दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
३ रा. ] कांताहरण. ५९
तंव तें मातेनें घेतलें । शंखेतीर्थ ॥ १९ ॥ ऐकोनि मिळाले लोक । उभे पाहती कौतुक । म्हणती बापास लेंक । कामा आले ॥ २० ॥ ज्यांकारणें केले नवस । ज्यांकारणें केले सायास । ते पुत्र मातापितयांस । मारिती पाहा ॥ २१ ॥ ऐसी आली पापकळी । आश्चर्य मानिलें सकळीं । उभे तोडिती केंळी । नागरिक लोक ॥ २२ ॥ पुढें बैसोन पांचजण । वांटे केले तत्समान । बापलेकांचें भांडण । तोडिलें तींहीं ॥ २३ ॥ बापास वेगळें घातलें । खोंपट बांधोनि दिधलें । मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धीं ॥२४॥ कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांस पडिला संबंध । खेद सांडूनि आनंद । मानिला तींहीं ॥ २५ ॥ स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणि चतुर । म्हणे माझें भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६ ॥ ऐसा आनंद मानिला । दुःख सर्व विसरला । तंव तो गलबला झाला । परचक्र आलें ॥ २७ ॥ अकस्मात धाडी आली । कांता बंदीं धरूनि नेली । वस्तभावही गेली । प्राणियाची ॥ २८ ॥ तेणें दुःख जाहलें भारी । दीर्घस्वरें रुदन करी । मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ॥ २९ ॥ तंव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्ट- विली । ऐकोनियां अंग घाली । पृथिवीवरी ॥ ३० ॥ सव्य अपसव्य लोळे । जळें पाझरती डोळे । आठवितां चित्त पोळे । दुःखानळें ३ ॥ ३१ ॥ द्रव्य होतें मेळविलें । तेंहि लभ्रास वेंचिलें । कांतेसहि धरून नेलें । दुराचारीं ॥ ३२ ॥ मजहि वृद्धपण आलें । लेंकीं वेगळें घातलें । आहा देवा ओढवलें अदृष्ट माझें ॥ ३३ ॥ द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं । देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४ ॥ पूर्वी देव नाहीं पूजिला । वैभव देखोनि भुलला । सेखीं प्राणी पस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५ ॥ देह अत्यंत खंगला । सर्वांगें वाळोनि गेला । वात पित्तें उसळला । कंठ दाटला कफें ॥ ३६ ॥ बळे जिभेची बोबडी । कफें कंठ घडघडी । दुर्गंधी सुटली तोंडीं । नाकीं श्लेष्मा ५ वाहे ॥ ३७ ॥ मान कांपे चळचळां । डोळे गळती भळभळां । वृद्धपणीं अवकळा । ठाकोनि आली ॥ ३८ ॥ दंतपाटी उखळली । तेणें बोचरखिंडी पडली । मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९ ॥ डोळां पाहतां दिसेना । कानीं शब्द ऐकेना । दीर्घस्वरें बोलवेना । दम
१. शंख करणें. २. तंटा. ३. दुःखाग्नीनें. ४. दव. ५. शेंबूड.
३० श्रीदासबोध. [ दशक दाटे ॥ ४० ॥ शक्ति पायांची राहिली । बैसवेना मुरकुंडी घाली । बृहती वाजौं लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१ ॥ क्षुधा लागतां आवरेना । अन्न स- मयीं मिळेना । मिळालें तरी चावेना । दांत गेले ॥ ४२ ॥ पित्तें जिरेना अन्न । भक्षितांचि होय वमन । तैसेंच जाय निघोन । अपानद्वारें ॥ ४३ ॥ विष्ठा मूत्र आणि बळस । भोंवता वमनें केला नास । दुरोन जातां कोंडे श्वास । विश्वजनांचा ॥ ४४ ॥ नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चले बुद्धी । तरी पुरेना अवधी । आयुष्याची ॥ ४५ ॥ पापण्या भोंवयांचे केश । पिको- नि झडले निःशेष । सर्वांगीं लोंबे मांस । चिरगुटासारिखें ॥ ४६ ॥ देह सर्व पारिखें झालें । सवंगडे निःशेष राहिले । सकळ प्राणिमात्र बोले । मरेना कां ॥ ४७ ॥ जे जन्मोनि पोशिलीं । तेचि फिरोनि पडिलीं । अंतीं विषैम वेळ आली । प्राणियासी ॥ ४८ गेलें तारुण्य गलें बळ । गेलें संसाराचें सळै । वाताहत झालें सकळ । शरीर आणि संपत्ती ॥ ४९ ॥ जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाही व्यर्थ गेला । कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥ ५० ॥ सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी झाला । पुढें मागुती धोका आला । यमयातनेचा ॥ ५१ ॥ श्लोक ॥ जन्मदुःखं जरादुःखं नित्यदुःखं पुनः पुनः ॥ संसारसागरे दुःखं तस्माज्जागृहि जागृहि ॥ १ ॥ टीका ॥ जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे पिंगळ । म्हणोनियां तात्काळ । स्वहित करावें ॥ ५२ ॥ असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण । म्हणो- नियां शरण । भगवंतासि जावें ॥ ५३ ॥ पुढें वृद्धास तत्वतां । गर्भी पस्ता- वा होता । तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४ ॥ म्हणोनि मागुतें जन्मांतर । प्राप्त मातेचें उदर । संसारें हा अति दुर्धर । तोचि ठाकोनि आला ॥ ५५ ॥ भगवद्भजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनी । तापत्रयाची जाचणी । सांगिजेल पुढें ॥ ५६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीय दशके कांताहरण नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. आध्यात्मिक ताप. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण । १. सर्व लोकांचा. २. कठीण. ३. भरभराट. ४. जन्ममरण.
श्रोतीं करावें श्रवण । एकाग्र होऊनी ॥ १ ॥ जो तापत्रयीं पोळला । तो संतसंगें निवाला । आर्तभूत तोषला । पदार्थै जेवीं ॥ २ ॥ क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन । बंदीं पडिला त्याचें बंधन । तोडितां सुख ॥ ३ ॥ महापुरें जाजावला¹ । तो पैलतीरास नेला । कां तो स्वप्नींचा चेइला² । स्वप्नदुःखी ॥ ४ ॥ कोणी एकासि मरण । येतां दीधलें जीवदान संकटास निवारण । केलिया सुख ॥ ५ ॥ रोगियासि औषध । सप्रचीत आणि शुद्ध । तयासि होय आनंद । आरोग्य होतां ॥ ६ ॥ तैसा संसारदुः- खें दुखवला । त्रिविधतापें पोळला । तोचि अधिकारी जाहला । परमार्था- सी ॥ ७ ॥ ते त्रिविधताप कैसे । आतां बोलिजेती तैसे । त्यांविषयीं एक असे । वाक्याधार ॥ ८ ॥ श्लोक ॥ देहेंद्रियमनःप्राणैः सुखं दुःखं यदा- प्यते ॥ इममाध्यात्मिकं तापं विजानीयाद्धि देहिनाम् ॥ १ ॥ सर्वभूतैर्देहयो- गात् सुखं दुःखं यदाप्यते ॥ द्वितीयं तं विजानीयात्संतापं चाधिभौति- कम् ॥ २ ॥ शुभाशुभैःकर्मभिस्तैर्देहांते यमयातना ॥ स्वर्गनरकादिभोक्त- व्यमिदं विद्ध्यधिदैविकम् ॥ ३ ॥ टीका ॥ एक ताप आध्यात्मिक । दुजा तो आधिभौतिक । तिसरा आधिदैविक । ताप जाणावा ॥ ९ ॥ आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण । आधिभौतिकाचें ल- क्षण । जाणिजे कैसें ॥ १० ॥ आधिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा । तेंही विशदें³ कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११ ॥ हां जी म्हणोनि वक्ता । जाहला कथा विस्तारिता । आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ॥ १२ ॥ देह इंद्रियें आणि प्राण । यांचेनि योगें आपण । सुख- दुःखें शिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥ १३ ॥ देहामधून जें आलें । इंद्रियप्राणें दुःख झालें । तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रयीं ॥ १४ ॥ देहा- मधूनि काय आलें । प्राण्यास कोण दुःख झालें । आतां हें विशदें³ केलें । पाहिजे कीं ॥ १५ ॥ खरूज खवडे पुळिया नारू । नखुरड्या मांजरी देवी गोवरू । देहामधील विकारू । या नांव आध्यात्मिक ॥ १६ ॥ काख- मांजरी केंसतोड । वोखटे वैर्ण⁴ काळफोड । व्याधि मूळव्याधि महाजड । या नांव आध्यात्मिक ॥ १७ ॥ अंगुळेंवेढें गालफुगी । कंड⁵ उठे जे वाउगी ।
१. त्रासका. २. जागा झाला. ३. स्पष्ट. ४. व्रण, क्षत. ५. कांडूं.
