सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४३२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - ग्वाही-साक्ष, काज-कारण अर्थ - ज्या स्थानी चित्त साक्षी झाले आहे, त्या ठिकाणी लौकिक गोष्टींची काय किंमत ? आपले स्वहित आपणच पाहावे १ अंतर्बाह्य सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे, असा जो मनाचा भाव होत असतो, तोच खरा मानाबपास हृदा २ आपल्या मनातील शुद्ध भाव काही कुणाला सांगावा लागत नाही तो दुसऱ्याच्या ठिकाणी आपल्याकडून प्रकट होत असतो ३ भोगणारा मनुष्य असतो त्यास अंतरंगातील गोडीशी कारण असते, बाहेरच्या रंगास तो कधी भुलत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील शुद्ध भाव हेच खरे म्हणजे ईश्वरप्राप्तीचे कारण होय अशा शुद्ध भावाने भजणाऱ्या भक्ताचा तो परमेश्वरच भाट होऊन जातो ५
९५२ नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥ काहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २ ॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥ ३ ॥ ज्याचे तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खंती-चिंता, मापाडें-माप टाकणारा अर्थ - मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे १ याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे २ अहंकाराची खोटी वाट जी असते, ती सांगितल्याबरोबर टाकून द्यावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, मजकडून बोलविणारा जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे ४
९५३ वासनेच्या मुखीं अदळोनि भीतें । निर्वाहापुरतें कारण ते ॥ १ ॥ या नांवे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥ सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अंग तो तो कळे सन्निधता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भीतें-भिऊन, कारण-कार्य अर्थ - नाना वासनांना भिऊन, त्याची भीती बाळगून, त्याच्या तोंडात काही देऊन आपण जरूरीपुरतेच कार्य करावे १ चित्तात समाधान असणे हीच एक खूण मनात नारायणाचा निवास झाल्याची आहे २ आत्म- तत्त्वाचा विवेक मनात निरंतर करून, नेहमी हाच एक विचार करीत असावे ३ तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या ज्या प्रमाणात भजनाकडे वळू, त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल ४
९५४ चिंतने अंचित राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवाये ॥ १ ॥ अबोल्याचा काळ आता ऐशापरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥ करू आला तो तो केला उपलाहो । उरोच संदेहो दिला नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मोह परतेचि ना मार्गे । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंचित-निश्चिंत, चिंतारहित, उरी-उणीव, बाकी अर्थ - या भगवंताचे चिंतन एकसारखे केल्याने मी चिंतारहित झालो आहे आता हे चिंतन तरी किती काळपर्यंत वाढवावे ? १ आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते काही बोल बोलावेत अशी बाकी आता राहिली आहे असे नाही २ ईश्वरप्राप्तीसाठी जो जो उपाय करावयास हवा, तो तो मी त्वरित केला असून मी माझ्या मनात कुठलाही संशय उरू दिलेला नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तरीसुद्धा माझ्या मनातील लौकिक गोष्टी विषयांचा मोह काही संपतच नाही म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करावा या मार्गास येण्याचे निश्चित केले ४
सार्थ तुकारामगाथा ४३३ ९५५ निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकी भिन्न भेद घडे ॥ १ ॥ तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तेंचि वरी जेथें तेथें ॥ २ ॥ आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही. अर्थ :- या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्याने परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनानी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या- प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४ ९५६ तुजच पासाव जालोंसों निर्माण । असावे तें भिन्न कासयानें ॥ १ ॥ पाहाया जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पासाव-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे फक्त अकर्ता बनलो आहे ४ विवरण -एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व चराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुख्यपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते, पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी त्यालाच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व सृष्टीचा चराचर संसार आवागम आला एकाच अव्यक्तापासून हे सर्व गुणरूपीधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे " अव्यक्त प्रकृती हे याचे बीज, बुद्धी हे झाड, अहंकार हा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोध्या, पचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलांनी व शुभाशुभ फळांनी नेहमी समृद्ध असता सर्व प्राणिमात्रांना आधारभूत होतो " असे याचे वर्णन आढळते ज्ञानेश्वरी ग्रंथापासून या प्रतिमेचे वर्णन करताना या मूलभूत बीजा- तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतास वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे व गीता यांतील अश्वत्थ वृक्ष होय. परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव याचे हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतानी मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा कित्येक वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहोत, पापी आहोत, संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहोत व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा साऱ्या ध्यास सर्वांना असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन, मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवते ? हे पाप आले कोठून ? दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही गाबडे घातलेले दिसते संत गोरोबांनी विठ्ठलाचे अभंग लिहिले आहेत, त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर देवा, तुम्हीही प्रकृती रूपासावयाच हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत योगिनील सर्व तु. गाथा. ५५
४३२ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - ग्वाही-साक्ष, काज-कारण अर्थ - ज्या स्थानी चित्त साक्षी झाले आहे त्या ठिकाणी लौकिक गोष्टींची काय किंमत ? आपले स्वहित आपणच पाहाये १ अंतर्बाह्य सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे असा जो मनाचा भाव होत असतो, तोच खरा मानावयास हवा २ आपल्या मनातील शुद्ध भाव काही कुणाला सागावा लागत नाही तो दुसऱ्याच्या ठिकाणी आपल्याकडून प्रकट होत असतो ३ भोगणारा मनुष्य असतो त्यास अंतरंगातील गोष्टीशी कारण असते, बाहेरच्या रंगास तो कधी भुलत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील शुद्ध भाव हेच खरे म्हणजे ईश्वरप्राप्तीचे कारण होय अशा शुद्ध भावाने भजणाऱ्या भक्ताचा तो परमेश्वरच भाट होऊन जातो ५ ९५२ नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥ कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २ ॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥ ३ ॥ ज्याचे तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खंती-चिंता, मापाडें-माप टाकणारा अर्थ - मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे १ याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे २ अहंकाराची खोटी वाट जी असते, ती सांगितल्याबरोबर टाकून द्यावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, मजकडून बोलविणारा जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे ४ ९५३ वासनेच्या मुखीं अदळुनि भीतें । निर्वाहापुरते कारण ते ॥ १ ॥ या नांवे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥ सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकी सादर आत्मत्याचे ॥ ३ ॥ तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अग तो तो कळे सन्निधता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भीतें-भिजून, कारण-काय अर्थ - नाना वासनांना भिजून, त्याची भीती बाळगून, त्यांच्या तोंडात काही देऊन आपण जरूरीपुरतेच कार्य करावे १ चित्तात समाधान असणे हीच एक खूण मनात नारायणाचा निवास झाल्याची आहे २ आत्म तत्त्वाचा विवेक मनात निरंतर करून, नेहमी हाच एक विचार करीत असावे ३ तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या ज्या प्रमाणात भजनाकडे वळू, त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल ४ ९५४ चिंतने अंचित राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवावे ॥ १ ॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥ करूं आला तो तो केला लवलाहो । उरोच संदेहो दिला नाही ॥ ३ ॥ तुका म्हणे मोह परतेचि ना मार्गे । म्हणउनि त्यागें त्याग झाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंचित-निश्चिंत, चिंतारहित, उरी-उणीव, बाकी अर्थ - या भगवंताचे चिंतन एकसारखे केल्याने मी चिंतारहित झालो आहे आता हे चिंतन तरी किती काळपर्यंत वाढवावे ? १ आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते काही बोल बोलावेत अशी बाकी आता राहिली आहे असे नाही २ ईश्वरप्राप्तीसाठी जो जो उपाय करावयास हवा तो तो मी त्वरित केला असून मी माझ्या मनात कुठलाही संशय उरू दिलेला नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तरीसुद्धा माझ्या मनातील लौकिक गोष्टी विषयींचा मोह कधी संपतच नाही म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करू या मार्गास येण्याचे निश्चित केले ४
