सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
१२६ / सार्थ तुकारामगाथा भगवद्गीतेच्या या ग्वाहीमुळे भागवत संप्रदायात एक प्रकारचे नवे चैतन्य निर्माण होऊन सर्व समाजास नवे स्फुरण चढले सर्व जातींना भगवद्भक्तीचा मार्ग खुला झाला पूर्वापुष्यात दुराचारी असणाऱ्यांना आत्मोद्धाराचा मार्ग खुला झाला हीन यातीयाच्या आशाआकांक्षा पल्लवित झाल्या ज्ञानेश्वरांनी या क्रांतिकारक विचाराचे वैभव वर्णन करताना मुक्त कंठाने लिहिले आहे 'अगा नावें घेता चोखटीं । जे अघाचिया अधमाचिये शेवटों । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥ ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे का दगड । परि माझियाठायीं दृढ । सर्वभावें ॥ ते पापयोनीही होतु का । ते श्रुता- धिनही न होतु का । परि मजसीं तुकिता तुका । तुटी नाहीं ॥ म्हणोनी कुळ जाती वर्ण । हे आघवेचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ तेंचि भलतेणें भावें । मन मज आतु येतें होआवे । आलें तरी आघवेंद । मागील वावो ॥ जैसे तवचि वहाळ वोहळ । जथ न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥ तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यज्यादि इया । जाति तवचि वेगळालिया । जथ न पवती मातें ॥ आणि भलतिया जाती जन्मावे । मग भजिजे का विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावे । माझियाची ॥ यालागी पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजता सदना । माझिया येती ॥' ज्ञानेश्वराच्या विचारसूत्राचाच अनुवाद पुढे साधुसंतांनी केला तुकारामबुवांनी अनेक अभंगातून या विचारास पुष्टी दिली आहे 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र । चांडाळा आहे अधिकार । बाळे नारीनर । आदिकरोनि वेश्याहि ॥ तुका म्हणे अनुभवे । आम्ही पाडियेले ठावे । आणिकहि देवे । सुख घेतो भाविके' असे त्यांनी दुसऱ्या अभंगात म्हटले आहे ज्यांची याती हीन आहे अथवा ज्यांचे पूर्वाचरण दूषित आहे पण भक्तिप्रेमामुळे ईश्वरास सर्वस्व अर्पण केल्याने जे आदर्श होऊन गेले त्यांची नामावलीच बुवा कधीकधी आपल्यापुढे उभी करतात या अभंगात प्रथम तुकोबांनी हिंदू कुमारी आधीच गंधर्व, अग्नी, चंद्र यांच्या द्वारे रूपरूपाने कां होईना पण भोगली गेलेली असते याचाच प्रथम उल्लेख केलेला आहे. सोम प्रथमो विविदे गंधर्वो विविदे परः । तृतीय. पग्निर- ग्निस्ते तुरियस्ते मनुष्यज 'या कल्पनेप्रमाणे बुवांनी स्त्रीच्या गंधर्व, अग्नी, सोम याच्या सवंधाचे वर्णन केलेले दिसते आपल्या शास्त्रामध्ये मुलगी आठ वर्षांची होईपर्यंत तिला दोन वर्षे गंधर्व, दोन वर्षे अग्नी, दोन वर्षे सूर्य व दोन वर्षे चंद्र भोगीत असल्याची कल्पना आहे. पांडवकुळाची सर्वच हकीगत प्रसिद्ध आहे पांडू हा विचित्रवीर्याचा मुलगा महर्षी व्यासांच्यापासून विचित्र- वीर्यपत्नी अंबालिका हिच्या पोटी याचा जन्म झाला युधिष्ठिरादी याचे पुत्रही असेच निरनिराळ्या असांयापून झाल्याची कथा आहे युधिष्ठिर हा पांडुपत्नी कुंतीस यमधर्मापासून झालेला मुलगा भीम हा वायुपुत्र, इंद्रमंत्राच्या प्रभावाने झालेला अर्जुन, इत्यादीच्या जन्मकथा महाभारतात सांगितलेल्या आहेत शकुंतला ही विश्वामित्र व मेनका याची मुलगी विश्वामित्र तप करीत असताना त्याचा भंग करण्यासाठी मेनका येथे आली याची ही कन्या नवजात अशा या बालिकेस तेथेच सोडून मेनका स्वर्गालाही गेली व मुलीस शकुंत पक्ष्यांनी सांभाळिले म्हणून ही शकुंतला पुढे हिचे पालन पोषण कण्वमुनींनी केले हीच राजा दुष्पन्त याची पत्नी होय कर्ण हा सूतपुत्र म्हणन शेवटपर्यंत उपेक्षिला गेला हा कुंतीस सूर्यापासून झालेला मुलगा जन्मतःच कुंतीने याला भडवनदीत सोडून दिले पेटीतील या बालकांचे रूप चमच्यनी नदीतून पुढे यमुना व भागीरथी नद्यात आले तेव्हा ते धृतराष्ट्राचा सारथी अधिरथ याने पाहिले त्याने व त्याची पत्नी राधा हिने या बालकाचे पालन केले देवाने दिलेला हा मुलगा म्हणून राधेने या कर्णाचे नाटपणे पोषण करुन त्याच नाव वसुषेण ठेविले राधेय म्हणूनही याचा उल्लेख होतो सूतपुत्र म्हणून याचा अपमान वारंवार होत असे परतु याच शौर्य व याच दातृत्व याची कीर्ती आजही सांगितली जाते शृंगी याचे पूर्ण नाव ऋष्यशृंग असून हा विभांडक ऋषींचा मुलगा. एकदा विभांडक गंगेवर स्नानास गेला असताना उर्वशी तेथे आलेली त्याला दिसली विभांडाकाचे रेत पाण्यात पडले, ते सापद्रप झालेल्या एका देवकन्येच्या पोटात गेले तिला जो मुलगा झाला तो हा शृंगी याचा आचार माणसासारखा पण यारा डोक्यावर मृगासारखी शिंगे
सार्थ तुकारामगाथा १२७ होती. व्यास हा पराशर व सत्यवती यांचा मुलगा. सत्यवती ही वसुराजाची कन्या. हिला कौमारदशेत पराशर ऋषीपासून कृष्णद्वैपायन नावाचा विख्यात मुलगा झाला. हाच प्रसिद्ध ग्रंथकर्ता भगवान व्यास होय. गणिका म्हणजे वेश्या. हिंचे नाव पिंगला असून ही अवंती नगरातील एक प्रसिद्ध गणिका होती मिथिला नगरीच्या वेश्येचे नावही पिंगला होते. परपुरुषाची मार्गप्रतीक्षा करताना मध्यरात्रीपर्यंतही कुणीही आले नाही तेव्हा तिला उपरती झाली व तिने ईश्वराकडे आपले चित्त वळविले अजामीळ हा कान्यकुब्ज देशातील एक ब्राह्मण एका वेश्येच्या नादी लागलेला होता. या वेश्येस याच्यापासून दहा मुलेही झाली. धाकट्या नारायण नावाच्या मुलावर याचा फार लोभ होता. अंतकाळी या मुलास त्याने हाक मारली ती ईश्वरास पोचली व त्यामुळे याचा उद्धार झाला अशी कथा आहे. शेवटी यांची परमेश्वरावर भक्ती जडली कुब्जा ही अत्यंत कुरूप व आठ ठिकाणी वाकडी असणारी कंसदासी श्रीकृष्ण व बलराम हे मथुरेस आले तेव्हा कृष्णकृपेने ही सुरूप झाली वाल्मीकी पूर्वा- युष्यात प्रसिद्ध दरोडेखोर वाल्या कोळी या नावाने होते हे प्रसिद्ध आहेच हा खरे म्हणजे एक ब्रह्मर्षी सुमती नावाच्या एका ब्राह्मणाचा हा पुत्र लहानपणी किराताच्या सहवासात वाढल्यामुळे यास चोऱ्या करण्याची सवय लागली पुढे याने तपश्चर्या करून वाल्मीकी या नावाने आपले नाव वाढविले रामचरित्राची कथा यांनीच छंदोबद्ध करून अमर केली आहे. वसिष्ठ- हाही एक प्रसिद्ध ऋषी असून हा मित्रावरुणाच्या रेताने कुंभात या कमलात निर्माण झाला पण पुढे याची प्रसिद्ध तत्त्वज्ञ म्हणून कीर्ती वाढली नारद हा प्रसिद्ध ऋषी असून संगीतकीर्तनादी भक्तीचा प्रवर्तक मानला जातो पण हा पूर्वी एका ऋषीचा दासीपुत्र होता
२५८ सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥ १ ॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ २ ॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा श्वान-कुत्रे, खर-गाढव, सूकर-डुक्कर, चोजविली-माखविली. अर्थ :- सोन्याचे ताट क्षीरीने भरून ते कुत्र्यापुढे ठेविले तर त्याचा त्याला काय उपयोग ? त्याला त्याची काही चव नाही. १ गाढवाला मोत्यांचा हार घातला किंवा डुकराला कस्तुरीने माखले तर काही उपयोग आहे काय ? २ एखादा वेदपरायण पंडित बहिऱ्या माणसांस ज्ञान सांगू लागला तर काय उपयोग ? त्याचे ज्ञान त्यास समजणारच नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला ज्या विषयाचे महत्त्व तोच विषय त्याला रुचणार, समजणार. भक्तीचे माहात्म्य साधुसंतच समजतील इतरांना त्याची काय किंमत ? ४
२५९ ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥ १ ॥ संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ २ ॥ आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥ ३ ॥ संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥ ४ ॥ धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥ ५ ॥ बहु बोलो जातां म्हणति हा वाचाळ । न बोलां सकळ म्हणती गर्वा ॥ ६ ॥ भेटिसि न यजातां म्हणती हा निष्ठूर । येतां जातां घर बुडविलें ॥ ७ ॥ लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥ ८ ॥ निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकांचें मूळ पोरवडा ॥ ९ ॥ लोक जैसा ओक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥ १० ॥ तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥ ११ ॥
१२८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- पोटपोसा-कसेबसे पोट भरणारा, वाचाळ-बडबड्या, न यजातां-न गेले तर. अर्थ - लोक कसे नेहमी दोन्ही बाजूंनी बोलत असतात याचे फार समर्पक वर्णन करताना तुकोबा म्हणत आहेत, हा बाह्य लौकिक नीट राखायचा म्हटले तर तो कधीच साधता येणार नाही. पतितपावना देवा, लौकिक राखणे अवघड काम आहे. १ कारण पाहा की; संसार सोडून द्यावा तर म्हणतात हा आळशी आहे. कसे तरी पोट भरण्याची ऐपत नाही याला. २ काही वेदविहित असे आचार करावेत तर लोक म्हणणार काय कर्मकांडाचा पसारा मांडला आहे; बरे, काहीच आचारधर्म पाळिला नाही तरीही निंदा करतात. ३ साधुसंतांची संगत धरावी तर म्हण- तात हा लागला आता लोकांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला; तसे न केले तर म्हणतात हा मतिमंदच, याला कुठली बुद्धी येणार? या अभाग्याला दान होणारच नाही. ४ जवळ धन नसले तर लोक हा मूळचाच करंटा असे म्हणतील, बरे धनवान झाला तर फार धनमत्त झाला असे जिथे तिथे बोलतील. ५ फार बोललो तर म्हणतील हा फारच बडबड्या दिसतो; बरे अनियात न बोलावे तर हा अहंमन्य, गर्विष्ठ आहे असे लोक म्हणतील ६ कुणाच्या भेटीस जर गेलो नाही तर म्हणतील हा मनाचा फारच निष्ठुर आहे; आणि भेटीस जाऊ लागलो तर हे म्हणतील जातायेता खाऊनपिऊन याने आमचे घर बुडविले हो. ७ लग्न करावे तर हा फारच माजला हूं असे म्हणतील. बरे न करावे तर हा कसले लग्न करणार? नपुंसकच आहे असेही म्हणणार. ८ मुले बाळे झाली नाहीत तर म्हणतात हा निपुत्रिक चांडाळ आहे; आणि चार मुलेबाळे झाली तर म्हणतील काय हो पोरवडा ! पातकाचे मूळच की. ९ येणारी ओशारी जशी थांबविता येत नाही तसे लोकांचे बोलणे थांबविता येत नाही. अभक्त असेल त्याला संतसंगदेखील जिरायचा नाही. १० म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकच वचन ऐका, की या दुटप्पी बोलणाऱ्या सामान्य लोकांची संगत सोडा व भक्ती करायला लागा. ११
