भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

२४८ श्रीदासबोध. [ दशक ५. पंचप्रलय. श्रीगणेशाय नमः ॥ ऐक प्रलयाचें लक्षण । पिंडीं दोन प्रलय जाण । एक निद्रा एक मरण । देहांतकाळीं ॥ १ ॥ देहधारक तीन मूर्ती । निद्रा जेव्हां संपादीती । तो निद्राप्रलय श्रोतीं । ब्रम्हांडींचा जाणावा ॥ २ ॥ तिही मूर्तीस होईल अंत । ब्रम्हांडास माडेल कल्पांत । तेव्हां जाणावा नेम- स्त। ब्रम्हप्रलय जाहला ॥ ३ ॥ दोन्ही पिंडीं दोन्ही ब्रम्हांडीं । चारी प्रलय नवखंडीं । पांचवा प्रलय उदंडीं । जाणिजे विवेकाचा ॥ ४ ॥ ऐसे हे पांच प्रलय । सांगीतले यथान्वयें । आतां हें अनुभवास ये । ऐसें करूं ॥ ५ ॥ निद्रा जेव्हां संचरे । तेव्हां जागृतिव्यापार सरे । सुषुप्ति अथवा स्वप्न भरे । अकस्मात अंगीं ॥ ६ ॥ या नांव निद्राप्रलय । जागृतीचा होय क्षय । आतां ऐका देहांतसमय । म्हणिजे मृत्युप्रलय ॥ ७ ॥ देहीं रोग बळावती । अथवा कठिण प्रसंग पडती । तेणें पंचप्राण जाती । व्यापार सांडूनी ॥ ८ ॥ तिकडे गेला मनपवन । इकडे राहिली नुसती तनू । दुसरा प्रलय अनुमाने । असेचिना ॥ ९ ॥ तिसरा ब्रम्हा निजेला । तों हा मृत्युलोक गोळा झाला । अवघा व्यापार खुंटला । प्राणिमात्रांचा ॥ १० ॥ तेव्हां प्राण्यांचे सूक्ष्मांश । वायुचक्रीं करिती वास । कित्येक काळ जातां ब्रम्हयास । जागृती घडें ॥ ११ ॥ पुनः मागुती सृष्टि रची । विसंचले जीव मागुते संची । सीमा हो- तां आयुष्याची । ब्रम्हप्रलय मांडे ॥ १२ ॥ शतवरुषें मेघ जाती । तेणें प्राणी मृत्यु पावती । असंभाव्य तडके क्षिती । मर्यादे वेगळी ॥ १३ ॥ सूर्य तपे बारा कळीं । तेणें पृथ्वीची होय होळी । अग्नि पावतां पाताळीं । शेष विष वमीं ॥१४॥ आकाशीं सूर्यांच्या ज्वाला । पाताळीं शेष वमी गरळा । दोहींकडून जळतां भूगोळा । उरी कैंची ॥ १५ ॥ सूर्यास खडतरता चढे । हलकल्लोळ चहूंकडे । कोसळती मेरूचे कडे । गडगडायमान ॥ १६ ॥ अमरावती सत्यलोक । वैकुंठ कैलासादिक । यांहि वेगळे नानालोक । भस्मोन जाती ॥ १७ ॥ मेरु अवघाच सरे । तेथील महिमाच वोसरे । देवसमुदाय बावरे । वायुचक्रीं ॥ १८ ॥ भस्म झालिया धरित्री । पर्जन्य पडे शुंडाधारीं । मही विरे जळांतरीं । निमिषमात्रें ॥ १९ ॥ पुढें नुसतें उरेल जळ । तयास शोषील १. झोंप. २. संशय. ३. विस्कळित झालेले जमवितो. ४. ओकतो.

अनळ । पुढें एकवटतील ज्वाळ । मर्यादेवेगळे ॥ २० ॥ समुद्रांचा वडवान- ळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ । सप्तकंचुकीं२चा आवरणानळ । सूर्य आणि वि- द्युल्लता ॥ २१ ॥ ऐसे ज्वाळ एकवटती । तेणें देव देह सोडिती । पूर्वरूपीं मिळोन जाती । प्रभंजनीं ॥ २२ ॥ तो वारा झडपी वैश्वानरा । वेन्हि वि- जेल एकसरां । वायु धांवे सैरावैरा । परब्रह्मीं ॥ २३ ॥ धूम्र वितळे आ- काशीं । तैसें होईल समीरासी । बहुतांमध्ये थोडियासी । नाश बोलिला ॥ २४ ॥ वायु वितळतां जाण । सूक्ष्म भूतें आणि त्रिगुण । ईश्वर सांडी अधिष्ठान । निर्विकल्पीं ॥ २५ ॥ तेथें जाणीव राहिली । आणि जगज्ज्योत निमाली । शुद्ध सारांश उरली । स्वरूपस्थिती ॥ २६ ॥ जितुकीं कांहीं नामाभिधानें । तये प्रकृतीचेनि४ गुणें । प्रकृति नसतां बोलणें । कैसें बोलावें ॥ २७ ॥ प्रकृति असतां विवेक कीजे । त्यास विवेकप्रलय बोलिजे । पांचहि प्रलय वोजें५ । तुज निरूपिले ॥ २८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके पंचप्रलयनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. भ्रम. श्रीगणेशाय नमः ॥ उत्पत्ति स्थिति संहार । यांचा निरूपिला व्यवहार । परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥ होतें वर्ततें आणि जातें । यांचा संबंध नाहीं तेथें । आदि मध्य अवसानीं तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥ परब्रह्म असतांचि असे । मध्येंच हा भ्रम भासे । भासे परंतु अवघा नासे । कालांतरीं ॥ ३ ॥ उत्पत्ति स्थिति संहारत । मध्यें हें अखंड होत जात । पुढें शेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४ ॥ यांमध्ये ज्यास विवेक आहे । तो आधींच जाणताहे । सारासार विचारें पाहे । म्हणोनियां ॥ ५ ॥ बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले । सृष्टीमध्यें उमजले । ऐसे थोडे ॥ ६ ॥ त्या उमजल्याचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । भ्रमाहून विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥ भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावें तयासी । ऐका आतां भ्रमासी । निरूपिजेल ॥ ८ ॥ एक परब्रह्म संचलें । कदापि नाहीं विकारलें । त्या वेगळें जें भासलें । तें भ्रमरूप ॥ ९ ॥ जयास १. अग्नि. २. ब्रह्मांडाचा. ३. वायूचे ठिकाणीं. ४. मायेचे. ५. स्पष्टपणें.

