सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
शब्दार्थ व टीपा - व्याल्याविण-बाळंत झाल्याशिवाय शोभन तातडी-बारशासारखे मंगल कार्य करण्याची घाई, चार-चाळे, देशी-पाहून, कुधाऱ्या-मुद्दाम उसने आणलेल्या, कुष्ठी-कोडाच्या रोगाचा, वाव-विनाकारण अर्थ - एक स्त्री बाळंतीण व्हायच्या आधीच बारसे वगैरे मंगल कार्य करण्याचे चाळे मूर्खाप्रमाणे करू लागली १ दुसऱ्या खऱ्या बाळंतिणीचे विस्तारपूर्वक व्यापार पाहून ही तसे करू लागली तर काय उपयोग ? साखर स्वतः खाऊन जो गोडी अनुभवता येते ती काय दुसऱ्यास सांगता येते ? २ तृप्ततेचे जेवण झाल्यावर जशी ढेकर येते तशी ती उगाच भुकेल्या पोटी बळाने दिलेल्या ढेकराप्रमाणे होणार नाही दोघीत मोठाच फरक दिसणार उलट अशा ढेकरेमुळे चेहरा मात्र कष्टदायक व मलीन दिसणार, किंवा कोडाच्या रोगाचा मनुष्य आपले कोड दिसू नये म्हणून अंग मलीन करून घेतो तसेच होणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, नुसती बडबड करणारे श्रोत्रहो ऐका, तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याखेरीज उगाच बोलू नका ४
१०८ जेणे घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥ १ ॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ २ ॥ प्रल्हादें जनक बिभीषणे बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अंतराय-अडथळा, वियोग, वर्जावी-मोडावी, येर-मग, लेखा-गणती, हिशेब, दुःखमूळ- दुःख देणारे अर्थ - ईश्वराच्या प्राप्तीस जर अडथळा होत असेल, त्याचा वियोग घडत असेल तर अत्यंत पूज्य असलेल्या आईबापांचाही त्याग करावा १ मग इतर नात्याची माणसे, प्रिय पत्नी, मुले धन यांची काय गणना ? त्याचाही त्याग करावा, कारण हे सर्व आपल्याला दुःख देण्यास पात्र असलेले शत्रूरूप आहेत २ आईबापाचा वा आप्तांचा असा त्याग पूर्वी अनेकांनी केला होता देवासाठी प्रल्हादाने आपल्या पित्याचा बिभीषणाने आपल्या थोरल्या बंधूचा, भरताने आपल्या आईचा व राज्याचाही त्याग केला नव्हता काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात याच्या सेवेतून निर्माण होणारे सर्व धर्म श्रीहरीच्या पायाशी दिसतील इतर सर्व उपाय दुःखाचे मूळ आहे त्यामुळे दुःखच होत राहील हे निश्चित ४ विवरण - ईश्वरप्राप्ती हे सर्वात मोठं ध्येय माणसाने असल्यान या प्राप्तीच्या आड येणारी सर्व बंधने तोडावीत असे वारंवार सांगितले जाते अतिशय पूज्य आईबाप, यांनी आपणास जन्म दिलेला असतो, पण हे जर परमेश्वरप्राप्तीच्या आड आले तर त्याचाही त्याग करावा, मग बंधू, पुत्र पत्नी याचा त्याग करावा यात नवल ते काय ? यांच्या अतिरिक्त मोहामधून ईश्वर दुरावतो म्हणून या नात्याचा त्याग सुचविला आहे गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसांची लक्षण सांगताना 'असक्तिरनभिष्वंग पुत्रदारगृहादिषु-बायकामुलं व घर इत्यादीविषयी लंपट न होणे'-हा एक प्रमुख म्हणून दर्शविला आहे 'दारागृहपुत्रों। नाहीं जया मैत्री । तो जाणपा धात्री । ज्ञानासि गा' असे ज्ञानदेवानी या पुरुषांचे वर्णन केले आहे 'देवाच्या सख्यत्वासाठीं । पाडाव्या जिवलगांसि तुटी । प्राण सर्वस्वही शेवटीं । तोही वेंचवा' असे समर्थ रामदासानी निःप्रहाण सांगितले आहे असा हा आप्तस्वकीयांचा किंवा आईबापांचा त्याग पूर्वी कधी कुणी केला होता काय ? तुकारामबुवांनी काही उदाहरणे आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी दिली आहेत प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा मुलगा पण यास भगवद्भक्तीचे अतिशय वेड म्हणून या बापाने प्रल्हादाचा अतिशय छळ केला प्रल्हादाने विष्णूची व नृसिंहाची प्रार्थना केली शेवटी नृसिंह प्रकट होऊन त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला अशी कथा आहे याप्रमाणे प्रल्हादान आपल्या बापाची पर्वा केली नाही असा भावार्थ बिभीषण हा रावणाचा बंधू मोठा भगवद्भक्त होता रावणान सीतेस चोरून आणले, रामास त्रास देण्यास सुरवात केली, त्याच्याशी युद्ध आरंभिले म्हणून याने रावणास बराच उपदेश केला, पण तो त्यास पटला नाही मग बिभीषण रामास अनुकूल झाला त्याने सर्व माहिती रामास पुरविली युद्धात रामाकडूनच लडन याने दृष्टमाळे, प्रहस्त वगैरंना ठार मारले भरत हा रामाचा बंधू आपली आई कैकयी हिच्या
५२ सार्थ तुकारामगाथा मुळे रामास वनवासास जावे लागले असे समजताच याने आईस कटू शब्दांनी फार दुखविले व आपण स्वतःही राज्याच्या त्यागास प्रवृत्त झाला. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवूनच भरत राज्यकारभार पाहात होता. १०९ मान अपमान गोयें । अवघें गुंडूनी ठेवावें ॥ १ ॥ हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ २ ॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥ ३ ॥ आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोयें-पाश, गुंडूनी-गुंडाळून, खुंटे-पावते, ऊर्मी-सुखदुःखाची लाट अर्थ - मान आणि अपमान याच्या पाशात गुंतून राहूं नये. हे सारे विकार गुंडाळून ठेवावेत. १ यामुळे अंतःकरण नेहमी समाधानी राहून यातच देवाचे दर्शन झाल्याचे सुख होईल. २ याच ठिकाणी खऱ्या शांततेची वसती असून कालधक्काचीही गती येथे खुंटेल. ३ जी जी सुखाची किंवा दुःखाची ऊर्मी येईल ती थोडी सहन करणे, शांतपणे तीस वागविणे, एवढे थोडे जमले म्हणजे झाले. ४ विवरण-मन ईश्वराकडे लावून शाश्वतचे समाधान मिळविण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे मानापमान न मानता स्थिर बुद्धीने राहणे मान आणि अपमान याच्या वृथा जाणिवेमुळे अनेक प्रकारची दुःखे निर्माण होतात. भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची जी लक्षणे आहेत त्यात 'अमानित्वम्' हे पहिलेच लक्षण सांग- ण्यात आले आहे 'पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।' अशी स्थिती आपली असावी 'चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी' अशी अवस्था ज्ञानी माणसाची असते. उलट मानसन्मानाची हाव धरली की अपमानच होऊं लागतो. 'मान इच्छी तो अपमान पावे' असे तुकारामबुवांनी म्हटले आहे ११० थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालियां ॥ १ ॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरले तें ॥ २ ॥ अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधायें ॥ ३ ॥ तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- साहे-साह्यतेस, हर्षामर्ष-आनंद, दुःख, सरले-संपले, लटिकें-खोटे, देहअभिमान-देह हा खरा असा अभिमान अर्थ - जर आपले चित्त आपल्या साह्यास येईल तर ईश्वरप्राप्तीसाठी फार थोडे करावे लागेल १ ज्याच्या चित्तात सुखदुःखादी विकार उरले नाहीत त्याचे जीवन पांडुरंगातच विलीन झाले असे समजावे. २ सर्व साधनांचे सार हेच एक असल्याने आणखी दुसरे काही शोधावयास नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व प्रपंच व ही बाह्य सृष्टी या गोष्टी खोट्या असल्याने मना, तू त्याचा अभिमान सोड. ४ विवरण -मानसन्मान सोडावा, अपमानाची फिकीर करू नये हे जसे खरे, तसेच या मार्गात राहणाऱ्या माणसाने सुखदुःखाचीसुद्धा पर्वा करू नये गीतेत सांगितल्याप्रमाणे 'सुखदुःखे समे कृत्वा' सुख आणि दुःख यांना समान मानूनच आपण चालले पाहिजे 'सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें' अशी ज्ञानेश्वरांची ही शिकवण आहे 'सुखदुःखादि यन् । का शुभाशुभं कर्म । दोनरे ऐसो मनोरथम् । नेणोचि जो ।' अशी अवस्था ईश्वरप्राप्तीसाठी सिद्ध झालेल्या माणसाची असते सुख, दुःख, हर्ष, अमर्ष, लाभ, अलाभ, जयाजय याच्या द्वद्वातून त्यास पलीकडे जावयाचे असते. १११ आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न फळे ॥ तरी मातेंचिये खोळे । दगड आला पोटासि ॥ १ ॥ मनुष्यदेहा ऐसा निघ । साधिलीं ते साधे सिद्ध ॥ करुनि प्रबोध । संत पार उतरले ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा ५३ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरुनियां करीं उभाउभी पालवी ॥ ३ ॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा – पोळें-गर्भात, निघ-निघी, साठा, प्रबोध-उपदेश, जागृति, कट-कटी, पालवी-खुणा- वतो, बोलावतॊ. अर्थ :- एवढा जन्म वाया चालला, अजून तरी डोळे उघड. अजूनही तुला जर काहीच समजले नसेल तर मग तू आपल्या आईच्या पोटीं बरेच दगड म्हणून जन्मलास असे मानणे भाग आहे १ चांगला मनुष्यदेह तुला मिळाला आहे. याच मोलाच्या साठ्यामुळे तुला काय साधावयाचे आहे ते तू साध, असाच बोध संतानी केला असून ते स्वतःही संसार-सागराच्या पलीकडे गेले आहेत २ तुझ्यासाठीं ही नाव पंढरपुरास चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या दारात हात कटीवर ठेवून उभी आहे. ती सर्वांना मोठ्या प्रेमाने आपल्याकडे उभ्या उभ्यानेच बोलावीत आहे, खुणावीत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या नावेस काही किंमत मोजावी लागत नाही, ही फुकटच आहे नुसती पायास मिठी घालायी; मग या भवसागरातून पलीकडच्या तीरावर जावयास उशीर काहीच नाही ४ ११२ न करी संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥ या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवावांचून बडवड ते ॥ २ ॥ इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा¹ ही न ये घरी मन ॥ ३ ॥ तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या धारा आनंदाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संग-संगत, निश्चळ-स्थिर, अद्वैत-आपण व ईश्वर, जीव व शिव, आत्मा व परमात्मा एक आहोत ही अनुभूती, क्षय-नाश, जाणीव-मी वेगळा ही दुजेपणाची कल्पना अर्थ :- तू आता इतर कुणाच्याही संगतीत पडू नकोस, अगदी स्थिर रहा तू. कुठल्याही संबंधाचा किंवा ममत्वाचा मळही तू स्वतःस लावून घेऊ नकोस. १ अशा या अवस्थेसच ब्रह्मज्ञान किंवा अद्वैतज्ञान असे नाव असून याची जाणीव अनुभवाखेरीज येणार नाही. अनुभवाशिवाय बोलणे व्यर्थ बडबडच मानावी लागेल २ या अवस्थेत इंद्रियांची विषयाचा जय होऊन वासनेचा नाश होत असतो विविध विषयावरील वासनाची आसक्ती संपते आणि देहादिक वृत्तींचे किंवा बाह्य प्रपंचाचे मनातील संकल्पही संपतात. ३ मी निराळा, मी वेगळा अशी जाणीवच या अवस्थेत मनात उरत नाही. सर्वच आनंदी आनंद याचेच राज्य असते, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ११३ पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥ १ ॥ ऐसा ठाव नाही कोठें । देव उभाउभी भेटे ॥ २ ॥ आहिति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥ ३ ॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठाव-ठिकाण, काळें-कालांतराने, पुष्कळ काळाने, उभाउभी-ताबडतोब, पेठ-बाजाराचे मुख्य ठिकाण, अर्थ :- पंढरपूरचा महिमा वर्णन करताना दुसरी उपमाच उपयोगी पडत नाही १ कारण या क्षेत्रासारखे ठिकाण इतरत्र कुठेच नाही देव येथे ताबडतोब भेटतो २ बाकीची तीर्थे पुष्कळ असली तरी त्यांचेकडून इष्ट फळ बऱ्याच काळानंतर मिळते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरपूर म्हणजे भक्तीचे मुख्य ठिकाण असून हे भूवरचे प्रत्यक्ष वैकुंठच आहे. ४ १ सकल्पा ही धरी न ये मन
५२ सार्थ तुकारामगाथा मुळे रामास वनवासास जावे लागले असे समजताच याने आईस कटू शब्दांनी फार दुखविले व आपण स्वतः ही राज्याच्या त्यागास प्रवृत्त झाला. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवूनच भरत राज्यकारभार पाहात होता १०९ मान अपमान गोवें । अवघें गुंडूनी ठेवावें ॥ १ ॥ हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ २ ॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥ ३ ॥ आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोवें-पाश, गुंडूनी-गुंडाळून, खुंठे-थांबते, ऊर्मी-सुखदुःखांची लाट अर्थ - मान आणि अपमान यांच्या पाशांत गुंतून राहूं नये. हे सारे विकार गुंडाळून ठेवावेत. १ यामुळे अंतःकरण नेहमी समाधानी राहून यातच देवाचे दर्शन झाल्याचे सुख होईल. २ याच ठिकाणी खऱ्या शांततेची वस्ती असून कालचक्राचीही गती येथे खुंटेल. ३ जी जी सुखाची किंवा दुःखाची ऊर्मी येईल ती थोडी सहन करणे, शांतपणे तीस वागविणे, एवढे थोडे असले म्हणजे झाले. ४ विवरण:-मन ईश्वराकडे लावून शाश्वतचे समाधान मिळविण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे मानापमान न मानता स्थिर बुद्धीने राहणे मान आणि अपमान याच्या वृथा जाणिवेमुळे अनेक प्रकारची दुःखे निर्माण होतात. भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची जी लक्षणे आहेत त्यात 'अमानित्वम्' हे पहिलेच लक्षण सांग- ण्यात आले आहे 'पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।' अशी स्थिती आपली असावी. 'चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी' अशी अवस्था ज्ञानी माणसाची असते. उलट मानसन्मानाची हाव धरली की अपमानच होऊ लागतो. 'मान इच्छी तो अपमान पाये' असे तुकारामबुवांनी म्हटले आहे. ११० थोडे आहे थोडें आहे । चित्त साहे जालियां ॥ १ ॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ २ ॥ अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधायें ॥ ३ ॥ तुका म्हणे लटिकें पाहें । सांडों देह अभिमान ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- साहे-साहवतेस, हर्षामर्ष-आनंद, दुःख, सरले-संपले, लटिकें-खोटे, देहअभिमान-देह हा खरा असा अभिमान अर्थ - जर आपले चित्त आपल्या साहण्यात येईल तर ईश्वरप्राप्तीसाठी फार थोडे करावे लागेल. १ ज्याच्या चित्तात सुखदुःखादी विकार उरत नाहीत त्याचे जीवन पांडुरंगातच विलीन झाले असे समजावे. २ सर्व साधनाचे सार हेच एक असल्याने आणखी दुसरे काही शोधावयास नको. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व प्रपंच व ही बाह्य सृष्टी या गोष्टी खोट्या असल्याने मला, तू त्याचा अभिमान सोड. ४ विवरण -मानसन्मान सोडावा, अपमानाची फिकीर करू नये हे जसे खरे, तसेच या मार्गात राहणाऱ्या माणसाने सुखदुःखाचीसुद्धा पर्वा करू नये गीतेत सांगितल्याप्रमाणे 'सुखदुःखे समे कृत्वा' सुख आणि दुःख यांना समान वागवूनच आपण चालले पाहिजे 'सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें' अशी ज्ञानेश्वरांची ही शिकवण आहे. 'सुखदुःखादि धर्मं । कां शुभाशुभे कर्में । दोन्ही ऐसीं मनोधर्मं । नेणोंचि जो।' अशी अवस्था ईश्वरप्राप्तीसाठी सिद्ध झालेल्या माणसाची असते. सुख, दुःख, हर्ष, अमर्ष, लाभ, अलाभ, जयाजय याच्या द्वंद्वातून त्यास पलीकडे जावयाचे असते. १११ आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न फळे ॥ तरी मार्तंडिये खोळे । दगड आला पोटासि ॥ १ ॥ मनुष्यदेहा ऐसा निघ । साधिलीं ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा ५३ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरुनियां करों उभाउभी पालवी ॥ ३ ॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खोळें-गर्भात, निध-निधी, साठा, प्रबोध-उपदेश, जागृति, कट-कटी, पालवी-खुणा- वतो, बोलावतौ अर्थ :- एवढा जन्म वाया चालला, अजून तरी डोळे उघड. अजूनही तुला जर काहीच समजले नसेल तर मग तू आपल्या आईच्या पोटी लप दगड म्हणून जन्मलास असे मानणे भाग आहे १ चांगला मनुष्यदेह तुला मिळाला आहे. यात्र मोलाच्या साधनामुळे तुला काय साघावयाचे आहे ते तू साध, असाच बोध सतांनी केला असून ते स्वत ही संसार-सागराच्या पलीकडे गेले आहेत २ तुझ्यासाठी हो नाव पंडरपुरास चद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या दारात हात कटोवर ठेवून उभी आहे. ती सर्वांना मोठ्या प्रेमाने आपल्याकडे उभ्या उभ्यानेच बोलावीत आहे, खुणावीत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या नावेस काही किंमत मोजावी लागत नाही, ही फुकटच आहे. नुसती पायात मिठी घालावी; मग या भवसागरातून पलीकडच्या तीरावर जावयास उशीर काहीच नाही ४ ११२ न करी संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥ या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ २ ॥ इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । सकल्पा¹ हो न ये यरी मन ॥ ३ ॥ तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संग-सगत, निश्चळ-स्थिर, अद्वैत-आपण व ईश्वर, जीव व शिव, आत्मा व परमात्मा एक आहात ही अनुभूती, क्षय-नाश, जाणीव-मी वेगळा ही दुजेपणाची कल्पना अर्थ :- तू आता इतर कुणाच्याही संगतीत पडू नकोस, अगदी स्थिर रहा तू. कुठल्याही सबंधाचा किवा ममत्वाचा मळही तू स्वत स लावून घेऊ नकोस. १ अशा या अवस्थेसच ब्रह्मज्ञान किंवा अद्वैतज्ञान असे नाव असून याची जाणीव अनुभवाखेरीज येणार नाही. अनुभवाशिवाय बोलणे व्यर्थ बडबडच मानावी लागेल २ या अवस्थेत इद्रियादी विषयाचा जय होऊन वासनेचा नाश होत असतो विविध विषयावरील वासनाची आसक्ती संपते आणि देहादिक वृत्तींचे किंवा बाह्य प्रपंचाचे मनातील सकल्पही संपतात. ३ मी निराळा, मी वेगळा अशी जाणीवच या अवस्थेत मनात उरत नाहीं. सर्वत्र आनंदी आनंद याचेच राज्य असते, असे तुकाराम महाराज म्हणतात ४ ११३ पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥ १ ॥ ऐसा ठाव नाही कोठें । देव उभाउभी भेटे ॥ २ ॥ आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥ ३ ॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठाव-ठिकाण, काळें-कालातराने, पुष्कळ वेळाने, उभाउभीं-तावडतोब, पेठ-बाजाराचे मुख्य ठिकाण, अर्थ :- पंडरपुरचा महिमा वर्णन करताना दुसरी उपमाच उपयोगी पडत नाही १ कारण या क्षेत्रासारखे ठिकाण इतरत्र कुठेच नाही. येथ येथे तावडतोब भेटतो २ बाकीची तीर्थे पुष्कळ असली तरी त्यांचेकडून इष्ट फळ बऱ्याच काळानतर मिळते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे पंडरपूर म्हणजे भक्तीचे मुख्य ठिकाण असून हे भूवरचे प्रत्यक्ष वैकुंठच आहे. ४ १ सकल्पा ही वरी न ये मन
५४ सार्थ तुकारामगाथा विवरण - या एका छोट्या व गोड अभंगात भूवरचे वैकुंठ म्हणजे विष्णुलोक म्हणून मानलेल्या पंढरपूरचा महिमा वर्णन केला आहे श्रीविठ्ठल हे दैवत पुंडलिकासाठी ज्या क्षेत्रात स्थिरावले ते हे पंढरपूर भागवत सांप्रदायिकांना वैकुंठापेक्षाही प्रिय वाटल्याने अनेक संतानी पंढरपूरचे माहात्म्य मोठ्या तन्मयतेने वर्णन केले आहे पुंडलिकाचा काळ अनिश्चित असल्याने पंढरपूरच्या इतिहासासबंधीही निश्चित असे सांगता येत नाही पूर्वी पंढरपुरास पांडुरंगपूर, पंढरिपूर, फागनिपूर, पौंडरीक क्षेत्र, पंढरी, पांडरंगपल्ली, पंडरंगपल्ली, पल्लरी इत्यादी नावांनी ओळखत असत असा पुरावा ऐतिहासिक कागदपत्रातून मिळतो पौंडरीक हे नाव पुंडरीक यावरून बनले असावे या पंढरपूरच्या विठ्ठलाचे उपासक ज्ञानेश्वर-नामदेव याच्या आधीपासून किती तरी असावेत पद्मपुराणातील सहाव्या अथवा उत्तर खंडातील १७६ व्या अध्यायात पैठणच्या ज्ञानश्रुति नावाच्या राजाच्या सारथ्याची कुष्टीगत झाली आहे तो अनेक क्षेत्रे हिंडत हिंडत तीर्थस्नानतर पंढरपूर येथे आला होता सन ५१६ च्या एका ताम्रपटात पांडरंगपल्ली असा पंढरपूरचा उल्लेख आलेला आहे सन १२३६ च्या सुमाराचा पंढरपूरचा शिलालेख जो साळोखानी मडपाच्या तुळईवर आहे त्यात पंडरगे असा उल्लेख आलेला आहे यानंतर १२४९ च्या एका शिलालेखात 'पौंडरीक क्षेत्र' असे पंढरपुरास म्हटले आहे १२७० च्या एका लेखात पांडुरगपूर असाही उल्लेख आहे प्रसिद्ध चौऱ्यायशीच्या शिलालेखात पंढरपुरास फागनिपूर म्हटल आहे हा सन १२७३ चा आहे हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि नावाच्या ग्रंथात पौंडरिक क्षेत्राचे वर्णन आहे चोखोबाच्या समाधीपाशी असलेल्या एका शिलालेखात सन १३११ मध्ये पंढरिपूर असा निर्देश आला आहे इ स १४९०-१५०८ च्या सुमारास निजामशाहीत दलपतिराज नावाचा एक अर्थमनी होऊन गेला त्याच्या नृसिंहप्रसाद नावाच्या ग्रंथात पुंडरीक क्षेत्राची माहिती आहे शामजी गोसावी बाजरखेडे नावाच्या एका कवीने सन १५०५ मध्ये एका कवितेत 'पुरातन स्थळ आमुचे पंढरपूर' असा उल्लेख केलेला दिसतो बगळचे प्रसिद्ध वैष्णव श्रीचैतन्यप्रभू किंवा गौरागदेव सन १५१०-११ मध्ये दक्षिणेत आले होते त्याच्या पंढरपूरभेटीचा उल्लेख कृष्णदास कविराजाने 'तथा होईते पाण्डुपुर आइला गौरचन्द्र । विठ्ठल ठाकूर देखि पाइल आनंद' असा उल्लेख केला आहे याप्रमाणे अनेक ऐतिहासिक उल्लेख पंढरपूरचे मिळतात मराठी संताच्या दृष्टीने तर अवघ्या विश्वात पंढरपूरसारखे क्षेत्र नाही असा गौरवाचा भाग त्यांच्या अभंगात वारंवार येतो 'पंढरीचे सुख नाही त्रिभुवनीं ' 'अवघी पंढरी मूर्वरुंठ नगरी', 'नामाची भरली पेठ । मूर्वरुंठ पंढरी' 'चोखा म्हणे पाहता पंढरी मूर्वरुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले', 'अगाध भूर्वेकुठ नगरी । पंढरी हे चराचरीं यासारख्या अनेक पक्तीतून चोखोबानी पंढरपूरचा महिमा प्रेमाने गाइला आहे 'याप तीर्थ पंढरी । भूर्वेकुठ महीवरो काशी अयोध्या अवंति कांति । मथुरा माया गोमती । ऐसीं तीर्थे इत्यादिर्फे आहेती । परि सरी न पवती पाडुरंगी' अशा भाषेत स्वतः ज्ञानेश्वरांनी पंढरपूरचा गौरव केला आहे 'इच्छितात देव पंढरीचा वास', 'बहुत तीर्थे क्षेत्रे बहुतापरी । न पावती मरी पंढरीची', 'उदड तीर्थे, उदड क्षेत्रे । परि पवित्र पंढरी ।', 'बहुता काळाचे हे क्षेत्र । सरळ देवाचे माहेर । सकळ संताचे निजमदिर । तें हे पंढरपूर जाणावे', 'माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं' इत्यादी ओळींतून एकनाथांनी पंढरपूरचे वर्णन केल आहे 'धन्य धन्य हे नगर । भूर्वेकुठ पंढरपूर' म्हणून भानुदासाचा उल्लेख आहे 'पंढरीचे सुख पाहता अलौकिक । वैकुंठनायक उभा जेथे' असा आणखी एक त्याचा अभंग प्रसिद्ध आहे नामदेवरायानी तर पंढरपूरचे वर्णन मोठ्या प्रेमळपणाने व मुक्तकठाने केले आहे 'पंढरी हे क्षेत्र पावनपवित्र । महिमा विचित्र त्रिभुवनीं', 'ऐसे तीर्थ कोणी दाखवा गोमटे । जेथे प्रत्यक्ष हे भेटे परब्रह्म', 'वरवे वरवे पंढरपूर । विठोबा रायाचे नगर', 'वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी । वास दे पंढरी सर्वकाळ' इत्यादी ओळींतून नामदेवरायाचा पंढरीप्रेमा उफाळून आला आहे इतकेच काय पण वैकुंठनगरापेक्षाही पंढरपूर अधिक असून सर्व जगतात प्रथम पंढरपूरच उभे राहिले अशा अर्थाचा नामदेवाचाच एक अति गोड अभंग आहे तो सबंध देण्याचा मोह हातो आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥ १ ॥ जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥ २ ॥ जेव्हा नव्हती गोदा गया । तेव्हा होती चंद्रभागा ॥ ३ ॥ चंद्रभागेच्या तटी । धन्य पंढरी गोमटी ॥ ४ ॥ नासिलिया भूमडळ । उरे पंढरी मडळ ॥ ५ ॥ असे सुदर्शनावरी । म्हणोनि अविनाश पंढरी ॥ ६ ॥ नामा म्हणे धा श्रीहरी । ते म्या देखिली पंढरी ॥ ७ ॥
सार्थ तुकारामगाथा ५५ तुकाराम महाराजांना पंढरपूरबद्दल अपार प्रीती वाटावी यात नवल काय ? ते तर त्यांच्या जिव्हाारीचे गूज होते ‘जाप जाप तू पंढरी । होय होय वारकरी’, ‘जा रे'तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनाचा’, ‘पंढरीसी जावे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ।’, ‘आमुची मिरास पंढरी । आमुचे घर भीमातीरीं’, ‘पावलो पंढरीं वैकुंठ भुवन । धन्य आजि दीन सोनियाचा’, ‘पंढरीये माझें माहेर साजणी । ओवीये काडणीं गाऊ गीत’, ‘धन्य पुंडलिक बहु बरे केले । निधान आणले पंढरीये’, ‘धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणिषेले सार पुंडलीके’, ‘धन्य धन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षयपुरी’, ‘धन्य झालो हो संसारी । आम्ही देखिली पंढरी’, ‘पंढरीची वारी जयाचिये घरीं । पाय-धुळी शिरीं वंदिन त्याची’ इत्यादि शेकडो वचनांतून तुकाराम महाराजांनी पंढरीमाहात्म्य तन्मयतेने वर्णन केले आहे असा हा पंढरपूरचा ध्यास मराठीतील सर्व साधुसंतांना दिसून येतो त्यांना दुसरे तीर्थ नको, क्षेत्र नको, भारी दुःखे एका पंढरीच्या दर्शनाने नाहीशी होतात म्हणून तर आषाढीकार्तिकीस लाखो लोक पंढरपुरास जाऊन विसावतात माहेरी आल्याचे सुख त्यांना याच पंढरपूरक्षेत्रात मिळते ११४ तीर्थों धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥ १ ॥ मिळालिया सतसंग । समर्पितां भले अंग ॥ २ ॥ तीर्थों भाव फळे । येथे आनाड ते वळे ॥ ३ ॥ तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा – रोकडा-प्रत्यक्ष, भले अंग-आपले सर्वस्व, आनाड-अडाणी मनुष्य अर्थ – कोणत्याही तीर्थस्थानात जा, तेथे धोंडा व पाणी यांचाच सुकाळ दिसेल मनात भाव नसेल तर तीर्थात दुसरे काय दिसणार ? खरोखर देव पाहावयाचा असेल तर तो साधुसंताच्या रूपातच पाहावा १ सतसंगती प्राप्त होताच आपण आपले सर्वस्व त्यांना अर्पण करावे म्हणजे देवत्वाची खूण पटते २ तीर्थस्थानावर गेल्यावर मनात शुद्ध भाव व भक्ती असेल तरच त्याचा उपयोग होतो, पण सतसंगतीत अडाणी मनुष्य असला तरीही त्याचा उद्धार होऊ शकतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, माणसाचे त्रिविध ताप नाहीसे झाले की तो निष्पाप झाला असे समजते ४ ११५ घेऊनिया चक्र गदा । हाच धंदा करी तो ॥ १ ॥ भक्ता राखे पायांपाशीं । दुर्जनासी संहारी ॥ २ ॥ अव्यक्त ते आकारले । रूपा आले गुणवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा – चक्र-शत्रूचा नाश करणारे सुदर्शन चक्र अर्थ – हा विठ्ठल हातात गदाचक्र घेऊन हाच उद्योग करतो १ दुर्जनाचा, वाईट लोकाचा संहार करून आपल्या भक्ताचे रक्षण करणे हेच याचे काम असते २ याच कामासाठी अव्यक्त परब्रह्म आकारास आले, नाना गुणांनी सांकृत झाले ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल ज्याची त्याची इच्छा पूर्ण करतो ४ विवरण – दुर्जनाच्या नाशासाठी व साधुसज्जनाच्या रक्षणासाठीच परमेश्वराचा अवतार असतो हे गीतेने 'परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम्' या श्लोकार्धात प्रकट केलेले आहे अधर्माचे प्राबल्य माजले की भगवंतास धर्मसंस्थापनेसाठी अवतार धारण करावा लागतो अशा प्रकारे अवतार घेऊन परमेश्वर भक्ताचे रक्षण धोने करतो यासबंधी ज्ञानेश्वरांनी फार चांगले व समर्पक असे वर्णन केले आहे ‘दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूचा मानु मियसीं । धर्मार्ती नीतीशीं । शंख भरीं ॥ मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळी । तं योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥' ढाल, चक्र, गदा, पण ही परमेश्वराची आयुधे या एका उद्योगासाठी असतात दुष्टाचा नाश, सज्जनाचे रक्षण व धर्मसस्थापना ही काम ईश्वरास अवतार घेऊन करावी लागतात
