सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
अर्थ :-लोकहो तुम्ही सर्वजण आता उठून उभे राहा. कारण नारायण उठून उभे राहिले आहेत. त्यांना पाहून सर्व मुनिलोक आनंदून गेले आहेत. तीनही लोकात आनंद पसरला आहे. १ चला, या पंढरीनाथाचा जयजयकार करा. वाद्यांचा गजर होऊ द्या. मृदंग, वीणा, टाळ, घोळ यांचा एकच ध्वनी होऊ द्या २ याच्यापुढे दोनही हात जोडून याचे श्रीमुख मोठ्या आदराने, कौतुकाने पाहा ना. याच्या पायावर डोके ठेवा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हांस जे काय आवडते ते यास मागा. आपले जे काय सुखदुःख असेल ते या पांडुरंगास सांगा. ४ ४९५ करुनी विनवणी पायीं¹ ठेवीं माथा । परिसावी विनवणी² माझी पंढरीनाथा ॥ १ ॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देईं ॥ २ ॥ असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहीं कृपादृष्टी मज पंढरीराया ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- परिसावी-ऐकावी, ठाव-स्थान अर्थ :- देवा, माझ्या उद्धाराची विनवणी करून मी तुझ्या पायीं माझा माथा ठेविला आहे. माझी विनंती आता पंढरीनाथा, तुम्ही ऐकावी. १ तुझ्या पायांशी अखंडपणे असावे अशी माझी इच्छा आहे देवा. थोडा संकोच सहन करून मला तुझ्या पायांशी स्थान दे ना. २ माझ्या मनात विठ्ठला, भाव बसो, नसो, मी तुला शरण आलो आहे ; पंढरीनाथा, तू कृपादृष्टीने माझ्याकडे पाहा ना. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वेडीवाकुडी असलो तरी तुझीच आहोत. तू आमचे भवपाश तुझ्या नामाच्या सामर्थ्याने तोडून टाक. ४ ४९६ घडिया घालुनि तळीं चालतो वनमाळी । उमटती³ कोमळीं कुंकुमाचीं ॥ १ ॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेंणे ॥ २ ॥ पैस धरुनी चला ठरुत ठायो ठायीं । मौन्य धरूनी कांहीं नो बोलावें ॥ ३ ॥ तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- पैस-मोठी ऐसपैस जागा, कवाडे-दारे अर्थः- खाली वाटेवर पायघड्या घालून हा वनमाळी त्यावरून चालत आहे. त्यावेळी त्याची कुंकुमाची पावले कशी स्पष्ट उमटतात १ सर्व लोकहो, या श्रीहरीच्या पावलांवरील धूलिकणांना वंदन करा. या पायांच्या योगाने पाण्यावर दगडसुद्धा तरलेले आहेत २ देवास उभे राहण्यासाठी आपली ऐसपैस जागा ठेवून चला; ठिक- ठिकाणी उभे राहा. मौन धारण करा काही उगाच बोलू नका. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी हळूहळू वेळ साधून पुढे जात आहे. देवाच्या शेजघराची दारे उघडलेली आहेत ४ ४९७ भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥ १ ॥ न कराँ त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ २ ॥ करुनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥ ३ ॥ नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥ ४ ॥ करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥ ५ ॥ तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होतीची⁴ ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- भीतरी-आत, भवानी-लक्ष्मी, सोनसळा-जरतारी पितांबर, मात-गोष्ट अर्थः- श्रीहरी शेजघरात गेले आहेत, क्षणभर बाहेर उभे राहा तुम्ही जरा धीर धरून वागलात तर तुमची इच्छा पूर्ण होईल. १ उगाच घाई करू नका. माझी गोष्ट तर नीट ऐका क्षणभर निवांतपणे स्वस्थ बसून राहा. २ या देवाच्या अंगास सुगंधी तेलाने व द्रव्यांनी, उटण्यांनी चांगले मर्दन करून अभ्यंगस्नान उष्ण पाण्याने घातले १ चरणी, २ विनंती, ३ उठती, ४ होणी बिती
सार्थ तुकारामगाथा २५५ आहे. देवाचे स्नान झाले असून त्यांचे अंग लक्ष्मी मोठ्या प्रेमाने पुशीत आहे. ३ स्नान झाल्यावर या श्रीहरीने जरतारी पीतांबर नेसला. नंतर 'ताट वाढले आहे भोजनास लवकर चलावे' अशी विनंती रखुमाईने विठ्ठलास केली. ४ मग नारायणांनी यथेच्छ भोजन केले व हात धुतले. नंतर नारायण स्वस्थ चित्ताने पलंगावर पहुडले. ५ सर्वांच्या चित्तात जी गोष्ट होती तीच तुकाराम महाराज म्हणतात, मी आज जाणली. एक अलौकिक सुख अनुभवले. ६ ४९८ द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥ १ ॥ टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ २ ॥ येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आम्ही दातारा ॥ ३ ॥ प्रेम देउनियां बहुडा आतां दिला¹ । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- शेष-उरलेले, बहुडा-निरोप. अर्थ:- रखुमाई, आता आम्हास नारायणाबरोबर सनकादिक जेवून काही उरले असेल ते द्यायला सांगा ना. १ आम्ही मोठी आशा धरून, टक लावून बसलो आहोत. आम्हा सर्वांना, एकमेकांना पुरेल एवढा उरलेला घास आम्हांस द्यावा. २ देवा, दातारा, तुझी मोठी आशा धरून, तुझे नाम घेत आम्ही येथे आलो आहोत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या देवाने प्रेमाने मला आतां निरोप दिला आहे. चला आता त्या विठ्ठलाचा गजर करा ना. ४ ४९९ बहुडविले जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥ १ ॥ पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ २ ॥ घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- बहुडविले-निरोप देऊन पाठविले, कोल्हाळ-गोंगाट. अर्थ:- आता या लोकांना प्रेमाने निरोप देऊन पाठविले असल्यामुळे मन निश्चित व शांत झाले आहे. या सर्व लोकांचा गोंगाट संपल्यामुळे तुकारामबुवा सावकाशपणे नारायणजवळ येऊन म्हणू लागले, 'नारायणा, आता रखुमाईसमवेत आपण या पलंगावर सुखाने निद्रा करावी. २ मी हातात टाळ, वीणा घेऊन आपली चरणसेवा करण्यासाठी आलो आहे' ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता देवा, माझी बोबडी वाणी कौतुकाने ऐकावी ४ ५०० नाच गाणें माझ जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥ १ ॥ तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाईन² लोण ॥ २ ॥ एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- जगदानी-जगाला दान देणारा अर्थ - तुमच्यासाठी देवा, नृत्यगायन करावे हेच माझे मुख्य काम आहे. हाच भक्तिभाव मी तुम्हास समर्पित करीन. १ तुमची निद्रा हीच मला माझ्या स्वभावानुसार आज्ञा आहे. म्हणून मी माझा जीव तुमच्यावर ओवाळून टाकेन. २ देवा, मी या एकाच स्थानी राहून सुस्वर सुरांनी व मधुर स्वरांनी मी माझे गायन तुम्हांस ऐकवीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, 'देवा, तू जगास दान देणारा अति उदार असा देव आहेस. माझ्या प्रपंचाचे ओझे तू दूर करशील. ४.' ५०१ सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥ १ ॥ अहो दीनानाथा आनंदमुरती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ २ ॥ १ झाला, २ निवलोण.
