भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

२९० श्रीदासबोध. [ दशक विस्कळित तेथें । एके अकलेविण तें । काय आहे ॥ २८ ॥ घालून अकलेचा पंवाड १ । व्हावें ब्रह्मांडाहून वाड २ । तेथें कैचें आणिलें द्वाड । करंटपण ॥२९॥ येथें आशंका फिटली । बुद्धि यत्नीं प्रवेशली । कांहीं एक आशा वाढली । अंतर्यामीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके यत्न- शिक्षानिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. उत्तमपुरुषनिदर्शन. श्रीगणेशाय नमः ॥ आपण यथेष्ट जेवणें । उरलें अन्न तें वांटणें । परंतु वायां दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥ तैसें ज्ञानें तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनांस सांगावें । तरतेनें बुडों न द्यावें । बुडतयासी ॥२॥ उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे । वर्तल्याविण बोलावें । ते शब्द मिथ्या ॥३॥ स्नान संध्या देवतार्चन । एकाग्र करावें जपध्यान । हरिकथा निरूपण । केलें पाहिजे ॥ ४ ॥ शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें । उणें पडों न द्यावें । कोणी एकाचें ॥ ५ ॥ अडलें गांजलें जाणावें । यथा- शक्ति कामास यावें । मृदुवचन बोलत जावें । कोणी एकासी ॥ ६ ॥ दुस- ऱ्याचे दुःखें दुःखी व्हावें । परसंतोषें सुखी व्हावें । प्राणिमात्रास मेळवून घ्यावें । बरव्या शब्दें ॥ ७ ॥ बहुतांचे अन्याय क्षमावे । बहुतांचे कार्यभाग करावे । आपल्यापरी व्हावे । पौरिखे ३ जन ॥ ८ ॥ दुसऱ्याचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें । लोकांस परीक्षीत जावें । नानाप्रकारें ॥ ९ ॥ नेम- केंचि बोलावें । तात्काळचि प्रतिवचन द्यावें । कदापि रागासि न यावें । क्षमारूपें ॥ १० ॥ आळस अवघाच दवडावा । यत्न उदंडचि करावा । शब्द- मत्सरें ४ न करावा । कोणी एकाचा ॥ ११ ॥ उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा । शब्द निवडून बोलावा । सावधपणें करीत जावा । संसार आपुला ॥ १२ ॥ मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीसी सादर व्हावें । मरोन कीर्तीस उर- वावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥ नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों आला । सर्व आर्जवी तयाला । काय उणें ॥ १४ ॥ ऐसा उत्तमगुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष । जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होय ॥ १५॥ उदंड १. विस्तार. २. मोठें. ३. परकी, दुसरे. ४. अर्थ न पाहतां शब्दवाद करणें.

१२ वा. ] उत्तमपुरुषनिदर्शन. २९१ धिक्कारून बोलती । तरी चळों न द्यावी शांती । दुर्जनासि मिळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥ उत्तम गुणीं शृंगारिला । ज्ञानवैराग्यें शोभला । तोचि एक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥ स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें सोशीत जावें । झिजोन कीर्तीसीं उरवावें । नानाप्रकारें ॥ १८ ॥ कीर्ति पाहूं जातां सुख नाहीं । सुख पाहतां कीर्ति नाहीं । विचारेंविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ १९ ॥ १परांतरास न लावावा धक्का । कदापि पडों न द्यावा चुका । क्षमाशील तयाच्या २तुकों । कोण नाहीं ॥ २० ॥ आपलें अ- थवा परावें । कार्य अवघेंचि करावें । प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित नव्हे ॥ २१ ॥ बरें बोलतां सुख वाटतें । हें तों प्रत्यक्ष कळतें । ३आत्मवत् परा- वें तें । मानीत जावें ॥ २२ ॥ कठिन शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें । तरी मग वाईट बोलावें तें । काय निमित्त ॥ २३ ॥ आपणास चि- मटा घेतला । तेणें कासावीस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखीत जावें ॥ २४ ॥ जे दुसऱ्यास दुःख करी । ते अपवित्र ४वैखरी । आपणास घात करी । कोणी एके प्रसंगीं ॥ २५ ॥ पेरीलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें । तरी मग कर्कश बोलावें तें । काय निमित्त ॥ २६ ॥ आपुल्या ५पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षसी क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणि कठिन वचन । हें अज्ञा- नाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥ जो उत्तमगुणें शोभला । तोचि पुरुष महा भला । कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥ क्रिये- विण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचें वमन । भले तेथें अवलोकन । कदापि न करिती ॥ ३० ॥ मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अगत्य धरणें । तया महापुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥ ऐसा जो ६महानुभाव । तेणें करा- वा समुदाय । भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥ आपण अवचितें मरून जावें । मग भजन कोणें करावें । या कारणें भजनास लावा- वे । बहुत लोक ॥ ३३ ॥ आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्या- सी । आपणा मागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥ या कारणें समुदा-


१. दुसऱ्याच्या अंतःकरणास. २. तुलनेस. ३. आपल्याप्रमाणें. ४. वाणी. ५. सामर्थ्यानें. ६. थोर प्रतापाचा पुरुष.

२९२ श्रीदासबोध. [ दशक व । झाला पाहिजे महोत्सव । हातोपातीं देवाधिदेव । वोळसा करावा ॥ ३५ ॥ आतां समुदायाकारणें । पाहिजेत दोन्ही लक्षणें । श्रोतीं येथें साव- धपणें । मन घालावें ॥ ३६ ॥ जेणें बहुतांस घडे भक्ती । ते हे रोकडी प्रबोधशक्ती । बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥ मागों बोलिले उत्तम गुण । तयांस मानिती प्रमाण । प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें चाले ॥ ३८ ॥ बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून बोलणें । तयांचीं वच- नें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥ जें जनासी मानेना । तें आपले न ये मना । आपण एकला जन नाना । सृष्टीमध्यें ॥ ४० ॥ म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिष्य करावे । हळू हळू शेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१ ॥ परंतु हीं विवेकाचीं कामें । विवेकी करतील नेमें । इतर ते बापुडे भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥ बहुतांसि भांडतां एकला । सैन्यावांचून पुरवला । या कारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके उत्तमपुरुषनिदर्शननिरूपणं नाम दशमः स- मासः ॥ १० ॥ ओंवी २९४. दशक तेरावा. १. आत्मानात्मविवेक. श्रीगणेशाय नमः ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा । विवरोन सदृढ धरावा । जीवामध्यें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण । त्यांचें करावें विवरण । तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ॥ २ ॥ चारी खाणी चारी वाणी । चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी । संख्या बोलिली पुराणीं । वर्तती आतां ॥ ३ ॥ नाना प्रकारचीं शरीरें । वर्ततां दिसती अपारें । तयां- मध्यें निर्धारें । आत्मा कवण ॥ ४ ॥ दृष्टीमध्यें पाहतो । श्रवणामध्यें ऐक- तो । रसनेमध्यें स्वाद घेतो । प्रत्यक्ष आतां ॥ ५ ॥ घ्राणामध्यें वास घेतो । सर्वांगीं तो स्पर्शतो । वाचेमध्यें बोलवितो । जाणोनि शब्द ॥ ६ ॥ सावधा- १. ताबडतोब. २. उपदेशशक्ति. ३. आत्मा कोण व अनात्मा कोण हा विचार.

