सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
३७८ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- हे माझें देहू गाव धन्य असून मोठ्या पुण्याचे स्थान आहे. कारण या ठिकाणीं प्रत्यक्ष देवाची, पांडुरंगाची वसती कायमची आहे १ या क्षेत्रांतील लोकही धन्य व दैववान होत कारण त्याच्या मुखातून सारखा विठ्ठलाचा नामघोष होत असतो. २ या विश्वात जन्म देणाऱ्या विठ्ठलाचे हात त्याच्या कमरेवर असून तो उभा आहे त्याच्या डाव्या अंगास माता रखुमादेवी उभी आहे. ३ जवळच पारावर गरुड उभा असून त्याने हात जोडले आहेत. समोर उत्तरेस पिंपळाचा वृक्ष उभा आहे. ४ दक्षिण दिशेस हरेश्वर नावाचे शंकराचे लिंग असून या गावास असणारे इंद्रायणी नावाच्या नदीचे तीर शोभून दिसते ५ जवळच लक्ष्मीनारायणाचे व बल्लाळाचे वन असून तेथे सिद्धेश्व- राचे स्थान प्रसिद्ध आहे. ६ दारात विघ्न दूर करणाऱ्या गणपतीचे स्थान असून बाहेर ग्रामदेव बहिरोबा आहे हनुमंतही रक्षणार्थ शेजारीच आहे. ७ तुकाराम महाराज म्हणतात, याच गावात हा दास कीर्तन करीत असून हृदयाशी विठोबाचे चरण धरीत आहेत. ८ विवरण :- या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकारामबुवांनी आपल्या देहू या गावचे तपशीलवार असे वर्णन केले आहे तुकोबांच्या संगती पवित्र व प्रसिद्ध झालेल हे गाव पुण्यापासून जवळच बसलेले एक लहान खेडे आहे पुणे मुबंई रस्त्यावरच पंधराव्या मैलावर उत्तरेस जाणारा देहूचा रस्ता लागतो या रस्त्याने तीन मैलावर इंद्रायणी नदीच्या काठी हे देहू क्षेत्र बसले आहे हे क्षेत्र आळंदीपासून पाच कोस, तळेगावपासून चार कोस, चिंचवड- पासून तीन-चार कोस दूर असून याच्या सभोवती लहान लहान डोंगर आहेत ज्ञानेश्वराच्यामुळे आळंदी पंढरपूर याचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात झाले एकनाथामुळे पैठणचे नाव झाले रामदासामुळे सज्जनगड, चाफळ, जाय ही स्थाने उदयास आली आणि तुकोबांच्यामुळे देहूचे भाग्य उदयास येऊन अवघ्या महाराष्ट्रात त्याची कीर्ती पसरून राहिली या गावात तुकोबाच्या आधीही चारदोन लहानलहान मंदिरे नेहमीप्रमाणे होतीच बुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा यानी या गावी श्रीविठ्ठलरखुमाईचे मंदिर बाधले तेव्हापासून या घराण्याचा विठ्ठलाशी संबंध जडला गेला त्याच्या घरी पंढरीची वारीही प्रथमपासून होतीच या अभंगातील सर्व वर्णन ऐतिहासिक वस्तुस्थितीस धरून आहे विठ्ठलाच्या देवळाचा भाग व त्याचा विस्तार हा नंतरचा असला तरी विठ्ठलरखुमाईच्या मूर्ती मात्र विश्वंभरबुवांनी स्थापन केलेल्या आहेत याच मंदिराचा तुकोबांनी जीर्णोद्धार केला देहूम श्रीविठ्ठल व रखुमाई शेजारी शेजारी असून त्यांच्या मूर्ती उत्तरेस तोंड करून आहेत समोर गरुडपार आहे गरुडहनुमंत नेहमीप्रमाणे हात जोडून देवासमोर उभे आहेत पूर्वेकडील दरवाजावर दक्षिणेस तोंड असलेले विघ्नराज असून बाहेर बहिरोबांचे छोटे मंदिर आहे मंदिराच्या पश्चिमेस हरेश्वर मंदिर असून थोड्या अंतरावर तुकोबांचेही घर आहे पश्चिमेच्या बाजूस बल्लाळाचे वन असून या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या थोडे पूर्वेस लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे ही मंदिरे तुकोबांच्या आधीपासूनची आहेत देहूक्षेत्राला लागूनच इंद्रायणी नदी असून उत्तराभिमुख होऊन वहात आहे या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे सर्व स्थानांचे विशेष आजही मिळतात, पण तुकोबांच्या इतर अभंगातून ज्याचा उल्लेख आला आहे त्याची स्थानेही दृष्टीस पडतात अर्थात या स्थानांना तुकारामबुवाच्या नंतर महत्त्व येत राहिले मबाजीबुवांचे घर, त्याची वाव, प्रदक्षिणेचा रस्ता, पुंडलिकाचे देऊळ, वह्या उदकावर तरल्या तो डोह, गोपाळपूर, जुनाट पिंपरीचा वृक्ष, गरजाईच स्थान, मुरलीधराचे देऊळ, पहिल्या स्त्रीचे, रखुमाईचे वृंदावन, थोड्या दूर अंतरावर भामनाथचा डोंगर ही सर्व स्थाने नंतरच्या काळात विशेष रूपांनी प्रसिद्ध झाली
शाक्तावर-अभंग १३
७९० टंवकारूनि दृष्टी लावुनिया रंग । दावी झगमग डोळ्यापुढें ॥ १ ॥ म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकीचि उपाधी झकविती ॥ २ ॥ दीपाचिया ज्योती फोडियेलें तेज । उपदेश साजरात्रीमाजी ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा ३७९ रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥ ४ ॥ पडदा लावूनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥ ५ ॥ नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥ ६ ॥ जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥ ७ ॥ पाषांड करोनी मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥ ८ ॥ कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥ ९ ॥ शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥ १० ॥ विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥ ११ ॥ योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्याद्रिक ॥ १२ ॥ वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंटें ॥ १३ ॥ तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥ १४ ॥ शब्दार्थ व टीपा :- झगमग-चमक, झकविती-फसवितात, सांजरात्रीमाजी-संध्याकाळी, रात्रीच्या वेळेस, वोजा-सहज, परवडी-नाना प्रकारची, पाषांड-नास्तिक, गुखाडी-नरकात जाणारे. अर्थ :- शाक्त मार्गामधील हे गुरू कसे असतात ? तर शिष्यावर डोळे वटारून त्याच्यापुढे नाना रंगांची चमक दिसेल असे करतात. १ आणि डोळ्यांस एक प्रकारची अंधारी आली म्हणजे शिष्याला सांगतात की, तुझी समाधी लागली आहे. अशा प्रकारे लबाडी करून शिष्याला हे लोक फसवितात २ दिव्याच्या ज्योतीने घरामध्ये तेज कोंदले आहे असे मानून हे गुरू संध्याकाळी व रात्री शिष्यांना उपदेश देतात. ३ भोवती रांगोळ्या वगैरे काढून धान्याने चौक भरून सहज असा शृंगार करतात व त्रिकोणी यंत्राची पूजा करतात. ४ समोवती पडदे लावून आत चहूबाजूंनी दिवे लावतात व आपण स्वतः आसनावर बसून मुद्रा लावतात. ५ शिष्याला नैवेद्यासाठी पक्वान्ने करावया सांगतात व नाना प्रकारची ही पक्वान्ने पात्रांत वाढून देवापुढे ठेवल्याचा देखावा करतात. ६ मग शिष्यांस म्हणतात, झाला आता उपदेश. आता तोंडांत एकेक घास घ्या आपोशन घेण्याची यांना काही जरूरी वाटत नाही ७ अशा प्रकारे हे गुरू नास्तिक्य पसरवून पोट भरण्याचा उद्योग जीविकात आरंभतात व लोकांना फसवितात. ८ काया, वाचा, मन गुरूला अर्पण करण्याचा संकल्प सोडवून गुरूच्या नामाचा जप वारंवार करायला सांगतात. ९ खराखुरा परमार्थ यानी बुडविलेला असून गुरुपणाच्या भूषणाने हे केवळ ऐश्वर्य भोगत असतात. १० वेदात असलेला सर्व शास्त्रविधीचा यांनी लोप केलेला असून सर्व शास्त्रांचाही बोध नाहीसा केलेला असतो. ११ यांना योगयाग व ध्यानधारणा यांची नीट माहिती नसते; कारण नित्यकर्म व यमनियमादी साधने यांचा यांनी त्यागच केलेला असतो. १२ यांच्या वैराग्याचा लोपच झालेला असून यांना श्रीहरीच्या भजनाविषयी त्रास वाटतो अशा या नास्तिकांनी जगात मुद्दामच पाप वाढविलेले असते. १३ तुकाराम महाराज म्हणतात, असा याचा गुरुपणा नरकात जावो कारण हे त्यांचे कृत्य त्यांच्या पूर्वजांसहही नरकात धाडणारे आहे. १४
३८० सार्थ तुकारामगाथा तुकारामबुवांच्या वेळी अशा प्रकारच्या हीन आचारधर्माचे व विकृत भावनाचे धर्माच्या नावावर बरेच पंथ पसरले होते शाक्तांचा वामाचारा पंथ हा त्यातलाच एक असल्याने बुवांनी त्याच्यावर कडाडून हल्ला केलेला आहे शाक्त हे खरे म्हणजे शक्तीचे उपासक, शक्ती हे शिवाचेच एक अंग, ही आदिमाता. तुकोबाही विठ्ठलाला माउली संबोधतात त्यांचेही उपास्य दैवत पांडुरंगाबरोबर शिवही होतेच वारकरी एकादशीप्रमाणे सोमवारचेही व्रत करतात म्हणजे शंकराची किंवा शक्तीची अथवा मातृत्वाची उपासना त्यांना मान्य आहे पण या भक्तीच्या नावावर कोणी भ्रष्ट व अनीतीचे आचारविचार प्रस्थापित करू लागला व सामान्य जनास याच मार्गाचा त्यातील मुक्त व स्वैर मचारामुळे लाभ वाटत राहिला तर एकंदर समाजच भलत्या थराला जाईल हे ओळखून तुकारामबुवा शाक्तांच्या- वर फार कडक शब्दात टीका करीत आहेत
७९१ शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥ १ ॥ सुकृताचा उदो वेला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ २ ॥ क्रोधरूपें वसे काम । तीचे नाम जपतसे ॥ ३ ॥ मद्यभक्षण मांगिणजाती । विटाळ चित्तीं साठविला ॥ ४ ॥ स्तवुनियां पूजी राड । न लजे भाड दाढीसी ॥ ५ ॥ तुका म्हणे भगवती । नेईल अंतीं आपणापें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सुकृताचा-पुण्याईचा, उदो केला-नाश केला, भगवती-देवी