सार्थ तुकारामगाथा २५६ बहुतांनीं विनविलें' बहुतां प्रकारों । सफळां ठायीं हरी पुरलेती ॥ ३ ॥ तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपाः - आनंदमुरती-आनंदाची मूर्ती अर्थ- आपल्या भक्तांना इच्छेनुसार दान देऊन देवा, तुम्ही फारच दमलेले दिसता. भक्तांचा स्वीकार मोठ्या अभिमानाने करून तुम्हांस फारच श्रम झालेले दिसतात. १ यहो दीनानाथा, आनंदमूर्ती पांडुरंगा, भक्तांचा उद्धार करण्याची ब्रीदें तुम्हांसच शोभून दिसतात. २ श्रीहरी, तुम्हांला पुष्कळ भक्तांनी पुष्कळ प्रकारांनी विनविले, आणि तुम्हीही सर्वांच्यावर कृपा करून पुरलात ३ तुकाराम महाराज म्हणतात, अरे, कुटुंबवत्सला देवा, तुझा महिमा कोण जाणणार आहे ? ४. ५०२ उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥ १ ॥ वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥ २ ॥ केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपाः- उजगरा-जागरण अर्थः- स्वामी नारायणा, तुम्हांस जागरणाचे फार श्रम झाले आहेत. उठा आता विठ्ठला, स्वस्थपणे झोप घ्या. १ तुमच्या पलंगावर शेज करून ही रुक्मिणीदेवी तुमची वाट पाहात आहे २ पुरुषोत्तमा, मी फार बडबड केली आहे आतापर्यंत; त्याबद्दल मला क्षमा करावी आपण ३ हा तुकयाबंधू नारायणा, तुमच्या चरणांना वंदन करीत आहे. ४. ५०३ पावला प्रसाद आतां उठोनि जावें । आपला तो श्रम फळों येतसे जीवें ॥ १ ॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ २ ॥ तुम्हांसि जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष वाराया² पीडा ॥ ३ ॥ तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आम्हां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपाः- वाराया-दूर करण्यासाठी, पीडा-दुःख. अर्थ- देवा, आता आम्हांस तुमचा प्रसाद मिळालेला आहे आता तुम्ही सुखाने निद्रा करावी. आपण आम्हासाठी जे कष्ट घेतले आहेत ते आम्हांस समजून आले आहेत. १ स्वामी, गोपाळा, आता सुखरूपपणे झोप घ्यावी. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाल्यामुळे मी आता माझ्या ठिकाणी परत जातो. २ आमची शुभाशुभ कर्मे नीट व्हावीत व दोष दूर व्हावेत म्हणून आमच्याच हौसेसाठी आम्ही तुम्हास जागविले देवा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमच्या भोजनातील उच्छिष्टाचा प्रसाद दिला. तुम्ही आपणापेक्षा वेगळे असे मला मानले नाही हे माझे केवढे भाग्य ! ४ ५०४ शब्दांचीं रत्नें करुनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥ १ ॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ २ ॥ संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पितलें ॥ ३ ॥ रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । मायां तुळसीदळ समर्पितलें ॥ ४ ॥ एकभावदीप करुनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥ ५ ॥ न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥ ६ ॥ १ निरविले, २ हाराया
सार्थ तुकारामगाथा २५७ शब्दार्थ व टीपा- आंचवण देणे-पाणी सोडणे, सुरग-रंगीत अर्थ - शब्दांचीच रत्ने व त्याचे अलंकार करून मी या विश्वंभराचे पूजन केले १ भक्तिभावाने अंत- करणपूर्वक उपचार करून मी भगवंतास, नारायणास भोजन घातले आहे २ मी या प्रभूसाठीच माझ्या संसारावर हाताने पाणी सोडले आहे. हेच प्रभूसाठी आचवण आहे माझे मन हीच मुखशुद्धी म्हणून मी त्यास अर्पण केले आहे. ३ श्रीहरीच्या भक्तीने रंगलेली इंद्रिये हाच गुणी एक विडा मी प्रभूंस दिला आहे त्याच्या मस्तकावर तुळसीदल अर्पण केले आहे ४ तुझ्याविषयीचा एकाग्रभाव हाच मी दीप लावून निराजन सिद्ध केले आहे मी आपल्या देहाचे आसन देवा, तुला समर्पण केले आहे ५ या माझ्या देवास माझ्या हृदयरूपी माजघरात झोपवून न बोलता त्याची चरणसेवा मी करीत आहे ६ ५०५ उठोनिया तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥ १ ॥ निउल जाले सेवका स्वामींचे । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ २ ॥ पहुडलिया हरी अनंतशयनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥ ३ ॥ अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सागितले लोका निजले देव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - राउळा माजी-देवळामध्ये, निउल-नवल अर्थ - शेजारतीचा सर्व प्रकार झाल्यावर तुकारामबुवा हे आपल्या राहण्याच्या ठिकाणी गेले आणि देवळात एकटा देवच उरला १ या स्वामींचे व तुकोबासेवकाचे जे रहस्य या वेळी जमले होते ते एक नवलच होय. त्याच्या आज्ञेवरून या भक्ताच्या चित्ताचे समाधान झाले २ श्रीहरी अनंतशय्येवर पहुडले आहेत; आता येथे काही काम उरले नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांना मी मंदिराबाहेर घालविले व त्यांना देव आता झोपले आहेत असे सांगितले ४ विवरण - अभंग क्र ४६७ पासूनचे बहुतेक सबंध अभंग शेजारतीच्या प्रसंगी म्हटले जातात आवडत्या दैवताच्या उपासनेचे, पूजेचे, स्तवनाचे जे अनेक प्रकार आहेत त्यात आरती हा प्रकार महत्त्वाचा आहे आरती म्हणजे देवास धूपदीपांनी मनोभाव ओवाळून गीतात त्याची स्तुती करणे, त्याचे गुणवर्णन करणे या आरतीचेही काकड आरती, दुपारती, शेजारती असे काही प्रकार असून मराठीत याचे विषयीही भरपूर वाङ्मय विविध प्रकारचे आहे आराध्य दैवताचे एकदा सगुणरूप मान्य झाले म्हणजे त्याच्या पूजनाचे, उपासनेचे, गुणस्तवनाचे विविध प्रकार आपोआपच आले षोडशोपचारे पूजन आले देवास नाना अलंकारांनी नटवावे, थटवावे त्याच्या सर्व लीलांचे मानवीकरण करून त्या भावात दंग राहावे हे भक्ताच्या दृष्टीने ओघानेच आले तुकोबांच्या या शेजारतीच्या अभंगातून त्यांनी अत्यंत भक्तियुक्त अंत करणाने संध्याकाळी देव झोपी जात आहेत अशी कल्पना करून मोठ्या कळकळद्याने, विनयाने, प्रासादिक वृत्तीने या अभंगाची निर्मिती केली आहे तुकोबांच्या मनाची सारी कोवळीक व हळुवार वृत्ती या अभंगातून प्रकट झालेली आहे अभंग शेजारतीचे असले तरी एकदा भक्तीच्या रंगात भक्त रंगून गेला की मग देवाची सारी दिनचर्याच त्या थाटात रात्रौत असतो रत्नजडित सिंहासनावर देव बसला आहे आणि तुकाराम सेवकाप्रमाणे पादुका घेऊन उभा आहे स्वयपाकाची तयारी झाली असून रखुमाई देवाची वाट पाहात आहे गोपिका पाण्याचे कलश घेऊन उभ्या आहेत, नाना रंगाच्या फुलांनी शेज सजून तयार आहे, ताटात रत्नदीप उजळले आहेत, पायघड्या घालून बनमाळी चालत असून त्याच्या कुकुमाच्या पावलाचे ठसे भूमीवर उमटले आहेत, देवानी उष्णोदकानी स्नान केले असून रुक्मिणी त्याचे अंग पुसून कोरडे करीत आहे, देवानी रेशमी अथवा जरोधठी पीतांबर नेसला आहे जेवण करून देव पलंगावर आनंदाने पहुडले आहेत, तुकारामादी संत मग उरलेल्या घासासाठी आमुकलेले आहेत, रखुमाईसहित विठ्ठल पलंगी असून तुकास्वामी हातात टाळवीणा घेऊन 'आवडी उत्तरे' गात आहे देवा, आता उठा पाहू, निद्रा करा रुक्मिणी पलंगाशी वाट पाहात आहे, स्वामी, आता तुम्ही सुखाने निद्रा करा इत्यादी वचने तुकोबांनी म्हणणे, शब्दाच्या रत्नांनी या विश्वंभराची पूजा करणे, मुखशुद्धीस मन समर्पित करणे, रंगलेल्या इंद्रियांचा तु गाथा ३३
२५८ सार्थ तुकारामगाथा तांबूल देणे, माथ्यावर तुळसीदल समर्पिणे, देहाचे आसन देणे, हृदयाच्या माजघरात देवास झोपविणे आणि न बोलोनि देवाची चरणसेवा करणे इत्यादी विविध भावछटातील कोमल वृत्ती तुकोबाच्या भक्तिप्रेमाची साक्ष पटविणाऱ्या आहेत दसरा - अभंग १ ५०६ पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सापडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जयजयकार हरि हृदयीं धराँ । आळस नका करूं लहाना सांगतो थोरां ॥ १ ॥ या हो या हो वाइयानो निघाले हरी । सिलगणा वेगें घेउनि आरत्या करीं । ओवाळू श्रीमुख वंदू पाउले शिरीं । आम्हा देव आले येथें घरिच्या घरीं ॥ २ ॥ अक्षय मुहूर्त ओटामध्ये साधे ते । मग येरी गर्जे जैसे तैसे होत जाते । म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । साडा परते काम जाऊ हरी सांगाते ॥ ३ ॥ बहुता बहुता रीती चित्तीं धरा हे मनीं । नका गे करू आइकाल ज्या कानीं । मग हे सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल कहाणी ॥ ४ ॥ ऐसियास वचती त्याच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर । फळले अमो द्या मग पडतील विचार ॥ ५ ॥ जयासाठीं ब्रह्मादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणे देव जळीं जाले मासे । अर्द्धांगी विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुक्यावधु म्हणे आले अनायासे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका - सिलगणा-सीमोल्लंघन, ओटामध्ये-साडेतीन मुहूर्तांपैकी एक, पिसे-वेडे, अर्धांगी- पत्नी हे पतीचे अर्धांग मानले जाते या अर्थाने लक्ष्मी अर्थ - आमचा हा दसऱ्याचा दिवस फार चांगला व उत्तम असा आहे हा मुहूर्त बरा सापडला असे समजून श्रीहरीचे नाम हृदयात धारण करा त्याची गर्जना जयजयकाराच्या स्वरूपात करा आळस करू नका मी हे सर्व लहान थोर लोकांना सांगत आहे १ या बायानो या तुम्ही श्रीहरी आज दसऱ्याच्या निमित्ताने सिलगणास निघाले आहेत लौकर आरती घेऊन या तुम्ही या श्रीहरीचे मुख आपण भक्तिभावाने ओवाळू, याची पाऊले वंदन करू आपल्या घरच्या घरीच हा थोर देव आपणास प्राप्त झालेला आहे २ साडेतीन सणातील दसरा हा एक महत्त्वाचा व अक्षय असा मुहूर्त आहे त्यावर जे काही साधावयाचे असेल ते साधून घ्या तुम्ही बाकीचे मुहूर्त असे तसेच असतात म्हणून मागेपुढे न पाहता दुसरी कामे सोडून या हरीच्या संगतीत या ३ पुष्कळ रीतींनीं याच श्रीहरीचे नाव मनात धरा ज्यांनी कोणी याचे नाव कानांनी ऐकले असेल त्यांनी याविषयी हयगय करू नये कारण मग हे सुख स्वप्नातसुद्धा कोणास दिसणार नाही उगाच हायहाय करण्याची परिस्थिती मात्र मागाहून निर्माण होईल ४ अशा या हरीस जे बचतील त्याच्या दुर्दैवास सीमा उरणार नाही असे मी त्रिवार गर्जून सांगत आहे मग अशी ही अजरामर घटना पुन काही येणार नाही हे सर्व तुम्ही नीट ध्यानात घ्या नाही तर मग पुन विचारात पडाल ५ या देवासाठी ब्रह्मादिक देवही वेडे झाले असून याचे उष्टे मिळावे म्हणून स्वर्गचे देवही पृथ्वीवरील पाण्यात माशाच्या जन्मास येतात विश्वमाता लक्ष्मी ज्याची पत्नी आहे असा हा योग तुक्यावधू म्हणत आहे की अनायासे लाभला आहे ६ विवरण - तुकोबा किंवा तुक्यावधू कान्होबा याचा हा दसऱ्यावरील अभंग असून याचा अर्थ रूपकात्मकही लावण्यात येतो दशेन्द्रियाचा हा दसरा मुहूर्त अशा अर्थाने मधी याचा अर्थ लावण्यात येतो परंतु दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक उत्तम असल्याने या सुप्रसंगी ईश्वरास मनात साठवून त्याची भक्ती करा हा साधा अर्थ अधिक समर्पक व उद्बोधक वाटण्यासारखा आहे हिंदू परंपरेत आश्विनातील नवरात्रानंतर येणाऱ्या दसऱ्याचा मुहूर्त अनेक