१३ वा. ] आत्मानात्मविवेक. २९३ न आणि चंचळ । चहूंकडे चळवळ । एकलाचि चालवी सकळ । इंद्रियद्वारें ॥ ७ ॥ पाय चालवी हात हालवी । अुकुटी पालवी डोळा घालवी । संकेत खुणा बोलवी । तोचि आत्मा ॥ ८ ॥ धिटांवी लाजवी खाजवी । खोकवी ओकवी थुंकवी । अन्न जेवून उदक सेवी । तोचि आत्मा ॥ ९ ॥ मळमूत्र- त्याग करी । शरीर मात्र सांवरी । प्रवृत्ति निवृत्ति विवरी । तोचि आत्मा ॥ १० ॥ ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारें वोळखे । संतोष पावे आणि धोंके । तोचि आत्मा ॥ ११ ॥ आनंद विनोद उद्वेग चिंता । काया छाया माया ममता । आत्मत्वें पावे समता । तोचि आत्मा ॥ १२ ॥ पदार्थांची आस्था धरी । जनीं वाईट बरें करी । आपल्यां राखे पराय्यां मारी । तोचि आत्मा ॥ १३ ॥ युद्ध होतां दोन्हीकडे । नाना शरीरीं वावडे । परस्परीं पाडी पडे । तोचि आत्मा ॥ १४ ॥ तो येतो जातो देहीं वर्ततो । हांसतो [L

२९४ श्रीदासबोध. [ दशक वरी । ब्रह्मादि पिपीलिका देह धरी¹ । नित्यानित्यविवेक चतुरीं । जाणिजे ऐसा ॥ २७ ॥ जड तितुकें अनित्य । आणि सूक्ष्म तितुकें नित्य । यांहि मध्यें नित्यानित्य । पुढें निरूपिलें ॥ २८ ॥ स्थूल सूक्ष्म वोलांडिलें । कार- ण महाकारण सांडिलें । विराट हिरण्यगर्भ खांडिलें । विवेकानें ॥ २९ ॥ अव्याकृत मूळप्रकृती² । तेथें जाऊन बैसली वृत्ती । ते वृत्ती व्हावया निवृ- त्ती । निरूपण ऐका ॥ ३० ॥ आत्मानात्मविवेक बोलिला । चंचल आत्मा प्रत्यया आला । पुढिलिये समासीं निरूपिला । सारासारविचार ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके आत्मानात्मविवेकनिरू- पणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. सारासारविचार. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका सारासारविचार । उभारलें जगडंबर³ । त्यांत कोण सार कोण असार । विवेकें ओळखावें ॥ १ ॥ दिसेल तें नासेल । आ- णि येईल तें जाईल । जें असतांचि असेल । तेंचि सार ॥ २ ॥ मागां आ- त्मानात्मविवेक बोलिला । आत्मा वोळखून सांडिला । आत्मा जाणतां लागला । मुळींचा तंतू ॥ ३ ॥ मुळीं जे राहिली वृत्ती । ते झाली पाहिजे निवृत्ती । सारासारविचार श्रोतीं । बरा पहावा ॥ ४ ॥ नित्यानित्यविवेक केला । आत्मा नित्यसा निवडिला । निवृत्तिरूपें हेत उरला । निर्विकारीं ॥ ५ ॥ हेत म्हणजे तो चंचल । निर्गुण म्हणजे तें निश्चळ । सारासारवि- चारें चंचल । होऊन जातें ॥ ६ ॥ चले म्हणोनि तें चंचल । न चले म्हणो- नि निश्चळ । निश्चळीं उडे चंचल । निश्चयेंसी ॥ ७ ॥ ज्ञान आणि उपासना⁴ । दोन्ही एकचि पहाना । उपासनेकरितां जना । जगदुद्धार ॥ ८ ॥ द्रष्टा सा- क्षी जाणता । ज्ञानघन चैतन्य सत्ता । ज्ञान देवचि तत्वता । बरें पाहा ॥ ९ ॥ त्या ज्ञानाचें विज्ञान⁵ होतें । शोधून पाहावें बहुमतें । चंचल अवघें नासतें । येणेंप्रकारें ॥ १० ॥ नाशवंत नासेल कीं नासेना । ऐसें अनुमानाचि आहे । मना । तरी तो पुरुष सहसा ज्ञाना । अधिकारी नव्हे ॥ ११ ॥ नित्य नि- १. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व देह धारण करितो. २. माया, आदिशक्ति. ३. जगाचा पसारा. ४. भक्ति. ५. साक्षात्कार.

१३ वा. ] सारसारविचार. २९५ श्रय केला । संदेह उरतचि गेला । तरी तो जाणावा वाहवला । मायामृग- जळीं ॥ १२ ॥ क्षयचि नाहीं जो अक्षयी । व्यापकपणें सर्वो ठायीं । तेथें हेतु संदेह नाहीं । निर्विकारीं ॥ १३ ॥ जें उदंड घनदाट । आद्य मध्य शेवट । अचळ अढळ अतुट । जैसें तैसें ॥ १४ ॥ पाहतां जैसें गगन । गगनाहून तें सघन । जनचि नाहीं । निर्जन । सदोदित ॥ १५ ॥ चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तो अवघा पूर्वपक्ष । निर्गुण ठायींचें अलक्ष । लक्षवेना ॥ १६ ॥ संग- त्यागेंविण कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । संगत्याग करुनि पाही । मौनें- गर्भ ॥ १७ ॥ निरसितां अवघेंचि निरसिलें । चंचल तितुकें निघोन गेलें । निश्चळ परब्रह्म उरलें । तेंचि सार ॥ १८ ॥ आठवा देह मूळमाया । निरसो- नि गेल्या अष्टकाया । साधु सांगती उपाया । कृपाळूपणें ॥ १९ ॥ सोहहंस तत्वमसी । तें तूं ब्रह्म आहेसी । विचार पाहतां स्थिति ऐसी । सहजाचि होते ॥ २० ॥ साधक असोन ब्रह्म उरलें । तेथें वृत्तिशून्य झालें । सारासार विचारिलें । येणें प्रकारें ॥ २१ ॥ तें तापेना ना निवेना । तें उजळेना ना काळवंडेना । ढहुळेना ना वितळेना । परब्रह्म तें ॥ २२ ॥ तें भिजेना ना वाळेना । तें विझेना ना जळेना । जयास कोणीच नेईना । परब्रह्म तें ॥ २३ ॥ दिसेना ना भासेना । उपजेना ना नासेना । तें येईना ना जाईना । परब्रह्म तें ॥ २४ ॥ जें सन्मुखचि चहूंकडे । जेथें दृश्यभास उडे । धन्य साधु तो पेंहुडे । निर्विकारीं ॥२५॥ निर्विकल्प कल्पनातीत । तोचि ओख- खावा संत । येर अवघेंचि असंत । भ्रमरूप ॥ २६ ॥ खोटें सांडून खरें घ्यावें । तरीच परीक्षवंत म्हणावें । असार सांडून सार घ्यावें । परब्रह्म तें ॥ २७ ॥ जाणतां जाणतां जाणीव जाते । आपली वृत्ती तद्रूप होते । आत्म- निवेदनी भक्ती ते । ऐसी आहे ॥ २८ ॥ वाच्यांशें मुक्ति मुक्ति बोलावी । लक्ष्यांशें तद्रूपता विवरावी । विवरितां हेतु नुरवी । ते तद्रूपता ॥ २९ ॥ सद्रूप चिद्रूप आणि तद्रूपं । स्वरूप म्हणिजे आपुलें रूप । आपलें रूप म्ह- णिजे अरूप । तत्त्वनिरसना उपरी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसं- वादे त्रयोदशदशके सारसारविचारनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ १. अखंड. २. निर्जन. ३. निरास होणारा विचार. ४. शब्दरहित ब्रह्म. ५. विश्रांति घेतो. ६. क्षणभंगुर. ७. नित्य. ८. ज्ञानरूप. ९. एकरूप.

