भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ५२९ गोळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती । तयासी दिले तें कवणासी नाहीं । अवघा अंतर्बाह्यीं तोचि' जाला ॥ ५ ॥ देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें धर्म नाचरावें । तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिले ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - मनावे-मानूं नये, म्हुन-म्हणून, पृथक-वेगळे, थेराकार-वंग, कंचाट-क्रोध, नाचरावें- आचरू नये अर्थ :- जर गुरूच्या वचनानी ईश्वराचे अंतर पडत असेल तर मग ते गुरूचे वचनही मान्य करू नये त्रिपाद भूमीचे दान देताना झारीच्या पाण्यात शुक्र आड आल्यावर बळी राजाने त्याचा डोळा दर्भाच्या काडीने फोडला शुक्राला आंधळेच करून टाकले १ देवाने जर मनात आणले तर मग तो काय करणार नाही ? तुम्ही उगाच वेगळे असे परिश्रम व्यर्थ का करिता ? २ आपल्या पतीची आज्ञा मोडून ऋषिपत्नी भगवंताकडे अन्न घेऊन गेल्या होत्याच ना ? त्यावेळी देयाने त्याचे सर्व काम करून त्याची लाज व त्याचा धर्म याचे रक्षण केले ३ प्रल्हाद जेव्हा श्रीहरीची भक्ती करू लागला, तेव्हा त्याच्या पित्याने, हिरण्यकशिपुने त्याला केवढा विरोध केला, पण देवाच्या प्राप्तीसाठी प्रल्हादाने आपल्या दैत्य पित्यास भारविले त्याने प्रल्हादावर परोपरीची संकटे निर्माण केली; पण ईश्वरविषयचीचा लोभ प्रल्हादाने सोडला नाही ४ गोकुळच्या गोळणी जरी देवाकडे व्यभिचाराच्या भावाने गेल्या तरी व त्या लौकिक आचारापासून भ्रष्ट झाल्या, तरी देवाने इतर कुणाला जे दिले नाही ते त्याने गोळणींना दिले कारण त्यांचा अंतर्बाह्य विषयच श्रीहरी बनून गेला होता. ५ यासाठी जरी वरवर अधर्म होत असला, पण त्यामुळे जर देव मिळत असेल तर तोही करावा परंतु देवाशी जेणेकरून अंतर पडेल, असे कुठलेही कार्य करू नये तुकाराम महाराज म्हणतात, देवास हा कळवळा हृदयामधील असतोच, म्हणून तर त्याने अजामेळासारख्या पातक्यांचाही उद्धार केला ६ विवरण :- भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गात आईबाप, बंधू, पती, पत्नी किंवा गुरू कुणीही आले तरी त्याचा त्याग करावा, व देवाशी सख्यत्व जोडावे, असा विचार अनेक ठिकाणी संतानी सांगितलेला आहे वरवर अधर्माचे वाटणारे कृत्यही करावे, पण श्रीहरीची प्राप्ती होत असेल तर ती सोडू नये या विचाराच्या पुष्टीसाठी तुकाराम बुवांनी दिलेली काही उदाहरणे आपणास माहित आहेत ऋषिपत्नीची कथा भागवतादी ग्रंथात विस्ताराने आलेली आहे एकदा श्रीकृष्ण व त्याचे मित्र रानात हिंडता हिंडता खूप दूर आले चालण्याचे परिश्रम फार झाल्यामुळे त्यांना फार भूक लागली व त्यांनी श्रीकृष्णाजवळ खायला मागितले तेव्हा बलराम व श्रीकृष्ण यांनी गोपाळांना सांगितले, 'येथून जवळच ब्राह्मणांनी आंगिरस नावाचा यज्ञ सुरु केलेला आहे त्यांच्यापाशी जाऊन अन्न घेऊन या' त्याप्रमाणे गोपाळ ऋषींच्या जवळ गेले त्यांनी श्रीकृष्ण व बलराम यांचा निरोप त्यांना सांगितला परंतु ऋषींनी व ब्राह्मणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही श्रीकृष्णास विसरून ते स्वर्गाची इच्छा मनात धरून यज्ञायागादी कर्म करण्यात गुंतले होते मग ते गोपाळ त्या ऋषींच्या पत्नींकडे गेले श्रीकृष्णाचा निरोप ऐकून ऋषिपत्नींना अतिशय हर्ष झाला त्यांचे चित्त भगवंताकडेच एकदम वेधून राहिले नाना प्रकारची अन्ने व गोडपदार्थांची ताटे घेऊन त्या श्रीकृष्णाकडे धावल्या भगवंताच्या ओढीपुढे त्यांनी कुणाचीही, आपल्या पतींचीही आज्ञा मान्य केली नाही त्यांच्या प्रीतीमुळे श्रीकृष्णासही आनंद झाला व श्रीकृष्णदर्शनामुळे ऋषिपत्नीहा सुखावल्या पुढे ब्राह्मणांनाही आपल्या कर्माचा पश्चात्ताप झाला गोकुळच्या गोळणी ईश्वराकडे कोणत्या भावनेने गेल्या? याविषयी भरपूर चर्चा आजवर झालेली आहे 'गोळणी करिती देवाशीं व्यभिचार' अशा भाषेत तुकोबांनी त्यांच्या वृत्तीने वर्णन केले असले तरी, त्या वर्णनाची वरवरची भाषाही महत्त्वाची नाही, हे ध्यानात घ्यावयास हवे व्यभिचाराच्या भावनेत जो तीव्रता व जी समर्पणाची १ हरी तु गाथा ६७

५३० सा. तु. म. गाथा वृत्ती असते तेवढीच येथे ध्यानात घेणे अगत्याचे आहे सर्व चित्त श्रीकृष्णास अर्पण करून लौकिक संसार करणे हे यातील मर्म आहे, पण हे चित्त कसे अर्पण करायचे ? तर स्वतः जवळ काहीही न ठेविता गोकुळच्या गौळणींना श्रीकृष्णाची प्रचीती त्यांच्या हृदयातच होत असे त्यांनी आपल्या पतींशीं वरवर वैर केल्याचे अथवा सदाचार सोडल्याचे दिसत असले तरी, त्यांच्या या समर्पणाची भाषा केवळ तुलनेसाठी आहे हे ध्यानात हवे वामनावताराच्या वेळी बलिराजाने सर्वस्वाचे दान तीन पावलांच्या रूपात मान्य करून शेवटी विष्णूच्या हातावर उदक सोडण्याचा प्रसंग आला तेव्हा शुक्रांने आपल्या राजाचा संकल्प सिद्धीस जाऊ नये म्हणून सूक्ष्म रूप घेतले व तो झारीच्या तोंडाशी जाऊन बसला झारीच्या तोटीमधून पाणी येईना असे पाहून बळीने दर्भाच्या काडीने डोसून शुक्राचा एक डोळा फोडला भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्वस्वाचे त्याला दान करण्याच्या आपल्या कृतीसाठी बळीने शुक्राचार्यास देखील दूर केले अशी कथा पुराणातून आहे तुकाराम महाराजांनी 'बळीनें आंधळा शुक्र केला' असा मोठा समर्पक उपयोग या अभंगात केला आहे १२०९ अरे गिळिले हो संसारे । कांहीं तरि राखा खरे । दिला करुणाकरे । मनुष्यदेह सत्संग' ॥ १ ॥ येथें न घालीं न घालीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवा ॥ २ ॥ केलें तें क्रियमाण । जाले तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उर्वरित उरले ते ॥ ३ ॥ चित्त खोटें चालीवरि । रोग भोगाचे अंतरीं । रसने अनावरी । तुका म्हणे दुग वाहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नाड- अडचण प्रतिबंध अर्थ - अहो लोकोहो, तुम्हाला या संसाराने गिळून टाकिले आहे यासाठी काही तरी सत्याची चाड ठेवा ना त्या करुणाकर भगवंताने तुम्हास हा मनुष्य देह व हा सत्संग दिलेला आहे त्याची थोडी तरी आठवण ठेवा १ येथे संचिताचा किंवा प्रारब्धाचा शब्द आड घालून, आमच्या प्रारब्धात हरिभजन नाही, असे समजून उगाच व्यर्थ आयुष्य घालवू नका हरिनामाच्या योगाने बीज वाढवून या जन्माचे सार्थक करा २ आजपर्यंत जे कर्म तुमच्याकडून घडले गेले, ते क्रियमाण, जे पूर्वी होऊन गेले, ते संचित व आता भोगण्यासाठी जे उरले आहे ते, प्रारब्ध जाणावे ३ कारण ध्यानात असू द्या की चित्त नेहमीच खोट्या चालीने चालत असते, रोग आपल्याच भोगामुळे निर्माण होत असतात जिह्वेची चटक अनिवार झाली की मग दुर्गंध वाहात राहते ४ १२१० अग्न तापलिया कायाचि होमे । तापत्रयें सतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसारस्थिति । राहाटघटिका जैसी फिरताचि राहिली । भरली जाती एके रितीं । साधीं हा प्रपंच पचाय अग्न । तेणे पावसील निजशांती रे ॥ १ ॥ नारायणनाम नारायणनाम । नित्य करीं काम जिव्हामुखें । जन्मजराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुखें ॥ २ ॥ शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ दान व्रत आचरण । यज्ञ नाना मन बुद्धी । १ सत्संग

भोगाभोग तेथें न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि । साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं ॥ ३ ॥ घोकित अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति । दूषणाचे मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खती । रिघोनि संतां शरण सर्वभावे । राहे भलतिया स्थिती ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - अन-अग्नी, काया-शरीर, पचाय आनी-पंचाग्नी, चारही बाजूस अग्निकुंडे पेटवून केलेली साधना, साडी-सोडून दे, खती-काळजी

