भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ५२१ शब्दार्थ व टीपा :- अभागी-करंटा, क्वडि-कवडी. अर्थ:- हे करंट्या, तू वेळोवेळीं का मरत आहेस ? तुझ्या वाट्याला पुष्कळ मरणांची संख्या आली आहे. १ या मनुष्य देहाने केले तर काय होणार नाही ? श्रीहरीच्या भक्तिभजनाने तो वैकुंठास जाऊ शकतो. २ रामनामाचे चिंतन करण्याला एक कवडीसुद्धा किंमत द्यावी लागणार नाही; त्यापासून या सर्व व्यथेतून सुटका होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रामाच्या ठिकाणी मन अडवून ठेव; व त्या रसासच जिह्वेने नित्य चाख. ४ ११७२ हम उदास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिई लंका ॥ १ ॥ गोवरधन नखपर गोकुल राखा । वर्सन लागा जय मेंहूं फत्तरका ॥ २ ॥ वैकुंठनायक काल कंसासुरका । दैत धुवाय सब मंगाय गोपिका ॥ ३ ॥ स्तंभ फोड पेट चीरीया कश्यपका । प्रल्हाद के लिये कहे भाई तुकयाका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तीन्हके-त्या, काल-काळ, यम, वर्सन-पाऊस पडू लागला. अर्थ:- रावणाला मारून विभीषणाला ज्याने लंका दिली, त्या रामाचा मी दास आहे, असे सर्व लोकांना सांगतो. १ ज्या वेळेस इंद्राने शिळाधारांनी पर्जन्यवृष्टी केली, त्या वेळेस गोवर्धन पर्वत याने उचलून नखावर धरला व गोकुळाचे रक्षण केले. २ वैकुंठाचा स्वामी हा कंसासुराचा काळ असून त्याचे सर्व दैत्य सैन्य ज्याने मारून टाकले, त्याला सर्व गोपिकांनी मागितले. ३ तुकारामप्रभू म्हणतात, प्रल्हादाकरता नरसिंहरूप धारण करून तो खांब फोडून प्रकट झाला; व त्याने हिरण्यकशिपूचे पोट फाडले. ४ साख्या ३० ११७३ तुफा वस्तर विचारा क्या करे । अंतर भगवान होप । भीतर मैला केंच मिटे रे । मरे उपर धोय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- वस्तर-वस्त्र, भीतर-आत अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, जर अंतःकरण शुद्ध नसेल, तर बाह्य भगवे वस्त्र बिचारे काय करील? वरच्या बाजूने मरेतोपर्यंत धुतले तरी अंतःकरणातील मळ नाहीसा कसा होईल ? १ ११७४ रामराम कहे रे मन । औरसुं नहि काज । बहुत उतारे पार । आधे राख तुकाकी लाज ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- औरसुं-दुसऱ्याशी. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, अरे मना, तू राम राम असे भजन कर. दुसऱ्याशी काही काम नाही. या रामनामाने या संसारातून पुष्कळ लोक पार पडले. याकरिता यापुढे तू माझी लज्जा रक्षण कर. १ ११७५ लोभीकें चित धन बैठै । कामीन चित काम । माताके चित पुत बैठै । तुकाके मन राम ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामीन-विषयी, पुत-पुत्र. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, लोभ्याचे चित्त धनावर बसलेले असते किंवा विषयी मनुष्याच्या चित्तामध्ये जसा काम असतो, मातेचे चित्त बालकाच्या ठिकाणी असते, तसे माझे मन रामाच्या ठिकाणी राहेल असे काही तू कर. १ तु. गाथा....६६

५२२ सार्थ तुकारामगाथा ११७६ तुका पखिबहिरन मानु । बोई जनाबर बाग । असतनकु सत न मानू । जे धर्मकु दाग ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पखिबहिरन-पक्षी बहिरी ससाणा, बाग-वाघ अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, बहिरी ससाण्यास आम्ही इतर पक्ष्यांप्रमाणे मानणार नाही व वाघ, हाही इतर जनावरांप्रमाणे नाही त्याप्रमाणे असताना सत मानणार नाही त्याच्या वाईट वर्मास आम्ही डाग लावू १ ११७७ तुका राम बहुत मिठा रे । भर राखू शरीर । तनकी करू नावरि । उतारू पैल तीर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - नावरि-नौका अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात राम हा फार गोड आहे म्हणून सर्व शरीरात त्याला भरून ठेवू व देहाची नौका करून या भवनादीच्या पार उतरून जाऊ १ ११७८ सतन पन्हया ले लडा । राहू ठाकुरद्वार । चलत पाछेंहु फिरो । रज उडत लेऊ सीर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पन्हया-पादुका रज-धुली अर्थ - संतांच्या पादुका मस्तकावर घेऊन देवाच्या द्वारात उभा राहीन आणि संत निघाले की त्यांच्या मागे मी फिरेन व त्यांच्या पायांची जी धूळ उडेल ती मी मस्तकावर घेईन १ ११७९ तुकाप्रभु बडो न मनू न मानू बडो । जिसपास बहु दाम । वलिहारि उस मुझकी । जिसती निकसे राम ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रभु-राजा अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, मी राजाला मोठा मानणार नाही व ज्याच्यापाशी पुष्कळ पैसा आहे, त्यालाही मी मोठा मानणार नाही ज्याच्या मुखातून रामनाम निघत आहे, त्याचे मुख धन्य आहे व तोच श्रेष्ठ आहे १ ११८० राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खाड । हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस राड ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - खाड-खडासाखर अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात जे मुख रामनामाचे चिंतन करीत आहे, ते उत्तम आहे व ते चिंतन नव्हे तर दूधसाखरेचे सेवन आहे ज्या मुखात हरीचे चिंतन नाही त्या मुखात माती पडली त्या आईने रांडेने, त्याला जन्म कशाला दिला ? १ ११८१ राम कहे सो मुख भला रे । बिन रामसे बीप । आप न जानू रमते बेरो । जन काल लगावे सीष ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - वीप-वाप अर्थ - जे मुख रामचिंतन करीत आहे, ते उत्तम आहे रामचिंतन नसेल तर ते मुख विष्ठाप्रमाणे होय आपल्या मताने आपल्यास मोठे समजू नये कारण ज्या वेळी काळ शिक्षा करील त्या वेळेस आपणांस कळून येईल १

सार्थ तुकारामगाथा ५२३ ११८२ कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार । मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - सवदा-सौदा अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी सौदा विकत आहे. जे कोणी घेतील त्यांची देहबुद्धीच हरेल. साधुसंत गोड आहेत व मूर्खांच्या डोक्यावर मात्र मार बसेल १ ११८३ तुका दास तिनका रे । रामभजन निरास । क्या विचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - तिनका-त्याचा. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी निष्काम मनाने रामाचे भजन करतो, त्याचा मी सेवक आहे. मोठे पंडित जरी असले तरी, त्या गरीबाचे काय करावयाचे आहे ? का ? तर ते आशेने ज्याच्या त्याच्या पुढे हात पसरतात. १ ११८४ तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी रास । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- पतंग-टोळ. अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे टोळ हा प्रेमाने दिव्यावर उडी घालून स्वतःस जाळून घेतो, तसे उत्तम प्रेम रामाच्या ठिकाणी तू ठेव. १ ११८५ कहे तुका जग भुला रे । कह्या न मानत कोय । हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- डोय-डोके. अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जग विषयांच्या संगतीने भूलून गेले आहे किती सांगितले तरी कोणी मानीत नाहीत ज्या वेळेस त्याच्यावर काळाचा हात पडेल त्या वेळेस तो इतका मार घेईल की, त्या योगाने डोके फुटेल. १ ११८६ तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ॥ चोट साहे धनकि रे । हिरा नीबरे तोये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुरा-शूर, धनकि-घणाचे, चोट-घाव, आघात अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, जे बोलण्याने आपल्याला शूर मानतात, त्यांनी जोपर्यंत शूरत्व गाजवले नाही, तोपर्यंत मी त्यांना मानीत नाही घणाचे घाव सोसून न फुटता जो टिकतो, त्याची खऱ्या हिऱ्याप्रमाणे निवड होते. १ ११८७ तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये । एक पावे उंच पदवी । एक खोसां जोये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- विरला-एखादाच अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, तोंडाने आपणाला शूर म्हणविणारे पुष्कळ आहेत, पण खऱ्या प्रसंगी धैर्य धरून शूरत्वाने युद्ध करणारे असे थोडे; म्हणून असे जे कोणी आहेत ते मोठे अधिकारी होतात. पण कित्येक जोडा खाणारे असे नीच पदवीचे राहतात १

