दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
२ रा. ] सद्विद्यानिरूपण. ३९ भाविक सात्विक प्रेमळ । शांतिक्षमादयाशीळ । लीन तत्पर केवळ । अमृत- वचनी ॥ ३ ॥ परम सुंदर आणि चतुर । परम सबळ आणि धीर । परम संपन्न आणि उदार । अतिशयेंसीं ॥ ४ ॥ परम ज्ञाता आणि भक्त । महा- पंडित आणि विरक्त । महातपस्वी आणि शांत । अतिशयेंसीं ॥ ५ ॥ वक्ता आणि नैराश्यता¹ । सर्वज्ञ आणि सादरता । श्रेष्ठ आणि नम्रता । सर्वत्रांसी ॥ ६ ॥ राजा आणि धार्मिक । शूर आणि विवेक । तारुण्य आणि नेमक । अतिशयेंसीं ॥ ७ ॥ वृद्धाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी । धन्वं- तरी परोपकारी । यशहस्ती² ॥ ८ ॥ कार्यकर्ता निरभिमानी । गायक आणि वैष्णव जनीं । वैभव आणि भगवद्भजनीं । अत्यादर ॥ ९ ॥ तत्वज्ञ आणि उदासीन । बहुश्रुत आणि सज्जन । मित्र आणि सत्वगुण । नीतिवंत ॥ १० ॥ साधु पवित्र पुण्यशीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा केवळ कृपाळ । कर्मनिष्ठ स्वधर्मी निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ ११ ॥ गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मा- र्गी सत्क्रिया धारणा³ धृती⁴ । श्रुति स्फूर्ति लीळा युक्ती । स्तुती मती परीक्षा ॥ १२ ॥ दक्ष धूर्त योग्य तार्किकें⁵ । सत्य साहित्य नेम भेदक । कुशल चपळ चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥ आदर सन्मान तारतम्य जाणे । प्रयो- ग समय प्रसंग जाणे । कार्यकारणचिन्हें जाणे । विचक्षण बोलका ॥ १४ ॥ सावध साक्षरी⁶ साधक । आगमनिगमशोधक⁷ । ज्ञानविज्ञानप्रबोधक । नि- श्रयात्मक ॥ १५ ॥ पुरश्चरणी तीर्थवासी । दृढव्रती कायक्लेशी⁸ । उपासक निग्रहासी । करूं जाणे ॥ १६ ॥ सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी एकवचनी । निश्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ वासनातृप्त स- खोल⁹ योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी¹⁰ । सौम्य सात्विक शुद्धमार्गी । नि- ष्कपट निर्व्यसनी ॥ १८ ॥ सुघड¹¹ संगीत गुणग्राही । अनपेक्षी¹² लोकसंग्रही । आर्जवें¹³ सख्य सर्वही । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥ द्रव्यशुची दानशुची । न्याय- शुची अंतरशुची । प्रवृत्तिशुची निवृत्तिशुची । सर्वशुची निःसंगपणें ॥ २० ॥ मित्रपणें परहितकारी । वाङ्मधुर्यता परशोकापहारी । सामर्थ्यपणें परनेत्र- १ औदासीन्य. २ यशस्वी. ३ चित्ताची स्थिरता. ४. धैर्य. ५. विचारशील. ६. दीर्घोद्योगी. ७ वेदशास्त्रांचें मनन करणारा. ८ शरीरकष्ट सोसणारा. ९. गंभीर स्वभावाचा. १०. वैराग्यशालि. ११. चतुर. १२. निरिच्छ. १३. सरळपणा.
४० श्रीदासबोध. [ दशक धौरी । पुरुषार्थे जगमित्र ॥ २१ ॥ संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ- क्लृप्ते असोनि श्रोता । कथानिरूपणीं शब्दार्था । जाऊंच नेदी ॥ २२ ॥ विवादरहित संवादी । संगरहित निरुपाधी । दुराशारहित अक्रोधी । नि- र्दोष निर्मत्सरी ॥ २३ ॥ विमळज्ञानी निश्चयात्मक । समाधानी आणि भजक । सिद्ध असोनि साधक । स्वधर्म रक्षी ॥ २४ ॥ सुखरूप संतोष- रूप । आनंदरूप हास्यरूप । ऐक्यरूप आत्मरूप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥ भाग्यवंत जयवंत । रूपवंत गुणवंत । आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिती ॥ २६ ॥ यशवंत कीर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत । वीर्यवंत वैरदवंत । सत्यवंत सुँकृती ॥ २७ ॥ विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्षणवंत । कुळवंत शु- चिष्मंत । बळवंत दयाळू ॥ २८ ॥ युक्तिवंत गुणवंत । बुद्धिवंत बहुधारिष्ट । दयावंत सदा संतुष्ट । निःस्पृह वीतरागी ॥ २९ ॥ असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्येचें लक्षण । अभ्यासावयासि निरूपण । अल्पमात्र बोलिलों ॥ ३० ॥ रूपलावण्य अभ्यासितां न ये । सहज गुणासि न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । आगंतुक गुणांची ॥ ३१ ॥ ऐसी हे सद्विद्या वरवी । सर्व- त्रांपासीं असावी । परी विरक्त पुरुष अभ्यासावी । अगत्यरूपें ॥ ३२ ॥ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके सद्विद्यानिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. विरक्तलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका विरक्तांचीं लक्षणें । विरक्तें असावें कोणत्या गुणें । जेणें अंगीं सामर्थ्य बाणे । योगियांचें ॥ १ ॥ जेणें सत्कीर्ति वाढे । जेणें सार्थकता घडे । जेणेंकरितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥ जेणें परमार्थ फावे । जेणें आनंद हेलोंवे । जेणें विरक्ति दुणावे । विवेकेंसहित ॥ ३ ॥ जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे ११ । जेणें भाग्यश्री प्रबळे । मोक्षसहित ॥ ४ ॥ मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती । सुखी १. लोकांचे रक्षण करणारा. २. सर्वज्ञता. ३. अनुग्रह प्राप्त झालेला. ४. पुण्यवान्. ५. शुद्ध, निर्मळ. ६. निरिच्छ. ७. वैराग्यशील. ८. आंगचे नाहींत असे, अभ्यासानें येणारे. ८. लाभे. १०. उचंबळून येई. ११. प्राप्त होते.
२ रा. ] विरक्तलक्षण. ४१ राहे सरस्वती । मधुर शब्द बोलावया ॥ ५ ॥ हीं लक्षणें श्रवण कीजे । आणि सुदृढ जीवीं धरिजे । तरी मग विख्यात होइजे । भूमंडळीं ॥ ६ ॥ विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें । विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषयीं ॥ ७ ॥ विरक्तें करावें साधन । विरक्तें लावावें भजन । वि- रक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटवावें ॥ ८ ॥ विरक्तें भक्ति वाढवावी । वि- रक्तें शांति दाखवावी । विरक्तें यत्नें करावी । विरक्ति आपुली ॥ ९ ॥ विरक्तें सत्क्रिया प्रतिष्ठांवी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी । विरक्तें नैराश्य- ता धरावी । सदृढ जीवीं ॥ १० ॥ विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति अवलंबावी । विरक्तें क्षमा सांभाळावी । अत्यादरें ॥ ११ ॥ विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा । विरक्तें सन्निध ठेवावा । स- न्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥ विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निव- वावीं । विरक्तें साबडी नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥ विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष । विरक्तें ओढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥ विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा । विरक्तें वक्तृत्वं उभारावा। मोडला परमार्थ ॥ १५ ॥ विरक्तें विमळ ज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें । विरक्तें निश्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥ पर्वै करावीं अचाटें । चालवावीं भक्तीचीं थाटें । नाना वैभवें केंचाटें । उपासनामार्ग ॥ १७ ॥ हरिकीर्तनें करावी । निरूपणें माजवावीं । भक्तिमार्गै लाजवावीं निंदक दुर्जनें ॥ १८ ॥ बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार । पुण्यमार्गाचा विचार । बल्लेंचि करावा ॥ १९ ॥ स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भजन । नित्यनेम पवित्रपण । अंतर शुद्ध असावें ॥ २० ॥ दृढ निश्चय धरावा । संसार मिथ्या जाणावा । विश्वाचा उद्धार करावा । सं- सर्गमात्रें ॥ २१ ॥ विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार । विरक्तें असावें तत्पर निरूपणविषयीं ॥ २२ ॥ विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्धमार्गै जावें । विरक्तें झिजोनि उरावावें । सत्कीर्तीसी ॥ २३ ॥ विरक्तें विरक्त धुंडावे । विरक्तें साधु ओळखावे । विरक्तें मित्र करावे । संत योगी १. स्थापावी. २. भोळीं मनुष्यें. ३. कैवार घ्यावा. ४. उद्योग. ५. निश्चित, स्थिर. ६. खटपटी.
