भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

वंत । एक सिद्ध अकस्मात । गगन वोळंगती ॥ ६ ॥ एक तेजीं तेज जा- हले । एक जळीं मिळोन गेले । एक दिसतांचि अदृश्य जाहले । वायुरूपीं ॥ ७ ॥ एक एकचि बहुधा होती । एक देखतांचि निघोन जाती । एक बै- सले असतांचि भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८ ॥ एक भयानकांवरी बैसती । एक अचेतनें चालविती । एक ते प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९ ॥ एक तेजें मंद करिती । एक जळें आटविती । एक वायु निरोधिती । विश्वजनांचा ॥ १० ॥ ऐसे हठनिग्रही कृतबुद्धी । जयांसि वोळल्या नाना सिद्धी । ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊनि गेले ॥ ११ ॥ एक मनःसिद्ध एक वाचासिद्ध । एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध । ऐसे नानाप्रकारचे सिद्ध । विख्यात जाहले ॥ १२ ॥ एक नवविधाभक्तिराजपंथें । गेले तरले परलोकींच्या निजस्वार्थे । एक योगी गुप्त पंथें । ब्रह्मभुवन पावले ॥ १३ ॥ एक वैकुंठास गेले । एक सत्यलोकीं राहिले । एक कैलासीं बैसले । शिवरूप होऊनी ॥ १४ ॥ एक इंद्रलोकीं इंद्र जाहले । एक पितृलोकीं मिळाले । एक उँडुगणीं बैसले । एक ते क्षीरसागरीं ॥ १५ ॥ सलोकता समीपता । स्वरूपता सायुज्यता । या चार मुक्ति तत्वतां । इच्छा सेवून राहिले ॥ १६ ॥ ऐसे सिद्ध साधु संत । स्वहितीं प्रवर्त्तले अनंत । ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणोनि वर्णावा ॥ १७॥ या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें । मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८ ॥ या नरदेहाचेनि संबंधें । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सो- डोनि स्वानंदें । सुखी जाहले ॥ १९ ॥ नरदेहीं येऊनि सकळ । ऊर्ध्वगति पावले केवळ । येथें संशयाचें मूळ । खंडोनि गेलें ॥ २० ॥ पशुदेहीं नाहीं गती । ऐसें सर्वत्र बोलती । म्हणोनि नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१ ॥ संत महंत ऋषि मुनि । सिद्ध साधु समाधानी । भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२ ॥ तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी । पिंडज्ञानी षट्दर्शनी तापसी । नरदेहींच जाहले ॥ २३ ॥ म्ह


१. सिंह, व्याघ्र इत्यादिकांवर. २. निर्जीव पदार्थ. ३. निश्चयी. ४. नक्षत्रांच्या समुदायांत. ५. न्याय, वैशेषिक, सांख्य, पातंजल, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशीं सहा शास्त्रें जाणणारे.

१८ श्रीदासबोध. [ दशक णेन नरदेहचि श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ । जयाचेनि चुके अरिष्ट । यम- यातनेचें ॥ २४ ॥ नरदेह हा स्वाधीन । सहसा नव्हे पराधीन । परंतु हा परोपकारीं झिजवून । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५ ॥ अश्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी । कृपाळुपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६ ॥ तैसा नव्हे नरदेहो । इच्छा जावो अथवा राहो । परी यास कोणी पहा हो । बंधन करूं शकेना ॥ २७ ॥ नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येता । अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥२८॥ नरदेह अंध असिला । तरी तो निपट वायां गेला । अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९ ॥ नरदेह असिला मुका । तरी घेतां न ये आशंका । अशक्त रोगी नासका । तरी तो निष्कारण ॥३०॥ नरदेह असिला मूर्ख । अथवा फॅपऱ्या समंधाचें दुःख । तरी तो जाणावा निर- र्थक । निश्चयेंसी ॥ ३१ ॥ इतुकेँही नसतां व्यंग । नरदेह आणि सकळ सांगें । तेणें धरावा परमार्थमार्ग । लौगवेगें ॥ ३२ ॥ सांगें नरदेह जोडला । आणि परमार्थबुद्धि विसरला । तरी मूर्ख कैसा भ्रमला । मायाजाळीं ॥३३॥ मृत्तिका खणोनि घर केलें । तें माझें असें दृढ कल्पिलें । परी हें बहुतांचें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४ ॥ मूषक म्हणती घर आमुचें । पाली म्ह- णती घर आमुचें । मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसी ॥ ३५ ॥ कां- तर्ण्य म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें । मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसी ॥ ३६ ॥ विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर । झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ३७ ॥ भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोऱ्या म्हणती आमुचें घर । आळिका म्हणती आमुचें घर । काष्ठामध्यें ॥ ३८॥ मार्जारें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर । मुंगुसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ३९ ॥ ढेंकूण म्हणती आ- मुचें घर । चांचणें म्हणती आमुचें घर । घुंगरडीं म्हणती आमुचें घर । नि- श्चयेंसी ॥ ४० ॥ पिंगूळ म्हणती आमुचें घर । व्याळें म्हणती आमुचें घर । पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ४१ ॥ पिसोळे म्हणती आमुचें १. सर्व अवयवांनीं युक्त. २. अति त्वरेनें. ३. उंदोर. ४. कोळ्याच्या जातीचा एक लहान किडा. ५. भ्रमरीची आळी. ६. कीड. ७. सर्प.

१ ला. ] नरदेहस्तवन. १९ घर । गांधले म्हणती आमुचें घर । सोट म्हणती आमुचें घर । आणि गोमी ॥ ४२ ॥ बहुत किड्यांचा जोजारें १ । किती सांगावा विस्तार । समस्त म्ह- णती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३ ॥ पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर । ग्रामस्थ म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥४४॥ पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर । घरचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५ ॥ तस्कर म्हणती आमुचें घर । राजकीय म्हणती आमुचें घर । अग्नि म्हणे आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६ ॥ समस्त म्ह- णती घर माझें । हें मूर्खही म्हणे माझें माझें । शेवटीं जड जाहलें बोझें । टाकिला देश ॥ ४७ ॥ अवघीं घरें भंगलीं । गांवाची पांढरी २ पडली । मग ते गृहीं राहिलीं । अरण्यश्वापदें ॥ ४८ ॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचें घर निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोनि गेलें ॥ ४९ ॥ ऐसी गृहाची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रतीती । जन्म दों दिवसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५० ॥ देह म्हणावें आपुलें । तरी तें बहुतात्कारणें निर्मिलें । प्राणियांच्या माथां घर केलें । उवा मस्तकीं भक्षिती ॥ ५१ ॥ रोममुळीं किडे भक्षिती । खांडूक झाल्या किडे पडती । पोटामध्यें जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२ ॥ कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी । कीड लागे कर्णांसी । आणि गोमाशा भरती ॥ ५३ ॥ गोचडि अशुद्ध ३ सेविती । चामवा मांसांत घुसती । पिसोळे चावून पळती । अक- स्मात ॥ ५४ ॥ सुंगे गांधले चाविती । गोमी जळवा अशुद्ध घेती । विंचू सर्प दंश कारिती । काँनटें फुशीं ४ ॥ ५५ ॥ जन्मोन देह पाळिलें । तें अक- स्मात व्याघ्रें नेलें । कीं तें लांडग्यांचि भक्षिलें । बलात्कारें ॥ ५६ ॥ मूषक- मार्जारें दंश कारिती । श्वानें अश्वें लोळें ५ तोडिती । रिसें ६ मर्कटें मारिती । कासावीस करूनियां ॥ ५७ ॥ उँहूॅ ७ डसोन उचलिती । हस्ती चिरडोनि टाकिती । वृषभ टोंचोन मारिती । अकस्मात ॥ ५८ ॥ तस्कर तडतडां तोडिती । भुतें झडपोन मारिती । असो या देहाची स्थिती । ऐसी आहे ॥ ५९ ॥ ऐसें शरीर बहुतांचें । हें मूर्ख म्हणे आमुचें । परंतु खाजें ९ जिवांचें । १. जंजाळ. २. लोकवस्ती; गांव ओस झाला हा अर्थ. ३. रक्त. ४. एक जातीचे जंतु. ५. लाडे, मांसाचे तुकडे. ६. अस्वलें. ७. उंट. ८. बैल. ९. खाद्य.