अर्थ - अग्नी तप्त झाला की शरीर तापून निघते तापत्रयानेही तो संतप्त होत असतो सचित, क्रियमाण व प्रारब्ध याचा भोग संसाराच्या स्थितीत कधी चुकत नाही ज्याप्रमाणे रहाटगाडग्याची भडकी एकसारखी फिरतच असतात, एक मडके पाण्याने भरले जाते व दुसरे रिकामे होते, त्याचप्रमाणे या प्रपंचाची गती आहे हा प्रपंच म्हणजे पंचाग्नीच्या साधनाप्रमाणे खडतर आहे, तो तू नीट साधून आत्मशांती प्राप्त करून घे १ नेहमी काम करीत असताना नारायण, नारायण असे मुखाने म्हणत जा या योगे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, पाप, पुण्यें ही सर्व दुःखे नाश पावतील २ रानावनात जाऊन तू शीत व उष्ण याची सवय कर आसन मांडून समाधी साधण्याचा प्रयत्न कर तपश्चर्या, तीर्थयात्रा, दानधर्म, व्रताचे आचरण व यज्ञयाग, वगैरे साधनाच्या व बुद्धीच्या योगाने नाना भोगाचे प्रकार काही चुकत नाहीत तेव्हा जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग याना सहन करून, काम, क्रोध, अहंकार इत्यादी विकाराना सहन करून आपल्या स्वतःच्याच आश्रमात अविनाशी स्वरूपात तू निजसुख प्राप्त करून घे ३ वेदाची अक्षरे घोकण्यास आरंभ करशील तर विनाकारण अहंकार व विधिनिषेध यांची कटकट मात्र पाठीमागे लागेल. वादविवाद करशील तर वृथा निंदेचा दोष प्राप्त होईल म्हणूनच ही भूषणे वाटली, तरी ती दोषांचीच मूळे आहेत असे तू समज, आणि तुकाराम महाराज म्हणतात, तू या संसाराची खोटी वाटणारी वृथा चिंता सोडून दे सर्व भावाने या संताना तू शरण जावेस व मग हव्या त्या स्थितीत तू राहिलास तरी हरकत नाही ४

१२११ नव्हे गुरुदास्य संसारिया । वैराग्य तरी भेंणे वापे विषया । तैसे नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥ १ ॥ म्हणोनि गोड सर्वभावे । आंघोळी न लगे तोंड धुवावे । अर्थचाड जीवे । न लगे भ्यावे संसारा ॥ २ ॥ कर्मा तव न पुरे संसारिक । धर्म तव१ फळदायक । नाम विठ्ठलाचे एक । नाशीं दुःख भवाचे ॥ ३ ॥ न लगे साडणे मांडणे । आगमनिगमाचे देखणे । अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामें आटले ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - गुरुदास्य-गुरुच दास्यत्व, भेंणे-भयाने, सायास-प्रयत्न, आटले-समाविष्ट झाले

अर्थ - जी संसारी माणसे आहेत, त्यांना श्रीगुरुचे दास्यत्व खडतरपणे होणार नाही, आणि प्रखर वैराग्य म्हणजे विविध विषयांविषयी पराग, हेही त्यांच्याकडून होणार नाही तसे या पंढरीरायाचे नाम नव्हे याच्या प्राप्तीसाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत १ यासाठी जे सर्व दृष्टींनी गोड आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आंघोळ करणे अथवा तोंड धुणे याचीही गरज लागत नाही जे सांसारिक जीव आहेत, त्यांनी धनाची योग्य इच्छा

१ तरी

५३२ सार्थ तुकारामगाथा मनात ठेवण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही संसारास त्यांनी भिण्याची जरूरी नाही २ विक्षेप फर्ने सूर्य प्रयासान करावयाची झाली तर सासारिक कधीच पुरा पडणार नाही आणि धर्म तर फळ देणारा असल्याने तो या विठ्ठलाच्या नामाच्या रूपानेच आचरावा त्याच्या योगाने संसाराचे दु ख नाहीसे होते ३ या विठ्ठलनामाच्या साधनात काही सोडणे, काही माडणे याची खटपट करावी लागत नाही काही वेदशास्त्राचा अर्थ पाहावा लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलनामात सर्व साधनांचा समावेश झाला आहे ४ १२१२ नये इच्छू सेवा स्वेच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणे ॥ १ ॥ देहाचा निग्रही त्याचे तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ २ ॥ आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणे क्षोभें ॥ ३ ॥ तुका म्हणे साडा दंभींचे दिमाख । मोडशीचे दुख गांड फाटी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्वेच्छा-स्वत च्याच तत्रान वागणाऱ्या जगाची, फळि-सकट अर्थ - स्वतः च्याच तत्रान वागणाऱ्या जगाच्या सेवेची इच्छा कधी करू नये त्यामुळे देवाची अवज्ञा मात्र होत असते १ या देहाचा निग्रह करणारा देवच असल्यामुळे त्याचे तो सांभाळीत असतो त्यायोगे कोणतेही सकट आपल्या अगावर कधीच येत नाही २ आई आपल्या मुलाची देखभाल आपल्याच इच्छेनुसार करीत असते या थोरवीमुळे तिच्या मनाचा क्षोभ तिला कधी बाधकारी होत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, नुसते तोडवेखले दिमाख सोडून द्या साधे मोडशीचे दुखणे झाले तरी गाड फाटली जाते ४ १२१३ सत्य सत्यें देतें फळ । नाही लागतचि बळ ॥ १ ॥ ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ २ ॥ करावीच चिंता । नाहीं लागत तत्त्वता ॥ ३ ॥ तुका म्हणे भावे । शरण म्हणविता बरवे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तत्त्वता-खरे पाहता अर्थ - सत्य हे सत्याचेच फळ देणारे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी काही वेगळया शक्तीची जरूरी लागत नाही १ देवाच्या पायाचे चितन करावे व धीर धरून असावे, हाच एक धीराचा उपाय आहे २ खरे पाहता मग आपणांस कोणत्याही प्रकारची चिता करावी लागत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, मनोभावे आम्ही देवासच शरण आहोत, असे म्हणणे फारच चांगले आहे ४ १२१४ साधक जाले कळौ । गुहगुडीची¹ लाव नळी ॥ १ ॥ पचीं पडे² मद्यपान । भागभुर्की हे साधन ॥ २ ॥ अभेदाचे पाठातर । अति विषयीं पडिभर ॥ ३ ॥ चेल्याचा सुकाळ । पिंड दड भगपाळ³ ॥ ४ ॥ सेवा मानधन । बरे इच्छेने सपन्न ॥ ५ ॥ सोगाच्या नरकाडी । तुका जोडोनिया झाडी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कळौ-कलियुगात, पची-पचनी, पडिभर-प्रेमाचे वैपुल्य, भगपाळ-विपपासवन, नर- काडी-नरखाला जाणारे अर्थ - या कलियुगात खोटा परमाथ साधणारे पुश्कळ झाले आहेत परतु त्यांच्या तोंडात सतत गुह- गुडीची नळी असते १ त्याना मद्याचे पान चागलेच पचनी पडलेले असते घोटा, भांग याच्या सेवनाचीही गोडी त्याना विशेष प्रकारची असत २ अभेदाच्या तत्त्वाचे, ईश्वर व जीव यांच्या ऐक्याच्या वचनाचे त्यांचे पाठांतर असते, १ गुदगुडीची, २ पडिल, ३ भगपाळ

सार्थ तुकारामगाथा ५३३ पण त्यांची खरी प्रीती मात्र नाना प्रकारच्या विषयांवर असते ३ त्यांच्यासारख्याच शिष्यांचा सुकाळ असतो त्यांच्याभोवती. त्यांचे देह चांगले जाडजूड असून दंडही चांगले पोसलेले असून ते सर्व चांगलेच विषयासक्त असतात. ४ दुसऱ्याने केलेली सेवा, मान, धन यांच्या इच्छेने त्यांना संपन्न झाल्यासारखे वाटते. ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सोंगाडे साधक नरकासच जाणारे आहेत. त्यांची मी चांगलीच फजिती करून सोडतो. ६ विवरण :- साक्षात्कारांनतर तुकोबांचे मन शांत झाले. ईश्वरी कृपेचे तेज त्यांच्या मुखावर विलसू लागले. त्यांच्या वाणीस एका बाजूस वात्सल्याचे, करुणेचे, तृप्तेनचे झरे फुटत राहिले, तर दुसऱ्या बाजूस त्यांच्या वाणीतून प्रखर शब्दांनी समाजसुधारणेचे कार्य परकरले. ही सुधारणा दुहेरी होती. लोकांचे संसार कसे विस्कटून गेले होते, लोक अनाचाराकडे कसे वळत होते. इंद्रिय सुमुखातच कशी गोडी त्यांना अवीट वाटत होती, केवळ प्रपंच, केवळ धन- दौलत याचीच चिंता त्यांना कशी असे, याचे वर्णन बुवांनी जितक्या प्रखर व कडक शब्दात केले आहे, तितक्याच तिखट शब्दाच्या प्रहारांनी त्यांनी समकालीन भोंदू गुरूचा, ढोंगी साधकांचा, खोट्या संतांचा निषेध केला आहे. धर्माच्या नावाखाली, देवाच्या प्राप्तीसाठी, रात्रीसाधू व ढोंगी बुवांनी समाजास लुबाडण्यास व परमार्थाच्या नावे भलत्याच मार्गास नेण्याचा प्रयत्न चालविला होता. बाह्यकर्मकांड, बाह्यवेष, नवरंग्यापारा, अगारेधुपारे, जादूटोणा, चमत्कार यांनी खरा परमार्थविचार लुब्ध होण्याच्या पंथात होता. जिकडे तिकडे ढोंगी साधू व व्यसनी साधक याचा गजबझाट झालेला होता. या विकृत अशा समाजस्थितीचे चित्रण त्यांच्या कडक निषेधासहित तुकारामबुवांनी केलेले आहे, त्यांनी म्हटलेले आहे, 'ऐंसे संत झाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी' 'एकभारती तोंडात चिरमीम धरुन व्यसनाधीन झालेल्या 'संतांना' 'आदर्श कसला आला आहे ? हे सर्व सोंग असल्यामुळे तेथे पांडुरंग कधीच असणार नाही असा त्यांचा विश्वास होता. गाजराच्या पुंगीसारखे क्षणभर टिकणारे व जागोजागी दिसणारे योगी अट्‍टवारी झाले होते. 'अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान' अशी त्यांची स्थिती असे. पर द्रव्य व परनारी याची अभिलाषा मनात धरून नाक धरणारे ढोंगी साधू सर्वत्र वावरत होते त्यांचा निषेध करताना तुकोबांनी म्हटले आहे, 'जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर' 'कुणी डोक्यावर बेस वाढ- वितात, कुणी अंगात भुते आणतात, कुणी शकुन सांगून लोकांना फसवितात, कुणी जटा वाढवून 'अभिमान मोठा करिताती' नवींगाना विभूतीलेपन असले तरी त्याचे लक्ष मात्र मिष्टान्नावर असते. तुकारामबुवांनी अशा गोसा- व्याचा, नाथाचा, महानुभवाचा निषेध केलेला आहे. 'घालीनिया फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती' अशी त्यांची अवस्था होती असे हे भोंदू साधू सर्वत्र दिसत होते. 'अंगीं लावूनिया राख । डोळे झांकुनि करिती पाप' कारण त्यांनी केवळ पोटासाठीच ही सर्व बाह्य सोंगे घेतलेली होती, मुखाने ब्रह्मज्ञान बोलणाऱ्यांचे चित्त धनावरच असते. सर्व पंथिक साधकही पिंडपोषकच म्हणजे शरीरधारणेचीच काळजी करणारे होते. गांजा ओढण्यात, भांग पिण्यात, मद्यपान करण्यातही काही भक्तिसाधनेची जोड आहे, असे प्रतिपादन करण्याचेही धैर्य काही साधुसंतांना होत असे. समाजापुढे हे असे ढोंगी साधू केव्हाही निषेधार्हच असल्याने बुवांनी कडक शब्दात त्यांनी धिंड काढली आहे. १३१५ मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥ १ ॥ कोणाचा कोणासीं न¹ धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ २ ॥ काढा जी आपुलें मोह बुंथी जाळें । नका लावूं बळें वेड आम्हां ॥ ३ ॥ जीव शिव काहीं ठेवियेलें नाहीं । सत्य तुम्हां ठायें असोनियां ॥ ४ ॥ सेवेच्या अभिलापें न घराचि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥ ५ ॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥ ६ ॥ तुका म्हणे काय छायेचा अभिलाप । हंस पावे नाश तारागणीं² ॥ ७ ॥ १ न धरणे, २ तारागणी.

