दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१२ वा.] विवेकवैराग्य. २८१ ४. विवेकवैराग्य. श्रीगणेशाय नमः ॥ महद्भाग्य हातासि आलें । परी भोगूं नाहीं जाणि- तलें । तैसें वैराग्य उत्पन्न झालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥ आदळतें आफ- ळतें । कष्टी होतें दुःखी होतें । ऐकतें देखतें येतें । वैराग्य तेणें ॥ २ ॥ नाना प्रपंचाच्या वोढी । नाना संकटें सांकडीं । संसार सांडून देशधडी । होय तेणें ॥ ३ ॥ तो चिंतेपासून सुटला । पराधीनतेपासून पळाला । दुः- खत्यागें मोकळा झाला । रोगी जैसा ॥ ४ ॥ परी तो होऊं नये मोकाट । नष्ट भ्रष्ट आणि चाट । सीमाचि नाहीं सैराट । गुरुं जैसें ॥ ५ ॥ विवेकें- विण वैराग्य केलें । तरी अविवेकें अनर्थी घातलें । अवघें व्यर्थचि गेलें । दोहींकडे ॥ ६ ॥ ना प्रपंच ना परमार्थ । अवघें जिणेंचि झालें व्यर्थ । अ- विवेकें अनर्थ । ऐसा केला ॥ ७ ॥ कां व्यर्थचि ज्ञान बडबडिला । परी वराग्ययोग नाहीं घडला । जैसा कारागृहीं अडकला । पुरुषार्थ सांगे ॥ ८ ॥ वैराग्येंविण ज्ञान । तो व्यर्थचि साभिमान । लोभदंभें घोळसून । का- सावीस केला ॥ ९ ॥ श्वान बांधिलें तरी भुंके । तैसा स्वार्थमुळे थिंके¹ । परौधिक देखों² न शके । साभिमानें ॥ १० ॥ हें एकेंविण एक । तेणें उ- गाच वाढे शोक । आतां वैराग्य आणि विवेक-। योग ऐका ॥ ११ ॥ विवेकें अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । निःसंग योगी ॥ १२ ॥ जैसें मुखें ज्ञान बोले । तैशीच सर्व क्रिया चाले । दीक्षा देखोन चकित झाले । शुचिष्मंत ॥ १३ ॥ आस्था नाहीं त्रैलोक्याची । स्थिति बाणली वैराग्याची । यत्न विवेक धारणेची³ । सीमा नाहीं ॥ १४ ॥ संगीत रसाळ हरिकीर्तन । तालबद्ध तानमान । प्रेमळ आवडीचें भजन । अं- तरापासूनी ॥ १५ ॥ तात्काळचि सन्मार्ग लागे । ऐसा अंतरीं विवेक जागे । वक्तृत्व करितां न भंगे । साहित्य प्रत्ययाचें ॥ १६ ॥ सन्मार्गें जगास मि- ळाला । म्हणजे जगदीश वोळला । प्रसंग पाहिजे कळला । कोणीएक ॥ १७ ॥ प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । ज्ञान संध्या भगव- द्भजन । पुण्यमार्ग ॥ १८ ॥ विवेकवैराग्य तें ऐसें । नुसतें वैराग्य हेंकाड- पिसें । शब्दज्ञान वेळीलेंसें⁴ । आपणचि वाटे ॥ १९ ॥ म्हणोन विवेक १. उसळतो. २. दुसऱ्याचें बरें. ३. चित्ताच्या एकाग्रतेची. ४. मिळमिळीत.
२८२ श्रीदासबोध. [ दशक आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्भाग्य । रामदास म्हणे योग्य । साधु जाणती ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके विवेक- वैराग्यनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. आत्मनिवेदन. श्रीगणेशाय नमः ॥ १रेघेचें गुंडाळें केलें । मातृकोक्षरीं शब्द झाले । शब्द मिळवून चाले । श्लोक गद्य प्रबंध ॥ १ ॥ वेद शास्त्रं पुराणे । नाना काव्यें निरूपणें । ग्रंथभेद २अनुवादणें । किती म्हणोनी ॥ २ ॥ नाना ऋषि नाना मतें । पाहों जातां असंख्यातें । भाषा लिपी जेथें तेथें । काय उणें ॥ ३ ॥ वर्ग ३ऋचा श्रुति स्मृती । अध्याय सर्ग स्तबक जाती । प्रसंगमानें समास पोथी । बहुधा नामें ॥ ४ ॥ नाना पदें नाना श्लोक । नाना बीर नाना क- डक । नाना साख्या दोहरे अनेक । नामाभिधानें ॥ ५ ॥ डफगाणें माची- गाणें । दिंडीगाणें कथागाणें । नाना मानें नाना जैसणें । नाना खेळ ॥ ६ ॥ ध्वनि घोष नाद रेखा । चहूं वाचामध्यें देखा । वाचारूपेंहि ऐका । नाना- भेद ॥ ७ ॥ ५उन्मेष ६परा ध्वनि पश्यंती । नाद मध्यमा शब्द चौथी । 'वैख- रीपासून उमटती । नाना शब्दरत्नें ॥ ८ ॥ अकार उकार मकार । अर्धमा- त्रांचे अंतर । ७औटेंमात्रा तदनंतर । बावन ८मातृका ॥ ९ ॥ नाना भेद राग- ज्ञान । नृत्यभेद तान मान । अर्थभेद तत्वज्ञान । विवंचना ॥ १० ॥ तत्वां- मध्यें मुख्य तत्व । तें जाणावें शुद्ध सत्व । अर्धमात्रा महत्तत्व । मूळमाया ॥ ११ ॥ नाना तत्वें लहान थोरें । मिळोन अष्टहि शरीरें । अष्टधा प्रकृ- तीचें वारें । निघोन जातें ॥ १२॥ वारें नसतां गगन । तैसें परब्रह्म सघन । अष्टदेहांचें निरसन । करून पाहावें ॥ १३ ॥ ब्रह्मांडपिंडउभार । पिंड- ब्रह्मांडसंहार । दोहीं वेगळें सारासार । विमळ ब्रह्म ॥ १४ ॥ पदार्थ जड आत्मा चंचल । विमळ ब्रह्म तें निश्चळ । विवरोनि विवरे तात्काळ । तद्रूप १. रेषांचें गुंडाळें करून अक्षरें बनविलीं, अक्षरांपासून शब्द झाले. २. सांगणें. ३. वेदांतील वाक्यें म्हणजे ऋचा, व कांहींएक ऋचा मिळून वर्ग. ४. मनोरंजक गोष्टी. ५. अंतःस्फुरण. ६. उन्मेष ही परा, ध्वनि ही पश्यंती, नाद ही मध्यमा व शब्द ही वैखरी या चार वाणी. ७. साडेतीन अक्षरें, ॐकार. ८. अ ते ज्ञपर्यंत.
