भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

३२ सार्थ तुकारामगाथा ६८ पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥ १ ॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ २ ॥ तोंच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पाये सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-भूमंडळीं-या जगतात, सरतीं पुरतीं-संपन्न, विपुल अर्थ - जगात भक्त हेच अति पवित्र व सोवळे असतात. १ त्यांचा देव मोठा आवडता व प्रेमाचा असून त्याविषयी त्याच्या मनात अखंड प्रेमभाव असतो. २ हे भक्त मोठे भाग्यवंत असून धनधान्य, संपत्ती यांची विपुलता त्याच्या घरी असते, म्हणजे या काळजीत ते कधी नसतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांची सेवा केल्यास ती देवाला पोचते. ४ ६९ आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥ १ ॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ २ ॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥ ३ ॥ तुका म्हणे विषें । अन्न नाशियेलें जैसें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-भ्रमले-भ्रमलेले, चावळे-चावळलेले. अर्थ :- आशाबद्ध लोक परमेश्वरास कसे जाणणार ? त्यांना परमेश्वर कसा समजणार ? १ तो तर इंद्रियाच्या म्हणजे विषयसुखाच्या सेवेत तत्पर असतो, आवडीच्या विषयाचाच हेवा त्याला वाटत असतो २ भ्रमलेला, चावळलेला मनुष्य बोलतो तेव्हा त्यात उचित-अनुचित असे काहीच नसते, आशेने बद्ध असलेल्याची गत अशीच असते. ३ ' तुकाराम महाराज म्हणतात, सुग्रास अन्नात विष कालविले म्हणजे जसे ते अन्न नासून जाते तसे आशाबद्ध माणसाचे आयुष्य व्यर्थ होते. ४ ७० ढेंकर्रें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथों ॥ १ ॥ हेही बोल तेही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ २ ॥ गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे असे हातांचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-साचे-खरोखर, काचे-कच्चे, खोटे, फोल-फुकट, परी-प्रकार, फकेवरी-फुकट्या मारून, थवाणे मारून, विल्हाळक-व्यर्थ अर्थ - तृप्ती करणारे जेवण झाले आहे की नाही ते सहजच येणाऱ्या ढेकरीवरून समजते जेवण यथातथाच झाले तर ढळेळळेच खोटे) ढेकर ध्यानात येतेच. १ तृप्त होऊन ढेकर देणाऱ्याचेही बोलच; व उपाशी राहून खोटी ढेकर देण्याचेहो बोलच. पण पहिल्याचे स्वानुभवी व खरे आहेत, दुसरे फोलकटाप्रमाणे व्यर्थ आहेत. २ गव्हाचे पुष्कळव निरनिराळे पदार्थ होतात म्हणून ते नुसतेच फाके अथवा थकाणे भरून खाऊ नयेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, हातच्या कंकणाला आरसा घेणे व्यर्थच नव्हे काय ? ४ ७१ करावी ते पूजा मनेंचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥ १ ॥ फळावें तयासि कळें अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ २ ॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसे ॥ ३ ॥ तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा :- लौकिक-बाह्य अवडंबर, साच-खरा, अतिशया-अति हव्यास, लौकिकाची हाव अर्थ - देवाची पूजा करायची असेल तर ती मनातल्या मनातच करावी हे उत्तम. येथे बाह्य अवडंबराची काय जरूरी आहे ? १ अशी मानसिक पूजा ज्या ईश्वरास पोचावयास हवी, त्यास समजावयास हवी त्यास ती बरोबर पोचते, समजते अंत करणातील खरा भाव खरोखरीच उपयोगी पडतो २ बाह्य डामडौलाचा हव्यास फार धरला तर कधी लाभ व कधी हानीही होईल कारण ज्या जातीचे बीज चिंतात असेल त्याप्रमाणे त्याचे फळ मिळते आपल्या अंत करणातील भावाप्रमाणे आपणास फलप्राप्ती होईल ३ तुकारामबुवा म्हणतात, ज्या भजनामुळे मनास खरे समाधान मिळते त्याच्या योगानेच संसारातून पैलतीराला जाण्याचे करावे ४ विवरण - मनात देवाविषयी प्रीती नसताना गंध, धूप, दीप, फुले, आरती, नैवेद्य या बाह्य थाटान पूजा केली तरी देव प्रसन्न होणार नाही त्यास फक्त भक्ताच्या मनातील भाव दिसतो मानसिक पूजा तुकारामबुवाना यासाठी श्रेष्ठ वाटते मनच भगवंताला अर्पण करून सर्व कर्मे करीत राहणे हीही एक प्रकारची पूजाच, आपले मन व त्याच्या सर्व वृत्ती हरिरूपच आहेत असे समजून वृथा बाह्य अवडंबर माजवू नये कारण या बाह्य देखाव्याने ईश्वर संतुष्ट होत नाही त्यास आपल्या मनाची निर्मळता व समर्पित अवस्था याची गोडी असते 'मनीं भाव असे काहीं । तेथें देव येती पाहीं' असे दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितले आहे आणखी एका अभंगात त्यांनी म्हटले आहे, 'मनोमयपूजा । हेंचि पदिये केशीराजा' या पंढरीरायाला भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम हवे त्याला गंध, अक्षदा, सुवासिक पुष्प, भरजरी वस्त्रे, मोल्यवान अलंकार याची जरूरी नसून भक्ताचे मनापासूनच प्रेम तवढे हवे असते 'देव भावाचा भुकेला' हेच खरे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात ज्ञानदेवांनी भगवंताच्या या आवडीचे मोठे रसाळ वर्णन केले आहे मनामधील नि:सीम भावाने एखादे फळ, फूल, पान जरी अर्पण करणारा भक्त असला तरी परमेश्वर संतुष्ट होतो आणि यापैकी काहीच मिळाले नाही तर पाण्याचा थेंबसुद्धा पुरेसा होतो या भक्तीच्या प्रेमाचा देव भुकेलेला असतो 'आम्ही भावाचे पाहुणे' असे खुद्द भगवंतानीच मागितले आहे मनानेच ईश्वराची पूजा कधी न जमली तर काय करावे याचेही सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरांनी बाराव्या अध्यायात केले आहे सर्व वृत्तीसहु मन ईश्वराशी निगडित करणे हे प्रथम कठीण वाटेल मग एखादे निमिष जरी ईश्वराच्या स्मरणात खर्च केले तरी चालेल, किंवा मनाने, वाणीने ज्या ज्या क्रिया होत आहेत त्या 'मी करतो आहे' असे असे मानू नये ज्याच्या स्फूर्तीने विश्वाचे चलनवलन होते, तेथे आपण कोण ? असाच भाव असावा बाह्य देखाव्याचा ईश्वराच्या भक्तीत काही उपयोग नसून स्वतःच्या मानसिक वृत्तीच हरिरूप बनल्याची जाणीव करून घेणे हीच सर्वोत्तम पूजा होय ७२ एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्याची गति होइल नेणो ॥ १ ॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ २ ॥ हरिहरा नाहीं बोटभरी वाती । कोण त्याची गति होइल नेणों ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्याची गति होइल नेणो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गति-परिणाम अखेरी, बहिर्मुखं-बाह्य उपचारावर लक्ष देणारे, वाती-वात, आरती अर्थ - जे लोक एकादशी अथवा सोमवारचे व्रत करीत नाहीत त्यांच्या आयुष्याची काय अखेरी होईल हे समजत नाही १ या सर्व लोकाकडे पाहून मनाची फार तळमळ होते, कारण सर्व माणसे आंधळी आहेत बाह्य कर्म- काडावर त्याचा भर आहे त्यांची वृत्ती बहिर्मुख आहे २ विष्णू किंवा शंकर यांना बोटभर वातीनेही जे ओवाळीत नाहीत, आपले प्रेम व्यक्त करीत नाहीत त्यांची गत काय होणार कुणास माहित ? ३ ईश्वरावर ज्यांचे प्रेम नाही त्यांचे आयुष्य सुखाचे कसे होणार याबद्दलची चिंता तुकाराम महाराजांना वाटते ४ विवरण - कोणत्या तरी देवास भजा, त्याचे स्मरण करा म्हणजे तुमच्या जीवनाचे सार्थक होईल या उपदेशाबरोबरच आणखी एक महत्वाचा सिद्धान्त बुवांनी या अभंगात सांगितला आहे धुवा भागवत संप्रदायातील, वारकरी पथातील त्याचे दैवत पंढरपूरचे श्रीविठ्ठल हा विठ्ठल श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण होय एकादशीचे व्रत हे या तु गा ५

३४ सार्थ तुकारामगाथा

पंथात प्रमुख; पण तुकाराम महाराज या ठिकाणी सोमवारही करायला सांगतात, यातले रहस्य काय ? कोणत्याही देवाची पूजा करा, स्मरण करा, स्तवन करा, ते एकाच परमेश्वराला पोचते अशी आपली परंपरा आहे. शिव, विष्णू ही नांवे दोन पण दैवत एकच अशीच वारकरी पंथाची धारणा आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हा शिवाशी संबंधित आहेच. त्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. ‘ विठोनें शिरीं वाहिला देव राणा ' म्हणून समर्थ रामदासांनी विठ्ठलाचे स्तवन केले आहे. हरिहरांचे ऐक्य हे वारकरी पंथाचे एक महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य मानावे लागेल. दैवतांवरून मतभेद व भांडण या बाबी वारकरी पंथात दिसत नाहींत मुख्य भर विठ्ठलावर असला तरी तोही शिवस्वरूपच संतानी मानला आहे हरिहरात केवळ एका बेलाटीचा फरक आहे असे एके ठिकाणी बुवांनी म्हटले आहे. विष्णू व शिव, हरि व हर यांच्यात वरवरचा भेद असला तरी ‘ मज उभयरूपां एक ' असे तुकारामांनी सांगितले आहे. 'हरिहरां भेद । नाहीं करूं वाद । एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं' अशी मोठी गोड अनुभूती तुकारामांनी वर्णन केली आहे आणि म्हणून हरीला किंवा हरला, कुणाला का होईना पण थात लावा, त्याचे स्मरण करा असे बुवा आग्रहाने सांगत आहेत तुकोबांच्या घरी कुलदैवत म्हणून शिवाचीही उपासना होतीच हरिहरेश्वराचे देऊळ अद्यापही त्यांच्या जागेत आहे ( अभंग क्र. १२४ वरील अधिक विवरण पाहावे )

७३ नव्हे आराणूक संसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥ १ ॥ देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ २ ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥ ३ ॥ तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- आराणूक- शांती, समाधान, सुख, सांदीं- कोपऱ्यात अर्थ.- केवळ संसार करणाऱ्या प्रापंचिकास कधीही समाधान मिळणार नाही; कारण त्याच्या चित्तात नेहमी धंदा, व्यवसाय याचाच ध्यास असतो. त्यास शांती कुठली ? १ अशा रीतीने सर्व चित्तच संसारात व्यग्र झाल्यावर मग देवधर्म सांदोकोपऱ्यात पडतात, त्यांची आठवणही कुणास होत नाही, कारण एकसारखे विविध विषयांचे चिंतन व त्याचाच गोंधळ मनात गाजत असतो. २ आणि कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे समाधान रात्रंदिवस कितीही केले तरी ते पुरे पडत नाहीं; पण त्यामुळे मात्र ईश्वराकडे दुर्लक्ष होऊन त्याचे दर्शन घेणेही दुर्लभ होऊन जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे संसारग्रस्त लोक आत्मघातकीच असतात. नारायणाच्या ठिकाणीं तयांचे चित्त लागत नाही ही त्यांची मोठी चूक होत आहे. ४

