भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ४०७ शब्दार्थ व टीपा - पडिये-आवडत, आघात-सकट, जड-राकट अर्थ - या माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून सांगू ? तोच माझा देव व तोच माझा गुरू झालेला आहे १ भक्ताना जे जे आवडते, प्रिय आहे ते ते किंवा ती ती इच्छा हा देव पुरवितो आणि शेवटी आपणापाशी घेऊन येतो त्याना २ आपल्या प्रिय भक्ताच्या मागेपुढे उभा राहून हा त्याचा साभाळ करीत असतो येईल त्या सकटाचे निवारण करीत असतो ३ आपल्या भक्ताचे मोठे सक्ट जाणून त्याचे रक्षण करून त्याचा हा देव नीट योगक्षेमही चालवितो हाताला धरून या भक्तिमार्गाची वाट तो दाखवीत असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या वचनावर ज्याचा विश्वास नाही, त्यानी पुराणातील अनेक दाखल्याचा विचार करावा ५ विवरण - ईश्वर आपल्या भक्ताची काळजी कशी करतो, त्याचे सकट कसे निवारण करतो, त्याचा योगक्षेम कसा चालवितो, याबद्दल तुकारामबुवानी अनेक अभंगातून फार कोवळीकतेने दिग्दर्शन केले आहे. स्वतःचे अनुभवही सागितले आहेत या एक फार गोड व तत्त्वस्पर्शी अभंगात बुवा अगदी साध्या भाषेत आपल्या विठोबाच्या प्रेमभावाचे वर्णन करीत आहेत आपल्या भक्ताची जी जी इच्छा असत, ती ती हा पूर्ण करीत असतो आपल्या लाडक्या भक्ताच्या मागेपुढे उभे राहून हा त्याच रक्षण करीत असतो हातात धरून तो भक्ताना परमार्थमार्गाची किंवा स्वरूपाची वाट दाखवीत असतो, आणि हा सब भाव पुराणातूनही व्यक्त झालेला आहे, असे बुवा आत्म- विश्वासाने सागत आहेत ८७४ सकळ धर्म मज विठोबाचे नाम । आणीक ते वर्म नेणें कांहीं ॥ १ ॥ काय जाणो सता निरविलें देवे । करिती या भावें कृपा मज ॥ २ ॥ तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळो यावा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - निरविले-सोपविले. अर्थ - या विठोबाच्या एका नामोच्चारात मला सर्व धर्म घडतात याखेरीज दुसरे कुठलेही वर्म मी जाणीत नाही १ या सतानी मजवर कृपा करावी म्हणूनच देवाने मला त्याच्यावर सोपविले की काय न जाणे २ तुकाराम महाराज म्हणतात, नाही तर असा माझा काय अधिकार आहे, की हा भक्तिज्ञानाचा विचार मला पूर्णपणे समजून यावा ? ३ ८७५ उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥ १ ॥ उडदा अक्षरा करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥ २ ॥ तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीय ते सिण रितें माप ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - उदंड-पुष्कळ, भरोवरी-श्रम, सायास, सिण-त्रास अर्थ - नाना प्रकारचे तर्क करणारे शहाणे पुष्कळच आहेत पण त्यांना या विठ्ठलाच्या स्वरूपाचा अंत काही लागणार नाही १ अक्षरे घोकून पाठांतर करणारे व अभ्यासाचा त्रास घेणारेही पुष्कळ आहेत, पण त्यांना काही विठ्ठलाची थोरवी समजून येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा लाभ भोळेपणाशिवाय होणार नाही ज्ञानाची जाणीव ही त्रास देणारीच वाटते कारण ज्ञानाच्या या मापाने या थोर विठ्ठलाला मापताच येणार नाही ज्ञानाचे माप कितीही मोठे असले तरी ते रितेच असते ३ ८७६ आधारावाचुनी । काय सागसी कहाणी ॥ १ ठावा नाहीं पंढरीराव । तोवरी अवघेंच वाय ॥ २ ॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥ ३ ॥ तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -- वाय-व्यर्थ, एक सवा-एकाबाजूला

४०८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - शास्त्रपुराणांतील किंवा साधुसंताच्या वचनावाचून तू ज्ञानाची कसली कहाणी सांगतोस ? १ जोपर्यंत तुला हा पंढरीचा राणा माहीत झालेला नाही, तोपर्यंत तुझे हे ज्ञानसंपादन सर्वच व्यर्थ आहे २ तुझे हे कोरडे ब्रह्मज्ञान कोण मानायला तयार होईल ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंडित लोकांनो, तुम्ही तुमच्या जाणिवेचा ठेवा एका बाजूलाच ठेवून द्या ४ ८७७ अनाथाची तुम्हा दया । पंढरीराया येतसे ॥ १ ॥ ऐसी ऐकोनिया कीर्ति । बहु विश्रांति पावलो ॥ २ अनाथाच्या धावा घरा । नामें करा कुडावा ॥ ३ ॥ तुका म्हणे सवघड हित । ठेवू चित्त पायांपैं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुडावा-रक्षण, सवघड-उघड असलेले अर्थ - पंढरीराया, जे अनाथ असतात, त्यांची दया तुम्हांस नेहमीच येत असते १ अशी तुमची कीर्ती ऐकून माझ्या मनास फारच समाधान लाभले आहे २ देवा, तुम्ही अनाथाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या घरी धावून जाता व तुमच्या नामाच्या साह्याने त्याचे रक्षण करता ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे उघड असणारे चित्त मी तुमच्या पायावर ठेवीत आहे ४ ८७८ येथे नाही उरो आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥ १ ॥ विषयाचे झगी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ २ ॥ वाहोनिया भार कुथसील ओझे । तेंचि माझें थीता त्याग ॥ ३ ॥ तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज । संतीं केशिराज साधिपेला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लोलिंगत-आसक्त अर्थ - मत्स्य, कूर्म इत्यादी अवतारही जेथे उरले नाहीत, तेथे मजसारख्या सामान्य माणसाची व गरीब पामराची काय कथा आहे ? १ इंद्रियाच्या विषयांशी जर आसक्त व्हाल तर ती इंद्रिये एकदा चेतवली गेली की मग त्याचा अंत लागेनासा होतो २ या इंद्रियसुखाचे ओझे डोक्यावर वागवीत बसला व मग विनाकारण कुंथाल तर मात्र माझ्या भावाचा त्याग करावा लागेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी या विठ्ठलाला मिळवून घेतला आहे, याची लाज तुम्हास कुणास कशी नाही ? ४ ८७९ हींच त्याचीं पचभूतें । जीवन भाते प्रेमाचे ॥ १ ॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ २ ॥ हाच काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥ ३ ॥ तुका म्हणे दिवसराती । हेचि खाती अन्न ते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भातें-अन्न, निगुती-बरोबर, कैवाड-स्वीकार अर्थ - या विठ्ठलाविषयीचे प्रेम हेच या भक्ताचे मुख्य जीवनदायी अन्न व पंचभूतात्मक शरीर आहे १ या संतांनीच या श्रीहरीविषयी चित्तात कळवळा धारण करून खरोखर त्याचा स्वीकार केलेला आहे २ या हरीविषयी त्यांना वाटणारे हे प्रेम हेच त्यांचा वर्तमानकाळ असून सर्व साधनसंपत्तीही याच स्वरूपाची आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस हे हरिमक्त हेच प्रेमाचे अन्न सेवन करीत असतात ४ ८८० दीप न देखे अंधारा । आता हेचि करा जतन ॥ १ ॥ नारायण नारायण । याठी धन बळकट ॥ २ ॥ चिंतामणीपाशी चिंता । तस्वता ही नयेत ॥ ३ ॥ तुका म्हणे उभयलोकीं । हेचि निकी सामग्री ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा ४०९ शब्दार्थ व टीपा :- गांठी-भांभाळावे, चिंतामणी-चिंतितलेले देणारे रत्न, निकी-चांगली. अर्थ :- सर्वत्र, सर्वकाळ प्रकाशमान असणारा दिया कधी कधी अंधाराला पाहात नाही. हाच भाव मनात धारण करून तुम्ही ईश्वरास जवळ करा. १ नारायण, नारायण हे धन तुम्ही चांगले जतन करून सांभाळावे. २ चिंतामणी जवळ असल्यावर खरे पाहता मग कसलीही चिंता उरू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, उभय लोकी याच ईश्वरप्रेमाच्या रूपाच्या धनाची सामग्री फार चांगली आहे ४ ८८१ धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥ १ ॥ संदेहाची सुटली गांठी । जालें पोटी शीतल ॥ २ ॥ भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥ ३ ॥ तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संदेहाची-संशयाची, गाठी-प्रश्न, तारा-नाव. अर्थ :- या संताच्या पायांशी मिठी पडते, तो काळ फारच धन्य होय. १ यांच्या भेटीमुळे संशयाचे सर्व प्रश्न सुटून जातात आणि त्यामुळे मन शांत व प्रसन्न होते. २ यांच्या कृपेने भवनदीच स्वतः नाव होऊन कृपा- प्रसादाने तरून नेण्यास समर्थ बनते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता या संतापेक्षा अधिक मंगलदायक असा दाता कोण आहे ? ४ ८८२ दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥ १ ॥ संकल्पिला देहू देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ २ ॥ नाहीं अवसान घडी । सफळ जोडी इंद्रिया ॥ ३ ॥ कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दिनरजनी-रात्रंदिवस, हेवा-हाव. अर्थ - रात्रंदिवस या गोविंदाची कीर्ती पोवाड्यातून गावी, हाच एक आमचा सततचा उद्योग आहे १ या सर्व देहाचा संकल्पही देवा, तुझ्यासाठी अर्पण व्हावा अशी आमची एकमेव इच्छा आहे. २ सर्व इंद्रियाची वृत्ती हीच असून याखेरीज दुसरो भावना क्षणभरसुद्धा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीची कीर्ती मी गर्जून सर्वत्र पसरवीत आहे व सर्व लोकांना सावध करीत आहे. ४ ८८३ सरें नानवट निक्षेपीचें जुने । काढिलें ठेवणें समयचिं ॥ १ ॥ मजुराच्या हातें मापाचा उफल । मी तो येथें फोल सत्ता त्याची ॥ २ ॥ कुलाळाच्या हाते घटाच्या उत्पति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीर्णी प्रकाशाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-नानवट-नाणे, निक्षेपीचे-पुरून ठेवलेले, कुलाळाच्या-कुंभाराच्या, कीर्णी-किरणांमधून. अर्थ :- समर्थ अशा संताच्या घरी विठ्ठलकृपाचे जुनाट नाणे जमिनीत पुरून ठेविलेले होते, ते मी बाहेर सर्वांसाठी काढले आहे १ मजुराच्या हातानेच धान्याचे माप होत असले भी या ठिकाणी फुकटचा असून तरी सत्ता त्याचीच आहे. २ कुंभाराच्या हातून घटांची उत्पत्ती होते, हे खरे असले तरी, जो कोणी खरेदी करणारा असतो, तोच त्यांना स्वयंपाकाच्या ठिकाणी पाठवीत असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सूर्याचेच तेज त्याच्या किरणांतून फाकत असते, त्याप्रमाणे सर्व ध्येयातून नारायणच व्यक्त होत असतो. ४ ८८४ गंगेचिया अंताचिण काप चाड । आपुले तें कोड तुपेपाशीं ॥ १ ॥ विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ २ ॥ १ पालू. तु गाथा ५२

