सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४६२ सार्थ तुकारामगाथा अर्थ - श्रीहरीची कथा आपण स्वतः वाचली किंवा दुसऱ्याकडून ऐकली, तर ती काही वाया जाणार नाही १ देवळात जाऊन देवाचे दर्शन जर घेतले तर, ते काही वाया नाही जायचे देवाची पूजा केली तर, ती वाया जाणार नाही २ एखाद्या तीर्थयात्रेस जाता आले अथवा एखाद्या व्रताचे आचरण करता आले तर, ते काही वाया जाणार नाही ३ साधुसंतांचे दर्शन झाल्यास काही वाया जाणार नाही आचरण जर शुद्ध असेल तर तेही वाया जाणार नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, मनात श्रेष्ठ प्रकारचा भाव असो नसो, चांगल्या कामाचे श्रम कधी वाया जाणारे नसतात झालाच तर त्याच्यापासून फायदाच होत असतो ५ १०२९ चित्तीं धरीन मी पाऊले सुकुमार । सकळ बिढार संपत्तीचे ॥ १ ॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ २ ॥ पाहेन श्रीमुख साजिरे सुंदर । सकळा अगर लावण्याचा ॥ ३ ॥ करिन अगलग बाळकाचे परी । बैसेन तो वरी नुतरों कडिये ॥ ४ ॥ तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मने सोय विठोबाची ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - बिढार-बिऱ्हाड आश्रयाचे स्थान, वल्ली-वेल तनु-शरीर अगर-खाण, नुतरी- उतरणार नाही, कटिये-कडेवरून अर्थ - या देवाची ही सुकुमार पावले मी माझ्या हृदयाशी धारण करीन कारण सर्व प्रकारच्या संपत्तीचे हेच एक आश्रयस्थान आहे १ अमृताची वेल असणारे या श्रीहरीचे नाम हेच मी माझ्या मुखात सतत धारण करीन त्यामुळे त्रिविध तापानी संतप्त झालेला माझा देह हा अतिशय शीतल होईल २ सर्व प्रकारच्या सौंदर्याची खाणच असलेले असे हे या श्रीहरीचे सुंदर व शोभिवंत मुख मी पाहात राहीन ३ या देवाच्या अंगाशी लडिवाळ पणा एखाद्या बालकाप्रमाणे मी धरीन मी कौतुकाने त्याच्या कडेवर जाऊन बसेन तो परत खाली उतरणारच नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी आपण ज्या भावाने जो भजतो, त्या भावाने तो आश्रयास येतो म्हणून तर याची सवय माझ्या मनाने धरलेली आहे ५ १०३० बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचे दुःख काय जाणे ॥ १ ॥ तयापरी करीं पाळण हे माझें । घेउनिया ओझें सकळ भार ॥ २ ॥ कासया गुणदोष आणिसिल मना । सर्व नारायणा अपराधी ॥ ३ ॥ सेवाहीन दीन पातकाची राशी । आता विचारिसी काय ऐसें ॥ ४ ॥ जेणे काळें पायीं अनुसरले चित्त । निर्धार हे हित जाले ऐसे ॥ ५ ॥ तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता । माझी काहीं चिंता असो दे वो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कासया-काय म्हणून अर्थ - देवा एखादे बालक आपल्या मातेस आपली तहानभूक सांगत असते त्यावर उपाय काय करायचा हे काही ते कधी जाणत नाही त्याचे काम फक्त आईस भूक, गरज सांगणे हेच होय १ त्याप्रमाणे देवा, तुम्ही माझे पालनपोषण करावे माझा सर्व भार आता देवा तुम्हीच घ्यावा २ नारायणा, माझे गुणदोष आता तू मनात तरी का आणतोस रे? मी अपराधाची रासच आहे असे समज ना रे ३ मला तुझी सेवा नीट घडलेली नाही मी दीन आहे, पातकी आहे आता काय काय माझ्यात दोष नाहीत म्हणून विचारतोस? सर्व काही आहेत असेच समज ४ ज्या काळात माझे चित्त तुझ्या पायाशी स्थिर झाले, त्याच वेळी मी मानले की, माझे हितच होणार ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही पुष्कळजणांचे रक्षण केले आहे त्यात माझी थोडी तरी चिंता तुम्हास असावी ६
सार्थ तुकारामगाथा ४६३ विवरण - भक्तिभावातील वात्सल्याच्या दृष्टीने तुकाराम महाराजांचा हा 'एक अतिशय प्रसिद्ध व थोर अनुभूतीचा अभंग आह बाळाने आपणास लागलेली तहान भूक बाईस सांगावी फक्त त्याला पुढल्या उपायाचे चिंतन करण्याचे काय कारण आहे ? आईच त सर्व पाहणार नाही का? खरे म्हणजे मुलास लागलेली भूक आईसच समजते आधी कारण तिचे त्याकडेच सारखे लक्ष असते तुकाराम महाराज म्हणतात, या आईच्या वात्सल्याने परमेश्वराने आपले पालन करावे ईश्वरास, विठ्ठलास आई म्हणून सबोधण्याची रीत फार पूर्वीपासून साधुसतांनी सुरू केलेली आहे बाप, बधू, पत्नी इत्यादी नात्वात थोडासा दूरत्वाचा अश उरतो पण आईचे नाते असे आहे की, त्यात उभयताना कसलाच सकोच धरणे आवश्यक नसते सहजसुलभ असा हा निर्व्याज प्रेमाचा आविष्कार असतो आईवर रागवावे, रुसावे, तिच्याशी भाडावे, तिच्या मांडीवर बसावे, तिच्याजवळ हट्ट करावा, तिचा पदर धरावा, हे सब लडिवाळ प्रकार फक्त आईच्याच नात्यात सभवतात, म्हणून तुकारामबुवासारख्या थोर भक्ताने विठ्ठलास आई म्हटले आहे माउली म्हणूनच तिची आळवणी केली आहे पंढरपूरच्या सप्रदायात याच वात्सल्याच्या भावनेने सर्वत्र विठ्ठलाची उपासना चालू आहे विठ्ठल आपली आई व आपण त्याचे लाडके, हट्टी, चुवणारे एक मूल या वात्सल्यभादावरील तुकोबांचे अनेक अभग आर्ततेने चित्त झालेले बाहूत भक्तीच्या सहजभाव्य अशा आविष्कारांत डोळ्यात अश्रू येणे, ऊर भरून येणे, अष्टसात्त्विक भाव जागृत होणे व हृदय द्रवून जाणे, विरघळून जाणे, याचा अनुभव तुकाराम महाराजांच्या या भावावरील निश्चयाने येतो ससारतापाने त्रस्त झालेल्या, रोजच्या व्यवसायातील चिंतांनी खगलेल्या, मानसिक चिंतानी ग्रस्त झालेल्या माणसांस तुकाबांचे हे अभग म्हणजे एक प्रकारचे श्रेष्ठ वरदानच होय व्यावहारिक क्षेत्रातील विविध तापाचा उन्हाळा तुकोबांच्या या प्रकारच्या अभगांच्या सान्निध्यात सहज सुखद असा वाटावा तुकोबांच्या या अमृतमधुर व चद्रिवेप्रमाणे शीतल असणाऱ्या वचनांचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यायासारखा आहे ज्या तुकोबांनी हा श्रेष्ठ अनुभव भोगला त फारच श्रेष्ठ, पण ज्याच्या कानावर तो अभंगहपांनी पडला व ज्याचे चित्त शात झाले, तेही तितकेच धन्य मानावयास हवेत ससारग्रस्त व तापत्रयाने भयभीत झालेल्या माणसाने डोळे मिटावत, श्रीविठ्ठलाचे रूप डोळ्यापुढे आणावे आणि मुखाने उच्चार करावा, 'माये मोकलिले कोठें जाये बाळें ? ', 'मायबापापुढें लाडिके लेकरू । तैंसे बोल करू कवतिके ', 'घेई उचलोनि पुसे तानभूक । पुसी मार्ते मुख पीतांबरें ', 'कोण आम्हा पुसे सिजलें भागले । तुजविण उगले पाडुरगा ?' 'वेडें वाकुडें बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ', 'तू माउलीहून मायाळ । चद्राहूनी शीतल । पाण्याहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा, 'नलगे मापेंसी बाळ निरवावे । आपल्या स्वभावे ओडे त्यासी ', 'विठ्ठल माझी माय । आम्हा सुखा उणे काय ' अशा सारख्या शेकडो वचनाचा उच्चार मुखातून होत असताना अत करण द्रवून येईल शीतल होईल अपार अस प्रभुप्रेमाचे सुख अनुभवास येईल तुकारामबुवांनी जे भोगले ते थोड्या अशान का होईना पण प्रतीतीस येईल १०३१ जीवनावाचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥ १ ॥ न सपडे जाले भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ २ ॥ मातेचा वियोग जालिया हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥ ३ ॥ सागावे ते किती तुम्हासी प्रकार । सकळाचे सार पाप दार्बी ॥ ४ ॥ येचि चिंते माझा करपला भीतर । का नेणो विसर पडिला माझा ॥ ५ ॥ तुका म्हणे तू हे जाणसी सकळ । यावरि कृपाळ होई देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - जीवनावाचूनि-पाण्याशिवाय, न सापडे-सापडत नाही, भीतर-मनाचा गाभा अर्थ - पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो तसा देवा, तुझ्यावाचून माझा जीव तळमळत आहे हो १ भूमीमध्ये दडलेले धन सापडत नसले म्हणजे जसे लोभी माणसाचे मन तडफडते, तशीच अवस्था माझ्या मनाची झालेली आहे २ आईचा वियोग झालेल्या मुलाचे भन जसे कासावीस होते, तोच कळवळा माझ्या पोटात
