छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
शिवाजीचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी अडीच लाख स्वार पाठविले. सभासदाने दिलेली माहिती कदाचित अतिशयोक्तीची असली तरी शिवाजीचा पाठलाग करण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठविली ही गोष्ट मात्र खरी. शिवाजी कैदेतून पळाला म्हणून औरंगजेबाने रामसिंगास जबाबदार धरले. त्याला बोलावून त्याचा पाणउतारा केला आणि त्याची मनसब एकदम कमी केली. शिवाजीबरोबर आलेल्या मराठ्यांपैकी जे लोक अद्याप परत गेले नव्हते आणि आग्रा किंवा जवळपास मुक्कामाला होते त्यांची त्वरेने धरपकड करण्यात आली. त्यामध्ये रघुनाथपंत कोरडे, दत्ताजी त्रिंबक, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आणि कवींद्र परमानंद ह्यांचा समावेश होता. जवळजवळ ८ महिने ही मंडळी औरंगजेबाच्या कैदेमध्ये होती. पुढे एप्रिल १६६७ मध्ये या साऱ्यांची सुटका करण्यात आली. शिवाजी राजगडाकडे परत शिवाजीला शोधण्यासाठी औरंगजेबाने फौजेची अनेक पथके वेगवेगळ्या मार्गांनी पाठविली. बहुधा शिवाजी वेषांतर करून हुलकावण्या देत असावा. कारण कोणत्याही तुकडीला त्याला शोधून काढता आले नाही. संभाजीबरोबर असल्यामुळे शिवाजीला त्याची काळजी वाटत होती. एक तर तो वयाने लहान होता. तो बरोबर असल्यामुळे शिवाजीचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते. तेव्हा शिवाजीने असा विचार केला की संभाजीला मथुरेत ठेवावे आणि आपण पुढे मार्गक्रमण करावे. मथुरेत असलेले शिवाजीचे निष्ठावंत सेवक कृष्णाजीपंत व काशीपंत यांच्या स्वाधीन संभाजीला करून शिवाजीने निर्धास्तपणे दक्षिणेचा मार्ग स्वीकारला. शिवाजी कोणत्या मार्गाने राजगडला परत आला याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. आग्राहून परत येताना दूरचा मार्ग शिवाजीने स्वीकारला असावा असे मत सर जदुनाथ सरकार यांनी दिलेले आहे. या मताप्रमाणे आग्रा-मथुरा- वाराणसी-प्रयाग-गोंडवण-हैद्राबाद या मार्गाने शिवाजी राजगडाकडे परतला असावा. परंतु समकालीन राजस्थानी कागदपत्रांवरून असे दिसते की शिवाजी ज्या मार्गाने आग्र्याला गेला त्याच मार्गाने राजगडाकडे परतला कारण आग्राहून निसटल्यावर तो नरवरच्या घाटापर्यंत आल्याचा उल्लेख एका राजस्थानी पत्रामध्ये आलेला आहे. आग्र्याला जाताना तो राजगड-औरंगाबाद-हंडिया- भोपाळ-सिरोज-नरवर-ग्वाल्हेर-धोलपूर-आग्र्याया मार्गाने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेला होता. बहुधा त्याच मार्गाने तो राजगडाकडे परत आला असावा १२ ५४ छत्रपती शिवाजी महाराज
सप्टेंबर १६६६ रोजी निवडक लोकांसह शिवाजी राजगडला सुखरूप पोहचला. १९ ऑगस्ट रोजी त्याने स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर तब्बल २४ दिवसांनी तो राजगडला पोहचला. जर तो गोंडवण-हैद्राबाद मार्गाने आला असता तर त्याला अधिक दिवस लागले असते. शिवाजी राजगडला सुखरूप पोहचल्यानंतर राजमंडळामध्ये आणि कुटुंबियांमध्ये मोठा आनंद पसरला अष्टप्रधान मंडळ, इतर सर्व अधिकारी, राजगडवरील सर्व सेवक आणि मावळे यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजमाता जिजाबाई हिला औरंगजेबाच्या पोलादी पिंजऱ्यात अडकलेला आपला पुत्र तेथून निसटून सुखरूपपणे आपल्यापाशी परत आला याचा आनंद केवढा झाला असेल ते शब्दात सांगता येणार नाही. शिवाजी राजगडला सुखरूप पोहोचल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर १६६६ मध्ये कृष्णाजी पंताने संभाजीला राजगडावर आणले. तो येईपर्यंत शिवाजी राजगडला आल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली असावी. कारण जेधे शकावलीत असा उल्लेख आहे की 'मार्गशिर्ष शुद्ध पंचमी शके १५८८ (२० नोव्हेंबर १६६६) रोजी शिवाजी संभाजीसह वर्तमान राजगडास आले.' राजगडास आल्यानंतर शिवाजीने सवड न घेता आगामी मोहिमेची तयारी सुरू केली. □□□ शिवाजी आणि औरंगजेब ५५
८. चढाईचे राजकारण आग्याहून परत आल्यावर शिवाजी आग्याहून परत राजगडला आल्याचे वर्तमान नोव्हेंबर १६६६च्या अखेरीस सर्वत्र पसरले. शिवाजीच्या शत्रूंची मोठी तारांबळ उडाली. विजापूर दरबारात मोठी खळबळ माजली. वखारवाले इंग्रजांचे धाबे दणाणले. शिवाजीच्या सुटकेचा सर्वात मोठा धक्का दक्षिणेत असलेल्या मिर्झाराजे जयसिंगाला बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की तो आजारी पडला आणि त्यातच २८ ऑगस्ट १६६७ रोजी बन्हाणपूर येथे त्याचा मृत्यू झाला. बन्हाणपूर येथे तापी नदीचे काठी मिर्झाराजे जयसिंग यांची भव्य समाधी बांधलेली आजही दिसते. शिवाजी आग्याला अडकून पडला असताना त्याचे लहानसहान शत्रूही मोकाट सुटले होते. परंतु शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटला हे समजल्यावर त्याच्या बहुतेक शत्रूंनी आपले धोरण बदलले. सप्टेंबर १६६६ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तुमजमा याने रांगणा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. आदिलशहाला ही गोष्ट आवडली नाही. त्याने बहलोलखान या सरदाराला मराठ्यांविरुद्ध पाठविण्याचे ठरविले. शिवाजीचा सावत्रभाऊ व्यंकोजी राजे बहलोलखानच्या मदतीला धावून आला आणि त्या दोघांनी मिळून रांगणा किल्ला मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या जबरदस्त प्रतिकारामुळे त्यांना यश आले नाही. मराठे आपल्याला दाद देत नाहीत, आणि आता तर प्रत्यक्ष शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आला आहे, हे लक्षात घेऊन आदिलशहाने आपणहून शिवाजीशी सलोखा करण्याचे ठरविले. दरसाल दोन लाख होन खंडणी देण्याचे मान्य करून आदिलशहाने शिवाजीशी तह केला. कुतुबशहा हा तर प्रथमपासून सावध होता. शिवाजीशी शत्रुत्व नको म्हणून त्याने आपणहून शिवाजीशी मैत्रीचा तह केला आणि दरसाल पाच लाख होन खंडणी देण्याचे कबुल केले. यावरून आग्याहून परत आल्यानंतर शिवाजीचा दरारा केवढा निर्माण झाला होता याची कल्पना येते. आदिलशहा आणि ५६
