दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१७ वा. ] श्रवणोपदेश. ३६९ वासनेसी परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥ वासना मुळींच अभेद । देहसंबंधें झाला भेद । तुटतां देहाचा संबंध । भेद गेला ॥ २३ ॥ नरनारीचें बीज कारण । शिवशक्तीमध्यें जाण । देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥ नाना प्रचीतींच्या वासना । एकाचें एकास कळेना । तीक्ष्ण दृष्टीनें अनुमाना । कांहींसें येतें ॥ २५ ॥ बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी । उपाधि वाढे जयाचेनी । ते हे वनिता ॥ २६ ॥ वीट नाहीं कंटाळा नाहीं । आलस्य नाहीं त्रास नाहीं । इतुकी माया कोठेंचि नाहीं । माते वेग- ळी ॥ २७ ॥ नाना उपाधि वाढवूं जाणे । नाना मायेनें गोवूं जाणे । नाना प्रीति लावूं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ॥ २९ ॥ ईंश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें । लोभाचें गुंडाळें केलें । उग- वेना ऐसें ॥ ३० ॥ ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची महा गोडी । हे मु- ळींहून चालली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥ मुळीं सूक्ष्म निर्माण झालें । पुढें स्पष्ट दिसोन आलें । उत्पत्तीचें कार्य चाले । उभयतांकरितां ॥ ३२ ॥ मुळीं शिवशक्ती हें तों खरें । पुढें झालीं वधुवरें । चौऱ्याशीं लक्ष विस्तारें । विस्तारली जे ॥ ३३ ॥ येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे आणिलें । विवरल्याविण बोलिलें । तें व्यर्थ जाणावें ॥ ३४ ॥ इति श्रीदा- सबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके शिवशक्तिनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. श्रवणोपदेश. श्रीगणेशाय नमः ॥ थांबा थांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडूं नका । सांगीतलें तें ऐका । सावधपणें ॥ १ ॥ श्रवणामध्यें सार श्रवण । तें हें अ- ध्यात्मनिरूपण । सुचित्त करूनि अंतःकरण । ग्रंथामध्यें विवरावें ॥ २ ॥ श्रवण मननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार । रोकडा मोक्षाचा उधार । बोलोंच नये ॥ ३ ॥ नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां । उत्तम सोनें पुटीं घालितां । सावधान असावें ॥ ४ ॥ नाना नाणीं मोजून घेणें । १. सूक्ष्म विचारानें. २. बायको. ३. पाहावें. ४. मुशींत.
नाना परीक्षा करणें । विवेकी मनुष्यास बोलणें । सावधानें असावें ॥ ५ ॥ जैसें लाखोलीचें धान्य । निवडोन वेंचिंतां होतें मान्य । सगट मोजितां अ- मान्य । देव क्षोभे ॥ ६ ॥ एकांतीं नाजुक कारभार । तेथें असावें अति त- त्पर । त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रंथीं ॥ ७ ॥ काहण्या कथा गोष्टी पवाडें । नाना अवतारचरित्रें वाड । त्यां समस्तांमध्यें जाड । अध्यात्मवि- द्या ॥ ८ ॥ गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काय हातासि आलें । म्हणती पुण्य प्राप्त झालें । तरी तें दिसेना कीं ॥ ९ ॥ तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रची- तीचा विचार । कळतां अनुमानाचा संहार । होत जातो ॥ १० ॥ मोठे मोठे येऊन गेले । आत्म्याकरितांच वर्तले । त्या आत्म्याचा महिमा बोले । ऐसा कवण ॥ ११ ॥ युगानुयुग एकटा एक । चालवितो तिन्ही लोक । त्या आत्म्याचा विवेक । पाहिलाच पाहावा ॥ १२ ॥ प्राणी आले येऊन गेले । ते जैसे जैसे वर्तले । ते वर्तणुकेचें कथन केलें । इच्छेसारिखें ॥ १३ ॥ जेथें आत्मा नाहीं दाट । तेथें अवघें सरसपाट । आत्म्याविण बापुडें काष्ठे । काय जाणे ॥ १४ ॥ ऐसें वरिष्ठ आत्मज्ञान । दुसरें नाहीं या समान । सृष्टी- मध्यें विवेकी जन । तेचि हें जाणती ॥ १५ ॥ पृथ्वी आणि आप तेज । यांचा पृथ्वीमध्यें समज । अंतरात्मा तत्वबीज । तें वेगळेंचि राहिलें ॥ १६ ॥ वायूपासून पैलीकडे । जो कोणी विवेकें पवाडे । जवळींच आत्मा सांपडे । तया पुरुषासी ॥ १७ ॥ वायुप्रकाशैं गुणमाया । प्रकृतिपुरुष मूळमाया । सूक्ष्मरूपें प्रतीत येया । कठिन आहे ॥ १८ ॥ मायादेवीच्या धांदली । सूक्ष्मीं कोण मन घाली । समजला त्याची तुटली । संदेहवृत्ती ॥ १९ ॥ मूळ- माया चौथा देह । झाला पाहिजे निःसंदेह । देहातीत होऊन राहे । धन्य तो साधु ॥ २० ॥ विचारें ऊर्ध्व चढती । तयासी ऊर्ध्वगती । येरां सकळां अधोगती । पदार्थज्ञानें ॥ २१ ॥ पदार्थ चांगले दिसती । परी ते सर्वैचि नासती । अतोभ्रष्टस्ततोभ्रष्ट होती । लोक तेणें ॥ २२ ॥ या कारणें प्रकृति- ज्ञान । नाना जिनसांचें अनुमान । सर्व सांडूनि निरंजन । धुंडीत जावें ॥ २६ ॥ अष्टांगयोग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञानें । त्याहून थोर आ- १. पोवाडे. २. लांकडासारखें निर्जीव शरीर. ३. वायूचा उद्भव. ४. सद्गति. ५. याला मुकला व त्यालाही मुकला. ६. महदादि तत्त्वांचें ज्ञान.
