भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

४५४ सार्थ तुकारामगाथा

सोने उरले नाही, आणि प्रिय स्वामी, या पूर्वीची हकीकत तर तुम्हास माहीत आहेच ३ देवा, तुझ्या या प्रपंचाच्या ऋणाने किती तरी लोक बद्ध झाले आहेत, ते सर्व माझ्यापेक्षा किती तरी थोर थोर आहेत ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या कर्जरोख्यासारख्या कागदपत्रात जे गुंतून गेले आहेत, त्याना तू आपलेसे करून घे ना ५

ध्रुवंक—अभंग २८.

१०१३ करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥ १ ॥ देसी कीं न देसी पायाचे दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ २ ॥ बोलसी कीं न बोलसी मजसवे देवा । म्हणोनिया जीवा भय वाटे ॥ ३ ॥ होईल कीं न होय तुज माझा आठव । पडिला संवेह हाचि मज ॥ ४ ॥ तुका म्हणे मी तो कमाईचे हीण । म्हणऊनि सीण करों देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा — अंगीकार—स्वीकार, संवेह—संशय अर्थ — देवा, तू माझा स्वीकार करशील, न करशील असा मला विचार पडलेला आहे १ तू मला तुझ्या पायाचे दर्शन देशील न देशील, अशा शंकेने माझे मन अस्थिर बनलेले आहे २ देवा, तू माझ्याशी बोलशील न बोलशील, या संशयाने माझ्या मनास भीती वाटत आहे ३ देवा, तुला माझी आठवण होईल न होईल, या शंकेने मी व्यथित झालो आहे रे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझी कमाई कमी, माझ्याकडून मेहनतही फार होत नाही म्हणून मनाला फार शीण वाटतो ५

१०१४ ऐसा माझा कोण आहे मोडभार । नावाचा मी फार वाया गेलो ॥ १ ॥ काय सेवा रुजु आहे सत्तावळ । तें मज राउळ कृपा करी ॥ २ ॥ काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणे पडे वर्म तुझे ठायीं ॥ ३ ॥ कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥ ४ ॥ तुका म्हणे वाया जातो भूमी भार । होईल विचार काय नेणो ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा — भीडभार—भीडेचे ओझे, राउळ—देव अर्थ — असा मी कोण एवढा थोर आहे की, माझी भीड ध्यानात ठेवून माझे काम व्हावे ? उलट मी तर एक वाया गेलेला मनुष्य आहे १ माझी काय ईश्वराच्या चरणी सेवा रुजू झालेली आहे ? का त्याच्यावर सत्ता करीन असे बळ तरी माझ्याजवळ आहे ? २ माझी काय जात शुद्ध आहे ? की कूळ पवित्र आहे ? काय म्हणून देवा, तुझे रहस्य माझ्या ध्यानी यावे ? ३ मी काय असा मोठा तपस्वी आहे ? की दानधर्म मनोभावे करणारा आहे ? माझ्या अंगी काही सत्ता आहे ? बळ आहे काय ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, या जगात जन्मास येऊन मी भूमीला भारच झालो आहे या सर्व आयुष्याची अखेर काय होणार आहे कुणास माहित ? ५

१०१५ साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काय नव्हे ॥ १ ॥ करावें तें बरें जेणे समाधान । सेवावें हैं वन न बोलावें ॥ २ ॥ शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरिच हे वेई निवडूनि ॥ ३ ॥ उचित अनुचित कळो आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥ ४ ॥ तुका म्हणे मज पायांसवें चाड । सागरी ते गोड आहे मज ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा — साच—खरी, चाड—इच्छा अर्थ — देवा, खरी स्थिती काय आहे, हेसुद्धा मला कळू नये ना ? तुझी सेवा मी कधीच करीत नसतो काय ? १ जेणेकरून माझे समाधान होईल, ते देवा, तुम्ही करा ना नाही तर न बोलता वनात जाऊन एकांत-

सार्थ तुकारामगाथा ४५५ वासात मी राहावे हेच उत्तम नाही का ? २ जेणेकरून माझा भाव देवा, तुझ्या पायांवर शुद्धपणे समर्पित होईल, असे काही निवडून मजजवळ दे. ३ पांडुरंगा, तुझ्या कृपादृष्टीमुळे योग्य काय, अयोग्य काय, हे मला चांगलेच समजून आले आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला तुमच्या पायांचीच एक इच्छा आहे. जे तू मला सांगशील ते गोडच वाटेल मला. ५ १०१६ नाहीं कांटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥ १ ॥ जन वन आम्हां समानचि जालें । कामक्रोध गेले¹ पायटणी ॥ २ ॥ षडऊर्मी शत्रु जितिले² अनंता । नामाचिया सत्तावळें तुझ्या ॥ ३ ॥ मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥ ४ ॥ म्हणऊनि तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पायटणी-पायऱ्या, अवलोकुनी-पाहून, वास-वाट. अर्थ :- देवा, मी आयुष्यास काही कंटाळलो नाही; पण काय करावे, न करावे या संभ्रमात मी असल्या- मुळे भयभीत झालो आहे. १ वनवास व जनवास हे आम्हास सारखेच झाले असून कामक्रोधांना आम्ही आमच्या घराच्या पायऱ्या केल्या आहेत. २ अनंता, तुझ्या नामाच्या सत्तेमुळे आम्ही कामक्रोधादी मनाच्या सहा ऊर्मी जिंकल्या आहेत. ३ स्वामीची आज्ञा शिरसावंद्य मानून ती पाळावी हाच आम्हा सेवकाचा धर्म आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच देवा, मी तुमची पवित्र पावले पाहून, त्यावर लक्ष ठेवून, तुमच्या कृपेच्या वचनाची वाट पाहात आहे. ५ १०१७ वांयाविण वाढविला हा लौकिक । आणिका लटिक वाद दोघां ॥ १ ॥ नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ २ ॥ शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं विंबेचि ना ॥ ३ ॥ जालों परदेशी गेलें दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥ ४ ॥ तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वैखरी-वाणी, साच-खरे, अर्थ :- देवा, मी हा परमार्थाचा लौकिक व्यर्थच वाढविला, असे मला वाटते. धड प्रपंच नाही, धड परमार्थ नाही. असे होऊन गेल्यामुळे या दोघांचा वाद लटफाच ठरलेला आहे. १ आता माझ्या मनास असे वाटत आहे की, या जगात देवच नाही, मग तो भुकेलेल्याचे जेविणे जाणणार तरी कसे ? २ उगाच मी आपली वाणी शब्दरूपाने गौरवून पाहिली. पण ईश्वराच्या रूपाचे खरे बिंब काही तीमध्ये उमटलेले मला दिसले नाही. ३ असा मी देवा, परदेशी बनलो आहे. दोन्ही मार्ग हुकले धड परमार्थही नाही, धड संसारही नाही तुझ्या पायांपासून असा मी अंतरलो आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असे मागेच मला समजून येते, तर मी हे तुझे वेड माझ्या मनास लावूनच घेतले नसते. ५ १०१८ न कळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥ १ ॥ आगमाचे भेद मी तों काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ २ ॥ कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥ ३ ॥ संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥ ४ ॥ मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥ ५ ॥ तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥ ६ ॥ १ केले, २ जिविले.

३५६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- मूढ--मूर्ख, मद, आगमाचे-वेदशास्त्राचे, घायें-घावाने, अर्थ :- देवा, मी अतिशय मंद बुद्धीचा असल्यामुळे, मला तुझे ते गूढ तत्त्वज्ञान काही समजत नाही. पण मी माझ्या चित्तात तुझ्याच चरणकमलांचे ध्यान करतो. १ वेदशास्त्रांतील भेद मी कसे जाणणार ? १ पण मी तुझ्याच चिंतनात काल कसा तरी संपवीत आहे. २ मी तसे काहीही जाणीत नसलो तरी, मी तुझा दास म्हणून घेत आहे. याचा अभिमान ज्याचा त्याने धरायला हवा. ३ मी संसाराची सर्व इच्छा सोडून देऊन तो मार्गही ढाणून दिला आहे. अशा प्रकाराने एका घावाने मी या जगाचा संबंध दूर केला आहे ४ मी मागच्या जन्मीच्या धर्माच्या लाभाचेही खंडण केले असून, मी माझे एकाएकी मन रक्षण केले आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, अगा, रखुमाईच्या वरा, भक्तांवर करुणा करणाऱ्या देवा, मला तुम्ही सांभाळायचे ६ १०१९ इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥ १ ॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ २ ॥ इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥ ३ ॥ इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥ ४ ॥ भलतिया मायें तारीं पंढरीनांथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - इतुले-इतकेसे तरी, भलतिया-कोणत्याही अर्थ :- देवा, माझे बोलणे नीट ऐकून एवढीशी लहान गोष्ट तरी कर ना, माझा देहाभिमान समूळ जाळून टाक ना. १ देवा, तू नीट ऐक; मी सर्वत्र समदृष्टीने तुला पाहावे अशी तरी माझ्यावर कृपा कर. २ देवा, निदान एवढे तरी कर की, संतांच्या चरणावरची धूळ माझ्या माथ्यास लागेल असे तू करावेस, अशी माझी तुला विनवणी .आहे. ३ देवा, पंढरीनाथा, नाही तर एवढेच कर की, माझ्या हृदयात रात्रंदिवस निवास कर ना. ४ पंढरीनाथा, मी आता तुला पूर्णपणे शरण आलो आहे. तू कोणत्याही का मार्गाने असो, पण माझ्यावर कृपा कर. मला तार. ५ १०२० तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥ १ ॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ २ ॥ माझे गुण दोष पाहतां न लगे' अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥ ३ ॥ नेणें तुझी कैसी करावी हे' सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥ ४ ॥ तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- लोकपाळ-राजा, प्रमुख लोक अर्थ :- देवा, मी तुझाच दास आहे, असे आता सर्व प्रमुख लोक बोलत राहिले आहेत, म्हणून तरी तू माझा सांभाळ करावांस. १ देवा, तू अनाथांच्यावर कृपा करणारा अनाथनाथ आहेस ना ? पापी लोकांचा उद्धार करणारा तू पतितपावन आहेस ना ? मग आता तुझी ही नावे तुलाच सांभाळली पाहिजेत. २ माझ्या गुणदोषांकडे देवा, पाहशील तर त्यांचा अंतच लागणार नाही. माझे चित्तच याविषयी मला ग्वाही देत आहे. ३ देवा, तुझी सेवा कशी करावी, हेही मी नीटपणे जाणीत नाही. परंतु तू माझ्या मनातील भाव जाणून आहेस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपेचा सागर असून माझे हे भवसागराचे बंधन तोडून टाक ना. ५ १०२१ जाणवें तें काय नेणावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥ १ ॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ २ ॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ ३ ॥ जायें तें फोडें न जावें तें आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥ ४ ॥ तुका म्हणे तूं करिसी तें सोपें । पुण्यें होतो पापें आमुच्या मतें ॥ ५ ॥ १ फळे, २ तें.

