भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

Here is the complete Devanagari text transcription of the page:

सार्थ तुकारामगाथा २६१ षा ? २ उशीर झाला, उशीर झाला, असे म्हणावे का ? आईने बालकाविषयी कधी राग धरू नये. ३ देवा, तुझ्या संगतीत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व गोपाळ मिळून तुझ्या नामाची गर्जना करून आनंद लुटू. ४ ५१३ कळस वाहियेला शिरों । सहस्रनामें पूजा करीं ॥ १॥ पीक पिकले पिकले । घन दाटोनियां १ आले ॥ २ ॥ शेवटींचें दान । भागा आला नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट । भरले वारले बोभाट ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कळस-मुकुट, बोभाट-तक्रार, वारले-निवारण झाले अर्थ :- या देवाने आपल्या मस्तकावर मुकुट धारण केलेला आहे. या देवाची मी सहस्र नामांनी पूजा करीत आहे. १ पाच्या नामस्मृतीचे पीक अफाटपणे पिकले असून त्याची छाया सर्वत्र घनदाटपणे पसरली आहे. २ शेवटचे दान म्हणून हा नारायणच आमच्या वाट्यास आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या प्राप्तीमुळे आमचे पोट भरले आहे आणि इतर सर्व तक्रारी निवारण झालेल्या आहेत. ४ विवरणः-हा व याच्या आधीचे पाचसात अभंग हे तुकोबांच्या मनाच्या तृप्तीची भावना दर्शविणारे आहेत. पंढरीनाथाची आरती वगैरे झाल्यानंतर संतुष्ट चित्ताने देवाची करुणा भाकावी, त्याचे ऋण मान्य करावे, त्याचा प्रेमाने निरोप घ्यावा, पुन्हा त्याला एकचित्ताने आठवावे, त्याच्या प्रसादाची वाट पाहावी, त्याच्या उच्छिष्टाची आशा करावी इत्यादी भाववृत्तींनी हे सर्व अभंग आर्द्र झालेले आहेत. अर्थाला तुकोबांचे अभंग जितके सोपे, सरळ तितकी त्यात भक्तिभावाची आर्द्रता अधिक असते असे दिसून येईल या अभंगात 'सहस्रनामें पूजा करी' असा एक उल्लेख आला आहे तो महत्त्वाचा आहे भागवत संप्रदायात विष्णुसहस्रनामास पूर्वीपासून मोठेच महत्त्व आहे महाभारतातील अनुशासनपर्वाचा ४९ वा अध्याय म्हणजे महत्त्वाचा मानला जातो विष्णूचे सहस्रनामानी ध्यान करण्यास याचा उपयोग मोठाच असतो. 'नामाचेया सहस्रबरी । नावा या अवधारी । सज्जन्या संसारी तारू जाहलों' असा ज्ञानेश्वरांनी या सहस्रनामाचा उल्लेख केलेला आहे. 'सहस्रनामाचे वाटगें । साडीं घेतले नेटगे' असा याचा उल्लेख नामदेवानी केला आहे. तुकोबांच्याही पाठात हे सहस्रनाम 'नाव धड करा सहस्रनामाची', 'नाममंत्रमाळा । विष्णुसहस्र', 'सहस्रनामाची आरोळी', 'केली सहस्रांची माळ' इत्यादी उल्लेख तुकोबाच्या अभंगात इतरत्रही सापडतात. ५१४ आरुष शब्द बोलों मनौ न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुची आई ॥ १॥ देईं गे विठाबाई प्रेमभातुके । अवघियां कवतुके लहाना थोरां सकळा ॥ २॥ असो नसो भाव आलो तुझिया ठाया। पाहे कृपादृष्टी आता पंढरीराया ॥ ३॥ तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वाकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आरुष-अडाणी, बोबडे, भातुके-खाऊ अर्थ :- हे विठाई, तूच आमची आई आहेस. आम्ही अडाणीपणाने काही वेडेवाकडे व बोबडे शब्द बोललो असलो तरी तू ते मनात काही धरू नकोस आम्ही तुझीच लडिवाळ बाळे आहोत ना ? १ विठाबाई, आई, तू आम्हाला प्रेमाने, कौतुकाने खाऊ दे. सर्व लहानथोर भक्तांना कौतुकाने तू प्रेमाचा खाऊ दे ना २ आमच्या मनात भाव असो वा नसो, पण आम्ही तुलाच शरण आलो आहोत. पंढरीनाथा, तू कृपादृष्टीने आमच्याकडे पाहा ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही वेडीवाकुडी असलो तरी तुझीच आहोत. पण तू नामस्मरणाने संतुष्ट होऊन आमचे भवपाश तोडून टाक. ४ ५१५ आडकले देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥ १ ॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं अजगरा ॥ २ ॥ १ मोडोनिया.

२६२ सार्थ तुकारामगाथा देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥ ३ ॥ राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- फरकट-कटकट, उजगरा-जागरण. अर्थ :- चला. आता देवाचे दार बंद झाले आहे. येथे उगाच कटकट करू नका. १ चला, आता आपण आपापल्या घरी जाऊ. इथे उगीच जागरण करून गडबड नका करू. २ देवाला झोप लागली आहे. येथे उभे राहून काय साधणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे करण्याने देवास राग येईल. मग तो आपली सेवा घेणार नाही. तेव्हा चला सर्वजण घरी. ४ ५१६ कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥ १ ॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारु भवनदीची ॥ २ ॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तारू-नाव, परता-वेगळा, निराळा अर्थ :- हा श्रीकृष्ण माझी माता आहे. श्रीकृष्ण माझा पिता आहे. बहिण, भाऊ, चुलता, सर्व काही हा श्रीकृष्णच आहे माझा. १ हा श्रीकृष्ण माझा गुरु असून संसारसागर तरून नेणारी नावही हाच आहे. २ कृष्णच माझे मन व हाच माझे इष्टजन होय. माझे सोयरे वगैरे आप्तजन हाच श्रीकृष्ण आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण माझा एक विसावा आहे याच्यापासून जीव निराळा असे वाटत नाही. ४ विवरण:- श्रीकृष्णावर, विठ्ठलावर तुकोबांचा किती जीव होता याचा उत्कृष्ट पुरावा म्हणून या अभंगाचा देता येईल. बुवांचे सर्व जीवनच विष्णुमय, कृष्णमय होऊन गेले होते माता, पिता, बंधू, मित्र, सोयरा, गुरू, चुलता, बहीण इत्यादी सर्व नात्यांनी खरा असा एक श्रीकृष्णच होय या भावाचे अनेक अभंग मराठी संतांचे सापडतील. 'तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती । गण गोत मित्र तूं माझें जीवन', 'तूं माझी माउली तूं माझी साउली । तूं मज एकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव', 'मायबापबंधू सोयरा सांगाती । तूंचि माझी प्रीति गणगोत' या शब्दांतून तुकोबांनी श्रीकृष्णाचे व आपले नाते स्पष्ट केले आहे नामदेव-एकनाथ यांनीही परमेश्वरात आपली सर्व नाती पाहिली आहेत. 'मातापिता बंधुभगिनी इष्टमित्र विठ्ठला तूं रे' या शब्दात नामदेवानी या देवाची स्तुती केली आहे. ज्ञानेश्वरांनीही श्रीकृष्णास उद्देशून 'तू गुरु बंधू पिता । तू आमची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदों आमुतें' असे त्याचे स्तवन केले आहे. श्रीकृष्ण सर्व नात्यांनी आपला आहे हा भाव सर्वत्र उमटलेला दिसेल या भावाचे तात्त्विक अधिष्ठान अभंग क्र ४८६ च्या विवरणात पाहावे ५१७ कृपा करावी भगवंते । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥ १ ॥ माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ २ ॥ व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥ ३ ॥ तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पालवी-प्रेम, कृपा, गुंडा-प्रमुख अर्थ:- भगवंताने कृपा करावी व मला असा एक शिष्य द्यावा, १ की जो माझे हे हरिनामाचे व भक्तिप्रेमाचे व्रत पुढे चालवील असा हा शिष्य असावा त्यावरच तू प्रेमपूर्वक कृपा करावीस. २ माझा शिष्य ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत प्रमुख असावा. तीनही लोकात त्याची कीर्ती पसरून राहावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने मी माझ्या विठोबाच्या दारात उभा राहून हाका मारीत आहे. ४