कुतुबशहा यांच्याशी मैत्रीचे तह झाल्यावर मुघलांशिवाय कोणी मोठा शत्रू शिवाजीला उरला नाही. पोर्तुगीज आणि इतर पाश्चात्त्य वखारवाले अधून मधून शिवाजीच्या वाटेला जात होते. त्याशिवाय जंजिऱ्याचे सिद्दी हे समुद्रावर सत्ता गाजवत असल्याने त्यांचे आव्हानही शिवाजीसमोर होते. सिद्दी काय, पोर्तुगीज काय किंवा पाश्चात्त्य वखारवाले काय, यांना कह्यात आणायचे असेल तर आपले स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार उभारणे आवश्यक आहे, हे शिवाजीने ओळखले होते. आरमाराची उभारणी जावळीचे खोरे जिंकल्यानंतर रायगडसारखा दुर्गम किल्ला शिवाजीच्या ताब्यात आला आणि त्याच्या राज्याची सरहद्द समुद्रापर्यंत जाऊन भिडली. इ.स. १६५७ मध्ये कल्याण, भिवंडी जिंकल्यानंतर किनारपट्टीतील आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी आपण स्वतंत्र आरमार उभारले पाहिजे याची जाणिव शिवाजीला झाली होती आणि म्हणून इ.स. १६५७ मध्येच आरमार बांधणीस त्याने सुरुवात केली. पोर्तुगीज पत्रव्यवहारावरून असे दिसते की आरमार उभारण्यामध्ये प्रारंभीच्या काळात पोर्तुगीज तंत्रज्ञांनी शिवाजीला मदत केली होती. १६५७ ते १६५९ या दरम्यान शिवाजीने २० जहाजे तयार केली. १६५९ मध्ये अफझलखानाचा वध झाल्यानंतर किनारपट्टीचा आणखी प्रदेश शिवाजीला मिळाला. इ.स. १६६४ मध्ये चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रावरून शिवाजीचे आरमारी सामर्थ्य बरेच वाढले होते असे दिसते. शिवाजीची राजनीती अशी होती की, किनारपट्टीचा जेवढा-जेवढा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली येईल, तेवढ्या प्रमाणात आरमारी सामर्थ्यामध्ये वाढ झाली पाहिजे असा त्याचा हिशेब होता. आपल्या आरमारी सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी शिवाजीने इ.स. १६६५ मध्ये बसनूरची स्वारी काढली आणि त्यात तो यशस्वी झाला. थोडक्यात जयसिंगाची स्वारी होण्यापूर्वी आणि शिवाजीची आग्राभेट होण्यापूर्वी मराठ्यांचे आरमार चांगलेच आकाराला आले होते. आग्र्याहून परत आल्यानंतर आरमारी सामर्थ्य अधिक बळकट करण्याचा निर्णय शिवाजीने घेतला. १६६७ मध्ये शिवाजीने आपले आरमारी सामर्थ्य एवढे वाढविले की गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरांना एका पत्रात 'शिवाजीचे आरमार आता भीतीदायक वाटते. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे शिवाजीने आरमार तर वाढविलेच पण किनाऱ्यावर किल्लेही बांधले.' असे म्हटलेले आढळते. वरकरणी मात्र पोर्तुगिजांनी शिवाजीबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले चढाईचे राजकारण ५७
होते. आग्र्याहून शिवाजी सुखरूप परत आल्यानंतर त्याचे अभिनंदन करण्यासाठी गोवेकरांनी एक खास वकीलही पाठविला होता. परंतु अंतःस्थपणे पोर्तुगिजांच्या शिवाजीविरुद्ध कारवाया चालू होत्या. पोर्तुगीजांच्या कारवाया शिवाजीने आरमारी सामर्थ्य वाढविल्यामुळे पोर्तुगिजांना शिवाजीच्या हेतूविषयी संशय वाटू लागला होता. विशेषतः शिवाजीने सुरत लुटल्यानंतर पोर्तुगिजांना अधिक काळजी वाटू लागली होती. सुरतेची लूट स्वराज्यात आणताना शिवाजीला पोर्तुगिजांनी मदत केली होती, असा निष्कर्ष पोर्तुगीज दप्तरातील पत्रव्यवहारावरून निघतो. शिवाजीच्या सामर्थ्याला पोर्तुगीज वचकून होते. पण त्याचबरोबर शिवाजीची नजर आपल्या राज्याकडे केव्हा वळेल याची भीतीही त्यांना वाटत होती. म्हणूनच वरकरणी पोर्तुगिजांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. तथापि, शिवाजीच्या विरोधकांना मदत करण्याचे धोरणही त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे हे दुटप्पी वर्तन शिवाजी ओळखून होता. कुडाळचे देसाई शिवाजीला विरोध करण्यामध्ये आघाडीवर होते. वास्तविक पाहाता कुडाळचा लखम सावंत याचा पराभव करून शिवाजीने त्याला चांगलाच धडा शिकविला होता. त्याने शिवाजीबरोबर तह करून अभयदान मिळविले होते. परंतु शिवाजी आग्र्याकडे गेल्यानंतर लखम सावंताने आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या. विशेषतः पोर्तुगिजांची फूस असल्यामुळे लखम सावंत शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्यास उद्युक्त झाला. आग्र्याहून परतल्यानंतर लखम सावंतचे उद्योग आणि पोर्तुगिजांच्या कारवाया शिवाजीच्या लक्षात आल्या. तेव्हा लखम सावंतला धडा शिकविण्यापेक्षा पोर्तुगिजांनाच धडा शिकवावा असे शिवाजीने ठरविले. त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७च्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगिजांच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून शिवाजीने पोर्तुगिजांना नामोहरम केले. शिवाजीचा प्रतिकार करणे आपल्याला जमणार नाही आणि प्रतिकार जर केला तर शिवाजी थेट गोव्यापर्यंत येऊ शकेल अशी भीती पोर्तुगिजांना वाटू लागली. आणि म्हणून त्यांनी शिवाजीबरोबर तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंताला पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरले. अशा प्रकारे आदिलशहा आणि कुतुबशहानंतर पोर्तुगिजांनीही शिवाजीचे श्रेष्ठत्व मान्य केले. मुअज्जमची भूमिका दक्षिणेचा मुघल सुभेदार म्हणून शाहजादा मुअज्जम मे १६६७ मध्ये ५८ छत्रपती शिवाजी महाराज