१२ वा.] सृष्टिक्रम. २८३ होय ॥ १५ ॥ पदार्थ मनें काया वाचा । मी हा अवघा देवाचा । जड आत्म- निवेदनाचा । विचार ऐसा ॥ १६ ॥ चंचळकर्ती तो जगदीश । प्राणिमात्र त्याचा अंश । त्याचा तोचि आपणास । ठाव नाहीं ॥ १७ ॥ चंचळ आत्म- निवेदन । याचें सांगीतलें लक्षण । कर्ता देव तो आपण । कोठेंचि नाहीं ॥ १८ ॥ चंचळ चले स्वभाकार । निश्चळ देव तो निराकार । आत्मनिवेद- नाचा प्रकार । जाणिजे ऐसा ॥ १९ ॥ ठावचि नाहीं चंचळाचा । तेथें आधीं आपण कैंचा । निश्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा ॥ २० ॥ तिहीं प्रकारें आपण । नाहीं नाहीं दुजेपण । आपण नसतां मीपण । नाहींच कोठें ॥ २१ ॥ पाहतां पाहतां अनुमानलें । कळतां कळतां कळां आलें । पाहतां अवघें निवांत झालें । बोलणें आतां ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे द्वादशदशके आत्मनिवेदननिरूपणं नाम पंचमः समासः ॥५॥ ६. सृष्टिक्रम. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । शाश्वत अमल विमळ । अव- काश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥ तयास करणें ना धरणें । तयास जन्म ना मरणें । तेथें येणें ना जाणें । शून्यातीत ॥ २ ॥ तें रचेना ना ख- चेना । तें होयना ना जायना । मायातीत निरंजना । पारचि नाहीं ॥ ३ ॥ पुढें संकल्प उठिला । षड्गुणेश्वर बोलिजे त्याला । अर्धनारीनटेश्वराला । बोलिजेतें ॥ ४ ॥ सर्वेश्वर सर्वज्ञ । साक्षी द्रष्टा ज्ञानघन । परेश परमात्मा जगज्जीवन । मूळपुरुष ॥ ५ ॥ ते मूळमाया बहुगुणी । अधोमुखें गुण- क्षोभिणी । गुणत्रय तिजपासूनी । निर्माण झालें ॥ ६ ॥ पुढें विष्णु झाला निर्माण । जाणती कळा सत्वगुण । जो करिताहे पाळण । त्रैलोक्याचें ॥७॥ पुढें जाणीव नेणीव मिश्रित । ब्रह्मा जाणावा नेमस्त । त्याच्या गुणें उत्पत्ति होत । भुवनत्रयीं ॥ ८ ॥ पुढें रुद्र तमोगुण । सकळसंहाराचें कारण । सक- ळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ ९ ॥ तेथूनि पुढें पंचभूतें । पावलीं स्पष्टदशेतें । अष्टधा प्रकृतीचें स्वरूप तें । मुळींच आहे ॥ १० ॥ निश्चळीं १. सत्ता, धर्म, यश, संपत्ति, ज्ञान, आणि वैराग्य या सहा गुणांनीं युक्त. २. खालीं; संसारोत्पत्तीकडे. ३. दृश्य रूपास.
२८४ श्रीदासबोध. [ दशक झालें चळण । तेंचि वायूचें लक्षण । पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा ॥ ११ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहावा महिमा । त्या आका- शापासून जन्मा । वायु आला ॥ १२ ॥ तया वायूच्या दोन्ही झुळुका । उष्ण शीतळ ऐका । शीतळापासुनि तारा मृगांका¹ । जन्म जाहला ॥ १३ ॥ उष्णापासून रवि वन्ही । विद्युल्लता आदिकरूनी । शीतळ उष्ण मिळोनी । तेज जाणावें ॥ १४ ॥ तया तेजापासून झालें आप । आप आळोनि पृ- थ्वीचें रूप । पुढें औषधी अमूप । निर्माण जाहल्या ॥ १५ ॥ औषधींपा- सून नाना रस । नाना बीजें अन्नरस । चौऱ्यांशी लक्ष योनींचा वास । भूमं- डळीं ॥ १६ ॥ ऐशी झाली सृष्टिरचना । विचार आणिला पाहिजे मना । प्रत्ययेंविण अनुमाना² । पात्र होइजे ॥ १७ ॥ ऐसा झाला आकार । येणेंचि न्यायें संहार । सारासार विचार । यासि बोलिजे ॥ १८ ॥ जें जें जेथूनि निर्माण झाल
१२ वा.] विषयत्याग. २८५ बोलीं लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला । एक साहेब¹ नसतां कोणाला । मुशारा मागावा ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके सृष्टिकमानिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. विषयत्याग. श्रीगणेशाय नमः ॥ न्यायनिष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें । मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥ बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवीत गेले । विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥ बोलणें एक चालणें एक । त्याचें नांव हीनविवेक² । येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥ विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं । ऐसें बोलणें ठायीं ठायीं । बरें पाहा ॥ ४ ॥ प्रपंची खाती जेविती । परमार्थी काय उपास करिती । उभयतां सारखे दिसती । विषयाविषयीं ॥ ५ ॥ देह चालतां विषयत्यागी । ऐसा आहे कोण जगीं । त्याचा निर्वाह मजलागीं । देवें निरूपावा ॥ ६ ॥ विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा । ऐसें पाहतां गोवां । दिसतो कीं ॥ ७ ॥ ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता झाला । सावध होऊन मन घाला । एतद्विषयीं ॥ ८ ॥ वैराग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग । प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥ मार्गे ज्ञानी होऊन गेले । तिहीं बहुत कष्ट केले । तरी मग विख्यात झाले । भूमंडळीं ॥ १० ॥ येरें मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न करितांचि मेलीं । कित्येक तीं भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥ वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं । शुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचें ॥ १२ ॥ ऐसे प्रकारिचे जन । आपणांस म्हणती सज्जन । पाहों जातां अनुमान³ । अवघेंच दिसे ॥ १३ ॥ जयास नाहीं अनुताप⁴ । हेंच एक पूर्व पाप । क्षणक्षणा विक्षेप⁵ । पराधिकपणें ॥ १४ ॥ मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जनां । खात्यास न खातें देखों शकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥ भाग्य पुरुष थोरथोर । त्यांस निंदिती दिवाळखोर । सांवास देखतां चोर । चरफडी जैसा ॥ १६ ॥ वैराग्या परतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य । १. धनी. २. विचारशून्य. ३. संशय. ४. वैराग्य. ५. मनाचें चांचल्य.
