सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
सार्थ तुकारामगाथा ३८९ शब्दार्थ व टीपा :- पार पायीं-पैलतीरावर पोचवितो. अर्थ :- आपल्या मुलाचे वर्म नेमके कोणते आहे, हे त्याची आई बरोबर ओळखत असते. त्याचे जे सुख किंवा दुख असेल ते तिला सर्व माहीत असते. १ एखाद्या आंधळ्यास जो आधार देतो त्यालाच पुढल्या पाऊलवाटेचा वा संकटांचा विचार करावा लागतो. २ शरण आलेल्यास ज्याने अभय देऊन पाठीशी घातले आहे, तोच त्याच्या रक्षणाविषयी जाणतेपणाने जाणीत असतो. ३ पाण्यात बुडणाऱ्यास काढण्यासाठी ज्याने कास घातली आहे, त्याला त्याचे काही वाटत नाही. फारसे प्रयत्नही करावे लागत नाहीत. हा पोहणारा मनुष्य ह्या बुडणाऱ्या इसमास सहजा- सहजी पैलतीरावर नेऊन पोचवितो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा आपला हा जीव विठ्ठलाच्या हातांत दिल्यावर त्याचे कार्य तो रक्षणाचे करणारच. ५ ८२० नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥ १ ॥ खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघेंच जाये एका घांसें ॥ २ ॥ जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें न मना¹ विषाद । निंबेविण व्याध तुटों नये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मासो-माशी, जोडी-प्राप्ती, व्याध-रोग, न मना-मानू नका. अर्थ - विधिनिषेधांच्या कचाट्यात तुमचे मन गुंतवू नका केवळ पांडुरंगाचे स्मरण सतत करा, म्हणजे झाले १ खाऊन झालेल्या अन्नाच्या शेवटच्या घासाच्या वेळी त्यात माशी पडली होती असे बोलू नये. केवळ एका घासासाठी मग सर्वच कल्पनेने ओकावे लागते. २ कोणत्याही चांगल्या गोष्टीची प्राप्ती सहजासहजी होईल एखाद्या वेळेस; पण त्याचे रक्षण मात्र नीट काळजीपूर्वक करावे लागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या बोलण्याचा राग मानू नका तुम्ही कोणी. कडू लिंबाच्या रसातून औषध घेतल्यावाचून शरीरात मुरलेला रोग दूर होणार तरी कसा ? ४ ८२१ नको होऊं देऊं भावों अभावना । याचि नांवें जाणा बहु दोष ॥ १ ॥ मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्या उसर लाभ नाड ॥ २ ॥ उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरू तैसा फळे त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जिव्हाळ्या-सुपीक जमीन, उसर-नापीक जमीन, न -तोटा. अर्थ :- देवा, माझ्या मनात तुमच्याविषयी जो भक्तिभावना आहे, तीत अभावना म्हणजे विपरीत भावना निर्माण करू नका. कारण यामुळे फार मोठा दोष निर्माण होईल १ जर पुष्कळ पाऊस पडला तर सुपीक जमिनीचा फायदा होईल व नापीक जमिनीचा तोटाच होईल. २ कल्पतरुच्या छायेखाली बसून चांगली कल्पना केल्यास चांगले फळ मिळेल. वाईट कल्पना केली तर वाईट फळ मिळेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आपले आयुष्य फार थोडे असल्यामुळे जेणेकरून हित होईल, असे तुम्ही नेहमी पाहात जा. ४ ८२२ त्याग तंव मज न यजतां केला । कांहींच विठ्ठला मनांतूनि ॥ १ ॥ भागलिया आला उपग सहज । न धरितां फाज जालें मनीं ॥ २ ॥ देह जड जालें ऋणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥ ३ ॥ तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न यजता-ध्यानात न येताच. १ माना.
३९० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- देवा, विठ्ठला, प्रपंचातील गोष्टींचा त्याग माझ्या मनातून सहजच, ध्यानात न येताही होत राहिला. १ संसाराच्या त्रासाने मी दमलेलो असल्यामुळे त्याग करावा असा भाव मनात येण्यापूर्वीच सहजासहजीच त्याग घडला. २ संसाराच्या भारामुळे, ऋणाच्या ओझ्यामुळे, माझा देह फारच जड झाला होता; आणि या संसा- राच्या तापामुळे मी फारच कासावीस झालो होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण आता मात्र परमार्थाच्या मार्गाविषयीचा आळस माझ्या मनातून पुरता गेला व असंख्य अशा संसारापासून निर्माण होणाऱ्या दोषांपासून मी मुक्त झालो. ४ ८२३ मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणवियाचे वाणी रवलाहें ॥ १ ॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावले नरदेह ॥ २ ॥ ओटोन्ऱ्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि केंवाडें स्वहिताचें ॥ ३ ॥ नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥ ४ ॥ तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाणी-धंदा, फावलें-प्राप्त झाले, केंवाडें-निश्चय. अर्थ :- शेतीचा धंदा करणाऱ्या कुणब्यास किंवा शेतकऱ्यास वेळ आली तर घरातील प्रिय माणसाचा मृत्यू झाला तरी, ते प्रेत तसेच झाकून ठेवून प्रथम शेत पेरण्याचे काम पाहावे लागते. १ त्याप्रमाणे तुम्ही आपले स्वतःचे हित साधावे. ज्यांना हे मानवी शरीर प्राप्त झाले आहे, त्यांनी तरी या हिताचा विचार करावा. २ धान्य पेरताना शेतकऱ्याच्या ओटीवर जे धान्य असते, त्याच्यापेक्षा पाभरीवरील मुठीत थोडे असले तरी ते जास्त समजायला हवे; कारण त्यातूनच अनेक पटींनी धान्य निर्माण होणारे असते; वाढणारे असते. त्याचप्रमाणे वाढ- णाऱ्या स्वहिताचा तुम्ही विचार निश्चयाने करावा. ३ कारण काळाची सत्ता काही आपल्या हातात नसते. जाणत्या माणसाने हे जाणून जन्ममृत्यूचा गुंता सोडवावा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी ही सूचना तुम्हांस केली आहे. जो या मृत्युलोकी शहाणा असेल त्यानेच हिचा विचार करावा. ५ ८२४ राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥ १ ॥ कोणी कोणाएथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ २ ॥ शृंगारि¹एलेंही तगोंपेत वरि । उमटे लौकरि जैसें तैसें ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खूण साम्या² येते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सांगातें-बरोबर, तगोंपेत-टिकून राहात्त. अर्थ :- जेथील मार्गाने राजा चाललेला असतो, त्याच मार्गाने त्याचे सर्व वैभव येत असते. त्या छत्रचामर- धारीना किंवा हत्तीघोड्यांना हे काही सांगावे लागत नाही. १ या जगात कोणीही कुणास विनाकारण मान देत नाही देवाच्या कृपेशिवाय असा मानही कुणाला मिळणार नाही २ एखाद्या वस्तूस वरवर शृंगारून टाकिले तरी, ती शोभा काही कायमची टिकून राहात नाही जे मूळचे स्वरूप असेल तेच लौकर बाहेर पडते. ३ तुकाराम महा- राज म्हणतात, ज्याच्या हृदयामध्ये नारायणाने निवास केला आहे, त्याच्यावर सर्वत्र समत्वाने पाहण्याची दृष्टी येऊन त्याच्यावर कृपाच होते. त्याचे समत्वदर्शन हीच त्याच्या कृपेची खूण होय ४ ८२५ वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आविर्भाव² ॥ १ ॥ शिकविले काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ २ ॥ सांडिले तें नाहीं घेत भेळवितां । म्हणऊनि लाता मार्गे सारी ॥ ३ ॥ तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥ ४ ॥ १ दिसो, २ आनुर्भाव.