शब्दार्थ व टीपा :- ध्यावे-वंदन करावे अर्थ - देवा, काय जाणावे, न जाणावे, ते काही समजत नसल्यामुळे तुझ्या पायावर मस्तक ठेवावे, हेच एक तात्पर्य आहे १ काय करावे, काय न करावे, या संभ्रमात तुझ्या पायाचे चिंतन करावे हे एकच सार आहे. २ काय बोलावे, काय बोलू नये, या संशयाच्या अवस्थेत देवा, तुझ्या पायावर मस्तक नमवावे, हेच एक सार वाटते. ३ कुठे जावे, कुठे जाऊ नये, या संभ्रमात, तुझे नाव आठवावे हेच चांगले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू जे जे करशील ते ते सोपेच वाटेल पुण्यमय वाटणारी पापेच आमच्या हातून होतात; पण तू आहेस म्हणून सर्व निभावते ५ १०२२ नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसे करीं ॥ १ ॥ दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन १ चरणावरी माथा ॥ २ ॥ पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निवलोण उतरीन ॥ ३ ॥ पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत गुजगोष्टी ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - आत्मस्थितिभाव-आत्मा ब्रह्मरूपच आहे अशी भावना, अभ्यंतर-अतरंग, अत करण अर्थ:-देवा, मला तुमचे ते ब्रह्मज्ञान नको आहे आत्मस्थितीची किंवा मोक्षाची अथवा मुक्तीची भावनाही मला नको. अशा प्रकारे एकच होऊन मुक्त होण्यापेक्षा देवा, मी भक्त व तू देव असेच नाते असड असावे १ गोपिकारमणा, तू तुझे सुदर सगुण असे रूप मला दाखोव मी तुझ्या चरणावर माझे मस्तक ठेवीन २ तुझे शोभिवत मुख पाहून मी तुला आलिंगन देईन, माझा जीव तुझ्यावरून उतरून टाकीन ३ काही प्रेमाने विचारशील तर तुला काही गोष्टी प्रेमातील व एकान्तामधील सांगेन काही गुजगोष्टी करीन देवा ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या गोष्टीस मात्र उशीर लावू नकोस माझे अंत करण जाणून तू माझ्यावर कृपा कर. ५ विवरण - तुकाराम महाराजाच्या या एका अभगात पुनः एकदा निर्गुणाऐवजी सगुणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे मुक्तीऐवजी, मोक्षाऐवजी 'मी भक्त तूं देव ' ही द्वैतावरची भावना या ठिकाणी स्पष्ट आहे या द्वैताच्या बुडाशी अविनाशी असे अद्वैततत्त्व असले तरी, निर्गुण निराकाराशी सुखसवाद दावय नाही, मुक्त स्थितीत प्रेमाचे हितगुज नाही, पायावर डोके ठेवणे नाही, आलिंगन नाही, जीव ओवाळून टाकणे नाही आणि भक्तीमध्ये तर याच भावनेचे सुख अवीट मानले गेले आहे ईश्वर निर्गुण, निराकार आहे व आपण त्याच्यापैकी एक किंवा दोन व्यक्त झाला ते आपण, असे नुसते ज्ञान उपयोगी पडत नाही त्याचा भोग अनुभूतीत हवा किंवा त्याची प्रतीती सवादसुखातून यावयास हवी यासाठी एकच तत्त्व दोन या अवस्थेस येते एक होते देव, दुसरे भक्त, एक होतो परमात्मा, दुसरा बनतो आत्मा पण ही भाषा अधुरी ठरते भक्तास सुदर रूपाची, देखण्या मुखसौंदर्याची, कोवळ्या चरणकमलाची, गोपिकारमणाची अपेक्षा वाटू लागते भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात भगवंताने आपले विराट रूप अर्जुनास दाखविले सर्व ब्रह्माण्डांस सामावून घेणारे ते अनंताचे रूप पाहून अर्जुन थकित झाला पण त्याचे मन भयाने व्याकुळ झाले आणि त्याने व्याकुळतेने श्रीकृष्णाय प्रार्थना केली की, 'तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास, हे जगन्निवासा, देवदेवा, प्रसन्न व्हा, आणि देवा, आपले ते पूर्वीचेच स्वरूप मला दाखवा ' अर्जुनाला श्रीकृष्णाच्या पूर्वीच्याच स्वरूपाचा लोभ जडला कारण ते सुदर होते, सगुण होते भक्ताच्या डोळ्यांना तृप्त कर- णारे होते अनेक सहस्र हात असलेल्या रूपापेक्षा चारच हात असलेले ईश्वराचे सुदर व परिचयाचे रूप अर्जुनाला पुन पुन पाहावेसे वाटते हे रूप कसे होते ? 'किरीटिन गदिन चक्रहस्तमिच्छामि त्वा द्रष्टुमह तथैव । तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, किरीट व गदा धारण करणारे, हातात चक्र घेतलेले, पूर्वीसारखेच मी तुम्हास पाहू इच्छितो म्हणून हे सहस्रबाहो, विश्वमूर्ते, त्याच चतुर्भुज रूपाने तुम्ही प्रकट व्हावे' या अर्जुनाच्या मनातील १ ठेवू दें तु गाथा. .५८

४५८ सार्थ तुकारामगाथा इच्छेचे रहस्य समजावून घेण्यासारखे आहे ईश्वराचे हे मानवी रूपच सौम्य व तृप्ती देणारे असते त्याच रूपाच्या सहवासात भक्ताचे मन विसावते

या अभंगात ईश्वराचे निर्गुणनिराकार रूपाचे ज्ञान नको, आत्मस्थितीभाव नको, ब्रह्मज्ञान नको, असे म्हटले आहे याचा अर्थच असा की, त्या परमेश्वरास आपल्या सर्व इंद्रियांनी भोगता यावे, अशी इच्छा भक्ताची असते चरणावर डोके ठेवण्यापासून एकान्तात हितगुज करण्यापर्यंतच्या विविध बाबतीत भक्तांना मोठे सुख वाटते सर्व काही एकच आहे, हे ज्ञानाने समजते बुद्धीस त्याचे आकलन होते, पण प्रेमाशिवाय त्यात मग उणीव निर्माण होते म्हणून भक्त सगुण प्रेमावर येऊन ज्ञानाचाच भाग मागतात परमेश्वराचे विश्वरूप पाहून अर्जुन त्यास म्हणाला, 'ते हें विश्वरूप आपुले । तुम्हां मज डोळां दाविले । तरि माझं मन झाले । तृप्त देवा' अवाढव्य असे हे डोळ्यात न मावणारे रूप जरी अर्जुनास आनंद देणारे होते, तरी त्यात एक प्रकारची भीती होती या हजार बाहूच्या रूपास दोन हातांनी कवळावे कसे ? हाही प्रश्न त्याच्या समोर होता त्याच्याशी प्रेमातल्या गोष्टी कशा बोलाव्यात ? म्हणूनच त्याने जी विनंती ईश्वरास केली, तिचा आविष्कार ज्ञानेश्वरांच्या शब्दात सहजसुंदर अशा स्वरूपात असा आहे 'परि आता ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोडी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगूनि तूतें' पण हे सर्व या विश्वरूपाशी कसे घडणे शक्य आहे ? 'ते येचि स्वरूपीं करू म्हणिजें । तरि कोणे एके मुखेंसीं चावळिजे । आणि कवण्हा खेंव देइजे । तुझ लेक नाहीं ।' अशी अवस्था असल्याने त्या सगुण रूपाशिवाय भक्तांस कधीच समाधान होत नाही अर्जुनाला कसे रूप हवे होते ? ज्ञानेश्वरांनी आपल्या सुकुमार शब्दात वर्णन केले आहे 'मस्तकीं मुगुटांतें ठंचिले । कीं मुकुटा मुकुट मस्तक झाले । शृंगारा लेणें लाधले । अंगाचेनि जया ॥ इंद्रधनुष्याचिये आडणी । मानो मेघ गगनधरणीं । तैसे आथरिले शारंगपाणी । वैजयंतिया ।' अशा या सुंदर सगुणरूपाची आवड भक्तांच्या मनात नेहमीच असते अर्जुनाने अगदी बाळुबोलीस येऊन व भगवंतास विनंती केली आहे की, 'हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आता होतात आधले । कृष्णमूर्तीलागी ॥ ते साकार कृष्णरूपडे । वाचूनि पाहो नावडे । तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवाचूनि मान नाहीं । म्हणोनि तैसाचि साकारू होई । हे सावरो आता ।'

याही ठिकाणी ज्ञानेश्वरांनी या सगुण व साकार मूर्तीपुढे आम्हास मोक्षाचीही काही किंमत नाही, असे सांगितले आहे सगुणभक्तीपुढे, ईश्वरस्मरणापुढे, भजनापुढे, संतसंगतीपुढे संतांना मोक्ष तुच्छ वाटतो ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या थोर संतांनी मुक्तीची अथवा मोक्षाची कधीही चिंता केलेली नाही उलट भक्ति- सुखावाचून मोक्ष असला तर तो कटाक्षाने दूर सारला आहे 'सांडुनि पंढरीची वारी । मोक्ष मागती ते भिकारी ।' 'मुक्ति मुक्ति मागो तुज । तरी मज हासती पूर्वज ।', 'मुक्तिपद मी या अभिलाषीन चित्तीं । क्षणी अंतरेतो बाप तुम्हे ', 'कर जोडूनि दोन्ही मोक्ष पाहे वाट । म्हणे होईन दास हरिदासाचा ।' यासारख्या नामदेवांच्या वचनातून मुक्तीऐवजी थोर भक्त भक्तीतच कसा सुखावलेला असतो, हे ध्यानात येईल सर्व संतांची साक्ष याच पद्धतीची आहे 'सांडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ती मागसी अधमा ।', 'न मांगो मुक्ति आणि 'मुक्ति । ती फजीती कोण सोसी' 'मुक्तिपद देता न घे फुकासाठीं । तैं हिंडे पाळुवटीं दोन रूप' 'मोक्ष मुक्तिंतें देवा । नव्हे गोड तया ठावा' यासारख्या वचनामधून एकनाथांनी मुक्तीपेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केलेले आहे तुकारामबुवांनी तर मोक्षाच्या तुच्छतेचा आपल्या अभंगातून वर्षावच केला आहे 'मोक्षपदें तुच्छ केलीं या कारणे । आम्हा जन्म घेणें युगायुगीं ।', 'देवा ऐक हे विनंति । मज नको रे हे मुक्ती', 'मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ।', 'नलगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेता जन्म ऐसे ', 'नाहीं चाड मोक्षपदीं, भजनौ आवडीं ।' यासारख्या अनेक चरणातून मोक्षसुखाऐवजी सगुण रूपाच्या भक्तीचे व संतसंगाचे महिमान तुकोबांनी वर्णन केले आहे