बोलिला कल्पांत । त्रिगुण आणि पंचभूत । हें अवघेंच समस्त । भ्रमरूप ॥ १०॥ मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम । ईश्वर हा हि भ्रम । निश्चयें सी ॥ ११ ॥ श्लोक ॥ भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर- भावत्वं भ्रममूलमिदं जगत् ॥ १॥ टीका ॥ या कारणें सृष्टि भासत । परंतु भ्रमचि हा समस्त । यामध्यें जे विचारवंत । तोचि धन्य ॥ १२॥ आ- तां भ्रमाचा विचारू । अत्यंतचि प्रांजळ करू । दृष्टांतद्वारें विवरूं । श्रोत- यांसी ॥ १३॥ भ्रमण करितां दूरदेशीं । दिशाभुली आपणाशी । कां ओ- ळखी मोडे जिवलगांसीं । या नांव भ्रम ॥ १४ ॥ कां उन्मत्तद्रव्य सेविलें । तेणें अनेक भासों लागलें । नाना व्यथा कां झडापिलें । भूतें तो भ्रम ॥ १५॥ दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडिली बाजीगिरी । उगाच संदेह अं- तरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥ ठेवला ठाव तो विसरला । कां मार्गीं जातां चुकला । पट्टणामध्यें भांभावला । या नांव भ्रम ॥ १७॥ वस्तु आपणा- पासीं असतां । गेली म्हणोन होय दुश्चिता । आपुलें आपण विसरता । या नांव भ्रम ॥१८॥ कांहीं पदार्थ विसरोन गेला । कां जें शिकला तें विसरला । स्वप्नदुःखें बाविरा झाला । या नांव भ्रम ॥१९॥ दुश्चिन्ह अथवा अपशकुन । मिथ्या वार्तेनें भंगे मन । दचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥२०॥ वृक्ष काष्ठ पशु देखिले । मनांत वाटे भूत आलें । कांहींच नसतां हडबडिलें । या नांव भ्रम ॥२१॥ आतां कांच म्हणोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणी वावडे । द्वार चुकोन भलतीकडे । या नांव भ्रम ॥२२॥ एक असतां एक वाटे । एक सांगतां एक निर्बटे । एक दिसतां एक उठे । या नांव भ्रम ॥२३॥ आतां जें जें दीजेतें । तें तें पुढें पाविजेतें । मेलें माणूस भोजना येतें । या नांव भ्रम ॥ २४ ॥ ये जन्मींचें पुढिले जन्मीं । कांहीं एक पावेन मी । प्रीति गुं- तली मनुष्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥ मेलें मनुष्य स्वप्नीं आलें । तेणें कांहीं मागीतलें । मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥ २६ ॥ अवघें मिथ्या म्हणोन बोले । आणि सामर्थ्यांवरी मन चाले । ज्ञाते वैभवें दड- पिले । या नांव भ्रम ॥ २७ ॥ कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळेंचचि १. उघड. २. मादक पदार्थ. ३. जादुगिरी. ४. मोठ्या शहरामध्यें. ५. आर- सेमहाल. ६. शिरतो. ७. घडलें.

अष्टे । कोणी एक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥२८॥ देहाभिमान कर्माभि- मान । जात्याभिमान कुळाभिमान । ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव भ्रम ॥ २९ ॥ कैसा न्याय तो न कळे । केला अन्याय तो नाढळे । उगाच अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥ मागील कांहीं आठवेना । पुढील हीं सुचेना । अखंड आरूढ अभिमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥ प्रची- तीवीण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें । प्रचीतीविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ३२ ॥ फळश्रुतीविण प्रयोग । ज्ञानेंविण नुसता योग । उ- गाच शरीरें भोगी भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥ ब्रह्मा लिहितो अदृष्टीं १ । आणि वाचून जाते संटी २ । ऐशा प्रकारच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥ उदंड भ्रम विस्तारला । अज्ञानजनीं पैलावला । अल्पसंकेतें बोलिला । कळावयाकारणें ॥३५॥ भ्रमरूप विश्व स्वभावें । तेथें काय म्हणोन सांगावें । निर्गुण ब्रह्मावेगळें आघवॆं । भ्रमरूप ॥ ३६ ॥ ज्ञात्यास नाहीं संसार । ऐसे बोलती अपार । गत झाल्यांचे चमत्कार ३ । या नांव भ्रम ॥ ३७ ॥ येथें आ- शंका उठिली । ज्ञात्यांची समाधि पूजिली । तेथें कांहीं प्रचीत आली । किंवा नाहीं ॥ ३८ ॥ तैसेचि अवतार संपले । त्यांचेंहि सामर्थ्य उदंड चाले । तरी ते काय गुंतले । वासना धरूनी ॥ ३९ ॥ ऐसी आशंका उद्भवली । समर्थे पाहिजे निरूपिली । इतुकेन हे संपली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके भ्रमनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥


७. सगुणभजन. श्रीगणेशाय नमः ॥ अवतारादिक ज्ञानी संत । सारासार विचारें मुक्त । त्यांचें सामर्थ्य चालत । कोणत्या प्रकारें ॥ १ ॥ हे श्रोत्यांची आशंका । पाहतां प्रश्न केला निका । सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥ ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचें सामर्थ्य चाले । परंतु ते नाहीं आले । वास- ना धरूनी ॥ ३ ॥ लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार । परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥ जित असतां नेणों किती । जना-


१. कपाळावर. २. सटवी. ३. अलौकिक कृत्यें.

२५२ श्रीदासबोध. [ दशक मध्यें चमत्कार होती । ऐसी यांची सद्यःप्रचीती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥ तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला । ऐसा हा चमत्कार झाला । यास काय म्हणावें ॥ ६ ॥ तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां देव यथार्थ । अन्यत्र कल्पना व्यर्थ । कुतर्काच्या ॥ ७ ॥ आवडे तें स्वप्नीं देखिलें । तरी काय तेथूनि आलें । म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥ एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना १। तरी ते पदार्थ चालतीना । अथवा आठवू नाहीं ॥ ९ ॥ येथें तुटली आशंका । ज्ञा- त्यास जन्म कल्पूं नका । उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥ ज्ञाते मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगौचि चाले । कां जे पुण्यमागें चालिले । म्हणोनियां ॥ ११ ॥ या कारणें पुण्यमागें चालावें । भजन देवाचें वाढवावें । न्याय सोडून न जावें । अन्यायमागें ॥ १२ ॥ नाना पुरश्चरणें करावीं । नाना तीर्थाटनें फिरावीं । नाना सामर्थ्यं वाढवावीं । वैराग्यबळें ॥ १३ ॥ निश्चय बैपे वस्तुंकडे । तरी ज्ञानमागैंहि सामर्थ्य चढे । कोणी एक ऐकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥ एक गुरु एक देव । कोठें तरी असावा भाव २। भावार्थ नसतां वाव ३। सर्व कांहीं ॥ १५ ॥ निर्गुण ज्ञान झालें । म्हणोन सगुण अलक्ष्य केलें । तरी तें ज्ञानें नागविलें । दोहींकडे ॥ १६ ॥ नाहीं भक्ति नाहीं ज्ञान । मध्येंच पैसावलें अनुर्मान ४। म्हणोनियां जप ध्यान । सांडूंचि नये ॥ १७ ॥ सांडील सगुण भजनासी । तरी तो ज्ञाता परी अ- पेशी । म्हणोनियां सगुण भजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥ निष्कामबुद्धी- चिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा । सामर्थ्याविण घडेना । निष्काम भजन ॥ १९ ॥ कामनेनें फळ घडे । निष्कामभजनें भगवंत जोडे । फळ- भगवंतासी कोणीकडे । महदंतर ॥ २० ॥ नाना फळें देवापाशीं । आणि फळ अंतरी भगवंतासी । या कारणें परमेश्वरासी । निष्काम भजावें ॥ २१॥ निष्काम भजनाचें फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळें । तेथें बापुडीं फळें । कोणीकडे ॥ २२ ॥ भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणाचि करावें । तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥ दोन्ही सामर्थ्यं एक होतां । का- ळासि नाटोपे सर्वथा । तेथें इतरांची काय कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥


१. अन्य पदार्थ. २. निष्ठा. ३. मनांतून दूर. ४. संशय.