४६४ सार्थ तुकारामगाथा देवा, तुमच्यासाठीं आहे हें नीट जाणावे तुम्ही. ३ देवा, आणखी माझ्या मनाची ही अवस्था तुम्हांस किती प्रका- रांनी सांगावी हो ? सर्व प्रकारांचे सार हेच कीं, तुम्ही तुमच्या पायांचे दर्शन मला लौकर द्यावे. ४ तू मला भेट देशील न देशील, याच चिंतेने माझ्या मनाचा गाभा करपून गेला आहे. देवा, माझा तुला एवढा विसर कां पडला आहे हेंच मला समजत नाहीं. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हे तू सर्व जाणीत कां नाहींस ? सर्व काही तू जाणून आहेस. तरी देवा तू मजवर कृपा कर मा एकदा. ६ १०३२ शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥ १ ॥ आळविती त्यांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ २ ॥ गांजलियांचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥ ३ ॥ भागलियाचा होईं रे विसांवा । परिसावी केशवा १ विज्ञापना ॥ ४ ॥ अंकिताचा भार वागवावा मायां । परिसावी अनंता विज्ञापना ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - विज्ञापना-विनंती, परिसा-ऐका, धांवणे-रक्षण, अंकिताचा-स्वाधीन असलेल्याचा. अर्थ :- देवा, जे शरण आलेले तुझे भक्त आहेत, त्यांना तू पाठ न दाखविता, त्यांच्यावर कृपाच करावीस अशी हे जगजेठी, तुला नम्र विनंती आहे. १ जे मनोभावे तुझी आळवणी करतात, त्यांना स्वीकृतीचे, कृपाप्रसादाचे उत्तर झटकन देऊन तू त्यांना तृप्त करावेस अशी विनंती आहे देवा. २ देवा, जे रंजलेले, गांजलेले, त्रासलेले आहेत, त्याचे तू रक्षण करावेस, नारायणा, ही माझी विनंती तुम्ही ऐकावी. ३ जे दमलेले आहेत, भागलेले आहेत, त्यांचा देवा, तू विसावा व्हावास. त्यांच्या विश्रांतीचे स्थान व्हावेस, केशवा, ही माझी विनंती तू ऐक ना. ४ जे तुझ्या स्वाधीन झाले आहेत, त्यांच्या रक्षणाचा भार देवा, तूच तुझ्या मस्तकावर घ्यावयास हवा. ही ही माझी विनंती अनंता, तू ऐकावीस. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता आम्हांस तुम्ही बिल्कुल विसरून जाऊ नये. देवा, ही एक विनंती माझी तुम्ही ऐका ना. ६ १०३३ कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥ १ ॥ कोणापाशीं आम्हीं सांगावें २ सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ २ ॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार ३ कोण दुजा ॥ ३ ॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥ ४ ॥ कोणावरी आम्हीं करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥ ५ ॥ तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पुसे-विचारील, सिणले भागलें-दमलेले, त्रासलेले, उगलें-उगाच, आपोआप, पार- (भार)-ओझे, भातुके-खाऊ. अर्थ :- देवा, आम्ही दमलेले आहोत, शिणलेले आहोत, त्रासलेले आहोत; अशा वेळी पांडुरंगा, तुझ्या- शिवाय उगाच आमची चौकशी प्रेमाने दुसरे कोण रे करणार आहे ? १ देवा, आम्ही आमच्या मनाचे सुखदुःख कुणापाशी सांगावे रे ? कोण माझी तहानभूक निवारण करील ? २ मला हा जो त्रिविध ताप झालेला आहे, तो तुझ्याशिवाय कोण रे दूर करील ? माझ्या मनावरचे हे ओझे कोण दूर करणार आहे ? ३ देवा, माझ्या इच्छेस येईल तो खाऊ मी कुणाजवळ रे मागावा ? आणि असा हट्ट घेतल्यावर कौतुकाने, प्रीतीने माझी समजूत तरी देवा, तुझ्याशिवाय दुसरे कोण काढणार आहे रे ? ४ आम्ही प्रेमाने, हक्काने कुणावर रे सत्ता करावी ? आमचा हा त्रास सहन करणारा कोण दुसरा आहे ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, तूच माझा स्वामी असल्यामुळे तूच सर्व कांहीं जाणणार आहेस, असे मी मानतो. नारायणा, तुमच्या चरणांवर माझे दंडवत असो. ६ १ देो, २ सांगो, ३ भार.
सार्थ तुकारामगाथा ४६५ विवरण — या व या वरील दोन तीन अभंगातील तुकारामबुवांच्या मनाची वर्तता सहज ध्यानात येण्या- सारखी आहे वात्सल्य व सख्य या दोन भावानी महाराजांचे चित्त द्रवून गेलेले असल्यामुळे या अभंगातून उच्च भूमिकेवरचे भाव सोप्या सोप्या शब्दात सहज रीतीने व्यक्त झाले आहेत ईश्वराशी किती लडिवाळ असावे, त्याच्याशी किती जवळीक साधावी, किती कौतुकाने त्याच्याशी लगट करावी, किती प्रेमाने त्याच्याशी नाते जडवावे, यासवंधीची उत्तम साक्ष या अभंगात आहे. आपला शीण कुणी तरी जाणावा, कुणी तरी आपल्या तहानभूकेची चौकशी करावी, कुणीतरी कौतुकाने आपली समजूत काढावी, अशी जी आपली इच्छा असते, ती पुरविणारा हा एक समर्थ श्रीविठ्ठलच असल्यावर मग त्या सुखाचे वर्णन अवीट व्हावे यात नवल ते काय ? १०३४ तेव्हां धाले पोट बैसलों पंगती । आता आम्हा मुक्तिपांग काई ॥ १ ॥ धांवा केला आता येई वो' धांवोन । येथें काई करणे न लगे संदेह ॥ २ ॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आले ॥ ३ ॥ देवाच्या सख्यत्वे विषमासी ठाव । मध्यें कोठें घाव राहो सके ॥ ४ ॥ तेव्हां जाली अवघी बाधा वातावरत । प्रेम हृदयांत प्रवेशले ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हीं जितिले भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- धाले-सतुष्ट झालो, मुक्तिपाग-मुक्तीची इच्छा, विषमासी-सकटास, ठाव-जागा अर्थ - जेव्हा मी देवाबरोबर त्याच्या पंगतीसच बसलो, तेव्हा माझे पोट भरून आल्यामुळे मी सतुष्ट झालो आता आम्हास मुक्तीची इच्छा कुठून असणार २ १ आता त्याचा धावा करताच तो धावून येईल; या विषयी मनात संशयच नको. २ आता त्याचे गायन करून गुणवर्णन करण्याचीही वेळ राहिलेली नाही, सर्वच त्याच्या प्रेमानंदाने भरून गेले आहे ३ देवाच्या मैत्रीमध्ये विषम भावनेस किंवा सकटाना स्थान कुठून असणार ? कारण मध्ये कुठे रिकामी जागा असतच नाही ४ या श्रीहरीचे प्रेम जेव्हा माझ्या हृदयात प्रवेश करू लागले, तेव्हा सर्व कामादिक शत्रूची वाताहत झाली दुर्वसिनाचा घात झाला ५ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवास खात्रीने जिंकले आहे, असा विश्वास मला आहे. कारण आपल्या दासास देव कधी सोडून देईल की काय ? ६ १०३५ तरि का पवाडे गर्जती पुराणे । असता नारायण शक्तिहीन ॥ १ ॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरा वाणीत ना ॥ २ ॥ तरिच म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखी गुण ॥ ३ ॥ चांगलेपण हें निरुपमता' अंगी । बाणले श्रीरंगीं म्हणऊनि ॥ ४ ॥ तरिच हा थोर सागितले करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे तरि करितो याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - निरुपमता - उपमा नसलेला, हेवा-हाव, कुडें-वाईट अर्थ - जर खरोखरच हा नारायण दुर्वल असता, तर त्याची एवढी कीर्ती पुराणांनी गर्जून का सांगितली असती ? १ याची कीर्ती असल्याखेरीज का नामाच्या महात्म्याचा डांगोरा सर्वत्र पिटून राहिला आहे ? याशिवाय मानाने व कीर्तीने एकमेकाची स्तुती केलीच असती २ देवा, तुम्ही या जीवास जर सुखी केलेत, तरच तो चिरजीव आहे असे म्हणता येईल ३ या श्रीहरीच्या अग्री चागूलपणा हा इतका आहे की, त्यास उपमा नाही या श्रीरगाच्या अंगी हा चागूलपणा पूर्णपणे बाणलेला आहे ४ या श्रीहरीपाशी कसलाच अभिमान नसल्यामुळेच तो थोर असल्याचे सागितले जाते ५ तुकाराम महाराज म्हणतात, या देवापाशी कधी कुणाची वाईट हाव नसते म्हणूनच सर्व लोक त्याची सेवा करतात ६ १ होईल धावणे । तया काई करणे लागे संदेह, २ निरुपायत तु गाया ५९
१०३६ अविट हे क्षीर हरिकथा माउली । सेविली' सेविली वैष्णवजनीं ॥ १ ॥ अमृत राहिलें लाजोनि माघारे । येणे रसे थोरें ब्रह्मानंदें ॥ २ ॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवांऐसें ॥ ३ ॥ सर्व सुखें तया मोहरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥ ४ ॥ निर्गुण² हे सोंग धरिलें गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥ ५ ॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होउनि ठेला ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अविट-कंटाळा न येणारे, क्षीर-दूध गाळणी-वगळून, अर्थ - या हरिकथामाउलीचे दूध अतिशय अविट आहे त्याचा कधीही कंटाळा येत नाही याचे सेवन आजपर्यंत अनेक वैष्णवांनी केलेले आहे १ या हरिकथेपुढे प्रत्यक्ष अमृतही लाजून माघारे फिरते या हरिकथेच्या रसाने फार थोर प्रकारचा ब्रह्मानंद झालेला असतो २ जे कोणी पतित, पातकी आहेत, ते संतांच्या पवित्र पंगतीत या हरिकथेच्या प्रसंगी बसून पावन होतात या कथामृतान तेही देवाप्रमाणेच चतुर्भुज होऊन जातात ३ ज्या ठिकाणी या कथेच्या निमित्ताने वैष्णवांची गर्दी होते तेथे सर्व प्रकारची सुखे मोहरली जातात, अंकुरतात ४ या निर्गुण श्रीहरीने या कथारसाच्या वेळेस गुणवान असे रूप धारण केले असून तो मोठ्या प्रीतीने स्वतःच नृत्य करू लागतो, गाऊ लागतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनांना वगळून, चाळणी करून, निवडून मी हे हरिकथेचे साधन अतिशय सुलभ असे निश्चित केले आहे याच सुखात मी तृप्त झालो आहे ६ विवरण -हरिकथा किंवा कीर्तनभक्ती हे एक सर्वोत्तम साधन ईश्वरप्राप्तीचे म्हणून साधुसंतांनी मानले आहे या हरिकथामाउलीची थोरवी तुकोबांनी या अभंगात गाइली आहे तिच्यापुढे अमृत लाजून दूर सरते, पतित लोक पावन होऊन जातात, निर्गुण असणारा भगवंत तिच्याच नादात सगुणसुंदर होऊन या कीर्तनाच्या जागी येऊन उभा असतो, वगैरे वर्णन मागील संतपरंपरेस धरूनच आहे हरिकथा या कीर्तन हे सर्वांना आवडणारे व सुलभ असे साधन आहे गायन, नृत्य, वाद्य यांच्या आविष्कारास यात भरपूर वाव असल्यामुळे बहुजनांसही याची प्रीती विशेष असते शिवाय कथात्मक निरूपणामुळे मनोरंजनाबरोबर परमेश्वराचे गुणगान केल्याचाही श्रेय हाती येते नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार मानले जातात मुभाचा वरगोठा व रकंटयाची लंगोटी लावून ते वाळवंटात पंढरपुरात कीर्तन करीत असत सगुण प्रीतीचा व कीर्तनभक्तीचा एक थोर