सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
२१८ | सार्थ तुकारामगाथा
विवरण :- वरील दोन व पुढील चार अभंगांतून वासुदेवाच्या भूमिकेवरून तुकोबांनी सर्वसामान्य जनतेस रूपकाच्या भाषेत बोध केला आहे. तुकारामासारख्या अनेक मराठी संतांनी सांस्कृतिक उद्बोधनाचे, धर्मप्रसाराचे व रक्षणाचे, जनतेस सन्मार्ग दाखविण्याचे फार मोठे कार्य केले आहे. पारमार्थिक तत्त्वज्ञान, वेदान्तविचार, आध्यात्मिक अनुभूती याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला व तो इतरांसाठी अतिशय सुलभ भाषेत भाष्याच्या आधारे शब्दबद्ध केला. रामकृष्णकथा, कौरवपांडवांच्या कथा सांगून आबालवृद्धांना थोर परंपरेची ओळख त्यांनी वारंवार करून दिली. मराठी संतांचे हे पारमार्थिक विचारधन प्रत्येकाच्या घरी नेऊन पोचते करण्याचे महान कार्य मनोरंजनाच्या द्वारे करणारा एक मोठा वर्ग त्यावेळी समाजात होता. त्यावेळी मुद्रणकलेचा शोध आपल्या देशात आलेला नसल्याने, पुस्तके मुद्रित स्वरूपात नव्हती, शिक्षणाचा प्रसार नव्हता, विद्यालये नव्हती अशा काळात बहुजनास परमार्थप्रवण करून बहुश्रुत करण्याचे कार्य साधुसंतांनी केलेच, पण त्यांच्या कार्याचा फार मोठा विस्तार मनोरंजनाच्या द्वारे खेड्यापाड्यातही घरोघरी जाऊन करणारा एक मोठा सन्मिश्र वर्ग होता. हा वर्ग म्हणजे गोंधळी, भुत्ये, वासुदेव, वाघ्या-मुरळी, नंदीबैलवाल इत्यादींचा होय. अजूनही यांच्यापैकी काहीजण रस्त्यातून दिसतात. आज नाही उद्या या मंडळींचे भवितव्य काय होणार आहे ? कुणास माहीत ? पण आज भिकाऱ्याप्रमाणे वाटणारे लोक एके काळी सांस्कृतिक उद्बोधनाचे व प्रसाराचे कार्य फार चांगल्या प्रकारे करीत असत. महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे हे एक प्रधान अंग होते. निरक्षर असणाऱ्या, अज्ञानामध्ये जीवन कंठणाऱ्या, व आपली शेती आणि खैडे सोडून न जाणाऱ्या शेतकरीवर्गास त्याच्या घरी जाऊन त्यास त्याच्या देवदेवतांची आठवण करून देणे, रोजची तिथी, रोजचे नक्षत्र, रोजचा सण याची आठवण करून देणे हे महत्त्वाचे कार्य लोकरंजनाच्या साहाय्याने गोंधळी, भुत्या, वासुदेव, कानफाट योगी, वाघ्या-मुरळी, बाळसंतोष, सरोदा ( पिंगळा ), कुडमुड्या जोशी, काल्हाटी, डाकारी, फकीर, जांगडे, भाटो, बहुरूपी, कडवलक्ष्मी, वैदू इत्यादी अनेक प्रकारच्या लोकांनी केले आहे. यांच्या परमार्थनिरूपणास विनोदाची, अतिशयोक्तीची, उपरोधाची किनार असल्यामुळे याची सोबत समाजास उपकारक वाटली.
या काही व पुढल्या तीनचार अभंगांत तुकारामबुवांनी वासुदेवाच्या भूमिकेवरून परमार्थनिरूपण केलेले आहे. वासुदेवाची जमात द्वारकेपासून आली असावी. हे मोठे कृष्णभक्त असून आजही त्यांच्या चिपळ्या, त्याचा टाळ, त्याचा पावा सकाळच्या वेळी श्रीकृष्णगीतातून साथ देणाऱ्या या गोष्टी आहेत. श्रीकृष्ण किंवा विठ्ठल यांची उपासना हे लोक करतात. याचा वेष बालकृष्णाचा असतो. डोक्यावर मयूरपिसांची टोपी असते, पायांत घुंगुर असतात तोंडांनी अलगुज असते. जुन्या पद्धतीचा पायघोळ अंगरखा असतो. त्यावर तांबडे अळवण असते. कृष्णभक्तीची गाणी गाऊन हे सकाळच्या प्रहरी लोकांना सुखवीत असत. या वासुदेवावर ज्ञानेश्वरएकनाथादी संतांनीही अभंग रचना केलेली आहे. 'घुळघुळा वाजती टाळ । झणझणा नाव रसाळ' या चरणाचा ज्ञानदेवांचा एक नादमधुर अभंग वासुदेवावर आहे. 'वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरण व्याधी । अहू सोहं कोहं मूळ या सांडी उपाधी' अशा भाषेत एकनाथांनी वासुदेवाचे माहात्म्य सांगितले आहे.
४३१ गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा असून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि १ झांको लोचन गा ॥ १ ॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसे जना । चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा २ गा ॥ २ ॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी भीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥ ३ ॥ देवाकारणे भाव तस्मात । द्याये न लगे फारसे वित्त । जाले एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥ ४ ॥
१ ऐको झाकोनि, २ नामनारायणा गा
आलों येथवरी बहु सायासे । करितां दान हेचि मागावयास । नका भार घेऊं करुं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥ ५ ॥ आतां मागुता येईल फेरा । हे तो न घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखो नाहीं तरी जाल अघोरा गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टोपा : - पाहार-प्रहर, निदसुरा-अर्धवट झोपेत अमलेल्यास, अनानीस, तोय-पाणी, मोस-गांव अर्थ : - तीन प्रहर ढळून गेले. पहिला प्रहर गर्भवासाचा, दुसरा बाळपणाचा, तिसरा तरुणपणाचा, अशा तीन प्रहरांचा काळ अज्ञानरात्रीचाच संपत आला असून झोपेत असलेल्यांनो जागे व्हा ना म्हातारपणाचा चौथा प्रहर येत आहे. सावध व्हा ना जागे होऊन काही दान करा हा सर्व उपदेश ऐकून डोळे मिटून घेऊन झोपेत काळ घालवू नका १ रामकृष्ण हरी म्हणून भजन करा, असा उपदेश हा वासुदेव करीत आहे. हातात टाळ, चिपळ्या, वीणा व मुखात श्रीकृष्णाचा अथवा विठ्ठलाचा किंवा रामकृष्णहरी असा घोष असू द्या. २ फळ, फूल, पान जे काय शक्य असेल ते देवास अर्पण करा. झोपेचे सोंग घेऊन उगाच झोपू नका घडून्हो. कारण या देहात जर प्रभूशी विन्मुख व्हाल तर मात्र पुढे कल्याण होणार नाही ३ या ईश्वराला नुसता भाव अर्पण केला तरी चालेल. त्याला काही धनदौलत अर्पण करावी लागते असे नाही एकचित्ताने त्याचे स्मरण केले तरी पुष्कळ होते. हे न करण्याचे तुम्ही आपल्या आयुष्याचा नाश उगाच करु नका ४ मोठे कष्ट घेऊन मी येथे हेच दान तुमच्याजवळ मागायला आलो आहे माझी निराशा करू नका. संसाराचा भार उगाच डोक्यावर घेऊ नका धर्म करणे हेच संसाराचे एक फळ आहे. ५ आता पुनः या देहरूप नगराला यावे न लागेल असे काही तुम्ही करावे तुकयाप्रभू तुम्हांस सांगत आहे की, असे काही न कराल, या ईश्वराची ओळख करून न घ्याल तर तुम्हांला अघोर नरकास जावे लागेल. ६
४३२ राम राम दोनी अक्षरे । सुलभ आणि सोपारे । जागा मागिले पाहारें । सेवतिचें गोड तेंचि खरे गा ॥ १ ॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागऱ्याघोषें गा ॥ २ ॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं काहीं ठेवा गा ॥ ३ ॥ एक वेळा जाणविती । धरूनिया राहा चित्तीं । नेघें भार सांडीं फामा हातीं । नीज घेऊनि फिरती गा ॥ ४ ॥ सुपात्रीं सर्व भाव १ । मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥ ५ ॥ शूर दान जीवे उदार । नाहीं वासुदेवीं विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - भोपारे-गोपी, आवा-धैर्य अर्थ - राम ही दोन अक्षरे अतिशय सुलभ व सोपी आहेत आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जागे राहून तुम्ही या नामाचा जप करा; व आयुष्याचा शेवट गोड साधा. १ वासुदेव, रामकृष्णाचे स्मरण करुन, चिपळ्या वाजवून, टाळ, घागऱ्यांचा घोष करुन रामकृष्ण वासुदेव, रामकृष्ण वासुदेव असा पुकारा करीत आहे. २ हा वासुदेव वासुदेव अशाच शब्दांनी गाणे गात आहे. या नामाखेरीज काही दुसरे वेगळे नाही असे समजून याचेच दान करा, असा त्याचा उपदेश आहे. याच दानाचे धैर्य दाखवा व देहबुद्धीसबधीचे काहीही मागे ठेवू नका. ३ हे दान मागण्यासाठी निज- १ नेघावे
