सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
७६ सार्थ तुकारामगाथा हा रानभर पळायला लावतो त्याच्या पाठीमागे धूम ठोकून जो पळेल तोच खरा शहाणा श्रीहरी माय आम्हा सर्वांचे घास एकटीच खाते या सर्व सुखांना आपण मुकलो म्हणून इंद्रादी देव हायहाय करू लागले ५ सर्व गोपाळ मग काल्याच्या घासांचाच खेळ खेळू लागले घासाने एकमेकाना मारायला लागले कुणी कुणाच्या तोंडावर, दुसऱ्यावर मारू लागले श्रीहरीला हा मार सहन होईना, तेव्हा आता पुरे असे तो म्हणू लागला मी आता फार दमलो आता आपण नियमास धरून आपले खेळ खेळू या श्रीकृष्णाच्या या सांगण्याचा सर्वांनी आदर केला ६ मग सर्व गोपाळांनी मोठ्या आनंदाने फेर धरले व मध्यभागी श्रीहरीला बसविले नंतर प्रत्येकेजण फेर धरत राहिले. काही जणांनी शिंगे, पावे वाजविण्यास सुरुवात केली या सोबत्यात काही गोपाळ वाकडे होते, काही बोबडे होते काही खोटे, लुळेही होते परंतु हे सर्व फार भाविक असल्यामुळे श्रीकृष्णाला फार प्रिय होते ७ त्याची भावपूर्ण तोंडे पाहून श्रीकृष्ण त्यांचे कौतुक करू लागला हे सर्व सुख पाहून श्रीकृष्ण खळखळून हसू लागला एकमेकांचे उष्टे खाण्यासही कुणास वीट वाटेनासा झाला काही थोडे संकोच धरणारे होते, पण त्यांनाही श्रीहरीने आपल्या संगतीने धीट बनविले ८ ज्यांची अजून भूक गेली नाही त्यांची मुखे उघडवून तो हरी सर्वांना सुख सारख्या प्रमाणात देतो मग सर्वजण म्हणत राहिले की, श्रीकृष्णा, तू फार चांगला, फार चांगला आहेस रे, तुझी संगत फार चांगली, आता तू जरी आम्हास फसविलेस तरी आम्ही दुसऱ्या कुणाही बरोबर जाणार नाही ९ श्रीहरी व गोपाळ यांचा हा आनंदप्रसंग पाहून गाई चारा खाण्याचा विसरून गेल्या पक्षी व वनातील इतर पशू यांचेही चारा खाणे बंद झाले यमुनेचे पाणी स्थिर झाले, त्याचा प्रवाहच जणू श्रीकृष्णस्मरणात थांबला हे सर्व प्रकार देवांनी पाहिले व त्याच्या तोंडात पाणी सुटले, व ते म्हणू लागले की यमुनेच्या तीरावरस्ते हे गोपाळ किती धन्य आहेत, आमचा जन्म मात्र फुकट धिक्कार असो त्याला १० मग ते स्वर्गातील देव म्हणू लागले, काय करावे, कसे करावे ? काल्याचा भाग भक्षण करण्यासाठी आपण यमुनेच्या पाण्यातील मासे व्हावे असे त्यांना वाटले या संकल्पास अनुसरून सर्व देव मत्स्यरूपांनी यमुनेच्या तीरावर आले सर्व किनारा भरून गेला तेव्हा हे खटपाळ गोपाळ अधिकच प्रमाणात आपले ओठ मटामटा वाजवून त्यांना हिणवू लागले ११ मोठ्या आनंदाने गोपाळांसह श्रीकृष्ण खेळ खेळू लागले आणि त्यांनी कुणीही आपले हात यमुनेत धुवू नका (कारण या मत्स्यांना काल्याचा शेष उगाच मिळेल) असे सांगितले त्यावर हा कृष्ण बरोबर आमच्या मनातले ओळखतो असे गोपाळ म्हणू लागले श्रीकृष्णाच्या हातच्या काल्याचा भाग जे आपल्या थोरवीमुळे लाजणारे आहेत त्यांना कसा मिळणार ? १२ आजचा दिवस व काळ किती धन्यतेचा आहे, कारण आज श्रीकृष्ण परमात्मा आम्हास भेटला देवा, तुझ्या हातामधून आज आम्हात काल्याचा प्रसाद मिळाला म्हणून आम्ही आज संतुष्ट झालो एकमेकाच्या संगतीत हे गोपाळ सोंगडी फार सुखावले नाना प्रकारांनी यानी इही पोटभर संतुष्ट होऊन खाल्ले असल्याने ते तृप्त झाले १३ देवा, तुझी ही चांगली संगत आम्हास नेहमी असावी अशाच प्रकारे नित्य जीवांना आनंद देऊन आम्हांस चालवावे त्यावर तो वनमाळी सर्व गोपाळांना म्हणाला, चला रे आपापल्या काठ्या, कावळ्या घ्या आपण सर्वजण खळीमेळीने गाई चारायला निघू या आता १४ तुकाराम महाराज म्हणतात, आज मोठा ब्रह्मानंद झाला त्याचे वर्णनही करता येणार नाही आज या श्रीकृष्णाने सर्व गाईंना व गोपाळांना आपल्यासारखच करून टाकले १५ आज केवढा आनंद झाला आहे प्रत्यक्ष परब्रह्मदच आपल्याबरोबर आज उभा आहे १६ १४९ या हो या चला जाऊ सकळा । पाहो हा सोहळा आजि वृदावनींचा ॥ १ ॥ वाहिला गोपाळें वेणुनाद पडे कानी । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ २ ॥ उरले ते सांडा काम नका करू गोवी । हेचि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥ ३ ॥ निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता । बोलती ते आता घरचीं सोसूं वाईट ॥ ४ ॥ कृष्णभेटीआड कांहीं १नावडे आणीक । लाज तरी लोक मन जाले उदास ॥ ५ ॥ एकाएकीं चालियेल्या सादावीत सवे । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥ ६ ॥ १ न साहे
सार्थ तुकारामगाथा ७७ शब्दार्थ व टीपा - वाइला-वाजविला, गोवो-गुतवण, सादावीत-सावध करीत अर्थ - चला, याज सर्वजण वृंदावनातील सोहळा पाहण्यासाठी जाऊ या १ या ठिकाणी श्रीकृष्ण मुरली वाजवीत आहे ती आपल्या कानी येईल चला, मला काही धीर निघत नाही, माझे चित्त आज भारी चंचल झाले आहे २ जे हातात काम धरले असेल ते टाकून द्या त्यात मग गुंतवू नका कारण, श्रीकृष्णास भेटण्याची हीच एक वेळ आहे ३ त्या श्रीकृष्णाला पाहताच डोळे निवतील घरची माणसे यासाठी काही वेडेवाकडे बोलतील तर ते सहन करू ४ कारण कृष्णाच्या भेटीआड जे येईल ते काही मला आवडणार नाही त्याच्या भेटीविषयी लाज कसली? या लाजेसबंधीच माझे मन उदास झाले आहे मी लज्जेची पर्वा करणार नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, एकमेकींना सावध करीत त्या सर्व एका मेळ्याने श्रीकृष्णाकडे निघाल्या त्या श्रीकृष्णाने आपल्या ठिकाणी त्यांना तन्मय करून सोडले आहे ६ फुगड्या-अभंग २ १५० फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज साडोनि एक एकी पाहे ॥ १ ॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरोच गोडी गे संसार तोडी गे ॥ २ ॥ मागें जें शिकली होतीस पोटीं । तेंचि विचारूनि आता उच्चारी ओठीं ॥ ३ ॥ त्रिगुणाची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि घरी घाली मूळबदीं गाठी ॥ ४ ॥ आगळें पाऊल जिके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥ ५ ॥ तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुके बार घेऊ पावो उच्च ठाव ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - मूळबद-योगातील एक क्रिया, टाचेने गुदद्वार दाबून, संकोचित करून अपानवायूची गती वरच्या दिशेस करणे, तुके-वजनाने, बार-खेप अर्थ - प्रपंचरूपी फुगडी घालीत असताना तू बाह्य वस्तूंविषयी कसलीही ममता न धरता निसंग होऊन उघडी राहा सर्व प्रकारची लाज सोडून त्या एका परमेश्वराकडे एकरूपतेने तू पाहा १ या फुगडीच्या नादाने तू प्रपंचातील बाह्य उपाधी साऱ्या मोडून टाक, संसारातील बाह्य गोष्टींचा संग सोडलास तरच या फुगडीची गोडी तुझ्या ध्यानात येईल २ मागे अध्यस्त असताना जो एकात्मतेचा भाव तू शिकली होतीस तो तुझ्या जवळ होताच, त्याचाच विचार करून आपल्या ओठातून तू उच्चार कर ३ ही फुगडी खेळताना त्रिगुणाची वेणी तुझ्या पाठीवर एकसारखी उडत असते, ती नीट सावरून धर यासाठी योगमार्गातील मूळबदादि क्रिया कराव्या लागल्या तरी तू कराव्यास ४ या फुगडीच्या खेळातील तुझे एक पाऊल पुढे पडेल तसे तू जिंकून घेशील एकरूप होण्यात तुला यश मिळेल तुला मान मिळेल तिन्ही लोक तुला मान देतील ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या माझ्या- मध्ये एकच आत्मरूप भाव आहे या खेपेस आता अशा आत्मरूपाची अनुभूती घेऊन तुझ्या बरोबरीने आम्ही उंचावले जाऊ ६ १५१ फुगडी फू सवती माझे तू । हागुनि भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावरि थू ॥ १ ॥ फुगडी घेता आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ २ ॥ हात पाय बेंबळ जाती । दुगण घोळिता लागे माती ॥ ३ ॥ सात पाच आणिल्या हरी । याचुनी काय तगसी पोरी ॥ ४ ॥ सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥ ५ ॥ तुका म्हणे आझुन तरी । सांगितले ते घडडी करी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - हरी-पराभव, जगनोवरी-जगाशी सबंध ठेवणारी नवरी, बेंबळ-ढिले, सात-सप्त धातू, पाच-पंचमहाभूते.