२८६ श्रीदासबोध. [ दशक वैराग्य नसतां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥ प्रत्ययज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी । तो जाणिजे महायोगी । ईश्वरी पुरुष ॥ १८ ॥ अष्टसिद्धींची उपेक्षा । करून घेतली योगदीक्षा । घरोघरीं मागें भिक्षा । महादेव ॥ १९ ॥ ईश्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी । म्हणोनियां सगटसरी । होत नाहीं ॥ २० ॥ उदासवृत्ति आणि विवेक । त्यासि शोधिती सकळ लोक । जे लालची मूर्ख रंक । ते दैन्यवाणे ॥ २१ ॥ जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्ट झाले । विचार करूं विसरले । विषयलोभी ॥ २२ ॥ भजन तरी आवडेना । पुरश्चरण सहसा घडेना । भल्यास त्यास पटेना । एक निमिष ॥ २३ ॥ वैराग्यें करून भ्रष्टेना । ज्ञान भजन सोडीना । व्युत्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥ कष्ट करितां शेत पिके । उंच वस्तु तत्काळ विके । जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥२५॥ येर तें अवघेंच मंदलें । दुराशेनें खोटें झालें । कानकोंडें ज्ञान केलें । भ्रष्टाकार ॥ २६ ॥ सकळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें । विषयत्यागाचीं लक्षणें । वोळखावीं ऐसीं ॥२७॥ सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव । विवेकाचा अभिप्राय । विवेकी जाणती ॥२८॥ शूरत्वविषयीं खडतर । त्यास मानिती लहान थोर । कामगार आणि अंगचोर । एक कैसा ॥ २९ ॥ त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे । पिंड ब्रह्मांड सकळ जाणे । यथायोग्य ॥ ३०॥ ऐसा जो सर्व जाणता । उत्तम लक्षणीं तो पुरता । तयाचेनि सार्थकता । सहजचि होय ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे द्वादशदशके विषयत्यागनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. काल. श्रीगणेशाय नमः ॥ मूळ माया जगदीश्वर । पुढें अष्टधेचा विचार । सृ- ष्टिकमें आकार । आकारला ॥ १ ॥ हें अवघेंच नसतां निर्मळ । जैसें ग- गन अंतराळ । निराकारीं काळ वेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥ उपाधीचा विस्तार झाला । तेणें काळ दिसोन आला । येन्हवीं पहातां काळाला । ठा- वचि नाहीं ॥ ३ ॥ एक चंचल एक निश्चळ । या वेगळा कोठें सकळ । चं- १. अनुभवी. २. वैराग्यशील. ३. शास्त्रज्ञानी. ४. विलासाचे; आकर्षक.
१२ वा.] काल. २८७ चळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥ आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास । त्या विलंबरूप काळास । जाणोन घ्यावें ॥ ५ ॥ सूर्याकरितां विलंब कळे¹ । गणना सकळांची आकळे । पळापासून निवडेले । युगपर्यंत ॥ ६ ॥ पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष² मास । षण्मास वर्ष युगास । ठाव जाहला ॥ ७ ॥ कृत त्रेत द्वापार केली । संख्या चालली भूमंडळीं । देवाचीं आयुष्यें आगळीं³ । शास्त्रीं निरूपिलीं ॥ ८ ॥ ते देवत्र- याची खटपट । सूक्ष्मरूपें विलगट । दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥ मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना । कोण थोर कोण शहाणा । कैसा म्हणावा ॥ १० ॥ असो हें जाणत्याचीं कामें । नेणता उगाचि गुंते भ्रमें । प्रत्यय जाणोनि वर्में । ठायीं पाडावीं ॥ ११ ॥ उत्पत्तिकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संहारकाळ । आद्यंत अवघा काळ । विलंबरूप ॥ १२ ॥ जें जें जये प्रसंगीं झालें । तेथें काळाचें नांव पडलें । बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥ पर्जन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोशकाळ । सुखदुःख आनंदकाळ । प्रत्यय येतो ॥ १४ ॥ प्रातः- काळ मध्यान्हकाळ । सायंकाळ वसंतकाळ । पर्वकाळ कठिणकाळ । जा- णिजे लोकीं ॥ १५ ॥ जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृद्धापकाळ । अंतकाळ विषमकाळ । वेळरूपें ॥ १६ ॥ सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोष- काळ पुण्यकाळ । सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥ असतें एक वाटतें एक । त्याचें नांव हीनविवेक । नाना⁴ प्रवृत्तीचे⁵ लोक । प्र- वृत्ति जाणती ॥ १८ ॥ प्रवृत्ति चाले अधोमुखें । निवृत्ति धावें ऊर्ध्वमुखें । ऊर्ध्वमुखें नानामुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥ ब्रह्मांडरचना जेथूनि झाली । तेथें विवेकी दृष्टि घाली । विवरतां विवरतां लाधली । पूर्वापार स्थिति ॥ २० ॥ प्रपंचीं असोन परमार्थ पाहे । तो हे स्थितींतें लाहे । प्रारब्धयोगें- करून राहे । लोकांमध्ये ॥ २१ ॥ सकळांचें एकाचि मूळ । एक जाणते एक बाष्कळ । विवेकेंकरून तात्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥ तरीच जन्माचें सार्थक । भले पाहती उभयलोक । कारण मूळींचा विवेक । केला पाहिजे ॥ २३ ॥ विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान । त्यांचें ऐकतां १. ओळखते २. पंधरवडा. ३. अधिक. ४. निरनिराळी. ५. व्यवहाराचे.
भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥ बरें आमचें काय गेलें । जें केलें तें फळास आलें । पेरिलें तें उगवलें । भोगती आतां ॥ २५॥ पुढेंहीू करी तो पावे । भक्ति- योगें भगवंत फावे । देवभक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥ कीर्ति करून मेले । उगेचि आले आणि गेले । शाहाणे होऊन अमले । काय सांगावें ॥ २७॥ येथील येथें अवघेंचि राहतें । ऐसें प्रत्ययास येतें । कोण काय घेऊनि जातें । सांगाना कां ॥ २८ ॥ ¹पैदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकाश । येणें करितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥ जगदीशपरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं । संसार करित असतांही । समाधान ॥ ३० ॥ मागां होते जन- कादिक । राज्य करितही अनेक । तैसेचि आतां ²पुण्यश्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥ राजा असतां मृत्यु आला । लक्ष कोटी कबूल झाला । तरी सो- डीना तयाला । मृत्यु कांहीं ॥ ३२ ॥ ऐसें पराधीन जिणें । यामध्यें दुखणें वाहणें । नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनी ॥ ३३ ॥ ³हाट भरला संसाराचा । नफा पहावा देवाचा । तरीच या कष्टाचा । परिहार होतो ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके कालनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. यत्नशिक्षा. श्रीगणेशाय नमः ॥ दुर्बळ ⁴नैचारी वोडगस्त । आळसी खादाड ऋण- ग्रस्त । मूर्खपणें अवघें अव्यवस्थ । कांहींच नाहीं ॥ १ ॥ खाया नाहीं जे- वाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं । आंथराया नाहीं पांघराया नाहीं । खोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥ सोयरें नाहीं धायरें नाहीं । इष्ट नाहीं मित्र नाहीं । पाहतां कोठें ओळख नाहीं । आश्रयेंविण परदेशी ॥ ३ ॥ तेणें कैसें करावें । काय जीवेसि धरावें । वांचावें कीं मरावें । कोणत्या प्रकारें ॥ ४ ॥ ऐसें कोणी एकें पुसिलें । कोणी एकें उत्तर दीधलें । श्रोतीं सावध ऐकिलें । पाहिजे आतां ॥ ५ ॥ लहान थोर काम नाहीं । केल्याविणें होत नाहीं । करंट्या सावध पाहीं । ⁵सदैव होसी ॥ ६ ॥ अंतरीं नाहीं सावधानता । यत्न ठाकेना पुरता । सुख संतोषाची वार्ता । येथें कैंची ॥ ७ ॥ म्हणोनि
१. सर्व वस्तूंबर. २. पुण्यवान् महात्मे. ३. बाजार. ४. दुर्वर्तनी. ५. भाग्यवान्.