आदर्श म्हणजे नामदेवराय होत ' नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं' अशीच त्यांची प्रतिज्ञा होती, या कीर्तनात प्रत्यक्ष देव सगुणसुंदर रूपात हजर असतो अशी श्रद्धा तर सर्वच संतांनी व्यक्त केली आहे ' कीर्तनाचे सुखें सुखी होतो देव' या नामदेवाच्या वचनात स्वतः भगवंतास कीर्तनाची आवड किती आहे हे स्पष्ट केले आहे ' कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा । नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसे', 'देवांसी तो मुख्य कीर्तनाची गोडी । म्हणोनिया उडी घाली स्वयें', 'कीर्तने तोष्ये अधोक्षज । राखी लाज भक्तांची', 'कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी' इत्यादी शेकडो वचनांतून एकनाथांनी कीर्तनाचा व देवाच्या आवडीचा संबंध स्पष्ट केलेला आहे ज्ञानेश्वर नामदेवापासून तुकाराम-रामदासांपर्यंत सर्वच श्रेष्ठ साधुसंत हे स्वतः थोर दर्जाचे कीर्तनकारही होते त्यामुळे कीर्तनाचे सुख त्यांना स्वानुभवाने पटलेले होते कीर्तनसुखाची चटक त्या प्रभूलाही कशी असते, याचे वर्णन तुकोबांनीही पुनः पुनः केले आहे ' कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव सगी आहे', 'न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटीं । जय तेथें दाटो । वैष्णवांची धावोनि', 'हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासाची' इत्यादी वचनांतून प्रत्यक्ष ईश्वरासही या कीर्तनाने किती सुख होते, याचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे या कीर्तनाचा आणखी एक लाभ असा की, या साधनाने देवास व भक्तास जसे सुख होते, तसाच फायदा पातकी लोकांनाही होतो नारदापासून या कीर्तनाचा महिमा सर्वांनी गाइला आहे यज्ञयाग, जपतप, व्रतेवैकल्ये १ सेविता सेविली, २ निगुण आकार झाला गुणवंत
सार्थ तुकारामगाथा ४६७ नसला खटाटोप न करता अगदी सोपे असे हे नामसंकीर्तनाचे साधन या कलियुगात माणसास उपलब्ध झाले आहे 'हेंचि कलिमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचे' कारण या कीर्तनामुळे 'महाअपराधी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं यश आले' अशी साक्ष एकनाथांनी दिली आहे 'पतित पातकी पावनजगत्रीं । चतुर्भुज होती देवा ऐसे' असा निर्णय या एका अभंगात तुकारामबुवा देतात त्यास आधारही त्यांच्या व इतर संतांच्या वाङ्मयात भरपूर सापडतात 'कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥ वाल्ह्या तारिला कीर्तनीं । पावन झाला त्रिभुवनीं ॥ गणिका कीर्तनें तरली । मोक्षधामा ती नेली ॥ अजामेळ चोखा महार । कीर्तनीं तरले अपार ॥ एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक झाले पावन' असा या कीर्तनाचा महिमा स्वत एकनाथांनी वर्णन केलेला आहे या कीर्तन परंपरेविषयीच्या अधिक माहितीसाठी अभंग न ९६ वरील विवरण पाहावे
१०३७ संसारसोहळे भोगिता सकळ । भक्ता त्याचें बळ विठोबाचें ॥ १ ॥ भय चिंता¹ धाक न मानिती मनीं । भक्ता चक्रपाणि सांभाळीत ॥ २ ॥ पापपुण्य त्याचें धरू न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वमाये ॥ ३ ॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्ता² भार सर्व वाहे ॥ ४ ॥ तुका म्हणे देव भक्ता वेळांईत । भक्त ते निश्चित त्यांचियानें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - वेळांईत-साह्यकारी कैवारी
अर्थ - संसाराचे सर्व सोहळे अलिप्तपणे भोगणारे जे कुणी आहेत, अशा भक्तांना त्या विठोबाचे साह्य नेहमीच असते १ जो चक्रपाणी श्रीकृष्णच त्यांचा सांभाळ करीत असल्यामुळे त्यांना भय, चिंता धाक याची बाधा कधीही होत नसते २ सर्व भक्त एका त्या श्रीरंगाच्या नावेच रंगून गेलेले असल्यामुळे, त्यांच्या अंगास पापपुण्याचा स्पर्श कधीच होऊ शकत नाही ३ त्या भक्तांना मुक्तही व्हावेसे वाटत नाही पुन पुन जन्म घेऊन संसार करावा अशी त्यांच्या मनांत एक इच्छा असते कारण त्यांचा सर्व भार तो परमेश्वरच वहात असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात देव हा आपल्या भक्ताचा कैवारी आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे ते निश्चित असतात ५
१०३८ देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहोंचा विचार एकपणे ॥ १ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्याच्या सगें सुख भोगी ॥ २ ॥ देवे भक्ता रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥ ३ ॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - पार-महिमा
अर्थ - देवाने भक्ताच्यासाठी अवतार घेणे व भक्ताने त्याचे स्मरण ठेवून संसार करणे या दोन्ही बाबींचे स्वरूप एकच आहे १ देवाच्या मुळेच भक्तास सर्व सुखाचे सोहळे उपभोगता येतात व देवही त्या भक्ताच्या संगतीत सुखी होऊन जातात २ या देवानेच आपल्या भक्तांना जन्म देऊन रूप व आकार दिलेले असतात आणि भक्तांनी त्या देवाचा महिमा वर्णन केलेला असतो ३ एकाच परब्रह्माच्या अंगावर दोन भाव निर्माण झाले देव व भक्त, स्वामी व सेवक अशा दोन भावांनी ते परब्रह्म व्यक्त झाले ४ तुकाराम महाराज म्हणतात, तरी त्यांच्यात भेद कधीही नसतो भक्त हाच देव व देव हाच भक्त, इतकी एकरूपता त्यांच्यांत असते ५
विवरण - या एका तत्वस्पर्शी अभंगात तुकाराम महाराजांनी देव व भक्त याच्या अभेदत्वाचे समर्पक वर्णन केले आहे केवळ सुखासाठी भोगविलासासाठी, प्रेमाच्या सुखाने एकाच तत्त्व दोन अवस्थांना आले एक देव झाला, एक भक्त झाले आणि हे नव्य त्याच तत्त्वाच्या आवडीत चा 'आपुलीच आवडी धरुनि राहिला । आपआपणाते
१ चित्तीं, २ त्याचा
४६६ सार्थ तुकारामगाथा १०३६ अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविली' सेविली वैष्णवजनीं ॥ १ ॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणे रसे थोरे ब्रह्मानंदें ॥ २ ॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐंसे ॥ ३ ॥ सर्व सुखें तया मोहोराती ठाया । जेथें बांटणी या वैष्णवांची ॥ ४ ॥ निर्गुण' हे सोग धरिलें गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥ ५ ॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनि ठेला ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अविट-कंटाळा न येणारे, क्षीर-दूध गाळणी-वगळन, अर्थ - या हरिकथामाउलीचे दूध अतिशय अवीट आहे त्याचा कधीही कटाळा येत नाही याचे सेवन आजपर्यंत अनेक वैष्णवानी केलेले आहे १ या हरिकथेपुढे प्रत्यक्ष अमृतही लाजून माघारे फिरते या हरिकथेच्या रसाने फार थोर प्रकारचा ब्रह्मानंद झालेला असतो २ जे कोणी पतित, पातकी आहेत, ते संताच्या पवित्र पंगतीत या हरिकथेच्या प्रसंगी बसून पावन होतात या कथामृतान तेही देवाप्रमाणेच चतुर्भुज होऊन जातात ३ ज्या ठिकाणी या कथेच्या निमित्ताने वैष्णवांची गर्दी होते, तेथे सर्व प्रकारची सुखे मोहोरली जातात, अंकुरतात ४ या निर्गुण श्रीहरीने या कथारसाच्या वेळेस गुणवान असे रूप धारण केले असून तो मोठ्या प्रीतीने स्वतःच नृत्य करू लागतो, गाऊ लागतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनांना वगळून, चाळणी करून, निवडून मी हे हरिकथेचे साधन अतिशय सुलभ असे निश्चित केले आहे याच मुद्यात मी तृप्त झालो आहे ६ विवरण - हरिकथा किंवा कीर्तनभक्ती हे एक सर्वोत्तम साधन ईश्वरप्राप्तीचे म्हणून साधुसंतानी मानले आहे या हरिकथामाउलीची थोरवी तुकोबानी या अभंगात गाइली आहे तिच्यापुढे अमृत लाजून दूर सरत, पतित लोक पावन होऊन जातात, निर्गुण असणारा भगवत तिच्याच नादात सगुणसुंदर होऊन या कीर्तनाच्या जागी येऊन उभा असतो, वगैरे वर्णन मागील संतपरंपरेस धरूनच आहे हरिकथा वा कीर्तन हे सर्वांना आवडणारे व सुलभ असे साधन आहे गायन, नृत्य, वाद्य याच्या आविष्कारास यात भरपूर वाव असल्यामुळे बहुजनासही याची प्रीती विशेष बसते शिवाय कथारूप निरुपणामुळे मनोरंजनाबरोबर परमेश्वराचे गुणगान केल्याचेही ध्येय हाती येते नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार मानले जातात सुभाचा दरगाटा व रकटयाची लंगोटी लावून ते टाळकुटात पंढरपुरास कीर्तन करीत असत सगुण प्रीतीचा व कीर्तनभक्तीचा एक थोर आदर्श म्हणजे नामदेवराय होत 'नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं' अशीच त्याची प्रतिज्ञा होती, या कीर्तनात प्रत्यक्ष देव सगुणसुंदर रूपात हजर असता, अशी श्रद्धा तर सर्वच संतानी व्यक्त केलेली आहे 'कीर्तनाचे सुखें सुखीं होतो देव ' या नामदेवाच्या वचनात स्वतः भगवंतास कीर्तनाची आवड किती आहे हे स्पष्ट केले आहे 'कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी झाली धांवा । नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसे', 'देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी । म्हणोनिया उडी घाली स्वयें', 'कीर्तने तोषें अघोक्षज । राखी लाज भक्तांची', 'कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी' इत्यादी शेकडो वचनांतून एकनाथानी कीर्तनाचा व देवाच्या आवडीचा संबंध स्पष्ट केला आहे ज्ञानेश्वर-नामदेवापासून तुकाराम-रामदासापर्यंतचे सर्वच श्रेष्ठ साधुसंत हे स्वतः थोर दर्जाचे कीर्तनकारही होते त्यामुळे कीर्तनाचे सुख त्यांना स्वानुभवाने पटलेले होते कीर्तनमुखाची चटक त्या प्रभूलाही कशी असते, यांचे वर्णन तुकोबांनीही पुनः पुनः केले आहे 'कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव सगो आहे', 'न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटीं । जाय तेथें दाटी । वैष्णवांची द्यावोनि', 'हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासाची' इत्यादी वचनातून प्रत्यक्ष ईश्वरासही या कीर्तनाने किती सुख होते, याचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे या कीर्तनाचा आणखी एक लाभ असा की, या साधनाने देवास व भक्तास जसे सुख होते, तसाच फायदा पातकी लोकांनाही होतो नारदापासून या कीर्तनाचा महिमा सर्वांनी गाइला आहे यज्ञयाग, जपतप, व्रतेवैकल्ये १ सेवितां सेविली, २ निर्गुण आधार झाला गुणवंत
असला खटाटोप न करता अगदी सोपे असे हे नामसंकीर्तनाचे साधन या कलियुगात माणसांस उपलब्ध झाले आहे. 'हेंचि कलिमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचें' कारण या कीर्तनामुळे 'महापापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले' अशी साक्ष एकनाथांनी दिली आहे. 'पतित पातकी पावनपंगतीं । चतुर्भुज होती देवा ऐसे' असा निर्णय या एका अभंगात तुकारामबुवा देतात त्यास आधारही त्यांच्या व इतर संतांच्या वाङ्मयात भरपूर सापडतात. 'कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥ वाल्ह्या तारिला कीर्तनीं । पावन झाला त्रिभुवनीं ॥ गणिका कीर्तनें तरली। मोक्षधामा ती नेली ।। अजामेळ चोख्या महार । कीर्तनी तरले अपार ॥ एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक जाले पावन' असा या कीर्तनाचा महिमा स्वतः एकनाथांनी वर्णन केलेला आहे या कीर्तन परंपरेविषयीच्या अधिक माहितीसाठी अभंग क्र ९६ वरील विवरण पाहावे १०३७ संसारसोहळे भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विठोबाचें ॥ १ ॥ भय चिंता¹ धाक न मानिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ २ ॥ पापपुण्य त्यांचें धडूं न शके अंग । भक्तांसी धीरंग सर्वभावें ॥ ३ ॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां² भार सर्व वाहे ॥ ४ ॥ तुका म्हणे देव भक्तां वेल्हाईत । भक्त ते निश्चित त्याचियानें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेल्हाईत-साह्यकारी, कैवारी. अर्थ :- संसाराचे सर्व सोहळे अलिप्तपणे भोगणारे जे कुणी आहेत, अशा भक्तांना त्या विठोबाचे साह्य नेहमीच असते. १ जो चक्रपाणी श्रीकृष्णच त्यांचा सांभाळ करीत असल्यामुळे त्यांना भय, चिंता, धाक यांची बाधा कधीही होत नसते. २ सर्व भक्त एका त्या धीरंगाच्या नावेच रंगून गेलेले असल्यामुळे, त्यांच्या अंगास पापपुण्याचा स्पर्श कधीच होऊ शकत नाही. ३ त्या भक्तांना मुक्तही व्हावेसे वाटत नाही पुनः पुनः जन्म घेऊन संसार करावा, अशी त्यांच्या मनांत एक इच्छा असते कारण त्यांचा सर्व भार तो परमेश्वरच वहात असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, देव हा आपल्या भक्तांचा कैवारी आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे ते निश्चित असतात. ५ १०३८ देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहोंचा विचार एकपणें ॥ १ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ २ ॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥ ३ ॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-महिमा. अर्थ :- देवाने भक्तांच्यासाठी अवतार घेणे व भक्ताने त्याचे स्मरण ठेवून संसार करणे या दोन्ही बाबींचे स्वरूप एकच आहे. १ देवाच्या मुळेच भक्तांस सर्व सुखाचे सोहाळे उपभोगता येतात व देवही त्या भक्तांच्या संगतीत सुखी होऊन जातात २ या देवानेच आपल्या भक्तांना जन्म देऊन रूप व आकार दिलेले असतात आणि भक्तांनी त्या देवाचा महिमा वर्णन केलेला असतो. ३ एकाच परब्रह्माच्या अंगावर दोन भाव निर्माण झाले. देव व भक्त, स्वामी व सेवक अशा दोन भावांनी ते परब्रह्म व्यक्त झाले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तरी त्यांच्यात भेद कधीही नसतो. भक्त हाच देव व देव हाच भक्त; इतकी एकरूपता त्यांच्यांत असते. ५ विवरणः- या एका तत्त्वस्पर्शी अभंगात तुकाराम महाराजानी देव व भक्त याच्या अभेदत्वाचे समर्पक वर्णन केले आहे. केवळ सुखासाठी, भोगविलासासाठी, प्रेमाच्या सुखार्थ एकच तत्त्व दोन अवस्थाना आले एक देव झाले, एक भक्त झाले. आणि हे सर्व त्यास तत्त्वाच्या आवडीने झाले. 'आपुलीच आवडी धरूनि सोहळा । आपआपणांतें १ चित्ती, २ त्यांचा.
४६८ | सार्थ तुकारामगाथा व्यानले रे' अशा नांवेत नामदेवांनी या रीतीने वर्णन केले आहे केवळ प्रेमसुखासाठी 'देवचि झाला भक्त' हेंच खरे आहे देवभक्ताचे हे ऐक्य व प्रेमाच्या भोगासाठी त्यांच्यातील भेद हा भक्तिमार्गातील एक मोठा तरल विचार आहे 'देव ते सत । देव ते सत । निमित्त त्या प्रतिभा', 'आम्ही जाणो तुझा भाव । कंचा भक्त, कंचा देव?' इत्यादी वचनातून तुकारामबुवानी देव व भक्त याचे अभिन्नत्व वर्णन केले असून 'अभेदानें भेद राखियेला अंगीं । वाढावया जगों प्रेमसुख' असा निर्णय दिलेला आहे १०३९ हुवरती गाये तयाकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥ १ ॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणे वनमाळी सुखावला ॥ २ ॥ चोरोनिया खाये दुध दही लोणी । भावे चक्रपाणि गोविला तो ॥ ३ ॥ निष्काम तो जाला कामासी लपट । गोपिकाची वाट पाहात बैसे ॥ ४ ॥ जगदानी इच्छी तुळसी एकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥ ५ ॥ तुका म्हणे हेंचि चैतन्य सावळे । व्यापूनि निराळें राहिलैसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका :- हुवरती-मोठ्या प्रेमाने, कैवल्यनिधान - मोक्षाचा, कैवल्याचा साठा, गोविला- गुंतला गेला अर्थ - जो भक्त मोठ्या प्रेमाने गाऊन देवाचे गुणगान करतो, त्याच्याकडे कान देऊन हा कैवल्याचा साठा श्रीहरी उभा राहिलेला असतो १ तो गोपाळानी केलेली पूजा मोठ्या प्रेमाने घेतो, त्याचे उच्छिष्टही ग्रहण करतो त्याच्यातच हा वनमाळी सुखावून जातो २ हा गोपाळांचे दहीदूध, लोणी चोरून खातो व त्यांच्या भावभक्तीत गुंतला जातो ३ गोपिकांविषयी हा प्रेमासक्त असला तरी निष्काम असल्यामुळे त्याची वाट पाहण्यात त्याला सुख वाटते ४ सर्व जगातील लोकांना आपल्या कृपेचे दान देणारा हा प्रभू, एका तुळशीच्या पानाची इच्छा करीत नसतो भक्ताच्या भावास तो अशा प्रकारे जणू विकलाच गेलेला असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, येथे हे सावळे चैतन्य सर्व विश्वात व्यापून आपण पुन वेगळे राहिलेले आहे ६ १०४० समर्थांसी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरों ॥ १ ॥ आदराचे ठायों बहुच आदर । मागितले फार तेथें' वाढी ॥ २ ॥ न म्हणे सोइरा सुहृद आवश्यक । राजा आणि रंक सारिखाचि ॥ ३ ॥ भाव देखे तेथें करी लडबड² । जडा राखे जड निराळेंचि ॥ ४ ॥ कोणी न विसभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥ ५ ॥ तुका म्हणे पोट भरूनी उरवी । धाले³ ऐसे दावी अनुभवे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - समर्थाती-श्रीमंत व उदार गृहस्थाच्या ठिकाणी, वर्णावर्णभेद-उत्तम-कनिष्ठ असा भेद, धाले-संतुष्ट झाले अर्थ :- श्रीमंताच्या घरी मेजवानीच्या प्रसंगी, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ, असा भाव कधी नसतो, त्याच्या घरची सामग्री सर्वांसाठी सिद्ध असते १ ज्याच्या मनात देवाविषयी विशेष आदर असतो त्याचा आदर मग देवही करतो व यामुळे भक्त जेवढे मागतील त्याच्यापेक्षाही जास्त तो त्याना देतो २ ह्यावेळी तो हा माझा सोयरा आहे, हा मित्र आहे, हा राजा आहे, हा भिकारी आहे, असा भेद तो कधी करीत नाही ३ जेथे भक्ताचा शुद्ध भाव त्यात दिसतो, तेथे हा देव फार लुडबुड करुन त्याला जड अशा संसाराच्या उपाधीपासून वेगळे ठेवतो ४ कोणत्याही याचक भक्ताकडे हा दुर्लक्ष करीत नाही त्याची दशा समजायून घेऊन त्याची इच्छा हा देव पूर्ण करितो ५ सर्वांचे पोट भरले आहे व अन्न उरले आहे, सर्वजण जेवून तृप्त झाले आहेत, असे स्वानुभवाने हा जाणतो भक्तानाही असाच अनुभव येतो ६ १ ते ते, २ बडबड, ३ आल.