२६० धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥ १ ॥ वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ २ ॥ न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥ ३ ॥ तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आटी-खटपट, श्रम, लंड-नास्तिक अर्थ:- आपल्या कार्याचे स्वरूप सांगताना या प्रसिद्ध अभंगात बुवांनी सांगितले आहे, धर्माचे रक्षण करण्या- साठीच आम्हास अशा प्रकारचे परिश्रम करावे लागतात १ वेदांनी सांगितलेली नीती आम्ही आमच्या वाणीने लोकांना सांगू व संतानी जसे आचरण केले तसेच आम्हीही करू. २ अंगी आत्मस्थिती बाणली नसताना जो कर्म सोडून देतो तो एक नास्तिकच म्हणावा लागेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो हरीच्या भक्तीला दूषण लावतो तो अधमच होय ४
२६१ चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं साठविला ॥ १ ॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं ऋद्धिसिद्धी ॥ २ ॥ असुर जयानें घातले तोरडीं । तो आम्हांसि जोडी कर दोन्ही ॥ ३ ॥ रूप नाहीं रेखा जयासि आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥ ४ ॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥ ५ ॥ ऋद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥ ६ ॥ तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवूनि आशा ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळगती-येतात, उपस्थित राहतात, तोरडीं-सुरगाल अर्थ:-ज्याच्या पोटात चौदा भुवने साठविली आहेत तोच श्रीहरी आम्ही आमच्या कंठात साठविलेला आहे. १ मग आमच्या घरी काय कमी आहे? आमच्या दारात ऋद्धीसिद्धीसुद्धा झुकतात २ ज्याने मोठमोठे राक्षसही
बंदिवासात घातले तो आमच्या पुढे हात जोडून उभा आहे. ३ ज्याला रूप नाही, रंगाचा आधार नाही, तो परमेश्वर आम्ही भक्तीच्या साह्याने सगुण व साकार केला ४ ज्याच्या अंगात अनंत ब्रह्मांडमुद्रा सामावतात तो आम्हासाठी मुंगीसारखही होऊ शकतो ५ ज्याने रिद्धीसिद्धींना सुद्धा दूर केले आहे तो या प्राकृत व साध्या संसाराची चिंता कशाला करील ? ६ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाहूनही बलवान आहोत कुठलीही आशा मनात न ठेवता आम्ही निराळेच झालो आहोत. ७ २६२ केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय देव म्हणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी समावे ॥ १ ॥ तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हास ॥ २ ॥ केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥ ३ ॥ केली कांसाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणे । कांसे राहे कांसेपणे ॥ ४ ॥ ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्यानेचि घेणे । आम्ही पाषाणरूप राहणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - किंकर-दास, काशाची-कांस धातूची, कांजी-पेज अर्थः- मातीचा पशुपती म्हणजे महादेव तयार करून त्याची पूजा केली, पण या मातीस का देवपण द्यायचे? ज्या शिवाच्या भावनेने पूजा केली होती त्या शिवास ती पोचली. माती मातीस मिळाली १ त्याचप्रमाणे काही लोक आमची पूजा करतात; पण आमचे महत्त्व नाही; पूजा घेणारा तो भगवंतच आहे-आम्ही केवळ संतांचे दास किंवा सेवक आहोत, आम्हास संतपदवी नको आहे. २ पाषाणाचा विष्णु केला तरी तो पाषाण काही विष्णु नव्हे, विष्णूची पूजा विष्णूला प्राप्त होते व पाषाण पाषाण रूपानेच राहातो ३ काशाची देवी जगदंबा केली व तिची पूजा केली; पण तिच्यातील कांसे हे काही जगदंबारूप नव्हे. अंबेची पूजा अंबेला मिळते, कांसे कांसेच राहते ४ तुकाराम महाराज म्हणतात, पूर्णब्रह्म असणाऱ्या ईश्वराच्या ठिकाणी माझी भक्ती ही कांजीच्या पेजाप्रमाणे आहे, या भावनेने पूजा झाल्यास ती त्याची त्यास म्हणजे परमेश्वरास पोचते व आम्ही मात्र पाषाण- रूपाने उरतो. ५ विवरण :- तुकाराम महाराज हे सगुणोपासक असल्याने त्यांना मूर्तिविषयी व तिच्या सौंदर्याविषयी अपार प्रेम असणे साहजिकच आहे निर्गुण, निराकार परमेश्वराची मनोमय पूजा करण्याचे काम फार क्लेशकारक असल्याने व अव्यक्ताची उपासना सर्वांना सहजसुलभ अशी नसल्याने सगुण उपासनेस व मूर्तिपूजेस महत्त्व मिळाले. परंतु या सगुणोपासनेवर व मूर्तिपूजेवर पूर्वापासून आक्षेप होते निर्गुण, निराकार व अव्यक्त स्वरूपाची उपासना थोर असा आग्रह धरणाऱ्यांच्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न तुकोबारायासारख्या साधुसंतांनी वारंवार केला आहे. मातीचा महादेव केला, पाषाणाचा विष्णु केला व त्याची पूजा केली तरी ती ईश्वरास मिळते त्या पूजनापाठीमागे एक भाव असेल तर पाषाण, माती, कासे कशाचा का देव असे ना, त्याच्या मूर्तीच्या निमित्ताने ती पूजा शेवटी परमेश्वरालाच प्राप्त होते या मूर्तीच्या वा प्रतिमाच्या रूपांनी तो परमेश्वरच पूजा घेत असतो. भक्तीचा पाचवा प्रकार म्हणून अर्चनभक्ती सांगितली आहे हे अर्चन सगुणाचेच होऊ शकते सगुणावर मन स्थिर करणे सोपेही असते भगवंताच्या विभूती ज्या ज्या ठिकाणी आहेत ती ती स्थाने किंवा त्या त्या वस्तू प्रतिमारूपाने तयार झाल्या की त्याचे पूजन सर्वसाधारण माणसांस सुलभ होते सूक्ष्म व अव्यक्त अशा रूपाचा परिचय करून घेण्यासाठी आधी सगुण मूर्तीची आराधना उपयुक्त होण्यासारखी असते असाही एक विचार आहे. तु. गाथा...१७
१३० सार्थ तुकारामगाथा अक्षराची ओळख होण्यासाठी प्रथम खडे मांडून लहान मुलांना दाखवावे लागतात, त्यातलाच हा प्रकार काहींनी सांगितला आहे 'ओनाम्याचे काळे, खडे मांडियले बाळें' असे तुकोबांनीही म्हटले आहे परंतु निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासना कमी असाही त्याचा अर्थ नाही मूर्तीपूजा किंवा सगुणपूजा हे एक निर्गुणनिराकारप्राप्तीचे साधन अशीही भूमिका नाही खरे म्हणजे एक भाव असेल तर मूर्तीमध्येही ईश्वरी तत्त्वाचा अंश का सापडू नये ? 'कासया पाषाण पूजिती पितळ' असे म्हणून पाषाण व पितळ याची पूजा का करता असे तुकोबांनी विचारिले आहे हे खरे असले तरी पुढे लागलीच 'अष्ट धातू खेळ भावेविण । भावचि कारण भावचि कारण' असेही बजावले आहे भाव असला तर प्रतीक कोणतेही चालेल आणि दुसरे असे की परमेश्वरतत्त्व सर्वत्र भरून आहे तर मग ते मूर्तीत अथवा प्रतीकात का नाही? 'अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ? असा प्रश्न स्वतः तुकारामबुवांनीच विचारला आहे याचाच अर्थ असा की मनाची तीव्र भावना असेल तर कोणतेही प्रतीक चालेल तुकोबांच्यासमोर नाना शंका घेऊन लोक बसलेले असावेत म्हणून कधी ते 'पाषाण नव्हे विष्णू' असे सांगतात, तर कधी प्रतिमा तो देव कैसा नव्हे ? असे विचारतात एक भक्तिभाव असेल तर परमेश्वराच्या पूजनास कोणतीही वस्तू चालेल २६३ ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥ १ ॥ येरा मानी विधि पाळण्यापुरते । देवाचीं तीं भूते म्हणोनिया ॥ २ ॥ सर्वभावे जालो वैष्णवाचा दास । करीन त्याच्या आस उच्छिष्टाची ॥ ३ ॥ तुका म्हणे जैसे मानती हरिदास । तेशी नाही आस आणिकाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सांगाती-सोबती, विधि पाळण्यापुरते-केवळ उपचारासाठी, मानली-प्रिय वाटतात अर्थ - संतांची महती वर्णन करताना तुकोबा म्हणतात, जे साधुसंत विठ्ठलाचे पाय आठवतात ते माझे सोयरे व सोबती आहेत १ दुसऱ्या लोकांना केवळ ती देवाचीच रूपे आहेत म्हणून उपचारापुरते मी मानतो २ पण सर्व भावनांनी युक्त होऊन मी दास मात्र विष्णुभक्तांचाच झालेलो आहे त्याच्या उष्ट्या घासाची इच्छा मी करीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्याप्रमाणे हरीच्या दासांना मानतो, ते जसे मला प्रिय वाटतात, तसे दुसरे कोणीही आवडत नाहीत दुसऱ्याची आशा मला वाटत नाही ४ २६४ दया तिचे नाव भूतांचे पाळण । अणीक निर्दळण कंटकाचे ॥ १ ॥ धर्म नीतीचा तो ऐकुनी वेव्हार । निवडीले सार असार ते ॥ २ ॥ पाप त्याचे नाव न विचारिता नीत । भलतेचि उन्मत्त करी सदा ॥ ३ ॥ तुका म्हणे धर्म रक्षावया साठी । देवास ही आटी जन्म घेणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भूतांचे-प्राण्यांचे निर्दळण-नाश कंटक-दुष्ट लोक, नीत-नीती आटी-त्रास अर्थ - दया तीच की जिच्यामुळे सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण होते व दुष्ट लोकांचा नाश होतो १ धर्म व नीती या सबंधीचा सब व्यवहार पाहून आम्ही हेच तात्पर्य काढलेले आहे २ त्याचे नाव पाप की ज्याच्या योगाने मनुष्य उन्मत्त होतो, त्याला नीतीची ओळख उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे रक्षण करण्या- साठी प्रत्यक्ष देवालाही फार त्रास घ्यायला लागतो नाना जन्म घ्यावे लागतात ४ विवरण - तुकारामबुवांचा हा एक छोटा, सुटसुटीत, अर्थपूर्ण व सर्वप्रसिद्ध असा अभंग असून यात दया म्हणजे काय याचा स्पष्ट उल्लेख केला आहे सर्व प्राणिमात्रांचे पालन करण्यासाठी दुष्टांचा नाश करणे ओघानेच येते दया म्हणजे कंटकांचे, दुष्ट लोकांचे निर्दळण व मग सज्जनांचे संरक्षण हा अर्थ येथे बुवांनी निश्चयाने सांगितला आहे आणि यास भगवद्गीतेचा सर्वप्रसिद्ध असा आधार आहेच धर्माची ग्लानी होऊन जेव्हा अधर्म फार माजतो तेव्हा मीच स्वतः अवतार घेऊन साधूंचे रक्षण करतो व दुष्टांचा नाश करतो असे चौथ्या अध्यायात भगवंतानी