सार्थ तुकारामगाथा २६२ ५१८ जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हंसी ॥ १ ॥ गेलो येतो नाहीं ऐसा । सत्य मानावा १ भरवसा ॥ २ ॥ नका काढू माझीं पेवे । तुम्हीं वरळा भूस खावे ॥ ३ ॥ भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥ ४ ॥ सांगाल जेवाया ब्राह्मण । तरी कापाल माझी मान ॥ ५ ॥ वोकलिया वोका । म्या खर्चिला नाहीं रुका ॥ ६ ॥ तुम्हीं खावे ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥ ७ ॥ नाहीं माझे मनीं । पोरे रांडा नागवणी ॥ ८ ॥ तुका म्हणे नीट २ । होते तैसे बोले स्पष्ट ॥ ९ ॥ शब्दार्थ व टीपा - निरवी-सोपवी, स्वाधीन करी, वरळा-फोलकटे व धान्य याचे मिश्रण अर्थ - कुणी एक संसारात आसक्त झालेला मनुष्य काशीयात्रेला निघताना म्हणत आहे, ' मी निघालो काशीयात्रेला गाई, घोडे, म्हशी याचा सांभाळ नीट करा तुम्ही मी ही जनावरे तुमच्यावर सोपवीत आहे १ मी गेलो की लगेच येतो गेलो असेही वाटणार नाही तुम्हास माझ्यावर विश्वास असू द्या तुमचा २ मात्र ध्यानांत ठेवा, मी गेल्यावर माझी धान्याची पेवे तुम्ही फोडू नका तुम्ही भुसा व फोलकटे याचेच अन्न खावे ३ दारात भिकारी आला तर हातात काठी घेऊन त्याच्यामागे लागा व त्याला हाकलून द्या ४ मी इथे नाही असे पाहून तुम्ही एखादा ब्राह्मण जेवायला सांगाल तर मग माझी मान कापल्याइतके दुःख मला होईल. ५ ओकारी किंवा याती होका दुखणे आले तरी मी त्याच्यासाठी, औषधासाठी एक पैसाही खर्च केलेला नाही असा पैसा मी जतन केला आहे ६ तुम्ही सर्वांनी नुसते ताकपाणी पिऊन राहावे , आणि तूपलोणी माझ्यासाठी ठेवून द्यावे ७ तुम्ही कुणी काही खर्च करू नका माझ्या राडापोरांची नागवण व्हावी असे माझ्या मनात नाही ८ तुकाराम महाराज म्हणतात, हा त्याच्या मनात जसे आहे तसेच स्पष्ट बोलत आहे ९ विवरण - आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, भगवद्भक्तीचा आनंद लुटल्यावर तुकोबा दुसऱ्याच्या सुखार्थ समाजातील दंभावर बोट ठेवून कडक टीका करीत असत लोकांना फसविणारे भोंदू गुरू पाहून त्यांना राग येई पण या भोंदू गुरूच्या नादी लागणाऱ्या बिचाऱ्या लोकांनाही कसे समजत नाही याचे त्यांना नवल वाटे नागवणींत, भक्तिप्रेम याचा सीधा साधा मार्ग सोडून सगळी व्यर्थ कर्मकांडात्मक कटकटीत सापडले होते कित्येकाच्या मनात संसाराची आसक्ती एवढी मोठी होती की, तिचे दर्शन त्यांच्या वरवरच्या पाठांत व तीर्थयात्रेतही स्पष्टपणे होत असे आंधळेपणानें रोगी संसारात, केवळ बाह्यांगांत बस गुरफटून राहिले होते याची उपरोधिक उदाहरणे तुकोबांनी अनेकदा आपल्या बोचक व मर्मग्राही शब्दात दिलेली आहेत या ठिकाणी एक वयोवृद्ध झालेला मनुष्य काशीयात्रेस निघणारा असून त्याचे चित्त संसारातील क्षुद्र वस्तूत कसे गुंतून राहिलेले आहे याचे मोठे विनोदी व उपहासगर्भ चित्र तुकारामानी दाखविलेले आहे एका संसारपाशात आसक्त झालेल्या एका पुरुषाचे हे चित्र पुढील एका अभंगातील एका स्त्रीच्या शब्दचित्राशी ताडून पाहण्यासारखे आहे एक आवा पंढरपुरास चाललेली असते, तिचेही चित्त संसारात कसे अनाठायी रमोत असते, याचे मोठे हृद्य व विनोदी पण विचारप्रवर्तक शब्दचित्र तुकारामांनी रंगविलेले पुढे अभंग नं ४२१९ मध्ये आहे. ५१९ कास घालोनी बळकट । झालो कळिकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥ १ ॥ या रे या रे लहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ २ ॥ १ माना श, २ नष्ट

कर्मीं गुंतले रिकामे । जपी तपी येयें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥ ३ ॥ एकदर शिक्का । पाठविला इहलोक । आलीं म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नीट-धीटपणे लढण्यास सिद्ध मुमुक्षू-मोक्षाची इच्छा करणारे, दमामे-नगारे, शिक्का-शिक्का अर्थ - बळकटपणे काचा घालून मी प्रत्यक्ष यमाशीहो लढण्यास धीटपणे सिद्ध झालो आहे संसाररूपी सागर तरून जाण्यास मी या नामस्मरणाची नावच तयार केली आहे १ या हो जे कोणी लहान, थोर, नर, नारी, कुठल्याही जातीचे, तुम्ही असा कुणासही इकडे येण्यास विचार करण्याची जरुरी नाही निश्चित मनाने यावे २ कुणी कामात आपापल्या व्यवहारात गुंतलेले असतील, कुणी रिकामे असतील, कुणी जप करण्यात गुंतले असतील, कुणी तपश्चर्येत व्यग्र असतील, कुणी मुक्त असतील, कुणी मोक्षाची इच्छा करणारे असतील सर्वांसाठी मी येथे विठ्ठलाच्या नामस्मरणाचे नगारे सुरु केले आहेत ३ या सर्व लोकांना एकच नामाचा शिक्का या लोकात उपयोगी असल्याने ईश्वराने पाठविला आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी या नामाचा धारकच येथे आलो आहे ४ ५२० आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्तावया ॥ १ ॥ झाडू संताचे मारग । आडरानें भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥ २ ॥ अर्थे लोपलीं पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । विषयलोभी मन । साधने बुडविलीं ॥ ३ ॥ पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वैकुंठवासी-श्रीविष्णूच्या वैकुंठात राहणारे साच-खरोखर, लोपलीं-लपली, शब्दज्ञाने- शाब्दिक ज्ञानाने अर्थ - खरे म्हणजे आम्ही वैकुंठात श्रीविष्णूरोबर राहणारे असून एका विशिष्ट कारणासाठी आम्ही या भूमीवर आलो आहोत पूर्वी ऋषिमुनींनी जे सांगितले तेच सत्यार्थाने सांगण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी आम्ही या पृथ्वीवर अवतरलो आहोत १ पूर्वीच्या सब साधुसंतांचे, ऋषिमुनींचे मार्ग आम्ही झाडून स्वच्छ करू जग आडरामाच्या बिकट मार्गाने चालले आहे पण त्यात आम्ही साधुसंतांच्या व प्राचीन ऋषिमुनींच्या उच्छिष्टारूपा भागाचे सेवन घडवून नीट सरळ मार्गावर आणू व आम्हीही तो भाग सेवन करू २ आज पुराणातील खऱ्या अर्थाचा लोप झाला असून केवळ शाब्दिक ज्ञानाने सब आयुष्याचा नाश आरंभिला आहे सर्वांच्या मनात विषयाचाच लोभ असल्याने सर्व महत्त्वाची साधन बुडाली आहेत ३ परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मात्र या भक्तीचाच डांगोरा पिटू या भक्तीचाच प्रचार करू यामुळे प्रत्यक्ष यमासही दरारा वाटेल चला त्या हरीच्या नामाचा जयजयकार मोठ्या आनंदाने करा ४ विवरण - तुकोबांचे आत्मप्रचीतीचे, आत्मसामर्थ्याचे, आत्मविश्वासाचे व आपण कोणत्या कार्यासाठी जन्मलो आहोत यासंबंधीच्या निश्चित जाणिवेचे जे काही अभंग आहेत, त्यात वरील दोन अभंगाना फारच महत्त्व आहे सर्व जातीच्या, सर्व पंथाच्या, सर्व वयाच्या स्त्रीपुरुषाना त्यांनी या भक्तिमार्गात पाचारण केले आहे या नामस्मरणाच्या मार्गावर त काचा घालून प्रत्यक्ष यमाशीही लढण्यास सिद्ध झाले आहेत त्यांच्या या सामर्थ्यामुळे

सार्थ तुकारामगाथा २६५ यमासही दरारा वाटू लागला आहे साधक, मुमुक्षु, प्रपंचिक कोणीही कोणत्याही पथातील असोत, नामस्मरणाचा शिक्का त्याच्यावर या कलियुगात बसावयास हवा, अशी त्याची इच्छा आहे यासाठीच भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी त सिद्ध झाले आहेत यापूर्वी आम्ही ईश्वराच्या सान्निध्यात, वैकुंठीच होतो हे बुवाचे वचन त्याच्या एकंदर चरित्रक्रमास व तत्त्वज्ञानास धरून आहे आपण प्राचीन ऋषीमुनी व साधुसंत याच्याच मार्गाने जात असून तीच परंपरा चालवीत आहोत असा स्पष्ट निर्देश त्यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे 'अंबरीष प्रल्हाद अंगद। उद्धव नामया नामाचा बोध ॥ हाचि भक्तीचा कळस । पिका आला ब्रह्मरस ।। सकल्प शतकोटी केलेसे। तुका म्हणे लाभले शेष ॥ झाला अवताराचा कळस । पिका आला ब्रह्मरस' या ओळींतून आपण अंबरीष, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव इत्यादींचेच वारसदार व अवतार आहोत असाच भाव प्रगट झाला आहे दुसऱ्या एका अभंगात त्यांनी आम्ही परमेश्वराच जुनेच मित्र आहोत असे सांगितले आहे 'आम्ही हरीचे सवंगडे । जुने ठावंचे वेडे वांगडे ।' आणखी एका अभंगात शुकाने समाधी लावली तेव्हा आम्ही तेथे होतो असे तुकोबांनी म्हटले आहे (अभंग क्र २७७८) आपण देवाचा निरोप घेऊनच आले आहात असे एका अभंगात (अभंग क्र ३४४) सांगितल्याचे आपण पाहिलेच आहे खऱ्याखोट्याचा निवाडा करून मार्ग स्वच्छ करण्यासाठीच आपण आले आहात, असही त्यांनी एका अभंगात म्हटले आहे (अभंग क्र ६१८) जन्मोजन्मी आपणास हेच काम कराव लागत असही त्यांनी एकदा स्पष्ट केले आहे 'मार्ग बहुता अन्नीं । हेंचि करीत आम्ही' असे त्यांनी निर्भिडपणे सांगितले आहे (अभंग क्र २३००) 'धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण । हेंचि आम्हा करणे काम' असा आपल्या आयुष्याचा हेतु त्यांनी एका अभंगात (क्र २१३६) स्पष्ट केला आहे. 'धर्म रक्षणासाठों । करणे आटी आम्हासी ।' असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे (अभंग क्र २६०) या सर्व आत्मप्रचीतीच्या व निश्चयात्मक भागाच्या अभंगावरून तुकोबांचे कार्य हे एक लोकोत्तर असे ईश्वरी काय हात असे मानाकयास हरकत नाही आपली वाणी 'नारायणीं मिश्रीत' आहे असेही त्यांनी एका अभंगात सांगितले आहे (अभंग क्र १३०९) 'मज विश्वंभर बोलवितो' हा त्याचा आत्मविश्वास प्रसिद्ध आहे (अभंग क्र १००७) याच अभंगात, 'वदवी गोविंद हेंचि यंदे' म्हणून त्यांनी स्वत च्या वाणीचे दिव्यत्व सूचित केले आहे 'संताचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें' असा त्याचा नम्र भाव आत्मविश्वासामारहित प्रगट झाला आहे (अभंग क्र ९१९) 'बोलविती देव मज,' परि त्या विश्वभरें बोलाविले अशा ओळींतून तुकोबांच्या अभंगवाणीचा प्रासादिक गुण सहज ध्यानात येणारा आहे आणि याच प्रासादिक वाणीमुळे व ईश्वरी बळामुळे तुकोबांना 'पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।' असा आत्मसामर्थ्याचा घोष करता आला जे आपण दुसऱ्यांना मागणार, साधकांना वा प्रपचिकांना मार्गदर्शनासाठी मागणार, त्याची प्रचीती स्वतःस आल्याखेरीज त्यास तेज पडत नाही, लोकाच्या मनावरही त्याचा परिणाम होत नाही परंतु तुकोबांना ही सर्व अनुकूलता प्राप्त झाली सद्गुरुनाथाची कृपा झाली नामदेवानी कवित्वाची जागृती दिली, ईश्वरसाक्षात्कार झाला, आणि मग तुकोबांच्या वाणीम आत्मप्रचीतीचे, ईश्वरी कृपेच तेज चढले 'तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे' अस सामथ्य मग त्याच्या अंगी प्रकट झाले 'गर्जूं हरिचे पोवाडे । मेळवूनि वैष्णव बागडे । घालू पायदळीं । कळीकाळ त्या बळें ।' यासारख्या शब्दांना धार आली ती तुकाराच्या सामथ्यमपन व आत्मविश्वाससम्पन्न देवा बळामुळे, 'सूर्याच्या परी । तुका लोकीं प्रौढा करी' हे सामथ्यवान बोर साध्या माणसाचे कसे असतील? खालील अभंगही असाच स्वाच्या सामर्थ्यवान वाणीचा निदर्शक असा आहे ५२१ बळियाचे अंकित । आम्ही जालो वळिवंत ॥ १ ॥ लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मिंचा मारा ॥ २ ॥ जन धन तन । केले तृणाही समान ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - षडूर्मिंचा-काम, क्रोध, मोह, लोभ, मद, आणि मत्सर या सहा मानसिक वृत्तींचा, अथवा शोक, मोह, जरा, मृत्यू, क्षुधा, व पिपासा या सहा उर्मी संसारसागराच्या लहरीप्रमाणे मान या आहेत तु गाथा ३४

