भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

२६८ सार्थ तुकारामगाथा ५२५ भक्तप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥ १ ॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥ २ ॥ तुका म्हणे माझें जाळुनि संचित । करीं वो उचित भेट देईं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- भक्तप्रतिपाळे-भक्ति करणाऱ्याचा सांभाळ करणारा, गुणें-कारणाने, कपाळ-नशीब अर्थ :- विठ्ठल माऊली, तू दोनवत्सल व भक्तांवर कृपा करणारी कृपाळू माताच आहेस. १ कोणत्या कारणाने माझा तुला विसर पडला गे माय ? माझेच नशीब खोटें त्याला काय करू ? मीच अवगुणी आहे असे मला वाटते. २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे सर्व संचित कर्म जाळून, नाहीसे करून मला भेट देणे हेच तुम्हास उचित नाही काय ? ३ ५२६ तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥ १ ॥ लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटों ॥ २ ॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वास-वाट, लेखी-मोजीत आहे अर्थ :- पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोण सोयरे आहेत रे ? दुसरे कुणीही मला आणखी तुझ्याशिवाय आप्त नाहीत विठ्ठला १ मला तुझीच एक आशा लागली असून मी एकसारखी तुझी वाट पाहात आहे रात्र व दिवस मी हाताच्या बोटावर मोजीत आहे. २ मला काही काम गोड लागत नाही, की धंदा सुचत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला देवा, एकसारखे तुझेच ध्यान लागलेले असते. ३ ५२७ पहियंते आम्ही १तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावे हितगुज ॥ १ ॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे २जनतिये ॥ २ ॥ जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥ ३ ॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥ ४ ॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशी । ठावें आहे देसी मागेन तें ॥ ५ ॥ म्हणउनि पुढें मांडियेली आळी । यिकोनियां चोळी डोळे तुका ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पहियंते-आवडते, लळे-लाड, आळी-हट्ट, यिकोनिया-रडून अर्थ :- देवा, आम्हास जे आवडते ते आम्ही तुझ्यापाशी मागू व आमच्या जीवात असणारी हितगुजाची गोष्ट आम्ही तुला सांगू १ दीनावर दया करणाऱ्या वत्सल देवा, विठ्ठला, तू माझे हट्ट पुरविणार आहेस. तू वत्सल अशी माऊलीच आहेस २ आम्ही आमचा सर्व जीवभाव देवा, तुझ्या पायांवर वाहिला आहे. तूच सर्व ठिकाणी आम्हांस एकरूपाने दिसतोस. ३ आम्हांला विठ्ठला, दुसऱ्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस. मी आता दुसऱ्याच्या घरी जाणारसुद्धा नाही. ४ तुझ्या प्रीतीची सर्वसत्ता एकवटलेली असून मी जे मागेन ते तू देशील असा विश्वास मला आहे ५ म्हणून तर देवा, मी तुझ्यापुढे हा हट्ट धरलेला आहे. मी रडूनरडून डोळे चोळीत आहे. ६ ५२८ कोण पर्वकाळ पहाल तीथ । होते माझें चित्त कासावीस ॥ १ ॥ पाठवी भातुकें प्रेरीं ३झडकरी । नको राखौं उरी पांडुरंगा ॥ २ ॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥ ३ ॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥ ४ ॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥ ६ ॥ १ जयापें, २ होसी माये, ३ प्रेमें.

सार्थ तुकारामगाथा २६९ शब्दार्थ व टीपा :- तीप-मुहूर्त, तिथी, भातुके-खाऊ अर्थ :- देवा, माझे चित्त आता फार कासावीस होत राहिले आहे रे. तू ये ना. येण्यासाठी तू काय एखादी चांगली तिथी किंवा मुहूर्त पाहात आहेस काय ? १ देवा, तू आपल्या प्रेमाचा खाऊ मला लौकर पाठवून दे स्वतःच्याजवळ काही राखून ठेवू नकोस. २ विठ्ठला, मजवर कुठलाच राग धरू नकोस. मी अवगुणी व अन्यायी असलो तरी तुझा राग नसावा. ३ थोर झालेल्या व जाणत्या असलेल्या पोराप्रमाणे तू मजसारख्या नेणत्या मुलास का रडवितोस ? ४ तू नुसते कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस ? आपली धाकटी व लडिवाळ बाळे आहेत; त्यांची समजूत काढ ना. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता देवा, मी तुमच्या पदरास धरून पिछा घालीन व पकडून ठेवीन तुम्हांला. मग मात्र मी काही निराळा होणार नाही. ६ ५२९ कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्ट । कां मज हिपुटी करीतसा ॥ १ ॥ कंठीं प्राण पाहे वचनाची आस । तों दिसे उदास धरिले ऐसें¹ ॥ २ ॥ येणे काळें बुंथी घेतलीसे खोल² । कां नये विटाळ होऊं माझा ॥ ३ ॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हिपुटी-कष्टी, बुंधी-खोळ, घुगट, खोल-मोठी अर्थ :- देवा, तुम्ही माझ्याशी कसलीच गोष्ट का बोलत नाही ? मला असे तुम्ही दुःखी कष्टी का करीत आहात ? १ माझा प्राण कंठाशी आला असून मी आपली वाट एकसारखी पाहात आहे. पण तुम्ही तर उदास झाल्यासारखे दिसता आहात. २ या वेळी फार मोठी खोळ तुम्ही माझा विटाळसुद्धा होऊ नये म्हणून घेतली आहे असे दिसते. ३ देवा, मी तुमचा असे म्हणविताना मला लाज वाटू लागली आहे. कारण, तुम्ही नुसती फुकाची चौकशीही माझी कधी करीत नाही. ४ ५३० उचित ते काय जाणावें दुबळें । थोरिवेचें काळें तोड देवा ॥ १ ॥ देतौं हाका कोणी नाइकती द्वारी । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ २ ॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन काय वेचे ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजिरों नव्हों ऐसीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा : - उचित-इष्ट, योग्य, थोरिवेचे-जाणतेपणाचे, अतीता-अतिथीस. अर्थ - देवा, इष्ट काय आहे, उचित काय आहे ते मजसारख्या दुबळ्याने कसे जाणावे ? आणि जाणतेपणाचे तोंड तर या भक्तिमार्गात काळेच आहे. जाणिवेचा उपयोग नसतो. १ एखाद्या रिकाम्या घरी दारात उभे राहून अनेक हाका माराव्यात, पण त्या कुणी ऐकूच नयेत अशी स्थिती देवा माझी झाली आहे. २ दारी आलेल्या अतिथीस शब्द, नुसता आदराचा शब्दही पुरा पडतो, तो फुकटचा बोलायला काय खर्च होणे तुमचे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, तुम्हास हे शोभून दिसते, पण आम्ही मात्र इतके निलाजरे नाहीत. ४. ५३१ आम्ही मागो ऐसे नाहीं तुजपाशीं । जरी तूं भीतोसि पांडुरंगा ॥ १ ॥ पाहे विचारूनि आहे तुज ठाये । आम्ही घालों नांवें तुझ्या एका ॥ २ ॥ ऋद्धिसिद्धि तुझें मुख्य³ भांडवल । हे तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निर्दिचत⁴ सुख भोगूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विचारूनि-विचार करुन, घालों-मजूर झालों. १ तुम्हीं, २ खोळ, ३ मोल, ४ निवान्त.

सार्थ तुकारामगाथा २७१ ५३५ देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवोनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मग तुझ्या नामापुढें । तुच्छ हे बापुडें सकळी काळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- राउळीं-देवळात. अर्थ :- कमरेवर हात ठेऊन तू उभा आहेस, असा तुझ्या रूपाचा आकार मी सतुष्ट मनाने पाहात आहे. १ त्यामुळे माझ्या चित्तास केवढे समाधान होत आहे ! तुमचे चरण सोडावेत असे कधी वाटतच नाही. २ मुखाने मी तुमच्या स्तुतीचे गीत गाऊन आनंदाने टाळी वाजवीत आहे; व तुमच्या देवळात मोठ्या भक्तिसुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामापुढे मला बाकी सर्व तुच्छ वाटते. ४ ५३६ आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- येणेविण-या तुझ्या नामाशिवाय, वांयां-विनाकारण. अर्थ :- या देवाच्या एका नामाशिवाय आम्हांला कशाचीही जरूरी नाही आता व्यर्थ इतर बडबड तरी कशाला हवी ? १ आता जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगलेच समजून आले आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंतस्वरूप देवाला वाहिली आहे. आता बोलायचे काही कामच उरलेले दिसत नाही. ३ ५३७ वोलो अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥ १ ॥ भोगों त्याग जाला संगींच असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हों दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा¹ ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाग-संबंध, तैसा-दिसणारा. अर्थ :- जे न बोलण्यासारखे आहे, त्याच्याविषयीच आम्ही बोलू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत. १ सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनात त्यागबुद्धीचा उदय झालेला असून सर्व संगांविषयी असंग निर्माण झाला आहे. किंवा आमच्या दृष्टीने सर्व भोग व सर्व संग नारायणस्वरूपच झाल्यामुळे आपोआपच त्याग या असंग घडत आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवर दिसतो तसा खरे म्हणजे नाही. माझ्या खऱ्या रूपाविषयी तुम्हांस काही विचारायचे असेल, तर ते या पांडुरंगास विचारा ना. ३ ५३८ अधिकार तैसा दायियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-पलीकडे. अर्थ :- ज्याचा जसा अधिकार तसा त्यास मार्ग दाखविलेला आहे. असे त्या मार्गाने चालले असता त्यास समजून येईल. १ एकदा नदीपार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये. कारण मागाहून येणाऱ्यांना तिचा आधार म्हणून खूप उपयोग होण्यासारखा असतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याचे अंगी रोग नसले, तरी जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे बाळगीत असतो. ३ १ विठोबासी.