५२ । श्रीदासबोध. । [ दशक
सज्जन ॥ २४ ॥ विरक्तें करावी पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें । वि- रक्तें करावी नाना स्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥ विरक्तें उपाधी न करावी । आणि उदासवृत्ति न सांडावी । दुराशा जडों न द्यावी । कोणे एके विषयीं ॥ २६ ॥ विरक्तें असावें अंतर्निष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट । विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधीनपणें ॥ २७ ॥ विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा । विरक्त चतुर असावा । सर्व प्रकारें ॥ २८ ॥ विरक्तें एकदेशी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें । विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥ हरिकथानिरूपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान । पिंडे- ज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावे ॥ ३१ ॥ प्रेमळ स्थिति उदासस्थिति । अंतरस्थिति अलिप्तस्थिति । विदेहस्थिति सहजें- स्थिति । सकळ जाणावें ॥ ३२ ॥ ध्यान लक्षण मुद्रा आसनें । मंत्र यंत्र विधि⁶ विधानें । नाना मतांचें देखणें । पाहून सांडावें ॥ ३३ ॥ विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र । विरक्तें असावें विचित्र । बहु- गुणी ॥ ३४ ॥ विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त । वि- रक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥ विरक्तें शास्त्रें धां९ढोळावीं । विरक्तें मतें विभांडां१०वीं । विरक्तें मुमुक्षु लावावीं । शुद्धमार्गी ॥ ३६ ॥ विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा । विरक्तें आपुला म्हणावा । विश्वजनें ॥ ३७ ॥ विरक्तें निंदक वंदावे । विरक्तें साधक बोधावे । विरक्तें बद्ध चेत१२वावे । मुमुक्षुनिरूपणें ॥ ३८ ॥ विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अ-गुण त्यागावे । नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९॥ ऐसीं हीं उत्तम लक्षणें । ऐकावीं एकाग्र मनें । यांचा अँ१३व्हेर न करणें । विरक्त
कठीण शब्दांचे अर्थ (Footnotes):
१. एकांगी, एकाद्या विषयाचा मात्र विचार करणारा. २. देहाच्या जन्मनाशा- दिकांचें तात्त्विक ज्ञान. ३. कोणत्याहि गोष्टीने चित्तास क्षोभ होत नाहीं अशी स्थिति. ४. देहविस्मृतिरूप ज्ञानी पुरुषाची निर्विकल्प स्थिति. ५. व्यवहारांत असतांही चित्ताची समाधानवृत्ति. ६. शास्त्रनियम. ७. व्रतें, अनुष्ठानें इत्यादि. ८. विचार. ९. बारकाईनें शोधून पहावीं. १०. जिंकावां, मोड करावा. ११. सर्व विश्वांतील लोक. १२. जागे करावे, विचारास प्रवृत्त करावे. १३. उपेक्षा.
पुरुषें ॥ ४० ॥ इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें । श्रोतीं उदास न व्हावें । बहु बोलिलों म्हणोनी ॥ ४१ ॥ परंतु हीं लक्षणें न घेतां । अवलक्षणें बाष्कळता। तेणें त्यास पढतमूर्खता। येऊ पाहे ॥४२॥ त्या पढतमूर्खांचें लक्षण । पुढीलिये समासीं निरूपण । बोलिलें असे साव- धान । होऊनि ऐका ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीय- दशके विरक्तलक्षणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १० पढतमूर्खलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खा अंगीं चातुर्य बाणे । आतां ऐका शहाणे । असोन मूर्ख ॥ १ ॥ तया नांव पढतमूर्ख । श्रोतीं न मानावें दुःख । अवगुण त्यागितां सुख । प्राप्त होय ॥ २ ॥ बहुश्रुत आणि- व्युत्पन्न । प्रांजळे बोले ब्रह्मज्ञान । दुराशा आणि अभिमान । धरी तो एक पढतमूर्ख ॥ ३ ॥ मुक्तक्रियां प्रतिपादी । सगुणभक्ति उच्छेदी । स्वधर्म आणि साधन निंदी । तो एक पढतमूर्ख ॥ ४ ॥ आपुलेनि ज्ञातेपणें । सक- ळांस शब्द ठेवणें । प्राणिमात्राचें पाहे उणें । तो एक पढतमूर्ख ॥ ५ ॥ शि- ष्यांसि अवज्ञा घडे । कां तो संकटीं पडे । ज्याचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ॥ ६ ॥ रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिल अंतःकरणीं । वैभव देखोनि वाखाणी । तो एक पढतमूर्ख ॥ ७ ॥ समूळ ग्रंथ पाहिल्या- विण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां पाहे अवगुण । तो एक पढत- मूर्ख ॥ ८ ॥ लक्षणें ऐकोनि मानी वीट । मत्सरें करी खटपट । नीति नायके उद्धट । तो एक पढतमूर्ख ॥ ९ ॥ जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे । क्रियां शब्दांस अंतरे । तो एक पढतमूर्ख ॥ १० ॥ वक्ता अधिकारेंविण । वक्तृत्वाचा करी शीण । वचन जयाचें कठिण । तो एक पढतमूर्ख ॥ ११ ॥ श्रोता बहुश्रुतपणें । वक्त्यासि आणी उणें । वाचाळपणाचेनि गुणें । तो एक पढतमूर्ख ॥ १२ ॥ दोष ठेवी पुढिलांसी । तेंचि स्वयें आपणापाशीं । ऐसें कळेना जयासी । तो एक पढतमूर्ख ॥ १३ ॥ अभ्यासाचेनि गुणें । सकळ १. स्पष्ट. २. वेदाधाररहित कर्म, स्वैर वर्तन. ३. भलत्याच नादात शिरतो. ४. आचरणास व बोलण्यास मेळ पडत नाहीं. ५. दुसऱ्यांस.