२६६ सार्थ तुकारामगाथा अर्थ - आम्ही त्या बलवान प्रभूचे बक्ति झालो असल्याने आम्ही पण त्याच्याइतकेच बलवान झालो आहोत १ आम्ही संसारास लाथ हाणून षड्रिपूचा अथवा षडूमींचा नाश केला आहे. २ लोक, आप्तस्वकीय, धन, शरीर याना आम्ही गवताप्रमाणे क्षुद्र मानले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणि आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर उभे आहोत आम्हास मुक्तीची काही किंमत नाही ४ विवरण -याही अभंगात तुकोरावाच्या मनाचे सामर्थ्य प्रकट झाले आहे ईश्वराच्या सगतीने आपण एवढे बळवत झाला आहोत की मुक्तीचीही किंमत यापुढे त्याना वाटेनाशी झाली आहे माधुर्यताना मोक्षाची अथवा मुक्तीची महती भक्तीपुढे कधीच वाटत नाही ' सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करटा' असे तुकोबांनीच एके ठिकाणी म्हटले आहे जे बद्धताच मानायला तयार नाहीत त्यानी मुक्तीची वाटाघाट न करावी हेच युक्त होय. ५२२ मृत्युलोकी आम्हा आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥ १ ॥ विटलें हे चित्त प्रपंचापासूनी । वमन१ हे मनीं बैसलेसें ॥ २ ॥ सोनें रूपें आम्हा मृत्तिके समान । माणिके पाषाण खडे तैसे२ ॥ ३ ॥ तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हापुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परी-प्रकार, वमन-वाती, आव रिसाचिया परी-अस्वलोप्रमाणे अर्थ - या मृत्युलोकात आम्हास एका हरिनामाशिवाय दुसरे कोणतेही प्रकार आवडत नाहीत १ या प्रपंचापासून आमचे चित्त पूर्णपणे विटून गेले असून एखाद्या वातीप्रमाणे घृणा त्याच्याविषयी आमच्या मनात बसली आहे २ सोने, रुपे, आम्हा हरिदासांना मातीप्रमाणेच वाटते आणि रत्ने, माणके दगडाच्या खड्याप्रमाणे वाटतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे या बायका आमच्यापुढे येणाऱ्या एखाद्या भयानक अस्लो- प्रमाणेच वाटतील ४ ५२३ स्त्रियाचा तो सग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥ १ ॥ नाठवे३ हा देव न घडे भजन । लाचावले मन आवरे ना ॥ २ ॥ दृष्टिसुखें मरण इंद्रियाच्या द्वारे । लावण्य ते खरे दु खमूळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जरी अग्नि जाला साधू । परी४ पावे बाधूं संघट्टणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सग-महवास काष्ठा-लाकडाच्या, नाठवे-आठवत नाही अर्थ - नारायणा, या स्त्रियाची संगत मला नको ह्याचे रूपलावण्य कितीही असले तरी मी त्याना लाकडाच्या, दगडाच्या किंवा मातीच्या समानच मानीन १ कारण याच्या सगतीत देव कधी आठवत नाही, कधी भजन होत नाही , व लालचावलेले मन कधी आवरले जात नाही २ याच्या नुसत्या दृष्टीच्या सहवासानेही मरणच येते खरोखर अशा स्त्रियाचे सौंदर्य हे दुःखाचे मूळच समजावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, अग्नी हा साधू झाला तरी त्याच्याशी विशेष संघटन केल्यास त्यास आलिंगन दिल्यास अग पोळणारच. ४ ५२४ पराविया नारी ५रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायींचेचि ॥ १ ॥ जाईं वो तू माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हो तैसे ॥ २ ॥ न साहावे मज तुझें हे पतन । नको हे वचन दुष्ट वदो ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पराविया-परक्याच्या, ठायींचेची-प्रथमपासूनच अर्थ -बाई, परक्याच्या स्त्रिया आम्हास रखुमाईमातेसमान आहेत. हा नियम आमचा प्रथमपासूनच ठरलेला आहे १ माते, तू परत जा आम्हाला गुंतविण्याचे प्रयत्न तू करू नकोस, आम्ही हरिभक्त त्या वश होणाऱ्याच्या १ बैसलेस मनी रामनाम, २ जैसे, ३ अंतरे, ४ तरी, ५ माउली

सार्थ तुकारामगाथा २६७ जातीचे नाहीत, २ तुझे हे पापकृत्य मला सहन होत नाही. तुझ्या तोंडून येणारी ही दुष्ट वचनाची वाणी मला ऐकवत नाही तू असे बोलू नकोस ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर पती हवाच असेल तर गावात इतर लोक का थोडे आहेत ? त्यांच्यातील एखादा निवड ना ४ विवरण - वरील दोन अभंगांना तुकोबांच्या आयुष्यातील एका विशिष्ट प्रसंगाचा आधार सांगितला जातो. कुणी एक स्त्री त्यांच्याकडे विषयसुखाच्या प्राप्तीसाठी आली होती. तिला उद्देशून या अभंगाची निर्मिती झाली असावी. तुकोबांचा लौकिक जसजसा वाढू लागला तसतसा त्यांच्या भोवती अनेक स्त्रीपुरुषांचा जमाव जमत असावा. तुकारामबुवांच्या मुखावरील तेज पाहून, त्यांच्यापैकी एका रूपवान स्त्रीच्या मनात भलतीच वासना निर्माण झाली. तिला उद्देशून तुकारामांनी आपल्या हरिभक्तीचे जे मर्म सांगितले आहे, ते सर्वच प्रापंचिकांना व साधकांना उपयुक्त आहे. मोह, काम, क्रोध या वृत्ती नैसर्गिक उभ्या, पण त्यांचा आविष्कार यथोचित मार्गाने होणेच युक्त आहे. त्यांचा स्वैर संचार व्यक्तीला व समाजाला अहितकारकच होय 'दुभत्याची स्त्री मातेसमान' हे एक ब्रीदवाक्य मराठी साधू- संतांचे व श्रीशिवरायांचे होते. यातील मर्म फार मोठे होते. स्त्रीने समाजाचे स्थैर्य व नैतिक आदर्श यांच्यावर राष्ट्राची उभारणी होत असते. या दोन्ही अभंगांकडे अगदी साध्या प्रपंचिकाच्या दृष्टीने पाहिल्यावरही त्यातील मथितार्थ पटण्याजोगा आहे असे दिसेल. ईश्वरचिंतनात व आत्मसुखात तल्लीन झालेल्या महात्म्याला या शुचितेची केवढी गरज आहे हे सांगावयास पाहिजे असे नाही. त्याची दृष्टीच निवडून गेलेली असल्यामुळे स्त्री सर्व सौंदर्य हरिरूप आहे, माऊलीरूप आहे, हा अधिकार प्राप्त होणे अवघड असले तरी याच आदर्शाप्रत सर्वांना जावयाचे असते. ‘स्त्रियांचा तो संग नको नारायणा’ असे तुकोबा म्हणतात त्यावरून संदर्भ न जाणता व त्या अभंगातील रहस्य न ओळखता तुकारामबुवांचा किंवा एकूण संतांचाच स्त्रीविषयक दृष्टिकोन किती खोटा व चुकीचा आहे याचे विवेचन करण्याकडे प्रवृत्ती काही आधुनिक टीकाकारांची असते, ती रीती व्यर्थ आहे. हे संतांच्या वचनाचा चार- बाजूने अर्थ पाहिल्याशिवाय ध्यानात येणार नाही. स्त्रीमोहवासना, स्त्रीसौंदर्याचा एक प्रकारचा तिरस्कारच संतांच्या मनात असतो हे वरवर दिसने हे खरे आहे. ‘नको नको स्त्रियांचा सांगात । नको स्त्रियांचा एकांत । नको नको स्त्रियांचा परमार्थ । करिती आघात पुरुषासी’ असे थोर प्रपंचिक संत एकनाथ यांनी तरी का म्हटले आहे ? ‘स्त्रीसंगा तडफडूनि जाण । वैराग्यासी ये मरण’, ‘तेथ वासना उपदेश जाण । आली नागवण परमार्था’, ‘ज्ञानी पोळी धरितां हातीं । तैशी स्त्रियाशी संगति ।’ इत्यादी अनेक ओवींतून एकनाथांनीसुद्धा स्त्रीसहवासाची निंदा केलेली दिसने खरी. तुकाराम व रामदास यांनीही स्त्रीदेहाची यथेच्छ टवाळी वरवर केलेली दिसते. मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई या थोर स्त्रिया भक्तिमार्गात फार मोठ्या पदावर आरुढ झालेल्या असताना मग स्त्रीबद्दल असे उद्गार काढतात, याचा स्पष्ट अर्थ असा की अतिरिक्त स्त्रीसहवास प्रपंचिकानाही बाधक आहे. केवळ स्त्री, केवळ विषयभोग, केवळ कामसुखाची चटक यापासून साध्या प्रपंचिकासही बाधा होणारी आहे आणि साधकास, मग तो फार मोठी ऐहिक ध्येय मिळविणाराही असो, स्त्रीलोभ अतिशिक्तपणे किती बाधक होईल हे काय सांगावयास हवे ? नटूनथटून तुकोबांसारख्याही सत्पुरुषाकडे येणाऱ्या स्त्रीस तुकोबांनी या स्त्रिया काष्ठाच्या, पाषाणाच्या, मूर्तिवेच्या मी मानीन असेच म्हणणे यथायोग्य नव्हे काय ? ‘परस्त्रीया सदा मातृप्रायहिणी’, ‘परद्रव्य परनारीचा अभिलाष । तेणोनिया म्हार सर्व भाष्या’, ‘विटाळ तो परद्रव्य परनारी’ अशा वचनाचा श्वासोच्छ्वासां वर्षाव करून समाजास मार्गदर्शन करणाऱ्या तुकोबांनी पुढे येणाऱ्या नटव्या स्त्रीस कुणीतरी पती निवडून संसार कर, असा उपदेश केला हे यथायोग्यच झाले असे मानावे लागने. तुकोबांच्या किंवा संतांच्या स्त्रीविषयक मनाचा निर्णय याही अभंगा- वरून आता घेता येण्यासारखा आहे. ‘कोमल ज्ञानीं विखो विघ्न’ असे श्रीचक्रधरांचेही एक सूत्र होते. कोणत्याही ध्येयाच्या साधनासाठी विषयाचे विघ्नच असते. अगदी रोजचा प्रपंच करणाऱ्यासन्ही त्याचा अतिरेक बाधक आहे. माझी बायको, माझी मुले यांचाच ध्यास घेणाऱ्या गाढव प्रपंचिकांची चित्रेही तुकोबांनी उत्तम रीतीने रेखाटली आहेत. सर मग विषयसुखार्थ बुवांच्याकडे येणाऱ्या या स्त्रीसंबंधी बुवांनी त्यांचा खडतर स्वभाव ध्यानात घेता सौम्यच भाषा वापरली आहे असे म्हणावे लागते.