२७० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- पांडुरंगा, आम्ही जे मागणार आहोत ते तुझ्यापाशी नाही. म्हणूनच तू भीत आहेस असे वाटते. १ देवा, तू विचार करुन पाहा की, आम्ही तुझ्या नामानृताने संतुष्ट आहोत हे तुलाही माहित आहे. २ तुझ्या जवळ रिद्धी व सिद्धी पांचच माडवल आहे; पण ते आमच्या दृष्टीने तुझ्या भक्तीपुढे फुकट आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुझ्या वैकुंठाला घालत जाऊ व तिथे निवातपणे तुझ्या सहवासाचे सुख भोगत राहू. ४ ५३२ न लगे हें मज तुझें ब्रह्मज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥ १ ॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलास या ॥ २ ॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं ही ॥ ३ ॥ तुका म्हणे नको रागेजों विठ्ठला । उठीं बेगीं मला भेटी आतां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न लगे-नको, रागेजों-रागावू अर्थ :- देवा, तुझे ते ब्रह्मज्ञान व निर्गुणाचे ज्ञान आम्हास नको, तुझे साजिरे, गोजिरे रूपच मला आता पुरे आहे. १ देवा, मला भेटायला तू उशीर लावला आहेस. मी पतितांना पावन करणारा आहे, या वचनास तू विसरून गेलास वाटते ? २ देवा, मी तर सर्व संसार जाळून टाकून तुझ्या अंगणात येऊन बसलो आहे; पण याचे भान तुझ्या मनातही दिसत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, रागावू नका माझ्यावर. उठा, मला आता लवकर भेट द्या ना ४ ५३३ कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकाळ भोगीतसे ॥ १ ॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ २ ॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥ ३ ॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कमोदिनी-कमळ, परिमळ-सुवास, भ्रमर-भुंगे, तृण-गवत अर्थ :- देवा, स्वतःमधील सुवास कमळास काही येत नाही, जाणवत नाही. त्याचा भोग इतर भुंगेच घेतात. १ त्याप्रमाणे तुझ्या नामाची गोडी तुला कशी ठाऊक असणार ? त्याचे प्रेमसुख केवळ आमच्यासारख्या भक्तांनाच माहीत असते. २ गोमाता गवत खाते; पण त्यापासून निर्माण झालेले दूध मात्र तिच्या वासरासाठीच असते. त्याची गोडी तिच्या बाळालाच समजणार ज्याची त्यास गोडी उपयोगी पडत नाही हेच खरे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, शिंपल्याच्या पोटात मोती निघतात, पण ते त्यांच्या पोटांत आहेत तोपर्यंत त्याचे सुख उपभोगता येते. त्याप्रमाणे देवा, तुझ्या नामाचे सुख आम्हीच भोगणार. ४ ५३४ काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥ १ ॥ बोलतां हे कैंसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ २ ॥ आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निखतें सुख दोघें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ग्वाही-साक्ष, मायपुतें-मायलेकरांस, निखतें-खरे. अर्थ - देवा, तुमच्या चरणाच्या सुखासंबंधी काय सांगावे आम्ही ? तो सुखाचा अनुभव तुम्हांस येणे शक्य नाही. १ तुमच्या चरणसुखाचे वर्णन तुम्हास खरेही वाटणार नाही. अमृताचे गुण अमृतास कसे समजणार ? २ तुझ्या चरणामृताचे सुख किती अवर्णनीय आहे, याची साक्ष केवळ आमची आई श्रीलक्ष्मी किंवा रखुमाई व आम्ही तिची लेकरे यानाच देता येण्यासारखी आहे. ते सुख आम्ही दोघेच जाणू शकतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हांला तुमच्या ह्या मोक्षाचा फार कंटाळा आहे आणि हे तुम्ही जाणीत का नाही ? ४

सार्थ तुकारामगाथा २७१ ५३५ देवोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥ १ ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळी काळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- राउळीं-देवळात. अर्थ :- कमरेवर हात ठेऊन तू उभा आहेस, असा तुझ्या रूपाचा सत्कार मी संतुष्ट मनाने पाहात आहे. १ त्यामुळे माझ्या चित्तास केवढे समाधान होत आहे ! तुमचे चरण सोडावेत असे कधी वाटतच नाही. २ मुखाने मी तुमच्या स्तुतीचे गीत गाऊन आनंदाने टाळी वाजवीत आहे; व तुमच्या देवळात मोठ्या भक्तिसुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामापुढे मला बाकी सर्व तुच्छ वाटते. ४ ५३६ आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण वडवड करी वांयां ॥ १ ॥ सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळून आलें ॥ २ ॥ तुका म्हणे वाचा पाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- येणेंविण-या तुझ्या नामाशिवाय, वांयां-विनाकारण अर्थः- या देवाच्या एका नामाशिवाय आम्हांला कशाचीही जरूरी नाही आता व्यर्थ इतर वडवड तरी कशाला हवी ? १ आता जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगलेच समजून आले आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंतस्वरूप देवाला पाहिली आहे. आता बोलायचे काही कामच उरलेले दिसत नाही. ३ ५३७ बोलों अबोलणे मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥ १ ॥ भोगों त्याग जाला संगांचि असंग । तोडियेलें लाग भाग दोन्ही ॥ २ ॥ तुका म्हणे नव्हे दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा' ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाग-संबध, तैसा-विचित्रा अर्थ :-जे न बोलण्यासारखे आहे, त्याज्याविषयीच आम्ही बोलू. आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत. १ सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनात त्यागबुद्धीचा उदय झालेला असून सर्व संगाविषयी असंग निर्माण झाला आहे. किंवा आमच्या दृष्टीने सर्व भोग व सर्व सग नारायणस्वरूपच झाल्यामुळे आपोआपच त्याग वा असंग घडत आहे. २ तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवर दिसतो तसा खरे म्हणजे नाही. माझ्या खऱ्या रूपाविषयी तुम्हांस काही विचारायचे असेल, तर ते या पाडुरंगास विचारा ना. ३ ५३८ अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळो येतें ॥ १ ॥ जाळूं नये नाव पायलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगों उपकार ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-पलीकडे. अर्थ :- ज्याचा जसा अधिकार तसा त्यास मार्ग दाखविलेला आहे. असे त्या मार्गाने वागले असता त्यास समजून येईल. १ एकदा नदीपार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये. कारण मागाहून येणाऱ्यांना तिचा आधार म्हणून खूप उपयोग होण्यासारखा असतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याचे अंगी रोग नसले, तरी जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे बाळगीत असतो. ३ १ विठोबासी.

२७२ सार्थ तुकारामगाथा ५३९ सवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥ १ ॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगों होऊनि ठेला ॥ २ ॥ तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयास दुसरें नाहीं मग ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - तीहीं-त्यानी, दारा-स्त्री, हर्षामर्ष-सुखदुख अर्थ - ज्याच्या चित्तात स्त्री व द्रव्य यांच्याबद्दल आसक्ती नाही त्यांनी ससारास पाठमोरे केले आहे ससार सोडला आहे असे मानावयास हरकत नाही १ ज्याला शुभ व अशुभ याच्याबद्दल सुख वा दुख वाटत नाही, तो या जगात प्रत्यक्ष जनार्दनच होऊन राहिला आहे असे समजावे २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपला देह नेहमीच देवास अर्पण केला आहे, त्यास या जगात दुसरे काही उरले आहे असे नाही ३ ५४० देहबुद्धि वसे लोभ जया चित्तीं । आपुले जाणती पराये जे ॥ १ ॥ तयासि चालता पाहिजे सिदोरी । दुख पावे करो असत्य तो ॥ २ ॥ तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हे तापला तो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -पराये-दुसऱ्याचे अर्थ - ज्याची देहबुद्धी अजून दूर झालेली नाही व ज्याच्या चित्तात लोभ वस्ती करून आहे, तो हे आपले, हे दुसऱ्याचे असे समजून असतो १ त्याला मात्र या जन्माची वाटचाल करीत असताना पुण्याची शिदोरी हवीच असत्य कर्म केल्यास त्यास दुखच होणार २ जो उन्हाने तापलेला आहे, त्यासच शीतल छायेची जरुरी वाटणार धर्म रक्षण करण्यासाठी असा प्रयत्न केलाच पाहिजे ३ ५४१ काळें खादला हा अवघा आकार । उत्पतिसहारघडमोडी ॥ १ ॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटाँ १ । अनंता सेवटी एकाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे शब्दें व्यापिले आकाश । गुढार हे तैसे कळो' नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -उत्पत्ति-निर्मिती, सहार-शेवट, अनंता-कल्पांताच्या गुढार-गुह्य अर्थ - जगाची निर्मिती आणि सहार याच्या घडामोडीत जगास आलेला हा आकार काळ एकसारखा खात असतो १ ज्याप्रमाणे निर्माण होणारा अंकुर त्या बीजाच्या पोटीच सामावलेला असतो, त्याप्रमाणे कल्पांताच्या शेवटी सर्व चराचर विश्व त्या एकाच्याच पोटी विलीन होणार आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व आकाश शब्दाचेच आहे, हे गुह्य कसे कळून येत नाही ? ३ ५४२ आणीक काळें न चले उपाय । धरावे या२ पाय विठोबाचे ॥ १ ॥ अवघेंचि पुण्य असे तया पोटीं । अवधिया तुटी होय पापा ॥ २ ॥ अवघें मोकळें अवधिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥ ३ ॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदु खें । उच्चारिता मुखें नाम एक ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं न लगे साडावे । सागतसे भावे घेती तया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - या काळें-या काळात कलियुगात, तुटी-नाश अर्थ - या कलियुगात दुसरा काही उपाय करायलाच नको एका त्या विठोबाचे पाय धरले म्हणजे पुरे १ मग सर्व पुण्ये त्याच्या पोटात आली आहेत असे समजा त्यामुळे सर्व पापाचाही नाश वेगाने होईल २ त्या विठ्ठलाचे चिंतन केल्यानंतर सर्वजणाना सर्व काळ मोकळाच वाटेल त्यामुळे साऱ्या स्त्रीपुरुषाची कुळे उद्धरली जातात ३ श्रीहरीचे नाव मुखाने उच्चारण्यास काही काळवेळ पाहण्याची जरुरी नाही त्या नामाने गर्भवासाची दुखे दूर होतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी काही सोडून देण्याची गरज नाही जो कोणी भक्तिभावाने हे नाम घेत असेल त्यासच मी हे सागत आहे ५ १ केंस, २ ते

