दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
६ वा. ] अनिर्वाच्यनिरूपण. १५१ ॥ ९ ॥ सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळाया गूळ देणें । ऐसें हें सद्गुरू- विणें । होणार नाहीं ॥ १० ॥ सद्गुरुकृपा वळे त्यासी । जो शोधील आप- णाशीं । पुढें कळेल अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११ ॥ दृढ करूनियां बुद्धी । आधीं घ्यावी आपली शुद्धी । तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२ ॥ आपुलें मूळ बरें शोधितां । आपुली ती मायिक वार्ता । पुढें वस्तुच तत्वता । समाधान ॥ १३ ॥ आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं । जो कोणी सिद्धांत लक्षी । तोचि साधु ॥ १४ ॥ सिद्धांत वस्तु लक्षूं जातां । सर्वसा- क्षिणी ते अवस्था । आत्मा त्याहून परता । अवस्थोतीत ॥ १५ ॥ पदार्थ- ज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणे नुरे । ते समयीं फुंजें उतरे । मीपणाचा ॥ १६ ॥ जेथें मुरालें मीपण । तेचि अनुभवाची खूण । अनिर्वाच्य समाधा- न । या कारणें बोलिजे ॥ १७ ॥ अत्यंत विचाराचे बोल । तरी ते मायिकचि फोल । शब्दा सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८ ॥ शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहतां शब्द व्यर्थ । शब्द सांगे यथार्थ । परी आपण मिथ्या ॥ १९ ॥ शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहतां शब्द नासे । शब्द फोल अर्थ असे । घनदाटपणें ॥ २० ॥ भुसाकरितां धान्य निपजे । धान्य घेऊ- न भूस टाकिजे । तैसा भूस शब्द जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१ ॥ पोंचटां- मध्यें घनवट । घनवटीं उडे पोंचट । तैसा शब्द हा फलगट । परब्रह्मीं ॥ २२ ॥ शब्द बोलूनि राहे । अर्थ शब्दापूर्वीच आहे । या कारणें न साहे । उपमा तया अर्थांसी ॥ २३ ॥ भूस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्य- जावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४ ॥ दृश्य वेगळें बोलि- जे । त्यास वाच्यांश म्हणिजे । त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश ॥ २५ ॥ ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो अलक्ष । लक्षिला न वचे ॥ २६ ॥ जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभ- वाचा गाभा । ऐसा तोहि उभा । कल्पित केला ॥ २७ ॥ मिथ्या कल्पने- पासून झाला । खरेपण कैसें असेल त्याला । म्हणोनि तेथें अनुभवाला । ठा-
१. जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या (केवल साक्षित्व) या चार अवस्थांहून भिन्न. २. अभिमान. ३. ब्रह्मानुभवाचे वेळीं 'मी' ही स्फूर्तिच नसल्यामुळे तो अनुभव कोण सांगणार ? अर्थात् तें समाधान अनिर्वाच्य होय. ४. आंतबाहेर.
१५२ श्रीदासबोध. [ दशक व नाहीं ॥ २८ ॥ दुजेविण अनुभव । हें बोलणोंचि तों वाव । या कारणें नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९ ॥ अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि लाजे । म्हणोनियां बोलणें साजे । अनिर्वाच्य ॥ ३० ॥ दिवसरेजनीचें प- रिमितें । करावया मूळ आदित्य । तो आदित्य गेलिया उर्वरित । त्यासि काय म्हणावें ॥ ३१ ॥ शब्द मौनाचा विचार । व्हावया मूळ ओंकार । तो ओंकार गेलिया उच्चार । कैसा करावा ॥ ३२ ॥ अनुभव आणि अनुभविता । सकळ ये मायेचिकरितां । ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥ वस्तु एक आपण एक । ऐशी असती वेगळिक । तरी अनुभवाचा विवेक । बोलों येता सुखें ॥ ३४ ॥ वेगळेपणाची मातें । ते लटिकी वंध्येची सुताँ । म्ह- णूनिया अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५ ॥ अजन्मां होता निजला । तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । सद्गुरूसि शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६ ॥ सद्गुरुकृपे- स्तव । झाला संसार वाव । ज्ञान झालिया ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७ ॥ आहे तितुकें नाहीं झालें । नाहीं नाहींपणें निमालें । आहे नाहीं जाऊन उरलें । नसोनि कांहीं ॥ ३८ ॥ शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान । तेणें झालें समा- धान । ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिती ॥ ३९ ॥ अद्वैतेंनिरूपण होतां । निमाली द्वैताची वार्ता । ज्ञानचर्चा बोलों जातां । जागृति आली ॥ ४० ॥ श्रोतीं व्हावें सावधान । अर्थी घालावें मन । खुणे पावतां समाधान । अंतरीं कळे ॥ ४१ ॥ तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तितुकें स्वप्नावरी गेलें । अनिर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२ ॥ तेथें शब्दांविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता । ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३ ॥ तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊन जागृतीस आला । तेथें तर्क कुंठित जाहला । अंत नलगे ॥ ४४ ॥ या निरूपणाचें मूळ । केलेंच करूं प्रांजळ । तेणें अंतरीं निवळ । समाधान कळे ॥ ४५ ॥ तंव शिष्यें विनविलें । जी हें आतां निरूपिलें । तरी पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६ ॥ मज क- १. अनुभव घेणारा, अनुभव घेण्याचा पदार्थ, व येणारा अनुभव हें त्रय. २. दिवस व रात्र ही कालगणना. ३. बाकी राहिलेले. ४. गोष्ट. ५. वांझेची मुलगी. ६. एकरूपता. ७. ज्याचा जन्मच झाला नाहीं तो; अर्थात् जीव. ८. शून्य नव्हे असें. ९. भेदभावना सत्य नाहीं, हा विचार. १०. सांगतां न येणारें.
ळाया कारण । केलेंच करावें निरूपण । तेथील जे कां निजखूण । ते मज अनुभवावी ॥ ४७ ॥ अजन्मा तो सांग कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न । येथें कैसें निरूपण । बोलिलें आहे ॥ ४८ ॥ जाणोनि शिष्याचा आदर । स्वामी देती प्रत्युत्तर । तेंचि आतां अतितत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९॥ ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंचि जाण । तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न । तोहि आतां सांगतों ॥ ५० ॥ स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा संसार । तेथें तुवां सारासार । विचार केला ॥ ५१ ॥ रिघोनि सद्गुरूंसि श- रण । काढून शुद्ध निरूपण । याची करिसी ऊनखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२॥ याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव । निवांत विश्रांतीचा ठाव । ते तूं जाण जागृती ॥ ५३ ॥ ज्ञानगोष्टीचा गलबला । सरोन अर्थ प्रगटला । याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४ ॥ तुज वाटे हे जागृती । मज झाली अनुभवप्राप्ती । या नांव केवळ भ्रांती । फिटलीच नाहीं ॥ ५५॥ अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला । हााहि स्वप्नींचा चेइला । नाहींस बापा ॥ ५६ ॥ जागा झालिया स्वप्नऊर्मी । स्वप्नीं म्हणसी अजन्मा तो मी । जागेपणें स्वप्नऊर्मी । गेलीच नाहीं ॥ ५७ ॥ स्वप्नीं वाटे जागेपण । तैसी अनुभवाची खूण । आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरूप ॥ ५८ ॥ जागृति या पलीकडे । तें सांगणें केवीं घडे । जेथें धारणाचि मोडे । विवेकाची ॥ ५९ ॥ म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये असें जाण । निःशब्दांची ऐसी खूण । ओळखावी ॥ ६० ॥ ऐसें आहे समाधान । बोल- तांच न ये जाण । इतुकेन बाणली खूण । निःशब्दाची ॥ ६१ ॥ इति श्रीदा- सबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके अनिर्वाच्यनिरूपणं नाम दशमः समासः ॥१० ॥ १. अनुभव. २. जागृत झाला. ३. स्वप्नात जसें जागृत आहोंसें वाटतें, त्याप्रमाणें तुला अनुभव आला असें वाटतें; पण खऱ्या जागृताला, मी स्वप्नांत नाहीं, जागा आहे, असें स्मरण असण्याचें कारण नाहीं, त्याप्रमाणें खऱ्या अनुभ- वाचे वेळीं 'अनुभव आला' हें स्फुरण राहाणें शक्य नाहीं. ४. स्थिति. ५. जेथें शब्दांचें कार्य नाहीं अशा ब्रह्माची.