२६८ सार्थ तुकारामगाथा ५२५ भक्तप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥ १ ॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥ २ ॥ तुका म्हणे माझें जाळुनि संचित । करीं वो उचित भेट देईं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- भक्तप्रतिपाळे-भक्ति करणाऱ्याचा सांभाळ करणारा, गुणें-कारणाने, कपाळ-नशीब अर्थ :- विठ्ठल माऊली, तू दोनवत्सल व भक्तांवर कृपा करणारी कृपाळू माताच आहेस. १ कोणत्या कारणाने माझा तुला विसर पडला गे माय ? माझेच नशीब खोटें त्याला काय करू ? मीच अवगुणी आहे असे मला वाटते. २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे सर्व संचित कर्म जाळून, नाहीसे करून मला भेट देणे हेच तुम्हास उचित नाही काय ? ३ ५२६ तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥ १ ॥ लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटों ॥ २ ॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वास-वाट, लेखी-मोजीत आहे अर्थ :- पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोण सोयरे आहेत रे ? दुसरे कुणीही मला आणखी तुझ्याशिवाय आप्त नाहीत विठ्ठला १ मला तुझीच एक आशा लागली असून मी एकसारखी तुझी वाट पाहात आहे रात्र व दिवस मी हाताच्या बोटावर मोजीत आहे. २ मला काही काम गोड लागत नाही, की धंदा सुचत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला देवा, एकसारखे तुझेच ध्यान लागलेले असते. ३ ५२७ पहियंते आम्ही १तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावे हितगुज ॥ १ ॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे २जनतिये ॥ २ ॥ जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥ ३ ॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥ ४ ॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशी । ठावें आहे देसी मागेन तें ॥ ५ ॥ म्हणउनि पुढें मांडियेली आळी । यिकोनियां चोळी डोळे तुका ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पहियंते-आवडते, लळे-लाड, आळी-हट्ट, यिकोनिया-रडून अर्थ :- देवा, आम्हास जे आवडते ते आम्ही तुझ्यापाशी मागू व आमच्या जीवात असणारी हितगुजाची गोष्ट आम्ही तुला सांगू १ दीनावर दया करणाऱ्या वत्सल देवा, विठ्ठला, तू माझे हट्ट पुरविणार आहेस. तू वत्सल अशी माऊलीच आहेस २ आम्ही आमचा सर्व जीवभाव देवा, तुझ्या पायांवर वाहिला आहे. तूच सर्व ठिकाणी आम्हांस एकरूपाने दिसतोस. ३ आम्हांला विठ्ठला, दुसऱ्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस. मी आता दुसऱ्याच्या घरी जाणारसुद्धा नाही. ४ तुझ्या प्रीतीची सर्वसत्ता एकवटलेली असून मी जे मागेन ते तू देशील असा विश्वास मला आहे ५ म्हणून तर देवा, मी तुझ्यापुढे हा हट्ट धरलेला आहे. मी रडूनरडून डोळे चोळीत आहे. ६ ५२८ कोण पर्वकाळ पहाल तीथ । होते माझें चित्त कासावीस ॥ १ ॥ पाठवी भातुकें प्रेरीं ३झडकरी । नको राखौं उरी पांडुरंगा ॥ २ ॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥ ३ ॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥ ४ ॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥ ६ ॥ १ जयापें, २ होसी माये, ३ प्रेमें.

सार्थ तुकारामगाथा २६९ शब्दार्थ व टीपा :- तीप-मुहूर्त, तिथी, भातुके-खाऊ अर्थ :- देवा, माझे चित्त आता फार कासावीस होत राहिले आहे रे. तू ये ना. येण्यासाठी तू काय एखादी चांगली तिथी किंवा मुहूर्त पाहात आहेस काय ? १ देवा, तू आपल्या प्रेमाचा खाऊ मला लौकर पाठवून दे स्वतःच्याजवळ काही राखून ठेवू नकोस. २ विठ्ठला, मजवर कुठलाच राग धरू नकोस. मी अवगुणी व अन्यायी असलो तरी तुझा राग नसावा. ३ थोर झालेल्या व जाणत्या असलेल्या पोराप्रमाणे तू मजसारख्या नेणत्या मुलास का रडवितोस ? ४ तू नुसते कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस ? आपली धाकटी व लडिवाळ बाळे आहेत; त्यांची समजूत काढ ना. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता देवा, मी तुमच्या पदरास धरून पिछा घालीन व पकडून ठेवीन तुम्हांला. मग मात्र मी काही निराळा होणार नाही. ६ ५२९ कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्ट । कां मज हिपुटी करीतसा ॥ १ ॥ कंठीं प्राण पाहे वचनाची आस । तों दिसे उदास धरिले ऐसें¹ ॥ २ ॥ येणे काळें बुंथी घेतलीसे खोल² । कां नये विटाळ होऊं माझा ॥ ३ ॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हिपुटी-कष्टी, बुंधी-खोळ, घुगट, खोल-मोठी अर्थ :- देवा, तुम्ही माझ्याशी कसलीच गोष्ट का बोलत नाही ? मला असे तुम्ही दुःखी कष्टी का करीत आहात ? १ माझा प्राण कंठाशी आला असून मी आपली वाट एकसारखी पाहात आहे. पण तुम्ही तर उदास झाल्यासारखे दिसता आहात. २ या वेळी फार मोठी खोळ तुम्ही माझा विटाळसुद्धा होऊ नये म्हणून घेतली आहे असे दिसते. ३ देवा, मी तुमचा असे म्हणविताना मला लाज वाटू लागली आहे. कारण, तुम्ही नुसती फुकाची चौकशीही माझी कधी करीत नाही. ४ ५३० उचित ते काय जाणावें दुबळें । थोरिवेचें काळें तोड देवा ॥ १ ॥ देतौं हाका कोणी नाइकती द्वारी । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ २ ॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन काय वेचे ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजिरों नव्हों ऐसीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा : - उचित-इष्ट, योग्य, थोरिवेचे-जाणतेपणाचे, अतीता-अतिथीस. अर्थ - देवा, इष्ट काय आहे, उचित काय आहे ते मजसारख्या दुबळ्याने कसे जाणावे ? आणि जाणतेपणाचे तोंड तर या भक्तिमार्गात काळेच आहे. जाणिवेचा उपयोग नसतो. १ एखाद्या रिकाम्या घरी दारात उभे राहून अनेक हाका माराव्यात, पण त्या कुणी ऐकूच नयेत अशी स्थिती देवा माझी झाली आहे. २ दारी आलेल्या अतिथीस शब्द, नुसता आदराचा शब्दही पुरा पडतो, तो फुकटचा बोलायला काय खर्च होणे तुमचे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, तुम्हास हे शोभून दिसते, पण आम्ही मात्र इतके निलाजरे नाहीत. ४. ५३१ आम्ही मागो ऐसे नाहीं तुजपाशीं । जरी तूं भीतोसि पांडुरंगा ॥ १ ॥ पाहे विचारूनि आहे तुज ठाये । आम्ही घालों नांवें तुझ्या एका ॥ २ ॥ ऋद्धिसिद्धि तुझें मुख्य³ भांडवल । हे तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निर्दिचत⁴ सुख भोगूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विचारूनि-विचार करुन, घालों-मजूर झालों. १ तुम्हीं, २ खोळ, ३ मोल, ४ निवान्त.