हिरडी सुजे भरे वर्णगी । या नांव आध्यात्मिक ॥ १८ ॥ वाउगे फोड उठती । कां ते सुजे अंगकांती । वात आणि तिडका लागती । या नांव आध्यात्मिक ॥ १९ ॥ नायटे अंदुं गजकर्ण । पेहांचें पोट विस्तीर्ण । बैसलें टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ॥ २० ॥ कुष्ठ आणि ओला कुष्ठ । पंडुरोग अतिश्रेष्ठ । क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ॥ २१ ॥ वाँटी वटकें वायगोळा । हातीं पायीं लागती कळा । भोवंडी लागे वेळोवेळां । या नांव आध्यात्मिक ॥ २२ ॥ वोलंडा आणि वळ । पोटशूळाची तळमळ । अर्धशिशी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ॥ २३ ॥ दुखे मार्ज आणि मान । पैंष्ठी ग्रीर्वा आणि वदन । अस्थि मांसें दुखती जाण । या नांव आध्यात्मिक ॥ २४ ॥ कुळीकें तरळें कामिणी । मुहम सुंठरें ११ मौळिणी । विदेशीं लागे पाणी । या नांव आध्यात्मिक ॥ २५ ॥ जळशोष आणि हिवँरें । गिरगिरी आणि अंधारें । ज्वर पाचाव आणि शौरें १४ । या नांव आध्यात्मिक ॥ २६ ॥ शैत्य उष्ण आणि तृषा । क्षुधा निद्रा आणि दिशाँ । विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ॥ २७ ॥ आळशी मूर्ख आणि अपेशी । भय उपजे मानसीं । विसराळू दुश्चित अहर्निशीं । या नांव आध्या- त्मिक ॥ २८ ॥ मूत्रेकौंडे आणि परमें । रक्तपिती आणि रक्तपरमे । खडा- चढौंचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ॥ २९ ॥ सुरडा हगवण । उन्हाळे । दिशाँ कोंर्डेतां १८ आंदोळे । एक व्यथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक ॥ ३० ॥ गांठ ढळली झाले जंत । पडे आंव आणि रक्त । अन्न तैसेंचि पडत । या नांव आध्यात्मिक ॥ ३१ ॥ उचकी लागली डशीतें गेलों । पित्त उसळलें उलट झाला । खरें पडसें आणि खोकला । या नांव आध्यात्मिक ॥ ३२ ॥ पोटफुगी आणि तडस । भरला हीरें २२ लागला घांस । फोडी ला-
१. कण, कसपट. २. झाब्यावर्ण. ३. पोटफुगीचें. ४. गुडघी. ५. लहान मूल दूध पिऊन लहान लहान गोळ्या होऊन ओकतें तो रोग. ६. कंबर. ७. पाठ. ८. गळा. ९. मोडशी. १० हागओक. ११. गळबें. १२. नाकांत फोड होतो तो. १३. हिंवताप. १४. शहारे. १५. हगवण. १६. मूतखडा. १७. पोटांत मळाचा खडा होऊन शौचाचे वेळीं दुःख होतें, त्यानें. १८. मलावरोध होतां. १९. कापू लागतो. २०. गळ्यांत घांस अडकला. २१. जीभकांते. २२. लचक.
३ रा. ] आध्यात्मिक ताप. ६३ गतां कासाविस । या नांव आध्यात्मिक ॥ ३३ ॥ उसळला दम आणि धाप । पडजीभ डेंसीं¹ । आणि कफ । मोठा वातज्वर आणि संताप । या नांव आध्यात्मिक ॥ ३४ ॥ कोणीं सेंदूर घातला । तेणें प्राणी निर्बुजलां² । घशामध्यें फोड आला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५ ॥ गळसोळ्या³ आणि जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे । दंतहीन लागती किडे । या नांव आध्यात्मिक ॥ ३६ ॥ जरंडी⁴ घोलाणीं⁵ गंडमाळा । अवचितां स्वयें फुटे डोळा । आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७ ॥ कळा तिडका लागती । कां ते दंत उन्मळती । अधर जिव्हा रगडती । या नांव आध्यात्मिक ॥ ३८ ॥ कर्णदुःख नेत्रदुःख । नाना दुःखें घडे शोक । गर्भाध आणि नपुंसक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९ ॥ फुलें वडस⁶ आणि पडळें⁷ । कीड गैतां⁸ रातांधळें । दुश्चित अमिष्ट आणि खुळें । या नांव आध्यात्मिक ॥ ४० ॥ मुकें बधिर राखोडें⁹ । थोंटें चळलें आणि वेडें । पांगुल कुन्हें¹⁰ आणि पोंवडें¹¹ । या नांव आध्यात्मिक ॥ ४१ ॥ तौरेसें¹² थुलें¹³ कान केरें¹⁴ । गोरोळें¹⁵ जमुन¹⁷ टॉपरें¹⁸ । पडांगुळें¹⁹ गेंगाणें²⁰ विदरें²¹ । या नांव आध्यात्मिक ॥ ४२ ॥ दांतरें बोतरें घाणाळें²² । घ्राणहीन श्रोत्रहीन बैरेंळ²³ । अतिकृश अतिस्थूळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४३ ॥ तोतिलें बोबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटिल । मत्सरी खादाड तपिळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४ ॥ संतापी अनुतापी मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी । पापी अवगुणी विकारी । या नांव आ- ध्यात्मिक ॥ ४५ ॥ उसव ताठा²⁴ करक । आवंटलें²५ आणि चरकें²६ । सुजी आणि चाळकें । या नांव आध्यात्मिक ॥ ४६ ॥ सलें²⁷ आडवें गर्भपात । स्तन गुंतलें १. कोरटा खोकला. २. घाबरला. ३. गळ्यापाशीं होणारा रोग. ४. पानथरी. ५. बुणबुणा. ६. हिरड्यांतून सुटतात. ७. मोतीबिंदु. ८. डोळे चांगले असून दिसत नाहीं तो रोग. ९. जन्मतः ओंठतुटकें. १०. कुबडें. ११. पांगळें. १२. तारडोळें. १३. मान तुलकावीत पाहणारें. १४. काणें. १५ तिरखें, चकणें. १६. घारेडोळें. १७. ढेंगणें. १८. ठेंचाळत चालणारें. १९. सहाबोटांचें. २०. नाकांतून बोलणारें २१. कुरूप. २२. मोठ्या नाकाचें. २३. बडबटणारें. २४. मान ताठरणें. २५. जबड्याची सूज. २६. पायाचे सांधे धरतात तो रोग. २७. वाढ खुंटलेला पोटांतील गर्भ.