५३४ सार्थ तुकारामगाथा

शब्दार्थ व टीपा :- लटिके-खोटे, बुंथो-खोळ, वस्त्र अर्थ .- देवा, मी जर सर्वत्र पाहिले तर मला सारे खोटेच दिसते. तेव्हा हे सर्व मायाजाळ आहे तरी काय? ते मला दाखोव ना ? या जगात कुणाचा कुणाशी सबंध नसून जे आहे ते शुद्ध बुद्ध असे जागच्या जागीच स्वयंसिद्ध असे आहे. २ देवा, तुम्ही आमच्यावर घातलेले हे जे मायेचे वस्त्र आहे तो फाडा ना. आम्हांला उगाच त्यापाठी वेड लावू नका ३ देवा, खरे पाहता सर्वत्र एकच तत्त्व असताना तुम्ही एकास जीव व एकास शिव अशी नांवे ठेवलीत. ४ आमच्याकडून तुम्हास सेवा घ्यायची इच्छा असल्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचारच न करिता आम्हास जन्ममृत्यूच्या खेपात फिरवीत आहात ५ आता तरी आहे ही वस्तुस्थिती समजल्यावर देवा, जो काही खोटाच द्वैतभाव धरला आहे तो सोडून द्यावा ६ तुकाराम महाराज म्हणतात, तारागणाचा, आकाशातील तारकांचा देखावा प्रतिबिंबाच्या रूपाने पाण्यावर पडलेला पाहून त्या ठिकाणी मौक्तिकाचा मोह हंसाला उत्पन्न होतो व तेथे उडी घेतल्यामुळे बिचारा हंस मात्र नाश पावतो. ७ १२१६ पंचभूतांचा गोधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥ १ ॥ तेथें काय भी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा फेडीं रिझें । हे काळाचे भातुकें ॥ २ ॥ जीव न देखे मरण । घरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥ ३ ॥ इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- पचभूताचा गोधळ-पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूताच्या एकीकरणा- तून झालेला मानवी देह अर्थ :- पृथ्वी, आप, तेजादी पंचमहाभूतांचे एकत्रिकरण होऊन हा मानवी देह निर्माण झाला व हा देह म्हणजेच मी, असा अहंकार जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला १ या ठिकाणी शरीर म्हणजेच मी, त्याचे ओझे माझ्यावरच आहे अशा ममत्वाच्या भावनेने मनुष्य काळाचेच खाद्य असणारा देह कौतुकाने जपू लागतो. २ खरे पाहिले असता, जीवास मरण कधीही नसते. तो जुने वस्त्र टाकून देऊन नवीन स्वीकारतो. पूर्वजन्मीच्या शुभाशुभ कर्माच्या भोगानुसार हे सर्व घडते ३ मागच्या जन्मीच्या कर्मानुसार इच्छेचा वेल वाढीस लागतो या इच्छारूपी वेलाला न वाढविणे, त्याची वाढच खुंटविणे, हे सत्य होय तुकाराम महाराज म्हणतात, ज्यानी आपली इच्छाच याप्रमाणे नाहीशी केली, तोच गुह्य किंवा गुप्त असलेले हे ज्ञान प्राप्त करून घेण्यास समर्थ होईल. ४ विवरण :- शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असून त्यात अहंकार, इच्छा निर्माण होऊन त्याचे कोडकौतुक केले जाते व त्यात असणारा अविनाशी आत्मा मात्र दुर्लक्षित होतो, हा एक तात्त्विक विचार तुकाराम महाराजांनी या अभंगात मांडलेला आहे. अहंकार व इच्छा यांचा त्याग करून आत्मतत्त्वच ओळखल्यासच खरे रहस्य समजेल, असे त्यांनी या ठिकाणी सुचविले आहे. पंचमहाभूतात्मक मानवी देह, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, यांचे शब्द, स्पर्श, रूप गंधात्मक पाच विषय, संकल्पाविकल्पात्मक मन, व्यवसायात्मक बुद्धी, अहंकार, इच्छा सुखदुःखादी भावना इत्यादींचा एकत्र मेळ म्हणजेच हे शरीर असा विचार शास्त्रानीही केलेला आहे गीतेच्या तेराव्या अध्यायात या शरीराचे म्हणजे क्षेत्राचे सविस्तर वर्णन आलेले आहे. महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा सूक्ष्म इंद्रिये, एक मन, पंचविषय इच्छा, द्वेष, सुख, मद्यन, चेतना, धैर्य इत्यादी तत्त्वाच्या समुदायास क्षेत्र अथवा शरीर म्हटले आहे हे क्षेत्र अथवा शरीर जो जाणतो तो क्षेत्रज्ञ होय.

सार्थ तुकारामगाथा ५३५ या शरीराचा खरा मालक गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे नित्य, अविनाशी असा आत्माच असून त्याला ओळखणे, त्याचे स्वरूप जाणणे, त्याचा व मूळ स्वरूपाचा सबंध ओळखणे हे खरे ज्ञान होय. हा आत्मा कधी मारला जात नाही, नष्ट होत नाही. हा कधी जन्मत नाही, कधी मरत नाही. हा नित्य अज, शाश्वत व पुरात आहे. या शरीराचा नाश झाला तरीही याला धक्का पोचत नाही. खरे म्हणजे हा देह म्हणजे 'काळाचें भातुकें'च होय. पण या देहाच्या नाशाने 'जीव न देखे मरण' हे गीतेमधील तत्त्वच बुवा सांगत आहेत. 'घरी नवी जीर्ण सांडी' हे शब्द म्हणजे गीतेमधील 'वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि' या तत्त्वस्पर्शी ओळीचाच सुबोध मराठी अनुवाद होय. गीतेच्या तत्त्वाप्रमाणे या आत्मतत्त्वास कधी मरणच नाही. याला अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही, वायू सुकवीत नाही. हा कधीही न तुटणारा, न जळणारा, न भिजणारा, न सुकणारा असा आत्मा नित्य सर्वत्र भरलेला, स्थिर, अचल व सनातन म्हणजे चिरंतन आहे. देहान्तर झाले म्हणून काय झाले ? • जैसीं जीर्ण वस्त्रे सांडिजे । मग नूतनें आणिके घेइजे । तैंसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यायें' असे थोडक्यात वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. सुखदुःखादी इच्छांची वेल वाढत असलेल्या या शरीराचे खरे महत्त्व ओळखून, ते कमी महत्त्वाचे मानून जे शुद्ध आत्मतत्त्व आहे, त्याचाच विचार केला तरच खरे ज्ञान होईल, असा तुकारामबुवांच्या म्हणण्याचा भावार्थ. १२१७ पुसावेसें हेंचि वाटे । जें जें भेटे तयासी ॥ १ ॥ देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ २ ॥ अवघियांचा विसर जाला । हा राहिला उद्योग ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अवधियांचा-सर्व विषयाचा. अर्थ :- मला जे कुणी भेटतील त्यांना हेच एक विचारावेसे वाटते की, १ देव माझ्यावर कृपा करून माझी लज्जा रक्षण करील काय ? २ मला सर्व विषयांचा विसर पडलेला असून हाच एक चिंतनाचा उद्योग राहिलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या एकाच गोष्टीची मला चिंता वाटत आहे. या प्रश्नाचे उत्तर कुणी देईल असे मला भेटेल काय ? ४ १२१८ जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥ १ ॥ खादलें पचे तरिच तें हित । ओकलिया थीत पिंड पीडि ॥ २ ॥ तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें १ जीवनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तारों गा विठ्ठला । नेणतांचि भला दास तुझा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खुण-घात, खून, थीत-व्यर्थ, खाने-दरोडा. अर्थ :- देवा, हा जाणतेपणाचा अभिमान माझाच घात करीत असल्यामुळे तुम्ही तो जाळून टाका. १ जे खाल्लेले आहे, ते नीट पचले तर ठीक आहे. पण तेच जर न पचल्यामुळे ओकले गेले तर मग शरीराला व्यर्थच पीडा आहे. २ जे धन मिळविले त्याचा प्रपंचास नीट उपयोग झाला तरच ठीक आहे, पण ते जर दरोड्यात नष्ट होईल तर त्याचा जीवनात काहीच उपयोग न होता उलटा घात मात्र होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तूच आता मला या संकटांतून तार. मी नेणता असून तुझाच दास आहे. ४ १२१९ याती मतिहीन रूपें लीन दीन । आणिक अवगुण जाणोनियां ॥ १ ॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ २ ॥ जें कांहीं करितों तें माझें स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥ ३ ॥ १ खाण.