२० श्रीदासबोध. [ दशक तापत्रयीं बोलिलें ॥ ६० ॥ देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जाहलें । नाहीं तरी व्यर्थचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथें ॥ ६१ ॥ असो जे प्रापंचिक मूर्ख । ते काय जाणती परमार्थसुख । त्या मूर्खाचें लक्षण कांहींएक । पुढें बोलिलें असे ॥ ६२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके नरदेहस्तवनं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी ३२६. दशक दुसरा. १. मूर्खलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ॐनमोजी गजवदना । एकदंता त्रिनयना । कृपादृष्टीं भक्तजना । अवलोकावें ॥ १ ॥ तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्म- सुते । अंतरीं वसें कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥ वंदूनि सद्गुरुचरण । करूनि रघुनाथस्मरण । त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥३॥ एक मूर्ख एक पढत- मूर्ख । उभय लक्षणीं कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पाहिजे ॥ ४ ॥ पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । सावध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥ आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार । परी कांहीं एक तत्पर । होऊनि ऐका ॥ ६ ॥ जे प्रापंचिक जन । जयांसि नाहीं आत्मज्ञान । जे केवळ अज्ञान । त्यांचीं हीं लक्षणें ॥ ७ ॥ जन्मला जयांचे उदरीं । तयांसि जो विरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो एक मूर्ख ॥ ८ ॥ सांडोनि सर्वही गोत । स्त्रिये आधीन जीवित । सांगे अंतरींची मात । तो एक मूर्ख ॥ ९ ॥ परस्त्रियेसी प्रेम धरी । श्वशुरगृहीं वास करी । कुळेंविण कन्या वरी । तो एक मूर्ख ॥ १० ॥ समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता । सामर्थ्याविण करी सत्ता । तो एक मूर्ख ॥ ११ ॥ आपली १. तापत्रयनिरूपणांत. (दशक ३, समास ६।७।८ पहा.) २. ग्रंथलेखनाच्या स्फुरणरूपानें ३. स्त्री.

२ रा. ] मूर्खलक्षण. २१ आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ती । सांगे वडिलांची कीर्ती । तो एक मूर्ख ॥ १२ ॥ अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी । जो बहु- तांचा वैरी । तो एक मूर्ख ॥ १३ ॥ आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यांसी मैत्री करी । परन्यून बोले अहोरात्रीं । तो एक मूर्ख ॥ १४ ॥ बहुत जाग- ते जन । तयांमध्यें करी शयन । परस्थळीं बहु भोजन । करी तो एक मूर्ख ॥ १५ ॥ मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न¹ । सदा व्यसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख ॥ १६ ॥ धरूनि पराची आस । प्रयत्न सांडी सावकाश । निसुगाईचाँ² संतोष । मानी तो एक मूर्ख ॥ १७ ॥ घरीं विवे- क उमजे । आणि सभेमध्यें लाजे । शब्द बोलतां निर्बुजे³ । तो एक मूर्ख ॥ १८ ॥ नायके त्यास शिकवी । वडिलांस जाणीव दावी । जो सात्विकां- सि गोंवी⁴ । तो एक मूर्ख ॥ १९ ॥ आपणासून जो श्रेष्ठ । तयासि अत्यंत निकट । शिकवणीचा मानी वीट । तो एक मूर्ख ॥ २० ॥ एकाएकीं एक- सरा । जाहला विषयीं निलाजिरा । मर्यादा सांडोनि सैराँ⁵ । वर्ते तो एक मूर्ख ॥ २१ ॥ औषध न घे असोनि व्यथा । पथ्य न करी सर्वथा । न मिळे आलिया पदार्था । तो एक मूर्ख ॥ २२ ॥ संगेंविण विदेश⁶ करी । वोळखी- विण संग धरी । उडी घाली महापुरीं । तो एक मूर्ख ॥ २३ ॥ आपणासि जेथें मान । तेथें अखंड करी गमन । रक्षूं नेणे मानाभिमान । तो एक मूर्ख ॥ २४ ॥ सेवक जाहला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित । सर्वकाळ जो दुश्चित । तो एक मूर्ख ॥ २५ ॥ विचार न करितां कारण । दंड करी अप- राधाविण । स्वल्पासाठीं जो कृपण । तो एक मूर्ख ॥ २६ ॥ देवलंड पितृ- लंड । शक्तिविण करितो दंड । ज्याचे मुखीं भंड⁷भंड । तो एक मूर्ख ॥ २७ ॥ घरींच्यावरी खाय दाढा । बाहेर दीन बापुडा । ऐसा जो कां मूढ वेडा । तो एक मूर्ख ॥ २८ ॥ नीच यातीसि सांगात । परांगनेसि एकांत । मागें जाय खात खात । तो एक मूर्ख ॥ २९ ॥ स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनुपकार । करी थोडें बोले फार । तो एक मूर्ख ॥ ३० ॥ तपिळ⁸ खादाड आळसी । कुश्चिळ⁹ कुटिळ¹⁰ मानसीं । धारिष्ट नाहीं जयापाशीं । तो एक मूर्ख


१. उघड. २. आळसाचा, किंवा निर्लज्जपणाचा. ३. घाबरतो. ४. पीडा करी. ५. स्वैर. ६. प्रवास ७. बडबड. ८. तापट. ९. दुष्ट स्वभावी १०. कपटी.