५२४ सार्थ तुकारामगाथा ११८८ तुका मान्या पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - मान्या-मारला गेला, पेटका-पोटाने अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, मी पोटाने मारला गेलो आहे दुसरे काही मी जाणत नाही. त्यातल्या त्यात हरिभक्ताच्या संप्रदायाने मी थोडा रामनामाचा जप करतो १ ११८९ काफर सोही आपण बुझे । आला दुनिया भर । कहे तुका तुम्हे सुनो रे भाई । हिरिदा जिन्होका कठोर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - काफर-नास्तिक हिरिदा-हृदय अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या योगाने प्रेम वाढते, त्यास मी सत समजतो व ज्याच्यामुळे देवावर असलेले प्रेम कमी होते अशा नास्तिकांना मी दुर्जन म्हणतो १ ११९० भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जयै कमतरिण । सो ही सो फल खाये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पढीया-शिकलेले अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, जे कुणी शिकलेले आहेत, त्यांनी आपल्या विद्यारूपी मालावर भरवंसा ठेवून लोकरंजन केले तर त्यांना परमार्थफळ प्राप्त होणार नाही व जे कोणी सर्व अभिमान टाकून आपल्याकडे कमीपणा घेऊन नम्र झाले आहेत तेच त्या परमार्थफळाचे सेवन करितात १ ११९१ फल पाया तो खुस भया । किन्होसु न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित मिलाया नाद ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - भया-झाले, मिरगा-हरीण अर्थ - जो परमार्थफळाचे सेवन करतो, तो सुखी होतो व कुणाशी वादविवाद करीत नाही जसे व्याधाच्या गायनाकडे हरिणीचे चित्त वेधून जाते की व्याधाने मारावयास काढलेल्या बाणाकडे तो पाहातही नाही १ ११९२ तुका दास रामका । मनमे एक हि भाव ॥ तो न पालटू आव । यँ हि तन जाय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पालटू-बदलूं अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात मी रामाचा दास आहे व माझ्या मनात त्याच्याविषयीचाच एक भाव आहे, तो हे शरीर पडले तरी कधी बदलणार नाही १ ११९३ तुका रामसु चित बाघ राखू । तैसा आपनो हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - बछरा-वासरू सात अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात वासराला टाकून गाय ही जरी वनात गेली तरी तिचे वासरावरील जे प्रेम आहे ते उठून तिच्या बरोबर जात नाही, तसे तुम्ही आपले चित्त आपल्या हाताने रामाच्या ठिकाणी बांधून ठेवा १ ११९४ चितसु चित जब मिले । तब तनु थडा होये । तुका मिलना जिन्होसु । ऐसा विरला कोये ॥ १ ॥

सार्थ तुकारामगाथा ५२५ शब्दार्थ व टीपा :- विरला-एकदाच, थोडेकेच. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, उभयतांच्या चित्तातले विचार जेव्हा एक होतील, त्या वेळेस देह शांत होतो. पण ज्याच्या चित्ताशी आपले चित्त मिळवावे असे सज्जन थोडेकेच असतात. १ ११९५ चित मिले तो सब मिले । नहि तो फुकट संग । पानी पथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठोर-जागा. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात चित्ताला चित्त मिळाले की, सर्व काही मिळालेच. नाही तर कोणाचीही संगत करणे फुकट. जसे पाणी आणि दगड या दोघांचा योग जरी झाला तरी त्या दगडाच्या आतील एक भागसुद्धा भिजला जात नाही. असंगतीने दगडाचे काठिण्यात नरमाई येत नाही. १ ११९६ तुका संगत तीन्हसें कहिये । जिनमें सुख दुनाये ॥ दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- दुनाये-दुप्पट होईल, मू-मुख. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या संगतीने प्रेमसुख दुप्पट होते, त्याची संगती करावी व ज्याच्या संगतीने असलेले प्रेम नाहीसे होते, त्या दुर्जनांचे तोंड काळे आहे असे समजून जावे. १ ११९७ तुका मिलना तो भला । मनसूं मन मिल जाय । उपर उपर माटि घसनी । उनकि कोन धराई ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - घसनी-घासून अर्थ :- जर मिळायचे असेल तर मनाने मनाशी मिळावे हे चांगले. वरवर कितीही मातीने घासले तरी त्याचा मोठेपणा काय आहे ? १ ११९८ तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर मुंदाय । जबये इच्छा नहिं मुई । तब तूं किया काय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- मंदाय-बोडून. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, बायका, पोरे इत्यादी सर्व कुटुंबाचा त्याग करून डोके बोडून संन्यास घेतला; पण अंतःकरणातील इच्छा नाहीशी झाली नाही तर तू काय केलेस ? १ ११९९ तुका इच्छा मीटइ तो । फाहा करे जट खाक । मथोया गोला डारदिया तो । नहि मिले फेरन ताक ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- मीटइ-नाहीशी, जट-जटा, मथोया-मथन करून. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणातील इच्छा नाहीशी झाल्यावर जटा राखणे व राख लावणे हे काय करावयाचे आहे ? तो संसारात जरी असला तरी त्याहून अलिप्त आहे. जसे मंथन करून काढलेला लोण्याचा गोळा पुन ताकात घातला तरी तो अलिप्त राहतो. १ १२०० दीद मेरे सांइयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - सांईयाके-स्वामीचे, लरे-लढे.

५२६ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामीचे ब्रीद जो चालवतो, त्याच्या जवळ मी असतो. जो कोणी धीर, शूर असून देहाचा लोभ टाकतो तोच आमच्याशी लढेल. १ १२०१ कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास । क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- भया-झाला. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी संताचा दास झालो, हे फार चांगले. माझ्या मनातील आशा जर नाहीशी झाली नसती तर किती वेळ मरावे लागले असते हे कळू शकेल. १ १२०२ तुका और मिठाई क्या करूं रे । पाले बिकारपिंड । राम कहावे सो भली रूखी । माखन खांडखीर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा :- पाले-पाळळा, रूखो-कोरडी. अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, बाकीच्या मिष्ट रसास काय करावयाचे आहे ? त्या योगेकरून विकारी देहाचेच रक्षण होईल. राम भजन करून कोरडी भाकरी खाणे, हे लोणी, दूध, साखर खाल्ल्याप्रमाणे उत्तम होय. १ १२०३ म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥ १ ॥ लाहो घेईं हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ २ ॥ गळा पडेल यमफांसी । मग केंचा हरि म्हणसी ॥ ३ ॥ पुरलासाटीं देहाडा । ऐसें न म्हणे न म्हणे मूढा ॥ ४ ॥ नरदेह दुबळा । ऐसें न म्हणे रे चांडाळा ॥ ५ ॥ तुका म्हणे सांगों किती । सेकीं तोंडीं पडेल माती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - संचित- प्रारब्धामध्ये, मात-गोष्ट, लाहो-लाभ, पुरलासाठीं-भोगासाठी, देहडा-देह, सेकीं-शेवटी. अर्थ :- श्रीहरीचे भजन आपल्या प्रारब्धामध्ये नाही अशा प्रकारची गोष्टच मुखातून काढू नकोस. १ या श्रीहरीच्या नामाचा लाभ त्वरित करून घे तू आपल्या या मानवी देहाचा जन्म व्यर्थ जाऊ देऊ नकोस २ कधी तरी लौकरच तुझ्या गळयात यमाचा पाश पडेल; मग या श्रीहरीचे नाव तुला कसे घेता येईल ? ३ मूर्ख माणसा, हा आपला देह केवळ विषयाच्या भोगासाठीच आहे, असे तू कधीही समजू नकोस. ४ हा नरदेह दुबळा आहे, असेही चांडाळा, तू कधी म्हणू नकोस ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता तुला सांगू तरी किती ? शेवटी तुझ्या तोंडात मातीच पडेल हे मात्र ध्यानात ठेव. ६ १२०४ संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥ १ ॥ बहु घट जरी झाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥ २ ॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - दुर्गम-समजण्यास कठीण, शाब्दिकाचे-पंडिताचे. अर्थ :- या संताचे माहात्म्य समजून घेण्यास फार कठीण आहे. केवळ पडिक पंडिताचे ते काही काम नव्हे. १ एखादी गाय अथवा म्हैस कितीही घडघास्ट झाली तरी, ती काय इच्छिलेली वस्तू देणाऱ्या कामधेनूच्या बरोबरीची पद्योतरी होईल काय ? २ तुकाराम महाराज म्हणतात, स्वतः आपण अंगानेच संत झालो, तरच संतांचे महत्त्व समजून येईल. एरव्ही नाही. ३