१७ वा.] अनुमान. ३७१ त्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ॥ २४ ॥ मूळमायेचे शेवटीं । हरिसंकल्प मुळीं उठी । उपासनायोगें मिठी । तेथें घातली पाहिजे ॥ २५ ॥ मग त्या पैली- कडे जाण । निखळ ब्रह्म निर्गुण । निर्मळ निश्चळ त्याची खूण । गगनासा- रिखी ॥ २६ ॥ येथून तेथवरी दाटलें । प्राणिमात्रास भेटलें । पदार्थमात्रीं लिगटलें । व्यापून आहे ॥ २७ ॥ त्याऐसें नाहीं थोर । सूक्ष्माहूनि सूक्ष्मवि- चार । पिंडब्रह्मांडांचा संहार । होतां कळे ॥ २८ ॥ अथवा पिंडब्रह्मांड अ- सतां । विवेकप्रलय पाहों जातां । शाश्वत कोण हें तत्त्वतां । उमजों लागे ॥ २९ ॥ करून अवघा तत्त्वझाडा । सारासारांचा निवाडा । सावधपणें ग्रंथ सोडा । सुखेनैव ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके श्रवणोपदेशनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. अनुमान. श्रीगणेशाय नमः ॥ बहुत जनांसि उपाय । वक्त्यास पुसतां त्रासूं नये । बोलतां बोलतां अन्वय । सांडूंच नये ॥ १ ॥ श्रोत्यानें आशंका घेतली । ते तात्काळ पाहिजे फेडिली । स्वगोष्टीनें स्वगोष्टी पेंचली । ऐसें न व्हावें ॥ २ ॥ पुढें धरितां मागें पेंचला । मागें धरितां पुढें उडाला । ऐसा सांप- डतांचि गेला । ठायीं ठायीं ॥ ३ ॥ पोहणारचि गुचक्या खातो । जनांस कैसा काढूं पाहतो । आशय लोकांचा राहत जातो । ठायीं ठायीं ॥ ४ ॥ आपणाचि बोलिला संहार । आपणचि बोलिजे सर्वसार । दुस्तर मायेचा पार । दाविला पाहिजे ॥ ५ ॥ जें जें सूक्ष्म नाम द्यावें । त्याचें रूप बिंब- वूनि द्यावें । तरीच वक्ता म्हणावें । विचारवंत ॥ ६ ॥ ब्रह्म कैसें मूळमाया कैसी । अष्टधा प्रकृति शिवशक्ति कैसी । षड्गुणैश्वर्याची स्थिती कैसी । गुणसाम्याची ॥ ७ ॥ अर्धनारी नटेश्वर । प्रकृतिपुरुषांचा विचार । गुण- क्षोभिणी तदनंतर । त्रिगुण कैसे ॥ ८ ॥ पूर्वपक्ष कोठून कोठवरी । वाच्यां- श लक्ष्यांशाची परी । सूक्ष्म नाना विचार करी । धन्य तो साधु ॥ ९ ॥ नाना पाल्हाळीं पडेना । बोलिलांचि बोलवेना । मौनगर्भे अनुमाना ।
१. 'एकोऽहं बहु स्याम्' (मी एक आहें तो पुष्कळ होईन.) असा ईश- संकल्प. २. ज्याचा गर्भ (स्वरूप) सांगण्यास शब्द नाहींत तें मौनगर्भ; ब्रह्म.
३७२ श्रीदासबोध. [ दशक आणून सोडी ॥ १० ॥ घडी एक विमळब्रह्म । घडी एक सर्व ब्रह्म । द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म । क्षण एक ॥ ११ ॥ निश्चळ तेंचि झालें चंचळ । चंचळ तेंचि ब्रह्म केवळ । नाना प्रसंगीं खळखळ । निवाडा नाहीं ॥ १२ ॥ चळतें आणि निश्चळ । अवघें चैतन्याचि केवळ । रूपें वेगळालीं प्रबळ । बोलवेना ॥ १३ ॥ उगीच करी गाथागोवी । तो लोकांस कैसा उगवी । नाना निश्चय नाना गोवी । होत जाते ॥ १४ ॥ भ्रमास म्हणे परब्रह्म । परब्रह्मास म्हणे भ्रम । ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दावी ॥ १५ ॥ घाली शास्त्रांचें दृढपण । प्रचीतीविण निरूपण । पुसों जातां उगाच शीण । अत्यंत मानी ॥ १६॥ झाल्यास आणि पडोंर्थेभिडा। तो काय बोलेल बापुडा । सारासारांचा निवाडा । झाला पाहिजे ॥ १७ ॥ वैद्य मात्रेची स्तुति करी । मात्रा गुण कांहींच न करी । प्रचीतीविण तैसी परी । ज्ञानाची झाली ॥ १८ ॥ जेथें नाहीं सारासार । तेथें अवघा अंधकार । नाना परीक्षांचे विचार । राहिले तेथें ॥ १९ ॥ पाप पुण्य स्वर्ग नरक । विवेक आणि अवि- वेक । सर्व ब्रह्मीं काय एक । सांपडलें नाहीं ॥ २० ॥ पावन आणि तें पतन । दोन्ही मानिलीं तत्समान । निश्चय आणि अनुमान । ब्रह्मरूप ॥ २१॥ ब्रह्मरूप झालें आघवें । तेथें काय निवडावें । अवघी साकराच टाकावें । काय कोठें ॥ २२॥(तैसें सार आणि असार । अवघा झाला एकंकार । तेथें बळावला अविचार । विचार कैंचा ॥ २३ ॥ वंद्य निंद्य एक झालें । तेथें काय हातास आलें । उन्मत्त द्रव्यें जे भुलले । ते भलतेंच बोलती ॥२४॥ तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला । महापापी आणि भला । एकचि मानी ॥ २५ ॥ सर्वसंगपरित्याग । अवासवा विषयभोग । दोघे एकचि मानितां मग । काय उरलें ॥ २६ ॥ भेद ईश्वर करून गेला । तो याच्या बापाचेनि न वचे मोडिला । मुखामध्यें घांस घातला । तो अपानीं घालावा ॥२७॥ ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ २८ ॥ अवघी आंतीची ठकाठकी । प्रचीतीविण गोष्टी लटकी । वेड लागलें जे बटकी । ते भलतेंच बोले ॥२९॥ -प्रत्ययज्ञाता सावधान । त्याचें ऐकावें निरूपण । आत्मसाक्षात्काराची १. गोंधळ. २. समजावी. ३. डौल. ४. खोभी. ५. मद्यानें.
सां पडोंच नये ॥ १३ ॥" or "सायासीं पडोंच नये"?
Usually: "सहज सांडून सायासीं । पडोंच नये ॥ १३ ॥"
In rhyme: सकळांसी / जाणत्यासी / सायासी.
Look at the image: सा या सीं - wait, the top of स has a curve to the right, which is a velanti (ी). But wait, does it have a kana too?
Ah, let's look at सायासों: the kana is not there, it's just सायासीं! Wait, no, look at the word: सायासों or सायासीं?
Wait, look at line 24: सायासें देव फुटे नासे ।
In line 23, look at the word: स ा य ा स and then a kana + matra?
Wait! स followed by ा and े = सो? No, look at पडोंच next to it: प ड ों च.