४१० सार्थ तुकारामगाथा कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥ ३ ॥ बाळाचे सोईतें घांस घाली माता । अट्टाहास चिंता नाहीं तया ॥ ४ ॥ गाऊं नाचूं करूं आनंदसोहळा । भावचि आगळा' नाहीं हातां ॥ ५ ॥ तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- अंताविण-खोलो समजल्याशिवाय. अर्थ - जो तान्हेलेला आहे त्याने गंगेचे पाणी प्यावे. ह्या पाण्याच्या खोलीची चौकशी त्याने कधी करु नये. तहान भागली की नाही, हे मात्र त्याने पाहावे. १ त्याचप्रमाणे इतर कसलीही चौकशी न करिता विठ्ठलाची ही साजिरी व सुंदर अशी मूर्ती निरंतर हृदयात स्थिर करुन ठेवावी. २ सारभूत असणाऱ्या नवनीतापाशीच आपले काम असावे. इतर गबाळापाशी आपण संबंध कशास ठेवावा ? ३ बाळाची सोय व्हावी म्हणून आई त्याला एक एक घास करुन घालीत असते. त्यासंबंधी कसली चिंता किंवा कसला खटाटोप बाळाला कधी करण्याची जरूरी नसते. ४ त्याचप्रमाणे आम्ही या श्रीहरीच्या प्रेमात नाचू, गाऊ व आनंदाने सुखाचा सोहळा करु. याखेरीज दुसरा भाव आपल्या मनात कधी नसतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व एक श्रीहरिमय झाल्यामुळे आम्हास परलोकीचे भय उरलेलेच नाही. ६ ८८५ स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥ १ ॥ आतां सोडवणें धांवा नारायण । मज हे वासना अनावर ॥ २ ॥ येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुम्हीं देवा सांभाळावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पडिभर-अधिक प्रेम. अर्थ - देवा, या स्त्रीपुत्रादिक नातेवाईकांविषयी मला विशेष प्रेम वाटते व विषयसुखांवर माझे अधिक प्रेम आहे. १ नारायणा, तुम्ही धावत यावे व मला यातून सोडवावे. या वासना मला आवरेनाशा झाल्या आहेत. २ ही लोकलाज्जा आमच्या मार्गात उभी राहिलेली असल्यामुळे देवा, आमचे कार्य दूर झाले असे वाटते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस जिथे तिथे गुंतून पडण्याचेच प्रसंग दिसतात नारायणा, अशा ठिकाणी तुम्हीच मला सावरावे. ४ ८८६ पडिलों भोवनीं १ होतों बहु चिंतवनी ॥ १ होतों चुकलों मारंग । लाहो केला लाग' वेगें ॥ २ ॥ इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- भोवनीं-भोवऱ्यात, चिंतवनीं-चिंतेत, संदीं-अडचणीत. अर्थ-मी या संसारचक्राच्या भोवऱ्यात सापडलो होतो. फार मोठ्या चिंतेत होतो. १ मी मार्ग चुकून गेलो होतो. पण आता मात्र त्वरित लाभ करून घेतला आहे. २ इंद्रियवृत्तींच्या अडचणीत मी चांगलाच सापडलो होतो, चांगलाच बंदिवासात फसत होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण बरे झाले; माझ्या वाचेतून विठ्ठलाचे नाम आले ४ ८८७ बरें जालें आलौं ज्यांचीं त्यांच्या घरा । चुकला पान्हेरा³ ओढाळांचा ॥ १ ॥ बहु केलें दुखीं त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ २ ॥ १ वेगळा, २ वेग, ३ पान्हेरा

सार्थ तुकारामगाथा ४११ त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥ ३ ॥ नाहीं कोठें स्थिर राहो दिलें क्षण । आजिवरी सिण पावलो तो ॥ ४ ॥ वेगळाळ्या खोडी केली तडातडी । सांगावया घडी नाहीं सुख ॥ ५ ॥

  • निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पन्हेरा-सवध, गोवारें-समुदाय अर्थ - देवा, हे एक बरे झाले बाहेर धावणारी इंद्रिये आत मुरडून ज्याची त्याची आपापल्या घरात येऊन मुरडून राहिली या ओढाळ इंद्रियाचा सवय आता सुटला १ याचा सांभाळ करता करता मला फार दुःख झाले. पण आता त्याच्याबद्दल असणाऱ्या लाभाचे अथवा लोभाचे तोंड काळेच झाले असे समजा ना २ या इंद्रियांनी जर काही अन्याय आता केला तर, त्या अन्यायाची फळे मला शरीरावर भोगावी लागत असत ३ या इंद्रियांनी मला कुठेही एक क्षणभरसुद्धा स्थिर राहू दिले नाही याच्या नादाने आजपर्यंत फारच क्षीण मला झाला ४ या इंद्रियाच्या निरनिराळ्या खोडींपायी माझी व ईश्वराची ताटातूट अनेकदा झाली सांगण्यासारखे सुख यानी मला एक क्षण- भरही दिले नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या इंद्रियाचा समुदाय देवापाशी सोपवून, त्याच्यावर याचा भार टाकून निघालो आहे ६ ८८८ न करावी आता पोटासाठीं चिंता । आहे त्या संचिता माप लावू ॥ १ ॥ दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपांयीं सिण जाला ॥ २ ॥ येथें तब नाहीं घेइंजेसे सवे । काही नये जीवे येचो मिथ्या ॥ ३ ॥ खडणेचि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असो ॥ ४ ॥ दोवटा पावती नावेचे बैसणे । भुजाबळें कोणे कष्टी व्हावे ॥ ५ ॥ तुका म्हणे आता सकळांचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - भुजाबळे-हाताच्या वळान अर्थ - आता पोटासाठी चिंता करण्याची जरूरी नाही जे अन्नधान्य जवळ आहे, तेच पुरवून पुरवून खाऊ १ आपली दृष्टी परमार्थाच्या विचारात गुंतवावी, उगाच बाकीच्या क्षुल्लक उपायाचा त्रास कशाला घ्यावा ? २ काही येथून आपल्याबरोबर घ्यावे असे नाही खोट्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती कशाला खर्च करायची ? ३ आपल्या चिंतेने जन्ममृत्यूच्या खेपात काही कधी खड पडणार नाही आम्ही संसारात नेहमीच गुरफटून दीन झालेलो आहोत ४ पण शेवटी या भवसागरावरील नौवेत बसलो आहोत ती प्रयास शेवटपर्यंत सुखरूप करणारी असताना तिच्या गतीसाठी उगाच आपल्या हाताचे बळ कशासाठी खर्च करायचे ? ५ तुकाराम महाराज म्हणतात सर्वांचे सार जे असेल तेच आता आपण करीत असावे ६ ८८९ आमच्या हे आले भागा । जिव्हार या जगाचे ॥ १ ॥ धरूनिया ठेलो जीवे । बळकट भावे एकविध ॥ २ ॥ आणूनिया केला रूपा । उभा सोपा जबळी ॥ ३ ॥ तुका म्हणे अवित्त केला । खालीं आला वचनें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जिव्हार-अन्न वरण अर्थ - सर्व जगास अंतःकरणरूपाने असणारा हा विठ्ठल आमच्या वाट्याला आला आहे १ यास मी आपल्या जीवात मोठ्या थळकट भावाने धारण करून ठेवले आहे २ या निर्गुण निराकारास आम्ही सगुण रूप देऊन नीट आकारात आणले ३ तुकाराम महाराज म्हणतात, मीच त्याला आपल्या स्वाधीन केला असून आपल्या प्रेमळ वचनामुळे तो आपल्या उच्च स्थानापासून खाली उभा आहे ४