७८ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- या फुगडीमध्ये देहादी वृत्तींच्या मागे लागणाऱ्या सवतीशी तू गडी फू कर. त्याच्या नादाने जो वाईट क्रियाकर्म झाली ती तुलाच धुवून काढावी लागतील. नाही तर तुझ्या ढुंगणावर व तोंडावर आम्ही थुंकू. १ ही प्रपंचरूप फुगडी खेळताना तुला जरी पराभव झाल्यासारखा वाटला तरी सर्व जगाशी संबंध ठेवणाऱ्या नवऱ्या मुलीप्रमाणे तू होऊ नकोस. ऊठ, सावध होऊन त्या श्रीहरीस शरण जा. २ ही आजची वेळ जर जाईल तर तुझे हातपाय ढिले पडतील. तू वाटेल तशी वागलीस तर तुझ्या अंगास फक्त मातीच लागेल. ३ तू सप्तधातू व पंच- महाभूते यांना जिंकून आणल्याखेरीज या प्रपंचरूप फुगडीत टिकणार नाहीस पोरी ४ आताच पहा, तुझ्या अंगातील सर्व शक्ती संपली असून तुझे पायही पांगुळले आहेत. तरी अजूनही तू या प्रपंचात काय घोळून राहिली आहेस? गुरफटून राहिली आहेस ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे गधडे, अजून तरी मी जे सांगतो आहे ते कर ना ६
लखोटा-अभंग १
१५२ लये लये लखोटा । मूळबंर्दि कासोटा । भावा केलें साह्यें । आतां माझें पाहें ॥ १ ॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥ २ ॥ अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं झांडे । जग झोडी रांडे ॥ ३ ॥ बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥ ४ ॥ पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥ ५ ॥ आतां उभी ठायीं । उभाउर्भी पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥ ६ ॥ नामा केलें खरें । आपुलें म्या घरें । तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- लये-अनुसंधानाची एकरूपता निका-उत्तम, झांड-निलाजरी, गोहो-पती, डोल-रूप.
अर्थ - योगमार्गातील मूळबंधादि क्रियांचा कासोटा घालून व सर्व वृत्तींच्या अनुसंधानाचा परमेश्वराशी लय साधून मी ही लखोट्याची क्रीडा करीत आहे. माझ्या भाववृत्तींचे साह्य मी घेतले असल्यामुळे माझी क्रीडा आता पाहाच. १ माझी वृत्ती आता जीवपणास मुकून ताबडतोब ईश्वरस्वरूपातच गुंतून राहिली. माझे धैर्य पाहा किती उत्तम आहे उगाच पोकळ बडबड तू आता सोडून दे. २ तूही याच श्रीहरीचा अंगिकार कर. उगाच जन्म- मरणाच्या फेऱ्यात अडकू नकोस. साऱ्या जगाची उठाठेव करणाऱ्या रांडे, भाडतोर वये, थोडीशी तरी लाज तू मनात धर ना. ३ तू श्रीहरीच्या भक्तीचाच फक्त आश्रय कर; माझी गोष्ट ऐक नीट. देहाभिमानाचा तू जो पती केला आहेस तो सोडून टाक; व या श्रीहरीच्या ठिकाणीच प्रेम ठेव. ४ पाठमोरी होशील तर तुझी अवस्था कठीण होईल. तुला कंप सुटेल, व्यर्थ बडबड तुला आवरावी लागेल व बाळे, बाह्य वृत्तींत तू रमून राहशील तर पुढे फार कठीण स्थिती प्राप्त होईल. ५ आताच या ठिकाणी उभी आहेस तोच त्या श्रीहरीकडे जा. उगाच पुढे डुक्कर, गाढव, कुत्री यांच्या जन्मास जाऊ नकोस. ६ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या नामाने माझे मी कल्याण करून घेतले आहे; पण इतर मुली मात्र त्यांचे चित्त देहावर व प्रपंचावर असल्यामुळे पळून गेल्या. ७
सार्थ तुकारामगाथा ७९ हुंबरी-अभंग १ १५३ तुझीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ १ ॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥ २ ॥ चेंडुयासवें घातली उडो । नाथिला काळिया देउनि बुडी ॥ ३ ॥ अशुद्ध पीता करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥ ४ ॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥ ५ ॥ जाणों तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥ ६ ॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुक्यास्वामी सारंगधरू ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- हुंबरी-तोडाने एका प्रकारपा आवाज करून खेळावयापा खेळ, साही-सहा शास्त्रे, अठरा-अठरा पुराणे, चारी-चार वेद, शेष-नाग, नाथिला-कपटी केला, अशुद्ध-रक्त, माउशी-पूतना मावशी, मामा-कस, सारंग-एव' धनुष्य. अर्थ :- देवा, तुझ्याशी हुंबरीचा खेळ कोण रे खेळू शकणार ? तुझे सामर्थ्य वर्णन करताना चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणेही थकली. १ हरी, एवढा सहस्र मुखाचा शेषनाग, तोही तुझे वर्णन करताना शिणून गेला. २ गोकुळात यमुनेच्या तीरावर चेंडूफळीचा खेळ खेळत असताना चेंडु यमुनेच्या डोहात पडला, तेव्हा तूच यमुनेत उडी घेतलीस व तेथील दुष्ट कालिया नागाचा पराभव केलास. ३ तुला मारण्यासाठी स्तनाना विष लावून ती पूतना मावशी आली असताना तू तिचे रक्त प्राशन करून तिला मारलेस. तुला कशी करुणा अगदी येत नाही रे ? ४ रामावताराच्या वेळी तू त्या रावणाचे घर बुडविलेस, त्याची बायकामुले मारून टाकलीस. ५ तू किती कठिण हृदयाचा आहेस हे आम्हास माहित आहे. या अवतारात तू आपल्या कंस मामालाही ठार मारलेस. ६ तुकाराम महाराज म्हणतात, सारंग नावाचे धनुष्य धारण करणाऱ्या या ईश्वराशी खेळ खेळताना असाच मोठा नाश होतो. कधी देहाहम्बुद्धीच्या वृत्तीचा नायनाट होतो. ७ हमामा-अभंग २ १५४ मझीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥ १ ॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ २ ॥ मझीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥ ३ ॥ तरीच मझीं बोल । पोरा जिव्हाळघाची ओल ॥ ४ ॥ मझीं घेता भास । जीवा मीतूपणा नास ॥ ५ ॥ मज सर्वै खरा । पण जाऊं नेदी घरा ॥ ६ ॥ आमुचिये रंगीं । तुजें तगे ना ये संगीं ॥ ७ ॥ तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥ ८ ॥
८० सार्थ तुकारामगाथा तू बोल. ४ माझ्यापुढे शपथ घेताना पोरा मी तूरणाचा माझ व्हायला हवा. ५ तू माझ्याबरोबर येशील तर मी तुला प्रपंचादिक मुलांसाठी परत घरी जाऊ देणार नाही. ६ आमच्या या अद्वैताच्या रंगात दुजेपणाचा भाव टिक- णारच नाही. ७ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा माझ्याबरोबर प्रतिज्ञा केली म्हणजे श्रीहरी जीवदशेचा नाश करून सर्वच सुखमय करून सोडतो. ८ १५५ हुमामा रे पोरा हुमामा रे। हुमामा घालितां ठकले पोर । करी येरझार चौऱ्याशीची ॥ १ ॥ पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतले ॥ देखोनि गडी तें विसरले । डाईं पडिले आपणची ॥ २ ॥ दुसऱ्या पहारा महा आनंदें । हुमामा घाली छंदछंदें । दिस वाढे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥ ३ ॥ तिसऱ्या पहारा घेतला बार । अहंपणें पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥ ४ ॥ चौथ्या पहारा हुमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुऱ्यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडसील डाईं ॥ ५ ॥ हुमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक विठोबा त्यासवें चारितो गाई ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठकले-फसले, पहारा-वेळेस, सुऱ्या पाटिलाचा-मूर्ख या पाटलाचा अर्थ :- पोरा, हुमामा खेळ खेळ रे. हुमामा हुमामा म्हणताना व खेळताना हे पोर फसून गेले आहे चौऱ्यांशी लक्ष योनींच्या फंदात सापडले. १ गर्भावस्थेच्या पहिल्या अवस्थेत मोठा रंग आलेला होता, त्यावेळी पोरा, तू सोहं सोह-तो मी आहे तो मी आहे, असा छंद घेतलास, पण संसारातील इतर गडी पाहून तू हा छंद विसरलास या डावात आपण होऊन सापडलास २ दुसऱ्या बालपणाच्या वेळी तू मोठया आनंदात होतास, स्वच्छंदाने हुमामाचा खेळ खेळत राहिलास. जसजशी वाढ होऊ लागली तसतसे तुला बरे वाटले, पण पोरा, पुढे काय आहे हे तुला काय माहित ? ३ तिसऱ्या तारुण्याच्या अवस्थेत याने मी वेगळा, निराळा असा देहबुद्धीच्या अहंपणाचा ध्यास घेतला. त्यामुळे याचा पाय स्थिर राहीना, तो सारखी संसाराची उठाठेव करू लागला. त्याने नाना विषयाचा सोस केल्यामुळे तो या डावात पुरता सापडला; हे खरेच समजावे. ४ मग चौथ्या अवस्थेत वृद्धपणा आल्यावर त्याचा हुमामा निराळाच सुरू होतो त्याचे हातपाय कापू लागतात सूर्याजी पाटलाचा पोर यम त्याच्या तावडीत सापड- ण्याची वेळ जवळ आलेली असते. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देहादी प्रपंचाशी हुमामा खेळताना मी भीत असतो. मी या सर्व गड्याचा सबंध सोडून गोकुळातील यादवाचा तो एक मूल जो विठोबा त्यालाच मित्र करून त्याच्या गाई मी वळण्याचे, चारण्याचे काम करतो. ६ गाई-अभंग १ १५६ आम्हां घरी एक गाय दुभता हे। पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥ १ ॥ वान ते सांयळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ २ ॥ वत्स नाहीं माय भलत्या सवे जाय । कुर्याळी तो लाहे भावभरणा ॥ ३ ॥ चहूं थारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥ ४ ॥ तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥ ५ ॥
सार्थ तुकारामगाथा ८१ शब्दार्थ व टीपा - दुभताहे-दूध देणारी आहे, न समाये-मावत नाही, थान-वर्ण, रग, वसुंधरा-पृथ्वी, भलत्या-कुणाही, जोगविते-पोसते अर्थ - आमच्या घरी एक दुभती गाय असून तिचा पान्हा सर्व त्रिभुवनांत मावत नाही १ तिचा रंग काळसर असून तिचे नाव धोधर असे आहे ती पृथ्वी व चौदा भुवनात चरत असते, हिंडत असते २ तिला स्वतःला वासरु नसल्याने ती कोणाही भक्ताबरोबर जाते जो तिला प्रेमाने कुरवाळतो त्याला ती कृपेचे दूध भरपूर देते ३ या गाईच्या चार स्तनांतून चार धारांनी कृपेचे दूध भरपूर मिळते याच दुधावर सनकादिक ऋषिमुनी व सिद्धलोक संतुष्ट झाले आहेत ४ तुकाराम महाराज म्हणतात अशा ठिकाणी माझी एवढीशी भूक काही विशेप नाही, कारण ही अदभुत धेनू तीनही लोकांची जोपासना करणारी आहे ५ कांडण-अभंग २ १५७ सिद्ध करूनिया ठेविले कांडण । मज सागातीण शुद्ध बुद्धि गे ॥ १ ॥ आठव हा घरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं शेवटिचा गे ॥ २ ॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी ॥ मी तुजमिळणी जय मिळे ॥ ३ ॥ एक कक्षी पाखडी दुसरी निवडी । नि शेष तिसडी ओज करी ॥ ४ ॥ सरले कांडण पाकसिद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचे ॥ ५ ॥ उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥ ६ ॥ तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तातडी मूळ केले ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - सम तुके-समानपणाची अर्थ - आत्मा-अनात्माभावाचे कांडण मी तयार करून ठेविले आहे कांडण करण्यासारख्याच या गोष्टी आहेत माझी विवेकबुद्धी हीच या कामी माझी मैत्रीण आहे तिच्या साहाय्याने मी हे कांडण करीत आहे १ ही आठवण मनात धरूनच अग्रे, मला रात्रीच्या शेवटच्या प्रहरी म्हणजे पहाटेसच तू जागे कर २ हे मैत्रिणी, तू सर्वत्र समत्वबुद्धी धरूनच या कांडणासाठी घाव घाल तर तुझी व माझी जुळणी एकरूपाची होईल ३ या शुद्धबुद्धीने मी माझ्या वृत्तीने किंवा देहात्मभावाचे कांडण करताना एकदा पाखडीन, एकदा निवडीन, एकदा सडून काढीन, मग मात्र बुद्धी तेजस्वी होईल ४ एवढे झाले की मग कांडण संपेल नंतर स्वयंपाक तयार होईल खीर व साखर याची मिळणी आत्मज्ञान व सुखानुभूती याच्या स्वरूपात होईल ५ आणि या अलौकिक प्रसंगी उद्धव व अक्रूर हे श्रीकृष्ण सखे व प्रत्यक्ष नारायण भोजनास येणार आहेत ६ तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या माहेरच्या माणसांची मोठीच आवड असल्यामुळेच तातडीने ते सगळेजण मला बोलवावयाला आले आहेत ७ १५८ सावधों कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥ १ ॥ मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सावरोनि थिरों घाव घालीं ॥ २ ॥ वाजती काकणे अनूहात गजरे । छंद माहियेरे गाऊ गीति ॥ ३ ॥ कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तो ॥ ४ ॥ तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - सावडीं-सावध थिरों-स्थिर बुद्धीन, अनुहात-अखंड ध्वनी अर्थ - नारायणाची ओवी गात गात आता तू हे कांडण आबर व आता यातील भुसा कोणता, व आत्मा- नुभूतीचे सार कोणते याचा निवाडा करू १ तू आता मुसळ असेच वरचे वर धर व नीट मन, बुद्धी, इद्रियादी वृत्ती यांना आवरून स्थिर चित्ताने घाव घाल २ त्यावेळी तुला अनुभव येईल की सोहच्या अनुभूतीचा ध्वनी तुझ्या वृत्तिरूप काकणातूनच तुला ऐकू येईल याच स्वरानी माहेरच्या आईबापाना आपण गाणे गाऊ ३ जोपर्यंत या तु गाथा ११
८२ सार्थ तुकारामगाथा कांडाशामध्ये मी-तूषणाचा दुजाभाव निर्माण झालेला नाही तोपर्यंत हे कांडण कांडताना कुठलाच त्रास होणार नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, जसा आरसा असेल तसेच आपले रूप त्यात उमटेल त्याप्रमाणे जशी आपली तयारी असेल तसा परमात्मस्वरूपाच्या स्वानुभूतीचा स्वयंपाक शुद्ध व सात्त्विक होईल. ५
आडसण-दळण-अभंग १
१५९ शुद्धीचें सरोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥ १ ॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलेँ ॥ २ ॥ सुपीं तोंचि पाहें घड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥ ३ ॥ सुपीं तोंचि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥ ३ ॥ सुपीं तोंचि संग घेई घडकुडी । एकसा घडडी नास केला ॥ ५ ॥ दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥ ६ ॥ सुपीं तोंचि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- आडसण-सुपाने वेगळे काढलेले स्वच्छ दाणे; उगटिले-वाईट; घडकुडो-खरोखर; वोज- काळजी; सांदीस-कोपऱ्यात.