७४ स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥ १ ॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ २ ॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- ग्रामवासी- गावचे लोक, श्वान- कुत्रे, लिंग- शिव, अतित- अतिथी, थारा- विश्रांती, कंटक- दुसऱ्याला त्रास देणारे लोक, कुळवाडी- वतनदारी अर्थ - ज्या गावचे लोक परमेश्वराची सेवा व भक्ती करीत नाहीत ते गाव व त्याच्या भोवतीची जागा स्मशानासारखी समजावी व त्या गावातील माणसे जिवंत असली तरी प्रेतरूप मानावीत. १ कसला तरी धंदा करून कुत्र्याप्रमाणे ते पोट भरतात एवढेच, पण त्यांच्या घरी यमदूतांची वस्ती असते. मृत्यूच्या पथाराच त्यांचे वागणे लागलेले असते. २ जेथे लिंगाची म्हणजे ईश्वराची पूजा होत नाही, तेथे अतिथीही आश्रयास, विश्रांतीस धावत नाही या गावात वस्ती फक्त चोरांची व समाजकंटकांचीच असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या बुद्धीला आपण कोण, आपली स्थिती काय याविषयी काहीच जाणीव नाही तेथे निश्चितपणे यमाची वतनदारी सुरू झालेली असते. ४

सार्थ तुकारामगाथा ३५ ७५ आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥ १ ॥ गळेचि ना गर्भ नव्हेचि का वांज । माता त्याची लाजलाया पापी ॥ २ ॥ परपीडे परद्वारीं सावधान । सादरचि मन अभाग्याचे ॥ ३ ॥ न मिळता निंदा चाहाडी उपवास । संग्रहवे दोष सकळ ही ॥ ४ ॥ परउपकार पुण्य त्या नावडे । विषाचे ते कीडें दुग्धीं मरे ॥ ५ ॥ तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाकटा- अरे देवा असे दुःखाने शब्द दुराचार-वाईट चालीरीतीचा, लाजलाया- वंशाला काळिमा लावणारा, सादर-उत्सुक, नावडे-सहन न होण्याजोग, नातळे-शिवत नाहीत अर्थ - आपल्या कुळातील पुत्र वाईट रीतीचा निघाला आहे असे पाहून स्वर्गातील त्याचे पितरही 'हाय रे देवा' म्हणून शोक करतात १ कुळाला लाज लावणारा, काळिमा लावणारा मुलगा प्रसवून, पापी मुलास जन्म देऊन कष्टी झालेली माता पाहून लोक म्हणतात, ही वांझ का नाही राहिली ? किंवा हिचा गर्भच गळून का नाही गेला ? २ या अभागी मुलाचे मन नेहमी दुसऱ्यास पीडा देण्यासाठी व दुसऱ्याच्या स्त्रीविषयी उत्सुक असते ३ कुणाची निंदा किंवा चहाडी करावयास एखाद्या दिवशी त्रास मिळाली नाही तर यास उपवास घडल्याइतके दुःख होते सगळ्या दोषांचा संग्रह करावा अशी त्याची बुद्धी असते ४ दुसऱ्यावर उपकार करावा अथवा काही पुण्य करावे हे त्याला सहनच होत नाही, विषावर जगणारे किडेच ते त्यांना गोड दुधात टाकल्यास ते मरणारच त्यांना विषच बरे वाटते ५ तुकाराम महाराज म्हणतात, तो केवळ विटाळाचीच, अमंगलाचीच मूर्ती असतो त्याच्या चित्तात दया, क्षमा, शांती हे गुण स्पर्श देखील करणार नाहीत ६ ७६ श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥ १ ॥ नाहीं भोड आणि धीर । उपदेश जिरें क्षीर ॥ २ ॥ माणसासि भुके । विजातीने द्यावे थुके ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - श्वान-कुत्रे शीघ्रकोपी-लवकर संतापणारा, घातकर-घात करणारा, विजातीने-हलक्या जातीच्या लोकांनी अर्थ - लवकर संतापणारा मनुष्य म्हणजे एक प्रकारचा कुत्राच आपला आपणच तो घात करतो १ तो कुणाची भीड धरत नाही, त्याला कसला धीरही नसतो उपदेशरूपी दूधही त्याच्या अंगी पचत नाही २ दुसऱ्या माणसावर तो नेहमी भुकत असतो, इतर हलक्या लोकांनीही त्याच्यावर थुंकावे अशी मग परिस्थिती निर्माण होते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचे चित्त हे पापी असते, त्याची पुरती फजिती करावी ४ ७७ देखोनि हरखली अड । पुत्र जाला म्हणे रांड ॥ तव तो जाला भाड । चाहाड चोर शिवळ ॥ १ ॥ जाय तिकडे पीडी लोका । जोडी भाडवल थुका ॥ थोर जाला चुका । वर का नाहीं घातली ॥ २ ॥ भूमि कापे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्ठुर उत्तरें । पाप दृष्टी मळिणचित्त ॥ ३ ॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सागातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनिया निषिद्ध तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हरखली-संतुष्ट झाली अड-गुरुत्व साधक चिन्ह भाड-भांडखोर, कुंभपाक-एक प्रकारचा नरक

३६ सार्थ तुकारामगाथा अथ - पुत्रप्राप्तीस हपापलेल्या एका स्त्रीस बऱ्याच दिवसांनी पुत्र झाला, पण तो दुराचारी निघाला काय त्याचा उपयोग ? या पाश्र्वभूमीवर तुकाराम महाराज म्हणत आहेत, वांझत झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने कोण्या एका स्त्रीने आपणास मुलगा झाला हे पाहताच मोठा आनंद व्यक्त केला, पण पुढे हा पोरगा तर मोठाच माडशोर व चोर निघाला चहाडखोरी करू लागला वाईट चालीचा निघाला काय त्याचा उपयोग ? १ त्याने जिकडे पाहिले तिकडे लोकांना पीडाच निर्माण झाली त्यामुळे लोक तिरस्काराने त्याच्यावर थुंकले, हेच त्याचे एकमेव भाडवल जमा झाले या आईच्या हातून मोठीच चूक झाली जन्मतःच तिने यास नष्ट का नाही केले ? २ या दुष्ट मुलाच्या भाराने भूमी थरथरा कापायाला लागते याचे शरीर म्हणजे कुंभपाक नरकाचे ठिकाणच होय हा नेहमी निष्ठुर उत्तरांनी बोलत असतो, याची दृष्टी पापी असून चित्तही नेहमी मलीन असते ३ हा धाडाळ दुराचारी असतो, याच्या बरोबर पापाचा विटाळ असतो तुकाराम महाराज म्हणतात, हा दुष्टच असतो याचा सदैव निषेधच करावा ४ ७८ नेंणें गाणे कठ नाहीं हा सुस्वर । घालू तुज भार पांडुरंगा ॥ १ ॥ नेंणे राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥ २ ॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना ॥ तुज नारायणा वौंचूनिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - कठ-गळा चाड-पर्वा, मात मात-ताल, लय वगैरे अर्थ - देवा, मला गायनाचे शास्त्र माहित नाही, मला चांगला गळा नाही, मला नीट गाता येत नाही, माझा आवाज गोड नाही पण पांडुरंगा, माझा सब भार तुझ्यावर आहे १ मला संगोतामधील राग माहित नाहीत, निरनिराळ्या वेळांच्या घात-मात्राच्या रीतीही मला माहित नाहीत, पण देवा, तुझ्या पायांवर मात्र माझे चित्त सदोदित असते २ तुकाराम महाराज म्हणतात की मला लोकांची काही पर्वा नाही नारायणा, तुझ्यावाचून या लोकाचा काय उपयोग आहे ? ३ ७९ माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥ १ ॥ तब तया पारखी सिव । लाजे ठाव सांडिता ॥ २ ॥ उष्टावळी करूनि जमा । थुथुनि प्रेमा आणितसे ॥ ३ ॥ तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदों न सरती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उट-कटकट पारखा-परीक्षा करते, सिव-सीमा ठाव-मूळचे ठिकाण बाहेरमुदी- बाह्यमुद्रा वरवरचे ढोंग आहाच-व्यर्थ न सरती-पोचती होत नाही अर्थ - सर्व सामान्य कवी असतात ते 'माझी कविता वाचा, पाठ करा' अशी एकसारखी कटकट लोकांच्या पाठीमाग लावतात १ पण ज्यांची परीक्षा स्वतःच्या गावच्या सीमेवर जाताच होते, व मग आपले स्थान सोडताच त्यानाच लाजल्यासारखे होते २ कारण मागच्या काही कवींच्या काव्यातील शब्द उसने आणून वृथा कष्टाने प्रेम व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, याचे बाहेरचेच ढोंग तेवढे पाहून घ्यावे ते व्यर्थ असते कारण ईश्वराच्या ठिकाणी ते कवित्व कधीच पोचत नसते ४ ८० उपाधीच्या नावे घेतला सितोडा । नेदू आता पीडा आतळो ते ॥ १ ॥ पाशासाठीं हात भरूनि धुवावे । । चालतिया गोवे मारगासि ॥ २ ॥ काय नाहीं देवे करूनि ठेविले । असे तें आपुले ते ते ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार । तेव्हा आपपर बोळविले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपाधी-बाह्य बंधने, शितोडा घेणे-शुद्ध होण, नदू-न येऊ, आतळणे-शिवू देणे, गोवे- अडथळे आपपर-मी-तू असा भाव बोळविले-निरोप दिला घालविले