२९६ श्रीदासबोध. [ दशक ३. उभारणी. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहूनि विशाल । निर्मळ आणि निश्चळ । निर्विकारी ॥ १ ॥ ऐसें असतां कित्येक काळ । तेथें आरंभिला भूगोल । तया भूगोळाचें मूळ । सावध ऐका ॥ २ ॥ परब्रम्ह असतां निश्चळ । तेथें संकल्प उठिला चंचल । तयास बोलिजे केवळ । आदिनारायण ॥ ३ ॥ मूळमाया जगदीश्वर । त्यासि म्हणिजे षड्गुणेश्वर । अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥ ऐलीकडे गुणक्षोभिणी १ । तेथें जन्म घेतला त्रिगुणीं । मूळ ओंकाराची मांडणी । तेथूनि जाणावी ॥ ५ ॥ अकार उकार मकार । तिन्ही मिळोन ओंकार । पुढें पंचभूतांचा विस्तार । विस्तारला ॥ ६ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्म्यासी । तयापासोनि जन्म वायूसी । तया वायूपासून तेजासी । जन्म जाहला ॥ ७ ॥ वायूचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे । सूर्यबिंब तें प्रगटे । तथें ठायीं ॥ ८ ॥ वारा वाजतो शीतल । तेथें निर्माण झालें जल । तें जल आळोनि भूगोल । निर्माण झाला ॥ ९ ॥ त्या भूगोळाचे पोटीं । अनंत बीजांचिया कोटी । पृथ्वीपाण्या होतां भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥ पृथ्वीवरी वल्ली नानारंग । पत्र पुष्पांचे तरंग । नाना स्वाद तेथें मग । फलें जाहलीं ॥ ११ ॥ पत्रें पुष्पें फलें मूळें । नाना वर्ण नाना रसाळें । नाना धान्यें अन्नं केवळें । तेथून जाहलीं ॥ १२ ॥ अन्नापासुनि झालें रेत । रेतापासून प्राणी निपजत । ऐसी हे रोकडी प्रचीत २ । उत्पत्तीची ॥ १३ ॥ अंडज जारज स्वेदज उद्भिज । पृथ्वी पाणी सकळांचें बीज । ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥ चारी खाणी चारी वाणी । चौऱ्यायंशी लक्ष जीवयोनी । निर्माण झाले लोक तिन्ही । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥ मुळीं अष्टधा प्रकृती । अवघे पाण्यापासून जन्मती । पाणी नसतां मरती । सकळ प्राणी ॥ १६ ॥ नव्हे अनुमानाचें बोलणें । याचा बरा प्रत्यय घेणें । वेद शास्त्रे पुराणे । प्रत्ययें घ्यावी ॥ १७ ॥ जें आपल्या प्रत्यया येईना । तें अनुमानिक घ्यावें ना । प्रत्ययेंविण सकळ जना । व्यवसाय नाहीं ॥ १८ ॥ व्यवसाय प्रवृत्ति निवृत्ति । दोहोंकडे पाहिजे प्रचीती । प्रचीतीविण अनुमानें असती । ते विवेकहीन ॥ १९ ॥ ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकलित ३

१. त्रिगुणांना प्रगट करणारी. २. निश्चितपणा. ३. संक्षेपानें.

१३ वा.] प्रलय. २९७ बोलिला प्रकार । आतां विस्ताराचा संहार । तोही ऐका ॥ २० ॥ मुळा- पासून शेवटवरी । अवघा अंतरात्माचि करी । करी आणि विवरी । यथा- योग्य ॥ २१॥ पुढें संहार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला । इतुक्त्या उपरी झाला । समास पूर्ण ॥ २२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके उभारणीनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. प्रलय. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत । ऐसा समाचार साद्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥ शतवर्ष अनावृष्टी । तेणें जळेल हे सृष्टी । पर्वत माती ऐसी पृष्ठी² । भूमीची तडके ॥ २ ॥ बारा कळीं सूर्यमंडळा । किरणापासूनी निघती ज्वाळा । शत वर्षें भूगोळा । दहन होय ॥ ३ ॥ सिंदूरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरां³ । तो आहोंळोन⁴ सरारां । विष वमी ॥ ४ ॥ त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें पाताळें जळती । महापावकें⁵ भस्म होती । पाताळलोक ॥ ५ ॥ तेथें महा- भूतें खवळती । प्रलयवात सुटती । प्रलयपावक वाढती । चहूकडे ॥ ६ ॥ तेथें अक्रा रुद्र खवळले । बारां⁶ सूर्य कडाडिले । पावकमात्र एकवटिले । प्रलयकाळीं ॥ ७ ॥ वायु विजांचे तडाके । तेथें पृथ्वी अवघीच तडके । कठिनत्व अवघेंचि फांके । चहूकडे ॥ ८ ॥ तेथें मेरूची कोण गणना । कोण सांभाळील कोणा । चंद्र सूर्य तारागणा । मूस जाहली ॥ ९ ॥ पृथ्वीनें विरी⁷ सांडिली । अवघी धगधगायमान झाली । ब्रह्मांडभट्टी जळोन गेली । एकसरा ॥ १० ॥ जळानें विरी⁷ सांडिली । विशेष महावृष्टि झाली । तेणें पृथ्वी मिळाली । जळामध्यें ॥ ११ ॥ भाजला चुना जळीं विरे । तैसा पृथ्वीस धीर न धरे । विरी सांडूनियां त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥ शेष कूर्म वराह गेला । पृथ्वीचा आधार तुटला । सैंधव सांडून जळाला । मिळोन गेली ॥ १३ ॥ तेथें प्रलयमेघ उचलले । कठिन घोरें गर्जिन्नले । अखंड १. नासतील. २. पृष्ठभाग. ३. शेषाला. ४. पोळून जाऊन ५. प्रलयाग्नीनें. ६. मित्र, रवि, सूर्य, भानु, खग, पूषा, हिरण्यगर्भ, मरीचि, आदित्य, सविता, अर्क, व भास्कर हे बारा सूर्य. ७. शक्ति, जिवटपणा.