सार्थ तुकारामगाथा २७३ ५४३ कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळ हृदयस्था ॥ १ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ २ ॥ कां हे चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति 'कुंटेचि ना ॥ ३ ॥ तुका म्हणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कंठस्फोट-घसाफोड, कोप-राग अर्थ - देवा, तू माझ्या अगदी हृदयात वास करुन असतानाही तुला माझा कळवळा कसा येत नाही रे ? १ देवा, नारायणा, तू निष्ठुर व निर्गुण आहेस असे वाटते, कारण मी घसाफोड करून शोक केला तरी तुला त्याबद्दल काहीच समजत नाही. २ माझे हे चित्त का विश्रांतीस पावत नाही ? विषयाकडे असणारी इंद्रियांची गती कुंठीत का होत नाही ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही असा राग मजवर का धरला आहे हो ? पांडुरंगा, अजून माझे पाप संपले नाही की काय ? ४ ५४४ दीनानाथा तुझीं ब्रिर्दें चराचर । घेसील कँवार शरणागता ॥ १ ॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ २ ॥ आपुल्या दासांचे न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥ ३ ॥ चक्र गदा हातीं आयुधें अपारे । न्यून तेथें२ पुरें करूं धांवें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज भक्तीचे कारण । कराया पूर्ण अवतार ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- बिदें-वचने, प्रतिज्ञा, आयुधें-शस्त्रे, न्यून-कमी अर्थ :- आपले जे शरणागत असतील त्याचा सांभाळ करणे, त्याची बाजू सावरणे हीच दीनानाथा, तुझी प्रतिज्ञा आहे ना ? १ पुराणांतून तुझ्या कीर्तीचे जे पवाडे गर्जून आहेत त्यावरून उघड उघड असे हेच आम्हास कळून आले. २ तू आपल्या भक्ताना काही कमी पडते, हे मुळोच सहन करीत नाहीस. त्याच्या मदतीसाठीच तू अखंडपणे उभा आहेस ३ यासाठीच तुझ्या हातात अपार अशी चक्र, गदा इत्यादी हत्यारे असतात. जिथे जे कमी पडेल ते पूर्ण करण्यासाठी तू धावत जातोस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, भक्तीचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझा अवतार आहे. ५ ५४५ वर्णू महिमा ऐसी नाही मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥ १ ॥ ठाचीची हे काया ठेविली चरणीं । आता ओवाळुनि काय सांडूं ॥ २ ॥ नाही भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥ ३ ॥ मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- साचा-खरोखर, पार-अंत, शेवट, थार-आधार. अर्थ :- देवा, तुझा महिमा पूर्णपणे वर्णन करावा अशी वाचा मजजवळ नाही तुझ्या महिम्याचा अंत वर्णन करता येणार नाही, असाच तो आहे १ हे माझे मूळचे शरीरच देवा, मी तुमच्या पायांवर अर्पण केले आहे, आता आणखी ओवाळून काय टाकू तुमच्यावरून ? २ देवा, तुमची सेवा करावी असा भावच नाही. जीव तुम्हांस अर्पण करावा तर तोही तुमचाच आहे ना देवा? ३ मला आता माझे असे जे तुला समर्पण करावे असे काहीच दिसत नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तुझे अनंत उपकार फेड़ावेत यासाठी मजजवळ काही आधारच उरलेला नाही ५ ५४६ नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥ १ ॥ देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ २ ॥ १ फुटे, २ तेंचि. तु. गाथा....३५

२७४ सार्थ तुकारामगाथा नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥ ३ ॥ तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढायें जळत आगींतूनि ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा:- विषतुल्य-विषाप्रमाणे, चांग-चांगले, वाणितां-वर्णन करीत असताना, कळा-कला, गोवूं-गुंतवू अर्थ--देवा, मला हा मान नको. हा मान हे काही माझे खरे सुख नाही. पण हे लोक ऐकत नाहीत, त्याला मी काय करू? १ त्यांच्या सुखोपचारांनी माझे हे अंग देवा, पोळून निघते चांगले गोड मिष्टान्न मला विषाप्रमाणे कडू लागते. २ कुणी माझी स्तुती केली, कुणी थोरवी वर्णन केली की ती ऐकावी असे मला वाटत नाही, त्यामुळे माझा जीव फार कासावीस होतो ३ विठ्ठला, मी तुला येऊन मिळेल अशी एखादी कला माझ्या अंगात येऊ दे ना. आता या भ्रान्त मृगजळात मला ओढून घेऊ नकोस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे काही हित करा ना. मला या अग्नीतून जळताना काढा ना. या संसाराच्या अग्नीतून मला मुक्त करा ना. ५ ५४७ न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥ १ ॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेंचि सांगे ॥ २ ॥ विटंबो शरीर होत कां विपत्ति । परि राहो चित्तीं नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तेंचि हित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संतान-संतती अर्थ.- देवा, मला खायला न मिळो, माझी संतती न वाढो, परंतु या नारायणाने मात्र माझ्यावर कृपा करावी. १ अशा प्रकारचा उपदेश माझी वाचा माझ्या मनास वारंवार करीत असते आणखी इतर लोकांनाही असेच सांगत असते. २ माझ्या शरीराची विटंबना होऊ दे. मला आणखी संकटे प्राप्त होऊ दे. पण माझ्या चित्तात त्या नारायणाने राहावे. ३ कारण तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या नारायणाशिवाय सर्व नाशवंत असून गोपाळाची आठवण येणे यातच खरे हित आहे. ४ ५४८ पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करुनियां ॥ १ ॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ २ ॥ क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥ ३ ॥ करवतीलीं देहें कापियेले मांस । गेले वनवासा शुकादिक ॥ ४ ॥ तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पिंड-शरीर, क्षणभंगुर-क्षणात नाहीसा होणारा अर्थ.- केवळ शरीराचे पोषण करावे हे अधमाचे ज्ञान होय. विलास करून, मिष्टान्न सेवन करून आपलाच देह पुष्ट करावा असे त्यांना वाटते. १ शरीराचे रक्षण करणे हाच एक धर्म असे ते बोलतात; पण खरे पाहिले असता, शरीराचे रक्षण करणे काय त्याच्या हातांत आहे ? २ तो तर एका क्षणात नाहीसा होणार आहे. न समज- ताच तो नाहीसा होईल. हातातील घास मी गिळीन इतके म्हणण्याचीही सत्ता त्यास नाही. ३ कित्येक साधकानी देवाच्या प्राप्तीसाठी आपले देह करवतीने कापवून घेतले आहेत; मांस कापून काढले आहे, देहाचे हालहाल केले आहेत. शुकादिकांसारखे तर वनवासाला सुद्धा गेले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, पण जनक राजा राज्य करीत असता अग्नीमध्ये एक पाय जळत असतानासुद्धा त्याला भान राहिले नाही. सारांश, शरीर कष्टविणे किंवा त्याचे लाड करणे यात काही नसून तुमच्या मनातील भावात सर्व काही आहे. ५