२२ श्रीदासबोध. [ दशक ॥ ३१ ॥ विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान । तो एक मूर्ख ३२ ॥ लंडी लटिका लबाड । कुकर्मी कुटिल निचोड । निद्रा जयाची वाँड । तो एक मूर्ख ॥ ३३ ॥ दंत चक्षु आणि घ्राण पाँणी वसन आणि चरण । सर्वकाळ जयाचे मलिन । तो एक मूर्ख ॥ ३४॥ ऊंचीं जाऊनि वस्त्र नेसे । चौबारां बाहेरि बैसे । सर्वकाळ नग्न दिसे । तो एक मूर्ख ॥ ३५ ॥ वैधृति आणि व्यतिपात । नाना कुमुहूर्तै जात । अपशकुनें करी घात । तो एक मूर्ख ॥ ३६ ॥ क्रोध अभिमान कुबुद्धी आपणासि आपण वधी । जयासि नाहीं दृढ बुद्धी । तो एक मूर्ख ॥ ३७ ॥ जिवलगांसी परम खेदी । सुखाचा शब्द तोही नेदी । नीच जनांसि वंदी । तो एक मूर्ख ॥ ३८ ॥ आपणासि राखे नानापरी । शरणागतासि अव्हेरी । लक्ष्मीचा भरंवसा धरी । तो एक मूर्ख ॥ ३९ ॥ पुत्र कलत्र आणि दारा । इतु- काचि मानूनियां थारा । विसरोन गेला ईश्वरा । तो एक मूर्ख ॥४०॥ जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावावें । हें जयासी नेणवे । तो एक मूर्ख ॥ ४१ ॥ पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांसी ईश्वरी देणें । ऐशा केल्या बहुत जेणें । तो एक मूर्ख ॥ ४२ ॥ दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडोनि चाले । दिवसा झांकिले डोळे । तो एक मूर्ख ॥ ४३ ॥ देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही । ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो एक मूर्ख ॥ ४४ ॥ आदरेंविण बोलणें । न पुसतां साक्ष देणें । निंद्य वस्तु अंगिकारणें । तो एक मूर्ख ॥ ४५ ॥ तुर्क तोडोनि बोले । मार्ग सोडोनि चाले । कुकर्मी मित्र केले । तो एक मूर्ख ॥ ४६ ॥ परपिडेचें मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख । गेले वस्तूचा करी शोक । तो एक मूर्ख ॥ ४७ ॥ पत्त राखो नेणे कदा । विनोद करी सर्वदा । हांसतां खिजे पेटे हुंद्दीं । तो एक मूर्ख ॥ ४८ ॥ होर्ड घाली अवघड । 'काजेंविण करी बडबड । बोलोचि नेणे मुखजड । तो एक मूर्ख ॥ ४९ ॥ वस्त्र शस्त्र दोन्ही नसे । उंचस्थानीं जाऊनि बैसे । जो गोत्रजांसि विश्वासे । तो एक मूर्ख ॥ ५० ॥ तस्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे । आपुलें अनहित करी रागें । तो एक मूर्ख ॥ ५१ ॥ हीन जनांसि बरोबरी । बोल १. निर्लज्ज. २. अतिशय. ३. हात ४. चव्हाठा. ५. कामविकार. ६. वजन, महत्व. ७. झोंबी करण्यास. ८. पैज.

२ रा. ] मूर्खलक्षण. २३ बोले सरोत्तरीं । वामहस्तें प्राशन करी । तो एक मूर्ख ॥ ५२ ॥ समर्थांसी मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी । घरींच्या घरीं करी चोरी । तो एक मूर्ख ॥ ५३ ॥ सांडोनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भरंवसा । सार्थकेंविण वेंची वयसा । तो एक मूर्ख ॥ ५४ ॥ संसारदुःखाचेनि गुणें । देवासी गाळी देणें । मैत्राचे बोले उणें । तो एक मूर्ख ॥ ५५ ॥ अल्प अ- न्याय क्षमा न करी । सर्वकाळ धारकीं धरी । जो विश्वासघात करी । तो एक मूर्ख ॥ ५६ ॥ समर्थांचे मनींचा तुटे । जयाचेनि सभा विटे । क्षणीं बरा क्षणीं पालटे । तो एक मूर्ख ॥ ५७ ॥ बहुत दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक । ज्याची सभा निर्नायक । तो एक मूर्ख ॥ ५८ ॥ अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी । तो एक मूर्ख ॥ ५९ ॥ घरीं असोनि सुंदरी । जो सदा परद्वार करी । बहुतांचें उच्छिष्ट अंगिकारी । तो एक मूर्ख ॥ ६० ॥ आपलें अर्थ दुसऱ्यापाशीं । आणि दुसऱ्याचें अभिलाषी । पर्वतें करी हीनासी । तो एक मूर्ख ॥ ६१ ॥ अतीताचा अंत पाहे । कुग्रामामध्यें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो एक मूर्ख ॥ ६२ ॥ दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो एक मूर्ख ॥ ६३ ॥ उदकामध्यें सांडी गुरळी । पायें पाय खांजोळी । सेवा करी हीन कुळीं । तो एक मूर्ख ॥ ६४ ॥ स्त्री- बाळकांस सलगी देणें । पिशाच्चासन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें । तो एक मूर्ख ॥ ६५ ॥ परस्त्रींशीं कलह करी । मुकी वस्तु निघातें मारी । मूर्खाची संगति धरी । तो एक मूर्ख ॥ ६६ ॥ कलह पाहत उभा राहे । सोडवीना कौतुक पाहे । खरें असतां खोटें साहे । तो एक मूर्ख ॥ ६७ ॥ लक्ष्मी आलियावरी । जो मागील ओळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो एक मूर्ख ॥ ६८ ॥ आपुलें कार्य होय तोंवरी । बहुसाल नम्रता धरी । पुढिलांचें कार्य न करी । तो एक मूर्ख ॥ ६९ ॥ अक्षरें गाळून वाची । कांहीं घाली पदरींचीं । निगा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख ॥ ७० ॥ आपण वाचीना कधीं । कोणासि वाचाया नेदी । बांधोनि ठेवी बंदीं । तो १. उत्तरास उत्तर असे. २. हांव. ३. धारेवर धरतो, त्रास देतो. ४. द्रव्य, ठेव. ५. देणें घेणें. ६. याचकाचा. ७. गुळणी. ८. कुतरें. ९. प्राणी. १० दुसऱ्याचें.

