भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा २०७ दिसें सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले' न साहाती ॥ २ ॥ पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी । बसकोळचा घागरी । डेरे रांजण भाडगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे माना । येथें कोणीं रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्याची शोभत्या ॥ ४ शब्दार्थ व टीपा - ज्येष्ठा-थोर, पट-सिंहासन, बसकोळचा-वंगट अर्थ .-सर्वच देवी थोर व समान आहेत असे मानले तरी पूजा करण्यास कोणती घ्यावी याचा निवाडा करावाच लागतो. असा एके ठिकाणी भाव धरताच मग दुसरीकडे पूजा योग्य वाटत नाही. १ सर्व वस्तु सारख्या दिसल्या तरी एखाद्या निमित्ताने, कारणाने त्याची खरी किंमत ध्यानात येते. गाडग्याच्या उतरंडीत तळातील गाडग्यासच का मान असे त्याच्यावरील गाडगी विचारतात; पण त्याना आपल्या वरच्या गाडग्याचे ओझे सहन होत नाही. २ सिहासनाचा अधिकार एकासच असतो व इतर लोकांना त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे मान मिळतो. एकाच मातीच्या वसच्या गौरी (लक्ष्मी), घागरी, डेरे, रांजण, गाडगी अशा वस्तू तयार होत असल्या तरी पूज्यस्थानाचे महत्त्व गौरीसच असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मानाच्या जागेकरिता कोणी रुसू नये. आपापल्या योग्यतेच्या स्थानावरच जो तो शोभून दिसतो. ४ ४१९ खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुरपाटणीं ॥ १ ॥ आतां फ्री कां रे हांकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ २ ॥ सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या वनीं । पावली जननी । झोटि मोकळिया केशीं ॥ ३ ॥ लाविलें कावरें । प्रल्हादा म्हांसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥ ४ ॥ वसुदेवाचीं बाळें । सात खावलीं ज्या काळें । आली भोगवेळें । तया कारणें तेथें ॥ ५ ॥ पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धावोनियां काढी । अंगसंगें त्राहार्विलीं ॥ ६ ॥ नामाचे चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥ ७ ॥ कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता काय भय भूतां । काळ यमदूतांचें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :-खेचर-आकाशात संचार करणारी भूतसृष्टी, पाटणीं-शहरात, झडपणी-बाधा, वासुगीच्या-अशोकाच्या, झोटि-लांब केस, कावरे-त्रास, जाच, म्हांसासुरें-हिरण्यकशिपु या नावाच्या महिषासुराने, बाज-नस्त, त्राहार्विली-रक्षण केली, हीण-कमीपणा

१ टोले साहातीं.

२०८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - ही आमंची प्रमुख देवी पंढरपूर शहरात भीमेच्या काठावर नांदत असल्याने तेथरावी इतर क्षुद्र दैवते हिच्यापुढे थरथर कापत असतात १ आता या देवीच्या नावाने हजार नावांनी एकदम हाक मारा मग तो तुमचा अगसंग करून या इतर क्षुद्र दैवताना दूर करेल २ इतर दैवताची अशीच बाधा सीतामाईस झालेली असल्यामुळे तिला अशोकवनात बंदिस्त व्हावे लागले पण या वेळीही जगन्माता केस मोकळे सोडून तिच्या साह्यास धावली व तिला हिनेच मुक्त केले त्या हिरण्यकशिपु नावाच्या महिषासुराने थोर भक्त प्रल्हादाला त्रास देण्यास सुरुवात केली मग हीच माता एकदम दात ओठ खात नृसिंहाच्या रूपाने आली व या दैत्याच्या तिन नाश केला ४ ज्या कसाने वसुदेवाची सात मुले निर्दयपणे मारिली होती त्याचा नाश करण्यासाठी हीच कृष्णरूपाने वसुदेवाचे दुख दूर करण्यास सिद्ध झाली ५ सर्व सामर्थ्यांनी सिद्ध असलेले पाडववीर या क्षुद्र दैवताच्या कोपानी त्रस्त झाले व वनवासात भटकू लागले, पण या श्रेष्ठ देवीनेच त्याचे रक्षण करून अगसंग येऊन त्याची लाज राखली ६ जेथे श्व हिच्या नामाचे चिंतन सुरू असते तेथे तेथे ही जाऊन मदत करते रक्षण करते अशा वेळी ही देवी कृपाचा कमोपणा न पाहता फक्त भावभक्तीकडे लक्ष देते ७ तुकाराम महाराज म्हणतात, ही कुळीची देवता आम्हास मातेप्रमाण आहे ही एकदा प्रसन्न झाल्यावर मग प्रत्यक्ष यमाचे किंवा यमदूताचे भय कसाल ? ८ ४२० देवी देव जाला भोग सरला¹ यावरी । सांगाया दुसरी ऐसी² नाही उरली ॥ १ ॥ हरिनामे देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पैठवणी मागा नका ठेवू लिंगाड ॥ २ ॥ शेवटीं सुताळी वरवी वाजवावी डाक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥ ३ ॥ गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरी आजि कोडीं उगविलीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पैठवणी-विदागी पाठवणी, लिंगाड-खटपट लचाट सुताली-चांगल्या ताळावर अर्थ - देव झाला देवी झाली सर्व प्रारब्ध कर्मानुसार भोगावयाचे भोगही संपले आता काही दुसरे करावचे आहे असे सांगायलाही काही उरले नाही १ आता तुम्ही या देवाचे हरीचे नाव घेऊन जागे राहा व त्यासाठी आपली नेहमीची कृपेची विदागी मागा, उगाच मागे खटपट ठेवू नका २ आता या शब्दाच्या प्रसंगात चांगल्या तालावर, सुरावर डाक वाजवा, व सरतेशेवटी संपल्यावर एक तालाने शेवटचा मेळ साधा ३ आता सर्व मानकर्याचे मान देऊन झाल आहेत हा देव्हारा आता गुंडाळून ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, कारण आता सर्व संकटाचा परिहार झाला आहे सर्व रहस्ये उलगडली गेली आहेत ४ ४२१ झाली झडपणी खडतर देवता । सचरली आतां³ निघो नये ॥ १ ॥ मज उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ २ ॥ नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी काही आता ॥ ३ ॥ तुका म्हणे कळो आले वर्तमान । माझें तो बचन आच्छादले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - झडपणी-बाधा अर्थ - अरे मला कसली तरी बाधा झाली आहे कसल्या तरी खडतर देवतेने झपाटले आहे आता ती जी अंगात झिरली आहे ती काही बाहेर निघत नाही १ आता मला लोकर काही तरी उपचार करा आता मला काही ही १ सरले २ उरी ३ चित्ता रिघो नये

सार्थ तुकारामगाथा २०९ फार सहन होत नाहीं २ मला असे करा ना. चंद्रभागेच्या तीरावर एक देव आहे. त्याच्या पायांवर घाला ना मला. आता माझ्या जीवात काही उरलेले नाही, म्हणून ही विनवणी करीत आहे. ३ तुम्हांस मी हे वर्तमान कळवीत आहे तोवर तुकाराम महाराज म्हणतात, तो माझी वाणीही बंद होण्याची वेळ आली. ४२२ अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे सुख दुःख न मनितां ॥ १ ॥ मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेईं । भाव खरें लोपे ना ॥ २ ॥ आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा । स्थिरावल्या कैसा काय जाणों विचार ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सोवा - मनातील गोष्टी, एथ्याच - उगाच अर्थ:- माझ्या अंगात देवी संचारली आहे हे तुम्हांस कुणास समजत नाही काय ? माझी सर्व सुखदुःखे व त्याचे चाळे कुणी संपविले ? १ मी तर आता बेहभानावर नाही माझ्या या बोलण्यावरूनच काही ओळख पटल्यास पाहावी. माझ्यात जो पालट झाला आहे त्याचा खरा भाव काही लपणारा नाही २ आपल्या मनातल्या गोष्टी तुम्ही उगाच विचारून तर पाहा. त्या कशा स्थिर झाल्या आहेत याचा नीट विचार करा ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा लाभ होण्याचा काळ असून थट राहण्याचे येथे कारण नाही अशी संधी आता पुन: कशी व केव्हा येणार ? ४ ४२३ पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेतितां फुंप फांटी । खुंट दरडी न पाहे । आधार' नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥ १ ॥ दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अल्लमाचा सोयरा ॥ २ ॥ हिंडतां गव्हाणें गा । शिणलों बारोदारीं । न मिळेचि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी । कीर्ति हे संतां मुखीं । तोचि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥ ३ ॥

  • या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरेचि बापमाय । भीक नाहीं खंडणा । पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हे लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥ ४ ॥ काय मी चुकलौं गा । मार्गे नेणवे फांहीं । न कळेचि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं । १ आधार नाही कोणी। मज बाप ना माय ॥ २ येरझारी, ३ जन्मदु ख निवारी, ४ नाही भीक, ५ नेगवेचि. तु. गाथा....२७