४६२ सार्थ तुकारामगाथा ८९० खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥ १ ॥ सवंगाचें केणें सांपडलें घरीं । भरुनि वैखरी सांटविलें ॥ २ ॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥ ३ ॥ फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां जालीसे निश्चिती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- उदमासी-व्यापारास, केणे-जिनस, माल, फडा-मंडळीस. अर्थ:- या विठ्ठलाच्या रूपाने खरेखुरे भांडवल आमच्या हाती आले असल्यामुळे याला काही आमच्या व्यापारात तूट येणार नाही. १ अतिशय स्वस्त असलेला असा विठ्ठलरूपी माल आमच्या घरीच सापडला असून त्याला आम्ही आमच्या वाणीतून साठवून ठेविला आहे. २ याचा लाभ सर्वांना देताना व घेताना होत असून सुदैवी असो, अथवा दुर्बल असो, सर्वांना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे हा प्राप्त होतो. ३ एकदा विठ्ठलभक्तांच्या मंडळीत, मेळाव्यात तो असला म्हणजे, काही मग निराश होत नाही हा; मग जरी त्यास आपण समजून घेण्याच्या प्रयत्नात नसलो तरी चालेल. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी निश्चिती झाली असून या विठ्ठलनामरूपी भांडवलाखेरीज आता चित्तात दुसरे काहीच धरणार नाही. ५ ८९१ पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥ १ ॥ रघवूनि ठेलों ठाव । जागा वाय सफळ ॥ २ ॥ पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥ ३ ॥ तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रघवूनि-व्यापून, क्षरभागी-क्षरणाऱ्या, कमी होणाऱ्या. अर्थ.-या श्रीहरीला मी माझे अंग पावलोपावली दिलेले असल्यामुळे माझे सर्व कार्य आता पूर्ण झाले आहे. १ जेवढी म्हणून विस्तृत जागा होती तो सर्व मी व्यापून राहिलो आहे. २ पुढे पुढे जाण्यात मनाला आनंद होत असून देहामध्ये संतोषही वाढत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक दिवशी कमी कमी होत जाणाऱ्या या जगाच्या आत, बाहेर मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे. ४ ८९२ निवडूनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥ १ ॥ आतां पुढें 'भावसार' । जीवना थार पाहावया ॥ २ ॥ पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संचित-नशिबात अर्थ :- आम्ही आता श्रीहरीच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे. ज्याने त्याने आपल्या नशिबाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा. १ आता यापुढे जीवनाला काही आधार शोधायचा असेल तर, हरिविषय हा एकच आधार होय. २ जे कोणी परीक्षा करणारे डोळस असतील, त्यांच्या हाती हे हरिनामाचे नवनीत पडेल व जे देहादिकांच्या दृष्टीने आंधळे बनलेले असतील, ते मात्र उगाच चाचपडत राहतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी याचे मनोभावे सेवन करील, त्यासच हा लाभ निश्चित होईल. ४ ८९३ उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकिलें तें ॥ १ ॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । वळें वेताळीस कुळें जग ॥ २ ॥ १ भवसार.

सार्थ तुकारामगाथा ४१३ अबोलणे बोले डोळे झांकुनिया । बडबडी वाया दंभासाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणो खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देखोवेखी-दुसऱ्याचे पाहून अर्थ :- जे केवळ इंद्रियांच्याच ओढीमुळे त्याच्या आधीन झालेले असतात, त्यांना योग्य काय, अयोग्य काय, हे काहीसुद्धा समजत नाही आपल्या गुरुजवळ ते जे शिकले त्याची वृथा बडबड मात्र करीत असतात १ अशा वागण्याने हे लोकही नरकास जातातच, पण यांच्या आधीच्या बेचाळीस पिढ्यातील पूर्वजही नरकास जातात २ हे लोक नुसते डोळे झाकतात व ब्रह्माचा अनुभव आला असल्याचे अबोल राहून बोलून दाखवितात. याची दांभिक बडबड मात्र व्यर्थ असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तर तेथील चांगले परीक्षा करणारे असून जे दुसऱ्याचे पाहून ढोंग करून नाचतात, त्यांना आम्ही नीट जाणतो हे खरे आहे ४ ८९४ एक मन तुझ्या अवघ्या भाडवला । वाटिता ते तुला येई कैसें ॥ १ ॥ म्हणउनि दृढ धरीं पातुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ २ ॥ आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसे जाणावे उचित । तरी सहज स्थित येईल कळो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्थित-स्थित अर्थ - तुला असणारे एक मन तू निरनिराळ्या व्यवहाराकडे कसे वाटून देणार आहेस ? १ यासाठी तू मनात पांडुरंग दृढ धरून राहा ना, व तुझा देह प्रारब्धाच्या संगतीत लाव ना. २ याखेरीज इतर कुठल्या संकल्पा- तून तू आपल्या मनास गुंतवू नकोस असे झाले तरच तुझे जीवितध्येय जे परमार्थसाधन ते साध्य होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जे उचित आहे ते तू जाणावेस असे तू जाणलेस तर तुला सहजास्थित अशी असणारी आत्मभावाची स्थिती समजून येईल ४ ८९५ गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसे चित्त ॥ १ ॥ हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ २ ॥ ऐकावी म्हण कथा । राहे तैसे धरूनि चित्ता ॥ ३ ॥ तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धणी-तृप्ती अर्थ :- या श्रीहरीचे जे गीत असेल तेच गावे व त्या गाण्यातील रुपच मनात धरून असावे १ पण हे फारच अवघड काम असून, नुसते अन्न पाहून कधी भूक लागलेल्या माणसाची भूक भागेल काय ? २ म्हणून या श्रीहरीची कथा चित्तात राहील तशीच धरून ठेवावी लागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरी तृप्ती पोटभर जेवण केल्याखेरीज होत नसते. ४ ८९६ कळेल हे खूण । तरि दावी नारायण ॥ १ ॥ सत्य संतापाशीं राहे । येरा भय आड आहे ॥ २ ॥ अणुचिया ऐसें । असे भरले प्रकाशें ॥ ३ ॥ इंद्रियाचे धनी । ते हे जाती समजूनि ॥ ४ ॥ तर्क फुटकें वाटा । नागवण घटापटा ॥ ५ ॥ तुका म्हणे ल्यावें । डोळा अंजन वरवे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :-येरा-मत्नाशिवाय इतरांना, घटापटा-घटाकाश, पटाकाश अशी वेदान्तातील शुष्क चर्चा.

४१४ सार्थ तुकारामगाथा अर्थ - हा नारायण कृपा करील, धर्म दाखवील तरच पुढील खूण कळेल १ सत्य संतापाशी असते व त्याच्याशिवाय इतरांना मात्र मयाचीच परिस्थिती असते २ या परमेश्वराचे स्वरूप अणुरेणुएवढे असून त्याच्यात सर्वत्र प्रकाशच भरून राहिलेला आहे ३ इंद्रियावर स्वामित्व ठेवणारे जे कोणी आहेत त्यांनाच हे वर्म नीटपणे समजते ४ अनेक तर्क व कुतर्क करून नाना वाटा निर्माण करणारे व घटापटादिकांची शुष्क चर्चा करणाराची व्यर्थ नागवणूक मात्र होते ५ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी चांगले असे ज्ञानाजन डोळ्यात घालावे ६ ८९७ जातो न येति या वाटा । काय निरवितो करटा ॥ १ ॥ कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ २ ॥ पाहे वैरियाकडे । डोळे वासुनिया रडे ॥ ३ ॥ बांधुनिया यमा हातीं । दिला नाहीं त्याची खती ॥ ४ ॥ नाही यापें काम । ऐसे जाणे तो अधम ॥ ५ ॥ अजून तरि मुका । का रे जालासि म्हणे तुका ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - बेश्रम-निलाजरा अर्थ - जेथे गेल्याने परत येता येणार नाही, अशी वस्तुस्थिती असली तरी आपल्या धनदौलतीची व संपत्तीची व्यवस्था हा करटा पुरुष अशाही वेळेस करीत बसला आहे १ कसा हा निलाजरा झाला आहे पाहा याला कसलीच लाज नाही रामाचे नाम घ्यायला काही हा तयार नाही २ हा अजूनही आपल्या शत्रूकडे डोळे मोठे करून पाहतो व रडतो ३ सर्वांनी मिळून याला बांधून यमाच्या हातात दिलेले असले तरी त्याची काही चिंता दृष्टी हा करीत नाही ४ या यमदूतांशी आपले काहीच काम नाही, असे अजूनही हा अधम समजत असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, तू या प्रभूचे नाम घेण्याविषयी अजून तरी का मूक राहिला आहेस ? ६ ८९८ वाटा घेईं लवकरि । मागें अतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥ १ ॥ ऐसीं भांबावलीं किती । काय जाणो नेणो किती१ । समय नेणती । माथा भार वाहोनि ॥२॥ नाहीं सारिले तोवरी । धाव घेईं वेग करीं । घेतले पदरीं । फावले ते आपुलें ॥ ३ ॥ फट लडी म्हणे तुका । एक न राहावे धका । तरिच या सुखा । मग कैसा पावसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भरोवरी-खटपट, फटलडी-हलकट मनुष्य अर्थ - अरे माणसा, नीट ध्यानात घे परमार्थाचा वाटा लौकर घे ना पदरात नाही तर मग विनाकारण प्रभूला तू अतरला जाशील सारी खटपट त केलीस व त्या श्रमाचे श्रेय इतरच घेऊन जात आहेत असे होऊ नये १ अशाच भ्रमात कितीजण सापडली आहेत ते काही नीट समजत नाही ही माणसे प्रसंग न ओळखता वृथा संसाराचा भार डोक्यावर वागवून कष्टी होत असतात २ जोपर्यंत आयुष्य सरले नाही, तोपर्यंतच वेगाने, त्वरेने धाव घेऊन जे पदरात आहे ते आपलेच आहे असे समजून घेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, अरे हलकट मनुष्या, तुला सत्यज्ञानाचा किंवा परमार्थविचाराचा एक धकासुद्धा सहन होत नाही असे असेल तर मग तुला या परमार्थ सुखाचा ठेवा कसा प्राप्त होईल ? ४ ८९९ चालावा पथ तो पाहिजे त्या ठाया । ऐकिल्या वाया वारता त्या ॥ १ ॥ ऐका जी वोझे पडतसे पाया । भावाची तें जायावाट नव्हे ॥ २ ॥ व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव । सांगता तो भाव येत नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें पाहिजे आरालेँ । बियों निव्वळलें तरि भासे ॥ ४ ॥ १ भिती