In सायासीं, look at the top: it has a circle/loop. Ah, it's सायासीं! Wait, why did it look like सायासों? Because the velanti hangs down. It is definitely सायासीं (rhyming with सकळांसी, जाणत्यासी
३७४ श्रीदासबोध. [ दशक यज्ञपुरुष पोटीं असती । तयांस अवदानें सकळ देती । लोक भांजेमध्यें असती । आत्मयाचे ॥ १७ ॥ सहज देव जपध्यानें । सहज बोलणें स्तुति स्तवनें । सहज घडे तें भगवानें । मान्य कीजे ॥ १८ ॥ सहज समजायाकारणें । नाना हठयोग करणें । परंतु एकाएक समजणें । घडत नाहीं ॥ १९ ॥ द्रव्य चुकतें दारिद्र येतें । तैंळीं लक्ष्मी वैरी वर्तते । प्राणी काय करील तें । ठाउकें नाहीं ॥ २० ॥ तळघरामध्यें उदंड द्रव्य । भिंतीमध्यें घातलें द्रव्य । स्तंभीं तुळवटीं द्रव्य । आपण मध्यें ॥ २१ ॥ लक्ष्मीमध्यें करंटा नांदे । त्याचें दरिद्र अधिक सांधे । नवल केलें परमानंदें । परम पुरुषें ॥ २२ ॥ एक पाहती एक खाती । ऐशी विवेकाची गती । प्रवृत्ति अथवा निवृत्ति । येणेंच न्यायें ॥ २३ ॥ अंतरीं वसतां नारायणें । लक्ष्मीस काय उणें । ज्याची लक्ष्मी तो आपण । बळकट धरावा ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके अजपानिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. देहात्मा. श्रीगणेशाय नमः ॥ आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुःखें भोगि- तो । शेवटीं शरीर सांडून जातो । एकाएकीं ॥ १ ॥ शरीरशक्ति तारुण्य- पर्णी । नाना सुखें भोगिती प्राणी । अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगिती ॥ २ ॥ मरावें ना ऐसी आवडी । हात पाय खोडून प्राण सोडी । नाना दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥ देहात्मयाचे संगतीं । कांहींएक सुख भो- गिती । चर्फडोंचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥ ऐसा आत्मा दुःख- दायक । एकाचे प्राण घेती एक । आणि शेवटीं निरर्थक । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ ऐसा दों दिवसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म । नाना दुःखाचा संभ्रमें । मानून घेतला ॥ ६ ॥ दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें काय समाधान झालें । कांहीं एक सुख भोगिलें । तों सर्वंच दुःख ॥ ७ ॥ जन्म- दारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें । नाना दुःखें भोगावें । काय म्हणोन ॥ ८ ॥ ऐसी आत्म्याची संगती । नाना दुःखें प्राप्त होतीं । दै- न्यवाणे होऊन जाती । प्राणिमात्र ॥ ९ ॥ कांहीं आनंद कांहीं खेद । ज. १. आहुति. २. कष्ट. ३. खालीं, वर. ४. वाढतें. ५. प्रसंग. ६. जन्मापासून.
न्मवरी पडिला संबंध । नाना प्रकारीं विरुद्ध । ताडांतोडी ॥ १० ॥ निद्रा- काळीं ढेंकूण पिसा । नाना प्रकारीं वळँसा । नाना उपायें वळसा । त्यांस होय ॥ ११ ॥ भोजनकाळीं माशा येती । नाना पदार्थ उंदीर नेती । पुढें त्यांचीहि फजिती । मार्जारें करिती ॥ १२ ॥ उवा चामवा गोचिड । गां- धलें कानटे उदंड । एकास एक चर्फंड । दोहोंकडे ॥ १३ ॥ विंचू सर्प वाघ रिसें । सुसर लांडगे माणसांस माणसें । परस्परें सुखसंतोषें । एकहि नाहीं ॥ १४ ॥ चौन्यायशीं लक्ष उत्पत्ति । एकास एक भक्षिती । नाना पीडा दु- खणीं किती । काय म्हणोन सांगावें ॥ १५ ॥ ऐशी अंतरात्माची करणी । नाना जीव दाटले धरणीं । परस्परें संहारणी । एक एकाची ॥ १६॥ अखंड रडती चर्फडती । विवळविवळों प्राण देती । मूर्ख प्राणी त्यांस म्हणती । परब्रह्म ॥ १७ ॥ परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं । स्तुति निंदा दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥ उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरा- त्म्यास लागल्या । विचार पाहतां प्रत्ययास आल्या । यथातथ्य ॥ १९ ॥ धगडीचा बटकीचा लंवडीचा । गधडीचा कुत्रीचा वोंगळीचा । ऐसा हिशेब शिव्यांचा । किती म्हणोन सांगावा ॥ २० ॥ इतकें परब्रह्मीं लागेना । तेथें कल्पनाचि चालेना । ताडातोडीचें ज्ञान मानेना । कोणी एकासी ॥ २१ ॥ सृष्टीमध्यें सकळ जीव । सकळांस कैंचें वैभव । या कारणें ठायाठाव । नि- र्मिला देवें ॥ २२ ॥ उदंड लोक बाजारींचे । जें जें आलें तें तें वेंचे । उत्त- म तितुकें भाग्याचे । लोक घेती ॥ २३ ॥ येणेंचि न्यायें अन्न-वसनें । येणें- चि न्यायें देवतार्चन । येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥ अवघेचि लोक सुखी असती । संसार गोड करून नेती । महाराजे वैभव भोगिती । तें करंट्यास कैंचें ॥ २५ ॥ परंतु अंतीं नाना दुःखें । तेथें होतें सकट सारिखें । पूर्वी भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना ॥ २६ ॥ प्राण शरीर सोडीना । कठिन दुःख सोसवेना । मृत्युदुःख सकळ जनां । कासावीस करी ॥ २७ ॥ नाना अवयवहीन झालें । तैसेंचि पाहिजे वर्तलें । प्राणी अंतकाळीं गेलें । कासावीस होउनी ॥ २८ ॥ रूप लावण्य आवघें जातें । शरीरसामर्थ्य तेंही जातें । कोणी नसतां मर-
तळटीपा (Footnotes): १. घोटाळा. २. उपद्रव. ३. खरोखर. ४. वस्त्र.
३७६ श्रीदासबोध. [ दशक तें । आपद् आपदों¹ ॥ २९ ॥ अंतकाळीं दैन्य² दीन । सकळिकांस तत्समान । ऐसें चंचल अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥ भोगून अभोक्ता म्हणती । हें तों अवघीच फजिती । लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥ अंतकाळ आहे कठिण । शरीर सोडीना प्राण । बराड्यासारिखें लक्षण । अंतकाळीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके देहा- त्मनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. जगज्जीवन. श्रीगणेशाय नमः ॥ मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लीमध्यें जातें । संगदोषें तैसें होतें । आम्लें³ तीक्ष्ण⁴ कडवट ॥ १ ॥ आत्मा आहमपणें असतो । देहासंगें विकारतो । साभिमानें भरीं भरतो । भलतीकडे ॥ २ ॥ बरी संगति सांपडली । जैसी उंसास गोडी आली । विषयवल्ली फोपावली । घातकी प्राणीं ॥ ३ ॥ अठरा भार वनस्पती । गुण सांगावे ते किती । नाना देहांचे संगती । आत्मयास होय ॥ ४ ॥ त्यामध्यें कोणी भले । ते संतसंगें निवाले । देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥ उदकाचा नाशचि होतो । आत्मा विवेकें निघतो । ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहावा ॥ ६ ॥ ज्यासी स्वहितचि करणें । त्यास किती म्हणोन सांगणें । हें ज्याचें त्याणें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥ आपला आपण करी कुडौवा⁵ । तो आपला मित्र जाणावा । आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥८॥ आपलें आपण अनहित करावें । त्यास आडवें कोणें रिघावें । एकांतीं जा- ऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥ जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी । या कारणें विवेकी । धन्य साधू ॥ १० ॥ पुण्यवंता सत्संगती । पापिष्ठास असत्सगंती । गति आणि अवगती । संगतियोंगें ॥ ११ ॥ उत्तम संगति धरावी । आपली आपण चिंता करावी । अंतरीं बरी विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥ इहलोक आणि परलोक । जाणता तो सुखदायक । नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥ जाणता देवाचा अंश । नेणता म्हणजे तो राक्षसांश । यामध्यें जें विशेषे । तें जाणो- १. डाळ होऊन. २. दीनवाणें. ३. आंबट. ४. तिखट. ५. रक्षण.