सार्थ तुकारामगाथा २६९ शरणासाठी प्रसिद्ध आहे याच दिवशी दस्त्रस्त्राचे पूजन करून शत्रूचा नाश करण्यासाठी सीमेचे उल्लघन होत असे विद्येच्या उपासनेचाही याच दिवशी प्रारंभ होत असे कौल्य नावाचा ब्राह्मणपुत्र रघुराजाकडे दान मागण्यासाठी आला होता नुकताच विश्वजित् यज्ञ करून रघुराजान आपला खजिना रिकामा केला होता परंतु आलेल्या ब्राह्मणास विन्मुख करून पाठवावयाचे नाही असे ठरवून रघूने कुबेरावर स्वारी केली. कुबेराने भयभीत होऊन नगराबाहेर शमीच्या वृक्षावर सुवर्णाची वृष्टी केली. चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्स्यास मिळाल्या हा दिवस दसऱ्याचाच होता या वेळेपासून दसऱ्यास सोने लुटण्याची प्रथा रूढ झाली असावी. असेही सांगतात की, प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी करण्यासाठी याच दिवशी प्रयाण केले अशा रीतीने हा दिवस पराक्रमाचा, विद्यार्जनाचा, धनार्जनाचा म्हणून पवित्र व महत्त्वाचा मानला जावा वर्षप्रतिपदा, अक्षय्यतृतीया, विजयादशमी किंवा दसरा हे तीन पूर्ण व बलिप्रतिपदा हा अर्धा असे साडेतीन मुहूर्त प्रसिद्ध आहेत या महत्त्वाच्या दिवशी श्रीहरीच्या पाउलांना वंदन करून हा मुहूर्त साधा असा भावार्थ या अभंगाचा वाह् ५०७ ओवाळू आरती' पंढरीराया । सर्वभावे शरण आलो तुझिया पाया ॥ १ ॥ सर्व व्यापून कैसे रूप आकळ । तो हा गौळ्या घरी झाला कृष्ण बाळ ॥ २ ॥ स्वरूप गुणातीत झाला अवतारधारी । तो हा पाडुरंग उभा विटेवरी ॥ ३ ॥ भक्तीचिया काजा कैसा रूपास आला । ब्रिदाचा तोडर' चरणी मिरविला ॥ ४ ॥ आरते आरती ओवाळिली । वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ५ ॥ भावभक्तित्वळे होसी कृपाळू देवा । तुका म्हणे पाडुरगा तुझ्या न कळती मावा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - काजा-तारणासाठी, आकळ-न समजण्यासारखा, ब्रिदाचा-वडघासारख्या दागिन्याचा, तोडर-नोडर, आरतें-मनोभाव, मावा-माया अर्थ – पंडरीराया, तुझी आरती मी मनोभावे ओवाळीत आहे मी सर्वभावाने तुला, तुझ्या पायाना शरण आलो आहे १ तू सर्वत्र व्यापून असतास तरी तुझे रूप वळू। येत नाही परंतु हा अनारूपनेष ईश्वर गोकुळात गवळ्याच्या घरी कृष्णरूपाने बाळ होऊन आला आहे २ रूपातीत व गुणापलीकडचा असणारा हा अवतारधारी पाडुरंग भक्तासाठी विटेवर उभा राहिलेला आहे ३ भक्तीच्या कारणासाठी हा या सगुणरूपात झाला याने पायात वडघासारखा दागिना घातलेला आहे ४ यान मोठ्या भक्तिभावाने मी आरती ओवाळीत आहे याची कीर्ती वर्णन करताना वाणीही परत फिरते ५ भावभक्तीच्या मुळे देवा, तू फार कृपाळू होतोस तुकाराम महाराज म्हणतात, पाडुरंगा, तुझी माया कधी ध्यानात येत नाही ६ ५०८ करूनि आरती आता ओवाळूं श्रीपती ॥ १ ॥ आजि पुरले नवस । धन्य झाला हा दिवस ॥ २ ॥ पाहा वो सकळा । पुण्यवता तुम्ही बाळा ॥ ३ ॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बाळा-या बालरूप देवास, पाहे-वात्रविना अर्थ - आता आरती करून या श्रीपतीला ओवाळू या १ आज माझे सर्व नवस पूर्ण झाले असून आजचा हा दिवस मला धन्यतेचा वाटतो आहे २ तुम्ही सर्व पुण्यवंत आहात, या बालरूप देवास आज नीट पाहा ना ३ तुकाराम आनंदाने आज टाळो वाजवीत आहे हा देवाच्या अगदी जवळ होता ४ ५०९ घाल माझ जरी' पडेन मी पाया । दडयत वाया कोण वेची ॥ १ ॥ आले ते हिशोवे' अवघिया प्रमाण । द्यावे तरी दान मान होतो ॥ २ ॥ १ माझ्या, २ तारडू, ३ तरी, ४ ही शोभे
२६० सार्थ तुकारामगाथा मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैंची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धार्या-फुकट, कृपण-कंजुष. अर्थ :- देवा, तुम्ही कृपेची माळ मला द्याल तरच मी तुमच्या पायां पडत आहे. उगाच फुकट दंडवत कुणास करावा ? १ जे हिशेबाने द्याल ते प्रमाण मी मानून राहीन. जे दान द्याल तो मान म्हणून मी स्वीकारीन २ मोकळ्या मनाने माझी सेवा घ्यावी व आपला कृपाप्रसाद लवकर पाठवावा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हीच कृपण झाल्यावर मग पतितपावन या तुमच्या नामाची जपणूक कोण करणार ? त्यासाठी तरी तुम्ही माझ्या- वर कृपा करावी. ४ ५१० तुम्हीं जायें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥ १ ॥ विठोबा लोभ असों देईं । आम्ही असों तुमचे पाईं ॥ २ ॥ चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गांवा ॥ ३ ॥ तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पाईं-पायावर अर्थ :- देवा, तुम्ही आता आपल्या मंदिरात जावे. आम्हीही आमच्या घरी जाण्यासाठी निघतो. १ देवा, विठोबा, आमच्यावर लोभ असू द्यावा तुमच्या पायावर आमचे जीवन सर्वस्वी आहे. २ आम्ही आमच्या गावास निघालो असलो तरी आमचे चित्त आपल्याच सेवेत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या गावात निघालो असलो तरी दिशा चुकून तुमच्याच पायाशी परत आलो असे होईल. ४ ५११ पाहे प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥ १ ॥ शेष घेऊनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ २ ॥ जालो एकसया । तुम्हां आडुनियां देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । करुनि राहिलों निश्चित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शेष-उरलेमुरले, एकसया- एकरूप अर्थ :- देवा, मी तुमच्या प्रसादाची वाट पाहात आहे तुमचे भोजनाचे ताट मला धुऊन द्यावे. १ तुमच्या भोजनानंतर जे उरलेमुरले असेल ते मी घेऊन जाईन. २ देवा, तुमच्या आडून मी असलो तरी तुमच्या रूपाशी मी एकत्व पावलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आपले चित्त चिंताविरहित करून मी निवांत राहिलो आहे ४ ५१२ केली कटकट गाऊं नाचो नेणता । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥ १ ॥ बैसा सिणलेती पाय रगडू दातारा । जाणवून द्या वारा उब झाली शरीरा ॥ २ ॥ उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहों न धरावा ॥ ३ ॥ तुझिये सगतीं 'आम्ही करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सिणलेती-दमलात, कोप-राग, कोल्हाळ-गोंगाट, गडबड, गर्जना अर्थ :- देवा, मी अज्ञानाने तुमच्याबद्दल काही न समजता नाचून, गाऊन कटकट केली. देवा, आम्हास कसलीच लाज किंवा पोटाची चिंता राहिलेली नाही १ देवा, दातारा, तुम्ही फार दमलेले आहात. खाली बसा ना मी तुमचे पाय रगडून देऊ का ? तुमच्या शरीराला उकाड्याचा त्रास होत असेल तर देवा, मी वारा घाल १ येऊ
Here is the complete Devanagari text transcription of the page:
सार्थ तुकारामगाथा २६१ षा ? २ उशीर झाला, उशीर झाला, असे म्हणावे का ? आईने बालकाविषयी कधी राग धरू नये. ३ देवा, तुझ्या संगतीत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व गोपाळ मिळून तुझ्या नामाची गर्जना करून आनंद लुटू. ४ ५१३ कळस वाहियेला शिरों । सहस्रनामें पूजा करीं ॥ १॥ पीक पिकले पिकले । घन दाटोनियां १ आले ॥ २ ॥ शेवटींचें दान । भागा आला नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट । भरले वारले बोभाट ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कळस-मुकुट, बोभाट-तक्रार, वारले-निवारण झाले अर्थ :- या देवाने आपल्या मस्तकावर मुकुट धारण केलेला आहे. या देवाची मी सहस्र नामांनी पूजा करीत आहे. १ पाच्या नामस्मृतीचे पीक अफाटपणे पिकले असून त्याची छाया सर्वत्र घनदाटपणे पसरली आहे. २ शेवटचे दान म्हणून हा नारायणच आमच्या वाट्यास आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या प्राप्तीमुळे आमचे पोट भरले आहे आणि इतर सर्व तक्रारी निवारण झालेल्या आहेत. ४ विवरणः-हा व याच्या आधीचे पाचसात अभंग हे तुकोबांच्या मनाच्या तृप्तीची भावना दर्शविणारे आहेत. पंढरीनाथाची आरती वगैरे झाल्यानंतर संतुष्ट चित्ताने देवाची करुणा भाकावी, त्याचे ऋण मान्य करावे, त्याचा प्रेमाने निरोप घ्यावा, पुन्हा त्याला एकचित्ताने आठवावे, त्याच्या प्रसादाची वाट पाहावी, त्याच्या उच्छिष्टाची आशा करावी इत्यादी भाववृत्तींनी हे सर्व अभंग आर्द्र झालेले आहेत. अर्थाला तुकोबांचे अभंग जितके सोपे, सरळ तितकी त्यात भक्तिभावाची आर्द्रता अधिक असते असे दिसून येईल या अभंगात 'सहस्रनामें पूजा करी' असा एक उल्लेख आला आहे तो महत्त्वाचा आहे भागवत संप्रदायात विष्णुसहस्रनामास पूर्वीपासून मोठेच महत्त्व आहे महाभारतातील अनुशासनपर्वाचा ४९ वा अध्याय म्हणजे महत्त्वाचा मानला जातो विष्णूचे सहस्रनामानी ध्यान करण्यास याचा उपयोग मोठाच असतो. 'नामाचेया सहस्रबरी । नावा या अवधारी । सज्जन्या संसारी तारू जाहलों' असा ज्ञानेश्वरांनी या सहस्रनामाचा उल्लेख केलेला आहे. 'सहस्रनामाचे वाटगें । साडीं घेतले नेटगे' असा याचा उल्लेख नामदेवानी केला आहे. तुकोबांच्याही पाठात हे सहस्रनाम 'नाव धड करा सहस्रनामाची', 'नाममंत्रमाळा । विष्णुसहस्र', 'सहस्रनामाची आरोळी', 'केली सहस्रांची माळ' इत्यादी उल्लेख तुकोबाच्या अभंगात इतरत्रही सापडतात. ५१४ आरुष शब्द बोलों मनौ न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुची आई ॥ १॥ देईं गे विठाबाई प्रेमभातुके । अवघियां कवतुके लहाना थोरां सकळा ॥ २॥ असो नसो भाव आलो तुझिया ठाया। पाहे कृपादृष्टी आता पंढरीराया ॥ ३॥ तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वाकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आरुष-अडाणी, बोबडे, भातुके-खाऊ अर्थ :- हे विठाई, तूच आमची आई आहेस. आम्ही अडाणीपणाने काही वेडेवाकडे व बोबडे शब्द बोललो असलो तरी तू ते मनात काही धरू नकोस आम्ही तुझीच लडिवाळ बाळे आहोत ना ? १ विठाबाई, आई, तू आम्हाला प्रेमाने, कौतुकाने खाऊ दे. सर्व लहानथोर भक्तांना कौतुकाने तू प्रेमाचा खाऊ दे ना २ आमच्या मनात भाव असो वा नसो, पण आम्ही तुलाच शरण आलो आहोत. पंढरीनाथा, तू कृपादृष्टीने आमच्याकडे पाहा ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही वेडीवाकुडी असलो तरी तुझीच आहोत. पण तू नामस्मरणाने संतुष्ट होऊन आमचे भवपाश तोडून टाक. ४ ५१५ आडकले देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥ १ ॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं अजगरा ॥ २ ॥ १ मोडोनिया.