सार्थ तुकारामगाथा ३९१ शब्दार्थ व टीपा :- आणिकांच्या-दुसऱ्याच्या, मेळवितां-भेटविल्यावर. अर्थ :- एखादे वासरु पुढे पळू लागले तर, त्याची आई (गाय) त्याच्यापाठीमागे धावत जाते कारण या वासराविषयीचा प्रेमभाव त्या गाईच्यामध्ये सहजच निर्माण झालेला असतो. १ असे हे प्रेम शिकवून कधी उपयोगास येईल काय ? मनातील गूढ प्रेमाचा तंतूच दुसऱ्याच्या मनास ओढीत असतो. २ पुढे वासरू मोठे झाले की गाय मग त्यास सोडून देते; मग पुनः तिला जरी ते बळेच भेटविले, तरी ती काही त्याला प्रेमपान्हा पाजीत नाही, उलट लाथा मारून ती त्याला दूरच करील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीचे प्रेम आग्रह करून निर्माण होत नाही. अगचा अनुभवच ते बोलून दाखवीत असते. ४ ८२६ देवाच्या संबंधें विश्वचि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥ १ ॥ आहाघ हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनौं देखें सामावलें ॥ २ ॥ आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरौँ तेणें न्यायें ॥ ३ ॥ तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभाचि पुढती विशेषेता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाघ-व्यर्थ, उगाच. अर्थ :- एकदा देवाचा संबंध आल्यावर मग सर्वच विश्वच आपले सोयरे बनून राहते आणि मग परस्परांच्या आंतरिक नात्याची सूत्रे एकमेकांना ओढीत राहतात. १ असे हे विश्वात्मक प्रेम उगाच वरवरचे व पटकन वीट येणारे नसते. या प्रेमात जीव स्वत चे जे जीवन परमेश्वरस्वरूप त्यात सामावून गेलेला असतो. २ या प्रेमाचे लक्षणच असे असते की, इतरांचे सुखदुःख याच्या अत करणात उमटते व याच न्यायाने याला एकाला झालेले दुख इतरत्र उमटून राहते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे शुद्ध स्वरूपाचा एकात्मभाव अंतःकरणात दृढ झालेला असल्यामुळे त्याची शोभा उत्तरोत्तर वाढीसच लागलेली असते. ४ ८२७ अवघा वेंचलौं इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥ १ ॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ २ ॥ कायावाचामनें तोचि निजध्यास । एथें जालों ओस भक्तिभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेचलों-खर्च झाले, धावणे-रक्षण. अर्थ :-देवा, या इंद्रियांच्याच ओढीमुळे माझे सर्व आयुष्य खर्च झाले. याविषयी जे ज्या ज्या वेळी घडले, ते ते सर्व मी तुम्हांस सांगितले आहे. १ देवा, आपल्याला हा विचार माहीत असावा म्हणून सांगून माझ्यावरचा भार मी कमी केला आहे. २ माझ्या शरीराने, वाणीने, मनाने विषयांचा ध्यास एकसारखा घेतल्यामुळे मी भक्ति- भावरहित होऊन बसलो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, नारायणा, तुम्हांस जर माझे रक्षण करावयाचे असेल तर, माझा सांभाळ आताच करावा. ४ ८२८ राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपटो ॥ १ ॥ फोडकंडुनि घरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ २ ॥ होईल येणें कळसा आलें । स्थिरावले अंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे गोजिरिया । विठोया पायां पडों द्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- लंपटो-जडून राहो, कळसा आलें-परिपूर्ण झाले. अर्थ :- आता श्रीविठ्ठलाचे हेच ध्यान माझ्यासमोर स्थिर व्हावे. यावरच माझे डोळे व मन जडून राहावेत. १ या पांडुरंगाला मी आता माझ्या हृदयात कोंडून ठेवीन व देहभावाच्या प्रेमाने मी याला ओवाळीन. २ याप्रमाणे
३९२ सार्थ तुकारामगाथा विठ्ठलाचे हे एक ध्यान हृदयात स्थिर झाले म्हणजे, सर्व परिपूर्ण झाले असे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, गोजिरवाण्या दिसणाऱ्या विठोबा, मला तुमच्या पाया पडू द्यांत, ४ ८२९ आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तो आपणापें यत्न बरा ॥ १ ॥ दास्यत्वे दाखिले धन्याचें भांडार । तोतो नव्हे सार एथुनिया ॥ २ ॥ उपायाने सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आले ॥ ३ ॥ तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचनचि फरी बैसोनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दीपे-दिव्याने, सोस-इंद्रियसुखाची हौस अर्थ - कोणत्याही पदार्थांचा आदी, मध्य, अंत काळोखात दिव्यानेच स्पष्ट होतो त्यामुळे अशा या दिव्या- च्याच उपयोगाचा आश्रय करावा हे बरे १ दास्यत्वामुळेच धन्याचे भांडार दृष्टीत पडते ही वृत्ती जर अंगी बाणली नाही, तर मात्र ते भांडार दृष्टीस पडणार नाही २ या ईश्वराच्या प्रेमाच्या उपायाने इंद्रियसुखाची हौस सर्व संपली आणि या प्रभूच्या प्रेमाचीच सत्ता अंगी बाणून राहिली ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमची दृष्टी सर्वांच्यावर सारखी असते आणि बसल्याबसल्याच आम्ही सर्वांना आज्ञा करीत असतो ४ ८३० साटविले वाण । पैस घातला दुकान ॥ १ ॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥ २ ॥ निवडिले साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥ ३ ॥ तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाण-माल, पैस-ऐसपैस, मोठे अर्थ - भक्तीच्या नाना प्रकाराचा माल मी माझ्या दुकानात भरलेला आहे मी दुकान चांगले ऐसपैस घातले आहे १ जे कुणाला ज्या वेळी पाहिजे, ते त्याने सागावे सर्व काही जवळच येथे तयार आहे २ उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा प्रकाराचा खराखुरा माल निवडून आम्ही ठेविला आहे ३ तुकारामच या दुकानावर बसून जो ज्या भावाने, वृत्तीने मागणी करील त्याप्रमाणे तो मालाचा पुरवठा करीत आहे ४ विवरण - तुकारामबुवा धंद्याने वाणी होते हे प्रसिद्ध आहे व्यापार करावा, थोडी सावकारकीही करावी, दुकानदारी चालवावी, हा त्यांचा धंदा होता याच धंद्यात पुढे तूट आली, दुष्काळामुळे द्रव्य संपून गेले, दुकानाच दिवाळे निघाले, वैराग्यशील वृत्ती मूळचीच ती अधिक परमात्मप्रवण होऊन हरिभजनात दङ्ग झाली भामनाथाच्या डोंगरावर वृक्षवल्लीच्या सहवासात रममाण झाली ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व गीता याच्या पारायणांनी व नामस्मरणाच्या सतत संगतीने बुवांची वृत्ती उल्हसित व प्रसन्न झाली नामसंकीर्तन व भजन हा सोपा माग हाताशी आला. नामदेवाकडून कवित्वाची प्रेरणा झाली सद्गुरुनाथांनी कृपा केली तुकोबाच्या मुखातून प्रसादपूर्ण अशी अभंग वाणी स्रवू लागली त्याच्या अभंगवाणीत काव्यगुणांचे सर्वोत्तम दर्शन होत हे खरेच परंतु परमेश्वराशी प्रेमपूर्वक कलह करीत असताना, आपला मुद्दा स्पष्ट करताना एखादा सिद्धान्त सांगताना बुवा कधी उदाहरण म्हणून कधी रूपक म्हणून आपल्या धंद्याचा अथवा व्यवसायाचा उपयोग मोठ्या चातुर्याने व समर्पक रीतीने करतात 'फोडिले भांडार धन्याचा हा माल' ही प्रसिद्ध ओळ (क्र ६९६ ) आपण पाहिलीच आहे याखेरीज अनेक ओळीत तुकारामबुवा आपल्या व्यापाराच्या, दुकानदारीच्या व्यवसायाचा मोठ्या गमतीने पण समर्पक रीतीने उल्लेख करितात 'येथ हातीं येच हातों । वाधा गांठीं पारखून', 'उतरला कसीं खरा माल', 'सवंग जाले सवंग जाले । घरा आले बदरोचे', 'पंढरी चोहोटा घातले दुकान', 'नाम घ्यारे कोणी फुका । भाव सांगतसे तुका', 'उधार घ्यारे उधार घ्यारे । अवघे मारे जातीचे', 'दुबळा तुका मावहीन । उधार देय घेतला ऋण', 'माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही', 'मुद्दल
६. वैराग्य व आत्म-निवेदन
सार्थ तुकारामगाथा ३९३ जतन झाले । मग तामाचे काय आलें ?', 'प्रेम व्याज देई हरी । माझा हिशेब लवकरी करी' यासारख्या अनेक वचनांतून तुकोबांनी व्यापारी वृत्तीला वरवर तरी विसंगत वाटणाऱ्या परमार्थवृत्तीशी भावपूर्ण अंत करणाने रंगविले आहे ८३१ लागलिया मुख स्तना । घाली पान्हा माउली ॥ १ ॥ उभयता आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ २ ॥ मेळविता अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥ ३ ॥ तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-हौस, जड-ओझे अर्थ - या विठाईमाउलीच्या स्तनास मुख लावताच तिच्या प्रेमाला पान्हा फुटतो १ या ठिकाणी माउली व तिचे मूल या उभयतांच्या लाडास व कौतुकास हौसेचे भरते येते २ अंग अंगाला मिळवून, मुलाला पोटाशी धरून प्रेमाचा रंग बहारीने वाढतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या प्रकारे आईच्या शिरावर मुलाची फार मोठी जबाबदारी असते याच्या कल्याणाचे फार मोठे ओझे तिला वागवावे लागते ४ ८३२ अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठािले । मागें होत आले शिष्टाचार ॥ १ ॥ दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा । हा तो नव्हे बरा सत्यवाद ॥ २ ॥ मद्य आणि मधु एकरासी मावे । तरि का ते खावे आधारे त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदामेद दृष्टिन्यायैं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - एकरासी-एकाच वर्गातील अर्थ - यापूर्वी अवगुणाची अथवा दुर्गुणाची प्रतिष्ठा बळच कुणीही केलेली नाही पूर्वोपासून चांगल्या आचाराचेच पालन होत आले आहे १ अशी स्थिती असताना उगाच दुबळ्या माणसाच्या नावाने डांगोरा पिटावा, हे काही ठीक नाही ही गोष्ट सत्यालाही धरून नाही २ मद्य व मध या वस्तू एकाच वर्गातील असल्या तरी, मद्याचे सेवन मधाच्या आधाराने करणे इष्ट आहे काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या कृपेने मेघ- वृष्टीप्रमाणे मला उपदेशाचा उच्छिष्ट प्रसाद मिळालेला असल्याने, त्यायोगे गुण व अवगुण याची अथवा भेद व अभेद याची निवड मी करू शकतो ४ ८३३ मूर्ती भगवंत । हा तो जाणतों संकेत ॥ १ ॥ भारी मोकलितो बाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ २ ॥ करावा उपदेश । निवडोनि तरि दोष ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे । चुकता आडराने कांटे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोकलितों-सोडतो अर्थ - सर्व भूतमात्रांमध्ये भगवंताचाच अंश भरून राहिला आहे, हे तर मी जाणतो १ म्हणूनच मी शब्दरूपाचे तीक्ष्ण बाण सोडीत असतो या बाणाचा गुण ज्याचा त्यास बरोबर समजतो २ दोष वगळून योग्य तो उपदेश करावा, हेच मी जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नीट सरळ मार्ग सोडून जर आडवाटेने गेलात तर पायांना काटे टोचतील मात्र ४ ८३४ आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥ १ ॥ कासयाचा धाक एकाच्या निरोपे । काय व्हावे कोपें जगाचिया ॥ २ ॥ तु गा ५०
३९४ सार्थ तुकारामगाथा अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नीत-नीतीचा विचार, विकरा-विक्री अर्थ - वाट चुकलेल्या जगास काही नीतिविचार सागावा, हेच आम्हास कौतुकाचे आहे जे कोणी वागायला चुकतील, त्यांची फजिती करावी हेच आम्ही पाहतो १ त्या एका देवाचा निरोप नीटपणे लोकांना सांगितला तर त्यात कसली बाधा आहे ? यासाठी लोक कितीही रागावले तरी काय होणार आहे ? २ या आमच्या भक्तिमार्गात रामनामाचे बाण सुटत असल्यामुळे येथे अविद्येस थाराच मिळत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, येथे खरा- खुरा उपदेश असेल त्याचीच विक्री होत असून खोट्या प्रकारचे येथे काही चालत नाही ४ ८३५ दर्पणासी १नकटें लाजे । शुद्ध बिंब देखोनि ॥ १ ॥ ऐसे अवगुणाच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ २ ॥ अधळयास काय हिरा । गाराचि तो सारिखा ॥ ३ ॥ तुका म्हणे भुके सुने । ठाया नेणे ठाव तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दर्पणासी-आरशाला नकटें-नकटा नावाचा, सुदें-चांगले, सुनें-कुत्रे अर्थ - समोर आरशात तोंड पाहून नकटा मनुष्य लाजतो व चांगला आरसा असला तरी तो त्या आरशावरच चिडतो १ याप्रमाणे जो अवगुणाच्या बाधेने पीडलेला आहे, त्याला जे जे चांगले आहे, ते ते सर्व विपरीतच दिसते २ आंधळ्याला हिरा दाखवून काय उपयोग ? तो त्याला गारेप्रमाणेच वाटणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे उचित, अनुचित न पाहता कुत्रे नुसते भुकतच राहते ४ ८३६ नायडे तरि का येतील हे भाड । घेउनिया तोंड काळें येथें ॥ १ ॥ नासोनिया जाय रस यासगती । खळाचे पंगती नारायणा ॥ २ ॥ तोंडावाटा नर्क काढी अमगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनैं ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं सताची मर्यादा । निंदे तोचि निंदा मायझावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भाड-भांडखोर लोक, खळाचे-दुष्टाच अर्थ - या भांडखोर माणसाना आमचा भक्तिमार्ग जर पसंत नाही, तर मग पुन पुन काळे तोड दाख- विण्यासाठी हे आमच्याकडे येतात तरी कशाला ? १ नारायणा, या दुष्ट लोकांच्या संगतीने व पंगतीने आमच्या प्रभुत्रेमाचा सर्व रंग बिघडून जातो ना ? २ हे दुष्ट लोक आपल्या मुखातून अमगल अशी वाईट वचने काढतात व कुत्र्याप्रमाणे चांगल्या अन्नाला शिवून विटाळ पसरवितात ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला सताची मर्यादा राखता येत नाही, मान ठेवता येत नाही, जो त्याची निंदा करतो, तो अति दुष्ट समजावा ४ ८३७ लेकरा आइति पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥ १ ॥ त्यापरि आमचा जालासे साभाळ । देखिलाचि काळ नाहीं आड ॥ २ ॥ भुकेचे सनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥ ३ ॥ आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आइतें-आयत अर्थ - पित्याने जन्मभर जे जे साठविलेले असते, ते आयतेच उभे करून तो मुलासमोर ठेवतो सर्व सपत्ती त्याने जो मिळवलेली असते, ती तो त्याच्या स्वाधीन करतो १ त्याचप्रमाणे या देवाने आमचा साभाळ केलेला असल्याने, आम्ही काळाला कधी पाहिलेच नाही २ भूक लागली की, प्रेमाचे स्तनपान द्यायला आई जवळच उभी १ नकटें
आहे नाना उपाय करण्याची चिंता आम्हास काही करावी लागत नाही ३ हा तुकाराम त्या पांडुरंगास आळवीत भवमदीच्या एका तीरावर उभा आहे, असे पाहून पाडुरंगाने त्याला वाचविण्यासाठी नदीत उडीच टाकलेली आहे ४ ८३८ शुद्ध चर्या हेचि संताचे पूजन । लागतचि धन नाही वित्त ॥ १ ॥ सगुणाचे सोई सगुण विधाती । आपणचि येती खोजवीत ॥ २ ॥ कीर्तनींचि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणे वास सन्निधता ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म सांगतो सबगें । मन लावा मार्गे स्वहिताच्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चर्या-दिनक्रम आचार, खोजवीत-शोधीत, वोरस-प्रसाद अर्थ - आपले आचारविचार व रोजचा कार्यक्रम शुद्ध ठेवणे हेच खरे म्हणने संताचे पूजन आहे आणखी काही धन किंवा संपत्ती यासाठी लागत नाही १ या श्रीहरीच्या सगुण रूपाच्या प्राप्तीमुळे हे सगुण रूपच आपण होऊन आपल्या भक्ताला शोधीत येत असते २ हा श्रीहरी दूर असला तरी कीर्तनाच्या वेळी याच्या कृपेचा रस किंवा प्रसाद प्राप्त होतो व त्याची जवळीक जाणवते ३ तुकाराम महाराज म्हणतात मी हे सोपे वर्म तुम्हास सांगत आहे की, तुम्ही आपले मन स्वतःच्या हिताकडे लावा ४ ८३९ जीवींचे जाणावे या नावे आवडी । हेकड ते ओढी अमंगळ ॥ १ ॥ चित्ताच्या संकोचे काहींच न घडे । अतिशय वेडे चार तेचि ॥ २ ॥ काळाविण काहीं नाहीं रुची येत । करुनि संकेत ठेवियेला ॥ ३ ॥ तुका म्हणे कळे वचर्ने चाचणी । काय बोलवूनि वेळोवेळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम हेकड-हेकट हट्टी अर्थ - आपल्या मानवी जीवनाचा हेतू जाणावा यालाच प्रेम हे नाव आहे पण जे हट्टी असतात त्याची ओढ मात्र जे अपवित्र आहे त्याकडेच असते १ चित अप्रसन्न व संकोची झाल्यास काहीच समजणार नाही की हातून होणार नाही अतिशय वेडे असणारे चार गान हातून घडतील २ पण योग्य काळाशिवाय कोणतीही गोष्ट एकदम समजत नाही, माप होत नाही असा जणु जुनाच संकेत आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, याची चाचणी शब्दांनीच मधून मधून होत असते या सबंधी पुन पुन बोलण्याने काय होणार आहे ? ४ ८४० कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥ १ ॥ रंगले तें अगीं दावी । विष देयवी आसडे ॥ २ ॥ धनसोसे लागे वेड । ते बडबड शमेना ॥ ३ ॥ तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चवी- मर्यादा रीत, आसडे-आचके वेसनें-व्यसन अर्थ - कामाने आसक्त झालेला मनुष्य व्यवहाराच्या सर्व मर्यादा सोडतो आणि तोंडात जे येईल ते बरळत असतो १ जे अंगात भिनून गेलेले असते, तेच बाहेर प्रकट होते अतरगात बाणलेले विषय बाहेर आच- क्याच्या रूपाने प्रकट होते २ अनिवार संपत्ती मिळविण्याच्या नादाने वेडच लागते माणसांस त्याची येताल बडबड काही केल्या शमत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही दोनही व्यसने नर्कवास भोगण्याचीच आहेत ४ ८४१ कृष्णार्जनें जाले सोज्ज्वळ लोचन । तेणे दिले थान' निवडूनि ॥ १ ॥ निरोपाच्या मार्पे करी लडबड । त्याचे त्याने गोड नारायणे ॥ २ ॥ भाग्यवंताघरीं करिता विश्वासे । कार्य २ त्यासरिसे होईजेतें ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट भरे घरेयोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥ ४ ॥ १ धान २ काय