सार्थ तुकारामगाथा ४३३ ९५५ निर्गुणाचे द्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥ १ ॥ तुम्हां आम्हा आता न पडे यावरी । आहों तेंचि बरी जेथें तेथें ॥ २ ॥ आपणापासुनी नसावे अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही अर्थ - या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्यामुळे परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनांनी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या- प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४ ९५६ तुजच पासाय जालोसो निर्माण । असावे तें भिन्न कासयाने ॥ १ ॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करुनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां बोलतसे स्पष्ट । जालो क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पासाय-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलेले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे करुन अकर्ता बनलो आहे ४ विवरण - एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व सचराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुखपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी त्यासच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व सृष्टीचा चराचर संसार आकारास आला एकाच अव्यक्तातपासून हे सर्व गुणरूपधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे "अव्यक्त प्रकृती हे याचे बीज बुद्धी हे खोड, अहंकार हा मुख्य पल्लव मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोल्या, पंचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलानी व शुभाशुभ फलानी नेहमी समृद्ध असतो सर्व प्राणिमात्रांना आधारभूत होतो' असे याचे वर्णन आढळते ऋग्वेदादी ग्रंथापासून या प्रक्रियेचे वर्णन करताना या मूलभूत वीजा- तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतरूप वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे व गीता यातील अश्वत्थ वृक्ष हाय. परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव यात हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतांनी मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा रित्या वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहात, पापी आहोत, संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहात व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा सारखा ध्यास सर्वांना असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवने ? हे पाप आले कोठून ? दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही मातले घातलेले दिसतात संत चोखामेळानी विटाळाचे अभंग लिहिले आहेत त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर देवा, तुझीही प्रवृत्ती तपासावयास हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत बीजातील सर्व तु गाथा .५५
४३४ | सार्थ तुकारामगाथा गुणदोष वृक्षाच्या फुलाफळांत येतात ना ? मग याचा दोष वृक्षाकडे ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा निष्कर्ष असा की, आम्ही सर्व देवा, तुझ्यापासून निर्माण झालेलो असल्यामुळे तुमच्या-आमच्यात भिन्नता नसावी तुकोबांची शिष्या बहिणाबाई हिने तर एका अभंगात या भूमिकेवरून विठ्ठलास विचारिले आहे, ' ' तुम्ही आम्ही मुलें होतौं एके ठायीं । कोणते अन्यायीं सापडलों ॥ तुझ्याचि हिताने वाढला संसार । आम्हो का रे दूर उतरलों ? " तुझ्याच इच्छेने हा संसार वाढला, मग तू स्वतंत्र, शुद्ध, मुक्त व भी मात्र बद्ध, पतित कसा ? असा हा प्रश्न आहे सर्व चराचर जगत व अव्यक्त ब्रह्मतत्त्व यांच्या या विक्षेप नात्यावर आधारलेला हा भक्तीचा विकास मराठी संतानी अतिशय गोड व लडिवाळ स्वरूपात रगविला आहे या त्याच्या सुखविलासास तत्त्वज्ञानाचे पाठबळ आहेच 'मया ततमिद सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि' मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सर्व जग विस्तारलेले आहे व माझ्या ठिकाणी ही सर्व भूते आहेत अशा अर्थाच्या गीतेतील श्लोकावर भाष्य करिताना ज्ञानेश्वरांनी अतिशय बहार करून आत्मा व परमात्मा, जीव व शिव, ईश्वर व भक्त याचा एकत्वाचा सवद्य वर्णन केलेला आहे त्यांनी अनेक गरवा व समर्पक दृष्टान्त देऊन म्हटले आहे की, 'माझेया विस्तारलेपणा नावे । हें अशेष नोहे आघवें ? । जैसे दूध मुराले स्वभावें । तरि तेंचि दही ॥ का बीजचि जाहले तरू । अथवा भांगराचि अलंकार । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हे जग ॥ " ९५७ प्रीतिभग माझा केला पाडुरंगा । भक्तिरस सागा का जी तुम्हीं ॥ १ ॥ म्हणउनि काही न ठेवीं चि उरो । आलो वर्मावरी एकाएकीं ॥ २ ॥ न देखोचि काही परती माघारी । उरली ते उरी नाही मुळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आला अंतरासी खड । तरि माझें तोड खवळिले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- उरी-कमतरता, वर्मावरी-सूक्ष्म मुद्यावर अंतरासी-सवघास अर्थ - पांडुरंगा, या भक्तिरसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या प्रीतीचा भग केला आहे ना ? १ म्हणूनच मी आता कसलीच कमतरता न ठेवता, मी सूक्ष्म मुद्द्यावर येऊन तुमची वर्मे काढणार आहे २ तुमच्यापासून काही माघारे परतून येईल, असे मी पाहणारच नाही काही कमतरताही उरू देणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या-आमच्या सवघास असा हा खड पडला तर माझे तोंड मात्र खवळून जाईल ४ ९५८ लटिका ऐसा म्हणता देव । सदेहसा वाटतसे ॥ १ ॥ ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ २ ॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायी चपळत्वे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिका-खोटा, मोळा-रीत, भेंडोळा-गुंडाळे, ताळो-ताळमेळ अर्थ - हा देव खोटाच आहे की काय, असा संशय माझ्या मनात आलेला आहे १ याची सेवा करता करता हाच अनुभव मला आलेला आहे २ तुम्ही देवा, शून्याकारी आहात, व तसेच असण्याची तुमची रीत आहे; असा तुमच्या कीर्तीचा डका सर्वत्र गर्जत आहे तुमच्या कीर्तीचे हे भेंडोळे सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकाच ठिकाणी असूनही चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीत ताळमेळ बसत नाही ४ ९५९ जंशासाठीं तैसे हाये । हे बरवे कळलेसे ॥ १ ॥ उदास' तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्हीच ॥ २ ॥ ठका महाठक जोडा । जो धडपुडा लागासी ॥ ३ ॥ एकागीच भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वे ॥ ४ ॥ १ उदार
शब्दार्थ व टीपा :- वरवें-चांगले, धडकूडा-धडधडीत, प्रत्यक्ष अर्थ:- जो जसा असेल तसे आपण व्हावे, हे आम्हांस चांगले समजून आले आहे. १ नारायणा, तू जर उदास असशील, तर मीही तसाच उदास झालो आहे २ एका ठकास दुसरा महाठक भेटला, तसा तुमचा व आमचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी एकाकी होऊनच माझा जीव दिनधोक असल्याने या देवापाशी असा भांडत आहे. ४
९६० बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न घराच ॥ १ ॥ आतां काशासाठीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ २ ॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥ ३ ॥ तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव अर्थ :- देवा, मी तुमच्यासाठी अनेक प्रकारांनी काकुळतीस आलो आहे; पण तुम्ही मात्र यासंबंधी तुमच्या चित्तात काहीही आणलेले दिसत नाही. १ मग देवा, आता कशासाठी खोटो हाव मी माझ्या मनात वागवू ? २ देवा, तुमच्याआमच्यांत ताटातुटी झाली आहे. आता तुमच्यात व आमच्यात भेट होणार, ती केवळ तुमच्याविषयोच्या चिंतनानेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जिणे मनातील इच्छेमुळे मोठे लाजिरवाणे झाले आहे. ४
९६१ आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥ १ ॥ मढचापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ २ ॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मढघापाशी-प्रेताजवळ ? अर्थ :- एक आश्चर्याची गोष्ट घडलेली माझ्या मनात आलेली आहे. १ प्रेतापाशी बसून त्याच्या नाते- वाईकांनी केलेला शोक जसा व्यर्थ जातो, तसेच मी आजवर देवा, तुमचेपाशी करुणा भाकली तो फुकट गेली. २ एखादे खोटे कृत्य पाहून मग राग कसा येऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझ्या शब्दांना हा कसला शोध लागला ? ४
९६२ मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥ १ ॥ लटकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ २ ॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सफळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे स्वामिसेवा । येयें देवा काशाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संकोचों-संकोच धरू अर्थ :- मला कोणतीही वस्तू मागण्याची इच्छा नसल्यामुळे मी संकोच कोणत्या गोष्टीसाठी धरावा ? १ कुठल्याही खोट्या गोष्टीची मी स्तुती करणार नाही; कारण माझ्या मनात कोणतीच इच्छा नसते. २ जे हिशेबाने येईल त्याचा स्वीकार करावा, हे तर सर्वांनाच समजते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या ठिकाणी कसली स्वामीसेवा आहे ? ४
९६३ पाठवणें १ पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥ १ ॥ घडलें तें भेटीसीवें । दिसेल बरवें सफळां ॥ २ ॥
१ पाटवणे.