४४ श्रीदासबोध. [ दशक विद्या जाणे। जनासि विवंचूं १ नेणे। तो एक पढतमूर्ख ॥ १४॥ हस्ती बांधिजे ऊर्णतंतें। लोभें मृत्यु अमरातें। ऐसा जो प्रपंचीं गुंते। तो एक पढतमूर्ख ॥ १५॥ स्त्रियांचा संग धरी। स्त्रियांसि निरूपण करी। निंद्य वस्तु अंगीकारी। तो एक पढतमूर्ख ॥ १६॥ जेणें उणीव ये अंगासी। तेंचि दृढ धरी मानसीं। देहबुद्धि ३ जयापाशीं। तो एक पढतमूर्ख ॥ १७॥ सांडू- निया श्रीपती। जो करी नरस्तुती। कां दृष्टी पडल्याची वर्णी कीर्ती। तो एक पढतमूर्ख ॥ १८॥ वर्णी स्त्रियांचे अवयव। नाना नाटकें हावभाव। देवास विसरे जो मानव। तो एक पढतमूर्ख ॥ १९॥ भरोनि वैभवाचे भरीं। जीवमात्रास तुच्छ करी। पाषांडें ४ मत सांवरी ५। तो एक पढतमूर्ख ॥ ॥ २०॥ व्युत्पन्न ६ आणि वीतरागी ७। ब्रह्मज्ञानी महायोगी। भविष्य सांगों लागे जगीं। तो एक पढतमूर्ख ॥ २१॥ श्रवण होतां अभ्यंतरीं। गुणदो- षांची चाळणा करी। परभूषणें मत्सरी। तो एक पढतमूर्ख ॥ २२॥ नाहीं भक्तीचें साधन। नाहीं वैराग्य ना भजन। क्रियेवीण बोले ब्रह्मज्ञान। तो एक पढतमूर्ख ॥ २३॥ न मानी तीर्थ न मानी क्षेत्र। न मानी वेद न मानी शास्त्र। पवित्र कुळीं जो अपवित्र। तो एक,पढतमूर्ख ॥ २४॥ आदर देखोनि मन धरी। कीर्तिविण स्तुति करी। सर्वैचि निंदी अनादरी। तो एक पढतमूर्ख ॥ २५॥ मागें एक पुढें एक॥ ऐसा जयाचा दंडक ८। बोले एक करी एक। तो एक पढतमूर्ख ॥ २६॥ प्रपंचाविषयीं सादर। परमार्थां जयाचा अनादर। जाणतपणें घे अंधार। तो एक पढतमूर्ख ॥ २७॥ यथार्थ ९ सांडूनि वचन। जो रक्षून बोले मन। ज्याचें जिणें पराधीन। तो एक पढतमूर्ख ॥ २८॥ सोंग संपादी वरीवरी। करूं नये तेंचि करी। मार्ग चुकोन भरे १० भरीं। तो एक पढतमूर्ख ॥ २९॥ रात्रंदिवस करी श्रवण। न सांडी आपुले अवगुण। स्वहित आपुलें नेणे आपण। तो एक पढतमूर्ख ॥ ॥ ३०॥ निरूपणीं भले भले। श्रोते येऊन बैसले। क्षुद्र लक्षूनि बोले। तो एक पढतमर्ख ॥ ३१॥ शिष्य जाहला अनधिकारी। आपुली अवज्ञा १. समजावून सांगूं. २. कोळ्याच्या सुतानें. ३. मी म्हणजे हा स्थूल देह, अशी भावना. ४. वेदशास्त्रविरुद्ध. ५. मंडन करितो. ६. शास्त्रें पढलेला. ७. वैराग्यशील. ८. वागणूक. ९. खरें. १०. नादांत शिरतो.
३ रा. ] जन्मदुःख. ४५ करी । पुन्हां त्याची आशा धरी । तो एक पढतमूर्ख ॥ ३२ ॥ होत असतां श्रवण । देहास आलें उणेपण । क्रोधें करी चिणचिणें । तो एक पढतमूर्ख ॥ ॥ ३३ ॥ भरोनि वैभवाचे भरीं । सद्गुरूची उपेक्षा करी । गुरुपरंपरा चोरी । तो एक पढतमूर्ख ॥ ३४ ॥ ज्ञान बोलोनि करी स्वार्थ । कृपणाऐंसा सांची अर्थे । अर्थासाठीं लावी परमार्थ । तो एक पढतमूर्ख ॥ ३५ ॥ वर्तल्याविण शिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी । पराधीन गोसावी । तो एक पढतमूर्ख ॥ ३६ ॥ भक्तिमार्ग अवघा मोडे । आपणांमध्यें उर्पंडरें पडे । ऐसिये कर्मीं पंवोडे । तो एक पढतमूर्ख ॥ ३७ ॥ प्रपंच गेला हातींचा । लेश नाहीं पर- मार्थाचा । द्वेषी देवाब्राह्मणाचा । तो एक पढतमूर्ख ॥ ३८ ॥ त्यागावया अवगुण । बोलिलों पढतमूर्खांचें लक्षण । विचक्षणीं न्यूनपूर्ण । क्षमा केली पाहिजे ॥ ३९ ॥ परम मूर्खांमाजी मूर्ख । जो या संसारीं मानी सुख । या संसारदुःखा ऐसें दुःख । आणिक नाहीं ॥ ४० ॥ तेंचि पुढें निरूपण । जन्मदुःखांचें लक्षण । गर्भवास हा दारुण । पुढें निरूपिला ॥ ४१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके पढतमूर्खलक्षणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ४८० ॥ शुभं भवतु ॥ दशक तिसरा. जन्मदुःख. श्रीगणेशाय नमः ॥ जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर । चलेना ऐसा ॥ १ ॥ जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी । जन्म काळाची जाचणी । नित्य नवी ॥ २ ॥ जन्म कुविद्येचें फळ । जन्म लोभाचें कमळ । जन्म भ्रांतीचें पेंडळ । ज्ञानहीन ॥ ३ ॥ जन्म जीवासि बंधन । जन्म मृत्यूस कारण । जन्म हेंचि अकारण । गाथांगोंवी ॥ ४ ॥ जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर । जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५ ॥ जन्म जीवाची अवदसा । जन्म १. फुसफुस. २. सांठवितो. ३. द्रव्य. ४. अव्यवस्था. ५. शिरतो. ६. पंडी- तांनीं. ७. मूळ. ८. पडदा. ९. गुंतागुंत.
४६ श्रीदासबोध. [ दशक कल्पनेचा ठसा । जन्म लावेचा वे¹ळसा । ममतारूप ॥ ६ ॥ जन्म मायेचें मै²दावें । जन्म क्रोधाचें वि³रांवें । जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७ ॥ जन्म जीवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण । जन्म हेंचि विस्मरण । ईश्व- राचें ॥ ८ ॥ जन्म विषयाची आवडी । जन्म दुराशेची बेडी । जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९ ॥ जन्म हाचि विषम काळ । जन्म हेचि वोखटी वेळ । जन्म हें अति कु⁴श्चळ । नरकपतन ॥ १० ॥ पाहतां शरी- राचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ । रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११ ॥ अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा । तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवीं घडे ॥ १२ ॥ रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोनि झाला गाळ । त्या गाळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३ ॥ वरीवरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नरकाचें । जैसें झांकण चर्मकुंडाचें । उघडितांचि नये ॥ १४ ॥ कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यहीं धुइजेते । तरी दुर्गंधि देहातें । शुद्धता न ये ॥ १५ ॥ अस्थिपंजर उभाविला । शिरा- नाडीं गुंडाळिला । मेदें⁵मांसें सरसाविला । सांदोसांदीं भरोनी ॥ १६ ॥ अ⁶शुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंही भरलें असे देहीं । नाना व्याधि दुःखें तीं- ही । अभ्यंतरीं वसती ॥ १७ ॥ नरकाचें कोठार भरलें । आंत बाहेरी लिडबिडिलें । मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधि करूनी ॥ १८ ॥ जंत किडे आणि आंतडीं । नाना दुर्गंधीचीं पोतडीं । अ⁷मूप लथवथती कातडीं । कंटाळ- वाणीं ॥ १९ ॥ सर्वांगास शिर प्रमाण । तेथें ब⁸ळसे वाहे घ्राण । उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधि न घेववे ॥ २० ॥ डोळां निघती चिपडें । नाकीं दाटली मेकडें । प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥ २१ ॥ लाळ थुंका आणि मळ । पित्त श्लेष्मा⁹ प्रबल । तयास म्हणती मुखकमळ । चंद्रा- सारिखें ॥ २२ ॥ मुख ऐसें कुश्चिळें दिसे । पोटीं विष्ठा भरली असे । प्रत्य- क्षास प्रमाण नसे । भूमंडळीं सर्वथा ॥ २३ ॥ पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन । भागीरथीचें घेतां जीवन । त्याची होय लघु- शंका ॥ २४ ॥ एवं मळ मूत्र आणि वं¹⁰मन । हेंचि देहाचें जीवन । येणेंचि १. फेरा, झपाटा. २. फसवणूक. ३. शौर्य. ४. घाणेरडें. ५. वसा, चरबी यांनीं. ६. रक्त. ७. पुष्कळ. ८. शेंबूड. ९. कफ. १०. ओक.