६४ श्रीदासबोध. [ दशक सन्निपात । संसारकोडें अपमृत्यु । या नांव आध्यात्मिक ॥ ४७ ॥ नखविष आणि हिंगुरडें । ब्राचड आणि बावडें । उगीच दांतखीळ पडे । या नांव आ- ध्यात्मिक ॥ ४८ ॥ झडती पाँती सुजती भोंवया । नेत्रीं होती रांजणवाडया । चाळसी लागे प्राणिया । या नांव आध्यात्मिक ॥ ४९ ॥ वांगें तिल सुरुमे लाँसें । चामखीळ गलंडे म्हैंसे । चुंकुर होईजे मानसे । या नांव आध्या- त्मिक ॥ ५० ॥ नाना फुगे आणि आवाळें । अंगीं दुर्गंधी प्रबळे । चाईंचाटी लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१ ॥ नाना चिंतेचीं १० काजळी । नाना दुःखें चित्त पोळी । व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥५२॥ वृद्धपणींच्या आपदा । नाना रोग होती सदा । देह क्षीण सर्वथा । या नांव आध्यात्मिक ॥ ५३ ॥ नाना व्याधि नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें । प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४ ॥ ऐसा आ- ध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप । सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ॥ ५५ ॥ बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें । पुढें बोलिलें स्वभा- वें । आधिभौतिक ॥ ५६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीय- दशके आध्यात्मिकतापनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. आधिभौतिक ताप. श्रीगणेशाय नमः ॥ मागां झालें निरूपण । आध्यात्मिकाचें लक्षण । आतां आधिभौतिक तो कोण । सांगिजेल ॥ १ ॥ श्लोक ॥ सर्वभूतैर्देहयोगा- त्सुखं दुःखं यदाप्यते ॥ द्वितीयं तं विजानीयात्संतापं चाधिभौतिकम् ॥ १ ॥ टी० ॥ सर्व भूतांचेनि संयोगें । ताप होतां मन भंगे । सुखदुःख उपजों लागे । या नांव आधिभौतिक ॥ २ ॥ तरी आधिभौतिकाचें लक्षण । प्रांज- ळ करूं निरूपण । जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३ ॥ ठेंचा लागती मोडती कांटे । वाजती शस्त्रांचे घायें १२ बोंबे । सलें शिळका आणि १. संसारांतील अडचणी. २. एक तऱ्हेचा फोड. ३. पापण्या. ४. मुरमाच्या पुळ्या. ५. पांढरे चट्टे. ६. लासरूं. ७. मांसाचा एक प्रकारचा फुगा. ८. अरिष्ट. ९. केंस झडतात तो रोग. १०. चिंतेनें येणारा काळसरपणा. ११. पुष्कळ. १२. घाव. १३. अंगांत घस अडकून राहणें.
३ रा.] आधिभौतिक ताप. ६५ सरांटे । या नांव आधिभौतिक ॥ ४ ॥ आग्या आणि काचकुहिरी । अैवचट लागे शरीरीं । गांधील येऊन दंश करी । या नांव आधिभौतिक ॥ ५ ॥ मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दंशी । सोट जळू लागे पायांसीं । या नांव आधिभौतिक ॥ ६ ॥ पिसा पिसोळें चांचणें । कुसळें सुंगळे देंकूण । विसीफें भौंवर गोंचीउ जान । या नांव आधिभौतिक ॥ ७ ॥ गोमी विंचू आणि विखार । व्याघ्र लांडगे आणि सूँकर । गोसांयाल आणि सॉमर । या नांव आधिभौतिक ॥ ८ रानगाई रानम्हैसे । रानशकटें आणि रिक्षें१० । रानहस्ती लांवपिसें । या नांव आधिभौतिक ॥ ९ ॥ सुस- रीनें ओढून नेलें । कां तें अवचित बुडालें । अथवा खळाळीं पडिलें । या नांव आधिभौतिक ॥ १० ॥ नाना विखारें अजगर । नाना मगर जळचर । नाना वनचरें अपार । या नांव आधिभौतिक ॥ ११ ॥ अश्व वृषभ आणि खैर१२ । श्वान सूकर जंबूक१३ मार्जार । ऐसीं बहुविध क्रूर । या नांव आधिभौ- तिक ॥ १२ ॥ ऐसीं कर्कशें भयानकेँ । बहुविध दुःखदायकें । दुःख दारुण अनेकें । या नांव आधिभौतिक ॥ १३ ॥ भिंती माळवदें पडती । कडे भुयारीं कोसळती । वृक्ष अंगावर मोडती । या नांव आधिभौ- तिक ॥ १४ ॥ कोणी एकाचा शाप जडे । कोणी एकें केलें चेडें१५ । अधांतरीं होती वेडे । या नांव आधिभौतिक ॥ १५ ॥ कोणी एकें चाळविलें । कोणी एकें भ्रष्टविलें । कोणी एकें धरूनि नेलें । या नांव आधिभौतिक ॥ १६ ॥ कोणी एकें दिधलें विष । कोणी एकें लाविले दोष । कोणी एकें घातले पाश । या नांव आधिभौतिक ॥ १७ ॥ अवचितां शेर लागला । नेणो बिबवा चिडला । प्राणी धुरें जाजावला१६ । या नांव आधिभौतिक ॥ १८ ॥ इंगळावरी पाय पडे । शिळेखालीं हात सांपडे । धावतां अडखळोनि पडे । या नांव आधिभौतिक ॥ १९ ॥ वाँपी १. एक पाला, यानें अंगाची आग होते. २. खाजरी कुयरी, हिने अंगास खाज सुटते. ३. अकस्मात. ४. चिलट. ५. इसव. ६. रानडुक्कर. ७. साळू पक्ष्याची जात. ८. सांबर. ९. गवे १०. अस्वलें. ११. डंखिणीपासून लागलेलें वेड. १२. माढव. १३. कोल्हा. १४. धाब्याचें छप्पर. १५. चेटक. १६. कासावीस झाला. १७. विहीर.
६६ श्रीदासबोध. [ दशक कूपें सरोवर । गैतां कडा नदीतीर । अवचितें पडे शरीर । या नांव आधि- भौतिकु ॥ २० ॥ दुर्गाखालें कोसळती । तेणें दुःखें आक्रंदती । झाडावरुनि पडती । या नांव आधिभौतिक ॥ २१ ॥ शीतें ओंठ तडकती । हात पाय टांचा फुटती । चिखल्याँ जिव्हाळ्या लागती । या नांव आधिभौतिक ॥ २२ ॥ अशनपानाचिये वेळे । उष्णरसें जिव्हा पोळे । दांत करकरे आणि हरळे । या नांव आधिभौतिक ॥ २३ ॥ पराधीन बाळपणीं । कुशब्मार जाचणी । अन्नवस्त्रांविण आळणी । या नांव आधिभौतिक ॥ २४ ॥ सासुर- वास गांलोरे । ठणके लोंसगें चिमोरे१० । आलें रुदन न धरे । या नांव आधिभौतिक ॥ २५ ॥ चुकतां कान पिळिती । कां डोळां हिंग घालिती । सर्वकाळ धारकीं धरिती । या नांव आधिभौतिक ॥ २६ ॥ नानाप्रकारचे मार । दुर्जन मारिती अपार । दुरी अंतरे माहेर । या नांव आधिभौतिक ॥ २७ ॥ कर्ण नासिक विंधिलें । बळेंचि धरूनि गोंदिलें । खोडी जाया पोळ- विलें । या नांव आधिभौतिक ॥ २८ ॥ परचक्रीं धरूनि नेलें । नीच यातीस दधिलें । दुर्दशा होऊनि मेलें । या नांव आधिभौतिक ॥ २९ ॥ नाना रोग उद्भवले । जे आध्यात्मिकीं बोलिले । वैद्य पंचाक्षरी आणिले । या नांव आधिभौतिक ॥ ३० ॥ नाना व्यथेचें निरसन । व्हावया औषध दारुण । बलात्कारें देती जाण । या नांव आधिभौतिक ॥ ३१ ॥ नाना वल्लींचे रस । काढे गरगोंडे कर्कश । घेतां होय कासाविस । या नांव आधिभौतिक ॥ ३२ ॥ ढाळ आणि उळाळें देती । पथ्य कठिण सांगती । अनुपान चुकतां वि- पत्ती । या नांव आधिभौतिक ॥ ३३ ॥ फाड रक्त आणि फांसैणी१३ । गुल- डागोंची जाचणी । तेणें दुःखें दुखवे प्राणी । या नांव आधिभौतिक ॥ ३४ ॥ रुचिकें विबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती । शिरा तोडिती जळवा लाविती । या नांव आधिभौतिक ॥ ३५ ॥ वहु रोग बहु औषधें । सांगतां अपार अगाधें । प्राणी दुखवे तेणें खेदें । या नांव आधिभौतिक ॥ ३६ ॥ १. कुवा. २. खाडा. ३. पाण्यांत बागण्यानें बोटांच्या मधील जागा सडते, तो रोग ४. खाण्यापिण्याचे. ५. वेगळा होतो. ६. सुकून जाणे. ७. गालगुच्चे. ८. ठोसे. ९. डागणें. १०. चिमटे. ११. पुष्कळ वाने घालून केलेले पातळ औषध. १२. उलटीचें औषध. १३. शस्त्राने गांठी चिरणे. १४ चोंचे. १५. रुईचा चीक.