सार्थ तुकारामगाथा १३१ सांगितले आहे, 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे' असा विश्वास श्रीकृष्णाने प्रकट केला आहे. सर्वत्र अधर्म माजला, दुष्टाचे प्राबल्य फार होऊन सज्जनाना त्रास होऊ लागला की, मग मी काय करतो ? ज्ञाने- श्वरानी आणखी रहस्य प्रकट करताना म्हटले आहे, 'अधर्माचि अवधि तोडीं । दोषांची लिहिलों फोडीं । सज्जनां- करवीं गुढी । सुखाची उभवीं ॥ दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा भानु गियशीं । धर्मासीं नीतीशीं । शेंस भरी ॥ भी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तें योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥ .... ऐसे या काजालार्थी । अवतरें मी युगींयुगीं ।' स्वतःच्या भक्ताचे रक्षण करण्याचा पतकरच जणू ईश्वराने घेतलेला असतो. 'सेवीं भी तयां । जैसे असतो तंतिया । कळिकाळ नोकोनिया । घेतला पट्टा' असे पुढे बाराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे सज्जनाचे हित व्हावे म्हणून दुर्जनाचा नाश करावा असे साधुसंत स्पष्टपणे अनेक ठिकाणी सांगतात 'दुर्जनाचा मान । मूर्खे करावा खंडण', 'दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडो माती' इत्यादी ओळींतून खळनिर्दळण किती आवश्यक आहे हेच तुकोबानी सांगितले आहे. 'पाया झाला नाहू' या ओळीने सुरू होणाऱ्या एका अभंगात बुवानी 'अधमासि तो अधम' असाच उपदेश केलेला आहे २६५ करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥ १ ॥ आपुलिया जीवाहूनी । असे व्हाल्हें तें जननी ॥ २ ॥ वियोग तें तीस । त्याच्या उपचारें तें विष ॥ ३ ॥ हरणी चुकली पाडसा । धुंडाळी ती दाही दिशा ॥ ४ ॥ रानीं हिंडो गेली गाय । घरीं वत्स वाट पाहे ॥ ५ ॥ तुका म्हणे पायें । डोळा सुखाये ज्या न्यायें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- उमटें-समजते, पटते, व्हाल्हें-प्रिय अर्थ :- आपल्या लाडक्या मुलाला काही तरी रोज चांगले करावे असे आईस नेहमीच वाटत असते; पटत असते. १ आपल्या स्वतःच्या जियापेक्षा तिला आपले मूल अधिक प्रिय वाटत असते. २ तिच्या उपचारात जे सुख तिला वाटत असते ते त्याचा वियोग झाल्यावर संपते, म्हणून वियोग तिला विषाप्रमाणे वाटतो. ३ हरिणी आपल्या पाडसास चुकली की ती त्याचा शोध संरांवरा धावून दाही दिशांना घेत असते. ४ गाय रानात घाऱ्यासाठी हिंडत असते, पण घरी गोठ्यात वासरू भुकेलेले आहे याची जाणीव तिला सतत असते. घरी वासरू वाट पाहात आहे याचा वेध तिला निरंतर असतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, पावास शीतोपचार केल्यावर जसे डोळयांना सुख होते तसे मुलाच्या सुखाने माता संतुष्ट होते. ६ २६६ कन्या सासुऱ्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥ १ ॥ तैसे जाले माझ्या जीवा । केव्हां भेटसी केशवा ॥ २ ॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥ ३ ॥ जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- जीवन-पाणी, मासोळी-मासा. अर्थ:- या एका सर्वप्रसिद्ध व गोड अभंगात आपण परमेश्वरासाठी कसे आतुर आहोत, कसे तळमळतो याचे फार सुदरु व समर्थ असे वर्णन करताना बुवा म्हणतात, लग्न झाल्यावर लहान मुलगी सासरी निघताना, तिला माहेर व माहेरची माणसे सोडताना जसे दुःख होते, ती पुनः पुनः माये घराकडे वळून पाहते. १ त्याचप्रमाणे देवा, माझ्या जिवाची अवस्था झाली आहे. देवा, मला कधी भेट देशील? २ आई चुकली किंवा दृष्ट्टिआड झाली की लहान मूलू
१३२ सार्थ तुकारामगाथा चुकल्यासारखे होऊन टकमक पाहात असते ना ? ३ किंवा पाण्याबाहेर काढलेला मासा कसा तडफड तडफड करून तळमळतो, तशी माझ्या जिवाची अवस्था झाली आहे मी एकसारखा तळमळत आहे देवा ४ विवरण - भक्त ईश्वरासाठी किती व्याकुळ होतो याचा हा एक नमुना म्हणून उत्कृष्ट अभंग आहे ईश्वराच्या मीलनातील सुख, अद्वैतातील, एकरूपातील सुख अद्वितीय तर आहेच, पण हे प्राप्त करण्यासाठी जी मनाची लगबग होत, जी व्याकुळलेली अवस्था होते, करुणेने हृदय जे भरून येत त्यास तुलना कुठली ? कित्येक वेळा भक्तास याच अवस्थेची गोडी अधिक लागते अद्वैताच्याच भूमिकेवर पण द्वैतावर येऊन मीतूपणाचा थोडा भेद कल्पून माधुर्यतानी करणेचे अनेक अभंग केले आहेत त्याच्या हृदयाची आर्त हाक, त्याची तळमळ, त्याच्या जिवाची कासा- वीस अवस्था, त्याची तडफड, त्याची व्याकुळलेली अवस्था इत्यादींची मोठी हृदयभेदन पण ईश्वरी प्रेमाने भारावलेली अशी अभंग संपदा मराठीत अमोल अशी आहे ईश्वराला, विठ्ठलाला आई कल्पून मराठी संतानी जी करुणेने हाक मारली आहे तिच्यातून कित्येक अभंग स्फुरले आहेत ही केवळ एक माध्व्याची साधनरूप अवस्था असेही नाही, तर केवळ भक्तीसुखासाठीही साधुसंत असा पुकारा करीत असतात नामदेव आणि तुकाराम या दोन संतानी तर या करुण वाणीच्या आर्त उद्गारांनी मराठी वाङ्मयास एक तेजस्वी लेणेच घडविले आहे 'देशीपरदेशी झालो तुजविण, 'तुजविण आम्हा कोण हो पोषिता', 'मज का मोकलिलें । कयणा निरविले ?', धाव गा विठ्ठला, सोडवी आपुला दास', इत्यादी ओळींतून नामदेवानी परमेश्वरापाशी, विठ्ठला पाशी करुणा भाकली आहे 'येग येग विठाबाई', 'गंगा गेली सिंधूपाशी', 'तुजवांचूनि विठ्ठला । कोणी नाही रे मजला', 'पोट भरुनि घालासी । मज सांडूनी कोठे जासी ?', 'का या उशीर लाविला । माझा विसर पडला', 'येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघ श्यामा' यासारख्या ओळींतून जनाबाईने आपली करुण व्यथा व्यक्त केलेली आहे तुकारामबुवांनीही इतरत्र, 'मायें मोकलिले कोठें जावे बाळें ?', 'येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटता आळविता', 'कोण आम्हा पुसे शिणले भागले', 'तुजलागीं माझा जीव झाला पिसा, 'न लगे मायेसीं बाळ निरवावें' इत्यादी ओळींतून आपल्या मनाची तळमळ समर्थपणे उभी केली आहे २६७ हातां होन द्यावी बेना । करिती लेकीच्या धारणा ॥ १ ॥ ऐंसे धर्म जाले कळी । पुण्य रंक पाप बळी ॥ २ ॥ सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥ ३ ॥ टिळे लपविती पातडीं । लेती विज़ारा कातडी ॥ ४ ॥ बैसोनिया तख्ता । अन्नेविण पिडिती लोका ॥ ५ ॥ मुदबख लिहिणे । तेलतुपावरी जिणे ॥ ६ ॥ नीचाचे चाकर । चुक लिया खाती मार ॥ ७ ॥ राजा प्रजा पीडा । क्षेत्रीं दुश्चितासी तोडी ॥ ८ ॥ वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥ ९ ॥ अदघे वाहूच रग । आत हिरवे घरी सोंग ॥ १० ॥ तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धावा ॥ ११ ॥ शब्दार्थ व टीपा - होन-नाणे, बेना-स्वत ची मुलगी, धारणा-भाव, कळीं-कलियुगात, रंक-गरीब, द्विज- ब्राह्मण, पातडीं-पंचाचे, मुदबख-स्वयंपाकगृहातील जमाखर्च. अर्थ - समकालीन दु स्थितीचे वर्णन करताना तुकोबा म्हणतात, लग्नाची झालेली मुलगी दुसऱ्यास देताना लोक तिच्याबद्दल हातात सुवर्णाची नाणी घेऊन तिचा भाव ठरवितात १ असे या कलियुगात उलटे धर्म बनले आहेत पुण्यवान आहेत ते गरीब बनले असून पापी बलिष्ठ झाले आहेत २ सर्वांनी आपापले आचार सोडले
सार्थ तुकारामगाथा १३१ ब्राह्मणांनी आपला धर्म सोडला आणि ते चहाडखोर व चोर बनले आहेत ३ आपले टिळे व पंचांग लपवून, सोडून देऊन ते कातड्याची विजार घालू लागले आहेत ४ न्यायाच्या किंवा राजाच्या सिंहासनावर बसतात व अन्नाशिवाय प्रजेस पीडा देतात ५ स्वयंपाकगृहात राहून साद्या जमाखर्च लिहितात व तेलतुपाचा हिशेब करून कसे तरी जिणे जगतात ६ नीच माणसांचे चाकर होऊन चुकले की वरिष्ठाकडून वारंवार मार खातात ७ राने लोक प्रजेस पीडा फारच देतात जमीनदार गरिबाला फार तोडून बोलतात ८ ब्राह्मण क्षत्रियाची ही दशा, मग वैश्यशूद्राची काय वर्णन करावी ? ते सहजच आणखी नीच अवस्थेस गेले ९ आत-बाहेर सर्वत्र बाह्य रंगाचा देखावा आहे, आतमात्र हिरवेकच्चेच आहेत सर्वजण १० तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही झोपला आहात काय ? समाजाची काय ही अवस्था ! लौकर उद्धारासाठी धावून या ना ११