| १५४ | श्रीदासबोध. | [ दशक |
|---|
दशक सातवा.
१. मंगलाचरण.
श्रीगणेशाय नमः ॥ विद्यावंताचा पूर्वजें । गजानन एकद्विजें । त्रिन- यन चतुर्भुज । परशुपाणी ॥ १ ॥ कुबेरापासून अर्थ । वेदांपासून परमार्थ । लक्ष्मीपासून समर्थ । भाग्यासि आले ॥ २ ॥ तैशी मंगळमूर्ती आद्या । तियेपासून झाली सकळ विद्या । तेणें लाघवॅं कविपद्या । सत्पात्रीं जा- हलीं ॥ ३ ॥ जैशीं समर्थांचीं लेंकुरें । नाना अलंकारीं सुंदरें । मूळपुरुषा- चेनि द्वारें । तैसे कवी ॥ ४ ॥ नमूं ऐसिया गणेशेंद्रा । विद्याप्रकाशपूर्णचंद्रा । जयाचेन बोधसमुद्रों । भरितें दाटे ॥ ५ ॥ जो कर्तृत्वास आरंभ । मूळपुरुष मूळारंभ । जो परात्पर स्वयंभ । आदिअंतीं ॥ ६ ॥ तयापासून प्रमदा । इच्छाकुनारी शारदा । आदित्यापासून गोदा । मृगजळ वाहे ॥ ७ ॥ जे मिथ्या म्हणतांच गोंवी । मायिकपणें लाघवी । वक्त्यास वेढा लावी । वे- गळेपणें ॥ ८ ॥ जे द्वैताची जननी । कीं ते अद्वैताची खाणी । मूळमाया ग- वसणी । अनंत ब्रम्हांडांची ॥ ९ ॥ कीं ते औदुंबरी वेली । अनंत ब्रम्हांडें लगडलीं । मूळपुरुषाची साउली । दुहिता रूपें ॥ १०॥ वंदूं ऐशी वेदमाता । आदिपुरुषाची जे सत्ता । आतां आठवीन समर्था । सद्गुरूसी ॥ ११ ॥ ज- याचेनि कृपादृष्टी । होय आनंदाची वृष्टी । तेणें गुणें सर्व सृष्टी । आनंदमय ॥ १२ ॥ कीं तो आनंदाचा जनक । सायुज्यमुक्तीचा नायक । कैवल्यपद- दायक । अनाथबंधू ॥ १३ ॥ मुमुक्षुचातर्कीं सुस्वर । केंरुणा पाँहिजे अंबरे । वोळे कृपेचा जलधर । साधकांवरी ॥ १४ ॥ कीं तें भवार्णवांचें तारूं । बोधें पाविजे पैलपारू । महा आवर्तीं आधारू । भाविकासी ॥ १५ ॥ कीं तो काळाचा नियंता । नाना संकटीं सोडविता । कीं ते भाविकांची माता । परम स्नेहाळ ॥ १६ ॥ कीं तो परत्रींचा आधारू । कीं तो विश्रांतीचा थारू । नातरी सुखाचें माहेरू । सुखरूप ॥ १७ ॥ ऐसा सद्गुरु पूर्णपणीं ।
तळटीपा (Footnotes): १. आदि पुरुष. २. एकदंत. ३. संपत्ति. ४. चातुर्य. ५. ज्ञानरूप सागरास. ६. थोरांहून थोर. ७. स्त्री. ८. सरस्वती. ९. कन्या. १०. मुमुक्षुरूप चातक पक्ष्यांनी प्रेमानें आकाशाकडे पाहावें. ११. संकटांत.
७ वा.] मंगलाचरण. १५५ तुटे भेदाची कडसणी । देहेंविण लोटांगणी । तया प्रभूसी ॥ १८ ॥ साधु- संत आणि सज्जन । वंदूनियां श्रोतेजन । आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ १९ ॥ संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन । माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २० ॥ ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्र- काश लोपला । अंधकारें पूर्ण झाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१ ॥ नाहीं सत्वांचें चांदणें । कांहीं मार्ग दिसे जेणें । सर्व भ्रांतीचेनि गुणें । आपेंआप न दिसे ॥ २२ ॥ देहबुद्धि अहंकार । निजले घोरती घोर । दुःखें आक्रंदती थोर । विषयसुखाकारणें ॥ २३ ॥ निजले असतां मेले । पुनः उपजतांच निजले । ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ २४ ॥ निर्दसुरेपणींचि सैरा- वैरा । बहुतों केल्या येरझारा । नेणोनियां परमेश्वरा । भोगिले कष्ट ॥२५॥ तया कष्टाचें निरसन । व्हावया पाहिजे आत्मज्ञान । म्हणोनि हें निरूपण । अध्यात्मग्रंथीं ॥ २६ ॥ सकळ विद्येमध्यें सार । अध्यात्मविद्येचा विचार । दशमाध्यायीं शार्ङ्गधर । भगवद्गीतेंत बोलिला ॥ २७ ॥ श्लोक ॥ अध्यात्म- विद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ या कारणें अद्वैतग्रंथ । अध्यात्म- विद्येचा परमार्थ । पावावया तोचि समर्थ । जो सर्वांगें श्रोता ॥ २८ ॥ ज- याचें चंचल हृदय । तेणें ग्रंथ सोडूंचि नये । सोडितां अलभ्य होय । अर्थ येथींचा ॥ २९ ॥ जयास जोडला परमार्थ । तेणें पाहावा हा ग्रंथ । अर्थ शोधितां परमार्थ-। निश्चय बाणे ॥ ३० ॥ जयास नाहीं परमार्थ । तयास न कळे येथींचा अर्थ । नेत्रेंविण निधानस्वार्थ । अंधास न कळे ॥ ३१ ॥ एक म्हणती मराठें काय । हें तों भल्यानें ऐकों नये । तीं मूर्खें नेणती सोय । अर्थान्वयाची ॥ ३२ ॥ लोहाची मांदूस केली । नाना रत्नें सांठविलीं । ती अभाग्योन त्यागिली । लोखंड म्हणोनी ॥ ३३ ॥ तैसी भाषा प्राकृत । अर्थ- वाद आणि सिद्धांत । नेणोनि त्यागिती भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ ३४ ॥ आह्नांच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण । द्रव्य घ्यावें सांठवण । पा- होंचि नये ॥ ३५ ॥ परिस देखिला अंगणीं । मार्गी सांपडला चिंतामणी । अव्हावेळ महागुणी । कूपामध्यें ॥ ३६ ॥ तैसें प्राकृतीं अद्वैत । सुगम आणि
१. दोरी. २. शीण पावतात. ३. सात्विक वृत्तिरूपी. ४. झोंपेतच. ५. ठेवण्याचा लाभ. ६. पेटी. ७. आपोआप. ८. दक्षिणवर्ती वेल.