२६२ सार्थ तुकारामगाथा देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥ ३ ॥ राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- फरकट-कटकट, उजगरा-जागरण. अर्थ :- चला. आता देवाचे दार बंद झाले आहे. येथे उगाच कटकट करू नका. १ चला, आता आपण आपापल्या घरी जाऊ. इथे उगीच जागरण करून गडबड नका करू. २ देवाला झोप लागली आहे. येथे उभे राहून काय साधणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे करण्याने देवास राग येईल. मग तो आपली सेवा घेणार नाही. तेव्हा चला सर्वजण घरी. ४ ५१६ कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥ १ ॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारु भवनदीची ॥ २ ॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तारू-नाव, परता-वेगळा, निराळा अर्थ :- हा श्रीकृष्ण माझी माता आहे. श्रीकृष्ण माझा पिता आहे. बहिण, भाऊ, चुलता, सर्व काही हा श्रीकृष्णच आहे माझा. १ हा श्रीकृष्ण माझा गुरु असून संसारसागर तरून नेणारी नावही हाच आहे. २ कृष्णच माझे मन व हाच माझे इष्टजन होय. माझे सोयरे वगैरे आप्तजन हाच श्रीकृष्ण आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण माझा एक विसावा आहे याच्यापासून जीव निराळा असे वाटत नाही. ४ विवरण:- श्रीकृष्णावर, विठ्ठलावर तुकोबांचा किती जीव होता याचा उत्कृष्ट पुरावा म्हणून या अभंगाचा देता येईल. बुवांचे सर्व जीवनच विष्णुमय, कृष्णमय होऊन गेले होते माता, पिता, बंधू, मित्र, सोयरा, गुरू, चुलता, बहीण इत्यादी सर्व नात्यांनी खरा असा एक श्रीकृष्णच होय या भावाचे अनेक अभंग मराठी संतांचे सापडतील. 'तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती । गण गोत मित्र तूं माझें जीवन', 'तूं माझी माउली तूं माझी साउली । तूं मज एकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव', 'मायबापबंधू सोयरा सांगाती । तूंचि माझी प्रीति गणगोत' या शब्दांतून तुकोबांनी श्रीकृष्णाचे व आपले नाते स्पष्ट केले आहे नामदेव-एकनाथ यांनीही परमेश्वरात आपली सर्व नाती पाहिली आहेत. 'मातापिता बंधुभगिनी इष्टमित्र विठ्ठला तूं रे' या शब्दात नामदेवानी या देवाची स्तुती केली आहे. ज्ञानेश्वरांनीही श्रीकृष्णास उद्देशून 'तू गुरु बंधू पिता । तू आमची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदों आमुतें' असे त्याचे स्तवन केले आहे. श्रीकृष्ण सर्व नात्यांनी आपला आहे हा भाव सर्वत्र उमटलेला दिसेल या भावाचे तात्त्विक अधिष्ठान अभंग क्र ४८६ च्या विवरणात पाहावे ५१७ कृपा करावी भगवंते । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥ १ ॥ माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ २ ॥ व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥ ३ ॥ तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पालवी-प्रेम, कृपा, गुंडा-प्रमुख अर्थ:- भगवंताने कृपा करावी व मला असा एक शिष्य द्यावा, १ की जो माझे हे हरिनामाचे व भक्तिप्रेमाचे व्रत पुढे चालवील असा हा शिष्य असावा त्यावरच तू प्रेमपूर्वक कृपा करावीस. २ माझा शिष्य ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत प्रमुख असावा. तीनही लोकात त्याची कीर्ती पसरून राहावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने मी माझ्या विठोबाच्या दारात उभा राहून हाका मारीत आहे. ४
सार्थ तुकारामगाथा २६२ ५१८ जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हंसी ॥ १ ॥ गेलो येतो नाहीं ऐसा । सत्य मानावा १ भरवसा ॥ २ ॥ नका काढू माझीं पेवे । तुम्हीं वरळा भूस खावे ॥ ३ ॥ भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥ ४ ॥ सांगाल जेवाया ब्राह्मण । तरी कापाल माझी मान ॥ ५ ॥ वोकलिया वोका । म्या खर्चिला नाहीं रुका ॥ ६ ॥ तुम्हीं खावे ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥ ७ ॥ नाहीं माझे मनीं । पोरे रांडा नागवणी ॥ ८ ॥ तुका म्हणे नीट २ । होते तैसे बोले स्पष्ट ॥ ९ ॥ शब्दार्थ व टीपा - निरवी-सोपवी, स्वाधीन करी, वरळा-फोलकटे व धान्य याचे मिश्रण अर्थ - कुणी एक संसारात आसक्त झालेला मनुष्य काशीयात्रेला निघताना म्हणत आहे, ' मी निघालो काशीयात्रेला गाई, घोडे, म्हशी याचा सांभाळ नीट करा तुम्ही मी ही जनावरे तुमच्यावर सोपवीत आहे १ मी गेलो की लगेच येतो गेलो असेही वाटणार नाही तुम्हास माझ्यावर विश्वास असू द्या तुमचा २ मात्र ध्यानांत ठेवा, मी गेल्यावर माझी धान्याची पेवे तुम्ही फोडू नका तुम्ही भुसा व फोलकटे याचेच अन्न खावे ३ दारात भिकारी आला तर हातात काठी घेऊन त्याच्यामागे लागा व त्याला हाकलून द्या ४ मी इथे नाही असे पाहून तुम्ही एखादा ब्राह्मण जेवायला सांगाल तर मग माझी मान कापल्याइतके दुःख मला होईल. ५ ओकारी किंवा याती होका दुखणे आले तरी मी त्याच्यासाठी, औषधासाठी एक पैसाही खर्च केलेला नाही असा पैसा मी जतन केला आहे ६ तुम्ही सर्वांनी नुसते ताकपाणी पिऊन राहावे , आणि तूपलोणी माझ्यासाठी ठेवून द्यावे ७ तुम्ही कुणी काही खर्च करू नका माझ्या राडापोरांची नागवण व्हावी असे माझ्या मनात नाही ८ तुकाराम महाराज म्हणतात, हा त्याच्या मनात जसे आहे तसेच स्पष्ट बोलत आहे ९ विवरण - आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, भगवद्भक्तीचा आनंद लुटल्यावर तुकोबा दुसऱ्याच्या सुखार्थ समाजातील दंभावर बोट ठेवून कडक टीका करीत असत लोकांना फसविणारे भोंदू गुरू पाहून त्यांना राग येई पण या भोंदू गुरूच्या नादी लागणाऱ्या बिचाऱ्या लोकांनाही कसे समजत नाही याचे त्यांना नवल वाटे नागवणींत, भक्तिप्रेम याचा सीधा साधा मार्ग सोडून सगळी व्यर्थ कर्मकांडात्मक कटकटीत सापडले होते कित्येकाच्या मनात संसाराची आसक्ती एवढी मोठी होती की, तिचे दर्शन त्यांच्या वरवरच्या पाठांत व तीर्थयात्रेतही स्पष्टपणे होत असे आंधळेपणानें रोगी संसारात, केवळ बाह्यांगांत बस गुरफटून राहिले होते याची उपरोधिक उदाहरणे तुकोबांनी अनेकदा आपल्या बोचक व मर्मग्राही शब्दात दिलेली आहेत या ठिकाणी एक वयोवृद्ध झालेला मनुष्य काशीयात्रेस निघणारा असून त्याचे चित्त संसारातील क्षुद्र वस्तूत कसे गुंतून राहिलेले आहे याचे मोठे विनोदी व उपहासगर्भ चित्र तुकारामानी दाखविलेले आहे एका संसारपाशात आसक्त झालेल्या एका पुरुषाचे हे चित्र पुढील एका अभंगातील एका स्त्रीच्या शब्दचित्राशी ताडून पाहण्यासारखे आहे एक आवा पंढरपुरास चाललेली असते, तिचेही चित्त संसारात कसे अनाठायी रमोत असते, याचे मोठे हृद्य व विनोदी पण विचारप्रवर्तक शब्दचित्र तुकारामांनी रंगविलेले पुढे अभंग नं ४२१९ मध्ये आहे. ५१९ कास घालोनी बळकट । झालो कळिकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥ १ ॥ या रे या रे लहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ २ ॥ १ माना श, २ नष्ट