अर्थ - देवीची वाममार्गाने उपासना करणारा हा शाक्त गधडा ज्याच्या देशात जाईल तेथे तेथे पापाच्या राशी उभ्या राहतील १ त्याने आपल्या पुण्याईचा नाश केलेला असून केवळ इंद्रियवृत्तींवरच त्याचा भर असतो विषयाचाच फक्त गोंधळ त्याचा असतो २ प्रत्यक्ष क्रोधाच्या रूपाने कामवासनाच तेथे असते व तीस देवी कल्पून ते तिची पूजा वगैरे करतात ३ मागीण जातीच्या मुलीस देवी समजून मद्याचे सेवन तिला करवितात व मग आपण ते घेतात याचे चित्त अशा प्रकारे विटाळानेच बरबटलेले असते ४ या रांडेची पूजा करून ते स्तवनही करतात अशा या भाडखोर व ढोगी लोकांच्या नादी लागू नये ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने ही भगवती देवी शेवटी आपणांस स्वतःजवळ घेईल असे यांना व्यर्थ वाटत असते ६
७९२ राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥ १ ॥ अधर्माचें उघडे पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ २ ॥ न पिके भूमि कापे भारे । मेघ धारे पीतील ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - द्वाड-वाईट, रंक-दरिद्री
अर्थ :- देवीची अशी अनाचाराने पूजा करणारे शाक्त ज्या देशात निवास करतात तो देश, तेथील राजा, तेथील प्रजा, या सर्वच गोष्टी वाईट असतात १ त्या ठिकाणी अधर्माचेच पीक उघड उघड आलेले असते या गावी प्रत्यक्ष धर्मही दरिद्री होऊन वावरत असतो २ या देशात पाऊस पडत नसल्यामुळे भूमी पिकात नाही पापाच्या ओझ्याने पृथ्वी थरथरा कापायाला लागलेली असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, या शाक्तांच्या वास्तव्यामुळे जगातील सर्व दुःखे मोठ्या सुखाने या गावात वस्ती करण्यासाठी येतील ४
७९३ ऐसें' कलियुगाच्या मुळें । जाले धर्माचें वाटोळें ॥ १ ॥ सांडूनिया रामराग । ब्राह्मण म्हणती दोमदोम ॥ २ ॥
१ ऐसा
सार्थ तुकारामगाथा ३८१ शिवो नये तीं निळीं । वस्त्रे पांघरती काळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दोम दोम-भिक्षेच्या वेळी फकीर लोक करतात तो उच्चार, गदा-भीक. अर्थ - अशा रीतीने या कलियुगात सर्व धर्माचे चाटोळे झालेले असते ते या शाक्ताच्या अनाचारामुळे. १ रामनामासारखा सोपा उपाय सोडून ब्राह्मण लोकसुद्धा फकीराप्रमाणे 'दोम दोम' म्हणत फिरायला लागले आहेत. २ ज्या वस्त्रांना शिवूसुद्धा नये अशी काळी वस्त्रे पांघरून हे शाक्त फिरतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक आपापली उच्च रीत सोडून भीक मागायलाच हिंडतात. ४ ७९४ अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥ १ ॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ २ ॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥ ३ ॥ करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणे ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अवघ्या-सर्व, एक-देवीचा उपासक. अर्थ:- हा अनाचाराने वागणारा देवीचा उपासक म्हणजे जगातील सर्व पापाचाच 'घडविलेला आहे असे वाटते १ पांडुरंगा, माझ्या शरीरास त्याचा विटाळसुद्धा नको २ कारण त्याच्या अंगी काम व क्रोध पूर्णपणे भरले असून मद्याच्या किंवा शाक्तच्या नादात तो रंगून गेलेला असतो. ३ कोणतेही पाप करताना याला कधीही शंका वाटत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ७९५ वारितां बळें धरिता हातां । जुलुमें जाती नरकामयीं । १ ॥ रंडीदासाप्रति काहीं । उपदेश तो ही चालेना ॥ २ ॥ जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारिता-निवारण करीत असताना अर्थ - या देवीच्या अनाचारी उपासकास बळाने हाती धरून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी पुन. ते नरकात जाण्याचा प्रयत्न करतातच. १ रांडेच्या या दासास कसलाही उपदेश केला तरी तो रुचत नाही, त्याच्या मनास या एका पापी मार्गाशिवाय दुसरे काही पटतच नाही. २ माणसाच्या जन्मास येऊन याचा घातच झाला. फार मोठा अपाय याच्यामुळे घडत राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, तुझ्या कथेलासुद्धा हे नीच लोक दूषणे देतात, नावे ठेवतात. ४ ७९६ शाक्तांची शुकरी माय । विष्ठा खाय विदीची ॥ १ ॥ तिची त्या पडली' सवे । मागें धांवे म्हणोनि ॥ २ ॥ शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय बेसदारा ॥ ३ ॥ तुका म्हणे द्विदळोचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शुकरी-डुकरीण, विदीची-रस्त्यावरील अर्थ :- वाम मार्गाने देवीची उपासना करणाऱ्या या शाक्तांची आई म्हणजे रस्त्यावरील विष्ठा खाणारी डुकरीणच समजावी १ तिला त्याच घाण वस्तूची सवय असल्यामुळे तिच्याच मागे मागे ती असते २ गावच्या वेशीपर्यंत भुंकत, ओरडत जाणारी गाढवी म्हणजेच या शाक्ताची आई असेच मानावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक फार वाईट खालीचे आहेत त्याचे वाचेने वर्णन केले तरी वाणी विटाळून जाईल इतके ते नीच आहेत. ४ १ लागली.
३८० सार्थ तुकारामगाथा तुकारामबुवांच्या वेळी अशा प्रकारच्या हीन आचारधर्माचे व विकृत भावनांचे धर्माच्या नावावर बरेच पंथ पसरले होते शाक्तांचा वामाचारा पंथ हा त्यातलाच एक असल्याने बुवांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला केलेला आहे. शाक्त हे खरे म्हणजे शक्तीचे उपासक, शक्ती हे शिवाचेच एक अंग; ही आदिमाता. तुकोबाही विठ्ठलाला माउली म्हणतात. त्यांचेही उपास्य दैवत पांडुरंगाबरोबर शिवही होतेच. वारकरी एकादशीप्रमाणे सोमवारचेही व्रत करतात म्हणजे शंकराची किंवा शक्तीची अथवा मातृत्वाची उपासना त्यांना मान्य आहे पण या भक्तीच्या नावावर कुणी भ्रष्ट व अनीतीचे आचारविचार प्रस्थापित करू लागला व सामान्य जनास याच मार्गाचा त्यांतील मुक्त व स्वैर प्रचारामुळे लोभ वाढत राहिला तर एकंदर समाजच भलत्या थराला जाईल. हे ओळखून तुकारामबुवा शाक्तांच्या- वर फार झणक शब्दात टीका करीत आहेत ७९१ शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥ १ ॥ सुकृताचा उदो के.१। गोंधळ घाला इंद्रियें ॥ २ ॥ क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥ ३ ॥ मद्यभक्षण मागीणजाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥ ४ ॥ स्तुवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढोसी ॥ ५ ॥ तुका म्हणे भगवती । नेईल अंतीं आपणापें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुकृताचा-पुण्याचा, उदो केला-नाश केला, भगवती-देवी. अर्थ :- देवीची वाममार्गाने उपासना करणारा हा शाक्त गधडा ज्याच्या देशात जाईल तेथे तेथे पापाच्या राशी उभ्या राहतील. १ त्याने आपल्या पुण्याचा नाश केलेला असून केवळ इंद्रियवृत्तींवरच त्याचा भर असतो. विषयाचाच फक्त गोंधळ त्याचा असतो. २ प्रत्यक्ष क्रोधाच्या रूपाने कामवासनाच तेथे असते व तीस देवी कल्पून ते तिची पूजा वगैरे करतात ३ मागीण जातीच्या मुलीस देवी समजून मद्याचे सेवन तिला करवितात व मग आपण ते घेतात. याचे चित्त अशा प्रकारे विटाळानेच वरवटलेले असते. ४ या रांडेची पूजा करून ते स्तवनही करतात. अशा या भांडखोर व ढोंगी लोकांच्या नादी लागू नये. ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने ही भगवती देवी शेवटी आपणास स्वतः जवळ घेईल असे यांना व्यर्थ वाटत असते. ६ ७९२ राजा प्रजा ढाड देश । शाक्त वास करिती तो ॥ १ ॥ अधर्माचें उघड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ २ ॥ न पिके भूमि कापे भारें । मेघ वारें पीतील ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघीं दुःखें । येतीं सुखें वस्तीसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ढाड-वाईट, रंक-दरिद्री अर्थ :- देवीची अशी अनाचारांनी पूजा करणारे शाक्त ज्या देशात निवास करतात तो देश, तेथील राजा, तेथील प्रजा, या सर्वच गोष्टी वाईट असतात. १ त्या ठिकाणी अधर्माचेच पीक उघड उघड आलेले असते. या गावी प्रत्यक्ष धर्मही दरिद्री होऊन वावरत असतो २ या देशात पाऊस पडत नसल्यामुळे भूमी पिकत नाही. पापाच्या ओझ्याने पृथ्वी थरथरा कापायाला लागलेली असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या शाक्तांच्या वास्तव्यामुळे जगातील सर्व दुःखे मोठ्या सुखाने या गावात वस्ती करण्यासाठी येतील. ४ ७९३ ऐसें१ कलियुगाच्या मुळें । जाले धर्माचें वाटोळें ॥ १ ॥ सांडुनियां रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम ॥ २ ॥ १ ऐसा.