३९६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- वान-पदार्थ, वस्तू, बरेवोजा-चांगल्या प्रकाराने. अर्थ :- श्रीकृष्णाच्या रूपाचे कृष्णांजन माझ्या डोळ्यांत घातलेले असल्याने ते मोठे सोवळ व निमंळ बनले आहेत. १ परमेश्वराचा निरोप सांगण्यासाठी म्हणूनच मी खटपट करीत आहे त्या नारायणाने त्याचा हा निरोप गोड करून मला सांगितला आहे. २ जे भाग्यवत आहे, ते त्यांच्या घरी विश्वासाने चाकरी केल्यास मनासारखे कार्य साधते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकाराने पोटही चांगले भरते व आपल्या स्वामी आपल्याला आश्रय आपोआप मिळतो. ४ ८४२ मंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥ १ ॥ पुढें नाडियेलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ २ ॥ उभारोनि बाहे । दृष्टादृष्टीं येधीताहे ॥ ३ ॥ वैकुंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥ ४ ॥ पुंडलिकाँ थारा । देउनि आणिले या चोरा ॥ ५ ॥ तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- मंद-ढोंगी, कपटी ( लटक्या अर्थाने ), नाडियेले-फसविले, पेणें-मुक्काम. अर्थ :- प्रेमाचा पाश हातात घेऊन हा ढोंगी श्रीहरी पंढरपुरास येऊन स्थिर झाला आहे. १ याने नंतर जगातील अनेकांना फसविले. काही मागमूस लागणार नाही अशा ठिकाणी हा लबाड घेऊन जातो. २ दोन्ही हात उभारून केवळ दृष्टीनेच वेधून हा आपणाकडे सर्वांना आकर्षित करून घेतो. ३ पुंडलीक भक्ताने या चोरास आश्रय देऊन या स्थानावर स्थिर केले आहे. ४ या पंढरपूरच्या लोभासाठी या श्रीहरीने वैकुंठ सोडून मुक्काम आपल्या भक्तांसाठी केलेला आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, चला, तुम्ही आम्ही सर्व मिळून त्याला धरून त्याचेच भजनपूजन करू. ६ ८४३ भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वासीं ॥ १ ॥ माझी माझी म्हणे एकएकां मारी । हैं तौ नाही दुरी उभयतां ॥ २ ॥ तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥ ३ ॥ तुका म्हणे एके ठायाँ आहे वर्म । हेचि होय श्रम निवारितें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुरी-उणीव, भातें-खाऊ. अर्थ :- कधी कधी आई आपल्या मुलाचे भांडण कौतुकाने लावते व आपण दूर उभी राहून साक्षित्वाने पाहात असते. १ ती कधी एका मुलास माझा लाडका असे म्हणते व दुसऱ्यास मार देते. पण या दोन्ही मुलाच्या प्रेमात काही उणीव नसते २ मला फार खाऊ मिळाला, तुला थोडाच आहे, असे भांडण विनाकारण कटकट करुन मुले करतात व आई प्रेमाने ते सोडविते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या वृथा भांडणाचे वर्म एका आईस मात्र माहीत असल्याने तो त्यांचे श्रम दूर करण्याचे प्रयत्न करते. ४ ८४४ लटकियाची आशा । होतो पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥ १ ॥ वरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ २ ॥ मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्त्तली बुद्धी । परती तों कधीं । घडेचि ना माघारीं ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा ३९७ साचूनि मरे धन । लायी पोरासी भांडण । नाही नारायण । तुका म्हणे स्मरीला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिक्याची-खोट्याची, वळसा-भोवऱ्यात अर्थ - धन, दौलत पुत्र, गेह, पत्नी या सर्व खोट्या पसाऱ्याच्या आशेत गुंतल्यामुळे मी जन्ममृत्यूच्या भोवऱ्यातच सापडलो होतो सर्व दोषास मी यामुळे पात्र झालो आहे १ परंतु याचवेळी माझी दृष्टी आत्मज्ञानाने उजळली हे बरे झाले नाही तर मग मी फार कष्टी झालो असतो अशा या खोट्याच शब्दांनी सर्व जग आक्रोश करीत असते २ या माणसांना मरणाचेही भय, ते वृद्ध झाल्यामुळे कधी वाटतच नाही नाना प्रकारच्या इंद्रियसुखात त्याचे मन गुंतून राहिलेले असते तेथून त्याची दृष्टी परत माघारी वळते असे कधी होतच नाही ३ अशी माणसे पुष्कळ धन साठवितात, आणि एक दिवस मरून जातात मग त्यांच्या मुलांमध्ये मात्र भांडण लागते तुकाराम महाराज म्हणतात, जिवंत असताना यानी कधीही नारायणाचे स्मरण केलेले नसते ४ ८४५ जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥ १ ॥ भवविर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ २ ॥ सुखाचे शेजार । करुं का नावडे घर ॥ ३ ॥ तुका म्हणे ठेवा । का हा न करीचि बरवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अहर्निशी-रात्रदिवस भवविर्दाळण-संसाराचा नाश अर्थ - श्रीहरीचे नाव चांगले मुखाजवळ असतानाही हा ते रात्रदिवस का बरे घेत नाही ? १ या विठ्ठलाचे नाम पुनःपुन घेतल्याने संसाराचा संसारबुद्धीचा नाश होऊन, इतर अनेक इच्छाही नष्ट होतात २ प्रभूचे हे नाम चांगली सुखाची शय्या असून तो का आवडत नाही ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हरिनामाचा हा उत्तम ठेवा तू जवळ का राखून ठेवीत नाहीस ? ४ ८४६ बरवे देशावर जाले । काय बोले बोलावें ॥ १ ॥ लाभें लाभ दुणावला । जीव धाला दर्शनें १ ॥ २ ॥ भाग्यें जाली सतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥ ३ ॥ तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुणावला-दुप्पट झाला, धाला-संतुष्ट झाला अर्थ - देशावर परमार्थाभाचा व्यवहार फार चांगला झाला त्याचे वाणीने वर्णन काय करावे ? १ मनुष्यदेहाचा लाभ झाल्यामुळे व सतदर्शनामुळे जीव संतुष्ट होऊन गेला २ मोठ्या भाग्याने माझी या संतांची भेट झाली याच भेटीची माझ्या पोटात इच्छा होती ३ तुकाराम महाराज म्हणतात या भेटीसाठी जे जे श्रम केले ते सर्व फळास आले ४ ८४७ सांगता हे नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥ १ ॥ आवडीनें सेवन करू । जीवांचे धरू जीवाँच ॥ २ ॥ उपमा या देता लाभा । काशा शोभा सारिखी ॥ ३ ॥ तुका म्हणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संताचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - काशा-कशासारखा, नुचलीं-उचलीत नाही अर्थ - संताच्या सहवासाचे जे सुख झाले, त्याचे वर्णन करून सांगता येण्यासारखे नाही त्याची कीर्तीही तोंडाने वर्णन करता येत नाही १ मोठ्या प्रीतीने त्याच्या संगतीचे सुख सेवन करू व आमच्या जीवातील जीव १ धापणे
जपून ठेवू. २ हा जो लाभ आम्हांला झाला आहे, त्याला उपमा द्यायला जावे तर तो पद्मासारखा आहे म्हणून सांगावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी या संतांच्या पायावर डोके ठेविले आहे, ते काही वर उचलत नाही. ४ ८४८ आपुलाला लाहो करूं । फेणें भरूं हा विठ्ठल ॥ १ ॥ भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ २ ॥ पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंबें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- लाहो-लाभ, फेणे-माल, जिन्नस. अर्थ :- आता आपला आपण लाभ करून घेण्यासाठी हा विठ्ठलरूपी माल भरून ठेवू. १ माझे मोठे भाग्य म्हणूनच मी या स्थानास प्राप्त झालो आहे. आता मी माझा जीव याच्यावरून ओवाळून टाकीन. २ असा हा लाभ, यापुढे घडेल असे नाही. फार दिवसांनी या लाभाची प्राप्ती मला झालेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात श्रीहरीचा हा जो लाभ मला झाला आहे, तो समजून मी याचे चरण एक क्षणही सोडणार नाही. ४ ८४९ उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥ १ ॥ संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ २ ॥ संपुट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥ ३ ॥ तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:-वारली-दूर झाली, संपुट-देवाला ठेवण्याचे पात्र. अर्थ:-आज माझे भाग्य किती उजळून आले आहे पाहा. या श्रीहरीच्या प्राप्तीमुळे माझी सर्व चिंता दूर झाली. १ संतांच्या दर्शनाने हा लाभ मला झाला, हा पद्मनाभ मला भेटला. २ याला आता माझ्या हृदयपेटीचे संपुट करून मी जपून ठेवीन, साठवून ठेवीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा जो श्रेष्ठ प्रकारचा साठा होता, तो मला भक्तिभावामुळे सापडला आहे. ४ ८५० आम्हां आपुलें नायडे संचित । खरफडे चित्त कळवळ्यानें ॥ १ ॥ न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ २ ॥ कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥ ३ ॥ तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संचित-साठलेले कर्म अर्थ:- ईश्वरा, आम्हांला आमचे कर्म आवडत नाही. यासाठी रात्रंदिवस आमचे चित्त एकसारखे तळमळत असते. १ खरोखर या परमार्थामागचे खरे मर्म न समजल्यामुळे आमचा खोळंबाच झाला असून या जगात लोकांच्या दृष्टीने मी नाना सोंगे आणणारा बहुरूपीच बनलो आहे. २ पण या सर्व गोष्टी आता मला समजून आल्या आहेत हे एक बरे झाले. आता माझे डोळे उघडले आहेत. आता या मार्गात एखादा मार्गदर्शक कर्णधार मिळेल तर बरे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमची करुणा तुम्हांस येत असेल तर, नारायणा, आमच्या संरक्षणासाठी उडी घ्या ना ४ ८५१ वरगासाठीं लावलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥ १ ॥ फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥ २ ॥ ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥ ३ ॥ तुका फजीत करी बुच्या¹ । विसरे कुच्या खोडी तेणें ॥ ४ ॥ १ बुका.