२४ श्रीदासबोध. [ दशक एक मूर्ख ॥ ७१ ॥ ऐसीं हीं मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे । चित्त देऊ- निया शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥ लक्षणें अपार असती । परी कांहीं एक यथामती । त्यागार्थ बोलिलों श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥ ७३ ॥ उत्तम लक्षणें घ्यावी । मूर्खलक्षणें त्यागावीं । पुढिले समासीं आघवीं । निरू- पिलीं ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके मूर्खलक्षणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. उत्तमलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । जेणेंकरितां बाणे खूण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥ वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये । सांपडली वस्तु घेऊं नये । एकाएकीं ॥ २ ॥ अतिवाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये । शोधिल्याविण करूं नये । कुळहीन कांता ॥ ३॥ विचारेंविण बोलूं नये । मर्यादेविण हालूं नये । विवंचनेविणें चालूं नये । कांहीं केल्या ॥ ४ ॥ प्रीतीविण रुसूं नये । चो- रासि वोळखी पुसूं नये । रात्रीं पंथ क्रमूं नये । एकाएकीं ॥ ५ ॥ जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥ निंदाद्वेष करूं नये । असत्संग धरूं नये । द्रव्यदारा हरूं नये । बलात्कारें ॥ ७ ॥ वक्त्यास खंडूं नये । ऐक्यतेसि फोडूं नये । विद्याभ्यास सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥ तोंडाळासि भांडूं नये । वाचाळासि तंडूं नये । संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥ अतिक्रोध करूं नये । जिवल- गासि खेदूं नये । मनीं वीट मानूं नये । शिकवणीचा ॥ १० ॥ क्षणक्षणा रुसूं नये । लटिका पुरुषार्थ बोलूं नये । केल्याविण सांगूं नये । आपुला पराक्रम ॥ ११ ॥ बोलिला बोल विसरूं नये । प्रसंगीं सामर्थ्य चुकूं नये । केल्याविण निर्खंदूं नये । पुढिलांसी कदा ॥ १२ ॥ आळसें सुख मानूं नये । चहाडी मनासी आणूं नये । शोधिल्याविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३ सुखा अंग देऊं नये । प्रयत्न पुरुषें सांडूं नये । कष्ट करितां त्रासूं नये । निरंतर ॥ १४ ॥ सभेमध्यें लाजू नये । बाष्कळपणें बोलूं नये । पैज होड १. विचार केल्यांशिवाय. २. तिरस्कार अथवा धिक्कार करूं नये.

२ रा. ] उत्तमलक्षण. २५ घालूं नये । कांहीं केल्या ॥ १५ ॥ बहुत चिंता करूं नये । निःसंगपणें राहूं नये । परस्त्रीतें पाहूं नये । पापबुद्धीं ॥ १६ ॥ कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखूं नये । परपीडा करूं नये । विश्वासघात ॥ १७ ॥ शौचेंविण असूं नये । मळिण वस्त्र नेसूं नये । जाणारासी पुसूं नये । कोठें जातोसि म्हणोनि ॥ १८ ॥ व्यापकेंपण सोडूं नये । पराधीन होऊं नये । आपलें ओझें घालूं नये । कोणी एकासी ॥ १९ ॥ पत्रेंविणें परतें करूं नये । हीनाचें ऋण घेऊं नये । ग्वाहीविण जाऊं नये । राजद्वारीं ॥ २० ॥ ल- टकी जांजू घेऊं नये । सभेसि लटिकें करूं नये । आदर नसतां बोलूं नये । स्वाभाविक ॥ २१ ॥ अदेखणेपण करूं नये । अन्यायाविण गांजूं नये । अ- नतिीनें वर्तू नये । अंगबळें ॥ २२ ॥ बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करूं नये । बहुत दिवस राहूं नये पिशुना

२६ श्रीदासबोध. [ दशक वाचा नवस बुडवूं नये । आपुला धर्म उडवूं नये । भलते भरीं पडूं नये । विचारेंविण ॥ ३६ ॥ निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये । पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥ सभा देखोनि गळूं नये । समयीं उत्तर टळूं नये । धिक्कारितां ढळूं नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥ गुरुविरहित असूं नये । नीच यातीचा गुरु करूं नये । जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥ सत्य मार्ग सोडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥ अपकीर्ति सोडावी । सत्कीर्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥ न घेतां हे उत्तम गुण । तो मनुष्य अवलक्षण । ऐक त्याचें लक्षण । पुढिलिये समासीं ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीय- दशके उत्तमलक्षणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. कुविद्यालक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका कुविद्येचीं लक्षणें । अतिहीन कुलक्षणें । त्यागार्थ बोलिलों श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥ ऐका कुविद्येचे प्राणी । जन्मा येऊनि केली हानी । सांगिजेल इहीं लक्षणीं । श्रोतीं ओळखावा ॥ २ ॥ कुविद्येचा प्राणी असे । तो कठिन निरूपणीं त्रासे । अवगुणांची समृद्धि असे । ह्मणोनियां ॥ ३ ॥ श्लोक ॥ दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ टी०॥ काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार । गर्व ताठा अहंकार । द्वेष विवाद विकल्पी ॥ ४ ॥ आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना । असूया अविद्या ईषणा वासना । अतृप्ति लोलंगतां ॥ ५ ॥ इच्छा वांञ्छा चिकित्सा निंदा । अनीति ग्रामेणी मस्ती सदा । जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ति दुर्वासना ॥ ६ ॥ स्पर्धा खटपट आणि चटपट । नव्हे झटपट आणि वटवट । सदा खटनट आणि लटपट । परम व्यथा आणि कुविद्या ॥७॥ कुरूप आणि कुलक्षण । अशक्त आणि दुर्जन । दरिद्री आणि कृपण । अतिशयेंसी ॥८॥ आळसी आणि खादाड । दुर्बळ आणि लाताड । तुटक आणि लुबाड । १. गीं. अ. १६. २. मत्सर. ३. इच्छा. ४. लुब्धपणा. ५. हरामी. ६. शठ व नष्ट.