५६ सार्थ तुकारामगाथा ११६ देखोनि पुराणिकांची दाढी । रडे फुंदे नाक ओढी ॥ १ ॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ २ ॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥ ३ ॥ बोलों नये मुखावटां । म्हणें होता व्यांचा तोटा ॥ ४ ॥ दोन्ही सिंगे चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥ ५ ॥ मनां आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥ ६ ॥ होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥ ७ तुका म्हणे कुडें । फळो येतें तें रोकडें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :- नावरे-आवरत नाही, नेवरे-पाडरे, फुडें-खोटे अर्थ - या अभंगात हरिदासपुराणिकाच्या कीर्तनात येणारी एक गमतीची पण मोठ्या बोधाची गोष्ट विनोदी पद्धतीने तुकाराम सांगतात. ज्याचा एक लाडका बोकड नुकताच मेला आहे असा धनगर पुराणिक बुवांचे पुराण कसे तन्मयतेने पण एका निराळ्याच अर्थाने समजावून घेत होता त्याचे मोठे गमतीचे वर्णन येथे आहे. पुराणिक बुवांची दाढी पाहताच त्याला स्फुंदून स्फुंदून रडू आले; नाक पुसण्याचा प्रसंग आला लोकांना वाटले काय निरूपणाचा परिणाम ! किती प्रेमळ श्रोता ! त्याच्या मनातील भाव मात्र निराळा होता. नुकताच मेलेला आपल्या दाढीवाला बोकड त्यास आठवला १ त्याच्या मनात खरे प्रेम नव्हते तरी वरवर लोकांना ते खरेच प्रेम वाटले २ त्याला रडे आवरेना. बोकडाचे खूर व नख्या त्याला एकसारख्या समोर दिसत होत्या ३ तो म्हणू लागला, काय सांगू हो ? हा माझा बोकड वियाण्याचा म्हणून राखलेला होता तोच गेला हो. पुराणिकांना एका बीजाचा हा विस्तार असा हे सांगितले तेव्हा त्यास आपल्या 'व्याच्या' बोकडाची आठवण झाली ४ पुराणिक बुवा सांगत होते, एक पुरुष, एक प्रकृती, चार वेद किंवा ईश्वराची चार रूपे तो धनगर बुवांच्या दोन व चार बोटाचा अर्थ मनाशी समजत होता, हो हो माझ्या बोकडास दोन शिंगे होती, चार पाय होते. ५ कारण या धनगराच्या अंतःकरणात मेलेल्या बोकडाचे दुःख होते. त्याचे चित्त पुराणात नव्हतेच ६ जो भाव त्याच्या अंतःकरणात होता तोच शेवटी त्याच्या मुखातून बाहेर पडला. ७ तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणात असणारी खोटी भावना शेवटी केव्हा तरी प्रकट होतेच ८ ११७ दुर्जनाची गांधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥ १ ॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघट्टन नये बोलों ॥ २ ॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तेशी ॥ ३ ॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥ ४ ॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥ ५ ॥ तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥ ६ ॥
सार्थ तुकारामगाथा ५७ ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज' तो ॥ १ ॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचे वचन न मानी जो ॥ २ ॥ तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवो नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - अतिवादी-वृथा वादविवाद करणारा अर्थ - विनाकारण वितंडवाद करून भांडणारा मनुष्य हा शुद्ध बीजाचा नाही असेच समजावे. तो जातीने अंत्यज म्हणजे महार समजावा १ कारण त्याला वेदांचे किंवा श्रुतींचे वचनच मान्य नसते, श्रेष्ठ माणसांचे वचन तो ऐकत नाही, मानीत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, मद्यपानाचे गोड अन्न जसे त्याज्य तसे या दुर्जनास शिवू सुद्धा नये ३ ११९ शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥ १ ॥ त्याचे न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ २ ॥ संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥ ३ ॥ तुका म्हणे पोटीं । भाव अणीक ज्या होंटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धीर-एकवाक्यता खळा-दुष्टाच्या होंटीं-ओठात अर्थ - ज्याच्या बोलण्यात एकवाक्यता नाही, निश्चय नाही, त्याची बुद्धीच स्थिर नाही असे समजावे १ त्याचे दर्शनसुद्धा घेऊ नये, की या दुर्जनाच्या पंगतीला जेवण घेऊ नये २ कारण हा दुष्ट मनुष्य संतसज्जनांची निंदा करतो व अधम लोकांची स्तुती करतो त्याची संगतच नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या पोटात भाव एक व ओठात म्हणजे बोलण्यात दुसराच, त्याचे दर्शनसुद्धा नको १२० चोरे चोरांतें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥ १ ॥ शिंदळीच्या मार्गे वेचिता पाऊले । होईल आपुले तिच्या ऐसे ॥ २ ॥ तुका म्हणे भितो पुढील्या दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - शिंदळीच्या-वाईट चालीच्या स्त्रीच्या, दत्ता-पुढे उभे राहिलेल्या, उपजली- निर्माण झाली अर्थ - चोराने चोरालाच उपदेश दिल्यावर तो तरी दुसरा काय देणार? जो त्याचा नित्याचा चोरीचा अभ्यास असेल तोच शिकविणार तो १ एखाद्या वाईट चालीच्या स्त्रीच्या घरी आपण गेलो तर आपण तिच्या- प्रमाणेच होणार २ तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे आता अशा विपरीत संगतीमुळे पुढे काय काय भयानक स्थिती लोकांची होणार या संबंधी चिंत्ताच वाटू लागली आहे ३ १२१ मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥ १ ॥ म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवऱ्याचे तोंड ॥ २ ॥ समय न कळे । काय उपयोगों ये वेळे ॥ ३ ॥ तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खरा-गाढवाला अर्थ - कोणत्या वेळी काय बोलावे हे न समजणाऱ्या लोकांना उद्देशून बुवा म्हणत आहेत एका लग्नात पुढारीपण एका म्हाताऱ्यास दिले मांडवाच्या दारातच त्याला उभे करून व्यवस्था पाहायला सांगितली १ तर १ अधम, २ अगणी तु गा ८
५८ सार्थ तुकारामगाथा तो प्रसंग न ओळखता वाटेल तसे बडबडू लागला, म्हणाला, त्या रांड नवरीला आणा त्या नवऱ्याचे तोंड जाळा २ त्याच्या मनात नसेल, पण असे अपशब्द या प्रसंगी का तोंडातून काढावचे? यावेळी त्याचा विपरीत परिणामच होणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रसंगातून यासारख्या गाढवांना प्रथम दूर करा ४ १२२ काहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तोचि श्वान ॥ वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥ १ ॥ त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ २ ॥ अखंड अशुभ वाणी । खरे न बोलेचि स्वप्नीं ॥ पापी तयाहूनी । आणीक नाहीं दुसरा ॥ ३ ॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥ ४ ॥ काहीं संताचे पूजन । न घडे तीर्थांचे भ्रमण ॥ यमाचा आदण । सीण थोर पावेल ॥ ५ ॥ तुका म्हणे त्यानीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरुनी । गेलीं म्हणता मी माझें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वाया-व्यर्थ वृषभ-बैल, यातीचा-जातिकुळाचा, आदण-देणगी, सीण-श्रम, दुख अर्थ - रोज काही तरी नामस्मरण, नित्यपाठ, भजन, गीताभागवतश्रवण यासारखा नित्यनेम न करता जो अन्न सेवन करतो तो कुत्र्याच्या जातीचा मानावा मनुष्यजन्माला येऊन तो वायाच गेला, केवळ बैलाप्रमाणे संसाराचा फुकट भार त्याने वाहिला १ कारण अशा माणसाचा भूमीला फुकट भार होतो, कारण हा आपल्या घराण्याचा काय आचार आहे, कुलाचार आहे, हेच विसरतो, त्यामुळे तो कुळाचाच दावेदार बनलेला असल्याने त्याचे सर्व पितर अघोर अशा नरकातच खितपत पडतात २ त्याची वाणी नेहमी अमंगल असून तो स्वप्नातही चुकून खरे बोलत नाही त्याच्याशिवाय दुसरा कोणीही पापी नाही ३ तो केवळ स्वतःचे पोट भरीत असतो त्याला इतर प्राणिमात्राबद्दल कधीही दया वाटत नाही दाराशी एखादा अतिथि जरी आला तरी त्याच्या पाठीशी लागून तो त्याला पिटाळून लावतो ४ साधुसंतांचे पूजन करावे, तीर्थांचे भ्रमण करावे या गोष्टी त्याला माहितच नसल्यामुळे हा यमाचेच भक्ष्य बनलेला असतो तो एक थोर असो यमाला विनासायास देणगीच मिळते ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या माणसाने सर्व मनुष्यपणाची हानी केली आहे कारण जगच्चालक परमेश्वरास विसरून हा ‘ मी मी, माझे माझे ’ करीत असतो त्याचा जन्म व्यर्थ गेला असेच समजावे ६ १२३ कन्या गो करी कयेचा विकरा । चाडाळ तो खरा तया नावे ॥ १ ॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥ २ ॥ जे जैसे करिती ते तैसे पावती । भोग ते भोगिती केले कर्मी ॥ ३ ॥ आशाबद्ध नये करुं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामध्वीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गो-गाय, विकरा-विक्री, कारण-कर्तव्य अर्थ - स्वतःची मुलगी, गाय किंवा क्या याची विक्री पैसे घेऊन जो करतो तो खरोखरीच नावाने चांडाळच होय १ माणसाचे गुण काय किंवा अवगुण काय हे त्याच्या ईश्वरनिष्ठेवरून ठरवायचे, जातीशी येथे काही कर्तव्य नाही जातीवर काही अवलंबून नाही २ जशी कर्मे एखाद्याच्या हातून होतील तशी फळे त्याला प्राप्त होतील व