४३४ सार्थ तुकारामगाथा गुणदोष वृक्षाच्या फुलाफळात येतात ना ? मग याचा दाप कुणाकडे ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा निष्कर्ष असा की, आम्ही सर्व दवा, तुझ्यापासून निर्माण झालो असल्यामुळे तुमच्या-आमच्यात भिन्नता नसावी तुकावाची शिष्या बहिणाबाई हिने तर एका अभंगात या भूमिकेवरून विठ्ठलास विचारिले आह,' तुम्ही आम्ही सुखें होतो एके ठायीं । कोणते अन्यायीं सांपडलों ॥ तुझ्याचि हिताने वाढला संसार । आम्ही का रे दूर अन्तरलों ?" तुझ्याच इच्छेन हा संसार वाढला, मग तू स्वतंत्र, शुद्ध, मुक्त व मी मात्र बद्ध, पतित कसा ? असा हा प्रश्न आहे सर्व चराचर जगत व अव्यक्त ब्रह्मतत्त्व यांच्या या विशेष नात्यावर आधारला हा भक्तीचा विकास मराठी संतानी अतिशय गोड व लडिवाळ स्वरूपात रंगविला आह या त्याच्या मुत्सद्देपणास तत्त्वज्ञानाचे पाठबळ आहेच ' मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि ' मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सब जग विस्तारलेले आहे व माझ्या ठिकाणी ही सर्व भूते आहेत अशा अर्थाच्या गीतेतील श्लोकावर भाष्य करिताना ज्ञानेश्वरानी अतिशय वहार करून आत्मा व परमात्मा, जीव व शिव, ईश्वर व भक्त याचा एकत्वाचा संबंध वणन केलेला आहे त्यांनी अनेक सरस व समर्पक दृष्टान्त देऊन म्हटले आहे की, माझेया विस्तारलेपणा भावे । हे जगचि नोहे आघवे ? । जैसे दूध मुराले स्वभावे । तरि तेंचि दहीं ॥ का योजचि जाहले तरू । अथवा भांगराचि अलंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । ते हे जग ॥ ' ९५७ प्रीतिभंग माझा केला पाडुरंगा। भवितरस सांगा का जो तुम्हीं ॥ १ ॥ म्हणऊनि काही न ठेवींचि उरो । आलो वर्मावरी एकाएकीं ॥ २ ॥ न देखोचि काहीं परती माघारी । उरली ते उरी नाही मुळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आला अंतरासी खड । तरि माझें तोड खचळिले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उरी-कमतरता, वर्मावरी-सूक्ष्म मुद्यावर अंतरासी-संबंधास अर्थ - पांडुरंगा या भवितरसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या प्रीतीचा भग केला आहे ना ? १ म्हणूनच मी आता कसलीच कमतरता न ठेवता, मी सूक्ष्म मुद्यावर येऊन तुमची वर्म काढणार आहे २ तुमच्यापासून काही माघारे परतून येईल, असे मी पाहणारच नाही काही कमतरताही उरू देणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या-आमच्या संबंधास असा हा खड पडला तर माझे तोंड मात्र लबळून जाईल ४ ९५८ लटिका ऐसा म्हणता देव । संदेहसा वाटतसे ॥ १ ॥ ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ २ ॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायी चपळत्वे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिका-खोटा मोळा-रीत भेंडोळा-गुंडाळ ताळी-ताळमेळ अर्थ - हा देव खोटाच आहे की काय, असा संशय माझ्या मनात आलेला आहे १ याची सेवा करता करता हाच अनुभव मला आलेला आहे २ तुम्ही देवा, शून्याकारी आहात, व तसेच असण्याची तुमची रीत आहे, असा तुमच्या कीर्तीचा डंका सर्वत्र गर्जत आहे तुमच्या कीर्तीचे हे भेंडोळे सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकाच ठिकाणी असूनही चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीत ताळमेळ बसत नाही ४ ९५९ जेंशासाठीं तैंसे हवे । हे बरवे कळलेसे ॥ १ ॥ उदास¹ तू नारायणा । भी ही म्हणा तुम्हीच ॥ २ ॥ ठका महाठक जोडा । जो धडपुडा लागासी ॥ ३ ॥ एकागींच भाडे तुका । नाहीं धोका जीवित्वे ॥ ४ ॥ १ उदार
सार्थ तुकारामगाथा ४३५ शब्दार्थ व टीपा :- बरवें-चांगले, घडफुडा-धडधडीत, प्रत्यक्ष. अर्थ :- जो जसा असेल तसे आपण व्हावे, हे आम्हांस चांगले समजून आले आहे. १ नारायणा, तू जर उदास असशील, तर मीही तसाच उदास झालो आहे २ एका ठकास दुसरा महाठक भेटला, तसा तुमचा व आमचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी एकाकी होऊनच माझा जीव बिनधोक असल्याने या देवापाशी असा भांडत आहे. ४ ९६० बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न घराच ॥ १ ॥ आतां काशासाठीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ २ ॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चितनें ॥ ३ ॥ तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव अर्थ :- देवा, मी तुमच्यासाठी अनेक प्रकारांनी काकुळतीस आलो आहे; पण तुम्ही मात्र यासंबंधी तुमच्या चित्तात काहीही आणलेले दिसत नाही. १ मग देवा, आता कशासाठी खोटी हाव मी माझ्या मनात बाळगू ? २ देवा, तुमच्याआमच्यांत ताटातुटी झाले आहे. आता तुमच्यात व आमच्यात भेट होणार, ती केवळ तुमच्याविषयीच्या चिंतनानेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जिणे मनातील इच्छेमुळे मोठे लाजिरवाणे झाले आहे. ४ ९६१ आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥ १ ॥ मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ २ ॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मढ्यापाशी-प्रेताजवळ अर्थ :- एक आश्चर्याची गोष्ट घडलेली माझ्या मनात आलेली आहे. १ प्रेतापाशी बसून त्याच्या नाते- वाईकांनी केलेला शोक जसा व्यर्थ जातो, तशीच मी आजवर देवा, तुमचेपाशी करुणा भाकली ती फुकट गेली. २ एखाद्याचे खोटे कृत्य पाहून मग राग कसा येऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझ्या शब्दांना हा कसला शोध लावला ? ४ ९६२ मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥ १ ॥ 'लटफियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ २ ॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संकोचो-संकोच धरू अर्थ :- मला कोणतीही वस्तू मागण्याची इच्छा नसल्यामुळे मी संकोच कोणत्या गोष्टीसाठी धरावा ? १ कुठल्याही खोट्या गोष्टीची मी स्तुती करणार नाही; कारण माझ्या मनात कोणतीच इच्छा नसते. २ जे हिशेबाने येईल त्याचा स्वीकार करावा, हे तर सर्वांनाच समजते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या ठिकाणी कसली स्वामीसेवा आहे ? ४ ९६३ पाठवणें' पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥ १ ॥ घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सफळां ॥ २ ॥ १ पाटवणे.
४३६ सार्थ तुकारामगाथा न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥ ३ ॥ अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका १ साक्षीतें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पाठवणें-पायरीला. अर्थ :- देवाच्या देवळाच्या पायरीला नुसता स्पर्श करून, नमस्कार करून काय उपयोग ? त्याने उद्धार कसा होणार ? १ प्रत्यक्ष भेटीत जे सुख उभे राहील, तेच सर्वात चांगले शोभून दिसणारे आहे. २ जर एकमेकांची दृष्टादृष्टच झाली नाही, तर मग सर्व गोष्टी वरवरच्याच, कोरडयाच राहतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच मी अबोल झालो असून अंतःकरणात त्याच्या साक्षीने मौन धारण केले आहे. ४ ९६४ अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥ १ ॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ २ ॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥ ३ ॥ तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलेंसे प्रेम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अचळ-स्थिर, न चळणारे. अर्थ :- निर्भय असणारे असे हे एकच स्थान म्हणजे, या विठ्ठलाचे चरण होत १ म्हणूनच मी याचा विश्वास धरून याच्या पायांचा दास होऊन राहिलो आहे. २ या श्रीहरीच्या पायांची गोडी मला लागली, म्हणूनच माझी आवड पूर्ण झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कंठात या श्रीहरीचे नाम असून अंगात रोमारोमी या श्रीहरीचे प्रेम भरून राहिले आहे ४ ९६५ संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥ १ ॥ आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ २ ॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥ ३ ॥ तुका म्हणे कसां निवडा जी खरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संदेह-संशय, निरसे-दूर होईल, फिक्यासी-रुचीहीन, फिके असणाऱ्यास, फटवूं- फसवू, आळीपायीं-पायापाशी हट्ट अर्थ :- सर्व संशयाचे निरसन झाले, ते दूर झाले तरच चांगले रुचकर असते. जे फिके व रुचिहीन असते, त्याविषयी कुणासही आदर वाटत नाही कुणालाही ते आवडतही नाही. १ देवा, आता मला खोटी आशा दाखवून उगाच फसवू नका मी आता तुमच्याकडे वारंवार कुठे ये-जा करू ? २ आता तुमच्या लाभावाचून माझा जीव जरी गेला तरी काय संकट ओढवणार आहे ? मी वाचून तरी काय मोठे कार्य साधले जाणार आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पोरांनी आपल्या पायांशी हट्ट केला आहे, तो तुम्ही नीट कसास लावून पुरवावा, आमची निवड नीट करावी ४ ९६६ वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचाचि वाहो बहुतेक ॥ १ ॥ आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलागा काळ जितितसे ॥ २ ॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाहो-प्रवाह, निश्चळ-स्वस्थ अर्थ :- वाणीने वृथा बडबड पुष्कळ करण्यासारखी आहे; पण त्याप्रमाणे अनुभव मात्र दुर्लभ आहे. बहुतेक ठिकाणी आधीची जी चाल असेल, तिचाच मागोवा घेत जाण्याची रीत असते. १ अशा परिस्थितीत आम्ही स्वस्थ १ एका.