औरंगाबादला रुजू झाला. आग्र्याहून सुटका करून शिवाजी दक्षिणेत परत आल्यावर मुघलांच्या राजकारणात फरक घडून येऊ लागला. शिवाजी आता निसटलाच आहे, तेव्हा ह्याच्याशी वैर करण्यापेक्षा शक्यतो समझोता करावा असे खुद्द औरंगजेबाला वाटू लागले होते. विशेषतः मिर्झाराजे जयसिंग मृत्यू पावल्यामुळे औरंगजेबाला दक्षिणेचे राजकारण आक्रमक स्वरूपाचे करून चालणार नाही असे वाटू लागले. शाहजादा मुअज्जम हा स्वतः ऐषआरामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजीशी लढा देण्यापेक्षा सामोपचाराचे धोरण स्वीकारावे असे त्याचे मत होते. शिवाय संभाजीला मनसबीच्या जाळ्यात पकडून काही कूरघोडी करता येईल का या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. संभाजीला पुन्हा मनसब द्यावी म्हणून त्याने औरंगजेबाचीही परवानगी मिळवली आणि त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७ मध्ये संभाजीला औरंगाबादेला बोलाविले मुअज्जमने समारंभपूर्वक संभाजीला मनसबदारी बहाल केली. संभाजी वयाने लहान असल्यामुळे त्याच्यातर्फे मन्सबीची जबाबदारी निराजी रावजी आणि प्रतापराव गुजर यांनी सांभाळावी असेही ठरले. अशा प्रकारे मराठ्यांशी सख्य जोडण्याचा उपक्रम मुअज्जमने सुरू केला होता. परंतु दिल्लीत औरंगजेबाला मुअज्जमच्याच हेतूविषयी शंका वाटू लागली. मराठ्यांच्या मायाजालात मुअज्जम जर फसला तर दक्षिणेतील राजकारणाचा धागा तुटून जाईल अशी भीती औरंगजेबाला वाटू लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी निघून गेल्यामुळे तो अत्यंत बेचैन झाला होता. सूड म्हणून हिंदू जमातीवर जिझिया कर बसविण्याचे त्याने ठरविले. वास्तविक पाहाता हा जाचक कर अकबराने विचारपूर्वक बंद केला होता. परंतु औरंगजेबाने मात्र हेतुपुरस्सर हिंदूंवर जिझिया कर बसविला. शिवाजी त्यामुळे उद्विग्न होईल अशी औरंगजेबाची अपेक्षा होती. गरीब सामान्य हिंदू रयतेवरती हा जुलमी कर बादशहाने बसविला ही गोष्ट शिवाजीच्या मनाला क्लेशदायक वाटली. त्याने औरंगजेबाला लिहिलेले फारसी भाषेतील एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रावरून शिवाजीच्या उदार धार्मिक धोरणाविषयी आणि त्याच्या थोरपणाविषयी कल्पना येते. त्याने या पत्रात उल्लेख केला आहे की, ‘हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही परमेश्वराची लेकरे आहेत. मंदिरामध्ये हिंदू घंटानाद करतात, तर मशिदीमध्ये मुसलमान ईश्वराला बांग देतात. सृष्टी हे परमेश्वराने निर्माण केलेले एक सुंदर चित्र आहे.’ अशा आशयाचा मजकूर लिहून शिवाजीने औरंगजेबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने मात्र आपली भूमिका अधिक ताठर करून सुरतेच्या हिंदू व्यापाऱ्यांवर अधिक जकात बसविली. हिंदूंना डिवचण्यासाठी १६६९च्या सुमारास काशी येथील चढाईचे राजकारण ५९
देवालय औरंगजेबाने पाडले. आणि त्या ठिकाणी मशीद उभारली. अशा प्रकारच्या औरंगजेबांच्या ताठर धोरणामुळे उत्तर भारतात सर्वसामान्य हिंदूंमध्ये अस्वस्थता पसरली. सुरतेमधील जवळ जवळ ८००० हिंदू बादशहाकडे दाद मागण्यासाठी दिल्लीकडे गेले, असा उल्लेख एका समकालीन पत्रामध्ये आढळतो. दक्षिणेत दहशत निर्माण करण्यासाठी औरंगजेबाने मुअज्जमला असे कळविले की, प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी या दोघांनाही कैद करावे. मुअज्जमला मात्र बादशहाच्या या घातकी धोरणाबद्दल चीड आली होती. त्याने कोणालाही कैद वगैरे केले नाही. उलट मराठ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या प्रदेशात जाऊ दिले. वास्तविक पाहता शिवाजीची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर सलोख्याचे राजकारण जर औरंगजेबाने केले असते तर शिवाजीनेही मुघलांबाबत सामोपचाराचे धोरण स्वीकारले असते. संभाजीला मन्सब घेण्यासाठी पाठवून शिवाजीने आपले सामोपचाराचे धोरण स्पष्ट केले होते. औरंगजेबाने हिंदूवर जिझियाकर लादलेला ऐकून एक सविस्तर पत्र पाठवून सामान्य रयतेची छळवणूक करू नये अशी तळमळीची विनंती शिवाजीने बादशहाला केली होती. परंतु संपूर्ण दक्षिण आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मनसुबा औरंगजेबाने रचलेला होता आणि म्हणून शिवाजीच्या सामोपचाराच्या धोरणाला त्याने दाद दिली नाही. शिवाजीची आक्रमक भूमिका औरंगजेबाने सामोपचाराचे धोरण सोडून देऊन आपल्याविरुद्ध छुपे राजकारण सुरू केले, आपले निष्ठावंत सरदार निराजी रावजी व प्रतापराव गुजर यांना विश्वासघाताने कैद करण्याचा डाव रचला हे पाहून शिवाजीनेही मुघलांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले आणि केवळ घाटावर व कोकणातच नव्हे तर बागलाण, खानदेश, वऱ्हाड, मराठवाडा इत्यादी मुघलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर आक्रमक हल्ले करण्याचे धोरण आखले. पुरंदरच्या तहामुळे जो प्रदेश गमावला आणि जे किल्ले गमावले आहेत ते पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवाजीने योजना आखली. पुण्याजवळ असलेला सिंहगड हा किल्ला स्वराज्याचे प्रवेशद्वारच होते. तेव्हा तो किल्ला प्रथम जिंकून घेण्याचे शिवाजीने ठरविले आणि त्याप्रमाणे ४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजीने तानाजी मालुसरे याला पाठवून सिंहगड जिंकून घेतला. हा अभेद्य किल्ला जिंकून घेण्यासाठी तानाजीला वीरमरण पत्करावे लागले. पुण्याजवळ घाटमाथ्याच्या तोंडाशी असलेला दुसरा ६० छत्रपती शिवाजी महाराज
किल्ला म्हणजे पुरंदर होय. हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याला पुणे शहराची, विशेषतः स्वराज्याची नाकेबंदी करता येणे सहज शक्य होते. त्यामुळे सिंहगड पाठोपाठ पुरंदरचा किल्ला ताब्यात घेण्याचे शिवाजीने ठरविले. शिवाजीने निळोपंतांना पुरंदरचा किल्ला जिंकण्यास पाठविले. ८ मार्च १६७० रोजी निळोपंतांनी हा किल्ला जिंकून घेतला. अशा प्रकारे शिवाजीने अवघ्या दोन महिन्यात दोन महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची झोप उडाली. हे किल्ले जिंकण्यापूर्वीच वऱ्हाड प्रदेशात जानेवारी १६७० मध्ये मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर जुन्नर-नगर पासून थेट औरंगाबादपर्यंत आणि तेथून मराठवाड्यात परिंडा-औसा पर्यंत आक्रमण करून मराठ्यांनी मुघलांची दाणादाण केली. पुरंदरच्या तहाप्रमाणे जे २३ किल्ले मुघलांना देण्यात आले होते ते एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा सुरू केला. ३ मे १६७० रोजी लोहगड जिंकून घेतला, तर १६ जून रोजी माहुली जिंकून घेतला. त्यानंतर एकाच आठवड्यात २२ जून रोजी कर्नाळा आणि २४ जून रोजी रोहिडा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. अशा प्रकारे १६७०च्या पावसाळ्यापर्यंत पराक्रमाची शर्थ करून मराठ्यांनी पुरंदरच्या तहाचा कलंक धुवून काढला. केवळ किल्ले जिंकून मराठे थांबले नाहीत, तर मुघलांच्या ताब्यात गेलेली महत्त्वाची ठाणीही त्याने एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा उद्योग सुरू केला. कल्याण हे कोकणातील महत्त्वाचे ठाणे मराठ्यांनी जिंकून घेतले. अशाप्रकारे शिवाजीचे हे आक्रमक धोरण पाहून औरंगजेबाला शिवाजीविरुद्ध काहीतरी जालीम राजकारण केले पाहिजे असे वाटू लागल्यास नवल नाही. आदिलशहाला आणि किनारपट्टीवर असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना आपल्या बाजूस वळवून शिवाजीविरुद्ध डावपेच लढविण्यास त्याने सुरुवात केली. त्यानुसार त्याने पाश्चात्य वखारवाल्यांना आणि आदिलशहा यांना फर्माने पाठविली परंतु हे सर्व होईपर्यंत पावसाळा सुरू झाला. मराठ्यांनी आपले चढाईचे राजकारण स्थगित केले आणि पावसाळ्याच्या दिवसात शिवाजीविरुद्ध हालचाली करणे धोकादायक आहे हे मुघलांना माहित असल्यामुळे तेही स्वस्थ बसले. सुरतेची दुसरी लूट १६७०चा पावसाळा थांबला आणि शिवाजीने लगेच पुन्हा चढाईचे राजकारण सुरू केले. मुघलांना नामोहरम करण्यासाठी अचानकपणे सुरतेवर छापा घालण्याचे त्याने ठरविले. या सुरतेच्या स्वारीपाठीमागे शिवाजीचे प्रमुख दोन उद्देश होते. एक म्हणजे सुरतेवर स्वारी केल्यामुळे औरंगजेबाला जबरदस्त चढाईचे राजकारण ६१
धक्का देता येईल आणि मुघलांची नाचक्की होईल. दुसरा उद्देश म्हणजे आपल्याविरुद्ध मुघलांना मदत करण्यास उद्युक्त असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना धक्का बसेल. याशिवाय तिसरा उद्देश म्हणजे सुरतेची पुन्हा लूट करून संपत्ती आणता येईल. या दुसऱ्या स्वारीच्या वेळी शिवाजीने किनारपट्टीचा मार्ग निवडला होता. ३ व ४ ऑक्टोबर १६७० रोजी त्याने सुरतेवर अचानक हल्ला केला आणि सुमारे ६६ लाख रुपयांची लूट केली. या लुटीच्या वेळी शिवाजीने डच आणि इंग्रज यांना बहुधा अंतःस्थपणे कौल (संरक्षण) दिला असावा. कारण इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये आणि डचांच्याही पत्रव्यवहारामध्ये ‘शिवाजीने आम्हाला कसलाही त्रास दिला नाही' अशा आशयाचे उल्लेख आलेले आहेत. ही लूट परत घेऊन जाताना किनारपट्टीच्या ऐवजी खानदेश-बागलाणच्या मार्गाने जाण्याचे शिवाजीने ठरविले होते. वणी-दिंडोरीची लढाई सुरतेची स्वारी आटोपून आणि बरोबर लुटीची संपत्ती घेऊन शिवाजी खानदेश-बागलाण मार्गाने स्वराज्याकडे मार्गाक्रमण करू लागला. यावेळी खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान पन्नी हा होता. शिवाजीशी सामना देण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली. बागलाणातून मार्गाक्रमण करीत असताना शिवाजीला वणी-दिंडोरीच्या परिसरात दाऊदखानाने अडविले. १७ ऑक्टोबर १६७० रोजी कंचन-मंचनच्या घाटाजवळ मुघल आणि मराठे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धामध्ये मराठ्यांनी मुघलांचा दणदणीत पराभव केला. सभासदाने आपल्या बखरीमध्ये वणी-दिंडोरीच्या लढाईचे तपशिलाने वर्णन दिलेले आहे. मराठ्यांनी या लढाईत शानदार विजय संपादन केला मात्र औरंगजेबाचा दरबारी लेखक भीमसेन सक्सेना याने ‘या लढाईत मराठ्यांची हार झाली व ते पळून गेले' असे लिहून ठेवले आहे. दरबारी लेखक औरंगजेबाच्या समजुतीसाठी मुद्दाम खोटे लिहून ठेवत असावेत. बऱ्हाणपूरपर्यंत मराठे वणी-दिंडोरीची लढाई झाल्यानंतर शिवाजीने मुघलांबरोबरचे आक्रमक धोरण अधिक तीव्र केले. दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या बऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून औरंगजेबाला आणखी एक धक्का देण्याचे शिवाजीने ठरविले. या योजनेप्रमाणे डिसेंबर १६७० पर्यंत मराठ्यांनी थेट बऱ्हाणपूरपर्यंत मजल मारली. तेथून साधारणपणे दोन मैल अंतरावर असलेली बहादरपूरा ही पेठ मराठ्यांनी ६२ छत्रपती शिवाजी महाराज
लुटली. खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान याला ती बातमी कळल्यानंतर तो मोठ्या तयारीनिशी बऱ्हाणपूराकडे निघाला. परंतु मराठ्यांचा वेग एवढा मोठा होता की बहादूरपूरा लुटून अतिशय शिघ्र गतीने ते बागलाणपर्यंत पोहचले याचा अर्थ दाऊदखान बऱ्हाणपूरपर्यंत पोहचण्याअगोदरच त्याला झुकांडी देऊन मराठे खानदेश सुभ्यामध्ये घुसले आणि बागलाणमधील मुल्हेर किल्ल्याजवळची पेठ त्यांनी लुटली. ही बातमी कळल्यावर दाऊदखान अधिकच चवताळला आणि मोठ्या शिघ्र गतीने तो बागलाणकडे परतला. परंतु दरम्यान ५ जानेवारी १६७१ रोजी मराठ्यांनी मुल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. या सगळ्या बातम्या समजल्यामुळे औरंगजेब अतिशय बेचैन झालेला होता. शिवाजीचा पुढचा बंदोबस्त करण्यासाठी महाबतखान नावाच्या पराक्रमी सरदारास त्याने दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले. महाबतखानाची मोहीम जानेवारी १६७१ मध्ये बऱ्हाणपूर ओलांडून महाबतखान दक्षिणेत आला. औरंगाबादकडे जाताना खानदेशचा सुभेदार दाऊदखान याच्या बरोबर मोहिमेच्या आखणीबाबत त्याने चर्चा केली. नंतर औरंगाबादेत जाऊन शाहजादा मुअज्जम याला तो भेटला. आपल्या मोहिमेमध्ये बागलाण प्रदेशावर प्रथम वर्चस्व निर्माण करण्याचे धोरण त्याने आखले. त्याच्याबरोबर नव्या दमाचे सैन्य होते. त्याचप्रमाणे दिलेरखानही त्याच्या मदतीसाठी मोठे सैन्य घेऊन आला. शिवाय दाऊदखान पन्नी याचेही सैन्य त्याच्या दिमतीस होते. दाऊदखानच्या सैन्यास बागलाणमधील किल्ले लढविण्याचा अनुभव होता. अशाप्रकारे मोठी तयारी झाल्यावर महाबतखानाने वेगवेगळ्या तुकड्या बागलाणातील किल्ले जिंकून घेण्यासाठी पाठविल्या. अहिवंत, हातगड आणि मार्कंडा हे किल्ले अल्पावधीत जिंकून घेऊन मुघलांनी बागलाणमध्ये पुन्हा प्रभाव निर्माण केला. बागलाणमधील कण्हेरागड या किल्ल्याच्या पायथ्याशी मराठे व मुघल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धात रामजी पांगेरा या मराठी सरदाराने पराक्रमाची शर्थ केली. सभासद लिहितो, 'एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले'. त्याचा पराक्रम पाहून दिलेरखानही चकीत झाला असा उल्लेख सभासदाने आपल्या बखरीत केलेला आहे. बागलाणमधील महत्त्वाचे किल्ले ताब्यात आल्यानंतर महाबतखानाने आपल्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. या योजनेप्रमाणे मराठ्यांना बागलाणच्या प्रदेशात गुंतवून ठेवायचे आणि दिलेरखानाने शिवाजीचे प्रमुख केंद्र असलेल्या पुणे शहरावर हल्ला करायचा चढाईचे राजकारण ६३
असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे जानेवारी १६७२ च्या सुमारास दिलेरखानाच्या फौजा पुण्याकडे मार्गक्रमण करू लागल्या. परंतु यावेळी मराठ्यांनी आत्मसंरक्षणाची कडेकोट तयारी केलेली होती आणि बागलाणमधून मुघलांना माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी चौफेर हल्ले करण्याची योजना मराठ्यांनी आखली होती. प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य बागलाणमध्ये उतरले. अटीतटीचा प्रसंग आला तर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी बागलाणात जाऊन किल्ले जिंकण्यास मदत करावी असे ठरविण्यात आले. दरम्यान मुघलांतर्फे इखलासखान याने साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. यावेळी रोमहर्षक युद्ध झाले. मराठ्यांतर्फे सूर्यराव काकडे याने एवढा पराक्रम गाजविला की मुघलांना माघार घेण्याशिवाय इलाज उरला नाही. तथापि अचानकपणे तोफेचा एक गोळा सुर्यराव काकड्यास लागला आणि तो धारातिर्थी पतन पावला. परंतु मराठ्यांनी धीर सोडला नाही. ठरल्याप्रमाणे मोरोपंत पिंगळे कोकणातून प्रतापराव गुजराच्या मदतीसाठी बागलाणात आले. आणि या सर्वांनी मिळून मुघलांचा वेढा मोडून काढला. साल्हेरचा वेढा सोडून मुघलांनी माघार घेतली. फेब्रुवारी १६७२ मध्ये मुल्हेरचा किल्ला जिंकून घेऊन संपूर्ण बागलाणवर मराठ्यांनी पुन्हा पकड निर्माण केली. मराठ्यांच्या चौफेर पराक्रमाच्या वार्ता ऐकून दिलेरखानालाही पेचात सापडल्यासारखे वाटले. पुण्यापेक्षा बागलाणवरच प्रभाव निर्माण केला पाहिजे कारण तो प्रदेश आपल्या हातचा गेला तर दक्षिणेतील मुघल सत्ता धोक्यात येईल असा विचार करून दिलेरखानाने पुण्याची मोहिम सोडली आणि बागलाणकडे तो परतला. मुघलांची ही पिछेहाट झालेली पाहून औरंगजेब अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्याने मुअज्जम व महाबतखान यांना उत्तरेत परत बोलाविले. दिलेरखानाबाबतही तो नाराज झाला होता. मुघल फौजेतील अनेक मराठे सरदार शिवाजीच्या आश्रयाला येऊ लागले होते. सिद्दी हिलाल, जाधवराव इत्यादी सरदार आपापल्या फौजा घेऊन शिवाजीच्या आश्रयास आले. अशाप्रकारे १६७२ च्या प्रारंभी शिवाजीने मुघलांच्याच प्रदेशात विशेषतः बागलाण भागात आपले प्रभुत्व निर्माण केले आणि बागलाणातील किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची खानदेश बागलाणमार्गे पुण्याकडे होणारी आक्रमणे थोपविणे मराठ्यांना सहजशक्य झाले. छत्रसाल आणि शिवाजी शिवाजी आग्र्याहून परत आल्यानंतर त्याच्या पराक्रमाविषयी उत्तर भारतातील लोकांना मोठे कुतूहल वाटू लागले. विशेषतः रजपूतांना शिवाजीच्या धाडसी ६४ छत्रपती शिवाजी महाराज
आणि आक्रमक प्रवृत्तीचे विशेष कौतुक वाटले. चंपतराय बुंदेले याचा मुलगा छत्रसाल हा औरंगजेबाच्या प्रशासनामध्ये काम करीत होता. शिवाजीचे बाणेदार वर्तन पाहून तो बेहद खूष झाला. शिवाजीने दक्षिणेत ज्याप्रमाणे एक स्वतंत्र राज्य स्थापन केले, त्याप्रमाणे आपल्याला उत्तर भारतात करता येईल का असा एक महत्त्वाकांक्षी विचार त्याच्या मनामध्ये आला. या विचाराने तो एवढा भारला की त्याने मुघलांची मनसबदारी सोडून दिली आणि दक्षिणेत शिवाजीच्या भेटीसाठी तो आला. भीमसेन सक्सेना याने ‘तारिखे दिलकशा’ या ग्रंथामध्ये छत्रसाल आणि शिवाजी यांच्या भेटीचा तपशील दिलेला आहे. छत्रसालाने शिवाजीकडून प्रेरणा घेतली आणि उत्तर भारतात जाऊन संधी येताच स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा निर्धार केला. १६७२ पर्यंत शिवाजीने दक्षिणेतील आपल्या सर्व शत्रूंना नामोहरम करून सोडले. मुघलांशी शिवाजीचा सामना चालू असतांना आदिलशहा, कुतूबशहा, पोर्तुगीज आणि अन्य वखारवाले शिवाजीच्या विरोधात गेले नाहीत. आपले स्वराज्य चारी बाजूंनी सुरक्षित करण्यासाठी शिवाजी कसोशीने प्रयत्न करीत होता. कारण आपली सत्ता निर्वेध झाल्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करवून घेण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला होता. 🞎🞎🞎 चढाईचे राजकारण ६५
९. मुघलांची पिछेहाट रयतेला कौल आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजीने प्रथम आपल्या जवळच्या शत्रूंना सामोपचाराने आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे आदिलशहा आणि कुतुबशहा यांनी शिवाजीबरोबर तह करून सलोखा जोडला होता. बारदेशच्या स्वारीनंतर पोर्तुगीजही नरमले होते. त्यांनी शिवाजीला आशिया खंडातील श्रेष्ठ राजा मानून त्याच्याशी सलोख्याचा तह केला. इंग्रज, डच, आणि फ्रेंच यांनी तर नरमाईचेच धोरण स्वीकारले होते. फक्त मुघलांचा शिवाजीला प्रखर विरोध होता. तरीपण आग्र्याहून सुटून शिवाजी दक्षिणेत आल्यानंतर औरंगजेबाने शिवाजीशी वरकरणी सलोखा प्रस्थापित केला. शाहजादा मुअज्जम हा इ.स. १६६७च्या प्रारंभी दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाबादेस रूजू झाला. तो ऐषारामी प्रवृत्तीचा होता. आणि मराठ्यांबरोबर त्याला संघर्षही नको होता. एकूण शिवाजीच्या दृष्टीने इ.स. १६६७-६८ हे वर्ष बऱ्याच प्रमाणात शांततेचे गेले. सतत लढाया आणि पेचप्रसंग सुरू असल्यामुळे स्वराज्यात सुधारणा करण्याइतकी सवड शिवाजीला मिळाली नव्हती. विशेषतः शायिस्तेखानाच्या स्वारीनंतर आणि त्यानंतर जयसिंग- दिलेरखान यांच्या स्वारीमुळे स्वराज्यातील बराच मुलूख उध्वस्त झाला होता. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली होती. मुघलांनी काही गावेच्या गावे जाळून-पोळून भस्म केल्यामुळे लोक परागंदा झाले होते. गावेच्या गावे ओस पडली होती. लोकांची परिस्थिती शोचनीय झाल्यामुळे महसूलाचे उत्पन्न खूप घटले होते. अशाप्रकारे स्वराज्यामध्ये बिकट संकट निर्माण झाले होते. आपल्या स्वराज्याचा विस्तार करण्यापूर्वी आपल्या ताब्यात असलेल्या राज्याची घडी बसविणे, रयतेला कौल देऊन त्यांचे पुनर्वसन करणे आणि स्वराज्याच्या परिसरात शांतता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे याची शिवाजीला पूर्ण कल्पना होती. परंतु जयसिंगच्या स्वारीनंतर मुघलांशी राजकारण करण्यामुळे शिवाजीला स्वराज्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अवसर सापडला नाही. आग्र्याहून परतल्यानंतर १६६७ च्या अखेरपर्यंत बरेच स्थीरस्थावर झाले आणि शिवाजीला स्वराज्यात सुधारणा करण्यासाठी उसंत मिळाली. ६६