५३६ सार्थ तुकारामगाथा जाले सुख जीवा आनंद अपार । परमात्मवे भार घेतला माझा ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी नावाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी वळें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - याती-जाती, मतिहीन-बुद्धीहीन, अगीकार-स्वीकार प्रचित-अनुभव अर्थ - मी यातीहीन म्हणजे हलक्या जातीचा असून बुद्धीनेही मद आहे माझे रूपही मोठे चांगले नसून मी अतिशय दीन असा आहे आणखीही माझ्यात काही अवगुण आहेत हे मी चांगलेच जाणून आहे १ असे असूनही माझा स्वीकार त्या पांडुरंगाने केलेला आहे याची मला चांगलीच जाणीवही आहे २ हा ईश्वर ज काही करतो ते माझेंच हित आहे, हा अनुभव माझ्या चित्तास पूर्णपणे झालेला आहे ३ या माझ्या जीवाला अपार असा सुखानंद झाला असून या परमात्मस्वरूपी विठ्ठलान माझा सर्व भार आपल्या स्वतःच्या शिरावर घेतलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, या देवाला स्वतःच्या नावाचा मोठाच अभिमान असल्यामुळे शरण आलेल्या भक्तांना तो तारतो ५ १२२० बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी वेशीराजा मायबापा ॥ १ ॥ तुझ्या पायी मज जालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ॥ २ ॥ ऋषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥ ३ ॥ नाहीं नास ते सुख दिले तयास । जाले जे उदास सर्वभावे ॥ ४ ॥ तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेसी पाय तुझे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काजा-कार्यासाठी आस-इच्छा मोकलिली-मोडून दिली नास-नाश अर्थ - देवा, वेशीराजा, मायबापा, भक्ताच्या कार्यासाठी तू फारच उतावीळ झालेला दिसतोस ाहभो १ माझा सर्व विश्वास देवा तुझ्याच पायाशी असल्याने मी इतर ठिकाणची सर्व आशा आता सोडून दिलेली आहे २ ऋषी, मुनी, साधक सिद्ध याना अपार असलेल्या तुझ्या रूपाचा विचार थोडासा का होईना समजलेला आहे ३ म्हणूनच ज्याचा कधीही नाश नाही, असे सुख जे सर्वस्वावर उदास झाले त्यांनाच तू दिलेस ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सुख माझ्याही मनात मावेनासे झाले आहे मी तुझे पाय माझ्या जीवापाशी जपून धरले आहेत ५ १२२१ मायामोहजाळीं होतो सापडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥ १ ॥ काढुनि बाहेर ठेविलो निराळा । कवतुक डोळा दाखविले ॥ २ ॥ नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥ ३ ॥ रडे फुडे दुखें कुटितील माथा । एकासी रडता ते ही मरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज वाटते नवल । मी माझे हे बोल ऐकोनिया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरा सत्य अर्थ - मी प्रपंचाच्या व देहादी वृत्तींच्या मायामोहाच्या जाळयात सापडलो होतो पण या पांडुरंगास माझी दया आली व मी त्यातून सुखरूपपणे बचावलो १ त्याने मला त्यातून बाहेर काढले व कृपेचे कौतुक माझ्या डोळयांना त्यानेच दाखविले २ नाही तर ही माया कशी असते ? तिच्या मोहाने सर्वजणांचे देहभान विसरते ती सर्वांना नाचायला लावते व नाशवंत असणारी ही इंद्रियसुखे खरीच आहेत, असा भास निर्माण करते ३ त्यामुळे सर्व जीवांना रडावे लागते इंद्रियसुखासाठी डोकेफोड करावी लागते आणि एकासाठी रडणारा दुसरा जीव असतो तोहो एके दिवशी मरून जातो ४ असे असताना तुकाराम महाराज म्हणतात, मी, माझे शरीर, माझा प्रपंच इत्यादी मिथ्या अभिमानाचे बोल ऐकून मला फारच नवल वाटते ५ १२२२ देहभाव आम्ही राहिलो ठेवूनि । निवात चरणीं विठोबाच्या ॥ १ ॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा ५३७ म्हणउनि नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥ ३ ॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- उपाय-उपाय, अंकित-स्वाधीन. अर्थ :- आम्ही आपला सर्व देहभाव निवान्तपणे त्या विठ्ठलाच्या चरणी वाहून मी आता स्वस्थ झालेलो आहे. १ आमचे हित जेणेकरून होईल, असे सर्व काही उपाय तो करीत असतो. २ म्हणून मला आता हे मी कानांनी ऐकले असल्यामुळे कसलेच सुखदुःख वाटत नाही. ३ मी आपला सर्व भार आता देवावर घालून, निःसंग होऊन एकटाच राहिलेला आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या विठ्ठलाचा अंकित झालो आहे, स्वाधीन बनलो आहे, तो आता माझे जे जे हित असेल ते करील. ५ १२२३ आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरि तें जतन होय देठीं ॥ १ ॥ नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवतां ॥ २ ॥ चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हानि लाभ ॥ ४ ॥ अर्थ:- ठाया-ठिकाणास, आघात-संकटे अर्थ :- झाडाला आलेले फळ पिकेपर्यंत टिकून राहील हे खरे, पण केव्हा ? ते जर देठास जपून राहिले तर. १ त्याचप्रमाणे आपण ईश्वराच्या नामाशीच एकनिष्ठ राहिलो तर आपला हेतू सिद्ध होईल, पण हे अनुसरणे दुसरे काही मनात ठेवण्याची व्यभिचाराची बुद्धी नसेल तर. २ ज्या मार्गाने ज्या ठिकाणास आपण निघालो आहोत, ते स्थान मध्येच काही संकट आड आले नाही तर आपण गाठू शकू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण मध्येच जर काही संकटे निर्माण झाली तर मात्र होणाऱ्या लाभाची हानी घडते ४ १२२४ निरोधाचें मज न साहे वचन । यहु होतें मन कासावीस ॥ १ ॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ २ ॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे' उबग आला यांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळे । आशामोहजाळें दुःख वाढे' ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निरोधाचे-निषेधाचे, विरोधाचे अर्थ :- या भक्तीच्या किंवा परमार्थाच्या निषेधाचे अथवा विरोधाचे जर एखादे वचन असेल तर ते काही मला सहन होत नाही. त्यामुळे माझे मन फारच कासावीस होते १ यासाठीच माझ्या जीवास कुणाचीही संगत आता सहन होत नाही. एकान्तात बसण्यातच मला फार गोडी वाटते. २ देहबुद्धीची भावना व निरनिराळ्या वासनांची संगत या गोष्टी काही आता मला आवडत नाहीत. त्यांचा मला भारी उबग आला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आशा व मोह यांच्या जाळ्यात मी सापडल्यामुळे दुःख मात्र वाढते व त्यामुळे देवाशी मात्र अंतर पडते. ४ १२२५ तुजशीं संबंधचि खोटा । परता परता रे³ खोंटा ॥ १ ॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ २ ॥ जेथें मुद्दल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥ ४ ॥ १ न साहे उबग, २ दाटे, ३ रे तू खोटा. तु. गाथा... ६८

शब्दार्थ व टीपा - परता-दूर ठकावें-फसावे, लेखिता-करीत असताना अर्थ - देवा, तू सरोसरीच फारच खोटा दिसतोस तुझा सवंगच खोटा आहे असे वाटते तू आमच्या पासून दूर होतास तेच बरे होते १ देवा तुझ्या भेटीत मी तुझ्यापासून काय घ्यावे रे ? काही घेता येत नाही उलट आम्ही फसले मात्र जातो २ या तुझ्या व माझ्या व्यवहारात मुद्दल काहीच हाताशी आलेले नाही, उलट घ्यायचा मात्र हिशेब करिता करिता मान भरण्याचा प्रसंग येत आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी भक्तजनाना फसविण्याची तुझी रीत फारच प्रसिद्ध आहे ४ १२२६ याचि हाका तुझे द्वारीं । सदा देखो ऋणकरी ॥ १ ॥ सदा करिती खड दड । देवा बहुगा तू लड ॥ २ ॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनिया आपणा ॥ ३ ॥ एके एक बुझविसी । तुका म्हणे ठक होसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लड-दांडगा, ठक अर्थ - देवा, तू आपल्या भक्ताना, सेवकाना फसवितोस, अशीच ओरड नेहमी तुझ्या दाराशी असते १ तू नेहमी कुणाला तरी दड करीत असतोस, कुणाशी तर खडाचे व्यवहार करीत असतोस असा तू मोठा बलदंड ठक दिसतोस २ आपल्या भक्ताना त्याचा हेतू जाणून कुठल्या तरी फळाच्या आशेचे वा तिच्या तृप्तीचे भोजन देतोस व आपण मात्र स्वतः लपून राहतोस ३ त्याना ज हवे ते न देता देवा, तू त्याची कशी तरी समजूत काढतोस असा तू चांगलाच फसविणारा ठक आहेस, असे तुकाराम महाराज म्हणतात ४ १२२७ आम्ही जाणो तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥ १ ॥ फांकू नेदू चुकायिता । नेघो थोडे बहु देता ॥ २ ॥ बहुता दिसांचे लिगाड । आले होत होत जड ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । नेघो सर्वस्व ही देता ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा ५३९ मान्य करून एकदा सर्व चुकते करा ना. म्हणजे लोकांत होणारी फजिती तरी वाचेल तुमची. ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मला काही तूट सहन करण्याचा प्रसंग येऊ नये असे तू करावेंस. ४ १२२९ नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥ १ ॥ जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ २ ॥ नाहीं केला पोट । पुढे घालूनि बोभाट ॥ ३ ॥ तुका म्हणे धरूनि हात । नाही नेलें दिवाणांत ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पोट-पोट भरण्याचा धंदा. अर्थ :- देवा, विठ्ठला, कोणताही मानसन्मान मी तुमच्याजवळ कधी मागितलेला नाही. १ असे असूनही माझी तुम्ही या सर्व लोकांत एवढी फजिती का आरंभिली आहे? २ मी पोट भरण्यासाठी काही धंदा म्हणून हा मार्ग पत्करल्याचा बोभाटा केलेला नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, किंवा देवा, मी कधी तुम्हांला तुमचा हात धरून कधी भांडणासाठी दिवाणातही नेलेले नाही. ४ १२३० तूं पांढरा स्फटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥ १ ॥ म्हणोनि तुझ्या दारा । न येत ठकतो दातारा ॥ २ ॥ तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लोक १ ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हेचि दाखविसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आणिकां-दुसऱ्यास, नांदणूक-वागणूक, रीत. अर्थ :- देवा, तू खरे म्हणजे पांढऱ्या स्वच्छ स्फटिक मण्याप्रमाणे आहेस व तू जे कुणी दुसरे तुझ्याकडे येतात त्यांनाही तसेच बनवून टाकतोस. १ म्हणून देवा, तुझ्या दारांत कुणीही येत नाही कारण येथे लोक फसले जातात. २ तू सर्व लोकांना बुडविले आहेस, हे आम्हास चांगलेच माहीत आहे ही तुझी रीत सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू कसा आहेस ? तर ज्याचे सेवारूपी कर्ज तू घेतोस, त्यालाच फसविण्याची रीत तू चांगलीच दाखवितोस. ४ १२३१ बोलतों निकुरें । नव्होत सलगीचीं उत्तरें ॥ १ ॥ माझें संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ २ ॥ अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥ ३ ॥ तुज भक्तांची आण देवा । जरि २ तुका येथें ठेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निकुरें-निकराला येऊन. अर्थ :- देवा, मी फार निकराला येऊन, एकेरीवर येऊन बोलत आहे, हे ध्यानात ठेवा. हे काही प्रेमाच्या सलगीचे बोलणे नाही १ माझे मन आता संतापून गेले असून तुझ्या सेवकांना तू जी पीडा दिली आहेस, ती मला आता ऐकवतही नाही. २ जोपर्यंत केवळ माझ्यावरच घाताचे ओझे होते, तोपर्यंत ते सहन केले; पण आता सर्वांचीच पीडा पाहून मी दुःखी झालो आहे. ३ देवा, या तुकारामास तू जर आहे तिथेच ठेवशील, तर तुला तुझ्या भक्तांची शपथ आहे. ४ विवरण - तुकाराम महाराज देवाशी कधी कधी विशेष सलगी दाखवून, काही मुद्दे काढून, प्रेमाचे भांडण करितात. वरील महत्त्वाच्या अभंगांतून तुकारामबुवांनी भांडणाचा असाच एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. देव हा आप- ल्याच सेवकांना ठकविणारा, फसविणारा आहे, तो त्यांच्याकडून सेवेचे भांडवल घेतो, पण त्याच्यावर कृपा मात्र करीत नाही देव अशा प्रकारे सर्वांनाच त्रास देतो, मुद्दलही बुडवितो व व्याज देण्यासही हा खळखळ करितो, असे तुकोबांनी १ लौकिक, २ तरी.