अर्थ :- शुद्ध केलेले दळण बाजूस सारून उरलेले जात्याच्या पाळीत भरून ठेवले व हे ओंगळ किंवा वाईट असणारे प्रभूच्या नामाने भरडून काढले. १ हे साजणी, आता तू हे दळण आडसून नीट स्वच्छ करून ठेव. पापिणी, हे चांगले तयार होत असलेले दळण तू नाश करू नकोस. २ जोपर्यंत हे सुपात आहे, तोपर्यंत तू ते चांगलें की वाईट हे नीट पाहा नाही तर निलाजरे बये, तू सर्वांचाच नाश करून टाकशील ३ जोपर्यंत हे दळण सुपात आहे, जोवर जीव देहात आहे तोपर्यंत तुझी त्यावर सत्ता आहे; मग मात्र, म्हणजे दळण संपल्यावर मात्र कर्मगतीप्रमाणेच तुला त्याचे भोजनरूपाने फळ मिळेल. ४ तेव्हां बरोबर, हे दळण सुपात आहे तोच त्याची संगत धरून नीट त्याचे रूप ओळखून घे. नाही तर गधडे, या मनुष्यदेहाचा नाश करशील. ५ नाही तर देहात्मबुद्धीचे दळण दळतानाच अनेक वेळा मग जन्ममृत्यूंच्या चक्रात सापडावे लागेल. नीट ध्यानात घे. तुझे कान व डोळे गेलेले नाहीत ना ? ६ जोपर्यंत हे दळण सुपात आहे, जोपर्यंत देह कायम आहे तोपर्यंतच तू त्याची नीट काळजी घे. फार श्रम न करता तू याला नीट जप; नाही तर अनेक जन्मांच्या कोपऱ्यात मात्र उगाच तू पडून राहशील. ७
दळण-अभंग १
२. बाल-क्रीडा व पंढरी महिमा
सार्थ तुकारामगाथा ८३ नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हे शुद्ध दळण सर्वांनाच आवडते आणि ज्या स्त्रीस हे दळण पसंत पडते तिला आपल्या जिवास या श्रीहरीश्वतारापासून कधीही वेगळे राहावत नाही ५ १६१ उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहीभात ॥ १ ॥ वैकुंठीं तो ऐसे नाहीं । कवळ काहीं काल्याचे ॥ २ ॥ एकमेका देऊ मुखीं । सुखीं घालू हुबरी ॥ ३ ॥ तुका म्हणे वाळवट । बरवे नीट उत्तम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपजोलिया-पुन जन्म घेऊन अर्थ - पुन पुन जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही, पण हा काला व दहीभात आपण मोठ्या प्रेमाने खाऊ १ कारण वैकुंठलोकीसुद्धा हे सुख नाही काल्याच्या घासाचे सुख तेथे कुठून असणार? २ हे घास आपण एकमेकाच्या तोंडात देऊ व मग सुखाने हुवरीचा खेळ खेळू ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा काल्याचा खेळ खेळाबला हे बाळवट फार चांगले आहे ४ १६२ याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥ १ ॥ आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोवरी ॥ २ ॥ हळ हळू चला । कोणी कोणाशी न बोला ॥ ३ ॥ तुका म्हणे साडा घाटें । तेणे नका भरू पोटें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लागें- लागलीच, घाटे- फोलकटे अर्थ - गोपाळांनो, यायचेच असेल तर लागलीच सर्वजण माझ्या मागोमाग या १ आज मी तुम्हाला काल्याचा प्रसाद पुरे पुरे म्हणाल तोपर्यंत पोटभर देणार आहे २ पण अगदी पाय न वाजविता हळूहळू चला, कुणाशीही एक शब्द बोलू नका ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व फोलकटे सोडून द्या त्यानी काही तुमचे पोट भरणार नाही ४ १६३ शिके लावियेलें दुरी । होतो तिघाचे मी वरी ॥ १ ॥ तुम्ही व्हा रे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ २ ॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहोंच्या कोपरा ॥ ३ ॥ तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणे नेदी एका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुरी-उच, टोका-पाहा अर्थ - गोपाळानो, आज त्या गवळणीने हे शिके फार उच लावले आहे काही हरकत नाही तुम्ही एक- मेकाच्या खाद्यावर असे तिघेजण उभे राहा मी तुमच्या खाद्यावर चढून ते दहीदूध काढतो १ तुम्ही मात्र माझ्या दोन्ही बाजूस तोंड उघडून तयार असा २ माझ्या दोन्ही हाताच्या कङानी दह्यादुधाच्या धारा वाहतील त्या नीट पाहा ३ तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हाताकडे पाहा, कुणाला काही कमीजास्त न करता मी सर्वांना सारखाच वाटा देईन ४ १६४ पळाले ते भ्याड । त्यासि येथे जाला नाड ॥ १ ॥ धीट घेती घणीवरी । शिकीं उतरितो हरी ॥ २ ॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥ ३ ॥ तुका लागे घ्यारे पायां । कं पावाल या ठाया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नाड-फसवणूक, रितीं-रिकामी
८४ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- या गोपाळांत जे भित्रे होते ते पळून गेले. पण त्याची फार फसवणूक झाली. कारण त्यांना स्वसुख मिळाले नाही. १ हा श्रीहरी उंचावरली शिकी उतरवीत आहे; तुमचे प्रारब्ध, क्रियमाण व संचित कमी करीत आहे. अशा प्रसंगी जे धीट होते ते भूमीवर पाय भक्कम ठेवून उभे राहिले. त्यांनी दह्यादुधांचे सेवन केले. २ आणि जे आपल्याच शहाणपणाच्या विचारात सापडले ते बिचारे रिकामेच, प्रभुकृपेविनाच तसेच राहिले. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या पायांशी लागा रे गोपाळांनो, पुनः या ठिकाणी कधी याल? आताच चांगली संधी आहे. ४ १६५ धाले मग पोट । केला गड्यांनीं बोभाट ॥ १ ॥ ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ २ ॥ खांद्यावरी भार । तों झिजती बहु फार ॥ ३ ॥ तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धाले-संतुष्ट झाले, बोभाट-आरडाओरडा, अबोलण्या-अनिर्बचनीय, बोलता न येणाऱ्या. अर्थ :- सर्व दहीदूध खाऊन झाल्यावर गोपाळ संतुष्ट झाले मग त्यांनी प्रभूच्या नावाने एकच आरडा- ओरडा केला, १ ते म्हणू लागले 'नारायणा, तुम्ही या ना. लवकर या, काही न बोलण्यासारख्या किंवा ज्याचे वर्णन करता येणार नाही अशा काही गोष्टी बोलू ना.' २ ज्यांच्या खांद्यावर पोषणाचे ओझे फार आहे त्यांना फारच त्रास झालेला असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने आपल्याबरोबर जे गोपाळ नेले ते सर्व सुखी करून सोडले. ४ १६६ पाहाती गोळणी । तंव पालथी दुधानी ॥ १ ॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ २ ॥ त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥ ३ ॥ सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दुधानी-दुधाचे भांडे, नासी-नासाडी, अगुणार-दुर्गुणी, अतिशय गुणी, किंवा गुणातीत अर्थ - दुसऱ्या दिवशी गोकुळातील गोळणी उठून पाहतात तो दुधाची सर्व भांडी पालथी झालेली त्यांना दिसली. १ त्या म्हणू लागल्या आज त्या नंदाच्याच पोराने चोरी केलेली दिसते. २ त्याच्याशिवाय दह्या-दुधांची ही अशी नासाडी दुसरे कोण करणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याच दुर्गुणी किंवा अतिशय गुणी या गुणातीत अशा नंदाच्या पोराने गोपाळाचा मेळा आणून हे कर्म केले असावे. ४ १६७ आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥ १ ॥ मग टाकती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ २ ॥ कोडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥ ३ ॥ बोलाबितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खोडी-सवय अर्थ -ह्या गोळणी मग म्हणू लागल्या, आता आपण असे करू, त्या श्रीकृष्णाला व त्याच्या साथिदाराला दोघांनाही धरून चांगला मार देऊ. १ तेव्हाच त्यांची चांगली खोड मोडेल, सवय नाहीशी होईल, त्यांच्या तोंडाला या दुधाची गोडी लागली आहे ती दूर होईल. २ किंवा त्यांना या आपल्या घरात कोंडून ठेवू, हृदयात बंदिस्त करून ठेवू, न बोलताच बुद्धी जागी ठेवून त्याला पकडू ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या श्रीहरीस व त्याच्या सवंगड्यांच्या मेळाव्यास बोलवावे व शिक्षा करावी असे त्या गोळणींनी ठरविले. ४