सार्थ तुकारामगाथा ४१५ शब्दार्थ व टीपा :- धोजें-सरळपणाने, व्याली-बाळंत झालेल्या स्त्रीस, आराले-शांत. अर्थ -असा पंथ चालावा की, जेथे आपणास पोचावयाचे आहे, तेथे तो घेऊन जाणारा असावा. या ठिकाणी एकदा पोचल्यावर मग पूर्वीच्या ऐकलेल्या वाटा व्यर्थ होऊन जातात. १ मी पाया पडून सांगत आहे, ते गोष्ट सरळ मनाने ऐका ना तेथे निश्चितपणे जाण्यासाठी भक्तिमार्गाचीच वाट निश्चित नाही का? २ जी बाळंतीण आहे, तिला आपला अनुभव कुमारिकेस काही कधी सांगता येणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, येथे मन शांत पाहिजे, कारण बिंबाचे रूप स्वच्छ भासावयास हवे. ४ ९०० काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥ १ ॥ जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ २ ॥ काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥ ३ ॥ तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा १ डेंग हा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धस-अविचारी, मद बुद्धीचा, कुचर-न शिजणारा, डेंग-मूर्ख. अर्थ - वारा आल्यावर झाडे काय लवत नाहीत ? वेडा मनुष्य आपल्या देहाचे हावभाव काय विसरत नाही ? १ ज्याला चांगला उपदेश रुचत नाही, त्याला मद बुद्धीचा, अविचारी म्हणतात. २ दगड हा न बोलणारा जड असत नाही काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अन्नात न शिजणारा एखादा टणक दाणा असतो, त्याप्रमाणे हा मूर्ख मनुष्य या भक्तिमार्गाच्या विचारात समरस न होणाराच असतो ४ ९०१ देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥ १ ॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सफळ मूर्ति ॥ २ ॥ काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । बोंधाळुनि थोरी परती सांडीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- देखीचा-दुसऱ्याचे पाहून, थोरी--थोरवी. अर्थ - दुसऱ्याचे पाहून काही दिमाख किंवा डौल दाखविला तरी तो काही खरा नव्हे. गारगोटचा कितीही झाल्या तरी हिऱ्यासारख्या कशा होतील ? १ अरे, अभाग्या, तू नीट मर्यादा जाणून ऐस ना. सर्व भूतमात्र हे त्या देवाच्या मूर्तीच आहेत, हे नीट समजून घे. २ उगाच खोट्या भरोस पडू नकोस व स्वतःच्या ठिकाणची थोरवी थोडी दूर सारून ठेव. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला पुढे तुझा घात दिसत आहे. म्हणून मी तुला फजीत करून पाहात आहे. ४ ९०२ संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥ १ ॥ भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासा मुकावें ॥ २ ॥ भिक्षा आणि बेवसाय । कसा करितो गाढव ॥ ३ ॥ करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी फास्या निस्पृही ॥ ४ ॥ प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं २ ॥ ५ ॥ तुका म्हणे होईं शूर । किंवा निसुर मजूर ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- निसुर-निवळ. अर्थ :- संसाराचे ओझे माथ्यावर असले की, मग पलीकडे काही उरतच नाही १ या भक्तीची जातच अशी आहे की, तिच्यासाठी सर्वस्वात्या मुकावे लागते. २ वैराग्यासाठी भिक्षा मागायची असेल तर, तिची व १ जाणा, २ जेवी.

४१६ सार्थ तुकारामगाथा व्यवसायाची गल्लत करून भागणार नाही. असा फाला करणारा गाढवच म्हणायला हवा ३ बाजारात लोभाने गेला आहे आणि स्वतःस मी निःस्पृह म्हणून घेत आहे, हे कसे पटणार ? ४ दुसऱ्याच्या कवितेतील काही प्रासादिक शब्द उचलून कवित्व करणाऱ्या भोंदू कवीचे काव्य हे खऱ्या तुपात पाणी मिसळल्याप्रमाणेच नव्हे काय ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, एक चांगले शूर तरी व्हावे, किंवा निव्वळ मजूर तरी बनावे. ६ ९०३ तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥ १ ॥ काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ २ ॥ नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥ ३ ॥ तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तेज्या-तेजीत असणाऱ्या घोड्यास. अर्थ - तेजीत असणाऱ्या घोड्याला नुसती इशारत करताच त्याला समजते व तो त्याप्रमाणे वागू लागतो; परंतु निर्बुद्ध तट्टाला कितीही फोक मारिले तरी ते काही ऐकत नाही. १ तुम्हाला काय सांगावे ? तुम्ही त्याच्या- हूनही नीच झालेले दिसता. तेव्हा मी काय सांगतो ते नीट मनात धरा व त्याप्रमाणे वागा. २ मी काही तसा भांडखोर नाही; पण तुमचा पदर ओढून धरीन व काही सांगू शकेन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांनी तोंड खाली करून काळे करावे. ४ ९०४ मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥ १ ॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ २ ॥ वर्णधर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥ ३ ॥ वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥ ४ ॥ तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कळीं-कलियुगात अर्थ - मागच्या संतांनी पुढे होणार होणार म्हणून जे जे सांगितले आहे, ते ते सर्व अनुभवास येऊ लागले आहे. १ या कलियुगात लोक आचारभ्रष्ट होतील व त्यामुळे पुण्य क्षीण होऊन पाप मात्र बलवान ठरेल. २ वर्णधर्माचा कोणीही विटाळ न मानता एकाच ठिकाणी सर्व वर्णांचा व जातींचा गोंधळ निर्माण होईल. ३ वेदांचे पठण करणारेच दारूचे सेवन करतील व हे भांडखोर विषयाचा भेद पाहणार नाहीत ४ तुकाराम महाराज म्हणतात, याची फजिती तरी किती करावी ? त्याचे तेच तेच छंद नित्याचे म्हणून होत राहतात ५ ९०५ अक्षरांचा श्रम केला । फळा१ आला तेणे तो ॥ १ ॥ अवघियाचा तळ घरी । जीबा उरी नुरउनी ॥ २ ॥ फळलें२ तें लवे भारें । पिक खरें३ आलें तईं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । पुढें भाव साराया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अक्षराचा-पाठांतराचा. अर्थ :- काही अक्षरांचे व ग्रंथांचे पाठांतर करण्याचे श्रम केले म्हणून पुढील फळ प्राप्त झाले. १ त्याच्या आयुष्यात जीवदशा उरलेली नसून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी तो विनम्र झालेला आहे. २ जो वृक्ष फळांच्या भारांनी खाली लवला आहे, त्यासच खरे व समृद्ध पीक आले आहे, हे खरेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा हा भाव या देवापुढे ठेवावा सर्वांनी ४ १ फळो, २ भरले, ३ सरे