१०२३ मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥ १ ॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ २ ॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागर उपमन्या ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ४५९ गजेंद्रपशु नाडियें¹ जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥ ४ ॥ प्रल्हाद अग्नीत राखिला जळात² । विषाचे अमृत तुझ्या नामें ॥ ५ ॥ पाडवा सकट पडता जडभारी । त्याचा तूं कैवारी नारायणा ॥ ६ ॥ तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनिया मात शरण आलो ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - दीनानाथ-गरिबाचा नाथ, अजामेळ-कान्यकुब्ज देशातील दुराचारी ब्राह्मण, गणिका- वेश्या, पिंगला, भिल्ली-शबरी, धुरु-ध्रुव, उपमन्यू-व्याघ्रपादाचा मुलगा, गजेंद्रपशु-गजेन्द्र हत्ती, नाडियें-दस्त केले, जळचरें-मगरीने, जडभारी-मोठे संकट, मात-कीर्ती अर्थ - देवा, यापूर्वी तुम्ही पुष्कळ पातकी लोकांचा उद्धार केलेला आहे म्हणूनच तू दीनाचा, गरिबाचा नाथ आहेस ना ? १ त्यावेळी तुम्ही कुणाचाही अपराध पाहिले नाहीत, की कुणाची जात कोणती आहे ? कूळ कोणते आहे ? हेही पाहिले नाही अजामेळ, गणिका, भिल्लीण यासारखे हीन व पातकीही तू तारलेस २ त्या ध्रुव बालकास तू ध्रुवस्थानाच्या अढळ पदावर बसविलेस त्या उपमन्यू बालकास दुधाचा समुद्र मिळवून दिलास. ३ गजेन्द्र नावाच्या हत्तीस पाण्यातील एका मकराने पकडले तेव्हा, त्याला या संकटातून तूच ना राखलेस ? त्याचे तूच ना रक्षण केलेस ? ४ प्रल्हादासारख्या विष्णुभक्तास त्याच्या पित्याने अग्निकुंडात टाकले, तेव्हा त्याचे रक्षण तूच देवा केलेस त्याचे पाण्यापासूनही रक्षण केलेस त्याच्या मुखात जाणाऱ्या विषाचे अमृत देवा, केवळ तुझ्याच नामामुळे झाले, हे खरे ना ? ५ त्या पांडवाना त्याच्या आयुष्यात मोठमोठी संकटे थोडी का आली ? पण नारायणा, त्याचा कैवार घेऊन तूच त्यांना वाचवीत होतास तूच त्याचे अनेक प्रसंगी रक्षण केलेस ६ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू अशा प्रकारे अनाथाचा नाथ आहेस अशी ही तुझी कीर्ती ऐकून मी तुला शरण आलो आहे ७ विवरण -आपणास ईश्वराने तारावे, आपणावर कृपा करावी, म्हणून थोर भक्त मागचे दाखले देत असतात याही अभंगात तुकोबांनी अजामेळ, गणिका, ध्रुव, उपमन्यू गजेन्द्र प्रल्हाद, पांडव इत्यादीची उदाहरणे नेहमीप्रमाणे दिलेली आहेत मागे अभंग क्र २५७, ३७२, ४२७ इत्यादीमधून वरील अभंगातील काही कथांचे संदर्भ आलेले असल्यामुळे त्या त्या ठिकाणचे अर्थ व विवरण पाहावे येथे फक्त ध्रुवाची कथा व गजेन्द्रमोक्षाची कथा याचा संदर्भ थोडक्यात पाहू ध्रुव हा उत्तानपाद राजाचा सुनीती नावाच्या पत्नीपासून झालेला मुलगा, हा मोठा भगवद्भक्त होऊन गेला एकदा याच्या सावत्र आईने, सुरुचीने, सवतीमत्सराने ध्रुवास उत्तानपादाच्या मांडीवरून खाली ओढले, कठोर शब्दांचे भाषणही तिने केले विषण्ण ध्रुव रडत रडत आपल्या आईजवळ गेला आपल्यावर ईश्वराची कृपा नाही म्हणूनच आपणास हे दुःख भोगावे लागले, असे त्यास आईने सांगितल्यावर ध्रुव ईश्वरप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी रानावनात निघून गेला तेथे नारदानी त्याला 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र दिला या मंत्राच्या शास्त्राने बालध्रुवाने तपश्चर्या केल्यावर ईश्वर प्रसन्न झाले व त्यांनी त्याची भक्ती पाहून त्याला अढळपद दिले, अशी पुराणातून कथा आहे तुकाराम महाराजांनी मोठ्या कौशल्याने 'अढळपदीं बाळ बैसविला धुरु' असा सार्थ उल्लेख केला आहे भगवंताने गजेंद्राचे रक्षण कसे केले, याविषयीही कथा पुराणातून सापडते अगस्त्य मुनीच्या शापाने इंद्रद्युम्न नावाचा एक राजा हत्तीच्या जन्मास जाऊन त्रिकूट गिरीवर निवास करीत होता तहानेने व्याकूळ झालेला असताना एकदा हा सरोवरात पाणी पिण्यासाठी व जलक्रीडेसाठी गेला असताना, त्याचा पाय पाण्यातील एका मगरीने धरला हा मगर अथवा नक्र हा पूर्वजन्मीचा गंधर्व असून देवलमुनीच्या शापाने या नक्राच्या जन्मास आला होता गजेन्द्र संकटात सापडताच त्याचे आप्तस्वकीय सर्व त्यास सोडून गेले मकराची मिठी तीव्र होत होती अशा संकटप्रसंगी गजेंद्राने भगवंताची स्तुती केली व त्यानंतर श्रीहरीने येऊन स्वतःच्या सुदर्शन चक्राने नक्रास मारून गजेन्द्राचे रक्षण केले ईश्वराच्या कृपेने पुढे गजेन्द्र व नक्र असे दोघेही वैकुंठाला गेले असल्याची कथा आहे तुकाराम महाराजांनीसुद्धा या गजेन्द्रकथेचे अनेक उल्लेख आपल्या अभंगातून केलेले आहेत 'गजेन्द्र तो हस्ती सहस्रन वरुपें । पल्लवामाजि नक्रें १ नाडिला, २ जळात

४६० सार्थ तुकारामगाथा पीडिलासे' (अभंग क्र ३०८७) व 'राजेंद्र पशू आर्ते मोकलीला । तो तुज स्मरला पाडुरंग (अभंग क्र २४५५) असे दोन स्वतंत्र अभंगच बुवानी गजेन्द्राच्या चरित्रकथेवर लिहिलेले आहेत १०२४ तुझा शरणागत जालो मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥ १ ॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आता साभाळी मायबापा ॥ २ ॥ अनाथाचा नाथ बोलतील सत । ऐकोनिया मात विश्वासलो ॥ ३ ॥ न करावी निरास न धरावें उदास । देईं याचकास कृपादान ॥ ४ ॥ तुका म्हणे मी तो पातकाची रासी । देईं पायापाशीं ठाव देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - अंकित-स्वाधीन, मात-गोष्ट, निरास-निराशा अर्थ - देवा, मी तुझ्या स्वाधीन झालेलो असून तुलाच शरण आलेलो आहे पांडुरंगा, माझे काही तरी हित तुम्ही करावे असे वाटते १ दया, तुझी पतिताना पावन करण्याची जी कीर्ती आहे, ती तू आता मोठेपणे सांभाळावीस २ हे सर्व संत तुला तू अनाथाचा नाथ आहेस असे बोलतात, त्याची ही गोष्ट मोठ्या विश्वासाने मी हृदयाशी धारण केली आहे ३ देवा, माझी निराशा तुम्ही कधी करू नये माझ्यासबंधी तुम्ही उदासही राहू नये या याचकास तू कृपेचे दान द्यावेस देवा ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर पातकाची रास आहे परंतु तू तुझे ब्रीद ध्यानात घेऊन मला आपल्या पायापाशी आश्रय द्यावास ५ १०२५ सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥ १ ॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसे ॥ २ ॥ घडे ज्या उपकार भूतांची ते दया । आत्मस्थिति तया अंगीं वसे ॥ ३ ॥ नो' बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनि तो जनीं जनार्दन ॥ ४ ॥ तुका म्हणे वर्म जानितल्याविण । पावे करिता सीण सांडीमाडी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - सत्यवादी-खर बोलणारा, सांडीमाडी-सोडणे, धरण अर्थ - ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे, तो नेहमीच सोवळा असतो अग्नी ज्याप्रमाणे कोणत्याही विटा- ळाने दूषित होत नाही, तसा तो असतो १ खरे बोलणारा संसार करीत असला तरी, तो पाण्यातील कमळाप्रमाणे पाण्यात राहूनही, संसारात राहूनही आसक्त असत नाही २ ज्यांना भूतमात्राची दया येते व ज्याच्या हातून त्याच्यावर उपकार होतो, त्याच्या अंगी आत्मस्थितीचा भाव निर्माण झालेला असतो असे समजावे ३ जो दुसऱ्याचे गुणदोष बोलत नाही कानानेही ऐकत नाही, तो जगात वावरत असूनही जनार्दनाप्रमाणेच असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थाचे नीट वर्म जाणून घेतले नाही तर, उगाचच काही धारण करणे, काहीचा त्याग करणे याचा शीण मात्र व्यर्थ होतो ५ १०२६ कुळधर्म ज्ञान कुळकर्म साधन । कुळधर्मे निधान हातीं चढे ॥ १ ॥ कुळधर्मे भक्ति कुळधर्मे गति । कुळधर्मे विश्रांति पाविजेल ॥ २ ॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्मे सार साधनाचे ॥ ३ ॥ कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्मे पावन परलोकींचि ॥ ४ ॥ तुका म्हणे कुळधर्म दावी देवीं देव । ययाविध भाव जरीं होय ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - निधान-ठेवा अर्थ - आपण ज्या कुळात जन्मास आलो आहोत, त्याच कुळधर्माचे ज्ञान करुन घ्यावे व ह्याचेच साधन करावे. त्यामुळेच आपल्या हातात श्रीहरीच्या कृपेचा ठेवा प्राप्त होईल १ कुळधर्माप्रमाणे वागणे हीच भक्ती व १ ना