सार्थ तुकारामगाथा ८५ १६८ गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥ १ ॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ २ ॥ न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥ ३ ॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रडी-चिडून राहिले. अर्थ :- पुष्कळ वेळ यमुनेच्या तीरावर खेळ खेळल्यावर मग गोपाळ रडकुंडीस आले, चिडूनही गेले व म्हणू लागले, कान्होबा, तू आमचा डाव चढूच देत नाहीस, तूच नेहमी जिंकतोस. १ आम्ही काही आता तुझ्याशी खेळणार नाही, तुझी लबाडीची भावना आता आमच्या ध्यानात आली आहे. २ आम्हाला आता या तुझ्या डावाचे ओझे सहन होत नाही व आम्हाला आता उशीरही झाला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणत एक गोपाळ रागारागाने मागे निघून गेला. हरीला त्याने आपल्या मागे येऊनसुद्धा दिले नाही. ४ हाल-अभंग २ १६९ यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियासि ॥ १ ॥ हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ २ ॥ नांवें ठेवूनि बांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥ ३ ॥ तुका म्हणे कान्हो तिळतांदळाचा । जिंके तो करी आपुला खेळचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हाल-डाव, न वजे-चालणार नाही अर्थ :- श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर खेळ सुरु करुन आपल्या सवंगड्यांना तो म्हणाला, १ चला आपण मोठा खेळ खेळू. डाव मांडू. उगाच व्यर्थ काळ घालवू नका. २ नावे ठेवून गडी वाटून घ्या; म्हणजे मग नंतर कुणाला रडी करायला जागा सापडणार नाही. कुणाची तक्रार चालणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या कान्होबाने कामक्रोधरूपी तिळातांदुळाची बोलीसुकी करुन त्याने डाव जिंकला व त्याने आपला खेळ सुरु केला. ४ १७० बळें डांईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥ १ ॥ मोकलें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडाव्या ॥ २ ॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥ ३ ॥ तुका म्हणे घरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कळा-युक्ती. अर्थ :- मोठ्या बळाने श्रीहरीला पकडण्याचा प्रयत्न करावा तर तो सापडत नाही. म्हणून बुद्धिकौशल्य वापरुन जो त्याला पकडील तोच शहाणा ठरेल १ या श्रीकृष्णाला मोकळेपणाने खेळू द्यावे व समत्वभावाने त्यास पकडून ठेवावे. २ तो अनेक वेळा हातात सापडतो, अनेक वेळा निसटून जातो; तो कायमचा सापडेल, हाती राहील अशी काय युक्ती आहे हे समजत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याला जागच्या जागीच पकडून ठेवा. त्याच्या पायांशीच जीवाने मिठी घालून राहिले पाहिजे. ४ सुतुतू-अभंग १ १७१ जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥ १ ॥ घाली सुतुतू फिरोनि पाही आपणासि । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ २ ॥
८६ सार्थ तुकारामगाथा खेळिया तो हाल साभाळी । घुम घाली तो पडे पाताळीं ॥ ३ ॥ वळिया गाढ्या तोचि ग्येळे । दम पुरे तो वेळोवेळा खेळे ॥ ४ ॥ हाता पडे तो चि डाग । दम पुरे तो खेळिया चांग ॥ ५ ॥ मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तोचि आधार फिके ॥ ६ ॥ आपल्या बळें खळे रे भाई । गडियाची साडोनि सोई ॥ ७ ॥ तुका म्हणे मी खेळिया नव्हे । जिकडे पडें त्याचि सवे ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीका - युतुतू-एक प्रकारचा खेळ, हाल्ला-डावात, भेडती-खेळातील भिडू अर्थ - जीवाशिवाच्या या डावात माडून अह सोहम या भिडूची चागली गाठ पडली आहे आता १ हे दोन गडी आता सुतुतूचा खेळ करून आपणाकडे फिरून फिरून पाहू लागले आहेत एखादा बलवान गडी मागील गड्याची कमतरता पुढल्यासाठी भरून काढीत असतो २ एखादा गडी डाव साभाळतो व दुसरा एकदा पळून जातो तो धरणीवर पडून राहतो ३ जो गडी चांगला दणकट तोच शेवटपर्यंत खेळतो त्याचा दम जसा पुरेल तसा तो खूप वेळपर्यंत खेळत राहील ४ गडी हातात सापडला असे वाटते, टाग मारून निसटून जातो कारण त्याचा दम भरपूर असल्यामुळे त्याचा खेळ चांगला होतो ५ मागेपुढे पाहून अवधान राखून जो खेळतो तोच जिंकतो जो गडी हाती आलेला असतो तोच आधार वाटतो ६ इतर गड्याची सोय सोडून आपल्या बळाने एखादा गडी खेळ करीत असतो ७ तुकाराम महाराज म्हणतात असा मी खेळिया गडी नाही मी ज्याच्या बाजूस राहीन त्याचीच बाजू राखीन ८ १७२ अनत ब्रह्मांडें उदरीं । हरि हा बाळक नदा घरीं ॥ १ ॥ नवल केव्हडें केव्हडें । न कले कान्होबाचे कोडें ॥ २ ॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥ ३ ॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥ ४ ॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - नटधारी-नाट्य धारण करणारा अर्थ - ज्याच्या उदरात अनत ब्रह्मांड समावतात तो हा बालक श्रीकृष्ण या नदाच्या घरी रागत आहे १ केवढे नवल आहे पाहा हे या कान्होबाचे कोडे काही केल्या उलगडतच नाही २ ज्या कृष्णाने सर्व पृथ्वीवरील लोकांना तृप्त केले त्यास माता यशोदा मोठ्या प्रेमाने घास भरवीत आहे ३ सर्व विश्वाला व्यापून राहणारा हा कमलापती श्रीकृष्ण, पण गोळणी यास कडेवर घेऊन मिरवितात ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण म्हणजे अनेक प्रकारची नाटकी रूपे धारण करणारा आहे अनेक प्रकारचे विविध भोग भोगून हा श्रीकृष्ण
सार्थ तुकारामगाथा ८७ १७३ कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टा चळकाप सुटला ॥ १ ॥ होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ २ ॥ प्रेम॑ नाम वाचे गाती । सदा आनंदें नाचती ॥ ३ ॥ तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चळकाप-चळचळा कापावया लावणारा थरकाप अर्थ - आज श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला केवढी आनंदाची गोष्ट दुष्ट लोकांच्या अंगाचा थरकाप उडालेला दिसतो १ या श्रीकृष्णाचा अवतार होताच सर्वत्र घरोघरी आनंद निर्माण झाला २ लोक त्याचे नाव मोठ्या प्रेमाने तोंडातून काढू लागले, आनंदाने नाचू लागले ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाचे नाव घेताना, त्याचा घोष करताना आपले सर्व दोष दूर होतील ४ विवरण - या एका लहानशा पण सुंदर अभंगात श्रीकृष्णजन्माने सर्वत्र जो आनंदी आनंद झाला त्याच मोठे रेखीव जिवंत वर्णन बुवानी केले आहे श्रीकृष्णजन्माच्या आधी कंसांदिकाची दुष्ट कृत्ये ध्यानात धरली तर लोक किती कष्टी व दुःखी झाले होत याची कल्पना येईल अशा प्रसंगी साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचे निर्दाळण करण्यासाठी आपण अवतार घेता हे 'पुढचे वचन श्रीकृष्णाने जन्म घेऊन जणु आधीच सार्थ केले कृष्ण जन्माचा आनंद या संदर्भात पाहण्यासारखा आहे १७४ मेळउनि सकळ गोपाळ । काहीं करिती विचार ॥ १ ॥ चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी । वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ २ ॥ वाट काढिली गोविंद्रीं । मागें गोपाळांची मांदी ॥ ३ ॥ अवघाचि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥ ४ ॥ घर पाहोनि एकांताचे । नवविधा नवनीताचे ॥ ५ ॥ रिघे आपण भीतरी । पुरवी मायुलियांच्या हरी ॥ ६ ॥ बोलो नेदी म्हणे स्थीर । खुणा बाबी खा रे क्षीर ॥ ७ ॥ जोगावल्यावरी । तुका करितो चाकरी ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - चंद्रधणी-मनाची तृप्ती, मांदी-समुदाय, मायुलियांच्या-दहादुधाच्या डेऱ्याच्या, हरी- ओळी, जोगावल्यावरी-संतुष्ट झाल्यावर अर्थ - सर्व गोपाळ एके ठिकाणी जमा करून श्रीकृष्णाने काही एक विचार केला १ तो म्हणाला, चला रे मित्रहो, आज आपण गौळणींच्या घरी जाऊन लोणी चोरून खाऊ व मनाची तृप्ती होईपर्यंत आज दहीदूध खाऊ चला, वेळ लावू नका एखाद्यासाठी उशीर करू नका २ श्रीकृष्णाने पुढे होऊन सर्वांना वाट दाखविली व त्याच्या पाठीमागे सर्व गोपाळांचा थवा निघाला ३ हा श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र वावरत असूनही कुणास एकदम समजत नाही ४ आणि जिथे नवविधा भक्तीचे स्थान आहे, जिथे एकान्तात ईश्वरचिंतन चालते ५ अशा ठिकाणी हा देव मोठ्या आनंदाने प्रवेश करतो व आपल्या सोबत्यांना दह्यादुधानी भरलेल्या भाड्याची किंवा डेऱ्याची रगच्या राग दाखवितो, त्यांना ते दहीदूध वाटतो ६ आणि दह्यादुधाचे सेवन मुकाटघाने करावे, बोलू नये, कुणी आवाज करू नये म्हणून हा खुणा करतो व सुचवितो की दूधदही भरपूर घ्या ७ तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने तृप्त झाल्यानंतर मी त्या प्रभूची मनोभावे चाकरी करीन संतुष्ट झाल्यावर त्याच्याच सेवेत राहीन ८ १ सदा नाम वाच गाती । प्रेमें आनंदे नाचती ॥