सार्थ तुकारामगाथा ४६९ १०४१ आलें भरा केणें । येरझार चुके जेणें ॥ १ ॥ उभें केलें विटेवरी । पेठ इनाम पंढरी ॥ २ ॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥ ३ ॥ तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- केणे-माल, जिन्नस. अर्थ:- ज्याच्या सहाय्याने आपली जन्ममृत्यूची येरझार संपते, असा हा या विठ्ठलनामाचा माल बाजारात आला आहे, तो नीट भरून ठेवा. १ पंढरी ही भक्तांना दिलेली इनामाची मोठी पेठ मिळालेली आहे, आणि या ठिकाणी विटेवर हा विठ्ठल उभा राहिलेला आहे. २ तो प्राप्त व्हावा म्हणून चहू दिशांनी एकसारखा ओघ लागलेला आहे. सर्व दिशांनी याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळून गेली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, बापहो, हा माल घेण्यासाठी माप मात्र खरेखुरे आणा. ४ १०४२ लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥ १ ॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥ २ ॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥ ३ ॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- लक्ष्मीवल्लभा-लक्ष्मीपती, पद्मनाभा-ज्याच्या नाभीमधून कमळ उगवले आहे, असा देवा. अर्थ :- लक्ष्मीपती, दीनांच्या नाथा, पद्मनाभा, १ तुझ्याच पायांवर सर्व सुखांची वस्ती आहे व त्याच ठिकाणी मला तू ठेव. २ हीच माझी अल्प वासना असून तू उदारांचा राजा असल्यामुळे ती पुरवावीस. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या माझ्या कर्मभोगाने फार त्रास दिला आहे. तू लौकर धावत येऊन माझे रक्षण कर. ४ १०४३ करों ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥ १ ॥ प्रेम झोंबो' कंठीं । देह धरणीये लोटीं ॥ २ ॥ राहे लोकाचार । पडे अवघा विसर ॥ ३ ॥ तुका म्हणे ध्यायें । तुज व्यभिचारभावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- झोंबो-टिकून राहो. अर्थ :- देवा, तुमच्याच पायांवर वारंवार पडून राहण्याची इच्छा व्हावी, असे मला जागे करा. १ माझ्या कंठात तुमच्या विषयीचे प्रेम सदैव टिकून राहो. माझ्या या देहाने धरणीवर तुम्हांस लोटांगण घालावे. २ माझा सर्व लोकाचार, लौकिक व्यवहार दूर व्हावा आणि मला सर्वांचा विसर पडावा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या जारिणीने व्यभिचारीभावाच्या तीव्रतेने आपल्या प्रियकराचे ध्यान करावे, तसे देवा, माझे चित्त तुझ्यावर जडावे. ४ १०४४ टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥ १ ॥ जाल तरी कोणी जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ २ ॥ जाती सादावीत । तेयें असों द्यावें चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सांगाती-सोबती, मित्र, सादवीत-सादघ करीत, समजावीत. १ झोंबे.
४७० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- हातांत टाळ वीणा घेऊन निघालेल्या या विष्णुभक्तांची सोबत ज्यांना आहे १ त्यांनी लगबग करून या मार्गाने चालावे. पुण्याची शिदोरी तयार ठेवावी २ असे हे भक्त सर्वांना सावध करीत जात असल्याने सर्वांनी त्यांच्यावर आपले चित्त द्यावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे वैष्णववीर, विठ्ठल, विठ्ठल बोल बोलोत निघाले आहेत. ४ १०४५ वांयां जातो देवा । नेणे भवती करूं सेवा ॥ १ ॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलो निवांत ॥ २ ॥ करावें ते काय । न कळे अवलोकितों पाय ॥ ३ ॥ तुका म्हणे दान । दिले पदरीं घेईन ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निवात-स्तब्ध, अवलोकितों-पाहतो अर्थ :- देवा, आतां माझा जन्म व्यर्थच चाललेला दिसतो मला तुझी सेवा करता येत नाही भक्ती करता येत नाही. १ आतां तुझ्यापुढे हात जोडून मी निवांतपणे उभा आहे २ काय करावे, ते मला समजत नाही तुमच्या पायाकडे पाहात देवा, इथे उभा मात्र आहे मी ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे दान देवा, द्याल ते मी पदरात घेईन. ४ १०४६ जीव खादला दैवतें । माझा येणें महाभूतें । झोबले निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥ १ ॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हा आम्हा सये । विघडाविघड केली ॥ २ ॥ बोलतां दुश्चिती । मी वो पडियेले भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥ ३ ॥ भलतेंचि चापळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥ ४ ॥ नका बोलो सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहे । उग्या वाचा खुंटोनी ॥ ५ ॥ तुम्हां आम्हा भेटी । नाही जाली जीवेसाठीं । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- खादला-खाल्ला, सये-सखे, विघडाविघड-वियोग, खुटोनी-बंद करून, अर्थ :- हा महाभूत असणारा जो देव त्याने तर माझा जीवच खाल्ला आहे. हे दैवत माझ्या जीवाला इतके झोंबून राहिले आहे की, काही केल्याने सुटत नाही १ आता मी काय करू? काहीही उपाय केले तरी, काही उपयोग नाही तसे, याने तुमच्याआमच्यात वियोग निर्माण केला आहे २ असे बोलत असतानाच मी दुश्चित्त होऊन भ्रांतीमध्ये पडले आहे माझ्या मनात मी व माझे असा आठवसुद्धा राहिला नाही ३ मी काहीतरी भलतेच बोला यला लागले आहे मला माझीं मलेबाळेही काही आठवत नाहीत आपले व परके हा भावही माझ्यामधील निघून गेला आहे ४ सख्यानो, माझ्याशी बोलूही नका, कारण मला आता एक वायगा शब्द सहन होत नाही. वाणी बद करून जशा आहात तशाच उगाच बसून राहा ५ तुमचीआमची भेट होणार नाही, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे आता हा श्रीहरी माझ्याजवळ एकसारखा आहे हे तुम्ही नीट पाहा ६ १०४७ जीवीचा जिव्हाळा । पाहो आपुलिया डोळा ॥ १ ॥ आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥ २ ॥ पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं । वाहू रखुमाईचा पती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- येर-इतर, वाव-व्यर्थ अर्थ :- आमच्या जीवाचा जिव्हाळा असणारा हा श्रीहरी आम्ही आपल्या डोळ्यानी पाहू. १ विठ्ठल हाच एक देव असून इतर सर्व व्यर्थ आहेत आमच्या दृष्टीने. २ हा विठ्ठल पुंडलिकासाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा रखुमाईचा पती श्रीविठ्ठल आम्ही आमच्या चित्तात धारण करू. ४
सार्थ तुकारामगाथा ४७१ १०४८ माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥ १ ॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ २ ॥ दास विठ्ठलाचा । अंकित अनिला ठायींचा ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा. - आराधन-आराध्य दैवत, निधान-ठेवा. अर्थ :- माझे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा हा एक ठेवा श्रीविठ्ठल हेच आहे. १ त्याच्या एकाशिवाय आम्हास दुसरे कुणी माहीत नाही. पंढरीराज विठ्ठल हेच आमचे एकमेव दैवत. २ मी या विठ्ठलाचा दास असून त्याच्या स्थानाचा अंकित असा सेवक आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता यात कधी पालट होणार नाही. ४ १०४९ आतां आम्हां हेचि काम । न १ विसंभावे तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें २ नाचावें ॥ १ ॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकळिक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिले ॥ २ ॥ गोदातटें निर्मळें । देव देवांहीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न विसभावें-विसरू नये, आराणूक-विश्रांती, गोदातीरें-गोदावरी नदीच्या काठी. अर्थ :- आता आम्हास हे एकच काम उरले आहे. तुला विसरू नये. वाणीने एकसारखे तुझेच नाम गावे. दोनही हातानी टाळी वाजवून प्रेमसुखाने नाचावे. १ या सुखामुळे मनास पूर्ण विश्रांती प्राप्त झाली असून मागची- पुढची सर्व काळजी सपलेली आहे. आध्यात्मिक, आधिदैविक आणि साधिभौतिक अशा प्रकारचे त्रिपुटीचे दुःख संपून आमचे प्रारब्धही पूर्णपणे संपले आहे. २ गोदावरीच्या स्वच्छ व निर्मळ किनाऱ्यावर अनेक देवांची देवळे पाहून, संतमहंतांच्या मेळाव्यात बागून दिवस मोठ्या सुखाचा जात आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, आता कसलीही चिंता मला उरलेली नाही. माझा सर्व योगक्षेम मी तुझ्याकडे सोपविलेला आहे. सर्व भार तुझ्यावरच टाकला आहे. ४ १०५० चोरटें सुनै मारिलें ताळें । फेंउं करी परि न संडी चाळे ॥ १ ॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ २ ॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कर्म बळिवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुनै-कुत्रे, ताळें-जोडपाच्या तळव्याने. अर्थ :- चोरट्या कुत्र्याला जोडप्याच्या तळव्याने मारले तर 'केउ केउ' करीत ते पळून जाते; पण ते स्वतःचे चाळे काही कधी सोडीत नाही. १ देवा, असे काही दुराचारी असतात, ते आपल्या जीवास आपणच घात करून घेतात. २ त्यांचे नाक काटले गेले असले तरी, त्यांना त्याची लाज कधीच वाटत नाही. फजितखोर होऊनही ते दारोदार हिंडत असतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे प्रारब्धकर्म बलवान म्हणून, ते त्याला मागेपुढे चांगल्या मार्गाने सरकू देत नाहीत. ४ १ वाचे गाऊ तुझे नाम, २ सुखें आनंदे.