५४० सार्थ तुकारामगाथा आपल्या नेहमीच्या व्यापारी भाषेत तक्रार केली आहे देवाने आपली ही वचने निकराची आहेत, मल्लगीची नाहीत असेच मानावे, म्हणूनही त्यांनी त्यास सूचना दिलेली आहे आपला संताप झाला आहे असे त्या एका अभंगात म्हणत आहेत अर्थात हे सर्व भांडण प्रेमाच्या पोटीच असते कधी आपण देवास फारच दुरुत्तरे केली, असे वाटून तुकोबांना पश्चात्तापाचीही भावना निर्माण होत मग ते म्हणतात, 'नये ऐसे बोलो कठिण उत्तरें । सलगी लेकरूं केलों पुढें' आपला हाही अपराध देवाने क्षमा करावा, अशीही प्रार्थना ते करितात मग तुकोबा भांडतात तरी का ? ईश्वरास एवढ्या कठोरतेने का बोलतात ? देवाची अशी फजीती करायला का प्रवृत्त होतात ? या प्रश्नाचे उत्तर असे की, ज्याच्यावर आपला फार मोठा विश्वास त्याच्यावर रागावण्यात रुसण्यात गोडी असते 'प्रीतीवीण रुसो नये' असे समर्थ रामदासानी म्हटल आहे याच प्रीतीच्या अतिरेकामुळे तुकारामासारखे भक्त कधी कधी देवावर रागावतात, त्याच्यावर रुसतात, कडक शब्दांनी भांडण मांडतात पण या सर्व कठिण शब्दांच्या मागे देवाविषयी अगाध प्रेम असत नाहीतर मग या संतानी कुणावर रागावावे ? कुणावर रुसावे ? कुणावर सत्ता करावी ? 'कवणाशीं भांडो कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण' या देवाशिवाय आपला राग तरी कोण सहन करणार आहे ? आपण कळ- वळवळाने व पाटतिडकीने का बोलतो, यासंबंधी तुकोबानी एका अभंगात म्हटले आहे, 'तुका म्हणें एके गांवचीं वसती । म्हणऊनि छती वाटे देवा' देव व आपण एकाच गावचे असून एवढा भेद व्हावा याचेच नवल तुकोबांना वाटते

१२३२ बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठविता चित्तीं काय नव्हे ॥ १ ॥ आणिका उपाया कोण वाटी मन । सुखाचे निधान पाडुरंग ॥ २ ॥ गीत गावों नाचो छंदें वावो टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥ ३ ॥ अनंत ब्रह्मांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावे उभा ॥ ४ ॥ लटिका हा केला सवसारसिंधु । मोक्ष खरा बघू नाहीं पुढें ॥ ५ ॥ तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलो निश्चिंत¹ त्याच्या बळें ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - जनिता-जन्म देणारा, निधान-साठा, रोमावळी-केसांची रांग अर्थ - बुद्धीला जन्म देणारा खरे म्हणजे लक्ष्मीपती श्रीविष्णूच आहे त्याचा आठव एकदा झाल्यावर मग काय साध्य होणार नाही ? १ सर्व सुखाचा ठेवा असा हा पांडुरंग जो आहे, त्यास सोडून आणखी दुसऱ्या दैवताकडे आपले मन कोण धाडून देणार ? २ वैष्णवाच्या मेळाव्यात मोठ्या आनंदाने गाऊ नाचू व सुरात टाळघा वाजवू ३ ज्याच्या एका केसावर अनंत ब्रह्मांडें आहेत, अशा या श्रीहरीस आम्ही आमच्या भोळ्या भावाने विटेवर उभे केले आहे ४ आम्ही आता याच्या कृपेने संसारसागर खोटाच ठरविला असून बद्धता व मोक्ष याही अवस्था आम्ही मानणार नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या नामाने अंकित झालो आहोत, त्याच्याच बळावर आम्ही निश्चित होऊन राहिलो आहोत ६

१२३३ न लगे मायेसी बाळें निरदावे । आपुल्या स्वभावे ओढे त्यासी ॥ १ ॥ मज का लागला करणे विचार । ज्याचा जार भार त्याचे माथी ॥ २ ॥ गोड धड त्यासी ठेवी न मागता । समाधान खाता नेदी मना ॥ ३ ॥ खेळता गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनी लावी बळें ॥ ४ ॥ त्याच्या दुखेंपणे आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसे ॥ ५ ॥ तुका म्हणें देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागो नेदी ॥ ६ ॥

१ निश्चित

[Page Header] सार्थ तुकारामगाथा ५४१ [End Page Header]

शब्दार्थ व टीपा - नलगे-लागत नाही, मिरवावे-रक्षणासाठी सांगावे, भारभार-गर्भाचा भार, उमगूनी- समजावून, खापरी-खापरातील लाहीप्रमाणे कष्टी, दुःखी अर्थ - आपल्या मुलाचे रक्षण आईने करावे अशी सूचना बाळानेंच करावी लागत नाही, ती आपल्या स्वभावानेच त्याच्याकडे ओढली जात असते, किंवा त्यास आपल्याकडे ओढीत असते १ या गोष्टीचा मग मीच आता कशास विचार करावा ? ज्याने मला गर्भात धारण केले, तोच आता माझा भार सहन करील हे खरेच २ जे गोड पदार्थ घरात आई तयार करून ठेविते, ते सर्व मुलाने मागावच्या आतच ती त्यासाठी जपून, राखून ठेवीत असते, त्याला सोडून ते पदार्थ खाण्याचे तिला समाधान मुळीच मिळत नाही ३ अशा वेळी जर बालक एखाद्या वेळेस खेळायला गुंतले असेल तर आई त्याचा शोध करते व त्यास घरी आणून बळेच स्तनाशी पिण्यास घेते ४ या बालकाच्याच दुःखाने ती सतत दुःखकष्टी होत असते खापरात तडफडणाऱ्या लाहीप्रमाणे तिचे चित्त तडफडून जाते ५ तुकाराम महाराज म्हणतात, या मुलाच्या मोहात आई आपला देह देखील विसरून जाते मुलाला कोण- त्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ती एकसारखी जपत असते ६ विवरण - तुकारामबुवांनी विठोबा माऊलीला उद्देशून जे वात्सल्याचे फार चांगले व थोर अनुभूतीचे अभंग लिहिले आहेत, त्यात वरील अभंग महत्त्वाचा आहे आईचे नात हे सर्वात जवळचे असते तिच्यापाशी मुलास मोकळेपणाने बोलता येतो, हट्ट करता येतो, प्रसंगी तिच्यावर रागावताही येते व पुत्राचे कितीही अपराध झाले तरी ती त्यास कधी दुखवत नाही, रागावली तरी पुन चटकरन जवळ घेत असे हे आईचे भाबडे हृदय प्रेमाने व मुलाच्या हिताने काठाकाठ भरलेले असते सर्व विश्वाची अनत युगाची ही विठ्ठलमाउली तर किती कनवाळू व हृदयाची कोमल ? तिला मनातील सर्व शकाकुशका सागाव्याव आईच आपल्या मुलास कशी सांभाळते, याचे फार चांगले व रमाळ चित्रण तुकारामबुवानी या अभगात केले आहे आई आपल्या स्वभावधर्मानुसार आपल्या मुलाची काळजी घेत असते त्याला ती गोड पदार्थ मुद्दाम राखून ठेवित तो खेळायला गेला तर ती त्याला शोधून आणते, त्याला दूध पाजत व मग बाळ तृप्त झाल्यावर ती तृप्त होते त्याच्या दुःखाने ती संतावन, सुखाने सुखावते असे हे आईच्या प्रेमाचे निर्व्याज मनोहर रूप तुकारामबुवानी या एका चागल्या अभंगात उभे केले आहे, या विठ्ठल माउलीचे अस वत्सल वर्णन अनेक अभंगातून आलेले आहे ' उत्तम तें बाळासाठीं। राखी ओढो आपुल्या,' ' लेकराचे हित । वाहे माउलीचें चित्त, ' ' व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा,' ' मातेचिया चित्तीं। अवघी वाळयाची व्याप्ति' अशा भाषेत त्यानी मातचा महिमा वर्णन केला आहे ज्याने जन्म दिला, त्यानच आपली काळजी वहावी, असा एक नाटिफ्रमही यथे आहे ' लेकराचा भार मातेचिया शिरीं । निडळ ते दूरी धरीलिया', ' पोटा आले बाळ । त्याचे जाणावे सकळ', ' मायो नेणे परी माय जाणे धर्म । बाळा नेदी श्रम पावो काही ' ' बाळा न मागता भोजन । माता घाली पाचारून, ' ' खेळता विसरे भूकताम घर । धरुनिया धर आणी बाळें,' 'तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूखतान ' अशा बोळीतून त्यानी मातेचा गौरव तर केला आहच, पण देवासी तिचा संबंध जोडून एक अति रमणीय असे नातेही निर्माण करून अधिकच जवळीक त्यांनी साधिली आहे वात्सल्यभक्तीचा सहज सुदर आविष्कार त्याच्या अभंगातून होत असतो