२१० सार्थ तुकारामगाथा मी माझी भुल्लों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥ ५ ॥ दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी । होतें हेंचि कारण । दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुशन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सैराट-भलतीकडेच, फुंप-कुपण, खुंट-खाट, दरडी-नदीचे उंच तीर, अरामाचा-पांगु- ळाचा, गव्हाल-पांगळयाच्या हातातील काठी, पागोरा-अंकीत. अर्थ:- देवा, मी पांगळा झालो आहे. मला हातपाय नाहीत य ज्यावर मी बसलो आहे ते भलतीकडेच कुठेही बेदरकारपणे जाते ते फाट्यास, कुपणास, खाडास, नदीच्या उंच तीरास न पाहता वाटेल तसे धावते. देवा, मला कुणाचाच आधार नाही. ना आईचा, ना बापाचा १ अहो दाते लोकहो, मला दान करा ना. मी पंढरपुरास निघालो आहे. मला तेथवर न्याना तुम्ही. तुम्हीच संतजन आमच्यासारख्या पांगळयांचे सोयरे आहात २ या काठीच्या साहाय्याने मी सर्वत्र हिंडून हिंडून शिणून गेलो आहे. माझे दुःख निवारण करणारा दाता अजून मला कुणीच भेटला नाही. संतांच्या मुखातून अशी कीर्ती ऐकली आहे की तो पंढरपूराचा धीहरी पांगळया माणसांस पाय देतो. तो मला दाखवा ना. ३ मी या पोटाच्या निमित्ताने लोकांच्या अकित झालो आहे; त्यामुळे प्रत्येक आईबापास हे माझे म्हणणे असतेच, ते कधी सरतच नाही. भीक मागणेही संपत नाही. काही लोक मला दारात पाहताच पुढे जा म्हणतात. त्यांना काही दया मायाच नाही; पण महादारुण अशी ही आशा कुत्र्याप्रमाणे माझ्या पाठेमागे लागली आहे. ४ मी पूर्वी काय व कसे चुकलो कुणास माहित, मला पापपुण्यही कळेनासे झाले आहे. दिव्यावर पतंग झेप घालतो त्याप्रमाणे मी माझ्याच वृत्तीवर राहिलो. संतमहानुभाव लोकहो, मला जीवदान द्या. ५ मी फार दूरच्या गावाहून आलो आहे. मला फार मोठे दुःख झाले आहे याच दुःखाच्या पोटी मी येथवर आलो बाहे. तुमची भेट दुर्लभ असली तरी आज तुमच्या पायाचे मला दर्शन झाल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, आज तुम्हां संताना दोन्ही हात जोडून नमस्कार असोत. ६ ४२४ देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलीं । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगूळ जालों ॥ १ ॥ आतां माझी करीं चिंता । दान देईं भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ २ ॥ चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं । नाहीं आलीं भागुतीं । न देखें काय जालें । कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरुनि चित्तीं ॥ ३ ॥ भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाय । न भरें पोट कधीं । नाहीं निश्चळ पाय । हिंडतां भागलों गा । लक्ष चौऱ्याशीं गांव । धरुनि राहिलों गा । हाचि बसता ठाय ॥ ४ ॥

भरवसा काय आतां । कोण आणि अयचिता । तैसीच जाली कीर्ति । तया मज बहुतां । म्हणउनि मारीं हाका । सोयी पावे पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळु दाता ॥ ५ ॥ संचित सांडवलें । कांहीं होतें जबळीं । वित्त गोत पुत भाया । तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सघोभायीं- संसार व तू यात, ठाव-मूळ ठिकाण, वित्त-संपत्ती, गोत-नातेवाईक, पुत-पुत्र, लागावळी-मायेचा सबंध. अर्थ:- हा काहो माझा देश या येय नसूनही मी या ठिकाणी फिरत फिरत आलो आहे. मी आता कुणावर सत्ता करावी ? मी स्थिर कुठे राहिलो आहे ? माझ्या पायांनी व डोळ्यांनी तर मला सोडूनच दिले आहे असा मी आंधळा, पांगळा या परदेशी असून मला कुणीही प्रेमाचे नाही. १ देवा, आता माझी चिंता तूच करावीस तुझ्या कृपेचे दान द्यावेस. मागेपुढे राहून कुणी साभाळणारे मला नाही; म्हणून तू मला आता या साधुसंतांच्या हाती सोपीव २ याउ चालत असताना मला फार भय बाटले. कारण या वाटेने पुष्कळ लोक गेले; पण ते काही परत आले नाहीत. त्यांची काय गती झाली ती काही कानावर आली नाही. काही दिसलेही नाही. यामुळे संसार व तू माच्यात धित ठेवून, मनात तुला बाणवून मी बसलो आहे. ३ देवा, तुझ्या ठायीचे मूळ ठिकाण सोडल्यापासून मी तुझी करुणा भाकीत आहे. कोणत्याही एकाच गळी मी निश्चल होऊन राहिलो नाही. खूप हिंडता हिंडता थकून गेलो. चौऱ्याऐशी लक्ष गावे हिंडून हिंडून मी फार थकलो आहे देवा, आता तुझ्याकडे पाहात याच जागेवर स्थिर होण्याच्या प्रयत्नात आहे. ४ कुणीतरी अवचित मजसाठी काही घेऊन येईल असा भरवंसा मला नाही. कारण माझ्या पूर्वीच्या लोकात तशीच कीर्ती झालेली आहे. म्हणून तर देवा, तुला मी हाका मारीत आहे पुण्यवंता, माझ्यावर कृपा कर. मला फार भूक लागली आहे रे, आजि तुझ्याशिवाय कृपाळू व उदार दाता असा कुणी नाही ५ माझ्याजवळ जे काही थोडे पूर्व- कर्माचे संचित होते ते सर्व खर्च झाले. संपत्ती, नातेवाईक, पुत्र यांच्या मायेचा सबंधही संपून गेला देवा, मी आता खरोखरीच निष्काम बनलो आहे. हेच माझ्या कपाळी होते तुकाराम महाराज म्हणतात, आता तूच माझा सर्वस्वी हित करणारा प्रभू आहेस. ६ विवरण :- वरील दोन अभंग पांगळ्याचे म्हणून तुकारामबुवांनी लिहिले आहेत धडधाकट, श्रीमंत, कला- चतुर, श्रेष्ठ वर्णाची, देखणी माणसे कुणालाही प्रिय होतील पण आंधळे, लुळे, पांगळे याचा कणव कुणाला येणार ? पाप नसल्यामुळे, डोळे नसल्यामुळे अधिकच दयनीय अवस्था झाल्यावर एका पांडुरंगाखेरीज दुसरा कोणी दाता नाही अशीच या पांगळ्याची खात्री झालेली दिसते अशा पांगळ्याला कुणी सांभाळणारा नसतो, कुणी जवळ करणारा नसतो, भारी दुखे याला भोगावी लागतात, सर्वांनी त्याची उपेक्षा केलेली असते तेव्हा संताच्या सहवासात, साधूच्या संगतीत त्याच्या जीवास तेवढेच सुख होते ईश्वराकडे चित्त लागल्यामुळे तेवढीच दुःखाची जाणीव कमी होऊन या पांगळ्या-आंधळ्याची जीवितातील करुणा भक्तीस मोठी पोषक झाली. देवासही अशा माणसाचा फार लोभ कारण याना साभाळणारा हाच एक पाडुरंग असल्याची जाणीव त्यालाही आहेच या पुढचेही आंधळ्यावरील रूपकात्मक अभंग याच भूमिकेवरचे आहेत ४१५ देखत होतो आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टो गेली वरी आले पडळ । तिमिर फोडलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालो देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥

२१२ सार्थ तुकारामगाथा आता मज दृष्टी देईं । पांडुरंगा मायबापा । शरण आलो आतां । निवारूनिया पापा । अंजन लेववूनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ २ ॥ होतसे खेद चित्ता । काहीं नाठवे विचार । जात होतो जना मागें । तोही सांडिला आधार । हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझों मज । कोणी न देती आधार ॥ ३ ॥ जोवरि चळण गा । तोवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं । आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला । तोचि देह नव्हे दुजा ॥ ४ ॥ गुंतलो या संसारे । कैसा जालोसे अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवे काम हे क्रोध ॥ ५ ॥ लागती चालता गा । गुणदोषांच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालो निराळा कैसा । पाहातो वास तुझी । थोरी करुनी आशा । तुका म्हणे वैधराजा । पंढरीच्या निवासा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा — पडळ-पडदा, चळण-चलती, सिद्धपंथें-तयार मार्गाने, साधुसंताच्या मार्गाने अर्थ - देवा, यापूर्वी मी सर्व काही पाहात होतो. मागेपुढे पाहून सर्वत्र तू भरून राहिला आहेस हे दिसत होते पुढे माझी दृष्टी गेली माझ्या डोळ्यावर पडदा येऊन अंधाराने सारे भरून आले. सर्वत्र अंधार वाढला पुढे तो अधिकच वाढला मी मग भयभीत झालो मी हा असा आंधळा झाल्यामुळे जन्मास येऊन काय उपयोग देवा ? १ पांडुरंगा, मायबापा, आता मला दृष्टी दे ना मी तुला मनोभावे शरण आलो आहे माझी काही पापे असतील ती दूर कर माझ्या डोळ्यात चांगली दृष्टी येईल असे अंजन घालून पुढचा मार्ग चांगला सोपा असा दाखव मग मी ह्या सिद्ध झालेल्या मार्गाने जाईन व जन्ममरणाच्या फेऱ्या चुकवीन २ देवा, माझ्या चित्तास फार खेद होत आहे रे कोणताही विचार सुचत नाही मी लोकांच्या मागे मागे जात होतो, तोही आधार माझा संपला मी आंधळा झाल्यामुळे त्यांनीही माझा संग सोडून दिला सर्वत्रच अंधार झाला माझी माझी म्हणून जी माणसे होती तीही फिरली, त्यांनीही मला सोडून दिले आता मला कुणीच आधार देत नाही ३ जोपर्यंत माझे सर्व इंद्रिये चलनवलन करीत होती, जोवर चलती होती, तोवर सर्व आप्तवर्ग मला आपला म्हणत होता लहानथोर लोक मला मान देत होते देहसुखासाठी लोक मला जवळ करीत होते पण आता माझ्या इंद्रियांचे सामर्थ्य संपले तेव्हा तीच माणसे मला पाहून 'हा पाहा आजोबा बागुल बुवा आला' असे म्हणू लागली आहेत कसे विपरीत घडत आहे माझा देह पहिलाच आहे दुसरा नवीन नाही पण लोकांची दृष्टी फिरली ना ४ या लौकिक संसारात गुंतल्यामुळे मी हा असा आंधळा झालो मायेची व नाना तृष्णांची बाधा मला झाल्यामुळे स्वहित नेमके कशात आहे हे मला समजेनासे झाले असा मीच आपला वध करुन घेतला आहे. माझ्या पाठीमागे हे काम क्रोधाचे काळ लागले आहेत ५ मी आंधळा