सार्थ तुकारामगाथा ५२७

१२०५ नाहीं सतपण मिळतें१ हें हाटों । हिंडता कपाटीं रानीं वनीं ॥ १ ॥ नये मोल देता धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥ २ ॥ तुका म्हणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - हाटों- बाजारात, कपाटीं- गुहात. अर्थ :- सतत्वाची प्राप्ती कुठे बाजारात विकत मिळत नाही किंवा रानावनात कुठे, डोंगरातील गुहांतही ते कधी प्राप्त होत नाही १ वाटेल तेवढे मोल धनाची रास ओतून जरी दिले, तरी काही त्याची प्राप्ती होणार नाही. ते आकाशात किंवा पाताळात धुंडूनही मिळणार नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, ते फक्त आपला जीव परमेश्वरास अर्पण करण्याची तयारी आपली असेल तरच, ते आपणांस मिळेल. अशी तयारी नसेल तर सत्त्वाची गोष्ट कुणीही कधी बोलू नये ३ विवरण - वरील दोन अभंगात तुकाराम बुवांनी सतांचे व सतत्वाचे महत्त्व स्पष्ट केले आहे सताचे महत्त्व शाब्दिक पंडिताना कधीच समजणार नाही, आपण स्वतःच जेव्हा सत्त्व अंगी बाणवून घेऊ, तेव्हाच त्याची प्रचीती आपणास येईल सत्तत्वही बाह्य देखाव्याची खूण नसून ती एक अंतरंगाची अनुभूती आहे हे सतपण वाटेल एवढी धनसंपत्ती जरी खर्च केली तरी बाजारात, गिरिकुव्हरात, आकाशात, पाताळात, किंवा इतरत्र कुठेही मिळणार नाही केवळ श्रीहरीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची ज्याची इच्छा आहे, त्यालाच या सत्त्वाचा अनुभव घेता येईल, असा निर्णय बुवांनी येथे दिलेला आहे तुकोबांच्या वेळी घरोघरी बवी व संत निर्माण झाल्यामुळे खरा संत कोण, खरे सतत्व कोणते, यासंबंधी एकसारखी जागृती त्यांना करावी लागली आहे संतदर्शनाची व संतसगतीची गोडी ज्ञानेश्वरानामदेवापासून तुकाराम बुवांपर्यंत सर्वच संतानी वर्णन केलेली असली तरी, खऱ्या संतत्वाचा निवाडाही प्रत्येक संतास इतर लोकांसाठी करावा लागला आहे लोकांना फसविणारे, खोट्या परमार्थाची खात वाट दाखविणारे, लुबाडणारे, भोंदू साधुसत वित्तीयरी असतात त्यांच्यापासून लोकांनी सावध असावे म्हणून जाग्रूपनेने थोर संतानी संतत्वाच्या खुणा पुन पुन वर्णन करून सांगितल्या आहेत 'ब्रह्ममूर्ती सत जगीं अवतरले । उद्धरात्रया आले दोन जना', 'सर्वाभूतीं पाहे एक वासुदेव । पुसोनिया ठाव अहंताचा । तोचि सतसाधू ओळखावा निका', असे संताचे वर्णन नामदेवानी केलेले आहे जो लौकिकाविषयी उदासीन आहे, ज्याच्या अंतरंगात प्रेमाचा जिव्हाळा आहे, ज्याच्या वाणीत नेहमी राम कृष्ण असा जप आहे, तेच खरे संत, असे त्याचे सांगणे आहे निळोबारायानी संताच्या लक्षणाविषयी व त्याच्या महत्त्वा- विषयी फार उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले आहे 'तेचि संत तेचि संत । ज्याचा हेत विठ्ठलीं' हे संत कसे असतात ? तर निळोबानी सागितले आहे, 'नेणती ते आपपर । विश्वीं झाले विश्वंभर', 'हरीच्या नामामृतें धाले । गिळूनी यहाळा राहिले' अशा भाषेत त्यानी संतांचा महिमा वर्णन केलेला आहे १२०६ नामाची आवडी तोचि जाणा देव ॥ न धरौं२ संदेह कांही मनीं ॥ १ ॥ ऐसे मी हें नाहीं बोलत नेणता । आणोनि संमता संतांचिया ॥ २ ॥ नाम म्हणे तया आणीक३ साधन । ऐसे हें वचन बोलों नये ॥ ३ ॥ तुका म्हणे सुत पाये या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संदेह-संशय, समता-संमती अर्थ:- श्रीहरीच्या नामाची प्रीती ज्याला आहे, तो प्रत्यक्ष देवच समजावा याविषयी मनामध्ये कसलाही सशय धारण करू नये १ मी अजाणपणे असे काही तरी बोलत आहे, असे तुम्ही कुणी समजू नका या माझ्या बोलण्यास सर्व संताची समती आहे. जो श्रीहरीचे नाम घेत आहे, त्याने आणखी काही साधने भगवंताच्या १ मिळत, २ घरा, ३ उरले

प्राप्तीसाठी करावीत असे कुणी बोलूसुद्धा नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे आईबाप शुद्ध आहेत, तोच माझ्या या वचनापासून सुखी होईल ४

विवरण - वारकरी पंथात इतर साधनांपेक्षा व्यार्त्तीर्तन, भजन व प्रभूचे सतत नामस्मरण याचंच महत्त्व आहे श्रीहरीचे नाम हे एक महत्त्वाचे साधन सर्वच साधुसंतानी सांगितले आहे या नामाची महती ज्ञानेश्वरनाम- देवापासून तुकारामबुवापर्यंत सर्व संतानी एकमुखाने गायिली आहे ' नाम हैं मगळ अच्युताचे ', ' नित्यनाम याचे तोचि एक धन्य ' ' नामाचेनि बळें तरिजे संसार ' इत्यादी ओळींतून निवृत्तीनाथानाही नामाचेच माहात्म्य सांगितले आहे ' सकाळ मंगळनिधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी ' या भाषेत श्रीज्ञानदेवानी या नामाचा गौरव केलेला आहे ' सार सार सार विठोबा नाम तुझें सार ' असे दुसऱ्या एका अभंगात त्यानी म्हटल आहे नामदेव महाराज हे तर नामाचेच देव त्याच्या शेकडो अभंगातून नामाचे माहात्म्य परोपरीने वर्णन केल आहे ' नाम हे अमृत भक्तांसी लाधले', ' नाम तेंवि रूप रूप तैंचि नाम ', ' साधनात सोपें नाम हे केवळ । यावीणसकळ सीण वाया ', ' नाम फुकाचे घोषट । नाम घेता न लगे कष्ट ' अशा अनेक वचनातून नामदेवानी नामाचे महत्त्व सांगितल आहे एकनाथ- तुकाराम यानीही याच नामाच्या साधनाचा प्रसार केला आहे

१२०७ सुखें होतो कोठें घेतली सुती । बाधविला गळा आपुले हातीं ॥ १ ॥ काय करूं बहु गुंतलो आता । नये सरता मागें पुढें ॥ २ ॥ होते गाठी ते सरले येता । आणीक माथा ऋण जाले ॥ ३ ॥ सोकरिलियाविण गमाविले पिक । राडापोरे भिके लावियेलों ॥ ४ ॥ बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरे कांहीं केल्या ॥ ५ ॥ तुका म्हणे काहीं न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकोनिया ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - सुती-लाभ, सोकरिलियाविण-राखल्याशिवाय

अर्थ - खरे म्हणजे मी अव्यक्तातच सुखी होतो पण कशी या प्रपंचाची व देहादी वृत्तींची गाठ पडली व लोभ जडला, कुणास माहीत, मी त्यात गुंतूनच राहिलो आपल्याच हातानी मी माझा गळा या लौकिक व्यवहारात गुंतवून टाकला १ आता काय करू ? मो फारच गुंतत चाललो हो मला आता मागेपुढे सरकण्यादीही काही सोय राहिलेली नाही २ माझ्याजवळ काही थोडी बहुत पुण्याई होती, पण ती येथे जन्म पावताच संपली आणि या प्रपंचाचे भले मोठे ऋण मात्र माझ्या डोक्यावर झाले ३ या प्रपंचरूपी अथवा देहरूपी शेताची राखण न केल्यामुळे मी सर्वच पीक गमावले व त्यामुळे राडापोरांना भिकेस लावले ४ मी पुष्कळाची घरे व्यर्थ खटपट करून घेतली, पण ती हाय काही मला पुरी पडेना ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र कशाचीच आशा न धरिता हे सर्व येथेच सोडून कुठे तरी निघून जावे असे वाटते ६