४७२ सार्थ तुकारामगाथा १०५१ मुनि मुक्त जाले भेणे गर्भवासा । आम्हा विष्णुदासा सुलभ तो ॥ १ ॥ अवघाचि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनिया ॥ २ ॥ पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हा सोपी वाट वैकुंठाची ॥ ३ ॥ तुका म्हणे जना सकळांसहित । घेऊं' अखंडित प्रेमसुख ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भेणें-भिऊन, भीतीने, उद्भट-कठिण अर्थ - थोर ऋषीमुनी गर्भवासाच्या भीतीने मुक्तीच्या मार्गास लागले, परंतु हा गर्भवास आम्हा विष्णु- दासाना मात्र अतिशय सुलभ असा झाला आहे १ आम्ही सर्व संसारच ब्रह्मरूप मानल्यामुळे आम्हास संसाराचे अथवा जन्ममृत्यूचे भय नाही आमचे सब विठ्ठलरूप होऊन गेले आहे २ ब्रह्मलोकाला अथवा वैकुंठाला जाण्याचा मार्ग फार कठिण आहे असे उल्लेख नाना पुराणांतून असले तरी, आम्हा भक्ताना मात्र वैकुंठाची वाट अतिशय सोपी अशी निर्माण झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व लोकांच्या सहित या ईश्वराचे प्रेमसुख मोठ्या आवडीने भोगू ४ १०५२ न करावी स्तुति माझी सतजनीं । होईल या वचनीं अभिमान ॥ १ ॥ भारे भवनदी नुतरवे पार । दुरावतील दूर तुमचे पाय ॥ २ ॥ तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सतजनीं-सत लोकांनी नुतरवे-उतरवणार नाही अर्थ - तुम्ही संत लोकांनी माझी आता स्तुती थोडीसुद्धा करू नये त्यामुळे माझ्या संतत्वाबद्दल मला मोठा अभिमान निर्माण होईल १ आणि या भारामुळे मला भवनदी तरून जाण्याचे सामर्थ्य राहणार नाही, आणि तुमच्यासारख्या साधुसंतांचे पायही दुरावतील २ तुकाराम महाराज म्हणतात आणि गर्व तर माझी पाठ पुरवील, व त्यायोगे या विठोबाची आणि माझी ताटातूट होईल ३ १०५३ तुमचिये दासींचा दास करुनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥ १ ॥ नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी२ माझ्या हात सतजनीं ॥ २ ॥ तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारें । उतरेन खरें भवनदी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नवविधा-शास्त्रात सांगितलेली श्रवण कीर्तन, स्मरण पादसेवन इत्यादी नऊ प्रकारची भक्ती अर्थ - सत सज्जनहो, मला तुमच्या दासाचा दास जरी करून ठेविले तरी चालेल हाच आशीर्वाद मला तुम्ही द्यावा १ शास्त्रामध्ये जो नवविधा भक्ती सांगितली आहे, ती तुम्ही सत लोकांनी मजकडून करवून घ्यावी २ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाच्या आधाराने मी ही भवनदी खरोखरीच उतरून जाईन ३ १०५४ चोर टेंकाचे निघाले चोरी । आपले तैसे पारखे घरीं३ ॥ १ ॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ २ ॥ बुद्धिहीन नये कांहींचि कारणा । तयासवे जाणा तेंचि सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ठाउके वर्म । तयासी कर्म वोढवले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - टेंकाचे-समूहान पारखे-दुसऱ्याच्या अर्थ -काही कमकुवत चोर समूहान चोरी करायला निघाले आणि आपल्या घरात जसे आपण वावरतो तसेच ते दुसऱ्याच्या घरीही वावरू लागले १ त्यामुळे काय झाले ? त्यांना तेथे काहीच फायदा न होता, उलट ते स्वतःच नागवले गेले घरातील मालकाकडून त्याचे कान व हातपाय कापले गेले मात्र २ याप्रमाण बुद्धिहीन माणसाचा १ बैसोनि निवान्त सुख भागू, २ द्यावी, ३ घरी
सार्थ तुकारामगाथा ४७३ उपभोग काहीच होत नाही. आणि त्याच्या बरोबर असणारास ही त्याच प्रकारचे भोग भोगायला लागतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला खरोखरच एखाद्या गोष्टीचे मर्म माहीत नाही, त्याला हे असे कर्मगतीचे फळ भोगावे लागते. ४ १०५५ समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥ १ ॥ अवगुणी जरी जालें तें घोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि १ मुद्रांकित जालों तुझा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- जन-लोक, घोंगळ-वाईट, मुद्रांकित-कृपेने, स्वाधीन. अर्थ :- देवा, एखाद्या समर्थ असणाऱ्या श्रीमंत माणसाचे मूल जर दीनवाणे अथवा केविलवाणे दिसत असेल तर, त्याकडे पाहताच लोक कुणाला हसतील? त्याच्या आईबापासच बोल देतील, नाही का? याचा विचार तुम्ही केला आहे? १ ते मूल कितीही अवगुणी असेल व कितीही वाईट असेल, तरी त्यांना त्याचा सांभाळ करावा लागतोच. २ तुकाराम महाराज म्हणतात, तसा मी एक पतित असून देवा, त्याची चिंता तुला असावी, कारण मी तुमच्या पतितपावन या मुद्रेने अंकित झालो आहे. तुमच्याच स्वाधीन आहे ३ १०५६ गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें २ भेटी केली तेणें ॥ १ ॥ सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ २ ॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मणि-रत्न, खळा-दुष्टास अर्थ :- एखाद्या गाढवाच्या अंगाला चांगली चंदनाची उटी लावली तरी त्याचा त्याला काय उपयोग ? ते लागलीच नेहमीच्या स्वभावाप्रमाणे राखेत जाऊन लोळणारच. १ ज्याचे जे सहज स्वभावातील गुण असतील ते काही बदलत नाहीत. २ एखाद्या माकडाच्या गळ्यात जर किंमतवान रत्न बांधले तर त्याचा त्याला काय उपयोग? ते त्याचे तुकडे तुकडे करून चघळूनच टाकणार ना? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे दुष्ट माणसास फार हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या त्याला आवडत नाहीत. आपल्याच मताने ते अज्ञानाची गोष्ट वाढवितात ४ १०५७ नेणे सुनैं चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥ १ ॥ शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेलें वांयां बोल जातो ॥ २ ॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥ ३ ॥ वंदूं निंदूं काय दुराचार ३ । खळाचा विचार तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुनैं-कुत्रे, ढाळ-खोड, वागण्याची रीत अर्थ :- दारात बांधलेले कुत्रे चोर कोण, पाहुणा कोण, हे न ओळखता सर्वावरच भुंकत राहते ? त्याला कितीही शिकविले तरी त्याचा काही उपयोग त्याला कधी होत नाही. त्याला शिकविले ते सर्व वायाच जाते. २ त्याला जरी चांगले दूध पाजले तरी, ते ओकून टाकून अमंगळ अशा घाणेरड्या पदार्थाकडेच त्याचे लक्ष जाणार. ते आपली खोड काही सोडायला तयार नसते. ३ त्याचप्रमाणे एखाद्या दुष्टाला कितीही वंदा अथवा निंदा, त्याच्या स्वभावात काही कधी फरक होणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ १०५८ जन मानवलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥ १ ॥ म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ २ ॥ १ दास, २ राख तया तेणे केलीसे भेटी, ३ दुराचारी थोर. तु. गा -.६०
४७४ सार्थ तुकारामगाथा संता ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥ ३ ॥ तुका म्हणे मी तो आपणासी ठावा । आहे बरा देवा जैसा तैसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मानविले-मानसन्मान केला अर्थ - देवा, बाहेरच्या दृष्टीने या लोकांनी माझा मानसन्मान केला असला तरी, मी अंत:करणाने मात्र तेवढा मोठा झालेलो नाही १ म्हणूनच पंढरीराया, माझ्या मनात फारच चिंता वाटत आहे, आणि मनाची खरी अवस्था प्रकट करताना भारी लाज वाटते २ साधुसंतांना सारे जगच ब्रह्मरूप दिसत असल्याने ते कुणाचेच दोष पाहात नाहीत माझेही अवगुण त्यामुळे त्यांना दिसले नाहीत ३ परंतु देवा मी कसा आहे हे तुम्हास माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी जसा आहे तसाच आहे हे तुम्ही जाणता ४ १०५९ काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसे ॥ १ ॥ कैसा सरता जालो तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हे ॥ २ ॥ पुराणांची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवी हे देवा साच खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जीताती-जिवंतपणे वावरतात, सरता जालो-मान्य झालो, साच-खरे अर्थ - खरे पाहिले असताना माझ्या शरीरात कामक्रोधादी विकार जिवंतपणे वावरत असूनही मी वरच्या बाजूने मात्र अतिशय मृदू शब्द बोलीत आहे १ तरी सुद्धा पांडुरंगा मी तुमच्या पायाशी कसा मान्य झालो, हे काही माझ्या ध्यानात येत नाही २ पुराणातील संतांचे चित्त कशा प्रकारे शुद्ध असायला पाहिजे, याची ग्वाही दिलेली आहे तशा प्रकारचे काही माझ चित्त शुद्ध झालेले नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून देवा, जी काही खरी गोष्ट असेल ती माझ्या अनुभवास आणून द्या ना ४ १०६० स्तुति करों जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥ १ ॥ तुमचे मी दास संताचे दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ २ ॥ रामकृष्णहरि मन उच्चारणा । आवडी चरणा विठोबाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे तुमचे सेवितो उच्छिष्ट । क्षमा करीं धीट होऊनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम, सेवितों-खातो अर्थ - संत लोकांनो, मी तुमची स्तुती करावी, असा अधिकार मजजवळ नाही कारण तुमच्या योग्यतेचा विचारच मला समजत नाही १ तुम्हा संतांचा मी एक दुर्बल असा दास असल्याने तुम्ही तुमच्या पायावरच माझे रक्षण करावे २ रामकृष्ण हरि या मंत्राचाच मी उच्चार करीत असतो व माझे प्रेम विठ्ठलाच्या चरणावर दृढ असे आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतहो, मी तुमचे उच्छिष्ट खात असतो, मोठ्या धिटाईने सेवन करीत असतो मला तुम्ही क्षमा करावी ४ १०६१ बहु दूरवरी । वेठीं ओझें होते शिरों ॥ १ ॥ आता उतरला भार । तुम्ही केला अंगीकार ॥ २ ॥ बहु काकुलती । आलो मागें किती ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेठी-बिगारीच्या पद्धतीत, अंगीकार-स्वीकार अर्थ - कित्येक जन्मपर्यंत मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात बिगारीस धरलेल्या नोकराप्रमाणे सापडलो होतो फार मोठे ओझे माझ्या डोक्यावर होते १ पण आता ते सर्व ओझे कमी झाले आहे देवा, तुम्ही माझा स्वीकार