सार्थ तुकारामगाथा २७५ ५४९ जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदो जिव्हे ॥ १ ॥ सकळा इंद्रिया हे माझी विनंती । नका होऊं परतीं पाडुरंगा ॥ २ ॥ आणिकाची मात नाइकावी कानीं । आणीक नयनों न पाहावें ॥ ३ ॥ चित्ता तुवा पायीं रहावे अखंडित । होऊनी निश्चित एकविध ॥ ४ ॥ चला पाय हात हेचि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥ ५ ॥ तुका म्हणे तुम्हा भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आन-दुसर परती-दूर मात-गोष्ट अर्थ -- जिभे, जरी माझो कोणी मान कापायला निघाले तरी, तू पाडुरंगाच्या नामाखेरीज दुसरे काही बोलू नकोस १ माझ्या सर्व इद्रियाना हीच विननी आहे की, त्यानी विठ्ठलापासून दूर होऊ नये २ दुसऱ्या कुणाचीही गोष्ट त्यानी ऐकू नये त्या विठ्ठलाखेरीज दुसऱ्या कुणाचे या डोळ्यानी रूप पाहू नये ३ चित्ता, तू या विठ्ठला- च्याच पायी अखड वसती करून असावेस तू निश्चित होऊन तेथे स्त ध होऊन असावेस ४ चला हातापायानो तुम्ही हेच एक काम करा माझ्या विठ्ठलास नमस्कार करणे हेच एक काम तुमचे आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्हास कसली भीती आली आहे ? आमचा कवार घेणारा तो एक नारायणच आहे ना ? ६ ५५० करिसी ते देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणे सत ॥ १ ॥ जया राज्य द्रव्य करणे उपार्जन । वश दभमाना इच्छे झाले ॥ २ ॥ जगदेव परी निवटीन निराळे । ज्ञानाचे आधळे भारवाही ॥ ३ ॥ तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे शिरीं करिता दड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपार्जनमा-मिळविणे अर्थ - देवा, माझे जे काय तू करशील ते तू सुखाने कर पण त्यांना माझ्या मुखाने मी काही सत म्हणणार नाही, कुणाला ? १ तर ज्याना राज्य, द्रव्य मिळविणे हेच नेहमी करायचे असते, व जे नेहमी दभ मान याच्या इच्छेला वश झालेले असतात, त्यांना मी सत मानणार नाही २ सर्व जग ईश्वरस्वरूप आहे, असे असले तरी मी त्याना निपटून वेगळे काढीन हे ज्ञानाने आधळे असून निव्वळ भारवाही आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, याना दड करण्याविषयी मी माझ्या मनात थोडेही भय धारण करणार नाही ४ ५५१ म्हणविती ऐसे आडवतो सत । न देखीजे होत डोळा कोणीं ॥ १ ॥ ऐसियाचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईंडाईं ॥ २ ॥ पर्जन्याचे काळों वाहाळाचे नद । ओसरता बुद न तारेचि ॥ ३ ॥ हिऱ्या ऐसा गारा दिसती दूरून । तुका म्हणे घन' न भेटे तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - घाईंडाई-गवगव मुद-घव पन-आघात अर्थ - पुष्कळ लोक ज्याना सत सत म्हणून म्हणतात, त्याची नावे मी ऐकतो आहे, पण अजून डोळ्यात तर कुणी दिसलेले नाही १ यशाचा विश्वास कोण धरणार ? अनेक सकटप्रसगात ज्याची शाती ढळत नाही तेच खरे सत २ खूप पाऊस पडत असताना साध्या साध्या ओहळाच्या मोठ्या नद्या झालेल्या दिसतात, पण पाण्याचा पूर ओसरून गेल्यावर त्याच्यात थेंबही उरलेला नसतो ३ गारा दूरून हिऱ्याप्रमाणेच दिसतात, पण घणाच्या आघाताची व त्याची गांठ पडताच त्याचे स्वरूप स्पष्ट होते आघातात टिकतील तेच सत ४ ५५२ बतियाव लावी । एक बोट सोंग दावी ॥ १ ॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ २ ॥ * १ घण

२७६ सार्थ तुकारामगाथा प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नट-वेष, नटणे, छाट-चापट अर्थ - जो अतिवाद करणारा आहे व जो कपाळावर एका बोटाची रेघ ओढून गंध लावणारा आहे, अथवा जो एक बोट करून ब्रह्म एक असल्याचे सांगणारा आहे त्याचे ते सर्व ढोंग असते १ त्याचा तो वेष फसवा असून तो त्यामुळे वैष्णव झालेला नसून तो चावटच असतो २ तो एकाचे प्रतिपादन करतो, दुसऱ्यास दूर करतो, एकाची पूजा करतो, दुसऱ्याची छळणूक करतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशाच्या ठिकाणी भूतदयाही असत नाही ४ ५५३ पोटाचे ते नट पाहो नये छंद । विषयाचे भेद विषयरूप ॥ १ ॥ अर्थी परमार्थ कैसा घडो सके । चित्त लोभी भीके सोंग वाया ॥ २ ॥ देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं राहे अभिलाष । दोघा नरकवास सारिखाचि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अर्थी-द्रव्याच्या उद्देशात अर्थ - जे पोटाकरिता नाटकात कामे करून नाना सोंगे घेतात, नाना छंद करतात, त्याचे दर्शन घेऊ नये कारण त्याच्या रूपांनी नाना विषयांची नाना रूपेच व्यक्त झालेली असतात १ ज्या ठिकाणी द्रव्य मिळविण्याचाच एक उद्देश असतो, त्यात परमार्थ कसा साधावा? चित्तात लोभ असताना देवाचे जरी सोंग घेतले तरी ते व्यर्थच असते, नाही का ? २ नाना प्रकारची सोंगे घेऊन देवाची चरित्रे व त्याच्या लीला हे लोक दाखवितात लोकांना मोहित करण्यासाठी चतुराईने सोंगे घेतात ३ तुकाराम महाराज म्हणतात पण त्याच्या चित्तात अभिलाषा, द्रव्याविषयी इच्छा असल्याने त्याचा काय उपयोग ? अशी सोंगे दाखविणारा व पाहणारा दोघांनाही सारखाच नरकवास घडतो ४ ५५४ मुकती तीं द्यावीं भुको । आपण त्याचे नये शिको ॥ १ ॥ भाविकानी दुर्जनाचे । मानू नये काहीं साचे ॥ २ ॥ होईल तैसे बळ । फजीत करावे ते खळ ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचे । पाप नाही ताडणाचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साचे-खरे, खळ-दुष्ट, ताडणाचे-मारण्याचे अर्थ - जी दुष्ट माणसे भुकत असतील त्यांना भुकू द्यावे आपण त्याच्यासारखे कधी शिकू नये १ जे ईश्वरावर विश्वास ठेवून आहेत त्यांनी दुर्जनाचे काही खरे मानू नये २ ज्या उपायानी दुष्टांना फजित करता येईल त्यांनी ते करावेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना मारल्याचे काही पापही कुणाला लागण्यासारखे नाही ४ ५५५ जप करिता राग । आला जवळी तो माग ॥ १ ॥ नको भोवताले जगीं । पाहो जबळी राह अर्गी ॥ २ ॥ कुडचाची संगती । सदा भोजन पंगती ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रह्म । साधी विरहित कर्म ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुडघाची-वाईटांची, विरहित-शून्यच अर्थ - जप करीत असताना जर तुला राग आला, तर तो मागाच्या विटाळाप्रमाणेच समजावा १ तू भोवतालच्या जगात पाहूच नकोस भोंवनी कोण महार आहे, की माग आहे हे न पाहता तुझ्या अंतःकरणात क्रोध- रूपी मांग शिरत नाही ना, एवढेच तू पहा मात्र २ वाईटांची संगत व नेहमी त्याच्याच पंगतीने भोजन होत आहे

सार्थ तुकारामगाथा २७७ को काय याविषयी तू सावध हो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे कर्मकांडाविरहित अथवा नैष्कर्म्य असणारे जे ब्रह्म आहे ते साधून घे. ४ ५५६ कांहींच मी नव्हें कोणिये गांवौंचा। एकट ठायाँचा ठायीं एक ॥ १ ॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां। अवघेंचि वांयांविण बोलणें ॥ २ ॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें। कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥ ३ ॥ नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत। आहों अखंडित जैसे तैसे ॥ ४ ॥ तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां। वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठायाँचा-मूळचा, ज्यावें-जगावे, कर्मअकर्म-विधिनिषेध अर्थ:-मी तसे पाहिले तर काहीच नाही. मी कोणत्या एका गावचा आहे असेही नाही. एकाच जागी असणारे जे काही आहे ते मी आहे १ मी कुठे जात नाही, आणि कुठून फिरूनही येत नाही. माझे सर्व हे बोलणेही व्यर्थच आहे. २ मला कुणी आपले नाही, मी तसा खरा कुणाचाच नाही ३ आम्हांला जगावे लागत नाही, मरावे लागत नाही, आम्ही जसे अखंडित आहोत तसेच आहोत. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस नाव, रूप, काही नाही. या कर्मअकर्म किंवा विधिनिषेध त्याहूनही आम्ही वेगळेच आहोत. ५ लोहगांवास परचक्रवेढा पडला-अभंग ३. ५५७ न देखवे डोळां ऐसा हा आकांत। परपीडे चित्त दुःखी होतें ॥ १ ॥ काय तुम्ही येथें नसालसें जालें। आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ २ ॥ परचक्र कोठें हरिदासांच्या वासें। न देखिजें देश राहिलािया ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी लाजविली सेवा। हीनपणें देवा जिणें जालें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-आकांत-दुःखद प्रसंग, परपीडे-दुसऱ्याच्या दुःखाने, परचक्र-शत्रूचे राजकीय संकट अर्थ :- देवा, मला हा दुःखद प्रसंग आता पाहवत नाही. दुसऱ्यांना पीडा झाल्याने देवा, मला भारी दुःख होते १ तुम्ही काय येथे नाहीत असे झाले? पण हे संकट यापुढे आम्हांस दिसता कामा नये. २ हरिदासांचा निवास ज्या ठिकाणी आहे, त्या स्थानी असे परचक्र कुठून असणार? जेथे हरिभक्त राहतात, तेथे संकटांना वाव कुठला? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आजपर्यंत माझी सेवा लाजविलीत. देवा, या संकटाने माझे जिणे हीनपणाचे झाले आहे. ४ ५५८ काय म्यां मानावें हरिकथेचें फळ। तरिजे सकळ जनों¹ ऐसें ॥ १ ॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला। रोकडें विठ्ठला परचक्र ॥ २ ॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें। साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे जेथें वसतील दास। तेथें तुझा वास कैसा आतां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तरिजे-रक्षण होते, उच्छेद-नाश, रोकडें-स्पष्ट अर्थ :- देवा, हरिकथेमुळे काय साधते असे मानावे ? असे हे परचक्र येते, की सर्व जनांचे रक्षण होते ? हरिकथेचे फळ कोणते मानावे ? १ आज तर विठ्ठला, सर्वांचा नाश तुम्ही आरंभिला आहे. या परचक्रावरून हे स्पष्टच दिसत आहे. २ पापावाचून पाप पुढे येत नाही, याचाच प्रत्यय या अनुभवाने येत आहे. ३ तुकाराम महा- राज म्हणतात, जेथे तुमचे दास राहतात तेथे तुमचे वास्तव्य असते असे आता मानावे तरी कसे ? ४ ५५९ भीत नाहीं आतां आपुल्या मरणा। दुःखी होतां जना न देखवे ॥ १ ॥ आमची तो जाती ऐसी परंपरा। कां तुम्ही दातारा नैंणों ऐसें ॥ २ ॥