२६८ साळंकृत कन्यादान । करिता पृथ्वीसमान¹ ॥ १ ॥ परि ते न कळे या मूढा । येईल कळो भोग पुढा ॥ २ ॥ आचरता कर्म । भरे पोट राहे धर्म ॥ ३ ॥ सत्या देव साहे । ऐसे करूनिया पाहे ॥ ४ ॥ अन्न मान धन । हे तो प्रारब्धा आधीन ॥ ५ ॥ तुका म्हणे सोस । दुःख² आता पुढें नास ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - साळंकृत-अलंकारासहित, सोस-हव्यास, नास-नाश अर्थ - अलंकार वगैरे घालून मुलगीचे दान केले की ते कन्यादान पृथ्वीच्या दानाप्रमाणे होणार आहे १ पण ते या मूर्खास समजत नाही पुढे भोगावयास लागले म्हणजे कळेल मग सर्व २ ज्याचे त्याने आपले विहित कर्म केले की पोट भरून आनंद होईल एवढा धर्म होतो ३ सत्याला देवाचे नेहमी साहाय्य असते सत्याने वागून तर पाहा ४ अन्न, मान, धन या गोष्टी आपल्या प्रारब्धाच्या आधीन आहेत ५ तुकाराम महाराज म्हणतात, पुढल्याहि गोष्टींचा हव्यास धरलास की पुढे खचित नाश आहे असे समजावे किंवा आता सुख वाटले तरी पुढे नाशच असतो ६
२६९ दिवट्या वाद्ये लावूनि खाणे । करूनि मढण दिलो हातीं ॥ १ ॥ नवरा नेई नवरी घरा । पूजन करा पायांचे ॥ २ ॥ गौरविली विहीण व्याही । घडिले कांहीं ठेवू नका ॥ ३ ॥ करू द्यावे व्हावे वरें । ठायींचे का रे न कळोचि ॥ ४ ॥ वहाडियाचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥ ५ ॥ तुका म्हणे जोडिला थुका । पुढें नरका सामग्री ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - मढण-सुशोभा अर्थ - लग्नाच्या वेळी घरात दिवे लावून, वाद्ये वाजवून, पक्वान्नाचे भोजन करून अलंकारांनी नटलेली नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या हातात देतात १ मग नवरा तिला थाटामाटाने घरी नेतो, नवऱ्याच्या पायांचे या वेळी पूजन वगैरे होते २ व्याह्याला व विहिणीला पोशाख वगैरे देऊन त्यांचा गौरव केला जातो व जर काही कमी जास्त समारंभात घडले असेल तर मनात ठेवू नका असे सांगितले जाते ३ नवऱ्याचे म्हणणे वगैरे जे काही असेल ते सर्व यथासांग कर द्यावे, पण या सर्वांच्या मुळाशी असणारी समजुतीची गोष्ट लोकांना फणी फळत नाही ? ४ जशी तेलामध्ये उटिका जिरून जाते त्याप्रमाणे ही विहिण भांडखोरपणे या वऱ्हाड्यांच्या पाठीमागे
१ पृथ्वी दानाच्या समान, २ सुख
लागते किंवा उटीची द्रव्ये जशी तेलात मुरत जातात तसे हे लोक एकमेकाच्या ध्यानात बुडून जातात पण मुख्य गोष्ट मुलीचा पैसा घेऊ नये हे मात्र कुणास समजत नाही ५ अशा या तुमच्या कर्मामुळे तुकाराम महाराज म्हणतात, तोंडावर थुकण्याचे व पुढे मिळणाऱ्या नरकाचे मात्र साधन तुम्ही करून ठेविले आहे ६ २७० ब्रह्महत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केले ॥ १ ॥ ऐका जेणे विकिली कन्या । पवाडे त्या सुग्याचे ॥ २ ॥ नरमास खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥ ३ ॥ अवघें पाप केले तेणे । जेणे सोने अभिलाषिले ॥ ४ ॥ उच्चारिता मज तें पाप । जिव्हे काप सुटतसे ॥ ५ ॥ तुका म्हणे कोरान्न राड । बेटा भाड मागे ना का ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सुग्याचे-कुत्त्याचे भाडी-कुंटणखाना चालवून मिळविलेला पैसा, अभिलाषिले-इच्छिले, भाड-भाडखोर मनुष्य अर्थ - त्याच्या हातून ब्रह्महत्या घडली, त्याने जणु गाई मारल्या आणखी काही पापे त्याने केली १ त्याने म्हणजे कुणी ? ऐका तर ज्याने आपली कन्या विकली त्या कुत्र्याची कीर्ती नीट ऐका २ या अधमाने मुलीच्या लग्नात पैसा घेऊन नरमास खाल्ल्याचे व कुंटणखाना चालवून पैसे मिळविल्याचे पाप याने केले म्हणून तर त्याच्या नावाने हाका मारतो आहे ३ जगातील सर्व पापे त्याने केलेली आहेत असे समजा कारण त्याने मुलीला विकून सोन्याची अभिलाषा धरलेली असते ४ त्याचे पाप उच्चरतानाही माझ्या जिभेचा थरकाप होत आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, मुलीचे द्रव्य घेणार, तिचा बाप हा भाडखोर व आई राड भिक्षा का मागेनात ! ६ २७१ याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥ १ ॥ फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजासि लाग निरयदंडीं ॥ २ ॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लड दुष्टासि ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचे अन्न । मद्यपाना समान ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पक्ष-बाजू निरयदंडी- नरकाच्या शिक्षेस अर्थ - अशा प्रकारे कन्येची विक्री करून जे पैसे मिळविणारे असतील, त्यांची बाजू घेणारे जे असतील तेही त्याच गुन्हेगारासारखे समजावेत १ त्यांची बाजू घेतल्याने त्याला फुकट दुःख प्राप्त होते आणि तो स्वतःच्या पूर्वजांनाही नरकाच्या शिक्षेस पाठवितो २ जो राजा अशा दुष्टाला दंड करीत नाही, ३ तो अन्न खात असला तरी त्याचे ते सेवन मद्याचे आहे असेच समजावे ४ २७२ कपट नाही एक । नेणे भुलवायाचे लोक ॥ १ ॥ तुमचे करितो कीर्तन । गातो उत्तम ते गुण ॥ २ ॥ दाऊ नेणे जडीवुटी । चमत्कार उठाउठी ॥ ३ ॥ नाहीं शिष्यशाखा । सांगो अयाचित लोका ॥ ४ ॥ नव्हें मठपति । नाहीं चाहूराची वृत्ति ॥ ५ ॥ नाहीं देवाचॅन । असे माडिले दुकान ॥ ६ ॥ नाहीं वेताळ प्रसन्न । काहीं सांगों लाण खुण ॥ ७ ॥ नव्हे पुराणिक । करणे सांगणें आणीक ॥ ८ ॥ नेणें वाद घटा पटा । करिता पंडित करटा ॥ ९ ॥
सार्थ तुकारामगाथा १३५ नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदीं ॥ १० ॥ नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गव्हाळा ॥ ११ ॥ आगमींचें कुडें नेणें । स्तंभन¹ मोहन उच्चाटणें ॥ १२ ॥ नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥ १३ ॥ शब्दार्थ व टीपा :- जडीबुटी-त्वरित गुण देणारी यातुर्मातुर औषधे, अयाचित-न विचारता, चाहूर-१२० बिघ्यांची जमीन, वृत्ति-निर्वाहाचे साधन, सांग खूण-गुपिते, करंटा-दुर्दैवी, भणदी-धूप जाळण्याची पात्रे, उदो-उदय असो, उदय असो असे देवीचे भक्त म्हणतात त्याप्रमाणे, गव्हाळा-बावळट लोकांना, आगमीचे-वेदान्ताचे कोडे, स्तंभन- जाग्यावर खिळून टाकण्याची विद्या, मोहनी-मोहिनी विद्या किंवा गौन, उच्चाटन-जारणमारणांपैकी एक विद्या, निरयवासी-नरकलोकांतील. अर्थ:- आपण कोण आहो, कोण नाहीत याचा स्पष्ट उलगडा करताना तुकारामबुवा सविस्तर सांगत आहेत की, लोकांना फसविण्याचे कपट काही मी जाणीत नाही. १ देवा, फक्त तुमचेच कीर्तन करून तुमचे उत्तम गुण मात्र गात असतो. २ लोकांना नादविण्यासाठी मजजवळ काही जडीबुट्टी त्यांना दाखविण्यास नाही; त्यामुळे त्वरित चमत्कारही मला करता येत नाहीत. ३ माझी शिष्यशाखाही मोठी नाही जे कोणी न विचारता किंवा न बोलविता येतात त्यांना काही थोडे सांगतो एवढेच. ४ मी तर देवा, एखाद्या मठाचा अधिपती नव्हे व मला चाहूरभर जमिनीचे निर्वाहाचे एखादे साधनही नाही. ५ देवाची पूजा करताना धूप, दीप, नैवेद्य, आरती यांचा पसारा मांडून मी दुकानही पातले नाही ६ लोकांना काही गुपिते सांगावीत, त्यांच्या मनांतील काही गोष्टी ओळखण्यात यासाठी मला एखादा बेताळही प्रसन्न नाही ७ लोकांना पुराण सांगून नादी लावणारा पुराणीकही मी नाही. सांगावे एक व करावे दुसरे असे मी करीत नाही. ८ मला घटापटादी शब्दाच्या साहाय्याने दुर्बोधी पंडितांप्रमाणे वादविवादही करता येत नाही. ९ किंवा धुपाटण्यात ऊद वगैरे धुपवून, जाळून मी आनंदीचा, अंबाबाईचा उदो उदो करीत नाही. १० चार अडाणी किंवा बावळट लोकांना भोवती जमवून मी नामजपाच्या माळा थोडण्याचे नाटकही करीत नाही. ११ मी वेदान्ताचे कोडे किंवा अथर्ववेदातील स्तंभन, मोहन, उच्चाटण इत्यादी जारणमारणादी क्रियाही आणीत नाही. १२ तुकाराम महाराज म्हणतात, मी वर सांगितलेल्या लोकांसारखा नाही, हे वेडे लोक वरील- सारखे प्रकार करून नरकाची जोड करतात. मी हरिभक्तीखेरीज दुसरे काहीच करीत नाही १३ विवरण :- तुकोबांनी व इतर साधुसंतानी सर्वांना अतिशय सुलभ असा विठ्ठलभक्तीचा मार्ग वारंवार सांगितला आहे. नामस्मरण, भजन, कीर्तन, एकादशी, सोमवार ही व्रते, पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचे टिळे, तुळशीची पूजा यासारखे अनेक सोपे उपचार किंवा सहज सुलभ साधने सांगितली आहेत. परंतु बुवांच्या वेळी सामाजिक भ्रष्टाचार सर्व बाजूंनी होत होता, लोकांचे प्रपंच विस्कटले होते, धार्मिक आचारविचार नष्ट झाले होते, देवदैवते याचा मुळमुळाट झाला होता. भोंदू लोक अशा प्रसंगी वरवर दिखाऊ व चमत्कार दाखवून सर्वसामान्य जनतेस फसवीत होते. त्याचा भरपूर समाचार बुवांनी अभंगातून घेतलेला आहे भोंदू व लबाड लोक सामान्य स्त्रीपुरुषांना कसे फसवितात त्याचे मोठे समर्पक व बोलके चित्र या अभंगात बुवानी काढले आहे. कुणी लोकांना फसविण्यासाठी कपट करतात, कुणी जादुटोणा करून, जडीबुट्टी देऊन, चमत्कार दाखवून लोकांना फसवितात कुणी मठाधिपती असतात. कुणी विलासी असतात, बुवांची जमिनीची व मठांची थोरवी असते, कुणी पूजेचे बाह्य अवडंबर माजवून बसलेले असतात कुणाला दुसऱ्याच्या मनातील ओळखणारी वेताळा- सारखी भूतसृष्टी प्रसन्न असते. अंगाराधुपारा देऊन हे लोक जनतेस फसवीत असतात. पुराणात एक सांगणारे व आचरणात दुसरे करणारे कुणी ढोंगी पुराणीक असतात, कुणी घटाकाश, पटाकाशासारख्या शाब्दिक बडबडीने वेदान्ताची व्यर्थ चर्चा करीत असतात कुणी देवीच्या नावे दिवटी पाजळवून आनंदीचा उदो उदो करतात. कुणी १ स्तंभ आणि उच्चाटणे.