देह वाढे जाण। यदर्थी संशय नाहीं ॥ २५॥ पोटीं नसतां मळ मूत्र चोक। तरी मरोन जाती सकळ लोक। झाला राव अथवा रंक। पोटीं विष्ठा चुकेना ॥ २६॥ निर्मळपणें काढूं जातां। तरी देह पडेल तत्वतां। एवं देहाची व्यवस्था। ऐसी असे ॥ २७॥ ऐसा हा घड असतां। यथा- भूत पाहूं जातां। मग ते दुर्दशा सांगतां। शंका बाधी ॥ २८॥ ऐसिया कारागृहें१ वस्ती। नवमास भोगिल्या बहु विपत्ती। नवहि द्वारें निरो- धिती। वायु कैंचा येथें ॥ २९॥ वोकानरकाचे रस झरपती। ते जठराग्नी- स्तव तापती। तेणें सर्वांहि उकडती। अस्थि मांस ॥३०॥ त्वचेविण गर्भ लोळे२ तंव मातेसि उठती डोहळे। कटु आम्ल तीक्ष्णें सर्वांग पोळे। तया बाळ- काचें ॥ ३१॥ बांधलें चर्माचें मोटालें३। तेथें विष्ठेचें पोटालें४। रसउपाय बंकेंनाळें। होत असे ॥ ३२॥ विष्ठा मूत्र वात पित्त। नाकीं तोंडीं नि- घती जंत। तेथें निर्बुजलें६ चित्त। अतिशयेंसीं ॥ ३३॥ ऐसिये कारागृहीं प्राणी। पडिला अत्यंत दाटणीं। कळवळोनि म्हणे चक्रपाणी। सोडवी येथूनि आतां ॥ ३४॥ देवा सोडविसी येथून। तरी मी स्वहित करीन। गर्भवास हा चुकवीन। पुन्हा न ये येथें ॥ ३५॥ ऐसी दुखवूनि प्रतिज्ञा केली। तंव जन्मवेळ पुढें आली। माता आक्रंदों लागली। प्रसूतीकाळीं ॥ ३६॥ नाकीं तोंडीं बैसलें मांस। मस्तकद्वारें सांडी श्वास। तेंही बुजलें निःशेष। जन्मकाळीं ॥ ३७॥ मस्तकद्वार तें बुजलें। तेणें चित्त निर्बुजिलें। प्राण तळमळूं लागले। चहूंकडे ॥ ३८॥ श्वासोच्छ्वास कोंडला। तेणें प्राणी जाजांविला। मार्ग दिसेनासा जाहला। कासावीस ॥ ३९॥ चित्त बहु निर्बुजिलें। तेणें आडभरीं भरलें। लोक म्हणती आडवें आलें। खांडोनि काढा ॥ ४०॥ मग तें खांडोनि काढिती। हस्त पाद छेदूनि घेती। हातीं सांपडलें तेंचि कापिती। मुख नासिक उदर ॥ ४१॥ ऐसे टंवके तोडले। बाळकें प्राण सोडिले। मातेनेंही सांडिलें। कळेवर१० ॥ ४२॥ मृत्यु पावला आपण। मातेचा घेतला प्राण। दुःख भोगिलें दारुण गर्भवासीं ॥ ४३॥
१. तुरुंगांत. २. गर्भवेष्टनांत, उदरांत. ३. मोटली. ४. सांठा. ५. मातेचे अन्नरस मुलास गर्भांत पोंचविणारें नाळ, त्यानें. ६. घाबरलें. ७. दडपणांत. ८. त्रासिला. ९. तुकडे. १०. शरीर.
४८ श्रीदासबोध. [ दशक तथापि सुकृतेंकरूनी । मार्ग सांपडला योनी । तरी अडकला जाऊनी । कंठीं स्कंधीं मागुता ॥ ४४ ॥ तये संकुचित पंथीं । बळेंचि ओढूनि का- ढिती । तेणें गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५ ॥ बाळकाचा जातां प्राण । अंतीं होय विस्मरण । तेणें पूर्वील स्मरण । विसरोनि गेला ॥ ४६ ॥ गर्भीं म्हणे सोहं सोहं । बाहेर पडतां म्हणे कोहं । ऐसा कष्टी जाहला बहु । गर्भवासीं ॥ ४७ ॥ दुःखा परवडौ होता जाहला । थोर कष्टीं बाहेर आला । सर्वैचि कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८ ॥ शून्याकार जाहली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं । अज्ञानें पडली भ्रांती । तेणें सुखचि मा- निलें ॥ ४९ ॥ देह विकार पावलें । सुखदुःखें झेंळंबलें । असो ऐसें गुंडा- ळलें । मायाजाळीं ॥ ५० ॥ ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणिमात्रासी । म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१ ॥ जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त । ज्ञानबळें विरक्त । सर्वकाळ ॥ ५२ ॥ ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरूपिल्या यथामती । सावध होऊनियां श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके जन्मदुःख- निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ प्रथमसंबंध. श्रीगणेशाय नमः ॥ संसार हाचि दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ॥ मागां बोलिली तळमळ । गर्भवासाची ॥ १ ॥ गर्भवासी दुःख झालें । तें बाळक विसरलें । पुढें वाढों लागलें । दिवसेंदिवस ॥ २ ॥ बाळपणीं त्व- चा कोंवळी । दुःख होतांचि तळमळी । वाचा नाहीं तये काळीं । दुःख सांगावया ॥ ३ ॥ देहास कांहीं दुःख झालें । अथवा क्षुधेनें पीडिलें । तरी तें परम आक्रंदलें । परी अंतर नेणवे ॥ ४ ॥ माता कुरवाळी वरिवरी । परी जे पीडा जाहली अंतरीं । ते मायेसि न कळे अभ्यंतरीं । दुःख होय बाळकांसी ॥ ५ ॥ मागुतें मागुतें रँफुंदे रडे । माता बुर्जावी घेऊनि कडे । व्यथा नेणती बापुडें । तळमळी जीवीं ॥ ६ ॥ नाना व्याधींचे उमाळे । १. तो मी, तो मी. २. कोण मी, कोण मी. ३. व्याप्त. ४. त्रासलें. ५. चा- मडी. ६. ओरडतें. ७. हुंदके देई. ८. समजावी. ९. रोगांचे.