सार्थ तुकारामगाथा ४६१ हीच गती होय. कुळधर्माच्या योगानेच उत्तम प्रकारची विश्रांती आपल्या मनास मिळत राहील. २ दुसऱ्यावर दया करण्याचाच आपला कुळधर्म आपण पाळावा. उपकार करणे, हाही एक कुळधर्मच आहे. सर्व साधनांचे सार म्हणजे आपल्या कुळाचा धर्म होय. ३ कुळधर्म चांगल्या रीतीने पाळल्यामुळेच मानसन्मान होतो, महत्त्व प्राप्त होते. कुळ- धर्मामुळेच आचरण पवित्र होऊन परलोकाची उत्तम गती प्राप्त होते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा जसा भाव असेल, तशा प्रकारच्या कुळधर्माची प्राप्ती आपणास आपला देव अथवा देवी करून देतील. ५ १०२७ पुण्य परउपकार पाप ते परपोडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥ १ ॥ सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हैं वर्म नाहीं दुजें ॥ २ ॥ गति तेचि मुखीं नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥ ३ ॥ संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥ ४ ॥ तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - परउपकार-दुसऱ्यावर उपकार, परपोडा-दुसऱ्यास दुख, जोडा-तुलना, अनर्गळा- स्वच्छंदी अर्थ - दुसऱ्यावर उपकार करणे हेच श्रेष्ठ प्रकारचे पुण्य होय व दुसऱ्यास त्रास देणे हे खरे पाप आहे. याशिवाय दुसरे पापपुण्य कोणतेही नाही १ सत्याने वागणे, हाच खरा धर्म असून असत्याने वागण्याने पापफर्म मात्र वाढते याखेरोज धर्माचे वर्म दुसरे नाही. २ मुखामध्ये एकसारखे प्रभूचे नाम असणे, हीच एक गती होय पण यापासून विन्मुख असणे हीच अधोगती होय. ३ साधुसंतांची संगत हा एक प्रकारचा स्वर्गवास असून सत्सगती- विषयी उदास असणे, यास स्वच्छंदी व उदासवाणा नर्क समजावा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हित आणि अहित कशात आहे, यासंबंधी स्पष्टता आहे. जे जसे उचित असेल तसे तुम्ही करा. ५ विवरण.-पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, याचा मार्मिक निवाडा तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलेला आहे दुसऱ्याचे दुख जाणून त्यावर उपकार करणे, हे पुण्य व दुसऱ्यास विनाकारण पीडा देणे, त्रास देणे, हे पाप अशी साधी, सोपी व सुटसुटीत व्याख्या तुकारामबुवांनी येथे केली आहे ती भागवतधर्माच्या परंपरेस धरून अशीच आहे जे रंजले गांजले असतील, जे पीडित आहेत, वचित आहेत, त्यांचे दुख दूर करणे, हा साधुसंतांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे जगातील पापताप दूर करावेत, खळांची बुद्धी वाईट असते ती चांगली व्हावी, सबंध विश्व धर्मप्रकाशाने धवलित व्हावे, हे खरे म्हणजे संतांचे कार्य 'तंसी बाधिलीं सोडीत । बुडालीं काढीत । साकडीं फोडित । आर्तीचिया।' आर्तांची दुःखे फेडणे व बुडणाऱ्यास वर काढणे हेच खरे म्हणजे संतांचे जोवितकार्य पाचसाठी परउपकार व परपीडा याचा उल्लेख संत करीत असतात दुसऱ्यास पीडा न देण्याचे कारण केवळ त्यांच्या पोटी कळवळा असतो, किंवा सहानुभूती असते, हेच नसून सर्वत्र पसरून राहिलेल्या आत्मतत्त्वाची जाणीव त्यांना फार मोठ्या प्रमाणावर असल्याने 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर ' असे त्यांना मनापासून वाटत असते १०२८ न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां यांयां न वजे ॥ १ ॥ न वजे यायां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ २ ॥ न वजे वांयां कांहीं केल्या तीर्थ । अथवा का व्रत वायां न वजे ॥ ३ ॥ न वज वांयां जाले संतांचे दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥ ४ ॥ तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करिता वांयां न वजे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- न वजे-जाणार नाही.

४६२ सार्थ तुकारामगाथा अर्थ - श्रीहरीची कथा आपण स्वतः वाचली किंवा दुसऱ्याकडून ऐकली, तर ती काही वाया जाणार नाही १ देवळात जाऊन देवाचे दर्शन जर घेतले तर, ते काही वाया नाही जायचे देवाची पूजा केली तर, ती वाया जाणार नाही २ एखाद्या तीर्थयात्रेस जाता आले अथवा एखाद्या व्रताचे आचरण करता आले तर, ते काही वाया जाणार नाही ३ साधुसंतांचे दर्शन झाल्यास काही वाया जाणार नाही आचरण जर शुद्ध असेल तर तेही वाया जाणार नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, मनात श्रेष्ठ प्रकारचा भाव असो नसो, चांगल्या कामाचे श्रम कधी वाया जाणारे नसतात झालाच तर त्याच्यापासून फायदाच होत असतो ५ १०२९ चित्तीं धरीन मी पाऊले सुकुमार । सकळ बिढार संपत्तीचे ॥ १ ॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ २ ॥ पाहेन श्रीमुख साजिरे सुंदर । सकळा अगर लावण्याचा ॥ ३ ॥ करिन अगलग बाळकाचे परी । बैसेन तो वरी नुतरों कडिये ॥ ४ ॥ तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मने सोय विठोबाची ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - बिढार-बिऱ्हाड आश्रयाचे स्थान, वल्ली-वेल तनु-शरीर अगर-खाण, नुतरी- उतरणार नाही, कटिये-कडेवरून अर्थ - या देवाची ही सुकुमार पावले मी माझ्या हृदयाशी धारण करीन कारण सर्व प्रकारच्या संपत्तीचे हेच एक आश्रयस्थान आहे १ अमृताची वेल असणारे या श्रीहरीचे नाम हेच मी माझ्या मुखात सतत धारण करीन त्यामुळे त्रिविध तापानी संतप्त झालेला माझा देह हा अतिशय शीतल होईल २ सर्व प्रकारच्या सौंदर्याची खाणच असलेले असे हे या श्रीहरीचे सुंदर व शोभिवंत मुख मी पाहात राहीन ३ या देवाच्या अंगाशी लडिवाळ पणा एखाद्या बालकाप्रमाणे मी धरीन मी कौतुकाने त्याच्या कडेवर जाऊन बसेन तो परत खाली उतरणारच नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी आपण ज्या भावाने जो भजतो, त्या भावाने तो आश्रयास येतो म्हणून तर याची सवय माझ्या मनाने धरलेली आहे ५ १०३० बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचे दुःख काय जाणे ॥ १ ॥ तयापरी करीं पाळण हे माझें । घेउनिया ओझें सकळ भार ॥ २ ॥ कासया गुणदोष आणिसिल मना । सर्व नारायणा अपराधी ॥ ३ ॥ सेवाहीन दीन पातकाची राशी । आता विचारिसी काय ऐसें ॥ ४ ॥ जेणे काळें पायीं अनुसरले चित्त । निर्धार हे हित जाले ऐसे ॥ ५ ॥ तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता । माझी काहीं चिंता असो दे वो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कासया-काय म्हणून अर्थ - देवा एखादे बालक आपल्या मातेस आपली तहानभूक सांगत असते त्यावर उपाय काय करायचा हे काही ते कधी जाणत नाही त्याचे काम फक्त आईस भूक, गरज सांगणे हेच होय १ त्याप्रमाणे देवा, तुम्ही माझे पालनपोषण करावे माझा सर्व भार आता देवा तुम्हीच घ्यावा २ नारायणा, माझे गुणदोष आता तू मनात तरी का आणतोस रे? मी अपराधाची रासच आहे असे समज ना रे ३ मला तुझी सेवा नीट घडलेली नाही मी दीन आहे, पातकी आहे आता काय काय माझ्यात दोष नाहीत म्हणून विचारतोस? सर्व काही आहेत असेच समज ४ ज्या काळात माझे चित्त तुझ्या पायाशी स्थिर झाले, त्याच वेळी मी मानले की, माझे हितच होणार ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही पुष्कळजणांचे रक्षण केले आहे त्यात माझी थोडी तरी चिंता तुम्हास असावी ६

सार्थ तुकारामगाथा ४६३ विवरण - भक्तिभावातील वात्सल्याच्या दृष्टीने तुकाराम महाराजांचा हा 'एक अतिशय प्रसिद्ध व थोर अनुभूतीचा अभंग आह बाळाने आपणास लागलेली तहान भूक बाईस सांगावी फक्त त्याला पुढल्या उपायाचे चिंतन करण्याचे काय कारण आहे ? आईच त सर्व पाहणार नाही का? खरे म्हणजे मुलास लागलेली भूक आईसच समजते आधी कारण तिचे त्याकडेच सारखे लक्ष असते तुकाराम महाराज म्हणतात, या आईच्या वात्सल्याने परमेश्वराने आपले पालन करावे ईश्वरास, विठ्ठलास आई म्हणून सबोधण्याची रीत फार पूर्वीपासून साधुसतांनी सुरू केलेली आहे बाप, बधू, पत्नी इत्यादी नात्वात थोडासा दूरत्वाचा अश उरतो पण आईचे नाते असे आहे की, त्यात उभयताना कसलाच सकोच धरणे आवश्यक नसते सहजसुलभ असा हा निर्व्याज प्रेमाचा आविष्कार असतो आईवर रागवावे, रुसावे, तिच्याशी भाडावे, तिच्या मांडीवर बसावे, तिच्याजवळ हट्ट करावा, तिचा पदर धरावा, हे सब लडिवाळ प्रकार फक्त आईच्याच नात्यात सभवतात, म्हणून तुकारामबुवासारख्या थोर भक्ताने विठ्ठलास आई म्हटले आहे माउली म्हणूनच तिची आळवणी केली आहे पंढरपूरच्या सप्रदायात याच वात्सल्याच्या भावनेने सर्वत्र विठ्ठलाची उपासना चालू आहे विठ्ठल आपली आई व आपण त्याचे लाडके, हट्टी, चुवणारे एक मूल या वात्सल्यभादावरील तुकोबांचे अनेक अभग आर्ततेने चित्त झालेले बाहूत भक्तीच्या सहजभाव्य अशा आविष्कारांत डोळ्यात अश्रू येणे, ऊर भरून येणे, अष्टसात्त्विक भाव जागृत होणे व हृदय द्रवून जाणे, विरघळून जाणे, याचा अनुभव तुकाराम महाराजांच्या या भावावरील निश्चयाने येतो ससारतापाने त्रस्त झालेल्या, रोजच्या व्यवसायातील चिंतांनी खगलेल्या, मानसिक चिंतानी ग्रस्त झालेल्या माणसांस तुकाबांचे हे अभग म्हणजे एक प्रकारचे श्रेष्ठ वरदानच होय व्यावहारिक क्षेत्रातील विविध तापाचा उन्हाळा तुकोबांच्या या प्रकारच्या अभगांच्या सान्निध्यात सहज सुखद असा वाटावा तुकोबांच्या या अमृतमधुर व चद्रिवेप्रमाणे शीतल असणाऱ्या वचनांचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यायासारखा आहे ज्या तुकोबांनी हा श्रेष्ठ अनुभव भोगला त फारच श्रेष्ठ, पण ज्याच्या कानावर तो अभंगहपांनी पडला व ज्याचे चित्त शात झाले, तेही तितकेच धन्य मानावयास हवेत ससारग्रस्त व तापत्रयाने भयभीत झालेल्या माणसाने डोळे मिटावत, श्रीविठ्ठलाचे रूप डोळ्यापुढे आणावे आणि मुखाने उच्चार करावा, 'माये मोकलिले कोठें जाये बाळें ? ', 'मायबापापुढें लाडिके लेकरू । तैंसे बोल करू कवतिके ', 'घेई उचलोनि पुसे तानभूक । पुसी मार्ते मुख पीतांबरें ', 'कोण आम्हा पुसे सिजलें भागले । तुजविण उगले पाडुरगा ?' 'वेडें वाकुडें बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ', 'तू माउलीहून मायाळ । चद्राहूनी शीतल । पाण्याहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा, 'नलगे मापेंसी बाळ निरवावे । आपल्या स्वभावे ओडे त्यासी ', 'विठ्ठल माझी माय । आम्हा सुखा उणे काय ' अशा सारख्या शेकडो वचनाचा उच्चार मुखातून होत असताना अत करण द्रवून येईल शीतल होईल अपार अस प्रभुप्रेमाचे सुख अनुभवास येईल तुकारामबुवांनी जे भोगले ते थोड्या अशान का होईना पण प्रतीतीस येईल १०३१ जीवनावाचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥ १ ॥ न सपडे जाले भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ २ ॥ मातेचा वियोग जालिया हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥ ३ ॥ सागावे ते किती तुम्हासी प्रकार । सकळाचे सार पाप दार्बी ॥ ४ ॥ येचि चिंते माझा करपला भीतर । का नेणो विसर पडिला माझा ॥ ५ ॥ तुका म्हणे तू हे जाणसी सकळ । यावरि कृपाळ होई देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - जीवनावाचूनि-पाण्याशिवाय, न सापडे-सापडत नाही, भीतर-मनाचा गाभा अर्थ - पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो तसा देवा, तुझ्यावाचून माझा जीव तळमळत आहे हो १ भूमीमध्ये दडलेले धन सापडत नसले म्हणजे जसे लोभी माणसाचे मन तडफडते, तशीच अवस्था माझ्या मनाची झालेली आहे २ आईचा वियोग झालेल्या मुलाचे भन जसे कासावीस होते, तोच कळवळा माझ्या पोटात