१० वा. ] प्रचीत. २५३ म्हणोनि निष्काम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । तयास तुळितां त्रिभुवन । उणे वाटे ॥ २५ ॥ येथे बुद्धीचा प्रकाश । आणिक न चढे विशेष । प्रताप कीर्ति आणि यश । निरंतर ॥ २६ ॥ निरूपणाचा विचार । आणि हरिक- थेचा गजर । तेथें होती तत्पर । प्राणिमात्र ॥ २७ ॥ जेथें भ्रष्टाकार घडेना । तो परमार्थहि बुडेना । समाधान बिघडेना । निश्चयाचें ॥ २८ ॥ सारासार विचार करणें । न्याय अन्याय अखंड पाहणें । बुद्धि भगवंताचें देणें । पालटे- ना ॥ २९ ॥ भक्त भगवंतीं अनन्य । त्यासि बुद्धि देतो आपण । यदर्थी भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥ श्लोकार्थ ॥ ददामि बुद्धियोगं तं येन मा- मुपयांति ते ॥ म्हणोन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । प्रत्ययाचें समा- धान । दुर्लभ जगीं ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. प्रचीत. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका प्रचीतीचीं लक्षणें । प्रचीत पाहतील ते शा- हाणे । येरें वेडे दैन्यवाणे । प्रचीतीविण ॥ १ ॥ नाना रत्ने नाना नाणीं । परीक्षून न घेतां होय हानी । प्रचीत न येतां निरूपणीं । बैसोंच नये ॥ २ ॥ तुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहतां प्रचीतीस आलें । तरी मग पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥ बीज उगवेल ऐसें पाहावें । तरी मग द्रव्य घालून घ्यावें । प्रचीत भालिया ऐकावें । निरूपण ॥ ४ ॥ देहीं आ- रोग्यता झाली । ऐसी जनास प्रचीत आली । तरी मग अगत्य घेतली । पाहिजे मात्रा ॥ ५ ॥ प्रचीतीविण औषध घेणें । तरी मग घडचि विघ- डणें । अनुमानानें जें कार्य करणें । तेंचि मूर्खपण ॥ ६ ॥ प्रचीतीस नाहीं आलें । आणि सुवर्ण करविलें । तरी मग जाणावें ठकिलें । देखत देखतां ॥ ७॥ शोधून पाहिल्याविण । कांहीं तरी एक कारण । होणार नाहीं निर्वाणें । प्राणास घडे ॥ ८ ॥ म्हणोन अनुमानाचें कार्य । भल्यानें कदापि करूं नये । उपाय पाहतां अपाय । नेमस्त घडे ॥ ९ ॥ पाण्यांतील म्हैसीची साँटी । करणें हे बुद्धिच खोटी । शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १०॥ १. इतर. २. घोडा अथवा शस्त्र फिरवून पाहिल्यावर. ३. नाश. ४. सवदा.

२५४ श्रीदासबोध. [ दशक विश्वासें घर घेतलें । ऐसें कधीं नाहीं ऐकिलें । मैंदें¹ मैंदायें केलें । परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥ (शोधिल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मु- कणें । लटिक्याचा विश्वास धरणें । हेंचि मूर्खपण ॥ १२ ॥ संगती चोरांची धरितां । घात होईल तत्वतां । ठक सिंतरू² शोधितां । ठायीं पडे) ॥ १३ ॥ गैरसालै³ तालमगिरी । कोणी नवी मुद्रा करी । नाना कपट परोपरी । शो- धून पहावें ॥ १४ ॥ दिवाळखोराचा मोंड⁴ । पाहतां वैभवहि दिसे उदंड । परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥ तैसें प्रचीतीविण ज्ञान । तेथें नाहीं समाधान । करून बहुतांचें अनुमान । अनहित केलें ॥ १६ ॥ मंत्र यंत्र उपदेशिले । नेणते प्राणी गोचिले । जैसें झांकून मारिलें । दुखणाइत ॥ १७ ॥ वैद्य पाहिला परी काचा । तरी प्राण गेला पोराचा । येथें उपाय दुस- ऱ्याचा । काय चाले ॥ १८ ॥ स्वदुःखें अंतरीं झिजे । आणि वैद्य पुसतां लाजे । तरी मग तयासि साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥ जाणत्यावरी गर्व गेला । परी तो नेणत्याकरितां बुडाला । येथें कोणाचा घात झाला । बरें पाहा ॥ २० ॥ पापाची खंडणा झाली । जन्मयातना चुकली । ऐसी स्वयें प्रचीत आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥ परमेश्वरासि ओळखिलें । आ- पण कोण ऐसें कळलें । आत्मनिवेदन झालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥ ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें । मुख्य कर्त्यास ओळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥ जेथें अनुमान राहिलें । तरी परमार्थ केले ते वायां गेले । प्राणी संशयीं बुडालें । प्रचीतीविण ॥ २४ ॥ हेंचि परमार्थाचें वर्म । लटिकें बो- लेल तो अधम । लटिकें मानील तो अधमाधम । यथार्थ जाणावा ॥ २५ ॥ येथें बोलण्याची झाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा । असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूंचि जाणसी ॥ २६ ॥ माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सां- गावें साचार । मिथ्या बोलतां उत्तर । प्रभूसी लागे ॥ २७ ॥ म्हणोनि सत्यचि बोलिलें । कर्त्यास पाहिजे ओळखिलें । मायोद्भवाचें शोधिलें । पा- हिजे मूळ ॥ २८ ॥ तेंचि पुढें निरूपण । बोलिलें बोलिजे प्रमाण । श्रोतीं सावध अंतःकरण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥ सूक्ष्म निरूपण लांगलें । तेथें बोलिलेंचि मागुती बोलिलें । श्रोतयांस पाहिजे उमजलें । म्हणोमिया

१. फांसेगारानें. २. फसव्या. ३. दुर्वर्तनी. ४. पसारा.

१० वा. ] प्रकृतिपुरुषनिदर्शन. २५५ ॥ ३० ॥ प्रचीत पाहतां निकट । उडोन जाती परिपाठें । म्हणोन हे खट- पट । करणें लागे ॥ ३१ ॥ परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचीत समा- धान बुडालें । प्रचीतसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥ ऐसीं सा- कडीं दोहींकडे । म्हणोनि बोलिलेंचि बोलणें घडे । दोन्ही राखोनियां कोडें । उकलून दावूं ॥ ३३ ॥ परिपाठ आणि प्रचीतप्रमाण । दोन्ही राखून निरूपण । श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे दशमदशके प्रचीतनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. प्रकृतिपुरुषनिदर्शन. श्रीगणेशाय नमः ॥ आकाशीं वायु झाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळ- माया जाण । त्या वायुमध्यें त्रिगुण । आणि पंचभूतें ॥ १ ॥ वटबीजीं असे वड । फोडून पाहतां न दिसे झाड । नाना वृक्षांचे जुंबाड । बिजापासून होती ॥ २ ॥ तैसी बीजरूप मूळमाया । विस्तार झाला तेथूनिया । तिचें स्वरूप शोधूनिया । बरें पाहा ॥ ३ ॥ तेथें दोन्ही भेद दिसती । विवेकें पाहावी प्रचीती । निश्चळीं जे चंचल स्थिति । तोचि वायु ॥ ४ ॥ तया- मध्यें जाणीवकळा । जगज्ज्योतीचा जिव्हाळा । वायु जाणीव मिळोन मेळा । मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥ सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहतां पाणीच असे । विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥ वायु जाणीव जगज्योती । तयास मूळमाया म्हणती । पुरुष आणि प्रकृती । याचेंच नांव ॥ ७ ॥ वायूंस म्हणती प्रकृती । आणि पुरुष म्हणती जगज्ज्योती । पुरुष प्रकृति शिव शक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥ वायुमध्यें जाणीव विशेष । तोचि प्रकृतीमध्यें पुरुष । ये गोष्टीचा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ९ ॥ वायु शक्ति जा- णीव ईश्वर । अर्धनारी नटेश्वर । लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥ वा- यूमध्यें जाणीव गुण । तेंचि ईश्वराचें लक्षण । तयापासून त्रिगुण । पुढें झाले ॥ ११ ॥ तया गुणांमध्यें सत्वगुण । निखिल जाणीव लक्षण । त्याचा देह- धारी आपण । विष्णु जाहला ॥ १२ ॥ त्याच्या अंगें जग चाले । ऐसें भगवद्गीता बोले । गुंतलें तेंचि उगवलें । विचार पाहतां ॥ १३ ॥ एक १. संप्रदाय. २. नदी. ३. उलगडलें.