झालो असल्याने रस्त्याने चालताना मला गुणदोषांच्या अनेक ठेचा लागतात. म्हणून मी तो रस्ता सोडला व या रानात येऊन पडलो. आता या निराळघाच मार्गावर राहून देवा, तुझी वाट पाहत आहे. मला तू कृपा करशील अशी फार मोठी आशा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, विठ्ठला, पंढरपूर येथे राहणाऱ्या पांडुरंगा, तूच खरा वैद्यराज आहेस, तूच माझे दुखणे बरे कर. ६

४२६ सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें । मी माजें हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तेंचि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥ १ ॥ सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ २ ॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा घोळसा । न मागे मी भीक आतां हाचि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥ ३ ॥ उर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतत्त्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥ ४ ॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मार्ग येतील त्यांसीं । मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥ ५ ॥ वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव । म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे ह्याचि संतों मार्गे केला उपाय ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :- त्रिकूटशिखरीं-त्रिपुटीच्या शिखरावर, त्रिपुटी-ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, अथवा कर्म, कर्ता, क्रिया इत्यादी त्रिधाचा समुदाय कोल्हाळ-कटकट, घोळसा-त्रास, वोळली-प्रसन्न झाली, सत्रावी-जीवनकला, ज्ञानकला, अमृतवाहिनी ज्ञानभवनी, उपाय-उपाय.

अर्थ :- देवा, मी तर सहजच आंधळा आहे. निजस्वरूपाच्या, निराकाराच्या ठिकाणी मला दृष्टी नाही. बाह्य रूप पाहणे संपल्यामुळे माझी वृत्तीच निवृत्ती झाली. मला हे बाह्य जग दिसेनासे झाले. मी व माझे शरीर या माझ्या वृत्ती हा भाव पण संपला. जे होते ते आपल्याच ठायी अदृश्य झाले १ सर्व शून्याचा त्याग करून, त्रिपुटीच्या शिखरावर जाऊन मी सुखाने झोप घेतली तेथे मला आयतेच दान मिळाले २ धर्म व अधर्म अशा वृत्तींची झोळी मी फेकून दिली. पात्रही टाकून दिले. सर्व प्रकारची कटकट चुकविली सत्व, रज, तम या त्रिगुणांचा त्रास घालविला. आता भीक मागण्याचेही कारण उरले नाही कारण सत्रावीची जीवनकला आता प्रसन्न झाली असल्याने तिने माझी इच्छा पूर्ण केली. तिचाच मोठा भरंवसा मला वाटतो ३ वर मुख करून सोहम् शब्दाने त्याची आळवणी केली; त्या

२१४ सार्थ तुकारामगाथा रूपविहीनाची स्तुती केली मग त्या छदाने तो दाता जागा झाला व त्याने मला हे दान दिले त्याने मला निज बोधाचे, निजतत्त्वाचे ज्ञान दिले आपल्या स्वरूपात मिळवून घेतले ईश्वर व भक्त हा भेद केवळ तात्पुरता ठेवला ४ सर्वांत शब्द हे एकच सार आहे तीच एक परोपकाराची रास आहे म्हणूनच माझ्या मागून येणाऱ्यासाठी हा दगड दान दिलेला आहे खरे म्हणजे ही वाट पूर्वीपासूनच चालत आलेली आहे अनेक सिद्ध लोक या वाटेने गेले व भव सागर तरले त्यामुळे इतरांनाही या वाटेसंबंधी विश्वास निर्माण झाला आहे ५ या वाटेवरचे धर्म एकच आहे आणि ते म्हणजे ईश्वरावर दृढ विश्वास ठेवावा त्याखेरीज जाणतेपणीही नागवण होण्याचा संभव आहे मग देवाचा ठायठिकाणाही सापडेनासा होतो म्हणून हा बाह्य सोंग सोडून त्या प्रभूशी एकत्वाचा भाव तेवढा कायम करावा तुकाराम महाराज म्हणतात, मागील संतानी हाच उपाय केलेला होता ६ ४२७ आंधळयापांगळ्याचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचीता । भवदु ख कोण वारी तुजवाचुनि चिंता ॥ १ ॥ धर्म गा जागो तुझा तूंचि कृपाळू राजा । जाणसी जीर्वीचे गा न सागता सहजा ॥ २ ॥ घातली लोळणी या पुंडलिके वाळवटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटी । न देखें दुसरे गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥ ३ ॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी या हरिनामा घोभाटे । पावला त्याकारणें धाव घातली नेटें ॥ ४ ॥ बैसोनि खोळीं शुक राहे गर्भ आंधळा । झीणला येरझारी दु ख आठवी वेळा । मागील सोसिले तें ना भी म्हणे गोपाळा । पावला त्याकारणे । लाज राखिली कळा ॥ ५ ॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदु खा मोहो साठवी १ घना । आपपर तेही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया तेचि परी जाली पाये नारायणा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - हेळामात्रें-एक क्षणात, वोळला-प्रसन्न झाला उपमन्यू-व्याघ्रपादचा मुलगा खोळीं- आईच्या पोटात, शुक-शुकाचार्य अर्थ - या आंधळ्यांना, पांगळ्यांना दान देऊन संतुष्ट करणारा फक्त विठोबाच आहे सर्व विश्व त्याच्या पासूनच निर्माण झाले असल्यामुळे तो मोठा सर्व काही जाणणारा आहे एक क्षणात तो या विश्वाची घडामोड करतो पापपुण्य, संचित कर्म, भवदु ख यांचे निवारण त्याच्यावाचून दुसरे कुणीही करीत नाही देवा, तुझ्यावाचून माझी १ नाठवी

सार्थ तुकारामगाथा २१५ चिंता कोण दूर करील ? कोण माझे दुःख कमी करील ? १ देवा, तू कृपाळू राजा आहेस. कृपा करण्याचा धर्म तुझा तूच राहा. आमच्यासारख्या जीवाच्या मनात काय आहे हे नेमके तूच जाणतोस तुला न सांगता आमचे दुःख समजते. २ त्या पुंडलीकाने या वाळवंटात लोळण घातली. असे हे पंढरपूर निरेभिमरेच्या तीरावर मोठ्या पुण्याचे स्थान निर्माण झाले आहे. त्या पुंडलीकास दुसरे काहीच दिसत नव्हते त्याची दृष्टी दुसरे पाहावयास तयार नव्हतो. मग हा प्रेमदाता पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाला त्याने त्यांच्यावर कृपामृताचा वर्षाव केला. ३ एक उपमन्यू नावाचे लहान मूल होते. त्याला लोकाच्याबरोबर नीट चालवत नसे त्याला त्यामुळे नीट जग दिसतही नसे. मग त्याने हरिनामास सुरवात केली. हरिनामाचा गजर झाल्यावर मात्र हा देव सावध झाला व त्याने धावत जाऊन त्याचे तत्परतेने रक्षण केले. ४ जग न पाहावे म्हणून शुकाचार्य आईच्याच गर्भामध्ये आंधळा होऊन राहिला होता. कारण त्याला जन्ममृत्यूच्या रोपांनी फार दुख झालेले होते त्याने यापूर्वी फारच सोसले होते. याच्यासाठी देवाने धावत जाऊन भिऊ नकोस, भिऊ नकोस असे म्हटले व त्याचे रक्षण करून लाज राखली. ५ जो सुखदुःखापासून वेगळा आहे, ज्याला धनाचा मोह नाही, ज्याला आपपर भाव नाही, जो भोवतीच्या आप्त स्वकीयात रमत नाही अशा लोकांनाच देव दर्शन देतो, स्वतःचे मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यातही तोच भाव निर्माण झाल्यामुळे नारायणा, माझ्यावर कृपा करा. ६ विवरण :- दुःखाचे आघात झाल्यावर कष्टी झालेल्यांना देव कशी मदत करतो, एकचित्ताने ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो कशी मदत करतो हे सांगण्यासाठी तुकारामबुवांनी येथे उपमन्यू व शुकाचार्य याची उदाहरणे दिली आहेत पैकी उपमन्यू हा धौम्य ऋषीचा शिष्य होय हा आंधळा झाला होता याची निर्वाहाची सर्व साधने बंद झाल्यामुळे याने रुईची पाने भक्षण केली. त्यामुळे याची दृष्टी जाऊन यास भोवळ आले. तो एकदा चालताना विहि- रीत पडला. पुढे याने गुरूच्या सांगण्यावरून अश्विनीकुमाराची प्रार्थना करून स्वतःस दृष्टी प्राप्त करून घेतली. हा दरिद्री असल्यामुळे इतरत्र गोड दुधाची चव त्याने पाहिली होती, पण याला घरी दूध मिळत नव्हते. आईने पाण्यात पीठ कालवून त्याला दिले. मग दूध मिळविण्यासाठी याने शंकराची प्रार्थना करून अवघा क्षीरसमुद्रच मिळविला. ईश्वराने असे याचे अज्ञान दूर केले याची दुधाची इच्छा तृप्त केली. ४२८ भगवंता तुजकारणें मेलों जीताचि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टि फिरली कैसी । जागतां न देखों गा खर आणि अक्षरासी ॥ १ ॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देईं देवा येउनि सामोरा आतां ॥ ३ ॥ संसारसागर गा भयदुःखांचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंद्रियें वन्यघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्धर हे चांडाळ ॥ ४ ॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । थेंधलों यदि सोडा भाव धरुनि टँका ।