सार्थ तुकारामगाथा ३८१ शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दोम दोम-भिक्षेच्या वेळी फकीर लोक करतात तो उच्चार, गदा-भीक. अर्थ :- अशा रीतीने या कलियुगात सर्व धर्माचे वाटोळे झालेले असते ते या शाक्ताच्या अनाचारामुळे. १ रामनामासारखा सोपा उपाय सोडून ब्राह्मण लोकसुद्धा फकीराप्रमाणे 'दोम दोम' म्हणत फिरायला लागले आहेत. २ ज्या वस्त्रांना शिवूसुद्धा नये अशी काळी वस्त्रे पांघरून हे शाक्त फिरतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक आपापली उच्च रीत सोडून भीक मागण्यालाच हिंडतात. ४ ७९४ अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥ १ ॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ २ ॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥ ३ ॥ करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणी ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अवघ्या-सर्व, एक-देवीचा उपासक. अर्थ:- हा अनाचाराने वागणारा देवीचा उपासक म्हणजे जगातील सर्व पापांचाच 'घडविलेला आहे असे वाटते. १ पांडुरंगा, माझ्या शरीरास त्याचा विटाळसुद्धा नको. २ कारण त्याच्या अंगी काम व क्रोध पूर्णपणे भरले असून मद्याच्या किंवा दारूच्या नादात तो रंगून गेलेला असतो. ३ कोणतेही पाप करताना याला कधीही शंका वाटत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ७९५ वारितां बळें धरितां हातों । जुलुमें जाती नरकामधीं । १ ॥ रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ २ ॥ जन्म केला वाताहात । थोर घात येथार्थी ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूपीती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धारितां-निवारण करीत असताना. अर्थ - या देवीच्या अनाचारी उपासकास बळाने हाती धरून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी पुनः ते नरकात जाण्याचा प्रयत्न करतातच. १ रांडेच्या या दासास कसलाही उपदेश केला तरी तो रुचत नाही, त्याच्या मनास या एका पापी मार्गाशिवाय दुसरे काही पटतच नाही. २ माणसाच्या जन्मास येऊन याचा घातच झाला. फार मोठा अपाय याच्यामुळे घडत राहतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, तुझ्या कथेलासुद्धा हे नीच लोक दूषणे देतात, नावे ठेवतात. ४ ७९६ शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय विदीची ॥ १ ॥ तिची त्या पडली १ सवे । मागें धांवे म्हणोनि ॥ २ ॥ शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय बेसदारा ॥ ३ ॥ तुका म्हणे शिवळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शूकरी-डुकरीण, विदीची-रस्त्यावरील. अर्थ :- वाम मार्गाने देवीची उपासना करणाऱ्या या शाक्तांची आई म्हणजे रस्त्यावरील विष्ठा खाणारी डुकरीणच समजावी. १ तिला त्याच घाण वस्तूची सवय असल्यामुळे तिच्याच मागे मागे ती असते २ गावच्या वेशीपर्यंत भुंकत, ओरडत जाणारी गाढवी म्हणजे या शाक्ताची आई असेच मानावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक फार वाईट चालीचे आहेत. त्याचे वाणीने वर्णन केले तरी वाणी विटाळून जाईल इतके ते नीच आहेत. ४ १ लागली.
३८२ सार्थ तुकारामगाथा ७९७ हरिहर सांडुनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥ १ ॥ ऐका त्याची विटंबणा । देवपणा भक्ताची ॥ २ ॥ अंगीं कवडे घाली गळा । परडी कळाहीन हातीं ॥ ३ ॥ गळा गाठा हिंडे दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ ४ ॥ माया सेंदुर दात खाती । जंगट हातीं सटवीचे ॥ ५ ॥ पूजिती विकट दोंद । पशु सोंड गजाची ॥ ६ ॥ ऐसा छंदें चुकली वाटा । भाव खोटा भजन ॥ ७ ॥ तुका म्हणे विष्णुशिवा । वाचुनि देवा भजती ते ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडुनि-सोडून, गाठा-खंडोबाच्या भक्ताच्या गळ्यातील रुप्याची हासळी, जंगट- वाद्य किंवा थाळी दोंद-डेरपोट अर्थ - हे शक्तोचे वा देवीचे उपासक हरि व हर हे मुख्य देव सोडून इतरच क्षुल्लक देवांना भजतात १ पण अशा भक्तांची कशी विटंबना होते ती ऐका व त्याच्या देवाचीही फजिती नीट ऐका २ हे भक्त गळ्यात कवड्याची माळ घालतात, हातामध्ये भिक्षेसाठी परडी घेतलेली असल्यामुळे हे कळाहीन दिसतात ३ याच्या गळ्यात रुप्याची हासळी असते व हे दारोदारी हिंडतात हे लोक मनुष्य असून कुत्रीच वाटतात ४ याचे देव कसे असतात ? तर त्याच्या माथ्यावर शेंदूर फासलेला असतो ते क्रोधाने कराकरा दात खात असतात आणि त्याच्या हातात सटवीचे जंगट वाद्य असते ५ ज्या देवाचे पोट मोठे व ज्यास हत्तीची सोड आहे त्याची हे लोक वरवर पूजा करतात ६ अशा विविध प्रकारच्या खोट्या मार्गांनी याची खरी वाट चुकलेली असते यांचे भजन व याचा भाव याही बाबी खोट्याच असतात ७ तुकाराम महाराज म्हणतात, कारण हे लोक शिवाला किंवा विष्णूला सोडून इतर क्षुल्लक देवांनाच भजतात ८ ७९८ कायासाठीं जाले ज्ञान । तेणे जन नाडिले ॥ १ ॥ काम क्रोध बुचबुची । भुके पुची व्यालींची ॥ २ ॥ पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्याते ॥ ३ ॥ तुका म्हणे कंचे ब्रह्म । अवघा भ्रम विषयाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नाडिले-फसविले अर्थ - शरीराची उपासना करणाऱ्यांना कसले आले आहे ज्ञान ? स्वत कांदे खातात व मग ब्रह्मज्ञानाचा खोटा आविर्भाव आणून लोकांना फसविततात १ याच्या अंगी कामक्रोध भरपूर भरलेले असून व्यालेल्या कुत्रीप्रमाणे ते ज्ञानाची व्यर्थ बडबड करतात २ हे लोक पूजेसाठी लोकाजवळ द्रव्य मागतात व काही तरी भेदावादाचा उपदेश करतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्याजवळ कसले आले आहे ब्रह्मज्ञान? येथे विषयाचाच सर्व भ्रम आहे ४ ७९९ सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥ १ ॥ बहु लाज वाटे चित्ता । आणिकातें देव म्हणता ॥ २ ॥ सांडूनिया हिरा । कोणे वेचाव्या त्या गारा ॥ ३ ॥ तुका म्हणे हरिहर । ऐसी सांडूनिया धुर ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आणिकातें-इतरांना, धुर-श्रेष्ठ
सार्थ तुकारामगाथा ३८३ अर्थ :- एका पंढरीनाथास सोडून दुसऱ्या कुणास देव म्हणावे ? १ इतरांना देव म्हणताना माझ्या चित्तास फारच लाज वाटते. २ चांगल्या मौल्यवान हिऱ्यास सोडून गारा वेचण्यात कुणी सुख मानावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरांसारखे श्रेष्ठ व मुख्य देव सोडून इतर क्षुद्र देवांच्याकडे का जावे ? ४ ८०० बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥ १ ॥ करिती कामिकांची सेवा । लागोन भागोन खात्या देवा ॥ २ ॥ अघवियांचा धनी । त्यासीं गेलीं विसरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामिकांची-लोभी देवाची. अर्थ :- या पंढरीनाथाला न भजल्यामुळे पुष्कळ लोकांचे आयुष्य वायाच गेले आहे. १ लोकांना मागून खाणाऱ्या लोभी देवांची पूजा करण्यात हे अडाणी लोक गुंतलेले दिसतात. २ आणि सर्व विश्वाचा धनी जो विठ्ठल त्यास मात्र विसरून गेली आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे शेवटी हे लोक यमाच्याच हातात सापडणार. ४ ८०१ असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥ १ ॥ रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ २ ॥ काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥ ३ ॥ तुका म्हणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरुनियां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आस-इच्छा. अर्थ :- आम्ही विष्णुदास मात्र कशाचीही इच्छा करीत नसतो. १ मग हे दुष्ट लोक आमची निंदा नेहमी का बरे करतात ? २ असू द्या. त्यांना त्यात समाधान असेल तर राहतील आपल्याच ठिकाणी ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझी सेवा हाच एक आमचा नित्याचा धंदा आहे. त्यात कमी पडणार नाही. ४ ८०२ नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणाची ॥ १ ॥ कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ २ ॥ असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आस-इच्छा. अर्थ - आम्ही या श्रीहरीचे जे दास आहोत ते कशाचीही इच्छा करीत नसतो. १ तरीसुद्धा हे दुष्ट, नष्ट लोक आमची निंदा नेहमी का करतात, हे काही समजत नाही. २ असू द्या. त्यांची मने भलत्याच ठिकाणी असली तर असू द्या. आम्ही आमच्या ठिकाणी समाधानी राहू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझी एकनिष्ठ सेवा करणे हाच माझा धंदा झाला आहे. ४ ८०३ पाखांड्यांनीं पाठी पुरविला दुमाला । येथें मी विठ्ठला काय बोलों१ ॥ १ ॥ कांद्यांचा लाणार चोजवी कस्तुरी । आपुलें२ भिकारी अर्थ नेणे ॥ २ ॥ न फळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥ ३ ॥ तुझ्या पायांविण दुजें नेणें कांहीं । तूंचि सर्वठायीं एक मज ॥ ४ ॥ तुका म्हणे खोळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादफांशीं ॥ ५ ॥ १ करू, २ आपण.