३ रा. ] आधिभौतिक ताप. ६७ बोलाविला पंचाक्षरी । धूरमार पीडा करी । नाना यातना चतुरीं । आधिभौतिक जाणिजे ॥ ३७ ॥ दरवडे घालुनियां जना । तस्करें¹ करिती यातना । तेणें दुःख होय मना । या नांव आधिभौतिक ॥ ३८ ॥ अग्नी- चेनि ज्वाळें पोळे । तेणें दुःखें आरंवेळे² । हानि झाली विव्हळे । या नांव आधि- भौतिक ॥ ३९ ॥ नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें । दिव्यांबरें³ मनोहरें । दग्ध होती ॥ ४० ॥ नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना स्वार्थीं⁴ । नाना पात्रें नाना अर्थीं⁵ । मनुष्यें भस्म होती ॥ ४१ ॥ अग्नि लागतां शेतीं । धान्यें बणंग्या⁶ खडकुती⁷ । इक्षुदंड⁸ जळोनि जाती । अकस्मात ॥ ४२ ॥ ऐसा अग्नि लागला । अथवा कोणीं लाविला । हानि झाली कां पोळला । या नांव आधिभौतिक ॥ ४३ ॥ ऐसे सांगतां बहुत । होती वन्हीचे आघात⁹ । तेणें दुःखें दुखवे चित्त । या नांव आधिभौतिक ॥ ४४ ॥ हारपे विसरे आणि सांडे । नासे गाहाळे फुटे पडे । असाध्य होय कोणी- कडे । या नांव आधिभौतिक ॥ ४५ ॥ प्राणी स्थानभ्रष्ट झाले । नाना पशु ते चुकले । कन्या पुत्र गाहाळले । या नांव आधिभौतिक ॥ ४६ ॥ तस्कर अ- थवा दावेदार । अवचितें करिती संहार । लुटती घरें नेती खिल्लारें¹⁰ । या नांव आधिभौतिक ॥ ४७ ॥ नाना धान्यें केळीं कापिती । पानमळा¹¹ नीट घालिती । ऐसे नाना आघात करिती । या नांव आधिभौतिक ॥ ४८ ॥ मैंद उचले खोंनोरी¹² । सुवर्णपथी¹³ भुरेरेंकरी¹⁴ । ठैकु¹⁵ सिंतैह¹⁶ वर्रंपेकरी¹⁷ । वरपा घालिती ॥ ४९ ॥ गठीसोर्ट¹⁸ द्रव्य सोडिती । नाना अलंकार काढिती । नाना वस्तु मूँषक¹९ नेती । या नांव आधिभौतिक ॥ ५० ॥ वीज पडे हिंव पडे । आणि पर्जन्यों सांपडे । कां तो महापुरीं बुडे । या नांव आधि- भौतिक ॥ ५१ ॥ भोवरे वँळणें²⁰ आणि धार । वोसैंणें²¹ लाटा अपार । १. चोर. २. तळमळतो. ३. उंची वस्त्रे ४. काये. ५. वस्तु ६. भाताची अथवा गवताची गंज. ७. प्रखर उन्हानें जळून गेलेलें शेत. ८. ऊंस. ९. धक्के १०. गुरें- ढोरें. ११. पानेवेलीच्या मळ्यास. १२. खानचोर. १३. किमयागार. १४. जादू- गार. १५. ठक. १६. फसविणारा. १७. लुटारु. १८. भामटा. १९. उंदीर. २०. नदीचा बांक, धरण. २१. पुरांमधील केरकचरा.
.६८ श्रीदासबोध. [ दशक वृश्चिव गोंवी अजगर । वाहूनि जाती ॥ ५२ ॥ तयामध्यें प्राणी सांपडला । खडकीं बेटीं² आडकला । बुडत बुडत वांचला । या नांव आधिभौतिक ॥ ५३ ॥ मनासारिखा नसे संसार । कुरूप कर्कश स्त्री क्रूर । विधवा कन्या मूर्ख पुत्र । या नांव आधिभौतिक ॥ ५४ ॥ भूत पिशाच लागलें । अंगावरून वारें गेलें । अबद्ध³ मंत्रें प्राणी चळलें । या नांव आधिभौतिक ॥ ५५ ॥ ब्राह्मणसंबंध शरीरीं । बहुसाल पीडा करी । शनैश्चराचा⁴ धोका धरी । या नांव आधिभौतिक ॥ ५६ ॥ शिंक पिंगळा आणि पाली । वोखंटे होला काक⁶ कलाली⁷ । चित्तीं काळजी लागली । या नांव आधिभौतिक ॥ ५७ ॥ नाना ग्रह काळ वार । काळ- तिथि घातचंद्र । काळवेळ घातनक्षत्र । या नांव आधिभौतिक ॥ ५८ ॥ दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला । दुःस्वप्नें जाजावला । या नांव आधिभौतिक ॥ ५९ ॥ भालुं भुंके श्वान रडे । पाली अंगावरी पडे । नाना चिन्हैं चिंता पवाडे । या नांव आधिभौतिक ॥ ६० ॥ बाहेर निघतां अपशकुन । नाना प्रकारीं विच्छिन्न । तेणें गुणें भंगे मन । या नांव आधिभौतिक ॥ ६१ ॥ प्राणी बंदीं सांपडला । यातने वरपडां⁹ जाहंला नाना दुःखै दुखावला । या नांव आधिभौतिक ॥ ६२। प्राणी राजदंड पावत⁸ । जेरबंद चाबुक वेत । दरेमार¹⁰ तळवेमारें¹¹ होत । या नांव आधिभौ- तिक ॥ ६३ ॥ कोरडे पारंब्या फोक । बहु प्रकार अनेक । बहु ताडिती आधिभौतिक । या नांव बोलिजे ॥ ६४ ॥ मोगरीमार¹² बुधलेमार¹³ । चौखै-¹⁴ रूनि डंगारणेमारें¹⁵ । बुक्या गचांड्या गुडघेमार । या नांव आधिभौतिक ॥ ६५ ॥ लाता चपराका शेणमार । कानखडे दगडमार । नाना प्रकारोंचे मार । या नांव आधिभौतिक ॥ ६६ ॥ टांगणें टिप्पऱ्या¹⁶ पिछोडे¹⁷। बेडी
१. घोणी. २. झाडाचे वनांत. ३. विसंगत; प्रयोगांत चूक झाला असा. ४. शनि- ग्रहाचा. ५. वाईट, अपशकुनी. ६. कावळा ७. कोल्हा. ८. प्राप्त होते. ९. प्राप्त झाला. १०. दरींत लोटून मारणें. ११. तापलेल्या तव्यावर अनवाणी उभे करणें. १२. गुदद्वारीं मेख ठोकून मारणें. १३. दारू भरलेल्या बुधल्यास बांधून दारू पेटवून मारणें. १४.- चोहीं बाजूंनीं ताणून. १५. बडग्यांनीं मारणें, १६- चाप. १७. मुसक्या.