आपल्या सहकाऱ्यांपैकी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांना शेती सुधारणा आणि पुनर्वसन याकडे लक्ष देण्यास सांगितले. शिवाजीने रयतेला अभय दिले. परागंदा झालेल्या रयतेला आपापल्या गावी परत बोलावून ज्याच्या त्याच्या जमिनी ज्याला त्याला परत केल्या. लावणी-संचणीसाठी लोकांना उत्तेजन दिले. पडीत जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलती जाहीर केल्या. स्वराज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतसारा निश्चित करण्याचे काम अण्णाजी दत्तो यांचेकडे सोपविले. जे शेतकरी गरीब असतील त्यांना बी- बियाणे, नांगर पुरविणे, नांगरणीच्या कामासाठी बैल मिळवून देणे, इ. शेतकऱ्यांच्या हिताची कामे करून शिवाजीने रयतेचा विश्वास संपादन केला. आपल्या लष्कराला शिवाजीने असे आदेश दिले की शेतकऱ्यांना उपद्रव देऊ नये, त्यांच्या उभ्या पिकांची हानी करू नये, कोणी उपसर्ग केला तर राजे सहन करणार नाही, महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, 'रयतेचा वाटा रयतेला मिळालाच पाहिजे', अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचाही मोह धरता कामा नये. अशा प्रकारे स्वराज्यातील रयतेला संपूर्ण दिलासा देऊन शिवाजीने लोकांचा विश्वास तर संपादन केलाच, पण त्याचबरोबर हे राज्य रयतेचे राज्य आहे अशी भावना लोकांच्या मनात त्याने निर्माण केली. परिणाम असा झाला की, गावागावातून मावळे आणि इतर लोक स्वराज्यासाठी वाटेल तो त्याग करण्यास तयार झाले. कोकण भागात प्रभाव बागलाण भागात मुघलांची पिछेहाट शिवाजीने केली होती. परंतु याच काळात कोकणामध्ये शिवाजीच्या लहानसहान शत्रूंनी शिवाजीच्या प्रदेशात घुसखोरी सुरू केली. विशेषतः जव्हार आणि रामनगर येथील राजे शिवाजीच्या प्रदेशात अधिक्षेप करू लागले. जंजिऱ्याचे सिद्दी हे तर शिवाजीच्या दृष्टीने अस्तनीतील शत्रू होते. त्यांनी किनाऱ्यावरच्या प्रदेशात मोठा उपद्रव सुरू केला होता. सिद्दींची चढाई पाहून पोर्तुगिजांनाही नवे अवसान आले आणि त्यांनीही कोकणात उपद्व्याप सुरू केले. या शत्रूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिवाजीने मोरोपंतावर सोपविली होती. मोरोपंत खास सैन्यदल घेऊन कोकणात उतरले. प्रथम त्यांनी चौल आणि वसई ही पोर्तुगिजांची ठाणी आपल्या प्रभावाखाली आणली. त्यानंतर इ.स.१६७२ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी जव्हार जिंकून घेतले आणि पाठोपाठ रामनगरही ताब्यात घेतले. जव्हारचा राजा मुघलांच्या आश्रयाला गेला तर रामनगरचा राजा पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेला. मुघलांची पिछेहाट ६७
अशाप्रकारे कोकणात आपला प्रभाव निर्माण करून मोरोपंतांनी मोहीम यशस्वी केली. दोन शाही राजवटी आग्याहून परत आल्यानंतर शिवाजीने गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. इ.स. १६७२ पर्यंत या संबंधामध्ये कोणताही बिघाड झाला नाही. पण या वर्षी म्हणजे १६७२ मध्ये दोन्ही शाही राजवटींचे सुलतान मरण पावले आणि राजकारणाचे रंग पालटू लागले. २१ एप्रिल १६७२ रोजी गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्ला कुतुबशहा मृत्यू पावला. त्यानंतर सात महिन्यांनी म्हणजे २४ नोव्हेंबर १६७२ रोजी विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मृत्यू पावला. या दोन्ही सुलतानांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध जोडलेले होते. नवीन येणाऱ्या सुलतानाबरोबरही सलोखा कायम ठेवावा असे शिवाजीचे धोरण होते. त्याचप्रमाणे सुलतानपदासाठी होणाऱ्या संघर्षापासून आपण अलिप्त रहावे आणि कोणाचीही बाजू घेऊ नये असे तटस्थ धोरण शिवाजीने स्वीकारले होते. गोवळकोंड्याच्या सुलतानपदावर अब्दुल्ला कुतुबशहाचा जावई तानाशहा हा अब्दुल हसन हे नाव धारण करून विराजमान झाला. त्याचे अभिनंदन करण्यासाठी शिवाजीने निराजी पंतास गोवळकोंड्यास पाठविले. अब्दुल हसनने निराजीपंताचे स्वागत करून मराठ्यांशी सलोख्याचे संबंध यापुढेही अबाधित राहतील असे अभिवचन दिले आणि दरवर्षी एक लाख होन खंडणी देण्याचेही त्याने मान्य केले. विजापूरच्या आदिलशहाबाबत मात्र सलोख्याच्या संबंधाला उजाळा मिळू शकला नाही. कारण विजापूरच्या सुलतान पदावर सिकंदरशहा विराजमान झाला पण तो अल्पवयी असल्यामुळे राजकारणाची सुत्रे विजापूर दरबारातील खवासखान नावाच्या सरदाराकडे गेली. खवासखान हा शिवाजीचा पक्का विरोधक होता. अली आदिलशहाने शिवाजीबरोबर जे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते ते त्याला अजिबात मान्य नव्हते. म्हणून दरबारची सूत्रे आपल्या हाती आल्यानंतर त्याने शिवाजीविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले. मुघलांची मदत घेऊन शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करता येईल असे त्याला वाटत होते. शिवाजीविरुद्ध उठाव करून प्रथम औरंगजेबाची कृपा संपादन करावी म्हणजे मुघल फौजा आपल्या मदतीला येतीलच असा सल्ला दियानत पंडीत या हस्तकाने त्याला दिला होता. खवासखानाने मराठ्यांच्या प्रदेशावर स्वारी करण्याचे ठरविले. अर्थात त्यामुळे सलोखा संपला आणि संघर्ष सुरू झाला. ६८ छत्रपती शिवाजी महाराज