सार्थ तुकारामगाथा ३७ अर्थ - दरोराचे विषय, प्रपंचातील सुखदुःखे इत्यादि बाह्य बंधनातून मी गोमूत्राचा शितोडा घेऊन शुद्ध झालो आहे. आता पुनः तो पीडा मला शिवणार देखील नाही. १ एखाद्या घाणेरड्या बाबतीत हात भरला व मग तो धुवा हे कशाला हवे ? चालत्या मार्गात अडथळे कशासाठी ? २ परमेश्वराने आपल्यासाठी काय करायचे बाकी ठेविले आहे ? त्याने जे जे निर्माण केले ते आपल्यासाठीच नाही का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य उपाधींचा अहंकार एकदा गेला म्हणजे मग मी-तू असा द्वैतावरचा भाव नाहीसा होतो. दुजेपणा उरत नाही. ४ ८१ योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥ १ ॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ २ ॥ मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥ ३ ॥ तुका म्हणे उचित जाना । उगीं सिणा काशाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दमा-दमन करा, ताब्यात ठेवा, सोयरा-आप्त, मिरासी-परंपरागत हक्क, सेत-शेत, सिणा-श्रम करा अर्थ - क्षमा हे योगाचे खरे सौभाग्य असून आधी इंद्रियांचे दमन करावे, त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा १ एकदा देवाशी सख्यत्व जडले, तो सोयरा झाला म्हणजे मग सर्व भाग्याच्या गोष्टी आपल्या घरात येतील २ शेत आपल्या वंशपरंपरागत हक्काचे असले तरी काही श्रम न करता काही पीक हाती येत नाही. ३ हे तुम्ही उचित असे जाणून परमेश्वरासाठी इंद्रियदमनाचे तप करा; उगाच इतर व्यर्थ असे प्रयत्न मात्र करून शिणू नका असे तुकाराम महाराज म्हणतात ४ ८२ न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥ १ ॥ तो हे चावटीचे बोल । जन रंजनणें फोल ॥ २ ॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- चावटी-उगाच बडबड, फोल-फुकट, सादर-प्रसन्न, स्वाधीन अर्थ - डोळ्यात पाण्याचा एक थेंबही नाही आणि मनात ईश्वराविषयी प्रेम नाही १ तोपर्यंत त्याचे बोल उगाच व्यर्थच आहेत. केवळ लोकांना रंजविण्यासाठी केलेली ती वायफळ बडबडच म्हणावी लागेल २ जोपर्यंत आपला स्वामी, परमेश्वर आपल्या स्वाधीन झाला नाही, त्याची कृपा झाली नाही तोपर्यंत आपल्या बोलाना अपेक्षित असे फळ मिळत नाही ३ दृष्टादृष्ट होऊन एकमेकाकडे पाहणे होऊन जोपर्यंत भेट झाली नाही तोपर्यंत तुमच्या वचनात कोणतेच इष्ट असे फळ येणार नाही ४ ८३ बाईल सवासिण आई ॥ आपण पितराचे ठायीं ॥ १ ॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ २ ॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥ ३ ॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव थोडा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेच-खर्च, अपसव्य-उलटी क्रिया, चरवणीं-भोगान, गाळणी करणे-व्यर्थ घालविणे, सरविणे, लंडा-धर्मभ्रष्टास अर्थ - धर्मशास्त्रविरहित वागणाऱ्या एका बेताल माणसाचे वर्णन बुवा येथे करीत आहेत. आपल्या आईबापाच्या श्राद्धाच्या दिवशी याने ब्राम्हण सुवासिनी जेवण्यास बोलावण्याऐवजी आपली बायकोच सवाष्ण आईच्या जागी व आपण ब्राह्मण वडिलांच्या जागी असा व्यवहार केला १ अरे दुष्ट माणसा, या धर्मबाह्य कृत्यामुळे तुझे फारच नुकसान झाले आहे, कारण या सर्व गोष्टी धर्माच्या उलट झाल्या आहेत धर्मशास्त्राच्या विपरीत ही तुझी १ चरणी

३८ सार्थ तुकारामगाथा करणी आहे २ तू तुझ्या आयुष्याची अखेर व्यर्थपणे विषयाच्या भोगातच केली आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा धर्मभ्रष्टाला कसलीही दयामाया उरत नाही या अधमाला देव आणि धोंडा सारखाच वाटतो ४ ८४ दानें कापे हात । नावडे तेविशीं मात ॥ १ ॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ २ ॥ न वजती पाय । तीर्था म्हणे वेचू काय ॥ ३ ॥ तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नावडे-आवडत नाही, ते विशीं-त्याबद्दल मात-गोष्ट चावटीचे-उगाच बडबडीचे मिथ्या-व्यर्थ, नवजतां-वळत नाही वेचू-खर्च करू अर्थ - दान देताना त्याचा हात थरथर कापतो, मनातून त्याला दान द्यायला नकोच असते, दानाविषयी कुणी गोष्ट काढली तरी ती त्याला आवडत नाही १ दुधात हिंगाचा खडा टाकल्यावर जशी स्थिती होते तसेच याच्या व्यर्थ बडबडीमुळे होते याचे सर्व बोल फुकट असतात २ तीर्थयात्रेसाठी याची पावले वळत नाहीत तो म्हणतो तेथे जाऊन खर्च कसा करू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या मनातच नाही तर ते आचरणात कसे दिसणार ? ४ ८५ वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥ १ ॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके घणी वरी ॥ २ ॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥ ३ ॥ सांडी थोरपणा । तुका म्हणे सवे दीना ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निवे-संतुष्ट होते घणी-समाधान सांडी-सांडून देवा अर्थ - केवळ गाई वळण्याच्या रूपाने प्रकट झालेल्या श्रीकृष्णस संतुष्ट करण्यास फार लागत नाही १ केवळ भक्तिप्रेमाचा मनापासूनचा एखादा उद्गारही त्याला पुरा होतो त्यावर तो संतुष्ट होतो कुणाच्याही या प्रेमाने तो तृप्त होतो, समाधान पावतो २ त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी जपजाप्य, यज्ञयाग वगैरे प्रकट काही करावे लागत नाही, काही मानाचे, आदर दर्शविण्याचे इतर उद्योगही करण्याची जरूरी नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमभावाने भजन्या या दीनासाठी आपले मोठेपण सोडून देवही त्याच्याशी सख्यत्व पत्करतात, त्याच्यावर कृपा करतात ४ ८६ मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥ १ ॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरी हा उत्तम ॥ २ ॥ नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥ ३ ॥ धन मेळविले कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥ ४ ॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥ ५ ॥ तववरि मिरविसी बळ । जव आला नाहीं काळ ॥ ६ ॥ तुका म्हणे बापा । चुकवीं चौऱ्यांशींच्या फेपा ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - मैत्र-मित्र, सामा-सामान कोडी-कोटीच अर्थ - आयुष्याचे कल्याण व्हावे म्हणून प्रापंचिकास उपदेश करताना बुवा म्हणतात, अनेक मोठेमोठे मित्र जरी तू जमविलेस तरी शेवटी अंतकाळी त्याचा काही उपयोग होत नाही १ म्हणून तू आधी रामनाम घे परमेश्वराच्या नामस्मरणाच्या सामानाने भांडवल जपून ठेवावेस हे उत्तम २ नाहीतर यम तुझ्यावर क्रुद्ध होऊन कराकरा दात खाईलच ३ कोट्यावधी रुपयांचे धन जरी तू मिळविलेस तरी ते यम घेतल्याखेरीज सोडणार

सार्थ तुकारामगाथा ३९ नाही म्हणूने ते धन तुला सोडावेच लागेल ४ बलवान मित्र, बाप, बहीण, आई, पत्नी हे बांधव व आप्त यांचे सैन्य जरी मोठे असले तरी त्याचा काहीच उपयोग शेवटी होणार नाही ५ कारण तुझी ही शक्ती जोपर्यंत प्रत्यक्ष काळ जवळ आलेला नाही तोपर्यंतच तू मिरवशील ६ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हा काळ जवळ नाही तोपर्यंतच तू काही करुन जन्ममृत्यूच्या चोऱ्यांशी लक्ष योनींच्या फेऱ्या चुकवीव ८७ कानडीनें केला मऱ्हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ॥ १ ॥ तैसे मज नको करु कमळापति । देईं या संगति सज्जनाची ॥ २ ॥ तिने पाचारिले इल या म्हणोन । येरु पळे आण जाली आता ॥ ३ ॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे शीण सुखा पोटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कानडीने-कर्नाटकातील कानडी बोलणाऱ्या स्त्रीने पाचारिले-बोलाविल एलदा-इकडे या, येह-हा नवरा आण-शपथ, येर येरा-एकमेकात विच्छिन्न-विसंगत अर्थ - आपणास संताची संगत हवी इतर कुणाची भलत्याची मिळाल्यास कसा शीण होतो ते या अभंगात बुवानी एक मोठ्या गमतीचे विनोदी उदाहरण घेऊन सिद्ध केले आहे एकदा एका कानडी भाषाच जाणणाऱ्या स्त्रीने मराठी बोलणाऱ्या माणसाशी लग्न केले पण संसार सुरु झाल्यावर एकाचे बोलणे दुसऱ्यास समजेना असा प्रसंग आला हे कमलापती विष्णू, मला मात्र तशी अवस्था देऊ नकोस, मला संताचीच संगत हवी २ नाही तर काय होईल पाहा, त्या कानडी बाईने 'इलबा-इकडे या' म्हणून नवऱ्याला बोलविले, पण नवऱ्याला वाटले हिन आपणास 'आ' शपथ म्हणून भलतीच शपथ घेतली त्यामुळे तो पळून जाऊ लागला ३ तुकाराममहाराज म्हणतात एकमेकास जे विसंगत असते त्यापासून सुख होण्याऐवजी दुःखच मोठे होते ४ ८८ सुख पाहता जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ १ ॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचे वचन ॥ २ ॥ नैलें रात्रीने तें अर्धं । बाळपण जराव्याधें ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुती जसी मूढा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जवापाडे-जवा एवढ अल्प जराव्याधें-म्हातारपण व रोग यांनी, पुढा-पुढील जन्म अर्थ - या संसारात माणसांस सुख जवाएवढे सुद्धा लाभत नाही उलट दुःख मात्र पर्वताएवढे अनुभवास येते १ याची आठवण धरुन मना, तू संताच्या उपदेशाप्रमाणे वाग २ कारण तुझे आयुष्य पाहा कसे चालले आहे निम्मे रात्रीच्या झोपेतच गेले काही बाळपणात गेले, काही म्हातारपणात व नाना रोगाच्या व्याधीत जाईल ३ आणि संतवचनाच्या साह्याने काही आताच उपाय न करोल तर पुढील जन्मीही तू असाच घाण्याला जुंपला जाशील ४ विवरण - तुकाराम महाराजांचा हा एक छोटा परंतु सर्वप्रसिद्ध असा अभंग असून यात मानवी समाजाच चित्र सथेपान पण यथायतनें रेखाटलं आहे या संसाराचा एकंदर अनुभव काय आहे ? हा संसार दुखमय की सुखमय ? संताचे उत्तर ठाम आहे आह की ईश्वरकृपा झाल्यास सर्वच सुखमय होऊन जात, मग दुःखेहा सुखच वाटतात परंतु ही अवस्था महतामहती सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी येत नाही तो संसारातील बाह्य वस्तूतच सुख शोधता द्रव्य, मान, कीर्ति, घर जमीन लौकिक यांच्या बाधीन मुख वाढेल अशी त्याची कल्पना असते पण ईश्वरी कृपेचिवाय हे सर्व व्यर्थ आह असाच त्याचा अनुभव असतो सब याह्य लौकिकाच्या वाढीबरोबरही ईश्वराशिवाय सुख जवा एवढे सुद्धा न दिसता दुःख मात्र पर्वताएवढे अनुभवास यत कारण या लौकिक गोष्टीच्या वागनेच सार आयुष्य व्यर्थ होाने ईश्वराकडे पाहण्यास वा त्याचे स्मरण करण्यास तुषाम वेळ आहे ? सुखदुःखाची रचनाच मुळात चुकलेली असते सुख म्हणजे काय ? दुख म्हणजे काय ? आपल्या शास्त्र- कारांनी शास्त्रीय व तात्त्विक पद्धतीने विचार केलेला आहे 'जे केवळ बुद्धीनेच ग्राह्य असून व ज इंद्रियातीत असत तेच आत्यंतिक सुख होय' (सुखमात्यंतिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ६-२१) असा निश्चय भगवद्गीतेतच

दिला आहे. सर्वांची प्रवृत्ति सुखासाठीं असते हें स्पष्ट आहे. पण सुख म्हणजे काय ? जे आपणास इष्ट वाटते ते सुख व ज्याचा द्वेष वाटतो तें दुःख' (यदिएं तत्सुखं प्राहुः द्वेष्यं दुःखमिहेष्यते) अशी सुटसुटीत व्याख्या महाभारत- कारानी केली आहे, परंतु येथेही इष्ट कशास म्हणावे, अनिष्ट कशास म्हणावे असा प्रश्न निर्माण होतोच नैयायिकानी 'अनुकूलवेदनीयं सुखम्' 'प्रतिकूलवेदनीयं दुःखम्' अनुकूल वेदना सुख व प्रतिकूल दुःख अशी परिभाषा वापरली आहे