१२३४ ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥ १ ॥ ज्यासी नायडे हरिनामकतिंन¹ । आणीक नृत्य न वैष्णवाचे ॥ २ ॥ सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे येयें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें फुष्ठ होय ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - श्रुतिमधों-वेदादी शास्त्रात, भानतारिखें-वेगळेच अर्थ - तुम्हाल वेदादी शास्त्रांत चौकशी करू पाहा अशा बुद्धीचा काही ब्राह्मण होऊ शकत नाही १ कसा बुद्धीचा ? तर ज्याला श्रीहरीचे नामसंकीर्तन आवडत नाही, व ज्याला विष्णुभक्तांचे कीर्तननृत्य आवडत नाही.


१ नाम संकीतंग

५४२ सार्थ तुकारामगाथा यांवर ज्याचे प्रेम नाही, असा ब्राह्मण जन्माचा ब्राह्मण असला तरी तो तसा नसतो २ जन्माने ब्राह्मण तो जरी असला तरी त्याच्याविषयी असेच म्हणावे लागेल की, यावेळी त्याच्या आईचा अंत्यजाशीच व्यवहार घडलेला असावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या विचाराखेरीज आणखी कांही वेगळेच कुणी मानेल तर त्याच्या मुखात त्वरित कोडाचा रोग होईल असे निश्चित समजावे ४ १२३५ ब्राह्मण तो याती अंत्यज असता । मानावा सत्यता निश्चयेंशीं ॥ १ ॥ रामकृष्णनामें उच्चारी सरळें । आठवों सावळें रूप मनीं ॥ २ ॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे गेल्या पडऊर्मी अंगे । सांडूनिया मग ब्रह्मचि तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - याती-जात, पडऊर्मी-कामक्रोधादी सहा उर्मी अर्थ - आणि तो जरी जन्माने अंत्यज असला तरी त्यास निश्चयाने व तात्त्विक दृष्टीनेही ब्राह्मण जाती- चेच मानावे १ कुणास ? तर ज्याच्या मुखातून रामकृष्ण या नामाचा सरळ सरळ उच्चार होत आहे, ज्याच्या मनात त्या सावळ्या विठ्ठलाच्याच रूपाचा एकसारखा आठव आहे २ शांती, क्षमा, दया इत्यादी दैवी गुणांचे अलंकार अंगावर शोभत आहेत, व जो कोणत्याही प्रसंगी धैर्यवान आहे, तो ब्राह्मणच समजावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्यातून कामादी सहा उर्मी नष्ट झाल्या आहेत, तो स्वत च ब्रह्म बनला आहे, असे समजावे तोच खरा ब्राह्मण ४ विवरण - या दोन अतिशय महत्त्वाच्या अभंगात एक बंडखोर विचार तुकारामबुवांनी निर्भीडपणे मांडी त्ला आहे त्यांच्या भक्तीमार्गात जातिभेदाची बंधने शिथिल होत असल्याचं आपण पाहिलेच आहे हीनजातीचे, चांडालादी लोक अथवा दुराचारीही भक्तीच्या क्षेत्रात एकदा मनापासून पदार्पण केले व पश्चात्तापाची दृढभावना निर्माण झाली की श्रेष्ठ पदवीस पोचू शकतात या संबंधीचे अनेक दाखले पुराणातूनही आहेत पण वरील दोन अभंगात बुवांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून जन्मजात अशा ब्राह्मणत्वाचा अथवा अंत्यजत्वाचा अधिकार होता, त्यासच धक्का दिलेला आहे ब्राह्मण हा जन्मावरून न ठरता, कर्मावरून गुणावरून त्याच्या आचारावरून समजावा हा नवा विचार रूढ होऊ पाहत होता ज्याला हरिकीर्तनात रुची नाही व जो वैष्णवांच्या संगतीत रमत नाही तो, कसला ब्राह्मण ? उलट एखाद्यास जन्म जरी अंत्यज यातीत आला असेल, पण त्यास श्रीहरीच्या प्रेमाची गोडी असेल रामकृष्णहरि या नामात जर तो तल्लीन होऊन तो जर रमत असेल, तर मग त्यासच ब्राह्मण म्हणावे असे बुवांनी स्पष्टपणे सांगितले आहे ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, हीच व्याख्या त्यांनी ब्राह्मणाची केलेली आहे कारण या श्रीहरीचे वर्म केवळ नामसंकीर्तनातच सापडते अशीही खात्री तुकारामबुवांची होती 'ब्राह्मणा न कळे आपुले तें वर्म । गवसे, परब्रह्म नामें एका' असे त्यांनीच म्हटले आहे ब्राह्मणासंबंधी एवढ कडक लिहिण्याचे कारण असे की सर्व वर्णाचे गुरु म्हणून ब्राह्मणांना मान होता वेदांचे अध्ययन अध्यापन ही त्यांची मुख्य कामगिरी, पण मध्ययुगीन काळानंतर ब्राह्मणधर्माचाही हास होता की काय अशी परिस्थिती निर्माण झाली व आपले उच्च आचारविचार सोडून नुसत्या कर्मकांडात रमू लागले त्यांना धनांचा, सत्तेचा लोभ सुटला त्यांचा आचारधर्म लुप्त झाले यासंबंधी हवी तेवढी वर्णने एकनाथ, तुकाराम रामदास या संताच्या वाङ्मयातून मिळतील केवळ जन्म ब्राह्मण जातीत झाला म्हणून श्रेष्ठता प्राप्त व्हावी अशी समाजाची अवस्था असल्यामुळे तीव्र असंतोष मात्र पसरला निर्बुद्ध व दुराचारी ब्राह्मणास कोण वंदन करणार ? व ईश्वरप्रेमी आणि सदाचारी अंत्यजास का दूर ठेवावे ? असे प्रश्न निर्माण होऊन जो एक नवा विचार रूढ होऊ पाहात होता त्याचे निदर्शन करणारे हे तुकोबांचे अभंग आहेत, ब्राह्मण कुणास म्हणावे ? असाच मूलभूत प्रश्न निर्माण झाला मराठी संतांनी या प्रश्नाची जी उत्तरे दिली आहेत त्याच सार बहिणाबाईने, 'ब्राह्मण तो एक सांगन इत्यथ । जेणें हा वेदार्थ साठविला,' 'ब्रह्मभाव देहीं सदासर्वकाळ । ब्राह्मण केवळ तोचि एक', 'ब्रह्म जाणे तोचि बोलिजे ब्राह्मण इतकेच

सार्थ तुकारामगाथा ५४३ बोलून बहिणाबाई थांबत नाही, तर ती स्पष्ट म्हणते, 'बहिणी म्हणे ब्रह्मीं नांदे तो ब्राह्मण । यातीशीं प्रमाण नसे तेथें' साधुसंतांनी हा जो निवाडा केला आहे, त्यास केवळ समकालीन परिस्थिती व ब्राह्मणाची अधोगती एवढीच पार्श्वभूमी नाही. या विचारास एक तात्त्विक बैठक असल्याचे आपण पाहिले आहे. एकाच ब्रह्मतत्त्वापासून जर हे चराचर विश्व व्यक्त झाले असेल, तर हा ब्राह्मण, हा अंत्यज हे ठरले कसे ? या प्रश्नाचे उत्तर वाटते तितके सोपे नाही. चोखोबांनी यार्ची तात्त्विक मीमांसा श्रेष्ठ प्रकारची केलेली आहे. समकालीन ब्राह्मणाची परिस्थिती, नखोन जाणीव व तत्त्वाची बैठक याचा सुंदर मिलाफ ज्यात आहे, असा एक एकनाथाचा अभंग येथे देणे अस्यानी होणार नाही. एका ब्राह्मणाचा व महाराचा एक खटकेबाज संवाद एकनाथांनी देऊन शेवटी निर्णयही दिलेला आहे तो संवाद असा- 'कां रे महारा ! बदमस्ता ?' 'का हो ब्राह्मणबाबा भलतेंच बोलतां !' 'तुझे बापाचे भय काय ?' 'मायबाप तुमचे आमचे एकच हाय !' 'ऐक ऐसे बोलू नको' 'निर्गुणापासून अवघे झालों' 'निर्गुण तुला काय ठावें' 'आत्मरूपीं शोधून पाहावें' 'आत्मस्वरूप आम्हां कळेना' 'नाहीं तरी संतांशीं शरण जाना १२३६ एक करिती गुरु गुरु । भोवता भारु शिष्यांचा ॥ १ ॥ पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ २ ॥ परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥ ३ ॥ तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भारु-समुदाय, पुंस-शेपूट, पेंडखान-पेंडीचे खाणे, निर्भर-निःकाळजी. अर्थ :- कित्येक आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय गोळा करून स्वतः गुरु गुरु म्हणवून घेऊन धन्य होतात. १ पण त्यांना मनुष्य म्हणावे काय? ती माणसे असली तरी शेपूट नसलेली अशी चार पायांची कुत्रीच आहेत, असे समजावे. २ परस्त्रीगमन व मद्यपान हेच जनावराचे पेंडीचे खाणे त्यांनी पसंत केलेले असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अधोगतीला जाण्याविषयी यांचे चित्त निष्काळजी असते. ते हटकून अधोगतीला जातातच. ४ १२३७ एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥ १ ॥ पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ २ ॥ कांहीं दुसरा विचार । न लगे करावाचि फार ॥ ३ ॥ असत्य जे वाणी । तेथें पापाचीच खाणी ॥ ४ ॥ सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥ ५ ॥ तुका म्हणे दोन्ही । जवळीच लाभहानी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाभहानी-फायदा व तोटा. अर्थ :- एखाद्या पुरुषास दोन बायका आहेत, असे जर असेल तर, त्याच्या घरात पापाचे स्थान आहे, असे मानावे. १ पापाचा शोध ज्याला घ्यावयाचा असेल, त्यास दुसरीकडे मग जाणे नको. त्याच्याच घरी जावे व पापाचे दर्शन घ्यावे. २ याविषयी दुसरा काही विचारच करण्याची जरूरी नाही. ३ जो नेहमीच खोटे बोलतो, त्याची वाणीही पाप निर्माण करणारी खाणच आहे असे समजावे. ४ जो तोंडाने नेहमी सत्य बोलतो, त्याच्या