४६४ सार्थ तुकारामगाथा देवा, तुमच्यासाठीं आहे हें नीट जाणावे तुम्ही. ३ देवा, आणखी माझ्या मनाची ही अवस्था तुम्हांस किती प्रका- रांनी सांगावी हो ? सर्व प्रकारांचे सार हेच कीं, तुम्ही तुमच्या पायांचे दर्शन मला लौकर द्यावे. ४ तू मला भेट देशील न देशील, याच चिंतेने माझ्या मनाचा गाभा करपून गेला आहे. देवा, माझा तुला एवढा विसर कां पडला आहे हेंच मला समजत नाहीं. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हे तू सर्व जाणीत कां नाहींस ? सर्व काही तू जाणून आहेस. तरी देवा तू मजवर कृपा कर मा एकदा. ६ १०३२ शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥ १ ॥ आळविती त्यांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ २ ॥ गांजलियांचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥ ३ ॥ भागलियाचा होईं रे विसांवा । परिसावी केशवा १ विज्ञापना ॥ ४ ॥ अंकिताचा भार वागवावा मायां । परिसावी अनंता विज्ञापना ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - विज्ञापना-विनंती, परिसा-ऐका, धांवणे-रक्षण, अंकिताचा-स्वाधीन असलेल्याचा. अर्थ :- देवा, जे शरण आलेले तुझे भक्त आहेत, त्यांना तू पाठ न दाखविता, त्यांच्यावर कृपाच करावीस अशी हे जगजेठी, तुला नम्र विनंती आहे. १ जे मनोभावे तुझी आळवणी करतात, त्यांना स्वीकृतीचे, कृपाप्रसादाचे उत्तर झटकन देऊन तू त्यांना तृप्त करावेस अशी विनंती आहे देवा. २ देवा, जे रंजलेले, गांजलेले, त्रासलेले आहेत, त्याचे तू रक्षण करावेस, नारायणा, ही माझी विनंती तुम्ही ऐकावी. ३ जे दमलेले आहेत, भागलेले आहेत, त्यांचा देवा, तू विसावा व्हावास. त्यांच्या विश्रांतीचे स्थान व्हावेस, केशवा, ही माझी विनंती तू ऐक ना. ४ जे तुझ्या स्वाधीन झाले आहेत, त्यांच्या रक्षणाचा भार देवा, तूच तुझ्या मस्तकावर घ्यावयास हवा. ही ही माझी विनंती अनंता, तू ऐकावीस. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता आम्हांस तुम्ही बिल्कुल विसरून जाऊ नये. देवा, ही एक विनंती माझी तुम्ही ऐका ना. ६ १०३३ कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥ १ ॥ कोणापाशीं आम्हीं सांगावें २ सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ २ ॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार ३ कोण दुजा ॥ ३ ॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥ ४ ॥ कोणावरी आम्हीं करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥ ५ ॥ तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पुसे-विचारील, सिणले भागलें-दमलेले, त्रासलेले, उगलें-उगाच, आपोआप, पार- (भार)-ओझे, भातुके-खाऊ. अर्थ :- देवा, आम्ही दमलेले आहोत, शिणलेले आहोत, त्रासलेले आहोत; अशा वेळी पांडुरंगा, तुझ्या- शिवाय उगाच आमची चौकशी प्रेमाने दुसरे कोण रे करणार आहे ? १ देवा, आम्ही आमच्या मनाचे सुखदुःख कुणापाशी सांगावे रे ? कोण माझी तहानभूक निवारण करील ? २ मला हा जो त्रिविध ताप झालेला आहे, तो तुझ्याशिवाय कोण रे दूर करील ? माझ्या मनावरचे हे ओझे कोण दूर करणार आहे ? ३ देवा, माझ्या इच्छेस येईल तो खाऊ मी कुणाजवळ रे मागावा ? आणि असा हट्ट घेतल्यावर कौतुकाने, प्रीतीने माझी समजूत तरी देवा, तुझ्याशिवाय दुसरे कोण काढणार आहे रे ? ४ आम्ही प्रेमाने, हक्काने कुणावर रे सत्ता करावी ? आमचा हा त्रास सहन करणारा कोण दुसरा आहे ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, तूच माझा स्वामी असल्यामुळे तूच सर्व कांहीं जाणणार आहेस, असे मी मानतो. नारायणा, तुमच्या चरणांवर माझे दंडवत असो. ६ १ देो, २ सांगो, ३ भार.

सार्थ तुकारामगाथा ४६५ विवरण — या व या वरील दोन तीन अभंगातील तुकारामबुवांच्या मनाची वर्तता सहज ध्यानात येण्या- सारखी आहे वात्सल्य व सख्य या दोन भावानी महाराजांचे चित्त द्रवून गेलेले असल्यामुळे या अभंगातून उच्च भूमिकेवरचे भाव सोप्या सोप्या शब्दात सहज रीतीने व्यक्त झाले आहेत ईश्वराशी किती लडिवाळ असावे, त्याच्याशी किती जवळीक साधावी, किती कौतुकाने त्याच्याशी लगट करावी, किती प्रेमाने त्याच्याशी नाते जडवावे, यासवंधीची उत्तम साक्ष या अभंगात आहे. आपला शीण कुणी तरी जाणावा, कुणी तरी आपल्या तहानभूकेची चौकशी करावी, कुणीतरी कौतुकाने आपली समजूत काढावी, अशी जी आपली इच्छा असते, ती पुरविणारा हा एक समर्थ श्रीविठ्ठलच असल्यावर मग त्या सुखाचे वर्णन अवीट व्हावे यात नवल ते काय ? १०३४ तेव्हां धाले पोट बैसलों पंगती । आता आम्हा मुक्तिपांग काई ॥ १ ॥ धांवा केला आता येई वो' धांवोन । येथें काई करणे न लगे संदेह ॥ २ ॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आले ॥ ३ ॥ देवाच्या सख्यत्वे विषमासी ठाव । मध्यें कोठें घाव राहो सके ॥ ४ ॥ तेव्हां जाली अवघी बाधा वातावरत । प्रेम हृदयांत प्रवेशले ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हीं जितिले भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- धाले-सतुष्ट झालो, मुक्तिपाग-मुक्तीची इच्छा, विषमासी-सकटास, ठाव-जागा अर्थ - जेव्हा मी देवाबरोबर त्याच्या पंगतीसच बसलो, तेव्हा माझे पोट भरून आल्यामुळे मी सतुष्ट झालो आता आम्हास मुक्तीची इच्छा कुठून असणार २ १ आता त्याचा धावा करताच तो धावून येईल; या विषयी मनात संशयच नको. २ आता त्याचे गायन करून गुणवर्णन करण्याचीही वेळ राहिलेली नाही, सर्वच त्याच्या प्रेमानंदाने भरून गेले आहे ३ देवाच्या मैत्रीमध्ये विषम भावनेस किंवा सकटाना स्थान कुठून असणार ? कारण मध्ये कुठे रिकामी जागा असतच नाही ४ या श्रीहरीचे प्रेम जेव्हा माझ्या हृदयात प्रवेश करू लागले, तेव्हा सर्व कामादिक शत्रूची वाताहत झाली दुर्वसिनाचा घात झाला ५ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवास खात्रीने जिंकले आहे, असा विश्वास मला आहे. कारण आपल्या दासास देव कधी सोडून देईल की काय ? ६ १०३५ तरि का पवाडे गर्जती पुराणे । असता नारायण शक्तिहीन ॥ १ ॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरा वाणीत ना ॥ २ ॥ तरिच म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखी गुण ॥ ३ ॥ चांगलेपण हें निरुपमता' अंगी । बाणले श्रीरंगीं म्हणऊनि ॥ ४ ॥ तरिच हा थोर सागितले करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥ ५ ॥ तुका म्हणे तरि करितो याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - निरुपमता - उपमा नसलेला, हेवा-हाव, कुडें-वाईट अर्थ - जर खरोखरच हा नारायण दुर्वल असता, तर त्याची एवढी कीर्ती पुराणांनी गर्जून का सांगितली असती ? १ याची कीर्ती असल्याखेरीज का नामाच्या महात्म्याचा डांगोरा सर्वत्र पिटून राहिला आहे ? याशिवाय मानाने व कीर्तीने एकमेकाची स्तुती केलीच असती २ देवा, तुम्ही या जीवास जर सुखी केलेत, तरच तो चिरजीव आहे असे म्हणता येईल ३ या श्रीहरीच्या अग्री चागूलपणा हा इतका आहे की, त्यास उपमा नाही या श्रीरगाच्या अंगी हा चागूलपणा पूर्णपणे बाणलेला आहे ४ या श्रीहरीपाशी कसलाच अभिमान नसल्यामुळेच तो थोर असल्याचे सागितले जाते ५ तुकाराम महाराज म्हणतात, या देवापाशी कधी कुणाची वाईट हाव नसते म्हणूनच सर्व लोक त्याची सेवा करतात ६ १ होईल धावणे । तया काई करणे लागे संदेह, २ निरुपायत तु गाया ५९