  • १ जन.

भजनीं विक्षेप तेचि पैं मरण । न वजावा क्षण एक वाया ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव¹ मागें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नेणा-जाणीत नाही, विक्षेप-अडचण, आघाताचा-संकटाचा, ठाव-ठिकाण अर्थ - देवा, मी आता आपल्या स्वतःच्या मरणास भीत नाही, पण इतर लोक दुःखी कष्टी होतात ते मात्र पाहवत नाही १ आमची भक्तांची व हरिदासाची ही अशीच परंपरा आहे दातारा, देवा, तुम्हास का हे माहीत नाही ? २ आमच्या हरभजनात अडचण आली की आम्हास मरणाप्रमाणे वेदना होतात भजनाशिवाय एक क्षणही वाया जाऊ नये असे वाटते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कसल्याही संकटाचा वाराही लागू नये असे ठिकाण दातारा, मला आता दाखीव ४ विवरण - पुण्याच्या शेजारी येरवड्याच्या पलीकडे ईशान्येस नऊ मैलावर असणाऱ्या लोहगावी तुकारामबुवांचे कीर्तन ऐन रंगात आले असताना, त्या गावास परचक्राचा वेढा पडला त्या प्रसंगी तुकोबांच्या मुखातून हे अभंग प्रगट झाले आहेत तुकारामबुवांचा संबंध लोहगावी प्रथमपासूनच होता या गावच्या मोझे घराण्यात तुकोबांचे आजोळ असून त्यांची पहिली बायको रखुमाबाई ही याच गावची होती तुकोबांचे अनुयायी या गावी विशेष असल्याने त्यांचे कथाकीर्तनाच्या निमित्ताने तेथे विशेष जाणे येणे असल्यास नवल नाही या गावात तुकारामबुवांचे एक देऊळही आहे पंढरपूरहून आळंदीस येणाऱ्या वारकऱ्यांना लोहगाव आजही तुकारामतीर्थ म्हणून महत्त्वाचे वाटते 'मधुरेस कृष्ण जन्मला पाहीं । परी गोकुळींच्या सुखास पार नाहीं । तैसा तुकयाचा प्रेमा सर्वही । लोहगावीं लुटिला ।।' अशा शब्दात महीपतीबुवांनी तुकोबांचा लोहगावसंबंध वर्णन केला आहे बहुधा श्रावण महिन्यात तुकोबांची अनेक कीर्तने लोहगावात होत असत सन १६३६ च्या सुमारास मोगलांचे परचक्र पुणे भागात एकसारख येत राहिले शहाजीविरुद्ध महाजान, खानजमान, रणदुल्लाखान इत्यादीचे भय वारंवार निर्माण होई सन १६३६ च्या जून महिन्यात खानजमान याने पुण्याकडे सैन्यासह आपला मोर्चा वळविला लोहगावी परचक्र झाले ते हेच असावे असा आधुनिक संशोधकाचा तर्क आहे या प्रसंगी महीपतीबुवांनी जे चमत्कारिक आख्यान जुळविले आहे त्यात स्थलकालाची विसंगती तर आहेच, शिवाय या प्रसंगी अभंग तीन की चार यासनंबंधीही मतभेदाची चर्चा अभ्यासकांनी केलेली आहे या गाथेतील पुढील १६०४ या नंबराचा 'बोलिलों तें आतां पाळावे वचन । ऐसे पुण्य कोण माझे गांठी ।।' या अभंगाचा समावेश वरील तीन अभंगाबरोबरच कधी कधी करण्यात येतो ५६० फिरगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥ १ ॥ पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि ते महिमान वेगळाले ॥ २ ॥ तुका म्हणे तैशा नव्हतीच परी । सतजना सरी सारिखिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - फिरगी-तरवार, वाखर-वस्तरा, सरी-योग्यता अर्थ - तरवार, वस्तरा व विळे हे सर्व पदार्थ एका लोखंडाचेच असले तरी ते आपापल्या गुणांमुळे वेगळेच ठरलेले असतात १ पाय देऊन घडावची पायरी व पूजेची प्रतिमा ही एका पाषाणाची खरी, पण प्रत्येकाचे महत्त्व किती वेगळे आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु येथे मात्र तसा प्रकार नाही सर्व सतजन एकसारख्याच योग्यतेचे आहेत ३ ५६१ कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥ १ ॥ आतां माझा श्रोता वक्ता तूंचि देवा । करावी ते सेवा तुझीच म्या ॥ २ ॥ कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाले येणे एके घरीं । मज आणि हरी तुम्हा गाठी ॥ ४ ॥ १ ठेवी मज

सार्थ तुकारामगाथा २७९ शब्दार्थ व टीपा :- न सरते=पुरत नाही, पेणें=मुक्काम. अर्थ :- देवा, तुझी उपासना कोणात घडेल ती घडो; या निर्गणाच्या वचनाप्रत कोण येईल ते येवो. १ पण आता माझा धोता व मक्ता तू होऊन अभेदत्वाची अनुभूती मला यावी. या जाणिवेने मी तुझी सेवा करावी. २ जे कुशल आहेत, चतुर आहेत, त्यांची चतुराई काही पुरत नाही. ते तुला भजत नाहीत. नुसते आपल्या बुद्धीने वृथा तर्कच करीत बसतील. ३ देवा, तुमचा व माझा मुक्काम एकाच घरी झालेला असल्यामुळे तुमची व माझी गाठ आता नित्याची आहे. ४ ५६२ आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीन देखोवेखीं ॥ १ ॥ न फळे संतत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ २ ॥ वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याच वाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देखोवेखी=दुसऱ्याचे पाहून, वरपडे=साधन. अर्थ:- आम्ही परमेश्वराची जी भक्ती आरंभिली आहे, जे थट्टेने बोलणे त्याच्याशी आम्ही करितो, ते जगाचे दृष्टीने त्याचे मरणच आहे. कारण आमचे परवर पाहून ते अंगी भाव नसता परमार्थाचे आचरण करतात १ सतत हिताचा विचार कोणता आहे, हे जोपर्यंत त्यांना समजत नाही, तोपर्यंत ते जन्ममृत्यूच्या दारात सारखे हेलपाटेच खात राहतील. २ जे कुणी दुसऱ्याने वंदिले असेल त्यास वंदन करावे, निंदिले असेल, त्यास निंदावे. दुसरे ज्या वाटेने गेले, त्याच वाटेने जावे हाच त्यांचा उद्योग आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कितीही सांगितले तरी कुणी ऐकत नाहीत, तरी ते यमदूतांच्या स्वाधीन होतील. ४ ५६३ दीप घेउनियां धुंडितो अंधार । भेटे हा¹ विचार अघटित ॥ १ ॥ विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ २ ॥ उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न फळे भाग्यहीना ॥ ३ ॥ तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हे तंव वचन वाउगेचि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अघटित=नवलाचे, न भ्यो=भिणार नाही, हुताशन=अग्नी. अर्थ - हातात दिवा घेऊन अंधार धुंडायला जाणे किती शहाणपणाचे आहे ? तो कधी भेटेल हा अविचारच नव्हे का? नवलाचेच नव्हे काय? १ आम्ही विष्णुदास प्रत्यक्ष काळासही भिणारे नव्हेत. मृगजळाच्या जाळ्यात सापडून फसणारे आम्ही नव्हेत २ मातीची धूळ वर उधळली तर सूर्याचे तेज मलीन होईल कसे? पण हे भाग्यहीन माणसास कसे समजणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, गवताने अग्नी झाकला जातो, हे बोलणे युगात आहे. नाही काय? ४ ५६४ नटनाट्यें अवघें संपादिले सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥ १ ॥ मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुले स्वरूप जाणतसों ॥ २ ॥ स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होउनि निश्चित² क्रीडा करूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- स्फटिक=शक्तिमुक्त पारदर्शक दगड, उपाधि=अडचण अर्थ - नाना प्रकारची नृत्ये व नाटके करणाऱ्यांप्रमाणे आम्ही नाना वेष धारण करून विविध सोंगे धारण करू; नाना भेदांचे प्रकार दाखवू; परंतु त्यामुळे आमचा आत्मरूपाचा बोध व त्याचा रंग काही पालटणार नाही. १ बहुरूप्याने कौतुकाने नाना प्रकारचे खेळ केले, तरी तो आपले स्वतःचे रूप जाणून असतोच २ स्फटिकाच्या पारदर्शक स्वरूपात पिवळे, लाल असे नाना रंग जरी दिसत असले, तरी त्यांची अडचण स्वतः स्फटिकास काही वाटत

  • १ तो, २ निश्चित.