परंतु प्रतिकूल वेदना घालवून अनुकूल वेदना कशी संपादावी हेच भक्तिमार्गाच मुख्य रहस्य आहे. संसार मूळचाच दुःखमय असला तरी प्रभुकृपेच्या साहाय्याने त्याचे गोड रूप आनंदमय व सुखमय कस करायचे हे सतपुरुष शिकवितात या संसारात सुखाचा विचार वरवर तर कुठेच नाही 'सुख नाहीं कोठें आल्या संसारां' असाच अनुभव तुकारामबुवा इतरत्रही सांगतात मग हे सुख आहे तरी कोठे ? तुकारामानी याचे उत्तर दिले आहे, 'सुख पंढरिये आलें । पुंडलिका साठविले,' 'सुख या संतसमागमें । नित्य दुणावे तुशिया नामें', 'सुखरूप ऐसे कोण दुजें सांगा । माझ्या या पांडुरंगासारिखें,' । 'सुख वाटें तुझें वर्णिता पवाडे,' 'सुख वाटे याचि ठायां । बहु पायीं संतांचे', 'हेचि सर्वसुख जपावा विठ्ठल' अशा अनेक वचनातून श्रीविठ्ठल व त्याचे संत सज्जन यांच्याशिवाय दुसरीकडे सुख कधीन मिळणार नाही असे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले आहे ज्ञानेश्वरानीसुद्धा 'सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर' असेच म्हटले आहे

तेव्हा हे अलौकिक व शाश्वतच सुख मिळविण्यासाठी संतांची संगती हवी आणि ही केव्हा तरी वय झाल्यावर करावी असे नव्हे ईश्वराची भक्ती व संतसंगत याची जरूरी सुरुवातीपासूनच आहे कारण आपले आयुष्य नकळत कमी होत असते, आणि पुढे पुढे इंद्रियाची कार्यशक्तीही मंदावते आपल्या आयुष्याचा सहसा लक्षात न येणारा हिशेब बुवानी या अभंगात दिला आहे माणसाचे शंभर वर्षे आयुष्य मानले तर त्यातली निम्मी वर्षे रात्रीच्या झापण्यात जातात व बाळपण तारुण्य, जराच्याधी व्यसने यातही बरीच वर्षे जातात या सर्व गोष्टीचा विचार करून आपण सावध असावयास हवे मानवी आयुष्याचा असा हिशोब आपल्या प्राचीन ग्रंथातून अनेक ठिकाणी केला आहे भर्तृहरीने या आयुष्याचा हिशेब देताना सुख वाढून व कसे मिळणार असाच प्रश्न विचारला आहे.

आयुर्वर्षशतं नृणां परिमितं, रात्रौ तदर्थं गतं । तस्यार्धस्य परस्य चार्धमपरं बालत्ववृद्धत्वयोः ॥ शेषं व्याधि-वियोग-दुःखसहितं सेवादिभिर्नीयते । जीवे वारितरङ्गबुद्बुदसम सांख्यं कुत प्राणिनाम् ॥

माणसास आयुष्य शंभर वर्षांचे मानले तरी त्यातले अर्धे रात्रीच्या झोपेत जाते उरलेल्या अर्ध्यांतले बालपण, वार्धक्य यात व मग जे उरले ते सेवा, रोग, वियोग, दुःख यात नष्ट व्हायचे हे जीवनच मुळी पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असल्यामुळे माणसांस सुख कुठले ? संतांनी मात्र या प्रश्नाचे उत्तर वरीलप्रमाणे दिले आहे

८९ बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥ १ ॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ॥ २ ॥ जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - भांड-भांडखोर, बडबड्या

अर्थ - ईश्वरा, जे दुर्जन आहेत त्यांच्याशी बोलण्याचाही प्रसंग मजवर येऊ नये १ तुला विसरून संत निंदा करतात त्याची संगत नको २ अशा दुष्टाचे तोंड जळून जाये त्या भांडखोर व बडबड्या माणसाचे नावही दृष्टीसमोर नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरा, अशा माणसापासून मला दूर ठेव ४

सार्थ तुकारामगाथा ४१ ९० तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोध तैसेचि खळ ॥ १ ॥ का रे सिणलासी बाउगा । न भजता पाडुरंगा ॥ २ ॥ मानदंभासाठीं १। केली अक्षराची आटी ॥ ३ ॥ तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥ ४ ॥ वाटिलें तें धन । केली अहंता जतन ॥ ५ ॥ तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- खळ-दुष्ट, बाउगा-व्यर्थ, आटी-सायास, वर्म-मुख्य गोष्ट अर्थ :- वरवर कर्मे करणाऱ्या पण अंतरंगात ईश्वरप्रेम नसणाऱ्यांना उद्देशून बुवा म्हणतात, मोठमोठे यज्ञयाग करून अग्नीत तीळ व तांदूळ यांच्या आहुती दिल्या, त्याचा काय उपयोग ? काम, क्रोध हे दुष्ट विकार असेच्या तसेच राहिले ना ! १ पांडुरंगाला न भजता उगाच श्रम व्यर्थ का करता ? २ केवळ मानसन्मान मिळावा, कीर्ती वाढावी म्हणूनच ना अक्षरांची घोकपट्टी केली, पांडित्याचा धडेबाज माजविला ? ३ तपश्चर्या केली, तीर्थयात्रा केली यामुळे फक्त अभिमान तेवढा वाढला. ४ पुष्कळ दानधर्म करण्यासाठी धन वाटले, पण यातही मी दानधर्म केला ही अहंता उरलीच ५ तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगास स्मरण्याचे मुख्य रहस्यच न समजल्यामुळे या बाह्य कर्मकांडाने अधर्म मात्र घडला ६ विवरण - परमेश्वराचे स्मरण, नामसंकीर्तन, भजन, विठ्ठलभक्ती ही साधी साधन सोडून यागसाधना, शरीरकष्ट, तीर्थयात्रा, उपासतापास, दानधर्म वगैरेंच्या चक्रात सापडणाऱ्या लोकांना सावध करण्याचे काम तुकारामांनी अनेक अभंगातून केले आहे या वरवरच्या गोष्टीत विठ्ठलस्मरण नसेल तर वृथा अहंकार मात्र येऊन अधर्म घडतो ईश्वरासाठी घर सोडून जावे लागत नाही, प्रपंचाचा त्याग करावा अस नाही मोठमोठी यज्ञकर्मे करून काही साधण्याचीही जरूरी नाही 'न लगे सायास जाणे वनान्तरा । सुखें येतो घरां नारायण' अशी संतांची शिकवण आहे नामसंकीर्तन हे अतिशय सोपे असे साधन सांगितले आहे तीर्थयात्रानी व व्रतवैकल्यानी काय होणार? वृथा अभिमान मात्र वाढणार त्या ऐवजी 'तीर्थांचे जें मूळ वतावे जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये' आहे तेच जाणून घ्यावे असे संताना वाटते 'तीर्थे केलीं कोटिवरी । नाहीं देखिली पंढरी' तर सर्व व्यर्थ आहे असेच बुवाना म्हणावयाचे आहे ९१ भवसारतापें तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुबाची ॥ १ ॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ २ ॥ बहुता जन्मींचा जालो भारवाही । सुटिजें हें नाहीं वर्म ठावे ॥ ३ ॥ वेढियेलो चोरों अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करो कोणी माझी ॥ ४ ॥ बहु पागविलो बहु नागविलों । बहु दिवस जालो फासाविस ॥ ५ ॥ तुका म्हणे आता धाव घालीं वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - भवसारतापें-संसारातील त्रासामुळे, भारवाही-ओझे वाहणारा, सुटिजें हें-ज्या योगानें सुटाव असे, अंतर्बाह्यात्कारी-आतून, बाहून, कणव-दया, पागविलों-दुबळा, पंगू केला गेलो, वेगीं-लवकर, दीननाथा-गरिवाच्या नाथा अर्थ - स्वतःच्या परिस्थितीचे सत्य निवेदन करणारा हा एक तुकारामबुवाचा श्रेष्ठ असा अभंग आर्त्त हाकेने भारावलेला असा आहे यात ते म्हणतात, देवा, मी या माझ्या संसारातील त्रासांमुळे त्रासून गेलो आहे या कुटुंबियांची सेवा करता करता मी देवा, थकून गेलो आहे १ म्हणून देवा, तुझे पाय आठवले आहेत, म्हणून तुझें १ मान धन पोटासाठी तु गा ६

४२ | सार्थ तुकारामगाथा

स्मरण झाले आहे, माझ्या आईप्रमाणे तू आहेस, माय पांडुरंगे, तू माझ्यासाठी लोकर धावत ये २ पुष्कळ जन्मात जे काही पापपुण्य हातून घडले असेल त्यांच्या ओझ्याखाली मी दडपून गेलो आहे. यातून मुक्त व्हावे असे काही रहस्य मला सापडले नाही. ३ आतून व बाहेरून असा नाना प्रकाराच्या चोरांनी मी वेढलो गेलो आहे, माझी दया कुणासही येत नाही ४ देवा, याच्यामुळे मी फारच पंगू झालो असून माझी नागवणही फार झाली आहे. पुष्कळ दिवस झाले, मी अगदी कासावीस होऊन गेलो आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू दीनाचा नाथ आहेस ना ? दीनाचे रक्षण करणे हे तुझे ब्रीद आहे ना ? ते ब्रीद सांभाळण्यासाठी दीनानाथा, आता तू सत्वर धावून ये व माझे रक्षण कर ६

विवरण - तुकारामबुवांच्या परिजपर अथवा आत्मपर अभंगातील हा एक अतिशय महत्त्वाचा अभंग आहे. यात बुवांनी आपणास वैराग्य का व कसे प्राप्त झाले त्याचा संक्षेपाने निर्देश केला आहे आपणास संसाराचा फार त्रास झाला, लोकांनी आपणास फार नागविले, लुबाडले, चोरांनी आतबाहेर दरोडे घालून आपली लूट नेली कोणता त्रास तुकाराममहाराजांच्या संसारात होता ? कोणी त्यांना लुबाटिले? नागविले? स्वतःच्या संसारासबंधी आणखीही काही अभंगातून तुकारामबुवांनी अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे 'संसाराच्या नावें घालुनिया शून्य । वाढता हा पुण्य धर्म मेला,' संसाराचे ओझें वाहतां वाहविता । तुजविण अनंता नाहीं कोणी,' 'देव भक्तालागीं करुं नेदी संसार,' 'जाला हा वमन संसार,' 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' इत्यादी वचनातून असे प्रत्ययास येते की बुवांचा संसार वरवर तरी सुखाचा झाला नसावा