कर्मीं गुंतले रिकामे । जपी तपी येयें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥ ३ ॥ एकदर शिक्का । पाठविला इहलोक । आलीं म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नीट-धीटपणे लढण्यास सिद्ध मुमुक्षू-मोक्षाची इच्छा करणारे, दमामे-नगारे, शिक्का-शिक्का अर्थ - बळकटपणे काचा घालून मी प्रत्यक्ष यमाशीहो लढण्यास धीटपणे सिद्ध झालो आहे संसाररूपी सागर तरून जाण्यास मी या नामस्मरणाची नावच तयार केली आहे १ या हो जे कोणी लहान, थोर, नर, नारी, कुठल्याही जातीचे, तुम्ही असा कुणासही इकडे येण्यास विचार करण्याची जरुरी नाही निश्चित मनाने यावे २ कुणी कामात आपापल्या व्यवहारात गुंतलेले असतील, कुणी रिकामे असतील, कुणी जप करण्यात गुंतले असतील, कुणी तपश्चर्येत व्यग्र असतील, कुणी मुक्त असतील, कुणी मोक्षाची इच्छा करणारे असतील सर्वांसाठी मी येथे विठ्ठलाच्या नामस्मरणाचे नगारे सुरु केले आहेत ३ या सर्व लोकांना एकच नामाचा शिक्का या लोकात उपयोगी असल्याने ईश्वराने पाठविला आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी या नामाचा धारकच येथे आलो आहे ४ ५२० आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्तावया ॥ १ ॥ झाडू संताचे मारग । आडरानें भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥ २ ॥ अर्थे लोपलीं पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । विषयलोभी मन । साधने बुडविलीं ॥ ३ ॥ पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वैकुंठवासी-श्रीविष्णूच्या वैकुंठात राहणारे साच-खरोखर, लोपलीं-लपली, शब्दज्ञाने- शाब्दिक ज्ञानाने अर्थ - खरे म्हणजे आम्ही वैकुंठात श्रीविष्णूरोबर राहणारे असून एका विशिष्ट कारणासाठी आम्ही या भूमीवर आलो आहोत पूर्वी ऋषिमुनींनी जे सांगितले तेच सत्यार्थाने सांगण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी आम्ही या पृथ्वीवर अवतरलो आहोत १ पूर्वीच्या सब साधुसंतांचे, ऋषिमुनींचे मार्ग आम्ही झाडून स्वच्छ करू जग आडरामाच्या बिकट मार्गाने चालले आहे पण त्यात आम्ही साधुसंतांच्या व प्राचीन ऋषिमुनींच्या उच्छिष्टारूपा भागाचे सेवन घडवून नीट सरळ मार्गावर आणू व आम्हीही तो भाग सेवन करू २ आज पुराणातील खऱ्या अर्थाचा लोप झाला असून केवळ शाब्दिक ज्ञानाने सब आयुष्याचा नाश आरंभिला आहे सर्वांच्या मनात विषयाचाच लोभ असल्याने सर्व महत्त्वाची साधन बुडाली आहेत ३ परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मात्र या भक्तीचाच डांगोरा पिटू या भक्तीचाच प्रचार करू यामुळे प्रत्यक्ष यमासही दरारा वाटेल चला त्या हरीच्या नामाचा जयजयकार मोठ्या आनंदाने करा ४ विवरण - तुकोबांचे आत्मप्रचीतीचे, आत्मसामर्थ्याचे, आत्मविश्वासाचे व आपण कोणत्या कार्यासाठी जन्मलो आहोत यासंबंधीच्या निश्चित जाणिवेचे जे काही अभंग आहेत, त्यात वरील दोन अभंगाना फारच महत्त्व आहे सर्व जातीच्या, सर्व पंथाच्या, सर्व वयाच्या स्त्रीपुरुषाना त्यांनी या भक्तिमार्गात पाचारण केले आहे या नामस्मरणाच्या मार्गावर त काचा घालून प्रत्यक्ष यमाशीही लढण्यास सिद्ध झाले आहेत त्यांच्या या सामर्थ्यामुळे
सार्थ तुकारामगाथा २६५ यमासही दरारा वाटू लागला आहे साधक, मुमुक्षु, प्रपंचिक कोणीही कोणत्याही पथातील असोत, नामस्मरणाचा शिक्का त्याच्यावर या कलियुगात बसावयास हवा, अशी त्याची इच्छा आहे यासाठीच भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी त सिद्ध झाले आहेत यापूर्वी आम्ही ईश्वराच्या सान्निध्यात, वैकुंठीच होतो हे बुवाचे वचन त्याच्या एकंदर चरित्रक्रमास व तत्त्वज्ञानास धरून आहे आपण प्राचीन ऋषीमुनी व साधुसंत याच्याच मार्गाने जात असून तीच परंपरा चालवीत आहोत असा स्पष्ट निर्देश त्यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे 'अंबरीष प्रल्हाद अंगद। उद्धव नामया नामाचा बोध ॥ हाचि भक्तीचा कळस । पिका आला ब्रह्मरस ।। सकल्प शतकोटी केलेसे। तुका म्हणे लाभले शेष ॥ झाला अवताराचा कळस । पिका आला ब्रह्मरस' या ओळींतून आपण अंबरीष, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव इत्यादींचेच वारसदार व अवतार आहोत असाच भाव प्रगट झाला आहे दुसऱ्या एका अभंगात त्यांनी आम्ही परमेश्वराच जुनेच मित्र आहोत असे सांगितले आहे 'आम्ही हरीचे सवंगडे । जुने ठावंचे वेडे वांगडे ।' आणखी एका अभंगात शुकाने समाधी लावली तेव्हा आम्ही तेथे होतो असे तुकोबांनी म्हटले आहे (अभंग क्र २७७८) आपण देवाचा निरोप घेऊनच आले आहात असे एका अभंगात (अभंग क्र ३४४) सांगितल्याचे आपण पाहिलेच आहे खऱ्याखोट्याचा निवाडा करून मार्ग स्वच्छ करण्यासाठीच आपण आले आहात, असही त्यांनी एका अभंगात म्हटले आहे (अभंग क्र ६१८) जन्मोजन्मी आपणास हेच काम कराव लागत असही त्यांनी एकदा स्पष्ट केले आहे 'मार्ग बहुता अन्नीं । हेंचि करीत आम्ही' असे त्यांनी निर्भिडपणे सांगितले आहे (अभंग क्र २३००) 'धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण । हेंचि आम्हा करणे काम' असा आपल्या आयुष्याचा हेतु त्यांनी एका अभंगात (क्र २१३६) स्पष्ट केला आहे. 'धर्म रक्षणासाठों । करणे आटी आम्हासी ।' असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे (अभंग क्र २६०) या सर्व आत्मप्रचीतीच्या व निश्चयात्मक भागाच्या अभंगावरून तुकोबांचे कार्य हे एक लोकोत्तर असे ईश्वरी काय हात असे मानाकयास हरकत नाही आपली वाणी 'नारायणीं मिश्रीत' आहे असेही त्यांनी एका अभंगात सांगितले आहे (अभंग क्र १३०९) 'मज विश्वंभर बोलवितो' हा त्याचा आत्मविश्वास प्रसिद्ध आहे (अभंग क्र १००७) याच अभंगात, 'वदवी गोविंद हेंचि यंदे' म्हणून त्यांनी स्वत च्या वाणीचे दिव्यत्व सूचित केले आहे 'संताचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें' असा त्याचा नम्र भाव आत्मविश्वासामारहित प्रगट झाला आहे (अभंग क्र ९१९) 'बोलविती देव मज,' परि त्या विश्वभरें बोलाविले अशा ओळींतून तुकोबांच्या अभंगवाणीचा प्रासादिक गुण सहज ध्यानात येणारा आहे आणि याच प्रासादिक वाणीमुळे व ईश्वरी बळामुळे तुकोबांना 'पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।' असा आत्मसामर्थ्याचा घोष करता आला जे आपण दुसऱ्यांना मागणार, साधकांना वा प्रपचिकांना मार्गदर्शनासाठी मागणार, त्याची प्रचीती स्वतःस आल्याखेरीज त्यास तेज पडत नाही, लोकाच्या मनावरही त्याचा परिणाम होत नाही परंतु तुकोबांना ही सर्व अनुकूलता प्राप्त झाली सद्गुरुनाथाची कृपा झाली नामदेवानी कवित्वाची जागृती दिली, ईश्वरसाक्षात्कार झाला, आणि मग तुकोबांच्या वाणीम आत्मप्रचीतीचे, ईश्वरी कृपेच तेज चढले 'तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे' अस सामथ्य मग त्याच्या अंगी प्रकट झाले 'गर्जूं हरिचे पोवाडे । मेळवूनि वैष्णव बागडे । घालू पायदळीं । कळीकाळ त्या बळें ।' यासारख्या शब्दांना धार आली ती तुकाराच्या सामथ्यमपन व आत्मविश्वाससम्पन्न देवा बळामुळे, 'सूर्याच्या परी । तुका लोकीं प्रौढा करी' हे सामथ्यवान बोर साध्या माणसाचे कसे असतील? खालील अभंगही असाच स्वाच्या सामर्थ्यवान वाणीचा निदर्शक असा आहे ५२१ बळियाचे अंकित । आम्ही जालो वळिवंत ॥ १ ॥ लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मिंचा मारा ॥ २ ॥ जन धन तन । केले तृणाही समान ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - षडूर्मिंचा-काम, क्रोध, मोह, लोभ, मद, आणि मत्सर या सहा मानसिक वृत्तींचा, अथवा शोक, मोह, जरा, मृत्यू, क्षुधा, व पिपासा या सहा उर्मी संसारसागराच्या लहरीप्रमाणे मान या आहेत तु गाथा ३४