२२० सार्थ तुकारामगाथा वस्तूचे दान मिळविण्यासाठी वासुदेव सर्वांना एकदा जाणीव देत आहे नीट ईश्वरविषयक भाव चित्तात धरून राहा संसाराचे ओझे शिरावर येऊ नका हाताची सर्व कामे सोडून याचा भाव मनात धारण करा ४ मी वासुदेव सर्वत्र भरून राहिलेला आहे असा सर्व चांगल्या भक्ताच्या मनात भाव असतो जे महानुभाव असे कृपाळू संत आहेत तेही असेच जाणतात त्याच्या ठिकाणी वेगळेपणाची जाणीव कधीच नसते ५ ज्यांना वासुदेवाचा विसर पडत नाही त्याचेच दान शूरत्वाचे व उदारतेचे मानावे त्याची कीर्ती सर्वत्र वाढोस लागेल, चराचरात पसरून राहील अशा या दानशूर साधुसंतांना तुकाराम महाराज म्हणतात, माझा नमस्कार असो ६ ४३३ बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आत निजेलें । कैसे घरात घरकुल केले । नेणो आधार ना उजेडले गा ॥ १ ॥ वासुदेव करितो फेरा । वाडियात बाहेर द्वारा । कोणी कांहीं तरी दान¹ करा । जाब नेदा तरी जातो सामोरा² गा ॥ २ ॥ हातीं टाळ दिंडी मुखीं³ गाणे । गजर होतो बहु मोठघाने । नाही निवडिली थोरल्हाने । नका निजो भिकेच्या भेणे गा ॥ ३ ॥ मी वासुदेव तत्त्वता । कळो येईल विचारिता । आहे ठाउका सभाग्या संता । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥ ४ ॥ काय जागाचि निजलासी । सुने जागेोन दारापासी । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥ ५ ॥ ऐसे जागविले अवघे जन । होतें सचित तींही केले दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टोपा - जाब-उत्तर, नेदा-दिला नाही भेणे-भयाने, सुने-कुत्र अर्थ - जे मुखाने बोलू नये अशा ज्ञानाच्या गोष्टी जे मुखाने एकसारख्या करतात ते बाहेरून जागे असले तरी आत झोपलेलेच आहेत त्यांनी आपल्या घरातच छोटेसे घरकुल केले आहे, त्यात अंधार आहे की उजेड आहे हे काही नीट समजत नाही १ हा वासुदेव रोजच्या फेऱ्या या देहरूपी वाड्याच्या आत, दारात बाहेर सर्वत्र करीत असतो त्याला कुणी काही तरी दान करून थोडे पुण्य सपादन करा ना तुम्ही काही उत्तर न द्याल तर मी आपला माघारा जाईन २ मी हातात टाळ व वीणा घेऊन, मुखाने ईश्वराचे नाम गात आह नामाचा हा गजर मी मोठघाने करीत आहे तो ऐकण्यासाठी लहानथोर अशी निवड केलेली नाही दान देण्याच्या भयाने कुणी झोपून जाऊ नका ३ मी तर निश्चयाने वासुदेवच आहे तुम्ही थोडा विचार केलात तर तुम्हासही हे सहज समजून येईल भाग्यवान संतांना हा प्रकार माहित आहे हे असे दान मागणारा माझ्याशिवाय दुसरा आणखी कोणी नाही ४ उगाच काय भ्रमात निजून राहिलात ? दाराशी मात्र राखणेसाठी कुत्रे जागेवोत ठेविले आहे ते तुमच्या हितासाठी घसापस करून भुकत आहे आणि तुम्ही वासुदेवाला भेटत नाही ५ अशा प्रकारे या वासुदेवाने सर्व लोकांना जागे केले आहे पण ज्यांचे पूर्वकर्म चांगले होते त्यांनीच दान केले आहे आणि वासुदेवाला विसरून जाणारे मात्र दुबळच आहेत ६ ४३४ रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळया वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥ १ ॥ जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसू द्यावा भाव गा ॥ २ ॥ १ दान पुण्य करा २ माघारा, ३ मुखी नाम गाण
सार्थ तुकारामगाथा २२१ निज दासाची थोर आवडी । यासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥ ३ ॥ अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥ ४ ॥ तुका म्हणे रे धन्य त्याचें जीणें । जींहीं¹ घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणें गा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- नीज-निजस्वरूपाचे दान, वोयळतो-प्रसन्न होतो. अर्थ :- आपल्या गीतांतून रामकृष्णांचे गुणवर्णन गात गात, टाळ व चिपळ्या वाजवीत, आपल्याच नादात नाचत नाचत हा वासुदेव निजस्वरूपाचे दान घेत घेत फिरत आहे. १ सर्व जनांत व वनांत सर्वत्र एकच परमेश्वर पसरून राहिलेला आहे. तो अनुभवण्यासाठी वासनेचा त्याग करावयास हवा. मगच वासुदेवाची संगत त्याला सुखाची होते, तो प्रसन्न होतो, असा भाव मनात निश्चयाने असू द्यावा. २ निजस्वरूपाच्या दानाची गोडी या वासुदेवास फार मोठी असून प्रत्येक क्षणी त्याच्या मुखात हरिनामाचा उच्चार असतो. अशा या वासुदेवाची प्राप्ती तुम्ही करून घ्या. ३ तुम्हांस जागे करण्याचे प्रयत्न फार झाले. त्याचा शेवटही झाला. पण काही प्रयत्न यशस्वी झाला नाही, तुम्ही झोप टाकून आधी जागे व्हा पाहू; व या वासुदेवाला दान द्या. ४ ज्याने या वासुदेवास दान दिले त्याचेच जिणे धन्य होय असे तुकारामबुवा म्हणतात, असे दान देणारास मग जन्ममृत्यूच्या फेऱ्या पडत नाहीत. कारण त्याचा निवास वासुदेवाच्या ठिकाणीच झालेला असतो. ५ गांवगुंड-अभंग १ ४३५ आम्ही जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥ १ ॥ दुसरें तें खेळों आलें । एका बोलें तो मियां ॥ २ ॥ अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥ ३ ॥ तुका म्हणे लुटूं नाद । जितूं वाद सतीनें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पुंड-बंडखोर, जितूं-जिंकू, सतीनें-शर्थीने. अर्थ :- आम्ही सर्व देहरूपी गावास दरारा बसविणारे गावगुंडच बनलो आहोत. सर्व बंडखोर प्राणीमात्रांना अथवा पंचमहाभूतांनाही आमचा दरारा वाटतो. १ या एका मियाच्या बोलावण्याने दुसरे अनेक लोक गावगुंडीचा खेळ खेळायला येऊन मिळाले. २ एकमेकांचा अंगसंबंध न येताही सर्वांना लाभ होईल असे करू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशांचा भाव संपवू. त्यांच्याशी शर्थीने वाद जिंकू. ४ जोगी-अभंग १ ४३६ जग जोगी जग जोगी । जागजागे² बोलती ॥ १ ॥ जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ २ ॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजा³ सकळ ॥ ३ ॥ पूजापत्र कांहीं । फल पुष्प तोय ॥ ४ ॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥ ५ ॥ नफा घेऊं भार । धर्म तोचि सार ॥ ६ ॥ तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- जोगी-योगी, जगदेव-जगन्नाथ. १ जिही वासुदेवा केलें दान, २ जागे जागे ३ पूजावा.