सार्थ तुकारामगाथा ५९ त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळे भोगावी लागतील इ आशेच्या लोभाने जे लोक करू नये तो कर्म करतात ते नरकासच जातील असे तुकाराम महाराज म्हणतात ४ १२४ हरिहरा भेद । नाहीं करूं नये वाद ॥ १ ॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ २ ॥ भेदकासी नाड । एक वेलाटीच आड ॥ ३ ॥ उजवे वामांग । तुका म्हणे एकचि अंग ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हरि व हर-विष्णू व शंकर, नाड-अडचण, वामांग-डावे अंग अर्थ - विष्णू व शंकर एकच असल्याने या विषयी वाद करू नये १ शंकराच्या हृदयात विष्णू व विष्णूच्या हृदयात शंकर आहे गोडी जशी साखरेसी एकजीव झालेली असते तसे हे ऐक्य असते २ फरक करणाऱ्याला अडचण फक्त एका वेलांटीचीच दिसून येते ३ पण तुकारामबुवा म्हणतात, डावे अंग काय, उजवे काय, दोन्ही एकच होत ४ विवरण - प्राचीन धर्मग्रंथात व पुराणात अनेक ठिकाणी विष्णू व शिव अथवा हरी व हर यांच्यात अभेद वर्णन केला आहे शिव व विष्णू हे परस्परांची उपासना करणारे आहेत वैकुंठ चतुर्दशीला शिव विष्णूची पूजा करतात व शिवरात्रीला मध्यरात्री विष्णू शिवाची पूजा करतात दोन देवतांची नावे वेगळी असली तरी त्यांच्यात भेद नाही अशीच शिकवण वारकरी संप्रदायाचीही आहे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, विष्णू जगाचे पोषण करतो विश्वाचा संहार करून शिव दुष्ट शक्तीचा नाश करून मंगल साधणारा आहे या त्रिमूर्तीचे ऐक्य मार्कंडेय पुराणात अध्याय ४६ मध्ये व भागवतात चौथ्या स्कंधात अध्याय ७ श्लोक ५०-५४ मध्ये वर्णन केले आहे ' य शिव सच वै विष्णूर्य्या विष्णू सच वै शिव ' असे शिव व विष्णू यांचे ऐक्य हरिवंशात वर्णन केले आहे ' शिवस्य हृदय विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिव ' अस म्हटले आहे ' स ब्रह्मा स शिवः सेंद्र सोक्षर परम स्वराट् । स एव विष्णु स प्राण स कालोऽग्नि स चंद्रमा । स एव सर्वं यद्भूतं यच्च भव्यं सनातनम् ' असे ऐक्य कैवल्योपनिषदात वर्णन केले आहे असे हे शिव विष्णूचे ऐक्य प्राचीन कालापासून मानले गेले आहे महाभारतात अनुशासन पर्वात उपमन्यूचे आख्यान आहे त्यात जांबवतीला पुत्र व्हावा म्हणून श्रीकृष्णान शंकराची आराधना केली व शंकराची सहस्रनामे श्रीकृष्णाने उपदशिली असे कथन आहे अर्जुनानेही शंकराचीन आराधना करुन पाशुपतास्त्र मिळविल्याची कथा प्रसिद्ध आहे महाभारतात असलेल्या विष्णू सहस्रनामात 'सर्व शर्व शिव स्थाणू ' व ' स्वयम्भू शम्भुरादित्य ' अशी वर्णने आहेत त्याप्रमाणे शिव व विष्णू या दोन देवता परस्पर भिन्न असल्या तरी त्यांचे ऐक्य सर्वांनाच मान्य आहे असा भेद कोणीही मानू नये असाच स्पष्ट आदेश सर्वत्र दिसतो 'शिव थोर विष्णू लहान । हरि विशेष हर गौण । ऐसे म्हणति जे त्यालागून । आणून नरकी घालाव ' अशी एक ओवी शिवलीलामृतात आहे मराठी संतानी हे हरिहराचे ऐक्य अनेक ठिकाणी आग्रहाने वर्णन केले आहे नावे भिन्न असली तरी ती एकाच परमेश्वराची रूपे असल्याचा बोध मराठी संतांचा आहे भागवत संप्रदायाचे पहिले उद्गाते श्रीज्ञानदेव यांनी खर म्हणजे या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया घातला पण हे ज्ञानेश्वर स्वतः शिवोपासक अशा नाथ संप्रदायाकडून प्रेरित झाले होते हे आपणास माहित आहे ' आदिनाथ उमाबीज प्रकटेले ' या अभंगात किंवा 'क्षीरसिंधुपरिसरी । शक्तीच्या कर्णकुहरीं ' या ओळीने सुरु होणाऱ्या ज्ञानेश्वरीमधील गुरुपरंपरेच्या ओव्या (अध्याय १८/१७५२ १७६६) या दृष्टीने पाहण्यासारख्या आहेत एकनाथानी श्रीशिवमाहात्म्य विस्ताराने वर्णन करुन पुन हरिहरैक्य म्हणून आणखी काही अभंग स्वतंत्र केले आहेत ' एक ध्याती एकमेका । वेगळे अंतर नोहे देखा । ', 'हराचे चिंतन हरीचे हृदयीं । हरीचे चिंतन हराचे हृदयीं ', 'हरिहरांसी जे करिती भेद । ते भतवादी जाण निषिद्ध । हरिहर एक तेथे नाही भेद । कासयासि वाद मूड जनों । ' इत्यादी ओळींतून एकनाथानी शिव व विष्णू यांचे ऐक्य चांगल्या रीतीन वर्णन के- आहे 'शेवे सारिखे सारिखे, शिव आणि विष्णू सखे ' असे तुकोबांनीही म्हटले आहे शिवविष्णूच्या या ऐक्यप्रतिपादना मागील वारकरी संप्रदयात एकादशीबरोबरच सोमवारचा उपवास करावा असा निर्देश केलेला आहे अभंग क्र ७२ वरील विवरण पाहावे
६० सार्थक तुकारामगाथा १२५ वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित' ॥ १ ॥ शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्मचि पाळण । सकळीं सत्य करावे ॥ २ ॥ पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥ ३ ॥ घरांतनी पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥ ४ ॥ सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचे कारण । तया ठायीं अळंकार ॥ ५ ॥ सेवका स्वामीसाठीं मान । त्याचे नाम त्याचे धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत तदर्थी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रमाण-मुख्य, पट्ट-गादी, येर-दुसरी अर्थ - धर्मप्रवचनाच्या वेळीं गंध, अक्षदा, पूजन इत्यादींचा मान श्रोत्याच्या आधी वक्त्याचाच म्हणजे प्रवचन सांगणाराचाच असतो मग श्रोत्यांत एखादा संन्यासी यती असला तरी त्याला मान देणे उचित नाही १ सर्व अंगात डोके हे महत्त्वाचे असल्याने त्याचे स्थान मुख्य आणि मग यथा क्रमाने हातापायांचे याच धर्माचे पालन सर्वानी करावे २ मुलगा मोठा होऊन तो गादीवर बसून राज्यकारभार सांभाळू लागला की मग त्याचा बापही त्याची आज्ञा पाळतो ह्याप्रमाणे मान्य झालेली मर्यादा सर्वांनीच पाळावी ३ देव्हाऱ्यामधील देव दगडाचा असला तरी तो सामान्य किंवा कमी प्रतीचा मुळींच होत नाही आणि या देवाच्या पूजेची उपकरणे जरी सोन्याची असली तरी ती देवापेक्षा नेहमीच कमी प्रतीची मानावीत हे स्पष्टच आहे ४ राजाच्या मुकुटावरील मणी कमी किमतीच्या काचेचा असला व त्याच्या पायातील तोडा सोन्याचा असला तरी मुकुटमणी हीन ठरत नाही, किंवा तोडघास महत्त्व येत नाही तो अलंकार त्या ठिकाणीच शोभून दिसतो ५ सेवकाचा मान केवळ स्वामीमुळे वाढलेला असतो, त्याच्या धन्याचे नाव हेच खरे म्हणजे त्याचे धन होय तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संतानी हे नीट समजून असावे तुमचा मान देवामुळे आहे ६ १२६ घरों रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकापासीं थोरपण ॥ १ ॥ नेऊनियां घरा दाखवावे काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - काळतोंडा-लाजेने तोंड चुकविणारा, ठकावे-फसतात अर्थ - एखादा मनुष्य आपले मोठेपण गावातील लोकांपाशी नेहमी वर्णन करून सांगत असतो, पण त्याची घरची बायकामुले मात्र उपाशी मरत असतात १ आपल्या घरातील वैभवाचे वर्णन करणाऱ्या माणसाच्या घरी अचानक आपण जाऊन पाहिले तर काय दिसेल ? खरी परिस्थिती लक्षात येईलच तो लाजेने तोंड चुकवून बसतो २ मग तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अशा माणसास चांगले ओळखून आहोत त्याच्या बोलण्यावर लोक फसले तसे आम्ही फसणार नाही ३ १ अधिकार
सार्थ तुकारामगाथा ६१ जोहार-अभंग ३ १२७ मायबाप¹ जोहार । सारा साधावया आलो बेसकर ॥ १ ॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालितो जी ॥ २ ॥ फांकूं नका रुजू जालिया वाचून । सागा जी कोण घरीं तों धण्या ॥ ३ ॥ आजि मायबाप करा तडामोडी । उद्या कोणी घडी रहेना हो ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - जोहार-पूर्वी अंत्यजादी महार लोक 'जोहार' म्हणून नमस्कार करीत असत जोहार म्हणजे नमस्कार सारा-सरकारी कर, बेसकर-वेशीवर राहणारा महार, झाडा-हिशेब, खोडा-सापळा, पिंजरा, फाकू नका-जाऊ नका, तडामोडी-ताटातूट अर्थ - मायबाप, मी हा गावचा बेसकर महार तुम्हास जोहार जोहार असे म्हणून वंदन करीत आहे मी, सरकारकडून सारा मागण्यासाठी आलो आहे १ तुम्ही तुमच्या मागल्यापुढल्या जन्माचा सर्व हिशोब नीट द्या, नाही तर जन्ममृत्यूच्या किंवा संसाराच्या खोडपात, सापळयात किंवा चक्रात तुम्ही पुन सापडाल २ धन्याच्या चाकरीस हजर झाल्यावाचून तुम्ही इतरत्र कुठे जाऊ नका जे काही सागायचे असेल ते या घरच्या धन्याला सागा ३ मायबाप लोकहो, आजच काय प्रियान्मंची ताटातूट करून घेऊन मोकळे व्हायचे असेल तर व्हा, पुन काही उद्या ही वेळ यायची नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, शेवटच्या वर्षी जेव्हा हिशेब पूर्ण होईल त्यावेळी मग काही बचावाचे बोलणे करता येणार नाही काय ते आताच साधा ५ विवरण - मराठी संतानी लोकवाङ्मयाच्या स्वरुपात जो अनेक रूपके 'भारुड' या विभागात केली आहेत त्यात त्यांच्या 'जोहार' अभगाना फार महत्त्व आहे अशा प्रकारचा हा उपदेश रूपकात्मकच असतो गारुडी, गावगुंड, गोंधळी, वासुदेव, भुल्या, माग, जागल्या, वेस्कर, वाघ्या, मुरळी अशा अनेक नावांनी ही लोकगीतात्मक अभगरचना संतानी केली आहे नुसत्या परमार्थपर निरूपणापेक्षा त्याच्या लोकव्यवहारात्मक अशा विविध रीतीतून किंवा क्रियातून बोध दिल्यास तो सर्वसामान्य जनतेस अधिक उपयुक्त