तेणें दुःखें आंदोळे । रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७ ॥ शरीर रक्षितां न ये । घडती नाना अपाय । खोडी आधांतरीं होय । अवयवहीन बालक ॥ ८ ॥ अथवा अपाय चुकले । पूर्व पुण्य पुढें ठाकलें । मातेसि वोळखूं लागलें । दिवसेंदिवस ॥ ९ ॥ क्षणभरी मातेसि न देखे । तरी आक्रंदोनि रुदन करी दुःखें । ते समयीं मातेसारिखें । आणिक कांहींच नाहीं ॥ १० ॥ आस करूनि वासें पाहे । मातेविण कदा न राहे । वियोग पळ- मात्र न साहे । स्मरण झाल्यानंतर ॥ ११ ॥ जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीनें अवलोकिलें । तरी न वचे बुझाविलें । मातेवांचुनी ॥ १२ ॥ कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण । तरी नाहीं ती- समान । भूमंडळीं कोणी ॥ १३ ॥ ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसें उणें । रागें परतें केलें तिणें । तरी आक्रंदोनि मिठी घाली ॥ १४ ॥ सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी । अति प्रीति तये काळीं । मातेवरी लागली ॥ १५ ॥ तंव ते मातेसि मरण आलें । प्राणी पोरटें जाहलें । दुःखें झुरणी लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६ ॥ आई पाहतां दिसेना । दीनरूप पाहे जना । आस लागलीसे मना । आई येईल म्हणोनी ॥ १७ ॥ माता म्हणोनि मुख पाहे । तंव ती आपुली माता नोहे । मग हिंव- सेंलेंसें राहे । दैन्यवाणें ॥ १८ ॥ मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख झालें। देहहि क्षीणत्व पावलें । अतिशयेंसी ॥ १९ ॥ अथवा माताहि वांचली । माय- लेंकरां भेटी झाली । बाळदशा ते राहिली । दिवसेंदिवस ॥ २० ॥ बाळपण जाहलें उणें । दिवसेंदिवस होय शहाणें । मग तें मायेचें अत्यंत पेखणें । होतें तें राहिलें ॥ २१ ॥ पुढें लोभ लागला खेळाचा । कळप मेळवी पोरांचा । आल्या गेल्या डौयाचा । आनंद शोक वाहे ॥ २२ ॥ मायबापें शिकविती पोटें । तयाचें दुःख परम वाटे । चट लागली न सुटे । संगति लेंकुरांची ॥ २३ ॥ लेंकुरांमध्यें खेळतां । नाठवे माता आणि पिता । तंव तेथेंहि अव- चिता । दुःख पावला । २४ ॥ पडिले दांत फुटला डोळा । मोडला पाय झाला खुळां । गेला माज अवकळा । ठाकोनि आली ॥ २५ ॥ निघाल्या देवी १. कांपतो. २. मध्येंच. ३. वाट. ४. दूर. ५. हिरमुसलेंसें. ६. भोळा, लळा. ७. डावांचा. ८. पोटाच्या काळजीमुळे. ९. लंगडा.
५० श्रीदासबोध. [ दशक आणि गोंवर । उठलें कपाळ लागला ज्वर । पोटशूळ निरंतर । वायगोळा ॥ २६ ॥ लागलीं भूतें जाहली झडपणी । जळींच्या¹ मेसको मायरौणी । मुंज्या झोटिंग करणी । म्हसोबाची ॥ २७ ॥ वेताळ खंकाळें² लागला । ब्रम्हग्रह³ संचरला । नेणों चेडा वोलांडिला । कांहीं कळेना ॥ २८ ॥ एक म्हणती बीरदेव । एक म्हणती खंडेराव । एक म्हणती सर्व वार्वे⁴ । हा ब्रह्म- संबंध ॥ २९ ॥ एक म्हणती कोणीं केलें । अंगीं दैवत घातलें । एक म्हणती चुकलें । सटवाईचें ॥ ३० ॥ एक म्हणती कर्मभोग । अंगीं जडले नाना रोग । वैद्य पंचाक्षरी चांग⁵ । बोलावूनि आणिले ॥ ३१ ॥ एक म्हणती हा वांचेना । एक म्हणती हा मरेना । भोग भोगितो यातना । पापास्तव ॥ ३२ ॥ गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापें पोळला । प्राणी बहुत कष्टी जाहला । संसारदुःखें ॥ ३३ ॥ इतकेंहि चुकोनि वांचला । तरी मारमा- रोनि शाहणा केला । लौकिकीं नेटका झाला । नांव राखे ऐसा ॥ ३४ ॥ पुढें मायबापीं लोभास्तव । संभ्रमें मांडिला विवाह । दाऊनियां सकळ वै- भव । नोवरी पाहिली ॥ ३५ ॥ वऱ्हाडी वैभव दाटलें । देखोनि परम सुख वाटलें । मन हें रंगोनि गेलें । सासुरवाडीकडे ॥ ३६ ॥ मायबापीं भलतैसें असावें । परी सासुरवाडीकडे नेटकें जावें । द्रव्य नसेल तरी घ्यावें । ऋण कळांतरें⁶ ॥ ३७ ॥ अंतरभाव ते सासुरवाडी । मायबापें राहिलीं बापुडीं । होताति सर्वस्वें कुडकुंडीं⁷ । तितुकेंचि कार्य त्यांचें ॥ ३८ ॥ नोवरी आलिया घरा । अति हृष्यास वाटे बरा । म्हणे मजसारिखा दुसरा । कोणीच नाहीं ॥ ३९ ॥ माय बाप बंधु बहिणी । नोवरी न देखतां वाटती कांणी⁸ । अत्यं- त लोधलां⁹ पापी प्राणी । अविद्यानें¹⁰ भुलविला ॥ ४० ॥ संभोग नसतां इ- तुका प्रेमा । योग झालिया उल्ंघी सीमा । प्रीति वाढविती कामा- । करितां प्राणी गुंतला ॥ ४१ ॥ जरी न देखे क्षण एक डोळां । तरी जीव होय उता- वळा । प्रीतिपात्र अंतरकळा । होऊनि गेली ॥ ४२ ॥ कोंवळे कोंवळे शब्द मंजुळ । मर्यादा लज्जा मुखकमळ । वक्त्रावलोकनें केवळ । मन ज्याचें मैं- दौवें¹¹ ॥ ४३ ॥ कळवळा येतां सांवरवेना । शरीरविकलता आवरेना । अन्यत्र १. जळदेवता. २. उग्र. ३. ब्रह्मराक्षस. ४. व्यर्थ. ५. चांगले. ६. व्याजानें. ७. निकामी. ८. कंटाळवाणीं. ९. लुब्ध झाला. १०. अज्ञानानें. ११. गुंग होतें.
३ रा. ] जन्मदुःख. ५१ व्यवसायीं क्रमेनों । हुरहुर वाटे ॥ ४४ ॥ व्यवसाय करितां बाहेरी । मन लागलेंसें घरीं । क्षणक्षणा अभ्यंतरीं । स्मरण होय कामिनीचें ॥ ४५ ॥ तु- ह्मी माझिया जिवांतील जीव । म्हणोनि अत्यंत लाघवें । दाउनियां चित्त सर्व । हिरूनि घेतलें ॥ ४६ ॥ मैंदें सोयरीक काढिती । फांसे घालोनि प्राण घेती । तैसें आयुष्य गेलिया अंतीं । प्राणियास होय ॥ ४७ ॥ प्रीति कामि- नीसि लागली । जरी तियेसि कोणी रागेजली । तरी परम क्षिती वाटली । मानसीं गुतरूपें ॥ ४८ ॥ तये भार्येचेनि कैवारें । मायबापांसी नीच उत्तरें । बोलेनियां तिरस्कारें । वेगळा निघे ॥ ४९ ॥ स्त्रीकारणें लाज सांडिली । स्त्रीकारणें सखीं सोडिलीं । स्त्रीकारणें बिघडलीं । सकळही जिवलगें ॥ ५० ॥ स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाहला । स्त्रीकारणें सांडविला । विवेकासी ॥ ५१ ॥ स्त्रीकारणें लोलंगतां । स्त्रीकारणें अतिनम्रता । स्त्रीकारणें पराधीनता । अंगिकारिली ॥ ५२ ॥ स्त्रीकारणें लोभी जाहला । स्त्रीकारणें ध- र्म सांडिला । स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३ ॥ स्त्रीकारणें सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं । तन मन धन सर्वही । अनन्य- भावें अर्पिलें ॥ ५४ ॥ स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितासि नागवला । ईश्वरीं कानकोंडा जाहला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५ ॥ स्त्री- कारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती । स्त्रीकारणें सायुज्यमु- क्ती । तेही तुच्छ मानिली ॥ ५६ ॥ एके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें उणें । जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटलीं ॥ ५७ ॥ ऐसी अंतरीं प्रीति ज- डली । सर्वस्वाची सांडी केली । तंव ते मरोनि गेली । अकस्मात भार्या ॥ ५८ ॥ तेणें मनीं शोक वाटिला । म्हणे थोर घात झाला । आतां कैंचा बुडा- ला संसार माझा ॥ ५९ ॥ जिवलगाचा सोडिला संग । अवचितां झाला घरेंभंग । आतां करूं देहत्याग । म्हणे दुःखें ॥ ६० ॥ स्त्री घेऊनि आडवी । ऊर बडवी पोट बडवी । लाज सांडोनि गौरवी । लोकां देखतां ॥ ६१ ॥ म्हणे माझें बुडालें घर । आतां न करीं हा संसार । दुःखें ओंकंदे थोर । घोर १. करमेना. २. दिखाऊ प्रीति. ३. घातकी, फांसेगार. ४. खंती. ५. अंतरलीं. ६. आसक्ति. ७. चोरटा. ८. ब्रह्मनिर्वाण. ९. शत्रु. १०. संसाराची नासाडी. ११. ओरडूं लागला.