२५६ श्रीदासबोध. [ दशक जाणीव वांटली । प्राणिमात्रास विभागली । जाणजाणों वांचविली । सर्व काया ॥ १४ ॥ तयेचें नांव जगज्योती । प्राणिमात्र तिचेनि जगती । याची रोकडी प्रचीती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥ पक्षी श्वापद किडा मुंगी । कोणी एक प्राणी जगीं । जाणीव खेळे त्याचे अंगीं । निरंतर ॥ १६ ॥ जाणोन काया पळविती । तेणें गुणें प्राणी वांचती । दडती आणि लपती । जाणजाणों ॥ १७ ॥ अवघ्या जगास वांचविती । म्हणोन नामें जगज्योती । ते गेलिया प्राणी मरती । जेथील तेथें ॥ १८ ॥ मुळींच जाणीवेचा विकार । पुढें झाला विस्तार । जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणू ॥ १९ ॥ तैसें देव देवता भूतें । मिथ्या म्हणों नये त्यांतें । आपुलाल्या सामर्थ्ये ते । सृष्टिमध्यें फिरती ॥ २० ॥ सदा विचरती वायुस्वरूपें । स्वइच्छा पालटती रूपें । अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पें । त्यासि बाधिती ॥ २१ ॥ ज्ञात्यासि संकल्पाचि असेना । म्हणोन त्यांचेनि बाधवेना । या कारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥ अभ्यासिल्या आत्मज्ञान । सर्व कर्म होये खंडण । हे रोकडी प्रचीत प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥ ज्ञानेंविण कर्म विथेंडे । हें तों कल्पांतीं न घडे । सद्गुरुविण ज्ञान जोडे । हेंहि अघटित ॥ २४ ॥ म्हणोन सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा । तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं ॥ २५ ॥ तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वतां । अनन्य- भावें सार्थकता । सहजाचि जाहली ॥ २६ ॥ विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगेंचि व्यर्थ गेलें । म्हणोनि विचारीं प्रवर्त्तलें । पाहिजे आधीं ॥२७॥ विचार पाहील तो पुरुष । विचार न पाहे तो पशु । ऐसीं वचनें सर्वेश । ठायीं ठायीं बोलिला ॥ २८ ॥ सिद्धांत साधावयाकारणें । पूर्वपक्ष लागे उठवणें । परंतु साधकांसी निरूपणें । साक्षात्कार ॥ २९ ॥ श्रवण मनन निदिध्यास । प्रचीतीनें बाणतां विश्वास । रोकडा साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके प्रकृ- तिपुरुषनिदर्शननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥


१. फलशून्य होतें.

१० वा.] चलाचलः २५७ १०. चलाचल. श्रीगणेशाय नमः ॥ गगनासारिखें ब्रह्म पोकळ । उदंड उंच अंतराळ । निर्गुण निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १ ॥ त्यास परमात्मा म्हणती । आणिक नामें सांगों किती । परी तें जाणिजे आदि अंतीं । जैसें तैसें ॥२॥ विस्तीर्ण पसरला पैस । भोंवता दाटला अवकाश । भासचि नाहीं निराभास । जैसें तैसें ॥ ३ ॥ चहूंकडे पाताळातळीं । अंतचि नाहीं अंतराळीं । कल्पांत- काळीं सर्वकाळीं । संचलेंचि असे ॥ ४ ॥ ऐसें कांहींएक चंचळ । तें अचंचळीं भासे चंचळ । त्यास नामेंही सकळ । विविध प्रकारें ॥ ५ ॥ न दिसतां नाम ठेवणें । न देखतां खूण सांगणें । असों हीं जाणावयाकारणें । नामाभिधानें ॥ ६ ॥ मूळमाया मूळप्रकृती । मूळपुरुष ऐसें म्हणती । शिव- शक्ति नामें किती । नाना प्रकारें ॥ ७ ॥ परी जें नाम ठेविलें जया । आधीं ओळखावें तया । प्रचीतीविण कासया । वल्गना करावी ॥ ८ ॥ रूपाची न धरितां सोय । नामासरिसें भरंगळों नये । प्रत्ययेंविण गळंगो¹ होय । अनुमानज्ञानें ॥ ९ ॥ निश्चळ गगनीं चंचल वारा । वाजों लागला भरारा । परी त्या गगना आणि समीरा । भेद आहे ॥ १० ॥ तैसें निश्चळ परब्रम्ह । चंचळ माया भासला भ्रम । त्या भ्रमाचा संभ्रम² । करून दावूं ॥ ११ ॥ जैसा गगनीं चालिला पवन । तैसें निश्चळीं झालें चळण । इच्छा स्फूर्ति लक्षण । स्फुरणरूप ॥ १२ ॥ अहंपणें जाणीव झाली । तेचि मूळ- प्रकृति बोलिली । महाकारण काया रचिली । ब्रह्मांडाची ॥१३॥ महामाया मूळप्रकृती । कारण ते अव्याकृती । सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती । विराट ते स्थूळ ॥ १४ ॥ ऐसें पंचीकरण³ शास्त्रप्रमेय⁴ । ईश्वरतनुचतुष्टयें⁵ । म्हणोन हें बोलणें होय । जाणीव मूळमाया ॥१५॥ परमात्मा परमेश्वर । परेश ज्ञानघन ईश्वर । जगदीश जगदात्मा जगदीश्वर । पुरुष नामें ॥ १६ ॥ आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । द्रष्टा साक्षी सर्वात्मा । क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा । देहीं कूटस्थ बोलिजे ॥ १७ ॥ इंद्रात्मा ब्रम्हात्मा हरिहरात्मा । यमात्मा धर्मात्मा नैर्ऋ- तात्मा । वरुण वायु कुबेरात्मा । ऋषिदेवमुनिधर्ता ॥ १८ ॥ गण गंधर्व १. घोटाळा. २. खुलासा. ३. पंचतत्वांचें मिश्रण. ४. शास्त्राचे सिद्धांत. ५. विराट्, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृति हे ब्रह्मांडांचे चार देह.