१०३६ अविट हे क्षीर हरिकथा माउली । सेविली' सेविली वैष्णवजनीं ॥ १ ॥ अमृत राहिलें लाजोनि माघारे । येणे रसे थोरें ब्रह्मानंदें ॥ २ ॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवांऐसें ॥ ३ ॥ सर्व सुखें तया मोहरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥ ४ ॥ निर्गुण² हे सोंग धरिलें गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥ ५ ॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होउनि ठेला ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अविट-कंटाळा न येणारे, क्षीर-दूध गाळणी-वगळून, अर्थ - या हरिकथामाउलीचे दूध अतिशय अविट आहे त्याचा कधीही कंटाळा येत नाही याचे सेवन आजपर्यंत अनेक वैष्णवांनी केलेले आहे १ या हरिकथेपुढे प्रत्यक्ष अमृतही लाजून माघारे फिरते या हरिकथेच्या रसाने फार थोर प्रकारचा ब्रह्मानंद झालेला असतो २ जे कोणी पतित, पातकी आहेत, ते संतांच्या पवित्र पंगतीत या हरिकथेच्या प्रसंगी बसून पावन होतात या कथामृतान तेही देवाप्रमाणेच चतुर्भुज होऊन जातात ३ ज्या ठिकाणी या कथेच्या निमित्ताने वैष्णवांची गर्दी होते तेथे सर्व प्रकारची सुखे मोहरली जातात, अंकुरतात ४ या निर्गुण श्रीहरीने या कथारसाच्या वेळेस गुणवान असे रूप धारण केले असून तो मोठ्या प्रीतीने स्वतःच नृत्य करू लागतो, गाऊ लागतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनांना वगळून, चाळणी करून, निवडून मी हे हरिकथेचे साधन अतिशय सुलभ असे निश्चित केले आहे याच सुखात मी तृप्त झालो आहे ६ विवरण -हरिकथा किंवा कीर्तनभक्ती हे एक सर्वोत्तम साधन ईश्वरप्राप्तीचे म्हणून साधुसंतांनी मानले आहे या हरिकथामाउलीची थोरवी तुकोबांनी या अभंगात गाइली आहे तिच्यापुढे अमृत लाजून दूर सरते, पतित लोक पावन होऊन जातात, निर्गुण असणारा भगवंत तिच्याच नादात सगुणसुंदर होऊन या कीर्तनाच्या जागी येऊन उभा असतो, वगैरे वर्णन मागील संतपरंपरेस धरूनच आहे हरिकथा या कीर्तन हे सर्वांना आवडणारे व सुलभ असे साधन आहे गायन, नृत्य, वाद्य यांच्या आविष्कारास यात भरपूर वाव असल्यामुळे बहुजनांसही याची प्रीती विशेष असते शिवाय कथात्मक निरूपणामुळे मनोरंजनाबरोबर परमेश्वराचे गुणगान केल्याचाही श्रेय हाती येते नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार मानले जातात मुभाचा वरगोठा व रकंटयाची लंगोटी लावून ते वाळवंटात पंढरपुरात कीर्तन करीत असत सगुण प्रीतीचा व कीर्तनभक्तीचा एक थोर आदर्श म्हणजे नामदेवराय होत ' नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं' अशीच त्यांची प्रतिज्ञा होती, या कीर्तनात प्रत्यक्ष देव सगुणसुंदर रूपात हजर असतो अशी श्रद्धा तर सर्वच संतांनी व्यक्त केली आहे ' कीर्तनाचे सुखें सुखी होतो देव' या नामदेवाच्या वचनात स्वतः भगवंतास कीर्तनाची आवड किती आहे हे स्पष्ट केले आहे ' कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा । नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसे', 'देवांसी तो मुख्य कीर्तनाची गोडी । म्हणोनिया उडी घाली स्वयें', 'कीर्तने तोष्ये अधोक्षज । राखी लाज भक्तांची', 'कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी' इत्यादी शेकडो वचनांतून एकनाथांनी कीर्तनाचा व देवाच्या आवडीचा संबंध स्पष्ट केलेला आहे ज्ञानेश्वर नामदेवापासून तुकाराम-रामदासांपर्यंत सर्वच श्रेष्ठ साधुसंत हे स्वतः थोर दर्जाचे कीर्तनकारही होते त्यामुळे कीर्तनाचे सुख त्यांना स्वानुभवाने पटलेले होते कीर्तनसुखाची चटक त्या प्रभूलाही कशी असते, याचे वर्णन तुकोबांनीही पुनः पुनः केले आहे ' कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव सगी आहे', 'न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटीं । जय तेथें दाटो । वैष्णवांची धावोनि', 'हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासाची' इत्यादी वचनांतून प्रत्यक्ष ईश्वरासही या कीर्तनाने किती सुख होते, याचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे या कीर्तनाचा आणखी एक लाभ असा की, या साधनाने देवास व भक्तास जसे सुख होते, तसाच फायदा पातकी लोकांनाही होतो नारदापासून या कीर्तनाचा महिमा सर्वांनी गाइला आहे यज्ञयाग, जपतप, व्रतेवैकल्ये १ सेविता सेविली, २ निगुण आकार झाला गुणवंत

सार्थ तुकारामगाथा ४६७ नसला खटाटोप न करता अगदी सोपे असे हे नामसंकीर्तनाचे साधन या कलियुगात माणसास उपलब्ध झाले आहे 'हेंचि कलिमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचे' कारण या कीर्तनामुळे 'महाअपराधी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं यश आले' अशी साक्ष एकनाथांनी दिली आहे 'पतित पातकी पावनजगत्रीं । चतुर्भुज होती देवा ऐसे' असा निर्णय या एका अभंगात तुकारामबुवा देतात त्यास आधारही त्यांच्या व इतर संतांच्या वाङ्मयात भरपूर सापडतात 'कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥ वाल्ह्या तारिला कीर्तनीं । पावन झाला त्रिभुवनीं ॥ गणिका कीर्तनें तरली । मोक्षधामा ती नेली ॥ अजामेळ चोखा महार । कीर्तनीं तरले अपार ॥ एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक झाले पावन' असा या कीर्तनाचा महिमा स्वत एकनाथांनी वर्णन केलेला आहे या कीर्तन परंपरेविषयीच्या अधिक माहितीसाठी अभंग न ९६ वरील विवरण पाहावे

१०३७ संसारसोहळे भोगिता सकळ । भक्ता त्याचें बळ विठोबाचें ॥ १ ॥ भय चिंता¹ धाक न मानिती मनीं । भक्ता चक्रपाणि सांभाळीत ॥ २ ॥ पापपुण्य त्याचें धरू न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वमाये ॥ ३ ॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्ता² भार सर्व वाहे ॥ ४ ॥ तुका म्हणे देव भक्ता वेळांईत । भक्त ते निश्चित त्यांचियानें ॥ ५ ॥

शब्दार्थ व टीपा - वेळांईत-साह्यकारी कैवारी

अर्थ - संसाराचे सर्व सोहळे अलिप्तपणे भोगणारे जे कुणी आहेत, अशा भक्तांना त्या विठोबाचे साह्य नेहमीच असते १ जो चक्रपाणी श्रीकृष्णच त्यांचा सांभाळ करीत असल्यामुळे त्यांना भय, चिंता धाक याची बाधा कधीही होत नसते २ सर्व भक्त एका त्या श्रीरंगाच्या नावेच रंगून गेलेले असल्यामुळे, त्यांच्या अंगास पापपुण्याचा स्पर्श कधीच होऊ शकत नाही ३ त्या भक्तांना मुक्तही व्हावेसे वाटत नाही पुन पुन जन्म घेऊन संसार करावा अशी त्यांच्या मनांत एक इच्छा असते कारण त्यांचा सर्व भार तो परमेश्वरच वहात असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात देव हा आपल्या भक्ताचा कैवारी आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे ते निश्चित असतात ५

१०३८ देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहोंचा विचार एकपणे ॥ १ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्याच्या सगें सुख भोगी ॥ २ ॥ देवे भक्ता रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥ ३ ॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥ ५ ॥

शब्दार्थ व टीपा - पार-महिमा

अर्थ - देवाने भक्ताच्यासाठी अवतार घेणे व भक्ताने त्याचे स्मरण ठेवून संसार करणे या दोन्ही बाबींचे स्वरूप एकच आहे १ देवाच्या मुळेच भक्तास सर्व सुखाचे सोहळे उपभोगता येतात व देवही त्या भक्ताच्या संगतीत सुखी होऊन जातात २ या देवानेच आपल्या भक्तांना जन्म देऊन रूप व आकार दिलेले असतात आणि भक्तांनी त्या देवाचा महिमा वर्णन केलेला असतो ३ एकाच परब्रह्माच्या अंगावर दोन भाव निर्माण झाले देव व भक्त, स्वामी व सेवक अशा दोन भावांनी ते परब्रह्म व्यक्त झाले ४ तुकाराम महाराज म्हणतात, तरी त्यांच्यात भेद कधीही नसतो भक्त हाच देव व देव हाच भक्त, इतकी एकरूपता त्यांच्यांत असते ५

विवरण - या एका तत्वस्पर्शी अभंगात तुकाराम महाराजांनी देव व भक्त याच्या अभेदत्वाचे समर्पक वर्णन केले आहे केवळ सुखासाठी भोगविलासासाठी, प्रेमाच्या सुखाने एकाच तत्त्व दोन अवस्थांना आले एक देव झाला, एक भक्त झाले आणि हे नव्य त्याच तत्त्वाच्या आवडीत चा 'आपुलीच आवडी धरुनि राहिला । आपआपणाते