'१५६ श्रीदासबोध. [ दशक
सप्रचीत । अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥ ३७ ॥ न क- रितां व्युत्पत्तीचा श्रम । सकळ शास्त्रार्थ होय सुगम । सत्समागमाचें वर्म । तें हें ऐसें असे ॥ ३८ ॥ जें व्युत्पत्तीनें न कळे । तें सत्समागमें कळे । स- कळ शास्त्रार्थ आकळे । स्वानुभवासी ॥ ३९ ॥ म्हणोनि कारण सत्समागम । तेथें नलगे व्युत्पत्तिश्रम । जन्मसार्थकाचें वर्म । वेगळेंच असे ॥ ४० ॥ श्लोक ॥ भाषाभेदाश्च वर्तंते ह्यर्थ एको न संशयः । पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥ १ ॥ टीका ॥ भाषापालटे कांहीं । अर्थ वायां जात नाहीं । कार्यसिद्धि ते सर्वही । अर्थाचपाशीं ॥ ४१ ॥ तथापि प्राकृताकरि- तां । संस्कृताची सार्थकता । येह्रवीं त्या गुप्तार्था । कोण जाणे ॥ ४२ ॥ आतां असो हें बोलणें । भाषा त्यागून अर्थ घेणें । उत्तम घेऊन त्याग करणें । साली तरफलांच्या ॥ ४३ ॥ अर्थ सार भाषा पोंचट । अभिमानें करावी खटपट । नाना अहंतैनें वाट । रोधिली मोक्षाची ॥ ४४ ॥ शोध घेतां लक्ष्यांशाचा । तेथें आधीं वाच्यांश कैंचा । अगाध महिमा भगवंताचा । कळला पाहिजे ॥ ४५ ॥ मुकेपणाचें बोलणें । हें जयाचें तोचि जाणे । स्वा- नुभवाचिये खुणे । स्वानुभवी पाहिजे ॥ ४६ ॥ अर्थ जाणे अध्यात्माचा । ऐसा श्रोता मिळेल कैंचा । जयास बोलतां वाचेचा । हव्यासचि पुरे ॥४७॥ परीक्षावंतापुढें रत्न । ठेवितां होय समाधान । तैसें ज्ञानियापुढें ज्ञान । बोलावें वाटे ॥ ४८ ॥ मायाजालें दुश्चित होय । तें निरूपणीं कामा न ये । संसारिकां कळे काय । अर्थ येथीलचा ॥ ४९ ॥ श्लोक ॥ व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन । बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ १ ॥ टीका ॥ व्यवसायीं जो मलिन । त्यासि न कळे निरूपण । येथें पाहिजे सावधपण । अतिशयेंसी ॥ ५० ॥ नाना रत्ने नाना नाणीं । दुश्चितपणें घेतां हाणी । परीक्षा नेणता प्राणी । ठकला तेथें ॥ ५१ ॥ तैसें निरूपणीं जाणा । आहाच पाहतां कळेना । मराठींचि उमजेना । कांहीं केल्या ॥५२॥ जेथें निरूपणाचे बोल । आणि अनुभवाची वोल । तें संस्कृतापरीस खोल । अध्यात्मश्रवण ॥ ५३ ॥ मायाब्रम्ह वोळखावें । तयास अध्यात्म म्हणावें । तरी तें मायेचें जाणावें । स्वरूप आधीं ॥ ५४ ॥ माया सगुण साकार । १. शास्त्रें पढण्याचा. २. निश्चितपणामध्यें. ३. वरवर.
७ वा. ] ब्रह्मनिरूपण. १५७ माया सर्व विकार । माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५ ॥ माया दृश्य दृष्टीस दिसे । माया भास मनास भासे । माया क्षणभंगुर नासे । वि- वेकें पाहतां ॥ ५६ ॥ माया अनेक विश्वरूप । माया विष्णूचें स्वरूप । मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७ ॥ माया बहुरूप बहु- रंग । माया ईश्वराचा संग । माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥ ५८ ॥ माया सृष्टीची रचना । माया आपली कल्पना । माया तोडितां तुटेना । ज्ञानेंविण ॥ ५९ ॥ ऐसी माया निरूपिली । स्वल्प संकेतें बोलिली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६० ॥ पुढें ब्रह्मनिरूपण । निरूपिलें ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान । एकसरें ॥ ६१ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. ब्रह्मनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निर्विकार । ब्रह्मास नाहीं पारावार । बोलती साधु ॥ १ ॥ ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं एक । ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं १ ॥२॥ ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत २ । ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३ ॥ ब्रह्म दृश्यावेगळें । ब्रह्म शून्यत्वा निराळें । ब्रह्म इंद्रियांच्या मेळें । चोजवेना ३ ॥ ४ ॥ ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खास असेना । ब्रह्म गुरूविण येईना । अनुभवासी ॥ ५ ॥ ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्माऐसें नाहीं सार । ब्रह्म सूक्ष्म अगोचर ४ । ब्रह्मादिकांसी ॥ ६ ॥ ब्रह्म शब्दें ऐसें तैसें । बोलिजे त्या- हूनि आनारिसें ५ । परी तें श्रवणअभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७ ॥ ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत । ब्रह्मास हे दृष्टांत । देतां न शोभती ॥८॥ ब्रह्मासारिखें दुसरें । पाहतां काय आहे खरें । ब्रह्मीं दृष्टांतउत्तरें ६ । कदा न साहे ॥९॥ जेथें वाचा निवर्तेती ७ । मनास नाहीं ब्रह्मप्राप्ती । ऐसी बोलिली श्रुती । सिद्धांतवचनीं ॥ १० ॥ कल्पनारूप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं । म्हणोनि हें वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११ ॥ आतां मनासि १. चळत नाहीं असें. २. असणारें. ३. जाणवेना. ४. अदृश्य. ५. निराळें. ६. दृष्टांतांनीं युक्त भाषणें. ७. परत वळते.