२१६ सार्थ तुकारामगाथा


जाणवो नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥ ५ ॥ नाठवे आपपर आतां काय या करूं । सारिखा सोइसवा १ हारपला विचारु । घातला योगक्षेम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देई अभयकरु ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा : - क्षर-नाशवंत, अक्षर-अविनाशी, इगळ-अग्नी, दुर्मर-भरण्यास कठिण वेंदलों-चढलो टेंका-आधार अर्थ :- ईश्वरा, तुझी प्राप्ती जर होणार नसेल तर आम्ही जियत कसले आहोत ? मेल्यासारखेच समजले आम्हास. आमची बुद्धी निष्काम व्हावयास हवी तिचे चलनवलन थांबले पाहिजे हातापायाचेही व्यापार थांबावया हवेत. आमची दृष्टीही आंधळी झाली आहे फिरली आहे. तू क्षर-नाशवंत व अक्षरही-अविनाशी आहेस हेही आमच्या ध्यानात येत नाहीसे झाले आहे. १ विठ्ठला, तुझ्या कृपेचे दान मला दे ना देवा, तुझी कीर्ती व तुझे नाम याची कीर्ती अमर्यादपणे वाढली आहे २ या लोकीचे भोग व परलोकीची मुक्ती सर्व काही तूच आहेस सर्व सिद्धींचा दाता तू आहेस म्हणूनच आमची भीती, लज्जा शोकादी वृत्ती दूर झालेली आहे. आम्ही सर्वस्वाचा त्याग करून तुझ्याकडेच धाव घेतली आहे आता देवा, तू कृपेचे दान द्यावेस. तू आता माझ्या दृष्टीसमोर असावेस. ३ हा संसारसागर हेचं दुःखाचे मूळ आहे. लौकिक अर्थाचे शब्द हे अग्नीच्या निखाऱ्याप्रमाणे आहेत इंद्रियांचे आघात हे वज्रासारखे असून उष्ण ज्वालांचा एकसारखा भडका त्यामुळे उठत आहे. देवा, हे सर्व मी सोसले आहे. न सोसून काय करू ? हे सर्व विकार दुष्ट, चांडाळ, व भरण्यास कठीण असे आहेत ४ तुझे नाम मात्र तीनही लोकात वृक्षाच्या फांद्याप्रमाणे, पानाप्रमाणे वाढत राहिले आहे याच संसाररूपी झाडाच्या मूळ खोडावर मी चढलो. भावभक्तीचा मला आधार मिळाला. तेथून मी लोकांसाठी हा तुझा धर्म सांगत आहे. पुण्यवंत असतील ते आमच्या उपदेशाप्रमाणे वागतील ५ मला आपले व दुसऱ्याचे असा भेद करता येत नाही. त्याला मी काय करावे ? मला सर्व सारखेच दिसते. संसार- परमार्थ याचा विचारही संपला मी माझ्या योगक्षेमाचे ओझे देवा तुझ्यावर सोपविले आहे. हा तुकाराम तुला शरण आहे. त्याला अभय दे. ६

४२९ मनुराजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी । पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आम्हावरी गा ॥ १ ॥ म्हणउनि आलो या देशा । होतों नाहीं तरी भुलों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा ॥ २ ॥ सवे घेउनि चौघेजण । आला कुमार सुलक्षण । कडे चुकवुनि कांटेवण । ऐका आणिलीं तीं कोण कोण गा ॥ ३ ॥ पुढें भक्तीनें धरिले हातीं । मार्गे ज्ञान वैराग्य धर्म येती । स्थिर केलों जीं आचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥ ४ ॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसो माय । धर्मे त्याच्या देखियेले पाय । दिले अक्षय भय वारुनि दान गा ॥ ५ ॥ होतो पीडत हिंडता गांव । पोट भरेना राहावया ठाव । तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥ ६ ॥


१ आमुचिया.

सार्थ तुकारामगाथा २१७ शब्दार्थ व टीका - मनु-मन, देहपुरी-देहरूपी शहरान, आचपळें-अति चपळ अर्थ - देहरूपी एका गावात मन नावाचा राजा राज्य करीत आहे प्रवृत्ती व निवृत्ती या त्याला दोन बायका असून तो पुत्रपौत्रादिकांनी अतिशय संपन्न असा आहे त्याने आमच्यावर फार मोठी कृपा केली हो ? म्हणून तर आम्ही या देशात येऊन पोचलो मानी दिशा सुकून भलतीकडेच मी गेलो असतो येथे आल्यावर इच्छेप्रमाणे दान देणारा दाता भेटला त्याने आम्हाला फार चांगला मार्ग दाखविला २ मनोरूपी राजा आपले चार सुलझणी कुमार घेऊन आमच्याबरोबर आला वाडे व काटे चुकवून त्यानेच आम्हास आणले त्याच्याबरोबर कोण कोण मुलेहोती त्याची नावे ऐका ३ त्याच्यापुढे भक्ती स्वतः चालत होती व तिच्याबरोबर ज्ञान, वैराग्य व धर्म हे येत होते जे अति चपळ होते ते स्थिर झाले सिद्धही याच पथास त्यानी आणून लावले ४ त्यानी आमच्यावर जे उपकार केले त्याचे महत्त्व काय सांगू ? आईबापसुद्धा असे उपकार करणार नाहीत त्याच्याच धर्मामुळे मला देवाचे हे पाय दिसले व मला अभयदान कायमचे मिळाले ५ पूर्वी अनेक जन्मी अनेक यात्रौ दु खोरुष्टी होऊन हिंडत होतो त्यावेळी धड नीट पोट भरले नाही की राहायला नीट जागा कधी मिळाली नाही पण या मनरूपी राजाने सर्व संशय फेडले व हा तुकोबाना याघवासारखा त्यामुळे वाढतो ६ ४३० गातो वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावे एका । डोळे झाकुनि रान करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥ १ ॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गाठ घाला मूळबदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावूनि राहा गोविंदों गा ॥ २ ॥ ऐसा अल्प मानवी देह । शत गणिले अर्ध रात्र खाय । पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरले ते पाहे गा ॥ ३ ॥ क्षणभगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा १ माया आशा । न चले बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥ ४ ॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावूनिया नीट । जर असेल करणे गोड शेवट गा ॥ ५ ॥ विनवितो सकळा जना । कर जोडुनि थोरा लाहना । दान इतुले द्या मज दीना । म्हणे तुकयावधु राम म्हणा गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका - लेखा-हिशेब, शत-शंभर, लाहो-लाभ, वोळसा-फेरे, लागपाठ-त्वरा अर्थ - मी वासुदेव गात आहे त्याचा अर्थ नीट लक्ष देऊन ऐका डोळे मिटून व्यर्थ आयुष्य घालवू नका कारण त्याचा काटेकोर हिशेब यम किंवा काळ करीत बसला आहे १ आधी रामराम असे स्मरण करा पाहू त्याचा लाभ करून घेऊन त्याला मूळ स्वरूपात गाठा इतर बाकीच्या संसाराच्या सर्व उपाधी सोडून द्या या एका गोंविदावर सर्व चित्त ठेवून राहा तुम्ही २ या मानवी देहास फार थोडे आयुष्य आहे शंभर वर्षे आहे असे मानले तरी त्यातील अर्ध रात्रीच्या झोपेतच जाते मग बालपण, दुख, रोग, क्षयासारख्या व्याधी यात काही वर्षे जाणारच मग ईश्वराच्या भजनासाठी किती उरले पाहा बरे ३ जे काही हाताशी असलेले आयुष्य आहे तेही क्षणभंगुरच यासाठी तुम्ही सर्व सावध होऊन याह्या आशा किंवा माया सोडून द्या एकदा यमाचा फास गळ्याशी पडला म्हणजे मग मात्र कुणाचे काही चालत नाही पुढे फार मोठ्या फेऱ्याच्या संकटात पडावे लागणार आहे हे ओळखून असा ४ काही थोडी त्वरा करून भक्तीचा भाव नीट बळकट करून ठेवा नीट तन, मन, ध्यान लावून या देवास सर्व अर्पण करुन शेवट गोड करण्याचे कार्य साधा ५ सर्व लहानथोराना मी वासुदेव हात जोडून सांगत आहे की, एवढेच दान मला द्या तुकयावधू सुद्धा म्हणत आहेत की, तुम्ही मुखाने नेहमी रामराम म्हणावे ६ १ तोडा तु गाथा २८