८८ सार्थ तुकारामगाथा १७५ धन्य त्या गोळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥ १ ॥ अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती । कोण तयाप्रति येईल आता ॥ २ ॥ तुका म्हणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासो लागें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - हिरोनी-हिरावून घेऊन, विंदान-कौशल्य अर्थ - या गोकुळच्या गोळणी धन्य आहेत या इंद्राच्या पूजनात मग्न असताना श्रीकृष्ण हळूच येतो व त्यांच्या पूजेतील नैवेद्य हिरावून नेऊन खातो १ अरे श्रीकृष्णा, त्या गोळणी इंद्रादी देवाची इच्छा करतात, आता तूच नैवेद्य खाल्ल्यावर त्यांच्यावर कोण कृपा करणार ? २ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु श्रीकृष्ण मोठे कौशल्य दाखवून त्यांच्यावर कृपा करतो, स्वतः नैवेद्य खाऊन हसू लागतो ३ विवरण - कृष्णावतारानंतर श्रीकृष्णाचे माहात्म्य हळूहळू वाढीस लागले याच्यापूर्वी इंद्रादिक देवांना महत्त्व होते इंद्र हा देवांचा राजा मानलेला असून त्याच्या कृपेने पाऊस पडतो अशी कल्पना आहे श्रावण महिन्यातील सूर्य हाच अमोही उल्लेख आहे वैदिक वाङ्मयात व महाभारतादी ग्रंथात याच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत कृष्णाचे वडील नंद याच्या घरी इंद्राची पूजा करण्यासाठी दर वर्षी इंद्रयाग होत असे नव्या काळात इंद्राच्या ऐवजी पावसासाठी गोवर्धन पर्वताची पूजा करावी, त्याची उपासना वाढवावी असा नवा विचार श्रीकृष्णाने काढला. इंद्रयाग बंद झाल्यानंतर सर्व गोकुळावर रात्रंदिवस अखंडपणे पर्जन्यवृष्टी इंद्रदेवाने केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताच्या आश्रयाने सर्व गोकुळवासियांचे रक्षण केले असल्याची कथा आपणास माहित आहेच इंद्राचे माहात्म्य त्याच्या नैवेद्य चोरून खाण्यातूनही कमी करण्याचा प्रयत्न या अभंगात दिसतो १७६ तुम्ही गोपी बाळा मज कँशा नेणा । इंद्र अमरराणा म्याचि केला ॥ १ ॥ इंद्र चंद्र सूर्य ग्रहा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ २ ॥ मजपासुनिया जाले जीव शिव । देवाचा ही देव मीच कृष्ण ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अमरराणा-अमर राजा अर्थ - गोपिकांनो, तुम्ही मला कशा जाणीत नाहींत ? तुमच्या ध्यानात कसे येत नाही की इंद्रालासुद्धा मीच अमर राजाचे पद प्राप्त करून दिले आहे १ इंद्र, चंद्र, सूर्य, ग्रह हे सर्व लोक मीच निर्माण केले असून यम व धर्म यांचीही निर्मिती माझ्यापासूनच आहे २ इतकेच काय पण सर्व जीव व त्यांच्यातील शिवतत्त्वही मीच आहे सर्व देवांचा देव तो मीच श्रीकृष्ण आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या गोळणींना श्रीकृष्ण हे सर्व समजावून सांगत आहे मी मात्र व्यर्थ पाषाण होऊनच जन्माला आलो आहे ४ १७७ का रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मार्गे जाले काई । एका तें का नेणसी ॥ १ ॥ केलास फजित । मार्ग पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावता ॥ २ ॥ बोला खोडा खिल्ल गाढी । ऐसा फोण तये काढी । धावेल का पाडी । तुझी आधीं बोदाळा ॥ ३ ॥ चाल धाये । मीही येतों तुजसवे । तुका म्हणे जब । तेथें नाहीं पावली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वळती-गाई वळून आणण्याची पाळी, खोडा-गापळा, खिल्ल-वदिस्त, पाडी-शालवड
सार्थ तुकारामगाथा ८९ अर्थ - श्रीकृष्ण आपल्या एका गोपाळ मित्रास म्हणत आहेत अरे तू इंद्रियरूपी गाई का सोडून दिल्यास ? आता तर त्यांना वळून आणण्याचे काम तुलाच करायचे आहे जा तू, मागच्या खेपेसही तू असेच काम केले होतेस ते तुझ्या ध्यानात नाही का ? १ या कामात कुचराई केलीस तर मात्र तू फजीत पावशील मागे व पुढेही तुझी अवस्था कठीण होईल नित्य काळ तुला शिक्षा करीत असताना तुला त्याची लाज कशी नाही ? २ पुढे जन्ममृत्यूचा जो मोठा वदिस्त करणारा सापळा आहे त्यातून तुला काढणारे कोण आहे ? आधीच ओढाळ म्हणून प्रसिद्ध असणारी तुझी वृत्तीरूपी कालवड धावून जात आहे तिला आवर ३ चल पळ लवकर मी पण तुझ्या मदतीस येतो तुकाराम महाराज म्हणतात, चल ती जोपर्यंत मिळाली नाही तोपर्यंत मीही येतो तुझ्याबरोबर ४ १७८ काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥ १ ॥ काय देवा यासि व्हावे उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ २ ॥ सहज बोलणे हित उपदेश । करुनि सायास शिकविती ॥ ३ ॥ तुका म्हणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसे मज येती सांभाळित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सायास-श्रम अर्थ - या साधुसंतांचे उपकार मी आता मानू तरी किती व कसे ? वारंवार उपदेश करून हे मला सावध करीत असतात १ देवा, आता या संतांचे उतराई तरी मी कसे व्हावे ? यांचे उपकार मी कसे फेडू ? यांच्या पायावर मी माझा जीव जरी ओवाळून ठेविला तरी ते थोडेच आहे २ या संतांचे सहजचेच जे बोलणे असते तोच सर्वसामान्य लोकांना हिताचा उपदेश असतो हे सत्पुरुष मोठे परिश्रम घेऊन सर्वांना शिकवीत असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, एकाद्या गाईच्या मनात ज्याप्रमाणे अखंडत्वाने तिचे वासरूच असते, त्याप्रमाणे हे सत्पुरुष मला एकसारखे चित्तात बाळगून सांभाळीत असतात ४ विवरण - वारकरी पंथात किंवा भागवत संप्रदायात दयाइतकेच महत्त्व संतांनाही आहे 'संत ते देव देव ते संत' अस एकनाथाना एका अभंगात म्हटलं आहे संत सहवासाचे, त्यांच्या दर्शनाचे फार मोठे सुख आपणास होत देव भेटल्याची अनुभूती संतांच्या सहवासात तुकारामादिकांनाही फार मोठी येत असे या एका अभंगात तुकारामांनी संतांचे माहात्म्य संतपाने वर्णन केले आहे संतांचे उपकार फार मोठ मानले जातात या संतांचे महत्त्व वर्णन करताना ब्रह्मदेवसुद्धा थकतो अस नामदेवांनी एका अभंगात म्हटले आहे 'संतसंगतीचे काय सांगू सुख । आपण पारिखे नाहीं तेथ,' 'माझ मायबाप साधुसंतजन । माझे जीवप्राण अंतरींचे,' अशा शब्दांनी नामदेवरायांनी संतांच्या सहवासाचे वर्णन केल आहे 'उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत' या भागात मायबाप संतांचे वर्णन श्रीसंतन केल आहे 'संतचरणींचा महिमा । काही न कळे आगमानिगमा,' देवाचे ते आप्त जाणावे ते संत, 'संत आधी देव मग । हाचि उगम आह्मा मना,' 'संतापोटीं देव वसे । देवापोटीं संत असे,' 'संतांचिये पायीं मज पैं विधाती' इत्यादी चरणांतून एकनाथांनी संतांचा महिमा गायिला आहे संतांच्या भेटीने आगमनाने दर्शनाने तुकाराम महाराज तर कमालच आवदून जातात 'दसरा दिवाळी तोचि आम्हा सण । सखे संतजन भेटतील । 'धन्य दिवस आजी दर्शन संतांचे । नांदे तया घरीं दैवत पंढरीचे' 'भाग्याचा उदय । तैं हे जोडी संतपाय', 'कृपेचे सागर हेचि साधुजन' 'आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ' अशा शब्दो वचनांतून तुकारामबुवांचा मंतप्रभा उफाळून वर आला दिसता संतप्रभापुढे मग मोक्ष स्वर्ग, वैकुंठास याचीही पर्वा नसते ईश्वर एकदम कृपावंत होऊन आपणास मुक्ती देईल की काय अशी भ्रान्ता वाटून मग तुकारामबुवांसारखा भक्त एकदम आळवितो, 'झणीं मुक्तोपदे देशी पांडरंगा । मग या संतसंगा पाहू कोठें ? अशी ओढ या श्रेष्ठ साधुसंतानाही संतसहवासाची असते १७९ कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥ १ ॥ काला वाटू एकमेकां । वैष्णवां निका संभ्रम ॥ २ ॥ तु गाथा १२
९० सार्थ तुकारामगाथा वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥ ३ ॥ तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कंठी-वाणीत, गळ्यात, कृष्णमणी-कृष्णाच्या नामाचा अलंकार, गाढे-प्रतापी. अर्थ :- ज्याने आपल्या वाणीत कृष्णरूपी मण्याचा अलंकार धारण केलेला आहे त्याचा प्रकाश सर्व लोकांत एकदम पसरतो. १ वैष्णवांच्या मेळाव्यात काल्याचा प्रसाद एकमेकांना वाटू. २ आणि या काल्याच्या सुखामुळे ब्रह्मलोकादी जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांनाही येथून वेडावण दाखवू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या जगतात आम्ही भक्तच मोठे बलवान असे प्रतापी वीर पुरुष आहोत. ४ १८० कवळाचिया सुखें । परब्रह्म जालें गोरखें । हात गोऊनि माप मुखें । बोटासांदीं लोणचें ॥ १ ॥ कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ २ ॥ घाली हुमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥ ३ ॥ काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया ॥ ४ ॥ तुका म्हणे सर्वैं तया । आम्ही ही सांकलों ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- कवळ-घास, गोरर्खे-गुरे राखणारे, सोकलों-मोकावलो.