५२ श्रीदासबोध. [ दशक घेणें ॥ ६२ ॥ तेणें जीव वार्यो¹ वेधला । संसाराचा डबगें² आला । तेणें दुः- ख झाला । जोगी कां महात्मा ॥ ६३ ॥ कां तें निघोन जाणें चुकलें । पुनः मागुतें लग्न केलें । तेणें अत्यंतचि निमग्न झालें । मन द्वितीयसंबंधीं ॥ ६४ ॥ जाहला द्वितीय संबंध । सवेंचि मानिला आनंद । श्रोतीं व्हावें सावध । पुढिलिये समासीं ॥ ६५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके प्रथमसंबंधनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. द्वितीयसंबंध. श्रीगणेशाय नमः ॥ द्वितीय संबंध जाहला । दुःख मागील विसरला । सुख मानोनि राहिला । संसाराचें ॥ १ ॥ झाला अत्यंत कृपण । पोटा न खाय अन्न । ³पैक्याकारणें सोडी प्राण । ⁴ऐकसरा ॥ २ ॥ कदा कल्पांतीं न वंची⁵ । संचिलेंचि पुनः साँची⁶ । अंतरीं असेल कैंची । सद्वासना ॥ ३ ॥ स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासही वारी⁷ । सर्वकाळ निंदा करी । साधु- जनांची ॥ ४ ॥ नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत । मुंगी- मुखींचें शीत । तेंही वेंचून⁸ साँची ॥ ५ ॥ स्वयें पुण्य करवेना । केलें तरी देखवेना । उपहास करी मना । न ये म्हणोनि ॥ ६ ॥ देवां भ- क्तांस उच्छेदी । अंगबळें सकळांसि खेदी । निष्ठुर शब्दे अंतर भेदी । प्राणि- मात्रांचें ॥ ७ ॥ नीति सांडोनि मागें । अनीतीनें वर्तों लागे । गर्व धरून फुगे । सर्वकाळ ॥ ८ ॥ पूर्वजांसि सिंतरलें⁹ । पक्ष श्राद्ध नाहीं केलें । कुळदैवत टाकिलें । कोणे परी ॥ ९ ॥ अक्षतें¹⁰ भैरली भाणीं । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेसि मूळ ॥ १० ॥ कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा । स्नान संध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११ ॥ अभिलाषें सांची वित्त । स्वयें करी विश्वासघात । मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२ ॥ तारुण्य अंगीं भरभरलें । धारिष्ट न वचे धरिलें । करूं नये तेंचि केलें । महापाप ॥ १३ ॥ स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटीं । विषयलोभें शेवटीं । वोळखी १. वायुचक्रासारखा भ्रसूं लागला. २. कंटाळा. ३. पैकरितां. ४. एकदम. ५. खर्च करी. ६. सांठवितो. ७. आडवा येतो. ८. निवडून, टिपून. ९. ठकाविलें. १०. बहिणीला केंस भरली, सवाष्ण बोलाविली.
सांडीली ॥ १४ ॥ मायबहिणी न विचारी । जाहला पापी परद्वारीं । दंड पावला राजद्वारीं । तरी पालटेना ॥ १५ ॥ परस्त्री देखोन दृष्टीं । अभिलाष उपजे पोटीं । अकर्तव्यें हिंपुटी । पुनः होय ॥ १६ ॥ ऐसें पाप उदंड केलें । शुभाशुभ नाहीं उरलें । तेणें दोषें दुःख भरलें । अकस्मात अंगीं ॥ १७ ॥ व्याधि भरली सर्वांगीं । प्राणी जाहला क्षयरोगी । केले दोष आपुले भोगी । शीघ्रकाळें ॥ १८ ॥ दुःखें सर्वांग फुटलें । नासिक आवघेंच बैसलें । लक्षण जाऊनि झालें । कुलक्षणें ॥ १९ ॥ देहास क्षीणता आली । नाना व्यथा उ- द्भवली । तारुण्यशक्ति राहिली । खंगला प्राणी ॥ २० ॥ सर्वांगीं लागल्या कळा । देहास आली अवकळा । प्राणी कांपे चळचळा । शक्ति नाहीं ॥ २१ ॥ हस्तपादादिक झडले । सर्वांगीं किडे पडले । देखोन थुंकों लागले । लहान थोर ॥ २२ ॥ जाहली विष्टेची सारणी । भोवतीं उठली वैढाणी । अत्यंत खंगला प्राणी । जीव न वचे ॥ २३ ॥ आतां मरण दे गा देवा । बहुत कष्ट झाले जीवा । जाहला नाहीं नेणों ठेवा । पातकांचा ॥ २४॥ दुःखें घळघळां रडे । जों जों पाहे अंगाकडे । तों तों दैन्यवाणें बापुडें । तळमळी जीवीं ॥ २५ ॥ ऐसे कष्ट झाले बहुत । सकळ झालें वाताहत । दरवडा घालुनि वित्त । चोरटीं नेलें ॥ २६॥ झालें ऐरत्र ना परत्र । प्रारब्ध ठाकलें विचित्र । आपलें आपण मळमूत्र । सेविलें दुःखें ॥ २७॥ पापसामुग्री सरली । दिवसें- दिवस व्यथा हरली । वैद्यें औषधें दीधलीं । उपचार झाला ॥ २८ ॥ मरत मरत वांचला । यास पुनः जन्म झाला । लोक म्हणती पडिला । माणसां- मध्यें ॥ २९ ॥ येरें स्त्री आणिली । पुन्हा बरवात मांडीली । अति स्वार्थे- बुद्धि धरिली । पुन्हा मागुति ॥ ३० ॥ कांहीं वैभव मिळविलें । पुन्हा सर्वहि संचिलें । परंतु गृह बुडालें । संतान नाहीं ॥ ३१ ॥ पुत्रसंतान नसतां दुःखी । वांझ नांव पडलें लोकीं । तें न फिटे म्हणोनि लेंकी । तरी हो आतां ॥ ३२ ॥ म्हणोनि नाना सायास । बहुत देवांस केले नवस । तीर्थे व्रतें उपवास । धरणें पारणें मांडिलें ॥ ३३ ॥ विषयसुख तें राहिलें । वांझपणें दुःखी केलें । तंव तें कुलदैवत पावलें । झाली वृद्धि ॥ ३४ ॥ त्या लेकरावरी
१. व्यभिचारी २ विरस. ३. शोभाहीन. ४. दुर्गंधी. ५. इहलोक. ६. परलोक. ७. देवळाच्या दारांत उपाशीं बसून देवावर संकट घालणें.