प्रारंभी प्रारंभी तरी तुकोबांना संसाराची वर्षे बरी गेली असावीत दुकानदारी चांगली चालत असावी घरांत महाजनकी होती परंतु पुढे एकामागून एक अशी सांसारिक दुःखे त्यांच्यावर कोसळली 'मातापिता बंधु सज्जन । परी उदंड धनधान्य । शरीरीं आरोग्य लोकात मान्य । एकही उणे असे ना' अशी परिस्थिती असताना तुकारामावर अनेक आघात सतत होत राहिले 'बाप मेला न कळतां' यावरून बुवांच्या ऐन वयाच्या वेळी त्यांचे वडील एकाएकी मरण पावले असे दिसते मग संसाराची सर्व जबाबदारी त्यांच्याचवर येऊन पडली आईही थोड्याच दिवसात मरण पावली तुकारामबुवांचा बंधू सावजी याची बायकोही याच सुमारास मृत्यू पावली व आधीच वैराग्यशील असणारा सावजी घर सोडून तीर्थयात्रेरा निघून गेला. तुकारामाचे एक मूल व पहिली स्त्री हीही माणसे दगावली या भयानक अशा मृत्यूच्या थैमानामुळे आधीच बोबळे असलेले तुकारामाचे मन व्यथित झाले दुसरी पत्नी त्यांचे मन हळुवारपणे सांभाळील अशी नव्हती

घरातील या आघातात बाह्य स्थितीचेही प्रहार त्यांच्या मनावर सतत झाले व्यथित चित्त असल्यामुळे अद्यावर, दुकानदारीवर मन राहिले नाही त्यात दिवाळे निघण्याची वेळ आली दुष्काळाची भर पडून माणसे व दावणीची गुरे हैराण झाली या वेळच्या दुष्काळांचे स्वरूपही भयानक होते 'पर्जन्य गेला देशान्नून । दुष्काळ आला पुढें कठिन । मुलें माणसे खायावांवून । होतीं हैरान सर्वथा' असे वर्णन या काळाचे महिपतीने केले आहे तुकोबाचा व्यापार चालेना, द्रव्यहानी फार झाली जगात अपमान झाला 'सावकार पिटिती दपाळ । लाता हळहळ करी' अशा भयंकर अवस्थेत बुवा सापडले होते 'एकविसाव्यात विपरीत काळ । तुकयासि पातला हरकाळ । तेव्हा निघताचि दिवाळें । सोइरे सकल हासती' अशा परिस्थितीत बुवांचे मन खिन्न झाले स्वत तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका महत्त्वाच्या अभंगात म्हटले आहे की, 'खटतारें जालों अति दुःखी दुःखी । मायबाप सेसों धर्मलिया । बहु पीडिलों संसारें-' घरातील जिवलगाचा मृत्यू, सन १६३०-३१ चा भयंकर दुष्काळ व त्यायोगे झालेली व्यापारहानी यामी तुकारामबुवा विव्हळ होऊन गेले 'मंद झाल्या मेघवृष्टि', 'अपीक धान्यें दिवसेदिवस', 'भेप पडो भोती' अशा भोवतालच्या भीषण स्थितीचे बुवांनी आपल्या अभंगातून उल्लेख केले आहेत त्यांना समकालीन वाङ्मयपत्रांचाही पुरावा मिळतो समर्थ रामदास स्वामींनी या असमानी संकटाचे हृदयभेदक वर्णन केले आहे 'काळ बुष्काळे कहर पडता', 'पाथली ज्वारीस एक दोन अशी धारण बसली', 'उपवासीं मरो लागलो' असे उल्लेख त्या वेळच्या सरकारी वाङ्मयपत्रातूनही मिळतात

सार्थ तुकारामगाथा ४३ तुकारामबुवांना असा हा संसाराचा ताप आतून व बाहेरून झालेला होता त्याचे चित्त कासावीस झाले असून करुणेने द्रवले होते याच करुणपोटी त्यांनी श्रीविठ्ठलाला 'माय पांडुरंगे!' म्हणून हाक मारली तुकोबा संसारतापाने त्रस्त झाले म्हणून त्यांना विठ्ठलाचे पाय आठविले असे जरी या अभंगात म्हटले असले तरी त्याचा अर्थ सावधतेने समजावून घ्यावयास हवा संसारताप व दुष्काळ ही वरवरची कारणे प्रभावी दिसतात हे खरे असले तरी 'बहुत सुकृतांची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी' हेही खरे आहे 'पंढरीची वारी आहे माझ्या घरीं' असे त्यांनीच म्हटले आहे 'माझ्या वडिलांची मिरासी गा देवा' या अभंगात 'वंशपरंपरा दास मी अंकित' म्हणून त्यांनी स्वतःचा उल्लेख केला आहे तुकारामबुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा यांनी देहूस एक विठ्ठलाचे देऊळ बांधले होतेच तेव्हा या वंशात जी भूमी पहिल्‍यापासूनच तयार होत होती तीमध्ये वैराग्याचे व प्रतिकूल परिस्थितीचे बीज पडले व देहूच्या भूमीत इंद्रायणीकाठी जे 'परब्रह्म मुहाडले' ते तुकारामबुवांच्या रूपाने साकारले ९२ भक्तऋणी देव बोलतीं पुराणे । निर्धार वचनें साच करीं ॥ १ ॥ मागें काय जाणे अडकिली वार्त्ता । कबीर सातें जातां घडिया घाटीं ॥ २ ॥ माझारिया धन आणिले घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥ ३ ॥ नामदेवाचिया घरासि आणिले । तेणे लुटविले द्विजा हातीं ॥ ४ ॥ प्रत्यक्षासि काय द्यावें हे प्रमाण । व्यकोवाचे ऋण फेडियेले ॥ ५ ॥ बीज दळोनिया केली आराधना । लागे नारायणा पेरणे तें ॥ ६ ॥ तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तोचि एक ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - भक्तऋणी-भक्ताच्या ऋणात असणारा, कबीर-उत्तर हिंदुस्तानातील पंधराव्या शत कातील प्रसिद्ध साधु कवी, सातें जाता-बाजारात जाताना, घडिया-विणल्या वस्त्रांच्या घडया, नामदेव-ज्ञानेश्वरांच्या समकालीन प्रसिद्ध भगवद्भक्त व संतकवी (१२७०-१३५०, ) व्यकोवा-एकोबा म्हणजे एकनाथ अशा पाठामुळे अर्थ स्पष्ट होतो अर्थ - पुराणे असे सांगतात की देव, हा भक्ताच्या ऋणात पक्त आहे देवा, ही वचने खरी करून दाखवाल ना ? १ मागें काय घडले पुणाल माहित ? पण असे ऐकतो खरे की कबीर नावाच्या एका भक्ताने बाजारास कापड विकावयास जाताना गरीबाना ती वस्त्रे वाटून टाकली २ मग घरी येऊन पाहतो ते देवाने त्या सर्व वस्त्राची किंमत आणून दिली आहे पण कबीराने ती घेतली नाही ३ नामदेवानी असेच केले त्यानीही असेच कापड वाटून टाकले व मग देवाने त्या पैशाची व्यवस्था करून सर्व किंमत घरी आणून दिली, पण नामदेवानीही ती घेतली नाही, ब्राह्मणाना ते धन वाटून टाकले ४ इतके कशास हवे ? प्रत्यक्षास प्रमाण नकोच एकनाथाचेही असेच ऋण देवाने फेडले ५ दुसऱ्या एका प्रसंगी पेरावयाचे बी दळन घरी आलेल्या संताच्या भोजनाची व्यवस्था एका संताने केली तेव्हा त्याच्या शेतात पेरणी करायचे कामही देवाला करावे लागले ६ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर आपल्या भक्ताची एवढी काळजी घेतो पण यावर ज्याचा विश्वासच नाही तो खरोखर जन्माला येऊन फसलाच म्हणावया ७ विवरण - देव हा भक्ताच्या ऋणात सुखावतो व तो आपल्या एकनिष्ठ भक्ताचे काही कमी पडू देत नाही, हा संतवाङ्मयात व चरित्रात वारंवार येणारा विचार तुकाराम महाराजांनी काही पूर्वीची उदाहरणे देऊन व्यक्त केला आहे कबीर, नामदेव व व्यकोवा किंवा एकोबा याची त्याना माहित असलेली हकीकत सांगितली आहे या प्रत्येकाच्या जीवितातील ऐतिहासिक प्रसंगाचा शोध घेणे कठिण काम आहे कबीर हा उत्तर हिंदुस्थानातील एक थोर संत पुरुष ज्ञानेश्वरांच्यावरच्या काळात होऊन गेला योगसंप्रदाय वैष्णवपंथ, सूफीसंप्रदाय याचे चमत्कारिक मिश्रण त्याच्या शिकवणुकीत दिसून येते काही तुकारामाप्रमाणेच फटकळपणे बोलून समाजातील ढोंगे दूर करणारा होता याचा वस्त्रे विणण्याचा धंदा होता ईश्वराच नामस्मरण करीत तो आपल्या उद्योगात रमून जाई नामदेव १ खरी, २ एकोबाच

४४ सार्थ तुकारामगाथा


हे बालभक्त म्हणून पंढरपुरास ज्ञानेश्वराच्या काळातच प्रसिद्धीस आले होते ते शिंपी जातीचे असून कापड विकण्याचा त्याचा धंदा होता तुकाराम महाराजांनी आणखी एका संताचे उदाहरण दिले आहे ते त्याच्या आधीच थोड्याच वर्षांत होऊन गेलेल्या एकनाथाचे आहे परंतु हे एकोबा अभंगात व्यंकोबा म्हणून उल्लेखलेले आहेत 'व्यंकोबा' हाच पाठ बरोबर असण्याची शक्यता आहे हे व्यंकोबा तुबाच्या समकालीन संत वाय ? कारण कबीर व नामदेव ही दोन जुन्या काळची उदाहरणे दिल्यानंतर 'प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण' म्हणून अगदी नजीकचा उल्लेख करीत आहेत कदाचित एकोबा म्हणजे एकनाथ हेही त्यांना काळच्या दृष्टीने कालचेपरवाचे वाटत असावेत कारण एकनाथाच्या निर्याणानंतर आठनऊ वर्षांतच तुकोबाचा जन्म झाला

९३ भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥ १ ॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अगोंच अधर्म ॥ २ ॥ देव अंतरे ते पाप । खोटे उगवा सकल्प ॥ ३ ॥ तुफा म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा¹ पोटीं ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - उफराटें-उलटे, अंतरे-दूर होतो, उगवा-उलगडा करून घ्या

अर्थ - मनात ईश्वराविषयी भाव असला म्हणजे नाना विषयांचे भोग घेत असतानाही त्याग घडतात व ईश्वराविषयी निष्ठा नसेल तर मात्र वरवर त्याग करीत असतानाही तो भोगच होतो १ असे हे धर्माचे रहस्य उलटेसुलटे आहे वद्यो धर्मामध्येच अधर्म दिसतो, अधर्मातच धर्म असतो २ एवढे लक्षात असू द्या की ज्यामुळे देव अंतरतो ते पापकर्म समजावे, म्हणून आपल्या कर्माचे खरेखोटेपंग नीट समजावून घ्यावे, त्याच्या स्वरूपाचा उलगडा करून घ्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या कर्माविषयी परीक्षा न करता संकल्प करणे ही भीड खोटी आहे विचार करून भिडेचा त्याग करणे श्रेयस्कर असते ४

९४ भोरप्याने सोंग पालटिले वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसे ॥ १ ॥ टिळे माळा मेद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ २ ॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फासा कळो नेदी ॥ ३ ॥ खाटिक हा स्नेहभावें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परो तू कृपावत पाडुरंगा ॥ ५ ॥

शब्दार्थ व टीपा - भोरप्याने-बहुरूप्याने बक-बगळा, मद-बाटमारे लोक डीवर-मासे धरणारा, स्नेहभावें-मोठ्या प्रेमाने