१२०८ न मनाये तैसे गुरूचे वचन । जेणें नारायण अंतरे तें । आड आला म्हून फोडियेला डोळा । वळिनें आंधळा शुक केला ॥ १ ॥ करो देव तरी काय नव्हे एक । का तुम्ही पृथक सिणा वाया ॥ २ ॥ उल्लंघूनिया भ्रताराची आज्ञा । अन्न ऋषिपत्न्या घेउनि गेल्या ॥ अवघेचि त्याचे देये केले वाज । धर्म आणि लाज राखियेली ॥ ३ ॥ पितियासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला ॥ बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं वैवाड सांडियेला ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा ५२९ गोळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती । तयासी दिले तें कवणासी नाहीं । अवघा अंतर्बाह्यीं तोचि' जाला ॥ ५ ॥ देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें धर्म नाचरावें । तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिले ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - मनावे-मानूं नये, म्हुन-म्हणून, पृथक-वेगळे, थेराकार-वंग, कंचाट-क्रोध, नाचरावें- आचरू नये अर्थ :- जर गुरूच्या वचनानी ईश्वराचे अंतर पडत असेल तर मग ते गुरूचे वचनही मान्य करू नये त्रिपाद भूमीचे दान देताना झारीच्या पाण्यात शुक्र आड आल्यावर बळी राजाने त्याचा डोळा दर्भाच्या काडीने फोडला शुक्राला आंधळेच करून टाकले १ देवाने जर मनात आणले तर मग तो काय करणार नाही ? तुम्ही उगाच वेगळे असे परिश्रम व्यर्थ का करिता ? २ आपल्या पतीची आज्ञा मोडून ऋषिपत्नी भगवंताकडे अन्न घेऊन गेल्या होत्याच ना ? त्यावेळी देयाने त्याचे सर्व काम करून त्याची लाज व त्याचा धर्म याचे रक्षण केले ३ प्रल्हाद जेव्हा श्रीहरीची भक्ती करू लागला, तेव्हा त्याच्या पित्याने, हिरण्यकशिपुने त्याला केवढा विरोध केला, पण देवाच्या प्राप्तीसाठी प्रल्हादाने आपल्या दैत्य पित्यास भारविले त्याने प्रल्हादावर परोपरीची संकटे निर्माण केली; पण ईश्वरविषयचीचा लोभ प्रल्हादाने सोडला नाही ४ गोकुळच्या गोळणी जरी देवाकडे व्यभिचाराच्या भावाने गेल्या तरी व त्या लौकिक आचारापासून भ्रष्ट झाल्या, तरी देवाने इतर कुणाला जे दिले नाही ते त्याने गोळणींना दिले कारण त्यांचा अंतर्बाह्य विषयच श्रीहरी बनून गेला होता. ५ यासाठी जरी वरवर अधर्म होत असला, पण त्यामुळे जर देव मिळत असेल तर तोही करावा परंतु देवाशी जेणेकरून अंतर पडेल, असे कुठलेही कार्य करू नये तुकाराम महाराज म्हणतात, देवास हा कळवळा हृदयामधील असतोच, म्हणून तर त्याने अजामेळासारख्या पातक्यांचाही उद्धार केला ६ विवरण :- भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गात आईबाप, बंधू, पती, पत्नी किंवा गुरू कुणीही आले तरी त्याचा त्याग करावा, व देवाशी सख्यत्व जोडावे, असा विचार अनेक ठिकाणी संतानी सांगितलेला आहे वरवर अधर्माचे वाटणारे कृत्यही करावे, पण श्रीहरीची प्राप्ती होत असेल तर ती सोडू नये या विचाराच्या पुष्टीसाठी तुकाराम बुवांनी दिलेली काही उदाहरणे आपणास माहित आहेत ऋषिपत्नीची कथा भागवतादी ग्रंथात विस्ताराने आलेली आहे एकदा श्रीकृष्ण व त्याचे मित्र रानात हिंडता हिंडता खूप दूर आले चालण्याचे परिश्रम फार झाल्यामुळे त्यांना फार भूक लागली व त्यांनी श्रीकृष्णाजवळ खायला मागितले तेव्हा बलराम व श्रीकृष्ण यांनी गोपाळांना सांगितले, 'येथून जवळच ब्राह्मणांनी आंगिरस नावाचा यज्ञ सुरु केलेला आहे त्यांच्यापाशी जाऊन अन्न घेऊन या' त्याप्रमाणे गोपाळ ऋषींच्या जवळ गेले त्यांनी श्रीकृष्ण व बलराम यांचा निरोप त्यांना सांगितला परंतु ऋषींनी व ब्राह्मणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही श्रीकृष्णास विसरून ते स्वर्गाची इच्छा मनात धरून यज्ञायागादी कर्म करण्यात गुंतले होते मग ते गोपाळ त्या ऋषींच्या पत्नींकडे गेले श्रीकृष्णाचा निरोप ऐकून ऋषिपत्नींना अतिशय हर्ष झाला त्यांचे चित्त भगवंताकडेच एकदम वेधून राहिले नाना प्रकारची अन्ने व गोडपदार्थांची ताटे घेऊन त्या श्रीकृष्णाकडे धावल्या भगवंताच्या ओढीपुढे त्यांनी कुणाचीही, आपल्या पतींचीही आज्ञा मान्य केली नाही त्यांच्या प्रीतीमुळे श्रीकृष्णासही आनंद झाला व श्रीकृष्णदर्शनामुळे ऋषिपत्नीहा सुखावल्या पुढे ब्राह्मणांनाही आपल्या कर्माचा पश्चात्ताप झाला गोकुळच्या गोळणी ईश्वराकडे कोणत्या भावनेने गेल्या? याविषयी भरपूर चर्चा आजवर झालेली आहे 'गोळणी करिती देवाशीं व्यभिचार' अशा भाषेत तुकोबांनी त्यांच्या वृत्तीने वर्णन केले असले तरी, त्या वर्णनाची वरवरची भाषाही महत्त्वाची नाही, हे ध्यानात घ्यावयास हवे व्यभिचाराच्या भावनेत जो तीव्रता व जी समर्पणाची १ हरी तु गाथा ६७

५३० सा. तु. म. गाथा वृत्ती असते तेवढीच येथे ध्यानात घेणे अगत्याचे आहे सर्व चित्त श्रीकृष्णास अर्पण करून लौकिक संसार करणे हे यातील मर्म आहे, पण हे चित्त कसे अर्पण करायचे ? तर स्वतः जवळ काहीही न ठेविता गोकुळच्या गौळणींना श्रीकृष्णाची प्रचीती त्यांच्या हृदयातच होत असे त्यांनी आपल्या पतींशीं वरवर वैर केल्याचे अथवा सदाचार सोडल्याचे दिसत असले तरी, त्यांच्या या समर्पणाची भाषा केवळ तुलनेसाठी आहे हे ध्यानात हवे वामनावताराच्या वेळी बलिराजाने सर्वस्वाचे दान तीन पावलांच्या रूपात मान्य करून शेवटी विष्णूच्या हातावर उदक सोडण्याचा प्रसंग आला तेव्हा शुक्रांने आपल्या राजाचा संकल्प सिद्धीस जाऊ नये म्हणून सूक्ष्म रूप घेतले व तो झारीच्या तोंडाशी जाऊन बसला झारीच्या तोटीमधून पाणी येईना असे पाहून बळीने दर्भाच्या काडीने डोसून शुक्राचा एक डोळा फोडला भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्वस्वाचे त्याला दान करण्याच्या आपल्या कृतीसाठी बळीने शुक्राचार्यास देखील दूर केले अशी कथा पुराणातून आहे तुकाराम महाराजांनी 'बळीनें आंधळा शुक्र केला' असा मोठा समर्पक उपयोग या अभंगात केला आहे १२०९ अरे गिळिले हो संसारे । कांहीं तरि राखा खरे । दिला करुणाकरे । मनुष्यदेह सत्संग' ॥ १ ॥ येथें न घालीं न घालीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवा ॥ २ ॥ केलें तें क्रियमाण । जाले तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उर्वरित उरले ते ॥ ३ ॥ चित्त खोटें चालीवरि । रोग भोगाचे अंतरीं । रसने अनावरी । तुका म्हणे दुग वाहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नाड- अडचण प्रतिबंध अर्थ - अहो लोकोहो, तुम्हाला या संसाराने गिळून टाकिले आहे यासाठी काही तरी सत्याची चाड ठेवा ना त्या करुणाकर भगवंताने तुम्हास हा मनुष्य देह व हा सत्संग दिलेला आहे त्याची थोडी तरी आठवण ठेवा १ येथे संचिताचा किंवा प्रारब्धाचा शब्द आड घालून, आमच्या प्रारब्धात हरिभजन नाही, असे समजून उगाच व्यर्थ आयुष्य घालवू नका हरिनामाच्या योगाने बीज वाढवून या जन्माचे सार्थक करा २ आजपर्यंत जे कर्म तुमच्याकडून घडले गेले, ते क्रियमाण, जे पूर्वी होऊन गेले, ते संचित व आता भोगण्यासाठी जे उरले आहे ते, प्रारब्ध जाणावे ३ कारण ध्यानात असू द्या की चित्त नेहमीच खोट्या चालीने चालत असते, रोग आपल्याच भोगामुळे निर्माण होत असतात जिह्वेची चटक अनिवार झाली की मग दुर्गंध वाहात राहते ४ १२१० अग्न तापलिया कायाचि होमे । तापत्रयें सतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसारस्थिति । राहाटघटिका जैसी फिरताचि राहिली । भरली जाती एके रितीं । साधीं हा प्रपंच पचाय अग्न । तेणे पावसील निजशांती रे ॥ १ ॥ नारायणनाम नारायणनाम । नित्य करीं काम जिव्हामुखें । जन्मजराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुखें ॥ २ ॥ शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ दान व्रत आचरण । यज्ञ नाना मन बुद्धी । १ सत्संग

भोगाभोग तेथें न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि । साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं ॥ ३ ॥ घोकित अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति । दूषणाचे मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खती । रिघोनि संतां शरण सर्वभावे । राहे भलतिया स्थिती ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - अन-अग्नी, काया-शरीर, पचाय आनी-पंचाग्नी, चारही बाजूस अग्निकुंडे पेटवून केलेली साधना, साडी-सोडून दे, खती-काळजी

अर्थ - अग्नी तप्त झाला की शरीर तापून निघते तापत्रयानेही तो संतप्त होत असतो सचित, क्रियमाण व प्रारब्ध याचा भोग संसाराच्या स्थितीत कधी चुकत नाही ज्याप्रमाणे रहाटगाडग्याची भडकी एकसारखी फिरतच असतात, एक मडके पाण्याने भरले जाते व दुसरे रिकामे होते, त्याचप्रमाणे या प्रपंचाची गती आहे हा प्रपंच म्हणजे पंचाग्नीच्या साधनाप्रमाणे खडतर आहे, तो तू नीट साधून आत्मशांती प्राप्त करून घे १ नेहमी काम करीत असताना नारायण, नारायण असे मुखाने म्हणत जा या योगे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, पाप, पुण्यें ही सर्व दुःखे नाश पावतील २ रानावनात जाऊन तू शीत व उष्ण याची सवय कर आसन मांडून समाधी साधण्याचा प्रयत्न कर तपश्चर्या, तीर्थयात्रा, दानधर्म, व्रताचे आचरण व यज्ञयाग, वगैरे साधनाच्या व बुद्धीच्या योगाने नाना भोगाचे प्रकार काही चुकत नाहीत तेव्हा जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग याना सहन करून, काम, क्रोध, अहंकार इत्यादी विकाराना सहन करून आपल्या स्वतःच्याच आश्रमात अविनाशी स्वरूपात तू निजसुख प्राप्त करून घे ३ वेदाची अक्षरे घोकण्यास आरंभ करशील तर विनाकारण अहंकार व विधिनिषेध यांची कटकट मात्र पाठीमागे लागेल. वादविवाद करशील तर वृथा निंदेचा दोष प्राप्त होईल म्हणूनच ही भूषणे वाटली, तरी ती दोषांचीच मूळे आहेत असे तू समज, आणि तुकाराम महाराज म्हणतात, तू या संसाराची खोटी वाटणारी वृथा चिंता सोडून दे सर्व भावाने या संताना तू शरण जावेस व मग हव्या त्या स्थितीत तू राहिलास तरी हरकत नाही ४