२५८ श्रीदासबोध. [ दशक विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । सर्व लोकांचें अंतर । तो सर्वात्मा बोलिजे ॥ १९ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । भूमंडळें मेघमंडळें । एकविस स्वर्गे सप्त पाताळें । अंतरात्माच वर्तवी ॥ २० ॥ गुप्तवल्ली पाल्हाळली । तिचीं पुरुषनामें घेतलीं । आतां स्त्रीनामें ऐकिलीं । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥ मूळमाया जगदीश्वरी । परम विद्या परमेश्वरी । विश्वाविद्या विश्वेश्वरी । त्रैलोक्यजननी ॥ २२ ॥ अंतर्हेतु अंतर्कळा । मौन्यगर्भ जाणीवकळा । चपळा जगज्योति जीवनकळा । परा पश्यंती मध्यमा ॥ २३ ॥ युक्ति बुद्धि मति धारणा । सावधानता नाना चाळणा । भूत भविष्य वर्तमाना । उकलून दावी ॥ २४ ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति जाणे । तुर्या तटस्थावस्था जाणे । सुख दुःख सकळ जाणे । मानापमान ॥ २५ ॥ ते प- रम कठिण कृपाळू । ते परम कोमळ स्नेहाळू । ते परम क्रोधी लोभाळू । मर्यादेवेगळी ॥ २६ ॥ शांति क्षमा विरक्ति भक्ती । अध्यात्मविद्या सायुज्य- मुक्ती । विचारणा सहजस्थिती । जयेचेनी ॥ २७ ॥ पूर्वी पुरुषनामें बोलि- लीं । उपरि स्त्रीनामें निरूपिलीं । आतां नपुंसकनामें ऐकिलीं । पाहिजे चंचळाचीं ॥ २८ ॥ सत्तारूप ज्ञानस्वरूप । प्रकाशरूप ज्योतिरूप । कार- णरूप चिद्रूप १ । शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ २९ ॥ जाणणें अंतःकरण चित्त । श्र- वण मनन चैतन्य जीवित । येतें जातें सुचित्त । होऊन ऐका ॥ ३० ॥ मीपण तूं पण जाणपण । ज्ञातेपण सर्वज्ञपण । जीवपण शिवपण ईश्वरपण । अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥ ऐसी नामें उदंड असती । परी ते एकचि ज- गज्योती । विचारवंत ते जाणती । सर्व अंतरात्मा ॥ ३२ ॥ आत्मा जग- ज्योति सर्वज्ञपण । तिन्ही मिळोनि एकचि जाण । अंतर्कळाचि प्रमाण । ज्ञप्तिमात्र ॥ ३३ ॥ ढीग झाले पदार्थांचे । पुरुष स्त्री नपुंसक नामांचे । परंतु सृष्टिरचनेचे । किती म्हणोन सांगावे ॥ ३४ ॥ सकळां चालिता एक । अंतरात्मा वर्तवी अनेक । मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेंचि चालती ॥ ३५ ॥ तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत ओळखाना आभासा । नाना प्रकारींचा तमासा । येथेंचि आहे ॥ ३६ ॥ तो कळतो परी दिसेना । प्रतीत येते परी भासेना । शरीरीं असे परी वसेना । एके ठायीं ॥ ३७ ॥ तीक्ष्णपणें २ १. ज्ञानस्वरूप २. सूक्ष्मपणें.

१० वा.] चलाचल. २४९ गगनीं भरे। सरोवर देखतांच पसरे। पदार्थ रक्षून उरे। चहूंकडे ॥ ३८ ॥ जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो। तो त्या पदार्थासारिखाच होतो। वायूहून विशेष तो। चंचळविषयीं ॥ ३९ ॥ कित्येक दृष्टीनें देखे। कित्येक रसनेनें चाखे। कित्येक ते वोळखे। मनेंकरूनी ॥ ४० ॥ श्रोत्रीं बैसोन शब्द ऐ- कतो। घ्राणेंद्रियें वास घेतो। त्वचेंद्रियें जाणतो। शीतोष्णादिक ॥ ४१ ॥ ऐशा जाणे अंतरकळा। सकळांमध्यें परी निराळा। पाहतां त्याची अगाध लीला। तोचि जाणे ॥ ४२ ॥ तो पुरुष ना सुंदरी। बाळ तरुण ना कुमारी। नपुंसकाचा देहधारी। परी नपुंसक नव्हे ॥ ४३ ॥ तो चालवी सकळ दे- हांसी। करून अकर्ता म्हणती त्यासी। तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी। देहीं कूटस्थ बोलिजे ॥ ४४ ॥ श्लोक ॥ द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ॥ क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १ ॥ टीका ॥ दोन्ही पुरुष लोकीं अ- सती। क्षराक्षर बोलिजेती। सर्व भूतें क्षर म्हणती। अक्षर कूटस्थ बोलिजे ॥ ४५ ॥ उत्तम पुरुष तो आणिक। निष्प्रपंच आणि निष्कलंक। निरंजन परमात्मा एक। निर्विकारी ॥ ४६ ॥ चारी देह निरसावे। साधकें देहा- तीत व्हावें। देहातीत होतां जाणावें। अनन्य भक्त ॥ ४७ ॥ देहमात्र नि- रसोन गेला। तेथें अंतरात्मा कैंचा उरला। निर्विकारीं विकारला। विका- रचि नाहीं ॥ ४८ ॥ निश्चळ परब्रह्म एक। चंचळ जाणावें मायिकें। ऐसा प्रत्यय निश्चयात्मक। विवेकें पाहावा ॥ ४९ ॥ येथें बहुत नलगे खळखळ। एक चंचळ एक निश्चळ। शाश्वत कोण हें केवळ। ज्ञानें ओळखावें ॥ ५० ॥ असार त्यागून घेइजे सार। म्हणोन सारासार विचार। नित्यानित्य निरं- तर। पाहती ज्ञानी ॥ ५१ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान। जेथें मनाचें होतें उन्मन। तेथें कैंचें चंचळपण। आत्मयासी ॥ ५२ ॥ सांगणी वांग- णीचें काम नव्हे। आपुल्या अनुभवें जाणावें। प्रत्ययेंविण सिणावें। तेंचि पाप ॥ ५३ ॥ सत्याएवढें सुकृतें नाहीं। असत्याएवढें पाप नाहीं। प्रची- तीविण कोठेंचि नाहीं। समाधान ॥ ५४ ॥ सत्य म्हणिजे स्वरूप जाण। असत्य माया हें प्रमाण। येथें निरूपिलें पाप पुण्य। रूपांसहित ॥ ५५ ॥ दृश्य पाप वोसरलें। पुण्य परब्रह्म उरलें। अनन्य होतांच झालें। नामा- १. कानामध्यें. २. नाकामध्यें. ३. त्वचेमध्यें. ४. खट. ५. पुण्य,