२२२ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- जगातील सर्व योगी लोकांना स्वतःच्या ठिकाणी जागे असा असे सांगत असतात. १ हा जगन्नाथ ईश्वर स्वतःच जाणणारा असल्याने त्याच्या ठिकाणी काही भाव ठेवावा. २ तोच सर्व क्षेत्राचा पालक असल्याने त्याचीच पूजा करावी. ३ फुले, फळे, पाणी, पान वगैरे घेऊन त्याचीच पूजा करावी ४ मनुष्यदेहाच्या शहरास फार दिवसांनी या योग्याची फेरी आलेली आहे. ५ आपल्या मस्तकावर लौकिक संसाराचा भार कुणीही घेऊ नये. धर्माने वागणे हेच जीविताचे सार आहे. ६ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हास हे दान मागत आहे. ते अनन्य- भावाने मला द्यावे. ७ विवरणः-येथून पुढचे अभंग असेच विरगोळ विषयावर लोकाभिमुख होऊन रूपकाच्या आश्रयाने लिहिलेले आहेत. जोगी, सरवदा, मुढा, डोईफोडा, मलग, दरवेस, गोंधळ, सोंगा, वाघ्या, दसरा इत्यादी नावांनी भारुडाच्या सदरात येतील असे हे अभंग ह्या वेळेच्या समाजात निरनिराळ्या वेषात वावरणाऱ्या व बहुजन समाजास सांस्कृतिक व पारमार्थिक विचाराची जाग देणाऱ्या व लोकरंजनाने काम करणाऱ्या काही लोकांचे हे शब्दचित्र मनोरंजक व उद्बोधक असे आहे या अभंगात योगी अथवा जोगी माणसाचा रूपकात्मक उल्लेख आहे. जोगी हे शंकराचे उपासक कानफाटे असेही यांना म्हणतात अंगाला विभूती, हातात भिक्षापात्र, त्रिशूल, काखेत झोळी किक्रियावर गोपीचंद- मैनावतीचे गाणे अशा थाटात हे लोक अजूनही हिंडताना दिसतात याची परंपरा धर्मनाथापासून सांगतात. या योगी अथवा जोगी लोकांचा संप्रदाय प्रसिद्ध नाथपंथाशीही संबंधित आहे आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ (ज्ञानेश्वरी ) ही परंपरा भागवतधर्माशी निगडित अशीच आहे शिवोपासक नाथपंथाचे पुढे मजेदार रूपान्तर विठ्ठलभक्तीत होऊन ऐक्याचा एक नवा आदर्श निर्माण झालेला दिसतो या अभंगात जागल्या जगदेवाची पूजा पत्र, फल, फूल, पाणी यांनी करावी असे सांगितले आहे याचा संदर्भ भगवद्गीतेमधील 'पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ' या ओळीची आहे हे स्पष्ट आहे सरवदा-अभंग १ ४३७ एका गा ए भाई । सरवदा सांगतो कांई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसिद्ध जना । एक न मारितां दाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥ १ ॥ आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरेंच बोले तो जाय । नरकामध्ये अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणायें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ २ ॥ आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन जागें माझें १ म्हणोन । पडिलें खान तया घरी । म्हणोन न म्हणा माझें कांही । निजीं निजा सुखें ठायी यत्न होईल तईं । चोराठायीं विश्वास ॥ ३ ॥ आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधी । पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनायी निश्चिती । परपुरुपीं होय रती । सुखगती ते पावे ॥ ४ ॥ १ माझे चित्त
सार्थ तुकारामगाथा २२३ आणीक एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो । तुका म्हणे आई । येयें नांव काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सरवदा-भविष्य सांगणारा, शकुन सांगणारा, खान-चोरी, वारी-निवारण करतो. अर्थ :- बंधूंनो, ऐका हा भविष्य अथवा शकुन सांगणार काही सांगत आहे. काम व क्रोध या दोन पुत्रांची ही बुद्धीरूप आई लोकांख्याकडून फसवली जाईल. ते तिची विटंबना करतील. हे सर्वत्र प्रसिद्धच आहे. कामाला मारल्या- शिवाय कुणालाही शहाणपणा येणार नाही, बरे सुखही मिळणार नाही. १ लोकहो, आणखी काही शकुन या भविष्य ऐका, हा शकुन सांगणारा काय सांगतो ते ऐका. देहादी लौकिक दृष्टी व प्रपंचविचार यांना खरे मानतो तो नरकात जाईल. त्याची अधोगती होईल. हे मी तुम्हांला चार वेदांच्या आधाराने सांगितले आहे. तेव्हा स्त्रीपुरुषहो, देहादी प्रपंच खोटा आहे असेच म्हणत राहा, म्हणजे तुमची सर्व दुःखे निवारण होतील. २ शकुन सांगणारा आणखी असे सांगत आहे की, आणखी एक मनुष्य फसणार आहे तो हा की जो माझे चित्त जागे आहे, मी सावध आहे असे म्हणणारा. त्याच्या घरी चोरी होऊन त्याचे सर्व लुटायला जाईल म्हणून माझे माझे म्हणून सावध राहण्याचा जहरी नाहो. निजात्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र सावध राहावे. सर्वांचे चित्त चोरणाऱ्या त्या श्रीहरीच्या ठिकाणीच विश्वास प्रयत्नपूर्वक ठेवावा ३ आणखी एक शकुन या सरवद्याचा असा आहे की, देहधर्मास व विकारांनाच सर्वस्व मानून पतीची सेवा करणारी पतिव्रता नारीही मोठेच दुःख पावेल. ही जीवदशारूपी पतिव्रता स्त्री पंचकर्मेन्द्रिये, पंचज्ञानेंद्रिये, पंचमहाभूते याच्या तावडीत सापडलेली असल्याने तिच्यापासून सावध असावे. निश्चिंत राहू नये परम म्हणजे श्रेष्ठ पुरुष जो परमेश्वर त्याच्याशीच रममाण ती जर झाली तरच तिला सुख वाटेल. ४ आणखी शकुनाचा एक प्रकार असा की, कुणी दान देत असताना जो निवारण करतो तोही काही चांगला मनुष्य नव्हे. तुकाराम महाराज म्हणतात, मातांनो, त्या सर्वांची नावेच कशाला सांगायला हवीत ? मरेनात रांडेचे. ५ मुंडा-अभंग ३ ४३८ संवाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पछ्वा जावे लुट ॥ १ ॥ प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ २ ॥ उडे फुडे हुंग मचाये आगल भुलन प्यार । लड्यड खडबड काहेकां खचलावत भार ॥ ३ ॥ कहे तुका चलो' एका हम जिन्होके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मुंडा-मुसलमानी गुरूचा एक प्रकार, यारा-मित्रा, संवाल-सांभाळ, चोट-तडास, खुदाई-देवावर, कुडे-उडी मारणे अर्थ :- मित्रा, स्वर्गासारख्या वरच्या गतीचे व पशुपक्ष्यादी खालच्या गतीचे सुखदुःखाच्या भोगाचे तडाखे जो सांभाळील त्याचेच रक्षण होईल व दुसरा मात्र नागविला जाईल १ बाबा, देवावर प्रीती असू दे. देवावरच प्रीती ठेव. देवावरच प्रेम असू दे २ प्रपंचविषयींचे प्रेम, भूलून, उड्या मारून, ढुंगण हालवून तू नाचत राहून देवापुढे लीन व्हावेस. काखेत झोळी, खडावा, कृष्णाजिन यांचे लडबडते, खडबडते ओझे विनाकारण का वाहवितोस ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो, नीट ऐका, आम्ही ज्याच्याशी तुमची सोबत करून देऊ त्यालाच हात देऊन जवळ करा. ४
२२६ सार्थ तुकारामगाथा काहे भुला एक देखत आखो मार तडागो बाजार ॥ २ ॥ दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥ ३ ॥ नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके सग फिरफिर गोते खाये ॥ ४ ॥ शब्दार्थ - मलग-मुसलमान फकीर, ठकण भेल-फसविण्यास केलेला वेष, तडागो-तडाखे, लत-लाथ, असाके-आशेच्या अर्थ - बाबा, लक्ष ठेवून राहोल तोच जिंकेल हा प्रपंचाचा तमाशा दूर राहून तू पाहा पुढे हातात काठी व फास घेऊन फसविण्यासाठी वेषधारी वाटमारे बसले आहेत हे नीट ओळख तू १ या बाजारात लोभाने आप- ल्याच डोक्यावर तडाखे देत कित्येक वेषधारी बसले असताना तू त्यांना पाहात आहेस मग तू त्याना का फसवतोस ? २ दमडीचमडीसाठी जो मनुष्य भूलून जातो तो पुढे लाथा खात राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाबा, तू कुणालाही बोलावू नकोस, तूही कुठे जाऊ नकोस कारण पुन आशेच्या संगतीने तू गोता खाशील रे बाबा ४ दरवेस - अभंग १ ४४३ अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥ १ ॥ ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हाटे आधे चढे पीठ । आपे हुवा असवार ॥ २ ॥ जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्पा अंदर भेत । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - दरवेस-अस्वलाचे खेळ करून हिंडणारा फकीर अथवा भिक्षेकरी, सिरताज-मुकुट, यारी-प्रेम, मैत्री, बाघो-वाघ अर्थ - देवाने मनात आणले तर सामान्य मनुष्यही बाबा, देवाच्या डोक्यावरील मुकुट होऊन राहील, आणि गाईवासरासहित वाघाबरोबरही ते मैत्री करतील १ बाबा, त्या एका ईश्वराची मात्र आठवण ठेव कारण तोच एक कर्ता आहे तरच तुम्ही त्याच्या पाठावर आरूढ व्हाल २ बाबा, सर्व भूतांचा अंतरात्मा जो अल्ला, बेध त्याची आठवण ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य हे सर्व समजून श्कतो तोच खरा दरवेशी झाला ३ वैद्यगोळी-अभंग १ ४४४ अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलाये । अल्ला वगर नहीं कोये अल्ला करे सो हि होये ॥ १ ॥ मर्द होये वो खडा फोर नामर्दुंकु नहीं धौर । आपने दिलकु करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ २ ॥ सब रसोग्न किया मार । भजनगोली एक हि सार । इमान¹ तो सब ही सचा । थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३ ॥ जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सातो पाचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥ ४ ॥ १ इनाम
४. संत-महिमा व सत्संग फल
सार्थ तुकारामगाथा २२७ सब ज्वानी निकल जाये । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥ ५ ॥ मेरी दारु जिन्हें खाया । दिवार दरगां सो हि पाया । तल्हे मुंडी घाल जाये । बिगारी सोवे क्या लेवे ॥ ६ ॥ बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसका ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- दारू-औषध, खुमासी-विषाद, रस-औषध, मटो-माती, दिदार-दर्शन अर्थ -- देवच देणारा अगर दुसऱ्यांकडून देवविणारा आहे. तो देवच औषध आहे. तोच औषध देणारा आहे. अल्लाशिवाय, देवाशिवाय दुसरे कोण आहे? तो करील तेच होईल. १ जो कोणी मर्द आहे तोच हे औषध नामरूपाचे घ्यायला तयार होईल. नामर्द हे काम करण्याचे धैर्य कसा दाखवील ? तुम्ही आपल्या मनाला प्रसन्न करून घ्यावे. तीन दमड्यांची काय बिसाद आहे ? २ सर्व औषधी सोडून द्याव्यात व एक भगवद्भजनाची गोळी मात्र घ्यावी. तोच सारभूत अशी आहे. विश्वास ठेवून या गोळीचे सेवन थोडे का होईना पण करावे. ३ ज्यांच्या- पाशी नीती झोपलेली आहे तेच पुरे पुरे म्हणून रडतात, त्यांच्या सप्तधातूत्मक व पंचभूतात्मक शरीरावर भार करून जिकणारी अशी ही भजनगोळी असल्यामुळे तिचा भवरोगावर उतार पडतो. ती पुन पुन. ते घेतात. ४ हे बादवी, सर्व तारुण्य संपल्यावर मग मातीच खावी लागेल तुला जे मूर्ख व खेडवळ आहेत ते काय माझी ही भजनगोळी घेऊ शकतील ? कारण त्यांच्या हगवणीचे कपडे त्यांच्याकडून धुतले जाईनात. ५ पण माझी भजनगोळी ज्याने घेतली आहे त्याने आत्मरूपाचे दर्शन घेतले; पण खाली मुंडी घालणारा तो बिगार-कामकरी काय तिचे महत्त्व जाणणार ? ६ तुकाराम महाराज म्हणतात, बाजारभाव विचारूनच तुम्ही माझी ही भजनगोळी घ्यावी. मी त्यांना फुकट वाटून टाकीन. जे कुणी सज्जन असतील ते ही भजनगोळी घेऊन सुखी होतील ७ विवरण - तुकोबांच्या या किरकोळ लोकरंजनात्मक अभंगाची भाषा फारसी-उर्दू मिश्रित अशी आहे मलंग, दरवेशी, मुढा, भजनगोळी देणारा वैदू याची भाषा अशी चमत्कारिक आहे. याचा अर्थ हा की त्यावेळी मुसलमानी राज्याच्या संबंधाने एकंदर हिंदुसमाजातही स्थित्यंतर होत होते देवधर्म, चालीरीती, समजुती यातील संघर्ष हा एक अभ्यासाचा विषय आहे मुसलमानी फकीर व मलंग यांचा संबंध हिंदुसंस्कृतीशी अनेक प्रसंगी येत राहिला लोक- जीवनात स्थिर होऊन राहिलेल्या या लोकांची ही तुकोबाकृत शब्दचित्रे होत गोंधळ - अभंग ३ ४४५ राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिंबीं बिंबोनि ठेली । माझी परब्रह्म वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी । परब्रह्म वेल्हाळा वो ॥ १ ॥ राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चोधींसी । लावी आपुलिये सोई वो ॥ २ ॥ सुकुमार साजिरी । कैसीं पाऊलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा । उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥ ३ ॥ निर्गुण निराकार । वेदां न कळेचि आकार वो । शेषादिक श्रमले । श्रुती न कळे तुझा पार वो । उमारोनि बाहे । भक्तां देत अभयकर वो ॥ ४ ॥
ब्रह्मादिकासही समजत नाही २ ही सावळी विठाई अतिशय सुकुमार आहे. हिचे चार हात फारच शोभून दिसतात. हिच्या छातीचा भाग सखोल असून त्यावर तेजस्वी असे पदक चमकत आहे. हिच्या कमरेस लहान लहान घुंगरे असून ती अतिशय मधुर आवाज करतात हिच्या पायातील घागऱ्या मधुर ध्वनी करून गाणे गात असतात हिच्या पुढे नित्य संगीत, नृत्य सुरू असते. ३ हिचा अष्टाय असा सुशोभित बाघा किती वर्णन करावा ! शुद्ध केलेल्या तेजस्वी रसांचीच ही सुगंधी व सौंदर्यवान अशी मूर्तीच जणू ओतली आहे ही सर्व कलात निपुण असून हिचे मुख हसरे आहे हिचे भाषण मधुर शब्दांनी भरलेले असते. ही नारायणी, आदिशक्ती देवी विठाबाई बहुरूपानी नटलेली आहे ४ पंढरपूरसारख्या महानगरामध्ये हिची घटस्थापना केलेली आहे. आकाशाचा मंडप त्रैलोक्यावर घातलेला असून चंद्रभागेच्या तीरावर हिने गोंधळ सुरू केला आहे ही कृष्णाबाई, योगेश्वरी आपल्या भक्तजनांच्या कार्यासाठी अवतीर्ण झाली आहे ५ तेहतीस कोटी देव, चामुंडादी देवी, अष्ट भैरव या सर्वांचा समुदाय हिच्या आरतीसाठी आलेला आहे आरती ओवाळून झाल्यावर हे तिच्यावर फुलांचा वर्षाव करितात नारदतुंबर व गंधर्व गाणे गाऊन हिची स्तुती करतात. या गायनाने सर्वांना ब्रह्मानंद होत असतो अशा या देवी विठाईचे चरणरज, पायांचे धूलिकण तुळयाबंधू मस्तकी धारण करीत आहे. ६
विवरण- वरील तीन अभंगात तुकोबांनी गोंधळाच्या रूपाने विठाईमाऊलीचे अति रेखीव, लोभस व सौंदर्यपूर्ण असे वर्णन मोठ्या तन्मयतेने केले आहे गोंधळाचा सर्व थाट त्यांनी येथे उभा केलेला आहे 'गोंधळा'ची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे इष्टकार्य सफल व्हावे म्हणून सर्व देवदेवतांना आवाहन केले जाते व त्यांची स्तुती किंवा प्रार्थना गोंधळाच्या वेळी म्हटली जाते. लग्नासारखे मंगल कार्य झाल्यावरही गोंधळ घालण्याची प्रथा अजूनही महाराष्ट्रात आहे गोंधळ हा मुख्यतः देवीचा असतो गोंधळी लोकांकडून देवीप्रीत्यर्थ गाणे, नृत्य भजन, स्तुती, प्रार्थना, पोवाडे इत्यादी प्रकार गोंधळात म्हटले जातात गोंधळाची प्रथा प्राचीन काळीही असावी स्कंदपुराणात गोंडली नृत्याचा उल्लेख असून दीपिका, माळ, टाळ, शंख, मृदंग, दिवट्या, कवड्यांची माळ इत्यादी वस्तूंचाही उल्लेख तिथे आहे या गोंधळाच्या वेळी माहूरची रेणुका, कोल्हापूरची अंबाबाई, औंधची यमाई पालीचा खंडोबा, जेजुरीचा खंडोबा, शिंगणापूरचा महादेव, पंढरपूरचा विठोबा इत्यादी प्रमुख देवापासून जोकाई, उगाई, तुकाई यासारख्या लहान दैव- तांनाही पाचारण करण्यात येते 'माहूरपूरची रेणुबाई गोंधळा येई, कोल्हापूरची आंबाबाई गोंधळा येई, जेजुरीचा खंडोबा गोंधळा येई' अशी गोंधळाची सुरुवात सर्वांना परिचयाची आहे गोंधळ ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्यास आपले दैवत आल्याचे समाधान वाटत असल्यामुळे एकत्वाचे एक नमुनेदार साधन म्हणूनही गोंधळाकडे सामाजिक दृष्टीने पाहण्यासारखे आहे मराठी संतांनी 'गोंधळा'चा उपयोग रूपकाच्या आधाराने फार चांगल्या रीतीने करून घेतला आहे