सार्थ तुकारामगाथा २७१ ५३५ देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवोनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मग तुझ्या नामापुढें । तुच्छ हे बापुडें सकळी काळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- राउळीं-देवळात. अर्थ :- कमरेवर हात ठेऊन तू उभा आहेस, असा तुझ्या रूपाचा आकार मी सतुष्ट मनाने पाहात आहे. १ त्यामुळे माझ्या चित्तास केवढे समाधान होत आहे ! तुमचे चरण सोडावेत असे कधी वाटतच नाही. २ मुखाने मी तुमच्या स्तुतीचे गीत गाऊन आनंदाने टाळी वाजवीत आहे; व तुमच्या देवळात मोठ्या भक्तिसुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामापुढे मला बाकी सर्व तुच्छ वाटते. ४ ५३६ आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- येणेविण-या तुझ्या नामाशिवाय, वांयां-विनाकारण. अर्थ :- या देवाच्या एका नामाशिवाय आम्हांला कशाचीही जरूरी नाही आता व्यर्थ इतर बडबड तरी कशाला हवी ? १ आता जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगलेच समजून आले आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंतस्वरूप देवाला वाहिली आहे. आता बोलायचे काही कामच उरलेले दिसत नाही. ३ ५३७ वोलो अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥ १ ॥ भोगों त्याग जाला संगींच असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हों दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा¹ ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाग-संबंध, तैसा-दिसणारा. अर्थ :- जे न बोलण्यासारखे आहे, त्याच्याविषयीच आम्ही बोलू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत. १ सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनात त्यागबुद्धीचा उदय झालेला असून सर्व संगांविषयी असंग निर्माण झाला आहे. किंवा आमच्या दृष्टीने सर्व भोग व सर्व संग नारायणस्वरूपच झाल्यामुळे आपोआपच त्याग या असंग घडत आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवर दिसतो तसा खरे म्हणजे नाही. माझ्या खऱ्या रूपाविषयी तुम्हांस काही विचारायचे असेल, तर ते या पांडुरंगास विचारा ना. ३ ५३८ अधिकार तैसा दायियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-पलीकडे. अर्थ :- ज्याचा जसा अधिकार तसा त्यास मार्ग दाखविलेला आहे. असे त्या मार्गाने चालले असता त्यास समजून येईल. १ एकदा नदीपार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये. कारण मागाहून येणाऱ्यांना तिचा आधार म्हणून खूप उपयोग होण्यासारखा असतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याचे अंगी रोग नसले, तरी जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे बाळगीत असतो. ३ १ विठोबासी.

२७० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- पांडुरंगा, आम्ही जे मागणार आहोत ते तुझ्यापाशी नाही. म्हणूनच तू भीत आहेस असे वाटते. १ देवा, तू विचार करुन पाहा की, आम्ही तुझ्या नामानृताने संतुष्ट आहोत हे तुलाही माहित आहे. २ तुझ्या जवळ रिद्धी व सिद्धी पांचच माडवल आहे; पण ते आमच्या दृष्टीने तुझ्या भक्तीपुढे फुकट आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुझ्या वैकुंठाला घालत जाऊ व तिथे निवातपणे तुझ्या सहवासाचे सुख भोगत राहू. ४ ५३२ न लगे हें मज तुझें ब्रह्मज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥ १ ॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलास या ॥ २ ॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं ही ॥ ३ ॥ तुका म्हणे नको रागेजों विठ्ठला । उठीं बेगीं मला भेटी आतां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न लगे-नको, रागेजों-रागावू अर्थ :- देवा, तुझे ते ब्रह्मज्ञान व निर्गुणाचे ज्ञान आम्हास नको, तुझे साजिरे, गोजिरे रूपच मला आता पुरे आहे. १ देवा, मला भेटायला तू उशीर लावला आहेस. मी पतितांना पावन करणारा आहे, या वचनास तू विसरून गेलास वाटते ? २ देवा, मी तर सर्व संसार जाळून टाकून तुझ्या अंगणात येऊन बसलो आहे; पण याचे भान तुझ्या मनातही दिसत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, रागावू नका माझ्यावर. उठा, मला आता लवकर भेट द्या ना ४ ५३३ कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकाळ भोगीतसे ॥ १ ॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ २ ॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥ ३ ॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कमोदिनी-कमळ, परिमळ-सुवास, भ्रमर-भुंगे, तृण-गवत अर्थ :- देवा, स्वतःमधील सुवास कमळास काही येत नाही, जाणवत नाही. त्याचा भोग इतर भुंगेच घेतात. १ त्याप्रमाणे तुझ्या नामाची गोडी तुला कशी ठाऊक असणार ? त्याचे प्रेमसुख केवळ आमच्यासारख्या भक्तांनाच माहीत असते. २ गोमाता गवत खाते; पण त्यापासून निर्माण झालेले दूध मात्र तिच्या वासरासाठीच असते. त्याची गोडी तिच्या बाळालाच समजणार ज्याची त्यास गोडी उपयोगी पडत नाही हेच खरे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, शिंपल्याच्या पोटात मोती निघतात, पण ते त्यांच्या पोटांत आहेत तोपर्यंत त्याचे सुख उपभोगता येते. त्याप्रमाणे देवा, तुझ्या नामाचे सुख आम्हीच भोगणार. ४ ५३४ काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥ १ ॥ बोलतां हे कैंसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ २ ॥ आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निखतें सुख दोघें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ग्वाही-साक्ष, मायपुतें-मायलेकरांस, निखतें-खरे. अर्थ - देवा, तुमच्या चरणाच्या सुखासंबंधी काय सांगावे आम्ही ? तो सुखाचा अनुभव तुम्हांस येणे शक्य नाही. १ तुमच्या चरणसुखाचे वर्णन तुम्हास खरेही वाटणार नाही. अमृताचे गुण अमृतास कसे समजणार ? २ तुझ्या चरणामृताचे सुख किती अवर्णनीय आहे, याची साक्ष केवळ आमची आई श्रीलक्ष्मी किंवा रखुमाई व आम्ही तिची लेकरे यानाच देता येण्यासारखी आहे. ते सुख आम्ही दोघेच जाणू शकतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हांला तुमच्या ह्या मोक्षाचा फार कंटाळा आहे आणि हे तुम्ही जाणीत का नाही ? ४

सार्थ तुकारामगाथा २७१ ५३५ देवोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळी काळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- राउळीं-देवळात. अर्थ :- कमरेवर हात ठेऊन तू उभा आहेस, असा तुझ्या रूपाचा सत्कार मी संतुष्ट मनाने पाहात आहे. १ त्यामुळे माझ्या चित्तास केवढे समाधान होत आहे ! तुमचे चरण सोडावेत असे कधी वाटतच नाही. २ मुखाने मी तुमच्या स्तुतीचे गीत गाऊन आनंदाने टाळी वाजवीत आहे; व तुमच्या देवळात मोठ्या भक्तिसुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामापुढे मला बाकी सर्व तुच्छ वाटते. ४ ५३६ आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण वडवड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळून आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा पाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- येणेंविण-या तुझ्या नामाशिवाय, वांयां-विनाकारण अर्थः- या देवाच्या एका नामाशिवाय आम्हांला कशाचीही जरूरी नाही आता व्यर्थ इतर वडवड तरी कशाला हवी ? १ आता जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगलेच समजून आले आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंतस्वरूप देवाला पाहिली आहे. आता बोलायचे काही कामच उरलेले दिसत नाही. ३ ५३७ बोलों अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥ १ ॥ भोगों त्याग जाला संगांचि असंग । तोडियेलें लाग भाग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हे दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा' ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाग-संबध, तैसा-विचित्रा अर्थ :-जे न बोलण्यासारखे आहे, त्याज्याविषयीच आम्ही बोलू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत. १ सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनात त्यागबुद्धीचा उदय झालेला असून सर्व संगाविषयी असंग निर्माण झाला आहे. किंवा आमच्या दृष्टीने सर्व भोग व सर्व सग नारायणस्वरूपच झाल्यामुळे आपोआपच त्याग वा असंग घडत आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवर दिसतो तसा खरे म्हणजे नाही. माझ्या खऱ्या रूपाविषयी तुम्हांस काही विचारायचे असेल, तर ते या पाडुरंगास विचारा ना. ३ ५३८ अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळो येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पायलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगों उपकार ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-पलीकडे. अर्थ :- ज्याचा जसा अधिकार तसा त्यास मार्ग दाखविलेला आहे. असे त्या मार्गाने वागले असता त्यास समजून येईल. १ एकदा नदीपार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये. कारण मागाहून येणाऱ्यांना तिचा आधार म्हणून खूप उपयोग होण्यासारखा असतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याचे अंगी रोग नसले, तरी जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे बाळगीत असतो. ३ १ विठोबासी.