३८४ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - दुमाला-पाठ, चोजवी-इच्छा करितो. अर्थ - देवा, या नास्तिकांनी तर माझी एकसारखी पाठ पुरविली आहे विठ्ठला, मी त्याच्या विषयी काय बोलू ? १ कांदे खाऊन समाधान मानणाऱ्यास कस्तुरीची इच्छा झाली तर तिचा काय उपयोग ? स्वत भिकारी असल्यामुळे त्याला तिची किंमत समजणारच नाही २ मला जो गोष्ट समजत नाही, तीच गोष्ट पुन पुन त्रास देऊन लोक विचारतात, माझ्या चरणाशी लागतात व आग्रह करतात सांगितल्याशिवाय पाय काही सोडीत नाहीत ३ देवा, मी त्यांना काय सांगावे ? तुझ्या पायावाचून मी काहीच जाणोत नाही सर्व ठिकाणी तूच एक मला दिसतोस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा लोकाच्या ताडाला खोळ पडो असल्या या भाडखोर लोकांशी मी किती बोलावे ? ५ ८०४ कलियुगीं कवित्व करिती पाषाड । कुशळ हे भाड बहु जाले ॥ १ ॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजाची आवडी । मुखें बडबडी¹ कोरडाचि ॥ २ ॥ दंभ करी सोग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥ ३ ॥ वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥ ४ ॥ तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पाषाड-पाखंडी, नास्तिक, दारा-स्त्री अर्थ - या कलियुगात कवित्व करणारे पुष्कळ नास्तिक लोक झाले असून ते केवळ भांडण करण्यातच कुशल आहेत १ त्याच्या मनात द्रव्य व स्त्री याची आणि पुष्कळ प्रजा आपणास व्हावी एवढीच आवड असते त्याच्या मुखातून कोरडी बडबड उगाच सारखी चालू असते. २ लोकांनी आपणास मानावे म्हणून उगाचच दंभ अथवा सोंग करतात, मुखाने त्यागाच्या गोष्टी बोलतात, पण त्याच्या मनात तशी भावना नसते ३ वेदाच्या आज्ञेप्रमाणे वागून हे आपले स्वहित साधीत नाहीत व देहाविषयीच्या प्रीतीपासून अलिप्तही होत नाहीत ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे कविलोक पुढे यमाची शिक्षा सहन करतील कारण वाणीने बोलल्याप्रमाणे कर्म याचे नसते ५ ८०५ विषयाचे सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥ १ ॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ २ ॥ असिपत्री तरुवरखैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥ ३ ॥ तप्तभूमीवरि लोळविती² पाहीं । अग्निस्तंभ बाहीं कवळविती ॥ ४ ॥ म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आता याती गर्भवास ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - किंकर-सेवक, असिपत्रीं-तरवारीच्या पात्यावर, धारेवर, इंगळ-अग्नी, विस्तव, बाही-बाहूनी, हातानी अर्थ - या लोकांना माणसाच्या जन्मी येऊन नाना विषयाचे सुख घेताना मोठे गोड वाटते पण पुढे फार मोठे असे यमाकडून शासन होणार असले हे ध्यानात हये १ यमाच्या हाती सापडल्यावर मग त्या पापी माणसांस मारतात, तोडतात, झोडपतात यमाचे सेवक मोठ्या निष्ठुरतेने त्याचे कित्येक वर्षे हाल हाल करतात २ त्याला हे तरवारीच्या धारेवर धरतात, वृक्षांमधील श्रेष्ठ असणाऱ्या खैराच्या लाललाल विस्वावर चालायला लावतात, ज्यातून ज्वाला निघत आहेत अशा तेलात किंवा पाकात टाकतात ३ तापलेल्या भूमीवर लोळवितात अग्नीच्या तप्त खांबास दोन्ही हातानी मिठी मारायला लावतात ४ हे त्याचे हाल पाहून तुकाराम महाराज म्हणतात, मी काकुळतीस येत आहे आता मला हे गर्भवास नकोत ५ १ मुखी बडबडी भलतेचि, २ घालविती पायीं
सार्थ तुकारामगाथा ३८५ ८०६ अल्प माझी मती । म्हणोनि येतो काकुलती ॥ १ ॥ आतां दाखवा दाखवा । मज पाऊलें केशवा ॥ २ ॥ धीर माझ्या मना । नाहीं नाहीं नारायणा ॥ ३ ॥ तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मती-बुद्धी. अर्थ :- देवा, माझी बुद्धी फार अल्प असल्यामुळे मी फार काकुळतीस आलो आहे रे. १ केशवा, आतां मला तुमची पाऊले दाखवा ना. २ माझ्या मनास आता धीर निघवत नाही नारायणा, आता नाही सहन होत रे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता या मजसारख्या अभाग्यावर एकदा दया कर ना. ४ ( हाच अभंग पुढे क्र. १६३३ वा म्हणून आलेला आहे. ) ८०७ वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाऊलें कें वो डोळां ॥ १ ॥ तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥ २ ॥ तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाटुली-वाट, वास-वाट, आसावल्या-उत्सुक झाल्या आहेत, क्षेम-आलिंगन. अर्थ :- देवा, तुमची वाट पाहून पाहून माझे डोळे शिणून गेले आहेत. तू तुझी पावले माझ्या डोळ्यांना कधी दाखविणार आहेस ? १ तू माझी प्रेम माउली व कृपेची सावली आहेस ना ? विठ्ठले, तुझी वाट तरी किती पाहावयाची मी ? २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुला आलिंगन देण्यासाठी माझे बाहू फार उत्सुक झाले आहेत. ३ ८०८ देह हा सादर पाहावा १ निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥ १ ॥ ब्रह्म जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रह्मरूप ॥ २ ॥ यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुष्या ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- यजन-होमहवन, याजन-दत्तयाग वगैरे. अर्थ :- तुम्हास देह जर निश्चितपणे समजावून घ्यायचा असेल तर सर्व सुखांचे सार जे नामस्मरण आहे, त्यातच तो पाहावा. या नामरूपाच साहाय्याने त्याचे सार्थक होईल. १ द्वैताच्या अथवा दोनपणाच्या बुद्धीचा जेव्हा नाश होईल, तेव्हाच ब्रह्माचा साक्षात्कार होईल, व मग हे शरीरही ब्रह्मरूप होऊन जाईल. २ पुष्कळ लोक होमहवन, यज्ञयाग वगैरे करतात. नाना प्रकारची व्रते व तपे आचरतात; पण त्यांच्या मनांत विकल्प असल्यामुळे शुद्ध पुण्य काही त्यांना कधीही मिळत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या नामात मात्र सर्व प्रकारचे सुख असून, सर्व भ्रांती दूर करून या नामाचाच सर्वांनी आश्रय धरावयास हवा. ४ ८०९ तुझें वर्णू गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥ १ ॥ मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ २ ॥ रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हैं झकवे ब्रह्मादिक ॥ ३ ॥ ब्रह्मादिकां देवां कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमूप वाणू काई ॥ ५ ॥ १ पाहावया. तु. गाथा....४९
३८६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - श्रुती-वेद, थोटावल्या-कुंठित झाल्या, शक्ये-फसले, खचाटी-खाच, त्रास, आटाटी- खटाटोप, याणू-दंभू अर्थ - देवा, तुझे रूप वर्णन करता येईल अशी बुद्धी मला नाही प्रत्यक्ष वेदांनाही तुझे वर्णन करता येत नसल्याने ते मौन राहिले आहेत १ परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारही वाणी तुझे वर्णन करताना कुंठित झाल्या असे हे तुझे रूप आहे २ तुझ्या रूपास डोळयांना पाहावतही नाही त्याकडे पाहण्याच्या उद्योगात ब्रह्मादिकही फसून गेले आहेत ३ ब्रह्मादिय देवांना कर्माची कटकट मागे लागल्यामुळे तर त्यांना हा खटाटोप करावा लागत असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे गुण, नाम, रूप इत्यादी सर्व न मापण्यासारखे असल्याने त्याचे वर्णन मी काय करावे ? ५ ८१० मनवाचातीत तुझें हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ति केले ॥ १ ॥ भवतीचिया मापें मोजितो अनंता । इतराने तत्वता न मोजवे ॥ २ ॥ योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सापडसी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही भोळया भावे सेवा । घ्यावी जी केशवा करितो ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मनवाचातीत-मन व वाणी याच्या पलीकडे अर्थ - ईश्वरा, तुझे हे रूप मन, वाणी यांनी न समजण्यासारखे आहे याच्याही पलीकडे हे आहे म्हणून भक्तीच्या मापाने त्याला मोजण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे थोडेसे आकलन होते १ मी या अनंताचे मोजमाप भक्तीच्या मापानेच करितो इतर साधनांनी याची खरी पारख होत नाही २ यज्ञ, याग, तपे, देहाची कर्मे, ज्ञानी माणसांची तपश्चर्या याच्या साहाय्याने हे रूप कधीच सापडणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु केशवा, आम्हासारख्या भोळया भावाच्या भक्ताची सेवा मात्र तू प्रेमाने घ्यावीस ४ ८११ देवा ऐसा शिष्य देईं । ब्रह्मज्ञानी निपुण पाहीं ॥ १ ॥ जो का भावाचा आगळा । भक्तिप्रेमाचा पुतळा ॥ २ ॥ ऐसा युक्ति ज्याला बाणे । तेथें वैराग्याचे ठाणे ॥ ३ ॥ ऐसा जाला हो शरीरी । तुका लंवलोण करी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आगळा-निराळा, विशेष अर्थ - देवा, असा एक मला शिष्य दे, की जो ब्रह्मज्ञानात निपुण आहे १ ज्याचा तुजविषयीचा भाव विशेष स्वरूपाचा असेल, व जो भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा असेल, असा शिष्य मला दे २ अशी भक्तिप्रेमाची युक्ती ज्याला साधते, तिथेच वैराग्याचेही स्थान असते ३ असा हा शिष्य प्रत्यक्ष शरीरानेही ब्रह्मस्वरूप झालेला असावा मी तुकाराम त्याच्यावरून माझा जीव ओवाळून टाकीन ४ ८१२ जबवरी नाही देखिली पंढरी । तोवरी वर्णिसो¹ थोरी वैकुंठींची ॥ १ ॥ मोक्षसिद्धि तेथें हिंडे दारोबारी । होऊनि कामारी दीनरूप ॥ २ ॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिनव सोहोळा घरोघरीं ॥ ३ ॥ नामघोष कथापुराणकीर्तनी । ओविया कांडणीं पाडुरंग ॥ ४ ॥ सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्म ते केवळ नांदतसे ॥ ५ ॥ तुका म्हणे जें न साधे सायासे । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरि ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कामारी-सेवक, सायासे-प्रयत्नाने १ वर्णिसोल
सार्थ तुकारामगाथा ३८७ अर्थ - जोपर्यंत पंढरपूर क्षेत्राचे दर्शन झालेले नाही, तोपर्यंतच वैकुंठाची थोरवी तुम्ही वर्णन कराल १ या क्षेत्रात मोक्षाची सिद्धी सेवकाप्रमाणे दीन रूप धारण करून घरोघरी जाऊन हिंडत असते २ येथे प्रत्येकाच्या घरी अंगणात तुळशीवृंदावन असून सडे टाकलेले असतात रांगोळ्या काढलेल्या असतात प्रत्येकाच्या घरी मोठा अभिनव सोहळा चालू असतो ३ येथे कथाकीर्तनात एकसारखा विठ्ठलाचा नामघोष चाललेला असतो दळणदळण करताना येथे पांडुरंगाच्या ओव्याही गाइल्या जातात ४ या ठिकाणी सर्व प्रकारची सुखे नेहमी भक्तांच्या सेवेत तयार असतात येथे परब्रह्म मूर्तिमंत होऊन नांदत असते ५ तुकाराम महाराज म्हणतात, जे मोठ्या प्रयत्नाने मोठमोठ्यांना साध्य होत नाही, ते हे रूप येथे पंढरीत विटेवर प्रत्यक्ष दिसते ६ ८१३ दुख वाटे ऐसी ऐको नये' गोष्टी । जेणे घडे तुटी तुझ्या पायी ॥ १ ॥ येतो कळवळा देखोनि या घात । करितो फजित नाइकती ॥ २ ॥ काय करु देवा ऐसी नाहीं शक्ति । दडुनि पुढती वाटे लावू ॥ ३ ॥ तुका म्हणे मज दावू नको ऐसे । दृष्टीपुढे पिसे पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तुटी-वियोग, दडुनि-शिक्षा करून, पिसे-वेडे अर्थ - देवा, जेणेकरून तुमच्या पायाचा वियोग होईल व मनाला दुख होईल अशा गोष्टी तू मला ऐकू येतील असे करू नकोस १ या प्रापंचिकांची केवळ ऐहिक दृष्टी पाहून माझ्या मनात फारच कळवळा निर्माण होतो रे त्यांचा हा घात पाहून मी त्यांची फजिती करून पाहिली, परंतु ते काही ऐकतही नाहीत २ देवा, मी यांच्या- साठी काय करू रे ? यांना चांगली शिक्षा करून मार्गाला लावावे अशी शक्तीही माझ्याजवळ नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असे संसाराच्या आसक्तीने वेडे झालेले लोक माझ्या दृष्टीपुढे सुद्धा नकोत ४ ८१४ शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥ १ ॥ तेयीं अभक्तासी आवडे पाखांड । न लगे त्या गोड परमार्थ ॥ २ ॥ श्वानासी भोजन दिले पंचामृत । तरी त्याचे चित्त हाडावरि ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जाले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शूकरासी-डुकरास, पाखंड-नास्तिकपणा, वमितां-ओकल्यावर अर्थ - डुकरासारख्या प्राण्यास विष्ठा सावकाशपणे चघळोत राहणेच आवडते त्याला जरी मिष्टान्न वाढले, तरी त्याचा उपयोग त्याला काय ? त्याला काय गोडी वाटणार त्या पक्वान्नाची ? १ त्याप्रमाणे जे अभक्त आहेत, त्यांना केवळ नास्तिकपणाच आवडतो त्यांना कधी परमार्थ गोड लागतच नाही २ कुत्र्याला जरी पंचामृताचे भोजन दिले, तरी त्याचे चित्त हाडे चघळण्यावरच राहणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, सापाला जरी दूध पाजले, किंवा क्षीर पाजली, तरी तो विषाच्या रूपानेच ओकले जाणार ४ ८१५ रासभ धुतला महा तीर्थामाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥ १ ॥ तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचे ॥ २ ॥ सर्पासी पाजिले शर्करापीयूष । अंतरींचे विष जाऊ नेणे ॥ ३ ॥ तुका म्हणे श्वाना क्षीरीचे भोजन । सवेचि वमन जेवी तया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -रासभ-गाढव, शामकर्ण-शुभ्रकर्णी घोडा, खळा-दुष्टास, शर्करापीयूष-साखरमिश्रित दूध अर्थ - गाढवाला गंगेच्या तीर्थाने जरी न्हायला घातले, तरी काही त्याचा शुभलक्षणांनी युक्त असा देखणा घोडा होणार नाही १ त्याप्रमाणे दुष्ट असणाऱ्या माणसास उपदेश करून काय उपयोग ? त्याचे मनच कधी शुद्ध १ ऐकोनिया
३८८ सार्थ तुकारामगाथा भरावे २ साखरेने युक्त असणारे दूध जरी सापाला पाजले, तरी त्याच्या अत्तरगातील विष नाहीसे कसे होणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, कुत्र्याला जरी गोड खिरीचे भोजन वाढले, तरी ते घटकन ओकून पडेल ४ ८१६ जेवीं नवज्वरें तापले शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥ १ ॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ २ ॥ कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥ ३ ॥ तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रचे त्या गोडी नवनीताची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सन्निपात-वात, कफ, पित्त याचा प्रकोप कामिनी-कावीळ अर्थ - ज्याचे शरीर नवज्वराने तापले आहे, त्याला दूध विषाप्रमाणे कडूच लागणार १ त्याचप्रमाणे ज्याना परमार्थविचार दुरावलेला आहे, त्याला सन्निपातासारखा रोग झाला आहे असेच समजावयास हवे २ ज्याच्या डोळ्यांना कावीळ झाली आहे, त्याला सर्व जगत चंद्रासह पिवळेच दिसणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला मद्यपानाची आवड आहे त्याला ताज्या लोण्याचीही चव काय बरे असणार ? ४ ८१७ आता असो मना अभक्ताची कथा । न होईं दुश्चिता हरिनामीं ॥ १ ॥ नये त्याची कदा गोष्टी करु मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नांवे ॥ २ ॥ प्रभाते न घ्यावे नाव माकडाचें । तैसे अभक्ताचें सर्वकाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे आता आठवू मंगळ । जेणे सर्व काळ सुखरूप ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुश्चिता-उदास, मंगळ-पवित्र अर्थ - मना, आता जे अभक्त आहेत, त्याची गोष्ट राहू दे दूर तू मात्र हरिनामाविषयो उदास होऊ नकोस १ त्याच्यासबधी आता तू कधीही विचार करु नकोस त्याचे नाव घेतले तरी, जिभेस प्रायश्चित्त घ्यावे लागेल २ सकाळच्या प्रहरी जसे माकडाचे नाव घेऊ नये, त्याचप्रमाणे त्या अभक्ताचेही नाव कधी घेऊ नये ३ तुकाराम महाराज म्हणतात आता अत्यंत पवित्र असा जो विठ्ठल त्याचेच स्मरण करू, तोच नेहमी सुखरूप असा आहे ४ ८१८ नाम आठविता सद्गदित कंठी । प्रेम बाढे पोटीं ऐसे करों ॥ १ ॥ रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टाय हीं गात्रीं प्रेम तुझें ॥ २ ॥ सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊ निशदिनीं नाम तुझें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुजें न फिरों कल्पातीं । सर्वदा विश्रांति सता पाईं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेंचो-खर्च होवो दुजें-दुसरे अर्थ - देवा, तुझे नाव आठवताच कठ सद्गदित व्हावा, अशा प्रकारचे प्रेम मनात वाढेल असे तू कर १ या सर्व अगावर रोमांच उभे राहावेत, डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहावेत आणि सर्व अष्टागात्ही तुझे प्रेम भरून यावे असे देवा, तू कर २ तुझ्या नामसकीर्तनात माझे सर्व शरीर खर्च व्हावे व रात्रदिवस देवा, तुझेच नाम मी गावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कल्पाचा शेवट झाला तरी याजरीज दुसरे तू काहीही करू नकोस नेहमीच मला सतांच्या पायी विश्राती मिळल असे कर तू ४ ८१९ जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुख धर्म जें जें काहीं ॥ १ ॥ अधापुढें जेणे दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥ २ ॥ शरणागता जेणे घातले पाठीशी । तो जाणे तेविशीं राखो तया ॥ ३ ॥ कासे लागे तया न लगती सायास । पोहोनारा त्यास पार पावी ॥ ४ ॥ तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥ ५ ॥