अर्थ - आपल्या कमकुवत मनाची मोठ्या विनयाने व प्रांजळपणे कबुली देताना तुका म्हणत आहेत, परमेश्वरा, बहुरूप्याने वरवरची अशी नाना प्रकाराची सोंगे धारण केली तरी तो निराळाच असतो व बगळ्याने डोळे मिटून ध्यानाची बतावणी केली तरी त्याचे चित्त माशावरच असते १ एखाद्या वाटमाऱ्याने गळ्यात माळा घातल्या किंवा मुद्रा लावल्या अंगावर तरी त्याचे अंतरंग निराळेच असते फांसे टाकून प्राण्यांना पकडण्याचे त्यांचे फसब दिसून येत नाही इतकेच २ माशांना गळाला खाण्याचा पदार्थ लावून मासेमारी लोक आमिष दाखवितात, पण त्यांना त्या गळात असणारा फास दिसत नाही ३ एखादा खाटिक मोठ्या प्रेमाने शेळ्यामेंढ्या पाळतो, त्यांना खायला घालतो, पण त्याचा हेतू या प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाण्याचाच असतो हे वरवर दिसत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व उदाहरणांप्रमाणेच मी वरवर लोकात बरा दिसत असेन, साधू वाटत असेन, पण माझे अंतरंग अजून शुद्ध नाही, प्रभू पांडुरंगा, तू कृपाळू आहेस म्हणून सारे निभावते एवढच ५


१ विचाराच्या

सार्थ तुकारामगाथा ४५ ९५ गेलो वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥ १ ॥ मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ २ ॥ भंगलीया चित्ता । न ये काशानें सांदितां १ ॥ ३ ॥ तुका म्हणे धीर । भंगल्या पाठीं फीर ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वीरसरी-वीरश्री, पराक्रम, भंगलिया-मोडून गेलेल्या, काशानें-कशानेही, सांदिता- सांधिता, जोडता, फीर-बरोबर, उचित. अर्थ - एकदा का अंगातील वीरश्री नाहीशी झाली, पराक्रम संपला, मग त्यास एखादी सामान्य स्त्री देखील फजीत करू शकते १ मग मात्र पूर्वी जशी सत्ता होती तशी परत आणता येत नाही. २ एकदा चित्त कोणत्याही कारणाने भंगले की मग ते कशानेही साधता येणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर एकदा का धीर सुटला की मग त्याची कीव किती करावी ? ४ ९६ युक्ताहार न लगे आणिक साधने । अल्प नारायणें दाखविलें ॥ १ ॥ कलियुगामाजीं करावें कीर्तन । तेणें नारायण येईल भेटी ॥ २ ॥ न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । ध्यावें वनांतर भस्म दंड ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसतो ते वाव नामाविण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- युक्ताहार-फलमूलादिकाचा जपजाप्य करतानाचा आहार, न लगे-लागत नाही, आणिक-दुसरी, अल्प-अगदी थोडक्यात, वेव्हार-व्यवहार, व्यवसाय, वाव-व्यर्थ. अर्थ - जपजाप्याची साधने करताना घ्यावयाचा फलमूलादिकाचा आहार पाळणे, त्याची नीट व्यवस्था करणे किंवा यासारखी आणखी काही कर्मकाडात्मक साधने करणे याची जरूरी लागत नाही. परमेश्वराने फार थोडक्यात असा मार्ग दाखविला आहे. १ या कलियुगात कीर्तनभक्ती हाच एक मार्ग सांगितला आहे, या कीर्तना- मुळेच परमेश्वराची भेट होईल. २ रोजचा व्यवहार अथवा लौकिक आचार सोडण्याचीही जरूरी नाही, वनात तपस्येसाठी जावयास नको, भस्म धारण करून, हातात दंड घेऊन सन्यासी किंवा वैरागी होण्याची जरूरी नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरप्राप्तीसाठी या कीर्तनाखेरीज आणखी इतर उपाय व्यर्थ आहेत. एक नामस्मरण व कीर्तन यांनीच देव सतुष्ट होईल. ४ विवरण - वारकरी पंथात नामभक्ती, कीर्तनभक्ती हेच एक ईश्वरप्राप्तीचे साधन सर्वांना अतिशय सुलभ असे सांगितले आहे. जपजाप्य, योगयाग, ध्यानधारणा, वनातील तपश्चर्या, उपासतपास, यज्ञकर्म, खडतर जागरण याची काही जरूरी आहे असे नाही 'आता गृहादिक आचर्ये । ते कांहीं न लगे त्यजावे' म्हणून ज्ञानेश्वरीत सांगितले आहे तुकाराम बुवांनीही 'न लगे सायास जाणे वनांतरा । सुखें घरा येतो नारायण' म्हणून या साधनमार्गांचे महत्त्व वर्णन केले आहे. रानावनात जाऊन यज्ञयाग वगैरे करण्याची किंवा शरीराला कष्ट देऊन योगसाधन करण्याची जरूरी या कलियुगात नाही असा निश्चय भागवत सांप्रदायिकांनी केलेला आहे 'क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्त- चेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते'- अव्यक्ताच्या ठिकाणी चित्त लावून बसणाऱ्यांना क्लेश अधिक होतात, कारण या उपासनेचा मार्ग कष्टकारक असतो असे भगवद्गीतेतही म्हटले आहे तेव्हा या कष्टाच्या व त्रासाच्या मार्गाला जाण्याचे कारणच नाही असे साधुसंतांचे सांगणे आहे 'म्हणोनि योगाचिया वाटा । जे निघाले गा सुभटा । तया दुःखाचाचि वाटा । भागा आला ।' असा स्पष्ट निर्णय ज्ञानदेवानी दिला आहे या कष्टदायक मार्गापेक्षा नामसंकीर्तनानी भक्ती सर्वांना अतिशय सुलभ व ईश्वराची प्राप्ती करून देणारी आहे नवविधा भक्तीतही कीर्तनास विशेष प्राधान्य आहे. भागवत संप्रदायात नामदेवापासून सर्वांनी याच कीर्तन- भक्तीचा प्रसार केला आहे. नामदेव महाराज हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होत. 'सुंभाचा वरदोटा रक्तयाची १. सांधिता

४६ सार्थ तुकारामगाथा लंगोटी । नामा वाळवंटीं कीर्तन करी' म्हणून नामदेवांचे वर्णन आहे. गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन व लीलासंकीर्तन असे कीर्तनाचे तीन प्रकार प्राचीन काळापासून मानण्यात आले आहेत. भगवान नारदमुनी हे कीर्तनसंस्थेचे आद्य प्रवर्तक होत. भागवतपुराण, नारदपुराण यातून कीर्तनाचे माहात्म्य विस्ताराने वर्णन केले आहे. स्त्रीशूद्रादिकांपर्यंत सर्वांना सुलभ असणारे हे साधन महाराष्ट्रातही लोकप्रिय झाले. नारद, परीक्षिती, ध्रुव, व्यास, वाल्मीकी यांचीही नावे या परंपरेशी निगडित आहेत. नारदाची वीणा आजही कीर्तनकारांना अतिशय प्रिय आहे. नामदेव, ज्ञानदेव, चोखादा, एकनाथ, तुकाराम रामदास या सर्वांनीच कीर्तनावर भर दिला होता. 'नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं।' अशी नामदेवांची प्रतिज्ञा आहे. तुकाराम महाराजांचे तर शेकडो अभंग कीर्तनाचा महिमा वर्णन करणारे आहेत 'सोपें धर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा- 'अमृत हें क्षीर हरिकथा माउली । सेवितो सेविली वैष्णवजनीं', 'आनंदें कीर्तन कथा हरी प्रोष । आवडीचा रस प्रेमसुखें' 'कथा देवाचे ध्यान । कथा साधन महन । हृदयाऐसें पुण्य आणिक नाहीं सर्वथा' अशी शेकडो वचने कीर्तनाचे माहात्म्य सांगणारी मिळतात. रामदासांनाही या कीर्तनभक्तीचे मोठे प्रेम होते. 'भगवंतास कीर्तन प्रिय । कीर्तने समाधान होय । बहुन जनांसी उपाय । हरिकीर्तने कलियुगीं' असे सांगून समर्थांनी कीर्तनाचे महत्त्व विशद केले आहे. कलियुगात मान्यता पावलेल्या या कीर्तनभक्तीचा महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर आधुनिक काळातही झाला. हरिदासी व वारकरी अशा दोन पद्धती मुख्यतः आज कीर्तनभक्तीच्या दिसतात. नृत्य, संगीत, वाद्य यांच्या साह्याने परमेश्वराचे गुणगान कीर्तनात सामुदायिक रीतीने साधता येते. नमन, स्तवन, सद्गुरुस्मरण झाल्यावर बहुधा तुकारामाचाच अभंग निरूपणास घेऊन तत्त्वज्ञान वा परमार्थ यांचे निरूपण प्रथमार्धात करण्याचा प्रघात आहे. हा झाला पूर्वरंग, आणि उत्तररंगात पहिल्या निरूपणास शोभेल अशा एका भक्ताचे, संताचे समग्र चरित्र कथात्मक पद्धतीने सांगावयाचे असे स्थूल स्वरूप आजही कीर्तनाचे टिकून आहे. ९७ कंठी कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥ १ ॥ हो का नर १ अथवा नारी । राड तयें नांवे खरी ॥ २ ॥ नाहीं हाती दान । शूरपणाचे काकण ॥ ३ ॥ बाळियेली संतों । केली वोडोनि फजिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ताळा । नाही त्याची अवकळा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - कंठी-गळ्यात; कृष्णमणी-श्रीकृष्णाच्या नामाचा मणी. बाळियेली-दूर काढल; वोडोनि-हजामत करुन, निकरान टीका करून. ताळा-मर्यादा. अर्थ - ज्याच्या गळ्यात श्रीकृष्ण नामाचा मणी नाही त्याची वाणी कितीही गोड असली तरी अशुभच समजावी. १ मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ती रांड व तो रंड्या अशीच नावे त्यांना शोभून दिसतात. २ ज्याच्या हातात दान देणारे शूरपणाचे कंकण नाही त्याचा काय उपयोग ? ३ अशा स्त्रीपुरुषांना संतांनी आपल्या मेळ्यातून दूर काढले असून त्यांनी त्यांची पुरती फजिती केली आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा ताळ सुटला आहे म्हणजे ज्याच्या वागण्यात मुळीच मर्यादा नाही असे झाले आहे त्यास अवकळाच येणार, त्याचा नाश होणार. ५ ९८ माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥ १ ॥ विषयीं लपट शिकवी कुविद्या । मनामागे नाद्या होऊनि फिरे ॥ २ ॥ करुनी खातां पाक' जिरे सुरण राई । करिता अतित्याई दुःख पावे ॥ ३ ॥ औषध द्यावया चाळविले बाळा । दावूनिया गुळा दृष्टीपुढें ॥ ४ ॥ तरावया आधीं शोधा देववाणी । वाटत बोलणीं द्वारा त्याचीं ॥ ५ ॥ तुका म्हणे जया पिंडाचे पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥ ६ ॥ १ पुरुष