१५८ श्रीदासबोध. [ दशक जें अप्राप्त । तें कैसेनि होईल प्राप्त । ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाहीं ॥ १२ ॥ भांडारगृहें भरलीं । परी असती अडकलीं । हातास न येतां किल्ली । सर्वही अप्राप्त ॥ १३ ॥ तरी ते किल्ली ते कवण । मज करावी निरूपण । ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४ ॥ सद्गुरुकृपा तेचि किल्ली । जेणें बुद्धि प्रकाशली । द्वैतकपाटें¹ उघडलीं । एकसरां ॥ १५ ॥ ते सुख असे बाड² । नाहीं मनासि पवाड³ । मनेंविण कैवाड⁴ । साधनाचा ॥ १६ ॥ त्याची मनाविण प्राप्ती । कीं वासनेविण तृप्ती । तेथें न चले व्युत्पत्ती । कल्पनेची ॥ १७ ॥ तें परेहूनि⁵ पैल । मन बुद्धि अगोचर । संग⁶ सोडितां सत्वर । पाविजे तें ॥ १८ ॥ संग सोडावा आपुला । मग पाहावें तयाला । अनुभवितां या बोला । सुखावेल गा ॥ १९ ॥ आपण म्हणजे मीपण । मीपण म्हणजे जीवपण । जीवपण म्हणजे अज्ञान । संग जडला ॥ २० ॥ सोडितां तया संगासी । ऐक्य होय निःसंगासी । कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१ ॥ मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे । अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ॥ २२ ॥ देहबुद्धीचें⁷ थोरपण । परब्रह्मीं न चले जाण । तेथें होतसे निर्वाण⁸ । अहंभावासी ॥ २३ ॥ उंच नीच नाहीं परी । राया रंका एकच तरी । झाला पुरुष अथवा नारी । एकाचि पद ॥ २४ ॥ ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचि ना ॥ २५ ॥ उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी । ऐसा भेद तयापासीं । मुळींच नाहीं ॥ २६ ॥ सक- ळांस मिळोन ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक । रंक अथवा ब्रम्हादिक । तेथेंचि जाती ॥ २७ ॥ स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिही लोकींचे ज्ञाते सकळ । सकळांसि मिळोनि एकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८ ॥ गुरु शिष्यां एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद । परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९ ॥ देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती । एकं ब्रम्ह द्वितीयं⁹ नास्ति । हें श्रुतीचें वचन ॥ ३० ॥ साधु दिसती वेगळाले । परी ते १. ब्रम्हास झांकून ठेवणारे द्वैतमय जग हीच कपाटें. २. पुष्कळ. ३. शिर- काव. ४. नाना प्रकार. ५. परा वाणीच्या पलीकडील. ६. विषयांची आसक्ति. ७. मी म्हणजे देह ही समजूत तिच्यासंबंधीं. ८. लय. ९. दुसरें नाहीं.
७ वा. ] ब्रह्मनिरूपण. १५९ स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तुं ॥३१॥ ब्रम्ह नाहीं नवें जुनें । ब्रम्ह नाहीं अधिक उणें । उणें भावील तें सुणें ३ । देह- बुद्धीचें ॥३२॥ देहबुद्धीचा निश्चय । करी समाधानाचा क्षय । चुके समाधान- समय । देहबुद्धियोगें ॥ ३३ ॥ देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण । मिथ्या जाणोन विचक्षण । निंदिती देह ॥३४॥ देह पावे जंववरी मरण । तंववरी धरी देहाभिमान । पुन्हा दाखवी पुनरागमन ४ । देहबुद्धी मागुती ॥३५॥ देहाचेनि थोरपणें । समाधानासि आणिलें उणें । देह पडेल कोणत्या गुणें । हेंहि कळेना ॥ ३६ ॥ हित आहे देहातीतें । म्हणोनि निरू- पिती संत । देहबुद्धीनें अनहित । होऊंचि लागे ॥३७॥ सामर्थ्यबळें देहबुद्धी । योगियांस तेहि बाधी । देहबुद्धीची उपाधी । फैसावों लागे ॥ ३८ ॥ म्हणोन देहबुद्धि झडे । तरीच परमार्थ घडे । देहबुद्धीनें बिघडे । ऐक्य- ता ब्रम्हींची ॥ ३९ ॥ विवेक वस्तूकडे वोढी । देहबुद्धि तेथूनि पाडी । अहंता लावूनि निवडी । वेगळेपणें ॥ ४० ॥ विचक्षणें या कारणें । देह- बुद्धि त्यजावी श्रवणें । सत्यब्रम्हीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१ ॥ सत्यब्रम्ह तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । प्रत्युत्तर दे आपण । व- क्ता श्रोत्यासी ॥ ४२ ॥ म्हणे ब्रम्ह एकचि असे । परी तें बहुविध भासे । अनुभव देहीं अनारिसे । नानामतीं ॥ ४३ ॥ जें जें जया अनुभवलेँ । तेंचि तयासि मानलें । तेथेंचि त्याचें विश्वासलें । अंतःकरण ॥४४॥ ब्रह्म नामरूपा- तीत । असोनि नामें बहुत । निर्मळ निश्चळ निवांत ५ । निजानंद ॥४५॥ अरूप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपार । अद्वय अतर्क्य अपार । ऐसीं नामें ॥४६॥ नादरूप ज्योतिरूप । चैतन्यरूप सत्तारूप । स्वस्वरूप साक्षरूप । ऐसीं नामें ॥४७॥ शून्य आणि सनातन । सर्वेश्वर आणि सर्वज्ञ । सर्वात्मा ६ जगज्जी- वन । ऐसीं नामें ॥ ४८ ॥ सहज ७ आणि सदोदित ८ । शुद्ध बुद्ध ९ सर्वातीत १० । शाश्वत आणि शब्दोतीत ११ । ऐसीं नामें ॥ ४९ ॥ विशाल विस्तीर्ण विश्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार । आत्मा परमात्मा परमेश्वर । ऐसीं नामें ॥ ५० ॥ परमात्मा ज्ञानघन । एकरूप पुरातन । चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्या-
१. देहाहून वेगळें. २. ब्रम्ह. ३. क्षुद्र. ४. पुन्हा जन्मास येणें. ५. न ढळणारें. ६. सर्वांस व्यापून राहतो तो. ७. कृत्रिम नव्हे. ८. सदैव प्रकाशित असणारें. ९. ज्ञानमय. १०. सर्वांहून भिन्न. ११. वाणीच्या पलीकडचें.
१६० श्रीदासबोध. [ दशक र्ची ॥ ५१ ॥ ऐसीं नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत । त्याचा क- रावया निश्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२ ॥ तो विश्रांतीचा विश्राम । आदि- पुरुष आत्माराम । तें एकचि परब्रम्ह । दुसरें नाहीं ॥ ५३ ॥ तेंचि कळा- याकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें श्रवणें । निश्चय बाणे ॥ ५४ ॥ खोटें निवडितां एकसरें । उरलें तें जाणिजे खरें । चौदा ब्रह्मों शा- स्त्राधारें । बोलिजेती ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमद- शके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. चतुर्दश ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान । जेणें होय समाधान । साधकांचें ॥ १ ॥ रत्नें साधायाकारणें । मृत्तिका लागे एकवटणें । चौदा ब्रम्हांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २ ॥ पदार्थाविण संकेत । द्वैतावगळा दृष्टांत । पूर्वपक्षांविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३ ॥ आधीं मिथ्या उभारावें । मग तें वोळखोन सांडावें । पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४ ॥ म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सि- द्धांत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५ ॥ पहिलें तें शब्द- ब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरें ब्रह्म । तिसरें खंब्रह्म² । बोलिली श्रुती ॥ ६ ॥ चौथें जाण सर्व³ ब्रह्म । पांचवें चैतन्य⁴ ब्रह्म । साहावें सत्ता⁵ ब्रह्म । साक्षि ब्रह्म सातवें ॥ ७ ॥ आठवें सगुण ब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म । दाहावें वाच्य⁶ ब्रह्म । जाणावें पै ॥ ८ ॥ अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें । तदा- कार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्यं⁷ ॥ ९ ॥ ऐसीं हीं चौदा ब्रम्हें । यांचीं निरूपिलीं नामें । आतां स्वरूपाचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १० ॥ अनुभवांविण भ्रम । या नांव शब्दब्रम्ह । आतां ओमित्येकाक्षरें ब्रम्ह । तें एकाक्षर ॥ ११॥ खं शब्दे आकाशब्रम्ह । महदाकाश व्यापक ब्रम्ह । आतां बोलिजेल सूक्ष्मब्रम्ह । सर्व ब्रम्ह ॥ १२ ॥ पंचभूतांचें कोडें । जें जें तत्व दृष्टीस पडे । तें तें ब्रम्ह- चि रोकडें । बोलिजत आहे ॥ १३ ॥ या नांव सर्व ब्रम्ह । श्रुतिआश्रयाचें १. ॐ असें एक अक्षर. २. आकाशरूप. ३. सर्व दृश्य हेंच ब्रह्म. ४. ज्ञानरूप. ५. अस्तित्वमात्र. ६. वाणीरूप. ७. शब्दानें सांगण्यास अशक्य.