१२ वा. ] यत्नशिक्षा. २८९ आळस सोडावा । यत्न साक्षेपें जोडावा । दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ८ ॥ १] प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरोंनि करावें । नित्य नेमें करावें । पाठांतर ॥ ९ ॥ मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट । बाष्कळपणाची वटवट । करूंांच नये ॥ १० ॥ दिशेकडे दुरी जावें । शुचि- ष्मंत होऊन यावें । येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥ धूत- वस्त्रें घालावीं पिळून । करावें चरणक्षालनें । देवदर्शन देवतांचें । यथा- सांग ॥ १२ ॥ कांहीं फळाहार घ्यावा । पुढें व्यवसाय करावा । लोक आ- पला परावा । म्हणत जावा ॥ १३ ॥ सुंदर अक्षर ल्याहावें । स्पष्ट नेमस्त वाचावें । विवरविवैरोनी जाणावें । अर्थांतरें ॥ १४ ॥ नेमस्त नेटकें पुसावें । विशद करून सांगावें । प्रत्ययेंविण बोलावें । तेंचि पाप ॥ १५ ॥ सावधा- नता असावी । नीति मर्यादा राखावी । जनास माने ऐसी करावी । क्रिया शुद्ध ॥ १६ ॥ आलियाचें समाधान । हरिकथा निरूपण । सर्वदा प्रसंग पाहून । वर्तत जावें ॥ १७ ॥ ताळ घाटी मुद्रा शुद्ध । अर्थप्रमेय अन्वय शुद्ध । गद्य पद्य दृष्टांत शुद्ध । अन्वयाचे ॥ १८ ॥ गाणें वाजवणें नाचणें । हस्तन्यासें दाखवणें । सभारंजनें वचनें । आडकथा छंदबंध ॥ १९ ॥ बहु- तांचें समाधान राखावें । बहुतांस मानेल तें करावें । विलगं पडोंचि न द्यावें । कथेमध्यें ॥ २० ॥ लोकांसि उदंड वाँजी आणूं नये । लोकांचें उक- लावें हृदय । तरी मग स्वभावेंचि होय । नामघोष ॥ २१ ॥ भक्ति ज्ञान वैराग्य योग । नाना साधनांचे प्रयोग । जेणें तुटे भवरोग । मननमात्रें ॥२२॥ तैसें बोलणें बोलावें । तैसेंच चालणें चालावें । मग महंतलीला स्वभावें । अंगीं वाणे ॥ २३ ॥ युक्तीविण साजिरा योग । तो दुराशेचा रोग । संग- तीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ॥ २४ ॥ ऐसें न करावें सर्वथा । जनास पाववूं नये व्यथा । हृदयीं चिंतावें समर्था । रघुनाथजीसी ॥ २५ ॥ उदास- वृत्तीस मानवे जन । विशेष कथानिरूपण । रामकथा ब्रह्मांड भेदून । पैलाडं न्यावी ॥ २६ ॥ सांगं महंती संगीत गाणें । तेथें वैभवास काय उणें । नभामाजी तारांगणें । तैसे लोक ॥ २७ ॥ अक्कलबंद नाहीं जेथें । अवघेंचि १. प्रातःस्मरण. २. पाय धुणें. ३. विचार करकरून. ४. अर्थाचे मर्म. ५. हाताचे हावभाव. ६. उणें. ७. कंटाळा. ८. निस्पृहपणास. ९. पलीकडे. १०. पूर्ण.
२९० श्रीदासबोध. [ दशक विस्कळित तेथें । एके अकलेविण तें । काय आहे ॥ २८ ॥ घालून अकलेचा पंवाड १ । व्हावें ब्रह्मांडाहून वाड २ । तेथें कैचें आणिलें द्वाड । करंटपण ॥२९॥ येथें आशंका फिटली । बुद्धि यत्नीं प्रवेशली । कांहीं एक आशा वाढली । अंतर्यामीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके यत्न- शिक्षानिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. उत्तमपुरुषनिदर्शन. श्रीगणेशाय नमः ॥ आपण यथेष्ट जेवणें । उरलें अन्न तें वांटणें । परंतु वायां दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥ तैसें ज्ञानें तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनांस सांगावें । तरतेनें बुडों न द्यावें । बुडतयासी ॥२॥ उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे । वर्तल्याविण बोलावें । ते शब्द मिथ्या ॥३॥ स्नान संध्या देवतार्चन । एकाग्र करावें जपध्यान । हरिकथा निरूपण । केलें पाहिजे ॥ ४ ॥ शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें । उणें पडों न द्यावें । कोणी एकाचें ॥ ५ ॥ अडलें गांजलें जाणावें । यथा- शक्ति कामास यावें । मृदुवचन बोलत जावें । कोणी एकासी ॥ ६ ॥ दुस- ऱ्याचे दुःखें दुःखी व्हावें । परसंतोषें सुखी व्हावें । प्राणिमात्रास मेळवून घ्यावें । बरव्या शब्दें ॥ ७ ॥ बहुतांचे अन्याय क्षमावे । बहुतांचे कार्यभाग करावे । आपल्यापरी व्हावे । पौरिखे ३ जन ॥ ८ ॥ दुसऱ्याचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें । लोकांस परीक्षीत जावें । नानाप्रकारें ॥ ९ ॥ नेम- केंचि बोलावें । तात्काळचि प्रतिवचन द्यावें । कदापि रागासि न यावें । क्षमारूपें ॥ १० ॥ आळस अवघाच दवडावा । यत्न उदंडचि करावा । शब्द- मत्सरें ४ न करावा । कोणी एकाचा ॥ ११ ॥ उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा । शब्द निवडून बोलावा । सावधपणें करीत जावा । संसार आपुला ॥ १२ ॥ मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीसी सादर व्हावें । मरोन कीर्तीस उर- वावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥ नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों आला । सर्व आर्जवी तयाला । काय उणें ॥ १४ ॥ ऐसा उत्तमगुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष । जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होय ॥ १५॥ उदंड १. विस्तार. २. मोठें. ३. परकी, दुसरे. ४. अर्थ न पाहतां शब्दवाद करणें.