३ रा. ] आधिभौतिक ताप. ६९ बुधनौल कोलदांडे । रक्षण निग्रह चहूंकडे । या नांव आधिभौतिक ॥ ६७ ॥ नाकवैणी चुनवैणी । मिठवणी रायवैणी । गुळवणी यांची जाचणी । या नांव आधिभौतिक ॥ ६८ ॥ जलामध्यें बुचकळती । हस्ती- पुढें बांधून ताकिती । हांकिती छळती यातायाती । या नांव आधिभौतिक ॥ ६९ ॥ कर्णच्छेद घ्राणच्छेद । हस्तच्छेद पादच्छेद । जिव्हाच्छेद अधर- च्छेद । या नांव आधिभौतिक ॥ ७० ॥ तीरमार सुळीं देती । नेत्र वृषण काढिती । नखोनखीं सुया मारिती । या नांव आधिभौतिक ॥ ७१ ॥ पारंड्यामध्ये घालणें । कां कडेलोट करणें । कां भांड्यामुखीं उडवणें । या नांव आधिभौतिक ॥ ७२ ॥ भोतें आणि बोटोबोटीं । अथवा गळ लागणें कंठीं । सांडस लावूनि आटाआटी । या नांव आधिभौतिक ॥ ७३ ॥ शिसें पाजणें विष देणें । अथवा शिरच्छेद करणें । कां पायांतळीं घालणें । या नांव आधिभौतिक ॥ ७४ ॥ कानीं खुंट्या आदळती । अपानीं मेखा मारिती । साल काढोनि टाकिती । या नांव आधिभौतिक ॥ ७५ ॥ सरंडे मांजरें भरिती । अथवा फांसीं नेऊन देती । नानापरी पीडा करिती । या नांव आधिभौतिक ॥ ७६ ॥ श्वानप्रलय व्याघ्रप्रलय । भूतप्रलय सुसरी- प्रलय । शस्त्रप्रलय वीजप्रलय । या नांव आधिभौतिक ॥ ७७ ॥ शिरा वोढोनि घेती । टेंभे लावूनि भाजिती । ऐशा नाना विपत्ती । या नांव आधिभौतिक ॥ ७८ ॥ मनुष्यहानि वित्तहानि । वैभवहानि महत्त्वहानि । पशुहानि पदार्थहानि । या नांव आधिभौतिक ॥ ७९ ॥ बाळपणीं मरे माता । तरुणपणीं मरे कांता । वृद्धपणीं मरण सुता । या नांव आधिभौतिक ॥ ८० ॥ दुःख दारिद्र्य आणि ऋण । विदेशपळणी नागवेण । आपदा १. झाडाच्या बुंधाशीं नालाकृति करून बांधून मारणें. २. पायांत हात अडकवून बांधून गुडघ्यांत दांडा घालणें. ३. पहारा. ४. बंदी. ५. नाकांत ओतावयाचें तीक्ष्ण औषध. ६. पिण्यास देण्याचें चुन्याचें पाणी. ७. मोहरींचें पाणी. ८. गुळाचें पाणी. ९. मनुष्याचें वजन कमी होत जाईल असे हाल करणें. १०. तोफेचें तोंडीं. ११. नखापासून शेंडीपर्यंत अंगाची चामडी काढणें. १२. चिमटे. १३. इमारतीच्या पायामध्यें जिवंत पुरणें. १४. गुदद्वारीं. १५. विजारींत सरडे घालून ती नेसवि- तात. १६. खवळलेलें मांजर व माणूस एके जागीं कोंडणें. १७. दरवडा.
७० श्रीदासबोध. [ दशक अनुपत्ती कदांन्न । या नांव आधिभौतिक ॥ ८१ ॥ आकांत वाखा प्रळय । युद्धीं होतां पराजय । जिवलगांचा होय क्षय । या नांव आधिभौतिक ॥ ८२ ॥ कठिण काळ आणि दुष्काळ । साशंकै आणि वोखटी वेळ । उद्वेग चिंतेची हळहळ । या नांव आधिभौतिक ॥ ८३ ॥ घाणाचरकीं शिरकला । चाकाखालीं सांपडला । नाना वन्हींत पडियेला । या नांव आधिभौतिक ॥ ८४ ॥ नाना शस्त्रें भेदिला । नाना श्वापदें भक्षिला । नाना बंदीं पडि- येला । या नांव आधिभौतिक ॥ ८५ ॥ नाना कुवासें निर्बुजे । नाना अप- मानें लाजे । नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आधिभौतिक ॥ ८६ ॥ ऐसे सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर । श्रोतीं जाणावा विचार । आधिभौतिकाचा ॥ ८७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके आधिभौतिकतापनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. आधिदैविक ताप. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला आध्यात्मिक । त्या उपरी आधिभौ- तिक । आतां बोलिजेल आधिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥ श्लोक ॥ शुभा- शुभैः कर्मभिस्तैर्देहांते यमयातना । स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं विद्ध्याधि- दैविकम् ॥ १ ॥ टी० ॥ शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना । स्वर्ग नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २ ॥ नाना दोष नाना पातकें । मदांधपणें अविवेकें । केलीं परी तीं दुःखदायकें । यमयातना भोगविती ॥ ३ ॥ अंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें । नाना सामर्थ्यांचेनि बळें । अकृत्यें करिती ॥ ४ ॥ नीति सांडोनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां । यमयातना भोगितां । जीव जाय ॥ ५ ॥ ⁵डोळे झांकूनि स्वार्थबुद्धी । नाना अभिलाष कुबुद्धी । ⁶वृत्तिभूमीसि साधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६ ॥ मातले- पणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात । ⁷अप्रमाणं क्रियां करित । म्हणोनियां यमयातना ॥ ७ ॥ मर्यादा सांडोनियां चालती । ग्राम दंडी ग्रामाधिपती । देश दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८ ॥ देशाधिपतीसि दंडी १. कंगालपणा. २. हलक्या प्रतीचें अन्न. ३. अडचणीची. ४. घाबरतो. ५ दुर्वर्तन. ६. वतन. ७. अशारू, गैर.