२६६ सार्थ तुकारामगाथा अर्थ - आम्ही त्या बलवान प्रभूचे बक्ति झालो असल्याने आम्ही पण त्याच्याइतकेच बलवान झालो आहोत १ आम्ही संसारास लाथ हाणून षड्रिपूचा अथवा षडूमींचा नाश केला आहे. २ लोक, आप्तस्वकीय, धन, शरीर याना आम्ही गवताप्रमाणे क्षुद्र मानले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणि आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर उभे आहोत आम्हास मुक्तीची काही किंमत नाही ४ विवरण -याही अभंगात तुकोरावाच्या मनाचे सामर्थ्य प्रकट झाले आहे ईश्वराच्या सगतीने आपण एवढे बळवत झाला आहोत की मुक्तीचीही किंमत यापुढे त्याना वाटेनाशी झाली आहे माधुर्यताना मोक्षाची अथवा मुक्तीची महती भक्तीपुढे कधीच वाटत नाही ' सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करटा' असे तुकोबांनीच एके ठिकाणी म्हटले आहे जे बद्धताच मानायला तयार नाहीत त्यानी मुक्तीची वाटाघाट न करावी हेच युक्त होय. ५२२ मृत्युलोकी आम्हा आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥ १ ॥ विटलें हे चित्त प्रपंचापासूनी । वमन१ हे मनीं बैसलेसें ॥ २ ॥ सोनें रूपें आम्हा मृत्तिके समान । माणिके पाषाण खडे तैसे२ ॥ ३ ॥ तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हापुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परी-प्रकार, वमन-वाती, आव रिसाचिया परी-अस्वलोप्रमाणे अर्थ - या मृत्युलोकात आम्हास एका हरिनामाशिवाय दुसरे कोणतेही प्रकार आवडत नाहीत १ या प्रपंचापासून आमचे चित्त पूर्णपणे विटून गेले असून एखाद्या वातीप्रमाणे घृणा त्याच्याविषयी आमच्या मनात बसली आहे २ सोने, रुपे, आम्हा हरिदासांना मातीप्रमाणेच वाटते आणि रत्ने, माणके दगडाच्या खड्याप्रमाणे वाटतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे या बायका आमच्यापुढे येणाऱ्या एखाद्या भयानक अस्लो- प्रमाणेच वाटतील ४ ५२३ स्त्रियाचा तो सग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥ १ ॥ नाठवे३ हा देव न घडे भजन । लाचावले मन आवरे ना ॥ २ ॥ दृष्टिसुखें मरण इंद्रियाच्या द्वारे । लावण्य ते खरे दु खमूळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जरी अग्नि जाला साधू । परी४ पावे बाधूं संघट्टणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सग-महवास काष्ठा-लाकडाच्या, नाठवे-आठवत नाही अर्थ - नारायणा, या स्त्रियाची संगत मला नको ह्याचे रूपलावण्य कितीही असले तरी मी त्याना लाकडाच्या, दगडाच्या किंवा मातीच्या समानच मानीन १ कारण याच्या सगतीत देव कधी आठवत नाही, कधी भजन होत नाही , व लालचावलेले मन कधी आवरले जात नाही २ याच्या नुसत्या दृष्टीच्या सहवासानेही मरणच येते खरोखर अशा स्त्रियाचे सौंदर्य हे दुःखाचे मूळच समजावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, अग्नी हा साधू झाला तरी त्याच्याशी विशेष संघटन केल्यास त्यास आलिंगन दिल्यास अग पोळणारच. ४ ५२४ पराविया नारी ५रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायींचेचि ॥ १ ॥ जाईं वो तू माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हो तैसे ॥ २ ॥ न साहावे मज तुझें हे पतन । नको हे वचन दुष्ट वदो ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पराविया-परक्याच्या, ठायींचेची-प्रथमपासूनच अर्थ -बाई, परक्याच्या स्त्रिया आम्हास रखुमाईमातेसमान आहेत. हा नियम आमचा प्रथमपासूनच ठरलेला आहे १ माते, तू परत जा आम्हाला गुंतविण्याचे प्रयत्न तू करू नकोस, आम्ही हरिभक्त त्या वश होणाऱ्याच्या १ बैसलेस मनी रामनाम, २ जैसे, ३ अंतरे, ४ तरी, ५ माउली
सार्थ तुकारामगाथा २६७ जातीचे नाहीत, २ तुझे हे पापकृत्य मला सहन होत नाही. तुझ्या तोंडून येणारी ही दुष्ट वचनाची वाणी मला ऐकवत नाही तू असे बोलू नकोस ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर पती हवाच असेल तर गावात इतर लोक का थोडे आहेत ? त्यांच्यातील एखादा निवड ना ४ विवरण - वरील दोन अभंगांना तुकोबांच्या आयुष्यातील एका विशिष्ट प्रसंगाचा आधार सांगितला जातो. कुणी एक स्त्री त्यांच्याकडे विषयसुखाच्या प्राप्तीसाठी आली होती. तिला उद्देशून या अभंगाची निर्मिती झाली असावी. तुकोबांचा लौकिक जसजसा वाढू लागला तसतसा त्यांच्या भोवती अनेक स्त्रीपुरुषांचा जमाव जमत असावा. तुकारामबुवांच्या मुखावरील तेज पाहून, त्यांच्यापैकी एका रूपवान स्त्रीच्या मनात भलतीच वासना निर्माण झाली. तिला उद्देशून तुकारामांनी आपल्या हरिभक्तीचे जे मर्म सांगितले आहे, ते सर्वच प्रापंचिकांना व साधकांना उपयुक्त आहे. मोह, काम, क्रोध या वृत्ती नैसर्गिक उभ्या, पण त्यांचा आविष्कार यथोचित मार्गाने होणेच युक्त आहे. त्यांचा स्वैर संचार व्यक्तीला व समाजाला अहितकारकच होय 'दुभत्याची स्त्री मातेसमान' हे एक ब्रीदवाक्य मराठी साधू- संतांचे व श्रीशिवरायांचे होते. यातील मर्म फार मोठे होते. स्त्रीने समाजाचे स्थैर्य व नैतिक आदर्श यांच्यावर राष्ट्राची उभारणी होत असते. या दोन्ही अभंगांकडे अगदी साध्या प्रपंचिकाच्या दृष्टीने पाहिल्यावरही त्यातील मथितार्थ पटण्याजोगा आहे असे दिसेल. ईश्वरचिंतनात व आत्मसुखात तल्लीन झालेल्या महात्म्याला या शुचितेची केवढी गरज आहे हे सांगावयास पाहिजे असे नाही. त्याची दृष्टीच निवडून गेलेली असल्यामुळे स्त्री सर्व सौंदर्य हरिरूप आहे, माऊलीरूप आहे, हा अधिकार प्राप्त होणे अवघड असले तरी याच आदर्शाप्रत सर्वांना जावयाचे असते. ‘स्त्रियांचा तो संग नको नारायणा’ असे तुकोबा म्हणतात त्यावरून संदर्भ न जाणता व त्या अभंगातील रहस्य न ओळखता तुकारामबुवांचा किंवा एकूण संतांचाच स्त्रीविषयक दृष्टिकोन किती खोटा व चुकीचा आहे याचे विवेचन करण्याकडे प्रवृत्ती काही आधुनिक टीकाकारांची असते, ती रीती व्यर्थ आहे. हे संतांच्या वचनाचा चार- बाजूने अर्थ पाहिल्याशिवाय ध्यानात येणार नाही. स्त्रीमोहवासना, स्त्रीसौंदर्याचा एक प्रकारचा तिरस्कारच संतांच्या मनात असतो हे वरवर दिसने हे खरे आहे. ‘नको नको स्त्रियांचा सांगात । नको स्त्रियांचा एकांत । नको नको स्त्रियांचा परमार्थ । करिती आघात पुरुषासी’ असे थोर प्रपंचिक संत एकनाथ यांनी तरी का म्हटले आहे ? ‘स्त्रीसंगा तडफडूनि जाण । वैराग्यासी ये मरण’, ‘तेथ वासना उपदेश जाण । आली नागवण परमार्था’, ‘ज्ञानी पोळी धरितां हातीं । तैशी स्त्रियाशी संगति ।’ इत्यादी अनेक ओवींतून एकनाथांनीसुद्धा स्त्रीसहवासाची निंदा केलेली दिसने खरी. तुकाराम व रामदास यांनीही स्त्रीदेहाची यथेच्छ टवाळी वरवर केलेली दिसते. मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई या थोर स्त्रिया भक्तिमार्गात फार मोठ्या पदावर आरुढ झालेल्या असताना मग स्त्रीबद्दल असे उद्गार काढतात, याचा स्पष्ट अर्थ असा की अतिरिक्त स्त्रीसहवास प्रपंचिकानाही बाधक आहे. केवळ स्त्री, केवळ विषयभोग, केवळ कामसुखाची चटक यापासून साध्या प्रपंचिकासही बाधा होणारी आहे आणि साधकास, मग तो फार मोठी ऐहिक ध्येय मिळविणाराही असो, स्त्रीलोभ अतिशिक्तपणे किती बाधक होईल हे काय सांगावयास हवे ? नटूनथटून तुकोबांसारख्याही सत्पुरुषाकडे येणाऱ्या स्त्रीस तुकोबांनी या स्त्रिया काष्ठाच्या, पाषाणाच्या, मूर्तिवेच्या मी मानीन असेच म्हणणे यथायोग्य नव्हे काय ? ‘परस्त्रीया सदा मातृप्रायहिणी’, ‘परद्रव्य परनारीचा अभिलाष । तेणोनिया म्हार सर्व भाष्या’, ‘विटाळ तो परद्रव्य परनारी’ अशा वचनाचा श्वासोच्छ्वासां वर्षाव करून समाजास मार्गदर्शन करणाऱ्या तुकोबांनी पुढे येणाऱ्या नटव्या स्त्रीस कुणीतरी पती निवडून संसार कर, असा उपदेश केला हे यथायोग्यच झाले असे मानावे लागने. तुकोबांच्या किंवा संतांच्या स्त्रीविषयक मनाचा निर्णय याही अभंगा- वरून आता घेता येण्यासारखा आहे. ‘कोमल ज्ञानीं विखो विघ्न’ असे श्रीचक्रधरांचेही एक सूत्र होते. कोणत्याही ध्येयाच्या साधनासाठी विषयाचे विघ्नच असते. अगदी रोजचा प्रपंच करणाऱ्यासन्ही त्याचा अतिरेक बाधक आहे. माझी बायको, माझी मुले यांचाच ध्यास घेणाऱ्या गाढव प्रपंचिकांची चित्रेही तुकोबांनी उत्तम रीतीने रेखाटली आहेत. सर मग विषयसुखार्थ बुवांच्याकडे येणाऱ्या या स्त्रीसंबंधी बुवांनी त्यांचा खडतर स्वभाव ध्यानात घेता सौम्यच भाषा वापरली आहे असे म्हणावे लागते.