१२११ नव्हे गुरुदास्य संसारिया । वैराग्य तरी भेंणे वापे विषया । तैसे नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥ १ ॥ म्हणोनि गोड सर्वभावे । आंघोळी न लगे तोंड धुवावे । अर्थचाड जीवे । न लगे भ्यावे संसारा ॥ २ ॥ कर्मा तव न पुरे संसारिक । धर्म तव१ फळदायक । नाम विठ्ठलाचे एक । नाशीं दुःख भवाचे ॥ ३ ॥ न लगे साडणे मांडणे । आगमनिगमाचे देखणे । अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामें आटले ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - गुरुदास्य-गुरुच दास्यत्व, भेंणे-भयाने, सायास-प्रयत्न, आटले-समाविष्ट झाले

अर्थ - जी संसारी माणसे आहेत, त्यांना श्रीगुरुचे दास्यत्व खडतरपणे होणार नाही, आणि प्रखर वैराग्य म्हणजे विविध विषयांविषयी पराग, हेही त्यांच्याकडून होणार नाही तसे या पंढरीरायाचे नाम नव्हे याच्या प्राप्तीसाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत १ यासाठी जे सर्व दृष्टींनी गोड आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आंघोळ करणे अथवा तोंड धुणे याचीही गरज लागत नाही जे सांसारिक जीव आहेत, त्यांनी धनाची योग्य इच्छा

१ तरी

५३२ सार्थ तुकारामगाथा मनात ठेवण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही संसारास त्यांनी भिण्याची जरूरी नाही २ विक्षेप फर्ने सूर्य प्रयासान करावयाची झाली तर सासारिक कधीच पुरा पडणार नाही आणि धर्म तर फळ देणारा असल्याने तो या विठ्ठलाच्या नामाच्या रूपानेच आचरावा त्याच्या योगाने संसाराचे दु ख नाहीसे होते ३ या विठ्ठलनामाच्या साधनात काही सोडणे, काही माडणे याची खटपट करावी लागत नाही काही वेदशास्त्राचा अर्थ पाहावा लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलनामात सर्व साधनांचा समावेश झाला आहे ४ १२१२ नये इच्छू सेवा स्वेच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणे ॥ १ ॥ देहाचा निग्रही त्याचे तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ २ ॥ आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणे क्षोभें ॥ ३ ॥ तुका म्हणे साडा दंभींचे दिमाख । मोडशीचे दुख गांड फाटी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्वेच्छा-स्वत च्याच तत्रान वागणाऱ्या जगाची, फळि-सकट अर्थ - स्वतः च्याच तत्रान वागणाऱ्या जगाच्या सेवेची इच्छा कधी करू नये त्यामुळे देवाची अवज्ञा मात्र होत असते १ या देहाचा निग्रह करणारा देवच असल्यामुळे त्याचे तो सांभाळीत असतो त्यायोगे कोणतेही सकट आपल्या अगावर कधीच येत नाही २ आई आपल्या मुलाची देखभाल आपल्याच इच्छेनुसार करीत असते या थोरवीमुळे तिच्या मनाचा क्षोभ तिला कधी बाधकारी होत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, नुसते तोडवेखले दिमाख सोडून द्या साधे मोडशीचे दुखणे झाले तरी गाड फाटली जाते ४ १२१३ सत्य सत्यें देतें फळ । नाही लागतचि बळ ॥ १ ॥ ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ २ ॥ करावीच चिंता । नाहीं लागत तत्त्वता ॥ ३ ॥ तुका म्हणे भावे । शरण म्हणविता बरवे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तत्त्वता-खरे पाहता अर्थ - सत्य हे सत्याचेच फळ देणारे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी काही वेगळया शक्तीची जरूरी लागत नाही १ देवाच्या पायाचे चितन करावे व धीर धरून असावे, हाच एक धीराचा उपाय आहे २ खरे पाहता मग आपणांस कोणत्याही प्रकारची चिता करावी लागत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, मनोभावे आम्ही देवासच शरण आहोत, असे म्हणणे फारच चांगले आहे ४ १२१४ साधक जाले कळौ । गुहगुडीची¹ लाव नळी ॥ १ ॥ पचीं पडे² मद्यपान । भागभुर्की हे साधन ॥ २ ॥ अभेदाचे पाठातर । अति विषयीं पडिभर ॥ ३ ॥ चेल्याचा सुकाळ । पिंड दड भगपाळ³ ॥ ४ ॥ सेवा मानधन । बरे इच्छेने सपन्न ॥ ५ ॥ सोगाच्या नरकाडी । तुका जोडोनिया झाडी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कळौ-कलियुगात, पची-पचनी, पडिभर-प्रेमाचे वैपुल्य, भगपाळ-विपपासवन, नर- काडी-नरखाला जाणारे अर्थ - या कलियुगात खोटा परमाथ साधणारे पुश्कळ झाले आहेत परतु त्यांच्या तोंडात सतत गुह- गुडीची नळी असते १ त्याना मद्याचे पान चागलेच पचनी पडलेले असते घोटा, भांग याच्या सेवनाचीही गोडी त्याना विशेष प्रकारची असत २ अभेदाच्या तत्त्वाचे, ईश्वर व जीव यांच्या ऐक्याच्या वचनाचे त्यांचे पाठांतर असते, १ गुदगुडीची, २ पडिल, ३ भगपाळ

सार्थ तुकारामगाथा ५३३ पण त्यांची खरी प्रीती मात्र नाना प्रकारच्या विषयांवर असते ३ त्यांच्यासारख्याच शिष्यांचा सुकाळ असतो त्यांच्याभोवती. त्यांचे देह चांगले जाडजूड असून दंडही चांगले पोसलेले असून ते सर्व चांगलेच विषयासक्त असतात. ४ दुसऱ्याने केलेली सेवा, मान, धन यांच्या इच्छेने त्यांना संपन्न झाल्यासारखे वाटते. ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सोंगाडे साधक नरकासच जाणारे आहेत. त्यांची मी चांगलीच फजिती करून सोडतो. ६ विवरण :- साक्षात्कारांनतर तुकोबांचे मन शांत झाले. ईश्वरी कृपेचे तेज त्यांच्या मुखावर विलसू लागले. त्यांच्या वाणीस एका बाजूस वात्सल्याचे, करुणेचे, तृप्तेनचे झरे फुटत राहिले, तर दुसऱ्या बाजूस त्यांच्या वाणीतून प्रखर शब्दांनी समाजसुधारणेचे कार्य परकरले. ही सुधारणा दुहेरी होती. लोकांचे संसार कसे विस्कटून गेले होते, लोक अनाचाराकडे कसे वळत होते. इंद्रिय सुमुखातच कशी गोडी त्यांना अवीट वाटत होती, केवळ प्रपंच, केवळ धन- दौलत याचीच चिंता त्यांना कशी असे, याचे वर्णन बुवांनी जितक्या प्रखर व कडक शब्दात केले आहे, तितक्याच तिखट शब्दाच्या प्रहारांनी त्यांनी समकालीन भोंदू गुरूचा, ढोंगी साधकांचा, खोट्या संतांचा निषेध केला आहे. धर्माच्या नावाखाली, देवाच्या प्राप्तीसाठी, रात्रीसाधू व ढोंगी बुवांनी समाजास लुबाडण्यास व परमार्थाच्या नावे भलत्याच मार्गास नेण्याचा प्रयत्न चालविला होता. बाह्यकर्मकांड, बाह्यवेष, नवरंग्यापारा, अगारेधुपारे, जादूटोणा, चमत्कार यांनी खरा परमार्थविचार लुब्ध होण्याच्या पंथात होता. जिकडे तिकडे ढोंगी साधू व व्यसनी साधक याचा गजबझाट झालेला होता. या विकृत अशा समाजस्थितीचे चित्रण त्यांच्या कडक निषेधासहित तुकारामबुवांनी केलेले आहे, त्यांनी म्हटलेले आहे, 'ऐंसे संत झाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी' 'एकभारती तोंडात चिरमीम धरुन व्यसनाधीन झालेल्या 'संतांना' 'आदर्श कसला आला आहे ? हे सर्व सोंग असल्यामुळे तेथे पांडुरंग कधीच असणार नाही असा त्यांचा विश्वास होता. गाजराच्या पुंगीसारखे क्षणभर टिकणारे व जागोजागी दिसणारे योगी अट्‍टवारी झाले होते. 'अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान' अशी त्यांची स्थिती असे. पर द्रव्य व परनारी याची अभिलाषा मनात धरून नाक धरणारे ढोंगी साधू सर्वत्र वावरत होते त्यांचा निषेध करताना तुकोबांनी म्हटले आहे, 'जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर' 'कुणी डोक्यावर बेस वाढ- वितात, कुणी अंगात भुते आणतात, कुणी शकुन सांगून लोकांना फसवितात, कुणी जटा वाढवून 'अभिमान मोठा करिताती' नवींगाना विभूतीलेपन असले तरी त्याचे लक्ष मात्र मिष्टान्नावर असते. तुकारामबुवांनी अशा गोसा- व्याचा, नाथाचा, महानुभवाचा निषेध केलेला आहे. 'घालीनिया फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती' अशी त्यांची अवस्था होती असे हे भोंदू साधू सर्वत्र दिसत होते. 'अंगीं लावूनिया राख । डोळे झांकुनि करिती पाप' कारण त्यांनी केवळ पोटासाठीच ही सर्व बाह्य सोंगे घेतलेली होती, मुखाने ब्रह्मज्ञान बोलणाऱ्यांचे चित्त धनावरच असते. सर्व पंथिक साधकही पिंडपोषकच म्हणजे शरीरधारणेचीच काळजी करणारे होते. गांजा ओढण्यात, भांग पिण्यात, मद्यपान करण्यातही काही भक्तिसाधनेची जोड आहे, असे प्रतिपादन करण्याचेही धैर्य काही साधुसंतांना होत असे. समाजापुढे हे असे ढोंगी साधू केव्हाही निषेधार्हच असल्याने बुवांनी कडक शब्दात त्यांनी धिंड काढली आहे. १३१५ मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥ १ ॥ कोणाचा कोणासीं न¹ धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ २ ॥ काढा जी आपुलें मोह बुंथी जाळें । नका लावूं बळें वेड आम्हां ॥ ३ ॥ जीव शिव काहीं ठेवियेलें नाहीं । सत्य तुम्हां ठायें असोनियां ॥ ४ ॥ सेवेच्या अभिलापें न घराचि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥ ५ ॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥ ६ ॥ तुका म्हणे काय छायेचा अभिलाप । हंस पावे नाश तारागणीं² ॥ ७ ॥ १ न धरणे, २ तारागणी.