सार्थ तुकारामगाथा ३१९ शब्दार्थ व टीपा :- वरगासाठीं-ज्वारी वगैरेसाठी, नवजाय-जाणार नाही, बुचा-निलाजरा, मूर्ख, फुच्या- ठोका, ढेम अर्थ - ज्वारी वगैरे धान्य न मिळाल्याने फुणी दुष्काळामध्ये झेण खाल्ले; पण त्याची त्याला एवढी चटक लागली की, पुढे अन्न मिळायला लागल्यानंतरही त्याने ते खायचे सोडले नाही. १ अशा माणसाची मार देऊन फजिती केली, तरी ती त्याला गौरवाचीच वाटते. २ ओढाळ जनावरास वाईटसाईट खाण्याची जो गोडी लागलेली असते, ती खोड काही त्याची सहजासहजी जात नाही. ३ अशा या निलाजऱ्या व मूर्ख माणसाची तुकाराम चांगलीच फजिती करीत असतो. चांगला मार बसल्यावर मग आपली खोड ते सोडतात. ४ ८५२ घांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥ १ ॥ धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटी ॥ २ ॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥ ३ ॥ तुका म्हणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हिंपुटी-नष्टी, उदास अर्थ - विठोबा माउली, आता माझ्या रक्षणासाठी तू धाव ना. आता तू कशासाठी थांबली आहेस ? कशाची वाट पाहतेस ? १ माझ्या पोटात आता कसलाच धीर नाही. मी तुझ्या वियोगाने फारच दुःखीकष्टी झालो आहे. २ आई, मला अतिशय ताप आला आहे, मला शांत कर ना. ३ देवा, मी आता अधीर झालो असून तुझ्या पायावर डोके कधी ठेवीन असे मला झाले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ८५३ तुम्हां ठावा होता देवा । माझे अंतरींचा हेवा ॥ १ ॥ होतो काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ २ ॥ नसतें सांभाळिले । जरि तुम्हीं आश्वासनिलें ॥ ३ ॥ तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव, सावाधावा-साहाय्य करण्यासाठी धाव घेणे. अर्थ :- देवा, माझ्या मनातील हाव कसली आहे याची माहिती तुम्हांस प्रथमपासूनच आहे. १ वैकुंठनायका, माझी सुटका या संसारपाशातून कशाने होईल हो ? २ तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे मला सांभाळले नसते तर मग काय झाले असते ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू फारच कृपाळू असून मला साहाय्य करण्यासाठी धाव घेतलीस हे फार चांगले केलेस. ४ ८५४ देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥ १ ॥ पाहतां फाशा तूं सारिखा । तिहीं लोकांच्या जनका ॥ २ ॥ आरष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥ ३ ॥ आवडीनें खेळें । तुका पुरवावे¹ सोहाळे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आरष-बोबडी, फाशा-गवताचा एक प्रकार अर्थ :- पुरुषोत्तमा, तुला जी उपमा आम्ही आवडीने देऊ ती शोभून दिसेल. १ एका बाजूस गवताच्या फाशासारखाही तू आहेस, तर दुसऱ्या बाजूस तू तीनही लोकांचा जनक आहेस. २ देवा, माझी ही बोबडी वाणी तुम्ही चागली कानानी गोड करुन ऐकता. ३ आवडीने खेळणाऱ्या या तुकारामाचे सर्व सोहाळे देवा, तुम्ही पुरवायेत ४ ८५५ दर्शनाची आस । आतां न साहे उदास ॥ १ ॥ जीव आला पायांपाशीं । येथें असे कलियरेंसीं ॥ २ ॥ १ फुपावे.
कांहींच नाठवे । ठायीं बैसलें नुठये ॥ ३ ॥ जीव असतां पाही । तुका ठकावला ठायीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आस-इच्छा, कलिवरेंसीं-शरीर तेवढे, नुठये-न उठवे, उठवत नाही, ठकावला- फसला गेला. अर्थ :- देवा, मला तुमच्या दर्शनाचीच तेवढी तीव्र इच्छा आहे. आता या बाबतीतील उदासीनता मला सहन होणार नाही. १ माझा सारा जीव देवा, तुमच्या पायाशी असून येथे शरीर तेवढे शिल्लक राहिलेले आहे. २ मला आता दुसरे काहीच आठवत नसून बसल्या जागेवरून उठवतही नाही. ३ देवा, तुमच्या चरणांवर मी माझा जीव पाहिलेला असतानासुद्धा मी असा फसवला जावा ना ? ४ ८५६ भोगावरि आम्हीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥ १ ॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं वळा येऊं आतां ॥ २ ॥ काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥ ३ ॥ केला तरी उरे वादचि कोरडा । वळें घ्यावी पीडा स्वप्नींची ॥ ४ ॥ अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोज कीर्दी¹ ॥ ५ ॥ तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाण-प्रकार, रोजकीर्द-रोजच्या जमाखर्चाची वही अर्थ :- देहासंबंधी असणाऱ्या सुखदुःखादी भोगावर आम्ही पाषाण घालून ते जणू सर्व बदच केले आहेत, आणि मरण देहाला व इंद्रियांच्या वृत्तींना असते हे जाणून मी आत्मतत्त्वाच्या जाणिवेमुळे अमर होऊन राहिलो. अशा प्रकारे मरणालाच मी मारून टाकले आहे. १ देवा, सर्व विश्वाला जर तू भरून राहिला असशील तर मी त्यातून निराळा कसा राहू शकेन ? मग मी वेगळा मानून उगाच कोणत्या वळाने माडून काढू ? २ सर्वत्र तूच आत व बाहेर जर भरून राहिला असशील, तर मग मी आतून बाहेर तरी काय काढावे ? व बाहेरून आत तरी काय ठेवावे ? ३ याविषयी वादही किती जरी केला तरी तो कोरडाच राहतो. असे असल्याने देहादींची व इंद्रियांची दुःखे ही स्वप्नवत असल्याने ती घेण्याची किंवा खरी मानून कष्टी होण्याची यातायाात मी का करावी ? ४ देवा, सर्व प्रकार तुमच्या घरीच आले असताना, सर्व मजुरांची मजुरी रोजच्या जमाखर्चाच्या वहीत आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, यात मी लाभहानी काही जाणणार नाही. या देहाचा जो कोणी धनी असेल तो या देहाचा वाडा रक्षण करील. ६ ८५७ कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥ १ ॥ कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें फोडें उपजलें ॥ २ ॥ कां हो उपजेना द्यावी ऐसी भेटी । काय ह्रींत पोटां धरिले देवा ॥ ३ ॥ पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाही आतां ॥ ४ ॥ काय जाले देणें² निघाले दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणियांनीं ॥ ५ ॥ तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडूनियां ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -नाड-अडथळा, साकडे-सकट, फोडें-अडचण. अर्थ - देवा, तुमच्या व माझ्या भेटीत आड येणारा काळ का हो मध्येच आला ? त्याने तुमच्याजवळ येऊन अडथळा का हो निर्माण केला ? १ मला भेट देण्याविषयीच्या विचाराचे सकट तुम्हांस का पडले आहे ? अशी कोणती अडचण निर्माण झाली आहे की, तुम्ही भेट देण्याचा विचार रहित केला ? २ देवा, मला भेट द्यावी अशी भावना १ कीर्ती, २ नेणे
तुमच्या अंतःकरणात का हो निर्माण होत नाही ? तुमच्या-माझ्यामधील द्वैताची, वेगळेपणाची भावना तुम्ही अजून कायम धरली आहे काय ? ३ मला भेट देण्याचे तुम्ही टाळता, याचे कारण देवा, आमचे पाप फार बलवत्तर आहे, का ? किंवा तूच दुबळा झालास की काय रे ? तुझ्या अंगी आता पापी लोकांचा उद्धार करण्याचे बळ पूर्वीसारखे उरलेले नाही काय ? ४ किंवा देवा, तुला इतरांचे देणे फार झाले की काय ? तुझेही दिवाळे निघाले ? की कुणाच्या ऋणात तुजकडून राहिला आहेस ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी गुंतवणूक करून का ठेवितो आहेस ? तुझ्या व माझ्या संबंधाचे स्वरूप स्पष्टपणे ठरवून ना देवा ६ विवरण - वारंवार प्रार्थना करून, स्तुती करून, आर्त भावनेने करुणा भाकूनही देव आपल्यावर का कृपा करीत नाही ? या एका प्रश्नाच्या पोटी थोर भक्तांच्या मनात जे जे विकल्प बहुतांशहतो येतात, त्यातील काही या अभंगात आहेत तुझ्यामाझ्या मार्गात काळ आडवा आला काय ? विसाराचे भेट द्यावी अथवा न द्यावी या सारख्या विचाराचे संकट निर्माण झाले काय ? का भेट न देण्याविषयीचे द्वैत पाटात निर्माण झाले ? आमचे पाप फार झाले ? की दया, तुझी पापमोचनाची शक्तीच कमी झाली ? तुझ्याही शक्तीचे दिवाळे निघाले की काय ? की कुणाच्या ऋणात जखडून गेला असल्यामुळे आमच्यासारख्याच्या वाटघास येत नाहीस ? अशासारखे अनेक संशय भक्तांच्या मनात येतात त्याचा उच्चार तुकारामबुवांनी येथे केलेला आहे मोरोपंतांची 'संशयरत्नमाला' प्रसिद्ध असून तिच्यातही लडिवाळ भक्ताच्या मनातील संशयाबद्दलचा आविष्कार फार चांगल्या प्रकारे झाला आह भक्ताने वारंवार करुणा भाकावी, दीन वाणीने प्रार्थना करावी, नाना तर्क करावेत, डाकाकुसका काढाव्यात, देवाशी प्रेमाने भांडण करावे व मग देवाने कृपा करावी, यामधील सुकुमारता व भक्तीची, जिव्हाळ्याची वृत्ती अधिक संतोषदायी आहे देवा, मला भेट, म्हटल्याबरोबर देव भेटल्यास त्या भेटीमधील आनंद व तळमळ केल्यावर, हट्ट केल्यावर भेटल्यानंतरचा आनंद, यात फरक असणारच लेकराने रागवावे, रुसावे, नाना शंका घ्याव्यात व आईने मग त्याची समजूत काढावी, यात सर्व आले ८५८ काय देहू घालू करवती कमरी । टाकू या भितरी अग्नीमाजी ॥ १ ॥ काय सेवू वन शीत उष्ण ताण । साहो कीं मोहन' धरुनी बैसो ॥ २ ॥ काय लावू अगीं भस्म उधळण । हिंडू देश कोण खुंट चारी ॥ ३ ॥ काय त्यजू अन्न करुनि उपास । काय करु नास जीविताचा ॥ ४ ॥ तुका म्हणे काय करावा उपाय । ऐसा देई भाव पाडुरंगा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कमरी-शस्त्र, मोहन-मौन, चार खुंट-चार धाम अर्थ - देवा, मी तुमच्या भेटीसाठी करावे तरी काय हो ? काय माझ्या देहावर शस्त्र घालून त्याला कापून टाकू ? की त्याला अग्नीमध्ये टाकून देऊन भाजून टाकू ? १ की एखाद्या रानावनात जाऊन शीत, उष्ण, तहान याचा त्रास सहन करू ? का मौन धारण करून तेथे स्वस्थपणे बसून राहू ? २ की अंगावर भस्माची उधळण करून वैरागी-गोसावी बनू ? चार खुंट फिरून कोणत्या देशाची वारी करू रे देवा, तुझ्यासाठी ? चार धामाची यात्रा करू तुझ्या प्राप्तीसाठी ? ३ अन्न सोडून देऊन देवा मी उपास करू का ? की माझ्या जिविताचा नाश करून टाकू ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला सांगा ना एखादा उपाय तुमच्या प्राप्तीचा याविषयी तुम्हीच मला आता एखाद्या भावभक्तीचा मार्ग दाखवा ना ५ ८५९ दमें कीर्ति पोट नरे मानी जग । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥ १ ॥ अंतरतो तुझे पाय मज दुरी । धरिता हे थोरी जाणिवेची ॥ २ ॥ पिंडाच्या पाळणे धावती विकार । मज दावेदार मजमाजी ॥ ३ ॥ १ मौन तु गाथा ५१
४०२ सार्थ तुकारामगाथा
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दावी तो सोहळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पिंडाच्या-शरीराच्या, गुमान-पर्वा, फिकीर अर्थ :- ढोंग करून परमार्थ केल्यास, भक्तीचा डोल मिरविल्यास पोट भरते. लोकांत मानमान्यताही मिळते. पण त्याच्यामुळे स्वतःचे मात्र कसलेही हित होत नाही. १ मी मोठा ज्ञानी व शहाणा या ज्ञानाच्या जाणिवेने देवा, तुझे पाय मात्र अंतरतात २ आणि केवळ देहाचेच पालनपोषण केल्याने कामक्रोधादी वृत्ती वळाव- तात, व माझ्यात असलेले माझे हे शत्रू माझे दावेदार बनतात ३ लोकांची पर्वा न करता मी माझा घात कसा करून घेऊ ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे पाय मी पाहिले आहेत, असा सोहळा मला दाखवा ना. ५ ८६० धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें वर' भलें मग ॥ १ ॥ आइका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ २ ॥ देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥ ३ ॥ तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - घर-चांगले अर्थ :- ज्याचा मालक वाईट आहे, त्याच्या जिण्याला धिक्कार असो. मग त्यापेक्षा मरण कितीतरी चांगले समजावे बरे. १ देवा, नीट ऐका; अशी ही एकंदर नीती आहे; म्हणून जे योग्य व उचित असेल त्यांचा सांभाळ तुम्ही करावा. २ ज्याच्या शब्दाचा दरारा सर्व देशांतून आहे, त्याचा कुत्राही होणेही बरे, फार चांगले वाटते, ३ देवा, अशा प्रकारच्या कडक शब्दांचे उत्तर मी तुम्हास का देत आहे, याचा विचार तुम्ही माझे अंतःकरण जाणून करावा ना एकदा ४ ८६१ आतां गाऊं तुज ओविया मंगळी । करूं गदारोळी हरिकथा ॥ १ ॥ होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ २ ॥ भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होऊनि राहों ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही लाडिकी लेंकरें । न राहों अंतरें पायांविण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मंगळी-पवित्र, मगलदायक, गदारोळी-आग्रहाने, गर्जना करून अर्थ :- देवा, आता तुला मंगलदायक ओव्या गाऊन तुझी आम्ही स्तुती करू. या हरिकीर्तनाची एकच गर्जना सर्वत्र करून देऊ. १ आमच्यावर जी जी संकटे येतील त्याचे निवारण देवा, तूच करणारा होशील. भय, तळमळ, पापपुण्य यांना दूर करण्याचे कार्य तूच देवा करशील. २ आम्ही आजपर्यंत जे जे भोग घेतले, ते ते सर्व तुझ्या अंगी लावून आम्ही या जगात अलिप्त होऊन राहू. भोगणारा केवळ तूच आहेस, या जाणिवेने आमचेकडे कर्तृत्व काही नाही असे समजू ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही सर्व लेकरे तुझी फारच लाडकी आहोत रे. तुझे पाय सोडून आता आम्ही दुसरीकडे कुठेही राहणार नाही. ४ ८६२ सर्व सुखें आजी येथेंचि वोळली । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥ १ ॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणे काळें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढें जालें चित्त समाधान ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळली-प्राप्त झाली, चरणांबुजें-चरणकमले, धणी-तृप्ती. १ बरे.
सार्थ तुकारामगाथा ४०३ अर्थ :--आज सर्व सुखांची प्राप्ती मला येथेच झाली आहे. कारण येथे संतांचे चरणकमल मी पाहिले आहेत. १ याच पावलांची इच्छा मी माझ्या मनात सदासर्वकाळ करीत होतो. आज मात्र माझी इच्छा तृप्त झाली. २ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी वाणी काही बोलू शकत नसून ती कुंठित झाली आहे; व माझ्या चित्तात पूर्ण समाधान प्राप्त झाले आहे. ३ ८६३ विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥ १ ॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ २ ॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न येदे अन्यथा आन दुजें ॥ ३ ॥ सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोवाचें ॥ ४ ॥ तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा.- काया-शरीर, आन-दुसरे अर्थ :-- हा विठ्ठल आता माझा अत्यंत आवडता असा सज्जन सोयरा झाला असून माझ्या चित्तात त्याचेच स्थान दृढ झाले आहे. १ या विठ्ठलरूपानेच माझे सर्व शरीर व्यापून गेलेले असून माझी छायाही त्यामुळे विठ्ठल- रूपाचीच बनलेली आहे. २ माझ्या जिव्हेच्या अग्रावर विठ्ठलच बसला असून, तो त्याच्यावाचून दुसऱ्या कुणाचे नावही घेत नाही. ३ सर्व इंद्रियात मन हे प्रमुख इंद्रिय असून, तेही याच विठ्ठलाचे ध्यान करू लागले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता या विठ्ठलास मला क्षणभरही विसरता येणार नाही. ५ ८६४ होय¹ वारकरी । पाहें पाहे रे पंढरी ॥ १ ॥ काय करावी साधने । फळ अवघेंचि तेणें ॥ २ ॥ अभिमान नुरे । कोड अवघेंचि पुरे ॥ ३ ॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-- नुरे-उरत नाही, कोड-इच्छा. अर्थ --अरे मनुष्या, तू पंढरपूरचा वारकरी हो ना. एकदा तरी पंढरपूर येथे जाऊन त्या विठ्ठलास डोळे भरून पाहा ना १ इतर साधनांचा काय उपयोग ? सर्व फळ याच एका दर्शनाने मिळने २ याच्या भेटीमुळे मनात अभिमान उरत नाही व मनातील सर्व इच्छा मात्र तृप्त होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सावळा विठ्ठल माझ्या डोळ्यात निवास करून राहिला आहे ४ ८६५ पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥ १ ॥ अवघा होप पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ २ ॥ न लगे धन मान । देहभावे उदासीन ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । नासी² तात्काळ तें स्थळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-- नासी-नाश होतो अर्थ. - जो पंढरपूरला मनोभावे जातो, तो देवाच्या दर्शनाने इतका भारावला जातो की आपल्या आई- बापासही विसरून जातो. १ तो सर्वार्थाने पांडुरंगच बनलेला असून बेधुंद अंग धरून राहिलेला असतो. २ त्याला धनाची वा मानाची मुळीच इच्छा नसते. स्वतःच्या देहाविषयीही तो उदासीन बनलेला असतो. ३ या पंढरीच्या वास्तव्यामुळे मनात विकारादिकाचा जो मळ असतो त्याचा संपूर्ण नाश होत असतो. ४ १ होय होय, २ नाही.