ठिकाणी सुख नेहमीच उचंबळून येते ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकाराने पापाजवळ तोटा व पुष्या जवळ, सत्याजवळ फायदा अगदी शेजारी शेजारी अशाच या गोष्टी आहेत ६ १२३८ जळते संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥ १ ॥ माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळा मनीं ध्याय ॥ २ ॥ नेदी कर्म घडो । कोठें आडराणे पडो ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । राहो नेदी ताप जाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धर्मनीत-धर्माची नीती अर्थ - आपले सर्व संचित कर्म जळून जाते अशी या धर्माची नीती आहे १ यासाठीच माझ्या या विठोबाच्या पायाचे चिंतन सतत करीत असावे २ त्यामुळे तुमच्या हातून कधी पापकर्म घडणार नाही, की आडरानातून सापडण्याचाही प्रसंग येणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हे विठ्ठलाचे नाम व त्याचे चिंतन याच्यामुळे तापाचा जाळ व पापाचा मळ राहूच शकत नाही ४ १२३९ संतापाशीं बहु असावे मर्यादा । फलकटाचा धदा उर फोडी ॥ १ ॥ बासर तो भुके गाढवाचे परी । उडे पाठीवरि दड तेणे ॥ २ ॥ समय नेणे ते येडें चाहाटळ । अवगुणाचा ओगळ मान पावे ॥ ३ ॥ तुका म्हणे काय वाया चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फलकटाचा धदा-हलकटपणाचा उद्योग उरफोडी-घात करील बासर-स्वैर, स्वच्छंदी अर्थ - संताच्याजवळ जाताना नेहमी मर्यादेत वागावे, उगाच हलकटपणाचा उद्योग केला तर, त्यापासून घात होण्याचा संभव फार असतो १ स्वैरपणाने बोलणारे आहेत त्यांचे बोलणे म्हणजे गाढवाच्या ओरडण्याप्रमाणेच आहे याचे फळ म्हणजे शेवटी पाठीवर दंडाचे वळच उठलेले दिसतील २ ज्यास प्रसंग समजत नाही तो चावटच समजला पाहिजे तो येडाच असतो त्यास ओंगळ अशा अवगुणाची पदवी मात्र प्राप्त होते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे त्याचे वागणे उगाच आहे हगवण लागलेल्या पोराची पिटपिटवाणी घाण असते तसेच त्याचे वागणे ओंगळ आहे ४ १२४० घेसी तरी घेई संताची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥ १ ॥ सर्वभावे त्याचे देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ २ ॥ करिशील तो करीं संताचा सांगत । आणीक ते मान नको मना ॥ ३ ॥ बैससी तरी बैस संताचे मधीं । आणीक ते बुद्धि नको मना ॥ ४ ॥ जासी तरि जाई संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथें मना ॥ ५ ॥ तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आणीक-दुसऱ्या सांगत-संगत सोवत धणी-तृप्ती अर्थ - मना, तुला भेटच जर घ्यावयाची असेल तर, तू संताची घ्यावीस याखेरीज दुसऱ्या गोष्टीच तू मनात आणू नकोस १ कारण या संताचे सर्व भांडवल म्हणजे तो एक देव झालेला असतो या देवाशिवाय ते दुसरे बोलणे कधीच बोलत नसतात २ मना तुला संगतच जर करायची असेल तर ती संताचीच कर आणखी याखेरीज दुसरी कोणतीच गोष्ट तुला मग करायला नको ३ तुला जर बसायचेच असेल तर तू संतांच्याच मध्य बैस या खेरीज दुसरी कसलीच बुद्धी तुला नको ४ तुला जर गावालाच जायचे असेल, तर तू संतांच्याच गावाला जा तुझा

सार्थ तुकारामगाथा ५४५ तेथेच खरी विश्रांती लाभेल. ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे संत म्हणजे सर्वसुखाचे सागर असून त्यांच्यामुळे मनाची निरंतर तृप्ती होते. ६ १२४१ संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥ १ ॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥ २ ॥ संतांचिये गांवीं यरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥ ३ ॥ संतांचें भोजन अमृताचें पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥ ४ ॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटों घेती देती ॥ ५ ॥ तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- यरो-पुष्कळ, उदीम-व्यापार, परी-प्रकार. अर्थ :- या संतांच्या गावी प्रेमाचा मोठा सुकाळ असतो. त्या ठिकाणी कसली तळमळ असत नाही, की दुःखाचा लेशही उरलेला नसतो. १ त्याच ठिकाणी मी याचक होऊन राहीन तेथे ते मला प्रेमाची भीक घालतील २ संतांच्या गावी श्रीविठ्ठलाचे प्रेम हेच खरे भांडवल आहे. हीच सर्व संपत्ती आहे. ३ संतांच्या घरचे हरिकीर्तनाचे भोजन म्हणजे केवळ अमृताचे पानच होय. कारण ते नेहमीच कथाकीर्तनात दंग झालेले असतात. ४ संतांचा नेहमी व्यापार म्हणजे उपदेशाचाच असतो. ते प्रेमसुखाचीच देवघेव नेहमी करीत असतात. ५ तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या ठिकाणी इतर दुसरे कसलेही प्रकार नसतात. म्हणूनच भिकारी होऊन मी त्यांचा दास झालो आहे. ६ १२४२ संतांचें सुख जालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥ १ ॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ २ ॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥ ३ ॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥ ४ ॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वार्गो नेदी आड कोणी तया ॥ ५ ॥ तुका म्हणे ते बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-संपूर्ण, पाड-किंमत. अर्थ :- या संतांच्या संगतीचे सुख देवासही फार मोठे झाले. म्हणून तोच या संतांची सेवा करण्यास उत्सुक असतो. १ अशा या देवाचा संपूर्ण महिमा मी कसा वर्णन करू शकणार ? माझा अधिकार तो किती. २ या भक्तांच्या साठी निर्गुणनिराकार असणारा देव सगुण व साकार झाला. तोच या संतांना दंडवत घालून त्यांची पूजा करीत असतो. ३ सर्व तीर्थे याच संताच्या सहवासाची इच्छा करितात व स्वतःच निर्मल होऊन जातात अनेकांची पापे दूर करण्यात आलेले मलीनत्व तीर्थे या संतांच्या संगतीने धुऊन काढतात. ४ अशा या संतांच्या सामर्थ्यापुढे अष्ट सिध्दींची काय किंमत आहे ? त्यांना कुणी समोर राहू देत नाहीत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व बलवंतांमध्ये संत हे बलवान होऊन राहिले आहेत, मी त्यांच्याच चरणापाशी निकटचा गृहून राहिलो आहे. ६ विवरण :- वरील चार अभंगात तुकाराम महाराजांनी संताचा महिमा पुन एकदा मुक्तकंठाने गाइला आहे. संतांचे चरित्र, संतांचा सहवास, संतांचे बोल, संताचा उपदेश, संतांची सेवा, संतांची ईश्वराविषयीची जवळीक व स्वतः ईश्वरासही वाटणारे संताविषयी प्रेम याचा विशेष लोभ सर्वच सज्जनांना वाटत असल्यास नवल नाही. ईश्वराएवढेच महत्त्व भागवत संप्रदायात संतांना दिलेले आहे. इतकेच नव्हे तर तुकारामबुवांनी 'देव सारावे परते । संत पूजावे आरतें' असे म्हटले आहे. कारण 'देव ते संत देव ते संत' असाच त्यांचा निर्णय आहे. या साधुसंताचा व संतसंगतीचा महिमा सर्वच संतानी एकमुखाने वर्णन केलेला आहे. 'संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सांगता हा तु. गाथा....६९