सार्थ तुकारामगाथा - ९१ शब्दार्थ व टीका :- गोवळों-गवळी, गुरे राखणारे, कांबळें-पांघरूण अर्थ:-पुष्कळ काळ झाला, आम्ही त्या श्रीकृष्णाच्या संगतीत वावरणारे गुराखी आहोत. १ त्याच्या शिदोरीमधील भाताचा आम्हांस कधींच तोट येत नाही. त्याच्या संगतीनेच आम्ही जेवणही करतो. २ यानेच माझे पांघरुणही पुष्कळकाळापर्यंत पांघरले होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमचे असे काहीच नाही; सर्व काही त्या प्रभूचे, श्रीकृष्णाचेच आहे. ४ १८३ बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा ॥ १ ॥ म्हणोनि जीवेंसाठों । घेतली कान्होयाची पाठी ॥ २ ॥ वरवा वरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥ ३ ॥ पुढती पुढतो तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - वरवा-चांगला, निमिषें-क्षणभरही. अर्थ - या श्रीकृष्णाची संगत फार चांगली दिसते. कारण याच्या संगतीत गाईगुरांना चाराही चांगला मिळतो. १ म्हणून माझ्या जीवाने या कान्होबाच्या पाठीमागे एकसारखे राहायचे ठरविले आहे. २ याचा सहवास एक क्षणभर जरी झाला तरी तो फारच चांगला वाटतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पुढे पुढे तर मी याच्या संगतीसच चटावलो व तो लोभ इतरांनाही लाविला. ४ १८४ घेती पाण्यासों हुंबरों । त्यांचें समाधान करी ॥ १ ॥ ऐसी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ २ ॥ स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥ ३ ॥ मोहरी पांवा काठी । तुका म्हणे याजसाठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका :- सवे-सवय. अर्थ - हुंबरोचा खेळ करून करून यमुनेच्या पाण्याचा प्रवाहही थांबविण्यावा म्हणजे त्याच्या आवाजावर मात करण्याचा प्रयत्न ज्या गोपाळांनी केला त्याचे समाधान श्रीकृष्णाने केले. १ या गोपाळांची सवय त्या श्रीहरीला फार मोठ्या प्रमाणावरची असल्याने तो ते तिकडे जातील तिकडे जात असतो २ या गोपाळांच्या हुंबरोने व श्रीकृष्णाच्या मुरलीच्या स्वरांनी प्रत्यक्ष यमुना नदीही स्थिर झाली. ती वहायची थांबली; मग श्रीकृष्णाने पांगलेल्या सोबत्यांना उगे राहण्यास सांगितले ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवाने पावा, मुरली, काठी यांना या आपल्या भक्त गोपाळांसाठीच धारण केले आहे. ४ १८५ वळी गाई धावे घरा । आमच्या करी येरझारा ॥ १ ॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ २ ॥ नेदी पडो उणें पुरें । म्हणे अवघेंचि बरे ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - परता-दूर. अर्थ - हा श्रीकृष्ण आमच्या इंद्रियरूपी गाई वळण्यासाठी आमच्या घरी धावत येतो व आम्हांस जवळ धरण्यासाठी याच्या सारख्या येरझारा चाललेल्या असतात. १ हा कान्हा फार बलवान असून चांगला आहे. तो त्याचे नाव घेताच आमच्याजवळ येतो २ तो आम्हांला काहीच उणे पडू देत नाही; सर्व काही चांगले आहे असेच तो म्हणतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तो दूर व्हावा असे माझ्या चित्तास कधीच वाटत नाही. ४ १८६ म्हणती घालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥ १ ॥
९२ सार्थ तुकारामगाथा चाल चाल रे कान्होबा खेळ मांडूं रानीं । बैसवू गोठणीं गाई जमा करुनि ॥ २ ॥ न लगे जावे घरा । चुकलीया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हा ॥ ३ ॥ तुका म्हणे धाले पोट । आता कशाचा घोभाट । पाहाणे ते वाट । मागें पुढें राहिली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धाले-सतुष्ट झालो, घणोवटो-मालणावर अर्थ - सर्व गोपाळ म्हणू लागले की आता या आमच्या प्रभूवर, स्वामीवर आम्ही पूर्णपणे संतुष्ट झालो आहोत्त, आता आम्हांला दिवसोरीघोषुद्धा जरुरी नाही आता याला एक क्षणभरसुद्धा सोडता कामा नये १ अरे कान्होबा आता चल ना, रानामध्ये जाऊन आपण आता चांगला खेळ मांडू सर्व गाई एकत्र करुन गोठणात बसवू २ आता घराकडे जाणे सुद्धा नको वाटते देवा तुझ्या संगतीत जन्ममृत्यूच्या येरझारो संपल्या तूच आता आमचा सज्जन, सोयरा, मायबाप आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही संतुष्ट झालो आहोत आता कसलीच तक्रारही नाही मागची पुढची वाट पाहण्याचेही कारण उरले नाही ४ १८७ तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥ १ ॥ नाहीं देखिले तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥ २ ॥ घरीं ताकाचे सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न वजो-जाणार नाही अर्थ - देवा तुझ्या संगतीत आम्हांला भरपूर सुख मिळून आम्ही निश्चित झालो आहोत १ जे सुख आम्ही कधी पाहिलेही नाही ते आम्ही मिळविले आहे सर्व सुखाचे भोग आम्ही भोगले आहेत २ घरी आमच्या ताक भरपूर आहे पण येथे कृष्णाच्या संगतीत मात्र चांगल्या लोण्याचे पूर आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता या श्रीहरीने आम्हांला दूर दवडिले तरी आम्ही जाणार नाही. ४ १८८ कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥ १ ॥ तुझ्या राहिलों आधारें । जालें आपेपेचि बरें ॥ २ ॥ तुझे लागलो संगती । आता येतों काकुळती ॥ ३ ॥ तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कामें-वासनेन भिडा-भिडेन अर्थ - आम्ही वासनेने फार त्रासलेलो होतो, तिच्या भाम्याखाली बंतगून गलो होतो तिला काही दयामाया नाही १ पण देवा, आता तुझ्या आधाराने राहिलो तेव्हा मात्र सर्व काही ठीक झाले २ तुझ्या संगतीत राहिलो म्हणूनच देवा, आता मोठ्या काकुळतेने आम्ही तुला विनवू शकतो ३ तुकाराम महाराज म्हणतात कान्होबा, तुझ्या भिडेने आमच्यामागची सर्व पीडा नाहीशी झाली ४ टिपरी-अभंग ७ १८९ खेळ माडियेला वाळवंटीं घाईं । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतोल पायीं रे ॥ १ ॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहूनी बळी रे ॥ २ ॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाई पुष्पवरुपाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥ ३ ॥ लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥ ४ ॥ वर्णाभिमान विसरली याति । एकाएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नयनींतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥ ५ ॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा.- पावटणी-पायाखालची पायरी, अनुपम्य-ज्याला दुसरी तुलना नाही असा, महानुभाव- श्रीचक्रधराच्या पंथातील साधक, अंबर-आकाश. अर्थ:-या वाळवंटात भाई हो, वैष्णवांनी घाईघाईने खेळाला आरंभ केला आहे. नाचताना ते तल्लीन झाले आहेत. या संतानी क्रोध, अभिमान वगैरे विकारांना पायांखालची पायरी करुन सोडले आहे. १ परमेश्वर- प्रेमाच्या आनंदकल्लोळात ते नाचत असून त्याच्या पवित्र नामावळीचा जयघोष करुन गाणे गात आहेत. यांनी या नामाच्या जोरावर प्रत्यक्ष यमावरही मात करण्यासाठी कास कसली आहे. एकापेक्षा एक बलवान असे हे वैष्णववीर आहेत. २ यानी आपल्या अंगाला गोपीचंदनाची उटी लावली आहे. गळयात तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत, हारही घालून ते मिरवीत आहेत. आणि भजनाच्या निमित्ताने टाळ, मृदुंग, फुलांचा वर्षाव यांची एकच घाई उडत आहे येथे. या सुखसोहळ्याचे वर्णनही करता येणार नाही. ३ या नामघोषाच्या नादास लुब्ध होऊन मूढ जनांपासून सर्व स्त्रीपुरुषांचीच समाधी लागलेली दिसते. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभावी, सिद्ध, साधक, यांचे चित्त एकतेने ईश्वराशी जडलेलॆ दिसते. ४ प्रत्येकजण आपल्या वर्णाचा अभिमान, जातीचा अभिमान विसरून गेलेले आहेत; ते एकमेकांची जात विसरून एकमेकांस लोटांगण घालतात; या प्रकारामुळे त्यांचे चित्त लोण्याहूनही मऊ व शुद्ध बनले आहे. त्यांच्या संगतीने पाषाणासही प्रभुप्रेमाचा पाझर फुटणार आहे. ५ यांच्या ईश्वरनामाच्या गर्जनेने सारे आकाश गर्जून राहिले असून हे वैष्णव वीर भक्तित्सुखाच्या नशेत जणू मत्त झालेले दिसतात; तुकाराम महाराज म्हणतात, यांनी भवसागर तरून जाण्यासाठी भक्तीची ही सोपी अशी पाऊल वाटच तयार केलेली आहे ६ १९० एके घाईं खेळतां न पडसी डाईं । दुचाळचानें ठकसील भाई रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोंघांची तरी घरीं सोई रे ॥ १ ॥ खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयाची घाई रे । तेणेंचि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ २ ॥ शिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या संवगडिया शिकवूनि घाईं । तेणें संतांतर फड जागविला रे । एक घाईं खेळतां तो न चुकेचि फोडें । तया संत जन मानवले रे ॥ ३ ॥ ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनों बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनि एकी च घाईं । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥ ४ ॥ रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे ।
९४ सार्थ तुकारामगाथा
पांचां संवगडिया एकचि घाई । तेथें नाद वरवा उमटला रे । ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो हो खेळ निवडिला रे ॥ ५ ॥ ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एकचि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥ ६ ॥ आणीक खेळिये होउनिया गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गढे हो हुशारुनि खेळा । पुढिलांचि धरूनियां सोई रे । एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - दुचाळपानें-द्वैताच्या भावनेने, बसवंत-उपास्य दैवत, संक्तर-स्वतंत्र.