२ रा. ] कुविद्यालक्षण. २७ अतिशयेंसीं ॥ ९ ॥ मूर्ख आणि तपिलें । वेडें आणि वाचाळ । लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ॥ १० ॥ नेणे आणि नायके । न ये आणि न शिके । न करी आणि न देखे । अभ्यासदृष्टीं ॥ ११ ॥ अज्ञान आणि अवि- श्वासी । छळवादी आणि दोषी । अभक्त आणि भक्तासी । देखों शकेना ॥ १२ ॥ पापी आणि निंदक । कष्टी आणि घातक । दुःखी आणि हिंसक । अति- शयेंसीं ॥ १३ ॥ हीन आणि कृत्रिमी । रोगी आणि कुकर्मी । अमंगल आणि अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥ नीच देह आणि ताठा । अप्रमाण आणि फांटा । बाष्कळ आणि करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥ लंडी आणि उन्मत्त । निष्कामी आणि डुलत । भ्याड आणि बोलत । पराक्रम ॥ १६ ॥ कनिष्ठ आणि गर्विष्ठ । न पुरतें आणि नष्ट । द्वेषी आणि भ्रष्ट । अतिशयेंसीं ॥ १७ ॥ अभिमानी आणि निःसंगळें । वोडगस्त आणि खळ । दांभिक आणि अन- र्गळें । अतिशयेंसीं ॥ १८ ॥ वोखटें आणि विकारी । खोटें आणि अनुप- कारी । अवलक्षण आणि धिक्कारी । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥ अल्पमति आणि वादक । दीनरूप आणि भेदक । सूक्ष्मरूप आणि त्रासक । कुशब्देँ- करूनि ॥ २० ॥ कठीणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी । दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥ न्यूनवचनी पैशून्य- वचनी । अशुभवचनी अनित्यवचनी । द्वेपवचनी अनृतवचनी । बाष्कळ- वचनी धिक्कारी ॥ २२ ॥ कपटी कुटिल गांढ्याळ । कुरटें कुचर नाठाळ । कोपी कुधन टवाळ । अतिशयेंसीं ॥ २३ ॥ तपिलें तामसी अविचार । पापी अनर्थी अपस्मार । भूतसमंधी संचार । अंगीं वसे ॥ २४ ॥ आत्महत्यारा स्त्री- हत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा । मातृहत्यारा पितृहत्यारा । महापापी पतित ॥ २५ ॥ उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विश्वासघातकी । कृतघ्न गुरुतल्पी नरॅकी । आततायी जल्पक ॥ २६ ॥ नित्य भांडण झगडा कलह । अधर्म अनराहाटी शोकसंग्रह । चाहाड व्यसनी विग्रहीँ । निग्रहकर्ता ॥ २७ ॥ द्वाड अपेशी वोंगळ । चाळक चुंबक लचाळ । स्वार्थी अभिलापी वोढाळ । अदत्त भांड अदेखणा ॥ २८ ॥ शठ शुंभ कातरूं । लंड तरमुंडें सितरूं । बंड पाखांड १. तापट. २. निर्लज्ज. ३. स्वच्छंद. ४. गुरुपत्नीशीं जाणारा. ५. नरकांत पडणारा. ६. कुमार्ग. ७. भांडण. ८. कृपण. ९. भित्रा १०. घुसणारा. ११. ठक.

२८ श्रीदासबोध. [ दशक तस्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥ धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजटें¹ । धोंटें उद्भट लंपट । बटवाळै² कुबुद्धि ॥ ३० ॥ मारेकरी वरपेकॅरी। दरवडेकरी खाँणोरी⁵ । मैंद भौंदु परद्वारी । भुरेरेंकरी⁶ चेटकी ॥ ३१ ॥ निःशंक निला- जिरा कैलभंट⁷ । टोणपा लौंद घट उद्भट । ठंस⁸ ठोंबसें⁹ खटनट । जगभांड विकारी¹⁰ ॥ ३२ ॥ अधीर आळकीं अनाचारी । अंध पंगु खोकलेकरी । थौंटा बधिर दभेकरी । तरी ताठा न सांडी ॥ ३३ ॥ विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन । शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीनँ¹¹ भिकारी ॥ ३४ ॥ बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन । लक्षणहीन लावण्यहीन । अंगहीन वि- पारैँ¹² ॥ ३५ ॥ युक्तिहीन बुद्धिहीन । क्रियाहीन सत्वहीन । आचारहीन विचारहीन । विवेकहीन संशयी ॥ ३६ ॥ भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन । शांतिहिन क्षमाहीन । सर्वहीन क्षुल्लक ॥ ३७ ॥ समय नेणे प्रसंग नेणे । प्रयत्न नेणे अभ्यास नेणे । आर्जव नेणे मैत्रिकी नेणे । कांहींच नेणे अभागी ॥ ३८ ॥ असो ऐसे नाना विकार । कुलक्षणांचे कोठार । ऐसे कुविद्येचे नर । श्रोतीं वोळखावे ॥ ३९ ॥ ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि त्यागाचि करणें । अभिमानें तैंन्हेँ¹³ भरणें हें विहित नव्हे ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके कुविद्यालक्षणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. भक्तिनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ नाना सुकृतांचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याही- मध्यें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥ नरदेहीं विशेष ब्राह्मण । त्याहीवरी संध्या स्नान । सद्वासना भगवद्भजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥ भगवद्भक्ति हे उत्तम । त्याहीवरी सत्समागम । काळ सार्थक हाचि परम लाभ जाणावा ॥३॥ प्रेमप्रीतीचा सद्भाव । आणि भक्तांचा समुदाय । हरि- कथा महोत्सव । तेणें प्रेम दुणावे ॥ ४ ॥ नरदेहीं आलिया एक । कांहीं करावें सार्थक । जेणें पाविजे परलोक । परम दुर्लभ जो ॥ ५ ॥ विधियुक्त १. वात्रट. २. कुभांडी. ३. भ्रष्ट. ४. लुटारू. ५. काळीजखाऊ. ६. भुरळ पाडणारा ७. कळ काढणारा. ८. ताठर. ९. ठोंब्या. १०. हाबरा. ११. दुर्दैवी. १२. कुरूप. १३. इट्टांस पेटणें.

२ रा. ] भक्तिनिरूपण. २९ ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म । अथवा करणें सुगम । भजन भगवंताचें ॥ ६ ॥ अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग । नाहीं तरी धरणें संग । साधुजनांचा ॥ ७ ॥ नाना शास्त्रें धांडोळावीं । अथवा तीर्थे तरी करावी । अथवा पुरश्चरणें बरवीं । पापक्षयाकारणें ॥८॥ अथवा कीजे परोप- कार । अथवा ज्ञानाचा विचार । निरूपणीं सारासार । विवेक करणें ॥ ९ ॥ पाळावी वेदाची आज्ञा । कर्मकांड उपासना । जेणें होइजे ज्ञाना । अधि- कारपात्र ॥ १० ॥ काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें । कांहीं तरी एक भजनें । सार्थक करावें ॥ ११ ॥ जन्मा आल्याचें फळ । कांहीं करावें सफळ । ऐसें न करितां निष्फळ । भूमिभार होय ॥ १२ ॥ नरदेहाचें उचित । कांहीं करावें आत्महित । यथानुशक्त्या चित्तवित्त । सर्वोत्तमीं लावावें ॥ १३ ॥ हें कांहींच न धरी जो मनीं । तो मृतप्राय वर्ते जनीं । जन्मास येऊन तेणें जननी । वायांच कष्टविली ॥ १४ ॥ नाहीं संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन । नाहीं मंत्र जप ध्यान । मानसपूजा ॥ १५ ॥ नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम । नाहीं देव नाहीं धर्म । अतीत अभ्यागत ॥ १६ ॥ नाहीं सद्बुद्धि नाहीं गुण । नाहीं कथा नाहीं श्रवण । नाहीं अध्यात्मनिरूपण । ऐकिलें कदा ॥ १७ ॥ नाहीं भल्याची संगती । नाहीं शुद्ध चित्तवृत्ती । नाहीं कैवल्याची प्राप्ती । मिथ्या मर्दै ॥ १८ ॥ नाहीं नीति नाहीं न्याय । नाहीं पुण्याचा उपाय । नाहीं परत्रींची सोय । युक्तायुक्त क्रिया ॥ १९ ॥ नाहीं विद्या नाहीं वैभव । नाहीं चातुर्यांचा भाव । नाहीं कळा नाहीं लाघव । रम्य सर- स्वतीचें ॥ २० ॥ शांति नाहीं क्षमा नाहीं । दीक्षा नाहीं मैत्री नाहीं । शुभाशुभ कांहींच नाहीं । साधनादिक ॥ २१ ॥ शुचि नाहीं स्वधर्म नाहीं । आचार नाहीं विचार नाहीं । अत्रै नाहीं परँत्र नाहीं । मुक्त क्रिया मनाची ॥ २२ ॥ कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं । योग नाहीं धारिष्ट नाहीं । कांहींच नाहीं पाहतां ॥ २३ ॥ उपरेति नाहीं त्याग नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं । आदर नाहीं प्रीति नाहीं । परमेश्वराची ॥ २४ ॥ परगुणाचा संतोष नाहीं । परोपकारें सुख नाहीं । हरिभक्तीचा १. मोक्षाची. २. परलोकाची. ३. इहलोक ४. परलोक. ५. वैराग्य.