५४६ सार्थ तुकारामगाथा ब्रह्मा बोलवेना', 'संतचरणरज उधळले । तेणें सर्वांग डवरले,' 'संतसंगतीचे काय सांगू सुख ? । आपण पारिखे नाहीं तेथें', 'सुख सांगावे संतापुढें । जेणे सुख अधिक वाढे' अशा भाषेत नामदेवानी संताचे महत्त्व स्पष्ट केले आहे श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून संताचे उपकार त्याच्या माहात्म्यासहित सविस्तर वर्णन केले आहेत 'संताचे चरणतीर्थ घेता अनुदिनीं । पातकांची धुणी सहज होय', 'संतचरणींचा महिमा । फावौं न कळे आगमानिगमा । ब्रह्मा घाली लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥ शिव प्यालो पायवणी । धन्य धन्य संत जनीं', 'देवाचे ते आप्त जाणावे जे संत । त्याचे चरणीं रत व्हावे सर्वदा', असे संतमाहात्म्य कथन करुन त्यांनीही 'संत आधी देव मग । हाचि उद्गम आणा मना', 'संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे' असाच निष्कर्ष काढलेला आहे या संताच्या नादाने देव लोभावला जातो तो त्या सुखामुळे या संताची सेवा करुन त्यांचे परोपरीने रक्षण करीत असतो हा भावही मराठी संतानी वारंवार प्रगट केला आहे ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ साडुनी संतसदनीं राहीला । धन्य धन्य संताचे सदन । जेथें लक्ष्मो सहित शोभे नारायण', 'संतचरणींचे रज कण । तेणें तिन्ही देव पावन' अशा शब्दात या संताचा वेध देवालाच किती जमतो, याचे वर्णन एकनाथानी केलेले आहे ज्ञाने- श्वरानी तर हा देव चार हातानी संताना मिठी मारण्यास कसा उत्सुक असतो याचे मोठे हृद्य चित्र ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात रसाळपणे वर्णन केले आहे या भक्ताच केवढे कौतुक देवास असते ? ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, 'आम्ही तयाचे करु ध्यान । ते आमुचे देवतार्चन । ते वाचूनि आन । गोमटे नाहीं ॥ तयाचे आम्हा व्यसन । ते आमुचे निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तें ॥ तो पाहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसो मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पूजूं तयांतें ॥ दोंवरी दोनी । भुजा आलो घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचे आंग ।' आपल्या भक्ताविषयी व संताविषयी देवाला हे येवढ प्रेम वाटते ! ज्ञानेश्वरीमधील हाच भाव ज्ञानेश्वरानी एका अभंगात अतिशय बहारदारपणे व्यक्त केलेला आहे 'संत भेटतों आजी मज । तेणें मी झालो चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थूळीं सहज । दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥ आलिंगनीं सुख वाटे । प्रेम चिदानंदीं गोठें । हर्षे ब्रह्मांड उतरे । समूळ उठे मी पण' अशा या संताचे उपकार या जगातील सब लोकावर किती मोठे झाले आहेत याचे वर्णनही सपूर्ण असे करता येणे कठीण आहे १२४३ जो मानी तो देईल काई । न मनी तो नेईल काई ॥ १ ॥ आम्हा विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ २ ॥ आधीन ते जना काई । जल्पे वायाविण ठायी ॥ ३ ॥ वदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पाडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भलतैसा-कसा तरी, कोणत्याही रूपात, जल्पे-बडबडतात अर्थ - जो आम्हास मान देईल, तो आम्हास अधिक काय देणार आहे ? व जो मान देणार नाही, तो आम्हास देणार नाही असे काय आहे ? १ कसेही असले तरी हा श्रीविठ्ठलच सर्वभूतमात्रामध्ये बसलेला आम्हास आमच्या चित्तात दिसावा २ लोकाच्या स्वाधीन तसे काहीच नसताना लोक असे व्यर्थ का बडबडतात ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे तुला कुणी वंदिले अथवा निंदिले तरी त्याचे महत्त्व तुला सारखेच आहे ४ १२४४ भावबळें कैसा जालासी लहान । मागें संतीं ध्यान वर्णिगेले ॥ १ ॥ तें मज उचित करुनिया देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ २ ॥ पाहो निया डोळा बोलेन मी गोष्टी । आलिंगूनि मिठी देइन पायीं ॥ ३ ॥ चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडो निया कर पुढें दोन्ही ॥ ४ ॥ तुका म्हणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥ ५ ॥

सार्थ तुकारामगाथा ५४७ शब्दार्थ व टीपा - भावबळें-भक्तीच्या प्रभावाने, आर्त-इच्छा अर्थ :- देवा, तू भक्ताच्या वळामुळे कसा लहान, सगुण व सुंदर झाला आहेस. याच ध्यानाचे वर्णन यापूर्वी तुझ्या सतमंडळींनी केले आहे. १ देवा, ते ध्यान उचित आहे, असे मला करून दाखवा ना. केशवा, मायवापा, अशी प्रचीती द्या ना तुम्ही २ मग मी डोळे भरून तुम्हास पाहीन व सुखाच्या दोन गोष्टी बोलून संतुष्ट होईन. तुझ्या पायावर आलिंगन देऊन तुला मी मिठीच मारीन मग. ३ मी माझी दृष्टी तुझ्या चरणावर लावून मी नीट न हालता समोर पाहीन, मी तुझ्यापुढे हात जोडून उभा राहीन. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ही वासना माझी अतिशय उत्कंठित झालेली आहे, म्हणून नारायण, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी ५ १२४५ कृपाळु म्हणोनि बोलती पुराणे । निर्धार वचनें यांचीं मज ॥ १ ॥ आणीक उपाय नेणेचि मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसेँ ॥ २ ॥ नये घड कांहीं बोलतां वचन । रिघालो शरण सर्वभावे ॥ ३ ॥ कृपा करिसी तरि थोडे तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दाखवी श्रीमुख । हरेल या भूक डोळियाची ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - निर्धार-विश्वास, हरे-दूर होणार आहेत अर्थ - देवा, तू मोठा कृपाळू आहेस, असे सर्व पुराणे गर्जून सांगतात व माझाही त्याच्या वचनावर विश्वास आहे. १ मी तुझ्या चिंतनाखेरीज दुसरा कुठलाच विचार मनात आणीत नाही तुझे रहस्य जेणेकरून ध्यानात राहील असेच मी पाहतो २ मला तर एक शब्दही नीट घडपणे बोलता येत नाही पण सर्व भावाने मी तुलाच देवा, शरण आलो आहे. ३ देवा, तू जर माझ्यावर कृपा करशील, तर ते फार थोडे काम तुला आहे पण त्यामुळे माझे श्रम मान मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत ४ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, मला तुमचे श्रीमुख एकदा दाखवा ना. माझ्या डोळ्याची मग तहानभूक हरून जाईल ५ १२४६ सर्वभावे आलों तुजचि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥ १ ॥ आणीक दुसरे नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ २ ॥ माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥ ३ ॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ऋणी । चालत दूरूनी आले¹ मागें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां घेतले धरणे । हिशोबाकारणे भेटी देई ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- जडभारी-मोठे सकट वारी-निवारण करील. अर्थ :- देवा, मी तुला आता कायावाचामनेकरून शरण आलेलो आहे. १ देवा, आता तुझ्याशिवाय दुसरे काहीही मनात येत नाही. माझी सर्व वासना तुझ्याच पायाशी दृष्टी देऊन राहिलेली आहे २ माझ्यावर जर एखादे मोठे संकट आले तर देवा, ते तुझ्याशिवाय दुसरे कोण पूर्ण करणार ? ३ देवा, आम्ही तुझेच दास आहोत, तू आमचा ऋणी आहेस असा हा तुझा व आमचा संबंध पूर्वीपासूनच चालत आलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मी तुझ्या दाराशी धरणेच घेऊन बसलो आहे, मागील सर्व ऋणाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आता तू मला भेट द्यावीस ५ १२४७ कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥ १ ॥ केला पाडूरंगें तुझा² अंगीकार । मग होइल धीर माझ्या जीया ॥ २ ॥ म्हणऊनि मुख अवलोकितो पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥ ३ ॥ १ आलो, २ माझा

सार्थ तुकारामगाथा ५४९ झालेले दिसतात. देव चांगला क्षीरसागरात सुखासनावर होता, परंतु पृथ्वीवर पातकांची दाटी झाली, दैत्य फार मत्त झाले, म्हणून या भगवंतास गोकुळात गवळ्यांच्या घरी अवतार घ्यावा लागला. आणि देवास त्या पुंडलीक महामुनींने गुंतवून ठेविले, पंढरपूर येथे बांधून ठेवले, इत्यादी भावतुषार सगुण प्रीतीच्या पोटी बुवानी येथे व्यक्त केले आहेत. ईश्वर आपल्या भक्तासाठी श्रमी होतो, हीही भक्तीच्याच अनेक छटांपैकी एक नाजुकसा आविष्कार आहे कारण हा भक्तीच्या भीतीनेच साकार सगुण झालेला असतो 'तुका म्हणे भावें । भेणे देणें आकाराचे' असे त्यांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे. १२४९ गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें ॥ म्हणतां पाप गेले । विठ्ठलसें वाचेसी ॥ १ ॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाठीं आपुलिया ॥ २ ॥ चित्त पावले आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥ ३ ॥ हें जाणती अनुभवी । जया चाड तो खोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरुपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धालें-संतुष्ट झालो, चाड-आवड, खोजवी-शोध घेतील अर्थ :- अवचितपणे या विठ्ठलाचे नाम माझ्या वाणीतून निघाले, म्हणून सर्वत्र गोड होऊन गेले. मनातील सर्व पापच नाहीसे झाले. पोट तृप्तीने भरून गेले. १ लोकहो, तुम्ही हे सर्व खरे मानावे. कारण अजामेळासारख्या पाप्याचाही या भगवंताच्या नामामुळे उद्धार झालेला आहे. तो कितीही पातकी व चांडाळ असला तरी त्याने भगवंताचे नाम घेतल्यामुळेच त्याचा उद्धार परमेश्वराने केला. २ श्रीहरीचे नाव वाणीतून निघाल्यामुळे माझे चित्त अतिशय आनंदित झाले आहे या गोविंदारूपा नावाने सदा सर्व काळ समाधी सुखाचाच आनंद प्राप्त झाला आहे. ३ जे कुणी अनुभवी आहेत, त्यांनाच या सुखाची किंमत समजून येईल. ज्यांना याची आवड आहे ते याचा शोध घेतील. तुकाराम महाराज म्हणतात, त्यालाच हा देव आपले अरूप असले तरी सगुण स्वरूप दाखवील. ४ १२५० आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥ १ ॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तयरा मुकविलें ॥ २ ॥ हरिनें जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोवताला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामा-वासनेस, घातला चिरा-दगड घालून बंदी केले, वित्तयरा-धनसंपत्ती. अर्थ :- आता हा श्रीहरी सर्वत्र आतून व बाहेरून भरून राहिलेला आहे घरोदारी याच हरीच्या रूपाने आकार धारण केला आहे. १ या श्रीहरीने माझ्या सर्व वासनावरच दगड घालून त्यांना बंदी केली आहे वासना त्याने नष्ट केल्या आहेत. याच्यामुळे माझी धनसंपत्तीवरीलही वासना संपलेली आहे. २ या हरीने माझ्या जीवा- घरचाही लोभ घालून सर्व व्यावहारिक प्रपंचाशी वृत्तींचा भंग केला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या श्रीहरीशिवाय वेगळा नाहीच. हाच श्रीहरी माझ्या भोवती सर्वत्र भरून राहिलेला आहे. ४ १२५१ हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरले ॥ १ ॥ आतां कैसो जाऊं घरा । नव्हें बरा लौकिक ॥ २ ॥