२७२ सार्थ तुकारामगाथा ५३९ सवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥ १ ॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगों होऊनि ठेला ॥ २ ॥ तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयास दुसरें नाहीं मग ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - तीहीं-त्यानी, दारा-स्त्री, हर्षामर्ष-सुखदुख अर्थ - ज्याच्या चित्तात स्त्री व द्रव्य यांच्याबद्दल आसक्ती नाही त्यांनी ससारास पाठमोरे केले आहे ससार सोडला आहे असे मानावयास हरकत नाही १ ज्याला शुभ व अशुभ याच्याबद्दल सुख वा दुख वाटत नाही, तो या जगात प्रत्यक्ष जनार्दनच होऊन राहिला आहे असे समजावे २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपला देह नेहमीच देवास अर्पण केला आहे, त्यास या जगात दुसरे काही उरले आहे असे नाही ३ ५४० देहबुद्धि वसे लोभ जया चित्तीं । आपुले जाणती पराये जे ॥ १ ॥ तयासि चालता पाहिजे सिदोरी । दुख पावे करो असत्य तो ॥ २ ॥ तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हे तापला तो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -पराये-दुसऱ्याचे अर्थ - ज्याची देहबुद्धी अजून दूर झालेली नाही व ज्याच्या चित्तात लोभ वस्ती करून आहे, तो हे आपले, हे दुसऱ्याचे असे समजून असतो १ त्याला मात्र या जन्माची वाटचाल करीत असताना पुण्याची शिदोरी हवीच असत्य कर्म केल्यास त्यास दुखच होणार २ जो उन्हाने तापलेला आहे, त्यासच शीतल छायेची जरुरी वाटणार धर्म रक्षण करण्यासाठी असा प्रयत्न केलाच पाहिजे ३ ५४१ काळें खादला हा अवघा आकार । उत्पतिसहारघडमोडी ॥ १ ॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटाँ १ । अनंता सेवटी एकाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे शब्दें व्यापिले आकाश । गुढार हे तैसे कळो' नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -उत्पत्ति-निर्मिती, सहार-शेवट, अनंता-कल्पांताच्या गुढार-गुह्य अर्थ - जगाची निर्मिती आणि सहार याच्या घडामोडीत जगास आलेला हा आकार काळ एकसारखा खात असतो १ ज्याप्रमाणे निर्माण होणारा अंकुर त्या बीजाच्या पोटीच सामावलेला असतो, त्याप्रमाणे कल्पांताच्या शेवटी सर्व चराचर विश्व त्या एकाच्याच पोटी विलीन होणार आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व आकाश शब्दाचेच आहे, हे गुह्य कसे कळून येत नाही ? ३ ५४२ आणीक काळें न चले उपाय । धरावे या२ पाय विठोबाचे ॥ १ ॥ अवघेंचि पुण्य असे तया पोटीं । अवधिया तुटी होय पापा ॥ २ ॥ अवघें मोकळें अवधिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥ ३ ॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदु खें । उच्चारिता मुखें नाम एक ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं न लगे साडावे । सागतसे भावे घेती तया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - या काळें-या काळात कलियुगात, तुटी-नाश अर्थ - या कलियुगात दुसरा काही उपाय करायलाच नको एका त्या विठोबाचे पाय धरले म्हणजे पुरे १ मग सर्व पुण्ये त्याच्या पोटात आली आहेत असे समजा त्यामुळे सर्व पापाचाही नाश वेगाने होईल २ त्या विठ्ठलाचे चिंतन केल्यानंतर सर्वजणाना सर्व काळ मोकळाच वाटेल त्यामुळे साऱ्या स्त्रीपुरुषाची कुळे उद्धरली जातात ३ श्रीहरीचे नाव मुखाने उच्चारण्यास काही काळवेळ पाहण्याची जरुरी नाही त्या नामाने गर्भवासाची दुखे दूर होतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी काही सोडून देण्याची गरज नाही जो कोणी भक्तिभावाने हे नाम घेत असेल त्यासच मी हे सागत आहे ५ १ केंस, २ ते

सार्थ तुकारामगाथा २७३ ५४३ कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळ हृदयस्था ॥ १ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ २ ॥ कां हे चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति 'कुंटेचि ना ॥ ३ ॥ तुका म्हणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कंठस्फोट-घसाफोड, कोप-राग अर्थ - देवा, तू माझ्या अगदी हृदयात वास करुन असतानाही तुला माझा कळवळा कसा येत नाही रे ? १ देवा, नारायणा, तू निष्ठुर व निर्गुण आहेस असे वाटते, कारण मी घसाफोड करून शोक केला तरी तुला त्याबद्दल काहीच समजत नाही. २ माझे हे चित्त का विश्रांतीस पावत नाही ? विषयाकडे असणारी इंद्रियांची गती कुंठीत का होत नाही ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही असा राग मजवर का धरला आहे हो ? पांडुरंगा, अजून माझे पाप संपले नाही की काय ? ४ ५४४ दीनानाथा तुझीं ब्रिर्दें चराचर । घेसील कँवार शरणागता ॥ १ ॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ २ ॥ आपुल्या दासांचे न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥ ३ ॥ चक्र गदा हातीं आयुधें अपारे । न्यून तेथें२ पुरें करूं धांवें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज भक्तीचे कारण । कराया पूर्ण अवतार ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- बिदें-वचने, प्रतिज्ञा, आयुधें-शस्त्रे, न्यून-कमी अर्थ :- आपले जे शरणागत असतील त्याचा सांभाळ करणे, त्याची बाजू सावरणे हीच दीनानाथा, तुझी प्रतिज्ञा आहे ना ? १ पुराणांतून तुझ्या कीर्तीचे जे पवाडे गर्जून आहेत त्यावरून उघड उघड असे हेच आम्हास कळून आले. २ तू आपल्या भक्ताना काही कमी पडते, हे मुळोच सहन करीत नाहीस. त्याच्या मदतीसाठीच तू अखंडपणे उभा आहेस ३ यासाठीच तुझ्या हातात अपार अशी चक्र, गदा इत्यादी हत्यारे असतात. जिथे जे कमी पडेल ते पूर्ण करण्यासाठी तू धावत जातोस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, भक्तीचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझा अवतार आहे. ५ ५४५ वर्णू महिमा ऐसी नाही मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥ १ ॥ ठाचीची हे काया ठेविली चरणीं । आता ओवाळुनि काय सांडूं ॥ २ ॥ नाही भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥ ३ ॥ मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- साचा-खरोखर, पार-अंत, शेवट, थार-आधार. अर्थ :- देवा, तुझा महिमा पूर्णपणे वर्णन करावा अशी वाचा मजजवळ नाही तुझ्या महिम्याचा अंत वर्णन करता येणार नाही, असाच तो आहे १ हे माझे मूळचे शरीरच देवा, मी तुमच्या पायांवर अर्पण केले आहे, आता आणखी ओवाळून काय टाकू तुमच्यावरून ? २ देवा, तुमची सेवा करावी असा भावच नाही. जीव तुम्हांस अर्पण करावा तर तोही तुमचाच आहे ना देवा? ३ मला आता माझे असे जे तुला समर्पण करावे असे काहीच दिसत नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तुझे अनंत उपकार फेड़ावेत यासाठी मजजवळ काही आधारच उरलेला नाही ५ ५४६ नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥ १ ॥ देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ २ ॥ १ फुटे, २ तेंचि. तु. गाथा....३५

२७४ सार्थ तुकारामगाथा नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥ ३ ॥ तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढायें जळत आगींतूनि ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा:- विषतुल्य-विषाप्रमाणे, चांग-चांगले, वाणितां-वर्णन करीत असताना, कळा-कला, गोवूं-गुंतवू अर्थ--देवा, मला हा मान नको. हा मान हे काही माझे खरे सुख नाही. पण हे लोक ऐकत नाहीत, त्याला मी काय करू? १ त्यांच्या सुखोपचारांनी माझे हे अंग देवा, पोळून निघते चांगले गोड मिष्टान्न मला विषाप्रमाणे कडू लागते. २ कुणी माझी स्तुती केली, कुणी थोरवी वर्णन केली की ती ऐकावी असे मला वाटत नाही, त्यामुळे माझा जीव फार कासावीस होतो ३ विठ्ठला, मी तुला येऊन मिळेल अशी एखादी कला माझ्या अंगात येऊ दे ना. आता या भ्रान्त मृगजळात मला ओढून घेऊ नकोस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे काही हित करा ना. मला या अग्नीतून जळताना काढा ना. या संसाराच्या अग्नीतून मला मुक्त करा ना. ५ ५४७ न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥ १ ॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेंचि सांगे ॥ २ ॥ विटंबो शरीर होत कां विपत्ति । परि राहो चित्तीं नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तेंचि हित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संतान-संतती अर्थ.- देवा, मला खायला न मिळो, माझी संतती न वाढो, परंतु या नारायणाने मात्र माझ्यावर कृपा करावी. १ अशा प्रकारचा उपदेश माझी वाचा माझ्या मनास वारंवार करीत असते आणखी इतर लोकांनाही असेच सांगत असते. २ माझ्या शरीराची विटंबना होऊ दे. मला आणखी संकटे प्राप्त होऊ दे. पण माझ्या चित्तात त्या नारायणाने राहावे. ३ कारण तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या नारायणाशिवाय सर्व नाशवंत असून गोपाळाची आठवण येणे यातच खरे हित आहे. ४ ५४८ पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करुनियां ॥ १ ॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ २ ॥ क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥ ३ ॥ करवतीलीं देहें कापियेले मांस । गेले वनवासा शुकादिक ॥ ४ ॥ तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पिंड-शरीर, क्षणभंगुर-क्षणात नाहीसा होणारा अर्थ.- केवळ शरीराचे पोषण करावे हे अधमाचे ज्ञान होय. विलास करून, मिष्टान्न सेवन करून आपलाच देह पुष्ट करावा असे त्यांना वाटते. १ शरीराचे रक्षण करणे हाच एक धर्म असे ते बोलतात; पण खरे पाहिले असता, शरीराचे रक्षण करणे काय त्याच्या हातांत आहे ? २ तो तर एका क्षणात नाहीसा होणार आहे. न समज- ताच तो नाहीसा होईल. हातातील घास मी गिळीन इतके म्हणण्याचीही सत्ता त्यास नाही. ३ कित्येक साधकानी देवाच्या प्राप्तीसाठी आपले देह करवतीने कापवून घेतले आहेत; मांस कापून काढले आहे, देहाचे हालहाल केले आहेत. शुकादिकांसारखे तर वनवासाला सुद्धा गेले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, पण जनक राजा राज्य करीत असता अग्नीमध्ये एक पाय जळत असतानासुद्धा त्याला भान राहिले नाही. सारांश, शरीर कष्टविणे किंवा त्याचे लाड करणे यात काही नसून तुमच्या मनातील भावात सर्व काही आहे. ५