बहलोल खानाची स्वारी विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर शिवाजीने आक्रमक भूमिका घेतली. प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजीने पाठविले. मोठ्या हिकमतीने कोंडाजी फर्जंदने ६ मार्च १६७३ रोजी पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. या स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या 'पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. खवासखानाने बहलोलखान नावाच्या सरदारास मोठ्या तयारीनिशी शिवाजीविरुद्ध पाठविले. मुघल सरदार दिलेरखान याची मदत बहलोल खानाला मिळावी म्हणून खवासखानाने प्रयत्न सुरू केले. बहलोल खानची स्वारी येत आहे हे समजल्यावर शिवाजीने प्रतापरावाला बहलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले आणि त्याला निर्वाणीची आज्ञा केली की, 'बहलोलखान स्वराज्यामध्ये उपद्व्याप करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा निर्णायक पराभव करावा. आणि त्याला ठार मारून कायमचा बंदोबस्त करावा. शिवाजी महाराजांचा हा निर्वाणीचा इशारा मिळाल्यावर प्रतापराव गुजर आणि आनंदराव मोठ्या तयारीनिशी विजापूरी प्रदेशात घुसले. एप्रिल १६७३ मध्ये प्रतापरावाने बहलोलखानास उमराणीजवळ गाठले. याठिकाणी घनघोर युद्ध होऊन बहलोल खानाचा दणदणीत पराभव झाला. खान पकडला गेला. त्याने प्रतापरावची मनधरणी करून क्षमा मागितली. 'या उपरी त्रास देणार नाही, आम्ही तुमचे आहोत' अशा शब्दात खानाने विनविण्या केल्या. उदार अंतःकरणाच्या प्रतापराव गुजरने बहलोल खनाला सोडून दिले. ही गोष्ट समजताच शिवाजी संतप्त झाला. तुम्ही खानाला का सोडून दिले? म्हणून प्रतापरावाला दोष दिला. खानाचा पराभव केल्यानंतर प्रतापरावाने हुबळीपर्यंत मजल मारून इंग्रजांची वखार लुटली. प्रतापरावाचे कर्नाटकात पराक्रम चालू असतांना देशावरचे मोक्याच्या ठिकाणचे किल्ले घेण्याचे सत्र मराठ्यांनी सुरूच ठेवले होते. १६७३ च्या पावसाळ्यापर्यंत परळी आणि सातारा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. मराठ्यांचे हे सारे पराक्रम ऐकून आदिलशहाचा सुत्रधार खवासखान अतिशय संतप्त झाला. बहलोल खानाची त्याने निर्भत्सना केली. तेव्हा पन्हाळा जिंकून घेण्याचा निर्धार बहलोल खानाने केला. त्यासाठी त्याने कोल्हापूरजवळ छावणी केली. ही बातमी समजताच शिवाजीने प्रतापरावाला मुघलांची पिछेहाट ६९
४. शाइस्ताखान पराभव, सुरत विजय व पुरन्दर सन्धि
बोलविले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की ‘बहलोलखानाला बुडवून फत्ते करणे, नाहीतर तोंड न दाखविणे’ शिवाजीने निर्वाणीचा संदेश दिल्यानंतर प्रतापराव बहलोलखानाचा निकाल लावण्याचा मनसुबा रचून कोल्हापूरकडे निघाला. ज्याला आपण क्षमा केली होती तोच आपल्यावर उलटलेला आहे हे पाहून प्रतापराव उद्विग्न झालेला होता. संतापाने तो बेभान झालेला होता. कोल्हापूरच्या दक्षिणेस चाळीस मैलावर असलेल्या नेसरीच्या खिंडीत प्रतापरावाने बहलोल खानाला गाठले. या दिवशी तारीख होती २४ फेब्रुवारी १६७४. नेसरीच्या खिंडीपर्यंत पोहचल्यावर आपल्या सैन्याची पाहणी करीत असलेल्या बहलोल खानाला त्याने पाहिले. खान दिसल्यावर प्रतापराव बेभान झाला. आणि कोणताही विचार न करता बरोबर असलेल्या केवळ ६ सैनिकांना घेऊन तो बहलोल खानाच्या सैन्यात मोठ्या त्वेषाने घुसला. हे ७ मराठे वीर कापाकापी करत बरेच अंतर चालून गेले. पण बहलोल खानाचे सैन्य प्रचंड होते. हे ६ वीर आणि प्रतापराव लढता लढता धारातिर्थी पतन पावले. नारायण शेणवी याने मुंबईकर इंग्रजांना ४ एप्रिल १६७४ रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये प्रतापरावाच्या साहसाची माहिती कळवलेली आढळते. प्रतापरावला मारल्यामुळे बहलोल खानाला मोठा हर्ष झाला परंतु त्याचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण आनंदरावाने मोठ्या त्वेषाने खानाच्या फौजेवर हल्ला केला त्याने बहलोल खानास माघार घेण्यास भाग पाडले. दरम्यान दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीस धावून आला. आदिलशाही आणि मुघली फौज एकत्र आल्या. तेव्हा गनिमी कावा लढवून आनंदरावाने आपला मार्ग बदलला व तो थेट बंकापूरपर्यंत गेला. बंकापूरजवळ असलेले संपगाव आनंदरावाने लुटले. हे संपगाव बहलोल खानाच्या जहागिरीत मोडत असल्याने आनंदरावाने लुटले. बंकापूरजवळ झालेल्या लढाईत आदिलशाही सैन्याचा संपूर्ण पराभव झाला. विजय संपादन करून आणि मोठी लूट घेऊन आनंदराव जेव्हा शिवाजीकडे आला तेव्हा त्याची पाठ थोपटून शिवाजीने त्याला हंबीरराव हा किताब दिला आणि त्याला सेनापती पदावर नेमले. प्रतापराव पडल्याचे दुःख शिवाजीला फार झाले. प्रतापराव गेल्यामुळे आपली एक बाजू गेली असे उद्गार शिवाजीने काढल्याचे सभासद बखरीत नमूद केलेले आहे. बहादुरखानाची स्वारी दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीला धावून आला याचा उल्लेख वर केलेला आहे. परंतु बहलोल व दिलेर एकत्र येऊनही मराठ्यांविरुद्ध त्यांना ७० छत्रपती शिवाजी महाराज
यश मिळू शकले नाही. उलट मराठ्यांचे पराक्रम वाढत चालले. इ. स. १६७३ च्या ऑक्टोबर महिन्यात शिवाजीने पांडवगड जिंकून घेतला आणि तेथून थेट त्याने कारवारपर्यंत धडक मारली. शिवाजीचे हे सर्व पराक्रम ऐकून औरंगजेबाची चीड वाढत चालली. दिलेरखानावरचा त्याचा विश्वास उडाला. शाहजादा मुअज्जम कडून कोणतीच कामगिरी होत नव्हती. त्यामुळे दक्षिणेचे राजकारण हा औरंगजेबाच्या चिंतेचा विषय झाला होता. तेव्हा जानेवारी १६७३ मध्ये बहादूरखान या विश्वासू सरदारास दक्षिणेच्या मोहिमेवर औरंगजेबाने पाठविले. दिलेरखान व बहादूरखान दोघे एकत्र आले आणि मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची योजना त्यांनी मांडली. परंतु कोणत्या बाजूने आक्रमण करावे याचा निर्णयच त्यांना लवकर घेता आला नाही दरम्यान एका चकमकीत शिवाजीने मुघलांचे एक हजार सैन्य गारद केले. त्यामुळे तर बहादूरखानाचे धाबेच दणाणले. दिलेरखानाला वारंवार अपयश आलेले पाहून औरंगजेबाने त्याला उत्तरेत बोलाविले. त्यामुळे मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची जबाबदारी एकट्या बहादूरखानांवर पडली. बहादूरखान लोभी वृत्तीचा असल्यामुळे त्याला काहीतरी आमिष दाखविले की त्याच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तो गप्प बसले अशी शिवाजीची खात्री होती. आणि म्हणून, “बहादूरखान पेंडीचे गुरू आहेत, त्याचा गुमान काय?” असे