५४ श्रीदासबोध. [ दशक अतिप्रीती । दोघेंहि क्षण एक न विसंबती । कांहीं जाह्या आक्रंदती । दीर्घ- स्वरें ॥ ३५ ॥ ऐसीं ती परम दुःखित । पूजित होती नाना दैवत । तंव तेंहि मेलें अवचित । पूर्वपापेंकरूनी ॥ ३६ ॥ तेणें बहुत दुःखी झाले । घरीं अंधारें पडिलें । म्हणती आम्हांस कां ठेविलें । देवें वांझ करुनी ॥ ३७ ॥ आम्हां द्रव्य काय करावें । तें जावें परी अपत्य व्हावें । अपत्यालागीं व्यजावें । लागे सर्व ॥ ३८ ॥ वांझपण संदिसें¹ गेलें । तों मरतवांझ नांव पडलें । तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९ ॥ आमुची वेली कां खुंटली । हा हा देवा वृत्ति² बुडाली । कुळस्वामिनी कां क्षोभली । विझाला कुळदीप ॥ ४० ॥ आतां लेंकराचें मुख देखेन । तरी आनंदें रोंडी³ चालेन । आणि गळही टोचीन । कुळस्वामिनीपाशीं ॥ ४१ ॥ आई भुल्या करीन तुझा । नांव ठेवीन केरपुंजा⁴ । वेसंनीं⁵ घालीन माझा । मनोरथ पुरवीं ॥ ४२ ॥ बहुत देवांस नवस केले । बहुत गोसांवी धुंडिले । गटगटां गिळूं लागले । सगळे विंचू ॥ ४३ ॥ केले समंधाचे सायास । राहाणें⁶ घातलें बहुवस । केलें नारिकेलें⁷ ब्राह्मणांस । आम्रदानें दिधलीं ॥ ४४ ॥ केलीं नाना कौटिलें⁸ । पुत्रलोभें केलीं ढाळें⁹ । तरी अदृष्टें¹⁰ फिरलें । पुत्र नाहीं ॥ ४५ ॥ वृक्षाखालें जाऊनि नाहाती । फळतीं झाडें करपती । ऐसे नाना दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६ सांडोनि सकळ वैभव । त्यांचा वारया वेंधलों¹¹ जीव । तंव तो पावला खंडेराव । आणि कुळस्वामिनी ॥ ४७ ॥ आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती । सावध होऊनि श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ४८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके द्वितीयसंबंधनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. संपत्तिवेध. श्रीगणेशाय नमः ॥ लेंकुरें उदंड झालीं । तंव ते लक्ष्मी निघोन गेली । बापुडीं भिकेस लागलीं । कांहीं खावयासी मिळेना ॥ १ ॥ लेंकुरें
१. नुकतेंच. २. वतन. ३. धगधगीत निखाऱ्यांची खाई. ४. केराचा ढीग, केरोपंत. ५. नथणी ६. अंगांत दैवत आणून बोलविलें. ७. नारळ. ८. मंत्रतंत्र, जारणमारणादि साधनें. ९. क्षुद्र साधनें. १०. नशीब. ११. झुरू लागला.
खेळती धाकुटीं । एक रांगती एक पाठीं । ऐसी घरभरी झाली दाटी । कन्या आणि पुत्रांची ॥ २ ॥ दिवसेंदिवस खर्च वाढला । यार्वा होता तो खुंटोनि गेला । कन्या उपवेर झाल्या त्यांला । उजवावया द्रव्य नाहीं ॥३॥ मायबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन । तेणेंकरितां प्रतिष्ठा मान । जनीं झाला होता ॥ ४ ॥ भ्रम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं । दिवसेंदिवस अभ्यंतरीं । दरिद्र आलें ॥ ५ ॥ ऐसी घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं । तेणें प्राणियासि लागली । काळजी उद्वेगाची ॥ ६ ॥ कन्या उपवेर झाल्याँ । पुत्रांस नोवऱ्या आल्या । आतां उजवण्या केल्या । पाहिजेत कीं ॥ ७ ॥ जरी मुलें तैसींच राहिलीं । तरी पुन्हा लोकलाज लागली । ह्मणती कायसा व्यालीं । जन्मदरिद्रीं ॥ ८ ॥ ऐसी लोकलाज होईल । वडिलांचें नांव जाईल । आतां ऋण कोण देईल । लग्नापुरतें ॥ ९ ॥ मागें ऋण ज्याचें घेतलें । त्याचें परतून नाहीं दिधलें । ऐसें आभाळ कोसळलें । उद्वेगाचें ॥ १० ॥ आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासी । सर्वकाळ मानसीं । चिंतात्तुर ॥ ११ ॥ पत अवघीच मोडली । वस्तुभाव गहाण पडली । हाहा देवा वेळ आली । आतां दिवाळ्याची ॥ १२ ॥ कांहीं केला ताडामोडा । विकिला घ- रचा रेडापाडा । कांहीं पैका रोकडा । कैलांतरें काढिला ॥ १३ ॥ ऐसें ऋण घेतलें । लौकिकीं दंभ केलें । सकळ ह्मणती नांव राखिलें । वडिलांचें ॥ १४ ॥ ऐसें ऋण उदंड झालें । ऋगाईतीं वेढूनि घेतलें । मग प्रयाणें आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५ ॥ दोन वर्षे बुडी मारिली । नीचसेवा अं- गिकारली । शरीरीं आपदा भोगिली । अतिशयेंसी ॥ १६ ॥ कांहीं मिळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपाशीं । मग पुसोनियां स्वामीसी । मुरडता झाला ॥१७॥ तंव तीं अत्यंत पीडा पावलीं । वाट पाहात बैसलीं । म्हणती दिवसगती कां लागली । काय कारण देवा ॥ १८ ॥ आतां आम्हीं काय खावें । किती उपवासी मरावें । ऐसियाचे संगतीस देवें । कां पां- घातलें आम्हांसी ॥ १९ ॥ ऐसें आपुलें सुख पावती । परी त्याचें दुःख १. मिळकत. २. वयांत आल्या. ३. व्याजाने. ४. आव, थाटमाट. ५. साव- कारांनीं. ६. गमन, जाणें.