२१८ सार्थ तुकारामगाथा विवरण :- वरील दोन व पुढील चार अभंगातून वासुदेवाच्या भूमिकेवरून तुकोबानी सर्वसामान्य जनतेस रूपकाच्या भाषेत बोध केला आहे तुकारामासारख्या अनेक मराठी संतानी सांस्कृतिक उद्बोधनाचे, धर्मप्रसाराचे व रक्षणाचे, जनतेस सन्मार्ग दाखविण्याचे फार मोठे कार्य केले आहे पारमार्थिक तत्त्वज्ञान, वेदान्तविचार, आध्यात्मिक अनुभूती याचा त्यांनी स्वत अनुभव घेतला व तो इतरांसाठी अतिशय सुलभ भाषेत काव्याच्या आधारे शब्दबद्ध केला रामकृष्णच्या, कौरवपांडवाच्या कथा सांगून आबालवृद्धांना थोर परंपरेची ओळख त्यांनी वारंवार करून दिली मराठी संतांचे हे पारमार्थिक विचारधन प्रत्येकाच्या घरी नेऊन पोचते करण्याचे महान कार्य मनोरंजनाच्या द्वारे करणारा एक मोठा वर्ग त्यावेळी समाजात होता त्यावेळी मुद्रणकलेचा शोध आपल्या देशांत आलेला नसल्यान, पुस्तकें मुद्रित स्वरूपात नव्हती, शिक्षणाचा प्रसार नव्हता, विद्यालये नव्हती अशा काळात बहुजनास परमार्थप्रवण करून बहुश्रुत करण्याचे कार्य साधुसंतानी केलेच, पण त्याच्या कार्याला फार मोठा विस्तार मनोरंजनाच्या द्वारे खेड्यापाड्यातही घरोघरी जाऊन करणारा एक मोठा समिश्र वर्ग होता हा वर्ग म्हणजे गोंधळी, भुत्ये, वासुदेव, वाघ्या-मुरळी, नंदीबैलवाले इत्यादींचा हाय अजूनही यांच्यापैकी काहीजण रस्त्यातून दिसतात आज नाही उद्या या मंडळींचे भवितव्य काय होणार आहे ? कुणास माहीत ? पण आज भिकाऱ्याप्रमाणे वाटणारे लोक एके काळी सांस्कृतिक उद्बोधनाचे व प्रसाराचे कार्य फार चांगल्या प्रकारे करीत असत महाराष्ट्राच्या समाजशिक्षणाचे हे एक प्रधान अंग होते निरक्षर असणाऱ्या, अज्ञानामध्ये जीवन कंठणाऱ्या, व आपली शेती आणि खेडे सोडून न जाणाऱ्या शेतकरीवर्गास त्याच्या घरी जाऊन त्यास त्याच्या दैवदेवतांची आठवण करून देणे, रोजची तिथी, रोजचे नक्षत्र, रोजचा सण याची आठवण करून देणे हे महत्त्वाचे कार्य लोकरंजनाच्या साहाय्याने गोंधळी, भुत्या, वासुदेव, कानफाट योगी, वाघ्या मुरळी, बाळसंतोष, शरोदा (पिंगळा ), कुडमुड्या जोशी, कोल्हाटी, डोंबारी, फकीर, जागले, भोपी, बहुरूपी, कडकलक्ष्मी, वैदू इत्यादी अनेक प्रकाराच्या लोकांनी केले आहे याच्या परमार्थनिरूपणास विनोदाची, अतिशयोक्तीची, उपरोधाची किनार असल्यामुळे याची भावत समाजास उपकारक वाटली या काही व पुढल्या तीनचार अभंगात तुकारामबुवांनी वासुदेवाच्या भूमिकेवरून परमार्थनिरूपण केलेले आहे वासुदेवाची जमात द्वारकेपासून आली असावी हे मोठे कृष्णभक्त असून आजही त्यांच्या चिपळ्या, त्याचा टाळ, त्याचा पावा सकाळच्या वेळी श्रीकृष्णगीतातून साथ देणाऱ्या या गोष्टी आहेत श्रीकृष्ण किंवा विठ्ठल याची उपासना हे लोक करतात याचा वेष बालकृष्णाचा असतो डोक्यावर मयूरपिसाची टोपी असते, पायात घुंगूर असतात ताडाशी अलगुज असते जुन्या पद्धतीचा पायघोळ अंगरखा असतो त्यावर तांबडे अलवण असते कृष्णभक्तीची गाणी गाऊन हे सकाळच्या प्रहरी लोकांना सुखवीत असत या वासुदेवावर ज्ञानेश्वरएकनाथादी संतानीही अभंग रचना केलेली आहे ' मुळुमुळा वाजवो टाळ । झणझणा नाद रसाळ ' या चरणाचा ज्ञानदेवाचा एक नादमधुर अभंग वासुदेवावर आहे ' वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरण व्याधी । अहं सोहं कोहं मूळ या सांडी उपाधी ' अशा भाषेत एकनाथांनी वासुदेवाचे माहात्म्य सांगितले आहे ४३१ गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अजून । जागे होऊनि करा कांहीं दान । नका ऐकोनि १ झाकों लोचन गा ॥ १ ॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसे जना । चिपळया टाळ हातीं मुर्ली घोप । नारायणा २ गा ॥ २ ॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । ह्या परी मीस घेऊ नका भाई । पुढें विन्मुख होता वरे नाहीं गा ॥ ३ ॥ देवाकारणे भाव तस्मात । द्यावे न लगे फारसे वित्त । जाले एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठी नका करु वाताहात गा ॥ ४ ॥ १ ऐको झाकीनि, २ नामनारायणा गा १०

सार्थ तुकारामगाथा २१९ आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हेंचि मागावयास । नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥ ५ ॥ आतां मागुता येईल फेरा । हें तो न घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पाहार-प्रहर, निदसुरा-अधवट झोपेत असल्यास, अज्ञानोस तोय-पाणी मोस-माग अर्थ - तीन प्रहर टळून गेले पहिला प्रहर गर्भवासाचा, दुसरा बाळपणाचा, तिसरा तरुणपणाचा, अशा तीन प्रहराचा काळ अज्ञानरात्रीचाच संपत आला अजून झोपेत असलेल्यांनो जागे व्हा ना म्हातारपणाचा चौथा प्रहर येत आहे सावध व्हा ना जागे होऊन काही दान करा हा सर्व उपदेश ऐकून डोळे मिटून घेऊन झोपेत काळ घालवू नका १ रामकृष्ण हरी म्हणून भजन करा असा उपदेश हा वासुदेव करीत आहे हातात टाळ चिपळ्या, पोगा व मुखात श्रीकृष्णाचा अथवा विठ्ठलाचा किंवा रामकृष्णहरी असा घोष असू द्या २ फळ, फूल, पान जें काय शक्य असेल ते देवास अर्पण करा झोपेचे सोंग घेऊन उगाच झोपू नका घडू नो कारण या देहात जर प्रभूशी विन्मुख व्हाल तर मात्र पुढे कल्याण होणार नाही ३ या ईश्वराला नुसता भाव अर्पण केला तरी चालेल त्याला काही धनदौलत अर्पण करावी लागते असे नाही एकचित्ताने त्याचे स्मरण केले तरी पुष्कळ होते हे न करण्याने तुम्ही आपल्या आयुष्याचा नाश उगाच करू नका ४ थोडे कष्ट घेऊन मी येथे हेच दान तुमच्याजवळ मागायला आलो आहे माझी निराशा करू नका संसाराचा भार उगाच डोक्यावर घेऊ नका धर्म करणे हेच संसाराचे एक फळ आहे ५ आता पुन या देहरूप नगराला यावे न लागल असे काही तुम्ही करावे तुकयाबंधू तुम्हास सांगत आहे की, असे काही न कराल, या ईश्वराची ओळख करून न घ्याल तर तुम्हांला अघोर नरकास जावे लागेल ६ ४३२ राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटींचे गोड तेंचि खरें गा ॥ १ ॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागऱ्याघोपें गा ॥ २ ॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनिया करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥ ३ ॥ एक वेळां जाणवितो । धरूनिया राहा चित्तीं । नेघें भार सांडीं फामा हातीं । नोज घेऊनि फिरती गा ॥ ४ ॥ सुपात्रीं सर्व भाव¹ । मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥ ५ ॥ शूर दान जीवे उदार । नाहीं वासुदेवीं विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सोपारें-सोपी आवा-धंय अर्थ - राम ही दोन अक्षरे अतिशय सुलभ व सोपी आहेत आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जागे राहून तुम्ही या नामाचा जप करा, व आयुष्याचा शेवट गोड साधा १ वासुदेव, रामकृष्णाचे स्मरण करून, चिपळ्या वाजवून, टाळ, घागऱ्यांचा घोष करून रामकृष्ण वासुदेव, रामकृष्ण वासुदेव असा पुकारा करीत आहे २ हा वासुदेव वासुदेव अशाच शब्दांनी गाणे गात आहे या नावाखेरीज काही दुसरे वेगळे नाही असे समजून याचेच दान करा, असा त्याचा उपदेश आहे याच दानाचे धैर्य दाखवा व देहबुद्धीसंबंधीचे काहीही मागे ठेवू नका ३ हे दान मागण्यासाठी निज- १ वेचावे