३ रा. ] आधिदैविक ताप. ७१ राव । रायासि दंडिता देव । राजा न करितां नीतिन्याय । म्हणोनियां यम- यातना ॥ ९ ॥ अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी होऊनि राहे । रा- ज्यांतीं नरक आहे । म्हणोनियां ॥ १० ॥ राजा सांडितां राजनीति । तयासि यम गांजिती । यमें नीति सांडितां धांवती । देवगण ॥ ११ ॥ ऐसी मर्या- दा लाविली देवें । म्हणोनि नीतीनें वर्तावें । नीति न्याय सांडितां भोगा- वें । यमयातनेसी ॥ १२ ॥ देवें प्रेरिले यम । म्हणोनि आधिदैविक नाम । तृतीय ताप दुर्गम । यमयातनेचा ॥ १३ ॥ यमदंड यमयातना । शास्त्रीं बोलिले प्रकार नाना । तो भोग कदापि चुकेना । या नांव आधिदैविक ॥ १४ ॥ यमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद । शरीरीं घालुनि प्रमा- द । नानाप्रकारें ॥ १५ ॥ पापपुण्याचीं शरीरें । स्वर्गीं असती कलेवरें¹ । त्यांत घालोनि नानाप्रकारें । पापपुण्यें भोगविती ॥ १६ ॥ नाना पुण्यें नाना विलास । नाना दोषें यातना कर्कश । शास्त्रीं बोलिलें अविश्वास । मानूंचि नये ॥ १७ ॥ वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती । त्यांस यमयातना करिती । या नांव आधिदैविक ॥ १८ ॥ अक्षोभ नरकीं उदंड जीव । जुनाट किडे करिती रवरव । बांधोनि टाकिती हातपाव । या नांव आधिदैविक ॥ १९ ॥ उदंड पेंस² लहान मुख । कुंभाकार कुंड एक । दुर्ग- धी उकाडा कुंभिपाक । या नांव आधिदैविक ॥ २० ॥ तप्तभूमिका तौविती³ । जळत स्तंभ पोटा लाविती । नाना सांडर्स⁴ लाविती । या नांव आधिदैविक ॥ २१ ॥ यमदंडाचे उदंड मार । यातनेची सामुग्री अपार । भोग भोगिती पापी नर । या नांव आधिदैविक ॥ २२ ॥ पृथ्वीमध्यें मार नाना । त्यांहून कठिण यमयातना । मारितां उसंत⁵चि असेना । या नांव आधिदैविक ॥ २३ ॥ चोघे चहूकडे वोढिती । एक ते झोंकून पाडिती । ताणिती मा- रिती वोढून नेती । या नांव आधिदैविक ॥ २४ ॥ उठवेना बैसवेना । रड- वेना पडवेना । यातनेवरी यातना । या नांव आधिदैविक ॥ २५ ॥ आ- क्रंदे रडे आणि फुंजे⁶ । धकाधकीनें निर्बुजे । झुरझुरोन पंजर⁷ होऊनि झिजे । या नांव आधिदैविक ॥ २६ ॥ कर्कश वचन कर्कश मार । यातनेचे नाना १. शरीरें. २. आंतील अवकाश, जागा. ३. तापवितात. ४. चिमटे. ५. विसांवा. ६. उसासे देऊन दुःख करतो. ७. हाडांचा पिंजरा.
७२ श्रीदासबोध. प्रकार । त्रास पावती दोषी नर । या नांव आधिदैविक ॥ २७ ॥ बोलिला राजदंड । त्याहूनी यमदंड उदंड । तेथील यातना प्रचंड । रूपें कर्कश ॥ २८ ॥ आध्यात्मिक आणि आधिभौतिक । त्याहूनी आधिदैविक । अल्पसंकेतें कांहींएक । कळावया बोलिलों ॥ २९ श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके आधिदैविकतापनिरूप- अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. मृत्यु. श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हणजे सर्वोचि स्वार । नाहीं २ उधारें । मार्गी लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १ ॥ नित्य काळाची नकळे होणाराची गती । कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देशीं १ ॥ २ ॥ सरतां संचितांचा३ शेष । नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां निमेष । जाणें लागे ॥ ३ ॥ अवचित काळाचे म्हणियारे४ । मारीत एकसरें । नेऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥ ४ ॥ होतां मृत्यूची आटी । कोर्णी घालूं न शकती पाठीं । सर्वत्रांस कुटाकुटी । मार्गे पुढें ॥ ५ ॥ मृत्युकाळ काठी निकी । वैसे वळियांचे५ मस्तकीं । महाराजे लोकीं । राहों न शकती ॥ ६ ॥ मृत्यु न म्हणे हा क्रूर । मृत्यु न ६ झुंझार । मृत्यु न म्हणे हा संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७ ॥ मृत्यु हा कोपी । मृत्यु न म्हणे हा प्रतापी । मृत्यु न म्हणे हा उग्ररूपी खळ ॥ ८ ॥ मृत्यु न म्हणे कीं हा बलाढ्य । मृत्यु न म्हणे हा ध मृत्यु न म्हणे हा आढ्य७ । सर्व गुणें ॥९॥ मृत्यु न म्हणे हा विख्यात न ह्मणे हा श्रीमंत । मृत्यु न ह्मणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १० ॥ म्हणे हा भूपती । मृत्यु न म्हणे हा चक्रवर्ती । मृत्यु न म्हणे हा कव कैवाडे८ जाणे ॥ ११ ॥ मृत्यु न म्हणे हा हयपती । मृत्यु न म्हणे ग पती । मृत्यु न म्हणे हा भूपती । विख्यात राजा ॥ १२ ॥ मृत्यु हा वरिष्ठ जनीं । मृत्यु म्हणे राजकारणी । मृत्यु न ह्मणे हा चे १. भयंकर. २. वायदा. ३. प्रारब्धाचा सांठा. ४. सेवक. ५. बळ ६. योद्धा. ७. संपन्न. ८. कारस्थान.
३ रा. ] मृत्यु. ७३ वेतनधर्ता ॥ १३ ॥ मृत्यु न ह्मणे हा देसाई । मृत्यु न ह्मणे हा व्यवसायी१ । मृत्यु न ह्मणे ठायीं ठायीं । पुंड राजे ॥ १४ ॥ मृत्यु न ह्मणे मुद्राधारी । मृत्यु न ह्मणे व्यापारी । मृत्यु न ह्मणे परनारी । राजकन्या ॥ १५ ॥ मृत्यु न ह्मणे कार्यकारण । मृत्यु न म्हणे वर्णावर्ण । मृत्यु न म्हणे हा ब्राम्हण । कर्मनिष्ठ ॥ १६ ॥ मृत्यु न म्हणे हा व्युत्पन्न२ । मृत्यु न म्हणे हा संपन्न३ । मृत्यु न म्हणे हा विद्वज्जन । समुदायीं ॥ १७ ॥ मृत्यु न म्हणे हा धूर्त । मृत्यु न म्हणे हा बहुश्रुत । मृत्यु न म्हणे हा पंडित । महा भला ॥ १८ ॥ मृत्यु न म्हणे हा पुराणिक । मृत्यु न म्हणे हा वैदिक । मृत्यु न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोशी ॥ १९ ॥ मृत्यु न म्हणे हा अग्निहोत्री । मृत्यु न म्हणे हा श्रोत्री४ । मृत्यु न म्हणे हा मंत्रयंत्री । पूर्णगामी५ ॥ २० ॥ मृत्यु न म्हणे हा शास्त्रज्ञ । मृत्यु न म्हणे वेदज्ञ । मृत्यु न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥ २१ ॥ मृत्यु न म्हणे ब्रह्महत्या । मृत्यु न म्हणे गोहत्या । मृत्यु न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२ ॥ मृत्यु न म्हणे रागज्ञानी६ । मृत्यु न म्हणे तालज्ञानी । मृत्यु न म्हणे तत्त्वज्ञानी । तत्त्ववेत्ता ॥ २३ ॥ मृत्यु न म्हणे हा योगाभ्यासी । मृत्यु न म्हणे संन्यासी । मृत्यु न म्हणे काळासी । वंचूं७ जाणे ॥ २४ ॥ मृत्यु न ह्मणे हा सावध । मृत्यु न म्हणे हा सिद्ध । मृत्यु न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५ ॥ मृत्यु न ह्मणे हा गोसावी । मृत्यु न म्हणे हा तपस्वी । मृत्यु न म्हणे हा मनस्वी८ । उदा- सीन ॥ २६ ॥ मृत्यु न म्हणे ऋषीश्वर । मृत्यु न म्हणे कवीश्वर । मृत्यु न म्हणे दिगंबर९ । समाधिस्थ१० ॥ २७ ॥ मृत्यु न म्हणे हठयोगी११ । मृत्यु न म्हणे हा राजयोगी१२ । मृत्यु न म्हणे हा वीतरागी१३ । निरंतर ॥ २८ ॥ मृत्यु न म्हणे हा ब्रह्मचारी । मृत्यु न म्हणे हा जटाधारी । मृत्यु न म्हणे हा निराहारी । योगीश्वर ॥ २९ ॥ मृत्यु न म्हणे हा संत । मृत्यु न म्हणे हा महंत । मृत्यु १. उद्योगी. २. विद्वान्, शास्त्रें पढलेला. ३. धनवान्. ४. श्रोत्रिय, वैदिक, कर्मनिष्ठ. ५. संपूर्ण मंत्रतंत्रशास्त्र जाणणारा. ६. गायनशास्त्र जाणणारा. ७. फसवूं, चुकवूं. ८. मनाचें आकलन करणारा. ९. परमहंस, संन्यासी. १०. समाधींत राहणारा. ११. शरीरशुद्धीच्या मार्गानें चित्तैक्य साधणारा. १२. विचाराच्या योगानें चित्तैक्य साधणारा. १३. वैराग्यशील.