सार्थ तुकारामगाथा ४३७ इसे राहावे ? कारण आमच्या पाठीमागे एकसारखा काळ लागलेला आहे. तो आम्हास जिंकू पाहात आहे. २ केवळ पोट भरण्यासाठी परमार्थाचे व भक्तीचे ढोंग करून कसे चालेल ? त्यायोगे मूळ मुद्दलासच तोटा येईल ना. ३ तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुमच्या अभय अशा वरदहस्ताने मी माझ्या मनास जागृत ठेवणे हेच चांगले होय. ४ १६७ उगॅचि हे मन राहाते निश्चळ । तरि कां तळमळ साट' होती ॥ १ ॥ काय तुमचीं नेणो कवतुक विदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ २ ॥ नानाछंदें आम्हां नाचयावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साट-एकसारखी, विदाने-कौशल्ये अर्थ :- माझे मन उगेच राहून स्थिर होत असूनही मग ही तळमळ एकसारखी का होत आहे हो ? १ तुमची कौशल्ये काय व कशी आहेत, हे काही ध्यानात येत नाही तुम्ही सर्वोत्तमपणाने क्रीडा करीत असता २ देवा, तुम्ही नाना छंद करून आम्हा जीवांना नाना प्रकारांनी नाचविता, आमच्या हावा भलत्यासलत्या वाढविता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या चेष्टा करीत आहात. ४ १६८ आम्ही बळकट जालो फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥ १ ॥ जाले तेव्हां जाले मागील ते मागें । आतां धर्मलागे ठावो जालीं ॥ २ ॥ तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध युद्ध व्हावें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- फिराउनी-फिरून, गोऊ-गुंतवू अर्थ - देवा, आम्ही फिरून आता मोठे बळकट झालो आहोत. आम्हांस सांभाळण्याचे किंवा आमच्यावर कृपा करण्याचे जे ब्रीद तुम्ही घेतले आहे, त्यात तुम्हास गुंतवून टाकू १ यापूर्वी काय झाले असेल ते असो, आता मात्र तुला पकडण्याची सर्व धर्मे आम्हास माहीत झाली आहेत २ देवा, तुझ्या सर्व चेष्टाचा सबंध तोडण्यासाठीच आम्ही शुद्ध भावाने तत्पर झालेले आहोत. तुम्हीही आमच्यासारख्या शुद्धापाशी शुद्धयुद्ध व्हावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हास आत्मस्वरूपात येण्याची जशी सोय आहे, तशीच ती तुम्हासही असेलच ४ १६९ तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसे ॥ १ ॥ कासया घातला लावणी उद्धार । ठेवा करकर बाह्यनियां ॥ २ ॥ सुटो नये ऐसे कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही समाग्य जी देवा । माझा तुम्हा केवा काय आला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर, नुपेक्षाल-अव्हेर करणार नाही, करकर-कटकट, बाह्यनियां-दूर करून, निरुतें-खरोखर, केवा-पर्वा, फिकीर, अवघड अर्थ:- देवा, तुम्ही माझा अव्हेर कधीही करणार नाही, अशीच खात्री मला आहे मला तुम्ही, फार अधीर आहे मी, असेच समजता. १ देवा, माझ्या उद्धाराची गोष्ट एवढ्या लावणीवर का हो टाकली आहे ? एकदा उद्धार करून ही कटकट कायमची मिटवा ना. २ खरोखर ही कटकट काही मागची सुटणार नाही, असे तुम्हांस कळते तर मग पुनः पुनः अशी आळवणी करून का घेता हो ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मोठे भाग्यवान आहात, तुम्हांला माझ्यासारख्याच्या उद्धाराचे एवढे अवघड का वाटावे ? ४ १ साठ.
४३८ सार्थ तुकारामगाथा ९७० तुम्हा होईल देवा पडिला विसर । आम्हीं ते उत्तर यत्न केलें ॥ १ ॥ पतितपावन ब्रीद मिरविसी । याचा काय देसी झाडा साग ॥ २ ॥ आहाच मी नव्हें अर्थाचे भुकेले । नलत्या एका बोले वारेन त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे देह देईन साडणे । सहित अभिमाने ओवाळूनि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - झाडा-हिशेब, अर्थाचे-सपत्तीचा वारेन-दूर करता येईल अर्थ - देवा, आमचा विसरच तुम्हास पडलेला दिसतो आम्ही तर उद्धारासाठी एकसारखी बडबड तुमच्यासमोर केलेली आहे १ पतितपावन असे ब्रीद देवा, तू मिरवितोस, मग माझा जर उद्धार केला नाहीस, तर या ब्रीदाचा हिशेब कसा देशील ? २ उगाच मी आपला काही सपत्तीचा भुकेलेला नाही तुम्हास भलत्या सलत्या बोलाने मला दूर करता येईल असे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा देह मी सर्व अभिमानासहित तुमच्यावरून ओवाळून टाकीन ४ ९७१ जडलो अगाअंगीं । मग ठेवी प्रसगो । कांहीं उरीजोगी । लोकी आहे पुरती ॥ १ ॥ ठेवी निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सापडली संधी । मग बळ कोणासी ॥ २ ॥ गळा बाधेन पायीं । हालो नेदी ठायिचा ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे ठावे । तुम्ही' असा जी वरचे । वोभाटाची सवे । मुळीहुनी विठोबा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उरीजोगी-शिल्लक राहील असा सवे-सवय अर्थ - देवा, मी तुमच्या अंगाला येऊनच जडलो आहे अशा या प्रसंगी तुमचा मोठेपणा शिल्लक राहील, असा काही मी ठेवणार नाही तुमचा व आमचा सबध कसा आहे याविषयीची कीर्ती लोकात पूर्णपणे आहेच १ आमच्या बुद्धीने अजून धीर धरला आहे, तोपर्यंतच देवा, तुम्ही पूर्णपणे विचार करा मग सधी सापडल्यावर आम्ही तुला धरून ठेवले तर, बळ कुणाचे मोठे आहे हे ध्यानात येईल २ अशा वेळी माझा गळा आपल्या पायाशी बाधेन, मग तुम्हाला जाग्यावरून काही हालता यायचे नाही यावेळी तुमची पुरती फजीती केल्याशिवाय निवाडा होईल असे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्हास पुरतेच ठाऊक आहात आपल्या दारात आलेल्या याचकाला असेच ओरडत ठेवण्याची सवयच पहिल्यापासून तुम्हाला आहे ४ ९७२ आम्ही शक्तिहीने । कैसे कराल ते नेणे । लिगाडाच्या गुणें । लोळमला राहिलो ॥ १ ॥ माझें मज देईं देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ २ ॥ नाहीं गळा पडलो झोड । तुमचे तेचि माझें तोड । चोघा चार खड । लायणी हे अनुचित ॥ ३ ॥ नाही येत बळा । आता तुम्हासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पाया लागतो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लिगाडाच्या-कटकटीच्या, झोड-निलाजरा, दांडगा अर्थ - देवा, आम्ही तर शक्तीहीन आहोत आमचा उद्धार तुम्ही कसा करणार आहात, ते काही समजत नाही तुम्हाला स्वतःपाठीमागे अशीच सारखी कटकट ठेवण्याची सवयच असल्यामुळे, मी असा कृपेशिवाय खोळंबून राहिलो आहे १ देवा, मी माझा जो ठेवा तुमच्याजवळ ठेविला आहे, तो मला परत द्या ना मी काही आगली अधिक मिळावे म्हणून काही हाव धरीत नाही २ मी एखादा दांडगा असून तुमच्या गळ्यात भलेच पडलो आहे १ आम्हा