सार्थ तुकारामगाथा २७५ ५४९ जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदो जिव्हे ॥ १ ॥ सकळा इंद्रिया हे माझी विनंती । नका होऊं परतीं पाडुरंगा ॥ २ ॥ आणिकाची मात नाइकावी कानीं । आणीक नयनों न पाहावें ॥ ३ ॥ चित्ता तुवा पायीं रहावे अखंडित । होऊनी निश्चित एकविध ॥ ४ ॥ चला पाय हात हेचि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥ ५ ॥ तुका म्हणे तुम्हा भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आन-दुसर परती-दूर मात-गोष्ट अर्थ -- जिभे, जरी माझो कोणी मान कापायला निघाले तरी, तू पाडुरंगाच्या नामाखेरीज दुसरे काही बोलू नकोस १ माझ्या सर्व इद्रियाना हीच विननी आहे की, त्यानी विठ्ठलापासून दूर होऊ नये २ दुसऱ्या कुणाचीही गोष्ट त्यानी ऐकू नये त्या विठ्ठलाखेरीज दुसऱ्या कुणाचे या डोळ्यानी रूप पाहू नये ३ चित्ता, तू या विठ्ठला- च्याच पायी अखड वसती करून असावेस तू निश्चित होऊन तेथे स्त ध होऊन असावेस ४ चला हातापायानो तुम्ही हेच एक काम करा माझ्या विठ्ठलास नमस्कार करणे हेच एक काम तुमचे आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्हास कसली भीती आली आहे ? आमचा कवार घेणारा तो एक नारायणच आहे ना ? ६ ५५० करिसी ते देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणे सत ॥ १ ॥ जया राज्य द्रव्य करणे उपार्जन । वश दभमाना इच्छे झाले ॥ २ ॥ जगदेव परी निवटीन निराळे । ज्ञानाचे आधळे भारवाही ॥ ३ ॥ तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे शिरीं करिता दड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपार्जनमा-मिळविणे अर्थ - देवा, माझे जे काय तू करशील ते तू सुखाने कर पण त्यांना माझ्या मुखाने मी काही सत म्हणणार नाही, कुणाला ? १ तर ज्याना राज्य, द्रव्य मिळविणे हेच नेहमी करायचे असते, व जे नेहमी दभ मान याच्या इच्छेला वश झालेले असतात, त्यांना मी सत मानणार नाही २ सर्व जग ईश्वरस्वरूप आहे, असे असले तरी मी त्याना निपटून वेगळे काढीन हे ज्ञानाने आधळे असून निव्वळ भारवाही आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, याना दड करण्याविषयी मी माझ्या मनात थोडेही भय धारण करणार नाही ४ ५५१ म्हणविती ऐसे आडवतो सत । न देखीजे होत डोळा कोणीं ॥ १ ॥ ऐसियाचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईंडाईं ॥ २ ॥ पर्जन्याचे काळों वाहाळाचे नद । ओसरता बुद न तारेचि ॥ ३ ॥ हिऱ्या ऐसा गारा दिसती दूरून । तुका म्हणे घन' न भेटे तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - घाईंडाई-गवगव मुद-घव पन-आघात अर्थ - पुष्कळ लोक ज्याना सत सत म्हणून म्हणतात, त्याची नावे मी ऐकतो आहे, पण अजून डोळ्यात तर कुणी दिसलेले नाही १ यशाचा विश्वास कोण धरणार ? अनेक सकटप्रसगात ज्याची शाती ढळत नाही तेच खरे सत २ खूप पाऊस पडत असताना साध्या साध्या ओहळाच्या मोठ्या नद्या झालेल्या दिसतात, पण पाण्याचा पूर ओसरून गेल्यावर त्याच्यात थेंबही उरलेला नसतो ३ गारा दूरून हिऱ्याप्रमाणेच दिसतात, पण घणाच्या आघाताची व त्याची गांठ पडताच त्याचे स्वरूप स्पष्ट होते आघातात टिकतील तेच सत ४ ५५२ बतियाव लावी । एक बोट सोंग दावी ॥ १ ॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ २ ॥ * १ घण

२७६ सार्थ तुकारामगाथा प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नट-वेष, नटणे, छाट-चापट अर्थ - जो अतिवाद करणारा आहे व जो कपाळावर एका बोटाची रेघ ओढून गंध लावणारा आहे, अथवा जो एक बोट करून ब्रह्म एक असल्याचे सांगणारा आहे त्याचे ते सर्व ढोंग असते १ त्याचा तो वेष फसवा असून तो त्यामुळे वैष्णव झालेला नसून तो चावटच असतो २ तो एकाचे प्रतिपादन करतो, दुसऱ्यास दूर करतो, एकाची पूजा करतो, दुसऱ्याची छळणूक करतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशाच्या ठिकाणी भूतदयाही असत नाही ४ ५५३ पोटाचे ते नट पाहो नये छंद । विषयाचे भेद विषयरूप ॥ १ ॥ अर्थी परमार्थ कैसा घडो सके । चित्त लोभी भीके सोंग वाया ॥ २ ॥ देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं राहे अभिलाष । दोघा नरकवास सारिखाचि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अर्थी-द्रव्याच्या उद्देशात अर्थ - जे पोटाकरिता नाटकात कामे करून नाना सोंगे घेतात, नाना छंद करतात, त्याचे दर्शन घेऊ नये कारण त्याच्या रूपांनी नाना विषयांची नाना रूपेच व्यक्त झालेली असतात १ ज्या ठिकाणी द्रव्य मिळविण्याचाच एक उद्देश असतो, त्यात परमार्थ कसा साधावा? चित्तात लोभ असताना देवाचे जरी सोंग घेतले तरी ते व्यर्थच असते, नाही का ? २ नाना प्रकारची सोंगे घेऊन देवाची चरित्रे व त्याच्या लीला हे लोक दाखवितात लोकांना मोहित करण्यासाठी चतुराईने सोंगे घेतात ३ तुकाराम महाराज म्हणतात पण त्याच्या चित्तात अभिलाषा, द्रव्याविषयी इच्छा असल्याने त्याचा काय उपयोग ? अशी सोंगे दाखविणारा व पाहणारा दोघांनाही सारखाच नरकवास घडतो ४ ५५४ मुकती तीं द्यावीं भुको । आपण त्याचे नये शिको ॥ १ ॥ भाविकानी दुर्जनाचे । मानू नये काहीं साचे ॥ २ ॥ होईल तैसे बळ । फजीत करावे ते खळ ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचे । पाप नाही ताडणाचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साचे-खरे, खळ-दुष्ट, ताडणाचे-मारण्याचे अर्थ - जी दुष्ट माणसे भुकत असतील त्यांना भुकू द्यावे आपण त्याच्यासारखे कधी शिकू नये १ जे ईश्वरावर विश्वास ठेवून आहेत त्यांनी दुर्जनाचे काही खरे मानू नये २ ज्या उपायानी दुष्टांना फजित करता येईल त्यांनी ते करावेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना मारल्याचे काही पापही कुणाला लागण्यासारखे नाही ४ ५५५ जप करिता राग । आला जवळी तो माग ॥ १ ॥ नको भोवताले जगीं । पाहो जबळी राह अर्गी ॥ २ ॥ कुडचाची संगती । सदा भोजन पंगती ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रह्म । साधी विरहित कर्म ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुडघाची-वाईटांची, विरहित-शून्यच अर्थ - जप करीत असताना जर तुला राग आला, तर तो मागाच्या विटाळाप्रमाणेच समजावा १ तू भोवतालच्या जगात पाहूच नकोस भोंवनी कोण महार आहे, की माग आहे हे न पाहता तुझ्या अंतःकरणात क्रोध- रूपी मांग शिरत नाही ना, एवढेच तू पहा मात्र २ वाईटांची संगत व नेहमी त्याच्याच पंगतीने भोजन होत आहे

सार्थ तुकारामगाथा २७७ को काय याविषयी तू सावध हो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे कर्मकांडाविरहित अथवा नैष्कर्म्य असणारे जे ब्रह्म आहे ते साधून घे. ४ ५५६ कांहींच मी नव्हें कोणिये गांवौंचा। एकट ठायाँचा ठायीं एक ॥ १ ॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां। अवघेंचि वांयांविण बोलणें ॥ २ ॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें। कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥ ३ ॥ नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत। आहों अखंडित जैसे तैसे ॥ ४ ॥ तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां। वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठायाँचा-मूळचा, ज्यावें-जगावे, कर्मअकर्म-विधिनिषेध अर्थ:-मी तसे पाहिले तर काहीच नाही. मी कोणत्या एका गावचा आहे असेही नाही. एकाच जागी असणारे जे काही आहे ते मी आहे १ मी कुठे जात नाही, आणि कुठून फिरूनही येत नाही. माझे सर्व हे बोलणेही व्यर्थच आहे. २ मला कुणी आपले नाही, मी तसा खरा कुणाचाच नाही ३ आम्हांला जगावे लागत नाही, मरावे लागत नाही, आम्ही जसे अखंडित आहोत तसेच आहोत. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस नाव, रूप, काही नाही. या कर्मअकर्म किंवा विधिनिषेध त्याहूनही आम्ही वेगळेच आहोत. ५ लोहगांवास परचक्रवेढा पडला-अभंग ३. ५५७ न देखवे डोळां ऐसा हा आकांत। परपीडे चित्त दुःखी होतें ॥ १ ॥ काय तुम्ही येथें नसालसें जालें। आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ २ ॥ परचक्र कोठें हरिदासांच्या वासें। न देखिजें देश राहिलािया ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी लाजविली सेवा। हीनपणें देवा जिणें जालें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-आकांत-दुःखद प्रसंग, परपीडे-दुसऱ्याच्या दुःखाने, परचक्र-शत्रूचे राजकीय संकट अर्थ :- देवा, मला हा दुःखद प्रसंग आता पाहवत नाही. दुसऱ्यांना पीडा झाल्याने देवा, मला भारी दुःख होते १ तुम्ही काय येथे नाहीत असे झाले? पण हे संकट यापुढे आम्हांस दिसता कामा नये. २ हरिदासांचा निवास ज्या ठिकाणी आहे, त्या स्थानी असे परचक्र कुठून असणार? जेथे हरिभक्त राहतात, तेथे संकटांना वाव कुठला? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आजपर्यंत माझी सेवा लाजविलीत. देवा, या संकटाने माझे जिणे हीनपणाचे झाले आहे. ४ ५५८ काय म्यां मानावें हरिकथेचें फळ। तरिजे सकळ जनों¹ ऐसें ॥ १ ॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला। रोकडें विठ्ठला परचक्र ॥ २ ॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें। साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे जेथें वसतील दास। तेथें तुझा वास कैसा आतां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तरिजे-रक्षण होते, उच्छेद-नाश, रोकडें-स्पष्ट अर्थ :- देवा, हरिकथेमुळे काय साधते असे मानावे ? असे हे परचक्र येते, की सर्व जनांचे रक्षण होते ? हरिकथेचे फळ कोणते मानावे ? १ आज तर विठ्ठला, सर्वांचा नाश तुम्ही आरंभिला आहे. या परचक्रावरून हे स्पष्टच दिसत आहे. २ पापावाचून पाप पुढे येत नाही, याचाच प्रत्यय या अनुभवाने येत आहे. ३ तुकाराम महा- राज म्हणतात, जेथे तुमचे दास राहतात तेथे तुमचे वास्तव्य असते असे आता मानावे तरी कसे ? ४ ५५९ भीत नाहीं आतां आपुल्या मरणा। दुःखी होतां जना न देखवे ॥ १ ॥ आमची तो जाती ऐसी परंपरा। कां तुम्ही दातारा नैंणों ऐसें ॥ २ ॥