सार्थ तुकारामगाथा ४१७ ९०६ उचित जाणावे मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायां स्थीर ॥ १ ॥ न घलावी १ धाव मनाचिये ओडी । वचन आवडी संतांचिये ॥ २ ॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - स्थीर-स्थिर अर्थ - आपले चित्त शुद्ध करून, बुद्धी परमेश्वराच्या पायाशीं स्थिर करून, उचित असेल त्या धर्माचे धर्म आधी नीट जाणावे १ केवळ ओढाळ मनाच्याच ओघाने किंवा ओडीने धावत सुटू नये संतांच्या वचनाचा आव- डीने ध्यासच ठेवावा २ या संतवचनाचा विश्वास एकदा मनात स्थिर झाला म्हणजे मग तुकाराम महाराज म्हणतात, उपदेशही करावा लागणार नाही ३ ९०७ जीवन हे मुक्त नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥ १ ॥ बहुत अन्न विष मोहरीच्या माने । अवघेंचि तेणें विष होय ॥ २ ॥ तुका म्हणे जेणे आपुलें स्वहित । तैंसी करीं नीत विचारूनि ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - मानें-प्रमाणानसुद्धा अर्थ - एखादा मनुष्य अत्यंत पवित्र आचरणाचा असून तो जीवन्मुक्तही आहे तरीसुद्धा त्याने दुर्जनांची संगत सोडायला हवी १ अन्न पुष्कळ असले तरी मोहरीएवढ्या विषानेसुद्धा त्याज्यात सर्वत्र विष पसरून राहाते २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यात आपले स्वहित आहे त्याविषयी बरी नीती पाहून विचार करावा ३ ९०८ द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥ १ ॥ करोनिया हेंचि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥ २ ॥ तुका म्हणे हेंचि करूनि जतन । आलिया हो दान याचकासी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-पाठलाग अर्थ - द्रव्याचा आम्ही नेहमी विटाळच मानलेला आहे कारण या द्रव्याच्या मागे काळ एकसारखा पाठ- लाग करीत असतो १ म्हणून नारायणाचे नाम हेच मी माझे जीवन ठरवून राहिलो आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, याच भावाची मी जपणूक करणार असून जे कुणी याचक दान मागायला येतील त्यांनाही हेच देणार आहे ३ ९०९ द्रव्याचिया मागें कळिकाळाचा लाग । म्हणोनिया संग खोटा त्याचा ॥ १ ॥ निरयाचे मूळ घालुनिया मागें । माडिली प्रसंगें कथा पुढें ॥ २ ॥ आजिच्या प्रसगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥ ३ ॥ प्रारब्ध काहीं न पालटे सोसें । तृष्णेचे हे पिसें वायांचिन ॥ ४ ॥ तुका म्हणे घेईं राहे ऐसें धन । सादर श्रवण करुनियां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-पाठलाग निरयाचे-नरकाच, प्रारब्ध-दैव अर्थ - द्रव्याची संगत, सोबत खोटी आहे असेच समजा कारण त्याच्या पाठीमागें एकसारखा काळ लागलेला असतो कळिकाळ त्याचा पाठलाग करीत असतो १ नरकाचे मूळ असणारे हे द्रव्य सोडून, त्याचा त्याग करूनच मी यापुढची कथा प्रसंगाने सांगत आहे २ आजच्याही प्रसंगी हाच लाभ तुम्ही करून घ्यावा व देवावर भार घालावा ३ आपल्या दैवात जे असेल ते कितीही प्रयत्न केला तरी पालटणार नाही त्यामुळे एकसारख्या तृष्णेचे येड व्यर्थ आहे असेच समजावे ४ तुकाराम महाराज म्हणतात नीट आदराने श्रवण करून परमार्थमार्गाचे जे धन कायम टिकेल तेच स्वीकारावे ५ १ घालावी तु गा ५३

४१८ सार्थ तुकारामगाथा ९१० रडे अळंकार ऐन्याचियें¹ कांती । उत्तमा विपत्तिसंग घडे ॥ १ ॥ एकाविण एक अशोभ्य दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ २ ॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रांधू नेणे-स्वयंपाक करणे जाणीत नाही. अर्थ :- अंगावर भरपूर अलंकार घातले आहेत; पण ज्याच्या अंगावर अलंकार आहेत, तोच सारखा रडत असेल किंवा तोच कांतिविहीन व दैन्यवाणा असेल तर मग काय उपयोग ? कारण दागिने अथवा अलंकार उत्तम असले तरी, ते विपत्तीच्या संगतीत असल्याने त्याची काती असून नसल्यासारखीच वाटते १ एकास दुसरे शोभून दिसणारे जर दातारा, नसेल तर त्याचा उपयोग काय ? पांडुरंगा, कृपेच्या सागरा, मग ते सुरूपही विशोभित दिसेल. २ चांगली स्वयंपाकाची आयती तयारी केली व ती ज्याला स्वयंपाक बिलकुल येत नाही, त्याच्यापुढे नेऊन ठेविली तर तिचा काय उपयोग होणार ? ती सर्व वायाच जाणार ना ! ३ तुकाराम महाराज म्हणतात, शेळीच्या गळ्यात कुणी सर्व चिंता दूर करणारा चिंतामणी बांधला तरी त्याचा काय उपयोग होणार तिला ? तो त्या स्थानी विशोभितच दिसणार. ४ ९११ दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसी ॥ १ ॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ २ ॥ भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें झांकितीळ डोळे । भोग देतेवेळे येईल कळों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तव-तर. अर्थ - या मानवी जन्मात दुःखाचे डोंगरच्या डोंगर सहन करावे लागतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. १ असे असूनही हे लोक आपल्या हिताचा विचार कधी करीत नाहीत, की कधी प्रभूच्या नामाचा घोष करीत नाहीत. २ या जन्मी आपण जे भोग भोगीत आहोत, ते पाहून या मागील जन्मात आपण उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे जे जे कर्म केले असेल ते ते ध्यानी येते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक याकडे या जन्मी डोळेझाक करतील व मग नाना खडतर भोग भोगताना मात्र त्यांना समजून येईल. ४ ९१२ सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥ १ ॥ मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ २ ॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होतीं पांगुळें ॥ ३ ॥ घरास आणि लायुनि जागा । न पळे तो² गा वांचे ना ॥ ४ ॥ तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सदैव-सुदैवाने, ठकलीं-फसली. अर्थ:-तुम्ही फार सुदैवाने जगणारे आहात, कारण ईश्वराने तुम्हाता सर्व अवयव नीटनेटके दिलेले आहेत. चालण्यासाठी पाय आहेत, पुण्यकर्म करण्यासाठी हात आहेत १ देवाचे नाव घेण्यासाठी वाणी मुखात आहे. त्याची कीर्ती ऐकण्यासाठी कान आहेत, त्याची मूर्ती पाहण्यासाठी डोळे आहेत. २ कित्येक आंधळे, बहिरे, मुके, पांगळे परमेश्वराची सेवा करिता येत नाही म्हणून फसले गेले आहेत ३ घराला आग लागली आहे व आत राहणारा जागा असून पळत नाही, तो कसा जिवंत राहणार ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, लोकांनो, तुम्ही आपल्या हिताविषयी नीट जागृत असा. ५ १ विघ्नवेने सगतीं, २ ते.

सार्थ तुकारामगाथा ४१९ ९१३ ऐसे पुढती मिळता आता । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥ १ ॥ म्हणउनि फावले तें घ्यावे । नाम गावे आवडी ॥ २ ॥ संचित प्रारब्ध गाढें । धावे पुढे क्रियमाण ॥ ३ ॥ तुका म्हणे घुबडा ऐसे । जन्म सरिसे शुकराचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ऐसे-असा मानवी देह शूकर-डुक्कर अर्थ - मानवी देहासारखे उत्तम साधन पुढे प्राप्त होईल असे नाही याबाबतीत आपण स्वतंत्र नसून आपल्या हाती सत्ताही काही नाही १ म्हणून जो आज मिळाला आहे, त्याचा फायदा घेऊन ईश्वराचे नाव मोठ्या प्रेमाने घेत जावे २ कारण आपल्या संचित कर्माची मोठ्या प्रारब्धाची व क्रियमाणाची गती एकसारखी पुढे धाडत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात यापुढे कदाचित घुबडाचे, डुकराचे जन्म न येतील हे कशावरून ? तेव्हा तुम्ही या नरजन्मातच काय साधायचे असेल ते साधा ४ ९१४ सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आता कोण भाव निवडे एक ॥ १ ॥ संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणता माझें कोणी ॥ २ ॥ देहसुख काहीं बोलिले उपचार । विष ते आदर बद' वाटे ॥ ३ ॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवाचे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - न साहे-सहन होत नाही, बद-वधन उपाधी-अडचण अर्थ - या सर्व लौकिक व सांसारिक गोष्टींविषयी माझा जीव त्रासून गेला आहे आता नाही असा कोणता एक भाव मी निवडून सांगू ? १ संसारासंबंधी तर मला कसलीच रुची नाही, त्याची वार्ताही सहन होत नाही आणि दुसऱ्याने कुणी हा संसार माझा माझा असे म्हटल्याचेही सहन होत नाही २ देहाला सुख देणाऱ्या काही उपचारांविषयी कुणी सुचविले तर तेही मला आवडत नाही इंद्रियसुखाचे हे भोग मला विषाप्रमाणे वाटतात त्याचे मोठे बंधनच माझ्या मनावर असते ३ कुणी माझा गौरव केला, कुणी माझी प्रतिष्ठा सांगितली तर त्या स्तुतीने माझा जीव फार कासावीस होतो ४ तुकाराम महाराज म्हणतात मला आता दुसरे काहीही सहन होत नाही मला या वैष्णवांचेच पाय महमी आवडतात मी त्यांचाच आश्रय घेतो ५ ९१५ आणीक काहीं या उत्तराचे काज । नाहीं आता मज बोलावया ॥ १ ॥ भिन्न भेद हे भावनाव्स्वभाव । नव्हे काहीं देव एकविध ॥ २ ॥ गुण दोष कोणे निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म ते ॥ ३ ॥ तरिच भले आता न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥ ४ ॥ तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हेचि धणी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काज-कारण धणी-तृप्ती अर्थ - आता दुसरे काही बोलावे हे कारणच मजजवळ नाही १ मानवी स्वभावानुसार ज्या ज्या भावना असतील त्या त्या प्रमाणे भिन्न भिन्न प्रकार असले तरी देव हा एकविध म्हणजे विविधतेतही एकपणानेच नटलेला आहे २ गुणांची व दोषांची निवड कोणत्या धर्मावरून करावी ? कर्म व अकर्म याची निवड कशी करावी ? याना कसे जाणावे ? ३ आता कुणाचीही संगत धरू नये यातच खरे म्हणजे चांगले आहे यामुळे दुःखाचे प्रसंगही आपोआप तुटले जातील ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी या देवाचेच गुण गात राहील यातच तिची तृप्ती आहे ५ १ बध