१७ वा.] तत्त्वविवरण. ३७७ न घ्यावें ॥ १४ ॥ जाणता तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य । जेणें करितां होइजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥ साक्षेपी शाहाण्याची संग- ती । तेणें साक्षेपी शाहाणे होती । आळसी मूर्खाची संगती । होती आळसी मूर्ख ॥ १६ ॥ उत्तमसंगतीचें फळ सुख । अधमसंगतीचें फळ दुःख । आंनंदू सांडूनियां शोक । कैसा घ्यावा ॥ १७ ॥ ऐसें हें प्रगट दिसे । जनामध्यें उदंड भासे । प्राणिमात्र वर्ततसे । उभययोगें ॥ १८ ॥ एका योगें सकळ योग । एका योगें सकळ वियोग । विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जावे ॥ १९ ॥ अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें । निघोन जातां झालें । परम समाधान ॥ २० ॥ नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनो- भंग । या कारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥ शाहाणा यत्नी त्याच्या गुणें । पाहों जातां काय उणें । सुख संतोष भोगणें । नाना श्लाघ्यता १ ॥ २२ ॥ आतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमध्यें वर्तताहे । जो कोणी समजोन पाहे । त्यास घडे ॥ २३ ॥ बहुरत्ना वसुंधरा । जाणजाणों विचार करा । सम- जतां प्रत्यय अंतरा-। माजी येतो ॥ २४ ॥ दुर्बळ आणि संपन्न । वेडें आणि व्युत्पन्न । हें अखंडदंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥ एक भाग्यपुरुष मोडती । एक नवे भाग्यवंत होती । तैशीच विद्या व्युत्पत्ती । होत जाते ॥ २६ ॥ एक भरे एक रितें । रितें मागुतें भरतें । भरतें तेंहि रितें होतें । कालांतरीं ॥ २७ ॥ ऐशी हे सृष्टि चालिली । संपत्ति दुपारची साउली । वयसों तरी निघोन गेली । हळूहळू ॥ २८ ॥ बाळ तारुण्य आपलें । वृद्ध- पणीं प्रचीतीस आलें । ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणीं ऐकें ॥ २९॥ देह जैसें केलें तैसें होतें । यत्न केल्या कार्य साधतें । तरी मग कष्टावें तें । काय निमित्त ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके जग- ज्जीवननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. तत्त्वविवरण. .श्रीगणेशाय नमः ॥ नाभीपासून उन्मेषवृत्ती ३ । तेचि परा जाणिजे श्रोतीं । ध्वनिरूप पश्यंती । हृदयीं वसे ॥ १ ॥ कंठापासून नाद झाला । १. कीर्ति. २. अखंड दंड (काठी) असावा तसें, अस्खलित. ३. अंतःस्फुरण.
१७८ श्रीदासबोध. [ दशक मध्यमा वाचा बोलिजे त्याला । उच्चार होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥२॥ नाभिस्यानीं परा वाचा । तोचि ठाव अंतःकरणाचा । अंतःकरणपंचकाचा । निवाडा ऐसा ॥ ३ ॥ निर्विकल्पीं जें स्फुरण । उगँच असतां आठवण । तें जाणावें अंतःकरण । जाणती कळा ॥ ४ ॥ अंतःकरणीं आठवलें । पुढें होय नव्हेसें गमलें । करूं न करूं ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥ संकल्प विक- ल्प तेंचि मन । तेणें करितां अनुमान । पुढें निश्चय तोचि जाण । रूप बुद्धीचें ॥ ६ ॥ करीनचि अथवा न करीं । ऐसा निश्चय करी । तेचि बुद्धि आहे अंतरीं । विवेकें जाणावी ॥ ७ ॥ जे वस्तूचा निश्चय केला । पुढें तेचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । यथार्थ मानावें ॥ ८ ॥ पुढें कार्यांचा अभिमान धरणें । हें कार्य तों अगत्य करणें । अशा कार्यास प्रवर्त्त- णें । तोचि अहंकारु ॥ ९ ॥ ऐसें हें अंतःकरणपंचक । पंच वृत्ति मिळोन एक । कार्यभागें प्रकारपंचक । वेगळालें ॥ १० ॥ जैसे पांचही प्राण । कार्यभागें वेगळाले जाण । नाहीं तरी वायूचें लक्षण । एकचि असे ॥ ११ ॥ सर्वांगीं व्यान नाभीं समान । कंठीं उदान गुदीं अपान । मुखीं नासिकीं प्राण । नेमस्त जाणावा ॥ १२ ॥ बोलिलें हें प्राणपंचक । आतां ज्ञानेंद्रिय- पंचक । श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक । ऐशीं हीं ज्ञानेंद्रियें ॥ १३ ॥ वाचा पाणी पाद् शिश्न गुद । हीं कर्मेंद्रियें प्रसिद्ध । शब्द स्पर्श रूप रस गंध । ऐसें हें विषयपंचक ॥ १४ ॥ अंतःकरण प्राणपंचक । ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियपंचक । पांचवें विषयपंचक । ऐशीं हीं पांच पंचकें ॥ १५ ॥ ऐसे हे पंचवीस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण । यांचा कर्दभ बोलिला श्रवण । केलें पाहिजे ॥ १६ ॥ अंतःकरण व्यान श्रवण वाचा । शब्द विषय आका- शाचा । पुढें विस्तार वायूचा । बोलिला असे ॥ १७ ॥ मन समान त्वचा पाणी । स्पर्श विषय हा पवनीं । ऐसे हे अंदाखे साधूनी । कोठा करावा ॥ १८ ॥ बुद्धि उदान नयन चरण । रूप विषयाचें दर्शन । संकेतें बोलिलें मन । घालूनि पाहिजे ॥ १९ ॥ चित्त अपान जिव्हा शिश्न । रस विषय आप जाण । पुढें ऐका सावधान । पृथ्बीचें रूप ॥ २० ॥ अहंकार प्राण घ्राण । गुद गंध विषय जाण । ऐसें केलें निरूपण । शास्त्रमतें ॥ २१ ॥ .. १. ठाव. २. मिश्रण. ३. पडताळे. ४. कोष्टक.
