऱ्या ढीग होते. माझेही हे घोंगडे तेथेच होते. १ देवा, माझा मार्ग मला दाखवा ना. ज्या गुंत्यात माझी गुंतवणूक झाली आहे त्यातून माझी सुटका करावी २ माझ्या वासनांचे व देहरूपी घोंगडीचे निसंतान व्हावे, अशी शपथ मी तुझ्यापाशी घेत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही हा लहानमोठेपणाचा ताठा सोडून द्यावा ४ १०८४ नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥ १ ॥ चाहाड तुझे वांचिन घरों । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ २ ॥ तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥ ३ ॥ तुका म्हणे उरली गोठी । पडिली मिठी न सुटे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- उगा-उगाच, सरोबरी-बरोबरी, गोठी-हकीगत, गोष्टी अर्थ :- देवा, गोपाळा, माझी घोंगडी तू घेतलीस, तेव्हा मी काही उगाचच गळ्यात पडलो म्हणून नव्हे. गोपाळा, तू तसाच जाऊ नकोस १ तुझ्या बोलण्यात काहीच ताळतंत्र नाही असे तुझ्या घरी जाऊन सांगणारे चहाडखोर मित्र मी तुला दाखवीन. २ आतापर्यंत तुमच्याआमच्यात मर्यादेचा व भेदाचा पडदा होता, तो आता संपला. आता तुझीआमची बरोबरी झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता ह्या भेदाच्या नुसत्या गोष्टीच उरतील. आता तुमच्या पायाशी जी मिठी पडलो आहे, ती काही सुटणार नाही. ४ १०८५ तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसे तैसी ॥ १ ॥ माझें घोंगडें टाकून देईं । एके ठायीं मग असों ॥ २ ॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जनाचारी-लोकव्यवहार, लोकाचार अर्थ - तुमच्यात व आमच्यात जोपर्यंत भेद आहे, मर्यादा आहे, तोपर्यंतच लोकव्यवहार असा तसाच राहणार. १ देवा, माझे घोंगडे टाकून द्या ना मग तुम्ही व आम्ही एकाच ठिकाणी असू. २ आपापसांत विरोध १ सांडवा.
वाढला म्हणजे विनाकारण अंतर निर्माण होते, म्हणून देवा, पोटात कधी कपट ठेवू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, तू स्वतः जाणता आहेस पण मला मात्र व्यवहारातील बोलणे करायला उगाच लावतोस ४ १०८६ मूळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥ १ ॥ घ्यावे त्याचे देणेचि नाहीं । येचि वाहीं देखतसो ॥ २ ॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांठीची लंगोटी सोडिस ना ॥ ३ ॥ तुका म्हणे म्या सांडिली आशा । हुगिला फांसा येथुनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाहीं-प्रवाह, ओघ, रीत अर्थ - देवा, तुम्हांला मूळचीच सवय लागली आहे, ती काही तुम्ही सोडीत नाही. १ ज्याचे तुम्ही एकदा घेता, ते कधी परत देतच नाही हाचं प्रवाह तुमच्या येथील मी पाहात आहे २ तू माझी भली मोठी घोंगडी घेतलींस तेवढी, पण स्वतःची लंगोटीसुद्धा देत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर आता आशाच सोडली आहे अशा प्रकारचा पाश मी हुसून टाकून दिलेला आहे ४ १०८७ घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवे ॥ १ ॥ हा गे चोर घरा धावा कोणी । घरात राहाटे चहू कोनी ॥ २ ॥ नोळखवे म्या धरिला हातीं । देहा दीप माय लाविली वाती ॥ ३ ॥ न पावे धावणे मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साटी केली-सोडून दिला, राहाटे-फिरता आहे अर्थ - या देवाने माझ्या घोंगड्यासच मिठी मारली आहे हो जीव गेला माझा तरी तो आता सोडणार नाही १ लोकांहो, हा एक चोरच माझ्या घरात शिरून चारही कोपऱ्यातून फिरतो आहे धावा हो धावा याला कुणी तरी धरा हो २ मी माझ्या देहाचा दीप मायची वात करून प्रज्वलित केला आहे, तरी मी त्याला काही ओळखू शकत नाही त्याला हातात मात्र पकडून ठेविले आहे ३ हा तुकाराम यामुळे लोकव्यवहारदृष्टीने नागवला जात असून, रक्षणासाठी लोकांना हाक मारीत असून त्याच्या मदतीसाठी कोणीही धावून येत नाहीत ४ १०८८ आता मी देवा पांघरो काई । भिकेचे तेही उरेचि ना ॥ १ ॥ सदैव दुबळें नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ २ ॥ नाही मजपाशीं फुटकी फोडी । पाचांनीं घोंगडी दिली होती ॥ ३ ॥ तुका म्हणे जना वेगळें जाले । एकचि नेले एकल्याचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सदैव-गुर्देवीं श्रीमान, सुनाट-उघडे फोडी-कवडी, सुपारीचे खांड, पाचांनी- पंचमहाभूतांनी अर्थ - देवा, आता मी पांघरू तरी काय रे ? एक घोंगडी मी भिक्षा मागून आणली होती, तीही तू नेलीस आता माझ्यापाशी काहीच उरले नाही १ चोर चोरी करताना श्रीमान, सुदैवी अथवा दरिद्री, दुबळा असा फरक कधीच करीत नाही घर उघडे पाहिले की तो फोडतो व चोरी करून निघून जातो तसेच माझे झाले २ माझ्या पाशी तसे पाहिले तर फुटकी कवडीसुद्धा नाही, मला तेवढीच एक पंचमहाभूतांनी देहरूपी घोंगडी दिली होती ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या एका परमेश्वराने माझी एकट्याची घोंगडी नेऊन मला लोकाचारातून वेगळे केले ४ १०८९ मी माझें करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले¹ खाने ॥ १ ॥ मज आल्याविण आधींच होता । मज न कळता मज² माझी ॥ २ ॥ १ घेतली खाण, २ मजपाशी