असे नव्हे तुमचे व माझे बोलणे एकसारखेच असल्याने दोघांना बोलावून दोघांच्या भांडणाचा निकाल लावून टाका ना एकदाचा हे काम लावणीवर टाकणे उचित नाही देवा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी काही आता निकरावर येत नाही तुमच्या पायावर मी माझे डोके ठेविले आहे, ते आणून माझी मुक्तता करा एवढीच विनंती आहे ४ ९७३ काय कृपेविण घालावे साकडें । निश्चिती निवाडें कोण्या एका ॥ १ ॥ आहो तैंसी पुढें असो दीनपणे । वेचूनि वचने करुणेची ॥ २ ॥ धरू भय आता काय वाहों चिंता । काय करु आता आप्तपण ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साकडें-संकट अर्थ - देवा, तुम्ही मजवर कृपा केलेली नाही म्हणून काय मी तुम्हास संकटात घालावे ? देवा, मी निश्चित असावे, असा कोणताही एखादा निवाडा तुम्ही केलेला नाही १ देवा, यापुढेही आम्ही पूर्वी होतो तसेच दीन वृत्तीने राहू करुणेची वचने तुमच्यासमोर बोलत राहू २ आता कसले भय धरून मनात चिंता वाहू ? आता आप्तपणाच्या संबंधास तरी काय करावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जीव भावभक्तीच्या शिवाय आहोत, म्हणूनच देव आमच्यापासून दूर झाला आहे ४ ९७४ नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज का नारायण दुरी जाला ॥ १ ॥ अशंकितीं मनें करों आळवण । नाहीं समाधान निश्चितीचे ॥ २ ॥ दासाचा विसर हे तो अनुचित । असे¹ सर्व नीत पायापाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हा लाज येत नाहीं । आम्हा चिंताडोहीं बुडविता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुरी-दूर अशंकितें-संशयित होऊन अर्थ - शास्त्रवचनांची अथवा साधुसंतांची मर्यादा मी अजून कधी ओलांडली नाही मग हा नारायण मला एवढा दूर का बरे झाला आहे ? १ याच संशयित मनाने मी या देवाची प्रार्थना करीत आहे, पण माझ्या मनाच्या ठिकाणी चिंतारहित असे समाधान नाही २ देवा, तुला तुझ्या दासाचा विसर पडला आहे हे तर फारच अनुचित दिसते तुमच्याजवळ तर सर्व नीती आहे असे असून तुम्ही असे वागता ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हाला अशा प्रकारे नाना प्रकारच्या चिंताच्या डोहामध्ये बुडविताना तुम्हाला काही लाज वाटत नाही ? ४ ९७५ जीव जायवरी सांडी करी माता । हे तो आश्चर्यता बाळकावी ॥ १ ॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जाले ॥ २ ॥ क्षणक्षणा माझा न घ्यावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल फटवेचि तें तें होय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडी-त्याग फल फटवेचि-फोलकटाप्रमाण अर्थ - एखाद्या मुलाचा प्राण जाईपर्यंत त्याची आई त्याचा त्याग करते, हे एक मोठे आश्चर्यच आहे १ देवा, तुम्ही दुर्बळच आहात, काय ? मग आम्ही जे सांगतो आहोत, ते तुम्ही नीट कानानी का ऐकत नाही ? तुमच्या ठिकाणी काय कमीपणा निर्माण झाला की काय हो ? २ क्षणाक्षणास आमचा सांभाळ तुम्ही करूच नये, अशा दुर्दैवाचा काळ मोठा विपरीत आलेला दिसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमच्या बोलण्यास काही रुचीच नाही, असे झाले आहे फोलकटाप्रमाणे ते व्यर्थ होत आहे ४ १ असो
४४० सार्थ तुकारामगाथा ९७६ म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥ १ ॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मीच माझ्या वेचें अट्टाहासें ॥ २ ॥ कासयानें गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वांचुनिया ॥ ३ ॥ तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विचारावें-विचार करावा अर्थ :- देवा, मी तुमचा दास असून नसल्यासारखा झालो आहे. अनुभवानेच हे सर्व मी बोलतो आहे स्वामीपुढे. १ देवा, मी तुमच्यापाशी एवढे बोलतो; तर तुम्ही उत्तर म्हणून एका शब्दाने का बोलत नाही माझ्याशी ? मीच मात्र हट्टाने सारखी बडबड करीत आहे. २ देवा, तुमच्याबद्दल गोडी निर्माण होऊन तुमच्या- विषयी विश्वास कसा वाटेल आम्हांस ? कारण तुमच्याआमच्यामध्ये प्रीतीचा थोडाही भाव दिसत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अरे चतुरांच्यांत चतुर असणाऱ्या ईश्वरा, तूच तुझ्या मनात एकदा याचा विचार करून पाहावा ना. ४ ९७७ काय आतां आम्हीं पोटचि भरावें । जग चाळवावें भक्त म्हण ॥ १ ॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ २ ॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥ ३ ॥ तुका म्हणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाळवावे-फसवावे, गुंपोनि-गुंतून अर्थ - देवा, आता तुझे भक्त म्हणून आम्ही ढोंगीपणाने लोकांना फसवून काय नुसते पोटच भरावे की काय ? १ असाच तुमचा विचार असेल तर, तो आम्हांस सांगा ना एकदाचा देवा, आम्ही फारच कासावीस झालों आहोत. २ अक्षरांची कशी तरी जोडणी करून आम्ही रूढीप्रमाणे कवित्व करूनच आयुष्य घालवावे की काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, की देवा, आम्ही आमचा घात करून नेहमीच्या दुकानदारीतच गुंतून असावे की काय ? ४ ९७८ वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥ १ ॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ २ ॥ द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्तावळें । लडिवाळें राखावीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दावा-दाखवा अर्थ :- देवा, आता तुमच्या प्राप्तीचे खरे वर्म काय आहे, ते तरी दाखवा ना. कारण मी खरे काय आहे ते जाणीत नाही. १ अनेक इंद्रियांच्या सुखांच्या रंगात माझी वृत्ती हीनदीन झाल्यामुळे देवा, मी तुला शरण आलो आहे २ देवा, तुम्हीच जर मला धीर द्याल, तर तुमच्या पायी माझे मन स्थिर होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमच्या सत्तेच्या बळाने माझ्यासारख्या लाडक्या बाळांचे रक्षण करावे ४ ९७९ सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥ १ ॥ वांयां मज चुकूर करा । विश्वंभरा विनोदें ॥ २ ॥ आवडीच्या करा ऐसें । अंतर्यासीं जाणतसां ॥ ३ ॥ तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- चुकूर-गोधळलेला.
सार्थ तुकारामगाथा ४४१ अर्थ - देवा, तुमच्या बोलाची आवड मला काय असते, ते काय सांगायाला हवे ? १ सर्व विश्वात भरून असणाऱ्या देवा, विनोदाने मला गोधळलेल्या मनस्थितीत कृपा करून घालू नका २ देवा, तुम्ही नत करणात निवास करीत असल्यामुळे सर्व काही जाणताच, तुम्हास जसे आवडेल तसे देवा, तुम्ही करा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मग मी मोठ्या समाधानाने मनापासून मोकळा होईन ४ ९८० निर्धाराचे अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥ १ ॥ बैसलिया भाव पायीं । बरा तईं नाचेन ॥ २ ॥ स्वामी फळे सावधान । तरि मन उल्हासे ॥ ३ ॥ तुका म्हणे आश्वासावे । प्रेम द्यावे विठ्ठले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तईं-तव्हा अर्थ - कोणतीही गोष्ट निर्धाराने करणे, हेच गोड असून त्याचेच कोडकौतुक होते १ देवा तुझ्या पायांशी एकदा माझा भाव निश्चित झाला की मग मी त्यानुसार सुंदर नृत्य करीन २ माझा स्वामी मोठ्या साव- धतेने मजकडे लक्ष देत आहे, असे दिसल्यास मला मनात मोठाच उल्हास वाटेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला नीट आश्वासन देऊन तुजविषयीचे प्रेमतुझ द्यावे ४ ९८१ जाली तडातोडी । अवघीं पडिलों¹ उघडीं ॥ १ ॥ नव्हो कोणाचीच काहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ २ ॥ पाथपला सवसार । मोडली बैसण्याची थार ॥ ३ ॥ आता म्हणे तुका । देवा अंतरें राखो नका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाहीं-प्रवाहात, पाथपला-नष्ट झाला, थार-स्थान अर्थ - देवा, आता आमची व लौकिक गोष्टींची ताटातूट झाली आहे त्यामुळे आम्ही आता उघडे पडलो आहोत १ आता आमचा व कुणाचाच संबंध नाही, अशी स्थिती प्राप्त झाली असून आम्ही तुझ्या भक्तिमार्गाच्या प्रवाहात सापडलो आहोत २ आमची आता संसारावरील आस्था संपल्यामुळे तो जवळजवळ नष्टच झाला आहे हा संसार ज्या आसक्तीवर उभा राहतो, ती आसक्तीची बैठकच मोडून गेल्यासारखी झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता तुम्ही मला आपल्यापासून दूर अंतरावर ठेवू नका ४ ९८२ आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥ १ ॥ तुम्हापाशी काय उणें । काय वेचे समाधाने ॥ २ ॥ सेवेच्या अभिलाषें । मन बहु जाले पिसे ॥ ३ ॥ अरे भक्तपराधीना । तुका म्हणे नारायणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अभिलाषें-इच्छेने, पिसे-वेडे, भक्तपराधीना-भक्ताच्या स्वाधीन असणाऱ्या देवा अर्थ - देवा, आता मला तुमच्याच पायाचा आश्रय मिळावा अशी मी इच्छा करीत आहे १ खरे पाहता तुमच्यापाशी काय कमी आहे ? माझे थोडेवसे समाधान केले तर काय कमी पडणार आहे तुम्हास ? २ देवा, तुमच्या सेवेच्या इच्छेने माझे मन येडे बनले आहे ३ अरे भक्ताच्या स्वाधीन असणाऱ्या देवा, नारायणा, तू माझी अवस्था जाणून माझ्यावर कृपा कर ना ४ ९८३ तुमचा तुम्हीं² केला गोवा । आता चुकवितां देवा ॥ १ ॥ फंसें सरे चाळवणे । केले फाशांला शाहाणे ॥ २ ॥ १ पडिली, २ आम्ही तु गा ५६
४४२ सार्थ तुकारामगाथा फासया रूपा । नाचा आलेति गा बापा ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । न सरे हवाले घालिता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गोवा-गुतागुत, हवाले घालिता-हवाले देण्याने अर्थ - देवा, हा व्यक्त होण्याचा तुमचा तुम्ही खेळ करून गुतागुत केलीत, आणि आता चुकाचुकी करीत आहात ? अशी फसवणूक आता कशी चालेल हो ? आम्हाला जन्मास घालून असे शहाणे तरी कशास केले ? २ देवा, तुम्ही पतितपावन, भक्तवत्सल, करुणासागर इत्यादी नामारूपास तरी का हो आलात ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता नुसते हवाले देऊन भागणार नाही माझ्यावर कृपा केलीच पाहिजे ४ ९८४ माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥ १ ॥ मी का पडेन निराळा । ऐसा साडूनि सोहळा ॥ २ ॥ आता अनारिसा । येथें न व्हावे सहसा ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - एकविध-एकनिष्ठ, अनारिसा-वेगळे अर्थ - देवा, माझी ही भक्ती भोळीभावडी असली तरी, ती एकनिष्ठ व भावाने बळकट अशी आहे, १ अशा प्रकारचा भवतीचा सोहळा सोडून मी काही निराळा होणार नाही २ आता या ठिकाणी वेगळे होणे सहसा जमणारे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आपले पाय एकमेकास जुळवून आमच्यासमोर उगेच उभे राहावे, आम्हास त्याच्यावर मस्तक ठेवायचे आहे ४ ९८५ आहे तरि सत्ता । ऐशा करितो वारता ॥ १ ॥ अगसगाची उत्तरे । सलगीसेवेने लेकरे ॥ २ ॥ तरी निकटवासें । असो आशकेच्या नासें ॥ ३ ॥ तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैंची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारता-वार्ता बोलणी, अगसगाची-जिव्हाळ्याने, आशकेच्या नासे-शकाकुशका टाकून अर्थ - देवा, आमची तुमच्यावर थोडीबहुत सत्ता आहे, म्हणूनच अशी धिटाईची बोलणी मी करीत आहे १ मुलालेकराचे धनी आम्हीही असल्याने विशेष प्रकारच्या जिव्हाळ्याने व सलगीने आम्ही तुमच्याशी लडिवाळ बोलणी करीत असतो. २ तरी मनातील सर्व शंकाकुशंका काढून टाकून आम्ही नेहमी तुमच्याजवळच असू ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच सानिध्याची मला मोठी रुची आहे यात भिन्नता नाही ४ ९८६ काळ सारावा चिंतने । एकांतवासी गंगास्नाने । देवाचे पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या १ ॥ १ ॥ युक्त आहार विहार । नेम इंद्रियाचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ २ ॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया २ जतन । हे उपाय लाभाचे ॥ ३ ॥ देह समर्पिजे देवा । भार काहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चिंतनें-ईश्वराच्या नामस्मरणात, विहार-विश्रांती, वासर-स्वच्छंदी अर्थ - मनुष्याने आपले आयुष्य ईश्वराच्या नामस्मरणात घालवावे एकान्तवासात राहून गंगास्नाने पवित्र व्हावे मनोभाव देवाचे पूजन करावे तुळशीस प्रदक्षिणा घालाव्यात १ विधियुक्त व उचित असा आहार घेऊन आवश्यक तेवढीच विश्रांती घ्यावी इंद्रियसुखाना नियमितता हेच सुखी आयुष्याचे सार आहे उगाच स्वच्छंदीपणाचे वागणे नसावे, फार झोप नसावी, फार बडबड नसावी २ परमार्थविचार हेच महाधन मानून देवाचे चरण जोडावेत व एकदा जोडलेले हे चरण जपावेत कसे, यासंबंधीचे उपाय शोधणे हेच लाभाचे होण्यासारखे आहे ३ १ तुळशीची, २ करावया
देह परमेश्वरात समर्पित केलेला असावा. स्वतःच्या शिरावर मोठेपणाचे कसलाही भार घेऊ नये, यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात आनंदीआनंद निर्माण होईल ४ विवरण - तुकारामबुवांच्या अभंगात कित्येक वेळा परस्परविरोधी वचने असल्यासारखी वाटतात. संसार करावा की करू नये ? मुलामाणसांबद्दल प्रेमाने विनी असावीत ? घरदार मोडावयास हवे काय ? धनसंपत्तीचा वीट विटौ मानायचा ? यासारख्या प्रश्नाचा विचार करताना मोठीच सावधगिरी बाळगून, संदर्भ पाहून निर्णय घ्यावयास हवा. ज्यांना खरोखरीच परमार्थाचे गुह्य शोधावयाचे आहे, आत्मतत्त्वाची अनुभूती घ्यावयाची आहे, अलौकिकाचा साक्षात्कार करवून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी प्रखर वैराग्यादी साधने आवश्यक आहेत परंतु सर्व- सामान्य सांसारिक स्त्री-पुरुषांना तुकाराम महाराजांनी कोणता उपदेश केलेला आहे ? या प्रश्नाचे उत्तर या अभंगात आहे. प्रपंच व परमार्थ हे एकाच वेळी एकाच माणसास जमणार नाहीत, असही तुकोबा मधून-मधून म्हणत असले तरी सांसारिकांनी परमार्थविचार अगदीच मोडावा असे त्यांना कधीही सांगितले नाही. उलट भलत्यासलत्याच अधारी मार्गाच्या साधनांची त्यांनी अवहेलना करून नामसंकीर्तनाचे, भजनमात्राचे सर्वश्रेष्ठ साधन उपलब्ध करून दिले. जे जे फुटेर ते ते प्रभुसत्तेतूनच, अशी मनाची धारणा झाल्यावर मग संसाराचे रूपही पालटने यासाठी अगदी साधे आचार- विचार तुकाराम महाराजांनी या अभंगात स्पष्टपणे सांगितले आहेत. अखंड परमेश्वराचे अनुसंधान असावे, एकान्नवान्न सेवावा, गंगास्नान करावे, देवाचे पूजन, तुळशीला प्रद- क्षिणा, युक्त असा आहार, नियमित विश्रांती, इंद्रियसुखांची नियमित प्राप्ती, परमार्थ हेच महाधन मानावे, दयाचे धरण सोडू नये, असे अगदी साधे सोपे आचारविचार बुवांनी या अभंगात सांगितलेले आहेत. यात आचरावयास कठीण अशी साधने नाहीत, की प्रदीर्घ व्रतवैकल्यांची यातायात नाही, यात कर्मकांड नाही, की गुंतागुंतीचे विधि- निषेध नाहीत. अतिशय साध्या अशा आचरणमार्गाचा निदर्शक असा हा अभंग नित्य स्मरणीय असाच आहे.