२८० सार्थ तुकारामगाथा नसते. तो स्वतः कोणत्याही एका रंगाचा नसतो. ३ त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या लोकांच्यांत मिसळत असलो तरी, त्यांच्या विरहितच असून शांतपणे आमची क्रीडा भजनसुखाची व ईश्वरचिंतनाची चालू असते.४ ५६५ तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥ १ ॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ २ ॥ नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥ ३ ॥ कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥ ४ ॥ तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा:- आणीक-दुसरे, घडी-वेळेस, श्रवण-कान, विसंबता-विसरून. अर्थ :-देवा, तुझ्याशिवाय इतर कुणाची थोरवी माझी वाणी करील तर मग माझी ही जीभ झडून जावो १ तुझ्यावाचून इतर काही माझ्या चित्तास आवडेल तर, माझे मस्तक फुटून जावो. २ मोठ्या आवडीने मी आपल्या डोळ्यांनी इतरांना पाहीन तर, त्याच वेळीं माझे हे चांडाळ डोळे नष्ट होवोत. ३ माझे हे कान जर तुझे कथामृत श्रवण न करतील तर, मग त्यांचा काय उपयोग ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एक क्षणभर जरी तुला विसरलो मी, तरी मग माझे हे जगणे निष्कारणच नाही का झाले ? ५ स्वामींचे स्त्रीनें स्वामीस कठिण उत्तरें केलीं-अभंग ७. ५६६ मजचि भोंवता केला १ येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥ १ ॥ चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुकेचि ना ॥ २ ॥ कोणाची बईल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥ ३ ॥ काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥ ४ ॥ कांहीं नेदी बांधीं धोवियेलें घर । सारवाया ढोर शेण नाहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंजे मायां ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा:- जोग-स्वाग, आपदा-दुःखे, मवटे, ढोर-जनावर. अर्थ- या माझ्या नवऱ्याचा सर्व त्याग माझ्याभोवती तेवढा झालेला दिसतो. त्याच्या उपभोगात मात्र काही कमी पडले आहे ? १ सर्व सुखोपचार घरात चालून येत आहेत. परंतु माझी फजिती मात्र चुकत नाही २ या संसारात कुणाची बायको म्हणून या सर्व आपत्ती सहन करू ? किती कष्ट सहन करू ? ३ ही पोरे मला खाण्या- साठी तोडत आहेत; त्यांना काय देऊ ? मरतील तर बरे एकदाची. ४ हा माझा पती घरात काही शिल्लकच ठेवीत नाही; सारे घर धुऊन काढले आहे याने. घर सारवावे म्हटले तर गुरांचे शेणसुद्धा आता घरात उरलेले नाही. ५ तुकाराम महाराज म्हणतात, ही रांड काहीच विचार करीत नाही. या संसाराचा भार स्वतःवर घेऊन उगाचच कुंथत बसते. ६ ५६७ काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥ १ ॥ किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरी ॥ २ ॥ झवे बापुली आई काय माझें केलें । घड या विठ्ठलें संसाराचें ॥ ३ ॥ तुका म्हणे येती वांईरी असडे । फुंदोनिया रडे हांसे कांहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोहो-पती, असडे-दुंदवे अर्थ :- हा मेला नवरा माझा पूर्वजन्मीचा दावेदार होता की काय कुणास माहीत ? या जन्मी पती होऊन माझे वैर साधतो आहे. १ मी आता सतत असे हे दुःख किती काळ सोसावे ? आणि प्रत्येक वस्तुसाठी किती १ घेतलागे जोग.

सार्थ तुकारामगाथा २८१ लोकांपुढे तोंड वांगाडावे २ या माझ्या संसाराचे या विठ्ठलाने काय बरे म्हणून केले आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही माझी बायको हुंदके देऊन देऊन रडत आहे. रडता रडता हसत आहे. ४ ५६८ गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥ १ ॥ भरी लोकांची पांतोरी । मेला चोरटा खागोरी ॥ २ ॥ खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोणी-धान्याचं पोते, पांतोरी-पोटे, खागोरी-खादाड, पिसी-वेडी, लांसी-राक्षसी. अर्थ :- तुकारामबुवांची बायको म्हणत आहे, घरी धान्याचे पोते आले तर हा नवरा काही नीट मुला- बाळांना खाऊ घालीत नाही. १ लोकांची मात्र पोटे भरीत असतो; असा हा मेला मोठा खादाडही आहे. २ एखाद्या वेड्या स्त्रीप्रमाणे ही खवळून जाते व राक्षसीप्रमाणे ही अंगाला, हातांना झोंबते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रांडे, तुझ्या संचित कर्माचा भाग नेहमी खोटाच दिसतो. ४ ५६९ आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥ १ ॥ डोचकें तिवी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ २ ॥ आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥ ३ ॥ हातीं टाळ तोंड वासी । गाय देऊळीं देवापासीं ॥ ४ ॥ आतां आम्ही करूं काय । न बसे घरीं राणा जाय ॥ ५ ॥ तुका म्हणे आतां धीरो । अझुनि नाहीं जालें तरी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोहो-पती, देवलसी-देववेडा, तिवी-भिजवून मऊ करून, उदमाचा-व्यापाराचा, सांडी-सोडी, थार-आधार, येसपार-आठवण, पत्ता, राणा-रानात. अर्थ :- पोरा, आता खाशील तरी काय ? नवरा देववेडा झाला ना ! १ सदा आंघोळ करून डोके भिजवतो, गळ्यात माळा घालतो. परवा व्यापाराचा उद्योग याने सोडून दिला आहे. २ आपल्या पोटाचा आधार मात्र पाहिला आमचा काही ठावठिकाणा त्याला नाही. ३ हातात टाळ घेऊन हा एकसारखा विठोबाच्या नावाने बडबड करीत असतो देवळात जाऊन, देवासमोर बसून सारखा गाणे म्हणत असतो. ४ आता मी करावे तरी काय ? हा कधी घरी बसतच नाही. एकसारखा रानावनात जाऊन बसतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, तू अजून धीर धर ना. अजून काही सर्वस्व नाहीसे झाले नाही. ६. ५७० बरें जालें गेलें । आजो अवघें मिळालें ॥ १ ॥ आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ २ ॥ किती तरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥ ३ ॥ तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- चीथू-छीतु, मानवला-मनावला. अर्थ :- बरे झाले सर्व नाहीसे झाले, त्यातच आज सर्व काही मिळाले. १ आता जवळच्या ओल्याकोरड्या भाकरी पोटभर खाईन. २ मी रांड या नवऱ्याच्या नावाने किती तोंड वाजवू ? किती तक्रार करू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी बायकोच्या या छीत्तू करून बोलण्याला सरावलो आहे. ४ ५७१ न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥ १ ॥ उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ २ ॥ तु. गा.-३६