१२ वा. ] उत्तमपुरुषनिदर्शन. २९१ धिक्कारून बोलती । तरी चळों न द्यावी शांती । दुर्जनासि मिळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥ उत्तम गुणीं शृंगारिला । ज्ञानवैराग्यें शोभला । तोचि एक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥ स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें सोशीत जावें । झिजोन कीर्तीसीं उरवावें । नानाप्रकारें ॥ १८ ॥ कीर्ति पाहूं जातां सुख नाहीं । सुख पाहतां कीर्ति नाहीं । विचारेंविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ १९ ॥ १परांतरास न लावावा धक्का । कदापि पडों न द्यावा चुका । क्षमाशील तयाच्या २तुकों । कोण नाहीं ॥ २० ॥ आपलें अ- थवा परावें । कार्य अवघेंचि करावें । प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित नव्हे ॥ २१ ॥ बरें बोलतां सुख वाटतें । हें तों प्रत्यक्ष कळतें । ३आत्मवत् परा- वें तें । मानीत जावें ॥ २२ ॥ कठिन शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें । तरी मग वाईट बोलावें तें । काय निमित्त ॥ २३ ॥ आपणास चि- मटा घेतला । तेणें कासावीस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखीत जावें ॥ २४ ॥ जे दुसऱ्यास दुःख करी । ते अपवित्र ४वैखरी । आपणास घात करी । कोणी एके प्रसंगीं ॥ २५ ॥ पेरीलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें । तरी मग कर्कश बोलावें तें । काय निमित्त ॥ २६ ॥ आपुल्या ५पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षसी क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणि कठिन वचन । हें अज्ञा- नाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥ जो उत्तमगुणें शोभला । तोचि पुरुष महा भला । कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥ क्रिये- विण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचें वमन । भले तेथें अवलोकन । कदापि न करिती ॥ ३० ॥ मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अगत्य धरणें । तया महापुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥ ऐसा जो ६महानुभाव । तेणें करा- वा समुदाय । भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥ आपण अवचितें मरून जावें । मग भजन कोणें करावें । या कारणें भजनास लावा- वे । बहुत लोक ॥ ३३ ॥ आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्या- सी । आपणा मागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥ या कारणें समुदा-
१. दुसऱ्याच्या अंतःकरणास. २. तुलनेस. ३. आपल्याप्रमाणें. ४. वाणी. ५. सामर्थ्यानें. ६. थोर प्रतापाचा पुरुष.
२९२ श्रीदासबोध. [ दशक व । झाला पाहिजे महोत्सव । हातोपातीं देवाधिदेव । वोळसा करावा ॥ ३५ ॥ आतां समुदायाकारणें । पाहिजेत दोन्ही लक्षणें । श्रोतीं येथें साव- धपणें । मन घालावें ॥ ३६ ॥ जेणें बहुतांस घडे भक्ती । ते हे रोकडी प्रबोधशक्ती । बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥ मागों बोलिले उत्तम गुण । तयांस मानिती प्रमाण । प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें चाले ॥ ३८ ॥ बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून बोलणें । तयांचीं वच- नें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥ जें जनासी मानेना । तें आपले न ये मना । आपण एकला जन नाना । सृष्टीमध्यें ॥ ४० ॥ म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिष्य करावे । हळू हळू शेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१ ॥ परंतु हीं विवेकाचीं कामें । विवेकी करतील नेमें । इतर ते बापुडे भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥ बहुतांसि भांडतां एकला । सैन्यावांचून पुरवला । या कारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके उत्तमपुरुषनिदर्शननिरूपणं नाम दशमः स- मासः ॥ १० ॥ ओंवी २९४. दशक तेरावा. १. आत्मानात्मविवेक. श्रीगणेशाय नमः ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा । विवरोन सदृढ धरावा । जीवामध्यें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण । त्यांचें करावें विवरण । तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ॥ २ ॥ चारी खाणी चारी वाणी । चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी । संख्या बोलिली पुराणीं । वर्तती आतां ॥ ३ ॥ नाना प्रकारचीं शरीरें । वर्ततां दिसती अपारें । तयां- मध्यें निर्धारें । आत्मा कवण ॥ ४ ॥ दृष्टीमध्यें पाहतो । श्रवणामध्यें ऐक- तो । रसनेमध्यें स्वाद घेतो । प्रत्यक्ष आतां ॥ ५ ॥ घ्राणामध्यें वास घेतो । सर्वांगीं तो स्पर्शतो । वाचेमध्यें बोलवितो । जाणोनि शब्द ॥ ६ ॥ सावधा- १. ताबडतोब. २. उपदेशशक्ति. ३. आत्मा कोण व अनात्मा कोण हा विचार.