४०४ सार्थ तुकारामगाथा ८६६ बळें बाह्यात्कारें संपादिले सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥ १ ॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरोनि सकळ हे ॥ ३ ॥ प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले फरी नित्य वेवसाय ॥ ४ ॥ तुका म्हणे मज भोरप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेवसाय-उद्योग, व्यवसाय, भोरप्याचि परी-बहुरूप्याप्रमाणे. अर्थ - साधुत्वाच्या बळानेच बाह्यात्काराने सोंग संपादन केले; पण अंतरगातून मात्र इंद्रियसुखाचा त्याग झाला नाही १ असे माझ्या अनुभवास नित्य येत असते व यासंबंधीचा खरा विचार काय आहे, याचीही जाणीव माझ्या मनास नेहमीच असते २ जो अनुभव जागेपणीचा असतो, तो कधी स्वप्नामध्ये दिसत नाही. यावेळी मी सर्व काही विसरून जातो ३ माझे चित्त खरोखर या प्रपंचातून बाहेर आलेलेच नाही. मागचेच सर्व उद्योग ते पुन' एकसारखे करीत असते ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी अवस्था निरनिराळी सोंगे घेणाऱ्या बहुरूप्याप्रमाणे झालेली आहे. वरवर पुष्कळ सोंगे वेळोवेळी केली तरी आत जो जसाचा तसाच शिल्लक असतो. ५ ८६७ म्हणवितो दास ते नाहीं कारणीं । आत घरी दोन्ही भिन्न भाव ॥ १ ॥ गातो नाचतों तें दाखवितो जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ २ ॥ पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालों या दोहों वघाचिया ॥ ३ ॥ भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥ ४ ॥ तुका म्हणे वांयां गेलो ऐसा दिसे । होईल या हांसें लौकिकाचें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - करणी-कृत्य, धर्म-रहस्य अर्थ - मी स्वतःम ईश्वराचा दास म्हणवून घेतो; पण माझ्या हातून तशी कृत्ये मात्र होत नाहीत कधी. माझ्या अंतरगातील व बाहेरचा भाव वेगवेगळाच दिसतो १ मी प्रेमाने हरीचे गुण गातो त्याच्यासाठी नाचतोही; पण ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी आहे. माझ्या अंत करणात ईश्वराविषयी प्रेम हटकून आहेच असे मात्र नाही. २ ईश्वरस्वरूपाच्या रहस्याचे ज्ञान जे मला हवे आहे, ते काही अजून मिळालेले नाही या दोघांच्या डोहातच मी पूर्णपणे बुडून जात आहे ३ माझ्या आयुष्याचे जे भांडवल होते ते मात्र काळाने हातोहात संपवीत आणले आहे. ह्या माझ्या आयुष्यास माप लागले असल्याने ते उतरणीस लागले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी तर या माणसाच्या जन्मास येऊन वायाच गेलो आहे असे दिसते माझ्या सर्व लौकिक संसाराचे हंसेच होईल असे दिसते ५ विवरण-वरील दोन अभंगात भक्तश्रेष्ठ तुकोबानी आपल्या मनाची दुर्बलता स्पष्टपणे मांडलेली आहे तुकारामबुवा एवढे साधू, एवढे विठ्ठलभजनात रंगलेले, एवढे परोपकारी, पण त्याचेही मन त्यांना चित्ती खात असावे हे या अभंगातून ध्यानात येते आपण ह साधुत्वाचे बाह्यात्कारी सोंग पसरून लोकाच्या मनाची फसवणूक तर करीत नाही ना? अशी शंका त्याच्या मनात चाटून गेलेली आहे आपले मन प्रपंचातून सपूर्णपणे निघालेले नाही, जागृती व स्वप्नी एकच ईश्वरभाव अजून आपल्यात निर्माण झालेला नाही, आपण बहुरूप्याप्रमाणे वरवर सोंगधारीच आहोत की काय ? आपले गाणे व आपले नाचणे हे केवळ वरवरचे तर नव्हे ? आपल्या अंतःकरणात ईश्वराविषयी दृढ प्रेम किती आहे ? आपले आयुष्य काळाच्या मानाने हातोहात कमी तर होत नाही ना ? अशा एकसारख्या शंका ह्यांना येत असून ते अत्यंत जागृकतेने आपले चित्त सदैव श्रीहरीच्या चरणी जडून राहील अशा विवंचनेत असतात. स्वतःचे हे जे कठोर आत्मनिरीक्षण तुकोबानी केले आहे, त्यावरून वस्तुस्थितीच तशी होती असे मानण्याचे कारण नाही.
सार्थ तुकारामगाथा ४०५ आपल्या मनात नारायणाविषयी प्रेम नाही व आपण अजून संसारापासून मुक्त झालो नाही, असे जेव्हा तुकाबा म्हणतात, तेव्हा त्यांच्या म्हणण्यापाठीमागची भूमिका समजावून घ्यावयास हवी आपण जास्तीत जास्त निर्विकार व्हाव, जास्तीत जास्त पूर्णत्वाने श्रीहरीशी एकरूप व्हावे, जास्तीत जास्त आपले चित्त निर्लेप व निर्मळ असावे, हा त्यामागचा उद्देश आहे थोर थोर लोकांचेही मन कसे चळेल व मग सर्व आयुष्याचा नाश कसा होतो हे त्यांना चांगलेच माहिती होते म्हणूनच त्यांनी आपल्या मनास नित्य वैराग्याचा डिवचावा, आत्मपरीक्षणाचा कठोर अंकुश लावून घेतला दिसतो व या आत्मपरीक्षणामुळेच त्यांना सदैव जागृती येत राहिली हे स्पष्टच आहे म्हणूनच एके ठिकाणी म्हटले आहे 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥' ८६८ न कळता काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥ १ ॥ येउनिया वास करिसी हृदयीं । ऐसे घडे करूं कासयाने ॥ २ ॥ साच भावे तुझें चिंतन मानसीं । राहे हे करिती कें गा देवा ॥ ३ ॥ लटके हे माझें करुनिया दुरी । साच तू अंतरीं येउनि राहे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज राखावे पतिता । आपुलिया सत्ता पाडुरंगा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खऱ्या अर्थ - देवा, माझ्या अंतःकरणातील प्रेमभाव सतत तुझ्या पायावर स्थिर व्हावा, अशासाठी मी काय उपाय करावा ? हे काही समजत नाही १ देवा तू माझ्या हृदयात येऊन निवास करशील अशी गोष्ट कशाने बरे होईल ? २ खऱ्या भावनेने तुझेच चिंतन घडेल व तेच मनात स्थिर राहील असे कधी होईल रे ? ३ देवा, माझ्यात जे जे खोटे असेल ते दूर व्हावे व तूच खऱ्या स्वरूपात माझ्या अंतःकरणात दृढ व्हावास ४ देवा पांडुरंगा, तुकाराम महाराज म्हणतात, मला या पतिताला तू आपल्या सत्तेने सांभाळावेस ५ ८६९ चिंतितलें तें मनिंचें जाणे । पुरवी खुणे अंतरींचें ॥ १ ॥ रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत्त हे ॥ २ ॥ नवसियांचे नव' रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे समचि देणें । समचरण उभा असे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सम-एकसारखे स्वरूप अर्थ - हा देव कसा आहे ? मनामध्ये जी जी इच्छा भक्त धारण करतो ती तो मोठ्या प्रेमाने पूर्ण करतो १ त्याला रात्र झालेलीही समजत नाही, दिवस झालेलाही ध्यानात येत नाही पांडुरंग दैवत हे त्याच्या अंतरंगात व शरीरात एकसारखे खेळत असते २ या देवाची प्राप्ती व्हावी म्हणून जे जे भक्त नवस करतात, ते ते हा पूर्ण करतो जो यात स्मरण भोग भोगीत असतो त्यास तो भिन्न वाटत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भक्तांना आपल्या एकसारख्या स्वरूपाची प्राप्ती करून देणारा हा विठ्ठल समचरणाने विटेवर उभा आहे ४ ८७० उद्धाराचा२ संदेह नाहीं । याचा कांहीं सेवका ॥ १ ॥ पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ २ ॥ बुडता जळीं जळता अग्नी । ते प्रसंगीं राखावे ॥ ३ ॥ तुका म्हणणे आम्हासाठीं । कृपा पोटों वागवी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संदेह-शंका, कोंवसा-आश्रय, आधार अर्थ - हा देव आपला उद्धार करील की नाही, अशी शंका कधी त्याच्या सेवकाच्या मनात येत नाही १ हा पांडुरंग आपल्या भक्तांविषयी अभिमानी असून त्यांच्या जीवदानाचा एकमेव आधारच आहे २ पाण्यात १ पुरवी नवस २ उधारीचा
४०६ सार्थ तुकारामगाथा
बुडण्याच्या प्रसंगीं किंवा अग्नीत जळण्याच्या प्रसंगी हा ईश्वर आपल्या भक्तांचे नेहमींच रक्षण करतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आमच्यासाठीही आपल्या अंतःकरणांत निरंतर दया बाळगीत असतो. ४ ८७१ काय विरक्ति फळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥ १ ॥ नाचो सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ २ ॥ शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेवांचूनियां ॥ ३ ॥ कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥ ४ ॥ कासया एकांत सेवूनया वना । आनंद तो जनामाजी असे ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वैष्णवमेळीं-विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात, घोळ-दीणा, सरसा-बरोबर अर्थ:-वैराग्याची थोरवी आम्हांस कुठून कळणार? आम्ही त्या विठोबाचे एक नाममात्र जाणीत असतो. १ मोठ्या सुखाने व आनंदाने आम्ही विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात नाचत असतो. टाळ व घोळ यांच्या नादांत आम्ही तल्लीन होत असतो. २ शांती, क्षमा, दया यांचे महत्त्व आम्ही काय जाणावे? या पांडुरंगाच्या, गोविंदाच्या कीर्तनात हे सर्व काही येते. गुणकीर्तनावाचून दुसरे काहीही आम्ही जाणीत नाही. ३ नामामृताच्या सागरात बुडी दिल्यानंतर देहावर उदास होऊन काय उपयोग? ४ या लोकातच एवढा आनंद भरलेला असताना मी रानावनात जाऊन उगीच शीण कशास वाढवून घेऊ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस आता कसलीच भीती नाही. कारण हा श्रीविठ्ठल आमच्याबरोबर आहे, असा विश्वास आम्हांस नेहमीच वाटत आलेला आहे. ६ ८७२ जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥ १ ॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे १ यमापाशीं ॥ २ ॥ गरुडटक्यांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥ ३ ॥ सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥ ४ ॥ तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥ ५ ॥ तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- ओखदासी-औषधासमुद्धा, भेणें-भयाने अर्थ :- ज्या स्थानावर विठ्ठलभक्तांचा निवास असतो, ती भूमी व तो देश पुण्यवान आहे असेच समजावे १ या ठिकाणी औषधालासुद्धा दोष दिसणार नाही, असे यमाचे दूत यमास सांगत असतात. २ गरुडाचे निशाण ज्यांच्या खांद्यावर आहे अशा वैष्णवांच्या समुदायाने व नामकीर्तनाने सर्वत्र या विठ्ठलाचाच जयजयकार होत असतो. ३ येथील लोकांच्या वाणीस गोविंद गोविंद-विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा सहजच छंद असतो ४ या ठिकाणी तुळशीची वने असून नाना प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या असतात. येथील सर्व सोहळा वैकुंठाप्रमाणेच असतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, भीतीने काळ या बाजूस फिरकतसुद्धा नाही. ६ ८७३ माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ॥ १ ॥ पढियें देहभावें पुरवितो वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २ ॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥ ३ ॥ योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥ ५ ॥ १ सांगती.