विजा कडकडिले । ध्वनि घोष ॥ १४ ॥ पर्वतप्राय पडती गारा । पर्वत उडती ऐसा वारा । निबिड तया अंधकारा । उपमाच नाहीं ॥ १५ ॥ सिंधु नद्या एकवटल्या । भेणें नभींहूनि रिचवल्या । संधी नाहीं धारा मिळाल्या अखंड पाणी ॥ १६ ॥ तेथें मत्स्य कूर्म सर्प पडती । पर्वतासारखे दिसती गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥ सप्त सिंधु आवरणीं गेले आवरण वेढे मोकळे झाले । जळरूप झालिया खवळले । प्रलयपावक ॥ १८ ॥ ब्रह्मांडा ऐसा तप्त लोहो । शोषी जलाचा समूहो । तैसें जळ झालें पाहो । अपूर्व मोठें ॥ १९ ॥ तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य माजला वन्ही । तया वन्हीस केली झडपणी । प्रलयवातें ॥ २० ॥ दीपासी पालवें घातला । तैसा प्रलयपावक विझाला । पुढें वायु प्रबळला । असं- भाव्य ॥ २१ ॥ उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा । पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥ महद्भूत मूळमाया । विस्मरणें वितुळे काया । पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं ॥ २३ ॥ दृश्य हलक- ल्लोळें नेलें । जड चंचळ वितुळलें । या उपरि शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रलयनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. काहाणी. श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन । कालक्रमणे लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥ श्रोता पुसे वक्तयासी । का- हणी सांगा बरवीसी । वक्ता म्हण श्रोतयांसी । सावध ऐका ॥ २ ॥ एक स्त्रीपुरुषें होतीं । उभयतांमध्ये बहु प्रीती । एकरूपेंचि वर्तती । भिन्न नाहीं ॥ ३ ॥ ऐसा कांहींएक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता आणी भला । सर्वविषयीं ॥ ४ ॥ पुढें त्यासही झाला कुमर् । तो पित्याहून आतुर । कांहीं तदर्थ चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥ तेणें व्याप उदंड केला । बहुत कन्या पुत्र व्याला । उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥ त्याचा १. ओतल्या. २. फुंकर. ३. हाहाकारें. ४. प्रकृति व पुरुष. ५. सत्वगुण; विष्णु. ६. रजोगुण; ब्रह्मा. ७. चंचल. ८. बापाच्या निमे. ९. कर्तृत्वानें.

पुत्र जो ज्येष्ठ¹. तो अज्ञान आणि रागीट । अथवा चुकतां नीट । संहार करी ॥ ७ ॥ पिता² उगाच बैसला । लेकें³ बहुत व्याप केला । सर्व जाणता भला । ज्येष्ठ पुत्र⁴ ॥ ८ ॥ नातू त्याचें अर्थ जाणे । पणतूं तो कांहींच नेणे । चुकतांचि संहारणें । महाक्रोधी ॥ ९ ॥ लेंकें सकळांचें पाळण करी । नातू मेळवी वरच्या⁵वरी । पणतूं चुकल्या संहार करी । अकस्मात ॥ १० ॥ नेम- स्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि झाला । ऐसा बहुत काळ गेला । आनंदरूप ॥ ११ ॥ विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानीना । परस्परें किंतु मना । बहुत पडिले ॥ १२ ॥ उदंड घरकलह लागला । तेणें कित्येक संहार झाला । विपर्त⁶ पडिलें थोर थोरांला । बेबंद जाहलें ॥ १३ ॥ नेणपणें भरीं भरले । मग ते अवघे संहारले । जैसे यादव निमाले । उन्मत्त- पणें ॥ १४ ॥ बाप लेंकें नातू पणतूं । सकळांचा झाला निःपातु । कन्यापुत्र हेतुमातू⁷ । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥ ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्म- मृत्युपासून सुटला । श्रोता वक्ता धन्य झाला । प्रचीतीनें ॥ १६ ॥ ऐसी काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होते जाते । इतुकें बोलून गोसावी ते । निवांत जाहले ॥ १७ ॥ आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो । ऐसें हें बोलणें विवरो । कोणी तरी ॥ १८ ॥ चुकत वाकत आठवलें । तितुकें संकाळित बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥ ऐसी काहाणी निरंतर । विवेकें ऐकती नर । दास म्हणे जगदुद्धार । तेचि करिती ॥ २० ॥ त्या जगदुद्धाराचें लक्षण । केलें पाहिजे विवरण । सार निवडावें निरूपण । यासी बोलिजे ॥ २१ ॥ निरूपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्व- कोडें उकलावें । समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥ विवरोन पाहतां अष्टदेह । पुढें सहजाचि निःसंदेह । अखंड निरूपणें राहे । समाधान ॥ २३ ॥ तत्त्वांचा गलबला जेथें । निवांत कैसें असेल तेथें । या कारणें गुलि⁸- परतें । कोणी एकें असावें ॥ २४ ॥ ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद । पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके काहाणीनिरूपणं नाम पंचम समासः ॥ ५ ॥ १. तमोगुण; शंकर. २. मूळ पुरुष. ३. सत्त्वगुण; विष्णु. ४. रजोगुण; ब्रम्हा. ५. पुनःपुन्हा. ६. वांकडें. ७. कन्यापुत्रांचा हेतु किंवा गोष्ट. ८. गलबल्यापासून दूर.