१ चित्तीं, २ त्याचा

४६६ सार्थ तुकारामगाथा १०३६ अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविली' सेविली वैष्णवजनीं ॥ १ ॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणे रसे थोरे ब्रह्मानंदें ॥ २ ॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐंसे ॥ ३ ॥ सर्व सुखें तया मोहोराती ठाया । जेथें बांटणी या वैष्णवांची ॥ ४ ॥ निर्गुण' हे सोग धरिलें गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥ ५ ॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनि ठेला ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अविट-कंटाळा न येणारे, क्षीर-दूध गाळणी-वगळन, अर्थ - या हरिकथामाउलीचे दूध अतिशय अवीट आहे त्याचा कधीही कटाळा येत नाही याचे सेवन आजपर्यंत अनेक वैष्णवानी केलेले आहे १ या हरिकथेपुढे प्रत्यक्ष अमृतही लाजून माघारे फिरते या हरिकथेच्या रसाने फार थोर प्रकारचा ब्रह्मानंद झालेला असतो २ जे कोणी पतित, पातकी आहेत, ते संताच्या पवित्र पंगतीत या हरिकथेच्या प्रसंगी बसून पावन होतात या कथामृतान तेही देवाप्रमाणेच चतुर्भुज होऊन जातात ३ ज्या ठिकाणी या कथेच्या निमित्ताने वैष्णवांची गर्दी होते, तेथे सर्व प्रकारची सुखे मोहोरली जातात, अंकुरतात ४ या निर्गुण श्रीहरीने या कथारसाच्या वेळेस गुणवान असे रूप धारण केले असून तो मोठ्या प्रीतीने स्वतःच नृत्य करू लागतो, गाऊ लागतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनांना वगळून, चाळणी करून, निवडून मी हे हरिकथेचे साधन अतिशय सुलभ असे निश्चित केले आहे याच मुद्यात मी तृप्त झालो आहे ६ विवरण - हरिकथा किंवा कीर्तनभक्ती हे एक सर्वोत्तम साधन ईश्वरप्राप्तीचे म्हणून साधुसंतानी मानले आहे या हरिकथामाउलीची थोरवी तुकोबानी या अभंगात गाइली आहे तिच्यापुढे अमृत लाजून दूर सरत, पतित लोक पावन होऊन जातात, निर्गुण असणारा भगवत तिच्याच नादात सगुणसुंदर होऊन या कीर्तनाच्या जागी येऊन उभा असतो, वगैरे वर्णन मागील संतपरंपरेस धरूनच आहे हरिकथा वा कीर्तन हे सर्वांना आवडणारे व सुलभ असे साधन आहे गायन, नृत्य, वाद्य याच्या आविष्कारास यात भरपूर वाव असल्यामुळे बहुजनासही याची प्रीती विशेष बसते शिवाय कथारूप निरुपणामुळे मनोरंजनाबरोबर परमेश्वराचे गुणगान केल्याचेही ध्येय हाती येते नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार मानले जातात सुभाचा दरगाटा व रकटयाची लंगोटी लावून ते टाळकुटात पंढरपुरास कीर्तन करीत असत सगुण प्रीतीचा व कीर्तनभक्तीचा एक थोर आदर्श म्हणजे नामदेवराय होत 'नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं' अशीच त्याची प्रतिज्ञा होती, या कीर्तनात प्रत्यक्ष देव सगुणसुंदर रूपात हजर असता, अशी श्रद्धा तर सर्वच संतानी व्यक्त केलेली आहे 'कीर्तनाचे सुखें सुखीं होतो देव ' या नामदेवाच्या वचनात स्वतः भगवंतास कीर्तनाची आवड किती आहे हे स्पष्ट केले आहे 'कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी झाली धांवा । नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसे', 'देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी । म्हणोनिया उडी घाली स्वयें', 'कीर्तने तोषें अघोक्षज । राखी लाज भक्तांची', 'कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी' इत्यादी शेकडो वचनांतून एकनाथानी कीर्तनाचा व देवाच्या आवडीचा संबंध स्पष्ट केला आहे ज्ञानेश्वर-नामदेवापासून तुकाराम-रामदासापर्यंतचे सर्वच श्रेष्ठ साधुसंत हे स्वतः थोर दर्जाचे कीर्तनकारही होते त्यामुळे कीर्तनाचे सुख त्यांना स्वानुभवाने पटलेले होते कीर्तनमुखाची चटक त्या प्रभूलाही कशी असते, यांचे वर्णन तुकोबांनीही पुनः पुनः केले आहे 'कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव सगो आहे', 'न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटीं । जाय तेथें दाटी । वैष्णवांची द्यावोनि', 'हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासाची' इत्यादी वचनातून प्रत्यक्ष ईश्वरासही या कीर्तनाने किती सुख होते, याचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे या कीर्तनाचा आणखी एक लाभ असा की, या साधनाने देवास व भक्तास जसे सुख होते, तसाच फायदा पातकी लोकांनाही होतो नारदापासून या कीर्तनाचा महिमा सर्वांनी गाइला आहे यज्ञयाग, जपतप, व्रतेवैकल्ये १ सेवितां सेविली, २ निर्गुण आधार झाला गुणवंत

असला खटाटोप न करता अगदी सोपे असे हे नामसंकीर्तनाचे साधन या कलियुगात माणसांस उपलब्ध झाले आहे. 'हेंचि कलिमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचें' कारण या कीर्तनामुळे 'महापापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले' अशी साक्ष एकनाथांनी दिली आहे. 'पतित पातकी पावनपंगतीं । चतुर्भुज होती देवा ऐसे' असा निर्णय या एका अभंगात तुकारामबुवा देतात त्यास आधारही त्यांच्या व इतर संतांच्या वाङ्मयात भरपूर सापडतात. 'कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥ वाल्ह्या तारिला कीर्तनीं । पावन झाला त्रिभुवनीं ॥ गणिका कीर्तनें तरली। मोक्षधामा ती नेली ।। अजामेळ चोख्या महार । कीर्तनी तरले अपार ॥ एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक जाले पावन' असा या कीर्तनाचा महिमा स्वतः एकनाथांनी वर्णन केलेला आहे या कीर्तन परंपरेविषयीच्या अधिक माहितीसाठी अभंग क्र ९६ वरील विवरण पाहावे १०३७ संसारसोहळे भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विठोबाचें ॥ १ ॥ भय चिंता¹ धाक न मानिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ २ ॥ पापपुण्य त्यांचें धडूं न शके अंग । भक्तांसी धीरंग सर्वभावें ॥ ३ ॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां² भार सर्व वाहे ॥ ४ ॥ तुका म्हणे देव भक्तां वेल्हाईत । भक्त ते निश्चित त्याचियानें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेल्हाईत-साह्यकारी, कैवारी. अर्थ :- संसाराचे सर्व सोहळे अलिप्तपणे भोगणारे जे कुणी आहेत, अशा भक्तांना त्या विठोबाचे साह्य नेहमीच असते. १ जो चक्रपाणी श्रीकृष्णच त्यांचा सांभाळ करीत असल्यामुळे त्यांना भय, चिंता, धाक यांची बाधा कधीही होत नसते. २ सर्व भक्त एका त्या धीरंगाच्या नावेच रंगून गेलेले असल्यामुळे, त्यांच्या अंगास पापपुण्याचा स्पर्श कधीच होऊ शकत नाही. ३ त्या भक्तांना मुक्तही व्हावेसे वाटत नाही पुनः पुनः जन्म घेऊन संसार करावा, अशी त्यांच्या मनांत एक इच्छा असते कारण त्यांचा सर्व भार तो परमेश्वरच वहात असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, देव हा आपल्या भक्तांचा कैवारी आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे ते निश्चित असतात. ५ १०३८ देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहोंचा विचार एकपणें ॥ १ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ २ ॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥ ३ ॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-महिमा. अर्थ :- देवाने भक्तांच्यासाठी अवतार घेणे व भक्ताने त्याचे स्मरण ठेवून संसार करणे या दोन्ही बाबींचे स्वरूप एकच आहे. १ देवाच्या मुळेच भक्तांस सर्व सुखाचे सोहाळे उपभोगता येतात व देवही त्या भक्तांच्या संगतीत सुखी होऊन जातात २ या देवानेच आपल्या भक्तांना जन्म देऊन रूप व आकार दिलेले असतात आणि भक्तांनी त्या देवाचा महिमा वर्णन केलेला असतो. ३ एकाच परब्रह्माच्या अंगावर दोन भाव निर्माण झाले. देव व भक्त, स्वामी व सेवक अशा दोन भावांनी ते परब्रह्म व्यक्त झाले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तरी त्यांच्यात भेद कधीही नसतो. भक्त हाच देव व देव हाच भक्त; इतकी एकरूपता त्यांच्यांत असते. ५ विवरणः- या एका तत्त्वस्पर्शी अभंगात तुकाराम महाराजानी देव व भक्त याच्या अभेदत्वाचे समर्पक वर्णन केले आहे. केवळ सुखासाठी, भोगविलासासाठी, प्रेमाच्या सुखार्थ एकच तत्त्व दोन अवस्थाना आले एक देव झाले, एक भक्त झाले. आणि हे सर्व त्यास तत्त्वाच्या आवडीने झाले. 'आपुलीच आवडी धरूनि सोहळा । आपआपणांतें १ चित्ती, २ त्यांचा.

४६८ | सार्थ तुकारामगाथा व्यानले रे' अशा नांवेत नामदेवांनी या रीतीने वर्णन केले आहे केवळ प्रेमसुखासाठी 'देवचि झाला भक्त' हेंच खरे आहे देवभक्ताचे हे ऐक्य व प्रेमाच्या भोगासाठी त्यांच्यातील भेद हा भक्तिमार्गातील एक मोठा तरल विचार आहे 'देव ते सत । देव ते सत । निमित्त त्या प्रतिभा', 'आम्ही जाणो तुझा भाव । कंचा भक्त, कंचा देव?' इत्यादी वचनातून तुकारामबुवानी देव व भक्त याचे अभिन्नत्व वर्णन केले असून 'अभेदानें भेद राखियेला अंगीं । वाढावया जगों प्रेमसुख' असा निर्णय दिलेला आहे १०३९ हुवरती गाये तयाकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥ १ ॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणे वनमाळी सुखावला ॥ २ ॥ चोरोनिया खाये दुध दही लोणी । भावे चक्रपाणि गोविला तो ॥ ३ ॥ निष्काम तो जाला कामासी लपट । गोपिकाची वाट पाहात बैसे ॥ ४ ॥ जगदानी इच्छी तुळसी एकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥ ५ ॥ तुका म्हणे हेंचि चैतन्य सावळे । व्यापूनि निराळें राहिलैसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका :- हुवरती-मोठ्या प्रेमाने, कैवल्यनिधान - मोक्षाचा, कैवल्याचा साठा, गोविला- गुंतला गेला अर्थ - जो भक्त मोठ्या प्रेमाने गाऊन देवाचे गुणगान करतो, त्याच्याकडे कान देऊन हा कैवल्याचा साठा श्रीहरी उभा राहिलेला असतो १ तो गोपाळानी केलेली पूजा मोठ्या प्रेमाने घेतो, त्याचे उच्छिष्टही ग्रहण करतो त्याच्यातच हा वनमाळी सुखावून जातो २ हा गोपाळांचे दहीदूध, लोणी चोरून खातो व त्यांच्या भावभक्तीत गुंतला जातो ३ गोपिकांविषयी हा प्रेमासक्त असला तरी निष्काम असल्यामुळे त्याची वाट पाहण्यात त्याला सुख वाटते ४ सर्व जगातील लोकांना आपल्या कृपेचे दान देणारा हा प्रभू, एका तुळशीच्या पानाची इच्छा करीत नसतो भक्ताच्या भावास तो अशा प्रकारे जणू विकलाच गेलेला असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, येथे हे सावळे चैतन्य सर्व विश्वात व्यापून आपण पुन वेगळे राहिलेले आहे ६ १०४० समर्थांसी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरों ॥ १ ॥ आदराचे ठायों बहुच आदर । मागितले फार तेथें' वाढी ॥ २ ॥ न म्हणे सोइरा सुहृद आवश्यक । राजा आणि रंक सारिखाचि ॥ ३ ॥ भाव देखे तेथें करी लडबड² । जडा राखे जड निराळेंचि ॥ ४ ॥ कोणी न विसभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥ ५ ॥ तुका म्हणे पोट भरूनी उरवी । धाले³ ऐसे दावी अनुभवे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - समर्थाती-श्रीमंत व उदार गृहस्थाच्या ठिकाणी, वर्णावर्णभेद-उत्तम-कनिष्ठ असा भेद, धाले-संतुष्ट झाले अर्थ :- श्रीमंताच्या घरी मेजवानीच्या प्रसंगी, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ, असा भाव कधी नसतो, त्याच्या घरची सामग्री सर्वांसाठी सिद्ध असते १ ज्याच्या मनात देवाविषयी विशेष आदर असतो त्याचा आदर मग देवही करतो व यामुळे भक्त जेवढे मागतील त्याच्यापेक्षाही जास्त तो त्याना देतो २ ह्यावेळी तो हा माझा सोयरा आहे, हा मित्र आहे, हा राजा आहे, हा भिकारी आहे, असा भेद तो कधी करीत नाही ३ जेथे भक्ताचा शुद्ध भाव त्यात दिसतो, तेथे हा देव फार लुडबुड करुन त्याला जड अशा संसाराच्या उपाधीपासून वेगळे ठेवतो ४ कोणत्याही याचक भक्ताकडे हा दुर्लक्ष करीत नाही त्याची दशा समजायून घेऊन त्याची इच्छा हा देव पूर्ण करितो ५ सर्वांचे पोट भरले आहे व अन्न उरले आहे, सर्वजण जेवून तृप्त झाले आहेत, असे स्वानुभवाने हा जाणतो भक्तानाही असाच अनुभव येतो ६ १ ते ते, २ बडबड, ३ आल.