१३६ सार्थ तुकारामगाथा ढोंगीपणाने उगाच माळ हालवून, जपाचे नाटक करुन गबाळया लोकांना फसवितात कुणी जारणमारणाच्या आसुरी विद्येच्या पाठीमागे असतात पण हे सब लोक बुवाच्या मते ढोंगी आहेत हे समाजातील भोळयाभाबड्या स्त्रीपुरुषाना लुबाडतात स्वतः तुकारामबुवा मात्र केवळ विठ्ठलाचे कीर्तन व गुणवर्णन करून हरिभक्तीचा प्रसार करतात असा भावार्थ २७३ रडोनिया मान । कोण मागता भूषण ॥ १ ॥ देवे दिले तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ २ ॥ लाविता लावणी । विके भिके केंज्या दानी ॥ ३ ॥ तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-कौतुक, केंजे-धान्य अर्थ - दुसऱ्याजवळ रडून भारून मान मिळविण्यात कोणते भूषण आहे ? देवाने आपण होऊन जे दिले त्यात गोडी आणि कौतुक आहे २ स्वतः शेतात धान्य पेरून नंतर ते विकण्यात वा भिकाऱ्याला दान देण्यात काही अर्थ आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणा न मागता यायला पाहिजे धीर धरल्यासच वीर पुरुषाचे महत्त्व येईल ४ २७४ पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसता गमन मातेशीं तें ॥ १ ॥ सांगतो ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावे तरी ॥ २ ॥ संता ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीच वळसा सापडला ॥ ३ ॥ तुका म्हणे एकाएकीं वरासन । बुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संकेत-सिध्दान्त वळसा-फेरा किंवा रहस्य, अशोभ्य-विशोभित, वरासन-श्रेष्ठ आसन अर्थ - ज्या आसनावर आपणास पूज्य असणारी वस्तू अथवा व्यक्ती आहे त्याच आसनावर आपण बसल्यास आईशी गमन केल्याचे पाप लागेल १ रोज वागण्यातील धर्मनीतीचे संकेत मी नीट सांगत आहे ते तुम्हास तुमचे हित व्हावेसे वाटत असेल तर सावधपणाने ऐका २ संतांची पूजा ज्या ठिकाणी होत असते तेथेच स्वतःच्या पूजनाची इच्छा धरणे हे जन्ममृत्यूपच्या फेऱ्यात सापडण्यासारखेच आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या श्रेष्ठ आसनावर दुसरा एखादा सामान्य मनुष्य जाऊन बसेल तर सारेच दृश्य विशोभित दिसेल ४ २७५ जेणें मुखें स्तवी । तेचि निंदे पाठीं रवी ॥ १ ॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोने खाय माती ॥ २ ॥ गुदद्वारा वाटे । मिष्टान्नाचा नरक लोटे ॥ ३ ॥ विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्तवी-स्तुती करतो, याती-जाती अर्थ - हा मनुष्य कसा आहे पाहा ज्या मुखाने स्तुती करतो, त्याच मुखाने मागून हा निंदा करतो १ अशी ही या अधमाची जात आहे हा जवळचे सोने पुरून ठेवून माती खात असतो २ मिष्टान्नाचे जेवण करावे व गुदद्वाराच्या वाटेने त्याचीच विष्ठा व्हावी तसे याचे हे करणे असते ३ काही एक फायदा नसताना विंचू आपल्या नांगीत विषाचा साठा वाहत असतो तसे या अधम माणसाचे असते ४ २७६ अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥ १ ॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वाया विण ॥ २ ॥ सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥ ४ ॥
सार्थ तुकारामगाथा १३७ शब्दार्थ व टीपा :- यारी-संगत, प्रीती, कल्हारीं-कमळात, हृदयकमळात, क्षणी-नकारात्मक अर्थ. अर्थ :- अधम माणसाची प्रीती पतंगाच्या रंगाप्रमाणे क्षणभंगूर असते. १ एक क्षणात ती विटून जाते. तिची किंमत व्यर्थ होते २ याच्या हृदयकमळात सर्पाप्रमाणे विष नेहमी भरलेले असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असला हा अधम मला दाखवूसुद्धा नका. ४ २७७ आणिकांची स्तुति आम्हां ब्रह्महत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥ १ ॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणां या देव आणिकांसि ॥ २ ॥ शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणिक संकल्पें । अवघींच पापे घडतील ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आणिकांची-इतर देवाची, शतखंड-शंभर तुकडे, रसना-जीभ. अर्थ :- त्या एका पांडुरंगाशिवाय इतर देवाची स्तुती आम्ही केली तर आमचेकडून ब्रह्महत्येचे पातक घडले असे समजा. १ आम्हा विष्णुदासाचा भाव एकच असतो व आम्ही इतर देवदेवतांना देवही मानीत नाही २ या माझ्या वचनात जर अंतर पडेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील. ३ या पांडुरंगप्रीतीशिवाय दुसरे काही भाव माझ्या मनात येतील तर माझ्या हातून जगातील सर्वच पापे घडल्यासारखे होईल असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ २७८ तान्हल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥ १ ॥ माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ २ ॥ तूं तों उदारांचा राणा । माझी अल्पचि वासना ॥ ३ ॥ कृपावृष्टीं पाहे । तुका म्हणे होई साहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धणी-तृप्ती, समाधान, उणी-कमी. अर्थ :- गंगेच्या पाण्याचे सेवन केल्यानंतर तृषाक्रांताची इच्छा तृप्त होते तो संतुष्ट होतो, पण गंगेचे पाणी काही कमी होत नाही. १ तेव्हा कृपेच्या सागरा, माझे मनोरथ एवढा पूर्ण करा ना. २ देवा, तुम्ही तर उदाराचे राजे आहात व माझी मागणीही अगदी अल्प आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, केवळ कृपावृष्टीने देवा, माझ्याकडे पाहा व मला साह्य करा ४ २७९ संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥ १ ॥ घेती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ २ ॥ अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । ताडन भेदकांची सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गाळी-घालवून देतो, शिवी, भेदक-देव व संत यांच्यात भेद करणारे. अर्थ :- घरी यज्ञाने देवपूजा चालू असताना घरात संत आले व त्यांचा सत्कार जर घडला नाही तर तो अधर्म आहे. १ अशा वेळी देवाला भक्तिभावाने मंत्रपुष्पे वाहिली तरी ती दगडाच्या वर्षावाप्रमाणे देवासही वाटतील. २ दाराशी अतिथी आला असताना त्याला घालवून देतो किंवा शिवी देतो व देवाला नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी दाखवितो हाही अधर्मच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या भेदबुद्धीने केलेली सेवा ही सेवा नसून एक प्रकारची माराची शिक्षाच नव्हे काय ? ४ २८० करणे तें देवा । हेचि एक पावे सेवा ॥ १ ॥ अवघें घडे येणें सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ २ ॥ तु गा १८
हेचि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वर्म-रहस्य, त्रिवाचा-तीन वेळा उच्चार करून. अर्थ - संतांची सेवा हीच खऱ्या अर्थाने देवास पोचते. १ भक्त किंवा संत हा एक देवाचेच अंग असल्यामुळे त्याच्या पूजनाने सर्व काही गोष्टी परिपूर्ण होतात २ धर्म म्हणून जो सांगितला जातो त्याचे हेच एक रहस्य आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तीन वेळा उच्चार करून सांगत आहे हेच खरे आहे. ४ २८१ मार्गे नेणपणे घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥ १ ॥ परनारीचें जया घडलें गमन । दाखवितो वदन जननीरत ॥ २ ॥ उपदेशा वरी मन नाही हातीं । तो आम्हा पुढती पाहूं नये ॥ ३ ॥ तुका म्हणे साक्षी असो द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सीमा-मर्यादा अर्थ :- मागे न जाणता जे काय घडले असेल ते असो त्याची तुम्हास क्षमा आहे. पण आता येथून पुढे मात्र नीट रीत किंवा मर्यादा घालून देतो ती गोष्ट ऐका १ परस्त्रीगमन ज्यास घडले आहे व जो उजळ माथ्याने वर तोंड दाखवीत आहे त्यास आईशी गमन करण्याचे पातक लागते २ मी हा उपदेश केल्यावरही ज्याचे मन स्वाधीन राहात नाही, त्याच्या मुखाचे दर्शनही मला आता यापुढे नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही घातलेली शपथ पाळण्यासाठी तुम्ही आपले मनच प्रथम साक्षी ठेवा ४ २८२ आणिकांच्या घातें । ज्याचीं निवतील चित्तें ॥ १ ॥ तेचि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ २ ॥ कान पसरूनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निरयवासी-नरकात राहणारे, भांड-भांडखोर. अर्थ - दुसऱ्याचा घातपात केल्यामुळे ज्याच्या चित्ताला समाधान वाटते, १ तो पापी समजावा तो शीघ्र- कोपी मानून त्याचा वास नरकात असतो असेच समजावे २ तो नेहमी कान टवकारून वाईट बोलणे ऐकत असतो; स्वतः बोलत असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य नुसता भांडखोर असतो त्याच्या तोंडाला धरबंध नसतो कधी. ४ हनुमंतस्तुति-अभंग ४ २८३ शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥ १ ॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ २ ॥ शूर आणि धीर । स्वामिकार्यीं तूं सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे रुद्र । अंजनीचिया कुमरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुभटा-श्रेष्ठ वीरा, सादर-तत्पर, रुद्रा-शिवा, अंजनी-हनुमंताची आई अर्थ :-मारुतीराया, हनुमंता, तुम्ही श्रीरामचंद्राचे सेवक आहात. म्हणून मी तुम्हास पुन: पुन वन्दन करतो. १ हे श्रेष्ठ अशा वीर पुरुषा, भक्तीच्या ज्या वाटा आहेत त्या मला दाखवा ना. २ तुम्ही शूर व धैर्यवान आहात, स्वामीच्या, रामचंद्राच्या कोणत्याही कामासाठी तुम्ही तत्पर असता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अंजनीमातेच्या कुमारा, हनुमंता, तुम्ही प्रत्यक्ष शिवाचेच रूप आहात. ४