३० श्रीदासबोध. [ दशक लेश नाहीं । अंतर्यामीं ॥ २५ ॥ ऐसे प्रकारचे पाहतां जन । ते जितचि प्रेतसमान । त्यांसी न करावें भाषण । पवित्र जनीं ॥ २६ ॥ पुण्य सामग्री पुरती । तयासीच घडे भगवद्भक्ती । जे जे जैसें संचित करिती । ते ते पावती तैसेंची ॥ २७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके भक्ति- निरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. रजोगुणनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ मुळीं देह त्रिगुणांचा । सत्व-रज-तमांचा । त्यांमध्यें सत्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥ सत्वगुणें भगवद्भक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती । तमोगुणें अधोगती । पावती प्राणी ॥ २ ॥ श्लोक ॥ ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥१॥ टी० ॥ त्यांतही शुद्ध आणि शबल । तेहि बोलिजेती सकळ । शुद्ध तेंचि जें निर्मल । शबलें बाधक जाणावें ॥ ३ ॥ शुद्ध-शबलांचें लक्षण । सावध प- रिसा विचक्षण । शुद्ध तो परमार्थी जाण । शबलें तो संसारिक ॥४॥ तया संसारिकाची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती । एक येतां दोनी जाती । निघो- नियां ॥ ५ ॥ रज तम आणि सत्व । तेणेंचि चाले जीवित्व । रजोगुणाचें कर्तृत्व । दाखवूं आतां ॥ ६ ॥ रजोगुण येतां शरीरीं । वर्तणूक कैसी करी । सावध होऊनियां चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥ माझें घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर । ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥ माता पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । इतु कियांची वाहे चिंता । तो रजोगुण ॥ ९ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । दुसऱ्या- चें अभिलाषावें । तो रजोगुण ॥ १० ॥ कैंचा धर्म कैंचें दान । कैंचा जप कैंचें ध्यान । विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥ नेणे तीर्थ नेण व्रत । नेणे अतीत अभ्यागत । अनाचारीं मनोगत । तो रजोगुण ॥ १२ ॥ धनधान्याचें संचित । मन होय द्रव्यासक्त । अत्यंत कृपण जीवित । तो रजोगुण ॥ १३ ॥ मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर । मी सक- ळांमध्यें थोर । म्हणे तो रजोगुण ॥ १४ ॥ माझा देश माझा गांव । माझा १. पुनः जन्मास येणें. २. नीच योनि. ३. गीता, अ० १४ पहा. ४. मिश्र.

२ रा. ] रजोगुणनिरूपण. ३१ वाढा माझा ठाव । ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगुण ॥ १५ ॥ दुसऱ्या- चें सर्व जावें । माझेंच बरवें असावें । ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगुण ॥ १६ ॥ कपट आणि मत्सर । उठे देहीं तिरस्कार । अथवा कामाचा वि- कार । तो रजोगुण ॥ १७ ॥ बालकावरी ममता । प्रीतीनें आवडे कांता । लोभ वाटे समस्तां । तो रजोगुण ॥ १८ ॥ जिवलगाची खंती । जेणें काळें वाटे चित्तीं । तेणें काळें शीघ्रगति । रजोगुण आला ॥ १९ ॥ संसाराचे ब- हुत कष्ट । कैसा होईल शेवट । मनास आठवे संकट । तो रजोगुण ॥ २० ॥ वैभव देखोनि दृष्टीं । आवडी उपजली पोटीं । आशागुणें हिंपुटी १ । करी तो रजोगुण ॥ २१ ॥ कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें । दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगुण ॥ २२ ॥ जें जें दृष्टीं पडलें । तें तें मनें मागि- तलें । लभ्य नसतां दुःख जाहलें । तो रजोगुण ॥ २३ ॥ विनोदार्थ भरे मन । शृंगारिक करी गायन । रागरंग तानमान । करी तो रजोगुण ॥ २४॥ टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे विवादा । हास्यविनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥ २५ ॥ आळस उठे प्रबळ । कर्मणुकीचे नाना खेळ । कां उप- भोगाचे गोंधळ । तो रजोगुण ॥ २६ ॥ कळावंत बहुरूपी । नटावे- लोकीं २ साक्षेपी ३ । नाना खेळीं दान अर्पी । तो रजोगुण ॥ २७ ॥ उन्मत्त ४ द्रव्यावरी अति प्रीती । आवडे नीचाची संगती । ग्रामण्य ५ आठवे चित्तीं । तो रजोगुण ॥ २८ ॥ तस्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे । नित्य- नेमासि मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥ देवाकारणीं लाजाळू । उदरा- लागीं कष्टाळू । प्रपंचीं जो स्नेहाळू । तो रजोगुण ॥ ३० ॥ गोड ग्रासीं आँळ- ६ केपण । अत्यादरें पिंडपोषण ७ । रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥ शृंगारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे । कळालाघवीं मन पर्वाडे ८ । तो रजोगुण ॥ ३२ ॥ नेणोनियां परमात्मा । सकल पदार्थां प्रेमा । बलात्कारें वाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥ असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण । प्रपंचीं तो शबल ९ जान । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥ आतां १. हिरमोड. २. नट वगैरेंना पाहण्यांत. ३. प्रयत्न करणारा. ४. मादक. ५. हरामखोरी. ६. अतिशय हाव. ७. देहाचें पोषण. ८. शिरे. ९ रजोगुणाचे प्रकार दोन, शुद्ध आणि शबल; त्यांतील एक.