२१८ | सार्थ तुकारामगाथा


विवरण :- वरील दोन व पुढील चार अभंगांतून वासुदेवाच्या भूमिकेवरून तुकोबांनी सर्वसामान्य जनतेस रूपकाच्या भाषेत बोध केला आहे. तुकारामासारख्या अनेक मराठी संतांनी सांस्कृतिक उद्बोधनाचे, धर्मप्रसाराचे व रक्षणाचे, जनतेस सन्मार्ग दाखविण्याचे फार मोठे कार्य केले आहे. पारमार्थिक तत्त्वज्ञान, वेदान्तविचार, आध्यात्मिक अनुभूती याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला व तो इतरांसाठी अतिशय सुलभ भाषेत भाष्याच्या आधारे शब्दबद्ध केला. रामकृष्णकथा, कौरवपांडवांच्या कथा सांगून आबालवृद्धांना थोर परंपरेची ओळख त्यांनी वारंवार करून दिली. मराठी संतांचे हे पारमार्थिक विचारधन प्रत्येकाच्या घरी नेऊन पोचते करण्याचे महान कार्य मनोरंजनाच्या द्वारे करणारा एक मोठा वर्ग त्यावेळी समाजात होता. त्यावेळी मुद्रणकलेचा शोध आपल्या देशात आलेला नसल्याने, पुस्तके मुद्रित स्वरूपात नव्हती, शिक्षणाचा प्रसार नव्हता, विद्यालये नव्हती अशा काळात बहुजनास परमार्थप्रवण करून बहुश्रुत करण्याचे कार्य साधुसंतांनी केलेच, पण त्यांच्या कार्याचा फार मोठा विस्तार मनोरंजनाच्या द्वारे खेड्यापाड्यातही घरोघरी जाऊन करणारा एक मोठा सन्मिश्र वर्ग होता. हा वर्ग म्हणजे गोंधळी, भुत्ये, वासुदेव, वाघ्या-मुरळी, नंदीबैलवाल इत्यादींचा होय. अजूनही यांच्यापैकी काहीजण रस्त्यातून दिसतात. आज नाही उद्या या मंडळींचे भवितव्य काय होणार आहे ? कुणास माहीत ? पण आज भिकाऱ्याप्रमाणे वाटणारे लोक एके काळी सांस्कृतिक उद्बोधनाचे व प्रसाराचे कार्य फार चांगल्या प्रकारे करीत असत. महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे हे एक प्रधान अंग होते. निरक्षर असणाऱ्या, अज्ञानामध्ये जीवन कंठणाऱ्या, व आपली शेती आणि खैडे सोडून न जाणाऱ्या शेतकरीवर्गास त्याच्या घरी जाऊन त्यास त्याच्या देवदेवतांची आठवण करून देणे, रोजची तिथी, रोजचे नक्षत्र, रोजचा सण याची आठवण करून देणे हे महत्त्वाचे कार्य लोकरंजनाच्या साहाय्याने गोंधळी, भुत्या, वासुदेव, कानफाट योगी, वाघ्या-मुरळी, बाळसंतोष, सरोदा ( पिंगळा ), कुडमुड्या जोशी, काल्हाटी, डाकारी, फकीर, जांगडे, भाटो, बहुरूपी, कडवलक्ष्मी, वैदू इत्यादी अनेक प्रकारच्या लोकांनी केले आहे. यांच्या परमार्थनिरूपणास विनोदाची, अतिशयोक्तीची, उपरोधाची किनार असल्यामुळे याची सोबत समाजास उपकारक वाटली.

या काही व पुढल्या तीनचार अभंगांत तुकारामबुवांनी वासुदेवाच्या भूमिकेवरून परमार्थनिरूपण केलेले आहे. वासुदेवाची जमात द्वारकेपासून आली असावी. हे मोठे कृष्णभक्त असून आजही त्यांच्या चिपळ्या, त्याचा टाळ, त्याचा पावा सकाळच्या वेळी श्रीकृष्णगीतातून साथ देणाऱ्या या गोष्टी आहेत. श्रीकृष्ण किंवा विठ्ठल यांची उपासना हे लोक करतात. याचा वेष बालकृष्णाचा असतो. डोक्यावर मयूरपिसांची टोपी असते, पायांत घुंगुर असतात तोंडांनी अलगुज असते. जुन्या पद्धतीचा पायघोळ अंगरखा असतो. त्यावर तांबडे अळवण असते. कृष्णभक्तीची गाणी गाऊन हे सकाळच्या प्रहरी लोकांना सुखवीत असत. या वासुदेवावर ज्ञानेश्वरएकनाथादी संतांनीही अभंग रचना केलेली आहे. 'घुळघुळा वाजती टाळ । झणझणा नाव रसाळ' या चरणाचा ज्ञानदेवांचा एक नादमधुर अभंग वासुदेवावर आहे. 'वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरण व्याधी । अहू सोहं कोहं मूळ या सांडी उपाधी' अशा भाषेत एकनाथांनी वासुदेवाचे माहात्म्य सांगितले आहे.

४३१ गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा असून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि १ झांको लोचन गा ॥ १ ॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसे जना । चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा २ गा ॥ २ ॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी भीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥ ३ ॥ देवाकारणे भाव तस्मात । द्याये न लगे फारसे वित्त । जाले एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥ ४ ॥


१ ऐको झाकोनि, २ नामनारायणा गा

आलों येथवरी बहु सायासे । करितां दान हेचि मागावयास । नका भार घेऊं करुं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥ ५ ॥ आतां मागुता येईल फेरा । हे तो न घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखो नाहीं तरी जाल अघोरा गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टोपा : - पाहार-प्रहर, निदसुरा-अर्धवट झोपेत अमलेल्यास, अनानीस, तोय-पाणी, मोस-गांव अर्थ : - तीन प्रहर ढळून गेले. पहिला प्रहर गर्भवासाचा, दुसरा बाळपणाचा, तिसरा तरुणपणाचा, अशा तीन प्रहरांचा काळ अज्ञानरात्रीचाच संपत आला असून झोपेत असलेल्यांनो जागे व्हा ना म्हातारपणाचा चौथा प्रहर येत आहे. सावध व्हा ना जागे होऊन काही दान करा हा सर्व उपदेश ऐकून डोळे मिटून घेऊन झोपेत काळ घालवू नका १ रामकृष्ण हरी म्हणून भजन करा, असा उपदेश हा वासुदेव करीत आहे. हातात टाळ, चिपळ्या, वीणा व मुखात श्रीकृष्णाचा अथवा विठ्ठलाचा किंवा रामकृष्णहरी असा घोष असू द्या. २ फळ, फूल, पान जे काय शक्य असेल ते देवास अर्पण करा. झोपेचे सोंग घेऊन उगाच झोपू नका घडून्हो. कारण या देहात जर प्रभूशी विन्मुख व्हाल तर मात्र पुढे कल्याण होणार नाही ३ या ईश्वराला नुसता भाव अर्पण केला तरी चालेल. त्याला काही धनदौलत अर्पण करावी लागते असे नाही एकचित्ताने त्याचे स्मरण केले तरी पुष्कळ होते. हे न करण्याचे तुम्ही आपल्या आयुष्याचा नाश उगाच करु नका ४ मोठे कष्ट घेऊन मी येथे हेच दान तुमच्याजवळ मागायला आलो आहे माझी निराशा करू नका. संसाराचा भार उगाच डोक्यावर घेऊ नका धर्म करणे हेच संसाराचे एक फळ आहे. ५ आता पुनः या देहरूप नगराला यावे न लागेल असे काही तुम्ही करावे तुकयाप्रभू तुम्हांस सांगत आहे की, असे काही न कराल, या ईश्वराची ओळख करून न घ्याल तर तुम्हांला अघोर नरकास जावे लागेल. ६