५६ श्रीदासबोध. [ दशक
नेणती । आणि शक्ति गेलिया अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २० ॥ असो ऐसी वाट पाहातां । दृष्टीं देखिला अवचितां । मुलें धांवती ताता ताता । भागलासी म्हणोनी ॥ २१ ॥ स्त्री देखोनि आनंदली । म्हणती आ- मुचीं दैन्य फिटलीं । तंव येरें दीधली । गांठोडी हातीं ॥ २२ ॥ सकळांस आनंद झाला । म्हणती आमुचा वडील आला । तेणें तरी आह्मांला । आंगडया टोप्या आणिल्या ॥ २३ ॥ ऐसा आनंद चारी दिवस ॥ सर्वैचि मांडिली कुमसुम । म्हणती हे गेलिया आह्मांस । पुनः आपदा लागती ॥ २४ ॥ म्हणोनि आणिलें तें असावें । याणें मागुती विदेशास जावें । आह्मीं हें खाऊ तों यावें । द्रव्य मेळवूनि ॥ २५ ॥ ऐसी वासना सकळांची । अवघीं सोयरीं सुखाचीं । स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखा लागली ॥ २६ ॥ विदेशीं बहुत दगदगला । विश्रांति घ्यावया घरीं आला । श्वासहि नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७ ॥ पुढें अपेक्षा जोश्याची । केली विवंचना मुहूर्तांची । वृत्ति गुंतली तयाची । जातां प्रशस्त न वाटे ॥ २८ ॥ माथां मात्रा सिद्ध केली । कांहीं सामुग्री बांधिली । लेंकुरें दृष्टीं पाहिलीं । नागस्थ झाला ॥ २९ ॥ स्त्रियेसि अवलोकिलें । वियोगें परम दुःख वाटलें । प्रारब्धसूत्र तुटलें । ऋणानुबंधाचें ॥ ३० ॥ कंठ सद्गदित जाहला । न सांवरेचि गहिवर आला । लेंकुरें आणि पित्याला । ताडातोडी जाहली ॥ ३१ ॥ जरी ऋणानुबंध असेल । तरी मागुती भेटी होईल । नाहीं तरी संगति पुरेल । येच भेटीनें तुमची ॥ ३२ ॥ ऐसें बो- लोनि स्वार होये । मागुती फिरफिरोनि पाहे । वियोगदुःख न साहे । परंतु कांहीं न चले ॥ ३३ ॥ आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें संसारउद्वेगें । दुखावला प्रपंचसंगें । अभिमानास्तव । ३४ । ते समयीं माता आठवली । म्हणे धन्य धन्य ते माउली । मजकारणें बहुत कष्टली । परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५ ॥ आजि जरी ते असती । तरी मला कदा न विसंबती । वियोग होतां आक्रंदती । ते पोटआगी वेगळीच ॥ ३६ ॥ पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी । दगदगला देखोन अंत- रीं । त्याच्या दुःखें दुखावे ॥ ३७ ॥ प्रपंचविचारें पाहतां । हें सकळ जोडे न
१. कुरकूर. २. मन. ३. द्रव्य. ४. फराळाचें सामान.
३ रा. ] संपत्तीवेध. ५७ जोडे माता । हें शरीर जयेकरितां । निर्माण जाहलें ॥ ३८ ॥ लांव तरी ते माया । काय कराव्या सहस्त्र जायो । परी भुलोनि गेलों वायां । मकर- ध्वजाचेनी ॥ ३९ ॥ या एका कामाकारणें । जिवलगांसी द्वंद्व घेणं । सखीं तींच पिसुनें । ऐशीं वाटती ॥ ४० ॥ म्हणोनि धन्य धन्य प्रपंची जन । जे मायबापांचें भजन । करिती न करिती मन । निष्ठुर जिवलगासी ॥ ४१ ॥ संगती स्त्रियाबाळकांची । आहे सोंठी जन्मांची । परी मायबापें कैंचीं मिळतील पुढें ॥ ४२ ॥ ऐसें पूर्वी होतें ऐकिलें । परी ते समयीं नाहीं कळलें । मन हें बुडोन गेलें । रतिसुखाचिया डोहीं ॥ ४३ ॥ हीं सखीं वाटती परी पिसुनें । मिळालीं वैभवाकारणें । रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे ॥ ४४ ॥ आतां भलतैसें करावें । परी द्रव्य मिळवून न्यावें । रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥ ४५ ॥ ऐसी विवंचना करी । दुःख वाटलें अंतरीं । चिंतेचिया महापुरीं । बुडोनि गेला ॥ ४६ ॥ ऐसा हा देह आपुला । अस- तांचि पराधीन केला । ईश्वरीं कानकोंडा झाला । कुटुंबकोंबाडी ॥ ४७ ॥ या एका कामासाठीं । जन्म गेला आटाआटी । वय वेंचलया शेवटीं । एकलेंचि जावें ॥ ४८ ॥ ऐसा मनीं पस्तावला । क्षण एक उदास झाला । सवेंचि प्राणी झेंळंबला । मायाजाळें ॥ ४९ ॥ कन्या पुत्र आठवलीं । मनीं- हुनि क्षिती१० वाटली । ह्मणे लेंकुरें अंतरलीं । माझीं मज ॥ ५० ॥ मागील दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त झालें । मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें ॥ ५१ ॥ अरणीं रुदन करितां । कोणी नाहीं बुझावितों । मग होय वि- चारिता । आपुले मनीं ॥ ५२ ॥ आतां कायसा रडावें । प्राप्त होतें तें भोगावें । ऐसें बोलोनियां जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३ ॥ ऐसा दुःखें दग- दगला । मग विदेशाप्रति गेला । पुढें प्रसंग कैसा वर्तला । तो सावध ऐका ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके संपत्ति- वेधनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ १. बायका. २. कामामुळे. ३. तंटा. ४. शत्रु. ५. सोबत. ६. चोरटा. ७. कुटुंबाचा भार वाहणारा. ८. दगदगीनें. ९. गुंडाळून गेला. १०. खंती. ११. समजावणी करणारा.
५८ श्रीदासबोध. [ दशक ५. कांताहरण. श्रीगणेशाय नमः ॥ पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला आपुल्या व्यासंगासी । आपुल्या जीवें सोसी । नाना श्रम ॥ १ ॥ ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर । पुढें दोनी चारी संवत्सर । द्रव्य मिळविलें ॥ २ ॥ सर्वंचि आला देशासी । तों अवर्षण पडलें देशीं । तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाहले ॥ ३ ॥ एकांच्या बैसल्या अमृतकळौ । एकांस चंद्री ला- गेली डोळां । एक कांपती चळचळां । दैन्यवाणी ॥४॥ एक दीनरूप बैसलीं । एक सुजलीं आणि मेलीं । ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५ ॥ तेणें बहुत दुःखी झाला । देखोनिदां उमर्डे आला । प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणें ॥ ६ ॥ तंव तीं अवघीं सावध झालीं । म्हणती बाबा जेवूं घालीं । अन्नालागीं मिटंकलीं । झर्डी घालिती ॥ ७ ॥ गांठोडें सोडोनि पाहती । हातां पडलें तेंच खाती । कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनियां ॥ ८ । तांतडी तांतडी जेऊं घाली । तों जेवितां जेवितां कांहीं मेलीं । कांहीं होतीं धांदावलीं । तींही मेलीं अजीर्णे ॥ ९ ॥ ऐसीं बहुतेंक मेलीं । एक दोन मुलें उरलीं । तींही दैन्यवाणीं झालीं । आपुले मातेवांचूनी ॥१०॥ ऐसें अवर्पण आलें । तेणें घरचि बुडालें । पुढें देशीं सुभिक्षं झालें । अति- शयेंसी ॥ ११ ॥ लेंकुरा नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेनि हातें । बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२ ॥ लोकीं भरीस घातलें । पुनः मागुतें लग्न केलें । द्रव्य होतें तें वोंचिलें । लग्नाकारणें ॥ १३ ॥ पुन्हा विदेशासि गेला । द्रव्य मेळवूनि आला । तंव घरीं कलहो लागला । साव- त्र पुत्रांसी । १४ ॥ स्त्री झाली न्हाती धुती । पुत्र देखों न शकती । भ्रता- राची गेली शक्ती । वृद्ध झाला ॥ १५ ॥ सदा भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें । वनिता अतिप्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६ ॥ किंतु बैसला मना । एके ठाईं पटेना । म्हणोनियां पांचजणां । मेळविलें ॥ १७ ॥ पांचजण वांटे करिती । तों ते पुत्र नायकती । निवाडा नव्हेचि अंतीं । भांडण लागलें ॥ १८ ॥ बापलेंकांचें भांडण झालें । लेंकीं बापास मारिलें । १. उद्योगास. २. गालफडा. ३. ताटकळा आली. ४. गहिवर. ५. आशाळलेलीं. ६. उद्व ईनें. ८. मुकेलेलीं. ९. सुकाळ. १०. बायको. ११. अविश्वास.