५३४ सार्थ तुकारामगाथा

शब्दार्थ व टीपा :- लटिके-खोटे, बुंथो-खोळ, वस्त्र अर्थ .- देवा, मी जर सर्वत्र पाहिले तर मला सारे खोटेच दिसते. तेव्हा हे सर्व मायाजाळ आहे तरी काय? ते मला दाखोव ना ? या जगात कुणाचा कुणाशी सबंध नसून जे आहे ते शुद्ध बुद्ध असे जागच्या जागीच स्वयंसिद्ध असे आहे. २ देवा, तुम्ही आमच्यावर घातलेले हे जे मायेचे वस्त्र आहे तो फाडा ना. आम्हांला उगाच त्यापाठी वेड लावू नका ३ देवा, खरे पाहता सर्वत्र एकच तत्त्व असताना तुम्ही एकास जीव व एकास शिव अशी नांवे ठेवलीत. ४ आमच्याकडून तुम्हास सेवा घ्यायची इच्छा असल्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचारच न करिता आम्हास जन्ममृत्यूच्या खेपात फिरवीत आहात ५ आता तरी आहे ही वस्तुस्थिती समजल्यावर देवा, जो काही खोटाच द्वैतभाव धरला आहे तो सोडून द्यावा ६ तुकाराम महाराज म्हणतात, तारागणाचा, आकाशातील तारकांचा देखावा प्रतिबिंबाच्या रूपाने पाण्यावर पडलेला पाहून त्या ठिकाणी मौक्तिकाचा मोह हंसाला उत्पन्न होतो व तेथे उडी घेतल्यामुळे बिचारा हंस मात्र नाश पावतो. ७ १२१६ पंचभूतांचा गोधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥ १ ॥ तेथें काय भी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा फेडीं रिझें । हे काळाचे भातुकें ॥ २ ॥ जीव न देखे मरण । घरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥ ३ ॥ इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- पचभूताचा गोधळ-पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूताच्या एकीकरणा- तून झालेला मानवी देह अर्थ :- पृथ्वी, आप, तेजादी पंचमहाभूतांचे एकत्रिकरण होऊन हा मानवी देह निर्माण झाला व हा देह म्हणजेच मी, असा अहंकार जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला १ या ठिकाणी शरीर म्हणजेच मी, त्याचे ओझे माझ्यावरच आहे अशा ममत्वाच्या भावनेने मनुष्य काळाचेच खाद्य असणारा देह कौतुकाने जपू लागतो. २ खरे पाहिले असता, जीवास मरण कधीही नसते. तो जुने वस्त्र टाकून देऊन नवीन स्वीकारतो. पूर्वजन्मीच्या शुभाशुभ कर्माच्या भोगानुसार हे सर्व घडते ३ मागच्या जन्मीच्या कर्मानुसार इच्छेचा वेल वाढीस लागतो या इच्छारूपी वेलाला न वाढविणे, त्याची वाढच खुंटविणे, हे सत्य होय तुकाराम महाराज म्हणतात, ज्यानी आपली इच्छाच याप्रमाणे नाहीशी केली, तोच गुह्य किंवा गुप्त असलेले हे ज्ञान प्राप्त करून घेण्यास समर्थ होईल. ४ विवरण :- शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असून त्यात अहंकार, इच्छा निर्माण होऊन त्याचे कोडकौतुक केले जाते व त्यात असणारा अविनाशी आत्मा मात्र दुर्लक्षित होतो, हा एक तात्त्विक विचार तुकाराम महाराजांनी या अभंगात मांडलेला आहे. अहंकार व इच्छा यांचा त्याग करून आत्मतत्त्वच ओळखल्यासच खरे रहस्य समजेल, असे त्यांनी या ठिकाणी सुचविले आहे. पंचमहाभूतात्मक मानवी देह, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, यांचे शब्द, स्पर्श, रूप गंधात्मक पाच विषय, संकल्पाविकल्पात्मक मन, व्यवसायात्मक बुद्धी, अहंकार, इच्छा सुखदुःखादी भावना इत्यादींचा एकत्र मेळ म्हणजेच हे शरीर असा विचार शास्त्रानीही केलेला आहे गीतेच्या तेराव्या अध्यायात या शरीराचे म्हणजे क्षेत्राचे सविस्तर वर्णन आलेले आहे. महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा सूक्ष्म इंद्रिये, एक मन, पंचविषय इच्छा, द्वेष, सुख, मद्यन, चेतना, धैर्य इत्यादी तत्त्वाच्या समुदायास क्षेत्र अथवा शरीर म्हटले आहे हे क्षेत्र अथवा शरीर जो जाणतो तो क्षेत्रज्ञ होय.

सार्थ तुकारामगाथा ५३५ या शरीराचा खरा मालक गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे नित्य, अविनाशी असा आत्माच असून त्याला ओळखणे, त्याचे स्वरूप जाणणे, त्याचा व मूळ स्वरूपाचा सबंध ओळखणे हे खरे ज्ञान होय. हा आत्मा कधी मारला जात नाही, नष्ट होत नाही. हा कधी जन्मत नाही, कधी मरत नाही. हा नित्य अज, शाश्वत व पुरात आहे. या शरीराचा नाश झाला तरीही याला धक्का पोचत नाही. खरे म्हणजे हा देह म्हणजे 'काळाचें भातुकें'च होय. पण या देहाच्या नाशाने 'जीव न देखे मरण' हे गीतेमधील तत्त्वच बुवा सांगत आहेत. 'घरी नवी जीर्ण सांडी' हे शब्द म्हणजे गीतेमधील 'वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि' या तत्त्वस्पर्शी ओळीचाच सुबोध मराठी अनुवाद होय. गीतेच्या तत्त्वाप्रमाणे या आत्मतत्त्वास कधी मरणच नाही. याला अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही, वायू सुकवीत नाही. हा कधीही न तुटणारा, न जळणारा, न भिजणारा, न सुकणारा असा आत्मा नित्य सर्वत्र भरलेला, स्थिर, अचल व सनातन म्हणजे चिरंतन आहे. देहान्तर झाले म्हणून काय झाले ? • जैसीं जीर्ण वस्त्रे सांडिजे । मग नूतनें आणिके घेइजे । तैंसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यायें' असे थोडक्यात वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. सुखदुःखादी इच्छांची वेल वाढत असलेल्या या शरीराचे खरे महत्त्व ओळखून, ते कमी महत्त्वाचे मानून जे शुद्ध आत्मतत्त्व आहे, त्याचाच विचार केला तरच खरे ज्ञान होईल, असा तुकारामबुवांच्या म्हणण्याचा भावार्थ. १२१७ पुसावेसें हेंचि वाटे । जें जें भेटे तयासी ॥ १ ॥ देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ २ ॥ अवघियांचा विसर जाला । हा राहिला उद्योग ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अवधियांचा-सर्व विषयाचा. अर्थ :- मला जे कुणी भेटतील त्यांना हेच एक विचारावेसे वाटते की, १ देव माझ्यावर कृपा करून माझी लज्जा रक्षण करील काय ? २ मला सर्व विषयांचा विसर पडलेला असून हाच एक चिंतनाचा उद्योग राहिलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या एकाच गोष्टीची मला चिंता वाटत आहे. या प्रश्नाचे उत्तर कुणी देईल असे मला भेटेल काय ? ४ १२१८ जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥ १ ॥ खादलें पचे तरिच तें हित । ओकलिया थीत पिंड पीडि ॥ २ ॥ तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें १ जीवनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे मज तारों गा विठ्ठला । नेणतांचि भला दास तुझा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खुण-घात, खून, थीत-व्यर्थ, खाने-दरोडा. अर्थ :- देवा, हा जाणतेपणाचा अभिमान माझाच घात करीत असल्यामुळे तुम्ही तो जाळून टाका. १ जे खाल्लेले आहे, ते नीट पचले तर ठीक आहे. पण तेच जर न पचल्यामुळे ओकले गेले तर मग शरीराला व्यर्थच पीडा आहे. २ जे धन मिळविले त्याचा प्रपंचास नीट उपयोग झाला तरच ठीक आहे, पण ते जर दरोड्यात नष्ट होईल तर त्याचा जीवनात काहीच उपयोग न होता उलटा घात मात्र होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तूच आता मला या संकटांतून तार. मी नेणता असून तुझाच दास आहे. ४ १२१९ याती मतिहीन रूपें लीन दीन । आणिक अवगुण जाणोनियां ॥ १ ॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ २ ॥ जें कांहीं करितों तें माझें स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥ ३ ॥ १ खाण.