३०० श्रीदासबोध. [ दशक ६. लघुबोध. श्रीगणेशाय नमः ॥ जे जे बोलिजेती पंचतत्त्वें । त्यांचीं अभ्यासावीं नांवें । तदुपरी स्वानुभवें । रूपें जाणावीं ॥ १ ॥ यामध्यें शाश्वत कोण । आणि अशाश्वत कोण । ऐसें करावें विवरण । प्रत्ययाचें ॥ २ ॥ पंचभूतांचा विचार । नांव रूप सारासार । तोचि बोलिजेल निर्धार । सावध ऐका ॥३॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । नांवें बोलिलीं सावकाश । आतां रूपाचा विश्वास । श्रवण करावा ॥ ४ ॥ पृथ्वी म्हणिजे ते धरणी । आप म्हणिजे तें पाणी । तेज म्हणिजे अग्नि तरणी² । सतेजादिक ॥ ५ ॥ वायु म्हणिजे तो वारा । आकाश म्हणिजे पैस सारा । आतां शाश्वत तें विचारा । आपुले मनीं ॥ ६ ॥ एक शीत चांचपावें । म्हणिजे वर्म पडे ठावें । तैसें थोडया अनुभवें । बहुत जाणावें ॥ ७ ॥ पृथ्वी रचते आणि खचते । हें तों प्रत्य- यास येतें । नाना रचना होत जाते । सृष्टीमध्यें ॥ ८ ॥ म्हणोन रचतें तें खचतें । आप तेंहि आटोन जातें । तेजहि प्रगटोन विझतें । वारेंही न राहे ॥ ९ ॥ अवकाश नाममात्र आहे । तेंहि विचारितां न राहे । एवं पांच- भौतिक राहे । हें तों घडेना ॥ १० ॥ ऐसा पांच भूतांचा विस्तार । नाश- वंत हा निर्धार । शाश्वत आत्मा निराकार । सत्य जाणावा ॥ ११ ॥ तो आत्मा कोणास कळेना । ज्ञानेंविण आकळेना । म्हणोनिया संतजनां । वि- चारावें ॥ १२ ॥ विचारितां सज्जनांसी । ते म्हणती कीं अविनाशी । जन्म मृत्यु आत्मयासी । बोलोंच नये ॥ १३ ॥ निराकारीं भासे आकार । आणि आकारीं भासे निराकार । निराकार आणि आकार । विवेकें ओळखावा ॥ १४ ॥ निराकार म्हणावा नित्य । आकार म्हणावा अनित्य । यासि बो- लिजे नित्यानित्य । विचारणा ॥ १५ ॥ सारीं भासे असार । आणि असारीं भासे सार । सारासार विचार । शोधून पाहतां ॥ १६ ॥ पांचभौतिक तें मा- यिक । परंतु भासे अनेक । आणि आत्मा एक । व्यापून असे ॥ १७ ॥ चहूं भूतांमध्ये गगन । तैसें गगनीं असे सघन³ । नेहैटून⁴ पाहतां अभिन्न⁵ । गगन आणि वस्तु ॥ १८॥ उपाधियोगेंचि आकाश । उपाधि नसतां निराभास । निरा-- १ शिंगणवाडी येथे शिवाजी महाराजांस श्रीसमर्थांनीं हा उपदेश केला, असें म्हणतात. २. सूर्य. ३. दाट. ४. बारकाईनें. ५. एकच.

१३ वा. ] प्रत्यय. ३०१ भास तें अविनाश । तैसें गगन ॥ १९ ॥ आतां असो हे विवंचना । परंतु जें पाहतां नासेना । तगे तेंचि अनुमाना । विवेकें आणावें ॥ २० ॥ परमात्मा तो निराकार । जाणिजे हाचि विचारसार । आणि आपण कोण हा विचार । पाहिला पाहिजे ॥ २१ ॥ देहास अंत येतां । वायु जातो तत्वतां । लटिकें म्हणाल तरी आतां । श्वासोच्छ्वास धरावा ॥ २२ ॥ श्वास कोंडतां देह पडे । देह पडतां म्हणती मडें । मड्यास कर्तव्य न घडे । कदाकाळीं ॥ २३ ॥ देहावेगळा वायु न करी । वायुवेगळा देह न धरी । विचार पाहतां कांहींच न करी । एका वेगळें एक ॥ २४ ॥ उगेंच पाहतां मनुष्य दिसे । विचार घेतां कांहींच नसे । अभेदभक्तीचें लक्षण ऐसें । ओळखावें ॥ २५ ॥ कर्ता आपण ऐसें म्हणावें । तरी आपले इच्छेसारिखें व्हावें । इच्छेसारिखें न होतां मानावें । अवघेंचि वाव ॥ २६ ॥ म्हणोन कर्ता नव्हे कीं आपण । तेथें भोक्ता कैंचा कोण । हेंचि विचाराचें लक्षण । अविचारें न घडे ॥ २७ ॥ अविचार आणि विचार । जैसा प्रकाश आणि अंधकार । विकार आणि निर्विकार । एक नव्हे कीं ॥ २८ ॥ जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच चालेना । खरें तेंचि अनुमाना । कदा न ये ॥ २९ ॥ प्रत्ययासि बोलिजे न्याय । अप्रत्यय तो अन्याय । जात्यंधास१ परीक्षा काय । नाना रत्नांची ॥ ३० ॥ म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणासि अनन्य । आत्मनिवेदनें मान्य । परम पुरुष ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके लघु- बोधनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. प्रत्यय. श्रीगणेशाय नमः ॥ निर्मळ निश्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश । आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥ आधीं पैस मग पदार्थ । प्रत्यक्ष पाहतां यथार्थ । प्रत्यक्षेविण पाहतां व्यर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥ ब्रह्म म्हणिजे तें निश्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचल । तयास दृष्टांत के- वळ । वायु जाणावा ॥ ३ ॥ घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटीं बिंब दृष्टांत आत्म्याचा । विवरितां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥ भूत म्हणिजे जि- १. जन्मांधास. २. देहसमर्पण केल्यानें.