७ वा.] चतुर्दश ब्रह्म. १६१
वर्म । आतां चैतन्यब्रम्ह । बोलिजेल ॥ १४ ॥ पंचभूतादि मायेतें । चैतन्य- चि चेतवितें । म्हणोनियां चैतन्यातें । चैतन्य ब्रम्ह बोलिजे ॥ १५ ॥ चैत- न्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रम्ह तत्वतां । तये सत्तेस जाणतां । या नांव साक्षिब्रम्ह ॥ १६ ॥ साक्षित्व जयापासूनी । तेंहि आकळिलें गुणीं । सगुण ब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १७ ॥ जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुण ब्रह्म तत्वतां । वाच्यब्रम्ह तेंहि आतां । बोलिजेल ॥ १८ ॥ जें वाचे बोलतां आलें । तें वाच्य ब्रम्ह बोलिलें । अनुभवासि कथिलें । न वचे सर्वथा ॥१९॥ या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म । परंतु याचेंहि वर्म । बोलवेना ॥ २० ॥ ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद । अनिर्वाच्य संवाद । तु- टोनि गेला ॥ २१ ॥ ऐसीं हीं चौदा ब्रह्में । निरूपिलीं अनुक्रमें । साधकें पाहतां भ्रमें । बाधिजेना ॥ २२ ॥ ब्रम्ह जाणावें शाश्वत । माया तेचि अ- शाश्वत । चौदा ब्रम्हांचा सिद्धांत । होईल आतां ॥२३॥ शब्दब्रम्ह तें शाब्दि- क । अनुभवैविण मायिक । शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥२४॥ जेथें क्षर ना अक्षर । तेथें कैंच ओमित्येकाक्षर । शाश्वताचा विचार । तेथें न दिसे ॥ २५ ॥ खंब्रम्ह ऐसें वचन । तरी शून्यातें नाशी ज्ञान । शाश्वताचें अधि- ष्ठान । तेथें न दिसे ॥ २६ ॥ सर्वत्रांस होतो अंत । हें तों प्रगटचि दिसत । प्रलय बोलिला निश्चित । वेदांतशास्त्रीं ॥२७॥ ब्रम्हप्रलय मांडेल जेथें । भूता- न्वय कैचा तेथें । म्हणोनियां सर्वब्रम्हांतें । नाश आहे ॥२८॥ अचलासि आणी चळण । निर्गुणास लावितां गुण । आकारास विचक्षण । मानतिना ॥ २९॥ जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नाशवंत । सर्वब्रम्ह हे मात । घडे कैंवी ॥३०॥ असो आतां हें बहुत । सर्व ब्रह्म नाशवंत । वेगळेपणास अंत । पाहणें कैंचें ॥ ३१ ॥ आतां जयास चेतवावें । तेंचि मायिक स्वभावें । तेथें चैतन्याच्या नांवें । नाश आला ॥ ३२ ॥ परिवारांविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्वतां । पदार्थांविण साक्षता । तेहि मिथ्या ॥ ३३ ॥ सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये । सगुण ब्रह्म निश्चयें । नाशवंत ॥ ३४ ॥ निर्गुण ऐसें जें नांव । त्या नांवास कैंचा ठाव । गुणेंविण गौरव । येईल कैंचें ॥ ३५ ॥ माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ । कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंचि ॥
१. विनाशी. २. अविनाशी. ३. पंचभूतांचा संबंध.
१६२ श्रीदासबोध. [ दशक ३६ ॥ ग्रामो नास्ति कुतः सीमां । जन्मैविण जीवात्मा । अद्वैतासि उपमा । द्वैताची ॥ ३७ ॥ मायेविरहित सत्ता । पदार्थाविण जाणता । अविद्येविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८ ॥ सत्ता चैतन्यता साक्षी । सर्वहि गुणां- चियेपाशीं । ठायींचे निर्गुण त्यासी । गुण कैंचे ॥ ३९ ॥ ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत । तोचि जाणावा अशाश्वत । निश्चयेंसी ॥ ४० ॥ निर्गुण- ब्रह्मासि संकेतें । नामें ठेविलीं बहुतें । तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१ ॥ आनंदाचा अनुभव । हाहि वृत्तीचाच भाव । तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२ ॥ अनिर्वाच्य याकारणें । संकेतवृत्तीच्या गुणें । तया संकेतास उणें । वृत्तीनें आणिले ॥ ४३ ॥ अनिर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती । निरूपाधी विश्रांती । योगियांची ॥ ४४ ॥ वस्तु जे कां निरूपाधी । तेचि सहजसमाधी । जेणें तुटे आधिब्याधी । भवदुःखाची ॥ ४५ ॥ जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत । सिद्धांत आणि वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६ ॥ असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम । अनु- भवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७ ॥ आपुलेनि अनुभवें । कल्पनेसी मोडावें । मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८ ॥ निर्विकल्पासि कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें । मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९ ॥ कल्पनेचें एक बरें । मोहरितांचें मोहेरें । स्वरूपीं घालितां भरे । निर्विकल्पीं ॥ ५० ॥ निर्विकल्पास कल्पितां । कल्पनेची नुरे वार्ता । निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१ ॥ पदार्थाऐसें ब्रम्ह नव्हे । म्हा तें हातीं धरुनि द्यावें । असो हें अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥ ५२ ॥ पुढें कथेचा अन्वये । केलाचि करूं निश्चये । जेणें अनुभवास ये । केवळ ब्रम्ह ॥ ५३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके चतुर्दशब्रह्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥३॥ ४. विमल ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रम्ह नभाहूनी निर्मळ । पाहतां तैसेंचि पोकळ । १. गांवच नाहीं तर शीव कशाची ? तद्वत् द्वैतच नाहीं, तर अद्वैत म्हणून तरी काय सांगावें ? २. एकरूपतेंत. ३. मनाच्या लयाची. ४. अंतर्बाह्य पीडा. ५. फिरवितांच फिरते. ६. मग. ७. संबंध. ८. आकाशाहून.