अर्थ - एकत्वाच्या भावनेने, अद्वैताच्या वृत्तीने तू जर खेळ खेळलास तर मग मात्र संसाराच्या डावात किंवा चवरात तू सापडणार नाहीस. द्वैताच्या भावनेने खेळशील तर भाई, फसशील रे बाबा. तू यामुळे सत्त्व रज, तम या त्रिगुणांच्या चवरात सापडून फारच कष्टो होशील. म्हणून पुढे दिलेल्या चौघांची उदाहरणे नीट ध्यानात धरून तू वाग १ जगातील संसाराचा जरी तू खेळ खेळलास तरी तू अलिप्त राहा बाह्य विषयांची भारी संगत तू सोडून दे. अशाच खेळामुळे तू प्रत्यक्ष ईश्वर होऊन जाशील हे माझे सत्यवचन भाई, तू नीट समजावून घे. २ पंढरपुरात एका शिंप्याचा पोर नामदेव नावाचा एक थोर खेळगडी होऊन गेला त्याने श्रीविठ्ठलासचे आपले आराद्य दैवत बनविले व आपल्या सर्व सोबत्यांना याच मार्गाची त्याने शिकवण दिली व वारकरी पथाचा स्वतंत्र फड पंढरीच्या वाळवंटात निर्माण केला याने एकत्वाच्या वृत्तीने खेळ खेळल्यामुळे त्याची कुठेच फसवंत झाली नाही, की तो कुठे चुकला नाही. त्यामुळे त्याला मत लोकही मान्य झाले ३ ज्ञानदेव, मुक्ताबाई, चांगदेव वटेश्वर, सोपानदेव यांनी आनंदाने खेळ सुरू करून कान्होबा गवळी यास आपले उपास्य दैवत बनविले. त्याच्या भोवती फेर धरून ते नाचले. त्या सर्वांना मिळून एवढमच आपल्या प्रभूविषयी आवड निर्माण झालेली पाहून ब्रह्मादिक देवही त्याच्या पायांवर नम्र होण्यास तत्पर झाले. ४ प्रसिद्ध साधू कबीरदास याने रामचंद्रास उपास्य दैवत वरून खेळ करावा लाधला. कबीर व राम याची जोडी फार चांगली जमली. या पाच सोंगड्यांनी खेळाची एवच घाई धरून ईश्वरभजनाचा नाद फार श्रेष्ठ प्रकारचा निर्माण केला. ब्रह्मादी व श्रेष्ठ देव यांनी सर्व खेळात यांचा हा खेळच निवडला ५ पैठणच्या ब्राह्मणाचा पोर एकनाथ हा एक असाच थोर खेळगडी होऊन गेला ह्याने जनार्दनास खेळगडी बनविले जनार्दन स्वामीस उपास्य दैवत बनविले व वैष्णवांचा मेळा पुनः जमा केला व एकच अशा खेळाच्या घाईत आपण स्वतःच तो जनताजनार्दन स्वरूपी होऊन गेला ६ आणखीही पुष्कळ खेळगडी पोर थोर होऊन गेले; त्यांचे वर्णनही करायला समर्थ अशी वाणी मजजवळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गड्यांनो, चांगले सावध राहून खेळ खेळा आधी होऊन गेलेल्या सत खेळाडयाचा मार्ग ध्यानात धरून खेळा एकच घाई करीत असताना जर खेळगडी चुकला तर मात्र तो संसाराच्या डावात पुरता फसेल. ७
सार्थ तुकारामगाथा . १५ संप्रदायावर नामदेवाच्या भक्तितत्त्वाची छाप मोठी असून त्याच्या ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात या नामदेवाची अनेक पदे आहेत. या नामदेवाचा व तुकोबाचा संबंध प्रसिद्धच आहे नामदेवानी स्वप्नात दृष्टान्त देऊन आपली कवित्वाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा आदेश दिला असा एक प्रसिद्ध अभंग तुकोबाचा आहे यानंतर तुकारामबुवानी ज्ञानदेव, सोपान-मुक्ताबाई याना थोर खेळगडी म्हणून उल्लेख केला आहे ज्ञानदेव ( १२७५-१२९६ ) हे तर भागवत संप्रदायाचे आद्य संघटक यांनी गीतेवर मराठीत भाष्य लिहून संस्कृता- मधील उच्च तत्त्वज्ञान प्रथम मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेत आणले. यांच्या भावार्थदीपिकेसारखा तत्त्वज्ञानाचा, भक्तीचा, काव्याचा ग्रंथ अजूनही झालेला नाही असे जाणते सांगतात याच भावार्थदीपिकेस ज्ञानदेवी किंवा ज्ञानेश्वरी अशी लोकप्रिय नावे आहेत अनुभवामृत, चांगदेवपासष्टी अभंगरचना इत्यादी वाङ्मय ज्ञानदेवांचे म्हणून प्रसिद्ध आहे यांनीच समकालीन संताचा मेळावा जमवून भक्तिमार्गाची पुनर्स्थापना केली याची भगिनी मुक्ताबाई ( १२७९-१२९७ ) हीही फार अधिकारसंपन्न अशी गाययित्री असून हिने आपल्या बोधाने प्रसिद्ध योगीपुरुष चांगदेव यानाही आपले शिष्य बनविले आपल्या भावडानाही ही प्रसंगी उपदेश देत असे हिचे 'ताटीचे अभंग' प्रसिद्ध असून त्यात भक्तीचा कळवळा व थोर तत्त्वज्ञान यांचे उत्कृष्ट दर्शन होते सोपानदेव ( १२७७-१२९७ ) हे निवृत्तिज्ञानदेवांचे धाकटे बंधू यांचेही परमार्थ-निरूपणावर काही अभंग प्रसिद्ध असून सोपानदेवी नावाची गीतेवर एक समश्लोकी टीका यांची आहे चांगा वटेश्वर ( समाधी १३२५ ) हेही प्रसिद्ध तापीतीरचे योगीपुरुष वटेश्वर हे स्वतंत्र न मानता चांगा वटेश्वर हे एकच मानून वटेश्वर हे त्यांच्या गुरूचे किंवा दैवताचे नाव मानण्याकडे संशोध- काचा कल आहे या योगीपुरुषाने शेवटी भक्तिमार्गातील मुक्ताबाईंचे शिष्यत्व पत्करले . कबीर ( पंधरावे शतक ) हे एक उत्तर भारतातील प्रसिद्ध सद्पुरुष होत यांच्यावर हिंदू व मुसलमान याचे संमिश्र संस्कार असून नाथ संप्रदाय व सूफी पंथ याचीही थोडी छाप यांच्या विचारांवर दिसते यांचे उपास्य दैवत राम. हा राम सगुण की निर्गुण असा वाद नेहमी उपस्थित होतो कारण दशरथाचा जो मुलगा रामचंद्र त्याहून माझ्या रामाचे मर्म निराळेच आहे असे यांनी म्हटले आहे 'दशरथ सुत तिहूँ लोक बखाना । रामनामका मर्म है आना' अशी यांची ओळ असली व 'निर्गुणं मेरा पीव' असा याचा पुकारा असला तरी सगुण भक्तीसही लाजवील असे प्रेम यांनी निर्गुण रामावर केले आहे एकनाथ ( १५३१-१५९९ ) हे भागवत संप्रदायाचे सजीवन पैठणास राहात असत ज्ञानेश्वरानंतरच्या काळात मुसलमानी राजवटीत जी सांस्कृतिक वाताहत झाली तीन ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ गुप्त होण्याची वेळ आली तेव्हा ज्ञानेश्वरांच्या प्रेरणेने यांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन केले रामायणभागवतावर ग्रंथरचना केली ज्ञानेश्वरीच्या खालोखाल यांच्या भागवतास वारकरी संप्रदायात मान आहे यांची पदे व अभंग प्रसिद्ध आहेत यांचे गुरू दौलतावाद येथील श्रीजनार्दनस्वामी यांचे भारूडवाङ्मय हे मराठीतील खरोखुरे लोकवाङ्मय असून जनतेतील जनार्दन जागृत करण्यास या वाङ्मयाचा फार मोठा उपयोग होत राहिला आहे १९१ बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस पद राखो जेणे टिपरिया घाई । अनुहाते वाद्ये मादळा रे ॥ १ ॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठुल रखुमाई पाहू रे ॥ २ ॥ सा चहूँ वेगळा अठराही निराळा । गाऊ वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा घेणे पाणी । तारुण्य देहभाव वाळा रे ॥ ३ ॥ आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानी रे । आंधळयासि डोळे पांगळासि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जतीस-यतीचे, वाद्ये-ध्वनी, मादळ-मृदंग अर्थ :- बारा अथवा सोळा खेळगड्यांचा समुदाय मिळवून सतरावा गडी प्रत्यक्ष श्रीकृष्ण देवच आहे रे या टिपऱ्याच्या घाईगर्दीत यतीचे पद मात्र रक्षण करा येथे मृदंगाचा अनुहाताचा ध्वनी उमटत आहे. १ अरे