३०२ श्रीदासबोध. [ दशक तुकें झालें । झालें तितुकें निमालें । चंचळ आलें आणि गेलें । ऐसें जाणावें ॥ ५ ॥ अविद्या जड आत्मा चंचळ । जड कर्पूर आत्मा अनळ । दोन्ही ज- ळोन तात्काळ । विझोन जाती ॥ ६ ॥ ब्रह्म आकाश निश्चळ जाती । आत्मा वायु चंचळ जाती । परीक्षवंत परीक्षिती । खरें कीं खोटें ॥ ७ ॥ जड अ- नेक आत्मा एक । ऐसा आत्मानात्मविवेक । जगा वर्तवी जगन्नायक । तयास म्हणावें ॥ ८ ॥ जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वी वर्ते सर्वात्मा । अवघा मिळोन चंचळ आत्मा । निश्चळ नव्हे ॥ ९ ॥ निश्चळ तें परब्रह्म । तेथें नाहीं दृश्यभान । विमळ ब्रह्म तें निर्भ्रम । जैसें तैसें ॥ १० ॥ आधीं आत्मानात्मविवेक थोर । मग सारासारविचार । सारासारविचारें संहार । प्रकृतीचा ॥ ११ ॥ विचारें प्रकृति संहारे । दृश्य असतांच वोसरे । अंत- रात्मा निर्गुणीं संचरे । अध्यात्मश्रवणें ॥ १२ ॥ चढता अर्थ लागला । तरी अंतरात्मा चढतचि गेला । उतरल्या अर्थे उतरला । भूमंडळीं ॥ १३ ॥ अर्थासारिखा आत्मा होतो । जिकडे नेला तिकडे जातो । अनुमानें संदेहीं पडतो । कांहीं एक ॥ १४ ॥ निःसंदेह अर्थ चालिला । तरी आत्मा निः- संदेहचि झाला । अनुमान अर्थे झाला । अनुमानरूपी ॥ १५ ॥ नवरसिकं अर्थ चाले । श्रोते तद्रूपचि झाले । चाटपणें होऊन गेले । चाटाचि अवघे ॥ १६ ॥ जैसा जैसा पडे प्रसंग । तैसे गुहिऱ्यांचे रंग । या कारणें उत्तम मार्ग पाहोन । धरावा ॥ १७ ॥ उत्तम अन्नें बोलत गेले । तरी मन अन्नाका- रचि झालें । लावण्य वनितेचें वर्णिलें । तरी मन तेथेंचि बैसे ॥ १८ ॥ पदार्थ- वर्णन आवघें । किती म्हणोन सांगावें । परंतु अंतरीं समजावें । होय कीं नव्हे ॥ १९ ॥ जें जें देखिलें आणि ऐकिलें । तें अंतरीं सदृढ बैसलें । हित अनहित परीक्षिलें । परीक्षवंतीं ॥ २० ॥ या कारणें सर्व सांडावें । एक दे- वास धुंडावें । तरी वर्म पडे ठावें । कांहीं एक ॥ २१ ॥ नाना सुखें देवें केलीं । लोकें तयास चुकलीं । ऐसीं चुकतांच मेलीं । जन्मवरी ॥ २२ ॥ सर्व सांडून शोधा मजला । ऐसा देवचि बोलिला । लोकीं शब्द अमान्य केला । भगवंताचा ॥ २३ ॥ म्हणोनि नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती । मनीं सुखचि इच्छिती । परी तें कैंचें ॥ २४ ॥ उदंड सुख जया

१ . सरड्याचे. २. 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज'-गीता, अ. १८.

१३ वा.] कर्तूलक्षण. ३०३ लांगलें । वेडे तयास चुकले । सुख सुख म्हणतांच मेले । दुःख भोगीत ॥ २५ ॥ शाहण्यानें ऐसें न करावें । सुख होय तेंचि करावें । देवास धुं- डीत जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥ मुख्य देवचि ठायीं पडला । मग काय उणें तयाला । लोक वेडे विवेकाला । सांडूनि जाती ॥ २७॥ विवेकाचें फळ तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख । यांत मानेल तें अवश्य । केलें पा- हिजे ॥ २८ ॥ कत्यांसि ओळखावें । यासि विवेक म्हणावें । विवक सां- डितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥ आतां असो हें बोलणें । कत्यांस ओळ- खणें । आपलें हित विचक्षणें २ । चुकों नये ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रत्ययनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. कर्तृलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । कोण कर्ता निश्चयेंसी । सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥ तंव बोलिले सभानायक । जे बोलिके एकाहून एक । या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर परिसावें ॥ २॥ एक म्हणती कर्ता देव । एक म्हणती कोण देव । आपुलाला अभिप्राय । सृष्टीमध्यें बोलती ॥ ३ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थे बोलती स्पष्ट । आपुलाली उपासना ३ श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४॥ कोणी एक ऐसें म्हणती । कर्ता देव मंगळमूर्ती ४ । एक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥ एक म्ह- णती कर्ता भैरव । एक म्हणती खंडेराव । एक म्हणती बरिदेव । एक म्हणती भगवती ॥ ६ ॥ एक म्हणती नरहरी । एक म्हणती बनशंकरी । एक म्हणती सर्व करी । नारायण ॥ ७ ॥ एक म्हणती श्रीराम कर्ता । एक म्ह- णती श्रीकृष्ण कर्ता । एक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥ एक म्हणती पांडुरंग । एक म्हणती श्रीरंग । एक म्हणती झोटिंग । सर्व करी ॥ ९ ॥ एक म्हणती मुंज्या कर्ता । एक म्हणती सूर्य कर्ता । एक म्हणती अग्नि कर्ता । सर्व कांहीं ॥ १० ॥ एक म्हणती लक्ष्मी करी । एक म्हणती मारुती करी । एक म्हणती धरित्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥ एक म्हणती तुकाई । एक म्हणती यमाई । एक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥ १. वृक्षाला फळें लागतात तसें. २. शहाण्यानें. ३. उपास्य दैवत. ४. गणपती.

एक म्हणती भार्गव कर्ता । एक म्हणती वामन कर्ता । एक म्हणती पर- मात्मा कर्ता । एकाचि आहे ॥ १३ ॥ एक म्हणती विरंणी कर्ता । एक म्ह- णती बस्र्वणी कर्ता । एक म्हणती रेवंणी कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥ एक म्हणती रवळैया कर्ता । एक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता । एक म्हणती व्यं- कटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥ एक म्हणती गुरु कर्ता । एक म्हणती दत्त कर्ता । एक म्हणती मुख्य कर्ता । वोढैया जगन्नाथ ॥ १६ ॥ एक म्हणती ब्रह्मा कर्ता । एक म्हणती विष्णु कर्ता । एक म्हणती महेश कर्ता । निश्च- येंसी ॥ १७ ॥ एक म्हणती पर्जन्य कर्ता । एक म्हणती वायु कर्ता । एक म्हणती करून अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥ एक म्हणती माया करी । एक म्हणती जीव करी । एक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥ एक म्हणती प्रयत्न करी । एक म्हणती स्वभाव करी । एक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥ ऐसा कत्यांचा विचार । पुसतां भरला बाजार । आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥ जिहीं जो देव मानिला । कर्ता म्ह- णती तयाला । ऐसा लोकांचा गलबला । बोसरेना ॥ २२ ॥ आपुलाल्या साभिमानें । निश्चय केला मनें । याचा विचार पाहणें । घडेचिना ॥ २३ ॥ बहुत लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार । परंतु याचा विचार । ऐसा आहे ॥ २४ ॥ श्रोतीं व्हावें सावधान । निश्चयें तोडावें अनुमान । प्रत्ययें मानावें प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥ जें जें कर्त्यानें केलें । तें तें त्या उपरी झालें । कर्त्या पूर्वी आढळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥ केलें तें पांच- भौतिक । आणि पांचभौतिक ब्रह्मादिक । तरी भूतांशीं पांचभौतिक । केलें तें घडेना ॥ २७ ॥ पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें । पां- चभौतिक स्वभावें । कर्त्यांत आलें ॥ २८ ॥ पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें नाहीं कर्तेपण । निर्विकारासि विकार कोण । लावूं शके ॥ २९ ॥ निर्गुणास कर्तव्य न घडे । सगुण झाल्यांत सांपडे । आतां कर्तव्यता कोणीकडे । पडे पाहा ॥ ३० ॥ लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण । म्हणोन हें प्रमाण । जें स्वभावेंचि जाहलें ॥ ३१ ॥ एक सगुण एक निर्गुण । कोठें लावूं कर्तेपण । या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥ सगुणें सगुण केलें । तरी


१. जैन लोकांचे देव. २. कोंकणांतील एक दैवत. ४. ओढ्या प्रांतांतील.