४३२ राम राम दोनी अक्षरे । सुलभ आणि सोपारे । जागा मागिले पाहारें । सेवतिचें गोड तेंचि खरे गा ॥ १ ॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागऱ्याघोषें गा ॥ २ ॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं काहीं ठेवा गा ॥ ३ ॥ एक वेळा जाणविती । धरूनिया राहा चित्तीं । नेघें भार सांडीं फामा हातीं । नीज घेऊनि फिरती गा ॥ ४ ॥ सुपात्रीं सर्व भाव १ । मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥ ५ ॥ शूर दान जीवे उदार । नाहीं वासुदेवीं विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - भोपारे-गोपी, आवा-धैर्य अर्थ - राम ही दोन अक्षरे अतिशय सुलभ व सोपी आहेत आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जागे राहून तुम्ही या नामाचा जप करा; व आयुष्याचा शेवट गोड साधा. १ वासुदेव, रामकृष्णाचे स्मरण करुन, चिपळ्या वाजवून, टाळ, घागऱ्यांचा घोष करुन रामकृष्ण वासुदेव, रामकृष्ण वासुदेव असा पुकारा करीत आहे. २ हा वासुदेव वासुदेव अशाच शब्दांनी गाणे गात आहे. या नामाखेरीज काही दुसरे वेगळे नाही असे समजून याचेच दान करा, असा त्याचा उपदेश आहे. याच दानाचे धैर्य दाखवा व देहबुद्धीसबधीचे काहीही मागे ठेवू नका. ३ हे दान मागण्यासाठी निज- १ नेघावे

२२० सार्थ तुकारामगाथा वस्तूचे दान मिळविण्यासाठी वासुदेव सर्वांना एकदा जाणीव देत आहे नीट ईश्वरविषयक भाव चित्तात धरून राहा संसाराचे ओझे शिरावर येऊ नका हाताची सर्व कामे सोडून याचा भाव मनात धारण करा ४ मी वासुदेव सर्वत्र भरून राहिलेला आहे असा सर्व चांगल्या भक्ताच्या मनात भाव असतो जे महानुभाव असे कृपाळू संत आहेत तेही असेच जाणतात त्याच्या ठिकाणी वेगळेपणाची जाणीव कधीच नसते ५ ज्यांना वासुदेवाचा विसर पडत नाही त्याचेच दान शूरत्वाचे व उदारतेचे मानावे त्याची कीर्ती सर्वत्र वाढोस लागेल, चराचरात पसरून राहील अशा या दानशूर साधुसंतांना तुकाराम महाराज म्हणतात, माझा नमस्कार असो ६ ४३३ बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आत निजेलें । कैसे घरात घरकुल केले । नेणो आधार ना उजेडले गा ॥ १ ॥ वासुदेव करितो फेरा । वाडियात बाहेर द्वारा । कोणी कांहीं तरी दान¹ करा । जाब नेदा तरी जातो सामोरा² गा ॥ २ ॥ हातीं टाळ दिंडी मुखीं³ गाणे । गजर होतो बहु मोठघाने । नाही निवडिली थोरल्हाने । नका निजो भिकेच्या भेणे गा ॥ ३ ॥ मी वासुदेव तत्त्वता । कळो येईल विचारिता । आहे ठाउका सभाग्या संता । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥ ४ ॥ काय जागाचि निजलासी । सुने जागेोन दारापासी । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥ ५ ॥ ऐसे जागविले अवघे जन । होतें सचित तींही केले दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टोपा - जाब-उत्तर, नेदा-दिला नाही भेणे-भयाने, सुने-कुत्र अर्थ - जे मुखाने बोलू नये अशा ज्ञानाच्या गोष्टी जे मुखाने एकसारख्या करतात ते बाहेरून जागे असले तरी आत झोपलेलेच आहेत त्यांनी आपल्या घरातच छोटेसे घरकुल केले आहे, त्यात अंधार आहे की उजेड आहे हे काही नीट समजत नाही १ हा वासुदेव रोजच्या फेऱ्या या देहरूपी वाड्याच्या आत, दारात बाहेर सर्वत्र करीत असतो त्याला कुणी काही तरी दान करून थोडे पुण्य सपादन करा ना तुम्ही काही उत्तर न द्याल तर मी आपला माघारा जाईन २ मी हातात टाळ व वीणा घेऊन, मुखाने ईश्वराचे नाम गात आह नामाचा हा गजर मी मोठघाने करीत आहे तो ऐकण्यासाठी लहानथोर अशी निवड केलेली नाही दान देण्याच्या भयाने कुणी झोपून जाऊ नका ३ मी तर निश्चयाने वासुदेवच आहे तुम्ही थोडा विचार केलात तर तुम्हासही हे सहज समजून येईल भाग्यवान संतांना हा प्रकार माहित आहे हे असे दान मागणारा माझ्याशिवाय दुसरा आणखी कोणी नाही ४ उगाच काय भ्रमात निजून राहिलात ? दाराशी मात्र राखणेसाठी कुत्रे जागेवोत ठेविले आहे ते तुमच्या हितासाठी घसापस करून भुकत आहे आणि तुम्ही वासुदेवाला भेटत नाही ५ अशा प्रकारे या वासुदेवाने सर्व लोकांना जागे केले आहे पण ज्यांचे पूर्वकर्म चांगले होते त्यांनीच दान केले आहे आणि वासुदेवाला विसरून जाणारे मात्र दुबळच आहेत ६ ४३४ रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळया वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥ १ ॥ जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसू द्यावा भाव गा ॥ २ ॥ १ दान पुण्य करा २ माघारा, ३ मुखी नाम गाण

सार्थ तुकारामगाथा २२१ निज दासाची थोर आवडी । यासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥ ३ ॥ अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥ ४ ॥ तुका म्हणे रे धन्य त्याचें जीणें । जींहीं¹ घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणें गा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- नीज-निजस्वरूपाचे दान, वोयळतो-प्रसन्न होतो. अर्थ :- आपल्या गीतांतून रामकृष्णांचे गुणवर्णन गात गात, टाळ व चिपळ्या वाजवीत, आपल्याच नादात नाचत नाचत हा वासुदेव निजस्वरूपाचे दान घेत घेत फिरत आहे. १ सर्व जनांत व वनांत सर्वत्र एकच परमेश्वर पसरून राहिलेला आहे. तो अनुभवण्यासाठी वासनेचा त्याग करावयास हवा. मगच वासुदेवाची संगत त्याला सुखाची होते, तो प्रसन्न होतो, असा भाव मनात निश्चयाने असू द्यावा. २ निजस्वरूपाच्या दानाची गोडी या वासुदेवास फार मोठी असून प्रत्येक क्षणी त्याच्या मुखात हरिनामाचा उच्चार असतो. अशा या वासुदेवाची प्राप्ती तुम्ही करून घ्या. ३ तुम्हांस जागे करण्याचे प्रयत्न फार झाले. त्याचा शेवटही झाला. पण काही प्रयत्न यशस्वी झाला नाही, तुम्ही झोप टाकून आधी जागे व्हा पाहू; व या वासुदेवाला दान द्या. ४ ज्याने या वासुदेवास दान दिले त्याचेच जिणे धन्य होय असे तुकारामबुवा म्हणतात, असे दान देणारास मग जन्ममृत्यूच्या फेऱ्या पडत नाहीत. कारण त्याचा निवास वासुदेवाच्या ठिकाणीच झालेला असतो. ५ गांवगुंड-अभंग १ ४३५ आम्ही जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥ १ ॥ दुसरें तें खेळों आलें । एका बोलें तो मियां ॥ २ ॥ अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥ ३ ॥ तुका म्हणे लुटूं नाद । जितूं वाद सतीनें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पुंड-बंडखोर, जितूं-जिंकू, सतीनें-शर्थीने. अर्थ :- आम्ही सर्व देहरूपी गावास दरारा बसविणारे गावगुंडच बनलो आहोत. सर्व बंडखोर प्राणीमात्रांना अथवा पंचमहाभूतांनाही आमचा दरारा वाटतो. १ या एका मियाच्या बोलावण्याने दुसरे अनेक लोक गावगुंडीचा खेळ खेळायला येऊन मिळाले. २ एकमेकांचा अंगसंबंध न येताही सर्वांना लाभ होईल असे करू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशांचा भाव संपवू. त्यांच्याशी शर्थीने वाद जिंकू. ४ जोगी-अभंग १ ४३६ जग जोगी जग जोगी । जागजागे² बोलती ॥ १ ॥ जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ २ ॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजा³ सकळ ॥ ३ ॥ पूजापत्र कांहीं । फल पुष्प तोय ॥ ४ ॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥ ५ ॥ नफा घेऊं भार । धर्म तोचि सार ॥ ६ ॥ तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- जोगी-योगी, जगदेव-जगन्नाथ. १ जिही वासुदेवा केलें दान, २ जागे जागे ३ पूजावा.