होणार असतो 'जोहार' हा एक महत्त्वाचा प्रकार आहे 'जोहार' म्हणजे अस्पृश्यांनी वरिष्ठांना करावयाचा नमस्कार, किंवा रामराम जुन्या समाजरचनेत किंवा जातिसंस्थेत निरनिराळ्या जातीना काही कामे वाटून दिली होती ती या भारुडात्मक लोक- वाङ्मयात भरून टिकून आहेत 'जोहार' मुख्यतः महाराच्या तातचा रामराम आहे गावव्यवस्थेत महारास फार महत्त्वाचे व जबाबदारीचे काम असे वेशीवर राहून त्याने गाव रक्षण करावे लागे सरकारचा सारा कुलकर्याच्या वतीने दरबारात भरण्याचे जोखमीचे काम यांच्याकडेच असे सरकारी पत्रव्यवहार नेणे, आणणे, निरोप देणे, घेणे ही कामेही या महाराकडेच असत महार हे अधिक बुद्धिमान, शक्तिमान व विश्वासू असल्यामुळे जुन्या समाजरचनेत त्यांना महत्त्वाचे स्थान असे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव मोठ्या सतोषाने करता येण्यासारखा आहे महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी महारच, म्हणून या देशाचे नाव महाराष्ट्र आहे असाही संशोधकाचा एक तर्क आहे येथील भूमिपुत्र म्हणून महारच प्रसिद्ध आहेत जमिनीची सर्व व्यवस्था महाराकडे असे जमिनीच्या न्यायनिवाड्यात महाराची साक्ष महत्त्वाची असे महाराच्या या कामाचे रूपकाच्या आश्रयाने मोठे सुरेख वर्णन संताच्या अभंगात सापडते स्वतः महाराचे रूप घेऊन किंवा त्या भूमिकेवरून संतानी परमेश्वरास अनेकदा आळविले आहे महार व त्याचा जोहार याना आणखी महत्त्व येण्याचे एक कारण म्हणजे ज्ञानेश्वराच्या काळी संतत्वास पोचलेला चोखा महार यांचे कर्तृत्व होय आपल्या विठ्ठलभक्तीमुळे हा चोखा महार सर्वांना वद्य झाला 'जोहार १ जोहार मायबाप जोहार
६२ सार्थ तुकारामगाथा , मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार । बहु भुकेला जाहलों । तुमच्या उष्टघासाठीं आलों' असा चोखोबाचा एक उत्कृष्ट अभंग जोहाराचा आहे चोखोबाना तो शोभून दिसलाच, पण जणु या भगवद्भक्तास वंदन करण्या- साठी ही वाट पुढील अनेक संतानी 'जोहार मायबाप' म्हणून अनेकदा अभगांची रचना करून चोखाबद्दल आपला आदर व्यक्त केला जोहार करताना असणारी लीन वृत्ती, दास्यत्वाची भूमिका, स्वत कमी असल्याची जाणीव, सेवेची भावना, काकुळतीचे शब्द या सर्वांचा उपयोग भक्तीच्या क्षेत्रात अधिक झाल्यास नवल नाही स्वतः ज्ञानेश्वरांचीही 'जोहार मायबाप जोहार । मी कृष्णाजी घरचा रांडेवार' म्हणून अभंग प्रसिद्ध आहे पुढे एकनाथानी जोहारावर अतिशय उत्कृष्ट रचना करून हे दालन समृद्ध केले 'जोहार मायबाप जोहार । मी तो एकनाथ महार' या भूमिकेवरून एकनाथांचे सर्वच अभंग हृदयस्पर्शी व उद्बोधक आहेत १२८ येऊं द्या जो काहीं वेसकरास । आतून बाहेर योजेचा घास ॥ १ ॥ जो पावे तो हातचि रिता नाहीं । कधीं तरी कांहीं द्यावे घ्यावे ॥ २ ॥ तुका म्हणे उद्या लावीन म्हनेरा । जे हे दारोदारामोवतीं फिरा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- योजेचा-चांगल्या स्वच्छतेचा, निर्मळ, म्हनेरा-तगादा अर्थ - अहो महाराज, हा वेसकर आला आहे आतून काही निर्मळ व सुग्रास अन्नाचा घास बाहेर येऊ द्या ना मजकडे तुमच्या कृपेचा ओघ मजकडे वळू द्या ना १ मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा हात रिकामा नाही, सवड नाही असे म्हणता, पण असे म्हणून कसे चालेल ? केव्हा तरी काही तरी मला द्यावे लागेल, मजकडून दुआ घ्यावा लागेल २ तुकाराम महाराज म्हणतात, उद्या मी सारखा तगादा लावीन तुमच्या दारात, मग मात्र जन्मभर जन्ममृत्यूच्या चक्रात तुम्ही फिरत राहाल ३ १२९ देतो घेती परज गेली । घर खालीं करुनिया ॥ १ ॥ धावण्याचा न पडे हाती । खादली राती काळोखी ॥ २ ॥ अवघियाचे अवघें नेलें । याहीं ठेविले नाहीं मागें ॥ ३ ॥ सोंग सपादुनि दाविला भाव । गेला आधीं भाव घरि होती ॥ ४ ॥ घराकडे पाहू नयेसेचि जाले । अमानत केले दिवाणात ॥ ५ ॥ आतां तुका कोणा न लगेचि हातीं । जाली ते निश्चिती बोलो नये ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - परज-धार, चमक, भाव-मोह, सांग, अमानत-ठेव, दिवाणात-सरकाराच्या दरबारात अर्थ - देण्याघेण्याच्या क्रिया करणारी बुद्धीची धार किंवा चमक आता घर सोडून निघून गेली आहे, काळोख्या रात्रीच्या अंधाराची जी अवस्था होती ती खाऊन टाकली, म्हणजे संपविली, आता धावत येणाऱ्या काळाच्या हातात मी लागणार नाही २ मी सर्व धर्माचे, सर्व तत्त्वाचे सार पाहिले, आता काही पाहावयास मागे ठेविलेच नाही ३ या दृश्य जगाच्या मायारुप वस्तूने सोंग धारण करून वेगळाच भाव मला दाखविला होता, पण तो घरवर असणारा मोह आता नाहीसा झाला ४ आता शरीररुप्याकडे व घरप्रपंचाकडे पाहू नये असेच वाटू लागले, कारण देहात्मबुद्धीची ठेव आता मी प्रभूच्या दरबारातच ठेविली आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात आता मी कुणाच्याही हाती लागणारा नसून माझा जो आता निश्चय झाला आहे त्याचे वर्णनही करून सांगता येणार नाही ६
सार्थ तुकारामगाथा ६३ १३० शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसा साता ॥ १ ॥ उठाउठी करी स्मरणाचा धावा । धरवत देवा नाहीं धीर ॥ २ ॥ त्वरा झाली गरुड टाकिला मागें । द्रौपदीच्या लागे नारायणे ॥ ३ ॥ तुका म्हणे करी बहुत तातडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शुकसनकादिक-प्रसिद्ध ब्रह्मचारी, धर्मज्ञ, वैराग्यशील ज्ञानी असा शुकाचार्य सनक, सनदन, सनातन व सनत्कुमार हे सनकादिक ब्रह्मदेवाचे चार मानसपुत्र ज्ञानी व तत्त्ववेत्ते म्हणून प्रसिद्ध होते बाहो- हात, परीक्षित-अर्जुनाचा नातू, उत्तरा-अभिमन्यू याचा मुलगा उठाउठी-ताबडतोब, द्रौपदी-पांडवपत्नी, द्रुपद राजाची मुलगी अर्थ - शुकसनकादिक ऋषिमूनींनी हात ऊंच करून सांगितले आहे की, परिक्षिताचा धावा ऐकून सातव्या दिवशी भगवंताने त्याचे रक्षण केले १ जो कोणी आपले स्मरण करील धावा करून प्रार्थना करील त्याकडे देव रक्षणास धावतो, देवालासुद्धा मग धीर धरवत नाही २ कौरवसेभेत दुष्टाकडून गांजलेल्या द्रौपदीकडून आर्त हाक ऐकू येताच भगवंताने गरुडासारख्या चपळ वाहनासही मागे टाकले व तो मनोमय वाहनातून येऊन तिच्या साहाय्यासाठी उभा राहिला ३ तुकाराम महाराज म्हणतात, एकनिष्ठ प्रेमाची आवड या भगवंतास फार असल्याने तो भक्ताच्या रक्षणासाठी अशीच त्वरा करीत असतो तातडीने तो भक्तांना संकटमुक्त करतो ४ विवरण - केवळ मनोभावे स्मरण केले तरी भक्ताचे रक्षण परमेश्वर कसे करतो हे दाखविण्यासाठी तुयानी दोन उदाहरणं दिली आहेत परिक्षितास भगवंतानी अनेक वेळा सरक्षण दिले आहे अश्वत्थाम्यान सोडलेल्या अस्त्रांमुळे उत्तरच्या गभात हा होरपळू लागला उत्तरेने विष्णूचा धावा केला, तेव्हा त्याचे रक्षण झाले हा एकदा तृषाक्रान्त होऊन पाण्यासाठी शमीक ऋषीच्या आश्रमात गेला शमीक ध्यानस्थ असल्याने त्याच्या ध्यानात याची याचना आली नाही यात रागाने त्याच्या गळ्यात एक मृत सर्प अडकविला ऋषीचा मुलगा शृंगी याने सातव्या दिवशी परीक्षित राजाला सर्पदंश होऊन मरण येईल असा शाप दिला परिक्षिताचे हे सकट शुकाचार्यांच्याकडून भागवतश्रवणान नष्ट झाल्याची कथा आहे १३१ बोलिलो तें काहीं तुमचिया हिता । वचन नेणता क्षमा कीजे ॥ १ ॥ वाट दावी तया न लगे रुसावे १ । अतित्याई जीवे नाश पाये ॥ २ ॥ निंब दिला रोग तुटाया अंतरों । पोभाळितां धरि आंत चरे ॥ ३ ॥ , तुका म्हणे हित देखण्यास कळे । पडती आंधळे कृपा माजी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अतित्याई-आततायी मनुष्य, पोभाळिता-वरवर चोळल्याने, देखण्यास-पाहणाऱ्यास कूपा माजी-विहिरीत अर्थ - मी आजवर कटू शब्दात तुम्हास काही बोललो असेन, पण ते तुमच्या हितासाठीच होते हे ध्यानात घ्या त्यातील कडवटपणा सोडून मला क्षमा करा तुम्ही १ जो नीट रस्ता दाखवितो त्याच्यावर कधी रागावू नये, त्याचे न ऐकताच जर आततायी माणसाप्रमाणे वागाल तर मग नष्ट व्हाल २ एखाद्या वैद्याने पोटात घ्यावयास कडू लिंबाचे औषध दिलेले असते, ते रोग नाहीसा व्हावा म्हणूनच पण ते पोटात घ्यायच्या ऐवजी जर वरवरच चोळले तर बरे वाटायच्या ऐवजी रोगाचे प्रमाण वाढतच राहील ३ तुकाराम महाराज म्हणतात जे लोक विचार करतात त्यानाच आपले हित समजेल, पण आंधळे असतील तर ते विहिरीतच पडतील अज्ञानाच्या विहिरीत पडून राहतील ४ १ शिषावे