३२ श्रीदासबोध. [ दशक रजोगुण हा सुटेना । संसारिक हेतु तुटेना । प्रपंचीं गुंतली वासना । यासि उपाय कोण ॥ ३५ ॥ उपाय एक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती । तरी यथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥ काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें । ईश्वरीं अर्पोनियां नमनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥ यथानु- शक्ति दान पुण्य । परी भगवंतीं अनन्य । सुखदुःखें परीं चिंतन । देवाचें- चि करावें ॥ ३८ ॥ आदि अंतीं एक देव । मध्येंचि लाविली माँव । म्हणो- निया पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥ ऐसा शबल रजोगुण । संक्षेपें केलें कथन । आतां शुद्ध तो तूं जाण । पारमार्थिक ॥ ४० ॥ त्याचे वोळ- खींचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण । तो सत्वगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥ ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुभविला । आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके रजोगुणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. तमोगुणनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण । आतां ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥ संसारीं दुःखसंबंध । प्राप्त होतां उठे खेद । कां अद्भुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥ शरीरीं क्रोध भरतां । नो- ळखे माता आणि पिता । बंधु बहिण आणि कांता । ताडी तो तमोगुण ॥ ३ ॥ दुसऱ्याचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा । विसरवी जीवभावा । तो तमोगुण ॥ ४ ॥ भरलें क्रोधाचें कौविरें । पिशाच्यापरी वावरे । नाना उपाहीं नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥ आपला आपण शस्त्रपात । परोव्याचा करी घात । ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥ डोळां युद्धचि पाहावें । रण पडिलें तेथें जावें । ऐसें घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥ अखंड भ्रांति पडे । केला निश्चय बिघडे । अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥ क्षुधा जयाची वाड । नेणे कडू अथवा गोड । अत्यंत जो कां मूढ । तो तमोगुण ॥ ९ ॥ प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें । स्वयें आत्म- हत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥ किडा मुंगी आणि श्वापद । यांचा करूं १. स्थिर होत नाहीं. २. माया. ३. वेड. ४. भटके, वागे. ५. दुसऱ्याचा.

२ रा.] तमोगुणनिरूपण. ३३ आवडे वध । अत्यंत जो कृपामंद । तो तमोगुण ॥ ११ ॥ स्त्रीहत्या बाळ- हत्या । द्रव्यालागीं ब्रह्महत्या । करूं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥ १२ ॥ ईंसाळोचेनि नेटें । विष द्यावें ऐसें वाटे । परवध मनीं उठे । तो तमोगुण ॥ १३ ॥ अंतरीं धरूनि कपट । पराचें करी तळपट । सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण ॥ १४ ॥ युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धचि करावें । मरावें कीं मारावें । तो तमोगुण ॥ १५ ॥ कलह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसें उठे । अंतरीं द्वेष प्रकटे । तो तमोगुण ॥ १६ ॥ मत्सरें भक्ति मोडावी । देवालयें बिघडावीं । फळतीं झाडें तोडावीं । तो तमोगुण ॥ १७ ॥ सत्कर्मे तीं नावडतीं । नाना दोष ते आवडती । पापभय नाहीं चित्तीं । तो तमो- गुण ॥ १८ ॥ ब्रह्मवृत्तीचा उच्छेद । जीवमात्रांस देणें खेद । करूं आवडे प्र- माद । तो तमोगुण ॥ १९ ॥ अग्निप्रलय शस्त्रप्रलय । भूतप्रलय विप्रप्रलय । मत्सरें करी जीवक्षय । तो तमोगुण ॥ २० ॥ भांडण लावून द्यावें । स्वयें कौतुक पाहावें । कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २१ ॥ प्राप्त झालिया संपत्ती । जीवांसी करी यातायाती । कळवळा नये चित्तीं । तो तमोगुण ॥ २२ ॥ नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव । वेद शास्त्र नलगे सर्व । तो तमोगुण ॥ २३ ॥ परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्या- स । संसाराचा न ये त्रास । तो तमोगुण ॥ २४ ॥ स्नान संध्या नेम नसे । स्वधर्मीं भ्रष्टला दिसे । अकर्तव्य करीतसे । तो तमोगुण ॥ २५ ॥ ज्येष्ठ बंधु बाप माये । त्यांचीं वचनें न साहे । शीघ्रकोपी निघूनि जाये । तो तमो- गुण ॥ २६ ॥ उगोंचि खावें उगोंचि असावें । स्तब्ध होऊनि बैसावें । कांहीं- च स्मरेना स्वभावें । तो तमोगुण ॥ २७ ॥ चेटकी विद्येचा अभ्यास । शस्त्र- विद्येचा हव्यास । मल्लविद्या व्हावी ज्यास । तो तमोगुण ॥ २८ ॥ केले ग- ळाचे नवस । रोंडी-वेडीचे सायास । काष्ठयंत्रें छेदी जिव्हेस । तो तमोगुण ॥ २९ मस्तकीं भेंदें जाळावें । पोतें४ अंग हुरपळावें । स्वयें शस्त्र टोचून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३० ॥ निग्रह करून धरणें । कां तें टांगून घेणें । १. कांहीं बाधेमुळें, किंवा ईर्ष्येमुळें. २. धगधगीत निखाऱ्यांची खाई. ३. ज्वाळा निघतील असा विस्तव खांपरांत पेटवून तें डोईवर घेऊन नाचावें. ४. भुत्याच्या हातांतील दिवटीनें.

३४ श्रीदासबोध. [ दशक देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३१ देवासि शिर वाहावें । कां तें अंग समर्पावें । कडणीवरून घालून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३२ ॥ निराहार उपोषण । पंचाग्निधूम्रपान । आपणास घ्यावें धुरून । तो तमोगुण ॥ ३३ ॥ सकाम जें कां अनुष्ठान । कां तें वायुरोधन । अथवा रहावें पडोन । तो तमोगुण ॥ ३४ ॥ नखें केश वाढवावे । हस्तचि वरते करावे । अथवा वाक्- शून्य १ व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥ नाना निग्रहीं पडावें । देहदुःखें चरफ- डावें । क्रोधें देवास फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥ देवाची जो निंदा करी । तो आशाबद्ध अघोरी । जो संतसंग न करी । तो तमोगुण ॥ ३७ ॥ ऐसा हा तमोगुण । सांगतां तो असाधारण । परी त्यागार्थ निरूपण । कांहींएक ॥ ३८ ॥ ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनांसि २ कारण । मोक्षप्राप्तीचें लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥ केल्या कर्माचें फळ । प्राप्त होईल सकळ । जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥ व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे तो सत्वगुण । तेंचि असे निरूपण । पुढिलिये समासीं ॥ ४१ ॥ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके तमोगुणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. सत्वगुणनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण । आतां ऐका सत्वगुण । परम दुर्लभ जो ॥ १ ॥ जो भजनाचा आधार । जो योगियांचा थार । जो निरसी ३ संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥ जेणें होय उत्तम गती । मार्ग फुटे भगवंतीं । जेणें पाविजे मुक्ती । सायु- ज्यता ती ॥ ३ ॥ जो भक्तांचा कोंवसा ४ । जो भवार्णवींचा भरवंसा । मोक्ष- लक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥ जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें भूषण । रजतामांचें निरसन । जयाचेनी ॥ ५ ॥ जो परम सुखकारी । जो आनंदाची लहरी । देऊनियां निवारी । जन्ममृत्यु ॥ ६ ॥ जो ज्ञानाचा शेवट । जो पुण्याचें मूळपीठ । जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥ ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण । तया क्रियेचें लक्षण । ऐसें असे १. मौन धरावें. २. अधोगतीस. ३. नष्ट करितो. ४. आश्रय, आधार.