४२० सार्थ तुकारामगाथा ९१६ आपुल्या विचार करीन जीवांशीं । काय या जनांशीं चाड मज ॥ १ ॥ आपुलें स्वहित जाणती सकळें । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ २ ॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥ ३ ॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥ ४ ॥ तुका म्हणे भाकूं आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाड-किंमत, वोज-चांगला. अर्थ :- परमार्थासंबंधीचा विचार मी माझ्या जीवाला विचारूनच करीन. इतर लोकांची किंमत मला काय असणार ? त्यांचा संबंध काय ? १ जो तो आपले हित नीटपणे जाणीत असतोच; त्यांना त्यांच्या कर्मापासून निरोधित केले तर दुःखच होणार. २ माझी ही कथा कोणी ऐको वा न ऐको, किंवा कोणी आपल्या घरी सुखाने झोपी जावोत. ३ माझा तरी या मार्गात असा कोणता चांगला शेवट झाला आहे की, ज्याच्यामुळे मी इतरांना मार्गाला लावावे ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतःपुरती त्या ईश्वराची करुणा भाकेन. ज्याची जशी वासना तसा तो त्यास प्रसन्न होईल. तशी त्याची वासना फळद्रूप होईल. ५ ९१७ धाईं अंतरिच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥ १ ॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ २ ॥ वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥ ३ ॥ अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥ ४ ॥ साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि ॥ ५ ॥ तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - धाईं-संतुष्ट, ब्रह्मवृंदें-ब्राह्मणांचे मेळावे. अर्थ :- अंतःकरणातील परमेश्वररूपाच्या दर्शनाने जे सुख होईल ते ध्यानात धरून संतुष्ट व्हावे. मुखाने उगाच बडबड कशास करावी ? १ परमेश्वराच्या विषयांची अनुभवाची गोडी जोपर्यंत लाभलेली नाही, तोपर्यंत विधिनिषेधांची शुष्क चर्चा नुसती उर फोडणारी व्यर्थच होते. २ जोपर्यंत ईश्वरविषयक अनुभव आलेला नाही, तोपर्यंत हृदयातील तळमळ मात्र वाढत असते. ३ कित्येक जण आपल्याच विशिष्ट मताने येडावलेले असून त्यांचा त्यायोगे काहीही फायदा झालेला नाही. ते जिथे आहेत, तिथेच दिसतात. त्यांच्यांत कसलीही प्रगती झालेली नाही. ४ तुम्ही मौन धारण करून बुद्धी स्थिर करा. हीच खरी म्हणजे सर्व साधनांची सिद्धी आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु व्यर्थ वादविवाद करकरून हे ब्राह्मणांचे समुदाय किंवा मेळावे उगाच वाया मात्र गेलेले दिसतात. ६ ९१८ कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥ १ ॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ २ ॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥ ३ ॥ तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुशळ-कुशल, सांकडीं-संकटात, उपणुनि-पाखडून, मथिलें-पुसलेले असता. अर्थ :- जे शास्त्रांमध्ये कुशल आहेत, त्यांचे सारे आयुष्य विधिनिषेधांच्या जंजाळातच जाते व ज्यांची बुद्धी प्रगल्भ आहे, ते नेहमीच वाद करण्यास प्रवृत्त झालेले असतात. १ ढोंग किंवा दंभ व विषयांची संकटे यांत हे दीन बापडे लोक कसे फसून गेले आहेत पाहा. २ भुसा पाखडून काय हाती लागणार ? दाणेही जातील व भुसही हातचा जाईल. ३ आधीच लोणी काढून घेतले असताना मग ताक घुसळले असता काय हातात येणार ? ४

सार्थ तुकारामगाथा ४२१ ९१९ संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्या गव्हाणें जाणावे हे ॥ १ ॥ विठ्ठलाचे नाम घेतां नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ २ ॥ करितों कवतुक बोबडा उत्तरीं । झणी मजवरि कोप धरा ॥ ३ ॥ काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नयें ॥ ४ ॥ तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - गव्हारे = गवार माणसाने, अडाणी माणसाने, झणी = नको अर्थ :- मी माझ्या कवितांमधून जे काही बोलतो, ते खरे म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या संतांचीच उच्छिष्ट अशी वचने असतात मी अडाणी माणसाने याशिवाय काय बोलावे ? १ मला एका विठ्ठलाचे नामही शुद्धत्वाने नीट घेता येत नाही अशा स्थितीत मला आत्मबोधाचे ज्ञान कसे होणार ? २ मी काही कौतुकाने कवित्व करून बोबडे बोल बोलतो, यासाठी मजवर तुम्ही कोणी राग करू नका. ३ माझी जाती कोणती ? माझा अधिकार कोणता ? यासंबंधी तुम्ही कसलाही विचार नका करू. आणि याविषयीही मी फार बोलू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु हा देवच मला बोलवितो. त्यात काही गुह्य अर्थ असला किंवा काही भावरहस्य असले, तर तो एक परमेश्वरच जाणणारा आहे. ५ विवरण - या एका महत्त्वाच्या व प्रसादपूर्ण अभंगात आपल्या कवित्त्वविषयी व अनुभूतीविषयी तुकोबांनी दानतीन तत्त्वे फार स्पष्टपणे व मार्मिक रीतीने सांगितली आहेत प्रथमच त्यांनी नेहमीप्रमाणे कबूल केले आहे की, मी तसा अडाणीच मनुष्य असून मागील, जे कोणी मोठे सत्पुरुष होऊन गेले त्यांचेच उष्टे बोल मी बोलत आहे मागे जे श्रेष्ठ ऋषीमुनी बोलून होते, त्याचाच भाव आपण कवितेत सांगून 'झाडू संतांचे मारग । आंदरांनी भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू' अशा ओळींतून त्यांनी आपल्या कवित्वाच्या व भक्तिप्रसाराच्या कार्याचे पूर्वपरंपरामूल थोडक्यात येथेही स्पष्ट केले आहे दुसरा एक मुद्दा येथे उपस्थित झालेला आहे तो असा की, तुकोबा उच्च वर्णीयांच्या जातीचे नसल्यामुळे त्यांना कवित्त परावाक्यनिरुपणाचा अधिकार आहे की नाही ? त्यांनी वेदाचा अर्थ सांगावा की नाही ? अशा प्रका- रचे प्रश्न व त्याची चर्चा बुवांच्या वेळी होत होती या प्रकरणात त्यांच्यावर कित्येक कठिण असे अपमानाचे प्रसंगही गुदरले होतेच ते लक्षात ठेवूनच सांगतात का, मी हे सारे कौतुकाने कवित्व करीत आहे माझ्यावर कोणी रागही धरू नये माझी जात कोणती, हेही कोणी विचारू नये, असे त्यांनी विनविले आहे खरे म्हणजे विष्णुदासाना कसली आली ही जात ? असाच सिद्धान्त त्यांनी इतरत्र सांगितलेला आहे, आणि हा निर्णयही वेदशास्त्रास धरूनच असल्याची खात्री त्यांना होती 'यातायाती धर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं' उगाच आपला वर्णाचा अभिमान धरून कोण शहाणे झाले आहेत ? कोण पवित्र झाले आहेत ? उलट 'अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । संताचीं पुरानें भाट झालीं' एवढेच सांगून बुवा थांबत नाहीत, तर कबीर, लतिफ, सेना, कान्होपात्रा, दादू, चोखा, जनी इत्यादी तथाकथित यातिहीनांची उदाहरणे देऊन तुकारामबुवा विष्णुदासाना, विठ्ठलभक्ताना जातिधर्म उरत नाही, असच सांगतात "तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ' तिसरा एक महत्त्वाचा विचार या अभंगातील असा की, आपण जरी यातीहीन आहोत तरी आपल्या मुखा- तून जी अभंगवाणी स्रवते ती नुसती प्रसादिक आहे असे नव्हे, तर प्रत्यक्ष देवाचीच आहे असा बुवांचा विश्वास होता आपणास देव बोलवितो हे त्यांनी कित्येक ठिकाणी स्पष्ट केले आहे तुकोबाना देव बोलवितो याचा अर्थ असा की, अनुभवाने तुकोबा स्वत च देवत्व या पदवीस पोचलेले होते सर्वत्रहि देवच पसरून राहिलेला असल्याची अनुभूती त्यांना होती 'भावारूढ तुका झाला एका एकीं । देवच लौकिकीं अवघा केला' एका भक्तिभावामुळे सर्व विश्वच देवमय झाल्यामुळे तुकोबा बोलतील ते देव बोलला असे मानण्यात गैर काय आहे ? आणि याच भूमिकेवरून तुका- रामबुवा नेहमी म्हणत असत, 'तुका म्हणे मज बोलवितो देव', 'म्हणती माझे बोल बोले पांडुरंग,' 'पांडुरंगे भार घेतला माझा, ' 'भावाइढ तुका मुद्रा विठोबाची, ' 'बोलवितो देव मज', 'परि त्या विश्वभरें बोलविले',