२८२ सार्थ तुकारामगाथा जिवंतचि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥ ३ ॥ संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥ ४ ॥ तळमळती यांच्या रांडा । घालितो जीवा नांवें धोंडा ॥ ५ ॥ तुका म्हणे बरे जाले । घे गे वाहिले लीहिले ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- लोंदा-गोळा, घास अर्थ :- काही धंदा न करिता आयता घास तोंडात पडेल तर बरे, असा विचार करणारा हा नवरा मला भेटला आहे १ उठल्या सुटल्या टाळ कुटीतच हा बसतो, याने सर्वत्र एकच गोगट करून सोडला आहे. २ हा जिवंत असून मेल्यासारखाच वाटतो सारी लाज याने घोळून प्यालेली दिसते ३ हा संसाराकडे चुकूनही लक्ष देत नाही त्यामुळे सारा संसार ओस पडला आहे ४ याच्या बायका घरी तळमळून रडतात व जीव धोंड्याप्रमाणे घट्ट करून दिवस काढीत आहेत ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे झाले ते बरे झाले. बाई, तुझ्या कपाळी होते तेच लिहिले असून त्याप्रमाणे घडते आहे. ६ ५७२ कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥ १ ॥ देवासाठीं जाले ब्रह्मांड सोइरे । कोमळया उत्तरें काय वेचे ॥ २ ॥ माने पाचारितां नव्हे आराणूक । ऐसे येती लोक प्रीतीसाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कातेलेसे श्वान लागे पाठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सोइरें-नातेवाईक, पाचारिता-बोलाविल्यावर, आराणूक-समाधान, सुख, कातेलेसे-संतापलेल्या अर्थ :- आपल्या पत्नीस उद्देशून बुवा म्हणतात, 'बाई, उगाच कोण आपल्या घरी येतील बरे ? काय ज्याचा त्याला धंदा घरचा नाही की काय ? १ या देवासाठी हे सारे जगातील लोक आपले नातेवाईकच बनले आहेत त्यांना कोमल शब्दात उत्तर दिलेस तर तुझे काय खर्च होईल ? २ मोठ्या सम्मानाने बोलाविले, तरी त्यात सुखसमाधान नसते; असे असूनही लोक मोठ्या प्रीतीने ईश्वरासाठी आपल्याकडे येतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या रांडेला यात काही भूषण वाटत नाही, ज्याच्या त्याच्या अंगावर संतापलेल्या कुत्र्यासारखी धावून जाते ४ विवरण - तुकारामबुवांच्या संसारासंबंधी, पत्नीसंबंधी, निरनिराळी मते प्रचलित आहेत वर जे सात अभंग आहेत, ते सुद्धा तुकोबांचे नसून त्यांमधे असाही काही अभ्यासकांचा ख्याल आहे तुकोबांची पत्नी जिजाबाई ही मोठी फटकळ, वात्रहाट व तुकारामांना सदोदित त्रास देणारी अशीही तिची रेखा कुणीकुणी रंगविली आहे ही जिजाबाई तुकोबांची दुसरी बायको हिचे माहेरचे नाव जाउली किंवा जिजाई असून ती पुण्याच्या किंवा भेंडच्या गुळवे घराण्यातील होती दोन्ही घराणी चांगली श्रीमंत व सावकाराची होती सर्व काही ठीक होते, तोपर्यंत प्रपंचही तुकारामबुवांचा बरोबर चालला असावा पण पुढे एकामागून एक अशी संकटपरंपरा बुवांच्यावर कोसळली आईबाप मेले, पहिली बायको मेली, पोरगे मेले, दावणीची गुरे मेली, दून मेले, दुष्काळ पडला, व्यापार संपून गावातील पत गेली दुकानाचे दिवाळे निघाले तुकारामबुवांची मनःस्थिती उसळून गेली खरी शांत वृत्तीने बुवांची पत्नी त्यांना सांभाळणारी, त्याचे मन समजावून घेणारी असती तर, कदाचित् वैराग्य कमी दिसले असता. पण ती कडक स्वभावाची होती श्रीमंतीत वाढलेली ही स्त्री बुवांचे मन बिनसत समजू करून होनी याबद्दल कित्येकांच्या मनात शंका आहे तुकोबांचे लक्ष प्रपंचांतून निघाले त्यांना साधा व्यवहारही उरला नाही घर सोडून भामनाथाच्या डोंगरावर जावे व विठ्ठलभजनात काळ कंठावा, नामस्मरण करावे, ज्ञानेश्वरीभागवताची पारायणे करावीत, यांत त्यांचे चित्त रमून गेले घरी पोरांचे काय होते, संसाराचे काय होते, घरी अन्नधान्याची गरज असते ना ? यासारख्या प्रश्नांची

[Page Header] सार्थ तुकारामगाथा २८३

[Body Text] चिंता बुवांना नव्हती. बुवा घरी आले तरी त्यांच्याबरोबर माणसे असत. त्यांची भगवद्भक्तीची चर्चा चाले, अभंग- निरूपण चाले, नामस्मरण, भजन चाले. या वृत्तीने संसार कसा होणार ? नवऱ्याचे काही लक्ष संसारावर नाही, असे पाहून मग ही जिजाई संतापत असे, रागवत असे. बुवा प्रसंगी कडक भाषा तिची सोशवत, हे आपल्याला इतर संदर्भात माहीत आहे. मग ही बोलून चालून शिक्षणाचा संस्कार नसलेली एक सामान्य अज्ञ स्त्री ती शुश्रोषापर कडक शब्दाचा वर्षाव करी. भारी रागावत असे. तिने एकटीने हा प्रपंचाचा गाडा ओढावा तरी कसा ? प्रपंचात काय लागत नाही ? मुलाबाळांना नीटपणे वाढविण्याची सर्व जबाबदारी निमूटपणे तिने पत्करावयास हवी होती. पण तेवढी समजूत तिला नव्हती असे दिसते. वरील अभंगात वर्णन केलेली परिस्थिती वस्तुस्थितीस धरून असेल तर, जिजाबाई तुकारामांना फारच कठोर उत्तरे देत होती असे दिसते. 'कोणाची बाईक होऊनिया ओढू । संवसारीं काढू आपदा किती ?', 'पोरें मरतीं तरी बरें होतें आतां' अशा शब्दात ती आपल्या मनातील संताप व्यक्त करीत आहे. 'बरें झालें देवा, बाईल कर्कशा' म्हणून तुकोबांनीही उल्लेख केला आहे.

तुकोबा व जिजाबाई यांच्या तांडी वरवर दिसणाऱ्या या अपशब्दातून दोघांच्या मनस्थितीचे व संप्रदायाचे विक्षेप निवडून काढणे कठीण काम आहे. सर्व लौकिक संसाराकडे तुकोबांनी पाठ फिरविली व ते एका विठ्ठलाच्या प्रेमात सापडले. मग या प्रारंभीच्या आयुष्यात सुखावलेल्या स्त्रीने कुणाच्या आधारावर प्रपंच ओढायचा ? तिचा तोल सुटला असला, तरी तिचीही बाजू समजावून घेण्यासारखी आहे.

बुवा एवढे परमार्थी, भक्तीच्या मार्गाने प्रवास करीत निघालेले, पण त्यांच्याही मुखातून स्वतःच्या पत्नी- विषयी अपशब्द निघत असत. मग जिजाबाई तर बोलून चालून स्त्री. धीमंदीत वाढलेली, तीही प्रसंगी त्रास असह्य झाल्यावर संतापून बोलत असे. पण दुपारच्या जेवणाची वेळ झाली की, भर उन्हात, डोक्यावर भाकरी घेऊन वाटघा- कुटपाच्या मार्गाने, पोरांच्या त्रासानं, मुमाराच्या फटफजितीने भारावलेली, गांगरलेली, कष्टी झालेली जिजाबाई आपल्या देवपिसे जडलेल्या नवऱ्यासाठी निघालेली दिसेल. यावळी तिच्या डोक्यावर भाकरी व मनात या देवभोळ्या 'ध्याना' बद्दल अपार प्रेमच असावे. जिजाबाई साध्वी होती, पतिपरायण होती, देवादिकांना मानणारी होती, पण स्वभावाने भारी तापट असावी. या स्त्रीच्या मनाचे रहस्य तुकोबाही जाणून होते. पायात काटा रुतल्यामुळे रगड़त लंगडत येणाऱ्या स्वस्त्रीची दैना पाहून तेही कळवळले. त्यांनी जेवणवेळेस घरी येण्याचे कबूल केले. तिला वारंवार उपदेश करून तिचे मन शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 'देवासाठीं जाले ब्रह्मांड सोइरें' असा बहुमोलाचा उपदेश तेही तिला करण्याचा प्रयत्न करीत असताना दिवसांन तिला केलेल्या पूर्णबोधाचा विचार पुढे आपण करणार आहोतच. पण अभंग क्र. १९८१ ते १९९१ पर्यंत तुकोबांनी ज्या श्रेष्ठ भूमिकेवर हा उपदेश केला आहे, त्याच्या चिंतनाने बुवांच्या व जिजाईच्या मनात आलेल्या क्षणिक यावटळी निघून जाव्यात. 'भले लोक तुज बहु मानवती । वाढेल या कीर्ती जगन्माजी । किंचित हें सुख टाकी वो चुकोनि । पावसील धनी परमानंद ।' या सारख्या किंवा 'नको चिंता करू वस्त्रा या पोटाची । माऊली आमुची पांडुरंग', 'वैष्णवाची दासी होई सर्वभावें । मुखीं नाम ध्यावें विठोबाचे' यासारख्या शब्दांच्या वर्षावाने जिजाबाईचे अंतःकरण पुढे पुढे शीतल झाले असावे व बुवांचा क्षणिक रागही नाहीसा झाला असावा. मुसानेतुराचे व भांडभांडुपणाचे मुख तिने धुवून टाकावे, अशी अपेक्षा तुकोबांची होती.

'तू माझ्या विचाराना येऊन मिळशील तर आपल्या मधील विरोध संपेल व देवावाचून तुला व मला दुसरे कुणीच नाही. मी त्याचीच सुखसाठीं केली आहे. तू मला त्यात साहाय्य करावेस' अशी महत्त्वाची विनंती प्रेमाच्या पोटी बुवांनी जिजाबाईस केली आहे. यात सर्व काही आले.