२२२ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- जगातील सर्व योगी लोकांना स्वतःच्या ठिकाणी जागे असा असे सांगत असतात. १ हा जगन्नाथ ईश्वर स्वतःच जाणणारा असल्याने त्याच्या ठिकाणी काही भाव ठेवावा. २ तोच सर्व क्षेत्राचा पालक असल्याने त्याचीच पूजा करावी. ३ फुले, फळे, पाणी, पान वगैरे घेऊन त्याचीच पूजा करावी ४ मनुष्यदेहाच्या शहरास फार दिवसांनी या योग्याची फेरी आलेली आहे. ५ आपल्या मस्तकावर लौकिक संसाराचा भार कुणीही घेऊ नये. धर्माने वागणे हेच जीविताचे सार आहे. ६ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हास हे दान मागत आहे. ते अनन्य- भावाने मला द्यावे. ७ विवरणः-येथून पुढचे अभंग असेच विरगोळ विषयावर लोकाभिमुख होऊन रूपकाच्या आश्रयाने लिहिलेले आहेत. जोगी, सरवदा, मुढा, डोईफोडा, मलग, दरवेस, गोंधळ, सोंगा, वाघ्या, दसरा इत्यादी नावांनी भारुडाच्या सदरात येतील असे हे अभंग ह्या वेळेच्या समाजात निरनिराळ्या वेषात वावरणाऱ्या व बहुजन समाजास सांस्कृतिक व पारमार्थिक विचाराची जाग देणाऱ्या व लोकरंजनाने काम करणाऱ्या काही लोकांचे हे शब्दचित्र मनोरंजक व उद्बोधक असे आहे या अभंगात योगी अथवा जोगी माणसाचा रूपकात्मक उल्लेख आहे. जोगी हे शंकराचे उपासक कानफाटे असेही यांना म्हणतात अंगाला विभूती, हातात भिक्षापात्र, त्रिशूल, काखेत झोळी किक्रियावर गोपीचंद- मैनावतीचे गाणे अशा थाटात हे लोक अजूनही हिंडताना दिसतात याची परंपरा धर्मनाथापासून सांगतात. या योगी अथवा जोगी लोकांचा संप्रदाय प्रसिद्ध नाथपंथाशीही संबंधित आहे आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ (ज्ञानेश्वरी ) ही परंपरा भागवतधर्माशी निगडित अशीच आहे शिवोपासक नाथपंथाचे पुढे मजेदार रूपान्तर विठ्ठलभक्तीत होऊन ऐक्याचा एक नवा आदर्श निर्माण झालेला दिसतो या अभंगात जागल्या जगदेवाची पूजा पत्र, फल, फूल, पाणी यांनी करावी असे सांगितले आहे याचा संदर्भ भगवद्गीतेमधील 'पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ' या ओळीची आहे हे स्पष्ट आहे सरवदा-अभंग १ ४३७ एका गा ए भाई । सरवदा सांगतो कांई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसिद्ध जना । एक न मारितां दाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥ १ ॥ आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरेंच बोले तो जाय । नरकामध्ये अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणायें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ २ ॥ आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन जागें माझें १ म्हणोन । पडिलें खान तया घरी । म्हणोन न म्हणा माझें कांही । निजीं निजा सुखें ठायी यत्न होईल तईं । चोराठायीं विश्वास ॥ ३ ॥ आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधी । पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनायी निश्चिती । परपुरुपीं होय रती । सुखगती ते पावे ॥ ४ ॥ १ माझे चित्त

सार्थ तुकारामगाथा २२३ आणीक एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो । तुका म्हणे आई । येयें नांव काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सरवदा-भविष्य सांगणारा, शकुन सांगणारा, खान-चोरी, वारी-निवारण करतो. अर्थ :- बंधूंनो, ऐका हा भविष्य अथवा शकुन सांगणार काही सांगत आहे. काम व क्रोध या दोन पुत्रांची ही बुद्धीरूप आई लोकांख्याकडून फसवली जाईल. ते तिची विटंबना करतील. हे सर्वत्र प्रसिद्धच आहे. कामाला मारल्या- शिवाय कुणालाही शहाणपणा येणार नाही, बरे सुखही मिळणार नाही. १ लोकहो, आणखी काही शकुन या भविष्य ऐका, हा शकुन सांगणारा काय सांगतो ते ऐका. देहादी लौकिक दृष्टी व प्रपंचविचार यांना खरे मानतो तो नरकात जाईल. त्याची अधोगती होईल. हे मी तुम्हांला चार वेदांच्या आधाराने सांगितले आहे. तेव्हा स्त्रीपुरुषहो, देहादी प्रपंच खोटा आहे असेच म्हणत राहा, म्हणजे तुमची सर्व दुःखे निवारण होतील. २ शकुन सांगणारा आणखी असे सांगत आहे की, आणखी एक मनुष्य फसणार आहे तो हा की जो माझे चित्त जागे आहे, मी सावध आहे असे म्हणणारा. त्याच्या घरी चोरी होऊन त्याचे सर्व लुटायला जाईल म्हणून माझे माझे म्हणून सावध राहण्याचा जहरी नाहो. निजात्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र सावध राहावे. सर्वांचे चित्त चोरणाऱ्या त्या श्रीहरीच्या ठिकाणीच विश्वास प्रयत्नपूर्वक ठेवावा ३ आणखी एक शकुन या सरवद्याचा असा आहे की, देहधर्मास व विकारांनाच सर्वस्व मानून पतीची सेवा करणारी पतिव्रता नारीही मोठेच दुःख पावेल. ही जीवदशारूपी पतिव्रता स्त्री पंचकर्मेन्द्रिये, पंचज्ञानेंद्रिये, पंचमहाभूते याच्या तावडीत सापडलेली असल्याने तिच्यापासून सावध असावे. निश्चिंत राहू नये परम म्हणजे श्रेष्ठ पुरुष जो परमेश्वर त्याच्याशीच रममाण ती जर झाली तरच तिला सुख वाटेल. ४ आणखी शकुनाचा एक प्रकार असा की, कुणी दान देत असताना जो निवारण करतो तोही काही चांगला मनुष्य नव्हे. तुकाराम महाराज म्हणतात, मातांनो, त्या सर्वांची नावेच कशाला सांगायला हवीत ? मरेनात रांडेचे. ५ मुंडा-अभंग ३ ४३८ संवाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पछ्वा जावे लुट ॥ १ ॥ प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ २ ॥ उडे फुडे हुंग मचाये आगल भुलन प्यार । लड्यड खडबड काहेकां खचलावत भार ॥ ३ ॥ कहे तुका चलो' एका हम जिन्होके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मुंडा-मुसलमानी गुरूचा एक प्रकार, यारा-मित्रा, संवाल-सांभाळ, चोट-तडास, खुदाई-देवावर, कुडे-उडी मारणे अर्थ :- मित्रा, स्वर्गासारख्या वरच्या गतीचे व पशुपक्ष्यादी खालच्या गतीचे सुखदुःखाच्या भोगाचे तडाखे जो सांभाळील त्याचेच रक्षण होईल व दुसरा मात्र नागविला जाईल १ बाबा, देवावर प्रीती असू दे. देवावरच प्रीती ठेव. देवावरच प्रेम असू दे २ प्रपंचविषयींचे प्रेम, भूलून, उड्या मारून, ढुंगण हालवून तू नाचत राहून देवापुढे लीन व्हावेस. काखेत झोळी, खडावा, कृष्णाजिन यांचे लडबडते, खडबडते ओझे विनाकारण का वाहवितोस ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो, नीट ऐका, आम्ही ज्याच्याशी तुमची सोबत करून देऊ त्यालाच हात देऊन जवळ करा. ४

२२६ सार्थ तुकारामगाथा काहे भुला एक देखत आखो मार तडागो बाजार ॥ २ ॥ दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥ ३ ॥ नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके सग फिरफिर गोते खाये ॥ ४ ॥ शब्दार्थ - मलग-मुसलमान फकीर, ठकण भेल-फसविण्यास केलेला वेष, तडागो-तडाखे, लत-लाथ, असाके-आशेच्या अर्थ - बाबा, लक्ष ठेवून राहोल तोच जिंकेल हा प्रपंचाचा तमाशा दूर राहून तू पाहा पुढे हातात काठी व फास घेऊन फसविण्यासाठी वेषधारी वाटमारे बसले आहेत हे नीट ओळख तू १ या बाजारात लोभाने आप- ल्याच डोक्यावर तडाखे देत कित्येक वेषधारी बसले असताना तू त्यांना पाहात आहेस मग तू त्याना का फसवतोस ? २ दमडीचमडीसाठी जो मनुष्य भूलून जातो तो पुढे लाथा खात राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाबा, तू कुणालाही बोलावू नकोस, तूही कुठे जाऊ नकोस कारण पुन आशेच्या संगतीने तू गोता खाशील रे बाबा ४ दरवेस - अभंग १ ४४३ अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥ १ ॥ ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हाटे आधे चढे पीठ । आपे हुवा असवार ॥ २ ॥ जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्पा अंदर भेत । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - दरवेस-अस्वलाचे खेळ करून हिंडणारा फकीर अथवा भिक्षेकरी, सिरताज-मुकुट, यारी-प्रेम, मैत्री, बाघो-वाघ अर्थ - देवाने मनात आणले तर सामान्य मनुष्यही बाबा, देवाच्या डोक्यावरील मुकुट होऊन राहील, आणि गाईवासरासहित वाघाबरोबरही ते मैत्री करतील १ बाबा, त्या एका ईश्वराची मात्र आठवण ठेव कारण तोच एक कर्ता आहे तरच तुम्ही त्याच्या पाठावर आरूढ व्हाल २ बाबा, सर्व भूतांचा अंतरात्मा जो अल्ला, बेध त्याची आठवण ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य हे सर्व समजून श्कतो तोच खरा दरवेशी झाला ३ वैद्यगोळी-अभंग १ ४४४ अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलाये । अल्ला वगर नहीं कोये अल्ला करे सो हि होये ॥ १ ॥ मर्द होये वो खडा फोर नामर्दुंकु नहीं धौर । आपने दिलकु करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ २ ॥ सब रसोग्न किया मार । भजनगोली एक हि सार । इमान¹ तो सब ही सचा । थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३ ॥ जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सातो पाचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥ ४ ॥ १ इनाम