सार्थ तुकारामगाथा ३८९ शब्दार्थ व टीपा :- पार पायीं-पैलतीरावर पोचवितो. अर्थ :- आपल्या मुलाचे वर्म नेमके कोणते आहे, हे त्याची आई बरोबर ओळखत असते. त्याचे जे सुख किंवा दुख असेल ते तिला सर्व माहीत असते. १ एखाद्या आंधळ्यास जो आधार देतो त्यालाच पुढल्या पाऊलवाटेचा वा संकटांचा विचार करावा लागतो. २ शरण आलेल्यास ज्याने अभय देऊन पाठीशी घातले आहे, तोच त्याच्या रक्षणाविषयी जाणतेपणाने जाणीत असतो. ३ पाण्यात बुडणाऱ्यास काढण्यासाठी ज्याने कास घातली आहे, त्याला त्याचे काही वाटत नाही. फारसे प्रयत्नही करावे लागत नाहीत. हा पोहणारा मनुष्य ह्या बुडणाऱ्या इसमास सहजा- सहजी पैलतीरावर नेऊन पोचवितो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा आपला हा जीव विठ्ठलाच्या हातांत दिल्यावर त्याचे कार्य तो रक्षणाचे करणारच. ५ ८२० नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥ १ ॥ खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघेंच जाये एका घांसें ॥ २ ॥ जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें न मना¹ विषाद । निंबेविण व्याध तुटों नये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मासो-माशी, जोडी-प्राप्ती, व्याध-रोग, न मना-मानू नका. अर्थ - विधिनिषेधांच्या कचाट्यात तुमचे मन गुंतवू नका केवळ पांडुरंगाचे स्मरण सतत करा, म्हणजे झाले १ खाऊन झालेल्या अन्नाच्या शेवटच्या घासाच्या वेळी त्यात माशी पडली होती असे बोलू नये. केवळ एका घासासाठी मग सर्वच कल्पनेने ओकावे लागते. २ कोणत्याही चांगल्या गोष्टीची प्राप्ती सहजासहजी होईल एखाद्या वेळेस; पण त्याचे रक्षण मात्र नीट काळजीपूर्वक करावे लागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या बोलण्याचा राग मानू नका तुम्ही कोणी. कडू लिंबाच्या रसातून औषध घेतल्यावाचून शरीरात मुरलेला रोग दूर होणार तरी कसा ? ४ ८२१ नको होऊं देऊं भावों अभावना । याचि नांवें जाणा बहु दोष ॥ १ ॥ मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्या उसर लाभ नाड ॥ २ ॥ उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरू तैसा फळे त्यासी ॥ ३ ॥ तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जिव्हाळ्या-सुपीक जमीन, उसर-नापीक जमीन, न -तोटा. अर्थ :- देवा, माझ्या मनात तुमच्याविषयी जो भक्तिभावना आहे, तीत अभावना म्हणजे विपरीत भावना निर्माण करू नका. कारण यामुळे फार मोठा दोष निर्माण होईल १ जर पुष्कळ पाऊस पडला तर सुपीक जमिनीचा फायदा होईल व नापीक जमिनीचा तोटाच होईल. २ कल्पतरुच्या छायेखाली बसून चांगली कल्पना केल्यास चांगले फळ मिळेल. वाईट कल्पना केली तर वाईट फळ मिळेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आपले आयुष्य फार थोडे असल्यामुळे जेणेकरून हित होईल, असे तुम्ही नेहमी पाहात जा. ४ ८२२ त्याग तंव मज न यजतां केला । कांहींच विठ्ठला मनांतूनि ॥ १ ॥ भागलिया आला उपग सहज । न धरितां फाज जालें मनीं ॥ २ ॥ देह जड जालें ऋणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥ ३ ॥ तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- न यजता-ध्यानात न येताच. १ माना.
३९० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- देवा, विठ्ठला, प्रपंचातील गोष्टींचा त्याग माझ्या मनातून सहजच, ध्यानात न येताही होत राहिला. १ संसाराच्या त्रासाने मी दमलेलो असल्यामुळे त्याग करावा असा भाव मनात येण्यापूर्वीच सहजासहजीच त्याग घडला. २ संसाराच्या भारामुळे, ऋणाच्या ओझ्यामुळे, माझा देह फारच जड झाला होता; आणि या संसा- राच्या तापामुळे मी फारच कासावीस झालो होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण आता मात्र परमार्थाच्या मार्गाविषयीचा आळस माझ्या मनातून पुरता गेला व असंख्य अशा संसारापासून निर्माण होणाऱ्या दोषांपासून मी मुक्त झालो. ४ ८२३ मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणवियाचे वाणी रवलाहें ॥ १ ॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावले नरदेह ॥ २ ॥ ओटोन्ऱ्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि केंवाडें स्वहिताचें ॥ ३ ॥ नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥ ४ ॥ तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाणी-धंदा, फावलें-प्राप्त झाले, केंवाडें-निश्चय. अर्थ :- शेतीचा धंदा करणाऱ्या कुणब्यास किंवा शेतकऱ्यास वेळ आली तर घरातील प्रिय माणसाचा मृत्यू झाला तरी, ते प्रेत तसेच झाकून ठेवून प्रथम शेत पेरण्याचे काम पाहावे लागते. १ त्याप्रमाणे तुम्ही आपले स्वतःचे हित साधावे. ज्यांना हे मानवी शरीर प्राप्त झाले आहे, त्यांनी तरी या हिताचा विचार करावा. २ धान्य पेरताना शेतकऱ्याच्या ओटीवर जे धान्य असते, त्याच्यापेक्षा पाभरीवरील मुठीत थोडे असले तरी ते जास्त समजायला हवे; कारण त्यातूनच अनेक पटींनी धान्य निर्माण होणारे असते; वाढणारे असते. त्याचप्रमाणे वाढ- णाऱ्या स्वहिताचा तुम्ही विचार निश्चयाने करावा. ३ कारण काळाची सत्ता काही आपल्या हातात नसते. जाणत्या माणसाने हे जाणून जन्ममृत्यूचा गुंता सोडवावा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी ही सूचना तुम्हांस केली आहे. जो या मृत्युलोकी शहाणा असेल त्यानेच हिचा विचार करावा. ५ ८२४ राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥ १ ॥ कोणी कोणाएथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ २ ॥ शृंगारि¹एलेंही तगोंपेत वरि । उमटे लौकरि जैसें तैसें ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खूण साम्या² येते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सांगातें-बरोबर, तगोंपेत-टिकून राहात्त. अर्थ :- जेथील मार्गाने राजा चाललेला असतो, त्याच मार्गाने त्याचे सर्व वैभव येत असते. त्या छत्रचामर- धारीना किंवा हत्तीघोड्यांना हे काही सांगावे लागत नाही. १ या जगात कोणीही कुणास विनाकारण मान देत नाही देवाच्या कृपेशिवाय असा मानही कुणाला मिळणार नाही २ एखाद्या वस्तूस वरवर शृंगारून टाकिले तरी, ती शोभा काही कायमची टिकून राहात नाही जे मूळचे स्वरूप असेल तेच लौकर बाहेर पडते. ३ तुकाराम महा- राज म्हणतात, ज्याच्या हृदयामध्ये नारायणाने निवास केला आहे, त्याच्यावर सर्वत्र समत्वाने पाहण्याची दृष्टी येऊन त्याच्यावर कृपाच होते. त्याचे समत्वदर्शन हीच त्याच्या कृपेची खूण होय ४ ८२५ वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आविर्भाव² ॥ १ ॥ शिकविले काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ २ ॥ सांडिले तें नाहीं घेत भेळवितां । म्हणऊनि लाता मार्गे सारी ॥ ३ ॥ तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥ ४ ॥ १ दिसो, २ आनुर्भाव.