ज्ञानेश्वरांनीही गोंधळावर सुरेख रचना केलेली आहे 'तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा । चौक आसनों कळस ठेविला हो करी कृपा । प्रेम चादवा वर दिधला हो करी कृपा । ज्ञानगादी दिली बैसावया हो करी कृपा । वरी बैसविली आदी माता हो करी कृपा । शुकसनकादिक गोंधळी हो करी कृपा । नाचताती प्रेमकल्लोळीं हो करी कृपा । पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा' अशा थाटाने ज्ञानेश्वरांनी या विठाई माउलीचा गोंधळ वर्णन केलेला आहे एकनाथांनी 'स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातला हो । चार वेदाचा फुलवरा बांधिला हो जीवशिव सबळ घेऊनि आनंदे नाचती हो । अठ्याऐशी सहस्र ऋषि दिवटे तिष्ठती हो । अशा शब्दात गोंधळाचे रूप उभे करून विठोबामाऊलीचे स्तवन केले आहे
४४८ शंख करिशी ज्याच्या नावे । त्यांचें तुज नाहीं ठावे । एक सांगतो एका भावें । सांपडे घरों ते जीवउनि राखें । रे विठ्ठल ॥ १ ॥ टिळे माळा करंडी सोग । धरूनि चाळविले जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा २३१ राख लावूनि अंग मळी। थाथे ठोके मी एक बळी। वासने हातीं बांधवी नळी। त्यासि येउनि गिळी। रे विठ्ठल ॥ ३ ॥ कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख । करवी पीडा भोगवी दुःख। पडे नरकीं परी न पळेचि मूर्ख। रे विठ्ठल ॥ ४ ॥ सिफला फार मारी हाका। रांडा पोरें मेळवी लोकां। विटंबी शरीर मागे रुका। केलें तें गेलें अवघेंचि फुका। रे विठ्ठल ॥ ५ ॥ कळावें जनां मी एक बळी। उभा राहोनि मांडी फळी। फोडोनि गुडघे कोपर चोळी। आपला घात करोनि आपणचि तळमळे। रे विठ्ठल ॥ ६ ॥ फुकट खेळें ठकलीं वांयां। धरुनि सोंग बोडण्या डोया। शिवों नये ती अंतरीं माया। संपादणीयिण विटंबिली काया। रे विठ्ठल ॥ ७ ॥ धुळी माती कांहीं खेलोच नका। जवांदी चंदन घ्यावा बुका। आपणा परिमळ आणिकां लोकां। मोलाची महिमा फजिती फुका। रे विठ्ठल ॥ ८ ॥ बहुत दुःखी जालिया खेळें। अंगीं बुद्धि नाहींत बळें। पाठीवरी तोब्रा तोंड काळें। रसना द्रवे उपस्थायच्या मुळें। रे विठ्ठल ॥ ९ ॥ काय सांगतो तें ऐका तुका। मोडा खेळ कांहीं अवगोच नका। चला जेवूं आधीं पोटों लागल्या भुका। घाल्यावरी बरा टाकमटिका। रे विठ्ठल ॥ १० ॥ शब्दार्थ व टीपा- करंडी-परडी, उथळी-ओकतो, राहडीचे-चिखलात, फारु-शिव्या, रुका-पैसा, जवांदी- सुवासिक पदार्थ, उपस्थ-इंद्रिय, घाल्यावरी-संतुष्ट झाल्यावर, टाकमटिका-थाटमाट अर्थ :- देव देव म्हणून ज्याच्या नावाने तू शाल करुन ओरडत आहेस, त्यासबधी तुला काहीही ज्ञान नाही. तर तू नीट ऐक. मी एका भावाने सर्व काही तुला सांगतो तुझ्या देहरूपी घरामध्येच जे विठ्ठलरूप वसती करुन आहे त्याचीच तू उपासना कर १ उगाच कपाळावर गंधाचे टिळे, गळ्यात माळा, हातात फुलांची परडी, असे ढोंग करून जगाला कशाला फसवितोस ? तू नेहमीच हात पसरून आहेस, खरा त्याग तू कधीच करीत नाहीस बभ्रदाची पूजा करून लोकांना मात्र आपल्या साधुत्वाचे ढोंग दाखवितोस. २ तू साऱ्या अंगाला राख फासून बसतोस आणि वृथा आपल्या मोठेपणाची ऐट मिरवतोस. तू वासनेकडून आपला गळाच बांधवून घेत आहेस यामुळे अशा लोकांना काळ गिळतो व पुन ओकून टाकतो ३ चिखलात डोके टेकून पाय वर करून उभा राहतोस तू काय ह्यात सुख ? उलट यामुळे तुला स्वत:ला दुख व पीडाच होईल नरकात जाशील ना. पण तुला मूर्खाला समजतच नाही ४ नाना- प्रकारचे अपशब्द व शिव्या शिकलास तू रांडापोरांना हाका मारून तू भोवती जमवतोस. आपले शरीर विटवून, नाना प्रकारची सोंगे करून त्यांच्याजवळ पैसा मागतोस ५ सर्व लोकांना मीच एक बलवान असे समजावे म्हणून तू एखाद्या दुकानापुढे उभा राहून मोठ्याने ओरडा करतोस व लोक जमवितोस, आपले गुडघे व कोपर फोडून ते चोळत बसतोस अशा प्रकारे तू आपला घात आपणच करीत आहेस ६ अशा या फुकटच्या खेळाने पुष्कळ लोक फसले ना डोकी बोडून संन्याशाची सोंगे घेणारे फार आहेत पण त्यांच्या मनात जिला शिवू नये अशी माया भरपूर असते वेशामुळे वेषासारखी वागणूक नसल्यामुळे देहाची नुसती विटंबनाच झाली रे. ७ म्हणून अशा प्रकारे धुळीत, मातीत खेळ खेळण्याचे काही कारण नाही कस्तुरी, चंदन किंवा बुक्याचा याचे सेवन करून तुम्ही स्वतःही सुवास घ्या व दुसऱ्यानाही द्यांवा. यामुळे मोठी किंमत होईल नाही तर फुकट फजिती मात्र आहे. ८ वर सांगितलेल्या खेळा- मुळे पुष्कळांना फार दु:खे झाली आहेत त्यांच्या अंगची बुद्धी नष्ट झाली, बळ संपले त्यांच्या पाठीवर एकसारखे आघात बसून त्यांचे तोंड काळे झाले आहे. इंद्रिय पाहून त्यांच्या तोंडात पाणी सुटते. ९ तेव्हा तुकाराम महाराज
२३२ सार्थ तुकारामगाथा काय सांगतात ते नीट ऐका. हा फजितीचा खेळ मोडून टाका. उगाच कसला तरी आचरटपणा करू नका कधी. तरी चला, आधी ईश्वरप्रेमाचे भोजन करू. भूक फार लागली आहे ईश्वरप्राप्तीने संतुष्ट झाल्यावर मग थाटमाट करणे शोभून दिसेल. १० ४४९ एक बाई तुज वो¹ कांहीं सांगत शकुन । निजालिया भुर होसी जागे म्हणउन ॥ १ ॥ मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हें भलें कळों कोणा लोकांप्ति ॥ २ ॥ सांगतें गुण जीवींची खुण ऐक माझी मात । येस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥ ३ ॥ बरया घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥ ४ ॥ आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साह्य चहूं अठरांच्या बळें ॥ ५ ॥ करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । असई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥ ६ ॥ कुळांची हे मुळीं तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावो ॥ ७ ॥ तुका म्हणे नांद सुखें घरीं आठवण । माझ्या येती' कोणी त्यांचा राख वरा मान ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :- भूर-फजीत, चहू आठरांच्या-चार वेदाच्या, अठरा पुराणाच्या, असई-अखंड अर्थ :- एक शकुन सांगणारी बाई म्हणते, 'बाई, तू ऐक, मी तुला एक शकुन सांगते भक्तीच्या वेळी तू जर झोपी जाशील तर तुझी मोठीच फजिती होईल म्हणून तू विठ्ठलस्वरूपात जागी राहा. १ माझे हे बोलणे त्याने एका शब्दाने मान्य केले आहे. पण माझे हे बोलणे पुष्कळ चांगल्या चांगल्या माणसांनाही समजत नाही. २ मी तुला माझ्या जीवाची एक खूण सांगते ती नीट ऐक. तू त्या गोष्टीवर भावना ठेवून ऐक व माझ्या हातात हात दे पाहू. ३ तुला घरसंसार व व्यवसाय चांगलाच मिळालेला दिसतो. पण येथे काहीही खरी फलप्राप्ती नसून सर्वत्र खोटा भावच व्यक्त झालेला दिसतो. ४ तुझ्या नशिबात मात्र एक नवसाचे फळ तुला मिळणार आहे. चार वेद व अठरा पुराणे यांच्या साहाय्याने मान तू विठ्ठलाची भक्ती वाढीव. ५ वर सांगितलेले काही लागपाठ कर. द्रव्याकडे चित्त देऊ नकोस यामुळे तुला अखंड सौभाग्याचा चुडा मिळेल व तुला ईश्वररूपाचा पती प्राप्त होईल. ६ तुझ्या कुळाची ही असणारी ही देवी तुझ्या मागे लागली आहे. तिचा तुला विसर पडलेला असल्यामुळे तुला काही फळ मिळत नाही. ७ तुकाराम महाराज म्हणतात, तू सुखाने आपल्या घरी नांद, असा या देवीचा आदेश आहे. पण तिची आठवण मात्र धर व तुझ्या घरी माझे जे भक्त येतील त्यांचा आदरसत्कार मात्र नीट कर त्याचा मान ठेव ८ कावडे - अभंग ५ ४५० आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक । ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रासादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥ १ ॥ माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी । पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥ २ ॥ जें या शीतलाहुनी सीतळ । पातळाहुनि जें पातळ । प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥ ३ ॥ जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान । धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥ ४ ॥ काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें धावडाव । शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥ ५ ॥ १ येथील.