६४ सार्थ तुकारामगाथा १३२ माकडें मुठी धरिले फुटाणे। गुंतले ते नेणे हात तेथें ॥ १ ॥ काय तो तयांचा लेखावा अन्याय। हित नेणे काय आपुले ते ॥ २ ॥ शुकें नळिकेशीं गोवियेले पाय। विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे एक ऐसे पशुजीव। न चले उपाव काहीं तेथें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लेखावा-मानावा शुकें-पोपटान, एकू-कित्येक उपाव-उपाय अर्थ - माकडाने मडक्यातील फुटाणे घेण्यासाठी हात आत घालून मुठीत फुटाणे धरून ठेविले, पारधी धरायला आला तेव्हा त्याचा हात काही त्या मडक्यातून निघेना फुटाण्याचाही लोभ सोडवेना त्याला १ पण यामुळे असे झाले की ते मात्र अडकून पडले, तो काय त्याचा अन्याय समजावा ? त्याला आपले हित समजले नाही २ अशीच बाब पोपेटाची आहे नळीवर पाय ठेवून बसतो तो बसल्याबरोबर नळी गरकन फिरून तो खाली येतो, आणि अडकला जातो त्याला आधाराची नळीही सोडता येत नाही, की आपल्या पक्षाचा उपयोगही त्यास सुचत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात असे कित्येक पशूचे जीवन फसून गेले आहे अशा जीवाच्या उद्धारासाठी, संसारात आसक्त राहणाऱ्यासाठी काही उपाय सुचत नाही ४ १३३ हरि तू निष्ठुर निर्गुण। नाही माया बहु कठिण। नव्हे ते करिसी आन। कवणे नाही केले ते ॥ १ ॥ घेऊनि हरिश्चंद्राचे वैभव। राज्य घोडे भाग्य सर्व। पुत्र पत्नी जीव। डोबाघरीं वोपविलीं ॥ २ ॥ नळा दमयंतीचा योग। विघडिला त्याचा संग। ऐसे जाणे जग। पुराणे ही बोलती ॥ ३ ॥ राजा शिबी चक्रवर्ती। कृपाळु दया भूतीं। तुळविले अंतीं। तुळें मास तयाचे ॥ ४ ॥ कर्ण भिडता समरगणीं। बाणी व्यापियेला रणीं। मागसी पाडोनी। तेथें दात तयाचे ॥ ५ ॥ बळी सर्वस्वे उदार। जेणे उभारिला कर। करूनि काहार। तो पाताळी घातला ॥ ६ ॥ श्रियाळाच्या घरीं। धरणे माडिले मुरारी। मारविले करीं। त्याचे बाळ त्याहातीं ॥ ७ ॥ तुज भावे जे भजती। त्याच्या ससारा हे गति। ठाव नाही पुढती। तुका म्हणे करिसी ते ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - आन-भलत बाहा तरी डोब-स्मशानातील राखणदार वोपाविलीं-विकली, तुळविले- वजन केले अर्थ - परमेश्वरा तू मोठा निष्ठुर, निर्विकार आहेस तुला काही दयामाया दिसत नाही, जे कधी कुणी केले नाही असे तू करतोस १ तू हरिश्चंद्र राजाचे वैभव घेतलेस, त्याचे राज्य घोडे हे सब वैभव हरण केलेस, इतकेच नव्हे तर त्याचा मुलगा, त्याची पत्नी व तो स्वत' याना डोबाघरी विकून घ्यायची पाळी तू आणलीस २ नळदमयंती
सार्थ तुकारामगाथा ६५
याची सगत फोडून त्याज्यातही तू असाच वियोग घडविलास असे सारी पुराणे सांगतात जगही बोलते ३ शिबी राजा छत्रपती होता आणि सर्व प्राणिमात्रावर तो दयाही करी, पण तू त्याला स्वतःचे मांस तापडीत घालून वजन करायला लावलेंस ४ ह्याच प्रमाणे देवा, रणागणात अर्जुनाशी युद्ध करताना मरणोन्मुख झालेल्या कर्णास तू त्याचे सुवर्णाचे दात तो बाणानी व्यापून गेलेला असताना मागितलेस ५ बळी राजा तर केवढा उदार, सर्वस्व द्यायला नेहमी तयार असे,' त्याने तुला दान देण्यासाठी हात वर केला, तर तू कपट करून त्यालाच पाताळात दडपलेस ६ आणि परमेश्वरा, तू श्रियाळ राजाच्या घरी विचित्र हट्ट धरून धरणे धरिलेंस व त्याच्या मुलास त्याच्या हातून मारविलेस ७ देवा, तुला जे भक्तिभावाने भजतात त्याच्या संसाराची ही अशी अखेर तू करतोस तुकाराम महाराज म्हणतात, आता त्यांना पुढे काय गती देत असशील काही पत्ता नाही त्याचा' ८
विवरण - थोर भक्तांना ईश्वरप्राप्तीसाठी, सत्त्वपालनासाठी, धर्मासाठी किती दुःख भोगावे लागते व परमेश्वरही त्याची परीक्षा कशी पाहतो याचे वर्णन प्राचीन काळचे अनेक दाखले देऊन तुकारामबुवांनी केले आहे हरिश्चंद्र हा सत्यव्रताचा पुत्र अयोध्येचा राजा असून त्याच्या पत्नीचे नाव तारामती विश्वामित्रास स्वप्नात दिलेले वचन खरे करण्यासाठी त्याने राज्य सोडले, नंतर स्वतःस स्त्रीस व पुत्रास एका वृद्ध ब्राह्मणास विकून स्वतःस स्मशानात डोबाघरी पाणी भरावे लागले असा याचा छळ झाला नळदमयंती यांची कथाही अशीच शोकार्तक आहे निषध देशाचा राजा हा नळ, त्याची पत्नी दमयंती हा प्रजेचे पालन उत्तम प्रकार करी अश्वमेधादिक यज्ञ करून याने देवानांही संतुष्ट केले काही थोड्या अपराधावरून याच्या शरीरात बलीने प्रवेश केला व यास द्यूत खेळण्याची बुद्धी झाली त्याची सर्व संपत्ती यात गेली तो एका वस्त्राने नगराबाहेर पडला, दमयंतीही एका वस्त्रान त्याच्याबरोबर आली अरण्यात याचे भुकेने फार हाल झाले, एकदा पक्ष्यानी याचे अर्धे वस्त्रही नेले मग त्यान दमयंती झोपली असताना तिचे अर्ध वस्त्र कापून घेतले ता तिला तिथेच सोडून गेला दमयतीस चेदी देशाच्या राजाची सैरंध्री म्हणून काम करावे लागले अशी संकटे नळदमयंतीवर येत राहिली
शिबी राजा मोठा दयाशील होता याची परीक्षा पाहण्यासाठी अग्नीन कपोताचे व इंद्रान श्येनाचे अशी रूप घेऊन श्येन कपोतामागे लागला. कपोत शिबीस शरण आला श्येनाने कपोताची मागणी केली तेव्हा आश्रयास आल्याचे रक्षण करणार असे त्याने मागितले, पण कपोताच्या ऐवजी तेवढेच मास त्याने आपल्या अगातील वाढून श्येनास दिले कर्ण हा सूर्यापासून झालेला कुंतीचा पुत्र महा पराक्रमी पण सुतीने याचे पालनपोषण न केल्याने हा सूतपुत्र म्हणूनच वाढला अपमानाने व सूडाने याचा स्वभाव नेहमी तप्त राही. हा कौरवाच्या बाजूचा असून भारतीय युद्धात अर्जुनाशी याचे निकराचे युद्ध झाले, ऐन संकटाकाळी याचे सुवर्णाचे दात देवान मागितले अशी कथा आहे बळी हा दैत्याचा राजा धर्माने राज्य करीत होता याचे सर्व हरण करण्यासाठी भगवान विष्णूनी वामन बटूचे रूप घेऊन यास तीन पावलांची भूमी मागितली ती याने दिल्यावर वामन बटू सर्व विश्वास व्यापणारा बनला एका पावलाने त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्याने स्वर्ग व तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याने पाताळात दडपून टाकले अशी कथा पुराणात आहे श्रियाळाचे सत्त्व भगवान शंकरानी पाहाण्याचे ठरविले अतिथीचा रूप धारण करून ते ऐन भोजनाच्या वेळी त्याच्या घरा आले त्याने संतुष्ट होऊन या ब्राह्मणाचे स्वात करून इच्छाभोजन विचारले या विचित्र ब्राह्मणाने राजा व राणी चांगुणा याच्या एकुलत्या एका मुलाच्या मासाचे भोजन मागितले ते या उभय तानी देऊन अतिथीस तृप्त केले अशा या भक्ताच्या दुखदायक कथा असल्या तरी त्याच्या आयुष्याचा शेवट चांगला होऊन त्यांना सद्गती मिळाली आहे
१३४ चाल फेलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळा ॥ १ ॥ तुज पापचि नाहीं ऐसे । नाम घेता जवळीं वसे ॥ २ ॥ पंच पातकांच्य फोडी । नामें जळता न लगे घडी ॥ ३ ॥ केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहो ॥ ४ ॥
तु गा ९
६६ सार्थ तुकारामगाथा करों तुज जों करवती । आणिक नामें घेऊं किती ॥ ५ ॥ तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्याळा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाल-चल, समज, कोडी-कोटी, जमान-जामीन, रीग-प्रवेश. अर्थ :- अनेक वेळा विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण कर; चल, ताबडतोब दुष्कर्मांतून मोकळा होशील. १ जवळ राहणारे असे एकही पाप तुझे नामस्मरण सुरू होतांच उरणार नाही. २ पंचमहापातकांची पापे केवढीही, कोट्यावधी जरी केलीस तरी ती एका नामस्मरणाने एका क्षणात जळून जातील. ३ मागे काही पापे तू केली असशील, पण त्यांत आता तू राहू नकोस, त्या सर्वांच्याबद्दल मी फार तर जामीन राहीन. ४ तुला हवीत तेवढी तू पापे कर; किती पापांची नांवे घेऊ मी ? ती सर्व तू कर. ती सर्व सपतील. ५ तुकाराममहाराज म्हणतात, ती सर्व पापे जळून भस्म होतील कारण हरिनामात प्रत्यक्ष यमालाही प्रवेश नाही. पापांचीही ज्वालात राख होऊन जाईल ६ १३५ बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निरपराध ॥ १ ॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ २ ॥ साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥ ३ ॥ तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आरुष-कठिण, दुर्बोध, आहाच- व्यर्थ, निष्फळ अर्थ :- एखाद्या लहान मुलाने चुकून वडिलात काका म्हटले तर काही बिघडत नाही; त्यामुळे बाप काही परका होत नाही. १ तसेच भक्ताने थेटेवाकडे नाव परमेश्वराचे घेतले तरी बिघडणार नाही, त्यातील भाव पाहून ईश्वर त्याचे मनोरथ पूर्ण करतो. २ साखरेस धोंडा म्हटले तर काही तिची गोडी तोंडाला कमी लागत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताचे बोल ओबडधोबड, दुर्बोध असले तर ते काही व्यर्थ ठरत नाहीत, वाया जात नाहीत. ते परमेश्वरास अधिक आवडतात. ४ १३६ चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥ १ ॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥ २ ॥ तुका म्हणे अवघे फिके भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वायु-लहर, मात-गोष्ट. अर्थ :- आपल्या मनातच नाही ते अगदी जवळ असून काय उपयोग ? एखादे मोठे वासरू रात्रदिवस आपल्या आईजवळ असले आणि आईच्याच मनात प्रेम नसले तर काय त्या जवळ असण्याचा उपयोग ? १ पण दोघाचे चित्त जर एकमेकात मिळून गेले असेल तर मात्र प्रीतीच्या संभाषणांच्या वाऱ्याची लहर किंवा झुळूक गोड लागेल. २ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही एका भावनेशिवाय फिके असून सुग्रास अन्नात मीठ नसल्यामुळे ते जसे बेचव होते तशीच अवस्था भावाशिवाय जीवनाची होते. ३ १३७ काय काशी करिती गंगा । भीतंरि चांगा नाहीं तो ॥ १ ॥ अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ २ ॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भीतरि-अंतरगात, चांगा-चांगले, कुचर-कठिण दाणा. अर्थ :- जर अंतरंग शुद्ध नसेल तर बाहेरच्या काशीयात्रेचे व गंगास्नानाचे काय महत्त्व ? मनच जर चांगले नसेल तर काशी व गंगा याचा काही उपयोग नाही: १ एखादा कठिण दाणा अधणात शिजविला तरी तो तसाच टणक