७४ श्रीदासबोध. [ दशक न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३० ॥ मृत्यु न म्हणे स्वाधीन । मृत्यु न म्हणे पराधीन । सकळ जीवांसी प्राशन । मृत्युच करी ॥ ३१ ॥ एक मृत्यु- मार्गी लागले । एकीं अर्धपंथ क्रमिले । एक ते शेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२ ॥ मृत्यु न म्हणे बाळ तरुण । मृत्यु न म्हणे हा सुलक्षण । मृत्यु न म्हणे हा विचक्षण । बहु बोलका ॥ ३३ ॥ मृत्यु न म्हणे हा धीर । मृत्यु न म्हणे हा उदार । मृत्यु न म्हणे हा सुंदर । चतुरंगी जाणे ॥ ३४ ॥ मृत्यु न म्हणे हा पुण्यपुरुष । मृत्यु न म्हणे हा हरिदास । मृत्यु न म्हणे हा विशेष । सुकृती नर ॥ ३५ ॥ आतां असो हें बोलणें । मृत्यूपासूनि सु- टिजे कोणें । मागें पुढें विश्वासें जाणे । मृत्युपंथें ॥ ३६॥ चौरी खाणी चारी वाणी । चौऱ्यांशीं लक्ष जीवयोनी । जन्मा आले तितुके प्राणी । मृत्यु पाव- ती ॥ ३७ ॥ मृत्युभेणें पळोनि जातां । तरी मृत्यु सोडीना तत्वतां । मृ- त्यूस न ये कीं चुकवितां । कांहीं केल्या ॥३८॥ मृत्यु न म्हणे हा स्वदेशी । मृत्यु न म्हणे हा विदेशी । मृत्यु न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९ ॥ मृत्यु न म्हणे थोर थोर । मृत्यु न म्हणे हरिहर । मृत्यु न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४० ॥ श्रोतीं कोप न करावा । हा मृत्युलोक सर्वांस ठावा । उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्युपंथें ॥४१॥ एथें न मानावा किंत । हा मृत्युलोक विख्यात । प्रकट जाणती समस्त । लहान थोर ॥ ४२ ॥ तथापि किंतु मानिजेल । तरी मृत्युलोक न होईल । या कारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३ ॥ ऐसें जाणोनियां जीवीं । याचें सार्थकचि करावें । जनीं म- रोनियां उरावें । कीर्तिरूपें ॥ ४४ ॥ येऱ्हवीं प्राणी लहान थोर । मृत्यु पा- वती निर्धार । बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंचि नये ॥ ४५ ॥ गेले बहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे । गेले अगाध महिमेचे । मृत्युपंथें ॥ ४६ ॥ गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी । गेले बहुत संग्रांमी । संग्राम- शूर ॥ ४७ ॥ गेले बहुत बळाचे । गेले बहुत काळाचे । गेले बहुत कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८ ॥ गेले बहुतांचे पालक । गेले बुद्धीचे चालक । गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९ ॥ गेले विद्येचे सागर । गेले बळाचे १. हुषार. २. पुण्यवान्. ३. सर्वास. ४. चार प्रकारची जीवसृष्टि. ५. खोटें. ६. योद्धे. ७. प्रवर्तक. ८. तर्कशास्त्रांत निपुण.
डोंगार । गेले धनाचे कुबेर । मत्युपंथें ॥ ५० ॥ गेले बहुत पुरुषाथांचे । गेले बहुत विक्रमाचे । गेले बहुत आटोपांचे । कार्यकर्ते ॥ ५१ ॥ गेले बहुत श- स्त्रधारी । गेले बहुत परोपकारी । गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥ गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तींचे । गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३ ॥ गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत विवादी । बहुता परींचे ॥ ५४ ॥ गेलीं पंडितांचीं थाटें । गेलीं शब्दांचीं क- चोंटें । गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥ गेले तापसांचे भार । गेले संन्यासी अपार । गेले विचारकर्ते साचार । मृत्युपंथें ॥ ५६ ॥ गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी । गेले बहुत नानापरी । नाना छंद करोनि ॥ ५७ ॥ गेले ब्राह्मणसमुदाय । गेले बहुत आचार्य । गेले बहुत सांगों काय । किती म्हणोनि ॥ ५८ ॥ असो ऐसे सकळ गेले । परंतु एकचि राहिले । जे स्वरूपा- कार झाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृती- यदशके मृत्युनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. वैराग्य लक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हाणिजे महापूर । माजीं जलचरें अपार । डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १ ॥ आशा ममता देहबेडी । सुसरीं करिताती ताडातोडी । नेउनि दुःखाचे सांगडी- । माजीं घालिती ॥ २ ॥ अहंकार नक्रें उडविलें । नेउनि पाताळीं बुडविलें । तेथूनियां सोडविले । न वचे प्राणी ॥ ३ ॥ काममगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना । मद मत्सर वोहटेना । भुली पडली ॥ ४ ॥ वासना धामीण पडली गळां । घालोनि वेंटाळें वैमी गरळा । जिव्हा लळलळी वेळोवेळां । भया- नक ॥ ५ ॥ माथां प्रपंचाचें ओझें । घेउनि म्हणे माझें माझें । बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥ ६ ॥ पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें । आलें अहंतेचें काँविरें । भूतबाधा ॥ ७ ॥ बहुतेक आवैतीं १. पराक्रमाचे. २. उद्योगाचे. ३ वाद करणारे. ४. खटपटी, वैयाकरणी. ५. मगरानें. ६. कमी होईना. ७. ओकते. ८. फुगतो, गर्व करितो. ९. वेड. १०. भोंवऱ्यांत.