सार्थ तुकारामगाथा २३३ पराविया नारी माउली समान । परधनीं बाटो नेदीं मन । जीवित्त्व तें तृणासमान । स्वामिकाजी जाण शूर म्हणो तया ॥ ६ ॥ क्षपित्त येचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा । सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें अहो सांगतो ॥ ७ ॥ व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य ते असे गाता नाचता बहु फार । पुन्हा योलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥ ८ ॥ संग संताचा करिता बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पथ तो सुपंथ चालावा । उगवा वासना लिंगाड ॥ ९ ॥ तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोलडी । पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥ १० ॥ शब्दार्थ व टीपा - कावडे-पाण्याची कावड घालणारे पान्हेरी-पाणपोई, कापटि-यात्रेकरू पण-पैज, घाडघाय-अधिकार, सधी, लिंगाड-लचाड, खटपट अर्थ - अहो बंधुनो, प्रथम गुरुचरणांना वंदन करुन गणपतीस नमस्कार करु त्याच्या कृपेने प्रासादिक वाणीत हरिहराचे गुणसंकीर्तन करु १ असे दास्यत्व करण्याची माझी योदावड्टी विशेष प्रकारची आहे पाणपोई घालून मी मार्ग आक्रमत आहे, सेवा करुन जीवन जगत आहे यात्रेकरू बंधुनो, तुम्ही हे पाणी खुशाल घ्यावे २ हे प्रेमा- मृताचे जीवन शीतलाहून शीतल, पातळाहून पातळ असे रसाळ व गोष्ट आहे याचे सेवन मोठ्या भाग्याने घडते ३ अगोदर तुम्ही अभिमान जिंका, लज्जा आणि मानसन्मानाची हौस सोडून द्या आणि घरणध धरावयाचे असतील तर महादेवाचे धरावेत काही पैज दाखवयाची असेल तर ती अशी असू द्यात ४ तुमच्या जीवनात काळाला शिरकाव करु देऊ नका त्याचा अधिकार नीट राखून मनात शुद्ध, सात्त्विक भाव धारण करून हरिहर महादेव अशी गर्जना याणीने करा ५ दुसऱ्याची स्त्री मातेसमान माना दुसऱ्याच्या धनसंपत्तीवर मन ठेवू नका आणि स्वामीच्या कामासाठी आपले जीवन तुम्ही गवतएवढे क्षुद्र समजा तरच मी तुम्हांस शूर म्हणेन ६ तुमची सर्व शक्ती दुसऱ्या- वर उपकार करण्यासाठी खच व्हावी, प्रपंच हा सर्व खोट्याचा पसारा आहे असे तुम्ही माना भवनदी तरून जाणे हेच एक सत्याचे रूप आहे असे समजा याबाबतीत आळस मुळीच करू नका असे मी तळमळीने सांगत आहे हो ७ एकादशी व सोमवार ही दोन व्रते नियमाने करा कथा, पूजा, हरिजागर करून नामसंकीर्तनाचा लाभ घ्या या नृत्यगीतात फार मोठे पुण्य आहे असा विश्वास धरा याच्यायोगे पुन संसार करण्यासाठी जन्म घेण्याचा प्रसंग येणार नाही हे सत्य आहे ८ संताची संगत धरणे हेच फार चांगले आहे यामुळे थोर कीर्तीचा लाभ होतो व वासनेचे लचाड दूर होऊन चांगल्या मार्गाचे आचरण ठेवावे ९ तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रवृत्ती व निवृत्ती अशी कावड चालवीत आहे पुढे आणखी भजनातील गोडीने कळस भरलेले दिसतील केशवदासाच्या प्रीतीने मीही कायदयाच्या निमित्ताने सेवा करीत आहे १० ४५१ आहा आहा रे भाई । हे अन्नदानाचे सत्र । पन्हे घातली सर्वत्र । पर्थी अवघे पथ मात्र । इच्छाभोजनाचे आर्त पुरवावया ॥ १ ॥ यावे तेणे घ्यावे । न सरेसे केले सदाशिवे । पात्र शुद्ध पाहिजे वरवे । मगळभावे सकळ हरि म्हणा रे ॥ २ ॥ मध्ये हे काहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें । नेदी नाचो मतांचिया थळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वे हरि म्हणा रे ॥ ३ ॥ तु गाथा ३०
२३४ सार्थ तुकारामगाथा हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली । विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥ ४ ॥ तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ । या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शने ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सत्र-अन्नछत्राचे स्थान, पन्हे-पाणपोई, आर्त-इच्छा, न सरेसे-न संपणारे, आंबिली- नबील, नाचणीचे पीठ आंबवून केलेला पातळ पदार्थ, तराळ-सेवक, महार अर्थ - बंधुनो, मी हे अन्नाचे सत्र घाटात मार्गाने जाणाऱ्या यात्रेकरूसाठी घातले आहे ही पाणपोई त्याच्यासाठीच आहे इच्छामोजनाची इच्छा पुरविण्यासाठी हे माझे अन्नसत्र आहे. १ ज्याने येथे यावे त्याने त्याचा लाभ घ्यावा सदाशिवाच्या, महादेवाच्या कृपेने हे कधी न संपेल असे आहे. पण तुमचे पात्र मात्र चांगले व शुद्ध हवे मगल भावाने सर्वजणांनी श्रीहरीच्या नावाचा उच्चार करावा २ हे नाम काही एकटेच मुक्त असे नाही चार वेदाच्या साक्षीहून हे निराळे आहे एवढेच निरनिराळ्या मताच्या मळावर हे कुणात नाचू देत नाही हे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व महान तत्त्वापेक्षाही महान असे आहे यासाठी श्रीहरीच्या साक्षीने याचा जयजयकार करा ३ ही हरिनामाची आंबोल असून सर्व जगास पोटभर पुरेल एवढी केलेली आहे ही कल्पतरूची सावली विश्रांती देणारीच समजा ना सर्व वर्णांनी हिचे सेवन केल्यास उत्तमच आहे. चला यासाठी सर्वजण हरहर महादेव म्हणू या ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी या श्रीहरीचा दवंडी देणारा सेवक महार आहे. सर्वजणांना हाका मारून सांगत आहे, या सर्वजण. या महादेवाच्या शिखराच्या तळाचे दर्शन घेऊ चैत्राच्या पर्वकाळात या महादेवाचे दर्शन घेऊ या ५ विवरण - या अभंगातील महादेवाचा संबंध शिखर शिंगणापूरचा आहे तेथे चैत्रात मोठी यात्रा भरते महादेवास पाणी घालून अभिषेक करण्यात येतो सर्व वर्णाना ही उपासना सुलभ असल्याची घोषणा वारकरी पंथाच्या धोरणास अनुसरूनच आहे. 'अणु अगोरणीया आगळें । महदि महदा' हे शब्द कठोपनिषदातील 'अणोरणीयान्महतो महीयान्' या सूत्राशी जुळणारे आहेत 'अणुरेणा थोडरा । तुका आकाशाएवढा' असे त्यांनी दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहेच वरील दान व पुढील एक असे तीन अभंग कावडीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत या सबंधीची थोड- क्यात हकीकत अशी की तुकाराम महाराज एकदा शंभुमहादेवाच्या यात्रेस निघाले होते गंगाधरपंत मवाळ व मताजी तेली असे दोघेजण बरोबर होते सातव्या दिवशी त्यांना शंभुमहादेवाचे शिखर दिसले. पायथ्याशी शिंगणापूर क्षेत्र लागले तेथील सरोवरात त्या सर्वांनी स्नाने केली स्वयंपाक करून भोजनास बसणार, इतक्यात एक अतिथी भिक्षेकर्याच्या वेषाने तेथे आला व भोजन करून तृप्त होऊन अदृश्य झाला बुवांना वाटले, अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष कैलासपतीच भोजन करून गेला जेवण करून मग डोंगरावर जाऊन सर्वांनी शंभूचे दर्शन घेतले तुकाराम महाराजांनी महाद्वारात कीर्तन केले व त्यावेळी वरील कावडीचे अभंग प्रेमाने म्हटले पाच रात्र तेथे राहून मग त परत देहूस आले ४५२ आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळवितो देवा तया नमो ॥ १ ॥ नमो तीर्थपंथें चालती तयासी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥ २ ॥ नमो तया सत्यवचनीं विश्वास । नमो भावे दास्य गुरूचें त्यां ॥ ३ ॥ नमो तया मातापित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥ ४ ॥ नमो तया जाणे आणिकांचें सुखदुःख । राखे तान भूक तया नमो ॥ ५ ॥ परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियासि ॥ ६ ॥ तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- बोल्हावितो-बोलावितात, आणिकांचे-दुसऱ्यांचे, तान-तहान, राखो-दूर करतो. अर्थ :- बंधूंनो, जे देहभावाविषयी उदासीन झाले आहेत व जे त्या देवास सदैव आळवीत असतात त्यांना नमस्कार असो. १ जे तीर्थयात्रा करण्यासाठी त्या मार्गाने चालतात व जे त्या मार्गास येतात त्यांना बोलावितात त्यांना नमस्कार असो. २ ज्यांचा विश्वास संतवचनांवर नेहमी असतो व भक्तिभावाने जे सद्गुरूचे दास्य करितात त्यांना नमस्कार असो. ३ जो आपल्या मातापित्याचे नीट पालनपोषण करतो व जो नेहमी सत्यवचन बोलत असतो त्यास नमस्कार असो. ४ जो दुसऱ्यांचे दुःख जाणून त्यांची तहान भूक दूर करतो त्यासही नमस्कार असो. ५ जो परोपकारी पुण्यवंत आहे व जो इंद्रियांचे दमन करतो त्यास नमस्कार असो. ६ तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या दासास नमस्कार असो. कारण माझे सर्व इच्छा त्यांच्याजवळच पूर्ण होत असते. ७ ४५३ आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये फळीं क्रियाहीन ॥ १ ॥ थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वर्णिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ २ ॥ बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥ ३ ॥ विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांस फळी मांडोनियां ॥ ४ ॥ गांविचिया देवा नाहीं दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना ॥ ५ ॥ सदा¹ सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥ ६ ॥ खासेमध्यें धन पोटासि बंधन । येणें ऐसा दानधर्म कांही ॥ ७ ॥ तुका म्हणे नटे दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :- फळीं-कलियुगात, पित्रांस-वडील माणसांस, अतीत-अतिथी, खासेमध्ये-स्वतःचे. अर्थ :- बंधूंनो, या कलियुगात जे कोणी क्रियाभ्रष्ट झाले आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी मी ब्रीद घेतले आहे. १ असे जे कुणी असतील त्यांच्या तोंडावर थुंकावे. त्यांची थोरवी कुणी वर्णन केली तरी ती अगदी व्यर्थ आहे असे समजून सोडून द्या. २ हा अधम मनुष्य बायकोचा दास झालेला असून वडील माणसांविषयी मात्र पूर्ण उदास असतो यांच्या दारात भिकाऱ्यांना कधीही भिक्षा मिळत नाही. ३ काही थोडीफार विद्या शिकून निरनिराळे वाद खेळतो व दुसऱ्यांना हा छळोत असतो. ४ गावातील देवाला हा चुकूनही नमस्कार करीत नाही. ब्राह्मण, अतिथी यांचा हा कधीच सत्कार करीत नाही ५ सदासर्वकाळ हा साधुसंतांची निंदा करीत असतो व गोविंदाचे स्मरण स्वप्नातही हा कधी करीत नाही ६ याचे स्वतःचे असे पुष्कळ धन असते; पोट बांधून त्याचे हा जतन करतो, पण कधी दानधर्म करावा असे याच्या मनात येत नाही ७ तुकाराम महाराज म्हणतात, हा नाना- प्रकारची सोंगे दाखवून नटत असतो पण भक्तिभावाने कधी याचे अंग लवले आहे असे दिसत नाही ८ ४५४ आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥ १ ॥ समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥ २ ॥ काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥ ३ ॥ चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखारयाच्या सारिखे ॥ ४ ॥ १ सर्व काळ करी संतांचिया निंदा.