२६० श्रीदासबोध. [ दशक तीतें ॥ ५६ ॥ आपण वस्तुच स्वतःसिद्ध । तेथें नाहीं देहसंबंध । पापराशी होती दग्ध । येणें प्रकारें ॥ ५७ ॥ येन्हवीं ब्रह्मज्ञानेंविण । जें जें साधन तो तो सिण । नाना दोषांचें क्षाळण । होईल कैसें ॥ ५८ ॥ पापाचें वळलें शरीर । पापचि वढे तदनंतर । अंतरीं रोग वरी उपचार । काय करी ॥ ५९ ॥ नाना क्षेत्रीं हें मुंडलें । नाना तीर्थीं हें दंडिलें । नाना निग्रहीं खं- डिलें । ठायीं ठायीं ॥ ६० ॥ नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा तप्तमुद्रेनें डाँशिलें । जरी हें वरीवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१ ॥ शेणाचे गोळे गिळिले । गोमूत्राचे भौघे घेतले । माळा रुद्राक्ष घातले । काष्ठमणी ॥ ६२ ॥ वेष वरिवरी केला । अंतरीं दोष भरला । त्या दोषाच्या दहनाला । आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्था- टणें । सर्वांहून कोटिगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥ आत्मज्ञान पाहे सदा । त्याच्या पुण्यास नाहीं मर्यादा । दुष्ट पातकांची बाधा । निर- सोन गेली ॥ ६५ वेदशास्त्रीं सत्यस्वरूप । तेंचि ज्ञानियाचें रूप । पुण्य झालें अमूर्प । सुकृतें सीमा सांडिली ॥ ६६ ॥ ह्या प्रचीतीच्या गोष्टी । प्र- चीत पाहावी आत्मदृष्टी । प्रचीतीवेगळें कष्टी । होऊं नये ॥ ६७ ॥ अगा हे प्रचीतीचे लोक हो । प्रतीत नसतां अवघा शोक हो । रघुनाथकृपेनें राहो । प्रत्यय निश्चयाचा । ६८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दश- मदशकचे चलाचलनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३५४. दशक अकरावा. १. सिद्धान्त. श्रीगणेशाय नमः ॥ आकाशापासून वायु होतो । हा तों प्रत्यय येतो । वायूपासून अग्नि होतो । सावध ऐका ॥ १ ॥ वायूची कठिण धैसणी । येथें निर्माण झाला वँन्ही । मंद वायु शीतळ पाणी । तेथून जाहलें ॥ २ ॥ आँ- पापासून झाली पृथ्वि । ते नाना बीजरूप जाणावी । बीजापासून उत्पत्ति १. नामरहित. २. डागलें. ३. एक मातीचें भांडें. ४. पुष्कळ. ५. घर्षण. ६. अग्नि. ७. जलापासून.

११ वा.] सिद्धान्त. २६१ व्हावी । हा स्वभावचि आहे ॥ ३ ॥ मुळीं सृष्टि कल्पनेची । कल्पना आहे मुळींची । तयेपासून देवेंत्रयांची । काया जाहली ॥ ४ ॥ निश्चळामध्यें चं- चळ । तेचि कल्पना केवळ । अष्टधा प्रकृतीचें मूळ । कल्पनारूप ॥ ५ ॥ कल्पनेचि अष्टधा प्रकृति । अष्टधा तेचि कल्पनामूर्ति । मूळाग्रापासून उत्प- त्ती । अष्टधा जाणा ॥ ६ ॥ पंच भूतें तीन गुण । आठ झालीं दोनी मिळोन । म्हणोनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते ॥ ७ ॥ मुळीं कल्पनारूप झाली । पुढें तेचि फांपावली । केवळ जडत्वा आली । सृष्टिरूपें ॥ ८ ॥ मुळीं झाली ते मूळमाया । त्रिगुण झाले ते गुणमाया । जडत्व पावली ते अविद्यामाया । सृष्टिरूपें ॥ ९ ॥ पुढें चारी खाणी झाल्या । चारी वाणी विस्तारल्या । नाना योनि प्रगटल्या । नाना व्यक्ति ॥ १० ॥ ऐसी झाली उभारणी । आतां ऐका संहारणी । मागिले दशकीं विशद करुनी । बोलिलें असे ॥११॥ परंतु आतां संकलित । बोलिजेल संहारसंकेत । श्रोते वक्ते एकचित्त । होऊन ऐका ॥ १२ ॥ शत वर्षे अनावृष्टि । तेणें आटेल जीवसृष्टी । ऐशा कल्पाताच्या गोष्टी । शास्त्रीं निरूपिल्या ॥ १३ ॥ बारा कळीं तपे सूर्य । तेणें पृथ्विीची रक्षा होय । मग रक्षा विरोन जाय । जळांतरीं ॥१४॥ तें जळ शोषी वैश्वानर । वन्हि झडपी समीर । समीर वितुळे निराकार । जैसें तैसें ॥ १५ ॥ ऐसी सृष्टिसंहारिणी झाली । मागें विस्तारें बोलिली । माया- निरासें उरली । स्वरूपस्थिती ॥ १६ ॥ तेथें जीव शिव पिंड ब्रह्मांड । आ- टोनि गेलें थोतांड । माया अविद्येचें बंड । वितळोन गेलें ॥ १७ ॥ विवे- केंचि बोलिला क्षय । ह्मणोन विवेकप्रळय । विवेकी जाणती सोय । मूर्खास कळेना ॥ १८ ॥ सृष्टि शोधितां सकळ । एक चंचल एक निश्चळ । चंच- ळास कर्ता चंचल । चंचळरूपी ॥ १९ ॥ जो सकळ शरीरीं वर्ते । सकळ कर्तृत्वास प्रवर्तें । करून अकर्ता हा वर्ते । शब्द जया ॥ २० ॥ राव रंक ब्रह्मादिक । सकळांमध्यें वर्ते एक । नाना शरीरीं चाळक । इंद्रियद्वारें ॥२१॥ त्यास परमात्मा बोलती । सकळकर्ता ऐसें म्हणती । परी तो नासेल प्र- चीती । विवेकें पाहावी ॥ २२ ॥ जो श्वानामध्ये गुरगुर करितो । जो सूक- रामध्यें कुंकुरतो । गाढवीं भरोन भुंकितो । अट्टहासयें ॥ २३ ॥ लोक नाना

१. ब्रह्माविष्णुमहेशांची. २. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज हे चारप्रकार.

२६२ श्रीदासबोध. [ दशक देह देखती । विवेकी देहांतर पाहती । पंडित समदर्शनें घेती । येणें प्रकारें ॥ २४ ॥ श्लोक ॥ विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ॥ शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥१॥ देह पाहतां वेगळाले । परंतु अंतर एकचि झालें । प्राणिमात्र देखिलें । एका अंतरें ॥२५॥ अनेक प्राणी निर्माण होती । परी एकचि कळा वर्तती । तया नांव जगज्योती । जाणती कळा ॥ २६ ॥ श्रोत्रीं नाना शब्द जाणे । त्वचेमध्यें शीतोष्ण जाणे । चक्षूमध्यें पाहों जाणे । नाना पदार्थ ॥ २७ ॥ रसनेमध्यें रस जाणे । घ्राणामध्यें वास तो जाणे । कर्मेंद्रियामध्यें जाणे । नाना विषयस्वाद ॥ २८ ॥ सूक्ष्मरूपें स्थूळ रक्षी । नाना सुखदुःखें परीक्षीत । त्यास म्हणती अंतरसाक्षी । अंतरात्मा ॥ २९ ॥ आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा । जीवात्मा शि- वात्मा परमात्मा । द्रष्टा साक्षी सत्तारूप