२६८ सार्थ तुकारामगाथा ५२५ भक्तप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥ १ ॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥ २ ॥ तुका म्हणे माझें जाळुनि संचित । करीं वो उचित भेट देईं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- भक्तप्रतिपाळे-भक्ति करणाऱ्याचा सांभाळ करणारा, गुणें-कारणाने, कपाळ-नशीब अर्थ :- विठ्ठल माऊली, तू दोनवत्सल व भक्तांवर कृपा करणारी कृपाळू माताच आहेस. १ कोणत्या कारणाने माझा तुला विसर पडला गे माय ? माझेच नशीब खोटें त्याला काय करू ? मीच अवगुणी आहे असे मला वाटते. २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे सर्व संचित कर्म जाळून, नाहीसे करून मला भेट देणे हेच तुम्हास उचित नाही काय ? ३ ५२६ तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥ १ ॥ लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटों ॥ २ ॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वास-वाट, लेखी-मोजीत आहे अर्थ :- पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोण सोयरे आहेत रे ? दुसरे कुणीही मला आणखी तुझ्याशिवाय आप्त नाहीत विठ्ठला १ मला तुझीच एक आशा लागली असून मी एकसारखी तुझी वाट पाहात आहे रात्र व दिवस मी हाताच्या बोटावर मोजीत आहे. २ मला काही काम गोड लागत नाही, की धंदा सुचत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला देवा, एकसारखे तुझेच ध्यान लागलेले असते. ३ ५२७ पहियंते आम्ही १तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावे हितगुज ॥ १ ॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे २जनतिये ॥ २ ॥ जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥ ३ ॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥ ४ ॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशी । ठावें आहे देसी मागेन तें ॥ ५ ॥ म्हणउनि पुढें मांडियेली आळी । यिकोनियां चोळी डोळे तुका ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पहियंते-आवडते, लळे-लाड, आळी-हट्ट, यिकोनिया-रडून अर्थ :- देवा, आम्हास जे आवडते ते आम्ही तुझ्यापाशी मागू व आमच्या जीवात असणारी हितगुजाची गोष्ट आम्ही तुला सांगू १ दीनावर दया करणाऱ्या वत्सल देवा, विठ्ठला, तू माझे हट्ट पुरविणार आहेस. तू वत्सल अशी माऊलीच आहेस २ आम्ही आमचा सर्व जीवभाव देवा, तुझ्या पायांवर वाहिला आहे. तूच सर्व ठिकाणी आम्हांस एकरूपाने दिसतोस. ३ आम्हांला विठ्ठला, दुसऱ्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस. मी आता दुसऱ्याच्या घरी जाणारसुद्धा नाही. ४ तुझ्या प्रीतीची सर्वसत्ता एकवटलेली असून मी जे मागेन ते तू देशील असा विश्वास मला आहे ५ म्हणून तर देवा, मी तुझ्यापुढे हा हट्ट धरलेला आहे. मी रडूनरडून डोळे चोळीत आहे. ६ ५२८ कोण पर्वकाळ पहाल तीथ । होते माझें चित्त कासावीस ॥ १ ॥ पाठवी भातुकें प्रेरीं ३झडकरी । नको राखौं उरी पांडुरंगा ॥ २ ॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥ ३ ॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥ ४ ॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥ ६ ॥ १ जयापें, २ होसी माये, ३ प्रेमें.
सार्थ तुकारामगाथा २६९ शब्दार्थ व टीपा :- तीप-मुहूर्त, तिथी, भातुके-खाऊ अर्थ :- देवा, माझे चित्त आता फार कासावीस होत राहिले आहे रे. तू ये ना. येण्यासाठी तू काय एखादी चांगली तिथी किंवा मुहूर्त पाहात आहेस काय ? १ देवा, तू आपल्या प्रेमाचा खाऊ मला लौकर पाठवून दे स्वतःच्याजवळ काही राखून ठेवू नकोस. २ विठ्ठला, मजवर कुठलाच राग धरू नकोस. मी अवगुणी व अन्यायी असलो तरी तुझा राग नसावा. ३ थोर झालेल्या व जाणत्या असलेल्या पोराप्रमाणे तू मजसारख्या नेणत्या मुलास का रडवितोस ? ४ तू नुसते कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस ? आपली धाकटी व लडिवाळ बाळे आहेत; त्यांची समजूत काढ ना. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता देवा, मी तुमच्या पदरास धरून पिछा घालीन व पकडून ठेवीन तुम्हांला. मग मात्र मी काही निराळा होणार नाही. ६ ५२९ कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्ट । कां मज हिपुटी करीतसा ॥ १ ॥ कंठीं प्राण पाहे वचनाची आस । तों दिसे उदास धरिले ऐसें¹ ॥ २ ॥ येणे काळें बुंथी घेतलीसे खोल² । कां नये विटाळ होऊं माझा ॥ ३ ॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हिपुटी-कष्टी, बुंधी-खोळ, घुगट, खोल-मोठी अर्थ :- देवा, तुम्ही माझ्याशी कसलीच गोष्ट का बोलत नाही ? मला असे तुम्ही दुःखी कष्टी का करीत आहात ? १ माझा प्राण कंठाशी आला असून मी आपली वाट एकसारखी पाहात आहे. पण तुम्ही तर उदास झाल्यासारखे दिसता आहात. २ या वेळी फार मोठी खोळ तुम्ही माझा विटाळसुद्धा होऊ नये म्हणून घेतली आहे असे दिसते. ३ देवा, मी तुमचा असे म्हणविताना मला लाज वाटू लागली आहे. कारण, तुम्ही नुसती फुकाची चौकशीही माझी कधी करीत नाही. ४ ५३० उचित ते काय जाणावें दुबळें । थोरिवेचें काळें तोड देवा ॥ १ ॥ देतौं हाका कोणी नाइकती द्वारी । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ २ ॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन काय वेचे ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजिरों नव्हों ऐसीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा : - उचित-इष्ट, योग्य, थोरिवेचे-जाणतेपणाचे, अतीता-अतिथीस. अर्थ - देवा, इष्ट काय आहे, उचित काय आहे ते मजसारख्या दुबळ्याने कसे जाणावे ? आणि जाणतेपणाचे तोंड तर या भक्तिमार्गात काळेच आहे. जाणिवेचा उपयोग नसतो. १ एखाद्या रिकाम्या घरी दारात उभे राहून अनेक हाका माराव्यात, पण त्या कुणी ऐकूच नयेत अशी स्थिती देवा माझी झाली आहे. २ दारी आलेल्या अतिथीस शब्द, नुसता आदराचा शब्दही पुरा पडतो, तो फुकटचा बोलायला काय खर्च होणे तुमचे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, तुम्हास हे शोभून दिसते, पण आम्ही मात्र इतके निलाजरे नाहीत. ४. ५३१ आम्ही मागो ऐसे नाहीं तुजपाशीं । जरी तूं भीतोसि पांडुरंगा ॥ १ ॥ पाहे विचारूनि आहे तुज ठाये । आम्ही घालों नांवें तुझ्या एका ॥ २ ॥ ऋद्धिसिद्धि तुझें मुख्य³ भांडवल । हे तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निर्दिचत⁴ सुख भोगूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विचारूनि-विचार करुन, घालों-मजूर झालों. १ तुम्हीं, २ खोळ, ३ मोल, ४ निवान्त.
सार्थ तुकारामगाथा २७१ ५३५ देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवोनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मग तुझ्या नामापुढें । तुच्छ हे बापुडें सकळी काळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- राउळीं-देवळात. अर्थ :- कमरेवर हात ठेऊन तू उभा आहेस, असा तुझ्या रूपाचा आकार मी सतुष्ट मनाने पाहात आहे. १ त्यामुळे माझ्या चित्तास केवढे समाधान होत आहे ! तुमचे चरण सोडावेत असे कधी वाटतच नाही. २ मुखाने मी तुमच्या स्तुतीचे गीत गाऊन आनंदाने टाळी वाजवीत आहे; व तुमच्या देवळात मोठ्या भक्तिसुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामापुढे मला बाकी सर्व तुच्छ वाटते. ४ ५३६ आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- येणेविण-या तुझ्या नामाशिवाय, वांयां-विनाकारण. अर्थ :- या देवाच्या एका नामाशिवाय आम्हांला कशाचीही जरूरी नाही आता व्यर्थ इतर बडबड तरी कशाला हवी ? १ आता जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगलेच समजून आले आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंतस्वरूप देवाला वाहिली आहे. आता बोलायचे काही कामच उरलेले दिसत नाही. ३ ५३७ वोलो अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥ १ ॥ भोगों त्याग जाला संगींच असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हों दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा¹ ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाग-संबंध, तैसा-दिसणारा. अर्थ :- जे न बोलण्यासारखे आहे, त्याच्याविषयीच आम्ही बोलू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत. १ सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनात त्यागबुद्धीचा उदय झालेला असून सर्व संगांविषयी असंग निर्माण झाला आहे. किंवा आमच्या दृष्टीने सर्व भोग व सर्व संग नारायणस्वरूपच झाल्यामुळे आपोआपच त्याग या असंग घडत आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवर दिसतो तसा खरे म्हणजे नाही. माझ्या खऱ्या रूपाविषयी तुम्हांस काही विचारायचे असेल, तर ते या पांडुरंगास विचारा ना. ३ ५३८ अधिकार तैसा दायियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-पलीकडे. अर्थ :- ज्याचा जसा अधिकार तसा त्यास मार्ग दाखविलेला आहे. असे त्या मार्गाने चालले असता त्यास समजून येईल. १ एकदा नदीपार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये. कारण मागाहून येणाऱ्यांना तिचा आधार म्हणून खूप उपयोग होण्यासारखा असतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याचे अंगी रोग नसले, तरी जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे बाळगीत असतो. ३ १ विठोबासी.