२ रा.] सत्वगुणनिरूपण. ३५ ॥ ८ ॥ ईश्वरीं प्रेम अधिक । प्रपंच संपादनें लौकिकें । सदा सन्निध विवेक । तो सत्वगुण ॥ ९ ॥ संसारदुःख विसरवी । भक्तिमार्ग विमल दावी । भज- नक्रिया जो उपजवी । तो सत्वगुण ॥ १० ॥ परमार्थाची आवडी । उठे भा- वार्थीची गोडी । परोपकारीं तांतडी । तो सत्वगुण ॥ ११ ॥ स्नान संध्या पुण्यशीळ । अभ्यंतरींचा निर्मळ । शरीर वरीं सोज्वळ । तो सत्वगुण ॥ १२ ॥ यजन आणि याजन । अध्ययन आणि अध्यापन । स्वयें करी पुण्यदान । तो सत्वगुण ॥ १३ ॥ निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी । क्रिया पालटे रोकडी । तो सत्वगुण ॥ १४ ॥ अश्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें । नाना रत्नांचीं दानें । तो सत्वगुण ॥ १५ ॥ धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान । करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६ ॥ कार्तिकस्नानें मा- घस्नानें । व्रतें उद्यापनें दानें । निष्काम तीर्थे उपोषणें । तो सत्वगुण ॥ १७ ॥ सहस्रभोजनें लक्षभोजनें । विविध प्रकारचीं दानें । निष्काम करी सत्व- गुणें । कामना रजोगुण ॥ १८ ॥ तीर्थां अर्पी जो अग्रहारें । बांधी वापी कूप सरोवरें । बांधी देवालयें शिखरें । तो सत्वगुण ॥ १९ ॥ देवद्वारीं पडशाळा । पायऱ्या दीपमाळा । वृंदावनें पार पिंपळा । बांधी तो सत्व- गुण ॥ २० ॥ लावी वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें । निववी तापसि- यांचीं मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥ संध्यामठ आणि भुयारीं । पायऱ्या नदीतीरीं । भांडारगृहें देवद्वारीं । बांधी तो सत्वगुण ॥ २२ ॥ नाना दे- वांचीं जीं स्थानें । तेथें नंदादीप घालणें । वाहे अलंकारभूषणें । तो सत्व- गुण ॥ २३ ॥ झंगत मृदंग टाळ । दमामे नगारे काहाळ । नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥ नाना सामुग्री सुंदर । देवालयीं घाली नर । हरिभजनीं तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥ छत्रें आणि सुखासनें । दिंड्या पताका निशाणें । वाहे चामरें सूर्यपानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥ वृंदावनें तुळसीवनें । रंगमाळा संमार्जनें । ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७ ॥ सुंदर नाना उपकरणें । मंडप चांदवे आसनें । देवालयीं समर्पणें । तो सत्वगुण ॥ २८ ॥ देवाकारणें खाद्य । नाना प्रकारचे नैवेद्य । अपूर्व १. बाह्यात्कारीं. २. देवब्राह्मणांस दिलेला गांव इत्यादि. ३. धर्मशाळा. ४. बागबगीचे. ५. अबदागिरी.

३६ श्रीदासबोध. [ दशक फळें अर्पी सद्यै । तो सत्वगुण ॥ २९ ॥ ऐसी भक्तीची आवडी । नित्य दास्यत्वाची गोडी । स्वयें देवद्वार झाडी । तो सत्वगुण ॥ ३० ॥ तिथि पर्वे महोत्सव । तेथें ज्याचा अंतर्भाव । कायावाचामनें सर्व । अर्पी तो सत्व- गुण ॥ ३१ ॥ हरिकथेसि तत्पर । गंध माळा आणि धूप कर्पूर । घेऊन उभा निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥ नर अथवा नारी । यथानुशक्ति सा- मुग्री । येऊन उभी देवद्वारीं । तो सत्वगुण ॥३३॥ महत्कृत्य सांडूनि मागें । देवास ये लागवेगें । भक्ति निकट अंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४ ॥ थोरपण सांडूनि दुरी । नीच कृत्य अंगिकारी । तिष्ठत उभा देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥ देवालागीं उपोषण । वर्जी तांबूल भोजन । नित्यनेम जप ध्यान । करी तो सत्वगुण ॥ ३६ ॥ शब्द कठिन न बोले । अतिनेमेंसि चाले । योगी जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥३७॥ सांडूनियां अभिमान । निष्काम करी कीर्तन । स्वेद रोमांच स्फुरण । तो सत्वगुण ॥ ३८ ॥ अंतरीं देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन । पडे देहाचें विस्मरण । तो सत्वगुण ॥३९॥ हरिकथेसी अति प्रीती । सर्वथा न ये विकृती । अधिक प्रेमा आदि अंतीं । तो सत्वगुण ॥ ४० ॥ मुखीं नाम हातीं टाळी । नाचत बोले बिरुदावळी । घेउनि लावी पायधुळी । तो सत्वगुण ॥ ४१ ॥ देहाभिमान गळे । विषयीं वैराग्य प्रबळे । मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥ कांहीं क- रावा उपाय । संसारीं गुंतोनि काय । उकलवी ऐसें हृदय । तो सत्वगुण ॥ ४३ ॥ संसारासि त्रासे मन । कांहीं करावें भजन । ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥ ४४ ॥ असतां आपुले आश्रमीं । अत्यादर नित्यनेमीं । सदा प्रीति लागे रामीं । तो सत्वगुण ॥ ४५ ॥ सकळांचा आला वीट । परमार्थी जो निकट । आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥ ४६ ॥ सर्वकाळ उदा- सीन । नाना भोगीं विटे मन । आवडे भगवद्भजन । तो सत्वगुण ॥ ४७ ॥ पदार्थां न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत । ऐसा दृढ भावार्थ । तो सत्व- गुण ॥ ४८ ॥ अंतरीं स्फूर्ति स्फुरे । स्वस्वरूपीं तर्क भरे । नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥ ४९ ॥ लोक बोलती विकारी । तरी अधिक प्रेमा धरी । निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ५० ॥ शरीर लावावें कारणीं । साक्षेपें १. तत्काळ, उत्कंठेनें. २. निश्चळ झाले, एकाग्र झाले. ३. वीट. ४. उत्कंठा.