११ वा. ] चत्वार देव. २६३ पक्ष । अप्रत्यक्षास कैंचें प्रत्यक्ष । असोन नाहीं ॥ ४३ ॥ असोन मायिक उपाधी । तोंच सहजसमाधी । श्रवणें बळावली बुद्धी । निश्चयाची ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके सिद्धांतनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. चत्वार देव. श्रीगणेशाय नमः ॥ एक निश्चळ एक चंचल । चंचळीं गुंतलें सकळ । निश्चळ तें निश्चळ । जैसें तैसें ॥ १ ॥ पाहे निश्चळाचा विवेक । ऐसा लक्षामध्यें एक । निश्चळाऐसा निश्चयात्मक । निश्चळचि तो ॥ २ ॥ या निश्चळाच्या गोष्टी सांगती । पुनः चंचळाकडे धांवती । चंचलचक्रीं १ नि- घोन जाती । ऐसे थोडे ॥ ३ ॥ चंचळीं चंचल जन्मलें । चंचळामध्यें वाढलें । अवघें चंचळचि बिंबलें । जन्मवरी ॥ ४ ॥ पृथ्वी अवघी चंच- ळाकडे । करणें तितुकें चंचळीं घडे । चंचल सांडून निश्चळीं पैवाडे २ । ऐसा कैंचा ॥ ५ ॥ चंचल कांहीं निश्चळेना । निश्चळ कदापि चलेना । नित्या- नित्य विवेकें जना । उमजे कांहीं ॥ ६ ॥ कांहीं उमजलें तरी नुमजे । कांहीं समजलें तरी न समजे । कांहीं बुझे तरी निर्बुजे । किंचिन्मात्र ॥ ७ ॥ संदेह अनुमान आणि भ्रम । अवघा चंचळामध्यें श्रम । निश्चळीं कदा नाहीं वर्म । समजलें पाहिजे ॥ ८ ॥ चंचळाकार तितुकी माया । मायिक जाय विलया । लहान थोर म्हणावया । कार्य नाहीं ॥ ९ ॥ सगट ३ माया विस्तारली । अष्टधा प्रकृति फांपावली । चित्रविचित्र विकारली । नाना रूपें ॥ १० ॥ नाना उत्पत्ति नाना विकार । नाना प्राणी लहान थोर । नाना पदार्थचमत्कार । नाना रूपें ॥ ११ ॥ विकारवंत विकारलें । सूक्ष्म जडत्वास आलें । अमर्याद दिसों लागलें । कांहींच्या बाही ॥ १२ ॥ मग नाना शरीरें निर्माण झालीं । नाना नामाभिधानें ठेविलीं । भाषापरत्वें कळों आलीं । कांहीं कांहीं ॥ १३ ॥ मग नाना रीती नाना दंडकें ४ । आचार एकाहूनि एक । वर्तों लागले सकळ लोक । लोकाचारें ॥ १४ ॥ अष्टधा प्रकृतीचीं शरीरें । निर्माण झालीं लहान थोरें । पुढें आपल्या प्रकारें । वर्तों १. मायेच्या चक्रांतून. २. प्रवेश करील. ३. सर्व प्रकारें. ४. परंपरा.

२६४ श्रीदासबोध. [ दशक लागलीं ॥१५॥ नाना मतें निर्माण झालीं । नाना पाखांडें वाढलीं । नाना प्रकारचीं उठिलीं । नाना बंडें ॥ १६ ॥ जैसा प्रवाह पडिला । तैसाच लोक चालिला । कोण वारील कोणाला । एक नाहीं ॥ १७ ॥ पृथ्वीचा झाला गळांठा । एक लहान एक मोठा । कोण खरा कोण खोटा । कोण जाणे ॥ १८ ॥ आचार बहुचेंकींत पडिला । कित्येक पोटासाठीं बुडाला । अवघा वरेंपंगचि झाला । साभिमानें ॥ १९ ॥ देव झाले उदंड । देवांचें मांडिलें भेंड । भूतां देवतांचें थोतांड । एकचि जाहलें ॥ २० ॥ मुख्य देव तो कळेना । कशास कांहींच मिळेना । एकास एक वळेना । अनावर ॥ २१ ॥ ऐसा नासला विचार । कोण पाहतो सारासार । कैंचा लहान कैंचा थोर । कळेचि ना ॥ २२ ॥ शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गलबला झाला । लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ॥ २३ ॥ ऐसें अवघें नासलें । सत्यासत्य हारपलें । अवघें अनायक झालें । चहूंकडे ॥ २४ ॥ मतामतांचा गलबला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयासी तेंचि थोर ॥ २५ ॥ असत्याचा साभिमान । तेणें पाविजे पतन । म्हणोनियां ज्ञा- ते जन । सत्य शोधिती ॥ २६ ॥ लोक वर्तती सकळ । तें ज्ञात्यांस करतळामळ । आतां ऐका केवळ । विवेकी हो ॥ २७ ॥ लोक कोणत्या पंथें जाती । आणि कोणत्या देवास भजती । ऐसी हे रोकडी प्रचीती । सावध ऐका ॥ २८ ॥ मृत्तिका धातु पाषाणादिक । ऐसिया प्रतिमा अनेक । बहुतेक लोकांचा दंडकें । प्रतिमा देवीं ॥ २९ ॥ नाना देवांचे अवतार । चरित्रें ऐकती एक नर । जप ध्यान निरंतर । करिती पूजा ॥ ३० ॥ एक सकळांचा अंतरा- त्मा । विश्वीं वर्तें जो विश्वात्मा । द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा । मानिती एक ॥ ३१ ॥ एक ते निर्मळ निश्चळ । कदापि नव्हेति चंचल । अनन्यभावें केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥ एक नाना प्रतिमा । दुसरा अवतारमहिमा । तिसरा तो अंतरात्मा । चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥ ऐसे हे चार देव । सृष्टीमधील स्वभाव । या वेगळा अंतर्भाव । कोठेंच नाहीं ॥ ३४ ॥ अवघें एकचि मानती । ते साक्षं देव जाणती । परंतु अष्टधा प्रकृती । वोळखिली १. टवाळी करण्यांत. २. बाह्यात्कारी. ३. बेवंदशाही. ४. हातचे आंबळ्यासारखें स्पष्ट. ५. पूजनाचा परिपाठ. ६. पोटभाग. ७. प्रत्यक्ष.

११ वा. ] शिक्षा. २६५ पाहिजे ॥ ३५ ॥ प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव । भावातींत महानुभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥ जो निर्मळास ध्याईल । तो निर्म- ळचि होईल । जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥ क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजती । सारासार जाणती । महानुभाव ॥ ३८॥ अरे जो चंचळास भजेल । तो सहजचि चलेल । जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥ ३९ ॥ प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्वत ओळखावें । सत्ये होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके चत्वारदेवनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥२॥ ३. शिक्षा. श्रीगणेशाय नमः ॥ बहुतां जन्मांचा शेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ॥ १ ॥ प्रपंच करावा नेमका । पाहावा परमार्थ विवेक । जेणें करितां उभयलोक । संतुष्ट होती ॥ २ ॥ शत वरुषें वय नेमिलें । त्यांत बाळत्व नेणतां गेलें । तारुण्य अवघें वेंचलें । विषयांकडे ॥ ३ ॥ वृद्धपणीं नाना रोग । भोगणें लागे कर्मभोग । आतां भगवंताचा योग । कोणे वेळे ॥ ४ ॥ राजिकें दैविक उद्वेग चिंता । अन्न वस्त्र देह ममता । नाना प्रसंगें अवचिता । जन्म गेला ॥ ५ ॥ लोक मर- मरौं जाती । वडिलें गेलीं हे प्रचीती । जाणत जाणत निश्चितीं । काय मा- निलें ॥ ६ ॥ अग्नि गृहासि लागला । आणि सावकास निजला । तो कैसा म्हणावा भला । आत्महत्यारा ॥ ७ ॥ पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसं- ग्रह उदंड झाला । यमयातनेचा झोला । कठीण आहे ॥ ८ ॥ तरी आतां ऐसें न करावें । बहुत विवेकें वर्तावें । इहलोक परत्र साधावें । दोहींकडे ॥ ९ ॥ आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे । सुख म्हणोन आवडे । आळसी लोकां ॥ १० ॥ साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढें सुर- वोडती । खाती जेविती सुखी होती । यत्नेंकरूनि ॥ ११ ॥ आळस उदास नागवणा । आळस प्रयत्नबुडवणा । आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट होती ॥ १२ ॥ म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा । अरेंत्रीं १. ब्रम्हरूप. २. इहपरलोक. ३. राजकारण. ४. सुख पावतात. ५. इहलोकीं.