१७ वा.] तनुचतुष्टय. ३७९ ऐसा हा सूक्ष्म देह । पाहतां होइजे निःसंदेह । येथें मन घालूनी पाहे । त्यासि हें उमजे ॥ २२ ॥ ऐसें सूक्ष्म देह बोलिलें । पुढें स्थूळ निरूपिलें । आकाश पंचगुणे वर्तलें । कैसें स्थूळीं ॥ २३ ॥ काम क्रोध शोक मोह भय । पंचविध आकाशाचा अन्वय १ । पुढें पंचविध वायु । निरूपिला ॥ २४ ॥ चळण वळण प्रसरण । निरोध आणि आकुंचन । हें पंचविध लक्षण । प्रभंज- नाचें २ ॥ २५ ॥ क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण । आतां पुढें आपलक्षण । निरूपिलें पाहिजे ॥ २६ ॥ शुक्रं ३ शोणितं ४ लाळ मूत्र स्वेदें ५ । हा पंचविध आपाचा भेद । पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे ॥ २७ ॥ अस्थि मांस त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म । ऐसें स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । हे पाचांचे पंचवीस । ऐसे मिळोनि स्थूळदेहास । बोलिजेतें ॥ २९ ॥ ति- सरा देह कारण अज्ञान । चौथा देह महाकारण ज्ञान । हे चारी देह निर- सितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥ विचारें चौदेहां वेगळें केलें । मीपण तत्वासरीसें गेलें । अनन्य आत्मनिवेदन झालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥ विवेकें चुकला जन्ममृत्यु । नरदेहीं साधीलें महत्कृत्य । भक्तियोगें कृतकृत्य । सार्थक झालें ॥ ३२ ॥ इति श्रीपंचीकरणं ६ । केलेंचि करावें विवरण । लो- हाचें होतें सुवर्ण । परिसाचेनि योगें ॥ ३३ ॥ हा हि दृष्टांत घडेना । परिसा- चेनि परिस करवेना । शरण जातां साधुजना । साधुचि होइजे ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके तत्त्वविवरणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ——— ९. तनुचतुष्टय. श्रीगणेशाय नमः ॥ स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । ऐसे हे चार देह जाण । जागृति स्वप्न सुषुप्ति ७ पूर्ण । तुर्या ८ जाणावी ॥ १ ॥ विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्यगात्मा हे अभिमान । नेत्रस्थान कंठस्थान । हृदयस्थान मूर्धा ९ तो ॥ २ ॥ स्थूळ भोग प्रविविक्तें १० भोग । आनंदभोग आनंदावभासें ११ भोग । ऐसे १. संबंध. २. वायूचें. ३. रेत. ४. रक्त. ५. घाम. ६. पंचभूतांचें मिश्रण. ७. झोंप. ८. समाधि. ९. मस्तक. १०. स्वप्नांतील भोग. ११. समाधींतील महानंद.
३८० श्रीदासबोध. [ दशक चारी भोग । चौदेहाचे ॥३॥ अकार उकार मकार । अर्ध मात्रा तो ईश्वर । ऐशा मात्रा चार । चौ देहांच्या ॥ ४ ॥ तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्ध सत्वगुण । ऐसे हे चार गुण । चौदेहांचे ॥ ५ ॥ क्रियाशक्ति द्रव्यशक्ति । इच्छाशक्ति ज्ञानशक्ती । ऐशा ह्या चार शक्ती । चौदेहांच्या ॥ ६ ॥ ऐशीं हीं बत्तीस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें । अवघीं मिळोन ब्यायसीं तत्वें । अ- ज्ञान आणि ज्ञान ॥७॥ ऐशीं हीं तत्वें जाणावीं । जाणोन मायिक ओळखावीं । आपण साक्षी निरसावी । येणें रीतीं ॥ ८ ॥ साक्षी म्हणिजे तें ज्ञान । ज्ञानें ओळखावें अज्ञान । ज्ञानाज्ञानांचें निरसन । देहासरिसें ॥ ९ ॥ ब्रह्मांडीं देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले । ते हे विवेकें निरासिले । आत्म- ज्ञानें ॥ १० ॥ आत्मानात्मविवेक पाहतां । सारासारविचार करितां । पंच- भूतांची मायिक वार्ता । प्रतीत आली ॥ ११ ॥ अस्थि मांस त्वचा नाडी रोम । हे पांचहि पृथ्वीचे गुणधर्म । प्रत्यक्ष शरीरीं हें वर्म । शोधून पाहावें ॥ १२ ॥ शुक्र शोणित लाळ मूळ स्वेद । हे आपाचे पंच भेद । तत्वें सम- जोन विशद । करून घ्यावी ॥ १३ ॥ क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन । हे पांचहि तेजाचे गुण । या तत्त्वांचें निरूपण । केलेंचि करावें ॥ १४ ॥ चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । हे पांचहि वायूचे गुण । श्रोतीं जाणावे ॥ १५ ॥ काम क्रोध शोक मोह भय । हा आकाशांचा प- र्याय । हे विचारिल्याविणें काय । उमजों जाणे ॥ १६ ॥ असो ऐसें हें स्थूळ शरीर । पंचवीस तत्त्वांचा विस्तार । आतां सूक्ष्म देहाचा विचार । बोलि- जेल ॥ १७ ॥ अंतःकरण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाश पंचकाचा वि- चार । पुढें वायु निरुत्तर । होऊन ऐका ॥ १८ ॥ व्यान समान उदान । अपान आणि प्राण । ऐसे हे पांचहि गुण । वायुतत्त्वाचे ॥ १९ ॥ श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हे पांचहि तेजाचे गुण । आतां आप सावधान । होऊन ऐका ॥२०॥ वाचा पाणि पाद शिक्ष गुद । हे आपाचे गुण प्रसिद्ध । आतां पृथ्वी विशद । निरूपिली ॥ २१ ॥ शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पृथ्वीचे गुण विशद । ऐसे हे पंचवीस तत्त्वभेद । सूक्ष्म देहाचे ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके तनुचतुष्टयनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१७ वा. ] सिद्ध. ३८१ १०. सिद्ध. श्रीगणेशाय नमः ॥ आवरणोदकीं हाटकेश्वर । त्यास न घडे नम- स्कार । महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥ परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना । विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी ॥ २ ॥ सातां समुद्रांचे वेढे । उदंड भूमि पैलीकडे । शेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥ सात समुद्र बोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे । म्हणोनि विवेकीं असावें । साधुजनें ॥ ४ ॥ जें आपणास नव्हे ठावें । तें जाणत्यास पुसावें । मनोगतीनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥ जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥ मध्यें आहे भूमीचें पडळें । म्हणोन आकाश आणि पाताळ । तें पडळ न- सूतां अंतराळ । चहूंकडे ॥ ७ ॥ तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें । जेथें दृश्यमायेच्या नांवें । शून्याकार ॥ ८ ॥ दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास । मनातीत निराभास । विवेकें जाणावा ॥ ९ ॥ दृश्य- भास अवघा बिघडे । विवेकी तेथें पहुंडे । भूमंडळीं ज्ञाते । थोडे सूक्ष्मदृष्टी- चे ॥ १० ॥ वाच्यांश वाचेनें बोलांवा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा । नि- र्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनि योगें ॥ ११ ॥ नाना गुणांस आहे नाश । निर्गुण तें अविनाश । डोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥ जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें । श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥ अष्टधेचे जिन्नस नाना । उदंड पाहतां कळेना । अवघें सगत पिटावेना । कोणी एक ॥ १४ ॥ सगत सारिखी स्थिति झाली । तेथें परी- क्षाच बुडाली । चवी नेणतां कालविली । नाना अन्नें ॥ १५ ॥ टोणपा नव्हे गुणग्राहक । मूर्खास कळेना विवेक । विवेक आणि अविवेक । एकचि म्हणती ॥ १६ ॥ उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभ्यासचि बुडाला । नाना अभ्यासेंविण प्राणियाला । सुटका कैची ॥ १७ ॥ वेड लागोन झाले ओं- गाळ । त्यांस सारिखेंच वाटे सकळ । ते जाणावे बाष्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥ ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश । बहूर्च- १. पृथ्वीला उदकाचें जें आवरण आहे, त्यांत. २. पाताळांतील एक शिवाचें स्थान. ३. पडदा. ४. विसांवा घेतो. ५. अष्टधा प्रकृतीचे. ६. वाचाळ.