१३ वा. ] आत्मानात्मविवेक. २९३ न आणि चंचळ । चहूंकडे चळवळ । एकलाचि चालवी सकळ । इंद्रियद्वारें ॥ ७ ॥ पाय चालवी हात हालवी । अुकुटी पालवी डोळा घालवी । संकेत खुणा बोलवी । तोचि आत्मा ॥ ८ ॥ धिटांवी लाजवी खाजवी । खोकवी ओकवी थुंकवी । अन्न जेवून उदक सेवी । तोचि आत्मा ॥ ९ ॥ मळमूत्र- त्याग करी । शरीर मात्र सांवरी । प्रवृत्ति निवृत्ति विवरी । तोचि आत्मा ॥ १० ॥ ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारें वोळखे । संतोष पावे आणि धोंके । तोचि आत्मा ॥ ११ ॥ आनंद विनोद उद्वेग चिंता । काया छाया माया ममता । आत्मत्वें पावे समता । तोचि आत्मा ॥ १२ ॥ पदार्थांची आस्था धरी । जनीं वाईट बरें करी । आपल्यां राखे पराय्यां मारी । तोचि आत्मा ॥ १३ ॥ युद्ध होतां दोन्हीकडे । नाना शरीरीं वावडे । परस्परीं पाडी पडे । तोचि आत्मा ॥ १४ ॥ तो येतो जातो देहीं वर्ततो । हांसतो [L
२९४ श्रीदासबोध. [ दशक वरी । ब्रह्मादि पिपीलिका देह धरी¹ । नित्यानित्यविवेक चतुरीं । जाणिजे ऐसा ॥ २७ ॥ जड तितुकें अनित्य । आणि सूक्ष्म तितुकें नित्य । यांहि मध्यें नित्यानित्य । पुढें निरूपिलें ॥ २८ ॥ स्थूल सूक्ष्म वोलांडिलें । कार- ण महाकारण सांडिलें । विराट हिरण्यगर्भ खांडिलें । विवेकानें ॥ २९ ॥ अव्याकृत मूळप्रकृती² । तेथें जाऊन बैसली वृत्ती । ते वृत्ती व्हावया निवृ- त्ती । निरूपण ऐका ॥ ३० ॥ आत्मानात्मविवेक बोलिला । चंचल आत्मा प्रत्यया आला । पुढिलिये समासीं निरूपिला । सारासारविचार ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके आत्मानात्मविवेकनिरू- पणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. सारासारविचार. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका सारासारविचार । उभारलें जगडंबर³ । त्यांत कोण सार कोण असार । विवेकें ओळखावें ॥ १ ॥ दिसेल तें नासेल । आ- णि येईल तें जाईल । जें असतांचि असेल । तेंचि सार ॥ २ ॥ मागां आ- त्मानात्मविवेक बोलिला । आत्मा वोळखून सांडिला । आत्मा जाणतां लागला । मुळींचा तंतू ॥ ३ ॥ मुळीं जे राहिली वृत्ती । ते झाली पाहिजे निवृत्ती । सारासारविचार श्रोतीं । बरा पहावा ॥ ४ ॥ नित्यानित्यविवेक केला । आत्मा नित्यसा निवडिला । निवृत्तिरूपें हेत उरला । निर्विकारीं ॥ ५ ॥ हेत म्हणजे तो चंचल । निर्गुण म्हणजे तें निश्चळ । सारासारवि- चारें चंचल । होऊन जातें ॥ ६ ॥ चले म्हणोनि तें चंचल । न चले म्हणो- नि निश्चळ । निश्चळीं उडे चंचल । निश्चयेंसी ॥ ७ ॥ ज्ञान आणि उपासना⁴ । दोन्ही एकचि पहाना । उपासनेकरितां जना । जगदुद्धार ॥ ८ ॥ द्रष्टा सा- क्षी जाणता । ज्ञानघन चैतन्य सत्ता । ज्ञान देवचि तत्वता । बरें पाहा ॥ ९ ॥ त्या ज्ञानाचें विज्ञान⁵ होतें । शोधून पाहावें बहुमतें । चंचल अवघें नासतें । येणेंप्रकारें ॥ १० ॥ नाशवंत नासेल कीं नासेना । ऐसें अनुमानाचि आहे । मना । तरी तो पुरुष सहसा ज्ञाना । अधिकारी नव्हे ॥ ११ ॥ नित्य नि- १. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व देह धारण करितो. २. माया, आदिशक्ति. ३. जगाचा पसारा. ४. भक्ति. ५. साक्षात्कार.
१३ वा. ] सारसारविचार. २९५ श्रय केला । संदेह उरतचि गेला । तरी तो जाणावा वाहवला । मायामृग- जळीं ॥ १२ ॥ क्षयचि नाहीं जो अक्षयी । व्यापकपणें सर्वो ठायीं । तेथें हेतु संदेह नाहीं । निर्विकारीं ॥ १३ ॥ जें उदंड घनदाट । आद्य मध्य शेवट । अचळ अढळ अतुट । जैसें तैसें ॥ १४ ॥ पाहतां जैसें गगन । गगनाहून तें सघन । जनचि नाहीं । निर्जन । सदोदित ॥ १५ ॥ चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तो अवघा पूर्वपक्ष । निर्गुण ठायींचें अलक्ष । लक्षवेना ॥ १६ ॥ संग- त्यागेंविण कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । संगत्याग करुनि पाही । मौनें- गर्भ ॥ १७ ॥ निरसितां अवघेंचि निरसिलें । चंचल तितुकें निघोन गेलें । निश्चळ परब्रह्म उरलें । तेंचि सार ॥ १८ ॥ आठवा देह मूळमाया । निरसो- नि गेल्या अष्टकाया । साधु सांगती उपाया । कृपाळूपणें ॥ १९ ॥ सोहहंस तत्वमसी । तें तूं ब्रह्म आहेसी । विचार पाहतां स्थिति ऐसी । सहजाचि होते ॥ २० ॥ साधक असोन ब्रह्म उरलें । तेथें वृत्तिशून्य झालें । सारासार विचारिलें । येणें प्रकारें ॥ २१ ॥ तें तापेना ना निवेना । तें उजळेना ना काळवंडेना । ढहुळेना ना वितळेना । परब्रह्म तें ॥ २२ ॥ तें भिजेना ना वाळेना । तें विझेना ना जळेना । जयास कोणीच नेईना । परब्रह्म तें ॥ २३ ॥ दिसेना ना भासेना । उपजेना ना नासेना । तें येईना ना जाईना । परब्रह्म तें ॥ २४ ॥ जें सन्मुखचि चहूंकडे । जेथें दृश्यभास उडे । धन्य साधु तो पेंहुडे । निर्विकारीं ॥२५॥ निर्विकल्प कल्पनातीत । तोचि ओख- खावा संत । येर अवघेंचि असंत । भ्रमरूप ॥ २६ ॥ खोटें सांडून खरें घ्यावें । तरीच परीक्षवंत म्हणावें । असार सांडून सार घ्यावें । परब्रह्म तें ॥ २७ ॥ जाणतां जाणतां जाणीव जाते । आपली वृत्ती तद्रूप होते । आत्म- निवेदनी भक्ती ते । ऐसी आहे ॥ २८ ॥ वाच्यांशें मुक्ति मुक्ति बोलावी । लक्ष्यांशें तद्रूपता विवरावी । विवरितां हेतु नुरवी । ते तद्रूपता ॥ २९ ॥ सद्रूप चिद्रूप आणि तद्रूपं । स्वरूप म्हणिजे आपुलें रूप । आपलें रूप म्ह- णिजे अरूप । तत्त्वनिरसना उपरी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसं- वादे त्रयोदशदशके सारसारविचारनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ १. अखंड. २. निर्जन. ३. निरास होणारा विचार. ४. शब्दरहित ब्रह्म. ५. विश्रांति घेतो. ६. क्षणभंगुर. ७. नित्य. ८. ज्ञानरूप. ९. एकरूप.