सार्थ तुकारामगाथा १३९ विवरण - तुकारामबुवांचे आराध्य दैवत पंढरपूरचे श्रीविठ्ठल हेच असले तरी याच श्रीविठ्ठलाच्या म्हणजे श्रीकृष्णच्या पूर्वावतारी रामचंद्राचा एकनिष्ठ भक्त हनुमंत याची महती भागवत सांप्रदायी साधुसंतांनी विशेष मानली आहे शक्ती, बुद्धी व स्वामीच्या कार्याविषयी तत्परता याबद्दल हनुमंताचे नाव प्रसिद्ध आहे विठ्ठलरखुमाईच्या दोन्ही अंगास गरुड व हनुमंत यांचीच जोडी हात जोडून उभी असते 'गरुड हनुमंत पुढे उभे राहती' असे वर्णन विठ्ठलाच्या प्रसिद्ध आरतीत आहे याच गरुडाचा अवतार मानतात नामदेवांनी याचे चरित्र अगदी थोडक्यात वर्णन केले आहे 'पिंड धारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥ अंजनीच्या तपासाठी । महारुद्र आले पोटीं ॥ चैत्र शुद्ध पौणिमेसी । सूर्योदयसमयासी ॥ महारुद्र प्रगटले । नामा म्हणे भ्या वदिले-' ॥ भक्ती व शक्ती यांचे प्रतीक असलेल्या या हनुमंताच्या श्रेष्ठतेचे वर्णन सर्वत्र मिळने एकनाथांनी याचे वर्णन, 'वानराचा वेष सुवर्ण पौवीन । दिसतों शोभायमान कुंडले तर्णी । जन्मताची जेणे सूर्याते धरियेलें । इंद्रादिका दिले थोर मार' अशा शब्दांत केले आहे खालील तीनचार अभंगातून तुकारामबुवांनी हनुमंताची स्तुती करून त्याच्या कार्याची ओळख करून दिली आहे हनुमंत हा सुमेरुचा राजा केसरिन व गौतमकन्या अंजनी यांचा पुत्र होय वायुपुत्र म्हणूनही याचा लौकिक आहे दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञातील पायसाचा भाग घारीच्या ताडून पडलेला अंजनीच्या ओंजळीत पडला व त्याच्या सेवनाने तिला हा पुत्र झाला या मोठ्या बलवान, ज्ञानवान सेवकाचा महिमा रामायणात विशेषत्वाने दिसून येतो रावणान सीतेचे हरण केल्यानंतर तिच्या शोधासाठी जे प्रयत्न झाले त्यात याच्या प्रयत्नाचे महत्व विशेष होत हरप्रयत्नांनी याने समुद्र उल्लंघून लंकेत प्रवेश केला अशोकवनातील सीता याने शोधून काढली रामाची मुद्रा दाखवून खूण पटविली नंतर याने अशोकवनाचा नाश केला रावणाकडून आलेल्या जंबुमालि विरूपाक्ष इत्यादी पाच सेनापतींचा याने पराभव केला नंतर इंद्रजिताने यास ब्रह्मास्त्राने बांधून रावणासमोर आणले याचा मृत्यू शेपटीत असल्याने शेपटीस आग लावण्याचे ठरले शेपटीस सर्व लंकेतील वस्त्र गुंडाळली तरी ती उघडीच राही, तेल ओतल्यावर रावणाने फुंकर मारल्याबरोबर त्याची दाढी जळून गेली अशी कथा आनंद रामायणात दिलेली आहे पुढे याने आपल्या पेटविलेल्या शेपटीने सारी लंका जाळून टाकली प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी तर याने हजारो राक्षस मारिले वानरांना संजीव करण्यासाठी निरनिराळ्या औषधी वनस्पती यानेच आणल्या याने रावणाचा पराभव केला लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर याने द्रोणागिरी माथावर उचलून आणला युद्धसमाप्तीनंतर याने रामावरची निष्ठा सोडली नाही राज्याभिषेकाच्या वेळी हनुमंतानेच समुद्राचे पाणी आणले रामचंद्राबराबर याचीही कीर्ती वाढली व एक आदर्श सेवकभक्त म्हणून याचे नाव प्रसिद्ध झाले सप्त चिरंजीवांपैकी हा एक आहेच, अर्जुनाचे रथावर याचे स्थान असे रामावर एवढी निष्ठा होती की ज्यास राम नाही त्या रत्नाचाही लोभ त्यास नसे रामभक्तीचा आदर्श म्हणजे हनुमंत होय २८४ केली सीताशुद्धी । मूळ रामायणा अर्थीं ॥ १ ॥ ऐसा प्रतापी गहन । सुरा सकळां भक्तांचे भूषण ॥ २ ॥ जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥ ३ ॥ राम लक्ष्मण । नेले आणिले चोरून ॥ ४ ॥ जोडूनिया कर । उभा सन्मुख समोर ॥ ५ ॥ तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सीताशुद्धी-सीतेचा शोध, गहन-श्रेष्ठ अर्थ :- या हनुमंतानेच सीतेचा शोध केला सर्व रामायणकथेस याच गोष्टीचे मूळ आहे १ असा हा पराक्रमी हनुमंत श्रेष्ठ असून सर्व देवाना व भक्ताना भूषणभूत झालेला आहे २ यानेच पाताळात जाऊन देवांची फजिती केली होती ३ अहिरावणमहिरावण यांनी रामलक्ष्मणास चोरून नेले होते, तेव्हा यानेच त्याचा वध करून १ सुरा सवळा मोहन
१४० सार्थ तुकारामगाथा रामलक्ष्मणास सोडवून आणले. ४ हा हनुमंत रामचंद्रजवळ दोन्ही हात जोडून नेहमीच उभा असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, या वायुपुत्राच्या जपाने सर्व पापाचा नाश होत असतो. ६ २८५ काम घातला बांदोडी । काळ' केला देशधडी ॥ १ ॥ तया माझें दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥ २ ॥ शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥ ३ ॥ रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बांदोडी-दंडीत अर्थ :- या हनुमंताने कामास जिंकून त्याला बंदिवासातच टाकले व यमास किंवा काळास देशोधडीस लाविले. हा चिरंजीव राहिला. १ वानरवंशातील या हनुमंतास माझे नमस्कार असोत. २ या हनुमंताचे शरीर वज्रासारखे कठिण असून याचे शेपूट एवढे आहे की त्याचा वेढा सर्व ब्रह्मांडालाही बसेल. ३ अरे रामाच्या सेवका, हनुमंता, मी तुकाराम तुम्हास शरण आलो आहे. ४ २८६ हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥ १ ॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ २ ॥ करोनी उड्डाण । केले लंकेचे शोधन' ॥ ३ ॥ जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- महाबळी-मोठा पराक्रमी, शोधन-शोध, शुद्ध अर्थ :- हा हनुमंत मोठाच बलवंत आहे, कारण याने त्या दुर्लाड्य व मदोन्मत्त रावणाची दाढीच जाळून टाकली. १ त्या श्रेष्ठ व बलवान हनुमंतास माझा नमस्कार पुनः पुनः असो २ समुद्रावर उड्डाण करून याने सर्व लंकेचा शोध लावला, लंका जाळून शुद्ध केली ३ याने सारी लंका जाळून रावणाच्या मदमत्त अशा वैभवाचा नाश केला मारुतीचा हा पराक्रम फार मोठा असून तुकाराम महाराज धन्य धन्य म्हणून त्याचा गौरव करतात ४ २८७ कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकाँ गू फेडावा ॥ १ ॥ ऐसे भिन्न भिन्न सांटे । केले प्रारब्धाने वांटे ॥ २ ॥ हिरे दगड एक खाणी । कंचे विजातीसी पाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुंभ-मडके, पाकी-स्वयंपाकात, फेडावा-काढण्यासाठी, सांटे-प्रकार, पाणी-तेज अर्थ .- सर्व मडकी ही कुंभाराच्या एकाच आव्यात तयार होतात, परंतु एक स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते व दुसरे गू काढण्यास उपयोगात येते १ याच न्यायाने प्रारब्धाने माणसांचे निरनिराळे प्रकार केले आहेत. २ हिरे व दगड एकाच खाणीतून जन्मास येतात, पण हिऱ्यास चमकदार पाणी असल्याने ते वेगळ्या जातीचे ठरतात व दगड दगडच राहातात ३ तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे एकेकाचे नशीब पाहा कसे बनते, एक हिरा राज्याच्या डोक्यावरील मुकुटात जाऊन बसतो व दुसरा दगड म्हणून कुठेतरी पायरीला बसतो ४ २८८ मांडे पुऱ्या मुखे सागो जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥ १ ॥ ऐशियाच्या गोष्टी फिक्या मिठेविण । रुचि नेदी अन्न चवी नाही ॥ २ ॥ बोलों जाणे अगी नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें ते ॥ ३ ॥ तुका म्हणे बहुतोडे जे वाचाळ । तेग तेच मूळ लटिक्याचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मात-गोष्ट, रिते-रिकामे, बहुतोंडे-फार बोलणारे, तेंग-तेच, लटिक्याचे-खोट्याचे. १ काळ घातला तोरडी, २ दहन