७३६ सार्थ तुकारामगाथा गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्वरु ॥ झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥ ५ ॥ कूर्ूम नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥ ६ ॥ गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥ ७ ॥ सोने नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चमांतु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ॥ ८ ॥ मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वेच्छेनें ॥ ९ ॥ गाव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥ १० ॥ कृष्ण नव्हे भोगी । शकर नव्हे जोगी । तुका पाडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥ ११ ॥ शब्दार्थ व टीपा - तनु-शरीर, मातु-गोष्ट, शेष-सर्पांचा राजा, वासुकी-सर्पाचा राजा नंदिकेश्वरु- शंकराचा नंदी, गवाक्ष-गाईचा डोळा पाटाव-रेशमी वस्त्र कृष्णाजिन-हरणाचे कातडे व्याघ्रांबर-वाघाचे कातडे, गोमती-द्वारूर येथील तीर्थ अर्थ - अहो बहुनो, गंगेचे पाणी हे काही इतर नद्याच्या पाण्यासारखे नाही त्याचे पावित्र्य विशेष प्रकारचे आहे तसेच वड व पिंपळ याची झाडे इतर झाडासारखी नव्हेत तुळशीची व रुद्राक्षाची माळ इतर माळा- सारखी नव्हे ५, सर्व गोष्टी त्या श्रेष्ठ परमेश्वराच्या शरीराप्रमाणेच होत १ समुद्र हा इतर नद्याप्रमाणे नव्हे. शिवलिंग पाषाणाचे असले तरी तो काही पाषाण नव्हे, त्याचप्रमाणे संत हे जगातील इतर लोकासारखे नव्हेत २ वेताची काठी ही इतर काठीसारखी म्हणू नये सातु इतर धान्याप्रमाणे समजू नयेत राम राम हा जप इतर शब्दासारखा नाही ३ इतर ताऱ्याप्रमाणे चंद्र व सूर्य यांना समजू नये मेरु पर्वत इतर पर्वताप्रमाणे सांधा नाही, शेष व वासुकी हे इतर सामान्य विषारी सर्पाप्रमाणे नाहीत ४ गरुड हा काही सामान्य पक्षी नव्हे शंकराचा नंदी हा काही इतर बैलासारखा नाही, इतर झाडाप्रमाणे कल्पतरूही नव्हे, इतर गाईसारखीच कामधेनू समजू नये ५ भगवंताचा अवतार कूर्मकासव हे इतर कासवाप्रमाणे नाही, वराह म्हणजे डुक्कर खरा, पण तो इतर डुकरा- प्रमाणे नाही सर्व जीवाप्रमाणे वासुदेव नव्हे ही लक्ष्मी साधी स्त्री म्हणू नये ६ इतर सामान्य हाडात गवाक्ष- गाईच्या डोळयाची गणना करू नये रेशमी वस्त्र हे इतर कापडाप्रमाणे कसे असेल ? परीस इतर दगडासारखा नाही जे जे सगुण म्हणजे विशेष गुणांनी युक्त आहे ते ते ईश्वराचे अंग मानावेत ७ सोने हा धातु इतर धातू- पासून वेगळाच मानायला हवा साध्या रेतीवाळूपेक्षा मीठ वेगळेच असते कृष्णाजिन व व्याघ्रांबर हे इतर प्राण्याच्या चामड्याप्रमाणे नाही ८ मुक्ताफळांची, मोत्याची किंमत गारगोटीशी कशी होईल ? हिऱ्याची सर खड्यांस कशी येईल ? जीव हा त्या शिवाचा अंश असल्याने तो आपलाच समजून सोप्याप्रमाणे त्यास वाटेल तसे वागविणे युक्त होणार नाही ९ द्वारका हे गाव इतर गावाप्रमाणे नव्हे रणछोडाची मूर्ती ही इतर मूर्तीसारखी नाही गोमती हे तीर्थ इतर तीर्थांहून फारच वेगळे आहे तिच्या दर्शनानेच मोक्ष घडतो १० श्रीकृष्ण हा काही वरवर दिसतो तसा भोगी नाही, शंकरही त्याने अंगाला राख फासली असली तरी इतर जोग्याप्रमाणे तो नव्हे तुकाराम महाराज म्हणतात, पाडुरंगाच्या प्रसादाने हा फरक मला समजला आहे ११
विवरण - या सुदर अभंगात एक तत्त्व तुकारामबुवांनी फार चांगल्या प्रकारे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे श्रीकृष्ण व शिवशंकर यांची एकरूपता वर्णन करणे व तसे ऐक्य प्रस्थापित करणे हे तर भागवत संप्रदा- याचे धोरण होते. पण कृष्ण व शिव यांच्या वरवरच्या आचरणावरून त्यांना इतर सामान्य माणसाप्रमाणे समजू नये हे पटविण्यासाठी तुकारामबुवांनी अनेक उदाहरणे या अभंगात दिलेली आहेत. ज्या वस्तूस ईश्वराचा स्पर्श झाला आहे, अथवा जीत ईश्वरी तत्त्वाचा वास अंम आहे ती स्वजातीयापासून वेगळीच मानावयास हवी तुकोबांचा हा सामर्थ्याने शोभणारा अभंग वाचून भगवद्गीतेमधील विभूतिविस्ताराच्या निरुपणाचा प्रसंग आठवतो सर्व जगत्, स्थिरचर वस्तू यांची अभिव्यक्ती एकाच ईश्वरी तत्त्वापासून असली तरी ज्या वस्तूत परमेश्वराचा दिव्यांश विशेष रूपाने असतो त्या वस्तू आपल्या वैशिष्ट्याने वेगळयाच दिसतात व असतात, जी जी वस्तू वैभव, लक्ष्मी, प्रभाव, ईश्वरसान्निध्य, किंवा ईश्वरस्पर्शित आहे ती वेगळीच म्हटली पाहिजे
सौऱ्या – अभंग ११
४५५ वेसन गेले निष्काम जाले नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥ १ ॥ त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावले घालिती गळां ॥ २ ॥ जन वेपा भीते तोडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥ ३ ॥ वेगळया याति पडिलो संतीं अवघ्या एका भावे । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवे ॥ ४ ॥ सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । धाय तुंबामूढासवे भक्ती नाचो भावा ॥ ५ ॥ म्हणे तुका टाक रुका नाचो निर्लज्जा । बहु जाले सुख काम चुकलो या काजा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सौरी-निर्लज्ज स्त्री, चोचाल स्त्री, भावीण, मुरळी, देवदासी, वेसन-व्यसन, सावलें-वस्त्र, धाय-व्यर्थ
अर्थ :- सकामातेचे माझे व्यसन आता संपले. मी आता निष्काम झाले आहे त्यामुळे मी नारीही नव्हे व पुरुषही नव्हे, अशा स्थितीत आहे आपल्या स्वरूपाची संगत कमी होऊन परपुरुषाची म्हणजे परमेश्वराची जडू लागली की सौऱ्याच्या संगतीने असा प्रकार घडून येतो १ त्या श्रेष्ठ पुरुषाचा मला छंद एकसारखा लागल्यामुळे मी हरी, गोविंदा असे पुनः पुनः म्हणत आहे मग माझ्या पाठीमागे माझे सगेसोयरे मला हसत असतात व रागाने गळघात वस्त्र घालतात २ लोक आमच्या वेषाला भितात, आमच्या भाडखोर स्वभावामुळे कोणी आमच्या तोंडास लागत नाहीत. पण कमरेवर हात ठेवून भीमा नदीच्या तीरावर जो पंढरीराया उभा आहे, त्याच्याशी मी रमले आहे ३ त्याचीच एकाची भाव धरून भक्ती केल्यामुळे आमची जात वेगळी झाली. आम्ही देहभावाची व संसाराची लाज जीवाशिवाच्या ऐक्यासाठी सर्व सोडून दिली आहे. ४ सर्वांहून जी श्रेष्ठ बुद्धीची आहे तिची सेवा आम्ही मनोभावे करू, मोठ्या भक्तिभावाने नाचू व्यर्थ मूर्खाबरोबर न राहू ५ तुकाराम महाराज म्हणतात, पैशासाठी निर्लज्जपणे नाचण्याचे सोडून दे या कामातील तुझे लक्ष कमी झाले म्हणजे कायमचे सुख होईल ६
२३८ सार्थ तुकारामगाथा ४५६ आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा¹ वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥ १ ॥ तैसा नव्हे घाला आवरों मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ २ ॥ बाहिरल्या येषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥ ३ ॥ तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी यांयां हा ना तोसा ठाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मुंढा-हिजड्याचा सोबती, हा ना तोसा-ना स्वार्थाचा, ना परमार्थाचा. अर्थ :- दुसऱ्यांना उपदेश देऊ नये. आपणच काय नाचायचे ते नाचावे. या मार्गास लागलेला सोबती मुढा हाही वायाच गेलेला असतो. त्याला लोक हसतात १ तेव्हा त्याच्याप्रमाणे खोटाच चाळा न करता मन आवरून धरावे. दृष्टी सावरावी. पुढे गेले आहेत त्यांचे गुण कौतुकाने घ्यावेत. २ बाहेरचा चांगला वेष काय उपयोगाचा ? आतील विकार जसेच्या तसेच असले तर ते झाकलेले बरे. बाह्य वेषाने पोट तरी भरेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपला भाव शुद्ध कराल तर बरे. नाही तर वाया जाल. ना स्वार्थ, ना परमार्थ अशी अवस्था तुमची होईल ४ ४५७ टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें शिवी ॥ १ ॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाही या गोविंदें माझें मजसी केलें ॥ २ ॥ कोरडे ते बोल कां गे वेचितेसी वांयां । थतें करूनि दावीं तुझ्या मुळींचिया ठाया ॥ ३ ॥ याजसाठीं म्या डोर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खांती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रुका-अभिमान, गोवी-गुंतवणूक, डौर-एक वाद्य, डमरू अर्थ :- अग रांडे, तू देहाचा अभिमान सोडून दे ना ह्या गुंतवणुकीत का राहतेस ? चल मजबरोबर मी ह्या अभिमानाचे स्थान सोडून दिले आहे म्हणून तर तुला शिवी देत आहे १ या गोविंदाने माझा मीपणा नाहीसा केला; म्हणून आता याच्याच नादाने मोठ्या मस्तीने व गमतीने याच्या संगतीत नाचू या. २ तू तुझ्या अंतःकरणांतील हे कोरडे बोल व्यर्थ का खर्च करतेस ? तुझ्या मूळच्या ठिकाणी ते प्रकट करून दाखोव ना. ३ यासाठीच मी हातात हा डोर धरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या अभिमानाची ही गाठ मला आता सोडवायची आहे. ४ ४५८ मोकळी गुंत रितो कुंथ्ये नाहीं भार दावें । घेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥ १ ॥ ऐका बाई लाज नाहीं² आणिकां त्या गरतीची । समाधानों उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ २ ॥ १ मुदा, २ काही