५३६ सार्थ तुकारामगाथा जाले सुख जीवा आनंद अपार । परमात्मवे भार घेतला माझा ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी नावाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी वळें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - याती-जाती, मतिहीन-बुद्धीहीन, अगीकार-स्वीकार प्रचित-अनुभव अर्थ - मी यातीहीन म्हणजे हलक्या जातीचा असून बुद्धीनेही मद आहे माझे रूपही मोठे चांगले नसून मी अतिशय दीन असा आहे आणखीही माझ्यात काही अवगुण आहेत हे मी चांगलेच जाणून आहे १ असे असूनही माझा स्वीकार त्या पांडुरंगाने केलेला आहे याची मला चांगलीच जाणीवही आहे २ हा ईश्वर ज काही करतो ते माझेंच हित आहे, हा अनुभव माझ्या चित्तास पूर्णपणे झालेला आहे ३ या माझ्या जीवाला अपार असा सुखानंद झाला असून या परमात्मस्वरूपी विठ्ठलान माझा सर्व भार आपल्या स्वतःच्या शिरावर घेतलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, या देवाला स्वतःच्या नावाचा मोठाच अभिमान असल्यामुळे शरण आलेल्या भक्तांना तो तारतो ५ १२२० बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी वेशीराजा मायबापा ॥ १ ॥ तुझ्या पायी मज जालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ॥ २ ॥ ऋषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥ ३ ॥ नाहीं नास ते सुख दिले तयास । जाले जे उदास सर्वभावे ॥ ४ ॥ तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेसी पाय तुझे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काजा-कार्यासाठी आस-इच्छा मोकलिली-मोडून दिली नास-नाश अर्थ - देवा, वेशीराजा, मायबापा, भक्ताच्या कार्यासाठी तू फारच उतावीळ झालेला दिसतोस ाहभो १ माझा सर्व विश्वास देवा तुझ्याच पायाशी असल्याने मी इतर ठिकाणची सर्व आशा आता सोडून दिलेली आहे २ ऋषी, मुनी, साधक सिद्ध याना अपार असलेल्या तुझ्या रूपाचा विचार थोडासा का होईना समजलेला आहे ३ म्हणूनच ज्याचा कधीही नाश नाही, असे सुख जे सर्वस्वावर उदास झाले त्यांनाच तू दिलेस ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सुख माझ्याही मनात मावेनासे झाले आहे मी तुझे पाय माझ्या जीवापाशी जपून धरले आहेत ५ १२२१ मायामोहजाळीं होतो सापडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥ १ ॥ काढुनि बाहेर ठेविलो निराळा । कवतुक डोळा दाखविले ॥ २ ॥ नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥ ३ ॥ रडे फुडे दुखें कुटितील माथा । एकासी रडता ते ही मरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज वाटते नवल । मी माझे हे बोल ऐकोनिया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरा सत्य अर्थ - मी प्रपंचाच्या व देहादी वृत्तींच्या मायामोहाच्या जाळयात सापडलो होतो पण या पांडुरंगास माझी दया आली व मी त्यातून सुखरूपपणे बचावलो १ त्याने मला त्यातून बाहेर काढले व कृपेचे कौतुक माझ्या डोळयांना त्यानेच दाखविले २ नाही तर ही माया कशी असते ? तिच्या मोहाने सर्वजणांचे देहभान विसरते ती सर्वांना नाचायला लावते व नाशवंत असणारी ही इंद्रियसुखे खरीच आहेत, असा भास निर्माण करते ३ त्यामुळे सर्व जीवांना रडावे लागते इंद्रियसुखासाठी डोकेफोड करावी लागते आणि एकासाठी रडणारा दुसरा जीव असतो तोहो एके दिवशी मरून जातो ४ असे असताना तुकाराम महाराज म्हणतात, मी, माझे शरीर, माझा प्रपंच इत्यादी मिथ्या अभिमानाचे बोल ऐकून मला फारच नवल वाटते ५ १२२२ देहभाव आम्ही राहिलो ठेवूनि । निवात चरणीं विठोबाच्या ॥ १ ॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा ५३७ म्हणउनि नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥ ३ ॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- उपाय-उपाय, अंकित-स्वाधीन. अर्थ :- आम्ही आपला सर्व देहभाव निवान्तपणे त्या विठ्ठलाच्या चरणी वाहून मी आता स्वस्थ झालेलो आहे. १ आमचे हित जेणेकरून होईल, असे सर्व काही उपाय तो करीत असतो. २ म्हणून मला आता हे मी कानांनी ऐकले असल्यामुळे कसलेच सुखदुःख वाटत नाही. ३ मी आपला सर्व भार आता देवावर घालून, निःसंग होऊन एकटाच राहिलेला आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या विठ्ठलाचा अंकित झालो आहे, स्वाधीन बनलो आहे, तो आता माझे जे जे हित असेल ते करील. ५ १२२३ आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरि तें जतन होय देठीं ॥ १ ॥ नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवतां ॥ २ ॥ चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हानि लाभ ॥ ४ ॥ अर्थ:- ठाया-ठिकाणास, आघात-संकटे अर्थ :- झाडाला आलेले फळ पिकेपर्यंत टिकून राहील हे खरे, पण केव्हा ? ते जर देठास जपून राहिले तर. १ त्याचप्रमाणे आपण ईश्वराच्या नामाशीच एकनिष्ठ राहिलो तर आपला हेतू सिद्ध होईल, पण हे अनुसरणे दुसरे काही मनात ठेवण्याची व्यभिचाराची बुद्धी नसेल तर. २ ज्या मार्गाने ज्या ठिकाणास आपण निघालो आहोत, ते स्थान मध्येच काही संकट आड आले नाही तर आपण गाठू शकू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण मध्येच जर काही संकटे निर्माण झाली तर मात्र होणाऱ्या लाभाची हानी घडते ४ १२२४ निरोधाचें मज न साहे वचन । यहु होतें मन कासावीस ॥ १ ॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ २ ॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे' उबग आला यांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळे । आशामोहजाळें दुःख वाढे' ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निरोधाचे-निषेधाचे, विरोधाचे अर्थ :- या भक्तीच्या किंवा परमार्थाच्या निषेधाचे अथवा विरोधाचे जर एखादे वचन असेल तर ते काही मला सहन होत नाही. त्यामुळे माझे मन फारच कासावीस होते १ यासाठीच माझ्या जीवास कुणाचीही संगत आता सहन होत नाही. एकान्तात बसण्यातच मला फार गोडी वाटते. २ देहबुद्धीची भावना व निरनिराळ्या वासनांची संगत या गोष्टी काही आता मला आवडत नाहीत. त्यांचा मला भारी उबग आला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आशा व मोह यांच्या जाळ्यात मी सापडल्यामुळे दुःख मात्र वाढते व त्यामुळे देवाशी मात्र अंतर पडते. ४ १२२५ तुजशीं संबंधचि खोटा । परता परता रे³ खोंटा ॥ १ ॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ २ ॥ जेथें मुद्दल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥ ४ ॥ १ न साहे उबग, २ दाटे, ३ रे तू खोटा. तु. गाथा... ६८