२९६ श्रीदासबोध. [ दशक ३. उभारणी. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहूनि विशाल । निर्मळ आणि निश्चळ । निर्विकारी ॥ १ ॥ ऐसें असतां कित्येक काळ । तेथें आरंभिला भूगोल । तया भूगोळाचें मूळ । सावध ऐका ॥ २ ॥ परब्रम्ह असतां निश्चळ । तेथें संकल्प उठिला चंचल । तयास बोलिजे केवळ । आदिनारायण ॥ ३ ॥ मूळमाया जगदीश्वर । त्यासि म्हणिजे षड्गुणेश्वर । अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥ ऐलीकडे गुणक्षोभिणी १ । तेथें जन्म घेतला त्रिगुणीं । मूळ ओंकाराची मांडणी । तेथूनि जाणावी ॥ ५ ॥ अकार उकार मकार । तिन्ही मिळोन ओंकार । पुढें पंचभूतांचा विस्तार । विस्तारला ॥ ६ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्म्यासी । तयापासोनि जन्म वायूसी । तया वायूपासून तेजासी । जन्म जाहला ॥ ७ ॥ वायूचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे । सूर्यबिंब तें प्रगटे । तथें ठायीं ॥ ८ ॥ वारा वाजतो शीतल । तेथें निर्माण झालें जल । तें जल आळोनि भूगोल । निर्माण झाला ॥ ९ ॥ त्या भूगोळाचे पोटीं । अनंत बीजांचिया कोटी । पृथ्वीपाण्या होतां भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥ पृथ्वीवरी वल्ली नानारंग । पत्र पुष्पांचे तरंग । नाना स्वाद तेथें मग । फलें जाहलीं ॥ ११ ॥ पत्रें पुष्पें फलें मूळें । नाना वर्ण नाना रसाळें । नाना धान्यें अन्नं केवळें । तेथून जाहलीं ॥ १२ ॥ अन्नापासुनि झालें रेत । रेतापासून प्राणी निपजत । ऐसी हे रोकडी प्रचीत २ । उत्पत्तीची ॥ १३ ॥ अंडज जारज स्वेदज उद्भिज । पृथ्वी पाणी सकळांचें बीज । ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥ चारी खाणी चारी वाणी । चौऱ्यायंशी लक्ष जीवयोनी । निर्माण झाले लोक तिन्ही । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥ मुळीं अष्टधा प्रकृती । अवघे पाण्यापासून जन्मती । पाणी नसतां मरती । सकळ प्राणी ॥ १६ ॥ नव्हे अनुमानाचें बोलणें । याचा बरा प्रत्यय घेणें । वेद शास्त्रे पुराणे । प्रत्ययें घ्यावी ॥ १७ ॥ जें आपल्या प्रत्यया येईना । तें अनुमानिक घ्यावें ना । प्रत्ययेंविण सकळ जना । व्यवसाय नाहीं ॥ १८ ॥ व्यवसाय प्रवृत्ति निवृत्ति । दोहोंकडे पाहिजे प्रचीती । प्रचीतीविण अनुमानें असती । ते विवेकहीन ॥ १९ ॥ ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकलित ३
१. त्रिगुणांना प्रगट करणारी. २. निश्चितपणा. ३. संक्षेपानें.
१३ वा.] प्रलय. २९७ बोलिला प्रकार । आतां विस्ताराचा संहार । तोही ऐका ॥ २० ॥ मुळा- पासून शेवटवरी । अवघा अंतरात्माचि करी । करी आणि विवरी । यथा- योग्य ॥ २१॥ पुढें संहार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला । इतुक्त्या उपरी झाला । समास पूर्ण ॥ २२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके उभारणीनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. प्रलय. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत । ऐसा समाचार साद्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥ शतवर्ष अनावृष्टी । तेणें जळेल हे सृष्टी । पर्वत माती ऐसी पृष्ठी² । भूमीची तडके ॥ २ ॥ बारा कळीं सूर्यमंडळा । किरणापासूनी निघती ज्वाळा । शत वर्षें भूगोळा । दहन होय ॥ ३ ॥ सिंदूरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरां³ । तो आहोंळोन⁴ सरारां । विष वमी ॥ ४ ॥ त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें पाताळें जळती । महापावकें⁵ भस्म होती । पाताळलोक ॥ ५ ॥ तेथें महा- भूतें खवळती । प्रलयवात सुटती । प्रलयपावक वाढती । चहूकडे ॥ ६ ॥ तेथें अक्रा रुद्र खवळले । बारां⁶ सूर्य कडाडिले । पावकमात्र एकवटिले । प्रलयकाळीं ॥ ७ ॥ वायु विजांचे तडाके । तेथें पृथ्वी अवघीच तडके । कठिनत्व अवघेंचि फांके । चहूकडे ॥ ८ ॥ तेथें मेरूची कोण गणना । कोण सांभाळील कोणा । चंद्र सूर्य तारागणा । मूस जाहली ॥ ९ ॥ पृथ्वीनें विरी⁷ सांडिली । अवघी धगधगायमान झाली । ब्रह्मांडभट्टी जळोन गेली । एकसरा ॥ १० ॥ जळानें विरी⁷ सांडिली । विशेष महावृष्टि झाली । तेणें पृथ्वी मिळाली । जळामध्यें ॥ ११ ॥ भाजला चुना जळीं विरे । तैसा पृथ्वीस धीर न धरे । विरी सांडूनियां त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥ शेष कूर्म वराह गेला । पृथ्वीचा आधार तुटला । सैंधव सांडून जळाला । मिळोन गेली ॥ १३ ॥ तेथें प्रलयमेघ उचलले । कठिन घोरें गर्जिन्नले । अखंड १. नासतील. २. पृष्ठभाग. ३. शेषाला. ४. पोळून जाऊन ५. प्रलयाग्नीनें. ६. मित्र, रवि, सूर्य, भानु, खग, पूषा, हिरण्यगर्भ, मरीचि, आदित्य, सविता, अर्क, व भास्कर हे बारा सूर्य. ७. शक्ति, जिवटपणा.
विजा कडकडिले । ध्वनि घोष ॥ १४ ॥ पर्वतप्राय पडती गारा । पर्वत उडती ऐसा वारा । निबिड तया अंधकारा । उपमाच नाहीं ॥ १५ ॥ सिंधु नद्या एकवटल्या । भेणें नभींहूनि रिचवल्या । संधी नाहीं धारा मिळाल्या अखंड पाणी ॥ १६ ॥ तेथें मत्स्य कूर्म सर्प पडती । पर्वतासारखे दिसती गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥ सप्त सिंधु आवरणीं गेले आवरण वेढे मोकळे झाले । जळरूप झालिया खवळले । प्रलयपावक ॥ १८ ॥ ब्रह्मांडा ऐसा तप्त लोहो । शोषी जलाचा समूहो । तैसें जळ झालें पाहो । अपूर्व मोठें ॥ १९ ॥ तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य माजला वन्ही । तया वन्हीस केली झडपणी । प्रलयवातें ॥ २० ॥ दीपासी पालवें घातला । तैसा प्रलयपावक विझाला । पुढें वायु प्रबळला । असं- भाव्य ॥ २१ ॥ उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा । पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥ महद्भूत मूळमाया । विस्मरणें वितुळे काया । पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं ॥ २३ ॥ दृश्य हलक- ल्लोळें नेलें । जड चंचळ वितुळलें । या उपरि शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रलयनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. काहाणी. श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन । कालक्रमणे लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥ श्रोता पुसे वक्तयासी । का- हणी सांगा बरवीसी । वक्ता म्हण श्रोतयांसी । सावध ऐका ॥ २ ॥ एक स्त्रीपुरुषें होतीं । उभयतांमध्ये बहु प्रीती । एकरूपेंचि वर्तती । भिन्न नाहीं ॥ ३ ॥ ऐसा कांहींएक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता आणी भला । सर्वविषयीं ॥ ४ ॥ पुढें त्यासही झाला कुमर् । तो पित्याहून आतुर । कांहीं तदर्थ चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥ तेणें व्याप उदंड केला । बहुत कन्या पुत्र व्याला । उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥ त्याचा १. ओतल्या. २. फुंकर. ३. हाहाकारें. ४. प्रकृति व पुरुष. ५. सत्वगुण; विष्णु. ६. रजोगुण; ब्रह्मा. ७. चंचल. ८. बापाच्या निमे. ९. कर्तृत्वानें.