[Abhanga] ५७३ भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥ १ ॥ करिता नव्हे नीट श्वानाचे हें पुच्छ । खापरा परीस काय करी ॥ २ ॥ काय करिल तया साकरेचे आळें । बीज जैसें फळें येतीं तया ॥ ३ ॥ तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥ ४ ॥

२८४ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- पाषाण-दगड, श्वानाचें-कुत्र्याचे, खळ-दुष्ट. अर्थ- जो मनात भाव धरून वागेल त्याच्या सामर्थ्याने दगडाचा देवही त्याला तारील. पण मूळातच जो दुर्जन किंवा दुष्ट वृत्तीचा आहे, त्याला सज्जन तरी काय करणार ? १ कुत्र्याचे वाकडे शेपूट कधी तरी सरळ करता येईल काय ? खापराच्या तुकड्यास परीस काय करणार ? त्याला लोखंडच हवे. २ कडू लिंबाच्या झाडास साखरेचे आळे करून काय उपयोग ? जसे बीज असणार, तशी फळे त्याला येणार हे स्पष्ट आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या वेळेस वज्रासारख्या कठिण शस्त्राचा भंग होईल; पण या दुष्ट माणसाच्या स्वभावात बदल घडून येणार नाही. ४ ५७४ इच्छावें तें जबळी आलें । काय बोलें कारण ॥ १ ॥ नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ २ ॥ मुकियाचे परी जीवीं । साकर जेवीं खादली ॥ ३ ॥ तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्यची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खादली-खाल्ली, मौन्यचि-न बोलणे. अर्थ :- ज्याची इच्छा करावी ते सर्व प्राप्त झाले आहे. आता बोलायचे काही कारण राहिले नाही. १ हरीच्या नामरूपाची गाठ पडल्यामुळे आता सर्व गोष्टी अथवा विवंचना संपल्याच ना. २ मुक्याने साखर खाल्ली तरी, त्याला जशी तिची गोडी सांगता येत नाही तसे माझे झाले आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी आता काय बोलावे; आता मौन धरावे, काहीच बोलू नये हे चांगले ४ ५७५ साधनें तरी हींच दोन्ही । जरी कोणी साधील ॥ १ ॥ परद्रव्य परनारी । याचा घरीं विटाळ ॥ २ ॥ दैवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥ ३ ॥ तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- परद्रव्य-दुसऱ्याची संपत्ती, परनारी-दुसऱ्याची स्त्री. अर्थ - साधनाने साधने करायची असली तरी हीच दोन करावीत. १ एक परद्रव्याचा विटाळ मानावा व दुसरे म्हणजे परस्त्री मातेप्रमाणे मानावी. २ मग मोठ्या भाग्याने देव त्याच्या घरी येतील. सर्व संपत्तीची अनुकूलता त्यास लाभेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, इतकेच नव्हे तर, अशा गृहस्थाचे शरीर म्हणजे देवाच्या घरचे भांडारच होय. ४ ५७६ आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥ १ ॥ मोहे धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ २ ॥ कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥ ३ ॥ सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥ ४ ॥ आम्हां घाली पाठीकडे । पुढें १कळिकाळाशीं भिडे ॥ ५ ॥ तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सूकर-वराह, कृपानीधी-कृपेचा सागर. अर्थ :- या देवाने आमच्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह यांच्या रूपांनी अवतार घेतले आहेत. १ या देवाचे पंढरीनाथा, असे नाव घेताच हा देव आपल्या कृपेचा पान्हा देण्यासाठी मोठ्या प्रेमाने धावून येतो. २ तसे पाहिले तर कुठे तो दिसत नसला तरी अवचितपणे येऊन आमचे संरक्षण करीत असतो. ३ हा देव एवढा दयाळू आहे की, १ आपण.

सार्थ तुकारामगाथा २८५ तो सुखाचा वाटा आम्हास देतो आणि दुःख स्वतःसाठी ठेवितो दुःखाचा घोट स्वतःच तो गिळीत असतो ४ आमचे सरंक्षण करण्यासाठी हा आम्हास पाठीशी घालतो व स्वतः प्रत्यक्ष काळाशी झगडण्यासाठी पुढे होतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा कृपेचा सागर आमच्या रक्षणासाठी भवसागरातील नावेत उतरलेला असतो ६ ५७७ रवि रश्मिकळा । नये काढिता निराळा ॥ १ ॥ तंसा आम्हा जाला भाव । अगीं जडोनि ठेला देव ॥ २ ॥ गोडी साखरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रश्मिकळा-किरणांचे तेज, ठेला-स्थिर जाला अर्थ - सूर्याची किरणे व त्याचे तेज याना सूर्यापासून वेगळे काढता येत नाही १ त्याप्रमाणेच देवाचे व आमचे नाते असून तो आमच्या सर्वांगातच स्थिर झालेला आहे २ साखरेपासून तिची गोडी निराळी काढता येईल काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो जो शब्द उमटेल, तो आकाशाच्या पोटातच विरून जाणार. जो जो भाव उमटेल, तो तो ईश्वराच्या रूपातच सामावलेला असणार ४ ५७८ थोडें परी निरें । अबिट तें घ्यावे सरे ॥ १ ॥ घ्यावें जेणे नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ २ ॥ चित्त ठेवी ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥ ३ ॥ आपले तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निरें-स्वच्छ अर्थ - अगदी थोडे, पण स्वच्छ असलेले व वीट न येणारे, यथार्थ असेल तेच घ्यावे १ असे घ्यावे की, ज्याची कमतरता कधी पडूच नये एका बीजातून अनेक नवी बीजे तयार होतात तसे व्हावे २ आपले चित्त आपणास साक्षी ठेवावे, इतरांच्या उपचाराची पर्वा ठेवू नये ३ आपले हित नेमके कशात आहे ते पाहावे यातच सब सार आहे ४ ५७९ अवघे देव साध । परी या अवगुणाचा वाध ॥ १ ॥ म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ २ ॥ ऊस कांदा एक आळा । स्वाद गोडीचा ¹ निराळा ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साध-साध्य अर्थ - सर्वत्र व्यापून राहिलेला देव हे एकच असून तो साध्य करून घेणे हे कर्तव्य असले तरी या अंगाच्या अवगुणामुळे बाध येऊन तो साधत नाही १ हे तत्त्व एकासारखे दुसरे दिसत असूनही हे त्यासारखे नसते २ ऊस व कांदा एकाच आळ्यात लाविले तरी त्याचा स्वाद व त्याची गोडी या गोष्टी वेगळ्याच असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात विषाची व अमृताची बरोबरी होणार नाहीच ४ ५८० शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥ १ ॥ म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ २ ॥ खवळलिया कामक्रोधीं । अगीं भरती आधिव्याधी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपोआप ॥ ४ ॥ १ पाहता

२८६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा:- येर-दुसरे, आधी-मानसिक त्रास, व्याधी-शारीरिक दुःख, त्रिविधताप-आधिदैविक, आध्यात्मिक व आधिभौतिक ताप. अर्थ:- या जगात शांतीप्राप्तीसारखे दुसरे कुठलेही सुख नाही. बाकी दुसरे सर्व दुःखच आहे. १ म्हणून सर्वांनी आपल्या चित्तात शांतता धारण करावी; त्यामुळेच तुम्ही या भवसागरातून पैलतीराला जाता. २ जर अंतः- करणात कामक्रोधादी विचार सबळवून गेले, तर मानसिक व शारीरिक दुःखांनी जीवित भरून जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या शांतीच्या प्राप्तीमुळे त्रिविध ताप आपोआप नाहीसे होतात. ४ ५८१ गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ॥ १ ॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ २ ॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥ ३ ॥ हेम अळंकरा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा- परी-रीतीने, हेम-सोने. अर्थ :- गूळ हा गोडीने सर्वत्र एकसारखाच असतो. त्याप्रमाणे हा देवच सर्वत्र भरून राहिलेला आहे. १ आता मी या सर्वज्ञ व सर्वव्यापी देवाची कोणत्या रीतीने भजन, पूजन करू ? कारण देव सर्वत्र अंतर्बाह्य स्वरूपात भरून राहिला आहे. २ पाण्याहून वेगळा असा त्यावरचा तरंग कधी असतो काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, सोन्याच्या अलंकारांची नावे निरनिराळी असली तरी, सुवर्ण एकच असते. तसे देव व आम्ही भक्त एकच आहोत. ४ ५८२ परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥ १ ॥ हेंचि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ २ ॥ इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥ ३ ॥ सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥ ४ ॥ पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥ ५ ॥ योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥ ६ ॥ मोक्षायेवढें सुख । सुख नव्हेचि तें दुःख ॥ ७ ॥ तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - परमेष्ठिपदा-ब्रह्मदेवाचे पद, विपत्य-संकट अर्थ - जे खरे भक्त आहेत ते ब्रह्मदेवाचे पदही नेहमीच तुच्छ मानतात १ नेहमी श्रीहरीचे चिंतन हेच त्यांचे धन असते. २ इंद्रपदाची जे सुखाचे भोग ते त्यांना भवरोगासारखे वाटतात ३ सर्व जगाचे राज्य जरी त्यांना मिळाले, तरी त्याच्याशी त्यांना कर्तव्य नसते ४ पाताळाचे अधिराज्य जरी त्यांना कोणी दिले, तरी ते त्यांना संकटच वाटते. ५ योगसिद्धींच्या पूर्णतेने जे लाभ होतील ते त्यांना दुःखाचेच वाटतात. ६ मोक्षप्राप्तीसारखे मोठे सुख त्यांना दुःखदायकच वाटते. ७ तुकाराम महाराज म्हणतात, एक श्रीहरीशिवाय त्यांना अवघा शीणच वाटतो. ८ ५८३ मोहोऱ्याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥ १ ॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ २ ॥ स्वामीचिया¹ अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥ ३ ॥ तुका म्हणे खोडी । देवमनी न देती दडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोहोर-एक प्रकारचा दगड, याच्या संपर्कात सूत असले तर ते अग्नीतही जळत नाही. देवमनी-घोडयाच्या गळ्याशी शुभ्रस्वस्तिक रंगाचा भोवरा असतो त्याच्यामुळे १ स्वप्नीचिया.