४२२ सार्थ तुकारामगाथा 'मज विश्वंभर बोलवितो' 'वदवी गोविंद तैंचि वदें' यासारख्या वचनाचा भावार्थ सहज, स्पष्ट व तर्कानही पटणारा असाच आहे ९२० चंदनाच्या वासे धरितील नाक । नावडे कनक न घडे हे ॥ १ ॥ साकरेची गोडी सारखी सकळा । थोरा मोठ्या बाळा धाकुटियां ॥ २ ॥ तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - कनक-सोन अर्थ - सुवासिक चंदनाच्या वासाने त्रस्त होऊन कुणी स्वतःचे नाक धरून बसतील का ? सोने कुणाला आवडणार नाही असे कधी होईल का ? १ साखरेची गोडी सर्वांना, थोरांना, लहानांना, मध्यम वयाच्या लोकांना सारखीच असते २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझे चित्त जर शुद्ध असते तर लोकांनी ही अशी निंदा कधी केली नसती ३ ९२१ तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥ १ ॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देही ॥ २ ॥ भावे हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्ताच्या परी नावडती ॥ ३ ॥ न वजासी जेथें दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियाच्या ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - परी-प्रकार न वजासी-जात नाहीस अर्थ - देवा, तुझ्यासारख्या उदार बाहयाचे नाव दुसरोकड कुठे मिळणार ? तू दातृत्वाची एक रासच आहेस तू आपले स्वतः चे स्थानही आपल्या दासाना देतोस १ मग त्या सेवकाचे अथवा भक्ताचे कुळ शुद्ध आहे, की अशुद्ध आहे उच्च आहे की नीच आहे, हेही न पाहता त्याच्या निर्मळ देहात तू निवास करीत असतोस २ त्याच्या घरचे निकृष्ट अन्नही तू मोठ्या प्रीतीने खातोस देवा, परतु जे अभक्त असतात त्यांच्या घरी असणाऱ्या नाना पक्वान्नाचे प्रकारही तुला आवडत नाहीत ३ भक्ताच्या येथून तुला दूर केले, तरी तेथून तू हालत नाहीस, जात नाहीस, पण मोठमोठ्या योग्याच्याही चित्तात तू क्षणभरही ठरत नाहीस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा हीच तुती खरी खरी ब्रीदे आहेत असे चारही वेद सांगतात ५ ९२२ तरि का नेणते होते मागें ऋषी । तोंहीं या जनासी दुराविले ॥ १ ॥ वोळगती जया अष्ट महासिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥ २ ॥ कंदमूळें पाला घातुच्या पोषणा । खातील वास राणा तरी केला ॥ ३ ॥ लावूनिया नेत्र उगेचि बैसले । न बोलत ठेले 'मौन्यमुद्रे ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - तोंहीं-त्या ऋषींनाही, वोळगती-प्रसन्न होतात अष्ट महासिद्धी-अणिमा-शरीर सूक्ष्म होणे, महिमा-शरीर मोठ होणे, गरीर हल्के होण प्राप्ति-सब प्राण्याच्या इद्रियानी त्या त्या अधिष्ठात्री देवताना रूपाना सरध यण प्राकाम्य-ऐहिक व पारलौकिक स्थानी भोग व दानाचे सामध्य येण ईशिता-ईश्वराच्या ठिकाणची मायचा प्रेरणा वगिता-आसक्त न हाण आणि प्राकाम्य-इच्छितर गुण अमर्यादपण प्राप्त होण या आठ महासिद्धी म्हणून मागितल्या आहत राणा-रानाबनात अर्थ - जे या सर्वसामान्य लोकांपासून दूर राहिले, ते पूर्वचि ऋषीमुनी काय अज्ञानी होते की काय ? त्यांनी या सामान्य जनांना का दूर केले ? १ ज्यांना अष्टमहासिद्धी प्रसन्न आहेत, त्यांनी सुद्धा या सामान्य लोकांच्या १ मौनरूप

सार्थ तुकारामगाथा ४२३ बुद्धीने वागण्याचे नाकारलेले आहे. २ ज्यांनी रानावनांत निवास केला आहे, ते केवळ शरीरधारणेसाठीच कंदमुळे व पाला भक्षण करतात. ३ या त्यानंतर हे साधक सज्जन डोळे मिटून, ध्यानस्थ होऊन, अचोल होऊन, मौनव्रत स्वीकारून बसले आहेत. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्याही चित्ताची अवस्था अशीच होईल, असे तू करावेस अनंता, या सर्वसामान्य लोकांपासून तू मला दूर करावेस. ५ ९२३ कोणाच्या आधारे करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥ १ ॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी याचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥ २ ॥ कलियुगीं बहु कुशल हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥ ३ ॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठाव-आधार, सवा-बाजूनी. अर्थ :- देवा, आता मी कुणाच्या आधाराने या मार्गाविषयी विचार करू रे? माझ्या दीन जीवास कोण धीर देईल रे ? १ मी काही मोठा शास्त्रज्ञ नाही, पंडित नाही, मोठा याचकही नाही. मी एक यातीहीन असून मला दुसरीकडे कुठे आधारही नाही. २ आणि या कलियुगात तर लोक किती चतुर झाले आहेत ते पाहा तुझे गुणगान करीत असतानाही ते मला छळतील. ३ तेव्हा, देवा, आता मी काय करावे रे? तुझे भजन करू ? की या लोकांच्या नादी लागू ? दोन्हीकडून मी संशयात सापडलो आहे. मी काय करावे आता ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी या लोकांना दूर करू ? की यांच्याबरोबर मरण पत्करू ? दोनही गोष्टी मला बऱ्याच दिसतात. ५ ९२४ काय उणें जालें तुज समर्यासी । ऐसा मजपाशी कोण दोष ॥ १ ॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥ २ ॥ तुजविण रत आणिकाचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दायीं मज ॥ ३ ॥ तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेव्हार-प्रकार, रत-रममाण, आणिकांचे-दुसऱ्याचे, गुमान - भीड, उगवून - स्पष्ट करून. अर्थ :- देवा, तू सर्वसमर्थ असताना तुला कोणत्या गोष्टीची उणीव आहे ? किंवा माझा तरी असा कोणता दोष निर्माण झाला आहे ? १ तू माझा स्वीकार का करीत नाहीस ? मी हा सर्व प्रकार संतांच्या मेळाव्यात सांगू का ? २ तुझ्याशिवाय इतर दैवताच्या ठिकाणी मी रममाण झालो आहे, अशी साक्ष कुणी तरी द्यायला तयार आहे का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, उगाच भीड धरून काय बसला आहेस रे ? सर्व काही गोष्टी तुम्ही मला समजावून सांगा ना ४ ९२५ काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥ १ ॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैंची उरी ॥ २ ॥ अनेक दीपांचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥ ३ ॥ तुका म्हणे नेंणे दुजें । एका विण पंढरीराजें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आन-इतर, दुजें-दुसरे. अर्थ :- या एका पंढरीनाथावाचून इतर दैवताचा मला काय उपयोग आहे ? १ एकदा नदी समुद्रास मिळाली की मग ती आपल्या वेगळ्या नावाने कुठे उरते ? २ सूर्य उगवताच इतर लहानसान दिव्याचा प्रकाश संपतोच की नाही ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, या एका पंढरीराजाशिवाय मी दुसरे दैवत कधीच जाणीत नाही. ४