  • १ जन.

भजनीं विक्षेप तेचि पैं मरण । न वजावा क्षण एक वाया ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव¹ मागें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नेणा-जाणीत नाही, विक्षेप-अडचण, आघाताचा-संकटाचा, ठाव-ठिकाण अर्थ - देवा, मी आता आपल्या स्वतःच्या मरणास भीत नाही, पण इतर लोक दुःखी कष्टी होतात ते मात्र पाहवत नाही १ आमची भक्तांची व हरिदासाची ही अशीच परंपरा आहे दातारा, देवा, तुम्हास का हे माहीत नाही ? २ आमच्या हरभजनात अडचण आली की आम्हास मरणाप्रमाणे वेदना होतात भजनाशिवाय एक क्षणही वाया जाऊ नये असे वाटते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कसल्याही संकटाचा वाराही लागू नये असे ठिकाण दातारा, मला आता दाखीव ४ विवरण - पुण्याच्या शेजारी येरवड्याच्या पलीकडे ईशान्येस नऊ मैलावर असणाऱ्या लोहगावी तुकारामबुवांचे कीर्तन ऐन रंगात आले असताना, त्या गावास परचक्राचा वेढा पडला त्या प्रसंगी तुकोबांच्या मुखातून हे अभंग प्रगट झाले आहेत तुकारामबुवांचा संबंध लोहगावी प्रथमपासूनच होता या गावच्या मोझे घराण्यात तुकोबांचे आजोळ असून त्यांची पहिली बायको रखुमाबाई ही याच गावची होती तुकोबांचे अनुयायी या गावी विशेष असल्याने त्यांचे कथाकीर्तनाच्या निमित्ताने तेथे विशेष जाणे येणे असल्यास नवल नाही या गावात तुकारामबुवांचे एक देऊळही आहे पंढरपूरहून आळंदीस येणाऱ्या वारकऱ्यांना लोहगाव आजही तुकारामतीर्थ म्हणून महत्त्वाचे वाटते 'मधुरेस कृष्ण जन्मला पाहीं । परी गोकुळींच्या सुखास पार नाहीं । तैसा तुकयाचा प्रेमा सर्वही । लोहगावीं लुटिला ।।' अशा शब्दात महीपतीबुवांनी तुकोबांचा लोहगावसंबंध वर्णन केला आहे बहुधा श्रावण महिन्यात तुकोबांची अनेक कीर्तने लोहगावात होत असत सन १६३६ च्या सुमारास मोगलांचे परचक्र पुणे भागात एकसारख येत राहिले शहाजीविरुद्ध महाजान, खानजमान, रणदुल्लाखान इत्यादीचे भय वारंवार निर्माण होई सन १६३६ च्या जून महिन्यात खानजमान याने पुण्याकडे सैन्यासह आपला मोर्चा वळविला लोहगावी परचक्र झाले ते हेच असावे असा आधुनिक संशोधकाचा तर्क आहे या प्रसंगी महीपतीबुवांनी जे चमत्कारिक आख्यान जुळविले आहे त्यात स्थलकालाची विसंगती तर आहेच, शिवाय या प्रसंगी अभंग तीन की चार यासनंबंधीही मतभेदाची चर्चा अभ्यासकांनी केलेली आहे या गाथेतील पुढील १६०४ या नंबराचा 'बोलिलों तें आतां पाळावे वचन । ऐसे पुण्य कोण माझे गांठी ।।' या अभंगाचा समावेश वरील तीन अभंगाबरोबरच कधी कधी करण्यात येतो ५६० फिरगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥ १ ॥ पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि ते महिमान वेगळाले ॥ २ ॥ तुका म्हणे तैशा नव्हतीच परी । सतजना सरी सारिखिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - फिरगी-तरवार, वाखर-वस्तरा, सरी-योग्यता अर्थ - तरवार, वस्तरा व विळे हे सर्व पदार्थ एका लोखंडाचेच असले तरी ते आपापल्या गुणांमुळे वेगळेच ठरलेले असतात १ पाय देऊन घडावची पायरी व पूजेची प्रतिमा ही एका पाषाणाची खरी, पण प्रत्येकाचे महत्त्व किती वेगळे आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु येथे मात्र तसा प्रकार नाही सर्व सतजन एकसारख्याच योग्यतेचे आहेत ३ ५६१ कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥ १ ॥ आतां माझा श्रोता वक्ता तूंचि देवा । करावी ते सेवा तुझीच म्या ॥ २ ॥ कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाले येणे एके घरीं । मज आणि हरी तुम्हा गाठी ॥ ४ ॥ १ ठेवी मज

सार्थ तुकारामगाथा २७९ शब्दार्थ व टीपा :- न सरते=पुरत नाही, पेणें=मुक्काम. अर्थ :- देवा, तुझी उपासना कोणात घडेल ती घडो; या निर्गणाच्या वचनाप्रत कोण येईल ते येवो. १ पण आता माझा धोता व मक्ता तू होऊन अभेदत्वाची अनुभूती मला यावी. या जाणिवेने मी तुझी सेवा करावी. २ जे कुशल आहेत, चतुर आहेत, त्यांची चतुराई काही पुरत नाही. ते तुला भजत नाहीत. नुसते आपल्या बुद्धीने वृथा तर्कच करीत बसतील. ३ देवा, तुमचा व माझा मुक्काम एकाच घरी झालेला असल्यामुळे तुमची व माझी गाठ आता नित्याची आहे. ४ ५६२ आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीन देखोवेखीं ॥ १ ॥ न फळे संतत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ २ ॥ वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याच वाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देखोवेखी=दुसऱ्याचे पाहून, वरपडे=साधन. अर्थ:- आम्ही परमेश्वराची जी भक्ती आरंभिली आहे, जे थट्टेने बोलणे त्याच्याशी आम्ही करितो, ते जगाचे दृष्टीने त्याचे मरणच आहे. कारण आमचे परवर पाहून ते अंगी भाव नसता परमार्थाचे आचरण करतात १ सतत हिताचा विचार कोणता आहे, हे जोपर्यंत त्यांना समजत नाही, तोपर्यंत ते जन्ममृत्यूच्या दारात सारखे हेलपाटेच खात राहतील. २ जे कुणी दुसऱ्याने वंदिले असेल त्यास वंदन करावे, निंदिले असेल, त्यास निंदावे. दुसरे ज्या वाटेने गेले, त्याच वाटेने जावे हाच त्यांचा उद्योग आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कितीही सांगितले तरी कुणी ऐकत नाहीत, तरी ते यमदूतांच्या स्वाधीन होतील. ४ ५६३ दीप घेउनियां धुंडितो अंधार । भेटे हा¹ विचार अघटित ॥ १ ॥ विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ २ ॥ उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न फळे भाग्यहीना ॥ ३ ॥ तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हे तंव वचन वाउगेचि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अघटित=नवलाचे, न भ्यो=भिणार नाही, हुताशन=अग्नी. अर्थ - हातात दिवा घेऊन अंधार धुंडायला जाणे किती शहाणपणाचे आहे ? तो कधी भेटेल हा अविचारच नव्हे का? नवलाचेच नव्हे काय? १ आम्ही विष्णुदास प्रत्यक्ष काळासही भिणारे नव्हेत. मृगजळाच्या जाळ्यात सापडून फसणारे आम्ही नव्हेत २ मातीची धूळ वर उधळली तर सूर्याचे तेज मलीन होईल कसे? पण हे भाग्यहीन माणसास कसे समजणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, गवताने अग्नी झाकला जातो, हे बोलणे युगात आहे. नाही काय? ४ ५६४ नटनाट्यें अवघें संपादिले सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥ १ ॥ मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुले स्वरूप जाणतसों ॥ २ ॥ स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होउनि निश्चित² क्रीडा करूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- स्फटिक=शक्तिमुक्त पारदर्शक दगड, उपाधि=अडचण अर्थ - नाना प्रकारची नृत्ये व नाटके करणाऱ्यांप्रमाणे आम्ही नाना वेष धारण करून विविध सोंगे धारण करू; नाना भेदांचे प्रकार दाखवू; परंतु त्यामुळे आमचा आत्मरूपाचा बोध व त्याचा रंग काही पालटणार नाही. १ बहुरूप्याने कौतुकाने नाना प्रकारचे खेळ केले, तरी तो आपले स्वतःचे रूप जाणून असतोच २ स्फटिकाच्या पारदर्शक स्वरूपात पिवळे, लाल असे नाना रंग जरी दिसत असले, तरी त्यांची अडचण स्वतः स्फटिकास काही वाटत

  • १ तो, २ निश्चित.