७ वा.] विमल ब्रह्म. १६३ अरूप १ आणि विशाल । मर्यादावेगळें ॥ १ ॥ एकवीस स्वर्ग सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्माण्डगोळ । ऐसें अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २ ॥ अनंत ब्रम्हांडाखालतें । अनंत ब्रम्हांडावरतें । तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३ ॥ जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी । तेणेंविण रिता प्राणी । एकहि नाहीं ॥ ४ ॥ जलचरांस जैसें जळ । बाह्य अभ्यंतरीं निखळ । तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रांसी ॥ ५ ॥ जळावेगळा ठाव आहे । ब्रह्मा- बाहेरि जातां न ये । म्हणोनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६ ॥ आका- शाबाहेरि पळों जातां । पुढें आकाशाचि तत्वतां । तैसा तया अनंता । अंतचि नाहीं ॥ ७ ॥ परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगाडिलें । अतिनिकट- पणीं चोरलें । सकळांसि जें ॥ ८ ॥ तयामध्येंचि असिजे । परी तयासि नेणिजे । उमजे भासे नुमजे । परब्रह्म तें ॥ ९ ॥ आकाशामध्यें आभाळ २ । तेणें आकाश वाटे डहुळ । परी तें मिथ्या निवळ । आकाशाचि असे ॥ १० ॥ न्याहाळ ३ देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांशीं । तैसें दृश्य ज्ञानि- यांशीं । मिथ्यारूप ॥ ११ ॥ मिथ्याचि परी आभासे । निद्रितासी स्वप्न जैसें । जागा झालिया आपैसें । बुझों लागे ॥ १२ ॥ तैसें आपुलेनि अनु- भवॆं । ज्ञानें जागृतीस यावें । मग मायिक स्वभावें । कळों लागे ॥ १३ ॥ आतां असो हें कुवाडें ४ । जें ब्रह्मांडा पैलीकडे । तेंचि आतां निवाडें । उमजोनि दावूं ॥ १४ ॥ ब्रह्म ब्रह्मांडों कालवलें । पदार्थमात्रासि व्यापूनि ठेलें । सर्वां- मध्यें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५ ॥ ब्रह्मामध्यें सृष्टि भासे । सृष्टीमध्यें ब्रह्म असे । अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६ ॥ अंशमात्रें सृष्टीभीतरीं । बाहेरि मर्यादा कोण करी । सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । मायील कैसें ॥ १७ ॥ अमृतीं ५ मध्यें आकाश । सगळें सांठवतां प्रयास । म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो ॥ १८ ॥ ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें । सर्वांत परी संचलें । संचलेपणें ॥ १९ ॥ पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंच- भूतातीत । पंकीं ६ आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २० ॥ ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे । परी दृष्टांतीं साहित्य ७ पेंडे ८ । विचारितां आ-
१. रूपरहित. २. परब्रह्मावरील भास, जग. ३. नजर. ४. कोडें. ५. तीर्थ ठेवण्याचें भांडें, त्यांत. ६. चिखलांत. ७. अलंकारशास्त्र. ८. अपुरतें होतें.
१६४ श्रीदासबोध. [ दशक काश ॥ २१ ॥ खंब्रह्म ऐसी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥ कालिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३ ॥ म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन । आढळ परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥ शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा । परंतु ते स्थिरावेना । वायूऐसी ॥ २५ ॥ असो ऐसी माया मायिक । शाश्वत तें ब्रम्ह एक । पाहों जातां अनेक । व्यापून असे ॥ २६ ॥ पृथ्वीसि भेदूनि राहे । परी तें ब्रम्ह कठीण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७ ॥ पृथ्वीहूनि मृदु जळ । जळाहूनि तो अनळ¹ । अनळाहूनि कोमल । वायु जाणावा ॥ २८ ॥ वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण । गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रम्ह जाणावें ॥ २९ ॥ वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें । उपमेरहित संचिलें । कठीण ना मृदु ॥ ३० ॥ पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें न नासे । जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१ ॥ तेजीं असे परी जळेना । पवनें² असे परी चलेना । गगनीं असे परी ढळेना । परब्रम्ह तें ॥ ३२ ॥ शरीरीं अवघें व्यापिलें । परी तें नाहीं आढळलें । जवळींच दुरा- वलें । नवल कैसें ॥ ३३ ॥ सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें राहणें घडे । बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४ ॥ तयामध्येंच आपण । सै- बाह्य³ तें जाण । दृश्यावेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५ ॥ कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंच तें कोंदाटलें । जैसें न दिसे आपुलें । आपणासि धन ॥ ३६ ॥ जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे । अनुभवें हें कुवांडें⁴ । उकलावें ॥ ३७ ॥ मागें पुढें आकाश । पदार्थैविण जो पैस⁵ । पृथ्वीविण भकांस⁶ । एकरूप ॥ ३८ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो नौथि- लाचि⁷ भ्रम । नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९ ॥ नभीं धू- म्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसें दावी वोडंबरें⁸ । माया देवी ॥ ४० ॥ ऐशी माया अशाश्वत । ब्रम्ह जाणावें शाश्वत । सर्वांठायीं सदोदित । भ- रलें असे ॥ ४१ ॥ पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमध्यें९ भरलें आहे । : १. अग्नि. २. वायूमध्यें. ३. आंत बाहेर. ४. कोंडें ५. अवकाश. ६. ओसाड. ७. नसलेला. ८. गारुड. ९ अक्षरांमध्ये.
७ वा. ] द्वैतकल्पनानिरसन. १६५ नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२ ॥ श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहतां । मना सबाह्य तत्वतां । परब्रम्ह तें ॥ ४३ ॥ चरणें चालतां मार्गीं । जें आढळेल सर्वांगीं । करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रम्ह ॥ ४४ ॥ असो इं- द्रियसमुदाय । तयामध्यें वर्तें सर्व । जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥ जें जवळींच असे । पाहों जातां न दिसे । न दिसोन बैसे । कांहीं एक ॥ ४६ ॥ जें अनुभवेंच जाणावें । सृष्टीचेनि अभावें । आपुलेनि स्वानुभवें । पाविजे ब्रम्ह ॥ ४७ ॥ ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे । अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया । ते एक जाणावी तुर्या । सर्वसाक्षणी ॥ ४९ ॥ साक्षित्व वृत्तीचें कारण । उन्मनीं ते निवृत्ती जाण । तेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५० ॥ जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे । विज्ञानवृत्ति मुरे । परब्रम्हीं ॥ ५१ ॥ ऐसें ब्रम्ह शाश्वत । जेथें कल्पनेसि अंत । योगिजनांचा एकांत । अनुभवें जाणावें ॥ ५२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तम- दशके विमलब्रम्हनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. द्वैतकल्पनानिरसन. श्रीगणेशाय नमः ॥ केवळ ब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें । आणि मायेचें लागलें । अनुसंधान ॥ १ ॥ ब्रह्म अंतरीं प्रकाशे । आणि मा- याही प्रत्यक्ष दिसे । आतां हें द्वैत निरसे । कवणेपरी ॥ २ ॥ तरी आतां सावधान । एकाग्र करूनियां मन । माया ब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३ ॥ सत्य ब्रम्हाचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प । ऐशिया द्वैताचा जल्प । मनचि करी ॥ ४ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया । ते एक जाणावी तुर्या । सर्व जाणे म्हणोनियां । सर्वसाक्षिणी ॥ ५ ॥ ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाण- पण । सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६ ॥ संकल्पविकल्पांची सृष्टी । झाली मनाचिये पोटीं । तें मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवण ॥ ७ ॥ साक्षित्व चतन्य सत्ता । हे गुण ब्रम्हाचिया माथां । आरोपिले जाण वृथा । मायागुणें १. दिसत नाहीं पण आहे. २. डोळ्यानें. ३. मनाच्या लयाची अवस्था. ४. तर्क. ५. सविकल्प समाधि.