सार्थ तुकारामगाथा १४१ अर्थ :- भांडे, चुन्या याच्या नुसत्या गोष्टीच तोंडाने म्हटल्याने काय साधते ? तोंडास फक्त पाणी सुटते व हात मात्र रिकामेच राहून एकमेकांवर चोळले जातात १ असे नुसते बोलणाऱ्या माणसाच्या गोष्टी मिठाशिवाय असणाऱ्या अन्नाप्रमाणे फिक्क्याच असतात, त्या अन्नाला व त्या बोलण्याला कसलीच चव नसते. २ तोंडाने खूप बडबड करतो, पण अंगीं शूरपणा मुळींच नाही; त्याच्या तोंडाची बडबड काय जाळायाची ? तिचा काहीच उपयोग नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे अतिशय व वृथा बडबड करणारे पुष्कळजण मोठे वाघाळें असतात पण त्याचे सारे बोलणे सर्व खोटेपणाचेच मूळ असते. त्यात सत्याचा किंवा स्वानुभवाचा अंशही कधी असत नाही. ४ २८९ न लगे चंदना सांगावा' परिमळ । वनस्पतिमेळ हाकारूनी ॥ १ ॥ अंतरींचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ २ ॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरण कर म्हून ॥ ३ ॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- परिमळ-सुवास, अंतरीचे-मनातील, म्हून-म्हणून, मयूरें-मोर. अर्थ :- रानावनातील इतर झाडाझुडपांना आपल्या अंगच्या सुवासाबद्दल चंदनास सांगावे लागत नाही तो आपोआपच प्रकट होत असतो १ जे अंतरगात म्हणजे मनात आहे ते स्वभावतःच बाहेर धावत असते, व्यक्त होत असते. त्याला आवरून धरले तरी ते आवरत नाही. २ आपले प्रकाशकिरण तेजस्वी आहेत असे म्हणून लोकांना सूर्य स्वतः होऊन काही सांगायला जात नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मेघ दिसताच मयूर आपोआप नाचू लागतात, त्यांनाही सांगावे लागत नाही. जे खरे आहे ते लपविता येत नाही. ४ २९० चंदनाचे हात पायही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥ १ ॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साखर अवघी गोड ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळेचि ना ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- हीन-कमी प्रतीचे, साखर-साखर. अर्थ :- चंदनाचे हातपाय, खोडमूळ सर्व अंगच चंदनमय असते. परिसाची कोणतीही बाजू कधी हीन नसते. तो अंतर्बाह्य परीसच असतो. १ दिव्याास मागेपुढे अंधार कसा दिसणार ? साखर सर्वांगाने गोडच असणार. २ तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच सज्जन सर्व बाजूंनी सज्जनच असायचा अवगुण पाहता कुठेही दिसणार नाही. ३ २९१ मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥ १ ॥ मने प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ २ ॥ मन गुरु आणि शिष्य । करी आपुलेंचि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥ ३ ॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सिद्धी-जे साधायाचे ते, मात-गोष्ट, आनु-दुसरे. अर्थ :- तुम्ही आपले मन आधी प्रसन्न ठेवा. कारण जे साधायाचे आहे त्या सिद्धीचे सर्व कारण मन हेच आहे. मोक्ष अथवा बंधन, सुख, समाधान, इच्छा वगैरे जे काही आहे ते सर्व मनापासूनच मिळते. १ दगडाची १ पुसावा
१४२ सार्थ तुकारामगाथा प्रतिमा अथवा मूर्ती मनाने स्थापन केली व तिची मनोमय पूजा मनानेच केली, मनानेच सर्व इच्छा पुरविल्या, आणि सर्व वासनांची, संकल्पाची माउली मनच होय २ गुरु आणि शिष्य हे मनाचेच प्रकार कल्पिले मनच स्वतःचे दास्य करू लागते. मनच स्वतःवर स्वतःच प्रसन्न असते चांगली किंवा वाईट गती या मनामुळेच प्राप्त होत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, साधकांनो, पंडितांनो, वाचकांनो, श्रोत्यांनो, वक्त्यांनो, एक गोष्ट ऐका ती ही की या मनाखेरीज दुसरे दैवत नाही ४ विवरण :- भागवत धर्मोय संतांनी चित्तशुद्धीवर फार भर दिलेला आहे. मन हे सर्व सिद्धीचे साधन, असल्याने ते शुद्ध राखणे, त्यास वळण देणे, ते ताब्यात ठेवणे, त्यावर अस्वार करणे, ने ईश्वराच्या ठिकाणी स्थिर करणे याची फार आवश्यकता संतांनी सांगितली आहे मन हे अति चंचल, अति खवळळ, हट्टी, दुराग्रही असल्याने व सर्व सुखांचेही साधन तेच असल्याने त्याची मशागत ही फार महत्त्वाची मानली जाते मन स्थिर झाल्याशिवाय, शांत झाल्याशिवाय कसलेही सुख नाही वरवर कसलाही डौल मिरविला तरी मन स्वस्थ नसेल तर सारे व्यर्थ आहे म्हणून मनोजयास, मनाच्या स्थिरतेस फारच महत्त्व आह पण ही स्थिरता यावी कशी ? मन स्वभावत च चंचल आहे, प्रमाद करणारे आह, त्याचा निग्रह करुन त्यास ताब्यात ठेवणे फार कठिण आह पण अभ्यासाने व वैराग्याने त्यावर स्वामित्व मिळविता येते असा गीतेचा आदेश आहे 'चञ्चलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्' असा मनाचा स्वभाव आहे वाऱ्याची मोट बांधणे जितके अवघड तितकेच मन वळविणे अवघड या अस्थिर मनाचे मोठे समर्पक वर्णन ज्ञानदेवानी करून म्हटले आहे, ' हे मन कैसे केवडें । ऐसे पाहों म्हणो तरी न सापडें । एन्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य याया ॥ म्हणोनि ऐसें कैसे घडेल । जें मर्कट समाधी येईल । दा राहा म्हणतलिया राहेल । महा- वायु ॥ जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी । धैर्येसीं हातरुळी । मिळऊनी जाय ॥ जें विवेकेंतें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥ परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविले अभ्यासाचिरे मोहरे । तरि केतुलेनि एके अवसरे । स्थिरावेल' या मनाची अस्थिरता बहुतेप सर्वांनी वर्णन केली आहे 'चंचळळ मन माझे नावरे आवरीता' म्हणून रामदासानी मनासच केलेला उपदेश प्रसिद्ध आहे हे चंचल मन कसे फसवे आहे व कसे झुकाड्या देत असते याचे मोठे सुंदर वर्णन एकनाथानी आपल्या भागवतात केले आहे 'निग्रहाच्या निज मन । साधक साधितो प्राणापान । त्यासीहो छेळोनिया मन । जाय निघोन तत्काळ ॥ मनोनिग्रह करिता देख । मन खवळे अधिकाधिक । मनोनेमी सज्ञान लोक । शिणले साधक साधनीं ॥ वारा बाधवेल मोठें । अग्नि प्राशवेल अवघटें । समुद्र घोटवेल घोटें । मन आत्मनिष्ठे तरी न ये ॥ आकाश फाडवेल चौघडी । महामेरु बाधवेल पुढीं । शून्याची मुरडवेल नरडी । परि या मनाच्या जोडी अनिवार ॥' अशा या दुराग्रही, हट्टी आणि चंचल मनास वश करता येते ते वैराग्य, सत्सग, प्राणायाम, हरिभक्ती, नामस्मरण, भजन इत्यादी उपायानी नाथांनी भागवतात मन स्थिर करण्याचे उपाय भिक्षुगीतात सांगितले आहेत मनाशीं वैर करावे, मनाशी मैत्री करावी, मनाविषयी उदासीन राहावे असे तीन मार्ग मनोजयाचे त्यानी सुचविले आहेत 'वैर करोनि मनचि मारावे । मित्रत्वें मनें मन साधावे । इयें दोन्ही जें न संभवें । तं उपेक्षावे मनातें ॥' मनोनिग्रहावरचे नाथाचे हे निरूपण अतिशय महत्त्वाचे व समर्पक असे आहे सर्व साधुसंतानी या मनास ताब्यात ठेवण्यासाठी उपाय सुचविले आहेत 'आधीं मन घेई हातीं । तोचि गणराज गणपती ॥ मन इंद्रियाचा राजा । त्याची सर्वभावें पूजा' असे तुकोबांनीच एका अभंगात पुढे म्हटले आहे 'मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं' या शब्दात त्यांनी मनाची चंचलता वर्णन करुन 'तुका म्हणे मन चंचळ । हातों येईल गुरूच्या बळें' असा एक उपायही सुचविला आहे मनानेच मनाला जिकावयाचे असल्याने हे फार कठिण काम वाटते नाथांनी 'जैवि हिरेनि हिरा चिरिजे । तेवी मनेंचि मन धरिजे' म्हणून सांगितले आहे. हिऱ्यानेच हिरा चिरावा लागतो, त्याप्रमाणे मनानेच मनास जिकावे
सार्थ तुकारामगाथा १४३ लागते. भावार्थ रामायणात एकनाथांनी मनोजयाचा एक उपाय सुचविला आहे. ते म्हणतात, 'मनें मनातें आवरावें । मनें मनातें निग्रहावें । मनें मनातें धरावें । मनें मारावें मनातें ॥' या मार्गाने जर मन स्वाधीन झाले, श्रीहरीकडे वळले तर मग सर्व सुख हाती आलेच म्हणून समजावे. जर असे हे मन हाती येईल तर काय काय सिद्ध होईल, याचे वर्णन करताना नाथांनी म्हटले आहे, 'या मनाची एक उत्तम गती । जरी स्वयें लागलें परमार्था । तरी दासो करी चारी मुक्ती । वे शोधीनि हातीं परब्रह्म ॥' एवढे या मनाचे सामर्थ्य आहे. यासाठीच तुकारामबुवा या मनास प्रमथ करा म्हणून सागतात. या मनास वश करुन घेतल्याने रोज नवीन नवीन जागृती येते राहील असे त्यांनी 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा' या शब्दात सांगितले आहे. तुकोबांनी स्वतःच्या आपुल्याचा जो मधून मधून क्म दिला आहे त्यावरून त्यांनाही या मनास ताब्यात ठेवण्यासाठी केवढे सायास पडले असावेत याची कल्पना येते. 'आवरितां मन नायरे दुर्जन । घात करी मन माझें मज,' 'निरोधिते परी न मोडे विकार । बहूं हीं दुस्तर विषय द्वारें', 'एकाचेंही मज न घडे दमन । अवधीं नेमून फंसा राखौं' यासारख्या ओळीतून तुकोबाच्या मनोनिग्रहाच्या प्रयत्नाची थोडीफार कल्पना येते. 'कोण तुम्हांवीण मनाचा चालक । बुजे सांगा एक नारायणा ?' म्हणून एके ठिकाणी प्रश्न विचारून त्यांनी आपल्या अवखळ मनाम काही उपाय सुचविले आहेत. 'मना एक करों । म्हणे मी जाईन पंढरी ।', 'देवाचिये पायीं मना देईं बुडी । नको धांवो घोडी इंद्रियांचे' असा काही ओळीतून त्यांनी मनाम वश करण्याचे मार्गही सुचविले आहेत. या सर्व प्रयत्नाचा अर्थ हाच की सर्व सिद्धीचे वा वधमोक्षाचे खरे कारण मन हे एवच आहे 'मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः' हाच विचार तुकाराम महाराजांच्या समोर असावा या मनामुळेच मोक्ष वा बंधन याची प्राप्ती होते २९२ मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥ १ ॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥ २ ॥ तुका म्हणे नरकों घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- संगें-पंगतीत, न पवे-पावत नाही. अर्थ :- आई सर्पीण व बाप बोका असल्यावर त्यांच्या संगतीत मुलाला सुख कसले लागणार ? तो कधीच सुखी होणार नाही कारण सर्पीण अंडो नासणार व बोका पिले खाणार. १ चंदनाचा शूळ असला आणि बेडी सोन्याची असली तरी सुख कसे घाटणार ? चंदनाचा शूळ आपले प्राणघाताचे काम करणारच. त्याच्या सुगंधाचा वा थडपणाचा काय उपयोग ? सोन्याची बेडी नाशच करणार. २ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे ज्ञानाचा गर्व झाला म्हणजे सुख न होता दुःखाचा नरकच प्राप्त होणार. ३ २९३ शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥ १ ॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥ २ ॥ तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥ ३ ॥