केल्यामुळे आता माझा भार हलका झाला आहे २ मी पूर्वीपासून तुमची कितीतरी काकुळतीने विनवणी करीत आलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आज मात्र तुम्ही मला पदरी घेतल्यामुळे माझी सेवा सफळ झाली असे मला वाटते ४ पाईक-अभंग ११. १०६२ पाईकपणें१ जोतिला सिद्धांत । शूर धरी मात वचन चित्तीं ॥ १ ॥ पाइकावाचून नव्हे कधीं सुख । प्रजामध्यें दुःख न सरे पीडा ॥ २ ॥ तरि व्हावें पाईक जिवाचे उदार । सकळ त्याचा भार स्वामी वाहे ॥ ३ ॥ पाइकीचे सुख जया नाही ठावे । धिग त्यांनीं ज्यावे वायाविण ॥ ४ ॥ तुका म्हणे एका क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा -पाईकपणें-सेवकपणा, जोतिला-जोडिला, सांगितला, ज्याचें-जयाचे अर्थ -मी सेवकपणाचा जो विचार सांगितला आहे, तो जो शूर पुरुष असेल तोच चित्तात धरून नीट समजावून घेईल १ सेवक झाल्यावाचून सुख कधीच लाभणार नाही त्याशिवाय प्रजेमधील दुःख, पीडा दूर होणारच नाही २ तरी जीवावर उदार होऊन तुम्ही सेवक व्हावे. तुमचा सर्व भार तो देव स्वतः वाहील ३ सेवकाच्या सुखाची ज्याला कल्पना नाही, त्याचे जन्माला येऊन जगणे व्यर्थच आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, एक क्षणभर जरी सेवकपणा अंगी बाणला तर अपार असे सुख त्यास भोगायला मिळेल ५ विवरण - या पुढचे दहा अभंग पाईक-अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत पाईक म्हणजे शूर शिपाई, सेवक, वीर पुरुष जीवनाच्या विविध क्षेत्रात पाईकपणाने वागणे किती महत्त्वाचे आहे, याचा स्पष्ट बोध या अभंगातून तुकाराम बुवांनी केलेला आहे राजकारण असो, देशरक्षण असो, विद्यासंपादन असो की परमेश्वरप्राप्तीची साधना असो, त्यात पाईकाचे, सेवकाचे गुण हवेतच या सेवकाच्या वृत्तीशिवाय कोणतही अवघड काम होणे शक्य नाही तुकाराम- बुवाच्या या अभंगातून निव्वळ परमार्थाचा बोध किती, व त्यातील राजकारणाचा अर्थ किती, याबद्दल शाहिंच्या मनात संशय येण्यासारखा आहे शिवरायांचे कार्य नजरेसमोर ठेवून तुकोबांनी पाईकाना, स्वराज्याच्या शिपायाना उद्देशून या अभंगातून उपदेश केलेला आहे, असेही मानिले जान या अभंगाच्या निर्मितीचाही प्रसंग सांगितला जातो, तो असा की, एकदा शिवबा व त्याचे महवारी शूर वीर पुरुष असे सर्वजण तुकाराममहाराजाचे कीर्तन ऐकत बसले होत 'थोर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळा पाया पढे' या अभंगाचे स्मरण होऊन वारकरी विठ्ठलभक्ताना व स्वराज्यसाधकाना एकदमच बोध व्हावा, असे तुकोबाच्या मनात आले व त्या प्रसंगी त्यांनी हे 'पाईक अभग ११' म्हटले धीरत्व, पुढारी- पणाची वृत्ती, धीटपणा, जीवावर उदार होऊन कुठेही धैर्याने उडी घेण्याची हिंमत या सर्व गोष्टीची जशी जरूरी स्वराज्यसाधनेस आहे, तशीच ती जीवनाच्या इतरही क्षेत्रात विविध ठिकाणी आहे, असे स्पष्ट दिसत परमार्थाच्या क्षेत्रातही या गुणाना किती महत्त्व आहे, ते या अभंगावरून समजण्यासारखे आहे १०६३ पाइकीचें सुख पाइकासी ठावे । म्हणोनिया जीवे केली साटीं ॥ १ ॥ येता गोळ्या बाण साहिले खडमार । वर्षाता अपार वृष्टि वरी ॥ २ ॥ स्वामीपुढें व्हावे पडता भांडण । मग त्या मडन शोभा दावी ॥ ३ ॥ पाइकांनीं सुख भोगिले अपार । शुद्ध आणि धीर अतर्याहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे या सिद्धाताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - मडन-भूषण, अलकार १ पाईक म्हणे
४७६ सार्थ तुकारामगाथा अर्थ - शिपाई किंवा सेवक होण्यात काय सुख असते, हे एक सेवकच जाणतो. म्हणून तर जीवावर उदार होऊन पाईक व्हावे. १ समोरून तोफांच्या गोळ्यांचा अथवा धनुष्यातून निघालेल्या बाणांचा वर्षाव सहन करावा, अगणित शस्त्रांचा मारा सहन करावा २ युद्ध सुरु असतांना आपल्या स्वामीपुढे होऊन हा सर्व मारा सहन करणे यातच सर्व शोभा आहे. शस्त्राचे वार अंगावर घेणे, हीच शूराची खरी भूषणे आहेत. ३ अंतर्बाह्य असे जे शूर पुरुष आहेत, धैर्यवान आहेत, त्यांनी पाईकपणाचे सुख अपार भोगले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व सिद्धांताच्या खुणा मी सांगितल्या आहेत. जो शहाणा व जाणणारा असेल, तो त्या ओळखील व त्याप्रमाणे स्वामीकार्य करून सुखी होईल. ५ १०६४ पाईक तो जाणे पाइकीचा भाव । लाग पगैं ठाव चोरवाट ॥ १ ॥ आपणां राखोनि ठकावे आणीक । घ्यावें सकळीक हरुनियां ॥ २ ॥ येऊं नेदी लाग लागों नेदी भाग । पाइक त्या जग स्वामी मानी ॥ ३ ॥ ऐसे जन केलें पाइक पाईक । जया कोणी भीक न घालिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाइक त्रैलोकींचा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पगें-पाय, पावले अर्थ :- जो खरा सेवक असेल तोच सेवकाचा भाव जाणेल, त्यालाच कोणत्या ठिकाणी काय आहे, चोर- वाटा कुठे आहेत, हे माहीत असल्याने तो आपली पावले नेमकी टाकीत असतो. १ तो आपले स्वतःचे रक्षण करून इतरांना फसवितो, त्यांचे सर्वस्व हरण करून घेतो. २ हे असे शूर सेवक कुणाविषयी फारसा सुगावा लागू देत नाहीत; आणि स्वतःविषयीही फारशी माहिती कुणास सांगत नाहीत असे सेवक स्वामीसहो जगासारखे मान्य होतात. ३ ज्यांना कुणी विचारोतही नव्हते, अशाही लोकांना या सेवकांनी सेवकत्वाची दीक्षा देऊन पाईक केले आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे ज्याचे सेवक आहेत, तो त्रैलोक्यात मोठा बलवान व श्रेष्ठ राजा आहे असे समजावे. ५ १०६५ पाइकांनीं पंथ चालविल्या वाट । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥ १ ॥ पारखिये ठायीं घेउनिया ठाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ २ ॥ आधारेविण जें बोलता चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥ ३ ॥ सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥ ४ ॥ तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पारख्याचा-परक्या शत्रूचा, साटा-स्थाने. अर्थ :- या सेवकांनी शत्रूची स्थाने मोडून चांगले निर्भय असे मार्ग निर्माण केले आहेत. १ या पाईकांनी शत्रूच्या ठिकाणी हल्ला केला असून तेथेच ते बसनी करून आहेत. त्यांनी या वेळी आपल्या लोकांचे मात्र रक्षण केले आहे. २ शास्त्राचा आधार नसताना जे लोक उगाच बोलतात, ते आपल्या जातीचे नव्हेतच असे समजून येते. ३ कुणी ठरलेला, शिस्तीचा रस्ता सोडून गेले की, त्यांना हे सेवकलोक शिक्षा करतात. कारण त्यामुळे मग इतरांनाही मोठ शिक्षण मिळते ४ तुकाराम महाराज म्हणतात, हे सेवक लोक सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व प्रकारचे सुख देतात ५ १०६६ पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥ १ ॥ तो एक पाईक पाइका नाईक । भाव सकळीक स्वामिकार्यों ॥ २ ॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥ ३ ॥
७. दैन्य-याचना, विठ्ठल कृपा व उपसंहार
सार्थ तुकारामगाथा ४७७ विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥ ४ ॥ तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- तृणवत-गवताप्रमाणे क्षुद्र. अर्थ :- हा सेवक कसा असतो ? तर तो आपल्या प्रजेचे रक्षण करतो आणि जो शत्रू असेल त्याचे मूळ छेदून त्याचा नाश करतो. १ ज्याचा सर्व भाव एका स्वामीच्याच कार्यावर असतो. तो सर्व पाईकांचा नायकच बनतो. २ त्याला स्वतःचा देह गवताप्रमाणे क्षुद्र वाटतो. त्याने सोने दगडाप्रमाणे मानलेले असते. अशा सेवकास हा पाईक स्वतःहून काही वेगळे मानत नाही. ३ स्वामीवर असा दृढ विश्वास ठेवल्याखेरीज त्या सेवकाला कधी मोल घडत नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, स्वामीस जेणेकरून कमीपणा येणार नाही, अशा कार्याचे जतन हे पाईक लोक करीत असतात. ५
१०६७ धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥ १ ॥ जयाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥ २ ॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥ ३ ॥ कमाइचों हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥ ४ ॥ तुका म्हणे तरि पाइकीच भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- हीण-कमी प्रतीची. अर्थ :- जो स्वामी आपल्या सेवकास मानतो, त्या सेवकासही मग सर्वजण भिवून असतात. १ जीवावर उदार होऊन लढणारे सेवकच शोभून दिसतात. ते सेवकांचे प्रमुख नाईक होऊन मोठ्या दिमाखाने शोभतात. २ असे हे सेवक सत्तेने स्वामीचे सर्व सुख भोगतात. त्यांचा गौरव सर्व प्रकारांनी होत असतो. ३ परंतु ज्यांची कमाईच हीन प्रतीची असते, असे किती तरी सेवक पडले आहेत. असे किती येतात आणि जातात, त्यांचा हिशोबच नाही. ४ तुका- राम महाराज म्हणतात, परंतु स्वामीची सेवा करणारे पाईकच भले होत. ५
१०६८ पाइकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥ १ ॥ पाईक जाणे मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ २ ॥ एके दोहीं घरीं घेतलें ठाणें । पाईक तो पणें निवडला ॥ ३ ॥ करुनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥ ४ ॥ तुका म्हणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- मशारा-वेतन, कारण-कार्य. अर्थ :- राजीपणाने सेवा करणे, हेच खरे म्हणजे पाईकाचे वेतन आहे. सेवेच्या योगानेंच तो खरा पाईक शोभून दिसतो. १ ज्या सेवकास लढाईचे अंग माहीत आहे, त्याच्या सेवेस कधी कमतरता पडणार नाही. २ एक दोन ठिकाणी स्वतः होऊन लढाई जिंकणारा जो सेवक असतो, तोच शूर सेवक म्हणून ओळखला जातो. ३ ज्याने काही विशेष कार्य करून स्वामीस यश दिलेले असते. त्याच्या सेवेलाच खऱ्या सेवेचे नाव मिळते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा स्वामीनिष्ठ पाईकांना त्यांच्या स्वामीखेरीज इतर विश्रांतीचे ठिकाण कुठलेही नाही. ५
१०६९ उंच निच कैंसी पाइकाची ओळी१ । कोण गांडे वळी निवडिले ॥ १ ॥ स्वामिकार्या एक सर्वस्वें तत्पर । एक ते फुचर आशाबद्ध२ ॥ २ ॥ प्रसंगावांचूनि आणिता आविर्भाव३ । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥ ३ ॥ १ वोळी, २ आशा बहु, ३ आयुर्भाव.