१३ वा. ] आत्मविवरण. ३०५ तें पूर्वींच आहे झालें । निर्गुणास कर्तव्य लाविलें । न वचे कदा ॥ ३३ ॥ येथें कर्ता दिसेना । प्रत्यय आणावा अनुमाना । दृश्य सत्यत्वें असेना । म्हणोनियां ॥ ३४ ॥ केलें तें अवघेंचि लटिकें । तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें । वक्ता म्हणे रे विवेकें । बरें पाहा ॥ ३५ ॥ बरें पाहातां प्रत्यय आला । तरी कां करावा गलबला । प्रचीत आलिया आपणाला । अंतर्यामीं ॥ ३६ ॥ आतां असो हें बोलणें । विवेकी तोचि हें जाणे । पूर्वपक्ष¹ लागे उडवणें । येन्हवीं अनिर्वाच्य ॥ ३७ ॥ तंव श्रोता करी प्रश्न । देहीं सुखदुःख भोक्ता कोण । पुढें हेंचि निरूपण । बोलिलें असे ॥ ३८ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके कर्तृलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥

९. आत्मविवरण. श्रीगणेशाय नमः ॥ आत्म्यास शरीरयोगें । उद्वेग चिंता करणें लागे । शरीरयोगें आत्मा तगे । हें तों प्रगटचि आहे ॥ १ ॥ देह अन्नाचिखाईना । तरी आत्मा कदापि तगेना । आत्म्याविण चेतना । देहास कैंची ॥ २ ॥ हें एका वेगळें एक । करूं जातां निरर्थक । उभययोगें कोणी एक । कार्य चाले ॥ ३ ॥ देहाला नाहीं चेतना । आत्म्यास पदार्थ उचलेना । स्वप्न- भोजनें भरेना । पोट कांहीं ॥ ४ ॥ आत्मा स्वप्न अवस्थेंत जातो । परंतु देहामध्येंहि असतो । निदसुरेपेंणें² खाजवितो । चमत्कार पाहा ॥ ५ ॥ अन्न- रसें वाढे शरीर । शरीराप्रमाणें विचार । वृद्धपणीं तदनंतर । दोन्ही लहा- नाळती³ ॥ ६ ॥ उन्मत्तें⁴ द्रव्यें देह खातो । देहयोगें आत्मा झुलतो । विस्म- रणें शुद्धि सांडितो । सकळ कांहीं ॥ ७ ॥ देहानें घेतलें विष । आत्मा जाय सावकाश । वाढणें मोडणें आत्म्यास । नेमस्त आहे ॥ ८ ॥ वाढणें मो- डणें जाणें येणें । सुखदुःख देहाचेनि गुणें । नाना प्रकारें भोगणें । आत्म- यासि घडे ॥ ९ ॥ वारूळ म्हणिजे पोकळ । मुंग्यांचे मार्गचि सकळ । तैसें- चि हें केवळ । शरीर जाणावें ॥ १० ॥ शरीर नाडीचा खेटा⁵ । नाडीमध्यें पोकळ वाटा । लहान थोर सगटा । दाटल्या नाडी ॥ ११ ॥ प्राणी अन्नोदक घेतो । त्यांचा अन्नरस होतो । त्यास वायु प्रवर्ततो । श्वासोच्छ्वासें ॥ १२ ॥

१. शंका. २. झोपेंत. ३. क्षीण होतात. ४. मादक पदार्थ. ५. खँचाखँच.

३०६ श्रीदासबोध. [ दशक नाडीद्वारा धांवे जीवनै । जीवनामध्ये खेले पवनै । त्या पवनासरिसा जाण । आत्माहि विचैरै ॥ १३ ॥ तृषेनें शोषलें शरीर । आत्म्यास कळे हा वि- चार । मग उठोन धांवे शरीर । उदकाकडे ॥ १४ ॥ उदक मागे शब्द बो- लवी । मार्ग पाहाेन शरीर चालवी । शरीर अवघेंच हालवी । प्रसंगानुसार ॥ १५ ॥ क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहाला उठवितो । अचावाचा बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥ बायकोस म्हणे झालें झालें । देह साँ- वळें करुनि आणिलें । पायांत भरोनं चालविलें । तांतडी तांतडी ॥ १७ ॥ त्यास पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरौन पात्र पाहिलें । हातांकरवीं आरंभिलें । आपोशन ॥१८॥ हातांकरवीं ग्रास उचलवी । मुखीं जाऊनि मुख पसरवी। दांतांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥१९॥ आपण जिव्हेमध्यें खेले। पाहतो परिमळ सोहळे । केश काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥ अळणी कळतां मीठ मागे । बावलेस म्हणे अगे कांगे । डोळे तापून पाहों लागे । रागें रागें ॥२१॥ गोडी लागतांच आनंदे । गोडी नसतां परम खेदे । वांकडी गोष्टी अंतरीं भेदे । आत्मयासी ॥ २२॥ नाना अन्नांची गोडी । नाना रसस्वाद निवडी । तिखट लागतांच मस्तक झाडी । आणि खोंकी ॥ २३ ॥ मिरपुडी घातली फार । कायसें करितें खापर । जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें ॥ २४ ॥ आज उदंड जेविला । सर्वैच तांब्या उछलिला । घळघळां घेऊं लागला । सावकाश ॥ २५॥ देहीं सुखदुःख भोक्ता । तो एक आत्माचि पाहतां । आत्म्याविण देह वृथा । मडें होय ॥ २६ ॥ मनाच्या अनंत वृत्ती । जाणणें तेचि आत्मस्थिती । त्रैलोकीं जितुक्या व्यक्ती । तदंतरीं आत्मा ॥ २७ ॥ जगामध्यें जगदात्मा । विश्वामध्यें विश्वात्मा । सर्व चालवी सर्वा- त्मा । नाना रूपें ॥ २८ ॥ हुंगे चाखे देखे ऐके । मृदु कठिण वोळखे । शीत उष्ण ठाउकें । तात्काळ होय ॥ २९ ॥ सावधपणें लाघैवी । बहुत करी उ- ठाठेवी । या धूर्तांच्या उर्गवी । धूर्ताच करी ॥ ३० ॥ वायूसरिसा परिमळु येतो । परी तो परिमळ वितळोन जातो । वायु धुळी घेऊन येतो । परी तोहि जाय ॥३१॥ शीत उष्ण वायूसरिसें । सुवासें अथवा कुवासें । असिजे परी सावकाशें । तगणें न घडे ॥ ३२ ॥ वायूसरिसे रोग येती । वायूस-


१. पाणी. २. वायु. ३. वावरतो. ४. आत्मस्वरूप. ५. चतुर. ६. उलगडा.