शब्दार्थ व टीपा :- माया-ईश्वरी शक्ती, अविद्या, भ्रम, ब्रह्म-ईश्वर, परमात्मा, जगाचे आदिकारण, मायाब्रह्म याची वरवर एकसारखी चर्चा करून लोकांना फसविणाऱ्या भोंदू गुरूंच्यावर उपरोधाने टीका करण्यासाठी हे शब्द वापरले आहेत, घमंडक-भोंदू लोक, नागविले-लुटले, नांदा-हो हो करणारा नंदीबैल, अतिष्याई-अत्याचार, पंज़िट-फ्रेज, पिंडाचे-शरीराचे. अर्थ:- जगात वरवर दिसणारा जो प्रपंच ती माया व खरे असणारे ब्रह्म अशा भावेत मायाब्रह्माचे भोंदू साधुलोक निरूपण करतात किंवा वरवर दिसणारा मायिक पसारा हेच ते ब्रह्माचे रूप मानतात. असे विवेचन करून ते स्वतःही फसतात व स्वतःप्रमाणेच इतरांनाही फसविततात. १ अशी माणसे केवळ विषयामध्ये आसक्त असतात व लोकांना वाटेल तसा खोटा बोध करतात आणि आपण मात्र स्वतः ओढाळ मनामागे नंदीप्रमाणे होऊन फिरतात. २ कोणतीही गोष्ट नीट रीतीने करायला हवी. नीट स्वयंपाक करून राई व सुरण या दोन्ही वस्तू शिजल्यावर त्या पचतील, पण अत्याचार करून त्या तशाच कच्च्याच खाल्ल्या तर मात्र खाणारास दुःख होईल. ३ कडू औषध द्यायचे असेल तर गुळासारखा गोड पदार्थ पुढे करून लहान मुलाची समजूत घालावी लागते. ४ म्हणून खरोखरी असे आहे की आपणांस तरायचे असेल तर अगोदर वेदवाणी काय आहे ते शोधा, ती समजावून घ्या व अशा भोंदू लोकांची वृथा बोलणी प्रथम दूर करा. ५ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांचे केवळ शरीरपोषण हेच एक ध्येय असते त्यांची व ईश्वराची भेट कधीही होणार नाही. ६ विवरण :- भोंदू साधुसंतापासून सावध असावे असे सांगताना तुकाराम महाराज या अभंगात 'तरावया आधी शोधा वेदवाणी' असे सांगतात हे ध्यानात घ्यावयास हवे. भागवत संप्रदाय किंवा वारकरी पंथ जरी गीता- भागवतादी ग्रंथातून आकारास आला असला तरी त्यास वेदांचे व उपनिषदांचे महत्त्व मान्यच आहे. सर्व उपनिषदांचे सार गीतेत आले आहे व त्यावर भागवत धर्माची इमारत उभी आहे वेदविरोधी असे भागवत धर्मात काहीही नाही कालमानाप्रमाणे जातिबंधने व वर्णव्यवस्था यांच्या विचारात थोडाफार बदल संतांनी सुचविला असला तरी वेदांचे महत्त्व त्यांनी अनेकदा मान्य केले आहे 'वेदु स्पृष्टु होय ठावँ । परी कृपणु ऐसा आनु नाहीं' अशी टीका ज्ञानदेवांनी केली असली तरी भाषेपुरती मर्यादित आहे. सर्वांना सुलभ होईल अशा लोकभाषेत परमार्थनिरूपण करावे अशा भूमिकेवर हे लिहिणे आहे. पुढील संतांनी वेदमान्यतेचेच धोरण स्वीकारले आहे. वेदांचेच सार तुकारामांनी 'वेद अनंत घोलिला । अर्थ इतकाचि साधिला ॥ विठोबासी शरण जावें' अशा शब्दांत काढले आहे. 'सकळ शास्त्रांचे हे सार । हैं वेदांचें गव्हार' म्हणून आणखी एका अभंगात बुवांनी वेदगौरव केलेला आहे 'वेदविहित तुम्हीं आइका हो कर्म । योजितों तीं धर्म संतांपुढें' या अभंगात तुकाराम महाराजांनी सर्वांची वेदविहित अशी कर्मे सांगितली आहेत. इतकेच नव्हे तर आपण प्राकृत वाणीच बोलत असू व उच्च कुळात आपला जन्म झाला नसला तरी प्रभुकृपेने आपणास केवढे सामर्थ्य आले आहे याचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, 'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।' सारांश, वारकरी पंथातील संतांना अभिमान हा स्पष्ट आहे. एका विशिष्ट सूत्रांत जोडलेल्या परंपरेतून वेदापासूनच भागवत धर्माचा विकास झाला आहे. हा ओघ अखंड आहे. 'हैं धर्मजात आघवे । युगायुगीं म्या रखायें । ऐसा ओघ हा स्वभावें । आद्य असे' अशी ज्ञानेश्वराची साक्ष आहे. ९९ मृगजळ दिसे साचपणा ऐसें । लोटियाचें पिसें ऊर फोडी ॥ १ ॥ जाणोनि कां करा आपुलाले घात । विचार रे हित लवलाहीं ॥ २ ॥ संचित सांगातीं बोळवणें सर्वै । आचरलें द्यावें फळ तेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे शेखीं स्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगो सर्वै ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मृगजळ-हरिणांना वाटणारा पाण्याचा भास, साचपणा ऐसे-सत्यासारखे, संचित-पूर्वे जन्मीचे कर्म, सांगातीं-बरोबर, शेखीं-शेवटी, आगीसवें-अग्नीबरोबर अर्थ :- मृगजळ हे खरे नसूनही बिचारी हरणे धापा टाकीत टाकीत त्याच्या मागे धावतात, त्यांना ते पाणी खरेच वाटते. १ या प्रमाणे वरवरचा देहादिक प्रपंच खरा नाही असे जाणून आपला घात करण्याचे थांबवा, व

४८ सार्थ तुकारामगाथा आपल्या हिताचा विचार लौकर करा २ आपले पूर्वसंचित जे कर्म असेल तेच आपल्या बरोबर असून आपली पाठवणी तेच करीत असते. जैसे आपले कर्म तसे आपणास फळ मिळते ३ शेवटी आपला देह जोपर्यंत स्मशा- नातच जाणार आहे तोपर्यंत त्याचा संबंध अग्नीशी व गोवरीशीच यायचा हे नाकारून कसे चालेल ? ४ १०० गौळीयाचीं ताकपिंरें । कोण' पोरें चांगलीं ॥ १ ॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ २ ॥ काय उपास पडिले होते । कण्यामोवते विदुरांच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ताकपिंरे-ताक पिणारी, विदूर-धृतराष्ट्र व पंडू याचा धर्मनिष्ठ भाऊ, कुब्जा-पाठीला वांक असलेली कंसाची एक बुरुप दासी अर्थ:- भक्तीसाठी परमेश्वर किती लालचावलेला असतो हे सांगण्यासाठी तुकारामबुवा सांगतात, गवळ्यांची ताक पिणारी ती पोरे ! काय त्यांच्यात लोभ पडण्यासारखे होते ? १ पण श्रीकृष्णास त्यांचा केवढा मोठा छंद होता ! कारण त्यांची सेवा व त्यांची भक्ती यांची थोरवी फार होती २ विदुराच्या कण्या देवांनी मोठ्या प्रेमाने खाल्या, त्यावेळी काय देवाला उपवास पडले होते ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती कंसाघरची दासी पाठीला पोंक आल्यामुळे अष्टवक्रा झाली होती, पण अशी विरूप झालेली व हीन कळा असलेली दासी ही ईश्वराला सौंदर्याची राशी वाटली कारण एकच देवाला केवळ भक्ती प्रिय आहे विवरण :- भक्तीचे महिमान सांगणारा एक महत्त्वाचा अभंग आहे हा शुद्ध प्रेमास भुकेलेला ईश्वर आपल्या भक्ताचे रूप, त्याची जात, त्याचे पूर्वकर्म वगैरे काही न पाहता केवळ त्याचे भाव पाहतो हे सांगण्यासाठी वरवर हीन किंवा क्षुल्लक दिसणाऱ्या काही थोर भक्तांचा उल्लेख तुकारामबुवांनी येथे केला आहे लहानपणी गोकुळात असताना गवळ्याची मुले घेऊन श्रीकृष्ण अनेक खेळ खेळले, ती गवळ्याची मुले ! काय त्यांना रूप असणार ? की त्यांना प्रगल्भ बुद्धी असणार ? का ती धनवंत होती ? पण ईश्वरास या गोष्टीची जरूरी नसते त्याला फक्त प्रेम हवे असते ते या बावळ्या पोरांच्यात होते विदुर हा अंबिका नावाच्या दासीपासून झालेला मुलगा शूद्र स्त्रीपासून याची निर्मिती म्हणून याला धृतराष्ट्र व पंडू यांची बंधुत्वाचे नाते असूनही राज्य मिळाले नाही पण हा मोठा धर्मनिष्ठ होता श्रीकृष्णावर याचे फार प्रेम होते याची श्रीकृष्णभक्ती थोर असल्याने याच्या घरच्या कण्याही श्रीकृष्णास गोड लागल्या आणि ती कंसाघरची दासी कुब्जा ? अंग वाकडे झाल्याने कुरूप दिसत असे त्रेता युगातील शूर्पणखेची दासी मधुरा शापाने द्वापरयुगात कंसदासी कुब्जा बनली होती पण तिच्या मनात कृष्णाविषयी अपार प्रेम असल्याने श्रीकृष्णाने तिला जवळ करून सुस्वरूप केले १०१ आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आपुलाचा ॥ १ ॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ २ ॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनिया मन एकविध ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दंडवत-नमस्कार, व्यापार-कामे अर्थ :- माझा सर्व प्राणिमात्रांना आता हाच उपदेश आहे की त्यांनी आपल्या आयुष्याचा नाश करू नये. १ सर्वांच्या पायावर डोके ठेवून मी विनंती करीत आहे की सर्वांनी आपापले चित्त शुद्ध करून विठ्ठलाची भक्ती करावी. २ ईश्वराचे चिंतन सतत करणे हेच हितकारक असल्यामुळे ते मन शुद्ध ठेवून करावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे हिताचे असेल ते लक्षात ठेवून आपली कामे करीत जावीत, आता आणखीन काय सांगावे ? ४ १ काय