काँचया लोकांस । काय म्हणावें ॥ १९ ॥ ईश्वरें नाना भेद केले । भेदें स- कळ सृष्टि चाले । आंधळे परीक्षकवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥ जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाय । गुणचि नाहीं गौरवें¹ । येईल कैंचें ॥ २१ ॥ खरें खोटें एकचि झालें । तरी विवेकानें काय केलें । असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥ उत्तम वस्तूची परीक्षा । कैसी घडे नतद्रक्षा² । दीक्षाहीनापाशीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥ आपलेंन वोंग- ळपणें । दिशा³ करून शौच नेणे । वेदशास्त्रें पुराणें । त्यास काय करिती ॥ २४ ॥ आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार । आचार विचारें पैल- पार । पाविजेतो ॥ २५ ॥ जें नेमकास न कळे । तें बाष्कळास केव्हीं कळे । डोळस ठकती आंधळे । कोणत्या कामाचे ॥ २६ ॥ पाप पुण्य स्वर्ग नरक । अवघेंच मानिलें एक । विवेक आणि अविवेक । काय मानावे ॥ २७ ॥ अमृत विष एक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती । कुकर्मीं होते फ- जिती । सत्कर्मीं कीर्ति वाढे ॥ २८ ॥ इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्यविवेक । तेथें अवघें निरर्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥ म्हणोनि सत्संगति जावें । वेदशास्त्रांचि श्रवण करावें । उत्तम गुणास अभ्यासावें । नाना प्रयत्नें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके सिद्ध- निरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २९७.
दशक अठरावा.
१. बहु देवस्थान⁴.
श्रीगणेशाय नमः ॥ तुज नमूं गजवदना । तुझा महिमाहि कळेना । विद्या बुद्धि देसी जनां । लहान थोरांसी ॥ १ ॥ तुज नमूं सरस्वती । चारी वाचा तुझेनि स्फूर्ती । तुझें निजस्वरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥ धन्य धन्य चतुरानना⁵ । त्वां केली सृष्टिरचना । वेद शास्त्रं भेद नाना । प्रगट केले ॥ ३ ॥ धन्य विष्णु पालन करिसी । एकांशें सकळ जीवांसी । वाढ- १. महत्त्व. २. भिकाऱ्यास. ३. शौचविधि. ४. पुष्कळ देवस्थानें. ५. ब्रह्मदेवा.
१८ वा. ] बहु देवस्थान . ३८३
विशीं वर्तविशी । जाणजाणों ॥ ४ ॥ धन्य धन्य भोळा शंकर । जयाच्या देण्यास नाहीं पार । रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥ धन्य धन्य इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव । इंद्रलोकींचें वैभव । काय म्हणोन सांगावें ॥ ६ ॥ धन्य धन्य यमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म । प्राणिमात्रांचें वर्म । ठायीं पाडिती ॥ ७ ॥ व्यंकटेशीं महिमा किती । भले उभ्यां अन्न खाती । वडे धिरडीं स्वाद घेती । आतळेंस अपालांचा¹ ॥ ८ ॥ धन्य तूं वो बन- शंकरी । उदंड शाकांचीया हारी । विवरांविवरों भोजन करी । ऐसा कैंचा ॥ ९ ॥ धन्य भीम गोलांगुला³ । कोरवड्यांच्या² उदंड माळा । दहीं वडे खातां सकळां । समाधान होय ॥ १० ॥ धन्य तूं गा खंडेराया । भंडारें होय पिंवळी काया । कांदे भरीत रोडगे खाया । सिद्ध होती ॥ ११ ॥ धन्य तुळजा भवानी । भक्तांस प्रसन्न होते जनीं । गुणवैभवास गणी । ऐसा कैंचा ॥ १२ ॥ धन्य धन्य पांडुरंगा । अखंड कथेचा होतो धिंगा⁴ । तान मान राग रंगा । नाना प्रकारीं ॥ १३ ॥ धन्य तूं गा क्षेत्रपाळा । उदंड जनां लाविला चाळा । भावें भक्ति करितां फळा । वेळ नाहीं ॥ १४ ॥ रामकृष्णादिक अवतार । त्यांचा महिमा अपार । उपासनेस बहुत नर । त- त्पर झाले ॥ १५ ॥ सकळ देवांचें मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ । भू- मंडळीं भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६ ॥ नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरूपें झाला । भोक्ता सकळ वैभवाला । तोचि एक ॥ १७ ॥ याचा पाहतां विचार । उदंड लांबला जोजार । होती जाती देव नर । किती म्हणोनी ॥ १८ ॥ कीर्ति आणि अपकीर्ती । उदंड निंदा उदंड स्तुती । सर्वत्रांची भो- गप्राप्ती । अंतरात्म्यासचि घडे ॥ १९ ॥ कोणे देहीं काय करितो । कोणे देहीं काय भोगितो । भोगी त्यागी वीतरागी तो । एकचि आत्मा ॥ २० ॥ प्राणी साभिमानें भुलले । देहाकडे पाहत गेले । मुख्य अंतरात्म्यास चुकले । अंतरीं असोनी ॥ २१ ॥ अरे या आत्म्याची चळवळ पाहे । ऐसा भूमंडळीं कोण आहे । अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहीं एक ॥ २२ ॥ त्या अनुसंधानासारिसें । जळोन जा- इजे किल्बिषें⁵ । अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसें । विवरोन पाहती ॥ २३ ॥ अंतर्निष्ठ तितुके तरले । अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले । बाह्यात्कारें भरंगळले । लोकाचारें
१. एक पक्वान्न. २. उडदांचे पिठाच्या वड्या. ३. हनुमंता. ४. गजर. ५. पापें.