शब्दार्थ व टीपा - परता-दूर ठकावें-फसावे, लेखिता-करीत असताना अर्थ - देवा, तू सरोसरीच फारच खोटा दिसतोस तुझा सवंगच खोटा आहे असे वाटते तू आमच्या पासून दूर होतास तेच बरे होते १ देवा तुझ्या भेटीत मी तुझ्यापासून काय घ्यावे रे ? काही घेता येत नाही उलट आम्ही फसले मात्र जातो २ या तुझ्या व माझ्या व्यवहारात मुद्दल काहीच हाताशी आलेले नाही, उलट घ्यायचा मात्र हिशेब करिता करिता मान भरण्याचा प्रसंग येत आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी भक्तजनाना फसविण्याची तुझी रीत फारच प्रसिद्ध आहे ४ १२२६ याचि हाका तुझे द्वारीं । सदा देखो ऋणकरी ॥ १ ॥ सदा करिती खड दड । देवा बहुगा तू लड ॥ २ ॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनिया आपणा ॥ ३ ॥ एके एक बुझविसी । तुका म्हणे ठक होसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लड-दांडगा, ठक अर्थ - देवा, तू आपल्या भक्ताना, सेवकाना फसवितोस, अशीच ओरड नेहमी तुझ्या दाराशी असते १ तू नेहमी कुणाला तरी दड करीत असतोस, कुणाशी तर खडाचे व्यवहार करीत असतोस असा तू मोठा बलदंड ठक दिसतोस २ आपल्या भक्ताना त्याचा हेतू जाणून कुठल्या तरी फळाच्या आशेचे वा तिच्या तृप्तीचे भोजन देतोस व आपण मात्र स्वतः लपून राहतोस ३ त्याना ज हवे ते न देता देवा, तू त्याची कशी तरी समजूत काढतोस असा तू चांगलाच फसविणारा ठक आहेस, असे तुकाराम महाराज म्हणतात ४ १२२७ आम्ही जाणो तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥ १ ॥ फांकू नेदू चुकायिता । नेघो थोडे बहु देता ॥ २ ॥ बहुता दिसांचे लिगाड । आले होत होत जड ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । नेघो सर्वस्व ही देता ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा ५३९ मान्य करून एकदा सर्व चुकते करा ना. म्हणजे लोकांत होणारी फजिती तरी वाचेल तुमची. ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मला काही तूट सहन करण्याचा प्रसंग येऊ नये असे तू करावेंस. ४ १२२९ नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥ १ ॥ जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ २ ॥ नाहीं केला पोट । पुढे घालूनि बोभाट ॥ ३ ॥ तुका म्हणे धरूनि हात । नाही नेलें दिवाणांत ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पोट-पोट भरण्याचा धंदा. अर्थ :- देवा, विठ्ठला, कोणताही मानसन्मान मी तुमच्याजवळ कधी मागितलेला नाही. १ असे असूनही माझी तुम्ही या सर्व लोकांत एवढी फजिती का आरंभिली आहे? २ मी पोट भरण्यासाठी काही धंदा म्हणून हा मार्ग पत्करल्याचा बोभाटा केलेला नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, किंवा देवा, मी कधी तुम्हांला तुमचा हात धरून कधी भांडणासाठी दिवाणातही नेलेले नाही. ४ १२३० तूं पांढरा स्फटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥ १ ॥ म्हणोनि तुझ्या दारा । न येत ठकतो दातारा ॥ २ ॥ तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लोक १ ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हेचि दाखविसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आणिकां-दुसऱ्यास, नांदणूक-वागणूक, रीत. अर्थ :- देवा, तू खरे म्हणजे पांढऱ्या स्वच्छ स्फटिक मण्याप्रमाणे आहेस व तू जे कुणी दुसरे तुझ्याकडे येतात त्यांनाही तसेच बनवून टाकतोस. १ म्हणून देवा, तुझ्या दारांत कुणीही येत नाही कारण येथे लोक फसले जातात. २ तू सर्व लोकांना बुडविले आहेस, हे आम्हास चांगलेच माहीत आहे ही तुझी रीत सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू कसा आहेस ? तर ज्याचे सेवारूपी कर्ज तू घेतोस, त्यालाच फसविण्याची रीत तू चांगलीच दाखवितोस. ४ १२३१ बोलतों निकुरें । नव्होत सलगीचीं उत्तरें ॥ १ ॥ माझें संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ २ ॥ अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥ ३ ॥ तुज भक्तांची आण देवा । जरि २ तुका येथें ठेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निकुरें-निकराला येऊन. अर्थ :- देवा, मी फार निकराला येऊन, एकेरीवर येऊन बोलत आहे, हे ध्यानात ठेवा. हे काही प्रेमाच्या सलगीचे बोलणे नाही १ माझे मन आता संतापून गेले असून तुझ्या सेवकांना तू जी पीडा दिली आहेस, ती मला आता ऐकवतही नाही. २ जोपर्यंत केवळ माझ्यावरच घाताचे ओझे होते, तोपर्यंत ते सहन केले; पण आता सर्वांचीच पीडा पाहून मी दुःखी झालो आहे. ३ देवा, या तुकारामास तू जर आहे तिथेच ठेवशील, तर तुला तुझ्या भक्तांची शपथ आहे. ४ विवरण - तुकाराम महाराज देवाशी कधी कधी विशेष सलगी दाखवून, काही मुद्दे काढून, प्रेमाचे भांडण करितात. वरील महत्त्वाच्या अभंगांतून तुकारामबुवांनी भांडणाचा असाच एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. देव हा आप- ल्याच सेवकांना ठकविणारा, फसविणारा आहे, तो त्यांच्याकडून सेवेचे भांडवल घेतो, पण त्याच्यावर कृपा मात्र करीत नाही देव अशा प्रकारे सर्वांनाच त्रास देतो, मुद्दलही बुडवितो व व्याज देण्यासही हा खळखळ करितो, असे तुकोबांनी १ लौकिक, २ तरी.

५४० सार्थ तुकारामगाथा आपल्या नेहमीच्या व्यापारी भाषेत तक्रार केली आहे देवाने आपली ही वचने निकराची आहेत, मल्लगीची नाहीत असेच मानावे, म्हणूनही त्यांनी त्यास सूचना दिलेली आहे आपला संताप झाला आहे असे त्या एका अभंगात म्हणत आहेत अर्थात हे सर्व भांडण प्रेमाच्या पोटीच असते कधी आपण देवास फारच दुरुत्तरे केली, असे वाटून तुकोबांना पश्चात्तापाचीही भावना निर्माण होत मग ते म्हणतात, 'नये ऐसे बोलो कठिण उत्तरें । सलगी लेकरूं केलों पुढें' आपला हाही अपराध देवाने क्षमा करावा, अशीही प्रार्थना ते करितात मग तुकोबा भांडतात तरी का ? ईश्वरास एवढ्या कठोरतेने का बोलतात ? देवाची अशी फजीती करायला का प्रवृत्त होतात ? या प्रश्नाचे उत्तर असे की, ज्याच्यावर आपला फार मोठा विश्वास त्याच्यावर रागावण्यात रुसण्यात गोडी असते 'प्रीतीवीण रुसो नये' असे समर्थ रामदासानी म्हटल आहे याच प्रीतीच्या अतिरेकामुळे तुकारामासारखे भक्त कधी कधी देवावर रागावतात, त्याच्यावर रुसतात, कडक शब्दांनी भांडण मांडतात पण या सर्व कठिण शब्दांच्या मागे देवाविषयी अगाध प्रेम असत नाहीतर मग या संतानी कुणावर रागावावे ? कुणावर रुसावे ? कुणावर सत्ता करावी ? 'कवणाशीं भांडो कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण' या देवाशिवाय आपला राग तरी कोण सहन करणार आहे ? आपण कळ- वळवळाने व पाटतिडकीने का बोलतो, यासंबंधी तुकोबानी एका अभंगात म्हटले आहे, 'तुका म्हणें एके गांवचीं वसती । म्हणऊनि छती वाटे देवा' देव व आपण एकाच गावचे असून एवढा भेद व्हावा याचेच नवल तुकोबांना वाटते

१२३२ बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठविता चित्तीं काय नव्हे ॥ १ ॥ आणिका उपाया कोण वाटी मन । सुखाचे निधान पाडुरंग ॥ २ ॥ गीत गावों नाचो छंदें वावो टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥ ३ ॥ अनंत ब्रह्मांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावे उभा ॥ ४ ॥ लटिका हा केला सवसारसिंधु । मोक्ष खरा बघू नाहीं पुढें ॥ ५ ॥ तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलो निश्चिंत¹ त्याच्या बळें ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - जनिता-जन्म देणारा, निधान-साठा, रोमावळी-केसांची रांग अर्थ - बुद्धीला जन्म देणारा खरे म्हणजे लक्ष्मीपती श्रीविष्णूच आहे त्याचा आठव एकदा झाल्यावर मग काय साध्य होणार नाही ? १ सर्व सुखाचा ठेवा असा हा पांडुरंग जो आहे, त्यास सोडून आणखी दुसऱ्या दैवताकडे आपले मन कोण धाडून देणार ? २ वैष्णवाच्या मेळाव्यात मोठ्या आनंदाने गाऊ नाचू व सुरात टाळघा वाजवू ३ ज्याच्या एका केसावर अनंत ब्रह्मांडें आहेत, अशा या श्रीहरीस आम्ही आमच्या भोळ्या भावाने विटेवर उभे केले आहे ४ आम्ही आता याच्या कृपेने संसारसागर खोटाच ठरविला असून बद्धता व मोक्ष याही अवस्था आम्ही मानणार नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या नामाने अंकित झालो आहोत, त्याच्याच बळावर आम्ही निश्चित होऊन राहिलो आहोत ६

१२३३ न लगे मायेसी बाळें निरदावे । आपुल्या स्वभावे ओढे त्यासी ॥ १ ॥ मज का लागला करणे विचार । ज्याचा जार भार त्याचे माथी ॥ २ ॥ गोड धड त्यासी ठेवी न मागता । समाधान खाता नेदी मना ॥ ३ ॥ खेळता गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनी लावी बळें ॥ ४ ॥ त्याच्या दुखेंपणे आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसे ॥ ५ ॥ तुका म्हणें देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागो नेदी ॥ ६ ॥

१ निश्चित