४२४ सार्थ तुकारामगाथा ९२६ काय करु कर्माकर्म । धरें सापडले वर्म ॥ १ ॥ होसी नामाच सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ २ ॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी सचला ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हा ओझें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लेखा-मर्यादा, वेचावेच-जमाखर्च अर्थ - कर्म व अकर्म याच्या कटकटींची चर्चा मी कशास करू ? मला या विठ्ठलाच्या नामाचे हे वर्म खरे सापडले आहे १ देवा, तू तुझ्या नामासारखाच कृपाळू व वत्सल होतोस व त्याचप्रमाणे आपल्या भक्ताची समजूत काढतोस अशी किती जनाची समजूत काढलीस त्याला सीमा नाही २ तुझ्या स्वरूपाविषयीही देवा काही खर्च वा काही जमा, असे न होता तू जसा आहेस तसाच साचून आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा, माझे ओझे तुम्ही का मानावे ? ४ ९२७ एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥ १ ॥ आम्ही देवा शक्तिहीने । भाकू तेणे करुणा ॥ २ ॥ पावटणी केला काळ । जया बळ होते ते ॥ ३ ॥ तुका म्हणे वीर्यावीर । सतधीर समुद्र ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हातोफळी-हातावर हात मारून ठाया-ईश्वरस्वरूपात पावटणी-पायरी अर्थ - कित्येक बलवान साधुसत आपल्या हातावर हात देऊन, टाळी वाजवून ईश्वरस्वरूपास प्राप्त झाले आहेत १ पण देवा, आम्ही मात्र शक्तिहीन असल्याने तुझी करुणाच केवळ भाकू २ ज्या साधुसंताना सामर्थ्य होते, त्यांनी यमास आपल्या घरी चढून जाण्याच्या पायरीचे स्थान दिले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सत म्हणजे धैर्यवान व वीरातील वीर असून धीराचे समुद्रच आहेत ४ ९२८ पुढिलांचे इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥ १ ॥ सत गेले तया ठाया । देवराया पावतीं ॥ २ ॥ ज्येष्ठांचीं का आम्हा जोडी । परवडी न लभो ॥ ३ ॥ तुका म्हणे करीं फोड । पुरवीं लाड आमुचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परवडी-प्रकार अर्थ - आमच्या पुढे जाऊन साधुसंतानी जे मिळविले, त्याचीच इच्छा मीही करीत आहे पण माझ्या अंगी तेवढे बळ मात्र नाही १ पण देवराया, यापूर्वीचे साधुसंत जेथे जाऊन पोचले आहेत, ते स्थान मला दाखवा त्या स्थानावर मला पोचवा २ ज्येष्ठ असणाऱ्या साधुसंतानी भक्तीचे जे जे प्रकार भोगले त्याचा लाभ आम्हांस का होऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आमचे कोडकौतुक करून लाड पुरवा ना ४ ९२९ कैवल्याच्या तुम्हा घरीं । रासी हरी उदंड ॥ १ ॥ मजसाटीं का जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ २ ॥ सर्वो गुणीं सपूरता । ऐसा पिता असोनी ॥ ३ ॥ तुका म्हणे पाडुरंगा । जालो सागा सन्मुख ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कैवल्याच्या-मोक्षाच्या, उदंड-पुष्कळ वाणी-कमतरता अर्थ - देवा, तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी असतील १ मग मलाच सर्व बाबतीत कमतरता का हो ? मला त्यांचा वाटा का मिळत नाही ? २ तू सर्व गुणांनी सपूर्ण असून, सर्वांचा पिता असून माझ्या

सार्थ तुकारामगाथा ४२५ धांवतोस अशी उणीव का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुमच्या समोर येऊन उभा आहे, मला सांगा ना सर्व काही ४ ९३० आपल्याला तुम्ही रूपासी समजा । फासया घरजा आरसिया ॥ १ ॥ हे तो नव्हे देहबुद्धीचे कारण । होईल नारायणे दान केले ॥ २ ॥ शत्रूचिया बाणे वर्मासि स्पर्शवे । हे तो नाहीं ठावे मोकलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु मुरें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फासया-बाय म्हणून, घरजा-त्याग, राग अर्थ - आपापल्या रूपांना तुम्ही समजून घ्या ना उगाच रागारागाने आरसाच टाकून देण्यात काय अर्थ आहे ? १ देहबुद्धी निर्माण होऊन नीट शरीर रक्षणाचे समजले म्हणजे गुह्यरूप प्राप्त होते असे नाही नारायणाने दान दिले तरच रूप आपणास मिळते २ शत्रूच्या बाणामुळे शत्रूच्या वर्मास स्पर्श होतो, पण ते बाण सोडणाऱ्यास समजत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, बहुमुलानी ही वचने सांगितली तरी सत्याशिवाय त्याना महत्व नाही ४ ९३१ न मनावी चिंता तुम्ही सतजनों । हिरा स्फटिकमणी केवि होय ॥ १ ॥ पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ २ ॥ बहुतासी भय एकाचिया दंडे । बहुत या तोडे वचनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं बैसरी या सर । करायाचे चार वेडे वेडे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न मनवी-मानू नये करू नये पारिखा-परका, सर-बरोबरी अर्थ - तुम्ही सत लोकानी कसलीही चिंता करू नये कारण हिऱ्याप्रमाणे लाभलेला हा परमेश्वर स्फटिक- मण्याप्रमाणे होणार नाही १ जेथे आपण आहोत, त्यानुसारच जो प्रसंग निर्माण झाला आहे काही परका भावही पाहिला हेही खरे आहे २ एकाला शिक्षा केली की, इतर पुष्कळांना भय वाटू लागते शब्दानाही पुष्कळ वेगवेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नाना प्रकारचे वेडेचार करणारी व इतरांची बरोबरी करणारी अशी माझी वाणी नाही ४ ९३२ यथाविधि पूजा करी । सामग्री तोवरि हे नाहीं ॥ १ ॥ आतां माझा सर्व भार । तू दातार घालविसी ॥ २ ॥ मंगळ ते तुम्हीं १ जाणा । नारायणा काय ते ॥ ३ ॥ तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सामग्री-सामग्री अर्थ - देवा यथाविधीने पूजा करावी अशी काही सामग्री मजजवळ नाही १ परंतु दातारा, माझा सर्व भार आता तुम्हीच चालवीत आहात २ नारायणा, जे काही पवित्र व मंगल आहे ते तुम्ही जाणीत आहात ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा हा सब देहभाव मी तुलाच समर्पित केलेला आहे ४ ९३३ भवसिंधूचे हे तारू । मज विचारु पाहता ॥ १ ॥ चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ २ ॥ माझ्या खुणा मनापाशी । तें या रसीं बुडाले ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म आले । हाता भले हें माझा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विचारु-विचार करून पाहता १ आम्ही जाणा तु गाथा ५४

४२६ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- मी नीट विचार करून पाहिले, तेव्हा देवा, तुम्ही मला भवसिंधू तरून नेण्याइतके समर्थ असे ताह आहात हे समजले. १ देवा, तुमचेच पाय मी माझ्या चित्तात धारण करीन गुप्त काय ते तेथेच आहे. २ माझ्या मनाच्या असलेल्या परमार्थाच्या सर्व खुणा या हरीच्या भक्तिरसात बुडून गेल्या आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातात हे मर्म आले; हे फार चांगले झाले आहे ४ ९३४ पाहाता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥ १ ॥ जिव्हे गोडी तीन अक्षराचा रस । अमृत जयास फिके पुढें ॥ २ ॥ श्रवणींची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद धारोनियां¹ ॥ ३ ॥ महामळें मन होतें जें गांबले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥ ४ ॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सापडलें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - न वजे-जात नाही, गांबले-भरलेले अर्थ - या श्रीहरीचे मुख पाहताच माझे सुख सुखावले गेले व माझ्या डोळ्याची भूक ही कधी जात नाही असे झाले. १ विठ्ठल या तीन अक्षराच्या भक्तिरसात गोडी निर्माण झाली असून तिच्यापुढे प्रत्यक्ष अमृतही फिके पडत आहे २ या श्रीहरीचे गुणगान ऐकण्याची वाटही चांगली शुद्धपणे चोखाळलेली असून सर्व भेदाभेद संपून गेले आहेत. ३ माझे मन मोठ्या मळामुळे भरलेले होते, ते यामुळे शुद्ध होऊन स्फटिकाप्रमाणे निर्मळ झाले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल म्हणजे माझ्या जीवनाचे जीवन असून एका फार मोठ्या मोलाचा साठा मला सापडला आहे ५ ९३५ हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देता ठायी द्वैत तुटे ॥ १ ॥ बोलापासि मात मन निवे हर्षे चित्त । दुणी बाढे प्रीत प्रेमसुख² ॥ २ ॥ जनात भूषण वैकुंठी सरता । फावले स्वहिता सर्वभावें ॥ ३ ॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पाहयला ॥ ४ ॥ तुका म्हणे हा विठ्ठलचि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - आळंगीन-आलिंगीन, बाहीं-बाहूंनी. अर्थ :- या परमानंदस्वरूपाच्या श्रीहरीस मी दोन्ही बाहूंनी आलिंगन देईन. त्याला आलिंगन दिल्या- बरोबर द्वैताचा नाश होतो १ त्याच्याविषयी गोष्टी करण्यातच विशेष आनंद चित्ताला होतो, मन निवून जाते व प्रेमसुखात दुप्पटीने वाढ होते २ लोकात भूषण वाढून शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते सर्व प्रकारचे स्वहित साधले जाते ३ सर्व प्रकारचा लौकिक व्यवहार संपतो, मायिक लोकाचार संपून जातो, आणि संसाराविषयीची भावना समूळ नष्ट होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला याच विठ्ठलाची रात्रंदिवस सोबत हवी; माझ्या जीवास आणखी दुसरी कसलीही हौस नाही ५ ९३६ आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥ १ ॥ प्रेमपान्हा स्तनां सदा सर्वकाळ । दृष्टि हे निमंळ अमृताची ॥ २ ॥ भूक तान दुःख वाटो नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनिया ॥ ३ ॥ आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हा करीं खेळावया ॥ ४ ॥ तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेयें न पवे हात कळिकाळाचा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - दवडी-नाहीसा कर, ठाव-स्थान, सांगात-सोबत. १ निवारुनि, २ प्रेमसुखें