न बोलतां करी चिंता न मारितां पळे । वादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥ ३ ॥ देखत आंध बहिर कानों बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रिती-रिकामी, धेडवाडा-महारवाडा, गरतीबो-कुलीन स्त्रीची अर्थ :- ही मोकळी असून गुंतली आहे. दर डोक्यावर कांही ओझे नसूनही भाराने कुथत आहे आणि आपल्याच देहभावाच्या छोडघामध्ये, देहरूपाम्च्या महारवाड्यात अडकून बसली आहे. १ आणि एक बाई, त्या कुलीन स्त्रीची लाज तुला वाटत नाही का ? ती पतीची सेवा करुन कशी समाधानात उंच ठिकाणी असते. २ कुणी काही रागाने बोलत नसताही चिंता करणे व कुणी मारीत नसताना पळून जाणे, शेजेवर आपला नवरा न आवडणे हे जगझोडीचे, चवचाल स्त्रीचे चाळे असतात. ३ देव पाहात नसल्यामुळे याचे डोळे आंधळेच असतात. त्यांची कीर्ती कानावर येत नसल्याने ते बहिरेच असतात, त्याची स्तुती तोंडात नसल्याने ते मुके असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची माणसे नरकलोकाचेच पाहुणे झाले आहेत ४ ४५९ सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारों नाचों फेर घरा ॥ १ ॥ या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटों काशासाठीं हिंडों पाटी बुकानें ॥ २ ॥ अवघ्या जणी मुंडा धणी नाचों एकें घाईं । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळींचिया ठाया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सातें-बाजारात, वोळगो-शरण जाऊं अर्थ :- शायांनो, चला बाजारात जाऊ डोळ्यात काजळ घाला, तेलफणी नीट करा. समोर पारावर दारात दिवाणजी बसले आहेत त्याच्या भोवती फेर धरून नाचू या. १ या साहेबाचे आपणांस वरचेवर कर्ज झाले आहे, देणे आहे. ते एकदा देऊन टाकले म्हणजे मग पुनः वरचेवर यायला नको. आता बाजारात त्याच्यासाठी मग दुकानांतून हिंडावे लागणार नाही. २ या निर्विकार धन्याभोवती आपण सर्वजण फेर धरून नाच करू या या एका ठिकाणी जर सुख मिळाले तर मग निरनिराळ्या ठिकाणी जाण्याचा चाळा उगाच कशासाठी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, चिंता व मायाममता सोडून यासच शरण जाऊ. याच्यापाशी सर्व काही सांगून याच्या मूळ गांवे जाऊ या. ४ ४६० सोरी सुर जालें दुर डोर घेतला हातीं । माया मोह सांडवले तीही लोकीं जालें सरती ॥ १ ॥ चाल धिठाबाई अवघो पांज¹ देईं । न घरीं गूज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ २ ॥ हिंडोनि चौऱ्याशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रूपयासाठीं आंचवलें संसारा ॥ ३ ॥ १ पाच.
२४० सार्थ तुकारामगाथा लाज मेली शंका गेली नाचोँ महाद्वारीं। भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥ ४ ॥ जालें भांडीं जगा सांडी नाहीं भीड चाड। घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥ ५ ॥ तुका म्हणे रुकारो संसारतुटी। आतां तुम्हां आम्हां कैसी जालो जीवे साटीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुर-शूर, दुर-दुरावले, पांज-पंचभूतात्मक देह, सावले-वस्त्र, भांडी-भांडण अर्थ :- हातामध्ये ढोर घेऊन मी शूर सौरी झाले आहे. सर्व प्रकारचे मायामोह सोडून मी तीनही लोकांना श्रेष्ठ ठरले आहे. १ विठाबाई, हा देह पंचभूतात्मक आहे. पण वाळवंटात या पंढरपुरास आले असता काही गुप्त गोष्ट मनात ठेवू नकोस. २ चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे जन्म हिंडून मी आज शेवटी तुझ्या घरी आले आहे; तुझ्या नामाच्या एका रुक्यासाठी मी माझा संसारही सोडून दिलेला आहे. ३ माझी सर्व लाज संपली; शंकाही दूर झाली; मी आता या महाद्वारात नाचत आहे. भ्रांतीचे वस्त्रही मी आता टाकून दिले आहे. आता देहभावाचे काय तसे उरले आहे ? ४ सर्वांशी माझे भांडण झाल्यामुळे मी सर्व जगाचा संबंध सोडून दिलेला आहे. मला आता कुणाचीच भीडभाड नाही. आता मी तुझ्याच चरणांवर मिठी घालून माझ्या जीवाची इच्छा पूर्ण करीन. ५ तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या नामाचा रुका मला प्राप्त झाला म्हणजे संसार संपून जाईल व जीवावर उदार होऊन तुमची-आमची कशीतरी भेट होईल. ६ ४६१ सम सपाट बेसरूकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥ १ ॥ गाऊं रघुरामा हेंच उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ २ ॥ ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥ ३ ॥ सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥ ४ ॥ लाज भय क्षणो नाहीं तजियेली दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचींच कोणी ॥ ५ ॥ तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सर्वै असों एकपणें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कुडपीयेला-व्यापून टाकला, सर्वे-बरोबर. अर्थ :- सर्व संग सोडून, सर्व व्यसने संपवून मी निःसंगपणाने सौरी झाले आहे. आता हा देश मीच एकटीने व्यापला असल्याने दुसऱ्या कुणास येऊ देणार नाही इथे. १ आता त्या रघुरामाचे नामस्मरण गाऊ हेच एक काम आम्हांस उरले आहे. आता आम्हास आमच्या जिवाचीही काळजी नाही, की धनदौलत व नातेवाईक लोक यांची चिंता नाही. २ हा सर्वच देहभाव संपलेला असल्यामुळे आता त्यास झाकून काय उपयोग ? आता कुणासाठी लाज धारण करायची ? त्याच्यावाचून आता पाहणारे तरी दुसरे कोण आहे ? ३ सौऱ्यांच्या संगतीने आम्हांला हे जग दुरावले आहे; पण त्यामुळे फार वेगळ्या प्रकारचे सुख आम्हांस मिळून त्याने आमच्या मनाचा भाव पालटला आहे. ४ आता लोकांची भीती व लाज दोन्ही आम्ही सोडून दिली आहे. आता आम्ही पूर्वीचा वेषही टाकून देऊ.
सार्थ तुकारामगाथा २४१ दुसरा वेष धारण केल्यामुळे आम्ही आतां कुणाचेही नव्हें ५ तुकाराम महाराज म्हणतात की, ही सोरी म्हणते, हा वेष ज्याने आम्हांस दिला त्याच्या भावाने आम्ही या जनाबरोबर एकट्याने राहू. ६ ४६२ नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळेचि ठेलों ॥ १ ॥ चाल रघुरामा ने आपुल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ २ ॥ जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥ ३ ॥ बहुता पाठीं निरोप हातीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पिशुनाचे-चहाडखोराचे, सहोदरें-सख्खे भावंडे अर्थ - आम्ही पुरुषही नाही व स्त्रीही नाही. आम्ही संसारासही आंचवलो आहोत. लाज टाकून देऊन, निष्काम होऊन, आम्ही या लोकांपेक्षा निराळेच झालो आहोत. १ रघुनाथा, तू आम्हास तुझ्या गावी घेऊन जा. तुझ्याशिवाय आम्हास कोण रे आता सोबतीचे सोयरे आहेत ? २ या लोकांचे प्रवाद, लोकांची निंदा, चहाडखोर लोकांचे फजितीचे बोलणे, देवा, तुझ्यासाठीच सहन करू रे. आमची भावंडेही तुजसाठीच अंतरली आहेत. ३ आज पुष्कळ मोठ्यांच्या बरोबर तुला मला घेऊन जाण्यासाठी निरोप पाठविला तुकाराम महाराज म्हणतात, ही सोरी लौकिक लाज सोडून तुझ्यासाठीच भक्तिभावाने उत्सुक आहे. ४ ४६३ नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥ १ ॥ ते सोरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ २ ॥ चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुपयाची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥ ३ ॥ थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥ ४ ॥ आंत मांग बाहेर चांग । सोरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥ ५ ॥