२६६ श्रीदासबोध. [दशक परत्रीं जीवा । समाधान ॥ १३ ॥ प्रयत्न करावा तो कोण । हेंचि ऐका निरूपण । सावध करूनि अंतःकरण । निमिष एक ॥ १४ ॥ प्रातःकाळीं उठावें । कांहीं पाठांतर करावें । यथानुशक्ति आठवावें । सर्वोत्तमासी ॥१५॥ मग दिशेकेंडे जावें । जें कोणासींच नव्हे ठावें । शौच आचमन करावें । निर्मळ जळें ॥ १६ ॥ मुखमार्जन प्रातःस्नान । संध्या तर्पण देवतार्चन । पुढें वैश्वदेव उपासन । यथासांग ॥ १७ ॥ कांहीं फळाहार घ्यावा । मग संसार धंदा करावा । सुशब्दें राजी राखावा । सकळ लोक ॥ १८ ॥ ज्याचा जो ब्यापार । तेथें असावें खबरदार । दुश्चित्तपणें तरी पोर । वेढा लावी ॥ १९ ॥ चुके ठके विसरे सांडी । आठवण झालिया चर- फडी । दुश्चित आळसाची रोकडी । प्रचीत पहा ॥२०॥ या कारणें सावधान । एकाग्र असावें मन । तरी मग जेवितां भोजन । गोड वाटे ॥ २१ ॥ पुढें भोजन झालियावरी । कांहीं देवाची चर्चा करी । एकांतीं जाऊन विवरी । नाना ग्रंथ ॥ २२ ॥ तरीच प्राणी शाहणा होतो । नाहीं तरी मूर्खचि राहतो । लोक खाती आपण पाहतो । दैन्यवाणा ॥ २३ ॥ ऐसें सदैवै- पणाचें लक्षण । रिकामा जाऊं नेदी क्षण । प्रपंच व्यवसायाचें ज्ञान । बरें पाहे ॥ २४ ॥ कांहीं मिळवी मग जेवी । गुंतल्या लोकांस उगवी । शरीर कारणीं लावी । कांहीं तरी ॥ २५ ॥ कांहीं धर्मचर्चा पुराण । हरिकथा नि- रूपण । वाया जाऊं नेदी क्षण । दोहोंकडे ॥ २६ ॥ ऐसा जो सर्वसावध । त्यास कैंचा असेल खेद । विवेकें तुटला संबंध । देहबुद्धीचा ॥ २७ ॥ आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें । मूळ तुटलें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥ प्रपंचीं पाहिजे सुवर्ण । परमार्थीं पंचीकरणें । महावाक्याचें विव- रण । करितां सुटे ॥ २९ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । येणें राहे समा- धान । परमार्थाचें साधन । तेंचि ऐकत जावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके शिक्षानिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ——— ४. विवेक. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार । १. परलोकीं. २. शौचास. ३. भाग्याचें ४. सोडवी. ५. पंचभूतांचा विचार.

विकार नाहीं निर्विकार । तेंचि परब्रह्म ॥ १ ॥ ब्रह्म म्हणिजे निश्चळ । अंत- रात्मा तो चंचळ । द्रष्टा साक्षी केवळ । बोलिजे तया ॥ २ ॥ तो अंतरात्मा म्हणिजे देव । त्याचा चंचळ स्वभाव । पाळिताहे सकळ जीव । अंतरीं वसोनी ॥ ३ ॥ त्या वेगळे जड पदार्थ । तेणेंविण देह व्यर्थ । तेणेंचि कळे परमार्थ । सकळ कांहीं ॥ ४ ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांत- मार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । देवचि चालवी ॥ ५ ॥ चंचळेंविण निश्चळ कळेना । चंचळ तरी स्थिरावेना । ऐसे विचार नाना । बरे पाहा ॥ ६ ॥ चंचळनिश्चळांची संधी । तेथें भांबावते बुद्धी । कर्ममार्गाचा जो विधी । तो मग ऐलीकडे ॥ ७ ॥ देव या सकळांचें मूळ । देवास मूळ ना डाळ । परब्रह्म तें निश्चळ । निर्विकारी ॥ ८ ॥ निर्विकार आणि विकारी । एक म्ह- णेल तो भिकारी । विचाराची होते वैरी । देखत देखतां ॥ ९ ॥ सकळ परमार्थांचें मूळ । पंचीकरण महावाक्य केवळ । तें विवरावें प्रांजळ । पुनः- पुन्हा ॥ १० ॥ पहिला देह स्थूलकाया । आठवा देह मूळमाया । अष्ट देह निरसलिया । विकार कैंचा ॥ ११ ॥ या कारणें विकारी । साचाऐशी बां- जिगिरी । एक समजे एक खरी । मानिताहे ॥ १२ ॥ उत्पत्ति स्थिति सं- हार । यां वेगळा निर्विकार । काळायासी सारासार । विचार केला ॥ १३ ॥ सार असार दोन्ही एक । तेथें कैंचा उरला विवेक । परीक्षा नेणती रंक । पापी करंटे ॥ १४ ॥ जो एकचि विस्तारला । तो अंतरात्मा बोलिला । नाना विकारीं विकारला । निर्विकारी ॥ १५ ॥ ऐसें प्रगटचि आहे । आ- पुल्या प्रत्ययें पाहे । काय राहे काय न राहे । हेंहि कळेना ॥ १६ ॥ तें अ- खंड होत जातें । जें सर्वदा संहारतें । रोकडें प्रचीतीस येतें । जनांमध्यें ॥ १७ ॥ एक रडे एक चरफडी । एकाची एक घरी नरडी । एकमेकां झों- बती बैराडी । डुकळले जैसे ॥ १८ ॥ नाहीं न्याय नाहीं नीती । ऐसे हे लोक वर्तती । आणि अवघेंच सार म्हणती । विवेकहीन ॥ १९ ॥ धोंडे सांडून सोनें घ्यावें । माती सांडून अन्न खावें । आणि अवघेंच सार म्हणावें । बाष्कळपणें ॥ २० ॥ म्हणोन हा विचार करावा । सत्य मार्ग तोचि धरावा । लाभ जाणोन घ्यावा । विवेकाचा ॥ २१ ॥ सारें गारें एकचि सरी । तेथें १. प्रपंच. २. परमार्थ. ३. समाप्ति. ४. गारुड. ५. अधाशी. ६. थोर लहान.