पडिले । प्राणी वाहतचि गेले । जिहीं भगवंतासि बोभाईलें । भावार्थ- बळें ॥ ८ ॥ देव आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी । येरें तीं अभाविकें बापुडीं । वाहतचि गेलीं ॥ ९ ॥ भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोनि भुलला । संकटीं पावे भाविकाला । रक्षित असे ॥ १० ॥ जया भगवंत आवडे । तयांचे देवास सांकडें पडे । संसारदुःख समूळ झडे । निजदासांचें ॥ ११ ॥ जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे । धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२ ॥ जैसा भाव जयापाशीं । तैसाचि देव तयापाशीं । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणिमात्रांचा ॥ १३ ॥ जरी भाव असला मायिकें । तरी देव होय महाठक । नवल तयाचें कौतुक । जै- शासि तैसा ॥ १४ ॥ जैसें जयाचें भजन । तैसेंच दे समाधान । भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५ ॥ दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैशासि तैसें भासे । तयाचें सूत्र असे । आपणाचपाशीं ॥ १६ ॥ जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें । जरी डोळे पसरोनि पहावें । तरी तेंहि टव- कारे ॥ १७ ॥ भ्रुकुटिस घालुनियां गांठी । पाहतां तेंहि क्रोधें उठी । आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८ ॥ जैसा भाव प्रतिबिंबितला । त- याचाचि देव जाला । जो जैसा भजेल त्याला । तैसाचि वोळे ॥ १९ ॥ भावें परमार्थाचिया वाटा । वाहती भक्तीचिया पेंठा । भरला मोक्षाचा चौहाटा । सज्जनसंगें ॥ २० ॥ भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरीं पावन झाले । भावार्थ बळें उद्धरले । पूर्वज तेही ॥ २१ ॥ आपण स्वयें तरले । जनांसि उपयोगा आले । कीर्तिश्रवणें पावन झाले । अभक्त भावार्थी ॥ २२ ॥ धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं । त्यांहींच एक जन्म जनीं । सार्थक केलें ॥ २३ ॥ तयांची वर्णू काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी । कांसे ला- वूनि उतरी । पार दुःखाचा ॥ २४ ॥ बहुत जन्माच्या शेवटीं । जेणें चुके आंटाआटी । तो नरदेह भेटी । करी भगवंताची ॥ २५ ॥ म्हणोनि धन्य ते भाविक जन । जिंहीं जोडिलें हरि निधान । अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६ ॥ आयुष्य हेचि रत्नपेटी । माजी भजनरत्नें गोमटीं । ईश्वरीं
तळटीपा (Footnotes): १. आळविलें. २. इतर. ३. बाह्यात्कारें. ४. भिवयांस. ५. पावतो. ६. चव्हाटा. ७. जन्ममरणरूप दगदग. ८. द्रव्याची रास. ९. सुंदर.
३ रा. ] वैराग्यलक्षण. ७७ अर्पूनियां लुटी । आनंदाची करावी ॥ २७ ॥ हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ । सदासर्वदा संतुष्ट । नैराश्यबोधें ॥ २८ ॥ धरूनियां ईश्वराची कांस । केली संसाराची निरास । तया भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९ ॥ जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परम सुख । संसार- सुखाचेनि पढतमूर्ख । लोधूनि पडती ॥ ३० ॥ जयांचा ईश्वरीं जि- व्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा । जयांचा जनावेगळा । ठेवा अ- क्षयीं ॥ ३१ ॥ ते अक्षयसुखें सुखावले । संसारदुःख विसरलें । विषयरंगीं वोरंगले । श्रीरंगरंगी ॥ ३२ ॥ तयांस फावली नरदेह- पेटी । केली ईश्वरीं साटी । येर अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३ ॥ अवचटें निधान जोडिलें । तें कवडीचे बद्दल नेलें । तैसें आयुष्य निघोन गेलें । अभाविकांचें ॥ ३४ ॥ बहु तपाचा सांठा । तेणें लाधला परिस गो- मटा । परी तो ठायींच करंटा । भोगूंचि नेणे ॥३५॥ तैसा संसारासि आला । मायाजाळीं गुंडाळला । अंतीं एकलाच गेला । हात झाडोनी ॥ ३६ ॥ या नरदेहाचे संगतीं । बहुत पावले उत्तम गती । एक बापुडीं यातायाती । वरपडीं जाहलीं ॥ ३७ ॥ या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावें संत- संगें । नीच योनि दुःख मागें । बहुत भोगिलें आहे ॥ ३८ ॥ कोण समय येईल कैसा । याचा न कळे कीं भरंवसा । जैसे पक्षी दाही दिशा । उडोनि जाती ॥ ३९ ॥ तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैशी वेळ । पुत्रकलत्रादि सकळ । विघडोनि जाती ॥ ४० ॥ पाहिली घडी नव्हे आपुली । वयसां तरी निघोनि गेली । देह पडतांच ठेविली । आहे नीच योनी ॥ ४१ ॥ श्वानसूकरादि नीच याती । भोगणें घडे नाना विपत्ती । तेथें कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२ ॥ मागें गर्भवासीं आटाआटी । भोगितां झालासि रे हिंपुटी । तेथोनियां थोर कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३ ॥ दुःख भोगिलें आपुले जीवें । तेथें कैंची होती सवें । तैसेंचि पुढें एकलें जावें । लागेल बापा ॥ ४४ ॥ कैंची माता कैंचा पिता । कैंची बहीण कैंचा भ्राता । कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकलत्रादिक ॥ ४५ ॥ हीं तूं जाण मावेचीं । १ निरसन. २. आंतून व बांहरून. ३. विटले. ४. श्रीरंगभक्त. ५. संगति- ६. प्राप्त झालीं. ७. आधारानें. ८. अंतरतात. ९. आयुष्य. १०. दुःखी.
अवघीं सोयरीं सुखाचीं । हीं तुझ्या दुःखाचीं । सांगाती नव्हती ॥ ४६ ॥ कैंचा प्रपंच कैंचें कुळ । कासया होतोसि व्याकुळ । धन कणे¹ लक्ष्मी सकळ । जाइजणें² ॥ ४७ ॥ कैंचें घर कैंचा संसार । कासया करितोसि जोजार³ । जन्मवरी वाहोनि भार । लेखीं सांडोनि जाशी ॥ ४८ ॥ कैंचें तारुण्य कैंचें वैभव । कैंचे सोहळे हावभाव । हें सकळही जाण माँव⁴ । माँयिक माँया ॥ ॥ ४९ ॥ याच क्षणीं मरोन जाशी । तरी रघुनाथासि अंतरलासी । माझें माझें म्हणतोसी । म्हणोनियां ॥ ५० ॥ तुवां भोगिल्या पुनरावृत्ती⁵ । ऐसीं मायबापें किती । स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानुलक्ष ॥ ५१ ॥ कर्मयोगें सकळही मिळालीं । एके स्थळीं जन्मासि आलीं । तीं तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२ ॥ तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार । आतां एक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३ ॥ एका डुंभराकारणें⁶ । नाना नीचांची सेवा करणें । नाना स्तुति आणि स्तवनें । मर्यांदा धरावी ॥ ५४ ॥ जो अन्न देतो उदरासी । शरीर विकावें लागे त्यासी । जेणें घातलें जन्मासी । त्यास कैसें विसरावें ॥ ५५ ॥ अहर्निशीं ज्या भगवंता । सकळ जीवांची लागली चिंता । मेघ वर्षे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरावी ॥ ५६ ॥ भूमि धरिली धराधरें⁷ । प्रगट होइजे दिवाकरें⁸ । ऐसी सृष्टि सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७ ॥ ऐसा कृपाळू देवाधिदेव । जो सांभाळी सकळ जीव । नेणवे जयाचें लाघव⁹ । कृपाळुपणें ॥ ५८ ॥ ऐसा सर्वात्मा श्रीराम । सांडूनि धरिती विषयकाम । ते प्राणी दुरात्मे अधम । केलें पावती ॥ ५९ ॥ रामैविण जे जे आस । तितुकी जाणावी निराश । माझें माझें सावकाश । शीणचि उरे ॥ ६० ॥ जयासि वाटे शीण व्हावा । तेणें विषय चिंतीत जावा । विषय न मिळतां जीवा । तळमळ सुटे ॥ ६१ ॥ सांडूनि राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासि कैंचें समाधान । लोलंगतांसी¹⁰ ॥ ६२ ॥ जयासि वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनीं लागावें । स्वजन सकळहि त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३ ॥ जेणें वासना झोंबोनि पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे । म्हणोनि विषय-
१. धान्य वगैरे. २. जाणारें, विनाशी. ३. व्याप. ४. फसवणूक. ५. जन्म- मरणाचे फेरे. ६ पोटासाठीं ७. शेषानें. ८. सूर्यानें. ९. कौशल्य. १०. विषयासक्तास