३८४ श्रीदासबोध. [ दशक ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके बहुदेवस्थान- निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. सर्वज्ञसंग. श्रीगणेशाय नमः ॥ नेणपणें झालें तें झालें । झालें तें होऊनि गेलें । जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥ जाणत्याची संगति धरावी । जा- णत्याची सेवा करावी । जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी । हळूहळू ॥ २ ॥ जाण- त्यापाशीं लिहों शिकावें । जाणत्यापाशीं वाचों शिकावें । जाणत्यापाशीं पुसावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥ जाणत्यास करावे उपकार । जाणत्या ऐसें झिज- वावें शरीर । जाणत्याचा पाहावा विचार । कैसा आहे ॥ ४ ॥ जाणत्याचे संग- तीनें भजावें । जाणत्याचे संगतीनें झिजावें । जाणत्याचे संगतीनें रिझावें । विवरविवरों ॥ ५ ॥ जाणत्यापाशीं गावें गाणें । जाणत्यापाशीं वाजवणें । नाना आलाप शिकणें । जाणत्यापाशीं ॥ ६ ॥ जाणत्याच्या कासेस लागावें । जाणत्याचें औषध घ्यावें । जाणता सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ ७ ॥ जाणत्यापाशीं परीक्षा¹ शिकणें । जाणत्यापाशीं तालीम करणें । जाणत्यापाशीं पोहणें । अभ्यासावें ॥ ८ ॥ जाणता बोलेल तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसें चालावें । जाणत्याचें ध्यान ध्यावें । नाना प्रकारीं ॥ ९ ॥ जाणत्याच्या कथा शिकाव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या । जाणत्याच्या गोष्टी विव- राव्या । सकळ कांहीं ॥ १० ॥ जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ उकलावे । जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥ ११ ॥ जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग । जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग । अभ्या- सावे ॥ १२ ॥ जाणत्याचा साक्षेप² घ्यावा । जाणत्याचा तर्क जाणावा । जा- णत्याचा उल्लेख³ समजावा । न बोलतांची ॥ १३ ॥ जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण । जाणत्याचें निरूपण । ऐकत जावें ॥ १४ ॥ जाणत्याचीं कवित्वें शिकावीं । गद्य पद्यें ओळखावीं । माधुर्य वचनें सम- जावीं । अंतर्यामीं ॥ १५ ॥ जाणत्याचे पाहावे प्रबंध⁴ । जाणत्याचे वचन- भेद⁵ । जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधावे ॥ १६ ॥ जाणत्याची तीक्षणता । १. कौशल्य. २. प्रयत्न. ३. अभिप्राय. ४. कविता. ५. वाक्चातुर्य.
१८ वा. ] निस्पृह. ३८५ जाणत्याची सहिष्णुता । जाणत्याची उदारता । समजोन घ्यावी ॥ १७ ॥ जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घसूचना । जाणत्याची विवंच- ना समजोन घ्यावी ॥ १८ ॥ जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अ- ध्यात्मविवेक । जाणत्याचे गुण अनेक । अवघेच घ्यावे ॥ १९ ॥ जाणत्याचा भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग । जाणत्याचा अवघा प्रसंग । समजोन घ्यावा ॥ २० ॥ जाणत्याचें पाहावें ज्ञान । जाणत्याचें शिकावें ध्यान । जा- णत्याचें सूक्ष्म चिन्ह । समजोन घ्यावें ॥ २१ ॥ जाणत्याचें अलिप्तपण । जाणत्याचें विदेहलक्षण । जाणत्याचें ब्रह्मविवरण । समजोन घ्यावें ॥ २२ ॥ जाणता एक अंतरात्मा । त्याचा काय सांगावा महिमा । विद्या कळा गुण- सीमा । कोणें करावी ॥ २३ ॥ परमेश्वराचे गुणानुवाद । अखंड करावा गुणसंवाद । तेणें करितां आनंद । उदंड होतो ॥ २४ ॥ परमेश्वरें निर्मिलें तें । अखंड दृष्टीस पडतें । विवरविवरों समजावें तें । विवेकी जनीं ॥२५॥ जितुकें कांहीं निर्माण झालें । तितुकें जगदीश्वरें निर्मिलें । निर्माण वेगळें स- मजलें । पाहिजे आधीं ॥ २६ ॥ तो निर्माण करितो जनां । परी पाहों जातां दिसेना । विवेकबळें अनुमाना । आणिंत जावें ॥ २७ ॥ त्याचें अ- खंड लागतां ध्यान । कृपाळूपणें देतो दर्शन । सर्वकाळ संभाषण । तेंदांशेंचि करावें ॥ २८ ॥ ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त । सं- सारापासून तो मुक्त । भक्तांस करी ॥ २९ ॥ उपासनेचे शेवटीं । देवां भक्तां अखंड भेटी । अनुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके सर्वज्ञसंगनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. निस्पृह. श्रीगणेशाय नमः ॥ दुर्लभ शरीरीं दुर्लभ आयुष्य । याचा करूं नये नाश । दास म्हणे सावकाश । विवेक पाहावा ॥ १ ॥ न पाहतां उत्तम विवेक । अवघा होतो अविवेक । अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥ हें आपलें आपण केलें । आळसें उदास नागविलें । वाईट संगतीनें बुड- १. सहनशीलता. २. दूरदृष्टि. ३. देहाभिमान नसणें. ४. त्यासंबंधांच.
३८६ श्रीदासबोध. [ दशक विलें । देखत देखतां ॥ ३ ॥ मूर्खपणाचा अभ्यास केला । बाष्कळपणें घातला घाला । काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥ मूर्ख आळसी आणि तरुणा । सर्वांविषयीं दैन्यवाणा । कांहीं मिळेना कोणा । काय म्हणावें ॥ ५ ॥ जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्न वस्त्र तेंहि नाहीं । उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥ बोलतां येइना बैसतां येइना । प्रसंग कांहींच कळेना । शरीर मन हें वळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥ लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं । नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणें ॥ ८ ॥ आपणास कांहींच येईना । आणि शिकविलेंहि मानेना । आपण वेडा आणि सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥ अंतरीं एक बाहेरी एक । ऐसा जयाचा दंडक १ । परलोकाचें सार्थक । कैसें घडे ॥ १० ॥ आपला संसार नासला । मनामध्यें पस्तावला । तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवे- काचा ॥ ११ ॥ एकाग्र करूनियां मन । बळेंच धरावें साधन । यत्नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥ अवगुण अवघेचि सांडावे । उत्तम गुण अभ्यासावे । प्रबंध पाठ करीत जावे । जाड अर्थे ॥ १३ ॥ पदप्रबंध श्लोकप्रबंध । नाना घाटी मुद्रा छंद । प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥ कोणे प्रसंगीं काय म्हणावें । ऐसें समजोन जाणावें । उगेंच वाउगें शिणावें । कासयासी ॥ १५ ॥ दुसऱ्याचें अंतर जाणावें । आदर देखोन म्हणावें । जें आठवेल तें गावें । तेंचि मूर्खपण ॥ १६ ॥ ज्याची जैसी उपासना । तेंचि गावें चुकावें ना । रागज्ञान तालज्ञाना । अभ्यासावें ॥ १७ ॥ साहित्य संगीत प्रसंगमानें । करावी कथेचीं घमशानें २ । अर्थांतर श्रवण मननें । काढीत जावें ॥ १८ ॥ पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें । सांगीतले गोष्टीचें असावें । स्मरण अंतरीं ॥ १९ ॥ अखंड एकांत सेवावा । ग्रंथमात्र धांडो- ळावा । प्रतीत येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके निस्पृहनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. देहदुर्लभता. श्रीगणेशाय नमः ॥ देहाकरितां ३ गणेशपूजन । देहाकरितां शारदा४-वंदन । १. वागणूक. २. लयलूट. ३. देहाच्या अस्तित्वावर. ४. सरस्वती.