१६६ श्रीदासबोध. [ दशक
॥ ८ ॥ घटमठाचेनि गुणें । त्रिविध¹ आकाश हें बोलणें । मायेचेनि खरेपणें । गुण ब्रम्हीं ॥ ९ ॥ जंव खरेपण मायेसी । तंवचि साक्षित्व ब्रम्हासी । माया- अविद्येचे निरासीं² । द्वैत कैंचें ॥ १० ॥ म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि झा- लिया उन्मन³ । मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ॥ ११ ॥ जयास द्वैत भासलें । तें मन उन्मन झालें । द्वैताद्वैताचें तुटलें । अनुसंधान ॥१२॥ एवं द्वैत आणि अद्वैत । होय वृत्तीचा संकेत । वृत्ति झालिया निवृत्त । द्वैत कैंचें ॥ १३ ॥ वृत्तिरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान । जेथें तुटे अनुसं- धान । मायाब्रम्हाचें ॥ १४ ॥ मायाब्रम्ह ऐसा हेत । मनें कल्पिला संकेत । ब्रम्ह कल्पनेरहित । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥ जें मनबुद्धि अगोचर । जें क- ल्पनेहूनि पर । तें अनुभवितों साचार । द्वैत कैंचें ॥ १६ ॥ द्वैत पाहतां ब्रम्ह नसे । ब्रम्ह पहातां द्वैत नासे । द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी ॥१७॥ क- ल्पना माया निवारी । कल्पना ब्रम्ह थाव⁴री । संशय धरी आणि वारी । तेहि कल्पना ॥ १८ ॥ कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान । ब्रम्हीं लावी अनुसंधान । तेहि कल्पना ॥ १९ ॥ कल्पना द्वैताची माता । कल्पना ज्ञा⁵सि तत्वता । बद्धता आणि मुक्तता । कल्पनागुणें ॥ २० ॥ कल्पना अं- तरीं सबळ । नसते दावी ब्रह्मगोळ । क्षणएकांत निर्मळ । स्वरूप कल्पी ॥ २१ ॥ क्षणएक धोका वाहे । क्षणएक स्थिर राहे । क्षणएक पाहे । वि- क्षित होउनी ॥ २२ ॥ क्षणएकांत उमजे । क्षणएक निर्बु⁶जे । नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३ ॥ कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचें फळ । कल्पना तेचि केवळ । मोक्षदात्री ॥ २४ ॥ असो ऐसी हे कल्पना । साधनें दे समाधाना । येन्हवीं हे पतना⁷ । मूळंचि कीं ॥ २५ ॥ म्हणोनि सर्वांचें मूळ । ते हे कल्पनाचि केवळ । इचें केलिया निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६ ॥ श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान । मिथ्या कल्पनेचें भान । उडोनि जाय ॥ २७ ॥ शुद्धब्रह्माचा निश्चय । करी कल्प- नेचा जय । निश्चिताथें संशय । तुटोनि जाय ॥२८॥ मिथ्या कल्पनेचें कोडें ।
१. घटानें मर्यादित, मठानें मर्यादित, व अमर्याद असें त्रिविध. २. निरसन झाल्यावर. ३. संकल्पविकल्परहित. ४. स्थापित करी. ५. ज्ञान. ६. समजत नाहींसें होतें. ७. नाशास कारण.
७ वा.] बद्धमुक्त. १६७ कैसें राहे साचापुढें । जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९ ॥ तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे । मग हें तुटे आपसें । द्वैतानु- संधान ॥ ३० ॥ कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें शर आंतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१ ॥ शुद्ध कल्पनेचें बळ । झालिया नासे सबळें । हेंचि वचन प्रांजळ । सावध ऐका ॥ ३२ ॥ शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण । स्वस्वरूपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३ ॥ सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचें निरसन । अद्वैत निश्चयाचें ज्ञान । तेंचि शुद्ध कल्पना ॥ ३४ ॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अ- शुद्ध तेचि प्रसिद्ध । सबळ जाणावी ॥ ३५ ॥ शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वै- ताचा निश्चितार्थ । आणि सबळ ते व्यर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६ ॥ अद्वैत क- ल्पना प्रकाशे । तेच क्षणीं द्वैत नासे । द्वैतासरसी निरसे । सबळ कल्पना ॥ ३७ ॥ कल्पनेनें कल्पना सरे । ऐसें जाणावें चतुरें । सबळ गेलियानंतरें । शुद्ध उरली ॥ ३८ ॥ शुद्ध कल्पनेचें रूप । तेंचि कल्पी स्वरूप । कल्पितां तद्रूप । होय आपण ॥ ३९ ॥ कल्पनेस मिथ्यात्व आलें । सहजचि तद्रूप झालें । आत्मनिश्चयें नाशिलें । कल्पनेसी ॥ ४० ॥ जेचि क्षणीं निश्चय चले । तेचि क्षणीं द्वैत उँफाळे । जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१ ॥ तैसें ज्ञान होतां मलिन । अज्ञान प्रबळे जाण । याकारणें श्रवण । अखंड असावें ॥ ४२ ॥ आतां असो हें बोलणें झालें । आशंका फेहूँ एका बोलें । जयास अद्वैत भासलें । तें तूं नव्हेंसी सर्वथॉ ॥ ४३ ॥ मार्गील आशंका फिटली । इतुकेन हे कथा संपली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके द्वैतकल्पनानिरसननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. बद्धमुक्त. श्रीगणेशाय नमः ॥ अद्वैत ब्रह्म निरूपिलें । जें कल्पनारहित संचलें । क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १ ॥ परी म्यां तदाकार व्हावें । १. जगताचा भास. २. तुटून पडता. ३. शबल, औपाधिक. ४. उसळतें. ५. कल्पनेला अद्वैत भासतें, ती कल्पना कांहीं स्वरूप नव्हें.