१३ वा. ] बोध. ३०७ रसीं भूतें धांवती । धूर आणि धुकट येती । वायूसवें ॥ ३३ ॥ वायूसवें कां- हींच जगेना । आत्म्यासवें वायु तगेना । आत्म्याची चपळता जाणा । अधि- क आहे ॥ ३४ ॥ वायु कठिणास अडतो । आत्मा कठिणास भेदून जातो । कठिण पाहीं तरी तो । छेद नाहीं ॥ ३५ ॥ वायु झडझडां वाजे । आत्मा कांहींच न वाजे । मौनेंचि अंतरीं समजे । विवरोन पाहतां ॥ ३६ ॥ शरी- रास बरें केलें । तें आत्मयासि पावलें । शरीरयोगें झालें । समाधान ॥ ३७ ॥ देहावेगळे उपाय नाना । करितां आत्म्यास पावेना । समाधान पावे वास- ना । देहाचेनी ॥ ३८ ॥ देहआत्म्यांचें कौतुक । पाहों जातां अनेक । देहा- वेगळी आडणुक । आत्म्यास होय ॥ ३९ ॥ एक असतां उदंड घडे । वेगळें पाहतां कांहींच न घडे । विवेक त्रैलोकीं पवाडे । देहात्मयोगें ॥ ४

३०८ श्रीदासबोध. [ दशक नव्हे काय । परी तें खोटें ॥ ११ ॥ पुण्यात्मा आणि पापात्मा । दोहोंकडे अंतरात्मा । साधु भोंदू सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥ अंतर एक तों खरें । परी सांगातें घेऊं नयेती माहारें । पंडित आणि चाट पोरें । एक कैसीं ॥ १३ ॥ मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडें । राजे आणि माकडें । एक कैसीं ॥ १४ ॥ भागीरथीचें जळ आप । मोरी संवदेणी तेंहि आप । कुश्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥ या कारणें आचारशुद्ध । त्याउपरी विचारशुद्ध । वीतरागी² आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥ शूराहूनि मानिले लंडी³ । तरी युद्धप्रसंगीं नेकोंडी⁴ । श्रीमंत सांडूनि बेरंडी¹ । सेवि- तां कैसें ॥ १७ ॥ एका उदकें सकळ झालें । परी पाहोनि पाहिजे सेविलें । सगट अवघेंच सेविलें । तरी तें मूर्खपण ॥ १८ ॥ जीवनाचें झालें अन्न । अन्नाचें झालें वमन । परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९ ॥ तैसें निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदयीं धरावें । सत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २० ॥ उत्तमास उत्तम माने । कनिष्ठास तें न माने । म्हणोन करंटें देवानें । करून ठेविलें ॥ २१ ॥ सांडा अवघें करंटपण । धरावें उत्तम लक्षण । हरि- कथा पुराणश्रवण । नीतिन्यायें ॥ २२ ॥ वर्तायाचा विवेक । राजी राखणें सकळ लोक । हळूहळू पुण्यश्लोक⁶ । करीत जावें ॥ २३ ॥ मुलांचें चालीनें चालावें । मुलांच्या अनुमतें बोलावें । तैसें जनास शिकवावें । हळुहळू ॥ २४ ॥ मुख्य मनोगत राखणें । हीं चातुर्यांचीं लक्षणें । चतुर तो चतु- रांग⁷ जाणे । इतर ते वेडे ॥२५॥ वेड्यास वेडें म्हणूं नये । वर्म कदापि बोलूं नये । तरीच घडे दिग्विजय । निस्पृहासी ॥ २६ ॥ उदंड स्थळीं उदंड प्रसंग । जाणोनि करणें यथासांग । प्राणिमात्रांचा अंतरंग⁸ । होऊन जावें ॥ २७ ॥ मनोगत राखोन जातां । परस्परें होय अवस्था⁵ । मनोगत तोडितां व्यवस्था⁹ । बरी नाहीं ॥ २८ ॥ या कारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोळोज येती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके बोधनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंबी ३००.


१. वस्त्र धुण्याचें धोब्याचें भांडें. २. वैराग्यशील. ३. भितरे. ४. घाण, फजिती. ५. आशामृत. ६. पवित्र कीर्तीचे. ७. सर्व अंगें. ८. जिवलग. ९. सोय.

१४ वा.] निस्पृहलक्षण. ३०९ दशक चौदावा. १. निस्पृहलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका निस्पृह शिकवण । युक्ति बुद्धि शहाणपण । जनें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें औषध गुणवंत । साधें बोलणें सप्रचीत । तैसें माझें ॥ २ ॥ तात्काळाचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होय प्राप्ती । शब्द औषध तीव्र श्रोतीं । साक्षेपें से- वावें ॥ ३ ॥ निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडूं नये । वोळखीमध्यें ॥ ४ ॥ कांता दृष्टीस राखूं नये । गोडी मनास चाखवूं नये । धारिष्ट चळतां दाखवूं नये । गुह्य आपुलें ॥ ५ ॥ एके स्थळीं राहूं नये । कोंनकोंडें साहूं नये । द्रव्य द्वारा पाहूं नये । आळकेंपणें ॥ ६ ॥ आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्या द्रव्य घेऊं नये । उणा शब्द घेऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥ भिक्षेविषयीं लाजू नये । बहुत भिक्षा घेऊं नये । पुसतांहि देऊं नये । ओळखी आपुली ॥ ८ ॥ धड मलिण नेसूं नये । गोड अन्न खाऊं नये । दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥ भोगीं मन असूं नये । देहदुःखें त्रासं नये । पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥ वि- रक्ति गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये । ज्ञान मळिण होऊं नये । वि- वेकबळें ॥ ११ ॥ करुणाकीर्तन सोडूं नये । अंतरध्यान मोडूं नये । प्रेम- तंतु तोडूं नये । सगुणमूर्तींचा ॥ १२ ॥ पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये । समयीं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥ अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये । धिकारितां झुरों नये । कदाकाळीं ॥ १४ ॥ लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजू नये । खिजवितां खिजूं नये । विर- क्तपुरुषें ॥ १५ ॥ शुद्धमार्ग सांडूं नये । दुर्जनासि तंडूं नये । संबंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥ तपिळेंपण धरूं नये । भांडवितां भांडूं नये । उडवितां उडों नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥ हांसवितां हांसूं नये । बोलवितां बोलूं नये । चालवितां चालूं नये । क्षणक्षणां १. अनुभवाचें. २. लाजीरवाणें. ३. आशाळभूत होऊन. ४. तापटपणा.