१८ वां. ] 'देहदुर्लभता. ३८७ देहाकरितां गुरु सज्जन । संत श्रोते ॥ १/॥ देहाकरितां कवित्वें चालती । देहाकरितां अध्ययनें करिती । देहाकरितां अभ्यासिती । नाना विद्या ॥२॥ देहाकरितां ग्रंथलेखन । नाना लिपी वोळखण । नाना पदार्थ शोधन । देहाकरितां ॥ ३ ॥ देहाकरितां महाज्ञानी । सिद्ध साधु ऋषि मुनी । देहा- करितां तीर्थाटणीं । फिरती प्राणी ॥४॥ देहाकरितां श्रवण घडे । देहाकरितां मननीं पवाडे । देहाकरितां देहीं आतुडे । परमात्मा ॥५॥ देहाकरितां कर्ममार्ग । देहाकरितां उपासनामार्ग। देहाकरितां ज्ञानमार्ग । भूमंडळीं ॥६॥ योगी वीत- रागी तापसी । देहाकरितां नाना सायासी । देहाकरितां आत्मयासी । प्रग- टणें घडे ॥७॥ इह लोक आणि परलोक । देहाकरितां सकळ सार्थक । देहा- विण निरर्थक । सकळ कांहीं ॥८॥ पुरश्चरणें अनुष्ठानें । गोरांजनें धूम्रपानें । शीतोष्ण पंचाग्निसाधनें । देहाकरितां ॥ ९ ॥ देहाकरितां पुण्यशीळ । देहा- करितां पापी केवळ । देहाकरितां अनर्गळ । ५शुचिष्मंत ॥ १०॥ देहाकरितां अवतारी । देहाकरितां वेषधारी । नाना बंडें पाषांडें करी । देहाकरितां ॥११॥ देहाकरितां विषयभोग । देहाकरितां सकळ त्याग । होती जाती नाना रोग । देहाकरितां ॥१२॥ देहाकरितां नवविधाभक्ती । देहाकरितां चतुर्विधामुक्ती । देहाकरितां नाना युक्ती । नाना मतें ॥ १३ ॥ देहाकरितां दान धर्म । देहाकरितां नाना वर्म । देहाकरितां पूर्वकर्म । म्हणती जनीं ॥१४॥ देहा- करितां नाना स्वार्थे । देहाकरितां नाना अर्थ । देहाकरितां होइजे व्यर्थ । आणि धन्य ॥ १५ ॥ देहाकरितां नाना कळा । देहाकरितां उणा आगळा । देहाकरितां जिव्हाळा । भक्तिमार्गाचा ॥ १६ ॥ नाना सन्मार्ग साधनें । देहाकरितां तुटती बंधनें । देहाकरितां निवेदनें । मोक्ष लाभे ॥ १७ ॥ देह सकळांमध्यें उत्तम । देहीं राहिला आत्माराम । सकळां घटीं पुरुषोत्तम । विवेकी जाणती ॥१८॥ देहाकरितां नाना कीर्ती । अथवा नाना अपकीर्ती । देहाकरितां होती जाती । अवतारमालिका ॥ १९ ॥ देहाकरितां नाना श्रम । देहाकरितां नाना संभ्रम । देहाचेनि उत्तमोत्तम । भोगिती पदें ॥२०॥ देहाकरितां सकळ कांहीं । देहाविण कांहीं नाहीं । आत्मा विरे ठायींचा १. प्राप्त होतो. २. वैराग्यशील. ३. भगवत्प्रीत्यर्थ आपणास जाळून घेणें. ४० आचारशून्य. ५. सदाचारी. ६. दशक ४ पहा. ७. समारंभ.
३८८ श्रीदासबोध. [ दशक ठायीं । नव्हता जैसा ॥ २१ ॥ देह परलोकींचें तारूं । नाना गुणाचा आगरू १ । नाना रत्नांचा विचारू । देहाचेनी ॥२२॥ देहाचेनि गायनकळा । देहाचेनि संगीतकळा । देहाचेनि अंतर्कळा । ठायीं पडे ॥ २३ ॥ देह ब्रह्मा- डाचें फळ । देह दुर्लभचि केवळ । परि देहास निवळ । उमजवावें ॥ २४ ॥ देहाकरितां लहान थोर । करिती आपुलाले व्यापार । त्यांहीमध्ये लहान थोर । कितीएक ॥ २५ ॥ जे जे देह धरोन आले । ते ते कांहीं करून गेले । हरिभजनें पावन झाले । किती ५ क ॥ २६ ॥ अष्टधा प्रकृतीचें मूळ । संक- ल्परूप २ चि केवळ । नाना संकल्प देहफळ । घेऊनि आले ॥ २७ ॥ ४ हरिसं- कल्प मुळीं होता । तोचि फळीं पाहावा आतां । नाना देहांतरीं तत्त्वता । शोधितां कळे ॥ २८ ॥ वेलाचे मुळीं बीज । उदकरूप वेली समज । पुढें फळामध्यें बीज । मुळींच्या अंशें ३ ॥ २९ ॥ मुळाकरितां फळ येतें । फळा- करितां मूळ होतें । येणें रीती होत जातें । भूमंडळ ॥३०॥ असो कांहींएक करणें । कैसें घडे देहाविणें । देह सार्थकीं लावणें । म्हणिजे बरें ॥ ३१ ॥ आत्म्याकरितां देह झाला । देहाकरितां आत्मा तगला । उभययोगें उदंड चालिला । कार्यभाग ॥३२॥ चोरून गुप्तरूपें करावें । तें आत्म्यास पडे ठावें । कर्तृत्व याचेनि स्वभावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥ देहामध्यें आत्मा असतो । देह पूजितां आत्मा तोषतो । देह पीडितां आत्मा क्षोभतो । प्रत्यक्ष आतां ॥ ३४ ॥ देहावेगळी पूजा पावेना । देहाविण पूजा फावेना । जनीं जनार्दन म्हणोनि जनां । संतुष्ट करावें ॥ ३५ ॥ उदंड प्रगटला विचार । धर्मस्थापना तदनंतर । जेथें पूजेसि अधिकार । पुण्यशरीरीं ॥ ३६ ॥ सगट भजन करूं येतें । परी मूर्खपण अंगीं लागतें । गाढवास पूजितां कळतें । काय त्याला ॥३७॥ पूज्य पूजेसि अधिकार । उगेचि तोषवावे इतर । दुखवूं नये कोणाचें अंतर । म्हणिजे बरें ॥३८॥ सकळ जगदंतरींचा देव । क्षोभतां राहावया कैंचा ठाव । जनांवेगळा जनांस उपाव । आणिक नाहीं ॥ ३९ ॥ परमेश्वराचे अनंत गुण । मनुष्यें काय सांगावी खुण । परंतु अध्यात्मग्रंथ- श्रवण । होतां उमजे ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादश- दशके देहदुर्लभतानिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ १. खाण. २. स्फूर्तिरूप. ३. वासनेमुळें. ४. ईशसंकल्प. ५. महात्मे.