सार्थ तुकारामगाथा ३९१ शब्दार्थ व टीपा :- आणिकांच्या-दुसऱ्याच्या, मेळवितां-भेटविल्यावर. अर्थ :- एखादे वासरु पुढे पळू लागले तर, त्याची आई (गाय) त्याच्यापाठीमागे धावत जाते कारण या वासराविषयीचा प्रेमभाव त्या गाईच्यामध्ये सहजच निर्माण झालेला असतो. १ असे हे प्रेम शिकवून कधी उपयोगास येईल काय ? मनातील गूढ प्रेमाचा तंतूच दुसऱ्याच्या मनास ओढीत असतो. २ पुढे वासरू मोठे झाले की गाय मग त्यास सोडून देते; मग पुनः तिला जरी ते बळेच भेटविले, तरी ती काही त्याला प्रेमपान्हा पाजीत नाही, उलट लाथा मारून ती त्याला दूरच करील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीचे प्रेम आग्रह करून निर्माण होत नाही. अगचा अनुभवच ते बोलून दाखवीत असते. ४ ८२६ देवाच्या संबंधें विश्वचि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥ १ ॥ आहाघ हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनौं देखें सामावलें ॥ २ ॥ आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरौँ तेणें न्यायें ॥ ३ ॥ तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभाचि पुढती विशेषेता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाघ-व्यर्थ, उगाच. अर्थ :- एकदा देवाचा संबंध आल्यावर मग सर्वच विश्वच आपले सोयरे बनून राहते आणि मग परस्परांच्या आंतरिक नात्याची सूत्रे एकमेकांना ओढीत राहतात. १ असे हे विश्वात्मक प्रेम उगाच वरवरचे व पटकन वीट येणारे नसते. या प्रेमात जीव स्वत चे जे जीवन परमेश्वरस्वरूप त्यात सामावून गेलेला असतो. २ या प्रेमाचे लक्षणच असे असते की, इतरांचे सुखदुःख याच्या अत करणात उमटते व याच न्यायाने याला एकाला झालेले दुख इतरत्र उमटून राहते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे शुद्ध स्वरूपाचा एकात्मभाव अंतःकरणात दृढ झालेला असल्यामुळे त्याची शोभा उत्तरोत्तर वाढीसच लागलेली असते. ४ ८२७ अवघा वेंचलौं इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥ १ ॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ २ ॥ कायावाचामनें तोचि निजध्यास । एथें जालों ओस भक्तिभावें ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेचलों-खर्च झाले, धावणे-रक्षण. अर्थ :-देवा, या इंद्रियांच्याच ओढीमुळे माझे सर्व आयुष्य खर्च झाले. याविषयी जे ज्या ज्या वेळी घडले, ते ते सर्व मी तुम्हांस सांगितले आहे. १ देवा, आपल्याला हा विचार माहीत असावा म्हणून सांगून माझ्यावरचा भार मी कमी केला आहे. २ माझ्या शरीराने, वाणीने, मनाने विषयांचा ध्यास एकसारखा घेतल्यामुळे मी भक्ति- भावरहित होऊन बसलो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, नारायणा, तुम्हांस जर माझे रक्षण करावयाचे असेल तर, माझा सांभाळ आताच करावा. ४ ८२८ राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपटो ॥ १ ॥ फोडकंडुनि घरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ २ ॥ होईल येणें कळसा आलें । स्थिरावले अंतरीं ॥ ३ ॥ तुका म्हणे गोजिरिया । विठोया पायां पडों द्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- लंपटो-जडून राहो, कळसा आलें-परिपूर्ण झाले. अर्थ :- आता श्रीविठ्ठलाचे हेच ध्यान माझ्यासमोर स्थिर व्हावे. यावरच माझे डोळे व मन जडून राहावेत. १ या पांडुरंगाला मी आता माझ्या हृदयात कोंडून ठेवीन व देहभावाच्या प्रेमाने मी याला ओवाळीन. २ याप्रमाणे
३९२ सार्थ तुकारामगाथा विठ्ठलाचे हे एक ध्यान हृदयात स्थिर झाले म्हणजे, सर्व परिपूर्ण झाले असे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, गोजिरवाण्या दिसणाऱ्या विठोबा, मला तुमच्या पाया पडू द्यांत, ४ ८२९ आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तो आपणापें यत्न बरा ॥ १ ॥ दास्यत्वे दाखिले धन्याचें भांडार । तोतो नव्हे सार एथुनिया ॥ २ ॥ उपायाने सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आले ॥ ३ ॥ तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचनचि फरी बैसोनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दीपे-दिव्याने, सोस-इंद्रियसुखाची हौस अर्थ - कोणत्याही पदार्थांचा आदी, मध्य, अंत काळोखात दिव्यानेच स्पष्ट होतो त्यामुळे अशा या दिव्या- च्याच उपयोगाचा आश्रय करावा हे बरे १ दास्यत्वामुळेच धन्याचे भांडार दृष्टीत पडते ही वृत्ती जर अंगी बाणली नाही, तर मात्र ते भांडार दृष्टीस पडणार नाही २ या ईश्वराच्या प्रेमाच्या उपायाने इंद्रियसुखाची हौस सर्व संपली आणि या प्रभूच्या प्रेमाचीच सत्ता अंगी बाणून राहिली ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमची दृष्टी सर्वांच्यावर सारखी असते आणि बसल्याबसल्याच आम्ही सर्वांना आज्ञा करीत असतो ४ ८३० साटविले वाण । पैस घातला दुकान ॥ १ ॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥ २ ॥ निवडिले साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥ ३ ॥ तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाण-माल, पैस-ऐसपैस, मोठे अर्थ - भक्तीच्या नाना प्रकाराचा माल मी माझ्या दुकानात भरलेला आहे मी दुकान चांगले ऐसपैस घातले आहे १ जे कुणाला ज्या वेळी पाहिजे, ते त्याने सागावे सर्व काही जवळच येथे तयार आहे २ उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा प्रकाराचा खराखुरा माल निवडून आम्ही ठेविला आहे ३ तुकारामच या दुकानावर बसून जो ज्या भावाने, वृत्तीने मागणी करील त्याप्रमाणे तो मालाचा पुरवठा करीत आहे ४ विवरण - तुकारामबुवा धंद्याने वाणी होते हे प्रसिद्ध आहे व्यापार करावा, थोडी सावकारकीही करावी, दुकानदारी चालवावी, हा त्यांचा धंदा होता याच धंद्यात पुढे तूट आली, दुष्काळामुळे द्रव्य संपून गेले, दुकानाच दिवाळे निघाले, वैराग्यशील वृत्ती मूळचीच ती अधिक परमात्मप्रवण होऊन हरिभजनात दङ्ग झाली भामनाथाच्या डोंगरावर वृक्षवल्लीच्या सहवासात रममाण झाली ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व गीता याच्या पारायणांनी व नामस्मरणाच्या सतत संगतीने बुवांची वृत्ती उल्हसित व प्रसन्न झाली नामसंकीर्तन व भजन हा सोपा माग हाताशी आला. नामदेवाकडून कवित्वाची प्रेरणा झाली सद्गुरुनाथांनी कृपा केली तुकोबाच्या मुखातून प्रसादपूर्ण अशी अभंग वाणी स्रवू लागली त्याच्या अभंगवाणीत काव्यगुणांचे सर्वोत्तम दर्शन होत हे खरेच परंतु परमेश्वराशी प्रेमपूर्वक कलह करीत असताना, आपला मुद्दा स्पष्ट करताना एखादा सिद्धान्त सांगताना बुवा कधी उदाहरण म्हणून कधी रूपक म्हणून आपल्या धंद्याचा अथवा व्यवसायाचा उपयोग मोठ्या चातुर्याने व समर्पक रीतीने करतात 'फोडिले भांडार धन्याचा हा माल' ही प्रसिद्ध ओळ (क्र ६९६ ) आपण पाहिलीच आहे याखेरीज अनेक ओळीत तुकारामबुवा आपल्या व्यापाराच्या, दुकानदारीच्या व्यवसायाचा मोठ्या गमतीने पण समर्पक रीतीने उल्लेख करितात 'येथ हातीं येच हातों । वाधा गांठीं पारखून', 'उतरला कसीं खरा माल', 'सवंग जाले सवंग जाले । घरा आले बदरोचे', 'पंढरी चोहोटा घातले दुकान', 'नाम घ्यारे कोणी फुका । भाव सांगतसे तुका', 'उधार घ्यारे उधार घ्यारे । अवघे मारे जातीचे', 'दुबळा तुका मावहीन । उधार देय घेतला ऋण', 'माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही', 'मुद्दल
६. वैराग्य व आत्म-निवेदन