९८७ मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे ॥ १ ॥ मेले जित असो निजोनिया १ जागे । जो जो जें जें मागे ते ते देऊ ॥ २ ॥ भले तरि देऊ गांडीची लगोटी । नाठयाळाचि गांठी देऊ माथा ॥ ३ ॥ मायबापाहूनि बहु मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥ ४ ॥ अमृत तें काय गोड आम्हापुढें । विष तें बापुडें कडू किती ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचे पुरे कोड त्याचेपरि ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - नाठयाळा-दुष्टाच्या. अर्थ - आम्ही विष्णुदास कसे आहोत ? तर प्रसंगी मेणाहूनही आम्ही मऊ आहोत, आणि प्रसंग पडला तर इंद्राच्या वज्रासही आम्ही भेदून टाकू, अशी आमची शक्ती आहे. १. आम्ही देहबुद्धीन मेलेलो असून आत्मतत्त्वाच्या जाणिवेने जिवंत आहोत. आम्ही देहबुद्धीच्या दृष्टीने झोपलेले असून आत्मतत्त्वाच्या जाणिवेने जागेच आहोत. २. जे कुणी आम्हास चांगले भेटतील, त्यांना आम्ही कमरेची लंगोटीही देऊन टाकू, पण जर कुणी नाठाळ व दुष्ट भेटतील, तर त्याच्या डोक्यात काठी आम्ही मारायला मागेपुढे पाहणार नाही. ३. आम्ही मायबापापेक्षाही पुष्कळच दयाळू व कृपावंत आहोत, पण प्रसंग पडला तर आम्ही शत्रूपेक्षाही घातपात करू शकतो. ४. आमच्यापुढे अमृताची गोडी अशी किती असणार ? आणि आम्हात्समोर विष तर बिचारे दोन होऊन उभे असते. ५. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्वच बाजूनी पूर्णपणे गोडच आहोत ज्याची जशी इच्छा असेल, तशी आमच्याकडून ती सफल होईल. ६. विवरण - तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा हा एक अभंग आहे. विष्णुदास किंवा विठ्ठलभक्त कसे असतात, याचे मोठे बोलके शब्दचित्र तुकाराबांनी यात काढले आहे. आम्ही विष्णुदास लोण्याहून मऊ आहात, कमरेची लंगोटीही कुणी मागितली तर ती देऊ मायबापाहूनही आम्ही दयावंत आहात, अमृतापक्षा आमची गाठी अधिक आहे वगैरे वर्णन संताचे, किंवा विठ्ठलभक्ताच सहज समजण्यासारखे आहे. १ निजेलिया
४४४ सार्थ तुकारामगाथा पण विष्णुदासाच्या स्वभावाची जी दुसरी एक बाजू या अभंगात दर्शविलेली आहे, ती अधिक महत्त्वाची आहे किंबहुना ही दुसरी बाजू जेवढी भक्कम, तेवढी पहिलीची सुरक्षितता अधिक अस मानावे लागते साधुपुरुषाच्या रक्षणाची पहिली पायरी म्हणजे दुष्टांचा नाश, असा निर्वाळा गीतेनेच दिलेला आहे तुकाराम महाराजांनीही दयेची व्याख्या सांगताना 'दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणिक निर्दाळण कंटकाचे' असेच आग्रहाने म्हटलेले बाहे दुष्ट लोकांचा नाश हाही एक दयेचाच भाग मानणे क्रमप्राप्त असते, आणि याच हेतूस ध्यानात धरून या अभंगात बुवा म्हणत आहेत, आम्ही कठिण अशा इंद्राच्या वज्रासही फोडून टाकू, नाठाळ माणसाच्या डोक्यावर आम्ही काठी हाणू, शत्रू सुद्धा करणार नाही अस घातपात आम्ही करू आमच्या पुढे बडू विषाची काय किंमत ? अशा भाषेतील अति शयोक्ती जरी सोडून दिली तरी मेणाहून मऊ असणाऱ्या विष्णुदासाच्या स्वभावातीलही कणखर बाजू ध्यानात येण्या- सारखी आहे याच वृत्तीस शोभणार असा आणखी एक अभंग 'पाया जाला नारु' (क्रमांक ४३७८) या ओळीन सुरू होणारा आहे त्यातील निष्कर्षही अर्थाभासी तो अधम' असाच आहे देव्हाऱ्यावर जर विंचू आला तर त्याची पूजा कशी करावी ? या प्रश्नाचे उत्तर देताना बुवानी म्हटले बाहे, 'तेथे पैजारेचे काम यावरून संताच्या भवाळ पणातील काठिण्य प्रसंगी किती प्रखर असते त ध्यानात येण्यासारखे आहे. ९८८ गाढवाचे ताने । पालटले क्षणक्षणे ॥ १ ॥ तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ २ ॥ उपजता बरे दिसे । रूप वाढता ते नासे ॥ ३ ॥ तुका म्हणे भुकेले वेळे । वेळ अयेळ न कळे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - ताने-मूल पिल्लू, उपजता-जन्मास येताच अर्थ - गाढवाचे लहान पिल्लू किती मोजिरवाणे दिसते पण त्याची वाढ होत असताना मात्र त्याचे गुण क्षणाक्षणाला पालटलेले दिसतात ते अवगुणाकडे झुकते १ तशाच प्रकारे अधम माणसाचे गुण असतात त्याचे मन एकचित्ताने कुठेच स्थिर राहात नाही २ गाढवाचे पिल्लू जन्माला आल्यावर फार चांगले दिसते पण वय वाढल्यावर त्याचे रूप बिघडून जाते त्याचे अवगुण प्रकट होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे अवगुणी गाढव वेळी अवेळी उगाच भुकत असते अधम माणसाचेही असेच असते ४ ९८९ विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोवळा ॥ १ ॥ गद्य पद्य कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीनचि बुद्धि करुनी ठेवा ॥ २ ॥ विचाराचे काही करावे स्वहित । पापपुण्यातीत भांडवल ॥ ३ ॥ तुका म्हणे न लगे जावे यमातरा । विश्व विश्वंभरा सारिखँचि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपाधी-अडचण अर्थ - दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याची स्त्री याचा विटाळ मानून जो तेथून दूर राहतो, तोच खरा सोवळा म्हणावा १ काही गद्य अथवा पद्य ग्रंथाचे पठण करून वृथा अडचण निर्माण न करिता आपली बुद्धी आपल्याच स्वाधीन करून ठेवावी २ परमार्थविचार करून काही स्वहित साधावे व पापपुण्याच्या पलीकडे असणाऱ्या आत्म- सुखाचे भांडवल प्राप्त करून घ्यावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सुखासाठी रानावनात जाण्याची जरूरी नाही, कारण सबंध विश्वात भरून राहिलेला तो विश्वंभर व त्यापासून निर्माण झालेले हे चराचर विश्व, यात भेद नाही तोच सर्वत्र सामावून राहिलेला आहे ४ ९९० कल्पतरु रया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया १ ॥ १ ॥ उडड त्या गाई म्हंसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥ २ ॥ तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवे भेटी थोर पुण्य ॥ ३ ॥ १ इच्छी तया
सार्थ तुकारामगाथा ४४५ शब्दार्थ व टीपा :- रया-रुईची झाडे, कामधेनु-इच्छिलेली वस्तू देणाऱ्या गाई अर्थ :- रुईची झाडे, बाभळींची झाडे हे काही कल्पतरु नव्हेत. त्यांच्यापासून इच्छिलेले फळ कधी प्राप्त होणार नाही. १ सर्वसामान्य अशा गाई, म्हशी व शेळ्या पुष्कळच आहेत. परंतु मनात इच्छिलेली वस्तू देणाऱ्या कामधेनू मात्र यांच्याहून वेगळ्याच आहेत. २ तुकाराम महाराज म्हणतात, देव आपणांस ज्या ज्या गोष्टी दाखवील त्यांची भेट डोळघांनी घेणे, यातच फार मोठे पुण्य आहे असे समजावे. ३ ९९१ जळो प्रेमा तैसा रंग । जाय उडोनि' पतंग ॥ १ ॥ सासूसार्टी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ २ ॥ मंद मुखाँचा फोवळा । भाव अंतरीं निराळा ॥ ३ ॥ जैसीं वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥ ४ ॥ बक ध्यान धरी । सोंग करुनि² मासे मारी ॥ ५ ॥ तुका म्हणे सर्प डोले । तैसा कयेमाजी खुले ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पतंग-फुलपाखराची एक जात, मंद-लबाड, कपटी, वृंदावनकांती-कडू वृंदावनाचे फळ, बक-बगळा. अर्थ :- फुलपाखरांच्या एका जातीस, पतंगास दिव्याविषयी मोठेच प्रेम असते. या प्रेमापोटी तो दिव्यावर झडप घालून जळून जातो. अशा प्रेमाच्या रंगास आग लागो. १ सासू मरण पावली म्हणजे सून रडत असते, पण तिच्या अंतरंगातील भाव मात्र निराळाच असतो. २ कपटी मनुष्य हा चेहऱ्यावरून फार चांगला दिसतो, कोमलतेने बोलतो, पण त्याच्या मनातील भाव मात्र निराळाच असतो. ३ कडू वृंदावनाच्या फळाची वरवरची कांती किती शोभिवंत असते. पण आतून ते कडूच असल्यामुळे हातातही धरू नये ते. ४ बगळा नदीच्या काठी डोळे मिटून ध्यान केल्यासारखा उभा राहतो; पण ते सर्व सोंग असते. संधी सापडताच मासे पकडण्यासाठी तो टपलेला असतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, गारुड्याच्या पुंगीच्या नादाने सर्प जसा डोलतो, तसाच हा वरवर भाविकपणा दाखविणारा मनुष्य कथेमध्ये डुलत असतो; पण त्याचे हे करणे खरे नसते. ६ ९९२ वेशा नाहीं बोल अवगुण दूपीले । ऐशा बोला भले ह्मणें क्षोभा ॥ १ ॥ कोण नेणे अन्न जीयाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ २ ॥ सोने शुध्द नेणे कोण हा विचार । डांकें हीनयर केलें त्यासी ॥ ३ ॥ याती शुध्द परि अधम लक्षण । वायां गेलें तेणें सोंगें ही तें ॥ ४ ॥ तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार याहो ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेशा-वेषास, पोषाखास, ह्मणे क्षोभा-राग मानू नका, डांके-सराफानी, सोनारांनी, हीनवर-हिणकस, मंडण-वरवरची शोभा. अर्थ :- साधू लोकांनी घेतलेल्या वेषास मी बोल देत नसून त्यांच्या अंगच्या अवगुणांना मात्र दोष देत आहे. माझ्या या बोलण्यामुळे भल्या माणसांनो, तुम्ही रागावू नये. १ सर्व वस्तुमात्रांचे व प्राण्यांचे जीवन अन्न हेच आहे, असे कोण जाणीत नाही? पण त्यात विष कालविले गेले असेल तर सर्वच अन्न विषमय होऊन सर्वांनाच घातककारक होईल ना. २ सोने हे शुद्ध व चांगलेच असते, असे कोण जाणीत नाही? पण सोनारानी मात्र त्यात हीन धातूंचे मिश्रण करून ते हीन केलेले असते. ३ एखाद्याची जात जरी शुद्ध असली, तरी तो अधमाच्या लक्षणांनी वायाच गेल्यासारखी असते. शुद्धत्वाचेही सोंग मग वायाच जाते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, शत्रूचा नाश करून विजय संपादन करणारा तोच शूर होय. तोच मानसन्मानास योग्य होय. पण इतरांनी अंगावर सैनिकाची वस्त्रे पांघरून शोभा वाढविण्याचा प्रयत्न केला तरी, ते केवळ ओझेच आहे असे मानणे भाग आहे. ५ १ भुलोनि, २ धरूनि.