सार्थ तुकारामगाथा ४०७ शब्दार्थ व टीपा - पडिये-आवडत, आघात-सकट, जड-राकट अर्थ - या माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून सांगू ? तोच माझा देव व तोच माझा गुरू झालेला आहे १ भक्ताना जे जे आवडते, प्रिय आहे ते ते किंवा ती ती इच्छा हा देव पुरवितो आणि शेवटी आपणापाशी घेऊन येतो त्याना २ आपल्या प्रिय भक्ताच्या मागेपुढे उभा राहून हा त्याचा साभाळ करीत असतो येईल त्या सकटाचे निवारण करीत असतो ३ आपल्या भक्ताचे मोठे सक्ट जाणून त्याचे रक्षण करून त्याचा हा देव नीट योगक्षेमही चालवितो हाताला धरून या भक्तिमार्गाची वाट तो दाखवीत असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या वचनावर ज्याचा विश्वास नाही, त्यानी पुराणातील अनेक दाखल्याचा विचार करावा ५ विवरण - ईश्वर आपल्या भक्ताची काळजी कशी करतो, त्याचे सकट कसे निवारण करतो, त्याचा योगक्षेम कसा चालवितो, याबद्दल तुकारामबुवानी अनेक अभंगातून फार कोवळीकतेने दिग्दर्शन केले आहे. स्वतःचे अनुभवही सागितले आहेत या एक फार गोड व तत्त्वस्पर्शी अभंगात बुवा अगदी साध्या भाषेत आपल्या विठोबाच्या प्रेमभावाचे वर्णन करीत आहेत आपल्या भक्ताची जी जी इच्छा असत, ती ती हा पूर्ण करीत असतो आपल्या लाडक्या भक्ताच्या मागेपुढे उभे राहून हा त्याच रक्षण करीत असतो हातात धरून तो भक्ताना परमार्थमार्गाची किंवा स्वरूपाची वाट दाखवीत असतो, आणि हा सब भाव पुराणातूनही व्यक्त झालेला आहे, असे बुवा आत्म- विश्वासाने सागत आहेत ८७४ सकळ धर्म मज विठोबाचे नाम । आणीक ते वर्म नेणें कांहीं ॥ १ ॥ काय जाणो सता निरविलें देवे । करिती या भावें कृपा मज ॥ २ ॥ तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळो यावा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - निरविले-सोपविले. अर्थ - या विठोबाच्या एका नामोच्चारात मला सर्व धर्म घडतात याखेरीज दुसरे कुठलेही वर्म मी जाणीत नाही १ या सतानी मजवर कृपा करावी म्हणूनच देवाने मला त्याच्यावर सोपविले की काय न जाणे २ तुकाराम महाराज म्हणतात, नाही तर असा माझा काय अधिकार आहे, की हा भक्तिज्ञानाचा विचार मला पूर्णपणे समजून यावा ? ३ ८७५ उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥ १ ॥ उडदा अक्षरा करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥ २ ॥ तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीय ते सिण रितें माप ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - उदंड-पुष्कळ, भरोवरी-श्रम, सायास, सिण-त्रास अर्थ - नाना प्रकारचे तर्क करणारे शहाणे पुष्कळच आहेत पण त्यांना या विठ्ठलाच्या स्वरूपाचा अंत काही लागणार नाही १ अक्षरे घोकून पाठांतर करणारे व अभ्यासाचा त्रास घेणारेही पुष्कळ आहेत, पण त्यांना काही विठ्ठलाची थोरवी समजून येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा लाभ भोळेपणाशिवाय होणार नाही ज्ञानाची जाणीव ही त्रास देणारीच वाटते कारण ज्ञानाच्या या मापाने या थोर विठ्ठलाला मापताच येणार नाही ज्ञानाचे माप कितीही मोठे असले तरी ते रितेच असते ३ ८७६ आधारावाचुनी । काय सागसी कहाणी ॥ १ ठावा नाहीं पंढरीराव । तोवरी अवघेंच वाय ॥ २ ॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥ ३ ॥ तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -- वाय-व्यर्थ, एक सवा-एकाबाजूला
४०८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - शास्त्रपुराणांतील किंवा साधुसंताच्या वचनावाचून तू ज्ञानाची कसली कहाणी सांगतोस ? १ जोपर्यंत तुला हा पंढरीचा राणा माहीत झालेला नाही, तोपर्यंत तुझे हे ज्ञानसंपादन सर्वच व्यर्थ आहे २ तुझे हे कोरडे ब्रह्मज्ञान कोण मानायला तयार होईल ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंडित लोकांनो, तुम्ही तुमच्या जाणिवेचा ठेवा एका बाजूलाच ठेवून द्या ४ ८७७ अनाथाची तुम्हा दया । पंढरीराया येतसे ॥ १ ॥ ऐसी ऐकोनिया कीर्ति । बहु विश्रांति पावलो ॥ २ अनाथाच्या धावा घरा । नामें करा कुडावा ॥ ३ ॥ तुका म्हणे सवघड हित । ठेवू चित्त पायांपैं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुडावा-रक्षण, सवघड-उघड असलेले अर्थ - पंढरीराया, जे अनाथ असतात, त्यांची दया तुम्हांस नेहमीच येत असते १ अशी तुमची कीर्ती ऐकून माझ्या मनास फारच समाधान लाभले आहे २ देवा, तुम्ही अनाथाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या घरी धावून जाता व तुमच्या नामाच्या साह्याने त्याचे रक्षण करता ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे उघड असणारे चित्त मी तुमच्या पायावर ठेवीत आहे ४ ८७८ येथे नाही उरो आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥ १ ॥ विषयाचे झगी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ २ ॥ वाहोनिया भार कुथसील ओझे । तेंचि माझें थीता त्याग ॥ ३ ॥ तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज । संतीं केशिराज साधिपेला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लोलिंगत-आसक्त अर्थ - मत्स्य, कूर्म इत्यादी अवतारही जेथे उरले नाहीत, तेथे मजसारख्या सामान्य माणसाची व गरीब पामराची काय कथा आहे ? १ इंद्रियाच्या विषयांशी जर आसक्त व्हाल तर ती इंद्रिये एकदा चेतवली गेली की मग त्याचा अंत लागेनासा होतो २ या इंद्रियसुखाचे ओझे डोक्यावर वागवीत बसला व मग विनाकारण कुंथाल तर मात्र माझ्या भावाचा त्याग करावा लागेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी या विठ्ठलाला मिळवून घेतला आहे, याची लाज तुम्हास कुणास कशी नाही ? ४ ८७९ हींच त्याचीं पचभूतें । जीवन भाते प्रेमाचे ॥ १ ॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ २ ॥ हाच काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥ ३ ॥ तुका म्हणे दिवसराती । हेचि खाती अन्न ते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भातें-अन्न, निगुती-बरोबर, कैवाड-स्वीकार अर्थ - या विठ्ठलाविषयीचे प्रेम हेच या भक्ताचे मुख्य जीवनदायी अन्न व पंचभूतात्मक शरीर आहे १ या संतांनीच या श्रीहरीविषयी चित्तात कळवळा धारण करून खरोखर त्याचा स्वीकार केलेला आहे २ या हरीविषयी त्यांना वाटणारे हे प्रेम हेच त्यांचा वर्तमानकाळ असून सर्व साधनसंपत्तीही याच स्वरूपाची आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस हे हरिमक्त हेच प्रेमाचे अन्न सेवन करीत असतात ४ ८८० दीप न देखे अंधारा । आता हेचि करा जतन ॥ १ ॥ नारायण नारायण । याठी धन बळकट ॥ २ ॥ चिंतामणीपाशी चिंता । तस्वता ही नयेत ॥ ३ ॥ तुका म्हणे उभयलोकीं । हेचि निकी सामग्री ॥ ४ ॥