पुत्र जो ज्येष्ठ¹. तो अज्ञान आणि रागीट । अथवा चुकतां नीट । संहार करी ॥ ७ ॥ पिता² उगाच बैसला । लेकें³ बहुत व्याप केला । सर्व जाणता भला । ज्येष्ठ पुत्र⁴ ॥ ८ ॥ नातू त्याचें अर्थ जाणे । पणतूं तो कांहींच नेणे । चुकतांचि संहारणें । महाक्रोधी ॥ ९ ॥ लेंकें सकळांचें पाळण करी । नातू मेळवी वरच्या⁵वरी । पणतूं चुकल्या संहार करी । अकस्मात ॥ १० ॥ नेम- स्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि झाला । ऐसा बहुत काळ गेला । आनंदरूप ॥ ११ ॥ विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानीना । परस्परें किंतु मना । बहुत पडिले ॥ १२ ॥ उदंड घरकलह लागला । तेणें कित्येक संहार झाला । विपर्त⁶ पडिलें थोर थोरांला । बेबंद जाहलें ॥ १३ ॥ नेणपणें भरीं भरले । मग ते अवघे संहारले । जैसे यादव निमाले । उन्मत्त- पणें ॥ १४ ॥ बाप लेंकें नातू पणतूं । सकळांचा झाला निःपातु । कन्यापुत्र हेतुमातू⁷ । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥ ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्म- मृत्युपासून सुटला । श्रोता वक्ता धन्य झाला । प्रचीतीनें ॥ १६ ॥ ऐसी काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होते जाते । इतुकें बोलून गोसावी ते । निवांत जाहले ॥ १७ ॥ आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो । ऐसें हें बोलणें विवरो । कोणी तरी ॥ १८ ॥ चुकत वाकत आठवलें । तितुकें संकाळित बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥ ऐसी काहाणी निरंतर । विवेकें ऐकती नर । दास म्हणे जगदुद्धार । तेचि करिती ॥ २० ॥ त्या जगदुद्धाराचें लक्षण । केलें पाहिजे विवरण । सार निवडावें निरूपण । यासी बोलिजे ॥ २१ ॥ निरूपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्व- कोडें उकलावें । समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥ विवरोन पाहतां अष्टदेह । पुढें सहजाचि निःसंदेह । अखंड निरूपणें राहे । समाधान ॥ २३ ॥ तत्त्वांचा गलबला जेथें । निवांत कैसें असेल तेथें । या कारणें गुलि⁸- परतें । कोणी एकें असावें ॥ २४ ॥ ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद । पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके काहाणीनिरूपणं नाम पंचम समासः ॥ ५ ॥ १. तमोगुण; शंकर. २. मूळ पुरुष. ३. सत्त्वगुण; विष्णु. ४. रजोगुण; ब्रम्हा. ५. पुनःपुन्हा. ६. वांकडें. ७. कन्यापुत्रांचा हेतु किंवा गोष्ट. ८. गलबल्यापासून दूर.
३०० श्रीदासबोध. [ दशक ६. लघुबोध. श्रीगणेशाय नमः ॥ जे जे बोलिजेती पंचतत्त्वें । त्यांचीं अभ्यासावीं नांवें । तदुपरी स्वानुभवें । रूपें जाणावीं ॥ १ ॥ यामध्यें शाश्वत कोण । आणि अशाश्वत कोण । ऐसें करावें विवरण । प्रत्ययाचें ॥ २ ॥ पंचभूतांचा विचार । नांव रूप सारासार । तोचि बोलिजेल निर्धार । सावध ऐका ॥३॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । नांवें बोलिलीं सावकाश । आतां रूपाचा विश्वास । श्रवण करावा ॥ ४ ॥ पृथ्वी म्हणिजे ते धरणी । आप म्हणिजे तें पाणी । तेज म्हणिजे अग्नि तरणी² । सतेजादिक ॥ ५ ॥ वायु म्हणिजे तो वारा । आकाश म्हणिजे पैस सारा । आतां शाश्वत तें विचारा । आपुले मनीं ॥ ६ ॥ एक शीत चांचपावें । म्हणिजे वर्म पडे ठावें । तैसें थोडया अनुभवें । बहुत जाणावें ॥ ७ ॥ पृथ्वी रचते आणि खचते । हें तों प्रत्य- यास येतें । नाना रचना होत जाते । सृष्टीमध्यें ॥ ८ ॥ म्हणोन रचतें तें खचतें । आप तेंहि आटोन जातें । तेजहि प्रगटोन विझतें । वारेंही न राहे ॥ ९ ॥ अवकाश नाममात्र आहे । तेंहि विचारितां न राहे । एवं पांच- भौतिक राहे । हें तों घडेना ॥ १० ॥ ऐसा पांच भूतांचा विस्तार । नाश- वंत हा निर्धार । शाश्वत आत्मा निराकार । सत्य जाणावा ॥ ११ ॥ तो आत्मा कोणास कळेना । ज्ञानेंविण आकळेना । म्हणोनिया संतजनां । वि- चारावें ॥ १२ ॥ विचारितां सज्जनांसी । ते म्हणती कीं अविनाशी । जन्म मृत्यु आत्मयासी । बोलोंच नये ॥ १३ ॥ निराकारीं भासे आकार । आणि आकारीं भासे निराकार । निराकार आणि आकार । विवेकें ओळखावा ॥ १४ ॥ निराकार म्हणावा नित्य । आकार म्हणावा अनित्य । यासि बो- लिजे नित्यानित्य । विचारणा ॥ १५ ॥ सारीं भासे असार । आणि असारीं भासे सार । सारासार विचार । शोधून पाहतां ॥ १६ ॥ पांचभौतिक तें मा- यिक । परंतु भासे अनेक । आणि आत्मा एक । व्यापून असे ॥ १७ ॥ चहूं भूतांमध्ये गगन । तैसें गगनीं असे सघन³ । नेहैटून⁴ पाहतां अभिन्न⁵ । गगन आणि वस्तु ॥ १८॥ उपाधियोगेंचि आकाश । उपाधि नसतां निराभास । निरा-- १ शिंगणवाडी येथे शिवाजी महाराजांस श्रीसमर्थांनीं हा उपदेश केला, असें म्हणतात. २. सूर्य. ३. दाट. ४. बारकाईनें. ५. एकच.