सार्थ तुकारामगाथा ३९३ जतन झाले । मग तामाचे काय आलें ?', 'प्रेम व्याज देई हरी । माझा हिशेब लवकरी करी' यासारख्या अनेक वचनांतून तुकोबांनी व्यापारी वृत्तीला वरवर तरी विसंगत वाटणाऱ्या परमार्थवृत्तीशी भावपूर्ण अंत करणाने रंगविले आहे ८३१ लागलिया मुख स्तना । घाली पान्हा माउली ॥ १ ॥ उभयता आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ २ ॥ मेळविता अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥ ३ ॥ तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-हौस, जड-ओझे अर्थ - या विठाईमाउलीच्या स्तनास मुख लावताच तिच्या प्रेमाला पान्हा फुटतो १ या ठिकाणी माउली व तिचे मूल या उभयतांच्या लाडास व कौतुकास हौसेचे भरते येते २ अंग अंगाला मिळवून, मुलाला पोटाशी धरून प्रेमाचा रंग बहारीने वाढतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या प्रकारे आईच्या शिरावर मुलाची फार मोठी जबाबदारी असते याच्या कल्याणाचे फार मोठे ओझे तिला वागवावे लागते ४ ८३२ अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठािले । मागें होत आले शिष्टाचार ॥ १ ॥ दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा । हा तो नव्हे बरा सत्यवाद ॥ २ ॥ मद्य आणि मधु एकरासी मावे । तरि का ते खावे आधारे त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदामेद दृष्टिन्यायैं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - एकरासी-एकाच वर्गातील अर्थ - यापूर्वी अवगुणाची अथवा दुर्गुणाची प्रतिष्ठा बळच कुणीही केलेली नाही पूर्वोपासून चांगल्या आचाराचेच पालन होत आले आहे १ अशी स्थिती असताना उगाच दुबळ्या माणसाच्या नावाने डांगोरा पिटावा, हे काही ठीक नाही ही गोष्ट सत्यालाही धरून नाही २ मद्य व मध या वस्तू एकाच वर्गातील असल्या तरी, मद्याचे सेवन मधाच्या आधाराने करणे इष्ट आहे काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या कृपेने मेघ- वृष्टीप्रमाणे मला उपदेशाचा उच्छिष्ट प्रसाद मिळालेला असल्याने, त्यायोगे गुण व अवगुण याची अथवा भेद व अभेद याची निवड मी करू शकतो ४ ८३३ मूर्ती भगवंत । हा तो जाणतों संकेत ॥ १ ॥ भारी मोकलितो बाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ २ ॥ करावा उपदेश । निवडोनि तरि दोष ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे । चुकता आडराने कांटे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोकलितों-सोडतो अर्थ - सर्व भूतमात्रांमध्ये भगवंताचाच अंश भरून राहिला आहे, हे तर मी जाणतो १ म्हणूनच मी शब्दरूपाचे तीक्ष्ण बाण सोडीत असतो या बाणाचा गुण ज्याचा त्यास बरोबर समजतो २ दोष वगळून योग्य तो उपदेश करावा, हेच मी जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नीट सरळ मार्ग सोडून जर आडवाटेने गेलात तर पायांना काटे टोचतील मात्र ४ ८३४ आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥ १ ॥ कासयाचा धाक एकाच्या निरोपे । काय व्हावे कोपें जगाचिया ॥ २ ॥ तु गा ५०
३९४ सार्थ तुकारामगाथा अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नीत-नीतीचा विचार, विकरा-विक्री अर्थ - वाट चुकलेल्या जगास काही नीतिविचार सागावा, हेच आम्हास कौतुकाचे आहे जे कोणी वागायला चुकतील, त्यांची फजिती करावी हेच आम्ही पाहतो १ त्या एका देवाचा निरोप नीटपणे लोकांना सांगितला तर त्यात कसली बाधा आहे ? यासाठी लोक कितीही रागावले तरी काय होणार आहे ? २ या आमच्या भक्तिमार्गात रामनामाचे बाण सुटत असल्यामुळे येथे अविद्येस थाराच मिळत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, येथे खरा- खुरा उपदेश असेल त्याचीच विक्री होत असून खोट्या प्रकारचे येथे काही चालत नाही ४ ८३५ दर्पणासी १नकटें लाजे । शुद्ध बिंब देखोनि ॥ १ ॥ ऐसे अवगुणाच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ २ ॥ अधळयास काय हिरा । गाराचि तो सारिखा ॥ ३ ॥ तुका म्हणे भुके सुने । ठाया नेणे ठाव तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दर्पणासी-आरशाला नकटें-नकटा नावाचा, सुदें-चांगले, सुनें-कुत्रे अर्थ - समोर आरशात तोंड पाहून नकटा मनुष्य लाजतो व चांगला आरसा असला तरी तो त्या आरशावरच चिडतो १ याप्रमाणे जो अवगुणाच्या बाधेने पीडलेला आहे, त्याला जे जे चांगले आहे, ते ते सर्व विपरीतच दिसते २ आंधळ्याला हिरा दाखवून काय उपयोग ? तो त्याला गारेप्रमाणेच वाटणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे उचित, अनुचित न पाहता कुत्रे नुसते भुकतच राहते ४ ८३६ नायडे तरि का येतील हे भाड । घेउनिया तोंड काळें येथें ॥ १ ॥ नासोनिया जाय रस यासगती । खळाचे पंगती नारायणा ॥ २ ॥ तोंडावाटा नर्क काढी अमगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनैं ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं सताची मर्यादा । निंदे तोचि निंदा मायझावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भाड-भांडखोर लोक, खळाचे-दुष्टाच अर्थ - या भांडखोर माणसाना आमचा भक्तिमार्ग जर पसंत नाही, तर मग पुन पुन काळे तोड दाख- विण्यासाठी हे आमच्याकडे येतात तरी कशाला ? १ नारायणा, या दुष्ट लोकांच्या संगतीने व पंगतीने आमच्या प्रभुत्रेमाचा सर्व रंग बिघडून जातो ना ? २ हे दुष्ट लोक आपल्या मुखातून अमगल अशी वाईट वचने काढतात व कुत्र्याप्रमाणे चांगल्या अन्नाला शिवून विटाळ पसरवितात ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला सताची मर्यादा राखता येत नाही, मान ठेवता येत नाही, जो त्याची निंदा करतो, तो अति दुष्ट समजावा ४ ८३७ लेकरा आइति पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥ १ ॥ त्यापरि आमचा जालासे साभाळ । देखिलाचि काळ नाहीं आड ॥ २ ॥ भुकेचे सनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥ ३ ॥ आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आइतें-आयत अर्थ - पित्याने जन्मभर जे जे साठविलेले असते, ते आयतेच उभे करून तो मुलासमोर ठेवतो सर्व सपत्ती त्याने जो मिळवलेली असते, ती तो त्याच्या स्वाधीन करतो १ त्याचप्रमाणे या देवाने आमचा साभाळ केलेला असल्याने, आम्ही काळाला कधी पाहिलेच नाही २ भूक लागली की, प्रेमाचे स्तनपान द्यायला आई जवळच उभी १ नकटें
आहे नाना उपाय करण्याची चिंता आम्हास काही करावी लागत नाही ३ हा तुकाराम त्या पांडुरंगास आळवीत भवमदीच्या एका तीरावर उभा आहे, असे पाहून पाडुरंगाने त्याला वाचविण्यासाठी नदीत उडीच टाकलेली आहे ४ ८३८ शुद्ध चर्या हेचि संताचे पूजन । लागतचि धन नाही वित्त ॥ १ ॥ सगुणाचे सोई सगुण विधाती । आपणचि येती खोजवीत ॥ २ ॥ कीर्तनींचि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणे वास सन्निधता ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म सांगतो सबगें । मन लावा मार्गे स्वहिताच्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चर्या-दिनक्रम आचार, खोजवीत-शोधीत, वोरस-प्रसाद अर्थ - आपले आचारविचार व रोजचा कार्यक्रम शुद्ध ठेवणे हेच खरे म्हणने संताचे पूजन आहे आणखी काही धन किंवा संपत्ती यासाठी लागत नाही १ या श्रीहरीच्या सगुण रूपाच्या प्राप्तीमुळे हे सगुण रूपच आपण होऊन आपल्या भक्ताला शोधीत येत असते २ हा श्रीहरी दूर असला तरी कीर्तनाच्या वेळी याच्या कृपेचा रस किंवा प्रसाद प्राप्त होतो व त्याची जवळीक जाणवते ३ तुकाराम महाराज म्हणतात मी हे सोपे वर्म तुम्हास सांगत आहे की, तुम्ही आपले मन स्वतःच्या हिताकडे लावा ४ ८३९ जीवींचे जाणावे या नावे आवडी । हेकड ते ओढी अमंगळ ॥ १ ॥ चित्ताच्या संकोचे काहींच न घडे । अतिशय वेडे चार तेचि ॥ २ ॥ काळाविण काहीं नाहीं रुची येत । करुनि संकेत ठेवियेला ॥ ३ ॥ तुका म्हणे कळे वचर्ने चाचणी । काय बोलवूनि वेळोवेळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम हेकड-हेकट हट्टी अर्थ - आपल्या मानवी जीवनाचा हेतू जाणावा यालाच प्रेम हे नाव आहे पण जे हट्टी असतात त्याची ओढ मात्र जे अपवित्र आहे त्याकडेच असते १ चित अप्रसन्न व संकोची झाल्यास काहीच समजणार नाही की हातून होणार नाही अतिशय वेडे असणारे चार गान हातून घडतील २ पण योग्य काळाशिवाय कोणतीही गोष्ट एकदम समजत नाही, माप होत नाही असा जणु जुनाच संकेत आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, याची चाचणी शब्दांनीच मधून मधून होत असते या सबंधी पुन पुन बोलण्याने काय होणार आहे ? ४ ८४० कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥ १ ॥ रंगले तें अगीं दावी । विष देयवी आसडे ॥ २ ॥ धनसोसे लागे वेड । ते बडबड शमेना ॥ ३ ॥ तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चवी- मर्यादा रीत, आसडे-आचके वेसनें-व्यसन अर्थ - कामाने आसक्त झालेला मनुष्य व्यवहाराच्या सर्व मर्यादा सोडतो आणि तोंडात जे येईल ते बरळत असतो १ जे अंगात भिनून गेलेले असते, तेच बाहेर प्रकट होते अतरगात बाणलेले विषय बाहेर आच- क्याच्या रूपाने प्रकट होते २ अनिवार संपत्ती मिळविण्याच्या नादाने वेडच लागते माणसांस त्याची येताल बडबड काही केल्या शमत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही दोनही व्यसने नर्कवास भोगण्याचीच आहेत ४ ८४१ कृष्णार्जनें जाले सोज्ज्वळ लोचन । तेणे दिले थान' निवडूनि ॥ १ ॥ निरोपाच्या मार्पे करी लडबड । त्याचे त्याने गोड नारायणे ॥ २ ॥ भाग्यवंताघरीं करिता विश्वासे । कार्य २ त्यासरिसे होईजेतें ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट भरे घरेयोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥ ४ ॥ १ धान २ काय