सार्थ तुकारामगाथा ४६९ १०४१ आलें भरा केणें । येरझार चुके जेणें ॥ १ ॥ उभें केलें विटेवरी । पेठ इनाम पंढरी ॥ २ ॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥ ३ ॥ तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- केणे-माल, जिन्नस. अर्थ:- ज्याच्या सहाय्याने आपली जन्ममृत्यूची येरझार संपते, असा हा या विठ्ठलनामाचा माल बाजारात आला आहे, तो नीट भरून ठेवा. १ पंढरी ही भक्तांना दिलेली इनामाची मोठी पेठ मिळालेली आहे, आणि या ठिकाणी विटेवर हा विठ्ठल उभा राहिलेला आहे. २ तो प्राप्त व्हावा म्हणून चहू दिशांनी एकसारखा ओघ लागलेला आहे. सर्व दिशांनी याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळून गेली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, बापहो, हा माल घेण्यासाठी माप मात्र खरेखुरे आणा. ४ १०४२ लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥ १ ॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥ २ ॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥ ३ ॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- लक्ष्मीवल्लभा-लक्ष्मीपती, पद्मनाभा-ज्याच्या नाभीमधून कमळ उगवले आहे, असा देवा. अर्थ :- लक्ष्मीपती, दीनांच्या नाथा, पद्मनाभा, १ तुझ्याच पायांवर सर्व सुखांची वस्ती आहे व त्याच ठिकाणी मला तू ठेव. २ हीच माझी अल्प वासना असून तू उदारांचा राजा असल्यामुळे ती पुरवावीस. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या माझ्या कर्मभोगाने फार त्रास दिला आहे. तू लौकर धावत येऊन माझे रक्षण कर. ४ १०४३ करों ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥ १ ॥ प्रेम झोंबो' कंठीं । देह धरणीये लोटीं ॥ २ ॥ राहे लोकाचार । पडे अवघा विसर ॥ ३ ॥ तुका म्हणे ध्यायें । तुज व्यभिचारभावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- झोंबो-टिकून राहो. अर्थ :- देवा, तुमच्याच पायांवर वारंवार पडून राहण्याची इच्छा व्हावी, असे मला जागे करा. १ माझ्या कंठात तुमच्या विषयीचे प्रेम सदैव टिकून राहो. माझ्या या देहाने धरणीवर तुम्हांस लोटांगण घालावे. २ माझा सर्व लोकाचार, लौकिक व्यवहार दूर व्हावा आणि मला सर्वांचा विसर पडावा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या जारिणीने व्यभिचारीभावाच्या तीव्रतेने आपल्या प्रियकराचे ध्यान करावे, तसे देवा, माझे चित्त तुझ्यावर जडावे. ४ १०४४ टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥ १ ॥ जाल तरी कोणी जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ २ ॥ जाती सादावीत । तेयें असों द्यावें चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सांगाती-सोबती, मित्र, सादवीत-सादघ करीत, समजावीत. १ झोंबे.

४७० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- हातांत टाळ वीणा घेऊन निघालेल्या या विष्णुभक्तांची सोबत ज्यांना आहे १ त्यांनी लगबग करून या मार्गाने चालावे. पुण्याची शिदोरी तयार ठेवावी २ असे हे भक्त सर्वांना सावध करीत जात असल्याने सर्वांनी त्यांच्यावर आपले चित्त द्यावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे वैष्णववीर, विठ्ठल, विठ्ठल बोल बोलोत निघाले आहेत. ४ १०४५ वांयां जातो देवा । नेणे भवती करूं सेवा ॥ १ ॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलो निवांत ॥ २ ॥ करावें ते काय । न कळे अवलोकितों पाय ॥ ३ ॥ तुका म्हणे दान । दिले पदरीं घेईन ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निवात-स्तब्ध, अवलोकितों-पाहतो अर्थ :- देवा, आतां माझा जन्म व्यर्थच चाललेला दिसतो मला तुझी सेवा करता येत नाही भक्ती करता येत नाही. १ आतां तुझ्यापुढे हात जोडून मी निवांतपणे उभा आहे २ काय करावे, ते मला समजत नाही तुमच्या पायाकडे पाहात देवा, इथे उभा मात्र आहे मी ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे दान देवा, द्याल ते मी पदरात घेईन. ४ १०४६ जीव खादला दैवतें । माझा येणें महाभूतें । झोबले निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥ १ ॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हा आम्हा सये । विघडाविघड केली ॥ २ ॥ बोलतां दुश्चिती । मी वो पडियेले भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥ ३ ॥ भलतेंचि चापळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥ ४ ॥ नका बोलो सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहे । उग्या वाचा खुंटोनी ॥ ५ ॥ तुम्हां आम्हा भेटी । नाही जाली जीवेसाठीं । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- खादला-खाल्ला, सये-सखे, विघडाविघड-वियोग, खुटोनी-बंद करून, अर्थ :- हा महाभूत असणारा जो देव त्याने तर माझा जीवच खाल्ला आहे. हे दैवत माझ्या जीवाला इतके झोंबून राहिले आहे की, काही केल्याने सुटत नाही १ आता मी काय करू? काहीही उपाय केले तरी, काही उपयोग नाही तसे, याने तुमच्याआमच्यात वियोग निर्माण केला आहे २ असे बोलत असतानाच मी दुश्चित्त होऊन भ्रांतीमध्ये पडले आहे माझ्या मनात मी व माझे असा आठवसुद्धा राहिला नाही ३ मी काहीतरी भलतेच बोला यला लागले आहे मला माझीं मलेबाळेही काही आठवत नाहीत आपले व परके हा भावही माझ्यामधील निघून गेला आहे ४ सख्यानो, माझ्याशी बोलूही नका, कारण मला आता एक वायगा शब्द सहन होत नाही. वाणी बद करून जशा आहात तशाच उगाच बसून राहा ५ तुमचीआमची भेट होणार नाही, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे आता हा श्रीहरी माझ्याजवळ एकसारखा आहे हे तुम्ही नीट पाहा ६ १०४७ जीवीचा जिव्हाळा । पाहो आपुलिया डोळा ॥ १ ॥ आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥ २ ॥ पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्तीं । वाहू रखुमाईचा पती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- येर-इतर, वाव-व्यर्थ अर्थ :- आमच्या जीवाचा जिव्हाळा असणारा हा श्रीहरी आम्ही आपल्या डोळ्यानी पाहू. १ विठ्ठल हाच एक देव असून इतर सर्व व्यर्थ आहेत आमच्या दृष्टीने. २ हा विठ्ठल पुंडलिकासाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा रखुमाईचा पती श्रीविठ्ठल आम्ही आमच्या चित्तात धारण करू. ४

सार्थ तुकारामगाथा ४७१ १०४८ माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥ १ ॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ २ ॥ दास विठ्ठलाचा । अंकित अनिला ठायींचा ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा. - आराधन-आराध्य दैवत, निधान-ठेवा. अर्थ :- माझे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा हा एक ठेवा श्रीविठ्ठल हेच आहे. १ त्याच्या एकाशिवाय आम्हास दुसरे कुणी माहीत नाही. पंढरीराज विठ्ठल हेच आमचे एकमेव दैवत. २ मी या विठ्ठलाचा दास असून त्याच्या स्थानाचा अंकित असा सेवक आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता यात कधी पालट होणार नाही. ४ १०४९ आतां आम्हां हेचि काम । न १ विसंभावे तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें २ नाचावें ॥ १ ॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकळिक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिले ॥ २ ॥ गोदातटें निर्मळें । देव देवांहीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न विसभावें-विसरू नये, आराणूक-विश्रांती, गोदातीरें-गोदावरी नदीच्या काठी. अर्थ :- आता आम्हास हे एकच काम उरले आहे. तुला विसरू नये. वाणीने एकसारखे तुझेच नाम गावे. दोनही हातानी टाळी वाजवून प्रेमसुखाने नाचावे. १ या सुखामुळे मनास पूर्ण विश्रांती प्राप्त झाली असून मागची- पुढची सर्व काळजी सपलेली आहे. आध्यात्मिक, आधिदैविक आणि साधिभौतिक अशा प्रकारचे त्रिपुटीचे दुःख संपून आमचे प्रारब्धही पूर्णपणे संपले आहे. २ गोदावरीच्या स्वच्छ व निर्मळ किनाऱ्यावर अनेक देवांची देवळे पाहून, संतमहंतांच्या मेळाव्यात बागून दिवस मोठ्या सुखाचा जात आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, आता कसलीही चिंता मला उरलेली नाही. माझा सर्व योगक्षेम मी तुझ्याकडे सोपविलेला आहे. सर्व भार तुझ्यावरच टाकला आहे. ४ १०५० चोरटें सुनै मारिलें ताळें । फेंउं करी परि न संडी चाळे ॥ १ ॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ २ ॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे कर्म बळिवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुनै-कुत्रे, ताळें-जोडपाच्या तळव्याने. अर्थ :- चोरट्या कुत्र्याला जोडप्याच्या तळव्याने मारले तर 'केउ केउ' करीत ते पळून जाते; पण ते स्वतःचे चाळे काही कधी सोडीत नाही. १ देवा, असे काही दुराचारी असतात, ते आपल्या जीवास आपणच घात करून घेतात. २ त्यांचे नाक काटले गेले असले तरी, त्यांना त्याची लाज कधीच वाटत नाही. फजितखोर होऊनही ते दारोदार हिंडत असतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे प्रारब्धकर्म बलवान म्हणून, ते त्याला मागेपुढे चांगल्या मार्गाने सरकू देत नाहीत. ४ १ वाचे गाऊ तुझे नाम, २ सुखें आनंदे.