१६८ श्रीदासबोध. [ दशक ब्रम्हचि होऊन असावें । पुनः संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २ ॥ कल्पनेरहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख । म्हणोनि तेंचिएक । होऊन असावें ॥ ३ ॥ बम्हचि होईजे श्रवणें । पुन्हा वृत्तीवरी लागे येणें । ऐसें सदा येणें । चुकेना कीं ॥ ४ ॥ मनें अंतरीं जावें । क्षणएक ब्रम्हचि व्हावें । पुन्हा तेथून कोसळावें । वृत्तींवरी¹ मागुती ॥ ५ ॥ ²ऐत्यावृत्ति सैरावैरा । किती करूं येरझारा । पायीं लावूनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६ ॥ उपदेश- काळीं तदाकार । होतां पडे हें शरीर । अथवा नेणे आपपर । ऐसें झालें पाहिजे ॥ ७ ॥ ऐसें नसतां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें । ब्रम्ह हो- ऊन संसार करणें । हेंहि विपरीत दिसे ॥ ८ ॥ जो स्वयें ब्रम्हचि झाला । तो मागुता कैसा आला । ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वाटे ॥ ९ ॥ ब्रम्ह होऊन जावें । कां ते संसारींच असावें । दोहींकडे भरंगळावें । किती म्हणोनी ॥ १० ॥ निरूपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे । मागुता कामक्रोध खवळे । ब्रम्हरूपासैं³ ॥ ११ ॥ ऐसा कैसा ब्रम्ह झाला । दोहींकडे अंतरला । वोडगस्तपणींच गेला । संसार त्याचा ॥ १२ ॥ घेतां ब्रम्हसुखाची गोडी । संसारिक मागें वोढी । संसार करितां आवडी । ब्रम्हीं उपजे ॥ १३ ॥ ब्रम्हसुख नेलें संसारें । संसार नेला ज्ञानद्वारें । दोन्ही अपुरीं पुरें । एकहि नाहीं ॥ १४ ॥ याकारणें माझें चित्त । चंचळ झालें दुश्चित । याकारणें निश्चितार्थ । एकहि नाहीं ॥ १५ ॥ ऐसा श्रोता करी विनंती । आतां राहावें कोणे रीती । म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६ ॥ आतां याचें प्रत्युत्तर । वक्ता देईल सुंदर । श्रोतीं व्हावें निरुत्तर । क्षणएक आतां ॥ १७ ॥ ब्रह्मचि होऊन जे पडिले । तेचि मुक्तिपदास गेले । येर ते काय बुडाले । व्यासादिक ॥ १८ ॥ श्रोता विनंती करी पुढती । शुको मुक्तो वामदेवो वा⁴ हे श्रुती । दोघेचि मुक्त आदि अंतीं । बोलत असे ॥ १९ ॥ वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव । वेदवचनीं अभावैं५ । कैसा धरा- वा ॥ २० ॥ ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्युत्तरें । दोघेचि मुक्त अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१ ॥ वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृ- १. देहभानावर. २. पुन्हा पुन्हा. ३. ब्रम्हरूप झालेल्या मला. ४. 'शुक मुक्त किंवा वामदेव मुक्त.' ५. अविश्वास.
७ वा.] बद्धमुक्त. १६९ ष्टीवरी । ऐसें बोलतां उरी १ । कोणास आहे ॥ २२ ॥ बहु ऋषी बहु मुनी । सिद्ध योगी आत्मज्ञानी । झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३ ॥ श्लोक ॥ प्रह्लादनारदपराशरपुंडरीकव्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ॥ रुक्मांगदार्जुनवसिष्ठबिभीषणादीन्पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १ ॥ कविर्हरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ॥ आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभा- जनः ॥ २ ॥ यांहीं वेगळे थोर थोर । ब्रम्हा विष्णु महेश्वर । आदिकरून दिगंबर २ । विदेहादिकें ३ ॥ २४ ॥ शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच बुडाले । या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५ ॥ तरी वेद कैसा बो- लिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला । ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर ॥ २६ ॥ वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष । साधु आणि व्युत्पन्न दक्ष । त्यास हें न माने ॥ २७ ॥ तथापि हें जरी मानलें । तरी वेदसामर्थ्य बुडालें । वेदाचोनि उद्धारिलें । न वचे कोणा ॥ २८ ॥ वेदांअंगीं सामर्थ्य नसे । जरी या वेदासि कोण पुसे । म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे । जन उद्धरावया ॥ २९ ॥ वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी । म्हणोनि वेदीं सामर्थ्यांसी । काय उणें ॥ ३० ॥ वेद शास्त्र पुराण । भाग्यें झालिया श्रवण । तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१ ॥ श्लोक अ- थवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपादें ४ । श्रवण होतां एक शब्द । नाना दोष जाती ॥ ३२ ॥ वेदशास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या अर्थीं ५ । अगाध म- हिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३ ॥ एकाक्षर होतां श्रवण । तात्काळां चि होइजे पावन । ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४ ॥ दोहीं- वेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे । असें हें जाणिजे चतुरें । येर- गाथागोवी ॥ ३५ ॥ वेदशास्त्रें पुराणें । कैसीं होती अप्रमाणें । दोघांवांचूनि तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६ ॥ म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक मुक्त झाला । शुक तोहि अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७ ॥ शुक मुक्त ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण । परी तो नव्हता अचेतन ६ । ब्रम्हाकार ॥ ३८ ॥ अचेतन ब्रम्हाकार । असता शुक योगीश्वर । तरी सारासार विचार ।
१. बाकी कोण उरलें ? मुक्त कोणीच नाहीं असें झालें. २. संन्यासी. ३. जन- कादिक. ४. श्लोकाचा एक चरण. ५. ठिकाणीं ६. जड, सुस्त.
१७० श्रीदासबोध. [ दशक बोलणें न घडे ॥ ३९॥ जो ब्रम्हाकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला । शुक भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४० ॥ निरुपण हें सारासार । बोलिला पाहिजे विचार । धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१ ॥ क्षणएक ब्रम्ह- चि व्हावें । क्षणएक दृश्य धांडोळावें । नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वांसी ॥ ४२ ॥ असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण । तया अंगीं बद्धपण । लावूं नये कीं ॥ ४३ ॥ म्हणोनि बोलतां चालतां । निश्चेष्टित पडिलें नसतां । मुक्ति लाभे सायुज्यता । सद्गुरुबोधें ॥ ४४ ॥ एक मुक्त एक नित्यमुक्त । एक जाणावे जीवन्मुक्त । एक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५ ॥ सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेह²मुक्त । दोहीं वेगळे नित्यमुक्त । योगीश्वर जाणावे ॥ ४६ ॥ स्वरूपबोधें स्तब्ध³ता । ते जाणावी तटस्थता । तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७ ॥ येथें अनुभवासीच कारण । येर सर्व निष्कारण । तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८ ॥ कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला । तेणें शब्दें जाजावला । हें तों घडेना ॥ ४९ ॥ स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह । बद्ध मुक्त ऐसा भाव । देहाचकडे ॥ ५० ॥ देहबुद्धी धरून चित्तीं । मुक्त ब्रम्हादिक नव्हती । तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१ ॥ मुक्तपणें येणेंचि बद्ध । मुक्त बद्ध ह अबद्ध⁴ । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२ ॥ मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा । देहबुद्धीची अर्गळा⁵ । स्वरूपीं न संटे⁶ ॥ ५३ ॥ मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला । मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४ ॥ जयास बांधावें तें वावें । तेथें कैंचा मुक्तभाव । पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५ ॥ श्लोक ॥ बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ॥ गुणस्य मायामूल- त्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १ ॥ टीका ॥ तत्वज्ञाता परम शुद्ध । तया- सि नाहीं मुक्त बद्ध । मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६ ॥ जेथें नाम- रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे । मुक्तबद्ध हें विसरे । विसरपणेंसीं १. देहभानावर असणारे; व्यवहार करणारे. २. देहभानरहित, समाधिनिमग्न. ३. इंद्रियगति थांबणें. ४. गैरशिस्त. ५. अडथळा. ६. टिकत नाहीं. ७. भ्रामक. ८. त्रिगुणांचा विचार.