गणतीचे एक उच निंच फार । तयामध्यें शूर विरळा थोडे ॥ ४ ॥ तुका म्हणे स्वामी जाणे त्याचा मान । पाईक पाहोनि मोल करी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - ओळी-प्रकार, गांडे-भिव, वळी-बलवान, कुचर-कुचराई करणारे अर्थ - या सेवकांचे श्रेष्ठ व कनिष्ठ असे प्रकार कसे असतात ते पाहा. कुणी भित्रे असतात कुणी शूर व बलवान असतात १ कुणी आपल्या स्वामीच्या सेवेत तत्पर असतात, तर कुणी त्याविषयी कुचराई करतात नुसतेच आशेने धड असतात २ शौर्य दाखविण्याचा प्रसंग आल्याशिवायच ते वृथा शूरत्वाचा खोटा आविर्भाव आणतात व आपण सेवक आहोत, अशी विनाकारण ऐट मिरवितात ३ या सेवकाची गणतीच करायला गेले तर, खरा व प्रामा- णिक असा सेवक एखादाच मिळतो खालच्या दर्जाचेच सेवक फार असतात त्याच्यात शूर असे वीर सेवक क्वचितच आढळून येतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा शूर सेवकाचा मान त्याचा स्वामी जाणीत असतोच त्याच्या सेवेप्रमाणेच त्याचा स्वामी त्याचे मोल यथायोग्य करीत असतो ५ १०७० एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥ १ ॥ स्वामिपदीं एका ठाव उच स्थळीं । एक तों निराळीं जवळी दुरी ॥ २ ॥ हीन कमाईचा हीन आन ठाव¹ । उचा सर्व भाव उच पद ॥ ३ ॥ पाईकपणे तो सर्वन सरता । चांग तरी परता गाडचा ठाव ॥ ४ ॥ तुका म्हणे मरण आहे या सकळा । भेने अयफळा अभयें मोल ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - भेनें-भीतीने अर्थ - एकाच स्वामीचे सब पाईक असले तरी त्याच्यात ज्याचे जसे बळ असेल तसे त्याचे मोल ठरते १ जे खरे, सच्चा दिलाचे असतात, शूर व प्रामाणिक असतात, त्याना स्वामीजवळच उचावर आसन मिळते व दुसरे कुणी कमी प्रतीचे असतात, त्याना स्वामीच्या आसपास कुठे तरी दूरच्या ठिकाणी जागा मिळत असते २ ज्याचे कर्तृत्व कमी प्रतीचे असते, त्याना स्थानही खालच्या दर्जाचे मिळते उलट ज्याचे शौर्य श्रेष्ठ दर्जाचे असते, त्याला मानाचे स्थानही फार उचीचे मिळते ३ तो सेवक आपल्या सेवेने सर्वांना प्रिय झालेला असतो, परंतु एखादा चांगला असूनही जर कुचराई करील, तर मात्र तो भित्राच ठरतो ४ तुकाराम महाराज म्हणतात मरण तर सर्वांनाच आहे पण मरणाचे भय धारण केल्यास अप्रतिष्ठा होते व अभय धरल्यास जीवितास मोल चढते ५ १०७१ प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठीं एके जैशीं तैशीं ॥ १ ॥ आगळें पाऊल आणिकासी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ २ ॥ पाठीवरी घाय² म्हणती फटमर । धडा अग्रें शूर मान पाये ॥ ३ ॥ घेईल दरवाडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥ ४ ॥ तुका म्हणे नव्हे बोलाचे कारण । कमाईचा पण सिद्धी पाये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रजी-प्रजेच्या सुखासाठी फटमर-भ्याड अर्थ - प्रजेच्या सुखासाठी मरण पत्करणारा जो सेवक असतो, तोच नाईकाच्या पोरवीस पोचतो आणि केवळ पोटासाठी लढणारे असतात, त्याना मानही जशास तसा असाच जमतेम मिळतो १ कित्येकजण शत्रूवर चाल करून वेगळेच पाऊल टाकतात, तर कित्येक शत्रूच्या भीतीने माघारी वळून पळत असतात, त्याचे मात्र पाय तुटले जातात २ शत्रूचे घाय पाठीवर घेऊन जे पळून येतात ते शिपाईगडी भ्याडच म्हणावेत व जे धड अगाने शत्रूवर समोर होऊन चालून जातात, त्याचाच मान सवत्र असतो ३ आपल्या जीवावर उदार होऊन जो पाईक शत्रूवर १ धाव, २ धाव
सार्थ तुकारामगाथा ४७९ हल्ला करील, तोच त्याचा पराभवही करू शकेल त्यालाच जय मिळेल ४ तुकाराम महाराज म्हणतात, या शूरत्वाच्या गोष्टी नुसत्या बोलायच्या नसतात, तर मोठा निश्चय करून कार्यसिद्धी करणे हेच सेवेकऱ्याच्या सेवेचे सार्थक आहे ५ १०७२ जातीचा पाईक ओळखले पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥ १ ॥ धरितील पोटासाठीं हतियेरें । फळती तों खरें वेठोचींसों ॥ २ ॥ जातीचे ते असे खरें घायदाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥ ३ ॥ तुका म्हणे नमूं देव म्हण जन । जालियाच्या खुणा जाणतसो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जातीचा-श्रेष्ठ प्रकारचा, खरा, खरें-गाढवे, वेठीचींसों-विगारीची, घायदाय-रीत, डावपेच, पारखिया-पारस करणाऱ्या लोकांपाशी अर्थ - जो खरा जातवंत सेवक असतो, तोच दुसऱ्या सेवकास ओळखतो त्यासच त्याच्या कार्याविषयी आदर वाटतो १ व जे केवळ पोटासाठीच हातात हत्यारे धरून असतात, ती माणसे केवळ बिगारीच्या गाड्या- प्रमाणेच नुसती हेतुशून्य होऊन राबतात असे समजावे २ जे जातीने खरे शूरवीर पुरुष आहेत, त्याचे डावपेच जो पारखी असतो, त्याच्या दृष्टीतून सुटत नाहीत त्यास त्याची ओळख पटतेच ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र देवाचीच वस्ती आहे, असे समजून आम्ही या सेवकास वंदन करूच, पण जे खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेलेले आहेत, त्यांच्याही खुणा आम्ही जाणतोच ४ विवरण - तुकाराम महाराजांचे हे पाईकाचे अकरा अभंग अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहेत. परमेश्वर- प्राप्तीच्या मार्गात अथवा भक्तिसाधनेत पाईकाच्या गुणाची कितीतरी आवश्यकता आहे आपले सर्व गुणसर्वस्व आपल्या धन्यासाठी, स्वामीसाठी खर्च करण्याची प्रतिज्ञा या सेवकाने घेतलेली असते अशी ही निकराची भावना भक्तीच्या वृत्तीस पोषकच आहे तुकाराम महाराजांच्या या विशेष अभंगाचा अर्थ दोन्ही प्रकारांनी लावता येण्या- सारखा आहे शिवबा व त्याचे स्वराज्यसाधनाचे कार्य व त्यासाठी तळहातावर शीर घेऊन निघालेले वीर सेवक, याच्या धैर्याचे व काहींच्या कुचराईचे वर्णन बुवांनी केले आहे हे सर्व वर्णन परमार्थाच्या मार्गावर निघालेल्या विठ्ठलाच्या वीर पुरुषानाही यथार्थपणे लागू पडते समोरील बाणाचा, तोफेच्या गोळ्याचा वर्षाव छाती पुढे करून झेलणे, शत्रूच्या चोरवाटा शोधणे, आपले शरीर गवताप्रमाणे क्षुल्लक मानणे, सुवर्ण दगडाप्रमाणे मानून वागणे, आपल्या गुणवत्तेने पाईकाचे सेवकाचा नाईक होणे, थोर प्रकारची सेवा, हेच खरे वतन मानणे, पाठीवर शत्रूचे घाव घेऊन पळून न येणे, सर्व धैर्य एकवटून शत्रूवर तुटून हल्ला करणे, ही सर्व खऱ्या पाईकाची लक्षणे तुकारामबुवांनी दिली आहेत ती पाहून यावेळी त्याच्या भोवती खरोखरच शिवबाचे शूरवीर शिपाई त्याची कथा ऐकण्यासाठी तत्पर झालेले असावेत असे वाटते तुकोबानी त्यांनाही स्वदेशकार्यासाठी उत्तेजित केले व आपल्या भक्तांनाही परमार्थमार्गात पाईकपणाचे महत्त्व काय आहे हे विशद करून सांगितले किंवा असेही असेल की, प्रत्येकाने जस परमार्थमार्गात निपुण असावे, तसच देशकार्याचीही त्यास जाणीव असावी हे दोन्ही मार्ग परस्पर दिसतात, तेवढे भिन्न नाहीत केवळ भक्तीमार्गी लोकांना व केवळ देशवीरांना उद्देशून प्रत्येकाच्या वर्गास उपयोगी पडेल असा उपदेश या अभंगात आहे, असे म्हणण्यापेक्षा सरमिसळ करून प्रत्येक माणसाने या दोनही अंगाचे महत्त्व समजावे अशीही कल्पना बुवाच्या मनात असेल ईश्वरप्राप्ती हेच जीविताचे ध्येय तुकारामादी साधुसंतानी मानले होते, हे खरे असले तरी त्याचे लक्ष भोवती असावे असे वाटून त्याचे परमार्थज्ञान एवढे संकुचित मानण्याचे काही कारण नाही त्याच्या आत्मज्ञानात सर्व विश्वाचा सामावेश होतो व त्यामुळे पीडलेल्या प्रजेच्या पारमार्थिक अराजकाने ते जसे कळवळून गेले, तसेच त्याचे ऐहिक दुर्दैवही त्याना पाहावले नाही दोघाची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यानी केला