२७० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- पांडुरंगा, आम्ही जे मागणार आहोत ते तुझ्यापाशी नाही. म्हणूनच तू भीत आहेस असे वाटते. १ देवा, तू विचार करुन पाहा की, आम्ही तुझ्या नामानृताने संतुष्ट आहोत हे तुलाही माहित आहे. २ तुझ्या जवळ रिद्धी व सिद्धी पांचच माडवल आहे; पण ते आमच्या दृष्टीने तुझ्या भक्तीपुढे फुकट आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुझ्या वैकुंठाला घालत जाऊ व तिथे निवातपणे तुझ्या सहवासाचे सुख भोगत राहू. ४ ५३२ न लगे हें मज तुझें ब्रह्मज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥ १ ॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलास या ॥ २ ॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं ही ॥ ३ ॥ तुका म्हणे नको रागेजों विठ्ठला । उठीं बेगीं मला भेटी आतां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न लगे-नको, रागेजों-रागावू अर्थ :- देवा, तुझे ते ब्रह्मज्ञान व निर्गुणाचे ज्ञान आम्हास नको, तुझे साजिरे, गोजिरे रूपच मला आता पुरे आहे. १ देवा, मला भेटायला तू उशीर लावला आहेस. मी पतितांना पावन करणारा आहे, या वचनास तू विसरून गेलास वाटते ? २ देवा, मी तर सर्व संसार जाळून टाकून तुझ्या अंगणात येऊन बसलो आहे; पण याचे भान तुझ्या मनातही दिसत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, रागावू नका माझ्यावर. उठा, मला आता लवकर भेट द्या ना ४ ५३३ कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकाळ भोगीतसे ॥ १ ॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ २ ॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥ ३ ॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कमोदिनी-कमळ, परिमळ-सुवास, भ्रमर-भुंगे, तृण-गवत अर्थ :- देवा, स्वतःमधील सुवास कमळास काही येत नाही, जाणवत नाही. त्याचा भोग इतर भुंगेच घेतात. १ त्याप्रमाणे तुझ्या नामाची गोडी तुला कशी ठाऊक असणार ? त्याचे प्रेमसुख केवळ आमच्यासारख्या भक्तांनाच माहीत असते. २ गोमाता गवत खाते; पण त्यापासून निर्माण झालेले दूध मात्र तिच्या वासरासाठीच असते. त्याची गोडी तिच्या बाळालाच समजणार ज्याची त्यास गोडी उपयोगी पडत नाही हेच खरे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, शिंपल्याच्या पोटात मोती निघतात, पण ते त्यांच्या पोटांत आहेत तोपर्यंत त्याचे सुख उपभोगता येते. त्याप्रमाणे देवा, तुझ्या नामाचे सुख आम्हीच भोगणार. ४ ५३४ काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥ १ ॥ बोलतां हे कैंसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ २ ॥ आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निखतें सुख दोघें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ग्वाही-साक्ष, मायपुतें-मायलेकरांस, निखतें-खरे. अर्थ - देवा, तुमच्या चरणाच्या सुखासंबंधी काय सांगावे आम्ही ? तो सुखाचा अनुभव तुम्हांस येणे शक्य नाही. १ तुमच्या चरणसुखाचे वर्णन तुम्हास खरेही वाटणार नाही. अमृताचे गुण अमृतास कसे समजणार ? २ तुझ्या चरणामृताचे सुख किती अवर्णनीय आहे, याची साक्ष केवळ आमची आई श्रीलक्ष्मी किंवा रखुमाई व आम्ही तिची लेकरे यानाच देता येण्यासारखी आहे. ते सुख आम्ही दोघेच जाणू शकतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हांला तुमच्या ह्या मोक्षाचा फार कंटाळा आहे आणि हे तुम्ही जाणीत का नाही ? ४
सार्थ तुकारामगाथा २७१ ५३५ देवोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळी काळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- राउळीं-देवळात. अर्थ :- कमरेवर हात ठेऊन तू उभा आहेस, असा तुझ्या रूपाचा सत्कार मी संतुष्ट मनाने पाहात आहे. १ त्यामुळे माझ्या चित्तास केवढे समाधान होत आहे ! तुमचे चरण सोडावेत असे कधी वाटतच नाही. २ मुखाने मी तुमच्या स्तुतीचे गीत गाऊन आनंदाने टाळी वाजवीत आहे; व तुमच्या देवळात मोठ्या भक्तिसुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामापुढे मला बाकी सर्व तुच्छ वाटते. ४ ५३६ आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण वडवड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळून आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा पाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- येणेंविण-या तुझ्या नामाशिवाय, वांयां-विनाकारण अर्थः- या देवाच्या एका नामाशिवाय आम्हांला कशाचीही जरूरी नाही आता व्यर्थ इतर वडवड तरी कशाला हवी ? १ आता जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगलेच समजून आले आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंतस्वरूप देवाला पाहिली आहे. आता बोलायचे काही कामच उरलेले दिसत नाही. ३ ५३७ बोलों अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥ १ ॥ भोगों त्याग जाला संगांचि असंग । तोडियेलें लाग भाग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हे दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा' ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाग-संबध, तैसा-विचित्रा अर्थ :-जे न बोलण्यासारखे आहे, त्याज्याविषयीच आम्ही बोलू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत. १ सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनात त्यागबुद्धीचा उदय झालेला असून सर्व संगाविषयी असंग निर्माण झाला आहे. किंवा आमच्या दृष्टीने सर्व भोग व सर्व सग नारायणस्वरूपच झाल्यामुळे आपोआपच त्याग वा असंग घडत आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवर दिसतो तसा खरे म्हणजे नाही. माझ्या खऱ्या रूपाविषयी तुम्हांस काही विचारायचे असेल, तर ते या पाडुरंगास विचारा ना. ३ ५३८ अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळो येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पायलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगों उपकार ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-पलीकडे. अर्थ :- ज्याचा जसा अधिकार तसा त्यास मार्ग दाखविलेला आहे. असे त्या मार्गाने वागले असता त्यास समजून येईल. १ एकदा नदीपार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये. कारण मागाहून येणाऱ्यांना तिचा आधार म्हणून खूप उपयोग होण्यासारखा असतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याचे अंगी रोग नसले, तरी जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे बाळगीत असतो. ३ १ विठोबासी.
२७२ सार्थ तुकारामगाथा ५३९ सवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥ १ ॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगों होऊनि ठेला ॥ २ ॥ तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयास दुसरें नाहीं मग ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - तीहीं-त्यानी, दारा-स्त्री, हर्षामर्ष-सुखदुख अर्थ - ज्याच्या चित्तात स्त्री व द्रव्य यांच्याबद्दल आसक्ती नाही त्यांनी ससारास पाठमोरे केले आहे ससार सोडला आहे असे मानावयास हरकत नाही १ ज्याला शुभ व अशुभ याच्याबद्दल सुख वा दुख वाटत नाही, तो या जगात प्रत्यक्ष जनार्दनच होऊन राहिला आहे असे समजावे २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपला देह नेहमीच देवास अर्पण केला आहे, त्यास या जगात दुसरे काही उरले आहे असे नाही ३ ५४० देहबुद्धि वसे लोभ जया चित्तीं । आपुले जाणती पराये जे ॥ १ ॥ तयासि चालता पाहिजे सिदोरी । दुख पावे करो असत्य तो ॥ २ ॥ तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हे तापला तो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -पराये-दुसऱ्याचे अर्थ - ज्याची देहबुद्धी अजून दूर झालेली नाही व ज्याच्या चित्तात लोभ वस्ती करून आहे, तो हे आपले, हे दुसऱ्याचे असे समजून असतो १ त्याला मात्र या जन्माची वाटचाल करीत असताना पुण्याची शिदोरी हवीच असत्य कर्म केल्यास त्यास दुखच होणार २ जो उन्हाने तापलेला आहे, त्यासच शीतल छायेची जरुरी वाटणार धर्म रक्षण करण्यासाठी असा प्रयत्न केलाच पाहिजे ३ ५४१ काळें खादला हा अवघा आकार । उत्पतिसहारघडमोडी ॥ १ ॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटाँ १ । अनंता सेवटी एकाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे शब्दें व्यापिले आकाश । गुढार हे तैसे कळो' नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -उत्पत्ति-निर्मिती, सहार-शेवट, अनंता-कल्पांताच्या गुढार-गुह्य अर्थ - जगाची निर्मिती आणि सहार याच्या घडामोडीत जगास आलेला हा आकार काळ एकसारखा खात असतो १ ज्याप्रमाणे निर्माण होणारा अंकुर त्या बीजाच्या पोटीच सामावलेला असतो, त्याप्रमाणे कल्पांताच्या शेवटी सर्व चराचर विश्व त्या एकाच्याच पोटी विलीन होणार आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व आकाश शब्दाचेच आहे, हे गुह्य कसे कळून येत नाही ? ३ ५४२ आणीक काळें न चले उपाय । धरावे या२ पाय विठोबाचे ॥ १ ॥ अवघेंचि पुण्य असे तया पोटीं । अवधिया तुटी होय पापा ॥ २ ॥ अवघें मोकळें अवधिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥ ३ ॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदु खें । उच्चारिता मुखें नाम एक ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं न लगे साडावे । सागतसे भावे घेती तया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - या काळें-या काळात कलियुगात, तुटी-नाश अर्थ - या कलियुगात दुसरा काही उपाय करायलाच नको एका त्या विठोबाचे पाय धरले म्हणजे पुरे १ मग सर्व पुण्ये त्याच्या पोटात आली आहेत असे समजा त्यामुळे सर्व पापाचाही नाश वेगाने होईल २ त्या विठ्ठलाचे चिंतन केल्यानंतर सर्वजणाना सर्व काळ मोकळाच वाटेल त्यामुळे साऱ्या स्त्रीपुरुषाची कुळे उद्धरली जातात ३ श्रीहरीचे नाव मुखाने उच्चारण्यास काही काळवेळ पाहण्याची जरुरी नाही त्या नामाने गर्भवासाची दुखे दूर होतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी काही सोडून देण्याची गरज नाही जो कोणी भक्तिभावाने हे नाम घेत असेल त्यासच मी हे सागत आहे ५ १ केंस, २ ते