सार्थ तुकारामगाथा ४९ १०२ भक्ताविण देवा । कैंचे रूप घडे सेवा ॥ १ ॥ शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ॥ २ ॥ देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥ ३ ॥ तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - येरयेरा-एकमेकाना, निष्कामता-निष्काम भक्ती, स्नेहजाल-एकमेकात गुंतलेले प्रेमाचे धागे अर्थ - भक्त असल्याखेरीज देवाला त्याचे रूप कसे प्राप्त होईल ? भक्त आहे म्हणून देव आहे १ सोन्याच्या कोदणात हिरा असतो म्हणून त्याची शोभा ना ? हिरा व सोने यानी एकमेकास सुशोभित केले आहे एकट्याची काय किंमत ? २ देव जर नसेल तर भक्त मग निष्काम भक्ती तरी कुणाची करणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, नात्याची ही नाजूक सुतामृत किंवा प्रेमाचे हे नाजूक धागे आई व मूल याच्या नात्यातील स्नेहाप्रमाणे आहेत आईमुळे मूल आहे व मुलामुळे आईस आईपणा आहे ४ विवरण - श्रेष्ठ भक्तीच्या एका विशेष अवस्थेचा फार मार्मिक संदर्भ या अभंगात आहे जीवाने शिवाची, आत्म्याने परमात्म्याची सेवा किंवा भक्ती करायची त्याला वंदन करायचे त्याच्याजवळ करुणा भाकायची, त्याची कृपा संपादन करायची हे ठीकच, पण भक्तीच्या पुढच्या अवस्थेत एक प्रश्न निर्माण होतो, तो असा की, भक्तानेच, सेवकानेच, जीवानेच का भक्ती करायची ? जीवास जशी शिवाची ओढ असते, तशीच शिवालाही असते ना ? पर- मेश्वरासही आपल्या भक्ताची ओढ असते ना ? काही कासावीस होतो ना ? खरं म्हणजे असंच व्हावयास हवे त्याला एकाकी करमत नव्हते, म्हणून तो हे चराचर विश्व प्रसवला तो या जगाची माता-पिता आहे मूलस्थानी तो व व्यक्त झालेले विश्व एकच होते पण बीजाचा विस्तार झाला, एकाच सुवर्णाचे नाना अलंकार झाले, एकाच पाण्यावर नाना लहरी उठल्या, म्हणून काही भेद मानावा असे नाही मग भेद नाही असे ठरल्यावर कोण कुणाचे स्तवन करणार ? भक्तास जसा ईश्वराचा ध्यास, तसा ईश्वरासही भक्ताचे अनुसंधान असतेच ना ? या उच्च भूमिकेवरून तुकारामाच्या याही अभंगातून विचार प्रगट झाले आहेत या अभंगात एक अति गोड भाव असा व्यक्त झाला आहे की मी भक्त आहे म्हणून देवा, तुला देवपण आहे बाळ आहे म्हणून स्त्रीस आईपण प्राप्त झाले आहे 'तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते-प्रत्यक्ष ब्रह्मदेवासही आम्हीच जन्म दिला आहे' या तुकाराम महाराजांच्या उक्तीमधील सामर्थ्य फार मोठे आहे दुसऱ्या एका ठिकाणी बुवांनी म्हटलं आहे 'जरि मी नव्हतो पतित । तरि तू पावन कैंचा तेथ ?' मी येथे पतित असल्यामुळे विठ्ठला, तू पतितपावन म्हणून लौकिकवान झालास, असा प्रेमाच्या भांडणाचा लडिवाळ मुद्दा उपस्थित केला आहे लोखंड आहे म्हणून परिसाला महत्त्व मी भक्त आहे म्हणून देवा तुमचे महिमान असा भावार्थ दोघेही परस्परांना पोषक आहेत १०३ विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥ १ ॥ ऐसा भक्ताचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ २ ॥ निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥ ३ ॥ तुका म्हणे आले । रूपा अव्यक्त चांगले ॥ ४ ॥

५० सार्थ तुकारामगाथा १०४ काय दिनकरा । केला कोबड्याने खरा ॥ १ ॥ का हो ऐसा सत ठेवा । भार माझे माथा देवा ॥ २ ॥ आडविले दासीं । तरि का भरती उपवासी ॥ ३ ॥ तुका म्हणे हातीं । कळा सकळ अमती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दिनकरा-सूर्यास, दासीं-सेवकांनी अर्थ - सूर्य उगवताना कोंबडा आरवतो याचा अर्थ असा नव्हे की त्याच्या आरवण्याने सूर्य उगवतो कोंबड्याच्या ओरडण्याने सूर्याचे उगवणे खरे मानायचे काय ? त्याचा उदय स्वयंसिद्धच आहे १ माझे व देवाचे नाते असेच आहे सत लोकोहो, माझ्यावर सत्वाचे ओझे ठेवू नका माझ्या सत्त्वामुळे ईश्वराचे नाव सिद्ध होऊ नका २ सेवकांनी, स्वयंपाक करणाऱ्या नोकरानी जरी अडवून घेतले, किंवा सोडले तरी मालक काही उपाशी राहात नाही तसे माझे सत्त्व नसले तरी ईश्वराचे थोरपण स्वयंसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला, माझ्या गुणावगुणाची सारी किमया त्या अनंत स्वरूपी ईश्वराच्या स्वाधीन आहे ४ १०५ जेविता ही धरी । नाक हगंतिया परी ॥ १ ॥ ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥ २ ॥ साडावे माडावे । काय ऐसे नाहीं ठावे ॥ ३ ॥ तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चाळा-निंदा, अवकळा-वाईट स्थिती, साडावे-सोडावे माडावे-पत्करावे, सरी-बरोबरी अर्थ - परसाकडेस बसले असताना ज्याप्रमाणे घाण येऊ नये म्हणून नाक धरतात त्याप्रमाणे काही लोक वेड्यासारखे जेवतानाच नाक धरतात १ अशा वेडसर क्रियामुळे आपली आपणच वाईट स्थिती किंवा फजिती करीत असतो २ कुठे काय करावे, काय धरावे, काय सोडावे याचा विवेकच त्हांना नसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे लोक ताक व दूध याना सारखेच मानतात ४ १०६ हो का पुत्र पत्नी बधु । त्याचा तोडावा सबंधु ॥ १ ॥ कळो आले खटचाळसे । शिवो नये लिपो दोषें ॥ २ ॥ फोडावे मडके । मेले लेखीं द्यावें एके ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगेँ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मडके फोडणे-संबध तोडणे, द्यावे-द्यावाने अर्थ - ईश्वरप्राप्तीसाठी पुत्र असो, पत्नी असो, बंधू असो त्या सर्वांचा सबंध तोडून टाकावा १ हे सबध सर्व खटघाळ आहेत, आड येणारे आहेत असे समजून आल्यावर त्यांना शिवू सुद्धा नये, त्याच्या सहवासाचा दोष अंगी लावून घेऊ नये २ ती सर्व मेली आहेत असे समजून त्याच्या नावाने मडके फोडून त्याचा सबंध तोडून द्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा त्याग केल्याशिवाय संसारातील भोगाविषयीची आस्था दूर व्हायची नाही ४ १०७ ज्याल्याविण करी शोभनतातडी । चार ते गद्यडी करीतसे ॥ १ ॥ कासया पाल्हाळ आणिफांचे देखों । संगता नव्हे सुपी सासरेसि ॥ २ ॥ फुयाच्या ढेकरें न देवेळ पुष्टी । रूप दावी कष्टी' मळिण वरी ॥ ३ ॥ तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेविण नका याव घेऊ ॥ ४ ॥ १ दृष्टी

शब्दार्थ व टीपा - व्याल्याविण-बाळंत झाल्याशिवाय शोभन तातडी-बारशासारखे मंगल कार्य करण्याची घाई, चार-चाळे, देशी-पाहून, कुधाऱ्या-मुद्दाम उसने आणलेल्या, कुष्ठी-कोडाच्या रोगाचा, वाव-विनाकारण अर्थ - एक स्त्री बाळंतीण व्हायच्या आधीच बारसे वगैरे मंगल कार्य करण्याचे चाळे मूर्खाप्रमाणे करू लागली १ दुसऱ्या खऱ्या बाळंतिणीचे विस्तारपूर्वक व्यापार पाहून ही तसे करू लागली तर काय उपयोग ? साखर स्वतः खाऊन जो गोडी अनुभवता येते ती काय दुसऱ्यास सांगता येते ? २ तृप्ततेचे जेवण झाल्यावर जशी ढेकर येते तशी ती उगाच भुकेल्या पोटी बळाने दिलेल्या ढेकराप्रमाणे होणार नाही दोघीत मोठाच फरक दिसणार उलट अशा ढेकरेमुळे चेहरा मात्र कष्टदायक व मलीन दिसणार, किंवा कोडाच्या रोगाचा मनुष्य आपले कोड दिसू नये म्हणून अंग मलीन करून घेतो तसेच होणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, नुसती बडबड करणारे श्रोत्रहो ऐका, तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याखेरीज उगाच बोलू नका ४

१०८ जेणे घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥ १ ॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ २ ॥ प्रल्हादें जनक बिभीषणे बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - अंतराय-अडथळा, वियोग, वर्जावी-मोडावी, येर-मग, लेखा-गणती, हिशेब, दुःखमूळ- दुःख देणारे अर्थ - ईश्वराच्या प्राप्तीस जर अडथळा होत असेल, त्याचा वियोग घडत असेल तर अत्यंत पूज्य असलेल्या आईबापांचाही त्याग करावा १ मग इतर नात्याची माणसे, प्रिय पत्नी, मुले धन यांची काय गणना ? त्याचाही त्याग करावा, कारण हे सर्व आपल्याला दुःख देण्यास पात्र असलेले शत्रूरूप आहेत २ आईबापाचा वा आप्तांचा असा त्याग पूर्वी अनेकांनी केला होता देवासाठी प्रल्हादाने आपल्या पित्याचा बिभीषणाने आपल्या थोरल्या बंधूचा, भरताने आपल्या आईचा व राज्याचाही त्याग केला नव्हता काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात याच्या सेवेतून निर्माण होणारे सर्व धर्म श्रीहरीच्या पायाशी दिसतील इतर सर्व उपाय दुःखाचे मूळ आहे त्यामुळे दुःखच होत राहील हे निश्चित ४ विवरण - ईश्वरप्राप्ती हे सर्वात मोठं ध्येय माणसाने असल्यान या प्राप्तीच्या आड येणारी सर्व बंधने तोडावीत असे वारंवार सांगितले जाते अतिशय पूज्य आईबाप, यांनी आपणास जन्म दिलेला असतो, पण हे जर परमेश्वरप्राप्तीच्या आड आले तर त्याचाही त्याग करावा, मग बंधू, पुत्र पत्नी याचा त्याग करावा यात नवल ते काय ? यांच्या अतिरिक्त मोहामधून ईश्वर दुरावतो म्हणून या नात्याचा त्याग सुचविला आहे गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसांची लक्षण सांगताना 'असक्तिरनभिष्वंग पुत्रदारगृहादिषु-बायकामुलं व घर इत्यादीविषयी लंपट न होणे'-हा एक प्रमुख म्हणून दर्शविला आहे 'दारागृहपुत्रों। नाहीं जया मैत्री । तो जाणपा धात्री । ज्ञानासि गा' असे ज्ञानदेवानी या पुरुषांचे वर्णन केले आहे 'देवाच्या सख्यत्वासाठीं । पाडाव्या जिवलगांसि तुटी । प्राण सर्वस्वही शेवटीं । तोही वेंचवा' असे समर्थ रामदासानी निःप्रहाण सांगितले आहे असा हा आप्तस्वकीयांचा किंवा आईबापांचा त्याग पूर्वी कधी कुणी केला होता काय ? तुकारामबुवांनी काही उदाहरणे आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी दिली आहेत प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा मुलगा पण यास भगवद्भक्तीचे अतिशय वेड म्हणून या बापाने प्रल्हादाचा अतिशय छळ केला प्रल्हादाने विष्णूची व नृसिंहाची प्रार्थना केली शेवटी नृसिंह प्रकट होऊन त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला अशी कथा आहे याप्रमाणे प्रल्हादान आपल्या बापाची पर्वा केली नाही असा भावार्थ बिभीषण हा रावणाचा बंधू मोठा भगवद्भक्त होता रावणान सीतेस चोरून आणले, रामास त्रास देण्यास सुरवात केली, त्याच्याशी युद्ध आरंभिले म्हणून याने रावणास बराच उपदेश केला, पण तो त्यास पटला नाही मग बिभीषण रामास अनुकूल झाला त्याने सर्व माहिती रामास पुरविली युद्धात रामाकडूनच लडन याने दृष्टमाळे, प्रहस्त वगैरंना ठार मारले भरत हा रामाचा बंधू आपली आई कैकयी हिच्या