४४६ सार्थ तुकारामगाथा १९३ अणुरणीया' थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ १ ॥ गिळुनि सांडिले कळिवर । भव भ्रमाचा आकार ॥ २ ॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । उरलों उपकारापुरता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अणुरणीया-अणुरेणूपेक्षाही, थोकडा-सूक्ष्म, त्रिपुटी-ज्ञेय ज्ञाता, ज्ञान इत्यादी तिहीचा समुदाय अर्थ - मी तुकाराम तसे पाहिले तर अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असूनही आकाशाएवढा विस्तारलेलो आहे १ मी देहादी व प्रपंचादिकाचा अभिमान गिळून शरीर सोडून दिल्यासारखेच आहे प्रपंचरूपी भ्रमाचा आकारही मी सोडलेला आहे २ ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशासारख्यांची त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहामध्ये प्रज्वलित केला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठींच उरलेलो आहे ४ विवरण - या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षाही विशाल असे आहोत, याचे त्यांच्या श्रेष्ठ अनुभूतीवरून वर्णन केले आहे एवच सूक्ष्म तत्त्व सर्व जगतात भरून राहिलेले आहे, याचा सुंदर अविष्कार जो 'अणोरणीयान्महतो महीयान' या कठोपनिषदातील सूत्रात झालेला आहे, त्याचा अनुवाद तुकोबांनी सहजमहनी या अभंगात मार्मिकपणे केलेला आहे 'अणु अणोरणीया आगळें' या शब्दांनी मागेही अभंग क्र ४५१ मध्ये बुवानी असेच वर्णन केलेले आपण पाहिले आहे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असलेल्या तत्त्वाचाच सर्व विश्वात भरून राहिलेला अविष्कार असल्याने त्याला सोडून दुसरे काहीच नाही याची जाणीव श्रेष्ठ साधकास नेहमीच होत असते जळीस्थळी ईश्वरतत्त्व पाहाणे व एकाच आत्मतत्त्वाच्या धाग्याने सर्व सृष्टी गुंफिली गेली आहे, असे अनुभवास येणे, हाच ईश्वरी साक्षात्काराचे मर्म होय तुकोबांना ही अनुभूती तीव्रतेने आलेली होती 'आत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें', 'नभोमय जाले जळ । एकीं सकळ हरपले', 'तुका म्हणे कल्प झाला । अस्त गेला उदयो', 'काहींच मी नव्हे कोणिये गांवींचा । एकटा ठांयींच्या ठायीं एक', 'आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्यें वास' इत्यादी वचनातून तुकारावाच्या अनुभूतीची विशालता ध्यानात येण्यासारखी आहे अनुभूतीची एवढी विशालता व तीव्रता ज्यांना लाभली आहे, ते देह धारण करून जगतात तरी कशासाठी ? याही प्रश्नाचे उत्तर तुकारामबुवांनी या अभंगात दिले आहे इतर लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आपण आता उरलेलो आहोत, असे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे स्वतःस साक्षात्कार झाल्यावर 'आपण जेऊन जेववी लोकां । सतर्पण करो तुका' अशी भूमिका तुकोबांसारख्या सत्पुरुषांना घ्यावी लागते लोकांनी सन्मार्गावर राहावे, केवळ प्रपंच व पैसापैगा न करिता ईश्वराची आठवण ठेवावी, अनाचारात व व्यसनात रमू नये, दुष्टाच्या संगतीत राहू नये, म्हणून साधुसंतांच्या एकसारख्या उपदेशाची फार मोठी जरूरी असते 'उपदेशी तुका । मेघवृष्टीने जाइरा' असा निर्वाळा दुसऱ्या एका अभंगात त्यांनी दिलेला आहे मेघाचा स्वभावच सहज वृष्टीचा असून त्याचा फायदा ज्याचा त्यान घ्यावयाचा असतो १९४ धन्य आजि दिन । जाले संताचे दर्शन ॥ १ ॥ झाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥ २ ॥ झाले समाधान । पायीं विसावले मन ॥ ३ ॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दिन-दिवस, तुटी-नाश, उठाउठी-ताबडतोब, त्वरित १ अणुरेणुया
सार्थ तुकारामगाथा ४४७ अर्थ :- आजचा दिवस केवढा धन्यतेचा आहे ! कारण आज मला संतांचे दर्शन झाले १ यांच्या दर्शनाने माझे पाप ताप नष्ट झाले माझे आजवरचे दैन्य त्वरित नाहीसे झाले २ माझ्या मनाचे पूर्ण समाधान झाले व या संताच्या पायाशी माझे मन पूर्णपणे विसावले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे साधुसंत आमच्या घरी आलेले असल्यामुळे आम्हाला दिवाळीदसर्याच्या सणाचाच आनंद झालेला आहे ४ ९९५ हेचि माझें धन । तुमचे वदावे चरण ॥ १ ॥ येणे भाग्यें असो जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ २ ॥ सांभाळिले देवा । मज अनाथा जी जीवा ॥ ३ ॥ जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जीत-जगण्याचे अर्थ - देवा, तुमचे चरण वदावेत हेच खरे म्हणजे माझे धन आहे १ तुमच्या पायावर चित्त समर्पून टाकावे यातच खरे म्हणजे जगण्याचे सार्थक आहे २ देवा, मजसारख्या अनाथाचा तुम्ही नीटपणे सांभाळ केलात ३ हा तुकाराम दास देवा, तुम्हास हात जोडून विनंती करीत आहे ४ ९९६ फजितखोरा मना किती तुज सांगो । नको कोणा लागो मागे मागें ॥ १ ॥ स्नेहभावें दुःख जडलेसे अंगीं । निष्ठुर हे जगीं प्रेमसुख ॥ २ ॥ निंदास्तुति कोणी करो दयामाया । न धरीं चाड या सुखदुःखे ॥ ३ ॥ योगिराज का रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं याचि गुणे ॥ ४ ॥ तुका म्हणे मना पाहें विचारून । होईं रे कठिण वज्राऐसें ॥ ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - चाड-पर्वा अर्थ - माझ्या फजितखोरा मना, तुला आता किती सांगावे ? किती शिकवावे ? तू आता कुणाच्याही मागे जाऊ नकोस कधी १ कुणाच्या विषयी प्रेम धरले की, आपल्या अंगी दुःख मात्र निर्माण होते. त्यामुळे जे निष्ठुर राहतात, त्यांनाच श्रीहरीचे प्रेमसुख प्राप्त होते २ कुणी निंदा करील, कुणी स्तुती करील, कुणी दयामाया करील, पण मी या सुखदुःखाची अथवा दयामाया करणाराची पर्वा करणार नाही कधी ३ मना, याचसाठी योगि- राज एकाच स्थानावर, एकाच आसनावर स्वस्थपणे बसून नाही का राहात ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू या सर्व गोष्टींचा विचार कर व इंद्राच्या वज्राप्रमाणे कठिण होऊन राहा ५ ९९७ जळो माझी ऐसी बुध्दी । मज घाली तुजमध्यीं । आवडे हे विधि । नियेंधींचि चांगली ॥ १ ॥ तू स्वामी मी सेवक । उच्च पद निघ एक । ऐसे करावें कौतुक । नको करु खडणा ॥ २ ॥ जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥ ३ ॥ हिरा शोभला कोदणें । अळकारी मिरवे सोनें । एक असता तेणे । काय दुजें जाणावें ॥ ४ ॥ उष्णे छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥ ५ ॥ तुका म्हणे हित । हेचि मानी माझें चित्त । नव्हे आता मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥ ६ ॥