सार्थ तुकारामगाथा ६७ राहतो, शिजत नाही की मऊ होत नाही, त्याचा काही शिजून रस होत नाही, त्याप्रमाणे अंतरंग कठिण असेल तर काही उपयोग नाही २ वरवर लावलेले कपाळावरचे टिळे व गळ्यातील माळा याचा काय उपयोग ? अशा दुष्ट माणसाच्या हृदयात भावभक्तीचा लवलेशही नसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, एका प्रेमभावाशिवाय जो बोलतो ते त्याचे निरर्थक भुंकणेच असते विनाकारण शीण मात्र त्याला होतो, कारण भावाविना बोलण्याचा काही उपयोग नाही ४ १३८ शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । वाईंल तो त्यास न विसंबे ॥ १ ॥ दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ २ ॥ तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - शिंदळ-वाईट चालीचा, व्यभिचार करणारा पुरुष, साला-मेहुणा, बायकोचा भाऊ अर्थ - जो वाईट चालीचा मनुष्य असतो त्यास कुणावरच विश्वास ठेवावासा वाटत नाही त्याच्या बायकोचा प्रत्यक्ष भाऊ जरी बहिणीस माहेरो न्यायला आला असेल तरी तो त्याच्याबरोबर तिला पाठवीत नाही कारण त्याला सर्वजण स्वतःसारखेच वाटतात १ तो नेहमीच चोरी करण्यात गुंतलेला असतो त्याची बुद्धी सदैव त्याच कर्मात रमलेली असते व इतर सर्व लोक आपल्यासारखेच चोर आहेत असेच तो मानतो २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनात जसा भाव, जशी वासना असेल तशी त्याची भावना होत राहते ३ काला चेंडूफळी-अभंग १०० १३९ झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचे गमावी तो पाठी साहे टोला ॥ १ ॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ २ ॥ आगळा होऊनि घरी वरचिया वरी । चपळ तो जिंके गाढचा ठके येरझारीं ॥ ३ ॥ हातीं सापडले उभें बैसो नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवे करूनि ॥ ४ ॥ डाईं पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोवता ही उभा फेर ॥ ५ ॥ तुका म्हणे सुख पाहे तयाचे आगळें । जिंकी तो¹ हरवी कोणी एका तरी काळें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - साहे-सहन करतो टोला-मार गाढया-दुबळा, अव्यक्त सोरी-दाव डाई-दावात अर्थ - हा सत्त्व, रज, तम अशा त्रिगुणाचा चेंडू तुम्ही वरचेवर झेला हो जर तुमच्या हातातून हा चेंडू निसटला तर मात्र जन्ममृत्यृचा डोला किंवा मार तुमच्या पाठीवर बसेल असेच समजा १ हा त्रिगुणाचा चेंडू वरचेवर झेलून अलगद हाताने निराळा टाकून द्या त्याचा म्हणजे देहबुद्धीत असलेल्या त्रिगुणात्मकतेचा सबंध सोडून तुम्ही आपली वरवर असणारी दृष्टी मनाशी एकाग्र कराथी, स्वतःच्या अंतर्यामी पाहावे २ स्वात्मसुखाने वेगळेच गुप्त होऊन हा त्रिगुणात्मक चेंडू वरचेवर धरून निराळाच ठेवा या कार्यात जो चपळ आहे तो डाव जिंकेल, जो दुबळा आहे तो डाव हरेल आणि मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडेल ३ जर एकदा का या त्रिगुणात्मक बंधनात व देहबुद्धीच्या तावडीत सापडलात की मग कुणी दमू देणार नाही, विश्रांति मग कुणी घेऊ देणार नाही डावामागून डाव एकसारखे वाकवून घेतील ४ मग या त्रिगुणाच्या डावात सापडल्यावर मात्र दुःखाचे डोंगरच्या डोंगर उभे राहतील, पाठीवरचा भार वाढत राहील व भोवतीचे खेळातील सोंगडी त्रास देतील ५ तुकाराम महाराज म्हणतात, जो कुणी एखाद्या वेळेस त्या हरीला जिंकेल त्यापेक्षाचे त्याचे सुख अलौकिक म्हणावे लागेल ६ विवरण - येथून पुढचे शंभर अभंग काल्यावरच आहेत 'काला' या शब्दाचा अर्थ मिश्रित खिचडी असा असून श्रीकृष्णाच्या बालजीवनात यास फार महत्त्व अस लहानपणी श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांना बरोबर घेऊन १ जिवीतो हरिसा
६८ सार्थ तुकारामगाथा गाईंच्या बरोबर रानात, वनात जात असे त्याच्या सवंगड्यांबरोबर त्याची शिदोरी पाठीशी असे वनात गेल्यावर काही खेळ होत असत, नीडाविलास झाला की मग शिदोऱ्या सोडून जेवण होई यावेळी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र होत असाव्यात या मिश्रणास काला म्हणतात यात श्रीकृष्णचीही शिदोरी मिसळलेली असल्याने तिची चव या काल्यात आलेली असते त्यामुळे फार महत्त्व या काल्यास येते श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी यांच्या बालजीवनातील हे मधुर प्रसंग मराठी संतांनी मनापासून वर्णन केले आहेत श्रीकृष्णाच्या बालजीवनातील हा रम्य आविष्कार अतिशय लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी वनातील विविध क्रीडांचे व गोपांच्या खेळांचे फार सुंदर वर्णन केले आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हा श्रीकृष्णाचा बाल अवतार अस- ल्यामुळे या वनक्रीडांना फारच महत्त्व आहे या दृष्टीने हे काल्याचे अभंग पाहण्यासारखे आहेत यात गोळणी, हमामा, हुतुतू, चेंडूफळी, फुगड्या, हुवरी, दळण, कांडण, टिपरी, विटीदांडू, मृदंगपाट्या इत्यादी विविध खेळांचे रूपकात्मक वर्णन असून त्यातून अध्यात्माचे व परमार्थविचाराचे सुबोध विवेचन करण्यात आले आहे नुसता बोध कोरडा होतो, तो खेळाच्या, बाललीलांच्या रूपांनी दिल्यास अधिक पटतो श्रीकृष्ण व त्याचे बालमित्र यांनी मधुवनात केलेल्या क्रीडांचे अवीट वर्णन संतांच्या अभंगांतून पाहावयास सापडते श्रीकृष्णाची सुंदर अशी बालमूर्ती, त्याचा डौलदार असा गवळ्याचा वेष, गळ्यात हार, डोक्यावर मोरपिसांची टोपी, आणि भोवती साधे साधे पण श्रीकृष्णावर अपार प्रेम असलेले त्याचे अनेक सोबती यांच्या विविध खेळांचे प्रकार, त्यांच एकमेकांवर रागावणे, रुसणे, श्रीकृष्णाने समजूत काढणे, मग त्याच्या शिदोऱ्या सुटणे, त्यांची वनातील पंगत बसणे, कुणाची भाकरी, कुणाचा भात, कुणाचे दहीदूध, कुणाच्या लाह्या यांचेमधूनच सर्व मिश्रण-काला-करून त सर्वांना वाटणे इत्यादी विविध क्रीडामधील आनंद व अलौकिक सुख संतांनी काल्यावरचे अभंग करून स्वतः लुटले व इतरांसाठी सिद्ध केले बाम्होबा, पेंद्या इत्यादी विशिष्ट मित्रांचे उल्लेख संतांच्या अभंगांत येत असतात काही मित्र बोबडे, लंगडे, खुजे, पांगळे, बहिरे होते त्यांची मजेदार वर्णने त्यांनी केलेली आहेत. 'तुला कमाल ले, संभाल अपुल्या गाई' या नावाने एकनाथांचे एक प्रसिद्ध गीत या संबंधात ध्यानात येण्यासारखे आहे विविध खेळ, क्रीडा, भांडणे, मारामारी, पुनः गोडी, सलोखा, श्रीकृष्णाचे समजावणे व मग सर्वांचे एकत्रित भोजन यातील सुख भोगण्यासाठी स्वर्गातील देवसुद्धा पृथ्वीवर येण्याची इच्छा करतात ज्ञानेश्वरांच्या काळापासून हे काल्याचे अभंग प्रसिद्ध आहेत एखाद्या उत्सवाच्या अखेरीस, यात्रेच्या शेवटच्या दिवशी, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी काल्याचे कीर्तन करण्याची पद्धती अजून आहे 'वैष्णवाचा मेळ सबळ मिळाला । विठ्ठल नामें काला पदरींसी, 'म्हणून निवृत्तिनाथांनी याचे वर्णन केले आहे 'सोडिल्या शिदोरी । काला करी दहीभात । प्यारे अवघे समस्त । हरी गोपाळांसी देत' असे या काल्याचे वर्णन श्रीसेनामहाराजांनी केले आहे 'देव भक्त दोन्ही करिताती काला । तयाच्या सुखाला वर्णो कोण।' या शब्दात एकनाथानी काल्याच्या सुखाचे वर्णन केले आहे 'अवघ्या सोडियेल्या मोटा । आजीचा दही काला केला गोमटा ॥ घ्यारे घ्यारे दहीभात । आम्हा देतो पंढरीनाथ' अशा भाषेत संत भानुदासांनी या प्रेमसुखाची महती गाइली आहे 'एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळांशीं लाह्या बांटी' अशी साक्ष ज्ञानेश्वरांच्याबद्दल जनाबाईने दिली आहे तुकाराम महाराजांनी तर या काल्याचे 'आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी' इतके वर्णन अतिशय विस्ताराने पण तन्मयतेने केले आहे श्रीकृष्ण व त्याचे मित्र यांच्या प्रेमाचे इतके अवीट वर्णन इतरत्र सापडणे कठिण आहे या प्रेमसुखाच्या दर्शनाने साऱ्या ब्रह्मांडास जणू वेड लागले 'काल्याचिये असे । देव जळीं जाले मासे' असे वर्णन तुकोबांनी एके ठिकाणी केले आहे 'धर्ची धर्ची घेऊ घास । ब्रह्मरस आवडी' अशी याची महती असल्याने 'गोकुळीच्या सुखा । अतपार नाही लेखा' असा निर्णय तुबांनी एका अभंगात दिला आहे काल्याच्या या सर्व अभंगात भगवंताचे प्रेम सर्वांवर कसे सारख्या प्रमाणात असते, कधी दुःखीकष्टी भक्तांकडे त्याचे अधिकच लक्ष कसे असते हेही ध्यानात येते प्रभुप्रेमाची व अध्यात्माची खेळता खेळता शिकवण देण्याची सोय संतांनी या काल्याच्या अभंगात केलेली आहे पंढरपूरच्या यात्रेतही काल्याच्या या प्रसंगास फार महत्त्व असते पंढरपूरच्या दक्षिणेस सुमारे एका मैलावर गोपाळपूर नावाची छोटी वस्ती आहे तेथे गोपाळकृष्णाचे देऊळ आहे विष्णुपद, गोपाळपुरा याच भागात श्रीकृष्णाने