मतप्रदर्शन शिवाजीने केल्याचे सभासदाने नमूद करून ठेवलेले आहे. बहलोलखानाला पराभूत केल्यानंतर शिवाजीने दिलेरखान व बहादूरखान यांचीही वाट लावली. आदिलशाही दरबार व दिल्लीचा दरबार शिवाजीच्या पराक्रमामुळे भयचकीत झाला. औरंगजेब अधिक अस्वस्थ झाला आणि विजापूरच्या खवासखानाची झोप उडाली. पोतुगिजांनी तर केव्हाच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. डच, फ्रेंच आणि इंग्रज आपला व्यापार सांभाळण्यासाठी शिवाजीला मान देऊ लागले होते. कुतुबशहाशी तर शिवाजीचे चांगले सख्य होते. जंजिऱ्याचे सिद्दी काहीतरी कुरापत काढून मराठ्यांच्या प्रदेशात घुसखोरी करीत होते. परंतु किनारी प्रदेशात शिवाजीने एवढी चोख व्यवस्था केली होती की सिद्दीही नामोहरम होऊन स्वस्थ बसले. थोडक्यात इ. स. १६७४ च्या पूर्वार्धात शिवाजीचे सर्व शत्रू नामोहरम झाले होते आणि नरमले होते. राज्याभिषेक करण्यासाठी हीच मोठी संधी आहे असा विचार करून शिवाजीने गागाभट्टाशी विचारविनिमय करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित केले. □□□ मुघलांची पिछेहाट ७१
१०. शिवराज्याभिषेक राज्याभिषेकाचे प्रयोजन शिवाजीने स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आपल्या स्वतंत्र राज्याची कोणतीही घोषणा केली नव्हती. १६३६ मध्ये आदिलशहाची नोकरी पत्करून शहाजी जेव्हा कर्नाटकाकडे गेला त्यावेळी पुणे जहागिरीचा कारभार त्याने बालशिवाजीकडे सोपविला होता. या मूळ जहागिरीच्या आधारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीला सुरुवात केली. शिवाजीच्या जहागिरीचा म्हणजे राज्याचा विस्तार होत आहे हे पाहून आदिलशहा आणि मुघल शिवाजीच्या हेतूविषयी साशंक झाले. शिवाजी केवळ जहागिरीचा विस्तार करीत नसून स्वतंत्र राज्याचीच उभारणी करीत आहे याची खात्री १६६५ पर्यंत मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज आणि इतर वखारवाले यांना पटली. विशेषतः औरंगजेबाला शिवाजीचा हेतू धोकादायक असल्याचे लक्षात आले आणि म्हणून मिर्झाराजे जयसिंगाला पाठवून त्याने शिवाजीचे राज्यच नष्टप्राय करण्याची योजना आखली. ती यशस्वी झाली नाही, तेव्हा शिवाजीला उत्तरेत बोलावून घेऊन त्याला कैदेत टाकण्याचा डाव औरंगजेबाने साधला. पण त्यातूनही शिवाजी सहीसलामत निसटला आणि दक्षिणेत परत येऊन त्याने आपल्या राज्याचा चौफेर विस्तार केला. मुघलांसहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला. पाश्चात्त्य वखारवाल्यांना नामोहरम केले. आदिलशहा व कुतुबशहा यांना आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले. आपले राज्य आता निर्वेध झाले आहे अशी खात्री पटल्यावर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. मध्ययुगीन राज्यपद्धतीप्रमाणे वंशपरंपरा चालणारे राज्य स्थापन करणे शिवाजीला आवश्यक होते. मोठ्या चतुराईने आणि कौशल्याने, तसेच अप्रतिम पराक्रमाने, प्रसंगी जीवघेणे धाडस करून किंवा जीवाची बाजी लावून शिवाजीने स्वराज्याची उभारणी केली होती. या कार्यासाठी साधुसंतांचे आशीर्वाद मिळवून देशावरील व कोकणातील देसाई, देशमुखांचा विश्वास संपादन केला होता. त्यांनाही स्वराज्यकार्यात सहभागी करून घेतले. आपल्या राज्यातील रयतेला सुखी ७२
करण्यासाठी संकल्प शिवाजीने सोडला होता. परकीयांच्या राज्यात, विशेषतः मुघलांच्या राज्यात गोरगरीब जनतेवर भयानक अन्याय होत होता. स्त्रियांची विटंबना होत होती आणि सज्जन साधुसंतांची अवहेलना होत होती. हा सर्व अन्याय निपटून काढण्यासाठी शिवाजीने स्वराज्य उभारण्याचा खटाटोप केलेला होता. आता हे राज्य स्थिर झाल्यामुळे भावी काळात राज्याचा वारस निश्चित होण्यासाठी शिवाजीला स्वतंत्र राजा म्हणून जाहिर करून घेणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याचा एकमेव मार्ग शिवाजीपुढे होता. राजमाता जिजाबाई आणि शिवाजीचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून मराठा राजवंश स्थापन करण्यासाठी शिवाजीला राज्याभिषेक करवून घेण्यासाठी उद्युक्त केले असावे. मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये म्हटले आहे की, ‘महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणोन छत्र सिंहासन करावे, राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदय जाहाला.’ राज्याभिषेक करून घेण्यामागे शिवाजीचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे स्वतंत्र राजा म्हणून त्याला अभिषेकाने मान्यता मिळणार होती आणि त्यानंतर त्याच्या शत्रूंनाही त्याला राजा म्हणून मानणे भाग पडणार होते. शिवाय जे अन्य शाही दरबारात नोकरीला होते ते मराठे सरदार शिवाजीला आपल्या बरोबरीचे किंवा कमीप्रतीचे मानत असत. अभिषेकानंतर त्यांनाही शिवाजीला स्वतंत्र राजा म्हणून मानणे भाग पडणार होते. शिवाजीचा दुसरा उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील वतने, इनामे, वृत्ती देण्याचा अधिकार त्याला अभिषेकाने प्राप्त होणार होता. शिवाय मध्ययुगीन राज्यप्रशासन पद्धतीप्रमाणे शिवाजीचे राज्यही वंशपरंपरेने चालणार होते. राज्याभिषेक करण्याचे निश्चित झाल्यावर किल्ले रायगड हे ठिकाण राजधानीसाठी शिवाजीने निवडले. हिरोजी इंदुलकर या स्थापत्यविशारदाकडे रायगडावर राजमहाल, राण्यांचे आणि राजपुत्रांचे महाल, मंत्र्यांचे वाडे आणि इतर इमारती बांधण्याचे काम दिले. या मोठ्या इमारतींशिवाय पाण्यासाठी प्रशस्त तलाव, लहानमोठ्या अधिकाऱ्यांसाठी घरे, बाजारपेठ, दारूची कोठारे, गजशाळा, अंबरखाना इत्यादी इमारती उभारून राजधानीचे वैभव वाढविण्यात आले. त्याचप्रमाणे जगदिश्वराचे मंदिर शिवाजीच्या आज्ञेप्रमाणे हिरोजी इंदुलकरने उभारले. अशाप्रकारे राजधानी सजविली. राज्याभिषेकाचा मुहूर्त गागाभट्टाने काढला. ‘राज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘तुलापुरुषदानविधी’ या दोन पोथ्या गागाभट्टाने मुद्दाम तयार केल्या. १६७४च्या प्रारंभी राजधानी रायगडावर राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू झाली. शिवराज्याभिषेक ७३