१८४ सार्थ तुकारामगाथा सत्त्वरजततमाधा । नव्हे हरिमक्तासि कदा ॥ ३ ॥ खाय बोले करी । अवघा त्याच्या अगें हरी ॥ ४ ॥ देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रारब्ध-पूर्वजन्माचे कर्म, संचित-जे भोगानेच संपणारे असत ते कर्म, क्रियमाण-चालू घडीचे कर्म अर्थ - ईश्वराच्या भक्तांना पूर्वजन्मीचे कर्म, भोगावयाचे साठलेले कर्म- चालू घडीचे कर्म अशा रूपात प्रारब्ध, संचित व क्रियमाण वगैरे सर्व कर्मभोग काही नसतात १ हा भक्त सर्व बाजूंनी देवच बनून राहिलेला असतो अंतर्बाह्य त्याला देवत्व प्राप्त झालेले असते २ या हरिमक्तांना सत्त्व, रज, तम या त्रिगुणाची बाधा कधीच होत नसते ३ प्रत्यक्ष श्रीहरी या भक्तांच्याबरोबर खातो, बोलतो, कामें करतो, सर्व कर्मे देव त्यांच्याबरोबरच करतो ४ तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे देव व भक्त भिन्न नसून एकच आहेत ५ २९५ शास्त्राचे जें सार वेदाची जो मूर्ति । तो माझा सागाती प्राणसखा ॥ १ ॥ म्हणउनी नाहीं आणिकाचा पाग । सर्व जाले सांग नामें एका ॥ २ ॥ सगुण निर्गुण जयाचीं हीं अगें । तोचि आम्हा सगै क्रीडा करी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सागाती-सोबती, जिवलग मित्र, पाग-गरज, सांग-पूर्ण, विधी-सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, जनिते-जन्म देणार, स्वयंभू-स्वत होऊन झालेले अर्थ - सर्व शास्त्राचे सार जे वेद त्याची मूर्तीच माझा जिवलग असा प्राणसखा मित्र आहे १ म्हणून मला दुसऱ्याच्या संगतीची गरजच नाही याच्या एका नामस्मरणाने सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत २ सगुण व निर्गुण ही ज्याची दोन प्रमुख अंगे आहेत तोच आमच्याबरोबर क्रीडा करीत असतो ३ तुकाराम महाराज म्हण तात, आम्ही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे बाप आहोत, आम्हीच त्याला निर्माण केले, त्याने आम्हास नाही आम्ही स्वतः होऊनच निर्माण झालो कोणी तरी आम्हास आयते बनविले असे नाही ४ विवरण - या एव लहानशा पण तत्त्वपूर्ण अभंगात बुवांनी तीन सिद्धान्त स्पष्टपणे सांगितले आहेत पहिला असा की त्यांचा परमेश्वर हा वेदांच व शास्त्रांचे सार आहे तो वेदप्रणीत आहे. 'वेदांचा तो अर्थ आम्हांसचि ठावा' म्हणणाऱ्या तुकोबांनाच हे शोभून दिसणार आहे 'वेद अनंत बोलीला अर्थ इतकाचि साधिला । विठोबासी शरण- जावे' हाच अर्थ तुकोबांनी वेदांतून काढलेला आहे तुकारामबुवांचा विठ्ठल हा वेदांचा शास्त्राचा, पुराणाचा एव पुतळाच आहे 'सावळें रूप ड्यावे डोळा । सा ची अक्षरचा मेळा' असा उल्लेख त्यांनी एका अभंगात केला आहे हा षडंगेचा राजा म्हणज 'सकळ शास्त्रांचे हैं सार । हे वेदांचे गव्हार' म्हणून दुसऱ्या एका ठिकाणी बुवानी म्हटले आहे दुसरा सिद्धान्त तुकाराम महाराजांच्या या अभंगातील असा आहे की हा आमचा देव सगुण आहे आणि निर्गुणही आहे सगुणनिर्गुणांना भेद हा वरवरचा आहे निर्गुण हा शब्दच एका गुणांचे वर्णन करणारा आहे भोगासाठी, प्रेमासाठी भक्तीसाठी निर्गुणच सगुण झाला, निराकार जो तो साकार झाला पण म्हणून तो फार निराळा झाला अस नाही 'तुज सगुण म्हणूं कीं निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदु रे' अशी प्रचीती सर्व साधुसंतांचीच आहे 'जेथुनि उद्गारू प्रसवले ॐकारू । तोचि हा श्रीवरू गोकुळीं वसे' असे याच वर्णन निवृत्तीनाथांनी केले आहे 'सगुणीं निर्गुण निर्गुणीं सगुण। दोन्हीही निरूपण नसे मूळी', 'निर्गुणा अंगीं सगुण बाणले । निर्गुण सगुण एकत्रचि आले।' अशा शब्दांत श्रीज्ञानेश्वरांनीही सगुपनिर्गुणांचे ऐक्य प्रस्थापित केले आहे तुकारामबुवांचे तर शेकडो अभंग या विषयी आहेत 'अद्वयाचि द्वय झालेचि कारण । धरिले नारायणे भक्तिकुलें।' यासारख्या ओळींतून तुकांचा हा सिद्धान्त चट्कन् मांडून जातात तिसरा एक महत्त्वाचा सिद्धान्त तुकोबांनी या अभंगात मांडला आहे तो असा की देवाच्याही आधी आपण भवन स्वयंभू आहोत देवाने, ब्रह्मदेवाने हे सर्व चराचर विश्व निर्माण केले असे आपण मानता, पण येथे बुवांची
सार्थ तुकारामगाथा १४५ धारणा अशी की आम्ही भक्तांनीच ब्रह्मदेवासही जन्म दिला आम्ही भक्त आहोत म्हणून देवास देवपणा आहे आम्ही पतित आहोत म्हणून तो पतितपावन म्हणून नावारूपास आला आहे नाही तर त्याला कोण पुसतो ? 'जरि मी नव्हतों पतित । तरि तू पावन कंचा तेथ ?' म्हणून त्यांनी एकदा परमेश्वरास विचारलेच आहे 'लोहें महिमान परिसा। नाहीं तरी दगड जैसा' लोखंड आहे म्हणून परिसाचे महत्त्व भक्त आहे म्हणून देवाचा महिमा मूळ आहे म्हणून तर ती बाई आईपणास आली बाईने मुलास जन्म दिला खरा, पण या मुलानेही आपल्या जन्माबरोबर बाईस आईपणाचा जन्म दिला भक्ताने ईश्वराचे स्थान स्थिर केले असा मजेचा खेळ आहे हा २९६ ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय १भिलटीचीं ॥ १ ॥ थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ २ ॥ पल्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडेच ॥ ३ ॥ न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तोपुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडीची-प्रेमाची, भिलटीचीं-शबरी नावाच्या भिल्लीणीची, पल्हे-पोहे, फके-मूठ अर्थ - भक्तांचा महिमा केवढा असतो तो नीट ऐका ना. या रामाने प्रेमापोटी शबरीची उष्टी बोरे वनवासात असताना तिचे प्रेम पाहून खाल्ली. १ हा ईश्वर भक्ति-प्रेमाचा मोठाच भुकेलेला असतो, त्याच्या घरी याचाच दुष्काळ असतो त्याला खरे म्हणजे आठही सिद्धी व क्षीरसागर याचा लाभ असूनही तो त्यांना मानीत नाही २ दरिद्री सुदाम मित्राचे पोहे खाण्यासाठी हा लोभावलेला असतो घरी दुधाचा समुद्र असूनही ते पोहे कोरडेच खावयास याला आनंद वाटतो ३ प्रीतीच्या पोटी तो वस्तु उष्टी आहे की थोडी आहे हेही पाहात नाही ४ विवरण .- देवास भक्ताचे प्रेम किती थोर वाटते, तो त्याच्यासाठी किती आसुसलेला असतो याचे वर्णन संतानी अनेक अभंगातून केले आहे येथे शबरीच्या उष्ट्या बोराच्या कथेचा संक्षेपान उल्लेख केला आहे शबरी एक भिल्लीण ही रामावताराच्या वेळी दक्षिणेत मातंग ऋषीची व त्याच्या शिष्याची सेवा करून राहात असे रामचंद्र वनवासात असताना जेव्हा या अरण्यात आले तेव्हा हिने रामलक्ष्मण यांचे उत्तम स्वागत केले रामाचे आगतस्वागत करून हिने ताजी बोरे रामचंद्रास खावयास दिली ती चाखली चांगली अशी निवडून, चाखून पाहून तिने रामासाठीच वेचून ठेविली होती अशी कल्पना सुदामदेव श्रीकृष्णाचा परममित्र दरिद्री व वद्रावस्थेत राहिला, पण श्रीकृष्णभेटीस तो त्याच्या सुवर्णाच्या राजवाड्याकडे निघाला तेव्हा त्याने फडक्यात मूठभर पोहे बांधून घेतले श्रीकृष्णाने मोठ्या प्रेमाने ते कोरडेच खाल्ले अशी कथा आहे २९७ कोणे तुझा साग केला अगीकार । निश्चिंत त्यां थोर मानियेली ॥ १ ॥ कोणे ऐसा तुज उपदेश केला । नको या विठुला शरण जाऊं ॥ २ ॥ तेव्हा तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥ ३ ॥ का रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेदिस बळ क्षीण होतें ॥ ४ ॥ तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - अगीकार-स्वीकार, वदन-तोंड, नागवसी-फसतोस अर्थः-तुझा कुणी स्वीकार केला आहे म्हणून तू एवढ्या निश्चिंततेने वागू लागला आहेस ? १ या विठ्ठलाला शरण जाऊ नये असा तुला उपदेश तरी कुणी केला आहे रे ? २ जेव्हा यम पाठीशी लागेल व तुझे तोंड भूमीला लागेल, तेव्हा तुझी बाजू कोण सांभाळणार आहे ? ३ उगाच कां आयुष्य फुकट घालवितोस ? नागविला जातोस ? फसतोस ? हा काळ आयुष्य घालवोत बसला आहे ना दिवसेंदिवस बळही क्षीण होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, याला कुणी तरी सांगायला हवे कारण हा मायबाप असा जो श्रीहरी त्यास विसरला आहे. ५ १ भिल्लणीची तु गाथा . १९